Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आर्थिक मदत देण्यास नियमाआडून चालढकल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा क्रांती आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या नागरिकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. परंतु, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास पालिकेचे प्रशासन नियमांच्या आडून चालढकलपणा करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मराठा समाज आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे, प्रमोद पाटील, उमेश एडाईत, कारभारी शेळके यांनी आत्महत्या केली आहे या चार जणांच्या कुटुंबांना पालिकेतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले आहेत. मात्र, त्याला तीन आठवडे उलटूनही पालिकेतर्फे अद्याप मदत दिली नाही, असे शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी सहा ऑगस्ट रोजीच्या सर्वसाधारण सभेत महापौरांच्या लक्षात आणून दिले होते. तेव्हा आवश्यक बाबींची पूर्तता करून १७ ऑगस्ट रोजी त्या कुटुंबांना मदत द्या, असे आदेश महापौरांनी लेखा विभागाला दिले होते. या आदेशाचीही अंमलबजावणी झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लेखा विभाग मदत देण्यासंबंधीच्या नियमांची शोधाशोध करत आहे. महापालिका अधिनियमाच्या कोणत्या नियमानुसार मदत द्यायची, हे निश्चित होत नसल्यामुळे मदत लांबणीवर पडत आहे.

मदतीच्या संदर्भात सर्वसाधारण सभेने घेतलेला ठराव प्रशासनापर्यंत जाण्यास वेळ लागला आहे. आता ठराव प्रशासनाला मिळाला आहे. मदत देण्यात नियमाची काही अडचण येणार नाही. शुक्रवारपर्यंत त्या कुटुंबांना मदत पोचवली जाईल.

-नंदकुमार घोडेले, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘उडान’मध्ये औरंगाबादच्या समावेशाची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी उडान योजनच्या तिसऱ्या यादीत औरंगाबाद विमानतळाचा समावेश होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विमान प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली.

देशभरात अनेक लहान शहरात विमान धावपट्टी तयार करण्यात आली. मात्र त्यांचा उपयोग केला जात नव्हता. अशा शहरातून मोठ्या किंवा महत्त्वाच्या शहरांना जोडून सर्वसामान्य नागरिकांना विमान प्रवास करता येईल, यासाठी केंद्र शासनाच्या नागरी उड्डयन मंत्रालयाने 'उडान' योजना सुरू केली. या योजनेची तिसरी यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्यात औरंगाबादचा समावेश करण्यात येणार असल्याचे समजते. औरंगाबाद पर्यटन शहर असून येथून दिल्ली, हैदराबाद, मुंबईसाठी विमान सेवा उपलब्ध आहे. औरंगाबादमधून जयपूर, उदयपूर, गोवा आणि बेंगळुरुसाठी विमान सेवा उपलब्ध झाल्यास पर्यटन आणि व्यवसायाला चालना मिळणार आहे.

विमान कंपन्यांकडून चाचपणी

औरंगाबादहून विमान सेवा सुरू करण्याबाबत इंडिगोसह अन्य विमान कंपन्यांकडून चाचपणी करण्यात आली आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यासाठी फ्लाय एअर कंपनीनेही चाचपणी केली आहे. उडाण योजनेंतर्गत विमान सेवा सुरू झाल्यास या कंपन्यांकडून विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बकरी ईदनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बकरी ईदनिमित्त बुधवारी छावणी येथे नमाज अदा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिक व वाहनांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी सहा ते अकरापर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. बंद मार्ग व पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे:

\Bबंद मार्ग\B

सकाळी सहा ते अकरापर्यंत मिलिंद चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटपर्यंतचा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद राहील.

\Bपर्यायी मार्ग व वाहतूक व्यवस्था\B

- नमाज अदा करण्यासाठी छावणीत टाऊन हॉल, मकई गेटकडून येणाऱ्या वाहनांची पार्किंग डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात केली आहे.

- ज्युबली पार्क, पाणचक्कीकडून येणाऱ्या वाहनांची पार्किंग डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या आवारात आहे.

- मिलकॉर्नर, बारापुल्ला गेट कडून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंग मिलिंद विज्ञान महाविद्यालयाच्या मागील मैदानात आहे.

- छावणी परिसरातून मिलिंद चौक मार्गे येणाऱ्या वाहनांच्या पार्किंग मिलिंद विज्ञान महाविद्यालयासमोरील वाहनतळावर आहे.

-पोलिस, शासकीय अधिकारी, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, दंडाधिकारी व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून वगळण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका लेखा विभागाचे ऑडिट रखडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लेखा परीक्षणासाठी महापालिकेच्या लेखा विभागाकडून फाइलच मिळत नसल्यामुळे दोन वर्षांपासून या भागाच्या लेखा परीक्षणाचे काम रखडले आहे. वारंवार मागणी करून देखील फाइल दिल्या जात नसल्यामुळे लेखा विभागाच्या कारभाराबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

दरवर्षी प्रत्येक विभागाचे लेखा परीक्षण होणे गरजेचे आहे. महापालिकेच्या लेखा परीक्षण विभागातर्फेच लेखा परीक्षण केले जाते. इतर विभागांप्रमाणे लेखा विभागाचे लेखा परीक्षण देखील लेखा परीक्षण विभागातर्फे केले जाणे अपेक्षित आहे. परंतु, या कामासाठी लेखा विभाग प्रतिसाद देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांच्या फाइल लेखा विभागाने लेखा परीक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या नाहीत. फाइल मिळाव्यात यासाठी लेखा परीक्षण विभागाने वारंवार पत्रव्यवहार केला. वारंवार मागणी करूनही लेखा परिक्षणासाठी फाइल उपलब्ध करून दिल्या जात नसल्यामुळे लेखा विभागाच्या कारभाराबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

