Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आयुक्तांनी कापले पानझडेंचे पंख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले आहेत. त्यात संपूर्ण महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली आहे. त्यामुळे शहर अभियंत्यांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले असून त्यांना अतिरिक्त आयुक्तांच्या अधिपत्याखाली काम करावे लागेल.

कार्यालयीन कामात सूसुत्रता व कामे जलदगतीने होण्यासाठी विभागाच्या विषयांच्या कामांमध्ये विभागणी करण्यात येत आहे असे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. महापालिकेत चाळीस विभाग आहेत. त्यापैकी तीस विभाग आयुक्तांनी स्वत:च्या अधिपत्याखाली ठेवले आहेत, तर दहा विभाग अतिरिक्त आयुक्तांच्या अधिपत्याखाली देण्यात आले आहेत. घनकचरा व्यवस्थापन ( विक्रम मांडुरके), पाणी पुरवठा ( हेमंत कोल्हे), मलनि:सारण विभाग ( अफसर सिद्दिकी), स्मार्ट सिटी व पंतप्रधान आवास योजना ( सिकंदर अली), शासकीय अनुदानातील स्थापत्य प्रकल्प व इतर महत्वाचे प्रकल्प (बी. डी. फड), नगर रचना ( डॉ. डी. पी. कुलकर्णी), मालमत्ता विभाग ( डॉ. डी. पी. कुलकर्णी), राष्ट्रीय नागरी उपजीविका प्रकल्प (रवींद्र निकम), कर आकारणी, स्थानिक संस्थाकर, क्रीडा, उद्यान, पशू संवर्धन व प्राणिसंग्रहालय विभाग (वसंत निकम), शिक्षण विभाग (श्रीकांत कुलकर्णी), वाचनालय (समता लोंढे), आरोग्य विभाग (डॉ. नीता पाडळकर), लेखा विभाग (आर. एम. साळुंके), नगर सचिव विभाग (दिलीप सूर्यवंशी), लेखा परीक्षण विभाग (दीपाराणी देवतराज), हेरिटेज सेल ( ए. बी. देशमुख), दक्षता कक्ष (एम. बी. काजी), सुरक्षा विभाग (बी. एस. जाधव), जनसंपर्क विभाग (तौसीफ अहेमद), प्रशासन विभाग ( रवींद्र निकम), महिला व बालकल्याण विभाग व विधी विभाग (अपर्णा थेटे), निवडणूक विभाग (एम. बी. काझी) हे सर्व विभाग आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी स्वत:च्या अधिपत्याखाली घेतले आहेत. कामगार विभाग (अपर्णा थेटे), भांडार विभाग (रवींद्र निकम), शहर अभियंत्यांमार्फतचा बांधकाम विभाग, विद्युत विभाग (शेख खमर), अतिक्रमण विभाग (सी. एम. अभंग), अग्निशमनविभाग (आर. के. सुरे), अस्थापना विभाग (रवींद्र निकम), यांत्रिकी विभाग (एम. बी. काझी), अभिलेख विभाग, जनगणना विभाग (एस. एस. कुलकर्णी) हे दहा विभाग अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या अधिपत्याखाली देण्यात आले आहेत. शहर अभियंता विभाग अतिरिक्त आयुक्तांच्या अधिपत्याखाली देण्यात आल्यामुळे या विभागाचे प्रमुख सखाराम पानझडे देखील अतिरिक्त आयुक्तांच्या अधिपत्याखाली यापुढे काम करतील असे आयुक्तांनी काढलेल्या आदेशावरून स्पष्ट झाले आहे.

\Bपानझडेंची स्टेटस पाहण्याची घाई\B

आयुक्तांनी विविध विभागांची फेर रचना केली. त्या त्या विभागाचे प्रमुख नेमून दिले. कोणता विभागप्रमुख कुणाच्या अधिपत्याखाली काम करणार हे देखील ठरवून दिले. त्यामुळे शहर अभियंता सखाराम पानझडे यांचे स्टेटस पाहण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांना घाई झाली. त्यांनी लगोलग आयुक्तांच्या आदेशाची प्रत मागवली. संपूर्ण प्रत काळजीपूर्वक पाहिली. शहर अभियंता विभाग अतिरिक्त आयुक्तांच्या आधिपत्याखाली देण्यात आल्यामुळे नाराजीचा सुरही काढण्यात आला. शहर अभियंत्यांचे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याच्या प्रतिक्रिया देखील काही पदाधिकाऱ्यांनी खासगीत व्यक्त केल्या.

