Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

Maharashtra Bandh:शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला धक्काबुक्की

$
0
0

औरंगाबाद :

मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान राजकीय नेत्यांना काही ठिकाणी आंदोलकांचा रोष सहन करावा लागला. औरंगाबादेत आंदोलक व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात धक्काबुक्की झाली. पोलिसांनी दोन्ही गटांना रोखत दानवे यांना आंदोलनाचे ठिकाण सोडण्यास सांगितले. आंदोलक संतप्त झाल्यामुळे काही वेळ तणाव वाढला होता.

मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मराठवाड्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बाजारपेठा, वाहतूक, शाळा-महाविद्यालये पूर्णत: बंद होती. चौका-चौकात आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. काही ठिकाणी राजकीय नेत्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. क्रांती चौकात हजारो आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. घोषणाबाजी करीत आंदोलकांनी आरक्षणाची मागणी केली. या मागणीसाठी आंदोलकांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा देत असताना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी विरोध केला. त्यामुळे आंदोलक आणि दानवे यांच्यात वाद झाला. ‘या आंदोलनात तुम्ही समाजाचे म्हणून सहभागी झालात की पक्षाचे’ असा सवाल तरुण कार्यकर्त्यांनी केला. या वादात दानवे यांचे कार्यकर्ते आणि आंदोलकात धक्काबुक्की झाली. पोलिस उपायुक्त दिपाली धाटे-घाडगे यांनी मध्यस्थी करीत वाद मिटवला. तसेच दानवे यांना आंदोलनाचे ठिकाण सोडण्यास सांगितले. दानवे यांच्यावर संतापलेल्या आंदोलकांनी दानवे आणि शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.

दरम्यान, जिल्हाप्रमुख दानवे यांनी दुसऱ्या ठिकाणी बसून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मज्जाव केल्याने अखेर दानवे कार्यकर्त्यांसह निघून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


maharashtra bandh: औरंगाबादमध्ये कडकडीत बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला शहर व जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने बंदची हाक दिली होती. शहराला जोडणारे जिल्ह्यातील जवळपास सर्वच रस्ते आंदोलकांनी बंद केल्यामुळे वाहतूकही ठप्प झाली. बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, खाजगी कंपन्यांमधील कामकाजही बंद ठेवण्यात आले होते. आंदोलनाचे केंद्र असलेल्या क्रांती चौकात सकाळपासून मराठा समाजातील नागरिकांनी गर्दी करुन आरक्षणाच्या मागणीसाठी गगनभेदी घोषणा दिल्या.

समन्वय समितीने राज्यव्यापी बंद जाहीर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले होते, शिवाय रस्त्यावरुन एकही एसटीबस न धावल्यामुळे बंदचा मोठा परिणाम जाणवला. सकाळपासून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आपापल्या भागामध्ये रस्त्यावर उतरुन रस्ता बंद केला. बंदची हाक देण्यात आली असल्यामुळे टीव्ही सेंटर, सिडको कॅनॉट, एन ९, एन ११, बजरंग चौक, चिश्चिया कॉलनी, जयभवानी नगर, जाधववाडी, पुंडलिकनगर, गारखेडा परिसर, गुलमंडी, निरालाबाजार, जुनाबाजार, टिळकपथ, पैठणगेट, मछलीखडक, उस्मानपुरा, क्रांती चौक, चिकलठाणा, सराफा बाजार, मुकुंदवाडी, रेल्वे स्टेशन, पद्मपुरा, बाबा पेट्रोल पंप परिसरासह शहरातील बहुतांश व्यापारी पेठांमधील दुकाने बंद होती. बहुतांश व्यापाऱ्यानी दुकाने बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच शुकशुकाट होता. शहरातील सिडको चौक, मुकूंदवाडी, चिकलठाणा, सिडको चौक, सेव्हन हिल्स, आकाशवाणी चौक, सुतगिरणी, उल्कानगरी, शाहनुरमियॉ दर्गा, पुंडलीकनगर, गारखेडा चौक, महावीर चौक, केंब्रीज चौक, झाल्टा फाटा, टीव्ही सेंटर चौक, एसबीओए चौक, हर्सूल टी पॉइंट या शहरातील बहुतांश महत्वाच्या चौकात मराठा समाजाने रस्त्यावर उतरुन ठिय्या आंदोनल केले व वाहतुक पूर्णपणे बंद केली.

जिल्ह्याभर रस्ता रोको, महामार्गांवरील वाहतूक ठप्प

जालना, जळगाव, सोलापूर, पुणे, नाशिक या भागातून शहरात येणाऱ्या वाहतुकीवरही बंदचा परिणाम झाला. शहरातील जालना रोडला जोडणारे जवळपास सर्वच रस्ते आंदोलकांकडून बंद करण्यात आल्यामुळे शहराच्या कोणत्याही भागातून जालना रस्त्यावर येणे अवघड झाले होते. औरंगाबाद शहरासह तालुका तसेच पैठण, फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, गंगापूर, सोयगाव, खुलताबाद तालुक्यातही शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. पैठण शहराला जोडणारे सर्व रस्ते सकाळपासूनच बंद करण्यात आले होते, तसेच बाजारातील एकही दुकान सकाळपासून उघडण्यात आले नाही, कन्नड शहरामध्ये बैलगाडी मोर्चा काढण्यात आला तसेच तालुक्यातील देवगाव रंगारी तसेच लिंबाची चिंचोली येथे समाजाकडून ठिय्या आंदोलन करण्यात येऊन रस्ता बंद करण्यात आला. खुलताबाद तालुक्यातही सकाळपासून बाजारपेठा बंद होत्या, औरंगाबाद-खुलताबाद कॉर्नर, गल्लेबोरगाव तसेच काटशिवरी फाटा येथे नागरीकांनी केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे संपूर्ण वाहतुक ठप्प झाली होती.

