Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बीड बायपासने घेतला महिन्याभरात चौथा बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मृत्यूचा सापळा ठरत असलेल्या बीड बायपासवर हायवाने चिरडल्याने दुचाकीस्वार मॅकेनिक जागीच ठार झाला. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता देवळाई चौकाच्या सिग्नलवर हा अपघात घडला. या अपघातात ट्रकने दुचाकीस्वाराला तब्बल २० फूट फरफटत नेले. अब्दुल अजीम अब्दुल रज्जाक (वय ३२, रा. बाबर कॉलनी, कटकटगेट) असे या मॅकेनिकचे नाव आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात हायवाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल अजीम यांचे संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ अजीम पंजाब मोटार गॅरेज आहे. शुक्रवारी सकाळी अजीम हे दुचाकीवर देवळाई भागात कामानिमित्त गेले होते. काम संपल्यानंतर अजीम गॅरेजकडे परतत होते. यावेळी देवळाई चौकात सिग्नलवर पिवळा दिवा लागल्याने अजीम यांनी दुचाकी थांबवली. यावेळी पाठीमागून हायवा ट्रकने वेगाने युटर्न घेत दुचाकीला धडक दिली. या अपघातात मागच्या चाकाखाली अजीमची दुचाकी आली. यामध्ये चाकाखाली चिरडल्याने अजिमच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. सातारा पोलिासांना घटनेची माहिती मिळताच सहायक फौजदार त्र्यंबक पवार व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करून अजीमचा मृतदेह घाटीत हलवला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जमादार पदार तपास करीत आहेत.

कंटेनर दुरुस्तीमध्ये हातखंडा

संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ गेल्या १५ वर्षांपासून अजीम यांचे चारचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. कंटेनर दुरुस्ती करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या गॅरेजमध्ये अनेक मॅकेनिक काम करीत होते. त्यांच्या अपघाताची बातमी कळताच या सर्वांनी घाटी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती. बेगमपुरा पोलिस ठाण्याचे पीएसआय शेख सरवर यांचे ते नातेवाईक होते.

महिन्याभरात चौथा बळी

बीड बायपास रोडवर गेल्या महिन्याभरात अपघातात हा चौथा बळी गेला आहे. चार ऑगस्ट रोजी पहाटे वॉकिंगसाठी गेलेल्या शब्बीर पटेल यांना ट्रकने चिरडले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी देवळाई चौकातच ट्रकच्या अपघातात दुचाकीवरील अनिता विठ्ठल आल्हाट या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. पाच दिवसांपूर्वीच २४ ऑगस्ट रोजी ट्रकच्या धडकेत लता लोलेवार या महिलेचा बळी गेला. अब्दुल अजीम हे या महिन्यातील बीड बायपासवरील अपघातातील चौथे बळी ठरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अज्ञात वाहनांच्या धडकेत वृद्ध ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. हरी देवीदास करमाळकर (वय ७४, रा. दशमेशनगर) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात पसार वाहनचालकाविरुद्ध मृत्युस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

करमाळकर हे गुरुवारी (३० ऑगस्ट) सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. शहानूरमियाँ दर्गा चौकात कृषी कार्यालयासमोर धडक देऊन अज्ञात वाहन पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत करमाळकर खाली कोसळले. स्थानिक नागरिकांनी ही माहिती उस्मानपुरा पोलिसांना दिली. जमादार इधाटे यांनी करमाळकर यांना उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आधी घाटी मेडीकल चौकीत व शुक्रवारी करमाळकर यांच्या मुलाच्या तक्रारीवरून पसार वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. करमाळकर यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. करमाळकर यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी दहा वाजता दशमेशनगर येथील निवासस्थानापासून निघणार असून प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

