Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

स्मार्ट सिटीसाठी मंगळवारी बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी योजनेतील विविध कामे मार्गी लावण्यासाठी मंगळवारी (२२ मे) मुंबईत बैठक होणार आहे. स्मार्टसिटी योजनेच्या 'एसपीव्ही'चे (स्पेशल पर्पज व्हेकल) अध्यक्ष सुनील पोरवाल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीसाठी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक मुंबईला जाणार आहेत. सिटी बस खरेदीसह अन्य विषयांबद्दल यावेळी ठोस निर्णय होईल असे मानले जात आहे. मंगळवारी स्मार्ट सिटी योजनेची बैठक असल्यामुळे या दिवशी होणारी सर्वसाधारण सभा महापौर नंदकुमार घोडेले यांनी रद्द केली आहे, ही सभा बुधवारी ( २३ मे) होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोष टाळण्यासाठी मशीन हलविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रोष टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने मध्यवर्ती जकात नाक्यात बसवलेले मशीन चिकलठाणा येथील दुग्धनगरीच्या जागेवर हलविले. त्यानंतरही या जागेवर शनिवारी कचरा टाकण्यात आला नाही. कचरा टाकण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या अन्य तीन जागांवर दिवसभरात ४२८ टन कचरा टाकण्यात आला.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी संनियंत्रण समितीने सात ठिकाणे निश्चित केले आहेत. त्यापैकी चिकलठाणा (दुग्धनगरी), हर्सूल, कांचनवाडी व पडेगाव येथील जागेवर तातडीने कचरा टाकण्याचे आदेश आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी कचऱ्याने भरलेल्या काही ट्रक चिकलठाणा येथील जागेवर पाठवण्यात आल्या. तेथील नागरिकांनी विरोध केल्यामुळे कचरा न टाकताच पालिकेच्या पथकाला माघारी फिरावे लागले. कचऱ्यावर प्रक्रिया करणारे यंत्र प्रथम बसवा आणि त्यानंतर कचरा आणून टाका, अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती. कचऱ्याबद्दलचा नागरिकांचा रोष टाळण्यासाठी मध्यवर्ती जकात नाक्याच्या परिसरात बसवलेले मशीन पालिका प्रशासनाने दुग्धनगरीच्या जागेवर हलविले. कचऱ्यापासून खत निर्मिती झाल्यावर खतातील प्लास्टिक, काचा असे घटक निवडून काढणारे हे मशीन आहे. दुग्धनगरीच्या जागेवर मशीन बसवल्यावर देखील शनिवारी त्या जागेवर कचरा टाकण्यात आला नाही. हर्सूल - सावंगी येथील जागेवर झोन क्रमांक चार व पाचमधील १६४ टन कचरा शनिवारी टाकण्यात आला. कांचनवाडी येथील जागेवर झोन क्रमांक सात व आठमधील ६३ टन कचरा टाकण्यात आला. पडेगाव येथील जागेवर झोन क्रमांक एक व नूमधील २०१ टन कचरा टाकण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड नगरपािलका

शिक्षकांचा नऊ महिन्यांनंतर पगार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आडगाव खुर्द (ता. औरंगाबाद) येथील शिक्षण प्रसारक मंडळ पिंप्री राजा या संस्थेच्या पद्मश्री सखाराम पाटील हायस्कूलमधील चार शिक्षक आणि तीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या नऊ महिन्यांपासून रखडले होते. शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे यांच्याकडे ही व्यथा मांडली. त्यानंतर झालेल्या पाठ पुराव्यानंतर अखेर शिक्षकांना पगार मिळाला.

