Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अकरावी प्रवेश प्रक्रियेकडे शाळांची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रवेश प्रक्रियेत पहिला टप्पा भरण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी शाळांमध्ये चौकशी करणे सुरू केले आहे. औरंगाबाद केंद्राहून सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा पहिला टप्पा भरला आहे, तर अद्याप अनेक शाळांनी प्रक्रियेला सुरुवात केली नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक चौकशी करून परत जात आहेत.

औरंगाबादमध्ये मागील वर्षापासून अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होत आहे. प्रवेशाचा पहिला ऑनलाइन नोंदणीचा टप्पा शाळास्तरावर पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी झोन सेंटरवर माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आला. शाळांनी या माहिती पुस्तिकेतून विद्यार्थ्यांकडून पहिला टप्पा भरून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. निकालापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ज्यामुळे पुढे प्रक्रियेवर ताण येणार नाही. शहरातील अनेक शाळांमध्ये प्रक्रिया सुरू आहे. काही शाळांनी प्रशासनाकडून माहिती पुस्तिकाच घेतल्या नाहीत. त्यामुळे प्रक्रियेला गती आलेली नाही. यंदा उर्दू माध्यमाचेही प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. शहरात २६ कॉलेज असून, त्यांची प्रवेश क्षमता अडीच हजार आहे. त्यांची प्रवेश प्रक्रियाही शाळा स्तरावरून होणार आहे.

\Bझोन नुसार मार्गदर्शन केंद्र\B

प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहेत. ही केंद्रे पुढील प्रमाणे; देवगिरी कॉलेज(डॉ. आर. बी. गरूड), पटेल कनिष्ठ कॉलेज( युनुस पटेल), विवेकानंद कॉलेज, (एस. जी. गोडबोले), मौलाना आझाद कॉलेज(शेख महम्मद), बळीराम पाटील हायस्कूल, (एस.आर. सोनगिरे), वसंतराव नाईक कॉलेज, (एस. डी. चव्हाण), वसंतदादा पाटील हायस्कूल (बी. जी. खोडवे), शिवछत्रपती कॉलेज(बी. आर. वाहटुळे), संत मीरा हायस्कूल( कमलेश सावंत), सरस्वती भुवन कॉलेज (संजय गायकवाड), मिलिंद कॉलेज (रामनाथ पवार), नाथ व्हॅली हायस्कूल(रणजित दास) या केंद्राचा समावेश आहे.

\Bअर्ज भरताना घ्या काळजी\B

- औरंगाबादसाठी https://aurangabad.11thadmission.net

- माहितीपुस्तिकेमध्ये दिलेला लॉग-इन आयडी, पासवर्ड वापरा

- पासवर्ड बदला आणि पुढच्या वेळेस लॉग-इन करण्यासाठी लक्षात ठेवा

- सिक्युरिटी प्रश्न निवडून तसेच योग्य उत्तरे लक्षात ठेवा

- कम्प्युटरवर दिलेल्या सूचना पाळून टप्प्याटप्प्यांने ऑनलाइन अर्ज भरा

अल्पसंख्याक कोटा… : ५०

व्यवस्थापन कोटा……… : ५

इनहाऊस कोटा……… : २०

एकूण कॉलेज : …११६

प्रवेश क्षमता… : २६३४५

शाळांना प्रवेशाचे टप्पे कसे असतील याबाबत पूर्णपणे माहिती देण्यात आली आहे. ऑनलाइन प्रवेशाबाबत प्रशासनाच्या स्तरावील प्रक्रिया सुरू आहे. या आठवड्यात पहिला टप्प्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. वेबसाइट सर्वांसाठी खुली करून देण्यात येईल.

डी. एम. पानसरे, सहायक शिक्षण उपनिरीक्षक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलिसांचा केला गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

पोलिस अधीक्षक कार्यालयात होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास लवकरात लवकर लागावा यासाठी तपास काम वेगाने करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव मंगळवारी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन करण्यात आला.