सभापतींचे आदेश

दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या स्थायी समिती बैठकीत सभापती रेणुकादास वैद्य यांनी मुख्य लेखा परीक्षकांना लेखा विभागाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. पण त्या विभागाकडून फाइलच मिळत नसल्यामुळे लेखा परीक्षण, कसे करायचे असा सवाल मुख्य लेखा परीक्षकांनी उपस्थित केला होता. त्याचाच संदर्भ देत सभापती वैद्य यांनी आयुक्तांना पत्र दिले असून लेखा परिक्षणासाठी फाइल उपलब्ध करून देण्याचे आदेश लेखा विभागाला द्या, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक स्थलांतराविरोधात उपोषण सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

पीरबावडा (ता. फुलंब्री) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे स्थलांतर करू नये या मागणीसाठी पीरबावडा आणि परिसरातील गावकऱ्यांनी सोमवारपासून (२० ऑगस्ट) बँकेच्या शाखेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सकाळी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करून, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बेमुदत आमरण उपोषण चालू करण्यात आले.

उपोषणास टाकळी कोलते, रिधोरा, धानोरा, गेवराई गुंगी, मारसावळी, गिरसावळी, रांजणगाव, पीरबावडा येथील शेकडो खातेधर यांनी येऊन भेट देत आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यात प्रामुख्याने अध्यक्ष व संचालक मंडळ; तसेच बँक प्रशासनाने विनाकारण बँक स्थलांतराचा घेतलेला ठराव व वेळोवेळी संबंधित गावातील खातेदार यांची केलेली दिशाभूल व सत्तेचा केलेला दुरुपयोग यासंबधी अनेक अपंग, वयोवृद्ध व खातेदार यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

दरम्यान, सायंकाळी उशिरा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिष्टमंडळाने उपोषणार्थिंची भेट घेतली. बँकेचे अध्यक्ष व इतर जबाबदार पदाधिकारी यांनी येऊन लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका उपोषणार्थींनी मांडली. त्यामुळे या शिष्ट मंडळास परतावे लागले. शिष्टमंडळात व्यवस्थापक वाय. एम. बावीस्कर, आर. के. भोजने, एस. एम. गजहंस, कर्मचारी प्रतिनिधी के. यू. गोरडे, लोन ऑफिसर सुरेश कोलते यांचा समावश होता.

\B दहा महिन्यांपासून नऊ गावांचा लढा\B

नोव्हेंबर २०१७पासून संबंधित नऊ गावातील ग्रामस्थ बँक स्थलांतरास विरोध करत आहेत. यासंदर्भात ग्रामपंचायात व सेवा सोसायटीच्या अध्यक्ष यांनी ठराव घेऊन ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष व संचालकांना दिले, परंतु काही महिन्यांनंतर अध्यक्ष व बँक प्रशासनाने फर्निचरसाठी निविदा मागविल्या. त्याला नऊ गावांतील ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत हजारोंच्या संख्येने 'रास्ता रोको' आंदोलन केले. त्यावेळी बँकेच्या सरव्यवस्थापकांनी,'बँक आहे तिथेच राहील,' असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर पुन्हा स्थलांतराच्या हालचालींना वेग आल्यामुळे बेमुदक उपोषण करावे लागत असल्याच आंदोलकांनी सांगतिले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खिसेकापूंनी ७३ हजार लांबवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात खिसेकापूंनी धुमाकूळ घालीत तीन प्रवाशांचे ७३ हजार रुपये लांबवले. मध्यवर्ती बसस्थानक व महावीर चौकात रविवारी हे प्रकार घडले. याप्रकरणी वेदांतनगर व क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पाकिटमारीची पहिली घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजता मध्यवर्ती बसस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक सात येथे घडली. शिवाजी गोपालराव देशमुख (वय ५४ रा. कांचनवाडी) हे प्रवासी बाहेरगावी जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर बसची वाट पाहत उभे होते. यावेळी खिसेकापूंनी त्यांच्या पँटच्या मागच्या खिशात असलेले पाकीट लंपास केले. या पाकिटात तीन हजार ९३० रुपये होते. पाकिटमारीची दुसरी घटना देखील याच ठिकाणी घडली. प्रवासी महेश कारभारी गायकवाड यांचे देखील पाकीट चोरट्यांनी लांबवले. या पाकिटात रोख ५०० रुपये होते. या दोन्ही घटनांप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक गायकवाड याप्रकरणी तपास करीत आहेत.

पाकिटमारीची तिसरी घटना रविवारीच दुपारी सव्वातीनच्या सुमारास महावीर चौकाजवळ घडली. उत्तम जिजा सावंत (वय ६८, रा. वडगाव, ता. सिंदखेड राजा) हे जेष्ठ नागरिक शहरात मुलाला भेटण्यासाठी आले होते. सिंदखेड राजा ते औरंगाबाद या एसटी बसने ते शहरात आले. महावीर चौकात ते उतरले होते. यावेळी उतरताना खिसेकापूंनी संधीचा फायदा घेत त्यांच्या बनियनचा आतला खिसा कापून ६९ रुपये लंपास केला. खाली उतरल्यानंतर काही वेळाने सावंत यांच्या लक्षात हा प्रकार आला. याप्रकरणी सावंत यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएसआय घोरपडे याप्रकरणी तपास करीत आहेत.