पद्मश्री सखाराम पाटील हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक एन. टी. रणयेवले हे ३१ जुलै २०१७ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर संस्थेने एक ऑगस्ट २०१७ रोजी संजय रामराव महाले यांना प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नेमणूक दिली. परंतु, प्रकृती खराब असल्याने महाले यांनी ३१ जानेवारी २०१८ रोजी प्रभारी मुख्याध्यापक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संस्थेने त्यांच्या जागी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून अशोक विश्वंभर जोशी यांची नेमणूक केली. प्रभारी मुख्याध्यापक बदलल्यानंतर संस्थेने शिक्षण विभागाकडे त्यासंदर्भातील पत्रव्यवहार केला. परंतु, प्रभारी मुख्याध्यापक पद नेमणुकीला शिक्षण विभागाने मान्यता दिली नाही. पदाची मान्यता न मिळाल्याने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ऑगस्ट २०१७ पासून वेतनापासून वंचित रहावे लागले. दरम्यान आमदार विक्रम काळे आणि राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप विखे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर शिक्षकांचा पगार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंजाळच्या जामिनावर सुनावणी पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नगरसेवक राजेंद्र जंजाळ याच्या नियमित जामीन अर्जावर प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांच्या न्यायालयात आज सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने प्रकरण आदेशासाठी राखून ठेवले आहे. त्यावर सोमवारी आदेश होण्याची शक्यता आहे.

'एमआयएम'चा फेरोज खान याच्यावतीने आज जामीन अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर सोमवारी प्रभारी सत्र न्यायाधीश गोसावी यांच्या न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावतीने अ‍ॅड. खिजर पटेल काम पाहत आहेत. जंजाळ नगरसेवक असून प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांच्याविरुद्धचा गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून, जंजाळकडून कोणतेही हत्यार जप्त करण्यात आले नाही. त्यांना जामीन मंजूर करावा. न्यायालयाने घातलेल्या अटींचे पालन करू असा युक्तीवाद जंजाळचे वकील अशोक ठाकरे यांनी केला. जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी जामीन अर्जास विरोध केला. त्यांनी तपासाची कागदपत्रे न्यायालयात सादर केली. गुन्हा घडविण्याचा काय उद्देश होता, आरोपीने कोणते साहित्य वापरले, अन्य कोणी साथीदार आहेत काय, दंगल घडवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत अशांतता निर्माण करण्याचा काय उद्देश आहे आदींचा तपास करायाचा आहे. आरोपींकडून घटनेच्यावेळचे कपडे जप्त करावयाचे आहेत. तसेच घटनेचा सखोल तपास करावयाचा आहे. जामीन मंजूर करू नये, अशी विनंती त्यांनी केली. जंजाळ यांच्यावतीने अशोक ठाकरे यांनी काम पाहिले. त्यांना सचिन शिंदे, अभयसिंह भोसले व विष्णू मदन पाटील यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी उपशात घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरासाठी जायकवाडी धरणातून केल्या जाणाऱ्या पाणी उपशात पाच 'एमएलडी'ची घट झाली आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होऊ लागला आहे. दरम्यान पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शनिवारी पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली व योजना समजून घेतली.

जायकवाडी धरणात सुमारे ४५ टक्के पाणी असताना औरंगाबाद शहरात मात्र पाणीबाणी निर्माण झाली आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात प्रशासनाला यश येताना दिसत नाही. त्यामुळे नगरसेवक व नागरिकांना वेळोवेळी आंदोलन देखील करावे लागले. आंदोलनातून मार्ग काढताना सगळ्याच शहरासाठी चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अद्याप योग्य प्रकारे अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे पालिकेचे नूतन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शनिवारी सकाळी सात ते दहा या वेळात पाणीपुरवठा योजनेची पाहणी करून योजना समजवून घेतली. जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहरासाठी १५५ एमएलडी पाणी उपसले जाते. पाणी उपसणाऱ्या पंपांची क्षमता कमी झाल्यामुळे सध्या १५० एमएलडी पाणी उपसले जात आहे. पाच एमएलडीची तूट आली आहे. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होत आहे असे अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिले.

