Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

माध्यमांना विश्वासार्हतेचे आव्हानः मनोहर कुलकर्णी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ध्येयवादी पत्रकारितेपासून ते व्यावसायिक पत्रकारितेपर्यंत वाटचाल झाली आहे आणि आता इथून पुढे धंदेवाईक पत्रकारिता सुरू झाली आहे आणि ही धोक्याची घंटा आहे. पेड न्यूज, फेक न्यूजचा 'व्हायरस' पत्रकारितेमध्ये घुसला आहे आणि 'अजेंडा' ठरवून पत्रकारिता केली जात आहे. त्यामुळे 'करप्शन' व 'क्रेडिबिलिटी' या दोन 'सी'चे पत्रकारितेपुढे मोठे आव्हान आहे. त्याचवेळी पत्रकारांना स्पर्धा ही केवळ माध्यमातील पत्रकारांशी नव्हे, तर निरनिराळ्या विषयांवर लिहिणारे 'ब्लॉगर्स' व एकूणच सोशल मीडियातील लेखकांशीही आहे, हेही पत्रकारांनी ध्यानात घ्यावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुलकर्णी यांनी केले.

विश्व संवाद केंद्रातर्फे देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण रविवारी (१ जुलै) महिला महाविद्यालयात करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी केंद्राचे अध्यक्ष कुलभूषण बाळशेट्टे, सचिव अंजली कोंडेकर, नागपूरचे माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांच्यासह पत्रकार, नागरिकांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात 'मटा'चे चीफ कॉपी एडिटर मनोज कुलकर्णी यांच्यासह संगीता विवेक जोशी (जळगाव), पूनम मिश्रा (औरंगाबाद), वेस्ता पाडवी (जामली, ता. अक्कलकुवा, नंदूरबार) व रमेश जायभाये (औरंगाबाद) यांना नारद पुरस्करांने सन्मानित करण्यात आले. या निमित्त, पुरुष पत्रकारांच्या खांद्याला खांदा लावून महिला पत्रकार काम करीत असतानाही त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची खंत पूनम मिश्रा यांनी व्यक्त केली. तब्बल ८५ टक्के पत्रकार हे कंत्राटी आहेत आणि त्यामुळेच पत्रकारांमध्ये अस्थिरता आल्याचे जायभाये म्हणाले. अनेक संकटे झेलत पत्रकार काम करीत असताना मिळालेली पुरस्काररुपी कौतुकाची थाप उत्साह द्विगुणीत करते, असे मनोज कुलकर्णी म्हणाले. शरद भोगले यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनैतिक संबंधातून पतीचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाण (ता. कन्नड) येथील शिवलाल राठोड यांच्या खुनाचे रहस्य ग्रामीण गुन्हे शाखेला उघडण्यात यश आले आहे. राठोड यांचा २२ मे रोजी दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. अनैतिक सबंधातून हा प्रकार घडला असून, पत्नीच्या प्रियकराला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.

शिवलाल बाळू राठोड (रा. घुसूर तांडा ता. कन्नड) याचा चिकलठाण शिवारात २२ मे रोजी खून करून मृतदेह फेकण्यात आला होता. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने भेट दिली होती. राठोड याचा खून त्याची पत्नी रंजनाबाई शिवलाल राठोड (रा. अंबातांडा ता. कन्नड) हिचा प्रियकर ज्ञानदेव नामदेव तुपे (रा. बऱ्हाणपूर, ता. नेवासा) याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पसार आरोपी ज्ञानदेवचा शोध सुरू होता.

दरम्यान, तुपे हा घोडेगाव येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पोलिासांनी घोडेगाव गाठून संशयित आरोपी ज्ञानदेव तुपे याला अटक केली. आरोपी तुपेला पुढील तपासासाठी कन्नड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पीएसआय एस. बी. कापुरे, बाळू पाथ्रीकर, शेख नदीम, बाबासाहेब नवले, योगेश तरमळे, जीवन घोलप व रमेश सोनूने यांनी केली.

