Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गुरुंवर विश्वास ठेवल्याने मनुष्याचा विकास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबाजार येथे आचार्य विशुद्धसागर महाराज ससंघ वास्तव्यास असून त्यांच्या सानिध्यात शुक्रवारी गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शेकडो भाविकांनी यावेळी आचार्यश्रींचे दर्शन घेतले.

सर्व प्रथम सकाळी भगवान शांतीनाथांचा पंचामृत अभिषेक,नित्यनिमय पूजा आदी कार्यक्रम झाले. आचार्यांचे पादप्रक्षालन करण्यात आले. आचार्यश्री मार्गदर्शन करताना म्हणाले, 'गुरुंवर, संतांवर विश्वास ठेवल्याने मनुष्याचा विकास होतो. गुरु व संतच आम्हाला श्रद्धा व भक्तीचा मार्ग दाखवित असतात. त्या करिता गुरुबद्दल आदर व समर्पणाची भावना ठेवा. हाच खरा विकासाचा मार्ग आहे. उपस्थितांना धरमचंद, चांदमल, दीपचंद, प्रकाशचंद, जीवन पाटणी परिवार अंधारीवाले यांच्या वतीने वात्सल्यभोज देण्यात आले. कार्यक्रमासाठी पंचायत व चातुर्मास अध्यक्ष ललित पाटणी, कार्याध्यक्ष विनोद लोहाडे, सचिव अशोक अजमेरा, कोषाध्यक्ष अ‍ॅड. एम. आर. बडजाते, सहसचिव दिलीप कासलीवाल विश्वस्त चांदमल चांदीवाल, भागचंद बिनायके, महावीर पाटणी, किरण पहाडे, डॉ.रमेश बडजाते, नरेंद्र अजमेरा,पियुष कासलीवाल यांनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समाजवादी जनपरिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक

$
0
0

औरंगाबाद : समाजवादी जनपरिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला शुक्रवारपासून रेल्वेस्टेशन रोड वरील टुरिस्ट होमध्ये सुरुवात झाली. या बैठकीत देशातील वर्तमान आर्थिक, समाजिक व राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जात आहे. या बैठकीनिमित्त शनिवारी सायंकाळी पाच वाजता लोकशाही समाजवादी कार्यकर्त्यांचा सद्यस्थितीवर परिसंवाद आयोजित केला आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलकांत बॅनर्जी, संघटन सचिव रणजित राय, महासचिव अफलातून, अतुलकुमार, विक्रम मौर्य, डॉ. स्वाती, शोभनाथसिंह यादव, मकसूद अली, राम केवल चौहान, जगनारायण महतो, निरज सिंह, चंद्रभूषण चौधरी, धरतीधर प्रसाद, शशिकांत, आदित्यनाथ शर्मा, जोशी जेकब, फाग राम यांची उपस्थिती आहे. कार्यकारिणीची बैठक पार पाडण्यासाठी अॅड्. विष्णू ढोबळे हे परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्याण मटका चालवणारे दोघे जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोबाइलवर ऑनलाइन कल्याण मटका जुगार चालवणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शहागंज बसस्टँडसमोर शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहागंज बसस्टँडसमोर दोन तरुण गेल्या काही दिवसापासून मोबाइलवर कल्याण मटका जुगाराचे आकडे घेऊन जुगार चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने सापळा रचला होता. यावेळी जुगार चालवणारे संशयित आरोपी इम्रान खान कासीम खान (वय ३३ रा. संजयनगर, बायजीपुरा) आणि अफरोज खान सैजाद खान (वय ४३, रा. बारी कॉलनी, किराडपुरा) यांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून रोख बाराशे रुपये व दोन मोबाइल हँडसेट जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मधुकर सावंत, पीएसआय विजय जाधव, नसीम पठाण, समद पठाण, सुरेश काळवणे, दत्तात्रय गाढेकर, भावसिंग चव्हाण, संदिप बिडकर, विरेश बने व शेख बाबर यांनी केली.