\Bअधिकाऱ्यांना देणार सूचना

\Bसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. निपुण विनायक यांनी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. माहिती जाणून घेतली. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ते येत्या काही दिवसांत अधिकाऱ्यांना सूचना देतील असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दक्षता कक्षाची पुनर्स्थापना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दक्षता कक्षाची पुनर्स्थापना केली आहे. दक्षता कक्ष विसर्जित करून या कक्षातील अधिकारी शहर अभियंता विभागात नियुक्त करण्याचा पूर्वीच्या आयुक्तांचा आदेश डॉ. निपुण विनायक यांनी रद्द केला. शहर अभियंता सखाराम पानझडे यांने निलंबन रद्द केल्यावर तत्कालीन आयुक्तांनी दक्षता कक्ष देखील संपुष्टात आणला होता. दक्षता कक्षाचे प्रमुख एम. बी. काजी यांची बदली शहर अभियंता विभागात करण्यात आली होती. गेले काही महिने पालिकेत दक्षता कक्ष अस्तित्वात नव्हता. आता डॉ. निपुण विनायक यांनी पुन्हा या कक्षाची स्थापना केली आहे. कक्षाची स्थापना करताना पूर्वीच्या आयुक्तांनी काढलेले आदेश त्यांनी रद्द केले आहेत. दक्षता कक्षाचे प्रमुख म्हणून पुन्हा एम. बी. काजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय शाखा अभियंता पी. जी. पाटे, डी. जी. निकम, संजय कोंबडे यांची दक्षता कक्षात सहाय्यक म्हणून एकतर्फी बदली केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी शाळा खासगींपेक्षा अव्वल

$
0
0

मकरंद कुलकर्णी, औरंगाबाद

गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबविणे सुरू केले आहे. पहिलीपासून इंग्रजी, ज्ञानरचनावाद सारखे उपक्रम ग्रामीण टॅलेंटला वाव देत दर्जात्मक विकास सिद्ध करत आहेत. 'एनसीईआरटी'च्या वतीने २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी शाळांची गुणवत्ता खाजगी शाळांच्या तुलनेत अधिक असल्याचे समोर आले आहे.

'एनसीईआरटी'तर्फे रँडम पद्धतीने शाळांची निवड केली गेली. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका तसेच खासगी शाळांची गुणवत्ता तपासण्यात आली. तिसरीच्या वर्गासाठी मराठी, गणित व परिसर अभ्यास, पाचवीसाठी मराठी, गणित, परिसर अभ्यास आणि आठवीसाठी मराठी गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रात विद्यार्थी किती निपुण आहेत, याची चाचणी घेण्यात आली. राज्य सरकारने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राज्यात सुरू केला आहे. त्याद्वारे जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांची गुणवत्ता वाढीस लागल्याचे दाखले दिले जात होते. किंबहुना अनेक शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्याचे सरकारी यंत्रणांकडून सांगितले जात होते. या सर्वेक्षणातून यास पुष्टी मिळाली आहे. जिल्हा परिषद, महापालिका शाळांच्या गुणवत्तेत खासगी अनुदानित शाळांच्या तुलनेत अधिक गुणवत्ता दिसून आली. जिल्हा परिषद व सरकारी शाळांमधील गुणवत्ता वाढ ही निश्चितपणे सकारात्मक मानली जात आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणारे उपक्रम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी निश्चितपणे फलदायी ठरले आहेत. जिल्ह्यातील शाळांमध्ये दर्जात्मक वाढीसाठी शिक्षकांच्या मदतीने यापुढेही सातत्यपूर्ण कामगिरी केली जाईल.

- सूरजप्रसाद जैस्वाल, शिक्षणाधिकारी

\Bइयत्ता विषय (गुणवत्ता) सरकारी शाळा खासगी अनुदानित शाळा\B

तिसरी मराठी ७२ टक्के ७०.४० टक्के

गणित ७४.२३ टक्के ६५,८७ टक्के

परिसर अभ्यास ७१.२३ टक्के ७०.०९ टक्के

पाचवी मराठी ६४.०६ टक्के ५५.६५ टक्के

गणित ६०.३४ टक्के ५०.९२ टक्के

परिसर अभ्यास ६०.३५ टक्के ५३.७६ टक्के

आठवी मराठी ७०.६४ टक्के ६०.२७ टक्के

गणित ५४.८८ टक्के ४१.२७ टक्के

विज्ञान ४७.४६ टक्के ४०.०४ टक्के

सामाजिक शास्त्र ५५.८७ टक्के ४३.७३ टक्के

………………………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुरुबंधूंची तेरा वर्षांनंतर भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र धर्मतीर्थ येथे १३ वर्षांनंतर दोन गुरुबंधूंचे मंगल मिलन झाले.