\Bएक महिन्यात दुसरा बळी\B

सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बळी जाण्याचा हा दुसरा प्रकार आहे. चार ऑगस्ट रोजी बीड बायपास येथील शब्बीर पटेल हे फिरण्यासाठी बाहेर पडले होते. कमलनयन बजाज हॉस्पिटलसमोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर हर महादेव कावड यात्रेचे आज आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्रावणमासाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली हर हर महादेव कावड यात्रा शनिवारी सकाळी आठ वाजता हर्सूल येथील हरसिद्धी माता मंदिरापासून निघणार आहे. मंदिरातील कुंडातून जलकलश भरून ही यात्रा टीव्ही सेंटर, गणेश कॉलनी, चेलिपुरा, गांधीपुतळा, सराफा, सिटीचौक, मच्छलीखडक, गुलमंडी, औरंगपुरा मार्गे खडकेश्वर येथे येईल. याठिकाणी खडकेश्वर महादेवाला जलाभिषेक केला जाणार आहे. गतवर्षी १५१ फुटांची कावड होती. यंदा ५०१ फुटांची कावड असणार आहे. १५०१ तरुण ही कावड स्वत:च्या खांद्यावर घेणार आहेत. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, संजय बारगजे, माजी आमदार किशनचंद तनवाणी नवनाथ महाराज आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली कावड यात्रा निघणार आहे. या यात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिसांना आमदारांनी घेतले फैलावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पार्किंगमध्ये पार्क केलेली वाहने कारवाईच्या निमित्ताने उचलल्यामुळे संतप्त झालेल्या भाजप आमदार अतुल सावे यांनी शुक्रवारी वाहतूक पोलिसांना फैलावर घेतले. 'सिडकोतील बजरंग चौकातून वाहतूक पोलिसांनी पार्किंगमधील वाहने उचललीच कशी. नियम तोडला तर जरूर कारवाई करा. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देऊ नका,' असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार सावे हे शुक्रवारी सिडको परिसरातील चिश्तिया चौकातून बजरंग चौक येथील संपर्क कार्यालयाकडे जात होते. त्यावेळी वैद्यनाथ बँकेच्या पार्किंगमध्ये लावलेली एक दुचाकी वाहतूक पोलिसांनी उलचलली. संबंधित दुचाकीच्या चालक महिलेने पार्किंगमध्ये वाहन पार्क केल्याचे सांगत कारवाई करू नका, अशी विनंतीही केली. मात्र, पोलिस व वाहन उचलणारे खासगी कर्मचारी ऐकण्यास तयार नव्हते. हा प्रकार पाहताच संतप्त झालेल्या आमदार सावे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहन उचलणाऱ्या युवकास पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो पसार झाला. त्यानंतर आमदार सावे यांनी वाहतूक पोलिसांना धारेवर धरले. 'गाडी जर पार्किगमध्ये उभी असेल तर ती कशी नेता, ही कोणती कारवाई, असा सवाल केला. महिलेला धक्का देणाऱ्या युवकाला बोलवा, मवाली लोकांना कामावर कसे घेता, अशा पद्धतीने कारवाई केली तर लोकांचा उद्रेक होईल. रस्त्यावर, बेशिस्त पार्किग असेल, तर जरुर कारवाई करा, पण चुकीची कारवाई केली तर ते सहन केले जाणार नाही,' असा इशारा आमदारांनी यावेळी दिला.

\Bसोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

\Bआमदार आक्रमक झाल्याचे पाहून संबंधित पोलिसांनी शांत राहणे पसंत केले. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी आपला राग व्यक्त करत योग्य पद्धतीने कारवाई व्हावी, अशी अपेक्षा केली. पार्किंग लेन टाकण्यात यावी, पी वन, पी टू असे फलक लावा, अशी मागणी पोलिसांकडे केली.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रसंगी उपस्थित लोकांनी हातगाडीवाल्याकडून चिरीमिरी घेतल्या जात असल्याने पोलिस त्यांच्यावर कारवाई करत नाही, असा आरोपही केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या ३५ टक्के उत्पादनाला फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला असतानाही बोंडअळीमुळे खरिपाचे संपूर्ण गणित कोलमडले होते. यंदा पाऊसही नाही आणि उगवलेल्या पिकांवर बोंडअळी आणि खोड किडीचा प्रादूर्भाव झाला असल्याने यंदाही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येण्याची शक्यता आहे. पावसाच्या मोठ्या खंडामुळे कापूस व मकासह इतर पिकांच्या उत्पादनात सरासरी ३० ते ३५ टक्के घट येणार असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यामध्ये उत्पादनाला सर्वाधिक फटका बसणार आहे. मराठवाड्यातील पाऊस तसेच पिकांच्या ३१ ऑगस्टपर्यंतच्या स्थितीची माहिती कृषी विभागाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे दिली आहे.

गेल्यावर्षी संपूर्ण खरिप बोंडअळीने पोखरला. त्यामुळे यंदा पाण्याची उपलब्‍धता असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी उसाचा पर्याय निवडला. मात्र, यंदाही कापूस पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी बोंडअळीमुळे निराशाच येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात मोठ्या क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात येते. यंदा तब्बल १५ लाख क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी केली. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या मोठ्या खंडामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरण्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. तरीही कापूस उत्पादनात ३० ते ३५ टक्‍के घट येण्याचा अंदाज आहे. औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात रुसलेल्या पावसाचे संकट कायम असताना दुसरीकडे दोन्ही जिल्ह्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडीचा तसेच बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यासह जालना, उस्‍मानाबाद, परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यात काही जिल्ह्यांमध्ये रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आढळून आले आहे. यंदा ४ लाख ४६ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या तुरीची ऑगस्ट महिन्यातील पावसामुळे वाढ होत असल्याचे कृषी विभाग म्हणत असले तरी तुरीतही घट होण्याचा अंदाज आहे. तर मूग व उडीद पिकांच्या उत्पादनात तब्बल ५० ते ६० टक्के तर सोयाबीनच्या उत्पादनात २५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. यातील बहुतांश घट ही औरंगाबाद जिल्ह्यातील आहे.

मराठवाड्यात पावसाच्या सरासरी ७९९ मिलिमीटरच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ४७२.५० मिलिमीटर पाऊस बरसला असून आतापर्यंत पावसाळ्याच्या ९२ दिवसांपैकी ५० दिवस कोरडे गेले आहेत.

औरंगाबाद, बीड दुष्काळाच्या उंबरठ्यावर

औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने हे दोन्ही जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत. दोन्ही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ७३ टक्के पाऊस झाला असून औरंगाबाद जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जिल्ह्यात सध्या दीडशेवर टँकर सुरू आहेत. पावसाच्या खंडामुळे कापूस उत्पादनात ३० ते ३५ टक्के तर मूग पिकाची तब्बल ५० ते ६० टक्के घट होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. बीड जिल्ह्यातही कमी पावसामुळे जिरायत क्षेत्रावरील कापूस पिकाची वाढ खुंटली आहे. तसेच ओलीताखालील कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादूर्भाव तसेच मावा, तुडतुडे व फूलकिडे या रस शोषणाऱ्या किडीचा प्रादूर्भाव आढळून येत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत.

