Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तोडलेल्या झाडांना आज श्रद्धांजली सभा

$
0
0

औरंगाबाद: कांचनवाडी येथे ७० ते ८० वर्षे जुने वडाचे झाड सार्वजनिक बांधकाम विभागाने वृक्ष प्राधिकरणाची परवानगी न घेता तोडले. या तोडलेल्या झाडाला श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम निसर्गप्रेमींनी मंगळवारी (१८ सप्टेबर) आयोजित केला आहे. सकाळी पावणेआठ वाजता पैठणरोड वरील शांती नर्सिंग होम शेजारी हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाटील यांना पदावरून हटवा

$
0
0

औरंगाबाद: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने काढलेल्या तिरंगा पदयात्रेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना फर्मान सोडण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे भगवेकरण करण्याचा हा प्रकार असल्याची टीका रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने केली आहे. याबाबत संघटनेने निवेदनाद्वारे निषेध नोंदवला आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. टी. आर. पाटील यांनी कार्यालयीन परिपत्रकाद्वारे महाविद्यालयांना 'अभाविप'च्या खासगी कार्यक्रमात 'एनएसएस'च्या विद्यार्थ्यांना पाठविण्याची सूचना केली आहे. या प्रकारावरून आंबेडकरी विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. हा प्रकार सत्तेचा गैरफायदा घेऊन शिक्षणाचे भगवेकरण करू पाहणाऱ्या 'आरएसएस'च्या रणनीतीचा भाग आहे व विद्यापीठातील संघधार्जिणे प्रशासन खतपाणी घालत असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने संचालक पाटील यांना तातडीने पदावर हटवावे, अशी मागणी सचिन निकम, अॅड. अतुल कांबळे, अविनाश जगधने, अविनाश काबळे, प्रा. प्रबोधन बनसोडे, कुणाल भालेराव, अॅड. प्रसेनजीत एडके, सागर शहा, गजानन कांबळे आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजाबाजार मित्र मंडळाचे नियोजन कौशल्य

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्थळ : संस्थान गणपती परिसर, वेळ : दुपारी अडीचची. हजारो भाविक भंडारा कधी सुरू होतो याची वाट बघत होते. अशा वेळी अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी संस्थान गणपती ट्रस्ट व राजाबाजार मित्र मंडळाने काही मिनिटांत नियोजन कौशल्य पणाला लावत सुमारे दीड हजार भाविकांना भोजनाचे पार्सल वाटप केले. दारी आलेला उपाशीपोटी जाऊ नये, याची पुरेपूर काळजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेत त्यांची भूक भागविली.

शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिर ट्रस्टतर्फे गणेशोत्सवामध्ये दररोज दुपारी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. सुमारे अडीच ते तीन हजार भाविक या भंडाऱ्याचा लाभ घेतात. सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणे भंडाऱ्याची तयारी जवळपास पूर्ण होत आली होती. हजारो भाविक महाप्रसादासाठी संस्थान मंदिराच्या परिसरात दाखल झाले. भुकेची वेळ झाल्याने कधी एकदा महाप्रसादाला सुरुवात होते, याची सर्वजण वाट बघत होते. यावेळी वरुणराजाने हजेरी लावली. सुरुवातीला भुरभूर वाटणारा पाऊस नंतर जोरदार झाला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देखील काही वेळ पाऊस थांबल्यानंतर भंडाऱ्याला सुरूवात करू, असे वाटले, मात्र पाऊस थांबण्याची काही चिन्हे नव्हती. यामुळे कार्यकर्त्यांनी बालाजी मंगल कार्यालयात भंडाऱ्याचे नियोजन करण्याचे ठरवले. काही मिनिटात सर्व व्यवस्था करण्यात आली.

या ठिकाणी सर्वांना बसवून वाढणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना पार्सल देण्याचे ठरवण्यात आले. जेष्ठ कार्यकर्ते रमेश घोडेले यांनी तात्काळ पार्सलसाठी पिशव्या उपलब्ध करून दिल्या. हजारो भाविक जेवणासाठी ताटकळत उभेच होते. राजाबाजार मित्र मंडळाचे सुमारे दीडशे कार्यकर्ते एकत्र कामाला लागले. कोणाचे नेतृत्व नव्हते की आरडाओरड नव्हता. प्रत्येकाने काम स्वत:हून वाटून घेतले. काही मिनिटात भाजी, पुरी, मसाले भात व बुंदीची शेकडो पाकिटे तयार करण्यात आली. बालाजी मंगल कार्यालयात शिस्तीमध्ये भाविकांच्या रांगा लावून भोजनाची पार्सल त्यांना देण्यात आली. अवघ्या दीड तासात अथक परिश्रम घेत कार्यकर्त्यांनी हे काम पार पाडले. सर्वांना अन्नदान झाल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शेवटी एकत्रित भोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आंदोलनाचा साकारला देखावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले. यावर्षी गणेशोत्सव आणि महालक्ष्मी पूजनातही आरक्षण आंदोलनाचे देखावे साकार करून आरक्षणाची मागणी धगधगती ठेवण्यात आली आहे. शहरातील चैतन्य पवार यांच्या घरी महालक्ष्मीसमोर साकारलेला देखावा आकर्षण ठरला आहे.

