Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

माजी खासदार जैस्वाल यांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना सोमवारी दुपारी क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली. क्रांतीचौक पोलिसांनी रविवारी रात्री अकरा वाजता अटक केलेल्या तरुणांना जामीनावर सोडण्याची मागणी करीत तोडफोड केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कोर्टात हजर केले असता प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी ए. यू. खेमकर यांनी हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

मारहाणीचा गुन्हा दाखल असलेले गांधीनगर येथील रोहित डुलगज व सुमित कांगडा या दोघांना क्रांतीचौक पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. त्यानंतर माजी खासदार जैस्वाल हे आठ ते दहा जणांसह क्रांतीचौक पोलिस ठाण्यात आले. यावेळी ड्युटी ऑफिसर म्हणून सहाय्यक फौजदार संजय बनकर, तर ठाणे अंमलदार म्हणून चंद्रकांत पोटे हजर होते. त्यांच्याकडे जैस्वाल यांनी संशयित आरोपींना जामीनावर सोडा, अशी मागणी केली. यावेळी पोलिसांनी तपास अधिकारी उपनिरीक्षक शेख अकमल यांना बोलावून घेतले. त्यानंतर जैस्वाल यांनी ठाणे अंमलदार पोटे यांना, तुम्ही तुमचे काम बंद करा, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा, शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांना पोलिस अटक करीत आहेत, तुम्ही व तुमचे वरिष्ठ अधिकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच टेबलासमोर ठेवलेल्या खुर्चा फेकून देत, पेन स्टँड टेबलावरील काचेवर मारून काच फोडली, अशी फिर्याद चंद्रकांत पोटे यांनी दिली आहे.

\Bशासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा \B

या तक्रारीवरून जैस्वाल यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, धमकी देणे, शिवीगाळ करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डीटीएड, बीएडधारकांची आज बैठक आयोजित

$
0
0

औरंगाबाद: शिक्षक अभियोग्यता चाचणी होऊन सहा महिने होत आले तरी, शासनस्तरावरून भरती प्रक्रिया केली जात नाही. त्याबाबत पुढे काय करायचे यासाठी डीटीएड, बीएडधारकांची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. डीटीएड, बीएड स्टुडंट असोशिएशनतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगपुरा येथील अॅम्बिशन करिअर पॉइंट येथे सकाळी साडे दहा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष संतोष मगर, परमेश्वर इंगोले, प्रशांत शिंदे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजेंद्र जंजाळ यांचा जामीन नाकारला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद जाळपोळ केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या युवासेना उपसचिव, नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांचा नियमित जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी फेटाळून लावला. मोहंमद शोहेब अब्दुल मुनाफ (२८, राजाबाजार) यांच्या तक्रारीवरून राजेंद्र जंजाळ यांच्याविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जंजाळ यांना शिवाजीनगरातून १५ मे रोजी अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी नियमित जामीनसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. जंजाळ हे नगरसेवक असून प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांच्याविरुद्धचा गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून, जंजाळ यांच्याकडून कोणतेही हत्यार जप्त करण्यात आले नाही. त्यांना जामीन मंजूर करावा. न्यायालयाने घातलेल्या अटींचे पालन करू, असा युक्तीवाद जंजाळ यांचे वकील अशोक ठाकरे यांनी केला. जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी जामीन अर्जास विरोध केला. त्यांनी तपासाची कागदपत्रे न्यायालयात सादर केली. गुन्हा घडविण्याचा काय उद्देश होता, आरोपीने कोणते साहित्य वापरले, अन्य कोणी साथीदार आहेत काय, दंगल घडवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत अशांतता निर्माण करण्याचा काय उद्देश आहे आदींचा तपास करायाचा आहे. आरोपीकडून घटनेच्या वेळचे कपडे जप्त करावयाचे आहेत. तसेच घटनेचा सखोल तपास करावयाचा आहे. जामीन मंजूर करू नये, अशी विनंती त्यांनी केली. ही विनंती कोर्टाने मान्य केली. जंजाळ यांच्या वतीने अशोक ठाकरे यांनी काम पाहिले. त्यांना सचिन शिंदे,अभयसिंह भोसले व विष्णू मदन पाटील यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद दंगलीबाबत मुस्लिम आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

