Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वसंतराव मिरखेलकर यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद: रोकडिया हनुमान कॉलनी येथील रहिवासी वसंतराव मिरखेलकर (वय ९३) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर कैलासनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समांतर’ प्रश्नी कंपनीच्या नवीन प्रस्तावाबद्दल पुढील आठवड्यात सर्वसाधारण सभा, सर्वोच्च न्यायालयात १३ जुलैला सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरासाठीच्या समांतर जलवाहिनी योजनेचे काम पुन्हा सुरू करण्याबद्दलचा प्रस्ताव औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केला. या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेचा निर्णय आणि पालिका प्रशासनाचा कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावाबद्दलचा अभिप्राय १३ जुलै रोजी आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयात सादर करायचा आहे.

समांतर जलवाहिनीच्या संदर्भात आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी कंपनी, राज्य शासन आणि महापालिका यांच्यात दोनवेळा चर्चा झाली होती. त्यानुसार कंपनीने समांतर जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू करण्याबद्दल नव्याने प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयात सादर झाल्यावर आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंटच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू होईल, असे मानले जात होते. त्यामुळे बुधवारी (४ जुलै) सर्वोच्च न्यायलयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्व संबंधितांचे लक्ष होते.

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीबद्दल आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना लेखी माहिती दिली. आयुक्तांनी दिलेल्या माहितीबद्दल महापौरांनी सांगितले की, 'कंपनीने समांतर जलवाहिनीबद्दलचा नवा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयात सादर केला आणि सुनावणीची तारीख वाढवून देण्याची विनंती केली. कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावाची गुणवत्ता तपासण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आयुक्तांना दिले व त्याचा अभिप्राय सादर करण्यास सांगून पुढील सुनावणी १३ जुलै रोजी ठेवली. कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुशंगाने सर्वसाधारण सभेत निवेदन करण्याची विनंती आयुक्तांनी पत्राव्दारे केली.'

प्रस्तावाबद्दल सर्वसाधारण सभेत केवळ निवेदन करण्यापेक्षा कंपनीने दिलेला नवीन प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडा, त्यावर चर्चा करून सर्वसाधारण सभा निर्णय घेईल. सर्वसाधारण सभेचा निर्णय आणि प्रशासनाची भूमिका एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात १३ जुलै रोजी मांडा, असे आपण आयुक्तांना सांगितले. त्यांनी ते मान्य केले, असे महापौरांनी सांगितले. १३ जुलै पूर्वी कंपनीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवायचा असल्यामुळे सोमवार किंवा मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी लागेल, असे संकेतही महापौरांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐतिहासिक तटबंदीची मोडतोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

एकीकडे ऐतिहासिक वारसा जपला जात असतांना खुलताबाद शहरात ऐतिहासिक वारसा नष्ट केला जात आहे. नगरसेवकांनी पदाचा गैरवापर करून विकासकामांच्या बाबतीत मनमानी सुरू केली आहे. गट नंबर १४४ मधील वक्फ बोर्डाच्या जागेतील ऐतिहासिक तटबंदी तोडून सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्यासह चार नगरसेवकांना नोटीस बजावली आहे.

नगरपालिकेच्या ७ मार्च २०१७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा नगरोत्थान अंतर्गत ठराव घेऊन वार्ड क्रमांक चार गट नंबर १४४ मध्ये विकासकामे करण्याचा ठराव घेण्यात आला. ही मालमत्ता वक्फ बोर्डाची असतांना नगर परिषदेने २२ लाख रुपये खर्च करून सिमेंट रस्ता व नाली बांधकाम केले आहे. या कामासाठी ऐतिहासिक तटबंदीची तोडफोड करण्यात आली. याबाबत इकबाल पटेल यांनी चार नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन गट नंबर १४४ वक्फ बोर्डाच्या जागेत ऐतिहासिक तटबंदी तोडून सिमेंट व रस्ता नाली बांधकाम केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. शिवाय या बाबतच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनात प्राप्त झाल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक अयाज मिर्झा बेग, शेख अब्दुल हाफिज अब्दुल रशीद, शेख मुनीबोद्दीन यांना नोटीस बजावल्याने शहरासह पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कामाबाबतच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. इकबाल पटेल यांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांनी नोटीस बजावली आहे. जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

\Bदहा जुलै रोजी हजर व्हा \B

मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक अयाज मिर्झा बेग, शेख अब्दुल हाफिज अब्दुल रशीद, शेख मुनीबोद्दीन यांना १० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीस उपस्थितीत राहून म्हणणे मांडण्याची नोटीस बजावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यात बेशरम लाऊन आंदोलन

$
0
0

वाळूज महानगर: वाळूज एमआयडीसीतील मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असून त्याकडे एमआयडीसी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्राम संघटनेतर्फे बुधवारी खड्ड्यात बेशरमाचे झाडे लावून आंदोलन करण्यात आले़ खड्डे बुजवावेत व बंद पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली.

