Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गोळीबारातील जखमीला तत्काळ उपचार द्या

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरात १२ मे रोजी पहाटे झालेल्या दंगलीत जखमी झालेला तरुण मुहीब यास घाटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार द्यावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. व्ही. के. जाधव यांनी दिले. या दंगलीप्रकरणी केलेल्या याचिकेत सिटीचौक पोलिस ठाण्याचे हेमंत कदम यांच्यासह सर्व प्रतिवादींना नोटीस देण्याचे आदेशही न्यायालायाने दिले.

जखमी मुहीब याची आई नसीमा बेगम यांनी ही याचिका केली आहे. त्या दोन मुले आणि दोन मुलींसह जिन्सीमध्ये राहतात. काही राजकीय व्यक्तींनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी दंगल घडवून धार्मिक रंग दिला आहे. १२ मे रोजी पहाटे पाच वाजता त्यांचा मुलगा मुहीब हा झोपला होता. पोलिसांनी त्यांच्या घराजवळ अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे मुहीबला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तो घराबाहेर पडला. तो घराबाहेर निघताच त्याच्यावर पोलिसांनी गोळीबार केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या गोळीबारात मुहीब गंभीर जखमी झाला आहे. त्याला प्रथम घाटी हॉस्पिटल आणि त्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या फुफ्फुसामध्ये गोळी अडकली आहे. शस्त्रक्रिया केल्याशिवाय ही गोळी शरिराबाहेर काढता येणार नाही. परंतु, याचिकाकर्त्या नसीमा बेगम यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी मुहीबचा जीव वाचविण्यासाठी शासनाने उपचार द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

\Bपोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल करा \B

निष्पाप नागरिकांवर गोळीबार करणारे पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याची बाजू एस. एस. काझी यांनी मांडली. त्यांना सईद शेख, फातिमा काझी हे सहाय्य करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसटीच्या कामगारांचे गणवेश अद्यापही पडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मागील तीन वर्षांपासून गणवेश देण्यात आलेले नाहीत. जानेवारी महिन्यात विशेष कार्यक्रम घेऊन मोजक्या कर्मचाऱ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. जानेवारी ते जून या दरम्यान आतापर्यंत एसटी कामगारांना गणवेशचे वाटप करण्यात आलेले नाही. हे गणवेश विभागात पडून आहेत.

औरंगाबाद विभाग नियंत्रक कार्यालयातच्या परिसरात ८ जानेवारी रोजी २०१८ गणवेश वाटपाचा मोठा कार्यक्रम घेण्यात आला. शिवसेनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत गणवेशाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. या गणवेश वाटपाच्या कार्यक्रमावर राज्यभरात लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. यावेळी अनेक कामगारांनी गणवेश चांगले नसल्याची तक्रार केली होती. यानंतर तक्रारी प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे गणवेश बदलण्याची कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती एसटी पदाधिकारी यांनी दिली होती.

गणवेश वाटप कार्यक्रमाच्या पाच महिन्यानंतरही गणवेश वाटपाचे कोणतीही काम औरंगाबाद विभागात अद्यापही सुरू झालेले नाही. औरंगाबाद वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये गणवेश वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळेच जुन्याच गणवेशावर काम करावे लागते. ………

डेपोतून मिळणार ड्रेस

विभागीय कार्यशाळा येथील विभागीय पुरवठा अधिकारी यांना गणवेश वाटपाचे काम देण्यात आले आहे. दिवसभरातून अनेक कर्मचारी पुरवठा विभागात गणवेश वाटपाबाबत विचारण्यासाठी येतात. या कर्मचाऱ्यांना डेपोतून ड्रेस दिले जाणार असल्याची माहिती एसटी कर्मचाऱ्यांना दिली जात आहे.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय विधी विद्यापीठाला पाच कोटी मिळाले

$
0
0

'राष्ट्रीय विधी विद्यापीठाला' अखेर मिळाले पाच कोटी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठा'ला राज्य शासनाने पाच कोटी रुपयांचा निधी दिला दिला आहे. फेब्रुवारीमध्ये घोषणा करण्यात आली होती. राज्यातील तीनही विधी विद्यापीठांना शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