$
0
0

मुस्लिम आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट औरंगाबाद : शहरात झालेल्या दंगलींबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुपारी सर्वच राजकीय पक्षाचे मुस्लिम आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. एआयएमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती एका प्रसिद्धी पत्रकादवारे दिली आहे. या शिष्टमंडळाच्या वतीने औरंगाबाद शहरात झालेल्या दंगलीचे फुटेजही मुख्यमंत्र्यांसमोर सादर केले जाणार आहे. यात शिवसेनेच्या काही नेत्यांचा प्रत्यक्ष सहभाग असलेले व्हिडिओचे पुरावेही मुख्यमंत्र्यांसमोर करून दंगलीस कारणीभूत असलेल्या अशा नेत्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे. याशिवाय या दंगलीत निर्दोष शहरातील काही युवकांना कोणत्याही पुराव्याविना अटक करण्यात आली आहे. अशा निर्दोष तरुणांना सोडण्यात यावे, याशिवाय दंगलीच्या फुटेजमध्ये पोलिस दलाचे काही अधिकारी दंगेखोरांची भेट घेत आहेत, अशा पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारावासियांचा हल्लाबोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद सातारा देवळाई परिसर महापालिकेत आल्यानंतर या भागाचा विकास खुंटला आहे. पिण्याच्या पाण्यापासून ते खराब रस्त्याचा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. रेणुका माता मंदिर ते अहिल्या देवी होळकर रस्त्याचे काम सुरू करा, या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवा, इतर नागरी समस्या सोडवा अशी मागणी करीत सातारा देवळाई भागातील नागरिक संघर्ष समितीकडून सोमवारी (२१ मे) हल्ला बोल आंदोलन करण्यात आले. सातारा आणि देवळाई परिसरातील नागरिकांकडून वारंवार त्यांच्या मागण्याबाबत निवेदने तक्रारी देण्यात येत आहेत. या तक्रारीची दखल महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी घेत नाहीत. सातारा देवळाई भागातील जनतेकडून आंदोलन झाल्यास पदाधिकारी त्यांच्या आश्वासनांवरच बोळवण करतात. कोणतीही कृती होत नाही. या सर्व प्रकाराला वैतागून सातारा देवळाई संघर्ष समितीकडून प्रभाग कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. पिण्याचे पाण्याचे रिकामे हंडे तसेच हातात प्रशासनाच्या विरोधात असलेले फलक घेऊन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती. सातारा देवळाई परिसरातील अनेक विहिरी अटल्या आहेत. टँकरद्वारे पाणी पुरवठाही करण्यात येत नाही. या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या मागणीकडेही महापालिकेचे दुर्लक्ष आहे. या शिवाय या भागातील नागरिकांनी सातारा-देवळाई परिसरातील मालमत्ता नियमित करा तसेच यासाठी कँम्प लावण्याचीही मागणी केली आहे. सातारा देवळाई भागात पथदिवे बसविणे, पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. सातारा-देवळाई संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आलेले निवेदन महानगर पालिकेचे उपअभियंता के. एम. फालक, तसेच वार्ड अधिकारी पी. जी. पवार यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारण्यात आले. या आंदोलनात पद्मसिंग राजपूत, रमेश बहुले, रंजीत ढेपे, संजय कुलकर्णी, अनिल बनगर, शांतीलाल साबळे, रुक्साना शाहा, सुमन माळी, राधा चोरमारे, अंजुम शेख, जयश्री गायकवाड, असद पटेल, गणेश साबळे, रंगनाथ आरते आदिंसह सातारा-देवळाईतील नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात उन्हासोबत पेट्रोलचाही चटका