पोलिस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पोलिस ठाणे चिकलठाणा हद्दीतील रमेश विलास मगरे (रा. चितेगाव) हे मोटारसायकलवरून निपाणीला जात असताना ऊस तोडणीच्या कारणावरून आरोपींनी त्यांना पळवून नेले होते. या प्रकरणाचा सहाय्यक पोलिस निरिक्षक एस. एस. ताईतवाले. पोलिस उपनिरीक्षक एस. एन. चव्हाण. एन. बी. कटकुरी, एल. के. थोटे, डी. एस. सुराशे, ए. आर. जायभाये यांनी तपास करून दोन दिवसात उपळाई (ता. माढा, जि. सोलापूर) येथील आरोपी अशोक कचरे याच्या घरातून रमेश विलास मगरे याची सुटका केली. तसेच आरोपींना ताब्यात घेतले. तसेच शेकटा येथील संजय झवर यांचे किराणा मालाचे गोदाम फोडून सात लाख ७५ हजार रुपयांचा माल चोरल्याची घटना घडली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंगे, पोलिस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, सहायक फौजदार गणेश जाधव, नवनाथ कोल्हे, विक्रम देशमुख, संजय काळे, बाळू पाथ्रीकर, विठ्ठल राख, सुनील शिराळे, राहुल पगारे यांनी तपास केला. मयूर पिंजारी (रा. नाचनवेल, ता. कन्नड), चंद्रकांत रामचंद्र शनोरे (रा. गाडेमळा, सिन्नर), अमरसिंग मल्लूसिंग मौर्य (रा. शकरदहा, उत्तर प्रदेश) यांना अटक केली. तसेच या आरोपींकडून मुद्दे मालही जप्त केला. या दोन्ही प्रकरणात उल्लेखनीय तपास करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंजाळ, फेरोज खान पोलिस कोठडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राजाबाजार परिसरात पेंटचे दुकान व वाहनांची जाळपोळ करून ४३ लाखांचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली युवा सेनेचा सचिव व शिवसेनेचा नगरसेवक राजेंद्र हिंमतराव जंजाळ याला मंगळवारी (१५ मे) दुपारी अटक करण्यात आली, तर दुकानाला जाळपोळ व घराचे नुकसान करून ७५ लाखांचे नुकसान केल्याचे आरोपाखाली 'एमआयएम'चा नगरसेवक फेरोज खान मोईनोद्दिन खान याला सायंकाळी अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता दोघांना शुक्रवारपर्यंत (१८ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

याप्रकरणी मोहमद शोहेब अब्दुल मुनाफ (२८, रा. राजाबाजार) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादीचे पेंटचे दुकान असून, ते ११ मे रोजी रात्री दुकान बंद करून गेल्यावर त्यांचे मित्र महमद अनिस यांनी फोनवरून, संस्थान गणपती परिसरामध्ये दोन गटांमध्ये कडक्याचे भांडण व जाळपोळ सुरू झाल्याचे कळवले. फिर्यादीने खिडकीतून डोकावून पाहिले असता सात ते आठजण हातात लाठ्या, काठ्या व पेट्रोल बाटल्या घेऊन येत असल्याचे दिसले. त्या टोळक्याने घरासमोर उभी असलेली कार व पेन्टचे दुकान पेटवून दिले. त्यानंतर जळत्या वाहनाच्या आजूबाजूला उभी असलेली दुचाकी व चारचाकी वाहने पेटवून दिली आणि यात माझे २५ लाखांचे नुकसान झाले.

त्यावरून जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपी जंजाळ यास मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. जंजाळ याला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले. आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. यू. सुपेकर यांनी जंजाळ याला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

दुसऱ्या प्रकरणात दीपक मन्नाला जैस्वाल (६८, रा. गारखेडा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ११ मे रोजी फिर्यादी त्याचे नवाबपुरा परिसरातील हॉटेल बंद करून गेले होते. शहागंज परिसरात जातीय दंगल भडकल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी हॉटेलकडे धाव घेतली असता, टोळक्यांनी हॉटेलमधील ३८ लाखांच्या मालाची तोडफोड केली. त्याच ठिकाणी असलेल्या फिर्यादीच्या जुन्या घरातील साहित्याची तोडफोड होऊन साहित्य जाळण्यात आले. यात ७५ लाखांचे नुकसान झाले.

