Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘एमएचटी-सीईटी’: वेळेचे नियोजन हुकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अणि कृषी पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी गुरुवारी प्रवेश पूर्व परीक्षा (एमएचटी-सीईटी) घेण्यात आली. मराठवाड्यातून ७२ हजार ९२५ पैकी सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अनेक परीक्षा केंद्रावरील हॉलमध्ये घड्याळ नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करता आले नाही. तर, जिल्हा प्रशासनानेही परीक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. 'जेईई मेन्स'च्या धर्तीवर झालेल्या परीक्षेत फिजीक्स अवघड ठरल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

राज्य सामाईक प्रवेश कक्षातर्फे घेण्यात आली. दोन सत्रात तीन पेपर झाले. सकाळी ९ वाजेपासून विद्यार्थी, पालकांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. राज्यपातळीवरील या परीक्षेत 'नीट' प्रमाणे खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला परंतु तेवढे गांभीर्य दिसले नाही. जिल्हा प्रशासनाची जबाबदारी परीक्षेची होती, परंतु निरीक्षक वगळता कोणी परीक्षा केंद्राकडे फिरकले नसल्याचे चित्र होते. विद्यार्थ्यांना बॅग, घड्याळ प्रवेशद्वारावरच काढून ठेवण्यात आल्या, परंतु परीक्षा हॉलमध्ये घड्याळ नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करताना अडचणी आल्या. अशा परीक्षांमध्ये वेळेचे नियोजन किती महत्त्वाचे असते याचे भान ना प्रशासनाला ना परीक्षा केंद्रांना असल्याचे समोर आले. त्याबाबत अनेक केंद्रावर विद्यार्थ्यांनी तोंडी तक्रारही मांडण्याचा प्रयत्न केला. एमआयटी हायस्कूल, देवगिरी अशा केंद्रावर विद्यार्थ्यांनी सांगितले. सकाळचा पेपर १० ते ११.३० वाजता मॅथ्स विषयाचा त्यानंतर १२.३० ते २ वेळेत फिजिक्स आणि केमिस्ट्री तर, तिसरा पेपर ३ ते ४.३० या दरम्यान बायोलॉजीचा झाला. मराठवाड्यातून २३१ परीक्षा केंद्राहून परीक्षा झाली. परीक्षेला ७२ हजार ९२५ विद्यार्थी नोंदणी केली होती. यातील औरंगाबादमधून १८ हजार ३३१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहरात ५३ सेंटरवरून परीक्षा झाली. नोंदणी केलेल्यापैकी ९७ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

'फिजिक्स'ने वाढवले टेन्शन

पेपरमध्ये फिजीक्स विषय आवघड गेल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. यंदा सीईटीतील प्रश्नांची काठिण्य पातळी जेईई मेनच्या प्रमाणे असेल असे सांगण्यात आले. प्रश्नपत्रिकेतील प्रश्न इयत्ता बारावी अभ्यासक्रमावर ८० तर, २० टक्के अकरावी अभ्यासक्रमावर होते. विद्यार्थ्यांना बदलाबाबत उत्सुकता होती. प्रश्नपत्रिकेत फिजीक्सचा पेपर अवघड असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

...

औरंगाबाद विभाग विषयनिहाय उपस्थिती...

पेपर....... नोंदणी......उपस्थिती

गणित..... २६४४६....२५६४८

भौतिक, रसायन.. ३९३९९....३८३०६

जीवशास्त्र.............३३०६१.....३२१२०

..

'सीईटी'तील बदलाबाबत कल्पना होती त्यानुसार तयारी केली होती. सांख्यिकी प्रश्नांची संख्या अधिक होती, परंतु पेपर सोपा होता.

राजेश चौधरी

..

बारावीसह अकरावी अभ्यासक्रमातील प्रश्न हा बदल छान वाटला. मॅथ्स, केमिस्ट्रीपेक्षा फिजिक्सचे प्रश्न सोडविण्यात अधिकचा वेळ गेला.

ईश्वर वाघ

..

फिजिक्स विषयातील प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक होती. त्यामुळे ते सोडविताना अडचण आली. विशेषत: त्यातील सांख्यिकी प्रश्नांची संख्याही अधिक होती.

प्रतीक्षा म्हस्के

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गॅलेक्सी एजन्सीकडून कर्मचाऱ्यांची पिळवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेला संगणक ऑपरेटर पुरवणाऱ्या गॅलेक्सी एजन्सीने कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरू केली असून, याविरोधात कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यावर एजन्सी संचालकाला चोवीस तासांची नोटीस देऊन हजर करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी दिले आहेत.

महापालिकेत संगणक ऑपरेटर पुरविण्याचे कंत्राट गॅलेक्सी एजन्सीला देण्यात आले आहे. या एजन्सीच्या माध्यमातून १२५ कर्मचारी काम करतात. एका कर्मचाऱ्यासाठी महापालिका एजन्सीला सोळा हजार रुपये देते, परंतु चार महिन्यांपासून एजन्सीने कर्मचाऱ्यांचा पगार केला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी महापौरांची भेट घेतली व आपल्या व्यथा मांडल्या. महापौरांनी तातडीने बैठक आयोजित केली. बैठकीला उपमहापौर विजय औताडे, कामगार अधिकारी अपर्णा थेटे, मुख्य लेखाधिकारी राम साळुंके व अन्य अधिकारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्याचे आदेश यावेळी महापौरांनी दिले. 'पीएफ' व 'ईएसआय'चे रेकॉर्ड मागवा व ते सादर करा असेही अधिकाऱ्यांना सांगितले.