आचार्य कुशाग्रनंदीजी महाराज यांचे कचनेरवरून श्री क्षेत्र धर्मतीर्थ येथे आगमन झाले. या प्रसंगी त्यांचे धर्मबंधू आचार्य श्री गुप्तीनंदी गुरुदेव ससंघ यांचे गुरुमिलन झाले. धर्मतीर्थ विकास समिती व धर्मतीर्थ महिला मंडळ त्याच प्रमाणे आडूळ, कोल्हापूर, औरंगाबाद, मुंबई, लोहारिया येथील भक्तांनी आचार्यश्रींचे पादप्रक्षालन केले. अरिहंतऋषी महास्वामी यांनी सांगितले की, धर्मामुळे आपले जीवन सुखमय राहते तसेच आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांनी सर्वांसाठी धर्मतीर्थाची स्थापना केली. आचार्य कुशाग्रनंदीजी महाराज यांनी सांगितले, की धर्मतीर्थ क्षेत्रामध्ये फार मोठी ऊर्जा शक्ती आहे. आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांच्या तप साधनेमुळे हे क्षेत्र जगप्रसिद्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. गुप्तीनंदी महाराज म्हणाले, की ही भूमी शेकडो दिवसांपासून दिगंबर जैन आचार्य व येणाऱ्या पदयात्रींसाठी हायवे महामार्गावर हे क्षेत्र आहे. भगवंतांचे दर्शन घेतल्याने मनाला सुख शांती मिळते. त्यानंतर भगवंतांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचखडी टाकल्यामुळे औरंगपुरा रस्त्यावर अपघाताची भीती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समर्थनगर ते औरंगपुरा या रस्त्यावर कचखडी टाकल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. दुचाकी वाहने स्लीप होण्याचे प्रकार या वाढल्याचे बोलले जात आहे.

उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे रस्त्याचे डांबर देखील वितळू लागले आहे. याची झलक समर्थनगर ते औरंगपुरा या रस्त्यावर पाहण्यास मिळते. समर्थनगरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापासून निराला बाजारमार्गे औरंगपुराकडे जाताना दुपारच्या वेळी रस्त्याच्या वितळलेल्या डांबराची दाहकता लक्षात येते. वितळलेल्या डांबरावरून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. हे टाळण्यासाठी महापालिकेतर्फे या रस्त्यावर कचखडी टाकण्यात आली. वितळलेल्या डांबरावर कचखडी टाकल्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळेल असे मानले जात होते, परंतु टाकण्यात आलेल्या कचखडीमुळे वाहनचालकांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. संपूर्ण रस्त्यावर टाकलेली कचखडी रस्त्याच्या एका बाजूला गोळा झाली आहे. एका बाजूला गोळा झालेल्या कचखडीने अर्धा रस्ता व्यापून टाकला आहे. दुचाकी वाहनचालकांना कचखडीवरूनच वाहने चालवावी लागतात. वेगात असलेले दुचाकी वाहन कचखडीवरून घसरून अपघात होण्याचे प्रमाण समर्थनगर ते औरंगपुरा या रस्त्यावर वाढल्याचे बोलले जात आहे. रस्त्यावर टाकलेली कचखडी पालिकेने गोळा करावी व रस्ता सुस्थितीत आणावा असे मतही व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटक विजयाचा काँग्रेसने केला जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कर्नाटकमध्ये लोकशाहीच्या विजयाबद्दल काँग्रेसच्या वतीने शनिवारी औरंगाबादमध्ये जल्लोष करण्यात आला.

बी. एस. येडियुरप्पा यांना सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दुपारी चारपर्यंत कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. मात्र त्याआधी येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला. काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनी सरकार स्थापण्याचा दावा करूनही राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी बोलाविले होते. अखेरीस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यामुळे लोकशाहीचा विजय झाल्याबद्दल काँग्रेसने जल्लोष व्यक्त केला. फटाके फोडून आनंद साजरा केला. यावेळी आमदार सुभाष झांबड, महापालिकेतील गटनेते भाऊसाहेब जगताप, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष बाबा तायडे, राहुल सावंत, आतिष पितळे, अॅड सय्यद अक्रम, गुलाब पटेल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटदाराच्या यंत्रावर पावणेदोन कोटींची खैरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नाला सफाईसाठी कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्रीवर एक कोटी ७७ लाख ६९ हजार १४८ रुपये खर्च करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. हे काम तातडीचे असल्यामुळे यंत्रसामुग्री उपलब्ध करून घेण्यासाठी अल्पमुदतीची निविदा काढण्याची तयारी देखील करण्यात आली आहे.