\Bआयुक्तांना फ्री हँड दिला आहे\B

'आम्ही आयुक्तांना फ्री हँड दिला आहे,' असे मत महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केले. 'त्यानुसार त्यांनी आमच्याशी चर्चा करूनच फेरबदल केले आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू दिले तर उद्या त्यांना कामाचे रिझल्ट विचारता येतील,' असे घोडेले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्येष्ठांच्या संस्थेत पर्यावरण दिन

$
0
0

औरंगाबाद: सदाचार संवर्धक ज्येष्ठ नागरिक संस्थेत मंगळवारी पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पर्यावरण तज्ज्ञ डॉ. आर. आर. देशपांडे यांचे पर्यावरण विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पर्यावरणाचा सध्या जो ऱ्हास होत आहे, त्याची विविध कारणे देशपांडे यांनी विस्तृत स्वरुपात सांगतानाच घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे, हा जटील प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद केले. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करा, असे आवाहन त्यांनी केले. संस्थेचे सचिव अनिल चौधरी, अशोक भालगावकर, मधुकर देशपांडे, प्रकाश कुलकर्णी, मधुसुदन कुलकर्णी, शशिकांत शास्त्री, विभा देशपांडे, स्मिता गानू आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार संघटनेचे पाच कलमी निवेदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनुसूचित जाती कल्याण समितीसमोर कामगार शक्ती संघटनेने पाच कलमी निवेदन सादर केले. निवेदनाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करा, अशी विनंती देखील करण्यात आली आहे.

अनुसूचाती जाती कल्याण समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांचे बुधवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पालिकेत आगमन झाले. आठ वाजेपर्यंत समितीचे सदस्य पालिकेत होते. स्थायी समितीच्या सभागृहात त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कामगार संघटनांची निवेदने स्वीकारली. कामगार शक्ती संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेत गेल्या दहा वर्षात अनुसूचित जातीचे आरक्षण भरण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय सेलकडून महापालिकेच्या बिंदू नामावलीची तपासणी वेळोवेळी केली जात नाही. निवड समितीमध्ये गेल्या दहा वर्षात अनुसूचित जातीचा अधिकारी घेण्यात आला नाही. निवेदनावर कामगार शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात, मुख्य सल्लागार मधुकर बावस्कर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संप; आज धिक्कार दिन

$
0
0

औरंगाबाद: शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला सहा दिवस पूर्ण होऊनही केंद्र तसेच राज्य सरकार कोणतीही दखल घेत नसल्याने संपकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी सरकार निषेध म्हणून गुरुवारी धिक्कार दिन पाळण्याची घोषणा केली आहे. यानिमित्त क्रांतीचौकात सकाळी साडेअकरा वाजता शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आ‌वाहन किसान क्रांती जन आंदोलनाचे राज्य समन्वयक विजय काकडे पाटील यांनी केले आहे. दरम्यान, खुलताबाद येथे ९ जून रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको होणार आहे, अशी माहिती शेतकरी नेते महेश गुजर यांनी दिली. आंदोलनाबाबत खुलताबाद येथे बुधवारी बैठक झाली. गुजर यांच्यासह राजीव खिल्लारे, अण्णासाहेब जाधव, अनिल श्रीखंडे, महेश उबाळे, राजु वरकड, निसार पठाण, गजानन फुलारे, संताराम खोसरे अविराज निकम, शाम उगले ,पंकज नन्नवरे, किशोर नरोडे आदी उपस्थित होते. त्यात रास्ता रोकोचा निर्णय घेण्यात आल्याचे गुजर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तत्कालीन सीईओंवर कारवाईची शिफारस करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये डीबीटीमार्फत निधी बॅँक खात्यात जमा केला जातो, मात्र आधी लाभार्थ्यांना स्वत: खर्च करावा लागतो. यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभार्थ्यांना सरळ लाभ द्यावा. तसेच दलित वस्ती सुधार योजनेची अंमलबजावणी करण्यास विलंब करणारे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकराजे अर्दड यांच्यावर कारवाईची शासनाकडे शिफारस करावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी अनुसूचित जाती जमाती कल्याण समितीकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