\Bसंचालक कोण?

\Bगॅलेक्सी एजन्सीचा संचालक कोण असा प्रश्न यावेळी चर्चिला आला तेव्हा कामगार अधिकारी थेटे यांनी कानावर हात ठेवले. एजन्सीचा पर्यवेक्षक माझ्याकडे बिल घेऊन येतो. एजन्सीचा संचालक कोण आहे हे माहिती नाही असे अजब उत्तर दिले. त्यानंतर एजन्सीच्या नावे नोटीस पाठवून त्या संचालकाला चोवीस तासात हजर व्हायला सांगा असे महापौर म्हणाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेतील एक कर्मचारीच या संस्थेचा संचालक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतवस्तीवरून दागिन्यांची चोरी

$
0
0

वैजापूर: तालुक्यातील दहेगाव येथे घरात घुसून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण एक लाख एक हजार ३२ रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. भीमसींग हारसिंग बैनाडे हे दहेगाव शिवारात शेतात घर करून राहतात. ते रात्री घराबाहेर झोपलेले असताना चोरट्यांनी पेटीत ठेवलेले ३० हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी बैनाडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्याविरूद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीए’ परीक्षा सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'सीए' अभ्यासक्रमाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. १६ मेपर्यंत या परीक्षा होणार आहेत. गुरुवारी शहरातील दोन केंद्रावर अंतिम वर्षाच्या ३०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दोन मेपासून सुरू झालेल्या परीक्षेत आयपीसीसी, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे वेळापत्रक आहे. 'चार्टड अकाउंटण्ट' अभ्यासक्रमाच्या परीक्षेत गुरुवारी देवगिरी कॉलेजमधील परीक्षा केंद्राहून १६७ परीक्षार्थी होते तर सरस्वती भुवन परीक्षा केंद्राहून १३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. शुक्रवारी 'आयपीसीसी'चे विद्यार्थी परीक्षा देतील. सीए अभ्यासक्रम पूर्ण करून करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. औरंगाबादमध्येही विद्यार्थ्यांची संख्या मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक भरतीसाठीचे ‘पवित्र’ अंतिम टप्प्यात

$
0
0

शिक्षक भरतीकडे बेरोजगारांचे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षकभरतीची कार्यपद्धती कशी असेल हे स्पष्ट करणारे 'पवित्र' पोर्टल अंतिम टप्प्यात आहे. पोर्टलच्या तांत्रिक कार्यपद्धतीच्या तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत सुसूत्रता येणार आहे.

शिक्षकांच्या भरतीत संस्थास्तरावर होणारे गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी शिक्षण भरती शासनस्तरावरून करण्याचा हालचाली झाल्या, परंतु त्याला मूर्त स्वरूप मिळाले नाही. त्यात 'पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टिचर रिक्य्रूटमेंट' (पवित्र) पोर्टल सुरू करण्याची घोषणा झाली, परंतु तेही प्रत्यक्षात उतरले नव्हते. अखेर त्याला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. त्याबाबतची अंतिम तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोर्टलवरूनच राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया होणार आहे. शासकीयसह अनुदानित, अशंत: अनुदानित, विनाअनुदानित शाळांची भरतीची प्रक्रिया याच माध्यमातून होणार आहे. अभियोग्यता आणि बुद्धीमापन चाचणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. यातूनच शिक्षक सेवेकांच्या गुणवत्तेनुसार नियुक्ती होतील, अशी प्रक्रिया केली जात आहे. या पोर्टलच्या तांत्रिक बाजू आणि येणाऱ्या अडचणींबाबत दोन दिवसांची बैठक संचालक पातळीवर घेण्यात आली. हे पोर्टल अंतिम टप्प्यात असून काही दिवसात त्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बेरोजगारांचे लक्ष…

राज्यात डीटीएड, बीएडधारक बेरोजगारांची संख्या मोठी आहे. सुमारे १२ लाखांपेक्षा अधिक संख्या असल्याचे सांगण्यात येते. राज्यात आठ वर्षांत शिक्षक भरतीची प्रक्रिया झालेली नाही. त्यात खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांमुळे बेरोगारांमध्ये नाराजी आहे. अशावेळी शिक्षक भरतीची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने व्हावी अशी राज्यातील बेरोजगारांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे.

शिक्षक भरतीची प्रक्रियेत सुसूत्रता येण्याची मोठी गरज आहे. त्यासाठी पवित्र हे पोर्टल उपयुक्त ठरेल असे आम्हाला वाटते, परंतु शासनाने भरतीची प्रक्रिया तात्काळ सुरू करायला हवी. बेरोजगारांची संख्या लाखोंमध्ये आहे आणि भरतीची प्रक्रिया ठप्प आहे.

संतोष मगर, अध्यक्ष,

डीटीएड, बीएड बेरोजगार विद्यार्थी कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंगल बातमी

$
0
0

नाथ प्रांगणमधील

डीपीला आग

औरंगाबाद :

शिवाजीनगर रोडवरील जानकी हॉटेलच्या पाठीमागे नाथ प्रागंण येथे असलेल्या विजेच्या डीपीला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे आरबी हिल्स सह अन्य परिसरातील वीज पुरवठा बंद झाला. या डीपीला दोन दिवसांपूर्वी नवीन केबल कनेक्शन करण्यात आले होते. नवीन कनेक्शन जोडल्यानंतर अवघ्या काही तासांतच डीपीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी डीपीचा वीज पुरवठा खंडित केला असून रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधीत कर्मचाऱ्यांचे काम सुरू होते, अशी माहिती महावितरण कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

…………

महाराष्ट्र सेना आटो रिक्षा युनियन नाम फलक

औरंगाबाद :

महाराष्ट्र सेना अटो रिक्षा युनियनची रेल्वे स्टेशनच्या नाम फलकाचे उदघाटन राजु साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युनियचे शहर अध्यक्ष शेख अख्तर, अयुब पटेल, अखिल हुसेन, सय्यद इरशाद, सुनिल खरात, नंदकुमार अंभोरे, राजु भिंगारदेव, आभी जाधव यांची उपस्थिती होती. या नाम फलकाचे उद्घाटन रविवारी ६ मे रोजी करण्यात आले आहे.