घरोघरी तीन दिवस महालक्ष्मीचे भक्तिभावाने पूजन करण्यात आले. आकर्षक सजावट महालक्ष्मी पूजनाचा महत्त्वाचा भाग असतो. सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्याचे प्रमाण काही वर्षांपासून वाढले आहे. नाथनगर येथील रहिवासी चैतन्य पवार यांनी यावर्षी मराठा आरक्षण आंदोलनाचा देखावा साकारला आहे. राज्यभर निघालेल्या मोर्चाची सविस्तर माहिती छायाचित्रांसह देण्यात आली आहे. लाखोंच्या संख्येने निघालेल्या मोर्चाची छायाचित्रे देखाव्याच्या वेगळेपणात भर घालणारी आहेत. तसेच रवींद्र जाधव यांच्या सहकार्याने पवार यांनी सात मिनिटांचा माहितीपटसुद्धा तयार केला आहे. मराठा मोर्चा निघण्याची कारणे आणि सद्यस्थितीवर माहितीपटात सविस्तर भाष्य आहे; तसेच आरक्षणाची गरज का आहे याची चर्चा करून संदेश दिला आहे. परिचित व परिसरातील नागरिकांनी हा देखावा पाहण्यासाठी आवर्जून भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीने उभारली दोन गोदामे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकऱ्यांना त्यांचा शेतीनियमित माल सुरक्षितपणे ठेवता यावा, यासाठी दोन गोदाम उभारण्यात आले आहेत. त्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून, येत्या १५ दिवसात लोकार्पण सोहळ्याचे नियोजन सुरू असल्याचे बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठारे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. शेतकऱ्यांच्या या हक्काच्या गोदामांच्यामाध्यमातून शेतीमाल तारण योजनाही अधिक प्रभावी राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात समितीचे एकही गोदाम नव्हते. त्यामुळे हमीभावाने खरेदी केलेल्या धान्यासह अन्य शेतीनियमित माल अन्यत्र ठेवावा लागत. अनेकदा शेतकऱ्यांना शेती मालास अपेक्षित भाव मिळत नाही. त्यावेळेस त्यांना माल सुरक्षितपणे कुठे ठेवावा, हाच प्रश्न पडत असे. ही बाब लक्षात घेत समितीने एक हजार टन क्षमतेचे असे दोन गोदाम बांधण्याचा निर्णय घेतला वर्षभरा पूर्वी घेतला होता. गोदामांचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, येत्या १५ दिवसांत लोकार्पण सोहळा आयोजित करण्याचे नियोजन आखले जात असल्याचे समितीचे सभापती पठाडे यांनी सांगितले. गोदामांच्या उभारणीसाठी एक कोटी १९ लाखांची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात एक कोटी १५ लाखांहून कमी खर्च असल्याची माहिती त्यांनी दिली.

\Bशेतमाल तारण योजनेचा लाभ

\Bशेती नियमित मालाची एकाच वेळी जास्त आवक झाल्यास बाजार भाव कमी होतो. अशा वेळी शेतकऱ्यांना कमी किंमतीत मालाची विक्री करावी लागते. मालाची साठवणुकीसाठी पुरेशी जागा नसते. त्यामुळे विक्रीशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो, परंतु गोदामांमुळे हा प्रश्न निकाली निघणार असून, पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभही यामाध्यमातून शेतकऱ्यांना घेता येईल. योजनेची माहिती प्रभावीपणे शेतकऱ्यांनापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही पठाडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत मालमत्तांना शासन मंजुरीची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनधिकृत मालमत्ता अधिकृत करण्याच्या संचिकांना शासकीय मान्यतेचा अडथळा निर्माण झाला आहे. मालमत्ता अधिकृत करून घेण्याच्या अटी शिथील करण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने घेतला, पण त्याला शासनाची मान्यता मिळाल्याशिवाय कार्यवाही करता येणार नाही, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या अनधिकृत मालमत्ता अधिकृत करण्याचे धोरण जाहीर केले. मात्र जाचक अटींमुळे या योजनेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अटी शिथील करण्याचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वत:च्या पातळीवर घ्यावा, हा निर्णय मंजुरीसाठी शासनाकडे पाठवावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार, सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला. शासन मंजुरीच्या आधीन राहून सर्वसाधारण सभेच्या निर्णयानुसार मालमत्ता अधिकृत करण्याच्या संचिका निकाली काढा, असे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले होते. संचिका स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात काही प्रमाणात संचिकांचा प्राप्त होत आहेत. पण, पालिकेने शिथील केलेल्या अटींना राज्य शासनाने मान्यता दिल्याशिवाय संचिकांवर निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे शासनाची मंजुरी मिळेपर्यंत फक्त संचिका स्वीकारण्यात येणार आहेत. परिणामी, लगेच अनधिकृत मालमत्ता अधिकृत होण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाजपेयी यांना कवितेतून श्रद्धांजली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हिन्दु तन मन हिन्दु जीवन