\Bअनैतिक सबंधात अडसर

\Bआरोपी ज्ञानदेव तुपे हा आंबा तांडा येथे ट्रॅक्टरवर दोन-तीन वर्षे कामाला होता. या ठिकाणी शिवलालची पत्नी रंजनासोबत त्याचे अनैतिक सबंध जुळले. शिवलाल हा दारू प्राशन करून रंजनाला नेहमी मारहाण करीत होता; तसेच तो अनैतिक सबंधामध्ये अडसर ठरत होता. त्यामुळे या दोघांनी त्याच्या खुनाचा कट रचला. रंजनाने २२ मे रोजी शिवलालला कन्नडच्या बसस्टँडवर बोलावून घेतले. यावेळी शिवलाल हा दारुच्या नशेत होता. शिवलालला आरोपी ज्ञानदेवच्या दुचाकीवर त्याच्यासोबत पाठवले. ज्ञानदेवने शिवलालला चिकलठाणा शिवारात नेले. त्याच्या डोक्यात; तसेच गुप्तांगावर दगडाने वार करून त्याचा खून ज्ञानदेवने केला. रंजनाला ही माहिती कळवून तो घोडेगावला पसार झाला होता, असे पोलिसांनी सांगितले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक भरती पोर्टलला संस्थांचालकांचा विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षक भरतीसाठी शासनाने केंद्रीय परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. याला खासगी शिक्षण संस्था महामंडळाने विरोध केला असून, मुलाखतीचे अधिकार संस्थाचालकांकडेच असावेत, अशी मागणी अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिक्षक भरतीसाठी 'पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टिचर रिक्य्रूटमेंट' (पवित्र) पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला. अभियोग्यता आणि बुद्धीमापन चाचणीमध्ये उत्तीर्ण असलेल्यांमधूनच शिक्षकपदासाठी पात्र ठरणार आहे. अशा प्रकारे प्रक्रिया करण्याला आमचा विरोध आहे. पात्र अर्जदार उमेदवारांची संस्थास्तरावर मुलाखत घेण्यास परवानगी द्यावी, लेखी परीक्षेतील व मुलाखतीतील गुण एकत्र करूनच नियुक्तीची पद्धत करावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाने अशा प्रकारचा आदेश काढण्यापूर्वी विधीमंडळाची परवानगी घेण्याची गरज होती, परंतु तसे करण्यात आले नाही. कायद्याच स्वरूप देत ही प्रक्रिया राबविणे गरजेचे होते. शासनाचा अशा प्रकारचा निर्णय हा खासगी संस्थांच्या स्वायत्तेत हस्तक्षेप करण्यासारखा आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात आम्ही कोर्टातही दाद मागितली आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात आम्ही कोर्टातही दाद मागितली आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेला एस. पी. जवळकर यांची उपस्थिती होती.

\Bअतिरिक्तचे समायोजन करा\B

राज्यात खासगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचा गंभीर बनला आहे. अडीच हजार अतिरिक्त शिक्षक आहेत. त्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. त्यांचे समायोजन करण्याचा प्रश्न असताना शासन सरकारी शाळांमधील शिक्षक खासगी शाळेत समायोजन करण्याच्या सूचना करते आहे, हे चुकीचे असल्याचेही विजय नवल पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनसोडे यांची निवड

$
0
0

औरंगाबाद: महाराष्ट्र सेनेच्या शहर संघटकपदी रवी बनसोडे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र सेनेच्या पक्ष कार्यालयात राजू साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर अध्यक्ष अयुब पटेल यांनी ही निवड केली. यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष शेख रब्बानी, जिल्हाध्यक्ष सुनील खरात, मराठवाडा कार्याध्यक्ष रवी शिंदे, पूर्वचे शहराध्यक्ष मुकेश मकासरे, शहर कार्याध्यक्ष राजू भिंगारदेव, राजकुमार अमोलिक, नंदकुमार अंभोरे, राजू पवार, बादशहा खान, अभिजित जाधव, सागर काळवे, रोहन उगले, सुनील खंडागळे, शैलेंद्र बनकर आदी कार्यकत्यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमोटारीची धडक; लोडिंगचा चालक ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,  खुलताबाद

ट्रक व लोडिंग टाटा ए. सी.  या वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात लोडिंग टाटा ए. सी चे चालक आसिफ खान समशेर खान (वय ६०, रा. कैसर कॉलनी औरंगाबाद) हे जागेच ठार, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.  हा अपघात खुलताबाद-औरंगाबाद रस्त्यावरील महाराष्ट्र ढाब्याजवळ  रविवारी सकाळी आठच्या सुमारास झाला.

खुलताबादकडून औरंगाबादकडे भरधाव जाणारा ट्रक (एम एच १८ एम २८४७)  औरंगाबाद येथून खुलताबाद, कन्नडकडे येणारा  लोडिंग टाटा ए. सी. (एम एच २९ बी टी ०६७१) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात  लोडिंग टाटा ए. सी.चे चालक  आसिफखान समशेर खान हे जागीच ठार झाले.  टाटा ए. सी. मध्ये बसलेले  मनोज नामदेव तायडे व बाबुराव रामजी फडे हे दोघे जखमी झाले. जखमींवर तातडीने खुलताबाद ग्रामीण  रुग्णालयात उपचार करण्यात आले. इरफान खान आसिफ खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक शेख सईद मंजूर अहमद राहणार (रा. धोबी गल्ली, सिल्लोड) याच्याविरुद्ध   भरधाव वेगात निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाफेड’च्या शिलकीतून तुरीचे पैसे द्यावेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नाफेडने यंदाही गेल्यावर्षीप्रमाणेच शेतकऱ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने तूर खरेदी केली. जिल्ह्यात पाच केंद्रांवर तूर खरेदी झाली आहे. बाजार समिती केंद्रावर ३१९३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. याचे एक कोटी १२ लाख ४६ हजार ७५ रुपये 'नाफेड'कडे शिल्लक आहेत. हे पैसे तत्काळ द्यावेत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत गायकवाड यांनी हा मुद्दा उपस्थित केला. तुरीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना केंद्रावर उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. जिल्ह्यात ३१९३ क्विंटल तूर खरेदी केली गेली. २७ फेब्रुवारीपर्यंत ६१ लाख एक हजार २८५ रुपये इतकेच पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. उर्वरित रक्कम चार महिने उलटूनही दिली गेली नाही. सरकार व औरंगाबाद नाफेड केंद्राकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. खरीप हंगाम, साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना त्रास होत आहे. शेतकऱ्यांच्या तुरीचे पैसे तत्काळ द्यावेत, अशा मागणीचा ठराव गायकवाड यांनी मांडला. त्यास सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्क मिल कॉलनीत २२ तोळ्यांची घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गावी गेलेल्या नागरिकाचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे तब्बल २२ तोळ्याचे दागिने व रोख एक लाख १५ हजाराची रोकड लांबवली. हा प्रकार शुक्रवार ते रविवारदरम्यान सिल्क मिल कॉलनी भागात घडला. रविवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली.