एसटी धावलीच नाही

मध्यवर्ती बसस्थानक तसेच सिडको बसस्थानकातून सकाळपासून एकही बस धावली नाही. दोन्ही बसस्थानकावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आगारातील बसच्या सुरक्षेसाठी सिडको बसस्थानकाचा मुख्य दरवाजा बंद करण्यात आला होता. बसस्थानकातही कडेकोट बंदोबस्त होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

maratha reservation: ३ महिन्याचा आंदोलक

$
0
0

जालना

कपाळावर चंद्रकोरीचा टिळा...नजरेत कुतुहल.... त्यात मूकपणे बाबागाडीवर स्वार होऊन एक अवघ्या ३ महिन्यांचा सर्वात लहान आंदोलक आज सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनात सहभागी झाला. जालन्यातील अंबड चौफुला येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात हा लहानगा सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरला. जगताप नावाच्या आंदोलक दांपत्याने आपल्या या चिमुकल्याला या ठिय्या आंदोलनात सहभागी करून घेतले होते.

जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज दिवसभर ठिकठिकानी चक्का जाम आंदोलन झालं. अंबड चौफुली येथील झालेल्या ठिय्या आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी शेकडो महिलांनी आरक्षणाची मागणी करत भरपावसात रस्त्यावर ठिय्या मांडला. अशा परिस्थितीत समाजाच्या आंदोलनात लहानग्यामुळे जात येत नाही असा बाऊ न करता जगताप दांपत्याने कशाचीही पर्वा न करता आपल्या अवघ्या ३ महिन्यांच्या चिमुरड्यालाही आणले.

लहानग्या आंदोलकाचे नाव ठेवले 'अविरत क्रांती'

आंदोलनात सहभागी झालेल्या महिला आंदोलकांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वात लहान आंदोलकाचे नाव क्रांती ठेवावे असा आग्रह धरला. यावेळी बाळाची आई साधना जगताप यांनी ही सर्वांच्या आग्रहाचा मान ठेवत आपल्या चिमुकल्याचे नाव आजपासून 'अविरत क्रांती' ठेवत असल्याचे जाहीर केले.

65339267

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोटेगाव-कोपरगाव कॅडलाइन सर्व्हे संथगतिने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला वर्षभरापूर्वी मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीनंतर सर्वेक्षणाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. तसेच दौलताबाद ते चाळीसगाव नवीन प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामाबाबतही अजूनही रेल्वे विभागाकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या काही रेल्वे प्रकल्पाची माहिती मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी घेतली. त्यानुसार, सध्या मनमाड-धुळे-इंदूर या ३६२ किलोमिटरच्या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू आहे. अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या रेल्वे मार्गाचेही काम प्रगतीपथावर आहे. मात्र मराठवाड्यातील इतर प्रकल्पाकडे रेल्वे विभाग दुर्लक्ष करत आहे.

मनमाड-औरंगाबाद रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाबाबत अजून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. शिवाय औरंगाबाद-दौलताबाद-चाळीसगाव या नवीन प्रस्तावित ८८ किलोमिटरच्या मार्गाला रेल्वेने मंजुरी दिली होती. वर्ष २०१५ मध्ये आयआयटी रुडकीने सर्वेक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल रेल्वे विभागाकडे सादर केला आहे. २०१५पासून आतापर्यंत या रेल्वे मार्गाबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या रेल्वे मार्गामुळे १८० किलोमिटरचा फेरा वाचणार आहे. हा मार्ग रेल्वे विभागासाठी 'फिजिबल' असल्याचे अहवालात म्हटले आहे. तरीही या रेल्वे मार्गाच्या विकासासाठी रेल्वे विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.

शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांसाठी तसेच दक्षिण भारतात थेट गोवा येथे जाण्यासाठी रोटेगाव-कोपरगाव हा प्रस्तावित रेल्वे मार्ग फायदेशीर ठरणारा आहे. या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम वर्षभरापूर्वी देण्यात आलेले होते. त्याचे सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांना भेटून हा मार्ग पूर्ण करण्याबाबत चर्चा करावी, अशी मागणी ओमप्रकाश वर्मा यांनी केली आहे.

मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नांकडे अजूनही दुर्लक्ष होत आहे. चाळीसगाव-दौलताबाद रेल्वे मार्गाला मंजुरी मिळालेली आहे. तसेच रोटेगाव-कोपरगाव सर्वेक्षण पूर्ण होत नाही. यामुळे रेल्वे विकासात मराठवाड्यावर अजूनही अन्याय सुरू आहे.

-ओमप्रकाश वर्मा, मराठवाडा रेल्वे विकास समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारेगाव कचरा याचिकेची सुनावणी १६ ऑगस्टला

$
0
0

औरंगाबाद : नारेगाव येथे कचरा टाकण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायमस्वरुपी बंदी घातली होती; तसेच उच्च न्यायालयाच्या २००३च्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कारण्याचे व इतर निर्देश खंडपीठाने दिले होते. या आदेशाच्या पूर्ततेबाबतच्या अहवालासंदर्भात १६ ऑगस्ट २०१८ रोजी न्या. संभाजी शिंदे आणि न्या. व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठात सुनावणी होणार आहे. मुख्य सचिवांचा पूर्तता अहवाल सुनावणीदरम्यान सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी बंद लिफाफ्यात सादर केला. त्याच्या प्रती वादी आणि प्रतिवादींना देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीनगरात पाच तास रेल्वे रोको आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणाच्या राज्यव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर भागातील रेल्वे रुळावर आंदोलकांनी ठिय्या मांडला. सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आंदोलक या ठिकाणी बसून घोषणाबाजी करीत होते. या आंदोलनामुळे जालन्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या होत्या.