रग रग हिन्दु मेरा परिचय॥

मै शंकर का वह क्रोधानल

कर सकता जगती क्षार क्षार

डमरू की वह प्रलयध्वनि हूं

जिसमे नचता भीषण संहार

रणचंडी की अतृप्त प्यास

मै दुर्गा का उन्मत्त हास

मै यम की प्रलयंकर पुकार

जलते मरघट का धुँवाधार

फिर अंतरतम की ज्वाला से

जगती मे आग लगा दूं मै

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अशा कविता सादर करत सोमवारी त्यांना काव्यरूपी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

भाजप गारखेडा मंळडाचे अध्यक्ष मंगलमूर्ती शास्त्री, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या पुढाकाराने या काव्यांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी संघाचे देवगिरी प्रांतचे सहसंघचालक मधुकर जाधव, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत श्रद्धांजली अर्पण केली. मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, मनोज पांगारकर आदी उपस्थित होते. सुधीर मोघे यांनी 'आओ मन की गाठें खोले' ही कविता सादर करत काव्यांजलीला प्रारंभ केला. तर नीता पानसरे यांनी

दूध में दरार पड गई,

खून क्यों सफेद हो गया?

भेद में अभेद खो गया

बंट गये शहीद, गीत कट गए,

कलेजे में कटार दड़ गई

दूध में दरार पड गई

ही कविता सादर करत वाजपेयी यांना श्रद्धाजंली अर्पण केली. यासह वाजपेयी यांच्या तसेच त्यांच्या काही अनुवादित केलेल्या कविता प्रा. विजय पोहरेनकर, अरविंद डोणगावकर, अश्विनी दाशरथे, पंडीत विश्वनाथ दाशरथे, हर्षवर्धन दीक्षित, दत्ता जोशी यांनी सादर केल्या. तर

'हिन्दु तन मन हिन्दु जीवन रग रग हिन्दु मेरा परिचय ही कविता' या सर्वांनी सादर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरीप्रकरणी पाच आरोपींना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कांचनवाडी परिसरातून दुचाकी चोरी झाल्याच्या प्रकरणात गणेश गवळी, प्रितेश वाघमारे, मंगेश वेळंजकर, राहुल घोडके व सुमेध वावरे यांना सोमवारी (१७ सप्टेंबर) अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता सर्व पाच आरोपींना मंगळवारपर्यंत (१८ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

याप्रकरणी सचिन भगवानसिंग मिरधे (३४, रा. पुरंदर बिल्डिंग, सैनिक विहार कॉलनी, कांचनवाडी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २७ जून २०१८ रोजी फिर्यादीने आपल्या घरातील पार्किंगमध्ये दुचाकी लावली असता, दुसऱ्या दिवशी दुचाकीची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. फिर्यादीच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी गणेश बळीराम गवळी (२०, रा. विटा, ता. मानवत, जि. परभणी, ह. मु. संजयनगर, बायजीपुरा, औरंगाबाद), प्रितेश रामराव वाघमारे (२१, रा. नागापूर, ता. परळी वैजनाथ, जि. बीड, ह. मु. सावित्रीनगर, चिकलठाणा, औरंगाबाद), मंगेश अरुण वेळंजकर (२०, रा. खंडाळा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद, ह. मु. संजयनगर, बायजीपुरा), राहुल सुदाम घोडके (२१, रा. अन्वा, ता. भोकरदन, जि. जालना, ह. मु. भवानीनगर, जुना मोंढा, औरंगाबाद) व सुमेध शरदरारव वावरे (२०, रा. सेलू, जि. परभणी, ह. मु. शंभुनगर, गारखेडा, औरंगाबाद) यांना सोमवारी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरी झालेल्या दुचाकीसह अन्य दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, दुचाकी चोरीची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर वाढली असून, आरोपींनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, त्यांचे अन्य कोणी साथीदार आहेत का आदींचा तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने सर्व पाच आरोपींना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीड लाखांचे मोबाइल चोरणारे कामगार गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

व्हिडिओकॉन कंपनीमधून कुलपॅड कंपनीचे दीड लाखांचे मोबाइल चोरणाऱ्या दोन कामगारांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. चितेगाव येथील कंपनीत १४ सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चितेगाव भागातील व्हिडिओकॉन कंपनीमधून गेल्या काही दिवसांपासून कुलपॅड कंपनीचे दीड लाख रुपये किंमतीचे १४ मोबाइल चोरीस गेले होते. याप्रकरणी कंपनीचे अधिकारी विजय लिलाधर भंगाळे (वय ४६, रा. प्रतापनगर) यांनी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील तपास करीत होते. हा गुन्हा कंपनीतील कामगार संशयित आरोपी करण नंदू आवारे व गणेश बाबासाहेब आवारे उर्फ शक्तीमान (दोघे रा. पाटोदे वडगाव, ता. पैठण) यांनी केला असल्याची माहिती या पथकाला मिळाली. या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीमध्ये सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत त्यांनी कंपनीमधून मोबाइल चोरून आणल्याची कबुली दिली. हे मोबाइल त्यांनी करणच्या ओळखीच्यांना दिले होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून ११ मोबाइल जप्त केले आहे. दोन्ही आरोपींना बिडकीन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पीएसआय भगतसिंह दुलत, गणेश जाधव, संजय काळे, विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, राहुल पगारे, सागर पाटील, गणेश गांगवे व चालक तांदळे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नडमध्ये कचरा संकलनासाठी पाच नव्या घंटागाड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