\Bकल्याण मटका झाला हायटेक

\Bकल्याण मटका हा चिठ्यावर आकडे लिहून खेळल्या जाणारा जुगार आहे. यापुर्वीच्या कारवाईमध्ये चिठ्या जप्त करण्यात येत होत्या. या दोन आरोपींनी मात्र मोबाइलवरच आकडे मॅसेजद्वारे घेण्यास सुरूवात केली होती. आकडा व त्यावर लावलेली रक्कम पाठवल्यास आरोपी त्यांना यस म्हणून मॅसेज पाठवत होते. यानंतर हा आकडा लागल्याचे गृहीत धरल्या जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधामोहन कॉलनीत माकडांचा धुमाकुळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोकाट कुत्र्यांमुळे आधीच हैराण असलेल्या बापुनगर, राधामोहन कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून माकडांच्या टोळक्याने उच्छाद मांडला आहे. एका महिलेवर माकडाने हल्ला केल्याने भीतीचे वातावरण असून माकडांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने वन विभागाकडे केली आहे.

राधामोहन कॉलनी परिसरात मध्यभागी उद्यान असून येथे सकाळ, सायंकाळ नागरिकांची मुलांसह गर्दी होते. मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना आता माकडांनी हैराण केले आहे. काही महिन्यात उद्यानात अधून मधून माकडांचे दर्शन होत होते. परंतु, गुरुवारी माकडाने चंदाताई आराक यांच्यावर हल्ला चढवत जखमी केले. या प्रकारात त्यांची सोनसाखळी तुटून आर्थिक फटका बसला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली असून माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी भाकपने वन विभागात दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनावर जिल्हा सहसचिव अॅड्. अभय टाकसाळ, शाखा सेक्रेटरी मनीषा भोळे, अनिता हिवराळे, अॅड्. अय्यास शेख, संग्राम कोरडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेणुकामाता मंदिरात गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा परिसरातील रेणुकामाता मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त भव्य मंडप उभारण्यात आला होता. प. पू. अप्पा महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. दुपारी विशेष गर्दी झाली. प्रवचन, आरती, महाप्रसाद, नामजप या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातील भाविकांनी गुरू दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. पहाटे सुरू झालेला सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यानिमित्त स्वयंसेवकांनी परिसरात विशेष व्यवस्था ठेवली होती. गुरुपौर्णिमेची गर्दी लक्षात घेऊन लहान-मोठ्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनगरांच्या प्रवर्ग बदलासाठी शंभर दिवसांची मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, यासंदर्भात येत्या शंभर दिवसांत निर्णय घ्यावा. अन्यथा राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने तीव्र आंदोलने पुकारले जाईल, असा इशारा धनगर समाजाचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. यासंदर्भात पुणे येथील बालगंर्धव सभागृहात एक ऑगस्ट रोजी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सामाजिक नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर(सोलापूर) यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. पोलिस बॉइज संघटनेचे रवी वैद्य, जनक्रांती संघाचे अध्यक्ष डॉ. संदीप घुगरे, नगरसेवक जनार्धन कांबळे, रासपचे राज्य कार्यकारणी सदस्य मोहन जानकर, जगदीश वीर, अरुण सागर, उदय जऱ्हाड उपस्थित होते.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पडळकर म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी शासनाला शंभर दिवसांची मुदत देण्यात येत आहे. शासनाने महाराष्ट्रातील 'धनगड' हेच 'धनगर' आहेत हे सिद्ध करून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र द्यावे. राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातून माहिती घेतल्यानंतर 'धनगड' जमातीबाबत विसंगत माहिती उपलब्ध झाली आहे. त्यात समाविष्ट लोकांचे पत्ते शासनाने द्यावेत. ते खोटे आढळल्यास आमचे आरक्षण दुरुस्त करून घ्यावे. आमच्या विरुद्ध धनगड समाजाने उठाव करणे अपेक्षित होते. परंतु, आदिवासींना फुस देण्यात येत आहे. आमचा आणि आदिवासी बांधवांचा संबंध येत नसून धनगड जमातीबाबत शासन दप्तरी चुकीची माहिती आहे, असा दावा त्यांनी केला.

उत्तमराव जानकर म्हणाले, महाराष्ट्रातील धनगर समाज हा शासनाच्या यादीत धनगड आहे. महाराष्ट्रात धनगर हेच धनगड आहेत. त्यामुळे शासनाने टोलवाटोलवी न करता तत्काळ एसटी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र द्यायला हवे. आम्ही पुराव्यानिशी शासनाकडे जात आहोत. तरीही शासनाने लक्ष न दिल्यास आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा जानकर यांनी दिला. येत्या निवडणुकीपूर्वी राज्यातील नव्हे तर देशातील समाज या लढ्यात सहभागी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस - सतीष वडस्कर, उप वनसंरक्षक