आणखी चार दिवस पाऊस नाही

आभाळाकडे डोळे लावलेल्या शेतकऱ्यांना काही दिवस पावसाची वाट पहावी लागणार आहे. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार ४ सप्टेबरपर्यंत मराठवाड्यात कुठेही पावसाचा अंदाज नाही. वेधशाळेच्या अंदाजानुसार ४ सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात किरकोळ स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात अशीच स्थिती राहणार असल्याचाही अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

मराठवाड्यात पावसाचा मोठा खंड होता. मात्र, १६, आणि १७ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांच्या स्थितीमध्ये सुधारणा झाली आहे. अनेक‌ ठिकाणच्या पिकांनी तग धरला आहे. या पावसामुळे पिकांना जीवदानच मिळाले असले तरी पावसाच्या मोठ्या खंडामुळे पिकांमध्ये घट होईल. यामध्ये औरंगाबाद विभागला अधिक फटका बसण्याची चिन्हे आहेत.

डॉ. पुरुषोत्तम भापकर

विभागीय आयुक्त, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रम्हरागिणीच्या महिल्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ब्रम्हरागिणी ग्रुपच्या वतीने बुधवारी पहिल्या ब्राम्हण महिला संघटन मेळाव्याचे आयोजन व्यंकटेश मंगल कार्यालयात करण्यात आले होते. या मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ब्रम्हरागिणीबद्दल सविस्तर माहिती यावेळी उपस्थित महिलांना देण्यात आली.

या कार्यक्रमाची सुरुवात वेगळ्या पद्धतीने करण्यात आली. प्रथम आलेल्या पहिल्या पाच महिलांच्या हस्ते शारदापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. या मेळाव्यात ब्राम्हण महिला संघटीकरण, व्यवसाय निर्मिती तसेच व्यवसायवृद्धी, गृहिणींच्या विविध सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देणे, आर्थिक सक्षमीकरणासाठी सहकार्य करणे, महिलांचे सामाजिक व मानसिक आरोग्य, त्यांचे सामाजिक प्रश्न या विषयावर ब्रम्हरागिणी काम करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आगामी काळात ब्रम्हरागिणी संघटनेची वेबसाइट तसेच त्रैमासिक काढण्यात येणार असून सर्व सदस्यांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली.

ब्राम्हण महिलांनी एकमेकांना सहाय्य करून आपली स्त्रीशक्ती दाखवण्याची तसेच समाज पुढे नेण्याकरीता एकत्र येण्याचे आवाहन यावेळी ब्रम्हरागिणी संघटनांच्या आयोजकांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात व स्वागत नेहाली खोचे यांनी केली. गीता आचार्य यांनी उपस्थितांना संघटनेची माहिती व उद्देश सांगितले. वर्षा कल्याणकर यांनी उपस्थित महिलांची ओळख करून दिली. मेघा थेटे यांनी आभारप्रदर्शन केले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता अंजली गोरे, पल्लवी पालकर, पल्लवी सुरड्कर, मयूरी जोशी, राधिका जोशी, सीमा नांदापूरकर, नेहा पद्माकर आदिंनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडत व्यापाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

व्यापाऱ्यांना शेतमाल खरेदी करताना हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केल्यास राज्य शासनाने शिक्षेसह दंड आकारण्याच्या निर्णया विरुद्ध जाधववाडी येथील आडत व्यापाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही आपले व्यवहार बंद ठेवले होते. या बंदमुळे धान्य मार्केटमध्ये शुकशुकाट होता. दरम्यान, ३ सप्टेंबर रोजी राज्यातील आडत व्यापाऱ्यांची बैठक होणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती येथील आडत व्यापाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवोदित साहित्यासाठी पुरस्कार

$
0
0

औरंगाबाद,

गेल्या २० वर्षापासून जीवन विकास ग्रंथालय टिळकनगर ग्रंथालयाच्या वतीने मराठवाड्यातील नवोदित साहित्यासाठी कै. श्रीमती सावित्रीबाई जोशी स्मृती पुरस्कार दिला जात आहे. १५०० रुपये रोख स्मृतीचिन्ह शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यासाठी २० ऑक्टोबर २०१८ पर्यंत प्रवेशिका आणून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‌‌एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या काळात प्रकाशित झालेल्या ग्रंथाचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल. मात्र, त्या लेखकाची ती पहिली पुस्तक रुपाने प्रकाशित साहित्यकृती असावी, साहित्याबाबत कसलीही अट नाही, तज्‍ज्ञ परिक्षकांचा निर्णय वर्तमानपत्रामधून तसेच वैयक्तिक कळविण्यात येणार असून यासाठी प्रवेशिका जीवन विकास ग्रंथालयाकडून विनामूल्य उपलब्‍ध आहेत.

फक्त मराठवाड्यातील नवोदित साहित्यिकांच्या पुस्तक रुपाने प्रकाशित पहिल्या साहित्यकृतीसाठी हा पुरस्कार असल्याचे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मागण्यांसाठी ‘एकलव्य’ रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करू नये, या प्रमुख मागणीसह आदिवासी प्रकल्प कार्यालयातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, घरकुल तसेच ठक्कर बाप्पा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, आश्रमशाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, वसतिगृहाचे बांधकाम त्वरित सुरू करावे, आदिवासींच्या नावे वन जमिनी कराव्यात, आदिवासी मच्छिमार संस्थांना भागभांडवल द्यावे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आर. जी. देशमुख यांची बदल करावी आदी मागण्यांसाठी एकलव्य संघटनेतर्फे शुक्रवारी (३१ ऑगस्ट) जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी प्रकल्प कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला.