औरंगाबादच्या विधी विद्यापीठाचा जागेचा प्रश्न सुटलेला नाही. त्यासह स्थापनेपासून औरंगाबाद विधी विद्यापीठाला निधी बाबत शासनाकडून दुर्लक्ष होते. राज्यातील इतर दोन विद्यापीठांच्या तुलनेत औरंगाबादच्या विद्यापीठाला निधी देताना हात आखडता घेतला. स्थापनेपासून केवळ २ कोटी ७१ लाख रुपयांचाच निधी देण्यात आला. त्यात फेब्रुवारीमध्ये शासनाने राज्यातील प्रत्येक विद्यापीठाला प्रत्येकी पाच कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. अखेर चार महिन्यानंतर शासनाने हा निधी दिला आहे. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथील विधी विद्यापीठांना प्रशासकीय व शैक्षणिक खर्चासाठी पुढील पाच कोटी रुपयांची रक्कम देत असल्याचे शासनाने जाहीर केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन-तीन दिवसात हा निधी विधी विद्यापीठांना वर्ग करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. औरंगाबाद येथील विद्यापीठ प्रशासनाने निधी मिळावा या हेतुने सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर निधी देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.

पाच वर्ष मिळतील प्रत्येकी पाच कोटी

राज्यात नव्याने उभारण्यात आलेल्या विधी विद्यापीठांना निधीची कमरता आहे. त्यात शासनाने प्रत्येक विद्यापीठाला पाच कोटी रुपये देण्याचे मान्य केले. सुरुवातीला पाच वर्ष हे पाच कोटी रुपये दिले जाणार आहेत. प्रशासकीय व शैक्षणिक खर्चासाठी हा निधी दिला जाणार आहे. त्यानंतर विद्यापीठांनी आपला खर्च उचलावा असे विद्यापीठांना सुचविण्यात आले आहे. निधी देण्याचे हे पहिले वर्ष आहे. यात २०१८-१९ शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. त्याच्या सुरुवातीला विद्यापीठांना निधी मिळाल्याने विद्यापीठांना बळ मिळाले आहे.

शासनाने पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी पाच कोटी रुपये मिळतील. ज्यामुळे प्रशासकीय, शैक्षणिक खर्चाचा मेळ घालणे सोपे होईल.

कोट..

एस. सूर्यप्रकाश,

कुलगुरू,

'महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ' औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याच्या प्लास्टिक पाऊच बंदीला आव्हान

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या पाऊचवर बंदी घालणाऱ्या अधिसूचनेस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, तसेच उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाचे प्रधान सचिव, पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. सुनील कोतवाल यांनी दिले. या याचिकेची सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.

महाराष्ट्र शासनाने २३ मार्च २०१८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे राज्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या पाऊचवर बंदी घातली आहे. या अधिसूचनेला जालना येथील पाऊच उत्पादक महाराष्टÑ पॅक्ड ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे सचिव सैय्यद जावेद अख्तर यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. शासनाने पाऊचवर अचानक बंदी घातली. बंदी घालताना राज्यात किती उत्पादित पाऊच आहेत याचा विचार केला नाही. याउलट विविध नामांकित कंपन्यांच्या बिस्किटे व इतर खाद्यपदार्थांच्या पातळ प्लास्टिक पाऊचवर बंदी घातली नाही. त्यांच्यावर बंदी का घातली नाही याची काही कारणमिमांसा दिलेली नाही. त्या नामांकित कंपन्या आणि पाण्याचे पाऊच उत्पादकांमध्ये भेदाभेद केला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात पाऊचमध्ये पाणी सहजपणे उपलब्ध होते. ते बाटलीबंद पाण्यापेक्षा स्वस्त असून गरिबांना सहजपणे खरेदी करता येते. शासनाने २३ मार्च २०१८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे घातलेली पाऊचवरील बंदी तत्काळ उठवावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे सतीश तळेकर, प्रज्ञा तळेकर आणि उमाकांत आवटे हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाची बदनामी; महिलेवर गुन्हा

$
0
0

औरंगाबाद: तरुणाच्या नावाने फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट अपलोड करण्यात आली. हा प्रकार २६ फेब्रुवारी रोजी घडला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात संशयित महिलेविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुनहा दाखल करण्यात आला.