या आदोलनाचे नेतृत्व शिवसंग्रामचे जिल्हाअध्यक्ष अमोल काळे पाटील यांनी केले. मिडास केअर कंपनी समोरील खड्ड्यांमधे बेशरमाची झाडे लावून एमआयडीसी प्रशासनाचा निषेध करण्यात आला. मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत असून त्यात पाणी साचल्यावर अंदाज येत नाही. त्यामुळे रात्रपाळीत कामावर जाणाऱ्या कामगारांचे अपघात होत आहेत. या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी राजेंद्र पवार, धनंजय फिसके, गणेश धोत्रे, अर्जुन तांबेकर, किशोर देशमुख, कृष्णा बोबडे, शिवा पाटील, अनिल भोसले, आशीष पाटोळे, शुभम सरोवर, संतोष राजपूत आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त पोलिस निरीक्षकाची मुलगा, सुनेकडून फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निवृत्त पोलिस निरीक्षकाच्या पत्नीच्या अर्थात स्वतचःच्या आईच्या नावावर असलेला भूखंड खोट्या कागदपत्रांच्या आधारे स्वतःच्या नावावर करून घेणाऱ्या मुलासह पोलिस कर्मचारी असलेल्या सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मुलगा श्यामसुंदर नेमाजी निर्मल याला अटक करून कोर्टात हजर केले असता शनिवारपर्यंत (७ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी बुधवारी दिले.

याप्रकरणी निवृत पोलिस निरीक्षक नेमाजी दशरथ निर्मल (वय ८१, वसंतनगर, जवाहर कॉलनी) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादीने १९८० मध्ये वसंतनगर शिक्षण मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेत ६० बाय ४० चा भूखंड २० हजार रुपयांत खरेदी करून पत्नी तुळजाबाई यांच्या नावे केला होता. मात्र पत्नीच्या नावावरील भूखंड हा मुलगा श्यामसुंदर याने त्यांच्या परवानगीशिवाय खोट्या कागदपत्रांच्या आधारे स्वतःच्या नावे करून घेतला. बनावट खरेदीनामा, करारनामा तयार करून भूखंडावर कब्जा दाखवला. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून भादंवि ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४०१, ११४, १२० (ब), ३४ कलमान्वये जवाहर कॉलनी पोलिस ठाण्यात श्यामसुंदर व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

\Bपोलिस सून पसार \B

या प्रकरणात संशयित आरोपी श्यामसुंदर याला अटक करुन कोर्टात हजर केले असता मुलाने खोटी कागदपत्रे कुठे तयार केली, त्याचे कोणी साथीदार आहेत, का आदी बाबींचा तपास करणे बाकी आहे. त्याचवेळी आरोपीची पत्नी व फिर्यादीची पोलिस कर्मचारी असलेली सून फरार असून, तिला अटक करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महात्मा गांधी व वर्तमान’ विषयावर आज परिसंवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महाराष्ट्र गांधी स्मारक निधी'च्या वतीने 'राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि वर्तमान' या विषयावर गुरुवारी (५ जुलै) दुपारी साडेचारला परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, विचारवंत जयदेव डोळे, 'महाराष्ट्र गांधी स्मारक निधी'चे अध्यक्ष डॉ. कुमाक सप्तर्षी हे परिसंवादामध्ये सहभागी होणार आहेत. समर्थनगर येथील महात्मा गांधी भवनात हा कार्यक्रम होणार असून, नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. माधवराव रत्नपारखी, अन्वर राजन, अॅड. प्रदीप देशमुख, डॉ. मच्छिद्रनाथ गोर्डे आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाम फोडणारे २४ तासांत गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

झाल्टा शिवारात गोदाम फोडणाऱ्या संशयित आरोपीला चिकलठाणा पोलिसांना अवघ्या चोवीस तासात मुद्देमालासह अटक केली. पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथून ट्रकचालक अशोक भीमराव शिंदे (रा. कोठाळवाडी, ता. कळंब)याला अटक केली.