क्रांतीचौकातून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे नेते शिवाजीराव ढवळे यांनी केले. मोर्चात उपाध्यक्ष पवनराव सोनवणे, अशोक बरडे, बाळासाहेब बरडे, किरण ठाकरे, किशोर नाईक, गोरख पवार, नवनाथ पवार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी कार्यकर्ते आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते. संघटनेच्या वतीने वेगवेगळ्या मागण्या मांडण्यात आल्या.

कन्नड येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयींनीयुक्त स्वतंत्र इमारत तत्काळ उपलब्ध करून द्यावी, मच्छिंद्र देवराम थोरात विनयभंग प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असून, यात तत्काळ कारवाई करावी, वडनेर-तीसगाव आदी ठिकाणी खराब भाजीपाल्याचा पुरवठा करणाऱ्या संस्थेचे कंत्राट रद्द करावे, स्वाभिमान सबलीकरण योजनेचे तत्काळ वाटप करावे, बिगर आदिवासींच्या ताब्यातील वन जमीन आदिवासींच्या नावे तत्काळ करावी, आदिवासी मच्छिमार संस्थांना मच्छबीज पुरवठा व भागभांडवल देण्यात यावे, प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी सुशिक्षित बेरोजगार तरुणांना विनाअट कर्ज देण्यात यावे, औरंगाबाद येथील सर्व वसतिगृहांच्या भोजन कंत्रांटांच्या ९० लाखांच्या अनियमित प्रकारांची चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, भारत सरकारच्या शिष्यवृत्तींचे तत्काळ वाटप करावे, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

\Bकार्यालयासमोर ठाण मांडून\B

आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला होता. हा मोर्चा प्रकल्प कार्यालयावर धडकल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारावे, या अपेक्षेने कार्यकर्ते शुक्रवारी रात्री नऊपर्यंत कार्यालयासमोर ठाण मांडून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डंपरच्या धडकेत महिलेचा झाल्टा फाटा येथे मृत्यू

$
0
0

औरंगाबाद: झाल्टा फाटा येथील त्रिमूर्ती हॉटेलसमोर दुपारी डंपर आणि दुचाकीच्या अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात तीन वर्षांचा मुलगा आणि वृद्ध जखमी झाले. सीमा इम्रान इब्राहीम शेख (२३, रा. आडूळ, ता. पैठण) असे मृत महिलेचे नाव आहे. मुलगा आसिफ (३) आणि सासरा इब्राहिम दगडू शेख (६५) जखमी झाले. या अपघातानंतर डंपरचालकाने घटनास्थळाहून पळ काढला. आडूळ येथील सीमा यांचे पती इम्रान शेख व्यापारी आहेत. सासरे इब्राहीम व मुलगा आसिफसोबत त्या दुचाकीने (एमएच-२०-डीए-२४६०) औरंगाबादला सोनोग्राफीसाठी येत होत्या. त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव आलेल्या डंपरने (एमएच-२०-एटी-२१८५) धडक दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले सहकाऱ्यांसह दाखल झाले. रुग्णवाहिका वेळेवर पोहचली नसल्याने जखमींना पोलिस व्हॅनने घाटीत दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सीमा यांचा दुपारी पावणेचार वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी इम्रान शेख यांच्या तक्रारीवरुन डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षण द्या, अन्यथा नेस्तनाबूत करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी आमखास मैदानावर आयोजित मेळा‌‌‌व्याला राज्यभरातील धनगर समाजबांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. 'आता अन्याय सहन केला जाणार. भाजपने दिलेला शब्द पाळावा. एक महिन्यात धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र द्या. देव्हाऱ्यात तुमचे फोटो लावू आणि आरक्षण दिले नाही, तर नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही,' असा इशारा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला. आरक्षण न दिल्यास प्रस्थापितांना धडा शिकविण्यासाठी आगामी निवडणुकीत राज्यभर उमेदवार उभे केले जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

धनगर समाजाच्या शुक्रवारी झालेल्या राज्यव्यापी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उत्तमराव जानकर हे होते. या मेळाव्यात पाडळकर बोलत होते. प्रारंभी जानकर व पडळकर यांनी धनगर व धनगड या जमाती हे एकच असल्याचे दाखले दिले. राज्यात ४३ हजार धनगड असल्याचे सरकार म्हणते, तर माहितीच्या अधिकारात विविध तहसील कार्यालयात विचारणा केली असता एकही धनगड नसल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती देत या नेत्यांनी 'एक तरी धनगड दाखवा,' असे आव्हान सरकारला केले. त्यानंतर प्रमुख भाषण करताना पडळकर यांनी सरकारवर तोफ डागली. आतापर्यंत प्रत्येक सरकारने धनगर समाजाचे आम्हीच तारणहार आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न करून फसवणूक केली. खोटा धनगड उभा करून धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याऐवजी तो सुटूच नये, या दृष्टीने प्रयत्न केले आहेत, असा आरोप केला. 'सत्तेत येण्याआधी व मते मिळविण्यासाठी भाजपचे नेते विद्यामान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर हा विषय एका महिन्यात सोडवू, असे आश्वासन दिले होते. महायुती म्हणून फडणवीस व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनीही तशी लेखी हमी दिली आहे. मग, सत्तेत आल्यानंतर दिलेला शब्द का पाळला जात नाही,' असा सवाल करत आरक्षण दिले, तरच भाजपला संरक्षण देऊ, असा इशारा दिला. सरकारने आतापर्यंत खूप फसवणूक केली आहे. पण आता ते सहन केले जाणार नाही. ३० सप्टेंबरपर्यंत आरक्षणाचे आश्वासन नको, तर प्रमाणपत्राचे वाटप करा. तुमचे छायाचित्र देव्हाऱ्यात लावू, आरक्षण दिले नाही, तर नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. मुस्लिम, मराठासह आरक्षण मागणाऱ्या विविध समाजबांधवांना पाठिंबा असल्याचे जाहीर करत मुस्लिम, मराठासह बहुजन, उपेक्षित वर्गाला सोबत घेऊन प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरू, असा इशारा दिला.