आदेश महादेवराव आटोटे (वय ३१, रा. तळेश्वर कॉलनी) यांनी ही तक्रार दिली आहे. आटोटे यांना २६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या फेसबुक मॅसेंजरवर दिशा अग्रवाल नावाच्या तरुणीचा मॅसेज आला. आटोटे यांच्याशी काही वेळ चॅटिंग केल्यानंतर तिने फेसबुकवर आदेश व त्यांच्या पत्नीचे फोटो अपलोड करत बदनामीकारक मजूकर पोस्ट केला. तसेच त्यांच्या बहिणीबद्दल देखील बदनामीकारक मजकूर पोस्ट केला. याप्रकरणी आटोटे यांच्या तक्रारीवरून संशयित महिलेविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक राजश्री आडे या तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटिझन रिपोर्टर-६जून

$
0
0

मछली खडक

खांब,वीज वाहिनी धोकादायक

हे छायाचित्र आहे मछली खडक येथील लघुदाब वीज वाहिनीचे. मिलन मिठाई भांडार समोरील या खांबांवरून गेलेली वीजवाहिनी ही इमारतीला अगदी खेटून आहे. शिवाय इमारतीवर टाकलेला पत्रा खूपच जवळ आहे. भर वस्तीमध्ये असे धोकादायक खांब व वाहिन्या शोधून वीजवितरण कंपनीकडून दखल घेतली जाईल काय, जेणेकरून पुढील अनर्थ टळेल.

- शरद लासूरकर, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी महाराजांचे धोरण राबवायला हवे

$
0
0

डॉ. सोनकांबळे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जातीव्यवस्था, बेकारी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा प्रश्नांना देश सामोरा जात आहे. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण अवलंबण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करण्याची खरी आज गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. ह. नि. सोनकांबळे यांनी केले. शिवराज्यभिषेक दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र व राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्रातर्फे बुधवारी डॉ. ह. नि. सोनकांबळे, डॉ. रवी देशमुख यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, डॉ. रवी देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, राहुल म्हस्के, डॉ. फुलचंद सलामपुरे, विभागप्रमुख डॉ. राजेश रगडे, संचालक डॉ. राजेश करपे, डॉ. राम चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सोनकांबळे म्हणाले की, 'राष्ट्राच्या उभारणीत शिवाजी महाराजांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या काळात जनता गुण्यागोविंदाने नांदायची. आजच्यासारखे प्रश्न त्यांना भेडासवत नव्हते. कारण त्यांच्या राज्यात प्रत्येकाच्या कल्याणाचा विचार होता. आजचे प्रश्न पाहिले तर, त्यांची आठवण येतेच. त्यांचे धोरण आज राबविण्याची गरज आहे. डॉ. देशमुख म्हणाले, 'शिवाजी महाराजांनी बांधलेले अभेद्य किल्ले हे आपले वैभव आहेत. या गडकोटांचा अभ्यास तरुणांनी केला तर, त्या काळात महाराजांनी जलव्यवस्थापन, वन संवर्धन अशा गोष्टी कशा राबविल्या हे लक्षात आले येते. अशा धोरणांची आज देशाला गरज आहे. अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले, 'देशाला महासत्ता बनवायचे आपण स्वप्न पाहिले ते साकार करायचे असेल तरुणांनी त्या दृष्टिकोनातून पाऊले उचलायला हवीत. आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा आदर्श आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेश करपे यांनी केले. सूत्रसंचालन गणेश बडे यांनी तर आभार दीपक बहीर यांनी मानले. कार्यक्रमाची रुपरेषा अमोल दांडगे यांनी मांडली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप वाघ, सचीन बोराडे, बालाजी मुळीक, विकास ठाले, परमेश्वर काळे, भारत सुरवसे, संदीप चालक, योगेश शिंदे, काकेश गरुड, हरिभाऊ विटोरे, केशव नामेकर, केशव नामेकर, केशव राऊत, दीक्षा पवार, मोनिका माली, प्रसाद देशमुख, दिलीप गरड आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरव समाजाला हक्क दया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

गुरव समाजाच्या पुजाऱ्यास दरमहा किमान २५ हजार रुपये पगार दयावे तसेच गुरव समाजाचा समावेश विशेष मागास प्रवर्गात करावा, या मागणीसाठी औरंगाबाद जिल्हा गुरव समाज मंडळातर्फे विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले.

