Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

छावणीतील जलवाहिनी रखडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणीवासीयांसाठी कर्णपुरा नाका ते छावणीपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय छावणी परिषदेच्या २४ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये झाला होता, परंतु तब्बल नऊ महिने लोटले तरी या जलवाहिनीचे काम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे काम रखडल्यानंतर हे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला १५ ऑगस्टची डेडलाइन मागेच देण्यात आली होती, मात्र आता तर ही डेडलाइनदेखील ओलांडली असून, काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

छावणी परिसरामध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्यात दूषित पाणीपुरवठ्यामुळे गॅस्ट्रोचा उद्रेक झाला होता. तब्बल दहा ते बारा हजार नागरिकांचा गॅस्ट्रोचा फटका बसला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत निदान यापुढे तरी खाम नदीत पाणी दूषित होण्याची शक्यता राहू नये, यासाठी कर्णपुरा नाका ते छावणीपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय झाला होता. या कामासाठी ४५ लाखांच्या निधीलादेखील तत्कालिन अध्यक्षांनी त्याच सभेत मान्यता दिली होती, मात्र हे काम किमान पाच ते सहा महिन्यांनंतर सुरू झाले. अत्यंत संथ गतीने व खंडित स्वरुपात होत आहे. अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. खाम नदीच्या पुलाला समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी नदीमध्ये कॉलम टाकण्याचे काम सुरू असून, हे कामदेखील पूर्ण झालेले नाही. प्रत्यक्षात जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू व्हायचेच आहे. याच गतीने हे काम होत राहिले तर हे काम पूर्ण होणार तरी कधी, असाही सवाल उपस्थित होत आहे.

\Bपाणी दूषित होण्याची भीती कायम\B

गेल्या नोव्हेंबरमध्ये खाम नदीतून गेलेल्या जलवाहिनीमध्ये पाणी दूषित झाले होते आणि जुलै महिन्यात पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ही जलवाहिनी तुटली होती. त्यामुळे ही जलवाहिनी दूषित होण्याची भीती कायम आहे व गॅस्टोचा पुन्हा एकदा फटका बसू शकतो. याच कारणास्तव जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशीही मागणी होत आहे.

हे काम पूर्ण करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाइन कंत्राटदाराला देण्यात आली होती, परंतु अडचणींमुळे हे काम पूर्ण झालेले नाही. हे काम लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे आणि कंत्राटदाराने डेडलाईन ओलंडाल्यामुळे कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईचाही विचार होऊ शकतो.

- प्रशांत तारगे, उपाध्यक्ष, छावणी परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्यानांचे रूप पालटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने महापालिकेतर्फे येत्या काही महिन्यांत ३६ उद्याने आणि पाच 'थीम पार्क'ची उभारणी केली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या केले जात आहे.

औरंगाबाद शहरात सिद्धार्थ उद्यान, नेहरू बालोद्यान, सलीम अली उद्यान, स्वामी विवेकानंद उद्यान, काव्योद्यान अशी जेमतेम पाच उद्याने नाव घेण्यासारखी आहेत. पाचपैकी फक्त सिद्धार्थ उद्यानातच बालगोपाळांसह ज्येष्ठांची देखील गर्दी असते. शहराच्या विविध भागात चांगली उद्याने असावीत अशी कल्पना आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मांडली आहे. त्यानुसार ३६ उद्याने नव्याने विकसित केली जाणार आहेत. त्याचबरोबर पाच थीम पार्क देखील तयार केले जाणार आहेत. यासंदर्भात आयुक्तांनीच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

उद्यानांच्या या उपक्रमाबद्दल पालिकेचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, शहरात महापालिकेची ११४ उद्याने आहेत. विविध लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यानुसार ही उद्याने तयार करण्यात आली आहेत. ११४पैकी सुमारे ५० उद्याने चांगल्या स्थितीत आहेत, परंतु काही वर्षांत या उद्यानांवर खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे उद्यानांची स्थिती तेवढी चांगली राहिलेली नाही. एकूण उद्यानांपैकी किमान ३० ते ३६ उद्याने सुस्थितीत आणण्याची कल्पना आयुक्तांनी मांडली आहे. त्यांच्या कल्पनेनुसार उद्यानांचा आराखडा व त्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सध्या केले जात आहे. सक्षम यंत्रणेची त्याला मान्यता मिळाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकेल. दुरुस्तीची कामे, रंगरंगोटीची कामे करून उद्यानांमध्ये खेळणी बसवण्याचे काम केले जाणार आहे. ही कामे झाल्यास त्या त्याभागातील नागरिकांना उद्यानांचा लाभ घेता येईल आणि पर्यावरण संतुलनाचे काम देखील होईल.