…………

दलित सुधार योजनेच्या निर्णयाची अमलबजावणी करा

औरंगाबाद :

दलित सुधार योजनेतंर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक असलेल्या सुशिक्षित बेरोजगार अभियंते व मजूर सहकारी संस्थेला काम प्राधान्याने देण्याची मागणी क्रांती संघटनेतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांना देण्यात आले. या मागणीची दखल घेतली नाही तर आंदोलन करण्यात येणार असल्याचाही इशारा संघटनेतर्फे देण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे बंडू कांबळे, नितीन झाल्टे, गुरमित गिल, रोहित यादव यांच्यासह अनय कार्यकर्ते उपस्थितीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आइक कँडी फॅक्टरीची वीजचोरी पकडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

शहरातील पांढरी मोहल्ला परिसरात महावितरणच्या पथकाने आइस कँडी फॅक्टरीवर कारवाई करत ४९ हजार ५७५ रुपयांची वीजचोरी पकडली. या कंपनीच्या मालकावर विद्यूत कायदा २००५च्या कलम १३५ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या ग्राहकांचे वीज मिटर पोलवर बसवण्याचे संकेत महावितरणने दिले आहे.

शहरातील थ्री फेज ग्राहक तपासणीत पांढरी मोहल्ला परिसरात बुधवारी 'ओल्ड शोले' नावाच्या आइस कॅन्डी फॅक्टरीच्या शेख युनूस शेख इब्राहिम यांच्या नावे पाच एच. पी.चे थ्री फेज विद्युत कनेक्शन आहे. मिटर तपासणीत त्या मिटरला येणाऱ्या सर्व्हिस वायरला टर्मिनलमध्ये बायपास करून थेट वीज वापरत असल्याचे आढळले. घटनास्थळाचा पंचनामा, स्थळ पाहणी अहवाल, संबंधित छायाचित्रे घेऊन सहाय्यक अभियंता बाळासाहेब बर्वे, हरीश महल्ले यांनी उपकार्यकारी अभियंता विजय दुसाने यांच्या समक्ष केला. यामध्ये ४९ हजार ५३७ रुपयांची ६१०६ युनिटची चोरी आढळून आली. महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार कारवाईचा मोहीम महावितरणकडून राबवण्यात येत आहे.

\B१५ टक्के वीजगळती \B

कन्नड शहराचा समावेश गतीमान उर्जा विकास आराखड्यात असल्याने विद्युत वाहिनीवरील वीज तूट व गळती १५ टक्क्याच्या खाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे वीजचोरी पकडण्याची मोहीम तीव्र करून कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विजय दुसाने यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यातील गणोरी येथील एका मेंढपाळाच्या ११ मेंढ्या सहा दिवसांत अज्ञात रोगाने दगावल्या आहेत. शिवाय २१ मेंढ्यांना रोगाची लागण झाल्याने त्याही काही दिवसांत दगावण्याची शक्यता आहे. मात्र, जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग आणि राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने टोलवाटोलवी करत आहे.

एक महिन्यापासून शेळ्या-मेंढ्याना अज्ञात रोगाची लागण झाली आहे. जनावरांना कोणता उपचार करावा, हे पशुपालकांना कळत नाही. परिणामी तालुक्यातील शासकीय पशु वैद्य रोग नियंत्रणात आणण्यासाठी उपाय करत नसल्याचा आरोप गणोरी येथील मेंढपाळ देविदास काळे यांनी केला आहे. या संदर्भात संपर्क केला असता औरंगाबाद येथील पशुसंवर्धन उपायुक्त यांनी बैठकीत असल्याचे सांगितले. मेंढ्यांच्या आजाराविषयी काही उपाय करायचा असेल, तर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागात संपर्क करा, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. एस. कांबळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हा विषय राज्याच्या विभागाकडे टोलवला. गणोरी येथे राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा दवाखाना आहे. त्यांच्याशी संपर्क करावा, असे त्यांनी सांगितले.