\Bसीसीटीव्ही नावालाच\B

महावीर चौक, मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात या घटना घडल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, मात्र हे कॅमेरे बंद असल्याने शोभेच्या वस्तू ठरत आहेत. मध्यवर्ती बसस्थानकात पोलिस चौकी देखील आहे, मात्र या ठिकाणी चोऱ्यांच्या घटना नेहमीच घडत असल्याचे दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रेन डेड बाळंतिणीचे अवयवदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बाळंत झाल्यानंतर अचानक मेंदुमध्ये रक्तस्त्राव होऊन उपचारादरम्यान ब्रेन डेड झालेल्या विवाहितेच्या अवयवदानाचा धीरोधात्त निर्णय तिच्या नातेवाईकांनी घेतला आणि त्यानंतर अवघ्या २५ वर्षीय बाळंतिणीच्या अवयवदानाच्या हालचालींना मंगळवारी (२१ ऑगस्ट) सायंकाळी वेग आला. सद्यस्थितीत ही अवयवदानाची प्रक्रिया शहरातील माणिक हॉस्पिटलमध्ये सुरू असून, हृदय, फुफ्फुस, यकृत, दोन्ही मूत्रपिंड, बुब्बळ आदी अवयवदांच्या दानासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्यक्षात अवयवदानाची शस्त्रक्रिया बुधवारी सकाळी होणार आहे.

खान्देशातील जळगाव-भुसा‍वळ परिसरातील संबंधित २५ वर्षीय बाळंतिण महिला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल होती. मुदतपूर्व प्रसुतीनंतर संबंधित महिलेच्या मेंदुमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि उपचारादरम्यान ती ब्रेन डेड झाली. त्यानंतर नातेवाईकांनी तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला आणि अयवदानासाठी तिला शहरातील माणिक हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. हॉस्पिटलमधील ब्रेन डेड कमिटीने वैद्यकीय चाचण्या करुन संबंधित महिलेला ब्रेन डेड घोषित केले. याबाबत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता होत असतानाच प्रत्यारोपणासाठी रुग्णांचा देशपातळीवर शोधदेखील सुरू आहे. यामध्ये हृदय तसेच यकृताच्या प्रत्यारोपणासाठी चेन्नईमध्ये प्रयत्न सुरू असून, दोन्ही मूत्रपिंड शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच यकृताचे प्रत्यारोपण नागपूरमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुब्बळांचे प्रत्यारोपण शहरामध्येच होणार आहे. ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकांनी सर्व अवयवांच्या दानाचा निर्णय घेतल्याने अधिकाधिक अवयवांच्या दानाचा प्रयत्न सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात किती अवयवांचे दान होणार आहे, हे बुधवारी स्पष्ट होणार आहे.

\Bएअर अॅब्युलन्स तसेच अंतराचा प्रश्न

\Bहृदय प्रत्यारोपण हे अवघ्या चार ते साडेचार तासांत होणे अत्यावश्यक असल्याने एअर अॅब्युलन्सशिवाय ते शक्य होणार नाही. तसेच अंतर हादेखील मोठा अडळा असून, अधिक कालावधीसाठी दात्या रुग्णाच्या प्रकृतीने साथ देणेदेखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाजपेयींचा अस्थीकलश उद्या शहरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थीकलश गुरुवारी (२३ ऑगस्ट) सकाळी आठ ते अकरा या वेळेत उस्मानपुरा येथील भाजप कार्यालय दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे,अशी माहिती भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी व जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी दिली.

देशभरातील कोट्यवधी जनतेला वायपेयी यांच्याबद्दल प्रेम, आपुलकी, आस्था, जिव्हाळा आहे. त्यांना त्यांचे अंतिमदर्शन घेण्यासाठी दिल्ली येथे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी अस्थीकलश येथे आणण्यात येत आहे. जनतेने अस्थिकलशाचे दर्शन घ्यावे, तसेच नदी-संगमावर अस्थीविसर्जन व्हावे, असे नियोजन केले आहे. उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयात सकाळी आठ ते अकरा या वेळेत अस्थीकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर तो दुपारी जालना व परभणी येथे ठेवण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (२४ ऑगस्ट) नांदेडमध्ये नागरिकांसाठी दर्शनासाठी अस्थीकलश ठेवला जाईल व गोदावरी नदीत अस्थीविसर्जन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटातील रेल्वेमार्ग मराठवाड्यासाठी गरजेचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'प्रस्तावित दौलताबाद-चाळीसगाव रेल्वे मार्ग मराठवाडा व उत्तर भारताचा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे. पंतप्रधान कार्यालयात जाऊन या रेल्वे प्रकल्पाची माहिती घेणार आहे,' अशी माहिती गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

प्रस्तावित दौलताबाद-चाळीसगाव रेल्वेमार्ग लाभदायक नसल्याने रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती मराठवाडा रेल्वे कृती समितीला पंतप्रधान कार्यालयाने कळवली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून या मागणीसाठी पाठपुरावा करणाऱ्यांना धक्का बसला आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग बांधणीची घोषणा झाल्यानंतर त्यासोबतच हा मार्ग टाकावा, अशी मागणी आमदार बंब यांनी केली होती. या मागणीला तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यकाळात मान्यता देण्यात आली. सत्तांतर झाल्यानंतर आमदार बंब यांनी पाठपुरावा केल्यामुळे तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी सर्वेक्षणाची घोषणा केली होती.