पावसाळा जवळ येऊ लागल्यामुळे नाला सफाईसाठी महापालिकेची लगबग सुरू झाली आहे. लवकरात लवकर नाला सफाईची कामे व्हावीत यासाठी पदाधिकारी व नगरसेवक देखील आग्रही आहेत. नाला सफाईच्या कामासाठी लागणाची यंत्रसामुग्री कंत्राटदारांकडून किरायाने घेऊन महापालिकेच्या यंत्रणेमार्फत नाला सफाईचे काम करण्याची पालिका प्रशासनाची योजना आहे. झोन क्रमांक एक ते झोन क्रमांक नऊअंतर्गत मान्सूनपूर्व नाला सफाईच्या कामासाठी कंत्राटदारांकडून खासगी यंत्रसामुग्री व वाहने किरायाने लावण्यासाठी पंधरा दिवस मुदतीची निविदा काढणे गरजेचे आहे. या संदर्भात १२ एप्रिल २०१७ रोजीचा शासन निर्णय देखील आहे. परंतु नाला सफाईचे काम तातडीचे असल्याचे नमूद करून पालिकेच्या यंत्रणेने आठ दिवसांची निविदा काढण्याची परवानगी मिळाण्याबद्दल टिप्पणी देखील तयार करण्यात आली आहे. या टिप्पणीला संबंधित अधिकाऱ्यांनी देखील मंजुरी दिली आहे. त्यामुळे पंधरा दिवसांच्या ऐवजी आठ दिवसांची निविदा काढून कंत्राटदारांची यंत्रसामुग्री व वाहने किरायाने घेण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असे मानले जात आहे.

झोन कार्यालय किरायाच्या यंत्रसामुग्रीचे अंदाजपत्रक (रुपयांमध्ये)

१ - २१९९२८४.००

२ - २३९००९०.००

३ - २३९३०४०.००

४ - १६९२७१०.००

५ - १५०३९१०.००

६ - २२८८६१०.००

७ - १९९८३३०.००

८ - २१७४७४०.००

९ - ११२८४३४.००

एकूण - १,७७, ६९, १४८.००

---------------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देगलूरकर महाराजांचे भागवत कथा निरुपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चैतन्य महाराज देगलूरकर यांचा श्रीमद् भागवत कथा निरुपणाचा कार्यक्रम २३ ते २९ मे दरम्यान कालावधीत होणार आहे.

टिळकनगर येथील पटांगणात हा सोहळा होईल. चैतन्य महाराज देगलूरकर हे वारकरी संप्रदायातील अग्रणी व प्रबोधनशील कीर्तनकार व प्रवचनकार म्हणून ओळखले जातात. अधिक मास पर्वणीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन रुद्राणी समूहाचे संचालक पी. यू. कुलकर्णी व परिवाराने केले आहे. कथा श्रवणाचा औरंगाबादवासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सदगुरु सेवा समिती पंढरपूर, रुद्राणी समूहाचे चेअरमन विवेक देशपांडे, संचालक पी. यू. कुलकर्णी, रोहित देशपांडे, निखिल कुलकर्णी, उषा कुलकर्णी, श्यामल भोगले, सविता कुलकर्णी, नगरसेवक अर्चना नीळकंठ, सागर नीळकंठ, रत्नाकर कुलकर्णी, संजय जोशी, सतीश कुलकर्णी, प्रेमा कुलकर्णी आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅट्रॉसिटी प्रकरणात बारा जणांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

खुलताबाद तालुक्यातील लोणी येथील महिलेस गायरान काठ्या का तोडतेस म्हणून विचारणा करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी बारा जणांवर खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारा जणांना उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार यांनी अहवाल सादर केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. भालेराव यांनी बारा जणांची सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