गुरुंच्या साक्षीने ‘जेरियाट्रिक्स’ सेवेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत आणि गुरुंचे गुरू अशी वैद्यकीय क्षेत्रात प्रतिमा असलेले ज्येष्ठ व नामांकित चिकित्सक डॉ. आर. बी. भागवत यांच्या साक्षीने व सानिध्यात घाटीच्या वार्धक्यशास्त्र (जेरियाट्रिक्स) विभागाच्या वॉर्डाचे शुक्रवारी (२७ जुलै) लोकार्पण झाले. यानिमित्ताने ३० खाटांचा स्वतंत्र वॉर्ड ज्येष्ठ रुग्णांसाठी सेवेत दाखल झालाच; शिवाय याच वर्षापासून याच विषयातील 'एमडी' हा पदव्युत्तर अभ्यासक्रमदेखील महाराष्ट्रात पहिल्यांदा घाटीमध्ये सुरू झाला. या प्रसंगी, विभागाला सदिच्छा देत कार्डिओलॉजी, प्लास्टिक सर्जरी, नेफ्रॉलॉजी आदी सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रम व या धर्तीवरील दर्जेदार सेवा-सुविधाही गोरगरीब रुग्णांना आता घाटीत मिळाव्यात, अशी सूचनाही मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष व मराठवाड्यातील पहिले बालरोग शल्यचिकित्सक डॉ. भागवत कराड यांनी केली.

या लोकार्पण सोहळ्याला अभ्यागत समितीचे अध्यक्ष आमदार अतुल सावे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, वार्धक्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर, औषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आदींची उपस्थिती होती. या वेळी, विविध कामांचा पाठपुरावा करण्यात येत असून, लवकरच ड्रेनेजलाईन, कंपाऊंड वॉल, अंतर्गत रस्ते आदी कामांसाठीचा निधीदेखील लवकरच उपलब्ध होईल, असे आमदार सावे म्हणाले. डॉ. बोरकर म्हणाल्या, ज्येष्ठ रुग्णांच्या आहार-विहारासह वेगवेगळ्या तात्कालिक तसेच दीर्घकालीन व्याधींवरही विभागात उपचार होणार आहेत. ज्येष्ठांमधील नैराश्यावर उपचारांबरोबरच समुपदेशनही केले जाणार आहे. 'एमडी-जेरियाट्रिक्स' हा देशातील तिसरा अभ्यासक्रम घाटीत सुरू करण्यासाठी सर्वांचेच हात लागले आहेत, असेही डॉ. बोरकर म्हणाल्या. या विशेष विभागामुळे व विभागासाठी डॉ. बोरकरांनी उपसलेल्या अनंत कष्टांमुळे घाटीचे नाव आणखी उंचावले गेले, अशा शब्दांत कौतुक व अभिनंदन करीत डॉ. ये‍ळीकर यांनी डॉ. बोरकर यांना विशेष भेटवस्तू देत त्यांचा गौरव केला.

\Bअनेक शाखा-उपशाखा येणार\B

मानवाचे सरासरी आयुर्मान वाढत असल्यानेच यापुढील काळात वार्धक्यशास्त्राची मोठी गरज राहणार आहे. त्यामुळेच या शाखेमध्ये भविष्यात अनेक शाखा-उपशाखा विकसित होतील आणि त्याची सुरुवात या विभागाने झाली आहे, असे मत डॉ. आर. बी. भागवत यांनी व्यक्त केले. याच कार्यक्रमात डॉ. आर. बी. भागवत यांचा जाहीर सत्कार करण्यात आलाच; शिवाय कार्यक्रमस्थळी बहुतेक डॉक्टर मंडळी त्यांना वाकून नमस्कार करताना, पाया पडताना व आर्शिवाद घेताना दिसून येत होते व वयाची ८४-८५ वर्षे पार केलेले डॉ. भागवत हे सर्वांशीच आस्थेने बोलताना दिसून येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसटी चालक, वाहकांसाठी आता स्वस्तात पोळी-भाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एसटी महामंडळाना उत्कृष्ट व नाममात्र दरात भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बसस्थानकावर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दोन पोळीभाजी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक व सिडको बसस्थानकात करण्यात आले. या केंद्रात २५ रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अनेक वेळा चालक व वाहकांना बाहेर हॉटेलमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण घ्यावे लागते. या चालक वाहकांना चांगल्या दर्जाचे जेवण नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी प्रयत्न सुरू केले होते. यासंदर्भात एका सेवाभावी संस्थेसोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी पुढाकार दर्शवला. हे जेवण २५ रुपये दरात देण्याचे ठरवण्यात आले.

