Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मनसेचे वॉर्डनिहाय आंदोलन फसले

$
0
0
शहरातील नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वॉर्डनिहाय आंदोलन हाती घेतले; मात्र आंदोलनाला अपेक्षित प्रतिसाद नसल्यामुळे पक्षाने आंदोलने गुंडाळली आहेत. विद्यानगर वॉर्डातील मटण मार्केट हटवण्याचे आंदोलन पदाधिकाऱ्यांच्या अंगलट आले आहे.

उड्डाणपुलामुळे फूट-ओव्हर ब्रीज रखडला

$
0
0
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मोंढा नाका उड्डाणपुलामुळे ‘एसएफएस’समोरील योजना तूर्त स्थगित ठेवली आहे. या ठिकाणी फूट ओव्हर ब्रीज किंवा रोडलेव्हल अंडरपाथ या दोन पर्यायांचे डिझाइन तयार असूनही महामंडळाला त्यावर निर्णय घेणे कठीण झाले आहे.

​अवैध बांधकामप्रश्नी आत्मदहनाचा प्रयत्न

$
0
0
घराशेजारी होत असलेल्या अवैध बांधकामाविरुद्ध देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने शुक्रवारी देगलूर शहरातील स्वातंत्र्य सैनिकाच्या पुत्राने अंगावर पेट्रोल टाकून घेऊन आत्मदहनाचा अयशस्वी प्रयत्न केला.

चोरट्याच्या मारहाणीत परभणीत वृद्धाचा मृत्यू

$
0
0
शहरात चोरट्यांनी केलेल्या जबर मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाला. एकाच रात्री पाच ठिकाणी चोऱ्या करून तीन लाखांचा ऐवज लांबवून चोरट्यापुढे पोलिसांनी मोठे आव्हान उभे केले आहे.

नांदेड पंचायत समितीची इमारत वीजपुरवठ्याविना

$
0
0
नांदेड पंचायत समितीच्या इमारतीस गेल्या चार महिन्यांपासून वीज पुरवठा मिळत नाही. या इमारतीतील वीजपुरवठा सुरू करण्यासाठी निधी मिळावा म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे हे जिल्हा परिषदेत तीन महिन्यांपासून खेटे घालत आहेत.

हत्तीरोग पेशंटची संख्या वाढतेय

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्यात हत्ती रोगाने सुमारे १ हजार ५६१ जण त्रस्त असून यातील सुमारे १ ‌हजार ११७ रुग्ण हे उमरगा तालुक्यातील आहेत. या रोग नियंत्रणकाची शासन स्तरावरून प्रयत्न जारी असले तरी ते तोकडे पडत असल्याचे यातून दिसते.

‘एकनाथ’च्या कामगारांचे स्थलांतर सुरू

$
0
0
सलग दहा महिन्याचे पगार नाही. पर्यायी काम नाही. त्यातच कारखान्याने कामगार राहत असलेल्या कॉलनीत वीज, पाणी व अन्य सुविधाही बंद केल्या. अशा स्थितीत जवळपास दोनशे कामगारांची कुटुंबे कारखान्याच्या कॉलनीत दारिद्र्याचे जीवन जगत आहेत.

शेतकऱ्यांनी भरले ५० कोटी रुपये

$
0
0
‘महावितरण’ने जंग जंग पछाडूनही शेतीपंपाच्या चालू थकबाकीपोटी औरंगाबाद परिमंडळात फक्त ५० कोटी रुपयांची वसुली झाली आहे. एप्रिल २०१२ ते जून २०१३ या काळात शेतीपंप ग्राहकांकडून २६१ कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट आहे.

खोदकामप्रकरणी कंपनीविरुद्ध तक्रार

$
0
0
बेकायदा रस्ता खोदल्याप्रकरणी रिलायन्स कंपनीविरुद्ध सार्वजनीक बांधकाम विभागच्या वतीने क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीवरुन शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्र‌िया सुरू होती.

‘पॅरोल’नंतर पळालेला कैदी पोलिस निरीक्षकाच्या घरात

$
0
0
पॅरोलवर गेल्यानंतर फरार झालेल्या कैद्यांना मदत केल्याचा ठपका असणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक देविदास ढोले यांचा आणखी एक प्रताप शुक्रवारी समोर आला. पॅरोलवर गेल्यानंतर फरार झालेल्या एका कैद्याला ढोले याच्या घरातून बाहेर पडत असतानाच अटक करण्यात आली.

रजा मंजूर झाल्यानंतरच शिक्षकांनी मुख्यालय सोडावे

$
0
0
जिल्हा परिषदेच्या गुरुजींना यापुढे एका कागदावर अर्ज करून रजेवर जाणे बंद होणार आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून रजा मंजुरी करून घेतल्यानंतरच शिक्षकांनी मुख्यालय सोडावे असे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत.