कचरा संकलनासाठी कन्नड नगर परिषदेने पाच नवीन घंटागाड्यांचे मराठवाडा मुक्तीदिनाचे औचित्य साधून नगराध्यक्षा स्वाती कोल्हे यांच्या हस्ते लोकार्पण केले. शहरातील टिळक उद्यानातील मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृती स्तंभाजवळ हा कार्यक्रम पार पडला. या घंटा गाड्यांमध्ये 'जीपीएस' प्रणाली बसवली असून, सर्व गाड्यामध्ये ओला कचरा व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. घंटागाडी चालकांना नगर परिषद कार्यालयाकडून स्वतंत्र मोबइल देण्यात आले असून, सर्व प्रभागामध्ये स्वतंत्र गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सर्व प्रभागांमधील दर्शनीय ठिकाणी घंटागाड्यांचा पथदर्शन नकाशा लावण्यात येणार आहे. नगर परिषद कार्यालयाच्या अॅपवर नागरिकांना घंटागाड्यांबद्दल अद्ययावत माहिती समजणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष, गटनेते संतोष कोल्हे, मुख्यधिकारी नंदा गायकवाड, नगरसेवक अनिल गायकवाड, कैलास जाधव, कविता रत्नाकर पंडित यांच्यासह नगर परिषद कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्न सोहळ्यात मोबाइल चोरणाऱ्याला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्न सोहळ्यातून मोबाइल लंपास केल्याप्रकरणात आरोपी आनंद बाबुराव होरशीळ याला रविवारी (१६ सप्टेंबर) अटक करण्यात आली. त्याला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीला मंगळवारपर्यंत (१८ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

याप्रकरणी काशिनाथ कोंडीबा टेकाडे (६०, रा. भगतसिंगनगर, अशोकनगर) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादी हा रविवारी दुपारी दीडच्या सुमारास फिर्यादी हा जळगाव रोडवरील कलावती लॉन्स येथे लग्न सोहळ्यासाठी गेला असता, त्याच्या शर्टाच्या खिशातून १४०० रुपये किंमतीच्या मोबाइलची चोरी झाली.

याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी आनंद बाबुराव होरशीळ (२६, रा. गौतमनगर, आंबेडकरनगर, औरंगाबाद) याला रविवारी अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने मोबाइल चोरीची कबुली दिली. त्यानंतर आरोपीला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीकडून मोबाइल हस्तगत करणे बाकी असून, आरोपीने आणखी काही गुन्हे केले आहेत का; तसेच त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का, आदींचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला मंगळ‍वारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश मंडळासमोर जुगार खेळणे भोवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

गणेश मंडळासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळणाऱ्या २१ जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी मध्यरात्री गारखेडा, गजानननगर व मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन भागात करण्यात आली. आरोपींविरुद्ध सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गजानननगर भागातील गल्ली क्रमांक चार येथे गुन्हे शाखेने पहिली कारवाई केली. या ठिकाणी असलेल्या गणेश मंडळाच्या समोरील पत्र्याच्या शेडमध्ये काही तरुण जुगार खेळत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. या ठिकाणी छापा टाकत पोलिसांनी संशयित आरोपी अक्षय अण्णसाहेब पडूळ, निलेश प्रभाकर पवार, सिद्धार्थ सुभाष साबळे, गजानन बन्सी मुगल, हिरानाथ क्षीरसागर, राजू रामचंद्र पवार, अक्षय राजपूत, गणेश जग्गनाथ तांदळे व निलेश लकेकर यांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा ३४ हजार ६४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

मुकुंदवाडी विश्रांतीनगर भागात पुंडलिकनगर पोलिसांनी दुसरीकारवाई केली. येथील मोकळ्या जागेत जुगार खेळत बसलेल्या आरोपींवर छापा टाकत अटक करण्यात आली. संशयित आरोपीमध्ये विजय कचरू बताडे, विजय मिठ्ठू भोकरे, अशोक नारायण म्हस्के, योगेश रामा गायकवाड, विनय भगवान कापडे, गौतम विश्वंभर खंदारे, राजू शेषराव ढाकणे, गौतम प्रभू म्हस्के, आकाश सुरेश राऊत, दत्तू सुभाष गायकवाड, धम्मा सुदामराव इंगळे व अनिल देवराव जाधव यांचा समावेश आहे. आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा ३२ हजार २०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्र्याच्या शेडमधील मृतदेहाचे रहस्य उलगडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुकुंदवाडी राजनगर भागात ३१ ऑगस्ट रोजी पत्र्याच्या शेडमध्ये अर्धवट आढळलेल्या मृतदेहाच्या खुनाचे रहस्य उलगडण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. रेल्वेत पाकिटमारी करणाऱ्या गुन्हेगाराने पिशवी उचलण्यास नकार दिल्याने भिकाऱ्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत भिकाऱ्याची ओळख पटली असून, पांडुरंग रामा पवार (वय ४५, रा. वसमतरोड, शासकीय डेअरीजवळ, परभणी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी रमेश जाधव या पाकिटमाराला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

पांडुरंग पवार हा मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन येथे भीख मागत असे. या ठिकाणी त्याची रेल्वेत पाकिटमारी करणारा गुन्हेगार रमेश उर्फ रम्या याच्याशी ओळख झाली होती. पांडुरंग हा गेल्या काही महिन्यापासून रमेश व त्याची पत्नी फुलाबाईसोबत राहत होता. रमेशने चोरलेल्या वस्तू सांभाळण्यासाठी फुलाबाई व पांडुरंगकडे देण्यात येत होत्या. दीड महिन्यापूर्वी चोरलेल्या सामानाची पिशवी उचलण्यावरून रमेश व पांडुरंगमध्ये वाद झाला होता. या वादातून राजनगर येथे रमेशने पांडूरंगला बेदम मारहाण केली; तसेच त्याला पाण्याच्या हौदात बुडवले. श्वास गुदमरल्यामुळे पांडुरंगाचा मृत्यू झाला.