\Bमेंढपाळाचे नुकसान \B

देवीदास काळे यांच्याकडे ७५ मेंढ्यांचा कळप असून त्यापैकी ३२ मेंढ्यांना अज्ञात रोगाची लागण झाली आहे. त्यापैकी ११ मेंढ्या दगावल्या असून २१ मेंढ्या रोगग्रस्त आहेत. या मेंढपाळाचे नुकसान झाले असून औषधीवर सुमारे पंधरा हजार रुपये खर्च केल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गृह कर्जाचे आमिष; चहाविक्रेत्यास गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गृह कर्जाचे आमिष दाखवत सायबर ठकांनी एका चहा विक्रेत्याला एक लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार एप्रिलमध्ये घडला. याप्रकरणी तिघांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागेश्वरवाडी, सुंदरनगर येथील राजू बाबुराव शिंदे (वय ४८) यांची चहाची टपरी आहे. त्यांच्या पत्नीच्या मोबाइलवर ५ एप्रिल रोजी अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. समोरून बोलणाऱ्या महिलेने ग्लोबल टेक फायनान्समधून बोलत असल्याचे सांगितले. तुम्हाला पर्सनल लोन, वाहन, गृह कर्ज पाहिजे का, अशी विचारणा केली. शिंदे यांना घर विकत घ्यायचे असल्याने पैशाची गरज होती. त्यांनी गृह कर्जासाठी होकार दर्शवला. त्या महिलने सात लाख रुपये कर्ज देण्याची थाप मारली. या कर्जासाठी वेगवेगळी कारणे दाखवून वेळोवेळी एकूण एक लाख २० हजार रुपये त्यांनी दिलेल्या बँक खात्यात भरण्यास भाग पाडले. हा प्रकार ५ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान सुरू होता. या काळात शिंदे यांच्यासोबत या महिलेशिवाय मनीष मेहता व अनुराग नावाच्या तरुणांने संभाषण केले. या तिघांचा २४ एप्रिलनंतर संपर्क बंद झाला. शिंदे यांनी वारंवार फोन करूनही संपर्क झाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून संशयित आरोपी मनीष मेहता, अनुराग व एक महिला या ग्लोबल टेक फायनान्स लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी हे पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा दिसल्यास कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यालगत कचरा दिसल्यास व कचऱ्याचे शंभर टक्के विलगीकरण साध्य न केल्यास संबंधित वॉर्ड व नियंत्रण अधिकाऱ्यावर कडक कारवाई केली करू, असा इशारा जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त उदय चौदरी यांनी गुरुवारी सायंकाळी एक आदेश काढून दिला आहे. तसेच वॉर्डनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे की, रस्त्यावर व खुल्या जागेवर साचलेल्या कचऱ्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. कचऱ्यावर तत्काळ प्रक्रिया करणे गरजेचे आहे. यासाठी चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी या महापालिकेच्या मालकीच्या जागांवर १० मे पासून ओला कचरा स्थलांतर करून प्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ११ ते १५ मे या पाच दिवसांसाठी फक्त रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा निश्चित ठिकाणी स्थलांतरित करून तेथेच वर्गीकरण करून घ्यावे व प्रक्रिया करावी. १६ मेनंतर संनियंत्रण समितीने निश्चित केलेल्या ठिकाणी अथवा शहरात कुठेही कचरा आढळून आल्यास व विलगीकरण शंभर टक्के साध्य न केल्यास संबंधित वॉर्ड अधिकारी, नियंत्रण अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.

\Bवार्डनिहाय अधिकारी नियुक्त

\B- झोन क्रमांक १ - सी. एम. अभंग (नियंत्रण अधिकारी), भालचंद्र पैठणे (वॉर्ड अधिकारी), झोन क्रमांक २ - सिकंदर अली (नियंत्रण अधिकारी), असलम कादरी ( वॉर्ड अधिकारी), झोन क्रमांक ३ - अफसर सिद्दिकी (नियंत्रण अधिकारी), मुकुंद कुलकर्णी (वॉर्ड अधिकारी), झोन क्रमांक ४ - हेमंत कोल्हे (नियंत्रण अधिकारी), अजमत खान (वॉर्ड अधिकारी), झोन क्रमांक ५ - विजय पाटील (नियंत्रण अधिकारी), सविता खरपे (वॉर्ड अधिकारी), झोन क्रमांक ६ - डॉ. नीता पाडळकर (नियंत्रण अधिकारी), मीरा चव्हाण (वॉर्ड अधिकारी), झोन क्रमांक ७ - डॉ. बी. एस. नाईकवाडे (नियंत्रण अधिकारी), महावीर पाटणी (वॉर्ड अधिकारी), झोन क्रमांक ८ - दीपाराणी देवतराज (नियंत्रण अधिकारी), मनोहर सुरे ( वॉर्ड अधिकारी), झोन क्रमांक ९ - वसंत निकम ( नियंत्रण अधिकारी), एस. आर. जरारे (वॉर्ड अधिकारी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घाटी’चा पाय खोलात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (घाटी) अनेक प्रकारच्या समस्यांपासून अनेक वर्षांपासून सुटकाच होत नाही. त्याचा फटका गोरगरीब जनतेला बसत आहे. एकीकडे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची दीडशे पदे कित्येक वर्षापासून रिक्त आहेत, तर दुसरीकडे उपलब्ध कर्मचारी किती काम करतात, असा प्रश्न आहे. त्यामुळे रुग्णांना दाखल करण्यापासून, वॉर्डात हलविणे, तपासण्यांना नेणे, शवविच्छेदनगृहात नेणे यासाठी नातेवाईकांनाच स्ट्रेचर ढकलावे लागत आहेत. निम्म्यापेक्षा जास्त औषधी, साहित्यदेखील रुग्णांना विकत आणावे लागत आहे.