$
0
0

औरंगाबाद : शहरात सोमवारी (२१ मे) तब्बल ४२.१ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. एकीकडे ऊन तापत असताना दुसरीकडे पेट्रोल दरवाढीच्या झळाही सर्वसामान्यांना बसत आहेत. गेल्या चौदा वर्षांत शहरात सोमवारी सर्वाधिक म्हणजे ८५ रुपये ४६ पैसे प्रतिलिटर या दराने पेट्रोल विकण्यात आले. कर्नाटक विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर पेट्रोलचे दर वाढत आहेत. मागील पाच दिवसांत पेट्रोलचे दर अडीच रुपयांनी वाढले. डिझेल दरातही वारंवार वाढ होत आहे. पाच ते सात दिवसांत डिझेलचे दरही चार रुपयांनी वाढल्याची माहिती पेट्रोल विक्रेत्यांनी दिली. सध्या शहरात डिझेलचे दर ७३ रुपये २४ पैसे असा आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकान लुटणाऱ्या चौघांना कोठडी

$
0
0

दुकान लुटणाऱ्या चौघांना कोठडी औरंगाबाद : दंगलीच्या काळात चेलीपुरा येथील संगणक, मोबाइलच्या दुकानात शिरून २२ लाखांचे साहित्य लुटणाऱ्या चौघांना सिटीचौक पोलिसांनी अटक केली. त्या चौघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. कांबळे यांनी २३ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. महमद शाकेर यांचे चेलीपुरा परिसरात संगणक आणि मोबाइल दुरुस्ती - विक्रीचे दुकान आहे. या १३ मे रोजी झालेल्या दंगलीत दंगलखोरांनी दुकानात शिरून मोबाइल, पेनड्राइव्ह, मोडियम, हार्डडिस्क, सीसीटीव्ही कॉमेरे असा जवळपास २२ लाख २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला. शाकेरच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून अक्षय मघाडे, निखिल नावेद, धनराज राऊत, शुभम गुराल्ले या तिघांना अटक केली. त्या तिघांना आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. कांबळे यांच्यासमोर हजर करण्यात आले असता सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी त्याच्या ताब्यातून साहित्य जप्त करावयाचे आहेत, अन्य साथीदारांची चौकशी करून त्यांना अटक करावयाची असल्यामुळे पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती केली.

न्यायालयाने त्या तिघांना बुधवारपर्यंत कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात रक्ताचा तुटवडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उन्हाळ्यात तुलनेत रक्तदान शिबिरांची संख्या घटल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून घाटी रुग्णालय; तसेच शहरातील इतर रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये केवळ कार्डधारक; तसेच थॅलेसेमिया रुग्‍णांसाठीच रक्त देण्यात येत आहे.

उन्हाळ्यात महविद्यालयांना सुट्ट्या लागल्या असून, कंपन्यातील कर्मचारीही सुट्ट्यांमध्ये परगावी गेल्याने शहरात रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे. परिणामी, मे महिन्यात शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता जाणवू लागल्याने रक्‍तपेढी; तसेच संयोजकांची पळापळ सुरू झाली असल्याचे चित्र शहरात आहे. दरम्यान, १५ जूननंतर स्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्वास बहुतांश ब्लडबँकेच्या प्रशासनांना आहे.

'एप्रिल ते जून महिन्यापर्यंत रक्तदान शिबिरांची संख्याच कमी असते. या काळात कॉलेजलाही सुटी असते. त्यामुळे शिबिरांची संख्या घटत असल्‍याने रक्तसंकलन कमी प्रमाणावर होते. घाटी रुग्णालयात दररोज रक्त व रक्तघटक असे सुमारे ९० ते ९५ बॅग वितरित करण्यात येतात. सध्या रक्‍तसंकलन कमी असल्याने अडचण निर्माण होत असली तरी १५ जूनपर्यंत स्थिती पूवर्वपदावर येईल, असा विश्वास घाटी रुग्‍णालयातील रक्तपेढीप्रमुख डॉ. अंजली इंगळे यांनी व्यक्त केला.