समिती बुधवारी शहरात दाखल झाली. सुभेदारी विश्रामगृहावर अध्यक्ष श्रीमती डोणगावकर यांनी स्वागत केले आणि निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की शिक्षकांना पदोन्नती देताना बिंदूनामावली बदलली आहे. मागासप्रवर्गातून सेवेत रुजू झालेल्या ११ शिक्षकांनी जात वैधता प्रमाणपत्र दिले नाही, त्यांना नंतर खुल्या प्रवर्गात समाविष्ट केले. यामुळे नोकरीत रुजू होताना मागासवर्गीयांच्या तर पदोन्नती घेताना खुल्या प्रवर्गातील शिक्षकांवर अन्याय झाला. यामुळे आंतरजिल्हा बदलीने येणास इच्छुक शिक्षकांना खुल्या प्रवर्गातील रिक्त जागा नसल्याने त्यांना स्वत:च्या जिल्ह्यात येता आले नाही. निवृत्तीपर्यंत कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्याने जात वैधता प्रमाणपत्र दिले पाहिजे, दिले नाही तर त्यांचे निवृत्तीवेतन देण्यात येऊ नये. दलित वस्ती सुधार योजनेची कामे रखडल्याने सदस्यांनी तत्कालीन सीईओ मधुकरराजे अर्दड यांच्या दालनापुढे सनदशीर मार्गाने आंदोलन केले असता त्यांनी पोलिसांना पाचारण करून लोकप्रतिनिधींना त्यांच्या ताब्यात दिले. दलित वस्ती सुधारच्या योजनांच्या मंजुरीला विलंब करुन जाब विचारणाऱ्यांवरच कारवाई करणाऱ्या अर्दड यांच्याविरुद्ध शासनाकडे कारवाईची शिफारस करण्याचीही मागणी समितीकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुसूचित जाती समितीने घेतला आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध विभागातील अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांचे पदोन्नती प्रश्न, अनुशेष, उमेदवारांची भरती प्रक्रिया याबाबत विधिमंडळाच्या अनुसूचित जाती जमाती समितीने बुधवारी बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत प्रलंबित प्रस्तावांचा आकडा मोठा असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर समितीने नाराजी व्यक्त केल्याचे कळते. तर, भरती प्रक्रियाबाबतही कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात समितीने बैठक घेतली. तीन दिवस विविध विभागातील आढावा समिती घेण्यासाठी समिती औरंगाबादमध्ये आली आहे. पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी, नगरपालिकांचा आढावा घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष आमदार हरीश पिंपळे आहेत. यांच्यासह समितीत आमदार लखन मलिक, आमदार डॉ. मिलिंद माने, राजू तोडसाम, संगीता ठोंबरे, ज्ञानराज चौघुले, डॉ. बालाजी किणीकर, गौतम चाबुकस्वार, धनाजी अहिरे, संध्या देसाई-कुपेकर, वर्षा गायकवाड,भाई गिरकर, प्रकाश गजभिये, जोगेंद्र कवाडे, कपिल पाटील हे सदस्य आहेत. बैठकीत आमदारांनी अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांचे पदोन्नती प्रश्न, अनुशेष, उमेदवारांची भरती प्रक्रिया, मागासवर्गीय कक्ष स्थापन केला का, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणे, ज्येष्ठता यादी डावलली जाते का, विविध योजना याबाबत आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाशी निगडित अशा प्रलंबित प्रस्तावांबाबत नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. अनेक विभागाची आकडेवारी पुरेसी नसल्याचे, काही अधिकाऱ्यांना नीट आकडेवारी माहित नसल्याचे उघड झाले. त्यामुळे संतापलेल्या समिती अध्यक्ष, सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अशा प्रकारचे कामकाज कसे करता, असा प्रश्न करत जाब विचारल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवारी ही समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी निगडीत आढावा घेणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसतिगृहाची वीज, पाणी बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थी वसतिगृह सोडत नसल्याने प्रशासनाने मंगळवारी रात्री चक्क वीज पुरवठा बंद केला. तर, बुधवारी पाणी पुरवठाही बंद केला. या प्रकाराने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना घेराव घातला आणि दुपारपर्यंत वसतिगृहात सर्व पूर्ववत झाले.

विद्यापीठातील विविध वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मागणी मोठी असल्याने वसतिगृहात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी राहतात. त्यात शैक्षणिक वर्ष संपल्याने सर्व वसतिगृह रिकामे करण्याची हालचाल विद्यापीठ प्रशासनाने केली. त्यात काही वसतिगृह बंद केले. संशोधक विद्यार्थी राहत असलेले वसतिगृह बंद करण्यासाठी ही प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. त्यात यश मिळत नसल्याने अचानक वसतिगृहाची वीज बंद करण्यात आली. रात्रभर विद्यार्थी अंधारात राहिले तर, आज पाणी पुरवठाही बंद करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. प्रशासनाकडून असे पाऊल उचलले जात असल्याने दुपारी विद्यार्थी एकत्र आले. कुलगुरू, प्र-कुलगुरूंची भेट घेत अडचणी मांडण्यासाठी विद्यार्थी फिरत होते. पर्यटनशास्त्र विभागातील कार्यक्रमासाठी कुलगुरू आल्याचे कळताच विद्यार्थी विभागाकडे धावले. कुलगुरू बाहेर पडताच विद्यार्थ्यांनी घेराव घालत वीज पुरवठा, पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याच्या तक्रारी मांडल्या. संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधन सुरू आहे. तर, एमफीलच्या विद्यार्थ्यांचे प्रबंध सादर करण्याची प्रक्रिया शिल्लक आहे. अशावेळी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू ठेवावीत, अशी मागणी केली. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी विद्यार्थ्यांची बाजू ऐकूण घेत वसतिगृह सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर लगेच वसतिगृहात वीज आली, पाणीही आले. त्यानंतर विद्यार्थी वसतिगृहात परतले.