शहरात सगळीकडे रास्ता रोको सुरू करण्यात आला. यावेळी देवळाई चौकात देखील आंदोलकांनी रास्ता रोको केला. यावेळी काही आंदोलकांनी थेट जवळच असलेल्या शिवाजीनगर रेल्वे फाटक गाठले. या ठिकाणी काही वेळातच हजारो आंदोलक जमा झाले. जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलकांनी रुळावर ठाण मांडले. या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनामध्ये देखील खळबळ उडाली. या मार्गावरून काही रेल्वे लवकरच जाणार होत्या. ठिय्या आंदोलनामुळे या रेल्वे थांबवण्यात आल्या. जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शरद इंगळे पथकासह दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी लेखी पत्र लिहून देण्याची मागणी केली. समजूत काढण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने पोलिसांनी माघार घेतली. सायंकाळी चार वाजेपर्यंत आंदोलक रेल्वे रुळावर ठाण मांडून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवे यांना धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनात घोषणाबाजीवरून दोन गटात धक्काबुक्कीचा प्रकार घडला. तरुण आंदोलकांना शिवसेनेच्या विरोधात घोषणा देण्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी विरोध केला. त्यामुळे आंदोलक आणि दानवे यांच्यात धक्काबुक्की झाली. एका तरुणाला दानवे यांनी मारहाण केल्यानंतर वाद चिघळला. अखेर, पोलिसांनी मध्यस्थी करीत दानवे यांना आंदोलनाचे ठिकाण सोडण्यास सांगितले.

मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक चौकात आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करून शहराची नाकेबंदी केली. आंदोलनात सहभागी होऊन श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना तरुणांचा रोष सहन करावा लागला. क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्यासाठी कार्यकर्त्यांची लक्षणीय गर्दी झाली. जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलकांनी आरक्षणाची मागणी केली. या मागणीसाठी आंदोलकांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी केली. युती सरकार मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच प्रमुख नेत्यांच्या नावासह घोषणाबाजी झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा देण्यास जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी आंदोलकांना विरोध केला. त्यामुळे आंदोलक आणि दानवे यांच्यात वाद झाला. 'या आंदोलनात तुम्ही मराठा म्हणून सहभागी आहात की शिवसेनेचे पदाधिकारी' असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. या वादात दानवे आणि आंदोलकात धक्काबुक्की झाली. एका तरुणाला दानवे यांनी मारहाण केल्यानंतर वाद आणखी चिघळला. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि आंदोलक अशी दुफळी तयार होऊन ढकलाढकली सुरू झाली. ज्येष्ठ नेते पृथ्वीराज पवार यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद मिटला नाही. पोलिस उपायुक्त दीपाली धाटे-घाडगे यांनी मध्यस्थी करीत वाद थांबवला. पोलिस प्रशासनाने जिल्हाप्रमुख दानवे यांना आंदोलनस्थळ सोडण्यास सांगितले. दानवे यांनी दुसऱ्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी मज्जाव केल्यामुळे दानवे कार्यकर्त्यांसह निघून गेले. यावेळी संतापलेल्या आंदोलकांनी दानवे आणि शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे क्रांती चौकात काही वेळ तणाव निर्माण झाला.

\Bआंदोलकाला मारहाण

\Bदानवे आणि आंदोलकांच्या वादात डोक्याला दुखापत झालेल्या तरुणाला नूतन कॉलनी भागात मारहाण करण्यात आली. त्यामुळे आंदोलक अधिक आक्रमक झाले. या तरुणावर गजानन हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी तरुणाची भेट घेऊन विचारपूस केली. हा वाद सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता.

आंदोलकांसोबत वाद झाला, पण मला धक्काबुक्की झाली नाही. शिवसेनेने नेहमीच आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पक्षप्रमुखांच्या विरोधात ऐकून घेणार नाही. बाहेरचे असामाजिक तत्त्व आंदोलनात घुसून दिशा बदलत आहेत.

- अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवेसना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शेतकरी, शेतमजुरांच्या पाल्यांना एम.फिल व पीएच.डी. संशोधनासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. एम.फिल संशोधक विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे; तसेच पात्र शिष्यवृत्तीधारकांसाठी नियमावली निश्चित नसल्यामुळे शिष्यवृत्ती मिळण्याबाबत विद्यार्थी साशंक आहेत.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत एम.फिल. अभ्यासक्रमासाठी शेतकरी, शेतमजुराच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिष्यवृत्तीमुळे अधिक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयाला १५ दिवस उलटल्यानंतरही प्रक्रिया सुरू झाली नाही. एम.फिल अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता २० वरून २५ करण्याचा निर्णय झाला आहे, मात्र याबाबत परिपत्रक निघाले नसल्यामुळे विभागप्रमुखांनी पुढील कार्यवाही केली नाही. उपलब्ध जागांच्या प्रमाणात एम. फिल. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक अध्यासन केंद्राद्वारे दोन एम.फिल. आणि दोन पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येणार आहे. एम.फिल.साठी दरमहा चार हजार रुपये आणि पीएच.डी.साठी सहा हजार रुपये शिष्यवृत्ती आहे.

विद्यापीठातील १८ अध्यासन केंद्रे ७२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहेत. शिष्यवृत्तीसाठी शेकडो विद्यार्थी प्रतीक्षा करीत असून, प्रशासनाने परिपत्रक जाहीर करावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. अद्याप प्रशासनाने निर्णय घेतला नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे; तसेच एम. फिल अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता वाढवण्याबाबत विभागप्रमुख साशंक आहेत. परिणामी, विभागात नियमित तासिका सुरू झाल्या नाहीत. ऑगस्ट महिन्यात तासिका सुरू करण्याचे नियोजन होते, मात्र प्रशासकीय विलंबामुळे तासिका आणि शिष्यवृत्तीची कामे रखडली आहेत.