झाल्टा शिवारातील रामकृष्णहरी अॅटोमोबाइल्सचे गोदाम चोरट्यांनी शनिवार ते सोमवारच्या दरम्यान फोडले होते. चोरांनी लोखंडाचे वाहनांचे पाटे व वॉशिंग सेंटर मशीन, असा दोन लाख १७ हजाराचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी दुकानमालक गोरखनाथ हरीभाऊ डिघोळे यांच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. चिकलठाणा पोलिसांनी तपास केला असता दोन दिवसांपासून एक ट्रक घटनास्थळाशेजारी उभा असल्याचे स्पष्ट झाले. त्या ट्रकचा चालक व सोबतचे दोन व्यक्ती हा ट्रक नादुरुस्त असल्याचे लोकांना सांगत होते. पोलिसांनी या ट्रकबाबत माहिती काढली असात तो ट्रकचालक अशोक भीमराव शिंदे (रा. कोठाळवाडी) याचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ कळंब गाठून अशोक शिंदेला ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी त्याने हा गुन्हा आपण भाऊ व मित्राच्या मदतीने केल्याची कबुली दिली. तसेच शेतात ज्वारीच्या बाजूला लपवलेला चोरीचा माल काढून दिला. पोलिसांनी अशोक शिंदेला अटक करून औरंगाबादला आणले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधीक्षक उज्ज्वला वनकर, उपअधीक्षक अशोक आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, उपनिरीक्षक सुधाकर चव्हाण, सहायक फौजदार नारायण कटकुरी, लहू थोटे व दीपक सुराशे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्ता विद्यार्थ्यांचा पोलिसांतर्फे सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जातीय सलोखा कार्यक्रमानिमित्त क्रांतीचौक पोलिसांच्या वतीने सर्वधर्मीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम बुधवारी दुपारी समर्थनगर येथील नियंत्रणकक्षाजवळील सभागृहात पार पडला.

कांही दिवसापासून विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियाचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा गैरवापर करू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी केले. या कार्यक्रमाला माजी महापौर रशीद खान, अशोक सायन्ना यादव, माजी नगरसेवक नासेर खान, गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, राम मंदिराचे पुजारी राजू महाराज, मौलाना चिराग साहब, जोशी महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. डॉ. जाधव, राजू महाराज, मौलाना चिराग साहब आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लहाने यांनी केले, तर क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उघड्यावर मांसविक्री, गुन्हे दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सेंट्रल नाका परिसरात रस्त्यावर मांस विक्री करणाऱ्या नऊ विक्रेत्यांवर मनपाच्या पथकाने मंगळवारी कारवाई केली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

येथे अनेक वर्षापासून उघड्यावर मांस व मासे विकण्यात येतात. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. त्याबद्दल मनपामध्ये अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. मनपाचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी शेख शाहेद शेख निजाम यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून इब्राहीम यासीन कुरेशी, अब्दुल रज्जाक मोहम्मद ईस्माईल, जफर हाजी मजहर कुरेशी, बशीर अहेमद कुरेशी, नासेर शाह, गुलजार शाह, ऐजाज अहेमद, अब्दुल रज्जाक, ईस्माईल यासीन कुरेशी, सय्यद पाशा सय्यद अहेमद, शाकेर दगडू पटेल (सर्व रा. सेंट्रलनाका परिसर) यांच्याविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार शेख शकील याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीच्या सीईओंना हायकोर्टाची नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

वस्तीशाळातील स्वंयसेवक आणि निमशिक्षक म्हणून कार्य केलेल्या शिक्षकांना एक मार्च २०१४ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षक म्हणून सामावुन घेण्यात आले. मात्र त्यांना चुकीची वेतनश्रेणी देण्यात आली. याविरोधात शिक्षकांनी दाखल केलेल्या याचिकेत न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. सुनील कोतवाल यांच्या खंडपीठाने औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

राज्यातील वस्तीशाळांचे प्राथमिक शाळांमध्ये रुपांतर करण्याचा तसेच प्राथमिक शाळांमध्ये एका पदावर वस्तीशाळा स्वयंसेवकांना निमशिक्षक म्हणून कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्याचा तसेच निमशिक्षकांना पत्रव्दारे डी. एड्. अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी देत त्यांना निवड प्रक्रियेत समावून घेण्याचा निर्णय शासनातर्फे पाच फेब्रुवारी २००९ रोजी घेण्यात आला. वस्तीशाळा स्वंयसेवक, निमशिक्षकांचा अनुभव लक्षात घेता त्यांना शासन निर्णय एक मार्च २०१४ नुसार जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक पदावर सेवेत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यांना ग्रेड २८००-८५६०-११३६० ऐवजी २८००-६४६०-८४६० या ग्रेड नुसार वेतनश्रेणी देण्यात आली. याप्रकरणी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमाचे कलम १३नुसार विभागीय आयुक्तांनी काही शिक्षकांचे वेतन ग्रेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश रद्द केले. त्यामुळे याचिकाकर्त्या शिक्षकांनी वेतनश्रेणी दुरुस्त करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला. मात्र त्या संदर्भात काही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे वैजापुर, कन्नड, फुलंब्री आणि औरंगाबाद तालुक्यातील गणेश शिंदे व इतर ४८ प्राथमिक शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी एक ऑगस्ट रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या बदल्या खोळंबल्या