'आयआयटी रुडकीतर्फे झालेल्या सर्वेक्षणात हा ९३ किलोमिटरचा रेल्वेमार्ग १३.५ टक्के फायदेशीर असल्याचे समोर आले होते. सर्वसाधारणत: १२ टक्के फायदा असावा, असे गृहित धरले जाते. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाला रेल्वे विभागाकडून तोट्याचा मार्ग आहे, अशी माहिती कशी काय दिली, याची माहिती घ्यावी लागेल. पंतप्रधान कार्यालयाकडे आलेल्या तक्रारींचा निपटारा त्वरित व्हावा यासाठी रेल्वे विभागाने अशी माहिती दिली असावी,' असी शंका आमदार बंब यांनी उपस्थित केली. दिल्लीत येथे जाऊन याची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

'मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी हा रेल्वेमार्ग होणे आवश्यक आहे. डीएमआयसीमधील व इतर उत्पादने उत्तर भारतात पाठविण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या पर्यटकांसाठीही हा मार्ग सोयीस्कर राहणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प हातचा जाऊ देणार नाही,' असे आमदार बंब यांनी सांगितले.

……………………

\Bकन्नड येथे आज बैठक \B

दौलताबाद-चाळीसगाव रेल्वेमार्ग झाल्यास कन्नड तालुक्यातील जनतेची मोठी सोय होणार आहे. हा मार्ग रद्द झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कन्नड तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी कन्नड येथील विश्रामगृहात बुधवारी (२२ ऑगस्ट) बैठक आयोजित केली आहे, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीच्या पित्यावर चाकुहल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलीचे लग्न आपल्यासोबत न लावता दुसऱ्यासोबत लावल्याने तिच्या वडिलांवर माथेफिरू तरुणाने चाकुने प्राणघातक हल्ला केला. हा प्रकार विवारी दुपारी साडेबारा वाजता फाजलपुरा भागात घडला. याप्रकरणी संशयित आरोपीवर खुनाचा प्रयत्न व अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी जखमी आनंद बाबुराव चांदणे (रा. फाजलपुरा) यांनी तक्रार दाखल केली. चांदणे यांच्या मुलीचा विवाह ठरलेला आहे. रविवारी दुपारी चांदणे नातेवाईकासोबत दुचाकीवर लग्नाचे सामान आणण्यासाठी जात होते. यावेळी फाजलपुरा चौकात समोरून रिक्षामध्ये संशयित आरोपी परमेश्वर हिरवे व त्याचा साथीदार आले. चालत्या दुचाकीवर असलेल्या चांदणे यांच्या छातीत आरोपीने चाकुने वार केला. यामुळे चांदणे व नातेवाईक दुचाकीवरून खाली कोसळले. यावेळी आरोपी त्यांच्याजवळ गेला. 'तुझ्या मुलीचे लग्न माझ्यासोबत न लावता दुसऱ्या सोबत लावतो का? थांब तुला संपवूनच टाकतो,' असे म्हणत पुन्हा छातीवर दोन वार व गळ्यावर तिसरा केला. चांदणे यांनी प्रतिकार केल्याने तोंडावर चाकुचा वार लागला. यावेळी अश्लील शिवीगाळ करीत आरोपी पसार झाले. याप्रकरणी चांदणे यांच्या तक्रारीवरून आरोपी परमेश्वर हिरवे व रिक्षाचालकाविरुद्ध खुनाचा प्रयत्न व अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त शहर विभाग तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडानंतर पावसाचा तडाखा!

$
0
0

म. टा .प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या महिन्यापासून गायब झालेल्या पावसाने आठवड्याभऱ्यात दुसऱ्यांदा दमदार हजेरी लावून मंगळवारी (२१ ऑगस्ट) सकाळी साडेआठपर्यंत नांदेड व हिंगोली जिल्ह्यात दाणादाण उडवली. नांदेड जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे सहा जण वाहून गेल्याची घटना घडली. यातील चार जण मृत झाले असून, दोघांचा शोध सुरू आहे. मराठवाड्यातील एकूण ८३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी ८०.३५ मिलिमीटर पाऊस झाला. नायगाव तालुक्यातील मौ. बरबडा येथील गंगाराम मारुती दिवटे (वय ४० वर्षे), पारुबाई गंगाराम दिवटे (वय ३५ वर्षे) व अनसूया गंगाराम दिवटे (वय ६ वर्षे) हे जीपमधून (क्र. एमएच ३७ जी ५६११) मांजरमकडून नायगाव मार्गे बरबडाकडे जात होते. सोमवारी रात्री उशीरा जीप मांजरम पुलावर आली असता वाहून गेली. त्यांचे मृतदेह स्थानिक आपत्ती शोध व बचाव पथकामार्फत बाहेर काढण्यात आले. हिमायतनगर तालुक्यातील वडगाव येथील मारोती संग्राम बिरकुरे (वय ७० वर्षे), हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथील रहिवासी भारत हरिभाऊ तोरकड (वय ४२ वर्षे) हे दोघे नाल्यात वाहून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे, तर नायगाव तालुक्यातील मौ. बेंद्री येथील रहिवासी विनायक बालाजी गायकवाड (वय ३० वर्षे) हे बेंद्रीच्या पुलावरून वाहून गेले. त्यांचा मृतदेह बेंद्री गावापासून एक किलोमिटर अंतरावर मंगळवारी सकाळी सापडल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यालाही पावसाने चिंब केले. त्यामुळे आता मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५८.२६ टक्के पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत अतिवृष्टी झालेल्या ८३ मंडळांपैकी सर्वाधिक ५९ महसुली मंडळे नांदेड जिल्ह्यातील आहेत. चोवीस तासात मराठवाड्यात ४२.५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ३५.८८ मिलिमीटर, जालना ३१.७५, परभणी ५१.९९, हिंगोली ६१.९६, नांदेड ८०.३५, बीड २७.७१, लातूर २८.४५, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २२.२८ मिलिमीटर पाऊस पडला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत मराठवाड्यात केवळ ५८.२६ टक्के एवढा पाऊस झाला आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४८.१७ टक्के, जालना ५७.२०, परभणी ५७.४१, हिंगोली ७२.०७, नांदेड ७३.५६, बीड ४४.४७, लातूर ५६.२२, तर उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४८.०७ टक्के पाऊस पडला आहे. औरंगाबाद व बीड या जिल्ह्यात तुलनेने कमी पाऊस झाल्यामुळे हे जिल्हे सरासरीच्या तुलनेत पिछाडीवर आहेत. प्रारंभी पाऊस झालेल्या उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यालाही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