लोणी गावातील अनुसूचित जातीची महिला गायरानावर लाकडे तोडत असताना तिला गावातील बारा जणांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणात लोणी (ता. खुलताबाद) गावातील गफूर कालू पटेल (वय ६०), हशम कालू पटेल (वय ६५), सलीम कालू पटेल(वय ४०), नदीम म्हसू पटेल (वय २२), निसार हाशम पटेल (वय २३), मोईम सांडू पटेल (वय २३), नजिम अब्दूल रहेमान(वय २८), मुसा सांडू पटेल (वय ५०), सिराज शेख चॉंद पटेल (वय ३५), कडू बाबूलाल पटेल (वय ४३), रऊफ अफजल पटेल, नय्यूम शेख रहीम पटेल यांच्यावर भादवि कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा कलम ३(१) (र) (स) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील कैलास पवार खंडाळकर यांनी बारा जणांच्या जामिनास विरोध केला. पुढील तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्या करण्यासाठी आलेल्या महिलेचे वाचविले प्राण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पतीच्या संशयी वृत्तीला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी देवानगरी रेल्वे रुळाजवळ आलेल्या महिलेचे मनपरिवर्तन करून तिचा जीव वाचविण्यात आला. विशेष पोलिस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील यांनी या कामी पुढाकार घेतला.

गोर्डे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास महिला संग्रामनगर रेल्वे गेटजवळ उभी होती. पाटील त्या महिलेजवळ गेले. त्यांनी तिला बोलते केले. त्या महिलेने आपले नाव आणि गोलटगाव, करमाड येथे राहत असल्याचे सांगितले. आपल्याला तीन मुली आहेत. या मुलींचा खर्च ती स्वत: उचलते. त्यासाठी कामाला जाते. मात्र, पती चारित्र्यावर शंका घेतात. संसारात त्यांचा कसालाही हातभार नसतो. ते मानसिक, शारिरीक त्रास देतात. हे सहन न झाल्याने मी आईकडे आले. तिला या छळाचा प्रकार सांगितला. आणि आईला माहिती नसताना मी आत्महत्या करण्यासाठी आल्याचे सांगितले. या महिलेची पाटील यांच्यासह शिवाजीनगर बीटचे पोलिस कर्मचारी दत्ता बोडखे, अॅड. रामदास भोसले, विलास सोनवणे, राहुल सोनकांबळे यांनी समजूत काढून तिला तिच्या आईच्या हवाली केले. तसे पतीला पोलिसांनी ताकीद दिली.

\B७० वर्षीय महिलेलाही घरी पाठविले

\Bदेवानगरी भागात भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. १८ मे रोजी दहा वाजेपर्यंत एक आजीबाई बसलेली होती. सगळेजण आपआपल्या घरी गेल्यानंतर मंडपात आजीबाई एकटीच होती. तिने आपली मुले चांगल्या ठिकाणी काम करत असल्याचे सांगितले. त्या रस्ता चुकून देवानगरीत आल्या होत्या. शेवटी त्या आजीच्या घरी संपर्क करून त्यांना विशेष पोलिस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील आणि उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी मुलांच्या स्वाधीन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोपांना घाबरत नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आम्ही आरोपांना घाबरत नाही. दंगलीला त्यांनी सुरुवात केली. शिवसैनिक हिंदूंच्या संरक्षणासाठी धावले. संरक्षण करण्यासाठी आम्हास पूर्ण अधिकार असून कुणी आमच्यावर हल्ला केला, तर आम्ही शांत कसे बसणार' असा सवाल शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी केला. ते हिंदू शक्ती मोर्चाच्या सरस्वती भुवन प्रशाला येथील जाहीर सभेत बोलत होते.