मृत्यूनंतर रमेशने त्याच्या घरासमोरील तेजबहादूर यादव याच्या पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून मृतदेह टाकला. शेडला दुसरे कुलूप लावून तो पसार झाला. या पसार आरोपींना शोधून अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले. ही कामगिरी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पीएसआय विजय पवार, समद पठाण, संजय धुमाळ, आनंद वाहूळ, सुरेश काळवणे, रमेश भालेराव, विरेश बने, शेख नवाब, भाऊलाल चव्हाण, संदीप बीडकर, शेख बाबर, ज्ञानेश्वर पवार आणि संजीवनी शिंदे आदींनी केली.

\Bरमेशला परतूर येथून अटक\B

पांडुरंगचा खून केल्यानंतर फुलाबाई मुंबईला, तर रमेशने परतूरला पलायन केले होते. कुत्र्यांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर खुनाचा हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने माहिती घेतली असता रमेश नावाचा पाकिटमार पसार असल्याचे समोर आले. पोलिसांनी पाळत ठेवून रमेशला परतूर येथून अटक केली. त्याच्यावर लोहमार्ग पोलिस ठाण्यात देखील गुन्हे दाखल असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमोहनसिंग ओेबेरॉय यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय यांचे मंगळवारी सकाळी ११ वाजता हृदयविकारच्या झटक्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना रुग्‍णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, चार मुली, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

ओबेरॉय हे गुरू तेगबहादूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. औरंगाबाद शहर तसेच जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. १९७८ ते २००० तसेच २००५ ते २०१० या कालावधीत नगरसेवक असलेले ओबेरॉय १९९१ ते ९२या कालावधीत महापौर तर १९८९ ते ९० या कालावधीत शहराचे उपमहापौर होते. या शिवाय १९८८मध्ये सभागृह नेता, तर १९९५ ते ९६ या काळात ते विरोधीपक्ष नेते होते. समाजकारणातही अग्रेसर असलेले ओबेरॉय हे बी. करमसिंग ओबेरॉय चॅरिटेबल ट्रस्ट, श्री गुरू तेगबहाद्दूर शिक्षण संस्था, स्थानिक ट्रक असोसिएशन, महाराष्ट्र टॅक्सी युनियन, सर्वपक्षीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष होते. यासह २००० ते २०१२ या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर, जिल्हा अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. मनमोहनसिंग यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी दिनांक ११ वाजता त्यांच्या उस्मानपुरा येथील निवासस्थानापासून सुरू होईल व प्रतापनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

माझे दीर्घकाळ सहकारी व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, औरंगाबाद शहराचे माजी महापौर मनमोहनसिंगजी ओबेरॉय यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

- शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारळीबागचा पावन गणपती

$
0
0

नारळीबाग येथील पावण गणेश मंदिर शहरातील जुन्या मंदिरापैकी एक आहे. नवसाला पावणारा गणराया म्हणून पावन गणपतीची ओळख आहे. पूर्वी शहरातील सार्वजनिक गणोशोत्सव मिरवणुकीचा समारोप नारळीबाग येथे करण्यात येत होता. या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक विहिरीमध्ये विसर्जन करण्यात येत होते. पावन गणेश मंदिराची स्थापना १९८२मध्ये या विहिरीच्या समोर करण्यात आली. यापूर्वी अंजली टॉकीजसमोर पावण गणेश मंडळाची स्थापना दादासाहेब गणोरकर, नंदलाल गुणवाणी, राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली बंडू ओक, सुहास दाशरथे, सोमनाथ खंडागळे आदींनी केली होती. त्यानंतर विसर्जन विहिरीजवळ या मंदिराचे कायमस्वरुपी मंदिर बांधण्यात आले. या मंदिरातील मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरीसची आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून पावन गणपती ओळखला जातो. ज्यांचा नवस पूर्ण झाला आहे. ती मंडळी या ठिकाणी घंटी बांधून किंवा यथाशक्ती अभिषेक करून नवस पूर्ण करतात. मंदिराच्या मागे महापालिकेने मोठे सभागृह बांधले आहे. या ठिकाणी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात येते. बदलत्या काळात विसर्जन मिरवणुकीतील गणपतीची वाढ होत असल्याने; तसेच वाहतुकीच्या दृष्टीने नारळीबागेतील सार्वजनिक विसर्जन विहीर कमी पडत होती. त्यामुळे १९९३मध्ये औरंगपुरा जिल्हा परिषद मैदानावर नविन विहिरीत विसर्जनास सुरुवात करण्यात आली. सध्या देखील या विहिरीत नागरिक निर्माल्य आणून विसर्जित करतात. पावण गणेश मंडळांतर्गत पावन गणेश क्रीडा मंडळ कार्यरत आहे. १९९०मध्ये या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये एकूण २५० सदस्य असून, त्यापैकी १५० महिला व तरुणीचा समावेश आहे. शिस्तबद्ध ढोल पथक म्हणून देखील पावण क्रीडा मंडळाची ओळख आहे. पावण गणेश मंडळाचे बंडू ओक यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षणमहर्षी चिपळूणकर गेले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्याचे माजी शिक्षण संचालक, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ विद्याधर विष्णू चिपळूणकर (वय ९० वर्षे) यांचे मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी प्रमिला, दोन मुले राजीव, अरविंद आणि मुलगी विनता असा परिवार आहे. मुकुंदवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्राचार्य, राज्य शिक्षणशास्त्र संस्थेचे संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक, शिक्षण संचालक अशी मानाची पदे त्यांनी भूषविली. तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री पी. व्ही. नरसिंहराव यांनी चिपळूणकर यांना दिल्लीत बोलावून त्यांच्यावर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड अॅडमिनिस्ट्रेशन संस्थेचे सल्लागार म्हणून जबाबदारी सोपवली होती.