जिल्हा परिषदेचा शाखा अभियंता निलंबित

$
0
0
औरंगाबाद । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (एमआरइजीएस) कामामध्ये अनियमितता झाल्यावरून गंगापूर पंचायत समितीचे शाखा अभियंता एस. डब्ल्यू. आसोले यांना निलंबित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. आसोलेंच्या कामाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला आहे. गंगापूर तालुक्यात एमआरइजीएस अंतर्गत विविध कामे झाली होती. त्यात गंभीर अनियमितता व गैरव्यवाहर झाल्याचे वेळोवेळी झालेल्या चौकशी अहवालातून समोर आले. गटविकास अधिकाऱ्यांच्या पथकाने २८ मे रोजी चौकशी केली. त्यात आसोलेंनी तालुका कक्षातील योजनेचे अभिलेख कार्यालयात न ठेवता स्वतःच्या घरी ठेवल्याचे आढळून आले. कार्यालयात उपस्थित न राहता घरी राहून काम केल्याची गंभीर बाब निदर्शनास आली होती. २८ नोव्हेंबर २०१२ रोजी गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर केला होता. त्यात म्हटले होते की हैबतपूर, घोडेगाव, नेवरगाव व वाहेगाव येथील योजनेच्या कामांचा चौकशी अहवालानुसार कामाच्या साइट फिजीबल नसणे, स्थळ पाहणी न करता तांत्रिक मान्यता प्रस्तावित करणे, काम चालू असताना भेटी न देणे, मोजमाप पुस्तिका कामांची पाहणी न करता भरणे, प्रत्यक्ष काम व नोंदवलेले मूल्यांकन यात तफावत असणे आदी गंभीर बाबी निदर्शनास आल्या होत्या. त्यात एकूण दहा लाख ६७ हजार ५४९ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी आसोले यांना कारणे दाखवा नोटिस दिली होती. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्या पथकाने तपासणी करून अहवाल सादर केला होता. आसोले यांचे संवर्ग नियंत्रण बांधकाम विभागाकडून होत असल्याने त्यांच्यावर झालेले आरोप, अनियमितता आणि गैरव्यवहार पाहता संबंधितास तत्काळ निलंबित करण्याची कार्यवाही प्रस्तावित करावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आदेशित केले आहे.

‘एअर होस्टेस’च्या नावाखाली फसवणूक

$
0
0
एअर होस्टेसचे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीला ट्रेनिंग सेंटर बंद करून केंद्रचालकाने पावणेदोन लाख रुपयांना फसवल्याचे समोर आला आहे. या तरुणीने क्रांती चौक पोलिस ठाणे गाठून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आणखी काही प्रशिक्षणार्थींची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

बेवारस कारमुळे गोंधळ

$
0
0
काल्डा कॉर्नर भागात गेल्या काही दिवसांपासून बेवारस कार उभी होती. नागरीकांनी दिलेल्या माहितीनंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने या कारची तपासणी केली. संशयास्पद काहीही न आढळल्यामुळे जवाहरनगर पोलिस ठाण्यात ही कार क्रेनद्वारे हलवण्यात आली.

उदयनराजे मोदींबरोबर?

$
0
0
रायगडावर पाच जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त भाजपचे नेते नरेंद्र मोदी आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले एका व्यासपीठावर येणार आहेत. या कार्यक्रमाचा मोठा फलक साताऱ्यात लागला आहे.

समन्यायी पद्धतीने पाणी सोडा

$
0
0
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून लोकप्रतिनिधी सरकारशी भांडत आहेत. पण नगर नाशिक जिल्ह्यातील नेत्यांच्या पुढे काही एक चालत नाही. ही व्यथा आमदार डॉ. कल्याण काळे यांनी नागपूर अधिवेशनात नुकतीच मांडली. जायकवाडी धरणात समन्यायी पद्धतीने पाणी सोडावे, अशी मागणी त्यांनी केली.

मोदी लाटेवर शिक्कामोर्तब

$
0
0
पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची देशभरात लाट आहे. सर्वच राज्यांमधून मोदींना उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच झालेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि दिल्लीतील यशामुळे मोदी लाटेवर शिक्कामोर्तब झाले आहे, असे मत भाजपच्या कोषाध्यक्ष शायना एन. सी. यांनी व्यक्त केले.

‘एसपीआय’ झाली ३६ वर्षांची

$
0
0
मराठी तरुणांना लष्करात अधिकारी बनविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या औरंगाबादच्या सैनिकी सेवापूर्व संस्थेच्या(एसपीआय) स्थापनेला शनिवारी ३६ वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या या शासकीय संस्थेने आजपर्यंत लष्करातील तीनही दलांमध्ये ४५३ अधिकारी दिले आहेत.

‘जेएनईसी’चे विद्यार्थी परीक्षेला मुकले

$
0
0
उपस्थिती कमी असल्याचे सांगून कॉलेज प्रशासनाने ‘डिटेन’ केलेल्या जेएनईसीच्या विद्यार्थ्यांचे आज चौथ्या दिवशीही विद्यापीठात साखळी उपोषण सुरूच आहे.

विद्यापीठात साकारणार ‘सायन्स सिटी’

$
0
0
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निधीतून सायन्स पार्क हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘सायन्स सिटी’ हा प्रकल्प हाती घेतला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images