पाच 'थीम पार्क'

उद्यानांचा केवळ सरसकट विकास न करता काही उद्यानांचा विकास थीम पार्क म्हणून करण्याची कल्पना आयुक्तांनी मांडली आहे. त्यानुसार कॅक्टस गार्डन, बोगनवेल गार्डन, चाफा उद्यान, जास्वंद उद्यान, नक्षत्र उद्यान, आयुर्वेद उद्यान अशा थीम घेऊन पाच उद्याने विकसित केली जाणार आहेत. त्याचाही आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

रोझ गार्डनचे काम सुरू

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून रोझ गार्डनची उभारणी सुरू करण्यात आली. सलिम अली सरोवरच्या विरुद्ध बाजुला मजनू हिलवर सुमारे पाऊण एकर परिसरात हे उद्यान उभारण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. उद्यानातील बांधकाम सध्या सुरू आहे. येत्या काही महिन्यांत हे काम पूर्ण होऊन तेथे विविध जातीची गुलाबांची रोपटी लावण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शिक्षण घेताना कुटुंब, समाज व देशसेवा करण्याची प्रेरणा उराशी बाळगून यशाचे उतुंग शिखर गाठण्याचा ध्यास विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे,' असे प्रतिपादन डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अश्विनकुमार तुपकरी यांनी केले. ते स्वातंत्रदिनानिमित्त आयोजित लोहार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

मराठवाडा महसूल प्रबोधनीच्या सभागृहात झालेल्या या समारंभाचे उद्घाटन डॉ. तुपकरी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा लोहार गाडी लोहार समजा विकास संघटनेचे अध्यक्ष दिनकर गाडेकर, मोहर टाकसाळ, दगडू खैरनार, विवेक लाड, लीलाबाई लाड, अ‍ॅड. नरेश गाडेकर, विलास रोणगोते, सुदाम पोपळघट, रमेश दिसागर, संजय डाखोरकर, डॉ. हरे, पांडुरंग थोरात यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करतांना संघटनेचे कोषाध्यक्ष दादाराव वाघ म्हणाले की, संघटनेने आतापर्यंत अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेतले आहेत. ही संघटना १९८२ पासून समाजातील गुणवंतांना पाठबळ मिळण्यासाठी कौतुक, सत्कार समारंभ आयोजित करत आहे. या सोहळ्यात अ‍ॅड. मनोहर टाकसाळ, दिनकर गाडेकर यांच्यासह मान्यवरांनी विद्यार्थयांचे कौतुक करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विष्णूपंत पोपळघट यांनी केले, तर रमेश दिसागज यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास राणगोते, यश प्रदीप वाघ, साहिल राणगोते, गजानन पोपळघट यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता संजना खंडागळे यांनी गायलेल्या वंदेमातरम् ने करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक मतीनचे दुसऱ्या गुन्ह्यात हस्तांतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या महापालिकेतील श्रद्धांजलीच्या प्रस्तावाला विरोध करणारा 'एमआयएम'चा नगरसेवक सय्यद मतीन यांना रविवारी (१९ ऑगस्ट) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिस कोठडी मुदत संपल्यामुळे त्याला कोर्टात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी हा आदेश दिला. बेगमपुरा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा करून दहशत निर्माण केल्याचा गुन्हा दाखल असल्यामुळे त्या गुन्ह्यात मतीनला हस्तांतर करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

नगरसेवक मतीन यांच्याविरुद्ध उपमहापौर विजय औताडे यांच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. मतीन यांच्या ताब्यातून मोबाइल जप्त करून त्यातील संदेशांचा डेटा हस्तगत करावयाचा असल्याचे सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर कोर्टाने मतीन यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सय्यद मतीन यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यामध्ये सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दुकाने बंद करण्यासाठी दगडफेâक करून दहशत पसरविणे, प्रक्षोभक भाषणे करून कार्यकर्त्यांना व नागरिकांना भडकावणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात 'एमआयएम'चा माजी शहराध्यक्ष जावेद कुरेशी यांस बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली होती. ते सध्या पोलिस कोठडीत असून या गुन्ह्यामध्ये सय्यद मतीन हे देखील प्रमुख आरोपी असल्यामुळे तपासासाठी हस्तांतर करावे, असा अर्ज पोलिसांनी कोर्टात दिला. कोर्टाने हा अर्ज गृहित धरून मतीनचे हस्तांतर करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव आरक्षण द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वंजारी समाजाला दहा टक्के आरक्षण द्यावे किंवा केंद्राप्रमाणे राज्यातही इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) समावेश करावा अशी मागणी वंजारी समाजाने केली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी करण्यात येईल. सकारात्मक प्रतिसाद दिला तर ठीक, अन्यथा रस्त्यावर उतरू, अशी भूमिका वंजारी समाज आरक्षण कृती समितीने रविवारी जाहीर केली आहे. समितीची बैठक आज औरंगाबादेत पार पडली.