\Bनियमावलीची प्रतीक्षा

\Bएम. फिल अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. अध्यासन केंद्राकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना माहित नाही. त्यामुळे विद्यापीठाने तातडीने नियमावली जाहीर करुन अर्ज मागवावेत असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑनलाइन पेमेंटची वीज ग्राहकांना गोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळातील सव्वा लाख ग्राहकांनी जुलै महिन्यात ३० कोटी ५७ लाख रुपये वीज बिलांपोटी ऑनलाइन जमा केली. महावितरणने वेबसाइटसह मोबाइल अ‍ॅप उपलब्ध करून दिल्याने ऑनलाइन बिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.

महावितरणच्या वेबसाइटवर सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. बिल भरण्याकरिता नेटबँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, मोबाइल वॉलेट व कॅश कार्ड्‌सचा पर्याय आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी ऑनलाइन बिल भरण्याला प्राधान्य दिले जात आहे. वीज बिल ऑनलाइन भरण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन दिले जात आहे. नेट बॅंकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने बिल भरण्याची सेवा नि:शुल्क आहे. केवळ क्रेडिट कार्डद्वारे बिल भरल्यास शुल्क आकारले जाते.

वीज बिल ऑनलाइन भरल्यास ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइलवर त्वरित एसएमएसद्वारे पोच दिली जाते. वेबसाइटवर 'पेमेंट हिस्ट्री' तपासल्यास तपशील व पावती उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाइन बिल भरणा सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

\Bमेलद्वारे बिल घ्या; तीन रुपये सूट \B

लघुदाब ग्राहकांना ई-मेलद्वारे वीज बिल मिळवण्याची सुविधा देण्यात आली आहे. छापील बिलाऐवजी 'गो-ग्रीन' संकल्पनेतून फक्त ई-मेलद्वारे बिल घेण्याचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट दिली जात आहे. तथापि, छापील बिलासह ई-मेलद्वारेही बिल मिळविण्याची सुविधा आहे. याची माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे.

\Bऑनलाइन पेमेंट \B

१ लाख २५ हजार ७६१ ग्राहकांनी भरले ऑनलाइन बिल

५७ हजार ८६२ ग्राहक औरंगाबाद शहर मंडळातील

१९ कोटी १ लाख रुपये औरंगाबादच्या ग्राहकांकडून जमा

४९ हजार ५०१ ग्राहक औरंगाबाद ग्रामीण मंडळातील

७ कोटी ७२ लाख रुपये ग्रामीणच्या ग्राहकांकडून जमा

१८ हजार ३९८ ग्राहक जालना मंडळातील

३ कोटी ८४ लाख रुपये जालनाच्या ग्राहकांकडून जमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असंतोषाचा वणवा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या वतीने आरक्षणाच्या मागण्यासाठी क्रांतीदिनाचे औचित्य साधून गुरुवारी (९ ऑगस्ट) पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिय्या आंदोलने, चौकात झालेले रास्ता-रोको, भजन, कीर्तन, विविध भागातून तरुणाईने हातात भगवा घेऊन काढलेली वाहनफेरी आणि सरकारविरोधी गगनभेदी घोषणांनी शहर परिसर ढवळून निघाला.

आंदोलनाचे केंद्र असलेल्या क्रांती चौकात सकाळपासून मराठा समाजाने गर्दी केली होती. शहराला जोडणारे जिल्ह्यातील जवळपास सर्व रस्ते आंदोलकांनी बंद केल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, खासगी कंपन्यांमधील कामकाजही बंद ठेवण्यात आल्यामुळे शहरातील बहुतांश भागामधील रस्त्यावर शुकशुकाट होता. सकाळपासूनच शहरातील विविध भागांमधून तरुण तसेच विद्यार्थ्यांनी क्रांती चौकात गर्दी करणे सुरू केले. यावेळी तरुणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा दिल्या.

समन्वय समितीने राज्यव्यापी बंद जाहीर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. शिवाय रस्त्यावरून एकही एसटीबस न धावल्यामुळे बंदचा मोठा परिणाम जाणवला. सकाळपासून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आपापल्या भागामध्ये रस्त्यावर उतरून रस्ता बंद केला. टीव्ही सेंटर, सिडको कॅनॉट, एन ९, एन ११, बजरंग चौक, चिश्चिया कॉलनी, जयभवानीनगर, जाधववाडी, पुंडलिकनगर, गारखेडा परिसर, गुलमंडी, निरालाबाजार, जुनाबाजार, टिळकपथ, पैठणगेट, मछलीखडक, उस्मानपुरा, क्रांती चौक, चिकलठाणा, सराफा बाजार, मुकुंदवाडी, रेल्वे स्टेशन, पद्मपुरा, बाबा पेट्रोल पंप परिसरासह शहरातील बहुतांश व्यापारी पेठांमधील दुकाने बंद होती. बहुतांश व्यापाऱ्यांनी सकाळी दुकाने उघडलीच नाही. त्यामुळे बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच शुकशुकाट होता. शहरातील सिडको चौक, मुकुंदवाडी, चिकलठाणा, सिडको चौक, सेव्हन हिल्स्, आकाशवाणी चौक, सूतगिरणी, उल्कानगरी, शाहनूरमियाँ दर्गा, पुंडलिकनगर, गारखेडा चौक, महावीर चौक, केंब्रिज चौक, झाल्टा फाटा, टीव्ही सेंटर चौक, एसबीओए चौक, हर्सूल टी पॉइंट या शहरातील बहुतांश महत्वाच्या चौकात मराठा समाजाने रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केले व वाहतूक शंभर टक्के बंद केली. शहराच्या सर्व बाजूच्या एन्ट्री पॉइंटवर रास्तारोको केल्यामुळे जालना, जळगाव, सोलापूर, पुणे, नाशिक या भागातून शहरात येणाऱ्या वाहतुकीवरही बंदचा परिणाम झाला. शहरातील जालना रोडला जोडणारे जवळपास सर्वच रस्ते आंदोलकांकडून बंद करण्यात आल्यामुळे शहराच्या कोणत्याही भागातून जालना रस्त्यावर येणे अवघड झाले होते. शहरात दिवसभरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