बुधवारी (६ जून) औरंगाबाद जिल्हा गुरव समाज मंडळाचे अध्यक्ष स. सो. खंडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी रोहिणी शेवाळे, सुवर्णा मुंगीकर, दामोधर पाटील पवार, पुंडलिक सोनवणे यांच्यासह अनेक जणांची उपस्थिती होती. या आंदोलनाद्वारे मंडळाने गुरव पुजाऱ्याला योग्य पगार द्यावा, देवस्थान जमीन इनाम वर्ग ३ खालसा करून त्याचे गुरव समाजाला मालकी हक्क द्यावे. देवस्थान जमिनीचे झालेले हस्तांतर स्वतंत्र कायदा करून रद्द करण्यात यावे व या जमिनी देवस्थानाच्या पुजाऱ्याला देण्यात यावे, देवापुढे येणाऱ्या उत्पन्नाच्या परंपरागत हक्कास सरंक्षण द्यावे व देवस्थान ट्रस्टची दानपोटी मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात येऊ नये, सहकारी व इतर क्षेत्रात मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार गुरव समाजाला आरक्षण देण्यात यावे, गुरव पुजाऱ्याला मंदिर परिसरात निवासासाठी जागा उपलब्ध करून द्यावे, या मागणीबाबत विचार करण्यात या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गांजाची तस्करी, तिघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुमारे ३३ हजारांच्या गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात करून बुधवारी कोर्टात हजर केले असता सोमवारपर्यंत (११ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायधीश आर. के. चौधरी यांनी दिले.

कारमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती अजिंठा पोलिस ठाण्याच्या पथकास मिळाली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक के. डी. आहेर यांच्या पथकाने गोळेगाव-अन्वा रस्त्यावर सापळा रचून कार (एम. एच. ०१ एम.ए.६४२३) अडवून झडती घेतली असता गांजा आढळून आला. याप्रकरणी कल्याण वैâलास सपकाळ (वय ३५ रा. जळगाव सपकाळ, ता. भोकरदन), फिरोजखान वाहेदखान पठाण (वय ४३, रा. पिंपळगाव रेणूकाई, ता. भोकरदन) व विजय प्रल्हाद बोर्डे (वय ३५, रा. पिंपळगाव रेणुकाई) या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ३३ हजार ३०० रुपये किंâमतीचा सहा किलो ६६० ग्राम गांजा, तसेच कार जप्त करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तिघांना कोर्टात हजर करण्यात आले असता, गांजा कुठे नेण्यात येत होता, कोणाकडून आणला, मुख्य सूत्रधार कोण आहे आदींचा तपास करणे बाकी असल्यामुळे पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील उल्हास पवार यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने तिन्ही आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्लडने गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

औरंगाबाद: घरगुती कारणावरून वायरमनने गळ्यावर ब्लेडने वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार बुधवारी सकाळी साडेदहा वाजता बेगमपुरा भागातील आदर्शनगरमध्ये घडला. विजय लक्ष्मण भांडेकर (वय ३१), असे या जखमीचे नाव आहे. विजयचे सकाळीच पत्नीसोबत भांडण झाले होते. यावेळी त्यांची तीन मुले देखील घरातच होती. या भांडणाच्या कारणावरून विजयने गळ्यावर ब्लेडने वार केले. विजयच्या पत्नीने तत्काळ त्याच्या मित्राला हा प्रकार सांगितला. मित्राने विजयला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. विजयवर सध्या उपचार सुरू असून या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदाधिकाऱ्यांना प्रशासनाचा पुन्हा धक्का

$
0
0

मशीनसाठी नव्हे, कचऱ्यावर प्रक्रियेसाठी निविदा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