घाटी हॉस्पिटलमध्ये ११७७ खाटा असून नेहमीच दोन ते अडीच हजार रुग्ण दाखल असतात. बहुतांश वॉर्डांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण असतात आणि त्यातही स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभाग, शल्यचिकित्साशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, क्ष-किरण, अस्थिरोग विभागात नेहमीच जादा रुग्ण असतात. बाह्य रुग्ण विभागात दररोज अडीच ते तीन हजार रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णांची संख्या वाढत असताना, त्याप्रमाणात मनुष्यबळ वाढण्याची गरज आहे, पण नेमके चित्र उलट आहे. रुग्णांना सेवा-सुविधा देण्यासह रुग्णालयातील छोटी-मोठी कामे व स्वच्छतेची मुख्य जबाबदारी असलेले चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढत्या रुग्णसंख्येनुसार वाढली तर नाही. अनेक वर्षांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची दीडशे पदे रिक्त आहेत. परिणामी, गंभीर-अत्यवस्थ रुग्णाला दाखल करण्यासाठी नातेवाईकालाच धडपड करावी लागते. नातेवाईकांना स्ट्रेचर ढकलावे लागते आणि स्ट्रेचर नसले, तर रुग्णांना चक्क उचलून दाखल करावे लागते. वेगवेगळ्या तपासण्यांना नेण्यासाठी नातेवाईकांनाच धडपड करावी लागते. रुग्णावर शवविच्छेदनाची वेळ आली तरी अनेकदा नातेवाईकांनाच स्ट्रेचरवरून मृतदेह न्यावा लागतो, शवविच्छेदनानंतर मृतदेहाला नातेवाईकांनाच स्ट्रेचवरून ढकलत आणावे लागते. अनेकदा मृतदेह झाकलेलाही नसतो. हे चित्र वर्षानुवर्षे कायम आहे. अलीकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती होऊनही या परिस्थितीमध्ये फार बदल झालेला नाही. स्ट्रेचर, व्हीलचेअरही अनेकदा गायब असतात त्याला रुग्ण-नातेवाईकांना त्रास होतो.

\Bऔषधांच्या तुटवड्याने रुग्ण हैराण\B

घाटीमध्ये एक वर्षापासून औषधांचा गंभीर तुटवडा आहे. सलाईन, ग्लोज, दैनंदिन गोळ्या-औषधेदेखील नसल्याचे सूत्रांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी 'पॅरासिटामोल'सारखे प्राथमिक औषध नसल्याचेही सांगण्यात आले. महाग औषधे-प्रतिजैविके सोडाच, दैनंदिन प्रतिजैविके व महत्त्वाची जीवरक्षक औषधेदेखील अनेकदा नसतात. त्यामुळे ती रुग्णांना विकत आणण्याशिवाय पर्याय नाही. मनोरुग्णांनाही नियमित औषधे मिळत नसल्याची नातेवाईकांची तक्रार आहे. श्वानदंशावरील 'एआरव्ही' या इंजेक्शनचा वर्षापेक्षा जास्त काळापासून तुटवडा आहॆ. शस्त्रक्रियांसह प्लास्टरसाठीचे साहित्यही रुग्णांना विकत आणावे लागत आहे. एकीकडे हॉस्पिटलचे बजेट वाढवून देण्यात येत नसतानाच तब्बल दहा कोटी रुपयांचे औषधांची बिले थकली आहेत. संपूर्ण राज्याची औषध खरेदी हाफकिन संस्थेमार्फत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, ते कधी पोहोंचणार, असा प्रश्न आहे.

\Bकामाचे मूल्यमापन केव्हा ?

\B

घाटी हॉस्पिटलमधून किमान दर्जाची रुग्णसेवा मिळावी, अशी अपेक्षा आहे. मात्र अनेक कर्मचारी कामच करत नाहीत, तर अनेक कर्मचाऱ्यांचे काम लपून राहाते. त्यामुळेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे अंतर्गत मुल्यमापन केले पाहिजे, कामचुकारांवर कारवाई केली पाहिजे, तेव्हाच रुग्णसेवेचा दर्जा सुधारेल, असा सूर तज्ज्ञांमधून उमटत आहे. निवासी डॉक्टरांपासून सर्व डॉक्टर-कर्मचारी हे रुग्ण-नातेवाईकांसोबत योग्य की उद्धटपणे बोलतात, याचेही मूल्यपान का होऊ नये, असा सवाल नेहमी होणाऱ्या मारहाणीच्या घटनांवरून उपस्थित होत आहे.

\Bव्हायरल फोटो मुद्दाम काढलेला?

\B

एका मुलीने सलाईनची बाटली हातात पकडल्याचा फोटो बुधवारी व्हायरल झाल्याने घाटी हॉस्पिटलच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. हा फोटो मुद्दाम काढून बदनामीच्या उद्देशाने व्हायरल केल्याची चर्चा आहे. या संदर्भात अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या, केवळ दोन किंवा फार तर पाच मिनिटे संबंधित मुलीने सलाइनची बाटली हातात पकडल्याचे आणि तिला उंच पकडण्यास लावून फोटो काढण्यात आल्याचे फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. त्या ठिकाणी 'आयव्ही स्टँड' होते, पण त्याची उंची कमी असल्याने ब्रदर उंच स्टँड आणावयास गेला होता. तो स्टँड आणेपर्यंतच त्या मुलीने बाटली पकडली होती. हा कालावधी दोन-पाच मिनिटांपेक्षा नक्कीच नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पंगाट’ चालकाचा प्रताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