\Bमहामार्गांवरील वाहतूक ठप्प

\Bऔरंगाबादसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. पैठणला जोडणारे सर्व रस्ते सकाळपासूनच बंद करण्यात आले होते. कन्नडमध्ये बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. देवगाव रंगारी तसेच लिंबाची चिंचोली येथे समाजाकडून ठिय्या आंदोलन करण्यात येऊन रस्ता बंद करण्यात आला. खुलताबाद तालुक्यातही सकाळपासून बाजारपेठा बंद होत्या. औरंगाबाद-खुलताबाद कॉर्नर, गल्लेबोरगाव तसेच काटशिवरी फाटा येथे नागरिकांनी केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. संध्याकाळी पाच वाजता क्रांती चौकात राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता करण्यात आली. संध्याकाळी पाचनंतर रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.

\Bआंदोलनाची धग

\B- सचखंड, तपोवन एक्सप्रेस रोखल्या

- शहरात बंदला उस्‍त्फुर्त प्रतिसाद

- क्रांती चौकात आंदोलनाचे केंद्र

- भगवे झेंडे घेऊन तरुण रस्त्यावर

- शहरातील बाजारपेठ १०० टक्के बंद

- जालना,जळगाव रस्त्यावर शुकशुकाट

- मुख्यमंत्र्यांविरुद्ध ठिकठिकाणी घोषणा

- महाविद्यालयीन तरुणांचा मोठा सहभाग

- सिडकोमध्ये चूल मांडून मोदी चहाचे वाटप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यारच भजन, क्रिकेट आणि मोदी चहा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदला उत्‍स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सिडको चौकात रस्त्यावर मध्यभागी मांडण्यात आलेल्या चुलीवर चहा करून हा चहा आंदोलनात सहभागी झालेल्यांना वाटप करण्यात आला. या चहाला आंदोलकांनी 'मोदी चहा' असे नाव दिले, तर याच चौकामध्ये टाळ मृदंगाच्या गजरात भजने म्हणून रास्तारोको करण्यात आला.

सकाळीच मराठा समाजातील तरुणांनी सिडको चौक पूर्णत: बंद केला. यावेळी रस्त्यावरच चूल पेटवून चहा करण्यात आला व या चहाला 'मोदी' चहा असे नाव देण्यात आले. हा चहा आंदोलनात सहभागी झालेल्यांना वाटण्यात आला. चुलीच्या चोहीबाजूने बसून फडणवीस सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी महिला व युवतींचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. चौकातच मांडण्यात आलेली चूल आणि चुलीभोवती सर्व आंदोलक यामुळे वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला होता. यामुळे जयभवानीनगर तसेच जालना व जळगावकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. याच चौकामध्ये पुलाखाली एन ९ येथे जयबाबाजी भजनी मंडळाने एकत्र येऊन भजन करण्यास सुरुवात केली. यामुळेही मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली.

अन् डाव रंगला

संपूर्ण रस्ता रि‌कामा आणि वाहन विरहित असल्याचे लक्षात येताच तरुणींनी या मोकळ्या रस्त्यावर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. समर्थनगरमध्येही बंद दुकाने आणि रस्ता मोकळा असल्यामुळे मुलांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. सिडको चौकामध्ये गटागटाने तरुण एकत्र येऊन आपापल्या पद्धतीने आंदोलन करत होते. कुणी घोषणाबाजी, कुणी चहा वाटप तर काही आंदोलक केवळ रस्‍ता बंद असल्याच्या सूचना वाहनधारकांना देत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचा खडा पहारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जय्यत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. क्रांती चौक आंदोलनाचे मुख्य केंद्र असल्याने या ठिकाणी फौजफाटा मोठ्या प्रमाणावर होता. शहरात सतत सुरू असलेल्या घडामोडीमुळे पोलिसांना खड्या पहाऱ्यासोबतच वाळूज एमआयडीसी भागात मोठी धावपळ करावी लागली.

शहरात सकाळपासूनच कडकडीत बंदला सुरुवात झाली होती. व्यापाऱ्यांनी दुकाने उघडलीच नाही. शहरात या बंदच्या पार्श्वभूमीवर जय्यत बंदोबस्त नेमण्यात आला होता. यामध्ये एक पोलिस उपायुक्त, सहा एसीपी, तीस पोलिस निरीक्षक, शंभर सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, अडीच हजार पोलिस कॉन्स्टेबल, तीनशे होमगार्ड, रॅपीड अॅक्शन फोर्सची एक तुकडी, राज्य राखीव पोलिस बलाच्या चार तुकड्या आदीचा समावेश होता. क्रांती चौक येथे मोठ्या प्रमाणावर आंदोलकांनी गर्दी केली होती. कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत होते. या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख व आंदोलकांमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने घोषणा दिल्यावरून वाद झाला. याचे रुपांतर धक्काबुक्कीमध्ये झाले. यामुळे काळी काळ तनाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी नागनाथ कोडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, श्रीकांत नवले, अनिल गायकवाड यांनी परिस्थिती हाताळली. दोन्ही बाजूच्या गटांना त्यांनी पांगवले. यामुळे काही काळ धावपळ उडाली होती.