त्यावरून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी फेरोज खानला मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले. आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवाड यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाले यांनी आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

कोट्यवधींचे नुकसान

दंगलीमध्ये सरकारी-खासगी मालमत्तेचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, आरोपींनी भयावह कृत्य करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दंगल भडकाविण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे, असे म्हणणे विशेष तपास पथकाचे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी कोर्टात सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत शाळा

$
0
0

हॅप्पी चाइल्ड इंग्लिश स्कूल (वाळूज), शिवाजी कन्या प्राथमिक शाळा (रांजणगाव), रायभानजी जाधव इंग्लिश स्कूल (उंबरखेडा), पॅराडाइज इंग्लिश स्कूल (हडको-एन ११), लिटिल एन्जल इंग्लिश स्कूल (नागेश्वर वाडी), अल फलाह इंग्लिश स्कूल (पैठण गेट), अल फलाह इंग्लिश स्कूल (चाउस कॉलनी), अल फलाह इंग्लिश स्कूल (रोशन गेट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य उपसंचालकपदी डॉ. स्वप्नील लाळे

$
0
0

औरंगाबाद : औरंगाबाद विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांची सहसंचालकपदी (आरोग्य सेवा, मुंबई) पदोन्नती झाली असून, त्यांच्या जागी नागपूर येथील 'पीएचआय'चे प्राचार्य डॉ. स्वप्नील लाळे यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. कंदेवाड हे बुधवारी रुजू होणार असून, त्यांनी आरोग्य उपसंचालक पदाचा प्रभारी पदभार डॉ. सुनिता गोलाईत यांच्याकडे सोपवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंजाळच्या अटकनेनंतर शहर बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दंगलप्रकरणात पोलिसांनी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ याला अटक केल्याची माहिती विविध वार्डांमध्ये पसरताच व्यापाऱ्यांनी या अटकेच्या निषेधार्थ उत्स्फूर्त बंद पुकारला.

जंजाळला ताब्यात घेण्यासाठी शिवाजीनगर येथे दुपारी पोलिस पोहचल्याची माहिती कळताच कार्यकर्त्यांनी जंजाळच्या घरासमोर तुफान गर्दी केली. जंजाळला पोलिस घेऊन जात असल्याचे समजताच शिवाजीनगर परिसरातील दुकाने बंद करण्यात आली. जंजाळ शिवाजीनगर भागाचा नगरसेवक असल्यामुळे वार्ड तसेच परिसरातील कार्यकर्ते, नागरिक, महिलांनी घोषणाबाजी सुरू केली. जंजाळला पोलिस ठाण्याकडे घेऊन जाताना कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले. शिवाजीनगरसह गजानन महाराज मंदिर परिसरातील बाजारपेठ काहीवेळ बंद होती. दंगलीमध्ये जाळपोळ, दगडफेक झालेल्या राजाबाजार, शहागंज परिसरातही जंजाळच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि तेथील दुकानेही व्यापाऱ्यांनी बंद केली. टीव्ही सेंटर परिसरामध्येही दुपारी जंजाळच्या अटकेची बातमी कळताच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून निषेध व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटकमधील विजयाबद्दल भाजपचा जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल भाजप गारखेडा मंडळाच्या वतीने मंगळवारी जल्लोष करत मिठाईचे वाटप करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

मंजळ अध्यक्ष मंगलमूर्ती शास्त्री, प्रा. गोविंद केंद्रे, नगरसेविका माधुरी अदवंत, संजय बोराडे, लक्ष्मीकांत थेटे, सचिन कोरोडे, विवेक राठोड, अशोक दामले, स्मिता दंडवते, अॅड. अरविंद डोणगावकर, ओमजी अग्रवाल, महेश केदारे, शिवाजी शिरसे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंजाळच्या अटकेसाठी अडीच तासांची कसरत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दंगलप्रकरणी युवासेना उपसचिव आणि नगरसेवक राजेंद्र जंजाळच्या अटकेसाठी मंगळवारी पोलिसांना तब्बल अडीच तासांची कसरत करावी लागली.