प्रशांत बाबासाहेब कोळसे (वय ३०, रा. सी-तीन अमृतसाई प्लाझा, सिल्क मिल कॉलनी) हे व्यवसायाने ऑनलाइन कन्सलटंट आहेत. कोळसे हे शुक्रवारी सायंकाळी कुटुंबीयांसह भेंडाळा फॅक्टरी येथे गेले होते. रविवारी दुपारी एकच्या सुमारास ते घरी परतले. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे २२ तोळ्याचे दागिने व रोख एक लाख १५ हजार रुपये चोरट्यांनी लांबवले. कोळसे कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी सातारा पोलिसांना ही माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा पोलिस ठाण्यातील अधिकारी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय घनश्याम सोनवणे, अजबसिंग जारवाल, अमोल देशमुख आदींच्या पथकानी धाव घेतली. फिंगरप्रिंट तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. आरोपीने कोणताही पुरावा माग काढण्यासाठी ठेवला नसल्याने श्वान घरातच घुटमळले. फिंगरप्रिंट तज्ज्ञांना देखील आरोपीचे ठसे आढळून आले नसल्याने सराईत गुन्हेगाराने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

\Bचोरट्यांचा धुमाकूळ...पान २\B

\Bआईचे दागिनेही गेले\B

कोळसे यांच्या आईला पंढरपूरला देवदर्शनासाठी वारीत जायचे होते. यासाठी त्यांनी त्यांचे दागिने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मुलाकडे ठेवण्यासाठी दिले होते. या चोरीमध्ये कोळसे यांच्या दागिन्यासोबतच त्यांच्या आईचेही दागिने चोरट्यांनी लांबवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी भूसंपादनात औरंगाबादची पिछाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनामध्ये नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ९५ टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून औरंगाबादची पिछाडी अद्यापही कायम आहे. जिल्ह्यात केवळ १०८१ हेक्टर भूसंपादन झाले असून दहा जिल्ह्यांच्या यादीमध्ये औरंगाबादचा क्रमांक शेवटून दुसरा क्रमांक आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये भूसंपादनात विरोध होत असलेल्या गावांचा विरोधही आता मावळला आहे. १०८१ हेक्टरपैकी (७९ टक्के) १२४ हेक्टर जमीन ही शासकीय आहे. नागपूर नंतर सर्वाधिक ९१ टक्के भूसंपादन अमरावती जिल्ह्यात झाले असून सर्वात कमी ७६ टक्के भूसंपादन नाशिक जिल्ह्यात झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर आणि औरंगाबाद या तीन तालुक्यांत समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन सुरू आहे. समृद्धी महामार्गासाठी वर्षभरापूर्वी दरनिश्चिती करण्यात आली. यानंतर जुलै २०१७ मध्ये जिल्ह्यात प्रशासनाला पहिली रजिस्ट्री करण्यात यश मिळाले, त्यानंतर मोठ्या खंडानंतर पुन्हा जमीन देण्यास शेतकऱ्यांनी पुढाकार दर्शवला. सध्या समृद्धी महामार्गासाठी तीनही तालुक्यातून आवश्यक असलेल्या १३४७.७२ हेक्टरपैकी १०८१ हेक्टरचे (७९ टक्के) भूसंपादन करण्यात आले. सक्तीचे भूसंपादनाच्या भीतीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पळशी, कान्हापूर, फतियाबाद, तळेसमान, पालखेड, महालपिंप्री यासह इतर काही गावांमधील बहुतांश शेतकऱ्यांचा दराच्या तफावतीचा नाराजीचा सूर निवळला असल्याने आता जिल्ह्यातील भूसंपादन वेगाने होण्याची शक्यता आहे. दरम्यान बागायती जमीन असताना मोजणीमध्ये सदर जमीन हंगामी बागायती लावणे, विहिरीची तसेच झाडांची नोंद न घेणे किंवा चुकीची नोंद घेणे आदी तक्रारी शेतकऱ्यांच्या कायम आहेत.