\Bवाळूजमध्ये ठाण

\Bसायंकाळपर्यंत या ठिकाणी बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. दरम्यान शिवाजीनगर भागात रेल्वे रुळावर आंदोलकांनी रेल्वे रोको केल्यानंतर पोलिस फौजफाटा त्या ठिकाणी रवाना झाला. त्याच दरम्यान वाळूज एमआयडीसी भागात बंदला हिंसक वळण लागले. त्यामुळे पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसादसह वरिष्ठ अधिकारी व अतिरिक्त फोर्स वाळूज भागात रवाना झाला होता. रात्री उशीरापर्यंत हा फौजफाटा वाळूज परिसरात ठाण मांडून होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूजमध्ये हिंसक वळण

$
0
0

- पोलिसांची वाहने पेटविली

- एमआयडीसीत कंपन्यांची तोडफोड

- चौकाचौकांत ठिय्या आंदोलन

- पुणे, नाशिक शहरांत वाहनांची जाळपोळ

- एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल

टीम मटा, वाळूज / औरंगाबाद / मुंबई

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत यांसह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांतीमोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या 'बंद'ला वाळूजमध्ये हिंसक वळण लागले. आंदोलकांनी वाळूज औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना लक्ष्य केले. त्याचबरोबर काही वाहनांनाही पेटवून देण्यात आले. दरम्यान, औरंगाबाद शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. पुणे, नाशिक जिल्ह्यांत वाहनांच्या जाळपोळीच्या घटना घडल्या. रुग्णवाहिका, रुग्णालये आदी अत्यावश्यक सेवा वगळता बहुतेक सर्व व्यवहार बंद होते.

वाळूजमध्ये प्रताप चौकात सकाळी मराठा क्रांतीमोर्चाच्या आंदोलनाला सुरुवात झाली. त्याचबरोबर सर्व चौकांत 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. दुकाने, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, बँका आदी बंद होते. औद्योगिक परिसरातील काही कंपन्या सुरू असल्याचे जमावाला समजले. त्यानंतर हा जमाव औद्योगिक वसाहतीत शिरला. त्यांनी कंपन्या बंद करण्यास भाग पाडले. त्यामुळे सकाळच्या पाळीसाठी आलेल्या कामगारांना घरी परतण्यासाठी ताटकळत बसावे लागले. बजाज कंपनीजवळ सकाळच्या पाळीसाठी आलेल्या कामगारांच्या ६५ बस रोकण्यात आल्या. दुपारपर्यंत आंदोलन शांततेत सुरू होते. दुपारनंतर चौकाचौकांत टायर जाळणे सुरू झाले. अनेक कंपन्यांमध्ये शिरून तोडफोड करण्यात आली. हा जमाव पोलिसांच्या नियंत्रणात आला नाही. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. त्यावेळी त्यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली. जमावाच्या दगडफेकीनंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या २० नळकांड्या फोडल्या. यादरम्यान काही जणांनी स्टरलाइट कंपनीत शिरून कंपनीतील साहित्य बाहेर आणले व त्याला आग लावली. आंदोलकांनी मायलॉन, एनआरबी, श्रेया, एफडीसी, वॉखार्ड, कॅनपॅक, मिलेनियम, स्टरलाइट आदी कंपन्यांत तोडफोड व जाळपोळ सुरू केली. त्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. स्टरलाइट कंपनीसमोर ट्रकला आग लावण्यात आली. ती विझवण्यासाठी आलेल्या एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाडीलाही पेटवून देण्यात आले. त्यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी जखमी झाले आहेत़ सायंकाळनंतरही वाळूज परिसरात तणावग्रस्त स्थिती होती.

औरंगाबादेत कडकडीत बंद

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरात हॉस्पिटल, औषधी दुकाने यांना बंदमधून वगळण्यात आले होते. दुकाने, शाळा, महाविद्यालयांसह बँका, सरकारी कार्यालये दिवसभर बंद होते. एसटी महामंडळाची सेवेसह खासगी प्रवासी वाहतूकही बंद होती. शहरातील बहुतांश चौकांत मराठा क्रांतीमोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

राज्यात 'बंद'ला हिंसेचे गालबोट

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील काही संघटनांनी गुरुवारी पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला राज्यभरात अनेक ठिकाणी हिंसेचे गालबोट लागले. मात्र, राज्याच्या बहुतांश भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलनाच्या स्वरूपावरून मराठा समाजाच्या आयोजकांमध्ये मतभेद असल्याचे बुधवारीच स्पष्ट झाले होते, ते गुरुवारी दृश्य रूपात दिसून आले. ठिकठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त असूनही औरंगाबाद, पुणे, नाशिक आदी शहरांत वाहनांची जाळपोळ करण्यात आली. आंदोलकांनी काही आस्थापने व सरकारी कार्यालयांचीही तोडफोड केली. औरंगाबादेत आंदोलकांच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली. राज्यातील अनेक महामार्गांवर आंदोलक ठिय्या देऊन बसल्याने वाहतूक खोळंबली. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग सुमारे पाच तास रोखून धरण्यात आला होता. राज्यभरातील एसटी बससेवा सकाळपासूनच पूर्णतः बंद ठेवण्यात आल्याने बस स्थानकांवर शुकशुकाट होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापार, उद्योगाचे चाक थांबले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदचा मोठा परिणाम व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रावर झाला. या बंदमुळे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. वाळूजसह अन्य काही ठिकाणी झालेल्या हिंसक घटनांमुळे औद्योगिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून, गुंतवणुकीवर त्याचे मोठे परिणाम होण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली. बंद असलेल्या कंपन्यांनाही टार्गेट केल्याचे सांगण्यात आले.

शेंद्रा, चिकलठाणा, वाळूजसह जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रावर बंदचा मोठा परिणाम जाणवला. वाळूज औद्योगिक क्षेत्रात आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. त्यात काही कंपन्यांवर दगडफेक करण्यात आली. जाळपोळच्या घटनाही घडल्या. बंदच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्रातील बहुतेक कंपन्यांनी काम बंदच ठेवले होते. मात्र, काही कंपन्यांना निर्यात आर्डरमुळे काम बंद शक्य नसल्याने त्यांनी पहाटेच कामगारांना बोलवून घेतले होते. पण त्याआधीच आंदोलनकर्त्यांनी कामगारांना प्रवेशद्वारचा रोखले. त्यानंतर दिवसभरात लहान मोठ्या अशा सुमारे वीसहून अधिक कंपन्यांना लक्ष करण्यात आल्याचे एका उद्योजकाने सांगितले.