सिडकोतील वंजारी मंगल कार्यालयात कृती समितीची ही बैठक झाली. बैठकीला राज्यभरातील विविध ठिकाणांहून कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यामध्ये दऱ्या-खोऱ्यामध्ये राहणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या या समाजातील मुलांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. आरक्षणाअभावी नोकरी मिळू शकत नाही. त्यामुळे समाजाला वाढीव आरक्षण द्यावे. वाढीव आरक्षण दिले गेले नाहीतर पुन्हा 'ओबीसी' प्रवर्गामध्ये समावेश करावा, अशी मागणी पुढे आली.

पुढची राज्य पातळवीरील आणखी एक बैठक पुढच्या आठवड्यात पुणे येथे घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार आहे. राज्य सरकारने सकारात्मकता दाखविली तर ठीक, अन्यथा या मागणीसाठी रस्त्यावर उतरू, असा इशाराही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

\Bसध्या दोन टक्के आरक्षण\B

सध्या वंजारी समाजाचा भटक्या जाती विमुक्त जमाती प्रवर्गात (एनटी)समावेश आहे. या प्रवर्गात सध्या दोन टक्के आरक्षण मिळते. हे आरक्षण पुरेसे नसून त्याच वाढ करावी, अन्यथा केंद्राप्रमाणे राज्यातील वंजारी समाजाचा 'ओबीसी' प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी आहे. येणाऱ्या काळात कृती समिती आंदोलनाची दिशा ही जाहीर करेल, अशी माहिती समिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजांची तपासणी कागदावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फायदा घेत ग्रामीण भागात क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देणाऱ्या कॉलेजांची तपासणी भरारी पथकामार्फत करण्यात येणार होती, मात्र अनेक ठिकाणी अद्याप पथकेच नेमण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला होणारा विलंब, ग्रामीण भागात कॉपी प्रकरणांना मिळणारे अभय अशा अनेक कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागातील कॉलेजांमध्ये अकरावी, बारावीला प्रवेश घेण्याचा कल असतो. याचाच फायदा घेऊन अनेक कॉलेज प्रवेश क्षमतेच्या अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. तशा तक्रारीही शिक्षण विभागाकडे करण्यात आल्या होत्या. यानंतर शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर कॉलेजांना भेटी देत त्यांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. संबंधित कॉलेजमध्ये अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत काय, हे तपासण्यात येणार होते. त्यासाठी भरारी पथकेही नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. शिक्षणाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली चार जणाच्या या पथकात प्रतिष्ठित कॉलेजांच्या प्राचार्यांचा समावेश करण्यात यावा, असे सांगण्यात आले आहे. अशा विद्यार्थ्यांची यादी हे पथक शिक्षण उपासंचालकांना सादर करतील. अशा विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ही माहिती ३० सप्टेंबरपर्यंत अद्ययावत करायची आहे, मात्र तपासणीची प्रक्रियाच अद्याप सुरूच झालेली नाही.

\Bसंथ गतीने काम

\Bअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फायदा घेत ग्रामीण भागातील अनेक कॉलेज क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देत आहेत. याची दखल घेत आता शहरालगतच्या कॉलेजांची तपासणी केली जाईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. त्याबाबत आठ ऑगस्ट रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. याबाबतचे परिपत्रक काढून दहा दिवस उलटले तरी तपासणीबाबत शिक्षण विभागाची गती संथच आहे. जिल्ह्यात अनेक तालुक्यात तपासणीसाठी पथकेच स्थापन करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. पथके स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सूत्रांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानांचे रूप पालटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने महापालिकेतर्फे येत्या काही महिन्यांत ३६ उद्याने आणि पाच थीम पार्कची उभारणी केली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या केले जात आहे.