$
0
0

औरंगाबाद :

महापालिका शाळेतील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या खोळंबल्या आहेत. कचरा आणि पाणीप्रश्नात अडकलेल्या आयुक्तांना शिक्षकांच्या बदली प्रकरणात लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शाळांमध्ये शिक्षकांबद्दल जैसे थे स्थिती निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या ७४ शाळा आहेत, त्यात सुमारे ४५० शिक्षक कार्यरत आहेत. काही शिक्षक एकाच शाळेत पाच - दहा वर्षांपासून काम करीत आहेत, तर काही शिक्षकांनी आपल्या घराच्या जवळची शाळा सोडलेली नाही. अशा शिक्षकांची काही शाळांबद्दल एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. ही एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिक्षण विभागाला दिले होते. एका मोठ्या सभागृहात स्क्रिन लावून पारदर्शक पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या करा, असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार लाँग स्टे असलेल्या सुमारे ७५ ते शंभर शिक्षकांच्या बदल्या करण्याची तयारी शिक्षण विभागाने केली. दरम्यानच्या काळात डॉ. निपुण विनायक आयुक्तपदी रुजू झाले. बदल्या करण्यासाठी आयुक्तांच्या परवानगीची गरज असते. त्यामुळे त्यांच्याकडे बदल्यांचे प्रकरण सादर करण्यात आले, परंतु कचरा आणि पाणीप्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिलेले असल्यामुळे याच कामात ते गढून गेले आहेत, त्यामुळे त्यांनी शिक्षकांच्या बदल्यांबद्दल थोडे थांबा, नंतर विचार करू, असे शिक्षण विभागाला सांगितल्याचे सूत्रांकडून कळाले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत. आता शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे बदल्या होण्याची देखील शक्यता नाही, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैदी रुग्णांच्या भरतीबाबत समिती घेणार निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) दाखल होणाऱ्या कैद्यांबाबतचे सर्व निर्णय समितीमार्फत घेतले जाणार असून, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन ये‍ळीकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (३ जुलै) झालेल्या बैठकीत या संदर्भातील समिती स्थापन झाली. आता रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक कैदी रुग्णाची इत्यंभूत माहिती संबंधी कैदी रुग्ण दाखल होताच समितीकडे असणार आहे आणि प्रत्येक कैदी रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याची सुटी होईपर्यंतचे सर्व निर्णय समितीमार्फत एकमुखी घेतले जाणार आहेत.

घाटीमध्ये नेहमीच कैदी रुग्णांना पोलिसांमार्फत दाखल केले जाते आणि कैदी रुग्णांना ठेवण्यासाठी घाटीमध्ये स्वतंत्र वॉर्ड क्रमांक दहा (प्रिझनर्स वॉर्ड) उपलब्ध आहे. मात्र या वॉर्डामध्ये दाखल होणाऱ्या कैदी रुग्णांची इत्यंभूत माहिती एकाच ठिकाणी एकाच वेळी उपलब्ध होईल, अशी स्थिती-परिस्थिती आतापर्यंत नव्हती. या वॉर्डात कोणत्या कैदी रुग्णाने किती दिवस भरती राहावे, या विषयीचे सर्व निर्णय संबंधित उपचार करणारे डॉक्टर घेत होते. अनेकदा कैदी रुग्णांकडून गैरफायदा घेतला जात असे व त्याची इत्यंभूत खबर प्रशासनाला असेलच असे नव्हते. त्यामुळेच कैदी रुग्णांबाबतचे सर्वस्तरीय निर्णय तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीमार्फत विचाराअंती घेतले जावेत व प्रत्येकी कैदी रुग्णाची, त्याच्या आजाराची, निदानाची, उपचारांची व इतर बाबींची एकत्रित माहिती समितीला असावी, या दृष्टीकोनातून ही समिती स्थापन झाली आहे. या समितीचे अध्यक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे हे आहेत व अधीक्षकांच्या अनुपस्थितीत आरएमओ हे काम पाहणार आहेत. न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. कैलास झिने, औषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. जाधव व संबंधित विभागाचे पथकप्रमुख हे या समितीचे सदस्य आहेत.