मद्यधुंद टेम्पो चालकाने रस्त्यावरून पायी जाणाऱ्यांसह दुचाकीला धडक दिल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री खंडाळा ते शहरातील लाडगाव रस्त्यावर घडली. या घटनेत १० ते १२ जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. यापैकी काही जणांना उपचारासाठी औरंगाबाद येथे घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मद्यधुंद चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. महेश डमाळे (रा. फुंगी पिंपळगाव, ता. राहता), असे पकडलेल्या चालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महेश हा टेम्पो ट्रॅव्हल (एम एच १७, बी डी ८८६६) घेऊन शिऊरकडून वैजापूरकडे येत होता. त्याने प्रथम खंडाळा येथे एकाला धडक दिली. त्या ठिकाणी न थांबता तो सुसाट शहराकडे निघाला. शहरातील लक्ष्मी टॉकीजजवळ त्याने एका महिलेला ठोस दिली. त्यावेळी या परिसरात उभे असलेले पोलिस नाईक संजय घुगे, सागर विघे, सागर शिंदे, विशाल पैठणकर यांनी महिलेला जवळच्याच नगर पालिकेच्या दवाखान्यात दाखल करून टेम्पोचा पाठलाग सुरू केला. तोपर्यंत महेशने लाडगाव रस्यावरील दुर्गा देवी मंदिराजवळ एका 'डीजे'ला धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक रामहरी जाधव, बी. बी. डांगे, सचिन सोनार, रज्जाक शेख, दिलीप वेलगुडे, पीयूष राजपूत हे या ठिकाणी पोहचेपर्यंत उपस्थित नागरिकांनी महेशला पकडून चोप देण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी त्याला जमावाच्या तावडीतून सोडवत ताब्यात घेतले. या चालकाने खंडाळा ते दुर्गा देवी मंदिरापर्यंत तब्बल १० ते १२ जणांना धडक देऊन जखमी केल्याचे नागरिकांनी सांगितले.

\Bजखमींवर उपचार

\B

या अपघातात किरण नामदेव कांगणे (रा. मखमलाबाद, नाशिक), सागर संतोष गवारे (रा. मनेगाव, ता. वैजापूर), सोनू लक्ष्मण शेळके (रा. नगीना पिंपळगाव) व प्रसाद दत्तात्रय शेरकर (रा. दत्तनगर, वैजापूर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात, तर काहींना औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडोदबाजारचे ठाणे जुन्या ठिकाणी सुयोग्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यातील वडोदबाजार येथील पोलिस ठाणे हे पूर्वीच्या ठिकाणी गावात स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन वडोदबाजार येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे याना नुकतेच दिले. निवेदनासह पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४६ गावांच्या ठरावाची प्रत देण्यात आली.

वडोदबाजार पोलिस ठाणे गावात जुन्या इमारतीमध्येच कार्यरत राहणे सर्वांसाठी सोयीचे आहे. यापूर्वी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी गावातील जुन्या इमारतीची पाहणी केली होती. त्यावेळी पोलिस ठाण्यात संपूर्ण गाव जमले होते. ही इमारत परिसरातील गावांसाठी, सर्वांसाठी मध्यवर्तीचे ठिकाण आहे. वसाहतींजवळ गावठाणात जुनी प्रशस्त इमारत आहे. हे पोलिस ठाणे गेल्या वर्षी खामगाव फाटा येथे स्थलांतरित झाले आहे. या इमारतीजवळ कोणतीही लोकवस्ती नसून रात्रीच्या वेळी तक्रारदारास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. येथे कोणत्याही सुविधा नसल्याने पोलिस ठाणे पूर्वीच्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅँकांपुढे महापौर हतबल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील बॅँका दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना सहकार्य करीत नसल्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले हतबल झाले असून याप्रकरणी बँकांची तक्रार आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), नगरविकास खात्याकडे करणार आहोत असा इशारा त्यांनी गुरुवारी दिला.

गोरगरिबांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी शासनाने दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत बँकांच्या मार्फत स्वयंरोजगारासाठीदोन लाखांपर्यंतचे कर्ज मिळते. महापालिकेसाठी ३२० लाभार्थींचे टार्गेट देण्यात आले आहे. या लाभार्थींना कर्जासाठी बँका मदत करीत नसल्यामुळे फक्त सत्तर लाभार्थींनाच कर्ज मिळू शकले आहे. महापौरांनी याबद्दलचा आढावा गुरुवारी घेतला. बँका सहकार्य करीत नसल्याचे त्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. बँका सहकार्य करीत नसतील तर आरबीआयसह राज्य शासनाचे नगर विकास खाते, नगर परिषद संचालनालय यांच्याकडे आपण तक्रार करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच दीनदयाळ अंत्योदय योजने अंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांचा अहवाल दर महिन्याच्या सर्वसाधारण सभेत ठेवा असे आदेश दिले.

\B'दीनदयाळ' अहवाल : २०१७

\B- ३५ लाखांचे अनुदान वाटप

- ७४ लाख इतर उपक्रमासाठी

- १६ लाख रात्र निवारा गृह

- २ लाख ७५ हजार प्रसिद्धीसाठी

- ७४ लाख कार्यालयीन कामकाज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा हजार अर्जांचे आव्हान

$
0
0

बृहत आराखड्याचे काम सुरू, चार जिल्ह्यात अर्ज भरून घेणार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बृहत आराखड्याच्या दहा हजार प्रश्नावली भरून घेण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सुरुवात केली. ऑनलाइन अर्ज आणि लिखित अर्ज या पद्धतीने काम पूर्ण करण्यात येत आहे. या कामासाठी जिल्हा आणि तालुकानिहाय प्रतिनिधी नेमले असून १३ मे पर्यंत प्रश्नावलीचे काम पूर्ण होईल असा दावा प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी केला. सध्या महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे प्रश्नावली अर्ज तातडीने भरण्याचे प्राचार्य व प्रतिनिधी यांच्यासमोर आव्हान आहे.