चिपळूणकर यांच्या काही क्रिया वृद्धापकाळामुळे मंदावल्या होत्या. सोमवारी रात्री अकरा वाजता जेवण करून ते झोपले. सकाळी सहा वाजता मुलगा अरविंद त्यांना उठवण्यासाठी खोलीत गेला. तेव्हा त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेजारीच असलेल्या डॉ. प्रशांत अपस्तंभ यांना बोलावण्यात आले. डॉ. अपस्तंभ यांनी तपासून त्यांची प्राणज्योत मालवल्याचे जाहीर केले. त्यानंतर डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे डॉ. सतीश कुलकर्णी देखील आले. त्यांनीही चिपळूणकरांना तपासले.

\Bचिपळूणकर यांनी माध्यमिक शिक्षक ते शिक्षण संचालक असा मोठा प्रवास केला आहे. त्यांनी सुरू केलेल्या अनेक योजना आणि कामे आजही कार्यरत आहेत व विद्यार्थ्यांसाठी हितावह ठरत आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस

\B

\Bऔरंगाबाद भूषण

\Bशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर १९९०मध्ये चिपळूणकर औरंगाबादेत स्थायिक झाले. औरंगाबादला आल्यानंतर त्यांनी सुमारे सात वर्ष नागरिकांसाठी संस्कृतचे मोफत वर्ग घेतले. शहरात पाच ठिकाणी त्यांचे वर्ग चालायचे. प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्याच काळात सिडको एन ५ येथील गीताभवन इमारतीचे काम पूर्णत्वास गेले. त्यांना औरंगाबाद भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

\Bचिपळूणकरांचे कार्य

\Bवि. वि. चिपळूणकर यांचा जन्म मुंबईतील विलेपार्ले येथे झाला. मुंबईतील वेल्सन कॉलेजमधून त्यांनी संस्कृतमधून बी. ए. आणि एम. ए. चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतीलच एस. टी. कॉलेजमधून एम.एड.चे शिक्षण पूर्ण केले. १९५०पासून ते मुंबईतील विविध शाळांमधून शिक्षक म्हणून काम करू लागले. रात्रशाळेतही शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील पोयनाड येथील शाळेत ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. १९६१मध्ये ते शासकीय सेवेत शिक्षण खात्यात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील 'एसएमटीटी' कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम केले. बीड येथे १९६३मध्ये शिक्षणाधिकारी म्हणून शासनाने त्यांची नियुक्ती केली. १९६६मध्ये शासनाने विद्यानिकेत शाळा सुरू केल्या. औरंगाबाद येथील शासकीय विद्यानिकेतनचे चिपळूणकर पहिले प्राचार्य होते. १९६६ ते १९७१पर्यंत त्यांनी विद्यानिकेतनचे प्राचार्य म्हणून काम केले. विद्यानिकेतनमधून ते पुन्हा मुंबईत १९७१मध्ये एस. टी. कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून रुजू झाले. राज्य शिक्षणशास्त्र संस्थेचे संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर १९७७ ते १९८७ या काळात शिक्षण संचालक म्हणून त्यांनी काम केले. तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री पी. व्ही. नरसिंहराव यांनी चिपळूणकर यांना दिल्लीत बोलावून घेतले. तेथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड अॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक भान जपणारा शिक्षणतज्ज्ञ हरपला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सामाजिक भान जपणारा, आपण समाजासाठी काही देणे लागतो याची सतत आठवण ठेवणारा शिक्षणतज्ज्ञ हरपला, अशा शब्दात त्यांच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्यांनी वि. वि. चिपळूणकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

\Bविद्यानिकेतन ही त्यांची देण \B

वि. वि. चिपळूणकर यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे. राज्याचे शिक्षण संचालक म्हणून त्यांनी भरीव काम केले. विद्यानिकेतन ही त्यांची शिक्षण क्षेत्रासाठी मोठी देण आहे. विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांना ते नेहमी मार्गदर्शन करत. प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला शिका, असे ते आम्हाला नेहमी सांगायचेय. सामाजिक भान जपायला त्यांनीच शिकवले. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