\B-

गुंतवणुकीवर परिणाम

\B-

औद्योगिक क्षेत्रात बंद होता. बंददरम्यान काही झालेल्या हिंसक घटनामुळे नेमके किती नुकसान झाले याविषयी हे आता सांगता येणार नाही. मात्र, अशा घटनांमुळे गुंतवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

- राम भोगले, अध्यक्ष, सीएमआयए

सकल मराठा समाजाने गुरुवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. औद्योगिक क्षेत्रातील बाजारपेठही बंद होती. मात्र, या काळात झालेल्या हिंसक घटनामुळे मोठे नुकसान झाले आहे.

- मनीष अग्रवाल, जनसंपर्क अधिकारी, मसिआ

महाराष्ट्र बंदमुळे औरंगाबादमधील गुलमंडी, शहागंज, निराला बाजार, कॅनॉट गार्डन आदी भागातील दुकाने बंद होती. या बंदमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती.

- जगन्नाथ काळे, अध्यक्ष, व्यापारी महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गावर ठिकठिकाणी ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळूज महानगर ते शेंद्रा, झाल्टाफाटा, हर्सूल गावापर्यंत ठिकठिकाणी तरुणांनी रास्तारोको केला. जालना रोडवरही ठिकठिकाणी, चौकाचौकात तरुणाईने रस्त्यावर उतरली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. शहरात सकाळपासूनच मराठा समाजातील तरुण रस्त्यावर उतरले होते. शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणची तरुणाई रस्त्यावर उतरत मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, अशा घोषणा देत होती. रस्त्यावर उतरत घोषणाबाजी करत तरुणांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. यामुळे वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या. बजाजजवळील ओअॅसिस चौक, मोरे चौक, महानुभव चौक, वालमार्ट चौक, ए.एस. क्लब चौक, वाळूज लिंक रोडसह केंब्रिज चौक, चिकलठाणा, मुकुंदवाडी चौक, एपीएआय कॉर्नर, सिडको बसस्टँड चौक, आंबेडकर चौक, जाधववाडी चौक, हर्सूल टी पॉईंट, जळगाव रोड यासह संग्रामनगर चौक, संग्रमानगर उड्डाण पूल, रोपळेकर चौकच्या रस्त्यावर तरुणाईने ठिय्या मांडला. एखादे वाहन जात असेल, तर लगेच समोर तरुण झोपायचे. त्यामुळे वाहने परत जात होती. बाहेरूनही शहरात वाहने आली नाहीत. जालना रोडवरही सेव्हन हिल्स्, आकाशवाणी चौकात तरुणांनी मोठ्या प्रमाणात ठिय्या आंदोलन केले. रास्तारोकोने ऐतिहासिक नगरी अक्षरश: ठप्प झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टायर जाळून रस्ता अडवला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणासंदर्भात गुरुवारी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता. शहरातील महत्त्वाच्या चौकाशिवाय अंतर्गत लहान मोठ्या चौकातही आंदोलकांनी वाहने अडवत उत्स्फूर्तपणे चक्का जाम केला. उल्कानगरी, रोपळेकर चौक, पुंडलिकनगर, शिवाजीनगर भागात कार्यकर्त्यांनी टायर जाळून वाहने अडवत रस्ता बंद केला होता.

शहरात रास्ता रोको असल्यास आतापर्यंत जालना रोड, महावीर चौक, टी.व्ही. सेंटर, हर्सूल चौक, चिकलठाणा आदी महत्वाच्या ठिकाणीच रास्ता रोको करण्यात येत होता. गुरुवारी झालेल्या बंद दरम्यान यावेळी वेगळे चित्र शहरात दिसून आले. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आल्याने तुरळक वाहनधारक रस्त्यावर दिसत होते. जालना रोड पूर्णपणे बंद असल्याने वाहनधारकांनी गारखेडा भागातून वाहने नेण्याचा पर्यायी मार्ग निवडला. मात्र या ठिकाणी देखील त्यांना रास्ता रोकोचा सामना करावा लागला. आंदोलकांनी रोपळेकर चौकात वाहने अडवून शहानूरवाडी, उल्कानगरीकडे जाणारा मार्ग बंद केला होता. उल्कानगरी भागात देखील आंदोलकांनी गारखेड्याकडे जाणारा मार्ग बंद केला होता. या ठिकाणी टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आला. पुंडलिकनगर चौकात देखील आंदोलकांनी मोठया प्रमाणावर रास्ता रोको केला. यामुळे जयभवानीनगर, एन चार कडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. या अंतर्गत चौकातील चक्का जाममुळे वाहनधारकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीचे संपावर गेलेले कर्मचारी कामावर रुजू

$
0
0

औरंगाबाद : घाटीचे संपावर गेलेले तब्बल ११८५ कर्मचारी गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास कामावर हजर झाले. गेल्या तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे घाटीच्या रुग्णसेवेला फटका बसला होता. ६५९ परिचारिका, ४५६ चतुर्थ श्रेणी कर्मचारी व ७० तंत्रज्ञ असे ११८५ कर्मचारी गुरुवारी दुपारी अडीचपर्यंत संपावर होते. संपामुळेच सर्व प्रकारच्या नियोजित शस्त्रक्रिया तसेच उपचार प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सर्व कर्मचारी रुग्णालयात रुजू झाल्यानंतर प्रशासनाने एकदाचा निःश्वास टाकला. दरम्यान, 'बंद'च्या पार्श्वभूमीवर घाटीच्या डॉक्टरांची टीम सज्ज होती. तरीही मोजकेच रुग्ण अपघात विभागात दाखल झाले. यामध्ये गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या कन्नड तालुक्यातील रवींद्र जाधव यांच्यावर घाटीमध्ये उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलकांनीच केली जेवण, अल्पोपहाराची व्यवस्था

