Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रिकॉल करा, अन्यथा राज्यपालांना बडतर्फ करा

$
0
0
आदर्श प्रकरणात राज्यपाल के. शंकरनारायणन् यांनी आपले संवैधानिक कर्तव्य योग्य रित्या पार पाडलेले नाही. काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणूनच भूमिका घेत जनतेशी प्रतारणा केली, असा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

व्यापा-याच्या कारवर दगडफेक

$
0
0
दुचाकी शोरुम मालकावर पाळत ठेवून गुंडांनी कारवर दगडफेक करत तोडफोड केली. बंजारा कॉलनीजवळील चौकात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. यात शोरुमचा व्यवस्थापक गंभीर जखमी झाला आहे.

विद्यापीठ प्रशासन गतिमान झाल्याचे समाधान

$
0
0
‘गेल्या दोन वर्षांत सायन्स पार्क, विद्यार्थी वसतिगृह, करिअर अॅडव्हान्समेंट, नवीन इमारतीची बांधकामे आदी अनेक कामे मार्गी लागल्याचे समाधान आहे,’ असे प्रतिपादन कुलसचिव डॉ. डी. आर. माने यांनी केले.

शिक्षण विभागास सीईओंची न्यू इअर गिफ्ट

$
0
0
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कारभारावर सातत्याने चर्चा होत असते. कामे होत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते. कमी मनुष्यबळावर काम करणाऱ्या शिक्षण विभागाने प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांची मागणी केली होती.

मॉडेल डिस्पेन्सरी सुरू करणार

$
0
0
वाळूज - पंढरपूर येथे नव्याने तयार झालेली इमारत मॉडेल डिस्पेन्सरी फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्ली येथील इएसआयसीचे वरिष्ठ आयुक्त बी. के. साहू यांनी दिले.

‘JNEC’च्या विद्यार्थ्यांचा दुस-या दिवशीही ठिय्या

$
0
0
‘जेएनईसी’च्या विद्यार्थ्यांचे पाचव्या दिवशीही साखळी उपोषण सुरुच राहिले. उपस्थिती कमी असल्याचे सांगत कॉलेज प्रशासनाने काही विद्यार्थ्यांना ‘डिटेन’ केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आजचाही पेपर देता आला नाही.

अधिकारी, कर्मचा-यांच्या उत्तरात विसंगती

$
0
0
पॉलिटेक्निक पेपरफुटीचा गुंता अद्याप कायम आहे. मंडळाने नेमलेल्या समितीकडून परीक्षा संबंधित नेमलेल्या समितीने पुन्हा जाबजवाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

विकास प्राधिकरणासाठी आग्रह

$
0
0
औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या जागृती मंचच्या बैठकीत घेण्यात आला. शहारातील रस्त्यांच्या प्रश्नांसह अन्य विषयांवर भूमिका ठरवण्यासाठी स. भु.च्या गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीच्या परिसरात मंचची बैठक आयोजित करण्यात आली होती.

पेडगावकरांना बाहेरचा रस्ता

$
0
0
स्थायी समितीच्या बैठकीसाठी येऊन बसलेले उपायुक्त सुरेश पेडगावकर यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पेडगावकर यांना शासनाच्या सेवेत परत पाठवण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभेने घेतला होता. महापौर कला ओझा यांनी पेडगावकर यांना सभेतून बाहेर काढले होते.

NOC च्या फायलींची चौकशी करा

$
0
0
बांधकाम परवानगीसाठी एलबीटीच्या एनओसीसाठी प्रलंबीत असलेल्या फायलींची आयुक्तांनी स्वतः मुख्य लेखापरीक्षकांना सोबत घेऊन चौकशी करावी असे आदेश स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी शनिवारी दिले.

महा ई-सेवा केंद्रांवर आधार

$
0
0
विविध सरकारी योजनांसाठी आवश्यक करण्यात आलेल्या आधार कार्डाच्या नोंदणीची सोय आता महा ई-सेवा केंद्रांवर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५९ महा ई-सेवा केंद्रांवर आधार नोंदणीचे संच बसविण्यात आल्याची माहिती आधार कार्ड नोंदणीचे समनव्यक व उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी दिली.

मनातले सगळे ब्लॉगवर लिहितो

$
0
0
भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे भाषण ऐकत लोक तासनतास बसत. तसे माझ्याबाबत होत नाही. मग हल्ली मनातले सगळे ब्लॉगवर लिहितो, अशा शब्दांत भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी शनिवारी आपले मन मोकळे केले.

स्टेशन रोडवरील दुकाने ‘धूळ खात’

$
0
0
स्टेशन रोडच्या काँक्रिटीकरणाचे काम काम रडखडल्यामुळे आता व्यावसायिकांची अडचण होत आहे. कोकणवाडी भागातील रस्ता गेल्या तीन महिन्यांपासून खणून ठेवला आहे. त्यामुळे या रस्त्यालगत असलेल्या व्यवसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

‘वाद्यां’ची मोहिनी

$
0
0
आजकाल धावपळ, रुटीन वर्क आणि तेचतेच काम यातून ‘संगीत’ ऐकून शांतता अनुभवणे, मनोरंजन करणे याकडे कल असतो. वाद्यसंगीत (इन्स्ट्रुमेंटल म्युझिक) ऐकण्याकडे कल अधिकच असतो.

विकासाच्या योजना मार्गी; आता कामे सुरू व्हावीत

$
0
0
पायाभूत विकासाच्या क्षेत्रात २०१३ हे वर्ष औरंगाबादकरांसाठी समाधानाचे राहिले आहे. रेल्वे विभागामुळे संग्रामनगर उड्डाणपुलाचे बांधकाम नियोजित मुदतीपेक्षा सहा महिने रखडले असले तरी या नवीन वर्षात तो वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने मुख्य शहर व शहराबाहेरील भाग जोडण्याचे मोठे काम होणार आहे.

‘यंत्रणांमध्ये समन्वय घडावा’

$
0
0
महापालिका, सिडको, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय आदी एकापेक्षा जास्त संस्था, कार्यालये शहर विकास कार्यात सहभागी आहेत.

आता तुम्हीच अध्यक्ष

$
0
0
औरंगाबाद जिल्हा परिषदेत पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण गटातून अध्यक्ष निवडला जाणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर ही संधी आल्याने सर्वपक्षीय सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

‘सीव्हीटीएस’ची पूर्ण क्षमतेने ‘धकधक’

$
0
0
गोरगरीब रुग्णांच्या हृदयशस्त्रक्रिया करण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून घाटीमध्ये बांधलेल्या हृदयशल्यचिकित्सा व उरोशल्यचिकित्सा विभागात (सीव्हीटीएस) तब्बल वर्षभरानंतर पूर्ण क्षमतेने काम सुरू झाले आहे.

तुम्हीच सांभाळा सौभाग्यलेणे

$
0
0
शहरातून फिरत असताना कधी दुचाकीस्वार जवळ येईल आणि गळ्यातील मंगळसूत्राला हात घालेल सांगता येत नाही, अशी परिस्थिती महिलांबाबत निर्माण झाली आहे.

‘मका खरेदी केंद्र सुरू करा’

$
0
0
कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शासकीय योजनेअंतर्गत मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी तहसीलदार राहुल गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे. खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेतकऱ्यांसह उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images