कृती कार्यक्रम जाहीर

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी हा अखेरचा लढा असल्याचे पाडळकर यांनी भाषणात सांगितले. आरक्षणाच्या मागणीचे ६० लाख पत्र येत्या दहा तारखेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येतील, तसेच सर्व समाजबांधवांनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात अर्ज करावे, असा कृती कार्यक्रम त्यांनी यावेळी जाहीर केला.

निर्णायक लढ्याला तयार व्हा

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये प्रमाणपत्र द्या, धनगर समाजाचे हे आंदोलन प्रमाणपत्र घेतल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा दिला. आंदोलन न करता समाजाला प्रमाणपत्र देण्याची नैतिक जबाबदारी सरकारची होती. मात्र आंदोलन करण्याची नामुष्की सरकारने आणली आहे, असा आरोपही करत निर्णायक लढ्यासाठी तयार व्हा, अशी हाक धनगर समाजबांधवांना मेळाव्याचे अध्यक्ष उत्तमराव जानकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या वतीने स्वच्छ वॉर्ड स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका प्रशासनाने स्वच्छ शहर, सुंदर शहराचा वसा घेतला असून, त्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शनिवारी 'स्वच्छ परिसर, स्वच्छ वॉर्ड' स्पर्धा जाहीर करण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा गांधी जयंतीला (२ ऑक्टोबर) होणार आहे.

सहा महिन्यांपेक्षा जास्त काळाच्या कचराकोंडीमुळे संपूर्ण औंरगाबादकर त्रस्त झाले आहेत. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्र खरेदी, सिव्हिल वर्क सुरू करणे या कामांना आता गती आली आहे. त्यामुळे कचराकोंडी फुटण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. आपला परिसर, आपला वॉर्ड स्वच्छ ठेवण्यात लोकांचा सहभाग वाढला पाहिजे या उद्देशाने महापालिकेने एक सप्टेंबरपासून 'स्वच्छ परिसर, स्वच्छ वॉर्ड' स्पर्धा जाहीर केली आहे. स्पर्धेचा कालावधी एक सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा आहे. स्वच्छ परिसर व वॉर्डाचे मूल्यमापन २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान केले जाणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात वॉर्डस्तरीय समिती २५ व २६ ऑक्टोबर दरम्यान मूल्यमापन करणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २७ व २८ सप्टेंबर रोजी मुख्य समिती मूल्यमापन करणार आहे. वॉर्डात किंवा परिसरात उघड्यावर कचरा दिसू नये, हगणदारीमुक्त परिसर असावा, खुल्या कचराकुंड्या असू नयेत, घनकचरा वर्गीकरणाचे प्रमाण नव्वद टक्केपेक्षा जास्त असावे, हे काम लोकसहभागातून केलेले असावे, असे या स्पर्धेचे निकष ठरविण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज चोरी प्रकरणात सात जणांवर गुन्हा

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात महावितरणने विशेष मोहीम सुरू केली असून, या मोहिमेंतर्गत शहरातील पाच वीज ग्राहकांवर वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंडित दिगंबर उदावंत यांचे सराफा भागात दुकान आहे. उदावंत यांनी आपल्या दुकानामधील वीज मीटरमध्ये फेरफार करून गेल्या १२ महिन्यांपासून एकूण ४५९७ युनिटच्या ७७ हजार ३८० रुपयांची वीज चोरल्याची माहिती २९ ऑगस्ट रोजी तपासणीत समोर आली. या प्रकरणात महावितरणाचे अधीक्षक अभियंता सुनील कमळकर यांच्या फिर्यादीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय जाभंळा येथील सिमेंट प्रोडक्ट असलेल्या एका प्रकल्पाच्या ठिकाणी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.५० वाजता विद्युत पथकाने छापा मारला असता. त्या ठिकाणी अनधिकृत वीज पुरवठा घेऊन गेल्या २४ महिन्यांपासून एकूण ११ हजार ४४० युनिटची तीन लाख ६६ हजार १५० रुपयांची वीज चोरी करून वीज कंपनीचे नुकसान केल्याप्रकरणी जागा मालक तसेच प्रकल्प मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग येथून आलेल्या महावितरणाच्या भरारी पथकाने एक ऑगस्ट ते २८ ऑगस्ट दरम्यान केलेल्या कारवाईत आलमगीर कॉलनी येथील एका घराच्या दोन वीज मीटरची तपासणी केली. यात वायरमध्ये फेरफार करून ६६ हजार २०० रुपयांची वीज चोरी केल्याचे आढळले. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bमीटरमध्ये फेरफार