मध्यवर्ती बसस्थानकात विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांच्या हस्ते, तर सिडको बसस्थानकात उपमहाव्यवस्थापक एम. बी. पठारे यांच्या हस्ते केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. औरंगाबाद विभागातील पैठण, सिल्लोड, कन्नड, गंगापूर, वैजापूर, सोयगाव या सर्वच आगारात पोळी-भाजी केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. या उद्‌घाटन कार्यक्रमाला आगार व्यवस्थापक अमोल भुसारी, सिडकोचे आगार व्यवस्थापक पी. पी. देशमुख, कामागार अधिकारी जी. एल. गवारे, वाहतूक अधीक्षक यू. जे. पाटील, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी ए. एल. घोडके, किशोर बत्तीशे, कृष्णा मूंजाळ, दिपक बागलाने यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांनी मागण्यांबाबत स्पष्‍टीकरण द्यावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

राज्यात गेल्या दहा दिवसांपासून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू असून या दरम्यान मराठा बांधवांना जीवही गमवावा लागला. आता मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करावी तसेच मागण्यांबाबत वेळ निर्धारित करून कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी मराठा क्रांतीमोर्चा समन्वय समितीने केली आहे. समन्वय समितीने दिलेल्या निवेदनात आम्हाला आता मध्यस्थांची गरज नाही, असेही म्हटले आहे. आतापर्यंत ५८ मोर्चे काढले, उपसमितीसोबतही वारंवार चर्चा केली मात्र त्याबाबत ठोस कृती करुन निर्णय घेतला नाही त्यामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. सुरु असलेल्या हिंसक आंदोलनामध्ये बाहेरचे काही समाजकंटक जबाबदार आहेत, पोलिस प्रशासन मात्र मराठा बांधवांना आकसापोटी टार्गेट करत असून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदवत आहेत. हे गुन्हे त्वरित मागे घ्यावे असेही मराठा क्रांती मोर्चाच्या वतिने काढण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिकेट मैदान परिसरातील झाडांवर कुऱ्हाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन २ एडीसीएच्या किक्रेट मैदान परिसरातील काही वृक्षांच्या फांद्या माहिती न देता शुक्रवारी तोडण्यात आला. यासाठी स्थानिक नगरसेविकेच्या पतीने पुढाकार घेतल्याचे उघड झाले आहे. फांद्या तोडण्यापूर्वी क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना साधी विचारणाही करण्यात आली नाही. हा प्रकार धक्कादायक असून यामुळे प्राणांकित यातना झाल्याचे क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

एकीकडे शासन वृक्ष लागवडीसाठी आटापिटा करत असताना सिडको एन २ परिसरातील काही झाडांवर शुक्रवारी कुऱ्हाड चावण्यात आली. विशेष म्हणजे क्रिकेट मैदान परिसरातील हे वृक्ष २० ते २५ वर्ष जुने असून आहेत. नगरसेविका सत्यभामा शिंदे यांचे पती दामुअण्णा शिंदे यांच्या देखरेखीखाली हे काम झाल्याचे समजते. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एका निवासी इमारतीसमोर असलेल्या वृक्षाच्या वरून उच्चदाब विद्युत वाहिनी जाते. तिच्या तारांचा स्पर्श फांद्याना होत असल्याने घर्षण होऊन अनेकदा वीजप्रवाह खंडीत होत होता. यामुळे अपघाताची शक्यता असल्याने काही फांद्या तोडण्यात आला. यावेळी विद्युत विभागाचे पथक सोबत होते. त्यांनी आवश्यक परवानगी घेतली आहे, असा दावा दामुअण्णा शिंदे यांनी केला.

दरम्यान, क्रिकेट मैदान परिसरातील झांडामुळे काय अडथळा येतो, असी विचारणा केली असता शिंदे यांनी झाड पूर्ण तोडण्यास आपला नेहमीच विरोधच आहे. परंतु, येथील झाडांच्या काही फांद्या बाहेर रस्त्यावर आल्या आहेत. फांद्याच्या अडथळ्यामुळे पथदिव्याचा प्रकाश अडतो. झाडांखाली अवैध धंदे चालतात, लोक घाण करतात, त्यामुळे काही फांद्या छाटल्या, असे ते म्हणाले.