विभाग, विभागप्रमुख आणि अधिकारी यांच्या रचनेत फेरबदल करून पालिका प्रशासनाने काही पदाधिकाऱ्यांना धक्का दिलेला असतानाच आता आणखी एक धक्का देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. मशीन खरेदी करण्याऐवजी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीच निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहराच्या कचराकोंडीवर मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाने ८० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपाआर) तयार केला. यामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्र खरेदीचा समावेश करण्यात आला. त्यामुळे प्रथम यंत्र खरेदी करा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी लावून धरली. प्रत्येक वॉर्ड कार्यालयाच्या अंतर्गत तीन मशीन खरेदी करण्यात याव्यात, असे ठरविण्यात आले. त्यानुसार नऊ वॉर्ड कार्यालयांतर्गत २७ मशीन खरेदी करण्यात येणार होत्या. याशिवाय १५० टन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करण्यासाठी मशीन खरेदी करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. कांचनवाडी येथे ३० टनाचा गॅस प्रकल्प उभारण्याचा निर्णय देखील झाला. या सर्व मशीनरींची खरेदी करण्यासाठी निविदा काढा आणि लवकर मशीन्स खरेदी करा, असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पालिकेचे प्रशासन मशीन खरेदी करण्याचा विचार सोडून देण्याच्या तयारीत आहे. मशीन खरेदी करून ती पडून राहण्यापेक्षा कंत्राटदारालाच मशीनरी लावून कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे कंत्राट देण्याचा विचार सुरू आहे. प्रक्रिया केलेल्या कचऱ्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराकडेच देण्यात येणार आहे. प्रकल्प टाकण्यासाठीची जागा, कचरा उपलब्ध करून देण्याचे काम व त्यासाठी येणारा खर्च महापालिका कंत्राटदाराला देण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत याच अनुषंगाने निविदा काढण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतीच्या वादातून खून केल्याच्या प्रकरणात हरी बंडू सावंत व विजू बंडू सावंत या दोघांना जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. कर्णिक यांनी ठोठावली. या प्रकरणातील आरोपी बंडू सावंत याचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला, तर रोहिदास बंडू सावंत हा फरार आहे. अंबादास भानुदास ढाकणे व ज्ञानेश्‍वर अशोक काकडे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

प्रताप बळवंत देशमुख (रा. इस्माईलपूर शिवार, ता. पैठण) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादी प्रताप यांच्या वडिलांनी बंडू सावंत (सध्या हयात नाहीत) (वय ६८, रा. दहिफळ, ता. शेवगाव, जि. नगर) याच्याकडून दोन एकर जमीन विकत घेतली होती. ही जमीन फिर्यादीचा भाऊ माधव बळवंत देशमुख (मृत) यांच्या नावे केली होती. याप्रकरणी प्रताप यांनी पैठण कोर्टात केलेल्या दाव्याचा निकालही त्यांच्याकडून लागला होता. १६ डिसेंबर २०१० रोजी प्रताप यांच्या आईचे निधन झाले. २६ डिसेंबर रोजी दहाव्याचा कार्यक्रम सुरू असताना आरोपी रोहिदास व हरी यांनी शेत नांगरण्यास सुरवात केली. त्यानंतर १३ व्याचा धार्मिक विधी सुरू असताना पुन्हा शेतात घुसून ऊस तोडण्यास सुरवात केली. दरम्यान, माधव यांची पत्नी सुनीता यांनी ऊस तोडण्यास अडविले. यावेळी आरोपी दमदाटी करून निघून गेले. ६ जानेवारी २०११ रोजी दुपारी एक वाजता सर्व सहाही आरोपी पुन्हा शेत नांगरण्यास गेले. या वेळी फिर्यादी प्रताप व माधव हे त्यांना अडविण्यास गेले असता आरोपी रोहिदास व हरी यांनी माधव यांना लोखंडी पाइपने डोक्‍यात वार केले. दरम्यान, माधवची पत्नी सुनीता व इतरांनी हे भांडण सोडविले व माधव यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून खासगी रुग्णालयात हलविले असता, उपचारादरम्यान माधव देशमुख यांचा मृत्यू झाला.

.....

प्रत्यक्षदर्शींची साथ ठरली महत्वपूर्ण

खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील कैलास पवार-खंडाळकर यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये सुनिता व प्रत्यक्षदर्शी भाऊसाहेब यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने दोघांना जन्मठेप व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच भादंवि ३२४ कलमान्वे एक वर्ष सक्तमजुरी, १४३ कलमान्वये एक महिना, तर १४८ कलमान्वये आठ महिने कारावासाची शिक्षा सुनावली असून या सर्व शिक्षा एकत्रितरित्या भोगावयाचे आहेत.