---.

जिल्हानिहाय भूसंपादन

जिल्हा......................... हेक्टर........ टक्के

नागपूर..........................३००.८४....................९५.३९

वर्धा..............................६४६.७९...................८९.१४

अमरावती.......................८०४.१८...................९१.३३

वाशिम...........................११२०.५८................९२.०२

बुलडाणा........................१०६३.१९................८७.१०

जालना...........................४०९.०१................८०.२५

औरंगाबाद.......................१०८१.९३..............७९.०१

अहमदनगर......................३०८.५८...............८५.८२

नाशिक...........................९६६.६१................७६.४०

ठाणे...............................६४२.८१...............८३.२३

--------------------------------------------------.

एकूण..................................७३४४.५२.............८५.०४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भांडवलशाहीचा विकास प्रतिगामी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'दोनशे वर्षाच्या कालखंडात भांडवलशाहीने भरपूर प्रगती केली, मात्र भांडवलदारांची सामाजिकता नष्ट झाल्यामुळे विकासाचा रस्त अडवला गेला. सद्यस्थितीत भांडवलशाहीचा विकास प्रतिगामी आहे' असे प्रतिपादन कॉ. अजित अभ्यंकर यांनी केले. ते व्याख्यानात बोलत होते.

सिटू संलग्नित महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय संघटनेच्या (एमएसएमआरए) वतीने कार्ल मार्क्स यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त 'कार्ल मार्क्स आणि सद्यस्थिती' या विषयावर प्रा. अजित अभ्यंकर यांचे व्याख्यान घेण्यात आले. कॉ. व्ही. डी. देशपांडे सभागृहात रविवारी व्याख्यान झाले. यावेळी कॉ. श्रीकांत फोफसे यांची प्रमुख उपस्थिती होती. भांडवलशाहीचा नेमका आढावा घेत अभ्यंकर यांनी सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. 'नफ्याच्या प्रेरणेमुळे प्रगती झाली. मार्क्सचा विचार श्रमिकांच्या मुक्तीसाठी होता. भांडवलशाहीने नवीन शोध लावून प्रगती केली, पण आता इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी हक्क नावाचा प्रकार गैरसोयीचा ठरला. सहा हजारांचे कॅन्सरचे औषध एक लाख रुपयाला विकले गेले. मक्तेदारीतून जनतेची पिळवणूक सुरू आहे. भांडवलदारांची सामाजिकता नष्ट होऊन नफेखोरी वाढली. विकासाचा रस्ता अडवणारी भांडवलशाही प्रतिगामी आहे. त्यामुळे भांडवलशाहीला किमान समर्थनसुद्धा राहिले नाही. वित्तीय भांडवलशाही हा प्रकार वाढीस लागला. उत्पादनाशिवायची नफेखोरी आर्थिक मंदीला कारणीभूत ठरली. ही मंदी भांडवलशाहीचा आजार आहे,' असे प्रा. अभ्यंकर म्हणाले. यावेळी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेश क्षमतेवर टांगती तलवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर प्रवेशाचा गोंधळ असल्याने अनेक विभागात एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश झाला नाही. 'पीजी सीईटी' न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय अधांतरी असल्यामुळे विभागात शुकशुकाट आहे. या गोंधळाची जबाबदारी झटकत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे थेट विद्यार्थी प्रवेश क्षमता कमी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयावर विद्या परिषदेच्या सोमवारी (दोन जुलै) होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची चर्चा आहे.

पदव्युत्तर प्रवेश पूर्वपरीक्षेला (पीजी सीईटी) दोन महिने होऊनही प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ संपला नाही. विद्यापीठ आणि महाविद्यालयात ऑनलाइन प्रक्रिया करताना विद्यार्थी जेरीस आले आहेत. शिवाय सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांची लक्षणीय संख्या आहे. सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात मंगळवारी स्पॉट अॅडमिशन प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतरही विद्यापीठातील वीसपेक्षा जास्त विभाग रिकामे राहण्याची भीती आहे. सद्यस्थितीत हिंदी, रशियन भाषा, लिबरल आर्ट, पुरातत्त्वशास्त्र, संस्कृत, उर्दू, फुले-आंबेडकर थॉटस, अप्लाइड मॅथेमॅटीक्स, नॅनोटेक्नॉलॉजी या विषयांसाठी एकही प्रवेश झाला नाही. इतर विभागात अत्यंत कमी विद्यार्थी संख्या आहे. दरवर्षी विद्यापीठातील प्रवेशसंख्या घटत असल्यामुळे चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे 'पीजी सीईटी'चा घोळ होऊनही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी विशेष दखल घेतली नाही. यावर्षी प्रत्येक विषयाची विद्यार्थी प्रवेश क्षमता कमी करण्याचा विचार त्यांनी मागील आठवड्यात झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत बोलून दाखवला. या निर्णयावर विद्या परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी प्रवेश संख्या कमी झाल्यास प्राध्यापकांच्या संख्येवर परिणाम होईल. शिवाय कमी शुल्कात शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. मात्र, विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहिल्यास 'एनआयआरएफ' मानांकनात कमी गुण मिळतात. त्यामुळे विद्यार्थी प्रवेश क्षमताच कमी करण्यावर कुलगुरू ठाम आहेत. हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

\Bते विद्यार्थी कुठे गेले?