आंदोलनात आचार्य जितेंद्र महाराज, शिवाजी इंगे पाटील, प्रकाश बोधले महाराज, नवनाथ आंधळे महाराज यांच्यासह शिवसेना आमदार संजय शिरसाट, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले उपस्थित होते. खैरे म्हणाले, 'दंगलीप्रकरणी यापुढे एकाही हिंदू मुलास अटक करता कामा नये. पोलिसांवर, आमच्यावर हल्ला कोणी केला? सायंकाळपर्यंत पोलिसांनी मतीन नामक व्यक्तीला अटक केली पाहिजे,' अशी मागणी त्यांनी केली. दंगल प्रकरणावरून खैरे राजकारण करत आहेत असा आरोप भाजपने शुक्रवारी केला होता. हाच धागा पकडत खैरे म्हणाले, 'गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ समाजकारणात आहे. आम्ही दंगलीवरून कधीही राजकारण केलेले नाही आणि करणार नाही. दंगलीत शिवसैनिकांनीच हिंदूचे रक्षण केले. अन्य कोणीही आले नाही. आमच्यावर आता आरोप होतील, त्यास घाबरात नाही. सुरक्षेचा, संरक्षणाचा आम्हाला अधिकार आहे. त्यामुळे मंदिर वाचले. दंगल समोरच्या लोकांनी सुरू केली. संयम बाळगा, दक्ष रहा, संघटित व्हा. नगरसेवक राजेंद्र जंजाळ, लच्छू पहिलवानसह अन्य अटकेत असलेल्यांना सोडवू. व्यापाऱ्यांनी आमच्या पाठिशी राहावे. ज्यांनी वाचविले नाही त्यांच्या नादी लागू नका. दंगलीत नुकसान झालेल्या नागरिक, व्यापाऱ्यांना मदत करू.'

\Bभाजपला धडा शिकवू : दानवे

\Bशिवसेना जिल्हाप्रमुख दानवे यांनी 'दंगलीवर राजकारण करते असा आरोप करणाऱ्या भाजपला आम्ही धडा शिकवू' असा इशारा दिला. जितेंद्र महाराज म्हणाले, 'एमआयएम आमदार इम्तियाज जलील हे राजकारण करत आहेत. जलील यांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी केली पाहिजे,' अशी मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता जब्बारचा खून?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्लॉटच्या कारणावरून दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या शेख जब्बार या तरुणाचा खून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एक लाख रुपयांसाठी अपहरण करून हा प्रकार घडला असावा अशी तक्रार बेगमपुरा पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.

आसेफिया कॉलनी परिसरातील हिलाल कॉलनीतील शेख जब्बार शेख गफ्फार (वय २८) हा प्लंबर काम करतो. हिलाल कॉलनीतील नाल्याजवळ राहणाऱ्या त्याच्या आत्याने घराशेजारी पत्र्याचे शेड मारून जब्बार यास राहण्यासाठी दिले होते. तो अतिक्रमित प्लॉटवर राहत असल्याने परिसरातील अमजद व बबल्या या दोन भावांनी जब्बार यास एक लाखाची मागणी केली होती. जब्बार याने पैसे देण्यास असमर्थता दाखवली. १६ मे रोजी जब्बार हा कामासाठी गेला आणि अचानक गायब झाला. यावरून नातेवाईकांनी जब्बार बेपत्ता झाल्याची तक्रार बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिली आहे. हिलाल कॉलनीतील स्मशानभूमीजवळ जब्बारची चप्पल सापडली. त्यामुळे एक लाखासाठी अट्टल गुन्हेगार असणाऱ्या अमजद व बबल्या या दोघा भावंडांनी जब्बारचा खून मृतदेहाची विल्हेवाट लावली, अशी अफवा पसरली. पोलिसांनी स्मशानभूमी भागात श्वानाच्या साह्याने शोध मोहीम राबवली.

दोघेही अट्टल गुन्हेगार

बबल्या व अमजद दोघेही अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांनी व त्याच्या साथीदारांनी रसवंती चालक शेख नजीर याचा खून केला होता. त्यानंतर सात वर्षांपूर्वी पोलिसाचा खबऱ्या असल्याचा संशयावरून मजास नावाच्या तरुणाचा खून करून मृतदेह पत्र्याचा शेडमध्ये पुरला होता. या प्रकरणी दोघाभावांना अटक करण्यात आली होती. सहा महिण्यांपूर्वी हे दोघे भाऊ हर्सूल कारागृहातुन बाहेर पडले आहे. त्यांनी पंधराच दिवसांपूर्वी जब्बार यास एक लाख रुपयांची मागणी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा मोर्चा; इंटरनेट सेवा बंद

$
0
0

औरंगाबाद :