एखाद्या विभागाचे बलस्थान लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रम राबविणे, तुकड्या वाढवणे, उद्योगपूरक अभ्यासक्रम अंमलात आणण्यासाठी शिक्षण विभागाने बृहत आराखडा मागितला आहे. विद्यापीठांनी संलग्न महाविद्यालये आणि परिसरात सर्वेक्षण करुन अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक संघटना यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येणार आहे. तीन दिवसात दहा हजार अर्ज भरून घेण्याचे विद्यापीठासमोर आव्हान आहे. शहरातील प्रमुख महाविद्यालयात विद्यार्थी नियमित येतात. या विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याची जबाबदारी २५ विद्यार्थ्यांवर सोपवली जाणार आहे. एका कॉलेजात ५० अर्ज भरून घेण्यात येतील. जिल्हानिहाय जबाबदारी अधिष्ठातांकडे निश्चित केली आहे. औरंगाबाद जिल्ह्याची जबाबदारी डॉ. वाल्मिक सरवदे, बीड-उस्मानाबाद जिल्हा डॉ. संजय साळुंके आणि जालना जिल्ह्याची जबाबदारी डॉ. मजहर फारुकी यांच्याकडे आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक प्रतिनिधी आणि तालुकानिहाय पाच प्रतिनिधी नेमले आहेत. पालक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी यांच्याकडून कमवा व शिका योजनेचे विद्यार्थी अर्ज भरून घेणार आहेत. तर २५० उद्योजकांना इ-मेल पाठवून प्लेसमेंट विभाग अर्ज भरून घेणार आहे. अर्ज सोपा असून तीन दिवसात १४ हजार अर्ज भरून होतील असा दावा प्र-कुलगुरु डॉ. अशोक तेजनकर यांनी केला. या प्रक्रियेनंतर १६ मे रोजी बैठक होणार आहे. एखाद्या विभागात कमी अर्ज असल्यास पुन्हा पाच दिवस मोहीम राबवण्यात येईल. उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे अर्ज भरून घेण्यात अडचणी निर्माण होतील, असे मत काही प्राचार्यांनी मांडले होते. मात्र, पुरेशी यंत्रणा उभारुन प्रशासनाने अर्ज भरुन घेण्याची मोहीम सुरू केली आहे.

प्राध्यापक पदासाठी मुलाखती

विद्यापीठात अनेक विभागात एकच प्राध्यापक असल्यामुळे तासिका अपूर्ण राहत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे विद्यापीठ सात विभागात तातडीने जागा भरण्यासाठी २१, २२ आणि २३ मे रोजी मानधन तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मुलाखती घेणार आहे. वृत्तपत्रविद्या विभाग, भौतिकशास्त्र, बायोकेमिस्ट्री, राज्यशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, शारिरीक शिक्षणशास्त्र या विभागांचा त्यात समावेश आहे. एकूण ८७ उमेदवार मुलाखत देणार असून नियुक्ती ११ महिन्यांसाठी निश्चित मानधनावर होणार आहे.

कोट

विद्यापीठाने गुरुवारी आठ हजार अर्ज पाठवले आहेत. संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करुन दिला आहे. बृहत आराखड्याच्या प्रश्नावलीचे काम तीन दिवसांत पूर्ण होईल.

डॉ. अशोक तेजनकर, प्र-कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटीला बजेटचा साडेतीन कोटीचा निधी प्राप्त

$
0
0

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी हॉस्पिटलला २०१८ - १९ यावर्षी बजेटमध्ये मंजूर झालेल्या निधीपैकी साडेतीन कोटीचा निधी घाटीच्या खात्यावर जमा झाला आहे. घाटीला जवळपास २१ कोटीचे देणे बाकी आहे. मेडिसीन आणि सर्जिकल अॅटमसाठी हा निधी असल्याची माहिती अधिष्ठता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. प्रशासनाने मेडिसीनसाठी साडेबारा कोटींच्या निधीची मागणी केली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकर अॅपेरिक्षाच्या अपघातात नऊ ठार

$
0
0

पैठणरोडवरील नक्षत्रवाडी गेवराई तांड्याजवळ पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत अॅपेरिक्षातील चालकासह नऊ प्रवासी ठार झाले. शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. मृतांमध्ये दोन महिलांसह दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. अपघातानंतर टँकरचालक पसार झाला असून चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी सायंकाळी शीतल वॉटर सप्लायर्सचा पाण्याचा टँकर (क्रमांक एमएच १५ जी ८४०) चितेगावकडून रेल्वे स्टेशनकडे येत होता. यावेळी अॅपेरिक्षाचालक शेख आमेर शेख मकसूद (वय २२ रा. सिटीचौक) हे त्यांच्या अॅपे रिक्षामध्ये (क्रमांक एमएच २० डीसी ४२६७) प्रवासी बसवून बिडकीनकडे जात होते. नक्षत्रवाडीपासून पुढे बंजारा हॉटेलच्या वळणावर टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. या टँकरने प्रथम एका दुचाकीला व नंतर समोरून येत असलेल्या अॅपे रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अक्षरश: अॅपेरिक्षाचा चुराडा झाला. रिक्षाचालक शेख आमेर जागेवरच ठार झाले तर आठ प्रवासी गंभीर जखमी झाले. यापैकी काही जण अपघातस्थळीच मरण पावले. तर उर्वरित जखमींना घाटी हॉस्पिटलमध्ये आणत असताना त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये रिक्षाचालक शेख आमेर शेख मकसूद, शेखू तुकाराम त्रिंबके, (वय २५), शिवलालसिंग गुलाबसिंग ठाकूर (वय ८४ दोघे रा. मातोश्री वृद्धाश्रम), जनार्दन नाथा अवचरमल (वय ४८), अनुजा सुनील अवचरमल (वय ११, दोघेही रा. शाहीनगर, बिडकीन), रामकुमारी प्यारेलाल ठाकूर (वय ६०), राममहेश प्यारेलाल ठाकूर (वय ४०), पुष्पा राममहेश ठाकूर (वय ३५), युवराज राममहेश ठाकूर (वय ०३ सर्व रा. बिडकीन) यांचा समावेश आहे. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. डिवायएसपी अशोक आमले, चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, बिडकीन पोलिस ठाण्याचे पथक, संताजी पोलिस चौकीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अँबुलंस, पोलिसांचे वाहन व रिक्षामध्ये मृतदेह घाटीत रवाना करण्यात आले. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टँकरचालक पसार झाला असून त्याच्या शोधासाठी पथक पाठवण्यात आले असल्याची माहिती डिवायएसपी अशोक आमले यांनी दिली.