\B२६ तालुक्यात निम्माही पाऊस नाही\B

तब्बल महिनाभराच्या मोठ्या खंडानंतर १६ आणि २१ ऑगस्टमध्ये दमदार पाऊस झाला. यामुळे एकूण टक्केवारीत पावसाने अर्धा पल्ला गाठला असला, तरी मराठवाड्यातील तब्बल २६ तालुक्यांमध्ये अद्याप निम्माही पाऊस झाला नाही. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ पैकी सहा तालुक्यांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील तीन, नांदेडमधील एक, बीडमधील आठ, लातूर तीन तर उस्मानाबाद तालुक्यातील तब्बल पाच तालुक्यांचा समावेश आहे. सध्या औरंगाबाद, जालना आणि नांदेड जिल्ह्यात चारशेवर टँकर सुरू आहेत.

\B

अतिवृष्टी झालेली महसूल मंडळे

- औरंगाबाद\B - वडोदबाजार, बनोटी, चिंचोली लिंबाजी

\B- जालना -\B तळणी

\B- परभणी -\B पिंगळी, पालम, पूर्णा, ताडकळस, देऊळगा, पाथरी व हदगाव

\B- नांदेड - \Bनांदेड, तुप्पा, विष्‍णुपुरी, वसरणी, वजिराबाद, नांदेड ग्रामीण, लिंबगाव, तरोडा, मुदखेड, मगट, बारड, अर्धापूर, दाभाड, मालेगाव, भोकर, निनी, मोगाळी, मातुळ, उमरी, सिंधी, गोळेगाव, कंधार, कुरुला, उस्मानपूर, पेठवडजा, फुलवळ, बरुळ, लोहा, माळाकोळी, कलंबर, सोनखेड, शिवडी, कापशी, किनवट, जलधारा, शिवणी, हदगाव, तामसा, पिंपरखेड, तळणी, आष्टी, हिमायतनगर, सरसम, जवळगाव, खनपूर, शहापूर, बिलोली, आदमपूर, लोहगाव, कुंडलवाडी, धर्माबाद, जरीकोट, करखेली, नायगाव, नरसी, मांजरम, बरवडा, कुंटुर व मुखेड

\B- हिंगोली - \Bहिंगोली, माळहिवरा, सिरसम बु., वासंबा, कळमनुरी, नांदापूर, आ. बाळापूर, हयातनगर, औंढा नागनाथ, जवळाबाजार, येळेगाव व साळना\B

- बीड -\B पिंपळगाव गाडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमच्यावर भाष्य करणे अयोग्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मी कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेटसाठी प्रस्ताव सादर केला. सभागृहाने तो फेटाळला. यंदा पुन्हा त्याची गरज लक्षात घेऊन नियोजन केले आहे. चार वर्षांपासून हा प्रश्न विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित करतात. मला त्याविषयी भाष्य करायचे नाही. नानांनी मागणी केलेले रस्ते झेडपीच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन बदलून देण्यात आले. तरीही आमच्या कार्यक्षमतेवर भाष्य करणे योग्य नाही, अशी भूमिका जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी मांडली.

जिल्हा नियोजन समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यक्षमतेवर ताशेरे ओढले होते. कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेटच्या मुद्यावरून बागडे यांनी झेडपीला लक्ष्य केले. त्या पार्श्वभूमीवर भूमिका मांडताना श्रीमती डोणगावकर पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या,'जिल्हा परिषदेत २९ वर्षांत कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट दुरुस्ती, नवीन बसविण्याचा निर्णय झाला नव्हता. मी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बंधाऱ्यांचा प्रश्न निदर्शनास आला. सिंचनक्षमता वाढविण्यासाठी १७ जुलै २०१७ रोजी प्रस्ताव सादर केला, पण सभागृहाने तो फेटाळला. त्यामुळे गेट बसविता आले नाहीत. २०१८मध्ये पाणी अडविण्यासाठी एक कोटी ७५ लाखांची तरतूद उपकरातून केली आहे. निविदा व खरेदी प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होईल. नियमानुसार ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाचे पाणी बंधाऱ्यांमध्ये साठविण्यात येईल. सर्व बंधाऱ्यांच्या गेटखरेदीसाठी ६५ कोटींची आवश्यकता आहे. जिल्हा नियोजन समितीकडे सातत्याने मागणी करूनही निधी उपलब्ध झाला नाही.'

'डीपीसीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असताना झेडपीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रश्नच नाही. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पक्षीय राजकारण न आणता गेटसाठी निधी मागणे अपेक्षित आहे. झेडपी व्यतिरिक्त स्थानिक स्तर लघुसिंचनाचे कितीतरी मोठे बंधारे आहेत, त्यावर कुणी भाष्य करत नाही. कदाचित जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात असल्यामुळे आता मुद्दे उपस्थित केले जात असावेत,' असा दावा श्रीमती डोणगावकर यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधनवार्ता.

$
0
0

प्रतिभा जोशी यांचे निधन

औरंगाबाद : मनिषा कॉलनी येथील रहिवासी प्रतिभा रमाकांत बक्षी (वय ८१, हल्ली मुक्काम पुणे) यांचे सोमवारी (२० ऑगस्ट) निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर पुण्यातील वडगाव खुर्द येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी घेण्यात येणार आहे. २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत ही फेरी चालणार आहे. प्रथम विशेष फेरी मंगळवारी संपल्यानंतर शिक्षण विभागाने या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

महापालिका हद्दीतील अकरावी कॉलेजांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते. २०१८-१९ शैक्षणिक वर्षातील प्रवेशाची प्रक्रिया मेपासून सुरू झाली आहे. चार मुख्य फेरीनंतर विशेष फेरी घेण्यात आली. त्याची मुदत २१ ऑगस्टला संपताच आता प्रवेशासाठी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' राबविली जाणार आहे. त्याचे वेळापत्रकही मंगळवारी जाहीर करण्यात आले. विशेष फेरीसाठी १७७६ विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. प्रत्यक्षात अत्यंत कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' ही फेरी कितपत फायद्याची ठरेल यावर शंका व्यक्त केली जात आहे. ही फेरी तीन गटांमध्ये होणार आहे. २५ ऑगस्ट रोजी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाईल. २७ रोजी गट क्रमांक एक महिला विद्यार्थ्यांना फेरीमध्ये सहभाग घेता येणार आहे. या गटात ८० ते १०० टक्के गुण असलेले विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या विद्यार्थ्यांना २७ रोजी सकाळी १० ते २८ रोजी दुपारी तीनपर्यंत अॅलोकेशन झालेल्या कॉलेजला जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल. २८ रोजी सायंकाळी सहा वाजता गट-२ साठी रिक्त जागांचा तपशिल जाहीर केला जाणार आहे. ही फेरी ६० ते ८० टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी असेल. त्यांना २९ रोजी फेरीमध्ये सहभाग घेता येईल. अॅलोगेशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना २९ रोजी सकाळी १० वाजेपासून ३० रोजी दुपारी तीनपर्यंत प्रवेश घेता येईल. ३० रोजी गट-३साठी रिक्त जागांची तपशिल जाहीर केला जाईल. ३५ टक्क्यावर गुण असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. या विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्ट सकाळी १० वाजेपासून ते १ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. २ सप्टेंबर रोजी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभागृहातील फुटेज देऊ नका: महापौर

$
0
0

औरंगाबाद: 'एमआयएम'चे नगरसेवक सय्यद मतीन यांना झालेल्या मारहाणीचे चित्रीकरण देऊ नका, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी नगर सचिव विभागाला दिले आहेत. सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम झाले नाही. त्यामुळे चित्रीकरण देण्यास त्यांनी विरोध केल्याचे सूत्रांनी सांगितले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास मतीन यांनी १७ ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत विरोध केला होता. यावेळी भाजप नगरसेवकांनी मतीन यांना सभागृहात मारहाण केली होती. या मारहाणीचे चित्रिकरण देण्याची मागणी 'एमआयएम'तर्फे सचिव कार्यालयाकडे केली आहे. त्यासंदर्भात महापौरांनी सचिव कार्यालयाला हे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाभोळकर हत्या: तीन तरुण ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. नरेंद्र दाभोलकर खुनप्रकरणी एटीएस व सीबीआयच्या पथकाने आणखी तीन संशयितांना मंगळवारी पहाटे चौकशीसाठी ताब्यात घेतले. या पथकांनी देवळाई येथील मनजीत प्राईड या अपार्टमेंटमध्ये ही कारवाई केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये संशयित सचिन अंदुरेचे दोन मेहुणे व धावणी मोहल्ल्यातील एका तरुणाचा समावेश आहे. आरोपीच्या ताब्यातून एक पिस्तुल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत या तिघांची एटीएस कार्यालयात चौकशी सुरू होती.

डॉ. दाभोलकर खुनप्रकरणात सीबीआयने शहरातील सचिन अंदुरे याला अटक केली असून तो सध्या सीबीआयच्या पोलिस कोठडीत आहे. सीबीआय व एटीएसच्या पथकाने मंगळवारी पहाटे मनजीत प्राईड सोसायटीमधील ए-१ विंगमधील एका प्लॅटमध्ये छापा टाकला. त्यासाठी त्यांनी स्थानिक सातारा पोलिसांची त्यांनी मदत घेतली. हा फ्लॅट नागमोडे नावाच्या महिलेचा असून येथे नचिकेत इंगळे हा तरुण दोन वर्षांपासून भाडेकरू आहे. या फ्लॅटमधून पथकाने अंदुरेचे मेहूणे शुभम सूर्यकांत सुरळे (वय २२), अजिंक्य शशिकांत सुरळे (वय २४, दोघे रा. औरंगपुरा) व रोहित राजेश रेगे (वय २३, रा. धावणी मोहल्ला) या तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पथकाने धावणी मोहल्ल्यात रोहितच्या घराची झडती घेतली. या झडतीत एक पिस्तुल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाविद्यालयीन तरुण