शहरातील दत्ताजी भाले रक्तपेढीचे अप्पासाहेब सोमासे म्हणाले की, उन्हाळ्यात तुलनेत रक्तसंकलन कमीच होते हे खरे आहे. स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या दात्यांची संख्या वाढविण्यावर आमचा भर आहे. ज्या रक्तगटाच्या रक्ताची कमतरता आहे. अशा दात्यांकडून रक्तसंकलन करण्यात येतो जेणेकरून रुग्‍णाला अडचण निर्माण होणार नाही. अशा रक्तदात्यांची संख्या वाढवून त्यांच्यामार्फत उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा कमी करण्याचा आमचा प्रयत्न असतो.

औरंगाबाद ब्लड बँकेचे शामराव सोनवणे म्हणाले की, उन्हाळ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याने गरजूंची गैरसोय होत आहे. आमच्या रक्तपेढीत जेमतेम रक्ताचा साठा आहे, येत्या दोन दिवसांत पुन्हा शिबिरांचे नियोजन केले असले, तरी रक्ताची गरज आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत असल्याने अडचण निर्माण होत आहे.

उन्हाळ्यात रक्तदान शिबिरे कमी प्रमाणात होतात. त्यामुळे रक्त मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही, दररोज २० बॅग; तसेच रक्तघटकाचे वितरण करण्यात येते, मात्र सध्या तुटवडा असल्याचे एमजीएम रुग्‍णालयातील रक्तपेढीप्रशासनाने सांगितले.

रक्ताचा तुटवडा असल्याने आम्ही केवळ थॅलेसे‌मियाच्या रुग्‍णांना तसेच कार्डधारकांना रक्तपुरवठा करत आहोत, इतर रक्ताच्या गरजुंना मात्र रक्त पुरवण्यासाठी अडचणी येत असल्याचे लोकमान्‍य ब्लड बँकेच्या प्रशासनाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'त्या' महिला पोलिसाच्या लिंगबदलास परवानगी

$
0
0

बीडचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचा हिरवा कंदील

म. टा. प्रतिनिधी, बीड

लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर पोलिस दलात कायम ठेवण्यासाठी बीड जिल्हा पोलिस दलातील महिला कॉन्स्टेबल ललिता साळवेने केलेल्या विनंतीला हिरवा कंदील मिळाला असून, त्या बीड पोलिसांत कायम राहणार आहेत. बीडचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तिला लिंगबदल करण्याची परवानगी दिली.

ललिता बीड जिल्ह्यातील पोलिस दलात २०१०मध्ये पोलिस भरती झाली होती. या भरतीमध्ये महिला कॉन्स्टेबल म्हणून ललिताची महिला पोलिस म्हणून पोलिस दलात समावेश झाला होता. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे लिंग बदल करण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. महिला पोलिस कॉन्स्टेबल भरती झाल्यानंतर, तिच्या शरीरात बदल तिला जाणवू लागले. त्यामुळे तिने जिल्हा पोलिस प्रमुख जी. श्रीधर यांना सप्टेंबर २०१७ मध्ये अर्ज करून पुरुष होण्याची परवानगी द्यावी, असे तिने अर्जामध्ये म्हटले होते. मात्र, हा विषय जिल्हा पोलिस प्रमुखांच्या कार्यकक्षेत येत नाही. त्यामुळे त्यांनी हा अर्ज राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे पाठवला होता. पोलिस महासंचालकांनी तिची मागणी फेटाळली होती. मात्र, या दुर्मिळ प्रकरणात सहानुभूतीने विचार व्हावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