......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नवजीवन’मध्ये प्रवेशासाठी आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवजीवन मतिमंद मुलांची संस्था गेल्या तीन दशकांपासून मतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असून, नवजीवन मतिमंद मुलांच्या संरक्षित कार्यशाळेत पुढील वर्षासाठी प्रवेश सुरू झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात १८ वर्षांवरील मतिमंद मुलामुलींना कार्यशाळेचा लाभ करून द्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्ती पाटील, आर्या राटोलीकर यांची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या बाल व युवा विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने केंद्र सरकारच्यावतीने दरवर्षी शिष्यवृती देण्यात येते. या वर्षीच्या शिष्यवृत्ती चाचणीसाठी भारतातून निवडक ४०० शिष्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या निवड चाचणीसाठी औरंगाबादच्या कलाश्री अकादमीच्या पूर्ती पाटील व आर्या राटोलीकर यांची निवड झाली आहे.

पूर्ती सेंट लौरेन्स हायस्कूलमध्ये नववीत शिकते. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शास्त्रीयनृत्य 'भरतनाट्यम'चे शिक्षण कलाश्री अकादमीमध्ये घेत आहे. आर्या राटोलीकर एसबीओए शाळेत आठवीमध्ये शिकते. शालेय शिक्षणासोबत गेल्या सहा वर्षांपासून शास्त्रीय नृत भरतनाट्याचे शिक्षण कलाश्रीमध्ये घेत आहे. दोघींनी सांघिक नृत्य स्पर्धेत व अनेक कार्यक्रमात सादरीकरण केले आहे. कलाश्री अकादमीचे नृत्यभूषण विक्रांत वायकोस यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या दोघी गुरुवारी, (सात जून) शिष्यवृत्ती चाचणीसाठी मुंबई येथे कार्यक्रम सादर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरेगाव-भीमा आयोग’ बाबत बैठक आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोरेगाव-भीमा दंगलीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरेगाव-भीमा आयोग गठित केला आहे. आयोगासमोर तक्रारकर्त्यांनी कसे जायचे याबाबत ७ जून रोजी दलित अत्याचार विरोधी संघर्ष समितीतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. लाल निशान पक्षाच्या कार्यालयात सांयकाळी ६ वाजता ही बैठक होणार आहे. अत्याचारग्रस्त, पीडितांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन बुद्धप्रिय कबीर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीडच्या अपात्र नगरसेवकांच्या याचिकेवर उद्या सुनावणी

$
0
0

औरंगाबाद : बीड नगर पालिकेच्या उपाध्यक्षांसह नऊ नगरसेवकांच्या अपात्रतेसंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शुक्रवारी न्या. संजय गंगापूरवाला व न्या. सुनील कोतवाल यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. सुटीतील न्यायमूर्तींनी बीड-उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सदर नगरसेवकांना मतदान करण्यास परवानगी दिली होती. त्यांचे मत मोजावे, परंतु त्यांच्या मतांचा परिणाम निवडणुकीवर होत असेल तर निकाल जाहीर करण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले होते. राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी अपात्र ठरविलेल्या नगरसेवकांसंबंधीच्या आदेशालाही ६ जूनपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाचे आमीष; मेहुणीला पळवले

$
0
0

वाळूज महानगर: लग्नाचे आमीष दाखवून रांजणगाव शेणपूंजी येथून अल्पवयीन मेहुणीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. सासऱ्याच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात जावयाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर दिनानाथ चव्हाण (रा़ भासुनाईक तांडा, ता़ अंबड, जि. जालना) याने लग्नाचे अमीष दाखवून अल्पवयीन मेहुणीची अपहरण केले. त्याचा विवाह या अल्पवयीन मुलीच्या मोठ्या बहिणीसोबत २०१५ मध्ये झाला आहे. हे कुटुंब अनेक दिवसांपासून उदरनिर्वाहासाठी रांजणगाव येथे आलेले होते़ या कुटुंबातील लहान मुलगी अंबड येथील एका शाळेत नववीमध्ये शिकते. शाळेला सुट्ट्या असल्याने ती रांजणगाव येथे राहण्यासाठी आली होती. मात्र, जावयाने तीन जून रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास मुलीला लग्नाचे अमीष दाखवून पळवून नेल्याची तक्रार सासऱ्याने दिली. त्यावरून

ज्ञानेश्वर चव्हाणविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास उपनिरीक्षक कसबे हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फतेलष्कर हल्लाप्रकरणी तिघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजप कामगार आघाडीचे सरचिटणीस संजय फतेलष्कर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना बुधवारी कोर्टात हजर केले असता सोमवारपर्यंत (११ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मद यांनी दिले.