\Bविश्वासात न घेता चालविली कुऱ्हाड\B

जिल्हा क्रिकेट संघटनेकडे विचारणा न करताच संबंधितांनी मैदान परिसरातील वृक्षावर कुऱ्हाड चालवली, असा आरोप संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे यांनी 'मटा'शी बोलताना केला. मैदान परिसरात लावलेली झाडे ही झाडे २० ते २५ वर्षे जुनी आहेत. त्यांची चांगली सावली पडते, त्यामुळे इतरांना त्रास होण्याचा प्रश्न नाही. वृक्षावर कुऱ्हाडीचे घाव घातल्याने प्राणांकित यातना झाल्याचे सांगत मुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, उद्यान अधिक्षक विजय पाटील यांनी उच्चदाबाच्या विद्युत तारांना अडथळा करणाऱ्या फांद्या विद्युत विभागाच्या पथकाने तोडल्या, अशी माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी मदत तिजोरीत बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासनाने मराठवाड्याला दिलेल्या दुसऱ्या टप्प्यांतील ४०७ कोटी रुपयांच्या अनुदानाचे वाटप सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत यातील १७२ कोटी रुपये (३५ टक्के) अनुदानाचे वाटप पूर्ण झाले आहे. ऐन पेरण्यांच्या वेळी बोंडअळी बाधितांना अनुदान वाटपाने दिलासा मिळाला असला, तरी तब्बल दोन वर्षांनंतर मराठवाड्यातील आठ लाख शेतकऱ्यांना मिळालेले ४९९ कोटी रुपयांची नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई अद्याप पडून आहे.

मराठवाड्यातील तब्बल २६ लाख ९० हजार शेतकऱ्यांना १२२१ कोटी चार लाख रुपयांची आवश्यकता आहे, तीन टप्प्यांत देण्यात येणाऱ्या या मदतीचा ३२५ कोटी ६० लाखांचा पहिला हप्‍ता वाटप करण्यात आल्यानंतर आता ४०७ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात आला आहे, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बोंडअळीच्या नुकसानभरपाईचे वाटप सुरू आहे, आठ दिवसांमध्ये यातील १७२ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यांतील सर्वाधिक ७५ टक्‍के नुकसान भरपाईचे वाटप बीड जिल्ह्यात झाले आहे. जालना जिल्हा पिछाडीवर असून, तेथे केवळ चार टक्के वाटप करण्यात आले आहे.

बोंडअळीबाधितांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदानवाटपाची स्थिती

जिल्हा.................... शेतकरी संख्या................ रक्कम....................टक्केवारी

औरंगाबाद...................४१३७५....................९ कोटी ७३ लाख..........८.२१

जालना......................८३८८.....................४ कोटी ७५ लाख............४.३२

परभणी......................४३१३५...................२२ कोटी ७२ लाख..........३५.९६

हिंगोली......................१४५३५...................५ कोटी ९६ लाख..............४०.७४

नांदेड........................११२७५९................४८ कोटी ९१ लाख..............६९.४३

बीड............................१८९५३१.............७७ कोटी ९० लाख...............७५.९०

लातूर........................१३७३..................४१ लाख ९४ हजार...............१२.१९

उस्मानाबाद..................४७५३................१ कोटी ७० लाख................३१.६५

एकूण........................४१५९४९............१७२ कोटी १२ लाख...............३५.२४ टक्के

अतिवृष्टीची नुकसानभरपाई पडून

तब्बल दोन वर्षांनंतर मराठवाड्यातील आठ लाख ९५ हजार अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी ४९९ कोटी १८ लाख रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झाली असली तरी आठवड्याभरानंतरही हे अनुदान तिजोरीत पडून आहे. नेहमीच दुष्काळाचे सावट असलेल्या मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना २०१६मध्ये एप्रिल, मे, जून ते ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांमध्ये अतिवृष्टीने झोडपले होते.

अतिवृष्टीची भरपाई

जिल्हा.......................... शेतकरी ......................रक्कम

औरंगाबाद........................२०१९.......................५१ हजार

परभणी..............................३३५७.....................५ लाख ३५ हजार

हिंगोली..............................७९३४....................१ कोटी २७ लाख

नांदेड.................................४९३९३९...............२६१ कोटी ९५ लाख

बीड.................................१७८०१७................६८ कोटी १५ लाख

लातूर...............................९००२३...................५५ कोटी २१ लाख

उस्मानाबाद..........................१२०६४०..............११२ कोटी ६ लाख

एकूण...............................८९५९२९.................४९९ कोटी १८ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडेखोरांना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोलवडी परिसरातील उद्योगपतीच्या बंगल्यावर तैनात दोन सुरक्षा रक्षक व एका स्वयंपाकीला डांबून बंगल्यातील २५ लाखांचा ऐवज चोरणाऱ्या तीन दरोडेखोरांना प्रत्येकी दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी २६ हजार रुपये दंडाची शिक्षा मोक्काचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी शुक्रवारी (२७ जुलै) ठोठावली.