समितीकडे असतील इत्यंभूत नोंदी

आता रुग्णालयात कैदी रुग्ण दाखल होताच समिती अध्यक्ष असलेल्या अधीक्षकांना कळविणे बंधनकारक असेल. तसेच कैदी रुग्णांच्या केसपेपरवर सर्व प्रकारच्या नोंदी अनिवार्य असतील. ४८ तासांपेक्षा जास्त काळ कैदी रुग्णाला दाखल करण्याची गरज असल्यास समितीच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. कैदी रुग्ण दाखल असताना दर तिसऱ्या दिवशी बैठकीमध्ये संबंधित रुग्णाच्या भरतीच्या आवश्यकतेबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हौसिंग फायनान्स; जाधव विजयी

$
0
0

औरंगाबाद: महाराष्ट्र स्टेट को ऑप हौसिंग फायनान्स कार्पोरेशन लि. मुंबईच्या संचालक पदासाठी रविवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या प्रगती पॅनलने २१ पैकी १७ जागेवर विजय मिळवत दणदणीत आघाडी घेतली. भाजपच्या सहकार पॅनलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. मंगळवारी मुंबई येथे मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत औरंगाबादचे सुनील जाधव यांनी सर्वसाधारण मतदारसंघात १०५ मतांनी विजय मिळवला. बीडच्या जयसिंह पंडित यांनी ८०, नांदेडचे हरिहरराव भोसीकर यांनी ११५, तर हिंगोलीचे दिलीप चव्हाण यांनी ११० मतांनी विजय मिळवला. राखीव मतदार संघातून औरंगाबादचे उत्तमराव शिंदे विजयी झाले. आमदार सुभाष झांबड यांची संचालकपदाची मुदत संपल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते सुनील जाधव यांना त्यांच्या जागी संधी देण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करा

$
0
0

औरंगाबाद : शहरातील खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी औरंगाबादमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करा, अशी मागणी आमदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. औरंगाबादमध्ये साई क्रीडा मंडळासह सिडकोचे क्रिकेट मैदान आणि इतर खेळांची मैदाने आहेत. शहरातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर आपली छाप पाडली आहे. औरंगाबादला विधी विद्यापीठ सुरू करण्यात आले. त्याप्रमाणेच क्रीडा विद्यापीठ स्थापन करावे. त्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थी आणि खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारात आपले भविष्य घडविण्याची संधी मिळे, असे साकडे जलील यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाथमंदिर परिसरात चोरांचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

संत एकनाथ समाधी मंदिर परिसरात चोरट्यांच्या अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी, मंगळसूत्र चोरांनी नाथ मंदिर परिसरातील महिला व्यापाऱ्यांची मंगळसूत्र तोडून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे नाथमंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपासून नाथ मंदिर परिसरातील, दत्त मंदिर, मोक्ष घाट, पितांबर मंगल कार्यालय परिसरात भाविक व वारकऱ्यांना लुटण्याचा अनेक घटना घडल्या आहे. पितांबर मंगल कार्यालय परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या वाहनळातून अनेक मोटारसायकली चोरीला गेल्या आहे. लुटीच्या व मोटरसायकल चोरीच्या घटना घडत असताना नाथममंदिर परिसरात आता मंगळसूत्र चोर अवतरले आहेत. मंगळवारी सकाळी दहाच्या दरम्यान, नाथ मंदिर परिसरातील व्यापारी रत्नमाला बाळूसिंग बुंदिले या दत्त मंदिर परिसरातून दुकानाकडे येत होत्या, त्यावेळी मंगळसूत्र चोरांनी त्यांना काही कळायच्या आत गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र तोडून नेले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर तरुणांनी मंगळसूत्र चोराचा पाठलाग करून पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. वारकरी व पर्यटकांना लुटणाऱ्या चोरांनी आता नाथमंदिर परिसरातील व्यापाऱ्यांना लुटण्यास सुरुवात केल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. नाथ मंदिर परिसरात मंगळसूत्र चोरीची घटना घडल्याची माहिती पसरताच महिला भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मंगळसूत्र चोरी प्रकरणी, पैठण पोलिस तक्रार देण्यात आली आहे, मात्र अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती योगराज बुंदिले यांनी दिली.

\Bसीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीकरण \B

नाथ मंदिर परिसरातील मंगळसूत्र चोरीची घटना या भागातील सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाली आहे. एक मंगळसूत्र चोर रत्नमाला बुंदिले यांचे मंगळसूत्र तोडताना दिसत आहे.