\Bपदवी परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच विद्यापीठाने सीईटी घेतली. त्यामुळे शेकडो विद्यार्थी 'सीईटी'पासून वंचित राहिले. संबंधित विद्यार्थी जून महिन्यात विद्यापीठातील विभागात प्रवेशासाठी आले होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला प्रशासनाने नकार दिला. परिणामी, या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या महाविद्यालयात नाइलाजाने प्रवेश घेतला. आता विद्यार्थी नसल्याची चिंता भेडसावत असल्याने प्रशासन सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी परवानगी देणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाद्यपदार्थांच्या दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांमधून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्यासाठी केंद्र सरकार कायदा करत आहे. या कायद्याने रिटेलर व्यवसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे. सरकारच्या या निर्णयाने जवळपास दहा लाख रिटेलर व्यवसायिकांच्या रोजगारावर गदा येणार असून कायद्याला आमचा विरोध आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ रिटेलर एसोसिएशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी नंदकुमार हेगिष्टे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महाराष्ट्र सरकारने खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्याचा निर्णय घेण्याच्या दृष्टिने पाऊल उचलले आहे. तसेच दुकानदारांना आपल्या दुकानांत कोणाचीही जाहिरात करता येणार नसल्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे. या निर्णयाला आमचा विरोध आहे. पानटपरी, पानठेला, छोटी छोटी दुकाने यांचे उत्पन्न कमी असते. त्यामुळे ते खाद्यपदार्थांसह तंबाखूजन्य पदार्थांचीही विक्री करतात. दिवसभरात किमान कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याइतका पैसा मिळतो. सरकारच्या या निर्णयाने राज्यातील दहा लाख तसेच देशभरातील चार कोटी रिटेलर दुकानांवर संक्रांत येणार आहे, असा दावा त्यांनी केला. सरकारने हा अन्यायकारक निर्णय घेऊ नये अन्यथा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा हेगिष्टे यांनी दिला. यावेळी हाजी सैफुद्दीन, जलील तांबोळी, अतुल नाडकर, अब्दुल सलीम सौदागर, शेख फय्याज, लक्ष्मीकांत दहिवाल आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आंतरिक सौंदर्य हा योगशास्त्राचा गाभा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बाह्य सौंदर्यामध्ये फार बदल करता येत नाही आणि त्यामुळे दैनंदिन जीवनात फारसा फरकही पडत नाही. आंतरिक सौंदर्य किंवा मनाचे सौंदर्य म्हणजेच वाणी, विचार, बुद्धी, मन आणि आत्म्याचे सौंदर्य जास्त महत्वाचे असते. योग हे मनाचे शास्त्र आहे म्हणूनच योगसाधना महत्त्वाची आहे. साधनेत सातत्य असेल तर फलप्राप्ती होते म्हणून योग नित्यनियमाने करा, असे प्रतिपादन योगतरंग मासिकाच्या (ठाणे) संपादिका सुजाता भिडे यांनी केले.

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने निरंजन योग निसर्गोपचार संशोधन केंद्र आणि योग थेरपी सेंटरतर्फे योग क्षेत्रातील योगदानाबद्दल भिडे यांना योगरत्न पुरस्कार हा महिला महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. मनोरमा शर्मा यांच्या हस्ते रविवारी (एक जुलै) यशोमंगल कार्यालात प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल देऊन त्यांना गौरविण्यात आले. या वेळी व्यासपीठावर श्रीकांत पत्की, डॉ. चारुलता देशमुख-रोजेकर यांची उपस्थिती होती. या निमित्ताने योगसाधना, योग्य आहार व सकारात्मक मानसिकतेच्या बळावर कॅन्सरवर मात केलेल्या सायली खरे यांनी कार्यक्रमात अनेकांना प्रेरणा दिली. शहरात लवकरच कॅन्सर सर्पोटिव्ह ग्रुप स्थापन करून, योगसाधनेतून त्यांना दिलासा देण्याचा मानस डॉ. रोजेकर यांनी या वेळी व्यक्त केला. डॉ. मनोरम शर्मा व श्रीकांत पत्की यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमात योगसाधनेतून आजारांवर नियंत्रण मिळवणाऱ्या सालोमन कांबळे, श्रीमती चापटगावकर, श्रीमती अन्नपूर्णे, सोपान नारखेडे, माढेकर आदींची या वेळी सत्कार करण्यात आला. दीपाली कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्नेहा बागलानी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी कविता जाधव, अपर्णा देशपांडे, रेखा आधाने, स्नेहा मुडवळकर, शुभदा सुतवणे, लाजवंती पाटील, अनिता पगारिया, सुचेता मालवडे, समीक्षा टोपरे, बळवंत विटेकर आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांच्या सुरेल मैफलीने रसिक मुग्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'डॉक्टर्स डे'निमित्त शहरातील सहा डॉक्टरांच्या सुरेल मैफलीने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. 'डॉक्टर्स डे'चे औचित्य साधत कराओके क्लबच्या वतीने रविवारी (१ जुलै) तापडिया नाट्य मंदिरात आयोजित 'आनंद - द जॉय' ही दृकश्राव्य संगीत रजनी श्रोत्यांच्या प्रतिसादात बहरत गेली.