राजाबाजार, नवाबपुरा, शहागंज भागात झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि फोटोवरून कारवाई सुरू केली आहे. शिवसेनेचा नगरसेवक जंजाळला ताब्यात घेण्यासाठी मंगळवारी सकाळी पोलिस शिवाजीनगरला पोहचले. दोन पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे, सहाय्यक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंडे आणि पोलिस निरीक्षकांच्या सोबतीला आठ व्हॅन, वज्र वाहन असा तगडा फौजफाटा होता. चौकशी करून जंजाळला ताब्यात घेण्याच्या भूमिकेवर पोलिस ठाम होते. पोलिस आले असे कळताच शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या घराजवळ जमा झाले. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या तरुणांनी घोषणाबाजी सुरू केली. जंजाळच्या अटकेला विरोध होत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी थेट कारवाई करणे टाळत पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. दानवे यांच्या गाडीत ते क्रांतीचौक पोलिस ठाण्यात आले. तेथे चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

\Bक्रांतीचौक पोलिस ठाण्यातही गर्दी

\Bजंजाळला शिवाजीनगर येथून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात आणण्यात आले. शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांची पोलिस ठाण्यात उपस्थिती होती. यामध्ये महापौर नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपमहापौर विजय औताडे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह समीर राजूरकर, राजगौरव वानखेडे, आप्पासाहेब कुडेकर यांची उपस्थिती होती. पोलिस ठाण्यात आणि बाहेरही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. महिलांची संख्याही यात मोठी होती. दुपारी अडीचपर्यंत ही प्रक्रिया चालली. तोपर्यंत गर्दी कायम होती. गर्दी पांगविण्यासाठी पोलिस वारंवार सूचना देत होते, परंतु कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर ठाण मांडले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दगंलप्रकरणी खान याची शरणागती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दंगलीतील सक्रिय सहभाग प्रकरणी गुन्हे दाखल असलेला 'एमआयएम'चा विरोधी पक्षनेता फेरोज खान याने अखेर मंगळवारी सिटीचौक पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली.

फेरोज खानला अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक नवाबपुरा भागात गेले होते. या ठिकाणी पोलिसांनी खानच्या घराची झडती घेतली. त्यावेळी खान घरी नव्हता. या प्रकरणात 'एमआयएम' आमदार इम्तियाज जलील यांनी मध्यस्थी केली. खान दुपारी सिटीचौक पोलिस ठाण्यात शरणागती पत्करेल असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर पोलिसांनीही फेरोजच्या घरासमोर लावलेला बंदोबस्त हटवला. दुपारी चारच्या सुमारास आमदार इम्तियाज जलील आणि अॅड खिजर पटेल यांनी पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर सायंकाळी सहाच्या सुमारास फेरोज खान याने सिटीचौक पोलिस ठाण्यात येऊन शरणागती पत्करली. यावेळी उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त दीपाली घाटे घाटगे, सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्यासह अन्य पोलिस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सिटीचौक पोलिसांनी फेरोजला ताब्यात घेताच कोर्टासमोर हजर केले. यावेळी एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दीकी, जिल्हाध्यक्ष अज्जू नाईकवाडे, एमआयएमचे नगरसेवक अजीम खान, एमआयएमचे आरेफ हुसैनी, शेख सलीम. डॉ. आफजाल खानसह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक कैसर खान यांची उपस्थिती होती.