\Bअख्ख्या दिंडीला लुटले\B

चिखली तालुक्यातील ढवळे महाराज यांची दिंडी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जात असताना सोमवारी पैठण मुक्कामी थांबली होती. दिंडीतील वारकरी सोमवारी संध्याकाळी स्नान करण्यासाठी नदीत उतरले असता, अज्ञात चोरट्यांनी सर्व वारकऱ्यांचे कपडे चोरले. कपड्यातील वारकऱ्यांचे जवळपास चाळीस हजार रुपये चोरीला गेल्याची माहिती दिंडीप्रमुख ढवळे यांनी दिली. पोलिसांचा त्रास नको म्हणून तक्रार न करता दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आपेगाव येथून माउलीच्या पालखीचे प्रस्थान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

विठूनामाचा जयघोष व टाळ-मृदंगाच्या गजरात बुधवारी ज्ञानेश्वर माउलीचे जन्मस्थान असणाऱ्या आपेगाव येथून माउलीच्या पालखीने आषाढी वारी महोत्सवात सामील होण्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान केले. ही पालखी अठरा दिवसांच्या पायी प्रवासानंतर २२ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे.

आपेगाव येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या उपस्थितीत मंदिरातील टाळ, मृदंग, वीणा व माउलीच्या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर वारकरी, गावकरी व पंचक्रोशीतील नागरिकांच्या दर्शनासाठी पालखी रथात ठेवण्यात आली. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी ठीक सहा वाजता पालखीने प्रस्थान केले. यावेळी तहसीलदार महेश सावंत, पैठण नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यात बेशरम लाऊन आंदोलन

$
0
0

वाळूज महानगर: वाळूज एमआयडीसीतील मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असून त्याकडे एमआयडीसी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्राम संघटनेतर्फे बुधवारी खड्ड्यात बेशरमाचे झाडे लावून आंदोलन करण्यात आले़ खड्डे बुजवावेत व बंद पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली.

या आदोलनाचे नेतृत्व शिवसंग्रामचे जिल्हाअध्यक्ष अमोल काळे पाटील यांनी केले. मिडास केअर कंपनी समोरील खड्ड्यांमधे बेशरमाची झाडे लावून एमआयडीसी प्रशासनाचा निषेध करण्यात आला. मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत असून त्यात पाणी साचल्यावर अंदाज येत नाही. त्यामुळे रात्रपाळीत कामावर जाणाऱ्या कामगारांचे अपघात होत आहेत. या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी राजेंद्र पवार, धनंजय फिसके, गणेश धोत्रे, अर्जुन तांबेकर, किशोर देशमुख, कृष्णा बोबडे, शिवा पाटील, अनिल भोसले, आशीष पाटोळे, शुभम सरोवर, संतोष राजपूत आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये हजारो शेतकऱ्यांना १० रुपयांच्या आत पीक विमा

$
0
0

बीड :

एकीकडे बीड जिल्ह्यात पिकविम्यापोटी दोनशे पासष्ट कोटी रुपये पीकविमा आल्याच सांगितले जाते आहे .हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे .मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दहा रुपयांच्या आत पीकविमा मंजूर झाला आहे . विशेष म्हणजे नांदूरघाट येथील सहाशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना एक रुपया पीकविमा मंजूर झाला आहे .त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी ही पंतप्रधान पीक विमा योजना म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी ठरली आहे .

बीड जिल्हा हा दुष्काळी ,कमी अनियमित पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो .या कमी पावसामुळे अनेकदा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो आणि शेतकऱ्याच्या उत्पादन घटते . केंद्र सरकारनेअशा कारणामुळे शेती पिकाचे नुकसान झाले तरी शेतकरी मोडून पडू नये म्हणून पंतप्रधान पिकविमा योजना गतवर्षी पासून सुरू केली . मोठा गाजावाजा या योजनेचा करण्यात आला .बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षात सलग दुष्काळी स्थिती होती त्यामुळे पीकविमा भरण्याकडे ऐंशी टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांचा कल होता .गतवर्षी जिल्ह्यात अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा भरावा व अधिकाधिक क्षेत्र विमा संरक्षित व्हावे यासाठी विशेष प्रयत्न झाले.व याचा परिपाक म्हणून बीड जिल्ह्यास पंतप्रधान पीकविमा योजनेच्या अंमलबजावणी साठी देशस्तरावर प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीडच्या जिल्हाधिकाऱयांचा सत्कार करण्यात आला . यावर्षी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे पासष्ट कोटी पीकविमा मंजूर झाल्याच प्रशासकीय पातळीवर सांगण्यात आले .मात्र हे जरी खरे असले तरी त्यापुढे जाऊन या योजनेतील त्रुटी आता समोर येत आहेत .जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत विमा रक्कम भरलेल्या अनेक शेतकऱ्यांना मंजूर झालेली विमा रक्कम पाहता ही योजना म्हणजे काही ठिकाणी शेतकऱ्यांना राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी ठरली आहे . बीड जिल्ह्यातील नांदूरघाट ,अंमळनेर , धामणगाव ,बालेपीर या शाखेतील या शेतकरी सभासदाच्या खात्यावर आलेली रक्कम तुटपुंजी आहे . नांदूरघाट येथील एक हजार पाचशे तीळ पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना बारा लक्ष एकेचाळीस हजार मंजूर झाले आहेत .व यातील सहाशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना केवळ एक रुपया पीकविमा आला आहे .तर एकशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना दोन रुपये मंजूर झाले आहेत . पंचिविस शेतकऱ्यांना तीन रुपये ,बारा शेतकऱ्यांना चार रुपये, सविस शेतकऱ्यांना पाच रुपये ,एका शेतकऱ्याला सहा रुपये ,दोन शेतकऱ्यालाया नऊ रुपये मंजूर झालेत .म्हणजेच नऊशेच्या जवळपास शेतकऱ्यांना दहा रुपयांच्या आत विमा आला आहे . हे रुपये दोन रुपये कसे खात्यात जमा करावेत आणि शेतकऱ्यांनी कसे बँक खात्यातून काढावे हा खरा प्रश्न आहे .तसेच आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील एक हजार चारशेहून अधिक शेतकऱ्यांना दहा रुपयांच्या आत विमा मंजूर झाला आहे .