दरम्यान, लिंग बदल केल्यानंतर ही तिच्या नोकरीवर गदा न येता, पुरुष म्हणून नोकरीवर कायम राहता यावे यासाठी ललिताने पोलिस भरती अधिनियमनात बदल करण्याविषयी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनानंतर गृहखात्याने या प्रकरणी कायदेशीर मत मागविले. ललिता साळवे त्यांच्या शरीरातील जैविक बदलांशी सामना करत आहे. ही नैसर्गिक घटना असून त्यामुळे त्यांच्या बाबत सकारात्मक दृष्टिकोन बाळगला जाणे आवश्यक आहे, असे सांगत विशेष केस म्हणून तिच्या मागणीला हिरवा कंदील दिला.

'ती' आता 'तो' होणार

वरिष्ठांच्या परवानगीने जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तिला लिंगबदल करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती साळवे यांनी दिली. या शस्त्रक्रियेचा खर्च त्यांनी वैयक्तिक उचलावा, असे पत्रात सांगण्यात आले आहे. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी पाच लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याच कळते. या प्रकरणी ललिताची लिंगबदलानंतर नोकरी कायम राहणार असल्याने 'ती' आता 'तो' होऊन पोलिसांत पुढील काळात कार्यरत राहू शकेल असे स्पष्ट होते.

परवानगी मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष खूप मोठा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक, जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी सकारात्मकरित्या बाजू समजून घेऊन हा निर्णय दिला. त्यासोबतच या प्रकरणात माध्यमांनी सहकार्य केले.

- ललिता साळवे, पोलिस कॉन्स्टेबल, बीड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात हिरवाईसाठी सहकार्य करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'गंगापूर तालुक्यातील वाघलगाव येथे राबवलेल्या वृक्षलागवडीप्रमाणेच मराठवाड्यात हिरवाई व्हावी यासाठी आपण सहकार्य करणार आहोत,' असे आश्वासन अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिले. त्यांनी मंगळवारी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेऊन वृक्षलागवडीसंदर्भात चर्चा केली.

शिंदे यांनी वाघलगाव येथील वृक्षलागवडीनंतरच्या संगोपनाचाही आढावा घेतला; तसेच आता तेथील परिस्थिती काय आहे, गेल्यावर्षीपेक्षा यंदा आणखी क्षेत्र वाढवता येईल का, वृक्षारोपण आणि संगोपनासाठी सरकारी यंत्रणांकडून कशाप्रकारे सहकार्य मिळेल यावरही बैठकीत चर्चा झाली. वाघलगावप्रमाणेच हा उपक्रम मराठवाड्यात राबवता येईल का, तसेच इको बटालियन आणि माझं गाव माझी टेकडी या उपक्रमाबाबतही मा‌हिती जाणून घेतली. वृक्षारोपणासह झाडे जगवण्यासाठी मनरेगातून पाणी उपलब्धतेसाठी शेततळे करण्याचा विचार या चर्चेतून समोर आला. शिंदे यांच्या संस्थेच्या माध्यमातून गेल्यावर्षी वाघलगाव येथे वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला होता. तेथे आणखी सुमारे १५ एकर जमीन शिल्लक असून, त्या जागेवरही वृक्षारोपण करण्याचा मानस शिंदे यांनी व्यक्‍त केला. मराठवाड्यात वृक्षारोपणाबाबत लोकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासनही सयाजी शिंदे यांनी यावेळी दिले.