……………

\Bअटक टाळण्यासाठी महिलांची उपस्थिती

\Bनवाबपुरा वार्डातील शहागंजच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका छोट्या मंदिराजवळ एका समाजाचे लोक राहतात. दंगलीच्या रात्री काही दंगेखोर युवक या समाजाच्या घरांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. दंगेखोरांना हुसकावून लावण्यासाठी फेरोज खान व त्याचे कार्यकर्ते रात्रभर तिथेच उपस्थित होते. त्यामुळे आमच्या नगरसेवकाला अटक करून नका, अशी मागणी करत या समाजाच्या महिला सकाळी अकरा वाजेपासून दुपारी चारपर्यंत नवाबपुरा भागात ठाण मांडून होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगलप्रकरणात आणखी तिघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दंगलप्रकरणात आणखी तिघांना अटक करून मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना शनिवारपर्यंत (१९ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांनी दिले. सिटीचौक पोलिस ठााण्याचे जखमी पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांच्या तक्रारीवरुन दंगलखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात यापूर्वीच १४ जणांना अटक केली असून त्यांना १८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्हीच्या पुâटेजमध्ये आणखी तिघे आढळून आल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारी वकील नितीन ताडेवार यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’ कामांवर जिल्हाधिकारी नाराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. जिल्ह्यात अभियानाचे काम समाधानकारक सुरू असले तरी जलसंधारणाच्या कामामध्ये जिल्ह्याचा क्रमांक राज्यात शेवटून दुसरा लागतो. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर चौधरी यांनी ‌जिल्ह्यातील विविध ठिकाणी दौरे करण्यास सुरुवात केली असून जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळ्यांचे समाधानकारक काम झाले असल्याचे त्यांनी सांगितले जलयुक्त शिवार अभियानातील कृषी विभागाच्या कामांची स्तुती करत असताना दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंधारणाच्या कामांबाबत मात्र नाराजी व्यक्त केली. जलयुक्त शिवार अभियानासाठी वर्ष २०१८-१९ वर्षासाठी जिल्ह्यामध्ये २५५ गावांची निवड करण्यात आली. काही गावांमध्ये कामांची सुरुवातही झाली आहे. निवडलेल्या गावांपैकी इतर विभागांची कामे सुरू झाली. मात्र, जलसंधारण विभागाची अनेक कामे वर्कऑर्डर निघाली असतानाही अपूर्ण आहेत. जिल्ह्यात जलसंधारणांच्या ८२ कामांची वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे. यातील १९० कामे अद्यापही शिल्लक आहे. जलसंधारणाच्या तुलनेत कृषी विभागाच्या कामावर जिल्हाधिकारी खूष असून जलयुक्त शिवार अभियानात जिल्हा राज्यामध्ये आठव्या क्रमांकावर आहे, तर यामध्ये कृषी विभागाची कामे पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहेत. मात्र जलसंधारणाची कामे जिल्ह्यात कासवगतीने सुरू आहेत. राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण विभागाची जिल्ह्यातील कामांचा क्रमांक शेवटून दुसरा आहे. त्यामुळे चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतरच्या कंपनीला पत्र देण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला पत्र पाठवून जलवाहिनीचे काम करण्याबद्दल १५ दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याचे कंपनीला कळवा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त उदय चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हा दक्षता आणि संनियंत्रण समितीची बैठक सोमवारी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत शहरातील विविध समस्यांबद्दल चर्चा करण्यात आली. समांतर जलवाहिनी योजनेबद्दलही यावेळी चर्चा झाली. समांतर जलवाहिनीची योजना पुन्हा त्याच कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्याबद्दल शासकीयस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या संदर्भात शासकीयस्तरावर आतापर्यंत दोन वेळा बैठका झाल्या आहेत. महापालिका व कंपनीने समांतर जलवाहिनीची योजना पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने स्वतंत्रपणे प्रस्ताव द्यावेत, त्यानंतर पुन्हा एकत्रित बैठक घेवून पुढील भूमिका ठरविण्यात येईल, असे या दोन्हीही बैठकांच्या माध्यमातून ठरविण्यात आले.

याचा संदर्भ खासदार चंद्रकांत खैरे यांनी दक्षता समितीच्या बैठकीत दिला. समांतर पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करण्याबद्दल कंपनीची राज्य सरकार बरोबर बोलणी सुरू आहे. असे असले तरी कंपनीने महापालिकेसोबत कोणताही पत्र व्यवहार सुरू केलेला नाही. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असले तरी महापालिकेकडून कंपनीला पत्र पाठवा आणि १५ दिवसात समांतर जलवाहिनी बद्दलची त्यांची भूमिका काय स्पष्ट करण्यास सांगा अशी सूचना खैरे यांनी आयुक्त चौधरी यांना केली. खैरे यांच्या सूचनेनुसार चौधरी यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना आदेश देताना कंपनीला पत्र पाठवण्याचे सांगितले. येत्या काही दिवसांत महापालिकेतर्फे कंपनीला पत्र पाठवण्यात येईल, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७ ते ११ जड वाहनांस शहरात प्रवेश बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