शिवसेनेने शनिवारी दंगलप्रकरणी पोलिस आणि समाजकंटकाविरुद्ध हिंदू शक्ती मोर्चाचे आयोजन केले होते. त्यामुळे सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान शहरातील मोबाइल कंपन्यांची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मोर्चापूर्वीच अचानक इंटरनेट सेवा बंद केल्याने

अफवांचे पेव फुटले होते. शहरात काही पुन्हा घडले का, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला होता. यामुळे अनेक मोबाइल ग्राहकांनी थेट संबंधित लोकांना फोन करून मोर्चात काही घडले आहे का, अशी विचारणा केली. याबाबत संबंधीत मोबाइल कंपन्याच्या प्रतिनिधींना विचारले असता तांत्रिक कारणांमुळे इंटरनेट सेवा बंद असल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खदानीत बुडून तीन मुलींचा मृत्यू

$
0
0

जालना:

घनसावंगी तालुक्यात कपडे धुण्यासाठी खदानीत गेलेल्या सहा मुलींपैकी तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे घनसावंगीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आज सकाळी ११ वाजता ही घटना घडली. घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली येथे लघुसिंचन तलावावर या १५ ते १७ वयोगटातील सहाही मुली कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. धुणी धुतल्यानंतर या मुलींनी तलावात पोहायला सुरुवात केली. मात्र तलावात खदानी असल्यानं खदानीतील गाळात त्या फसल्या. त्यामुळे त्यांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आक्रोश ऐकून काही मुलांनी त्यांना वाचवण्याचा बराच प्रयत्न केला. त्यातील तीन मुलींना वाचवण्यात त्यांना यश आले. मात्र इतर तीन मुलींना ते वाचवू शकले नाहीत. सोमित्रा दत्ता सातपुते, संगिता बजरंग रणमाळे आणि जनाबाई रणमाळे अशी या मृत मुलींची नावे आहेत. तर कल्याणी खोसे, मनीषा रणमाळे आणि ज्योती हेमके यांना वाचवण्यात यश आलं. मात्र या घटनेमुळे घनसावंगी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

64246376

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीच्या पडक्या इमारतीत अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा आसरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत. वर्षभरापूर्वी या इमारतीमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना इमारत रिकामी करण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. वर्षभरात आतापर्यंत ७५ टक्के इमारती रिकाम्या झालेल्या आहेत. मात्र, अद्यापही अनेक एसटी कर्मचाऱ्यांचा आसरा या इमारतीत आहे.

एसटी महामंडळाने विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या मागील बाजुला असलेल्या इमारतीत ६४ कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी इमारती बांधल्या होत्या. याशिवाय ३४ कर्मचाऱ्यांसाठी सीबीएस बस स्थानकाच्या बाजुला असलेल्या जागेवर निवासस्थाने बांधण्यात आली होती. या इमारतीची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. मुंबईत जुनी इमारत कोसळल्याच्या घटनेनंतर मागील वर्षी एसटीच्या या इमारतीची तपासणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागाकडून तयार करण्यात आली होती. या अहवालानुसार या इमारतींची अवस्था वाईट असल्याने या इमारतीमध्ये राहत असलेल्या कर्मचाऱ्यांनी निवासस्थान सोडावे, अशी नोटीस एसटी महामंडळाच्या स्थापत्य विभागाकडून देण्यात आली होती.

या नोटीसनंतर रहिवासी नागरिकांनी या निर्णयाचा तीव्र विरोध केला होता. मागील सहा महिन्यांत या इमारतींमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांनी आपल्या परिवारांना इतरत्र हलविले आहे. दोन्ही भागातील इमारतींमधून अनेक कर्मचाऱ्यांनी घरे सोडली आहेत. मात्र, अजूनही १६ कर्मचाऱ्यांची घरे रिकामी होण्याची बाकी आहेत. आगामी काही महिन्यांत ही घरेही रिकामी होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली.

…………इमारती तोडण्याची कार्यवाही

एसटीच्या इमारती जीर्ण झाल्याने या इमारतीतील कर्मचाऱ्यांना निवासस्थाने सोडण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली आहे. ७५ टक्के इमारती रिकाम्या झाल्यानंतरही त्या पाडण्याबाबत अद्याप काहीच कारवाई एसटी महामंडळाकडून करण्यात आली नसल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

…………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images