\B१३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

\Bशिंदे यांच्या भेटीत विभागीय आयुक्त म्हणाले, 'यंदा मराठवाड्यात १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. केवळ वृक्षारोपण न करता ही झाडे जगवण्यासाठी पाणी कसे उपलब्ध करून देता येईल, यासाठी मनरेगातून शेततळे तयार करण्याचा पर्याय समोर आला. पावसाळ्यापूर्वी शेततळे तयार केल्यास पावसाचे पाणी त्यात साचेल. हेच पाणी वृक्ष संगोपनासाठी वापरता येईल. तसेच ज्या - ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गायरान जमीन आहे तिथे शेततळे तयार करून परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येईल. येथे विविध प्रकारचे झाडे लावून संगोपन करण्याची जबाबदारी गावकऱ्यांवर देण्यासंदर्भात पावले उचलली जातील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमाई साहित्य संमेलनाचे आयोजन

$
0
0

औरंगाबाद - रमाई फाउंडेशन व रमाई मासिक, औरंगाबाद यांच्या वतीने सातवे रमाई चळवळीचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सोलापूर येथे २७ मे रोजी संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री हिरा दया पवार राहणार असून भीमराव आंबेडकर, शारदा गजभिये, प्रा. सुशीला मूलजाधव, डॉ. अरुणा लोखंडे, उर्मिला पवार, प्रा. आशालता कांबळे, प्रा. विजयकुमार गवई, योगीराज वाघमारे, प्रा. अझीज नदाफ आणि दत्ता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या संमेलनात रसिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन रमाई फाउंडेशनच्या प्रा. रेखा मेश्राम, दैवशाला गवंदे, शोभा खाडे, ललिता खडसे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किसानपुत्रांचा मुंबईत संवाद

$
0
0

औरंगाबाद: किसानपुत्र संघटनेच्या वतीने शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. १८ जून रोजी आझाद मैदान परिसरातील पत्रकार भवनात किसानपुत्रांचा संवाद होणार आहे. संविधान आणि शेतकरी या विषयावर प्रमोद चुंचूवार, शेतकऱ्यांच्या समस्या व उपाय या विषयावर डॉ. आशीष लोहे व शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी याचिका या विषयावर मकरंद डोईजड बोलणार आहेत. किसानपुत्रांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अमर हबीब यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’चे १८ कंत्राटदार पात्र

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी नियोजित १६ पॅकेजच्या कामांसाठी कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. तांत्रिक निविदा तपासणीमध्ये १८ कंत्राटदार पात्र ठरले आहेत. या पॅकेजच्या आर्थिक निविदा (फायनान्शिअल बीड) सोमवारी उघडण्यात येतील. त्यानंतर कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हा महामार्ग आठ जिल्ह्यांमधून जाणार आहे. यासाठी ४५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या असून काही ठिकाणी भूसंपादनाचे काम सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पॅकेजसाठी तांत्रिक निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याची छाननी नुकतीच झाली. त्यात १८ कंत्राटदार निकषास पात्र ठरले. या कंत्राटदारांनी सादर केलेल्या आर्थिक निविदा सोमवारी उघडल्या जातील. त्यात भरलेले दर पाहून कंत्राटदार निश्चित होतील. त्यानंतर पात्र कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत.

\Bपात्र ठरलेले कंत्राटदार\B

अॅफकॉन्स, अशोका बिल्डकॉन, अॅपको, बी.सीनाईह सीपीएल, दिलीप बिल्डकॉन, गायत्री प्रोजेक्टस, एल अँड टी, मेघा इंजिनीअरिंग, नवयुग इंजिनीअरिंग, पीएनसी इन्फ्रास्ट्रक्चर, सद्भाव, टाटा प्रोजेक्टस, एनसीसी, माँटेकार्लो, ओरिएंटल स्ट्रक्चरल इंजिनीअर्स, केएनआर कन्स्ट्रक्शन्स, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, आयएलएफएस ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क.

१८ कंत्राटदारांच्या आर्थिक निविदा सोमवारी उघडण्यात येतील. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी सध्या सुरू आहे. आर्थिक निविदा निश्चित झाल्यानंतर पुढील प्रक्रिया होऊन कार्यारंभ आदेशाची कार्यवाही लवकरच होईल.