या कार्यक्रमात 'ए माझी रे...', 'तेरा मुझसे हैं नाता...', 'हम थे जिनके सहारे...' यासारख्या रसिकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवेल्या लोकप्रिय गीतांबरोबरच 'मैं हू घोडा, ये है गाडी...', 'ए मेरो बेटे, सुन मेरा कहना...', 'छन छन मन गाये क्यू...' यासारख्या वेगळ्या धाटणीच्या गीतांनाही रसिकांची मनसोक्त दाद मिळाली. याच कार्यक्रमात डॉक्टर-रुग्णांच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित करणारे काही चित्रपटातील काही प्रसंगही दाखवण्यात आले आणि त्यांनाही मनस्वी दाद मिळाली. शहरातील डॉ. मुकेश तलरेजा, डॉ. राजगोपाल तोतला, डॉ. मकरंद पत्की, डॉ. अशोक शेरकर, डॉ. वर्षा वैद्य व डॉ. अनघा मारावार यांनी हा सिनेगीतांचा नजराणा सादर केला. कार्यक्रमाला शहरातील रसिकांसह डॉक्टर मंडळींनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमासाठी क्लबचे रतन नगरकर व इतरांनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यासाठी नागरिकांनी केले आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील कचऱ्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत आहे. साडेचार महिन्यांपासून काही भागातील कचरा शहराच्या मुख्य बाजारपेठेत औरंगपुऱ्यातील भाजी मार्केटच्या मोकळ्या जागेत टाकला जातो आहे. त्याची दुर्गंधी वाढल्याने संतापलेल्या परिसरातील नागरिकांनी रविवारी रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले. या कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

शहरात १६ फेब्रुवारीपासून कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. नारेगावमध्ये कचरा टाकण्यास बंदी झाली तेव्हापासून शहरातील कचरा कोठे टाकायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातील जमा केला जाणारा मोठ्या प्रमाणातील कचरा औरंगपुऱ्यातील भाजी मार्केटच्या मोकळ्या जागेमध्ये टाकला जात आहे. दोन-तीन मजली इमारतीच्या एवढा हा कचरा जमा झालेला आहे. त्यात पावसाने त्याची दुर्गंधी सुटलेली आहे. त्यासह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. छोटे-छोटे व्यापारी वैतागले आहेत. त्यासह तीस वर्षांपासून या परिसरात रस्ताही झालेला नाही. परिसरातच नाला आहे. पावसाने सगळ्या कचरा कुजला असून त्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे परिसरातून जाणेही अवघड झालेल्या संतापलेल्या नागरिकांनी रविवारी रस्त्यावर उतरले. दुपारी दोन वाजता नागरिकांनी रस्त्यावर येऊन महापालिकेचा निषेध केला. नागरिकांनी रास्ता रोको केला. सुमारे तासभर नागरिकांनी आंदोलन करत तत्काळ या परिसरातील कचरा उचलण्यात यावा, यापुढे कचरा टाकण्यात येऊ नये, तत्काळ रस्ता तयार करावा अशी मागणी केली. यावेळी व्यापारी, नागरिकांसह सुराणा अपार्टमेंटमधील गिरिधारी अग्रवाल, राकेश जैन, विनोद अग्रवाल, प्रदीप संचेती, शेख जलील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगची शिस्त लागली फायलींचे काय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद मुख्यालयात वाहनांची शिस्त राहिलेली नव्हती. अधिकाऱ्यांची वाहने काढतानाही दमछाक होत होती. मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी पार्किंगला शिस्त लागण्यासाठी कठोर पावले उचलली. त्याचे चांगले परिणाम दोन दिवसांपासून दिसत आहेत. पार्किंगची शिस्त लागली, पण फायली लवकर निकाली लावण्यासाठी काय उपाययोजना करणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी पार्किंगला शिस्त लावण्यासाठी कठोर निर्णय घेतले आहेत. जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या वाहनांना पास लावण्यात येणार आहेत. पास असलेल्या वाहनांनाच गेटमध्ये प्रवेश असेल. त्यांच्यासाठी पार्किंगची जागा निश्चित असेल. वाहने कुठेही पार्क होणार नाहीत. दुचाकीही पार्किंगच्या ठिकाणी लावण्यात येतील. याशिवाय येणारी वाहने जिल्हा परिषद मैदानावर लावण्याची सूचना करण्यात आली आहे. शुक्रवारच्या स्थायी समिती बैठकीत कौर यांनी ही घोषणा केली आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले. शनिवारी लगेचच बदल दिसून आला. सर्व चारचाकी वाहने शिस्तीत लावलेल्या होत्या. पार्किंगचा विषय मार्गी लागला पण फायलींचे काय असा प्रश्न कायम आहे.