- मच्छिंद्र चाटे, माजी विद्यार्थी, विद्यानिकेतन

\Bविद्यानिकेतनचा प्रभाव

\Bतत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी आणि वि. वि. चिपळूणकर यांच्या संकल्पनेतून शासकीय विद्यानिकेतन शाळा सुरू करण्यात आल्या. त्या शाळा सुरू झाल्या नसत्या, तर आम्ही कुठेच नसतो. आज आम्ही जे काही आहोत ते चिपळूणकर सरांच्या विद्यानिकेतन शाळेमुळेच. सरांनी विद्यानिकेतनच्या माध्यमातून शिक्षणासाठीची पायवाटच आमच्यासाठी तयार करून दिली. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

- सखाराम पानझडे, माजी विद्यार्थी, विद्यानिकेतन

\Bहसतमुख राहण्याचा मंत्र \B

कोणत्याही स्थितीत हसतमुख रहा, असे सर सांगत राहिले. आम्हा विद्यार्थ्यांना ते किती जमले माहीत नाही, पण सर अखेरपर्यंत हसतमुखाने समाज आणि शिक्षणाचे चिंतन करत राहिले. विद्यानिकेतनचे संस्थापक आणि प्रचार्य म्हणून, शिक्षण संचालक म्हणून आणि निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकाचे संघटन म्हणून त्यांनी अनेक पिढ्या घडविल्या. सरांनी औरंगाबादला राहण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला. हे या शहराचे भाग्यच म्हटले पाहिजे. विद्यानिकेतनमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली नसती, तर आयुष्यात कोणत्या स्थितीला सामोरे जावे लागले असते, याची माझ्यासारखे हजारो विद्यार्थी कल्पनाही करू शकत नाहीत. त्यावेळी सरांनी आमच्यासारख्या विद्यार्थ्याचा विचार करून ग्रामीण भागातील होतकरू मुलांवर मोठे उपकार केले. सरांनी घालून दिलेल्या आदर्शावर हजारो विद्यार्थी समाज आणि देशसेवा करीत आहेत. ती अविरत सुरू ठेवणे हीच सराना आदरांजली होय.

- यमाजी मालकर, माजी विद्यार्थी, विद्यानिकेतन

\Bआधुनिक चेहरा दिला\B

वि. वि. चिपळूणकर यांचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत मोठे योगदान आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्राला आधुनिक चेहरा देण्याचे काम केले. शासनाच्या शिक्षण खात्यालाही त्यांनी आधुनिक चेहरा दिला. त्यांचे माझे फार जवळचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सामील आहे.

- सतीश चव्हाण, आमदार

\Bमोलाचे काम

\Bचिपळूणकर यांचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीचे मोलाचे काम आहे. चिपळूणकर समितीचा अहवाल त्याचे उदाहरण आहे. चिपळूणकर सर हे हाडाचे शिक्षक होते. शिक्षक कसा असावा याचे ते मूर्तीमंत उदाहरण. विद्यानिकेतनची मूळ कल्पना त्यांचीच. विद्यानिकेतन शाळांमुळे ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली आहे. त्यांच्या निधनामुळे एका दृष्टी असलेल्या शिक्षणतज्ज्ञाला महाराष्ट्र मुकला आहे.

- एस. पी. जवळकर, शिक्षणतज्ज्ञ

\Bकार्य प्ररणा देणारे

\B जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर यांचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम राबवून ज्ञानार्जनाचे कार्य केले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले भरीव कार्य हे येणाऱ्या पिढीला नेहमीच प्रेरणा देत राहील. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे या उद्देशाने शासकीय विद्यानिकेतनची संकल्पना त्यांनी साकारली. शिक्षण क्षेत्रात चिपळूणकरांसारखे व्यक्तिमत्त्व होणे नाही.

- नंदकुमार घोडेले, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिंदादिल व्यक्तिमत्व हरपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उत्कृष्ट संघटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय हे सर्व समाजातील नागरिकांना सोबत घेऊन चालणारे एक जिंदादिल व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनामुळे औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय आणि समाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केली.

\Bआवडते व्यक्तिमत्व

\Bमनमोहन सिंग ओबेरॉय हे एक जिंदादिल इन्सान होते. महापालिकेच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष विविध पदावरून शहर विकास केला. विशेष म्‍हणजे सर्वपक्षीय नेत्यांचे आवडते व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. महापालिकेतील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्‍यांना एकत्र करून एकाच व्यासपीठावर आणून त्यांनी शहरवासीयांची मने जिंकली. त्यांच्या कार्याला सलाम. घोडेले कुटुंबीय आणि शहरवासियांच्या वतीने शहराचा प्रथम नागरिक या नात्‍याने भावपूर्ण आदरांजली.