जड वाहनांना शहरात दिवस प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जड व मध्यम प्रकारच्या वाहनांना शहरात सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रवेश बंद राहणार आहे. हा नियम आता कायमस्वरूपी करण्यात आला असल्याची माहिती सहायक वाहतूक पोलिस आयुक्त सी. डी. शेवगण यांनी दिली.

वाहतूक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार शहरात येणाऱ्या जड, मध्यम वाहनांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत बंदी राहणार आहे. यापूर्वी ही बंदी प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली होती. या अधिसूचनेवर सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यावर कोणत्याही प्रकारची सूचना अथवा हरकत घेतली गेली नाही. त्यामुळ हा नियम कायमस्वरुपी करण्यात आला आहे. रात्री ११ नंतर सकाळी सात वाजेपर्यंत ही वाहने शहरातून प्रवास करू शकतील, असे शेवगण यांनी दिली.

………

अशी राहणार परवानगी

- पुणे-नगरकडून येणारी जड व मध्यम मालवाहू वाहने एएसक्लब, पैठण लिंक रोड, महानुभाव आश्रम चौक, बीड बायपास मार्गे जातील.

- वैजापूर-धुळेकडून येणारी जड व मध्यम मालवाहू वाहने नगरनाका, एएसक्लब, पैठण लिंक रोड, महानुभाव आश्रम चौक बीड बायपास मार्गे जाणार आहेत.

- बीड, जालनाकडून येणारी जड व मध्यम मालवाहू वाहने पुणे-नगर, वैजापूर, धुळेकडे जाणारी वाहने केंब्रीज शाळे समोरून बीडबायपास, झाल्टा फाटा, महानुभाव आश्रम चौक व पैठण लिंक रोड मार्गे जातील.

- जळगावकडून येणारी जड व मध्यम मालवाहू वाहने सावंगी नवीन बायपास रोडने केंब्रीज शाळेसमोरून जालना रोडने व बीड बायपास मार्गे जाणार आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारी वेळेत निकाली काढा, अन्यथा कारवाई करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकशाही दिनातील तक्रारी वेळेत निकाली न काढल्यास संबंधित विभाग, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी येथे दिला.

लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींवर तत्परतेने योग्य ती कार्यवाही करून संबंधित अर्जदाराला वेळेत योग्य तो न्याय मिळवून देणे हा लोकशाही दिनाचा मूळ उद्देश आहे. या व्यापक जाणिवेने सर्व संबंधित विभागांनी लोकशाही दिनात दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे. तक्रारी वेळेत निकाली न काढणारे विभाग, अधिकारी यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी स्पष्ट केले. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय लोकशाही दिनात एकूण १२ अर्ज दाखल झाले. या सर्व अर्जावर सुनावणी करण्यात आली. यावेळी डॉ. भापकर यांनी अधिकाऱ्यांना, तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे निर्देश दिले.

यावेळी अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे, विजयकुमार फड, उपायुक्त हजारे, पारस बोथरा, उपायुक्त वर्षा ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, उपसंचालक नगर विकास रिता मेत्रेवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळूंके, महापालिकेचे उपायुक्त रवींद्र निकम यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगलीतील मृताच्या कुटुंबियास देशमुख यांचा मदतीचा हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अभिजित देशमुख यांनी दंगलीत मृत पावलेल्या कुटुंबियाची भेट घेत मदतीचा हात दिला. देशमुख यांनी मंगळवारी दुपारी मृताच्या नातेवाईकांची भेट घेत विचारपूस करत पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

दंगलीच्या घटनेत त्या कुटुंबातील एका सदस्याचा मृत्यू झाला होता. मालमत्तेचे नुकसान झाले असून, अशा परिस्थितीत सामाजिक दायित्व म्हणून मदतीचा हात देणे आपले कर्तव्य आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुनर्विलोकन अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांचे शिबिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल वेळेत प्रतिवेदन, पुनर्विलोकन केले जातील यासाठी विभागीय, जिल्हा, तालुका ठिकाणी शिबिर आयोजित करण्याचे निर्देशे सरकारने दिले होते. त्यानुसार २६ व २७ मे रोजी पुनर्विलोकन अधिकाऱ्यांसाठी मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत आयोजित करण्यात आले आहे.