औरंगाबाद शहरात सिद्धार्थ उद्यान, नेहरू बालोद्यान, सलीम अली उद्यान, स्वामी विवेकानंद उद्यान, काव्योद्यान अशी जेमतेम पाच उद्याने नाव घेण्यासारखी आहेत. पाचपैकी फक्त सिद्धार्थ उद्यानातच बालगोपाळांसह ज्येष्ठांची देखील गर्दी असते. शहराच्या विविध भागात चांगली उद्याने असावीत अशी कल्पना आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मांडली आहे. त्यानुसार ३६ उद्याने नव्याने विकसित केली जाणार आहेत. त्याचबरोबर पाच थीम पार्क देखील तयार केले जाणार आहेत. यासंदर्भात आयुक्तांनीच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

उद्यानांच्या या उपक्रमाबद्दल पालिकेचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, शहरात महापालिकेची ११४ उद्याने आहेत. विविध लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यानुसार ही उद्याने तयार करण्यात आली आहेत. ११४पैकी सुमारे ५० उद्याने चांगल्या स्थितीत आहेत, परंतु काही वर्षांत या उद्यानांवर खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे उद्यानांची स्थिती तेवढी चांगली राहिलेली नाही. एकूण उद्यानांपैकी किमान ३० ते ३६ उद्याने सुस्थितीत आणण्याची कल्पना आयुक्तांनी मांडली आहे. त्यांच्या कल्पनेनुसार उद्यानांचा आराखडा व त्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सध्या केले जात आहे. सक्षम यंत्रणेची त्याला मान्यता मिळाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकेल. दुरुस्तीची कामे, रंगरंगोटीची कामे करून उद्यानांमध्ये खेळणी बसवण्याचे काम केले जाणार आहे. ही कामे झाल्यास त्या त्याभागातील नागरिकांना उद्यानांचा लाभ घेता येईल आणि पर्यावरण संतुलनाचे काम देखील होईल.

पाच थीमपार्क

उद्यानांचा केवळ सरसकट विकास न करता काही उद्यानांचा विकास थीम पार्क म्हणून करण्याची कल्पना आयुक्तांनी मांडली आहे. त्यानुसार कॅक्टस गार्डन, बोगनवेल गार्डन, चाफा उद्यान, जास्वंद उद्यान, नक्षत्र उद्यान, आयुर्वेद उद्यान अशा थीम घेऊन पाच उद्याने विकसित केली जाणार आहेत. त्याचाही आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

रोझ गार्डनचे काम सुरू

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून रोझ गार्डनची उभारणी सुरू करण्यात आली. सलिम अली सरोवरच्या विरुद्ध बाजुला मजनू हिलवर सुमारे पाऊण एकर परिसरात हे उद्यान उभारण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. उद्यानातील बांधकाम सध्या सुरू आहे. येत्या काही महिन्यांत हे काम पूर्ण होऊन तेथे विविध जातीची गुलाबांची रोपटी लावण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओळख संस्कृती - पर्यटनाच्या दिशा कोंडल्या

$
0
0

जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणीसह अनेक ऐतिहासिक वास्तूचा वारसा औरंगाबादला लाभला आहे. त्यामुळेच पर्यटननगरी अशी ओळख निर्माण झाली. मात्र, पायाभूत सुविधेचा अभाव, कचराकोंडी, पाणी पुरवठ्याची समस्या यासह गेल्या काही महिन्यात कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न यामुळे पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ५२ दरवाजे आणि ५० पुऱ्याचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात आता बोटावर मोजता येईल ऐवढचे दरवाजे शिल्लक राहिले आहेत. अर्थात, काही दरवाज्याचे संवर्धन, जतनासाठी पुढाकार घेतला असला तरी ते पुरेसे नाही. तटबंदीचे केवळ काही अवशेष शिल्लक आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे जायकवाडी पक्षी अभयारण्य, गौताळा अभयारण्यासह धार्मिक पर्यटनच्या दृष्टीने या शहराचे मोठे महत्त्व आहे, पण वन पर्यटनाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. पर्यटन उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता आहे. औरंगाबादेत त्यादृष्टीने मोठी क्षमता आहे. पर्यटननगरी ही ओळख कायम ठेवण्यासाठी त्याकडे अधिक गांभीर्याने पाहात, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना होणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राखी बनविणे कार्यशाळेचे येत्या बुधवारी आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लाडक्या भाऊरायाला राखी पौर्णिमेच्या दिवशी आकर्षक राखी बांधली पाहिजे, अशी प्रत्येक बहिणीची अपेक्षा असते. ही आकर्षक राखी आपण स्वत: तयार केलेली असेल, तर फारच उत्तम, पण राखी तयार करायची कशी? असा प्रश्न समोर असेल. राखी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी गरवारे कम्युनिटी सेंटर आणि 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे येत्या बुधवारी (२२ ऑगस्ट) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सिडकोतील गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये गुरुवारी दुपारी चार वाजता या कार्यशाळेला सुरुवात होणार आहे. विविध प्रकारच्या आकर्षक राख्या तयार करण्याचे प्रशिक्षण कार्यशाळेत देण्यात येणार आहे. ही कार्यशाळा सर्वासंसाठी खुली आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी साहित्य मात्र सोबत आणावे लागेल. कार्यशाळेसाठी येताना सोबत लोकर (कोणत्याही रंगाची, एक बंडल), फेव्हिकॉल, कात्री, कार्यशीट पेपर (कोणताही रंग), मोठे मोती, कुंदन, स्पार्कल, फोम शीट, बॉल पेन किंवा पेन्सिल आदी साहित्य सोबत आणावे. कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