फतेलष्कर यांच्यावर ७ मे २०१८ रोजी विद्यापीठ परिसरात जीवघेणा हल्ला झाला होता. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी शैलेश उर्फ बाल संदीप पठाडे (वय २१, रा. ढिंबरगल्ली, बेगमपुरा), चंद्रकांत उर्फ बाळ्या कैलास गायकवाड (वय २५, रा. कैकाडीवाडा, बेगमपुरा) व अक्षय उर्फ गिरीश बाबासाहेब जाधव (वय २४, रा. पडेगाव) यांना मंगळवारी अहमदनगर येथे अटक करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय रमेश परकेल्लू (वय १९, रा. बेगमपुरा) व मयुर भास्कर आडुळे (वय २०, रा. बेगमपुरा) यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्याचे आदेशही कोर्टाने दिले. सहाय्यक सरकारी वकील बी. बी. काकडे पाटील यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार करून मोबाइलमध्ये चित्रीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पतीपासून वेगळे राहत असलेल्या एका ३७ वर्षांच्या महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्यात आला. तसेच या घटनेचे चित्रीकरण मोबाइलमध्ये करण्यात आले. संशयित आरोपीने तिच्याकडून तीन लाख ९० हजार रुपये हडपले आहेत. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेची संशयित आरोपी विजय फुलारे याच्यासोबत २ फेब्रुवारी २०१८ रोजी ओळख झाली होती. फुलारेने तिच्यासोबत ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केला. या घटनेचे चित्रीकरण मोबाइलमध्ये करीत वारंवार धमक्या देत लैंगिक शोषण केले. तसेच तिला विश्वासात घेऊन तिच्या 'एटीएम'मधून तीन लाख रुपये काढून घेतले तसेच तिच्याकडून रोख नव्वद हजार रुपये घेतल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार फेब्रुवारी ते ५ जूनपर्यंत सुरू होता.

त्याने या महिलेला वैजापूर येथे वाढदिवसाला जाण्याचे सांगून या महिलेला वाहनातून नेले व लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर शिर्डी, पुणे, गोवा आदी ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तसेच खोटे धनादेश दिले. तिचे 'पीएफ'चे पैसे काढून घेतल्याची तक्रार आहे. याप्रकरणी महिलेने मंगळवारी गुन्हा दाखल केला. फुलारे विरुद्ध बलात्कार व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

\Bसोमवारपर्यंत कोठडी \B

संशयित आरोपी सिव्हील कंत्राटदार विजय गोविंदराव फुलारे (रा. स्वप्ननगरी, गारखेडा) याला अटक करून बुधवारी कोर्टात हजर केले असता सोमवारपर्यंत (११ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वाराने मंगळसूत्र साताऱ्यात पळवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात मंगळसूत्र चोरांनी पुन्हा डोके वर काढले असून बुधवारी मंगळसूत्र चोरीची घटना घडली. सातारा परिसरातील पेशवेनगर, बँक कॉलनी येथे बुधवारी दुपारी दुचाकीवरील शिक्षिकेचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार पळून गेला. यावेळी दुचाकीवरून पडल्याने शिक्षिका जखमी झाली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयुरी गोपालचारी मुडेपल्ली (वय ३२ रा. ज्योती प्राइड सोसायटी, सातारा परिसर) या शिक्षिका आहेत. त्या मैत्रिणीसह बुधवारी सकाळी मुलीच्या प्रवेशासाठी शाळा पहायला दुचाकीवरून गेल्या होत्या. त्यांच्या मैत्रीणीकडे देखील दुसरी दुचाकी होती. पेशवेनगरमधून जात असताना मुडेपल्ली यांची दुचाकी पुढे होती. एक हेल्मेटधारी दुचाकीस्वार पाठीमागून त्यांच्या मैत्रीणीला ओव्हरटेक करून पुढे आला. मुडेपल्ली यांना गाठत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र त्याने हिसकावले आणि धूम ठोकली. त्यामुळे मुडेपल्ली यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्या खाली कोसळल्या यात त्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांनी आरडाओरडा करेपर्यंत चोरटा पसार झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज बहुरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images