-राधेश्याम मोपलवार, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जब्बार खून प्रकरणतील कुख्यात बबला पसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हिलाल कॉलनी येथील शेख जब्बार खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार कुख्यात गुन्हेगार शेख वाजेद उर्फ बबला हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. बबला हा परराज्यात पळाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. जब्बारचे बुधवारी अपहरण करून त्याचा खून करीत मृतदेह दौलताबाद जवळील विहिरीत फेकण्यात आला होता. याप्रकरणी दोन आरोपी अटक करण्यात आले आहेत.

प्लॉटिंगच्या वादातून शेख जब्बार शेख गफार या तरुणाचे बुधवारी पाच जणांनी कारमध्ये हिलाल कॉलनी येथून अपहरण केले होते. त्याचा मृतदेह दोन दिवसानंतर दौलताबाद जवळील मोमबत्ता तलावाशेजारील विहिरीत आढळला होता. जब्बार याचा करण्यात आला होता. त्याच्या पोटाला दगड बांधून त्याला विहिरीत फेकण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे मुख्य आरोपी बबलाने बेगमपुरा पोलिसांना ही माहिती दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपी शेख अलीम व शेख इरफान उर्फ बाबा लोळी यांना अटक केली आहे. या गुन्ह्यामध्ये शेख वाजेद उर्फ बबला हा मुख्य आरोपी आहे. घटना घडल्यापासून बबला हा शहरातून पसार झाला आहे. बेगमपुरा पोलिस व गुन्हे शाखेच्या वतीने त्याचा शोध सुरू आहे. त्याच्या सध्या सुरू असलेल्या मोबाइल क्रमांकावरून तो परराज्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

\Bनशेची सवय\B

आरोपी बबला हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर दोन खुनाच्या गुन्ह्यांसह जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहे. मेडिकल औषधी व गांजाची नशा करण्याची त्याची सवय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल दरवाढ उद्या काँग्रेसची सायकल फेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशात व राज्यात पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. औरंगाबादमधील दर देशात सर्वाधिक आहेत. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य माणूस, नोकरदार वर्ग हैराण झाला आहे. आर्थिक बजेट कोलमडलेले आहे. केंद्र व राज्य सरकार मात्र दरवाढीच्या माध्यमातून पैसे कमवून सर्व जनतेला वेठीस धरण्याचे काम करत आहेत. या गोष्टींचा निषेध करण्यासाठी औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे गुरुवारी २४ मे सायकल फेरी काढण्यात येणार आहे.

पैठण गेट ते विभागीय आयुक्त कार्यालय यादरम्यान गुरुवारी सकाळी अकरा वाजता ही फेरी काढण्यात येईल. काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी स्वत:ची सायकल घेऊन झेंडा लावून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यांच्या तपासणीसाठी पाच सदस्यीय समिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांची तपासणी गुणवत्ता नियंत्रण समितीकडून करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्णय जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

झेडपीच्या बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्ती व रस्ते मजबुतीकरण केले जाते. ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी अनेक तक्रारी करण्यात येतात. त्यातून अनेकवेळा अडचणी निर्माण होतात. हे टाळण्यासाठी यंदा या कामांची तपासणी गुणवत्ता नियंत्रण समितीकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत समिती सदस्य अक्षय जायभाये यांनी पैठण, कन्नड व सिल्लोड तालुक्यांतील रस्ते मजबुतीकरणाच्या कामांवर आक्षेप घेतला. कामे निकृष्ट झाल्याने सरकारच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचे त्यांनी सांगितले. या कामांची तपासणी समितीकडून करावी, असा ठराव मांडला. सभापती विलास भुमरे यांनी जिल्ह्यातील सर्वच कामे गुणवत्ता नियंत्रण समितीकडून तपासून घेण्याचा निर्णय घेतला. समितीत कार्यकारी अभियंता आनंद राजूस्कर, उपअभियंता झेड. ए. काजी, कनिष्ठ अभियंता अस्वले, जिल्हा परिषद सदस्य अक्षय जायभाये, सय्यद कलीम कोदन यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वीज मीटर रिडिंग काटेकोर करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वीज ग्राहकांचे मीटर रिडिंग दर महिन्याच्या एक ते २५ तारखेदरम्यान घ्या, निर्धारित वेळेत हे काम न झाल्यास संबंधित कार्यकारी अधिकाऱ्यांनी रिडिंग एजन्सीवर कारवाई करावी, नादुरुस्त मीटर ३१ मेपर्यंत बदलावे, वीज गळती कमी करावी, असे आदेस महावितरणचे कार्यकारी संचालक (देयक व महसूल) श्रीकांत जलतरे यांनी दिले.