- स्थळ : गरवारे कम्युनिटी सेंटर, सिडको

- दिनांक : २२ ऑगस्ट

- वार : बुधवारी

- वेळ : दुपारी चार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संत एकनाथ’चा हिशेब जुळेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

तडजोड झाल्यानंतर संत एकनाथ घायाळ कंपनीच्या ताब्यात आला असला तरी शीला अतुल शुगर टेक व संचालक मंडळात कारखान्याचे देणी देण्यावरून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. यामुळे कारखान्याचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक मंडळ व सचिन घायाळ कंपनीमध्ये तडजोड झाल्याने कारखाना पुन्हा घायाळ कंपनीच्या ताब्यात आला आहे. घायाळ कंपनीने कारखाना सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, गेल्या वर्षी भाड्याने कारखाना घेणाऱ्या शीला अतुल शुगर टेक कंपनी व संचालक मंडळात एकमेकांच्या देणी देण्यावरून वाद उभा राहिला आहे. शीला अतुल शुगर टेक कंपनीतर्फे तीन ऑगस्ट रोजी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. बोर्डे यांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यानुसार, शीला अतुल शुगर टेक कंपनीने सुमारे नऊ कोटी ३३ लाख रुपये खर्च केला आहे. यापैकी कंपनी भाडे, गाळप, कामगारांचा पीएफ, कामगारांचा ओव्हरटाइम, तोडणी वाहतूकदार अनामत व उसाच्या वाढीव हप्त्याचे पाच कोटी सात लाख रुपयांचा उल्लेख आहे. संत एकनाथ कारखान्याच्या संचालकांनी कंपनीची फरकाची रक्कम चार कोटी ५९ लाख रुपये देणाची मागणी शीला अतुल कंपनीने केली आहे. कार्यकारी संचालक बोर्डे यांनी हा दावा फेटाळला आहे. शीला अतुल कंपनीला कोणतेही देणे नसून उलट त्यांच्याकडे कारखाना भाडे, शेतकऱ्यांची देणी, तोडणी मजुरी, कामगारांचा पीएफ व एफआरसी आदी एकूण जवळपास नऊ कोटी थकबाकी आहे, असा दावा कार्यकारी संचालकांनी केला आहे.

\Bशीला अतुल कंपनीने कारखान्यावर केलेला खर्च \B

कारखाना दुरुस्ती ४ कोटी ९७ लाख

गोदामात शिल्लक साखर ३ कोटी ९ लाख

कामगार पगार वाटप १ कोटी

स्क्रॅप मटेरियल ६० लाख

एकूण ९ कोटी ३३ लाख

\Bशीला अतुल कंपनी खालील देणी देण्यात तयार\B

भाडे व प्रतिटन १०० प्रमाणे १ कोटी ४५ लाख

कामगारांचा पीएफ ३० लाख

कामगारांचा ओव्हरटाइम ५ पाच लाख

बँकेची एकूण रक्कम १ कोटी ३७ लाख

तोडणी कामगार अनामत ३७ लाख

उसाचे वाढीव पेमेंट १ कोटी

एकूण ५ कोटी ७ लाख

\Bसंचालक मंडळानुसार शीला अतुल कंपनीकडे येणे\B

कारखाना भाडे ३ कोटी ३५ लाख

शेतकऱ्यांची थकबाकी १ कोटी ६८ लाख

तोडणी कामगार २ कोटी ३७ लाख

कामगारांचा पीएफ ३३ लाख

एफआरसी रक्कम १ कोटी

एकूण ९ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सदाचार संवर्धक’तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील सदाचार संवर्धक ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने संस्थेच्या सदस्यांच्या दहावी व बारावीतील गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला. तसेच भगवान बाबा बालिकाश्रमातील होतकरू आठ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम रविवारी (१९ ऑगस्ट) विश्वभारती कॉलनीतील विश्वेश्वर महादेव मंदिरात पार पडला.