क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी

शैक्षणिक वर्ष संपले, वसतिगृहातील रुम खाली करा, असे सांगूनही अनेकदा विद्यार्थी वसतिगृहाची रुम सोडत नाहीत. त्यात प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. विद्यापीठाकडे असलेल्या वसतिगृहाची प्रवेश संख्या मर्यादित आहेत. तर, मागणी अधिक आहे. त्यामुळे अनेक वसतिगृहात एका रूममध्ये सात-आठ विद्यार्थी राहतात. क्षमतेचा विचार करून वसतिगृहांची उभारणी करण्याचे विद्यापीठ प्रशासनाच्या घोषणा कागदापुरत्याच मर्यादित राहिल्या. तीन प्रस्तावही धूळखात पडून आहेत. त्यात आजच्या प्रकरणाने पुन्हा प्रशासनला माघार घेण्याची वेळ आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडिलांच्या डोक्यात घातले मुसळ

$
0
0

औरंगाबाद : खर्चासाठी पैसे दिले नसल्याने मुलाने वडिलांच्या डोक्यात मुसळ घालून जखमी केले. मंगळवारी दुपारी तीन वाजता कोळीवाडा, राधास्वामी कॉलनी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी बाबूराव अण्णा मुठ्ठे (वय ५० रा. कोळीवाडा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलगा विष्णू मुठ्ठे (रा. कोळीवाडा) याच्याविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारू विक्रेता गजाआड

औरंगाबाद : अवैधरित्या देशी दारूची विक्री करणारा आरोपी संतोष दामोधर दाभाडे (रा. विश्रांतीनगर) याला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. मंगळवारी रात्री विश्रांतीनगर भागात ही कारवाई करण्यात आली. आरोपी दाभाडेच्या ताब्यातून ८३२ रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे.

अवैध दारू विक्री

औरंगाबाद : अवैधरित्या देशी दारूची विक्री करणारा आरोपी इदेश सुरेश माचरेकर (रा. आनंद गाडेनगर, नारेगाव) याला सिडको एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. मंगळवारी सायंकाळी आनंद गाडेनगर भागात ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून तेराशे रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली आहे.

मोबाइल लांबवला

औरंगाबाद : अदालत रोडवरील रेल्वे कोर्टात साक्षीसाठी आलेल्या सुभाष छगनलाल भोसले (रा. हर्सूल परिसर, मयूरपार्क रोड) यांचा मोबाइल चोरट्यानी लांबवला. मंगळवारी सकाळी अकरा ते बारा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीचे अपहरण

औरंगाबाद : परीक्षेसाठी गेलेली विद्यार्थी गेल्या आठ मेपासून बेपत्ता झाली आहे. उस्मानपुरा भागातील पॉलिटेक्निक कॉलेजजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रकाश अरुण तुपे (रा. तारांगण, पडेगाव) याच्याविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला गजाआड

औरंगाबाद : गांजा विक्री करणाऱ्या ३५ वर्षांच्या महिलेला सिडको एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी सायंकाळी चमचमनगर, नारेगाव भागात ही कारवाई करण्यात आली. या महिलेच्या ताब्यातून साडेसात हजाराचा दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक रागावल्याने घरातून पलायन

$
0
0

म. टा. प्रतनिधी, औरंगाबाद

क्लासमधील शिक्षकाने वर्गात सर्वासमक्ष रागावल्याने अपमानित झालेल्या १४ वर्षांचा मुलगा घरातून पळून गेला. मात्र, दुसऱ्या दिवशी राग शांत झाल्यानंतर तो काकाच्या घरी परतला. मात्र, त्याचा शोध घेताना मुकुंदवाडी पोलिस व नातेवाईकांची चांगलीच दमछाक झाली.

मुकुंदवाडीतील लोकशाही कॉलनीतील एका खासगी क्लासेसमध्ये हा मुलगा दहावीच्या व्हॅकेशन बॅचमध्ये शिकत आहे. क्लासला आलेल्या या मुलाला धिंगाणा घालत असल्यामुळे शिक्षकांने वर्गात उभे राहण्याची शिक्षा दिली, शिवाय पालकांकडे तक्रार करतो, असे सुनावले होते. त्याचा या मुलाला राग आला. तो दुपारी पावणे तीनच्या सुमारास कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला. तो सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे मित्र, नातेवाईकांकडे त्याचा शोध घेतला. मात्र, तो न सापडल्याने त्याच्या वडिलांनी मंगळवारी सकाळी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात जाऊन अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी मुलाचा तपास सुरू केला होता.