बालेपीर शाखेतील पाचशे हुन आधीक शेतकऱ्यांना शंभर रुपयांच्या आत विमा मंजूर झाला आहे .तर हजार शेतकऱ्यांना शंभर ते दोनशे रुपयांच्या दरम्यान विमा मंजूर आहे. एकीकडे सरकार कडून या विमा योजनेचा शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत होत असल्याचे गुणगान केले जात असताना हे रुपया दोन रुपये विमा मंजूर करून शेतकऱ्यांची एक प्रकारे चेष्टा करण्याचा प्रकार म्हणावा लागेल. या बाबत शेतकरी नेते राजाभाऊ देशमुख म्हणाले की हे एक दोन रुपये देऊन शेतकऱ्यांची फसवूनक सरकारने केली आहे . या बाबत आपण आवाज उठवू असेही ते म्हणाले .मात्र पीकविमा काढताना उत्पादन आणि उत्पन्न ठरवण्याचे पैसेवारीचे उंबरठा उत्पन्नाचे निकष ब्रिटिशकालीन आहेत .ते विद्यमान स्थितीतील शेतीच्या जमा खर्च उत्पन्न यावरून ठरवणे गरजेचे आहे .तसेच अनेक गावात तालुक्याला बसून शेतीतील पीक पाण्याचे अहवाल पाठवले जातात हे ही यास कारणीभूत आहेत .पीकविमा योजना ही चेष्टा करण्याचे साधन न राहता त्यांच्या अडचणीत मदतीचा हात ठरवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’साठी बुधवारी विशेष सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीसंदर्भात औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (११ जुलै) विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे.

समांतर जलवाहिनीच्या संदर्भात न्यायालयाबाहेर मार्ग काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. जलवाहिनीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात चार जुलै रोजी सुनावणी होती. यावेळी कंपनीतर्फे जलवाहिनीच्या कामाबद्दलचा नवीन प्रस्ताव न्यायालयाला सादर केला. या प्रस्तावाची गुणवत्ता तपासून त्याचा अभिप्राय १३ जुलै रोजी सादर करा, असे आदेश न्यायालयाने आयुक्तांना दिले आहेत. प्रस्तावाच्या गुणवत्तेबद्दलचा अभिप्राय सादर करताना सर्वसाधारण सभेचा त्या प्रस्तावाबद्दलचा निर्णय देखील आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयात सादर करावा, अशी भूमिका महापौरांनी आयुक्तांकडे मांडली. आयुक्तांनी महापौरांकडे प्रस्तावाबद्दल सर्वसाधारण सभेत निवेदन करण्याची परवानगी मागितली होती. केवळ निवेदन करण्यापेक्षा प्रस्तावच सर्वसाधारण सभेत ठेवा, अशी सूचना महापौरांनी आयुक्तांना केली होती. त्यासाठी बुधवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापौरांनी पत्रकारांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिटलाइनच्या सुविधेसाठी जनहित याचिका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहराचा वेगाने होत असलेला विस्तार, डीएमआयसी, वाढते औद्योगिकीकरण आणि वाढती लोकसंख्या, प्रवाशांची मागणी लक्षात घेता, मनमाड आणि नांदेड येथे येऊन थांबणाऱ्या विविध रेल्वे गाड्या औरंगाबादपर्यंत आणण्याकरीता येथे पिटलाइनची सुविधा निर्माण करण्याची विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या प्राथमिक सुनावणीत न्या. रवींद्र बोर्डे आणि न्या. ए. एम. ढवळे यांनी रेल्वेसह अन्य प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे माजी सदस्य मंगेश कपोते यांनी ही जनहित याचिका केली आहे. औरंगाबाद, नगरसोल, करमाड आणि चिकलठाणा यापैकी एका ठिकाणी रेल्वेची पिटलाइन सुरू करण्याचा प्रस्ताव या सल्लागार समितीने वेळोवेळी पारित करून रेल्वे बोर्डाकडे पाठविला होता. याशिवाय मराठवाडा रेल्वे विकास समिती, मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटना आदी संस्था, संघटनांनीही सातत्याने या मागणीकरीता पाठपुरावा केला.