पथकांनी ताब्यात घेतलेले तिघेही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. रोहित रेगे याचे वडील शासकीय कर्मचारी होते. त्यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. घरी आई व लहान भाऊ आहेत. शुभम सुरळे हा सचिन अंदुरे याचा सख्खा मेहुणा असून अजिंक्य सुरळे हा चुलत मेहुणा आहे. या तिघांचा डॉ. दाभोळकर यांच्या हत्येशी काय सबंध आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

सोसायटीच्या रजिस्टरमध्ये नोंद

एटीएस व सीबीआयच्या पथकाने मनजीत प्राईड सोसायटीत मंगळवारी पहाटे अडीच वाजता प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत सातारा पोलिस होते. सोसायटीच्या गेटजवळील सुरक्षारक्षकाच्या रजिस्टरमध्ये त्यांनी इन व आउटची नोंद केली आहे. हे पथक पहाटे दोन वाजून ५० मिनिटांनी सोसायटी बाहेर पडले. त्यांनी सातारा पोलिसांनाही फ्लॅटमध्ये येऊ दिले नाही. सातारा पोलिसांना कोणाला सोसायटीच्या आत सोडू नका, तसेच बाहेर पडू देऊ नका, अशा सूचना दिल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमटीएम रकमेत अपहार; दोघांना अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल साडेबारा लाखांचा अपहार केल्याच्या प्रकरणात 'एटीएम'मध्ये रक्कम भरण्याचे कंत्राट असलेले अर्जून उत्तमराव वराडे व सूरज गंगाधर अंभोरे या आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये बुधवारपर्यंत (२२ ऑगस्ट) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी मंगळवारी (२१ ऑगस्ट) दिले.

या प्रकरणी सुशील भिमराव धुळे (३१, रा. बौद्धनगर, जवाहर कॉलनी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा 'इलेक्ट्रॉनिक्स पेमेंट अँड सर्व्हिसेस प्रा. लि' या कंपनीत चॅनेल मॅनेजर असून, एटीएम मशीन बसवणे, देखभाल करणे व रक्कम भरणा करण्याचे काम कंपनी करते. या कंपनीकडे राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएम मशीनमध्ये रक्कम भरण्याचे काम आहे. या कंपनीने 'एटीएम'मध्ये रक्कम भरण्याचे काम 'अॅक्टिव्ह सिक्युअर मॅनेजमेंट प्रा. लि.'ला दिले होते व याबाबत करार करण्यात आला होता. फिर्यादी हा शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या सुमारे १५० 'एटीएम'चे काम पाहतो. त्याने 'एसबीआय'च्या 'एटीएम'मध्ये पैसे भरण्याचे कामदेखील 'अॅक्टिव्ह'ला दिले होते. हा करार जून २०१४ मध्ये संपला होता. मात्र 'अॅक्टिव्ह'चा व्यवस्थापकीय संचालक व आरोपी अर्जून उत्तमराव वराडे (४२, रा. राजनगर, गारखेडा) याने बँक गॅरेंटीची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने फिर्यादीच्या कंपनीने रक्कम भरणा करण्याचा 'अॅक्टिव्ह'शी असलेला करार रद्द केला. दरम्यान, हा करार असताना आरोपी वराडे व आरोपी सूरज गंगाधर अंभोरे (३०, रा. म्हाडा कॉलनी, सिडको एन-दोन) यांनी संगनमत करून वेगवेगळ्या 'एमटीएम'मध्ये १२ लाख ५३ हजार १०० रुपये कमी भरल्याचे ऑडिटमध्ये आढळले.

\Bतपास अजून बाकी\B

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ४२०, ४०९, ४०६, ३४ कलमान्वये सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून आरोपींना १८ ऑगस्ट रोजी अटक करून मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, तपास बाकी असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये बुधवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश कोर्टाने दिले. सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केरळच्या आपत्तीग्रस्तांसाठी ‘आयएमए’ची धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाने थैमान घातलेल्या केरळच्या आपत्तीग्रस्तांच्या मदतीला 'आयएमए' ही खासगी डॉक्टरांची देशपातळीवरील सर्वांत मोठी संघटना धावून गेली आहे. संपूर्ण देशातील प्रत्येक शाखेतून सर्वस्तरीय मदत केली जात आहे. आतापर्यंत ४० लाखा रुपयांपेक्षा जास्त किंमतीची औषधी देण्यात आली आहे. सुमारे एक हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते १८०० कॅम्पमधून सेवा देत आहेत. त्याशिवाय निःशुल्क रुग्णवाहिका व उपचार केले जात आहेत. गरजचेनुसार सेवा देण्यास डॉक्टर सज्ज असल्याचे 'आयएमए'चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी 'मटा'शी बोलताना स्पष्ट केले.