याप्रकरणी ज्या बंगल्यावर दरोडा घालण्यात आला त्या बंगाल्याशेजारी राहणारे गिरीधर वैजनाथ संगोनेरिया यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, उद्योगपती प्रवीण लक्ष्मीकांत तुलसियान हे आपल्या कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. त्यांच्या बंगल्यावर दोन वॉचमन व एक स्वंयपाकी होता. ३० मे २०१५ रोजी मध्यरात्री सुरक्षा रक्षक संजय वाघ व भीमराव दिवेकर हे बंगल्यातील कंपाउंडमधील कॅबिनमध्ये असताना त्यांना कंपाउंडवरून उड्या मारून पाच ते सहाजण आतमध्ये आल्याचे दिसले. त्या दरोडेखोरांनी केबिनमध्ये असलेल्या संजय यांना चाकुचा धाक दाखवून चाव्या मागितल्या. त्याचवेळी भीमराव दिवेकर हेदेखील कॅबिनकडे आल्यामुळे दरोडेखोरांनी त्या दोघांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्याजवळील मोबाइल हिसकावून घेतला. सुरक्षा रक्षकाला सोबत घेत बंगल्यातील स्वयंपाकघरामध्ये झोपलेल्या राजकुमार रॉयला दरवाजा उघडण्यास सांगितले. रॉयने स्वयंपाकघराचा दरवाजा उघडल्यानंतर त्या दरोडेखोरांनी तिघांना एका खोलीत डांबून ठेवले व त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी तीन दरोडेखोर तिथेच थांबले, तर उर्वरित दरोडेखोरांनी बंगल्यामध्ये ऐवजाची शोधाशोध सुरू केली. दरोडेखोरांनी कपाट उचकटून कपाटातील रोख चार लाख रुपये व २० लाख रुपये किंâमतीचे सोन्याचे दागिने व मौल्यवान वस्तू असा २५ लाखांचा ऐवज चोरून नेला. या दरोड्याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादीने सातारा पोलिस ठाण्यात दरोडाची माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरुन सातारा पोलिस ठाण्यामध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास करुन सहा जणांना अटक केली होती. संबंधित प्रकरण संघटित गुन्हेगिरीचे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम कलमान्वे (मोक्का) गुन्हा दाखल झाला होता.

\Bतिघांना प्रत्येकी २६ हजारांचा दंड

\Bखटल्यावेळी, विशेष सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी १६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये वॉचमन, सोन्याचे व्यापारी व फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपी अजय रमेश वाहूळ (२०, रा. एकता कॉलनी, सातारा), स्वप्नील उर्फâ गोलू सुभाष मिसाळ (२०, महापालिका कॉलनी) व अरुण बाबुराव शिनगारे (२२, रा. मिलिंदनगर) या तिघा आरोपींना भारतीय दंड संहितेच्या ३९२, ३९५ व ३९७ कलमान्वे प्रत्येकी दहा वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन वर्षे सक्तमजुरी, तर भारतीय दंड संहितेच्या ३४२ कलमान्वे प्रत्येकी एक वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सुनावणीदरम्यान दरोडेखोरांचा म्होरक्या विठ्ठल शिवाजी वाघमारे (४०, रा. रेणुकानगर) याचा मृत्यू झाला. विनोद चाबुकस्वार व संतोष खरे या आरोपींना सबळ पुराव्याअभावी कोर्टाने निर्दोष मुक्त केले. त्याचवेळी मोक्काच्या गुन्ह्यातूनही आरोपींना मुक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रल्हाद महाराज उपासना मंडळातर्फे पादुका पूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रल्हाद महाराज उपासना मंडळाच्या वतीने शुक्रवारी सिडको एन सहा येथील कुलस्वामिनी मंगल कार्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात पार पडला. गुरुवारी सायंकाळी साखरखेर्डा संस्थान येथून श्री प्रल्हाद महाराजांच्या पादुकांचे कार्यालयात आगमन झाले.