याप्रसंगी 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक प्रमोद माने, संस्थेचे अध्यक्ष अविनाश देशपांडे, उपाध्यक्ष अशोक भालगावकर, सचिव अनिल चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी दहावीतील नऊ, तर बारावीतील एका, अशा दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात सहस्त्रचंद्र दर्शनानिमित्त (८० वर्षे) कुसुम विनयराज कल्याणीकर यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचवेळी अमृत महोत्सवानिमित्त शरद शांभदेव देऊ‍ळगावकर, जगदीश शंकर अभ्यंकर व कलावती पुंजाराम सराईतकर यांनाही गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश देशपांडे, तर सूत्रसंचालन अनिल चौधरी यांनी केले. कलावती उबाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. स्वाती बोराडे यांना पीएच. डी.

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रा. स्वाती बोराडे यांना भौतिकशास्त्र विषयात पीएच. डी. प्रदान केली. डॉ. के. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 'इन्वेस्टीगेशन ऑफ फिजिकल अँड मॅग्नेटिक ऑफ सम स्पिनेल फेराइट नॅनोपार्टिकल सिंथेसाइज व्हाया नॉनकनव्हेशनल मेथड' या विषयावर संशोधन केले. प्रा. बोराडे या शासकीय तंत्रनिकेतन येथे अधिव्याख्याता पदावर कार्यरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ विद्यार्थी ‘नेट’ उत्तीर्ण

$
0
0

औरंगाबाद : जुलै महिन्यात झालेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेत (नेट) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. विभागाचे नऊ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांत सुनील दाभाडे, ज्ञानेश्वर तिखे, कौशल्या बागूल, क्रांती गायकवाड, समाधान खलसे, रामप्रसाद वाव्हळ, बापूराव वराडे, सबाना तडवी आणि पूजा कदम यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. भाऊसाहेब ढवळे यांना पीएच. डी.

$
0
0

औरंगाबाद : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने प्रा. भाऊसाहेब सुखदेव ढवळे यांना वाणिज्य विषयात पीएच. डी. प्रदान केली. डॉ. प्रभाकर हरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली 'ए रोल ऑफ महाराष्ट्रा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ टुरिझम इन मराठवाडा रिजन' या विषयावर त्यांनी संशोधन केले. प्रा. ढवळे हे विद्याधन महाविद्यालयात कार्यरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवक महोत्सवाला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सप्टेंबर महिन्यात आयोजित केलेल्या केंद्रीय युवक महोत्सवाला विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. ऑगस्ट महिन्यात तासिका सुरू झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात युवक महोत्सव घेणे योग्य ठरणार नाही. विद्यार्थ्यांना महोत्सवाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ न देता विद्यापीठ प्रशासन महोत्सव केवळ उरकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी केंद्रीय युवक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाशी संलग्नित ४१९ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना महोत्सवात सादरीकरणाची संधी देण्यात आली आहे. दरवर्षी दिवाळीच्या सुटीनंतर महोत्सव होतो. या कालावधीत पदवी-पदव्युत्तर सत्र परीक्षा असल्यामुळे विद्यार्थी उपस्थित नसतात. फक्त सव्वाशे महाविद्यालये सहभागी असल्यामुळे महोत्सवाचा उद्देश संपला होता. महोत्सवाच्या सरावासाठी वेळ मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी सहभाग कमी केला होता. हा महोत्सव सप्टेंबर किंवा डिसेंबर महिन्यात घेण्याची मागणी होती. परीक्षा आणि महोत्सवात योग्य अंतर ठेवून प्रशासनाने यावर्षी पाच ते आठ सप्टेंबर या कालावधीत युवक महोत्सव आयोजित केला आहे. प्रत्येक महाविद्यालयांना महोत्सवात सहभागी होण्यासाठी परिपत्रक काढले आहे. प्रशासन नियोजन न करता घाईघाईत महोत्सवर उरकत असल्याची टीका विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना कला सादरीकरणाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. याबाबत संघटनेने विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. मुस्तजिब खान यांना निवेदन दिले. यावेळी अमोल दांडगे, दीपक बहीर, दिक्षा पवार उपस्थित होते. महोत्सवाचा दर्जा उंचावण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे नियोजित तारखेत बदल करण्यात यावा आणि पुरेसा अवधी द्यावा असे निवेदनात म्हटले आहे. कॅम्पस आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनीही सप्टेंबर महिना युवक महोत्सवासाठी योग्य नसल्याचे म्हटले आहे. परीक्षेचा कालावधी वगळण्यासाठी प्रशासनाने डिसेंबर महिन्यात महोत्सव घ्यावा असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