\Bप्रतिसादावर यश \B

'फाइल ट्रॅकिंग सिस्टम' कार्यान्वित करण्याचे पवनीत कौर यांनी ठरवले आहे. त्यात कुठली फाइल कुठे आहे याची माहिती दर्शनी भागात नोंदविली जाईल. ही पद्धती औरंगाबाद जिल्हा परिषदेतील कर्मचारी, लोकप्रतिनिधींना पचण्यास थोडी अवघड असली तरी शिस्त लागण्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. या उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळतो त्यावर कौर यांच्या निर्णयाचे यश अवलंबून आहे. कारण अनेक फायली किरकोळ त्रुटी दाखवून महिनोनमहिने थांबविल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्यांची अडवणूक थांबवण्यासाठी या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होणार काय ? असा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक पात्रता परीक्षा १५ जुलै रोजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) १५ जुलै रोजी घेण्यात येत आहे. राज्यात एक लाख ३५ हजार परीक्षार्थी विविध ३५ जिल्हा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षार्थींची संख्या निम्म्याने कमी झाली आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया न झाल्याने त्याचा परिणाम परीक्षेला अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येवर झाल्याचे मानले जात आहे.

राज्यात शिक्षक पात्रतेसाठी शिक्षक पात्रता परीक्षा २०१३पासून घेतली जाते. मागील वर्षीपासून शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेतली जात आहे. यंदा शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मेमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. याची परीक्षा १५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा परिषदेने त्याचे वेळापत्रक आपल्या वेबसाइटवर जाहीर करून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या लॉग इन-आयडीवरून हॉलतिकीट काढता येणार आहे. रविवारपासून (एक जुलै) हॉलतिकीट उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हास्तरावर परीक्षा केंद्र असून प्राथमिकस्तर (इयत्ता पहिली व पाचवी) व माध्यमिकस्तर (सहावी ते आठवी) यांच्यासाठी वेगवेगळी परीक्षा होणार आहे, अशी माहिती परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी 'मटा'ला दिली. मागील वर्षी २२ जुलै २०१७ ला परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी परीक्षेतील चुकांमुळे परीक्षा गाजली होती. निकालालाही विलंब झाला होता.

\Bपरीक्षार्थी घटले\B

शिक्षक पात्रता परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा मोठ्या प्रमाणात कमी झाली. सुरुवातीला राज्यात साडेसहालाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. निकालाची टक्केवारी चार ते पाच टक्क्यांच्या पुढे गेलेली नाही. त्यानंतर दरवर्षी विद्यार्थी संख्या कमी होत गेली. मागील वर्षी हे पावणेतीन लाख विद्यार्थी प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील 'टीईटी' दिली. यंदा तर केवळ एक लाख ३५ हजार परीक्षार्थी 'टीईटी' देणार आहेत. राज्यात डीटीएड, बीएडधारक बेरोजगारांची संख्या बारा लाखांपेक्षा अधिक आहेत, परंतु २०१०नंतर शिक्षक भरतीची प्रक्रियाच झालेली नाही. त्यामुळे परीक्षार्थींची संख्या ही मर्यादित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

परीक्षा............१५ जुलै

परीक्षार्थी संख्या......१३५०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हज यात्रेकरुंची यात्रा यंदा महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सउदी अरबमध्ये 'व्हॅट' लागू झाल्यामुळे हज यात्रेकरुंना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांवर कर लावण्यात आला आहे. या करासह देशांतर्गत विमानतळ करातही वाढ झाल्यामुळे यंदा यात्रेकरुंना प्रत्येकी आठ ते साडेआठ हजार रुपये जादा मोजावे लागणार आहेत.

हज कमिटी ऑफ इंडियाने या वाढीव कराची माहिती २६ जून रोजी काढलेल्या अध्यादेशाद्वारे दिली आहे. या अध्यादेशानुसार, अजिजीया आणि ग्रीन कॅटगरीमध्ये जाणाऱ्या यात्रेकरुंना वेगवेगळे कर लावले आहेत. देशांतर्गत विमानतळावरून जाणाऱ्या विमानाचे विमानतळ शुल्क वाढविण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईहून जाणाऱ्या यात्रेकरुंना ८५० रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत.