गुरुवारी सायंकाळी उपासना, महाआरती व नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यानंतर शेजआरतीने पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शुक्रवारी पहाटे पाच वाजता काकडा आरतीने उत्सवाला सुरुवात झाली. नंतर अभिषेक, पाद्यपूजा, नामजप प्रवचन आदी कार्यक्रम घेण्यात आले. यानंतर महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गुरुपौर्णिमा उत्सवाला शहरातील शिष्य परिवाराने मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रल्हाद महाराज उपासना मंडळाने या उत्सवाचे आयोजन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवनीत फाउंडेशनची कार्यशाळा

$
0
0

औरंगाबाद: नवनीत फाउंडेशनच्या वतीने 'इंग्लीश रिसोर्स पर्सन्स' प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शिवाजीनगर येथील पोस्टर डेव्हलपमेंट प्राथमिक शाळेत शनिवारी दुपारी साडेबारा वाजता हा उपक्रम होईल. यावेळी डॉ. उमेश प्रधान, अखिल भोसले आणि साहेबराव महाजन मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहसंचालक कार्यालयासमोर फार्मडी विद्यार्थ्यांची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शैक्षणिक सुविधा मिळाव्यात आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवावे या मागणीसाठी 'फार्मडी'च्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली. गेल्या शुक्रवारी (२० जुलै) या विद्यार्थ्यांनी याच मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

शासनाने २०११-१२ या वर्षापासून 'फार्मडी'चा अभ्यासक्रम औरंगाबादला औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात सुरू केला आहे, परंतु अद्यापही या अभ्यासक्रमासाठी अनुभवी शिक्षक नियुक्त करण्यात आले नाहीत. तासिका तत्वावरील शिक्षकांच्या माध्यमातून वर्ग घेतले जातात. त्यामुळे अनुभवी कायमस्वरुपी शिक्षकांची नियुक्ती करा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. 'क्लिनिकल फार्मासिस्ट' हे पद निर्माण करून त्यावर अनुभवी व्यक्तीची नियुक्ती करावी. 'फार्मड'च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू करावी, मासिक भत्ता देण्यात यावा, रुग्णालयामध्ये क्लिनीकल फार्मासिस्ट विभाग सुरू करावा अशी मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली आहे. यासर्व मागण्यांसाठी सहसंचालक कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली. आतापर्यंत मुख्यमंत्री, तंत्रशिक्षण मंत्री यांना; तसेच प्रशासनच्या स्तरावर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली, पत्रव्यवहार केला, पण कुणीच अद्याप मागण्यांची दखल घेतली नाही, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातन संस्थेतर्फे गुरुपौर्णिमा साजरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीतर्फे शुक्रवारी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजीनगरातील वाणी मंगल कार्यालयात उत्सवाच्या निमित्ताने दिवसभर कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