दरम्यान, मंगळवारी दुपारी या मुलाने त्याच्या काकाचे घर गाठले. काकांनी त्याच्या वडिलांना तसेच मुकुंदवाडी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक अशोक शिर्के यांनी काकाचे घर गाठत मुलाची चौकशी केल्यानंतर शिक्षक रागावल्याने घरातून निघून गेल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी या मुलाला त्याच्या पालकाच्या स्वाधीन केले आहे.

उघड्यावर काढली रात्र

शिक्षकाने रागावल्यामुळे व त्यांचा राग आल्याने घर सोडल्याचे मुलाने पोलिसांना सांगितले. घरातून बाहेर पडल्यानंतर तो कामगार चौकामार्गे बीड बायपास रोडवरील एमआयटी कॉलेजजवळ गेला. त्यापूर्वी त्याने बिर्याणी खाल्ली, यानंतर रात्री बीड बायपास रोडवरच एका ठिकाणी झोपी गेला. मंगळवारी दुपारी राग शांत झाल्यानंतर त्याने काकाचे घर गाठल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विना ई-निविदा कामे; प्रधान सचिवांना नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामपंचायतीमधील १५ लाखांपर्यंतची कामे विना ई-निविदा प्रक्रियेद्वारे करण्याच्या निर्णयप्रकरणी दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. बोर्डे व न्या. ए. एम. ढवळे यांनी नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावली. तसेच दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. उत्तर दाखल न केल्यास सचिवांना व्यक्तिश: हजर राहण्याचे स्पष्ट केले आहे.

२५ मार्च २०१५ रोजी ई-निविदेद्वारे ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याच्या निर्णयात यावर्षी २३ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाने दुरुस्ती केली. त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना १५ लाखांची कामे विना ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश देण्यात आले. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल माकणीकर व विठ्ठल हजगुडे यांनी याचिका दाखल केली. आमदार-खासदार-स्थानिक कार्यक्रमातंर्गत विना निविदा कामे करण्याची मर्यादा तीन लाख रुपयांवरुन दहा लाख रुपयांपर्यंत वाढविण्याच्या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वी स्थगिती दिली होती. तर नागपूर खंडपीठाने हा निर्णयच रद्द केला होता. त्यामुळे सरकार तोंडघशी पडले होते. आता ग्रामपंचायतीच्या कामातही ई-निविदा प्रक्रियेला शासनाने हरताळ फासल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याचिकाकर्त्याची बाजू रामराव बिरादार यांनी मांडली. या याचिकेची सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात गुन्हेगाराने तरुणावर चाकुने वार करीत रोख रक्कमेसह दुचाकी लांबवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहाबाजार भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आदील चाऊस याने साथीदाराच्या मदतीने तरुणावर चाकुहल्ला करीत दुचाकी व चारशे रुपये लुबाडले. २ जुन रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता काचीवाडा, शहाबाजार भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनिष शाम नवगिरे रा. उस्मानपुरा यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नवगिरे हे २ जुन रोजी रात्री साडेबारा वाजता दुचाकीवर काचीवाडा मार्गे घरी जात होता. यावेळी त्यांना शहाबाजार येथील बुद्धविहाराजवळ चार जणांनी अडवले. या चौघांनी नवगिरे यांना मारहाण करीत पैशाची मागणी केली. नवगिरे यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर चाकुने वार केले. नवगिरे याच्या खिशातील रोख चारशे रुपये काढून घेत त्यांची दुचाकी देखील सोबत घेऊन आरोपी पसार झाले. याप्रकरणी संशयित आरोपी आदील चाऊस, इम्रान व दोन अनोळखी आरोपीविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएसआय नागरे तपास करीत आहेत.