\Bप्रशासनाची अडचण

\Bयावर्षी शैक्षणिक वेळापत्रकानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सत्र परीक्षा होणार आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात युवक महोत्सव घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. महोत्सवाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस पडण्याची दाट शक्यता असल्यामुळे महोत्सव घेणे जिकिरीचे ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी विरोध केल्यामुळे प्रशासनाची अडचण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विंदा हे स्वत:च्या जाणिवेशी एकनिष्ठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शंभर वर्षांनंतरही कवी विंदा करंदीकर महत्त्वाचे वाटतात. कारण, त्यांची कविता समकालीन आहे. कविता वाचताना जणू ती आजच्या गोष्टींबद्दल सांगते असे वाटते. त्यामुळेच स्वत:च्या जाणिवेशी एकनिष्ठ असणारा हा कवी श्रेष्ठ ठरतो,' असे प्रतिपादन कवी प्रा. दासू वैद्य यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान औरंगाबाद व स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीने कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'स्वच्छंद ' कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित कार्यक्रम रविवारी गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीच्या सभागृहात झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कवी दासू वैद्य यांनी केले. यावेळी मंचावर डॉ. श्रीरंग देशपांडे, डॉ. संजय मोहोड, वामन पंडीत आणि ज्येष्ठ पत्रकार दीपक पटवे उपस्थित होते. विंदांचे व्यक्तिमत्त्व आणि कवितेवर दासू यांनी भाष्य केले. 'समीक्षक, अनुवादक, कवी असलेले करंदीकर मराठी साहित्याला समृद्ध करुन गेले. त्यांचे मोठेपण शंभर वर्षांनंतरही टिकून आहे. मध्य प्रदेश सरकारने विंदांना कबीर सन्मान प्रदान केला होता. या पुरस्काराची रक्कम विंदांनी किल्लारी भूकंपग्रस्तांना दिली होती. प्रदेशाच्या पलीकडे जाणारी ही दानत होती' असे दासू म्हणाले.

\Bसमग्र साहित्याचे दर्शन \B

विंदांच्या समग्र साहित्याचे दर्शन घडविणारा 'स्वच्छंद' कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरला. या कार्यक्रमाची संहिता डॉ. विद्याधर करंदीकर यांची होती. निर्मिती, संकल्पना, नेपथ्य वामन पंडीत, संगीत माधव गावकर यांचे होते. वामन पंडित, अनिल फराकटे, प्रसाद घाणेकर, विद्यागौरी ताम्हनकर, माधव गावकर यांनी विंदांच्या आठवणींना उजाळा देत कविता सादरीकरण केले. 'तन मन धन अर्पाया देई चेतना' या कवितेने सुरुवात झाली. 'स्वेदाचीही ही अखंड गंगा' ही कविता नवीन पैलू उलगडून गेली. विंदांचे उपहासाने भरलेले, पण गंभीर आशयाचे चुटके दाद मिळवून गेले. शेक्सपीअर लिखित 'किंग लिअर'चे विदांनी भाषांतर केले होते. अतिरिक्त संतापाची ही शोकांतिका मराठीतही तेवढ्याच ताकदीने लिहिली गेली असे घाणेकर यांनी सांगितले. वैविध्यपूर्ण कवितांनी कार्यक्रम रंगत गेला. या उपक्रमासाठी सुबोध जाधव, गणेश घुले, महेश अचिंतलवार, श्रीराम पोतदार, श्रीकांत देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सचिन जहाल हिंदुत्ववादी असल्याचा कयास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संशयावरून सचिन अंदुरे याला अटक झाल्याने राजाबाजारमधील घरमालक व परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे. सचिन सोशल मीडियावरही सक्रीय होता, त्याच्या पोस्ट जहाल हिंदुत्ववादी विचारसरणी दर्शविणाऱ्या आहेत. त्यामुळे तो जहाल हिंदुत्ववादी असल्याचा कयास व्यक्त होत आहे.

नालासोपारा येथे सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी अटक केलेल्या शरद कळसकर (रा. केसापुरी, ता. औरंगाबाद) याने दिलेल्या माहितीवरून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सचिन अंदुरे याला १४ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणात त्याचा सहभाग असल्याच्या संशयावरून सीबीआयने त्याला अटक केली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. अंदुरे हा राजाबाजारमधील राधाकृष्ण शिंदे यांच्या वाड्यात भाडेकरू होता. त्याने साधारणत: दहा महिन्यांपूर्वीपासून खोली भाड्याने घेतली. तो येथे पत्नी व चार महिन्यांच्या मुलगीसह राहत होता. त्याच्या अटकेची माहिती समजल्यानंतर सचिन राहत असलेल्या परिसरातील नागिरकांनी त्याच्या घराभोवती शनिवारी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. घरमालक राधाकृष्ण शिंदे यांनी 'मटा'ला सांगितले की, तो नियमित कोणाशी बोलत नव्हता, अबोल होता. एका कापड दुकानात नोकरी करायचा, त्याची पत्नीही कामावर जायची. त्यामुळे संध्याकाळी कधी समोरासमोर भेट झाली, तर तेवढ्यापुरते बोलणे व्हायचे. याशिवाय त्याबद्दल इतर माहिती नाही. खोडी भाड्याने देताना ११ महिन्यांचा भाडेकरार केला आहे. खोली भाड्याने मागण्यास आला असता बाहेरगावाहून आल्याचे त्याने सांगितले होते, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