व्यासपूजा आणि संत भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून गरूपौर्णिमा महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 'हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी चालू असलेले हिंदुसंघटनांचे कार्य' या विषयावर लघुपट दाखवण्यात आला. समाज, राष्ट्र आणि धर्म यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचे प्रवचन देखील यावेळी झाले. यात सुरेश कुलकर्णी, छाया देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. समाजाच्या सहाय्यासाठी प्रथमोपचार प्रात्यक्षिके कल्पना देशपांडे यांनी करून दाखवली. स्वसंरक्षणासाठीची प्रात्यक्षिके शशांक देशपांडे यांनी करून दाखवली व उपस्थितांना मार्गदर्शन केले. अमोल वानखेडे यांनी त्यांना सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहिंसक मार्गानेच लढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लाखोंच्या समुदायांचे ५८ मोर्चे काढून मराठा समाजाने जगासमोर नवा इतिहास ठेवला आहे. समाजाचे आंदोलन आपल्या न्याय्य हक्कांसाठी असून ते सनदशीर मार्गानेच करावे, असे आवाहन मान्यवर साहित्यिकांनी केले आहे. तरूण कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या आवाहनात महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उसळलेल्या आंदोलनांनी राज्य ढवळून निघाले आहे. काही ठिकाणी हिंसक वळण लागले. या पार्श्वभूमीवर हे आवाहन ज्येष्ठ साहित्यिकांनी केले आहे. विशेषत: ग्रामीण भागाचे जीवन साहित्यात प्रत्ययकारी पद्धतीने मांडलेल्या साहित्यिकांचा या मान्यवरात समावेश आहे. पेरा आणि खा हा संदेश शेतीत रात्रंदिवस राबून शेतकरी समाज जगाला देतो. श्रमात आणि सामर्थ्यात कधीच कमी पडता कामा नये, अशी शिकवण राजा शिवछत्रपतींनी आपणाला दिली आहे. शाहू, फुले, आंबेडकर अशी समृद्ध परंपरा आपल्या पाठिशी आहे. सामाजिक समतेचा पुरस्कार करून विवेकशील वर्तनाचा वारसा चालवणारा हा समाज आपल्या प्रश्नांमुळे विलक्षण अस्वस्थ आहे. शांततामय मार्गाने लाखोंचे मोर्चे काढूनही प्रश्न सुटत नाहीत. या जाणिवेने मराठा समाजातील तरूण आत्मघातासारखी टोकाची भूमिका घेत आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आत्मघात करून प्रश्न सुटत नसतात. लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही प्रश्न सुटलेले नाहीत. लढू आणि जिंकू हा आपला निर्धार असायला हवा. यापुढेही आपण हक्कांसाठी सनदशीर मार्गाने समविचारी बांधवांना सोबत घेऊन लढणार आहोत. तरूण मित्रांनी आत्मघातासारख्या मार्गाचा अवलंब करू नये, अशी कळकळीची विनंती साहित्यिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, बाबा भांड, द. ता. भोसले, विठ्ठल वाघ, भास्कर चंदनशिव, श्रीकांत देशमुख, जगदीश कदम, भारत काळे, दगडू लोमटे, महेंद्र कदम, सदानंद देशमुख, गोविंद काजरेकर, प्रदीप पाटील, अजय कांडर व शंभु पाटील यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकीवर ‘ठोक’ थरार !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षण आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढलेल्या आंदोलकांनी प्रशासनाची तारांबळ उडवली. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने विनंती करूनही आंदोलक खाली उतरले नाहीत. अखेर लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सायंकाळी उशिरा आंदोलकांनी माघार घेतली. या थरार नाट्यामुळे पुंडलिकनगर परिसरात गर्दी झाली.

शहरात मराठा आरक्षण आंदोलनांची धग कायम आहे. ठिकठिकाणी विविध मार्गांनी आंदोलक आरक्षणाची मागणी करीत रस्त्यावर उतरत आहेत. मराठा आरक्षण आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी आठ ते दहा तरुण कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी दीड वाजता हनुमाननगर येथील पाण्याच्या टाकीवर आंदोलन केले. झेंडा हाती घेतलेल्या या तरुणांनी जोरदार निदर्शने केली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिस टाकीवर चढण्याचा प्रयत्न करीत असताना आंदोलकांनी उडी मारण्याचा इशारा दिला. त्यामुळे पोलिसांनी खाली थांबून आंदोलक खाली उतरण्याची वाट पाहिली. काही कार्यकर्त्यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनावर ठाम असलेले कार्यकर्ते टाकीवर ठाण मांडून बसले. अखेरीस जिल्हा प्रशासनाने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलक खाली उतरले. थरार नाट्यामुळे परिसरात बघ्यांची गर्दी झाली.


आमदार जाधवांची शिष्टाई

आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सायंकाळी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर जाधव यांनी संवाद साधला. मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार आहेत असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, असे जाधव यांनी सांगितले. फुटेजमधील कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाणार नाही असे जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी आंदोलकांची गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मसाप’चे पुरस्कार वितरण आज

$
0
0

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या वाड्मय पुरस्कार रविवारी विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत. मसापच्या नांदापूरकर सभागृहात सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम होईल. समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येईल. यंदा पुरस्कारप्राप्त लेखकात डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (लक्षणीय असे काही), प्रसाद कुमठेकर (बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या), डॉ. कैलास इंगळे (वाड्मयीन मराठवाडा), डॉ. पी. विठ्ठल (शून्य एक मी), प्रा. कृष्णात खोत (रिंगाण), राजीव नाईक (लागलेली नाटकं) यांच्यासह पुस्तक व्यवहारातील लक्षणीय कामगिरीसाठी निर्मलकुमार सूर्यवंशी यांचा समावेश आहे. यावेळी प्रा. शेषराव मोहिते व डॉ. जयद्रथ जाधव पुरस्कार विजेत्यांच्या ग्रंथावर बोलणार आहेत. रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कौतिकराव ठाले पाटील, डॉ. दादा गोरे, किरण सगर, देविदास कुलकर्णी व रामचंद्र काळुंखे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images