चौकट

कुख्यात गुन्हेगार

आदील चाऊस शहाबाजार भागातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर जबरी चोरी, चोरी, खुनाचा प्रयत्न आदी स्वरुपाचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापुर्वी हद्दपार व झोपडपट्टी दादानुसार कारवाई देखील करण्यात आलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्वासने पाळा; अन्यथा रस्त्यावर उतरू!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सरकारने दिलेली आश्वासने पाळावीत. चार वर्षांपूर्वी 'स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर' (एसपीए)ची घोषणा केली. ती सत्यात आणावी. मराठवाड्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी औरंगाबादमध्ये केंद्रीय विद्यापीठ स्थापन करावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गुरुवारी सरकारला देण्यात आला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसांच्या बैठकीचा गुरुवारी 'एमआयटी'मध्ये समारोप झाला. बैठकीला डॉ. प्रशांत साठे, अभिजित पाटील, राय सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. संघटनात्मक, कार्यक्रम, विविध शैक्षणिक प्रश्न, सामाजिक प्रश्न, आंदोलने, कृषी शिक्षण, आगामी शैक्षणिक वर्षातील सदस्यता अशा विविध विषयांवर दोन दिवसांत चर्चा झाली. आज शेवटच्या दिवशी विविध ठराव मांडण्यात आले. मराठवाड्यात शिक्षणाच्या अनुशेषाबाबत नाराजी व्यक्त करत गुणवत्तापूर्ण, कौशल्यधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी मराठवाड्यात विविध संस्थांना बळ द्यावे. त्यासाठी मराठवाड्यात केंद्रीय विद्यापीठ स्थापन करावे, 'स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर'ची घोषणा करून चार वर्ष पूर्ण झाले. त्यानंतरही संस्था उभारणी झाली नाही. त्यामुळे घोषणा केलेल्या संस्था तात्काळ उभारण्यात याव्यात, असा ठराव मांडण्यात आला. खासगी विद्यापीठ स्थापनेला दिले जाणार बळ थांबवावे, कॉलेजांची स्वायत्तता याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे. 'पेपरफुटी'सारखे प्रकार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी करण्यात आली. राज्याच्या विविध जिल्ह्यातून बैठकीला १०२ पेक्षा अधिक सदस्य उपस्थित होते. रुसामधून राज्याला मिळालेला निधीबाबत सरकारचे अभिनंदनही करण्यात आले.

\Bशिष्यवृत्ती लवकर द्या

\Bशैक्षणिक संस्थांची घोषणा झाली, परंतु त्या पूर्ण न केल्यास आगामी काळात रस्त्यावर उतरून सरकारचा विरोध करू असा निश्चय बैठकीत करण्यात आला. विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती वर्षाच्या सुरुवातीलाच मिळावी. घोषणा करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या योजना अधिक प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात. कृषी शिक्षण शेतकरीभिमूख करावे अशी मागणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

घोषणा केलेल्या शैक्षणिक संस्था सुरू करायलाच हव्यात. त्यासह खासगी विद्यापीठे, स्वायत्ततेमुळे शैक्षणिक शुल्क, गुणवत्तेला तडे जाणार नाहीत याबाबत सरकारने काळजी घ्यायला हवे, अशा विविध मागण्याही आम्ही करणार आहोत. वेळ पडली तर रस्त्यावर उतरून मागण्या सरकार दरबारी मांडू.

- अभिजित पाटील, प्रदेशमंत्री, अभाविप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियांत्रिकचे वेळापत्रक आले..

$
0
0

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश निश्चितालाच हवे

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तंत्रशिक्षण विभागाने इंजिनीअरिंग प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार गुरुवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश निश्चितीच्या वेळीच असणे आवश्यक करण्यात आले आहे. प्रवेश निश्चितीच्या वेळी नसेल तर, प्रवेश खुल्या प्रवर्गातून धरला जाणार आहे.

सीईटी दिलेल्या राज्यातील विद्यार्थी, पालकांचे अभियांत्रिकी प्रवेश वेळापत्रकाकडे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारपासून प्रक्रियेला सुरुवात झाली. 'बीई', 'बीटेक' पदवी अभ्यासक्रमांच्या प्रक्रियेत यंदा बदल करण्यात आले. २०१८-१९ शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश निश्चितीच्या वेळीच सादर करावे लागणार आहे. mahacet.org.in आणि dtemaharashtr.gov.in वेबसाइट पद्धतीने होणार आहेत. राखीव जागेतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत दिली जायची. यंदा ही सुविधा बंद करण्यात आल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. यासह विद्यार्थ्यांना सुविधा केंद्रात मूळ कागदपत्रे दाखवून त्याचे दोन सेट झेरॉक्सप्रती सोबत ठेवत, त्यावर सही शिक्का त्याचवेळी घ्यायचा आहे. त्यानंतर प्रवेशापर्यंत त्या कागदापत्रांची प्रत जपून ठेवत एक प्रत एआरसी सेंटर आणि एक प्रत प्रवेश निश्चितीच्या वेळी केंद्रात दाखवून ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे तेथे जमा करायची आहे. प्रवेशाच्या तीन फेरी होणार आहेत.

असे आहे वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज नोंदणी १९ जून पर्यंत

अर्ज पडताळणी....... १९ जून

तात्पुरती गुणवत्ता यादी.. २१ जून

कागदपत्रातील त्रुटी दुरुस्तीसाठी.. २२ ते २३ जून

पहिल्या फेरीसाठी अंतिम गुणवत्ता यादी...२४ जून

पहिल्या फेरीसाठी पर्याय..२५ ते २८ जून

जागांचे वाटप........२९ जून

प्रवेश निश्चितीसाठी...३० जून ते ४ जुलैपर्यंत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा आंदोलनाची दखल घ्या