आक्राळ-विक्राळ पावसाने केरळचे अतोनात नुकसान केले असून, आपत्तीग्रस्तांना वाचवण्याबरोबरच रोगराईसह वेगवेगळ्या समस्यांचे आव्हान आहे. त्यामुळेच सर्वांच्या मदतीचे हात केरळकडे एकवटत असल्याचे चित्र आहे. त्यातही 'आयएमएम'ने परिस्थितीचे गांभीर्य ओळ‍खून तत्काळ सर्वस्तरीय मदत देण्यास प्रारंभ केला आहे. त्याचबरोबर सर्वव्यापी मदतीसाठी 'आयएमए' ही देशपातळीवर एकवटली आहे. प्रत्येक शाखेशी समन्वय साधून एकत्रितरित्या मदत करणे सुरुवातीपासून प्रत्यक्षात सुरू झाले आहे. केरळच्या ४२० पेक्षा जास्त पुनर्वसन कॅम्पमध्ये 'आयएमए'ने डॉक्टर नियुक्त केले आहेत. सर्व शाखांमधून तत्काळ एक कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी जमा केला आहे. आतापर्यंत ४० ते ४२ लाख रुपयांची औषधी आपत्तीग्रस्तांसाठी देण्यात आली आहे. शिवाय केरळमध्ये ठिकठिकाणी हेल्पलाइन क्रमांक देण्यात आले असून, निःशुल्क रुग्णवाहिका सेवाही दिली जात आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय विद्यार्थीदेखील यात सहभागी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आपत्तीग्रस्तांना कोणकोणत्या प्रकारच्या मदतीची गरज आहे, याचा आढावा घेण्यासाठीही विशेष समिती स्थापन केली असून त्यावर आजी-माजी पदाधिकारी लक्ष ठेऊन आहेत, असे सांगण्यात आले.

साथरोगांपासून बचावासाठी मोहीम

यापुढे केरळमध्ये रोगराई, साथरोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. त्यामुळे 'आयएमए'ने तातडीने पावले उचलली आहेत. आपत्तीग्रस्तांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळेल, टॉयलेटची योग्य व्यवस्था होईल व घनकचरा व्यवस्थापन योग्य होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच वैद्यकीय सहाय्य व औषधी वाटप करणे, आवश्यक सर्व प्रकारचे साहित्य वाटप करणे, रोगराई होऊ नये म्हणून सर्वस्तरीय काळजी घेणे व वेळ आलीच, तर कृती आराखडा सज्ज ठेवणे, परिस्थितीबाबत दक्ष व सतर्क राहणे आणि गरजेनुसार राष्ट्रीय पातळीवर तत्काळ निर्णय घेऊन सर्व आवश्यक पावले उचलणे या बाबींना प्राधान्य देऊन व्यूहरचना आखण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

आतापर्यंत ४०-४२ लाखांची औषधी आपत्तीग्रस्तांना देण्यात आली आहेत. यापुढेही ज्यांना औषध व साहित्याची गरज असेल ती पुरवली जाणार आहे. सद्यस्थितीत हजार डॉक्टर-वैद्यकीय विद्यार्थी-कार्यकर्ते सेवा देत आहेत. ही संख्या गरजेनुसार वाढवली जाईल.

- डॉ. रवी वानखेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, आयएमए

औरंगाबादेतूनही गरजेची औषधी तसेच साहित्य पाठवण्यात आले आहे. तसेच किमान १०-१२ डॉक्टर तिथे जाऊन सेवा देण्यासाठी सज्ज आहेत. सूचना मिळताच ते तातडीने केरळमध्ये पोहोंचतील व सेवा देतील. हरतऱ्हेच्या प्रयत्नांसाठी आम्ही सज्ज आहोत.

- डॉ. कुलदीपसिंह राऊळ, शहराध्यक्ष, आयएमएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयएम’च्या कुरेशीची रवानगी हर्सूल कारागृहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांना शिविगाळ व धक्काबुकी करीत सरकारी कामात अडथळा निर्माण करणारा एमआयएमचा माजी शहरध्यक्ष जावेद कुरेशी याची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला मंगळवारी (२१ ऑगस्ट) कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहमद यांनी दिले. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना महापालिकेच्या सर्वसाधरण सभेमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असता, त्या प्रस्तावास विरोध करणारा एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन यास नगरसेवकांनी सभागृहात बेदम मारहाण केली होती. यात मतीन जखमी झाल्यामुळे त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे समजताच जावेद कुरेशी याने घाटीत धाव घेतली होती व बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांना शिविगाळ करत धक्काबुकी केली होती आणि जावेद कुरेशीसह त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जावेद कुरेशीला अटक करून मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज परतफेडीसाठी आणलेले ५० हजार रुपये लांबवले

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पतसंस्थेचे कर्ज चुकवण्यासाठी आलेल्या प्रवाशाचे ५० हजार खिसेकापूनी लंपास केले. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास सिल्लोड ते औरंगाबाद यादरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनायक प्रभाकर ठाले (वय ५७, रा. आव्हाना. ता. भोकरदन) यांनी मुलीच्या लग्नासाठी मुकुंदवाडी शाखेच्या गंगामाई नागरी पतसंस्थेच्या शाखेतून ५० हजारांचे कर्ज घेतले होते. ही कर्जाची रक्कम चुकवण्यासाठी सोमवारी ठाले व त्यांच्या पत्नी दोघे सिल्लोडवरून एसटी बसने शहरात आले. हर्सूल टी पॉइंट येथे उतरून रिक्षाने ते मुकुंदवाडी येथे पतसंस्थेच्या कार्यालयात आले. रक्कम काढताना शर्टाचा वरचा खिसा फाटलेला ठाले यांच्या लक्षात आले. खिसेकापूनी खिसा कापत त्यांची रक्कम लांबवली होती. याप्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक फौजदार के.एस. गोरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images