\Bवीज चोरी पकडण्यासाठी असलेल्या पथकाने मोहम्मद अजीमोद्दीन, मोसिन नासिर शेख यांच्या जेबन वॉशिंग सेंटर, हर्सूल येथील वीज मीटरची २७ ऑगस्ट रोजी तपासणी केली. यावेळी वीज मीटर टॅप करून एक लाख एक हजार २८० रुपयांची वीज चोरी केल्याचे उघड झाले. याप्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० ऑगस्ट रोजी भरारी पथकाने केलेल्या कारवाईत रमेश खांडुजी नानंदल्कर व सतीश नानंदल्कर या दोघांवर मीटरमध्ये फेरफार करून वीज मीटरची गती कमी करून २७२१ युनिटची वीज चोरून महावितरण कार्यालयाची २८ हजार ५१२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर हर महादेवच्या गजरात कावडयात्रा उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर हर महादेव, बम बम बोलेच्या गजरात शनिवारी शहरातून कावडयात्रा काढण्यात आली. या यात्रेसाठी ५०१ फुटांची कावड तयार करण्यात आली होती.

मुख्य संयोजकांनी ५०१ फुटांची कावड खांद्यावर घेत तसेच हर्सूल येथील हरसिद्धी मातेच्या मंदिरातील कुंडातून कलश भरून घेऊन हजारो भाविकांच्या साथीने यात्रेला सुरुवात झाली. टीव्ही सेंटर, गणेश कॉलनी, चेलिपुरा, गांधीपुतळा, सराफा, सिटीचौक, मच्छलीखडक, गुलमंडी, औरंगपुरामार्गे ही यात्रा खडकेश्वर महादेव मंदिरात पोचली. येथे महादेवाला महाजलाभिषेक करण्यात आला. पर्जन्यवृष्टीसाठी महाआरतीचे आयोजनही करण्यात आले होते. या यात्रेत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, संजय बारगजे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, नवनाथ महाराज आंधळे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कावड यात्रेचा समारोप झाला. कन्नड तालुक्यातील वैसपूर आश्रमाचे रामेश्वरनंदजी महाराज यांचे यावेळी आशीर्वचन झाले.

\Bपुष्पवृष्टीने स्वागत

\Bकावड यात्रेच्या मार्गावर सडा टाकून रांगोळ्या काढण्यात आल्या. ठिकठिकाणी पुष्पवृष्टीने यात्रेचे स्वागत करण्यात आले. यात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. डोक्यावर कलश घेऊन त्या सहभागी झाल्या होत्या. यात्रेच्या अग्रभागी शंकर - पार्वतीची मूर्ती असलेला रथ होता. संदीप चांदणे मित्रमंडळ, व्यापारी संघटना चेलिपुरा, शिवसम्राट मित्रमंडळ, स्व. सेठ हुकुमचंद भारुका चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लबतर्फे कावड यात्रेच्या मार्गावर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजार अर्धांगवायूचा; उपचार किडनीचे

$
0
0

औरंगाबाद : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील सचिन या पांढऱ्या वाघाला अर्धांगवायूचा आजार झालेला असताना त्याचा अंदाज न आल्याने डॉक्टरांनी त्याच्यावर किडनीच्या आजाराचे उपचार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सचिन २० ऑगस्टपासून आजारी आहे. त्याच्यावर कोणत्या पद्धतीने उपचार केले पाहिजेत याबद्दल प्राणिसंग्रहालयाचे प्रशासन संभ्रमावस्थेत होते. प्राणिसंग्रहालयात आतापर्यंत बहुतांश प्राणी किडनीच्या आजारामुळेच दगावल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सचिनला देखील किडनीचाच आजार झाला असावा, असे मानून उपचार सुरू करण्यात आले. मात्र, त्याने प्रतिसाद न दिल्याने पुणे येथील प्राणिसंग्रहालयाचे डॉ. राजकुमार जाधव यांना उपचारासाठी बोलावण्यात आले. त्यांनी दोन दिवसांपूर्वी सचिनची पाहणी केली तेव्हा त्याला अर्धांगवायू झाल्याचे लक्षात आले. त्यापद्धतीने त्याचे उपचार सुरू केले. सचिनला अर्धांगवायू झाल्याचे प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना कसे काय लक्षात आले नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोस्ट बँकेचे शानदार उद्घाटन

$
0
0

औरंगाबाद : बहुप्रतीक्षित इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे शनिवारी शानदार उद्घाटन झाले. जुना बाजार येथील पोस्ट कार्यालयात बँकेची शाखा राहणार असून, अन्य पोस्ट ऑफिसमध्ये एक्सेस पॉइंट देण्यात येणार आहे. डिसेंबरअखेर सर्व पोस्ट कार्यालयात ही सुविधा उपलब्ध

होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात देशभरातील ६५० शाखांचे उद्घाटन झाले, तर येथील विभागीय शाखेचा उद्घाटन सोहळा एमजीएम परिसरातील रुख्मिणी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी खासदार चंद्रकांत खैरे होते. यासह आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, इम्तियाज जलील, पोस्ट विभागाचे सहायक निदेशक एस. एस. परळीकर, बँकेचे प्रबंधक जी. एस. कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी खैरे म्हणाले, 'पोस्ट बँकेमुळे नवीन क्रांती देशात होईल. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळातील ही संकल्पना आहे, नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद द्यावा,' असे आवाहन केले. दरम्यान, यावेळी एका मोठ्या स्क्रिनवर दिल्ली येथील उद्घाटन सोहळा पाहण्याची सोय करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केरळसाठी मदत फेरी

$
0
0

औरंगाबाद : केरळ येथील पूरग्रस्तांसाठी मिलिंद विज्ञान कॉलेजच्या 'एनएसएस'च्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी शुक्रवारी शहरातून मदतफेरी काढत निधी संकलन केले. कॉलेज परिसरातून या फेरीला सुरुवात झाली. छावणी व नंदनवन परिसरातून ही फेरी काढण्यात आली. नागरिकांनी सामाजिक दायित्व दाखवत सढळ हाताने मदत केली. फेरीतून आठ हजार १६८ रुपयांचा निधी संकलित झाला असून, ही रक्कम केरळ सरकारला सुपुर्द करण्यात येणार आहे. प्राचार्य डॉ. एस. डी. राठोड, कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. ए. वाघमारे, डॉ. के. एन. विधाटे, डॉ. एम. पी. कुलथे, डॉ. आर. एस. यन्नावर, डॉ. एस. डी. सरकटे, डॉ. ए. एस. मुंडे आदी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३९३ होर्डिंग हटवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या नऊ पथकांनी शनिवारी अनधिकृत होर्डिंग, बॅनर आणि पोस्टरवर हटविण्याची जोरदार कारवाई केली. दिवसभरात तब्बल १३९३ होर्डिंग हटविले. मंगळवारपर्यंत (४ सप्टेंबर) ही कारवाई सुरू राहणार आहे.

अनधिकृत होर्डिंग, पोस्टर आणि बॅनरविरोधात कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार महापालिका, जिल्हाप्रशासन व पोलिस प्रशासनातर्फे यापूर्वी २८ जुलै ते दोन ऑगस्ट दरम्यान कारवाई करण्यात आली. या दरम्यान सुमारे आठ हजार होर्डिंग हटविण्यात आले. या कारवाईच्या नंतरही अनधिकृत होर्डिंग शिल्लक राहिल्याचे लक्षात आल्यावर एक ते चार सप्टेबर दरम्यान पुन्हा कारवाई सुरू करण्यात आली. कारवाईच्या पहिल्या दिवशी नऊ झोन कार्यालयाच्या कायक्षेत्रात एकूण १३९३ होर्डिंग काढण्यात आल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. प्रत्येक झोन कार्यालयाच्या क्षेत्रात सहा कर्मचाऱ्यांचे पथक या कारवाईसाठी तयार करण्यात आले आहे. सोबत पोलिस देखील देण्यात आले आहेत.

\Bबांधकामे अधिकृत करायला प्रतिसाद नाही

\Bअनधिकृत बांधकामे अधिकृत करून घेण्यासाठी महापालिकेत एक सप्टेंबरपासून गुंठेवारी कक्षातच स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. मात्र, पहिल्या दिवशी एकही प्रस्ताव या कक्षात प्राप्त झाला नाही, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. शासनाने अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबद्दलचे धोरण जाहीर केले आहे. ३१ डिसेंबर २०१५पर्यंतची अनधिकृत बांधकामे अधिकृत केली जाणार आहेत. अनधिकृत नळ अधिकृत करण्यासाठी मंगळवारपासून अभय योजना राबवली जाणार आहे. एक हजार रुपये भरून अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घेता येणार आहेत.

\B'समांतर' सभा पुढे ढकला

\B'एमआयएम' पक्षाचे शिबिर मंगळवारी (४ सप्टेंबर) रोजी हैदराबाद येथे होत आहे. याच दिवशी महापालिकेत समांतर जलवाहिनीबद्दल विशेष सर्वसाधारण सभा देखील आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे 'समांतर'ची सभा पुढे ढकला व सात सप्टेंबर रोजी सभा घ्या, अशी विनंती करणारे पत्र विरोधीपक्षनेते जमीर कादरी यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिले आहे. या सभेत नागरिकांच्या हिताचा निर्णय न झाल्यास कोर्टात धाव घेतली जाईल, असेही कादरी यांनी पत्रात नमूद केले आहे.