सचिन अंदुरे याने सरस्वती भुवन महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्याचा प्रेमविवाह असून त्याची पत्नीही याच कॉलेजची विद्यार्थिनी होती. त्यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सचिन अकाउंटिंगची कामे करायचा, असे समोर आले आहे.

\Bसोशल मीडियावर 'जहाल हिंदुत्ववादी'\B

सचिन अंदुरे हा सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टबाबत माहिती एकत्र केल्याचे कळते. त्याने टाकलेल्या बहुतांश पोस्ट या कट्टर आणि जहाल हिंदुत्ववादी विचारसरणीशी निगडीत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. नरसिंहाने हिरण्यकश्यपुचे पोट फाडलेले यासह प्रखर हिंदुत्ववादी पोस्ट त्याने टाकल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सचिन निर्दोष; पत्नीचा दावा

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिनचा काहीही संबंध नाही. तो पूर्णत: निर्दोष आहे,' असा दावा संशयित सचिन अंदुरेची पत्नी शीतल अंदुरे यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

शीतल अंदुरे यांनी तीन महिन्यांच्या लेकराला कवेत घेऊन घटनाक्रमाबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, '१४ ऑगस्ट रोजी क्रांतीचौक पोलिस ठायातून सचिनला बोलविण्यात आले. पथकाने राजाबाजार परिसरातील कुंवारफल्ली गल्लीतील किरायाने राहणाऱ्या घराची तपासणी केली. त्यानंतर सचिन आणि त्याच्या मोठ्या भावाला ताब्यात घेतले. १६ ऑगस्ट रोजी औरंगपुऱ्यात माझ्या माहेरी सचिनला सोडले. त्यानंतर लगेच सीबीआयचे एम. एस. पाटील यांनी सचिनला ताब्यात घेतले. ही माहिती कुणाला दिल्यास सचिनच्या जीवाला धोका आहे. यामुळे कारवाईची वाच्यता करू नका, असा सल्लाही दिला. दोन वर्षांपूर्वी माझा सचिनशी प्रेमविवाह झाला होता. ते कुठेही जात नव्हते. फक्त अकोला येथे राहणाऱ्या बहिणीशी भेटायला जात. २०१६च्या जानेवारीत सचिनच्या वडिलांचे निधन झाले. त्याच वर्षी आईचेही निधन झाले. त्यावेळी आम्ही धावणी मोहल्ल्यात राहत होतो. सचिन निर्दोष आहेत', असा दावा त्यांनी केला. दरम्यान, सचिनच्या अटकेनंतर रविवारी दिवसभर शहरात तीन ते चार ठिकाणी पथकाकडून शोध मोहीम सुरू असल्याची चर्चा होती. गारखेडा भागातही एका घराची पथकाकडून तपासणी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अशी तपासणी झाली किंवा नाही याबाबत 'एटीएस'कडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

पांगारकरांच्या नावाने जालन्यात खळबळ

जालना : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी जालन्यात हिंदुत्ववादी संघटनांचे काम करणारा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर याला शनिवारी ताब्यात घेतले आहे. जुन्या जालन्यातील निवासस्थानी दहशतवाद विरोधी पथकाने झडतीही घेतली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. पांगारकर शिवसेनेचा माजी नगरसेवक तसेच हिंदू जनजागृतीच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय होता. त्याचे वडील जगन्नाथ पांगारकर भाजपचे माजी नगरसेवक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधनवार्ता - बाबूराव राऊत

$
0
0

औरंगाबाद: रहिमाबाद (ता. सिल्लोड) येथील रहिवासी बाबूराव दगडूजी राऊत यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर पैठण रोड परिसरातील इटखेडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी डीन डॉ. वीणा पाटील यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) माजी अधिष्ठाता डॉ. वीणा पाटील (वय ७०) यांचे रविवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी (२० ऑगस्ट) सकाळी साडेनऊला दशमेशनगर येथील निवासस्थानापासून निघेल व अंत्यसंस्कार प्रतापनगर स्मशानभूमीत होतील. त्यांच्या मागे पती व ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. पी. एस. पाटील, डॉ. ऋषिकेश व डॉ. अनिरुद्ध ही मुले, डॉक्टर स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images