यावर रेल्वेचे वरिष्ठ विभागीय प्रबंधक, नांदेड यांनी तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली. या समितीने प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा उपयोगिता आणि आर्थिक अहवाल तयार केला. यामध्ये औरंगाबाद येथून अधिकच्या गाड्या सुरू करण्याकरता चिकलठाणा येथे पिटलाइन प्रस्तावित करण्यात आली. हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठविण्यात आला. हा प्रस्ताव अतिशय वास्तव दर्शविणारा आणि तज्ज्ञांनी तयार केलेला होता. मात्र, जानेवारी २०१८ मध्ये रेल्वेमंत्र्यांनी खासदारांना एका पत्राद्वारे कळविले की, हा प्रस्ताव व्यवहार्य नसल्याने तो मान्य करता येणार नाही. औरंगाबाद शहराचे औद्योगिक, पर्यटन, शैक्षणिक आणि इतर विविध क्षेत्रातील महत्व तसेच त्याचा वाढता विस्तार आणि सातत्याने वाढत चाललेली लोकसंख्या विचारात घेऊन येथून नवीन रेल्वे सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे म्हणणे मांडण्यात आले. यात नवीन गाडी सुरू करणे आणि जवळच्या जंक्शनवर आलेल्या गाड्या औरंगाबादपर्यंत आणणे असे दोन मार्ग आहेत. अशा गाड्या औरंगाबादपर्यंत आणताना गाड्यांचे वेळापत्रक अजिबात बिघडणार नाही, हा मुद्दा महत्वाचा आहे.

औरंगाबादची गरज लक्षात घेता मुंबईवरून मनमाडपर्यंत येणाऱ्या पंचवटी आणि राज्यराणी या दोन गाड्या मनमाडला बारा तास थांबून असतात. याशिवाय बिहार, राजस्थानकडे जाणाऱ्या श्रीगंगानगर, पाटणा, संत्रा गची या गाड्या नांदेडला १२ तास थांबून असतात. या गाड्यांची क्षमता २४ डब्यांची असताना सध्या १८ डबेच जोडले जातात. औरंगाबादहून प्रवाशांचा प्रचंड ओघ लक्षात घेता, सध्या सुरू असलेल्या गाड्यांचे तीन-चार महिने आधी आरक्षण करावे लागते, अशी परिस्थिती असताना त्या गाड्या औरंगाबादपर्यंत आणल्या जात नाहीत. या गाड्या औरंगाबादला आणल्यास त्यांच्या वेळापत्रकात कोणताही बिघाड होत नाही. गाड्यांची ही उपलब्धता आणि शहर आणि परिसराची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी पिटलाइन सुविधा निर्माण करणे अत्यावश्यक आहे.

रेल्वे बोर्डाने रेल्वे मंत्रालयाकडे पाठविलेला प्रस्ताव अत्यंत योग्य असताना, कोणतेही संयुक्तिक कारण न देता त्याला 'अव्यवहार्य' ठरवून नाकारणे चुकीचे आहे. या प्रस्तावाचा सकारात्मक पुनर्विचार करावा आणि चिकलठाणा येथे पिटलाइन टाकण्यात यावी, अशी विनंती या जनहित याचिकेत करण्यात आली आहे. यात रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाला प्रतिवादी करण्यात आले आहे. अतिरिक्त सॉलिसीटर जनरल संजीव देशपांडे हे रेल्वेतर्फे हजर झाले. याचिकाकर्त्यातर्फे अजित कडेठाणकर हे काम पाहत आहेत. या याचिकेची सुनावणी चार आठवडयांनंतर होणार आहे.

'पिटलाइन' म्हणजे

रेल्वे गाडीची स्वच्छता, तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीसाठी प्लॅटफॉर्म तसेच पाणी आणि देखभाल दुरुस्तीसाठी तज्ज्ञ कर्मचारी या सुविधा निर्माण करणे याला पिटलाइन सुरू करणे म्हणतात. औरंगाबादला (चिकलठाणा) अशी सुविधा निर्माण केल्यास मनमाड, नांदेडपर्यंत येणाऱ्या अनेक गाड्या औरंगाबादपर्यंत येऊ शकतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images