\Bअशी केली कारवाई

\Bझोन - हटविलेले होर्डिंग

- १ - १८०

- २- ४५

- ३ - २८

- ४ - २११

- ५ - ३४

- ६ - २५८

- ७ - २२४

- ८ - २४४

- ९ - ६९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यायाला विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकाला !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कुणाची हत्या करण्याचा अधिकार कुणालाच नाही. पण, प्रत्येकाला अन्यायाचा प्रतिकार करण्याचा अधिकार आहे. अन्यायाचा विरोध न करणे म्हणजे त्यात सहभागी झाल्यासारखे असते,' असे परखड मत ज्येष्ठ हिंदी कवी डॉ. अरुण कमल यांनी व्यक्त केले. ते 'समन्वय' कार्यक्रमात बोलत होते.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या 'समन्वय' उपक्रमात ज्येष्ठ हिंदी कवी डॉ. अरुण कमल (पाटणा) यांनी संवाद साधला. नांदापूरकर सभागृहात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. हिंदी आणि मराठी साहित्यातील सहसंबंधावर प्रकाश टाकत कमल यांनी भाष्य केले. 'मराठी साहित्याने नेहमीच हिंदी साहित्याला प्रेम दिले. गजानन माधव मुक्तीबोध यांच्या साहित्याने हिंदीचे रूप पालटले. मुक्तीबोध मराठी भाषिक होते. चिंतनातून हिंदी साहित्य बदलण्याचा हा प्रयत्न मी मराठीची देण मानतो. भारतात विविध भाषा असल्या तरी सर्वाधिक अनुवाद हिंदी, मराठी आणि मल्याळम भाषेत होता. बंगाली व तामिळ भाषेत अनुवादाचे सर्वात कमी प्रमाण आहे. त्यामुळे या भाषा निस्तेज झाल्या आहेत. कोणतीही भाषा दुसऱ्या भाषेच्या संपर्कात आल्यानंतर बदलते. मराठीसारखी स्थिती इतर भाषांची राहिल्यास भाषेचा विकास होईल. विंदा करंदीकर, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे यांच्यापासून ते नवोदित कवींपर्यंत मराठीतील सर्व कविता हिंदीत अनुवादित आहेत. कारण मराठी भाषेत मोकळेपणा आहे. भाषा प्रवाही आणि खुली असल्यास ती टिकते. मराठीतील स्त्रीवादी कविता आणि दलित कविता देशात सर्वोत्तम आहे. या कवींनी नेहमीच भारावून टाकले' असे डॉ. कमल म्हणाले. यावेळी त्यांनी अनुराधा पाटील, प्रज्ञा दया पवार आणि मल्लिका अमरशेख यांच्या कवितांचा हिंदी अनुवाद वाचला. त्यानंतर स्वरचित 'धार', 'संबंध', 'घोषणा', 'सबसे जरुरी सवाल', 'योगफल' या कविता सादर केल्या. सामाजिक भाष्य करणाऱ्या कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली. डॉ. कैलास इंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी साहित्य रसिक उपस्थित होते.

\Bजिवावर बेतल्याने बोला

\Bरसिकांशी साधलेल्या संवादात डॉ. अरुण कमल यांनी परखड मते मांडली. 'देशातील असमानता सर्वात मोठा अन्याय आहे. त्यामुळे प्रत्येकाने अन्यायाविरुद्ध बोलण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी तेलुगू कवी वरवरा राव यांना स्थानबद्ध करण्यात आले. कारण ते नेहमीच अन्यायाचा विरोध करीत आले आहेत. अन्यायी सत्तेला विरोध करण्यात ते आघाडीवर राहिले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश या विचारवंतांची हत्या करण्यात आली. ही साथ लेखकांपर्यंत येण्यास वेळ लागणार नाही अशी भयावह स्थिती आहे. जिवावर बेतत असल्यामुळे बोलावेच लागणार' असे कमल म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्ट नेते विकासातली धोंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठवाड्याच्या मागासलेपणासाठी सध्याचे भ्रष्ट नेते जबाबदार आहेत. या नेत्यांना जाब विचारण्यासाठी विक्रांद मराठवाडा विकास क्रांती दलाच्या माध्यमातून जनआंदोलन उभे करू,' असा निर्धार शनिवारी माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, 'औरंगाबाद पुढच्या समस्यां वाढत चालल्या आहेत. कचरा, पाणी, रस्ते अशा समस्यांनी नागरिकांची कोंडी केले आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी आता नवीन नेतृत्व समोर येण्याची गरज आहे. नव्या नेतृत्वाच्या माध्यमातूनच विकासाला वेग येईल. गेल्या काही वर्षात सत्ताधाऱ्यांनी विदर्भाच्या विकासासाठी राज्याचा अर्थसंकल्पाच्या ७६ टक्के निधी नेला. पश्चिम महाराष्ट्राने आपला अधिकार कायम ठेवला. कोकणलाही नेतृत्व असल्याकारणाने तेथील विकास होत आहे, पण मराठवाड्याचा विकास आतापर्यंत झालेला नाही. सध्या औरंगाबाद शहराची परिस्थिती खूपच खालावली आहे. औरंगाबादमध्ये राहणारे अनेक निवृत्त अधिकारी औरंगाबाद सोडून जात आहेत. यामुळे या भ्रष्ट राजकारणी आणि पक्षाविरोधात आंदोलन उभे करण्याची वेळ आली आहे. या आंदोलनातुन मराठवाड्याला नवे नेतृत्व देण्याचा प्रयत्न असून, विक्रांद मराठवाडा विकास क्रांती दलाच्या माध्यमातून गणेश उत्सवानंतर हे आंदोलन उभारू. यात औरंगाबाद आणि जालन्यातील १५ हजार दलाचे कार्यकर्ते सहभागी होतील,' असा दावा पवार यांनी केला.

'एमआयएम'मध्ये जाणार नाही…

'गेल्या चार वर्षांचा राज्य आणि केंद्र शासनाच्या कामाचा अभ्यास केल्यास, तसेच शहरातील सत्ताधाऱ्यांचा अभ्यास केला, तर आतापर्यंत या सर्वांनी जनतेचा विश्वास घात केला आहे. न अच्छे दिन आये है, न ही आयेंगे. लोकसभेसाठी मी 'एमआयएम'कडून लढणार नाही. तसेच 'भाजप'सारख्या जातीयवादी पक्षाच्या वळचणीला जाणार नाही,' असेही पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images