$
0
0

शेतकऱ्यांचा आंदोलनाची दखल घ्या

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकऱ्यांचा संप सुरू होऊन सहा दिवस झाले तरी, सरकारकडून दखल घेतली गेली नसल्याचा आरोप करत किसान क्रांतीतर्फे केंद्र, राज्य सरकारचा निदर्शने करत निषेध करण्यात आला. क्रांतीचौकात ही निदर्शने करण्यात आली. सरसकट कर्ज मुक्ती द्यावी, शेतीमालास उत्पादन खर्च अधिक ५० टक्के हमीभाव अधारित कायद्याने बाजारभावाची हमी, शेतकऱ्यांच्या पत्नीसह निवृत्तीवेतन कायद्या करून द्यावा, दुधाचा हमी भाव ५० रुपये द्यावा, शेती उत्पादनातील जोखमीचे कायदा करणे, बैलगाडा शर्यतसारख्या स्पर्धांना कायदेशीर मान्यता देणे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी विजय काकडे पाटील, गजानन पाटील, महेश गुजर, राजीव खिल्लारे, सुवर्णा मोहिते, सतीश जगताप, दत्ता माळशिसारे, जी. के. गाडेकर आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्घृण खून, बबल्याची रवानगी हर्सूल कारागृहात

$
0
0

औरंगाबाद: अल-हिलाल कॉलनीतील शेख जब्बार शेख गफार यांचा निर्घृण खून केल्याच्या प्रकरणात कुख्यात आरोपी शेख वाजेद उर्फ बबल्या शेख असद याची हर्सूल येथील न्यायालयीन कारागृहात रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मद यांनी गुरुवारी दिले. मृताचा भाऊ शेख सत्तार शेख गफार यांनी फिर्याद दिली होती. बिस्मिल्ला कॉलनीत वाद झाल्यानंतर आरोपींनी जब्बार याचे अपहरण करून खून केल्याचा आरोप आहे. मुख्य संशयित आरोपी शेख वाजेद उर्फ बबल्या शेख असद (वय २५, रा. जहांगीर कॉलनी, औरंगाबाद) याला ३१ मे रोजी अटक केली होती. त्याच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे कोर्टात हजर केले होते. सहाय्यक सरकारी वकील बी. पी. काकडे पाटील यांनी काम पाहिले.

....…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांच्या मुलांना दिली स्कॉलरशीप

$
0
0

औरंगाबाद : ग्रामीण पोलिस दलाचा पोलिस कल्याण सप्ताह सुरू आहे. या सप्ताहात पोलिस दलाच्या वतीने १३ पोलिसांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी पंचवीस हजाराची स्कॉलरशीप देण्यात आली. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते गुणंवत पाल्यांचा सत्कार करून त्यांना हे धनादेश देण्यात आले.

पोलिस पाल्यांमध्ये किरण डापकर, विवेक मरकळ, स्वाती मालोदे, चैताली तांगडे, अक्षय कामठे, पृथ्वी धायजे, सचिन दौंड, मानसी धात्रक, प्रीती शिरसाठ, रवींद्र लुटे, शेख सुमिया रियाजखान, विशाखा देशमुख, स्वप्नील धुरंधरे यांचा समावेश आहे. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. आरती सिंह म्हणाल्या, 'पोलिसांनी आपल्या पाल्यांना योग्य शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पोलिस प्रशासनाकडून त्यांना निश्चित आर्थिक मदत करण्यात येईल. या वर्षी ५८३ पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र दर्शन प्रवास सवलत या योजनेद्वारे अनुदान देण्यात आले आहे. त्यांना तत्काळ रजा सवलत देखील दिली आहे.' कार्यक्रमाचे नियोजन पोलिस कल्याण शाखेचे निरीक्षक बी. डी. फुंदे यांनी केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीजी’ प्रवेशात लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेत मनमानी शुल्क आकारणी केली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील महाविद्यालयांनी ८० हजार ते एक लाख रुपये शुल्क आकारल्यामुळे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाने समिती नेमावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेण्यास सुरुवात केली आहे. गणित, रसायनशास्त्र, कम्प्युटर सायन्स, प्राणिशास्त्र या विषयांकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल असतो. त्यामुळे जास्तीचे शुल्क घेत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची अडवणूक केली आहे. विद्यापीठाने प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) घेतल्यानंतर पर्याय निवडीत संबंधित महाविद्यालय मिळाल्यामुळे दुसरीकडे प्रवेश घेणे कठीण झाले आहे. किमान २० हजार रुपये शुल्क असताना ८५ हजार रुपये शुल्क आकारणीचे प्रकार घडत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांना निवेदन दिले. 'एम. एस्सी प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर ऑप्शनमध्ये बदनापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रवेश मिळाला. कॉलेजात प्रवेश घेण्यासाठी मंगळवारी गेलो असता धक्का बसला. एम. एस्सी रसायनशास्त्र विषयाच्या प्रवेशासाठी ८५ हजार रुपये शुल्क लागेल असे कॉलेज प्रशासनाने सांगितले. या मनमानी शुल्कामुळे गैरसोय झाली' असे हरिदास नागरे व दिनेश पवार यांनी निवेदनात म्हटले आहे. या महाविद्यालयाचे प्रवेश विद्यापीठात शुल्क घेऊन द्यावे, प्रवेश प्रक्रिया होईपर्यंत विद्यापीठ प्रशासनाने समिती पाठवावी, प्रत्येक प्रवेशाचा डी. डी. विद्यापीठात घ्यावा, पदवी व पदव्युत्तर वर्गाचे प्रवेश शुल्क महाविद्यालयाच्या दर्शनी भागात मोठ्या बोर्डवर लावावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्याला सीईटी प्रवेशपत्रावर मिळालेल्या महाविद्यालयाचे शुल्क निश्चित असावे. मनमानी शुल्क आकारुन गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याचे विद्यार्थ्यांनी कुलगुरुंना सांगितले. या प्रकारात न्याय न मिळाल्यास शनिवारपासून उपोषण करणार असल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. दरम्यान, आपण गरीब असल्यामुळे एवढी फी भरणे शक्य नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यावर, तुम्ही दुसरीकडे प्रवेश घ्या असे महाविद्यालयाने सांगितले. हा प्रकार अनेक ठिकाणी घडत असल्यामुळे प्रशासनाचा ढिसाळपणा चव्हाट्यावर आला आहे.