विभागीयस्तरावर विभागीय आयुक्त, जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, तालुकास्तरावर तहसीलदार यांच्यावर गोपनीय अहवाल लिहिण्यासाठी शिबिर आयोजनाची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाने सोपविलेली आहे. संचालक, उपजिल्हाधिकारी मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी, औरंगाबाद डॉ. एस. पी.सावरगांवकर यांची शिबिर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागातील, सर्व प्रादेशिक कार्यालयातील सर्व विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे २०१७-१८ या वर्षाचे गोपनीय अहवालाचे प्रतिवेदन, पुनर्विलोकन करण्यासाठी शिबिरास उपस्थित राहून गोपनीय अहवालाबाबत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगलीत दहा कोटींचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

शहरात शुक्रवारी झालेल्या दंगलीमध्ये घरे, वाहने व दुकानांचे तब्बल दहा कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याचे संयुक्त पथकाच्या पंचनाम्यानंतर स्पष्ट झाले. पाच संयुक्त पथकांनी सोमवारी (१४ मे) दगडफेक, जाळपोळीत नुकसान झालेल्या मालमत्तांचे पंचनामे पूर्ण केले. रात्री उशिरापर्यंत पथकाकडून दंगलीतील नुकसानीची आकडेमोड सुरू होती. नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सादर करण्यात येणार असून, त्यानंतर तो शासनाला पाठवण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर दंगलीतील पंचनामे करण्यासाठी पाच पथक तयार करण्यात आली. यामध्ये महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम, नगर भूमापन, प्रादेशिक परिवहन आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या पथकाने शहागंज, चमन, राजाबाजार, नवाबपुरा, गुलमंडी, जिन्सी परिसरात दंगलीमुळे झालेल्या मालमत्तांचे पंचनामे दीड दिवसात पूर्ण केले. यामध्ये पथकाकडून सर्व मालमत्ताधारक; तसेच वाहनमालकांचे जबाबही घेण्यात आले. ६४ वाहनधारकांच्या जबाबानुसार एक कोटी २७ लाख ७३ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले असून, ७५ घरे व दुकानांचे आठ कोटी ९३ लाख ४२ हजार १०० रुपये असे एकूण १३९ मालमत्ताधारकांच्या जबाबानुसार दंगलीमध्ये दहा कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. तहसीलदार रमेश मुनलोड यांच्या नेतृत्वाखाली पाच पथकातील ३५ कर्मचाऱ्यांनी पंचनामे पूर्ण केले.

दंगलीतील नुकसान

६४ वाहने : १ कोटी २७ लाख ७३ हजार ५००

७५ घर व दुकाने : ८ कोटी ९३ लाख ४२ हजार १००

नुकसानधारकांची एकूण संख्या : १३९

नुकसानीची एकूण रक्कम : १० कोटी २१ लाख १५ हजार ६००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंजाळांच्या अटकेसाठी अडीच तासांची कसरत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दंगलप्रकरणी युवासेना उपसचिव आणि नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांच्या अटकेसाठी मंगळवारी पोलिसांना तब्बल अडीच तासांची कसरत करावी लागली.