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद पाळण्यात आला. विविध आंदोलकांनी रास्ता रोको केला. यावेळी काही चौकात आंदोलकांच्या वतीने आंदोलक तसेच पोलिसांसाठी जेवण, अल्पोपहार, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

मुकुंदवाडी चौकात आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रास्ता रोको केला. आंदोलकांनी घोषणाबाजी करीत रस्त्यावर ठिय्या दिला. यावेळी गावातील तरुणांनी पुढाकार घेत सर्वांसाठी जेवणांची सोय केली. चौकातच चुली पेटवून पिठलं भाकरी व खिचडी तयार करण्यात आली. शेकडो आंदोलकांनी तसेच पोलिसांनी या गरम जेवणाचा आस्वाद घेतला. पिण्यासाठी या चौकात पाण्याचे टँकर देखील उभे करण्यात आले होते. या उपक्रमासाठी ज्ञानेश्वर डांगे, सुनील जगताप, दीपक कोतकर, बंडू ठुबे, ज्ञानेश्वर शिंदे, सतीश जगताप, प्रवीण भुसारे, नवनाथ डांगे, नामू राते, योगेश माटे, सत्तेश्वर शिंदे, मनोहर भुसारे, शिवाजी शिंदे, प्रमोद भुसारे, पप्पू ठुबे, किसन ठुबे, अनिल जगताप, बबन जगताप, रामू ठुबे, किशोर ठुबे आदींनी परिश्रम घेतले. सेव्हन हिल चौकात देखील रास्ता रोको करण्यात आला. या ठिकाणी आंदोलकांच्या वतीने पोहे व चहाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पुंडलिकनगर चौकात देखील जोरदार रास्ता रोको करण्यात आला. याठिकाणी देखील आंदोलकांनी जेवणासाठी खिचडीची सोय केली होती. शिवाजीनगर भागात रेल्वे रुळावर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले होते. या ठिकाणी त्यांना जाबेरखान मित्र मंडळाने पुढाकार घेत पिण्यासाठी पाण्याची तसेच चहाची व्यवस्था केली होती.

\Bचिमुकल्यांतर्फे पोलिस मामांना चॉकलेट वाटप

\Bशहरात पोलिसांचा खडा पहारा होता. बंदोबस्तावरील पोलिसांचे देखील बंदमुळे हाल झाले. उस्मानपुरा चौकात बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलिसमांमाना कोठारी परिवारातील चिमुकल्यांनी तहानेवर उपाय म्हणून चॉकलेटचे वाटप केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला मार्केट बंद

$
0
0

मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदचा परिणाम जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही जाणवला. त्यामुळे भाजीपाल्याच्या आवकेवर झाला. दररोजच्या तुलनेते केवळ २० ते ३० टक्केच भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाल्याचे बाजार समितीतर्फे सांगण्यात आले. धान्य मार्केटमध्येही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. दिवसभर ग्राहक, व्यापारी, शेतकऱ्यांच्या गर्दीने गजबजणारी जाधववाडीत बंदमुळे शुकशुकाट होता. जुना मोंढा परिसरातील दुकानेही दिवसभर कुलूप बंद होते. मार्केट बंदमुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे सेवा कोलमडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला. त्यामुळे औरंगाबाद ते परभणी दरम्यानची वाहतूक सहा तासापेक्षा जास्त वेळ बंद राहिली. या बंदमुळे नांदेड विभागात पाच रेल्वे पूर्णत: बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर चार रेल्वे अंशत: रद्द करण्यात आल्या.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर तीन रेल्वे थांबवून ठेवण्यात आल्या. तर जालना येथे तीन रेल्वे थांबविण्यात आल्या. जालना येथे सचखंड एक्स्प्रेसला अर्धा तास रोखण्यात आले. सहा तासानंतर रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात झाली. तीन ते चार तास रेल्वे वाहतूक बंद असल्याने रेल्वेत बसलेल्या प्रवाशांचे हाल झाले. औरंगाबाद ते परभणी मार्गावर औरंगाबाद येथे शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगवर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. तसेच जालना येथेही आंदोलन करण्यात आले. याशिवाय नांदेड जवळील चुडावा येथेही रेल्वेवर दगडफेकीच्या घटना घडल्या.

\B

आज रद्द झालेल्या रेल्वे

\B- परळी-अकोला पॅसेंजर ९ ऑगस्ट रोजी रद्द

- अकोला-पूर्णा पॅसेंजर ९ ऑगस्ट रोजी रद्द

- परभणी-नांदेड पॅसेंजर ९ ऑगस्ट रोजी रद्द

- आदिलाबाद-पूर्णा पॅसेंजर ९ ऑगस्ट रोजी रद्द

- अकोला-परळी पॅसेंजर ९ ऑगस्ट रद्द

\B

आज अंशतः रद्द

\B- आदिलाबाद-परळी पॅसेंजर ९ ऑगस्ट रोजी पूर्णा-परळी दरम्यान रद्द

- नगरसोल-नांदेड पॅसेंजर ९ ऑगस्ट रोजी परभणी-नांदेड दरम्यान रद्द

- मनमाड-काचीगुडा पॅसेंजर रेल्वे ९ ऑगस्ट रोजी परभणी-काचीगुडा दरम्यान रद्द

- काचीगुडा-मनमाड पॅसेंजर रेल्वे ९ ऑगस्ट रोजी नांदेड-मनमाड दरम्यान रद्द

- हैदराबाद-औरंगाबाद पॅसेंजर ९ ऑगस्ट रोजी जालना-औरंगाबाद दरम्यान रद्द

- औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर ९ ऑगस्ट रोजी औरंगाबाद-जालना दरम्यान रद्द

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images