- नंदकुमार घोडेले, महापौर

\Bराजकीय मार्गदर्शक गमावला

\Bराष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा औरंगाबादचे माजी महापौर मनमोहनसिंगजी ओबेरॉय यांच्या निधनामुळे औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. माझे वडील व मनमोहनसिंगजी यांच्या वडिलांची घनिष्ठ मैत्री होती. त्यामुळे साहजिकच मनमोहनसिंगजी ओबेरॉय व आमच्या कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहून औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. शहराच्या प्रश्नांची उत्तम जाण व शहराच्या विकासाविषयीची तळमळ त्यांच्या बोलण्यातून कायम जाणवत असे. राजकीय दृष्ट्या आम्हा तरुण पिढीचे ते मार्गदर्शकच होते. त्यांच्या जाण्याने औरंगाबाद जिल्ह्यात एक राजकीय पोकळी निर्माण झाली असून, मी एक कुशल राजकीय मार्गदर्शक गमावला आहे.

- सतीश चव्हाण, आमदार

\Bजनतेचे प्रश्न मांडले

\Bराष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्‍यंत धक्कादायक बातमी. मनमोहनसिंग ओबेरॉय यांचा २५ वर्षे राजकारणात सक्रिय सहभाग होता. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, लोकांना न्याय देण्यासाठी ओबेरॉय हे नेहमीच अग्रेसर होते. राष्ट्रवादी काँग्रेसची १९९९मध्ये स्थापना झाल्यानंतर त्यांनी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पक्ष वाढवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी हानी झाली.

- काशिनाथ कोकाटे, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय आयुक्तालयात उचापती ‘व्हिजिटर’ची नाकाबंदी

$
0
0

म .टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध योजनांमध्ये झालेला गैरव्यवहार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या तक्रारी घेऊन आलेल्या नेत्यांच्या मागे पुढे फिरणाऱ्या उचापती 'व्हिजिटर्स'ची विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल शाखेने नाकाबंदी केली आहे. तक्रारी दिल्यानंतर थेट संबंधित कनिष्ठ, अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे जाऊन नेतेगिरी करणाऱ्यांसह इतरांनाही आता महसूल उपायुक्तांच्या दालनामधून शाखेत जावे लागणार आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात दररोज दीडशे ते दोनशे नागरिक आपले गाऱ्हाणे घेऊन न्याय मागण्यासाठी येतात. यापैकी बहुतांश नागरिक विभागीय आयुक्तांना भेटण्यासाठी येत असले तरी काही जण वारंवार केवळ विविध योजनेत इतका गैरव्यवहार झाला असल्याचे सांगत काही अधिकाच्या तक्रारी घेऊन येतात. विभागीय आयुक्‍तांना निवेदन दिल्यानंतर तक्रारींच्या अनुषंगाने काय कारवाई केली, याची विचारणा करण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या टेबलापर्यंत धडक मारतात. नेतेगिरीचा रुबाब दाखवत असल्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता.

दोन दिवसांपूर्वीच महसूल शाखेमध्ये अशा उचापती 'व्हिजिटर'च्या दोन गटांत मोठ्या आवाजात वादावादी झाली होती. या प्रकारणाची दखल घेऊन भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय प्रशासनाने मंगळवारपासून महसूल शाखेचे दोन दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता महसूल शाखेमध्ये प्रवेश करण्यासाठी महसूल उपायुक्तांच्या दालनामधून जावे लागणार आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल शाखेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‌उपद्व्यापी 'व्हिजिटर्स'चा त्रास सहन करावा लागत होता. शाखेचे दरवाजे नेहमी उघडे असल्याने, कुणीही थेट कर्मचाऱ्यांपर्यंत जाऊन तक्रारीबाबत विचारणा करत होते. हा त्रास टाळण्यासाठी हे दोन्ही दरवाजे बंद करण्याचा निर्णय विभागीय आयुक्‍तांच्या निर्देशानुसार घेतला आहे. पूर्वीही महसूल उपायुक्‍तांच्या दालनातून प्रवेश करण्याचा मार्ग होता.

-शिवानंद टाकसाळे, उपायुक्त महसूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धाराशायी वृक्षाला श्रद्धांजली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण रोडवरील डॉ. बाऱ्हाळे हॉस्पिटल शेजारचे वडाचे झाड सार्वजनिक बांधकाम विभागाने विनापरवानगी तोडले. या झाडाला निसर्गप्रेमींनी मंगळवारी श्रद्धांजली अर्पण केली. यानिमित्त झाड तोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करत कांचनवाडी भागात वृक्षारोपण करण्यात आले.

रस्ता रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पैठण रोडवरील वडाचे तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेतली नाही. परवानगी न घेता झाडाची कत्तल केल्याच्या निषेधार्थ निसर्गप्रमींकडून मंगळवारी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सृष्टी संवर्धन संस्था, वुई फॉर एनव्हालयर्लमेंट, सलीम अली सरोवर संवर्धन समिती, निसर्ग मित्र मंडळ, प्रयास ग्रुप, जनसहयोग सेवाभावी सामाजिक संस्था या संस्थांच्या प्रतिनिधींसह निसर्गप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिका आयुक्तांना निवेदन देण्याचा निर्णय श्रद्धांजली सभेनंतर घेण्यात आला. वृक्षतोड प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला खुलासा निसर्ग प्रेमींनी उपलब्ध करून द्यावा व त्या आधारे आक्षेप मांडण्याची संधी द्यावी, यापुढे वृक्ष प्राधिकरणाच्या मान्यतेशिवाय कोणतेही झाड तोडू नये, आदी मागण्या निवेदनात करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images