घाटीत फुटला हंबरडा - ४

घाटीत फुटला हंबरडा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

या भीषण अपघातातील काहींनी अपघातस्थळीच प्राण सोडला तर काहींचा घाटीत उपचारासाठी दाखल केल्यावर मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी घाटीत धाव घेतली. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. ओळख पटल्यानंतर आपला नातेवाईक मृतामध्ये आहे असे समजताच अपघात विभागाबाहेर नातेवाईक धाय मोकलून रडत होते. रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांची घाटीत गर्दी होती. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना अपघाताची माहिती कळाल्यानंतर त्यांनी घाटी हॉस्पिटल गाठले. मृतदेहाची पाहणी तसेच अपघाताची माहिती त्यांनी घेतली. अपघातग्रस्त स्थळाला देखील त्यांनी भेट दिली.

आजोबा व नातीवर काळाचा घाला

मृतामधील जनार्दन अवचरमल व त्यांची नात अनुजा एका नातेवाईकाच्या लग्नासाठी चिकलठाण्याला सकाळी आले होते. लग्न आटोपून ते परत जात होते. अॅपेरिक्षामध्ये जात असताना या रिक्षाचा अपघात झाला. यामध्ये दोघेही ठार झाले. अनुजाच्या हातावर लग्नानिमित्त काढण्यात आलेली मेहंदी देखील तशीच होती.

चौघांचे कुटुंबच संपले

या अपघातात रिक्षामध्ये बिडकीन येथील ठाकूर कुटुंबीयातील चार सदस्य होते. राममहेश ठाकूर यांचे चितेगावला ज्यूस सेंटर आहे. आजारी आईला बिडकीनला घरी सोडण्यासाठी राममहेश, त्यांची पत्नी पुष्पा व मुलगा युवराज हे तिघे सोबत होते. नेमका या रिक्षाचाच अपघात घडला. या दुर्देवी घटनेत चौघेही जागीच ठार झाले.

पोलिसांचे वाहनाचे दुर्लक्ष

अपघात घडला त्यावेळी घाटीतील कर्मचारी हनुमान रोडे त्या ठिकाणावरून जात होते. त्यांनी दुचाकी थांबवून घटनास्थळी मदत केली. यावेळी पोलिसांचे एमएच १२-७७५८ पासिंगचे एक वाहन त्या ठिकाणावरून जात होते. मात्र, हात दाखवून पोलिसांनी दुर्लक्ष करीत वाहन पुढे नेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

रिक्षाचालकांने केली मदत

अपघातातील नऊ जणांना घाटीत हलवण्यासाठी पोलिसांच्या वाहनाशिवाय दुसरे वाहन उपलब्ध नव्हते. थोड्या वेळातच रुग्णवाहिका आली. सात मृतदेह हलवल्यानंतरही दोन मृतदेह पडून होते. चितेगावरून रिक्षाचालक अजहर पठाण रा. कटकटगेट औरंगाबादकडे येत होते. त्यांच्यासमोर हा अपघात घडला. त्यांनी रस्त्यावर पडलेले दोन मृतदेह आपल्या रिक्षातून घाटी हॉस्पिटलमध्ये आणण्यासाठी पोलिसांना मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी कुटुंबास मदत

$
0
0

सोयगाव: तालुक्यातील घोसला येथील आत्महत्या केलेले शेतकरी विजय जगन बावस्कर यांच्या कुटुंबाला शासनातर्फे शुक्रवारी तहसील कार्यालयात एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार प्रभाकर गवळी, प्रभारी पोलिस निरीक्षक गणेश जागडे, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बावस्कर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकर काळे, मराठा प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष सोपान गव्हांडे पाटील, आप्पा वाघ पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीपंपाचे स्टार्टर चोरीस

$
0
0

सोयगाव: तालुक्यातील जरंडी येथील एका शेतातून शुक्रवारी भरदिवसा अज्ञात चोरांनी वीजपंपाचे स्टार्टर आणि इतर साहित्य चोरून नेले. हा प्रकार गोविंदा लक्ष्मण चौधरी यांच्या गट क्रमांक २८४ येथे घडला. या साहित्याची किंमत अंदाजे अडीच हजार रुपये ाहे. उन्हामुळे दुपारी शेतकरी घरी जात असल्याची संधी साधून चोऱ्या होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारी विभागीय महिला लोकशाही दिन

$
0
0

फास्ट न्यूज

औरंगाबाद,

विभागीय स्तरावरील विभागीय महिला लोकशाही दिन १४ मे रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे पाळण्यात येणार आहे. शासनाने समस्याग्रस्त व पीडित माहिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणांकडून सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना लोकशाही दिन पाळण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images