सउदी अरबमध्ये विविध सुविधांवर 'व्हॅट' लागू करण्यात आला आहे. याशिवाय रेल्वे व बस सुविधेसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. पूर्वी मीना येथे निवास असलेल्या यात्रेकरुंना झोपण्यासाठी गाद्या देण्यात येत होत्या. यंदा पंलग देण्यात येणार असल्याने त्याचेही शुल्क वाढविण्यात आले आहे. मदिना येथून विविध राज्यात परतणाऱ्या यात्रेकरुंची निवास व्यवस्था करण्यात आली असून त्यावरील करात वाढ करण्यात आली आहे.

जीएसटी लागू झाली व अनुदान बंद झाल्याने यंदापासून यात्रेकरुंना २२ हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागत होते. आता कर वाढल्याने जास्तीचे आठ ते साडेआठ हजार रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहेत. पूर्ण पैसे भरण्यासाठी १० जुलै ही अंतिम मुदत देण्यात आल्याची माहिती हुज्जाज कमिटीचे शेख फैसल यांनी दिली.

……

\Bकुर्बानी साठी ५०८ रुपये वाढले

\B

हज यात्रेच्या शेवटच्या दिवशी मक्का येथे कुर्बानी दिली जाते. या कुर्बानीसाठी आठ हजार रुपये हज कमिटीने आकारले होते. 'व्हॅट'मुळे आता त्यात ५०८ रुपयांची वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हज यात्रेकरुंना मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हज यात्रेच्या पाच दिवसांत पूर्ण करावे लागणारे कर्तव्य, हज यात्रेनंतरची मदिना यात्रा कशी असते, याची माहिती मौलाना नसीम मिफ्ताई यांनी हज यात्रेकरुंच्या शेवटच्या दिवशी दिली. यात्रेकरुंसाठी हुज्जाज कमिटीतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शेवटचे चौथे शिबिर जामा मशीदमधील सईद हॉलमध्ये पार पडले.

या शिबिराला ३० जून रोजी सुरुवात झाली, त्यात २२४० यात्रेकरुंनी सहभाग घेतला. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली, अहमदनगर, बुलढाणा, मुंबई, नाशिक, हैदराबाद येथील यात्रेकरून सामील झाले. पहिल्या दिवशी शनिवारी डॉ. रहिमोद्दीन आणि रफत बेग यांनी यात्रेसाठीची तयारी याबद्दल माहिती दिली. दुपारच्या सत्रात सय्यद साजेद अन्वर यांनी एहराम आणि उमराह याबाबत सविस्तर माहिती दिली. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (१ जूलै) प्रा. अब्दुल खालेक यांनी हज यात्रेचे पाच दिवस, त्याचे महत्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात मौलाना नसीम मिफ्ताई यांनी मदिना यात्रेची माहिती दिली. त्यानंतर यात्रेकरुंच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशाला लुबाडणारा रिक्षाचालक गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रवाशाला साथीदारांच्या मदतीने लुबाडणाऱ्या रिक्षाचालकाला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. जितेंद्र श्रीमंत जाधव उर्फ जितू (वय २१, रा. प्रकाशनगर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. बुधवारी रात्री एका प्रवाशाला आयोध्यानगर भागात मारहाण करीत १४ हजार रुपये लुबाडण्यात आले होते.

जितेंद्र जाधव हा मुकुंदवाडी पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याला हद्दपार आदेशाची नोटीस देखील बजावण्यात आली होती. शनिवारी मुकुंदवाडी पोलिसांना पाहून जितूने रिक्षासह पलायनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. प्रदीप कैलास मगर (वय २१ रा. बीड बायपासरोड) हे बुधवारी रात्री त्याच्या रिक्षामध्ये बसून रेल्वे स्टेशनकडे जात होता. यावेळी जितूने रिक्षा आयोध्यानगरीत निर्जन भागात घेतली. रिक्षामध्ये पूर्वीपासून दोन साथीदार प्रवासी म्हणून बसले होते. या तिघांनी यांना मारहाण करीत १४ हजार रुपये लांबवले होते. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपी जितूला वेदांतनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मोबाइल चोर गुन्हे शाखेच्या जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीचे मोबाइल विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. गारखेडा सूतगिरणी चौकात रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. चार दिवसांपूर्वी शंभूनगर भागातील मोबाइल शॉपी फोडल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींच्या ताब्यातून चार मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

सूतगिरणी चौकात एक अल्पवयीन आरोपी चोरीचे मोबाइल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून या मुलाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ चार मोबाइल आढळले. या मोबाइलबाबत चौकशी केली असता आरोपीने २७ जून रोजी शंभूनगर भागातील एक मोबाइल शॉपी साथीदाराच्या मदतीने फोडल्याची कबुली दिली. अरुण जिनवाल यांची अक्षरा मोबाइल शॉपी या आरोपीने फोडली होती. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या आरोपीला जवाहरनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय योगेश धोंडे, जमादार रामदास गायकवाड, संतोष सोनवणे, आनंद वाहूळ, विकास गायकवाड, रितेश जाधव, योगेश गुप्ता व नंदलाल चव्हाण यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images