महावितरणच्या औरंगाबाद व जळगाव परिमंडळ कार्यालय अंतर्गत उपविभागनिहाय वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट व इतर बाबींवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. जलतरे यांनी पाणीपुरवठा व पथदिव्यांचे देयक अचूक करण्याच्या सूचना दिल्या. मुख्य कार्यालयाने १५ मे पर्यंत ३६,१८५ ग्राहकांकडील थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. हे उद्दिष्ट पूर्ण न करणारे शाखा अभियंता, उपविभागीय अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

महावितरणचे संचालक (संचलन) अभिजित देशपांडे यांनी औरंगाबाद प्रादेशिक विभागात वीज वितरण आणि वसुलीत तूट निर्माण झाल्याचे सांगितले. यावेली औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, प्रभारी महाव्यवस्थापक विवले लक्ष्मीकांत राजेल्ली, अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल, देवेंद्र जायस्वाल, संजय अकोडे, कैलास हुमणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांनी तपासले हजेरी रजिस्टर

$
0
0

औरंगाबाद : महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास अचानकपणे महापालिका मुख्यालयातील विविध विभागांना भेट देवून अधिकारी - कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासली आणि हजेरी रजिस्टर देखील तपासले. कर निर्धारक व संकलक विभागात एक कर्मचारी, कामगार विभागात दोन तर शिक्षण विभागात एक कर्मचारी गैरहजर आढळला. त्यांची नावे नोंदविण्यात आली असून या कर्मचाऱ्यांची गैरहजेरी देखील नोंदवण्यात आली. या वेळी उपायुक्त रवींद्र निकम, अस्थापना अधिकारी संजय जक्कल उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट कार्यशाळेला प्रतिसाद

$
0
0

औरंगाबाद - एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयातील फिल्म आर्ट्स विभागाच्या वतीने चित्रपट निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. अभिनेते यतीन कार्येकर यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांनी कार्येकर यांचा सत्कार केला. यावेळी फिल्म आर्ट्स विभागप्रमुख शिव कदम, प्रा. आशा देशपांडे यांची उपस्थिती होती. येत्या शैक्षणिक वर्षापासून एमजीएममध्ये फिल्म मेकिंग अभ्यासक्रम सुरू झाला आहे. प्रवेशासाठी दोन दिवस कार्यशाळा घेण्यात आली. निवडक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. दिग्दर्शन, अभिनय, संपादन, सिनेमॅटोग्राफी, ध्वनी संकलन या विषयावर कार्येकर यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुरुषोत्तम’चे चित्रीकरण सुरू

$
0
0

औरंगाबाद: शहरात 'पुरुषोत्तम' या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. शहरातील कचरा समस्या आणि कर्तबगार प्रशासकीय अधिकाऱ्यांचे काम या विषयावर चित्रपट आधारीत आहे. गारखेडा परिसरात मंगळवारी सकाळी महत्त्वाचे चित्रीकरण करण्यात आले. चित्रपट निर्मितीची जबाबदारी रिमा अमरापूरकर सांभाळत आहेत. प्रमुख भूमिकेत अभिनेता नंदू माधव आहेत. शहरात वेगवेगळ्या लोकेशन्सवर चित्रीकरण करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images