राजाबाजार, नवाबपुरा, शहागंज भागात झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि फोटोवरून कारवाई सुरू केली आहे. शिवसेनेचे नगरसेवक जंजाळ यांना ताब्यात घेण्यासाठी मंगळवारी सकाळी पोलिस शिवाजीनगरला पोहचले. दोन पोलिस उपायुक्त,

सहाय्यक पोलिस आयुक्त आणि पोलिस निरीक्षकांच्या सोबतीला आठ व्हॅन, वज्र वाहन असा तगडा फौजफाटा होता. चौकशी करून जंजाळ यांना ताब्यात घेण्याच्या भूमिकेवर पोलिस ठाम होते. पोलिस आले असे कळताच शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या घराजवळ जमा झाले. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या तरुणांनी घोषणाबाजी सुरू केली. जंजाळ यांच्या अटकेला विरोध होत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी थेट कारवाई करणे टाळत पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. दानवे यांच्या गाडीत ते क्रांतीचौक पोलिस ठाण्यात आले. तेथे चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

\Bक्रांतीचौक पोलिस ठाण्यातही गर्दी

\Bजंजाळ यांना शिवाजीनगर येथून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात आणण्यात आले. शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांची पोलिस ठाण्यात उपस्थिती होती. यामध्ये महापौर नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपमहापौर विजय औताडे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह समीर राजूरकर, राजगौरव वानखेडे, आप्पासाहेब कुडेकर यांची उपस्थिती होती. पोलिस ठाण्यात आणि बाहेरही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. महिलांची संख्याही यात मोठी होती. दुपारी अडीचपर्यंत ही प्रक्रिया चालली. तोपर्यंत गर्दी कायम होती. गर्दी पांगविण्यासाठी पोलिस वारंवार सूचना देत होते, परंतु कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर ठाण मांडले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणीचे फोटो फेसबुकपवर टाकून बदनामी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तरुणीचे फोटो फेसबुकवर अपलोड करीत तिची बदनामी करण्यात आली. शनिवार रात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेगमपुरा पोलिस ठाणे हद्दीतील एका महिलेची शुभम पंडित जाधव (रा. जगदीशनगर ) तरुणासोबत ओळख आहे. १६ डिसेंबर २०१७ रोजी जाधवने या महिलेचा पाठलाग करून तिला अडवले होते. तू बेनसीन नावाच्या मुलासोबत का बोलते, जर परत त्याच्यासोबत बोललीस तर फेसबुक अकाऊंटवर तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली होती. दरम्यान, शनिवारी रात्री एका फेसबुक अकाऊंटवरून महिलेचे फोटो अपलोड करीत तिच्या मित्राला पाठविण्यात आले. हा प्रकार मित्राने या महिलेच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शुभम जाधव विरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राजश्री आडे याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लच्छु पहेलवान अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जुन्या औरंगाबाद शहरातील दंगल प्रकरणातील संशयित आरोपी लक्ष्मीनारायण बाखरिया उर्फ लच्छु पहेलवान उर्फ यास बुधवारी सायंकाळी एसआयटीच्या पथकाने दिवाणदेवडी परिसरातून अटक केली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिली.

मोतीकांरजासह राजाबाजार, चेलीपुरा, शहागंज आदी भागात शुक्रवारी रात्री दंगल उसळली. त्यात दोघांचा मृत्यू झाला, तर दगडफेक, जाळपोळीमध्ये अनेक जण जखमी झाले होते. मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. या दंगलप्रकरणात नगरसेविका यशश्री बाखरिया यांचे वडील लच्छु पहेलवान हे संशयित आरोपी असून, पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, दिवाणदेवडी परिसरात लच्छु पहेलवान असल्याची माहिती एसआयटी पथकास मिळाली. त्याआधारे पथकाने कारवाई करत लच्छु पहेलवान यास अटक केली, असे पोलिस उपायुक्त ढाकणे यांनी सांगितले.

दरम्यान, राजा बाजार येथील एका तरुणाला सायंकाळी पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतल्याने परिसरातील महिला संतप्त झाल्या. दंगल सुरू असताना पोलिस कुठे होते, असा सवाल करत त्यांनी रोष व्यक्त केला. निरपराध लोकांना अटक करू नको, अशी मागणी मोठ्या संख्येने जमलेल्या महिलांनी करत सिटी चौक पोलिस ठाण्याकडे निघाल्या होत्या. ही माहिती समजताच पोलिस उपायुक्त दीपाली घाटे-घाडगे यांनी घटनास्थळी जाऊन निरपराधांवर कारवाई होणार नाही, असे आश्वासन दिले. दरम्यान, चौकशीनंतर त्या तरुणास सोडून दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images