मागील वर्षी हाच प्रकार

मागील वर्षी 'सीईटी'नंतर प्रवेश प्रक्रियेत पैठण, बदनापूर, खुलताबाद येथील महाविद्यालयांनी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी ५० हजार ते एक लाख रुपये शुल्क आकारले होते. कॅम्पसमध्ये स्पॉट अॅडमिशन घेतल्यामुळे फसवणूक टळल्याचा दावा कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला होता. तर ग्रामीण भागातील महाविद्यालये मनमानी शुल्क घेत असल्याची तक्रार पालक व विद्यार्थ्यांनी केली होती. सीईटी आणि स्पॉट अॅडमिशनपर्यंत चार हजार रुपये खर्च झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा रोष वाढला होता. शुल्क आकारणीत लूट करणाऱ्या महाविद्यालयांची नावे समोर येऊनही प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्यामुळे यावर्षी पुन्हा विद्यार्थ्यांची लूट सुरू झाली आहे.

कोट

काही महाविद्यालये जास्तीचे शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करणार आहे.

डॉ. अशोक तेजनकर, प्र-कुलगुरू

रसायनशास्त्र विषयाच्या प्रवेशासाठी २० हजार रुपये शुल्क अपेक्षित आहे. महाविद्यालयाने आम्हाला थेट ८५ हजार रुपये सांगितले. कुलगुरुंनी योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.

हरिदास नागरे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. विष्णू वहाटुळे यांना पीएच. डी.

$
0
0

औरंगाबाद : अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्रा. विष्णू बाळकृष्ण वहाटुळे यांना इतिहास विषयात पीएच. डी. प्रदान केली. प्राचार्य डॉ. ए. आर. म्हळसने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 'भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कार्याचे ऐतिहासिक अध्ययन (१९३४ ते २०१२)' या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामदास धुमाळ यांना पुरस्कार

$
0
0

औरंगाबाद : शाहीर रामदास धुमाळ यांना 'राज्यस्तरीय तानाजी मालुसरे समाजभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय भटके, विमुक्त, आदिवासी, ओबीसी संघर्ष महासंघाच्या ११ व्या अधिवेशनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, शरदच्चंद्र वानखेडे, स. सो. खंडाळकर, अशोक जाधव धनगावकर, राजपालसिंह राठोड उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीचा निकाल आज..

$
0
0

दहावीचा निकाल आज

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (८ जून) ऑनलाइन जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजेपासून हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. औरंगाबाद विभागातून एक लाख ९७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

शिक्षण मंडळातर्फे १ ते २४ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. सोशल मीडियावर निकालावरून वेगवेगळ्या तारखांचे संदेश होते. यामुळेही विद्यार्थी, पालक काहिसे संभ्रमात होते. अखेर गुरुवारी मंडळाने निकालाची तारीख जाहीर केली. त्यामुळे तारखांच्या चर्चेला विराम मिळाला. दुपारी १ वाजेपासून निकाल विद्यार्थ्यांना वेबसाइटवर पहायला मिळणार आहे. ऑनलाइन निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणपडताळणीसाठी १८ तर, छायाप्रतीसाठी २८ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. आवश्यक ते अर्जाचे नमुने वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या वेबसाईटवर पाहता येईल निकाल

- www.mahresult.nic.in

- www.sssresult.mkcl.org

- www.maharashtraeducation.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images