Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कंत्राटदाराने कमी केले फक्त नऊ रुपये

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक (कलेक्शन अँड ट्रांसपोर्टेशन) करण्यासाठीच्या कंत्राटदाराने वाटाघाटी अंती मूळ किंमतीच्या फक्त नऊ रुपये कमी केले आहेत. कमी केलेल्या रक्कमेसह या कंत्राटदाराला काम देण्याबद्दलचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला जाणार आहे.

कचऱ्याचे संकलन आणि वाहतुक करण्यासाठी महापालिकेने निविदा काढली होती. प्राप्त झालेल्या निविदांमधून बेंगरुळू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीची निविदा तुलनेने कमी दराची असल्यामुळे या कंपनीची निविदा अंतिम करण्याच्या दृष्टीने महापालिकेने कार्यवाही सुरू केली. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कंपनीच्या प्रतिनिधींना वाटाघाटीसाठी बोलावण्यात आले. वाटाघाटीनंतर कंपनीने मुळ किंमतीच्या नऊ रुपये कमी करण्याची तयारी दाखवली. कंपनीने निविदेमध्ये १८७२ रुपये प्रतिदिवस असा दर भरला होता. वाटाघाटीनंतर १८६३ रुपयांवर काम करण्यात तयारी दाखवण्यात आली. आता या कंपनीबरोबर करार करून निविदा अंतिम करणे व कंपनीला कार्यादेश देणे यासाठी स्थायी समितीच्या समोर प्रस्ताव ठेवला जाणार आहे.

हर्सुल येथील साईटवर 'ओपन टेक्नॉलॉजी' च्या माध्यमातून कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी मायो वेसल्स आणि हायक्युब या दोन कंपन्यांच्या निविदा महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. पालिकेच्या यंत्रणेकडून तांत्रिक कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. सोमवार किंवा मंगळवारी निविदेतील 'फायनांशियल बीड' उघडून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

कांचनवाडी येथे कचऱ्यापासून गॅस प्रकल्प सुरू करण्यासाठी कमल गॅस, जैन अँड ड्राय कंपनी, बॅको कंपनी या तीन कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. पुढील आठवड्यात या निविदा उघडण्याची कार्यवाही केली जाणार आहे. पडेगाव, चिकलठाणा, कांचनवाडी आणि हर्सुल येथील साईटवर मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे या चारही ठिकाणी एमजीएम संस्थेच्या मदतीने बायोकल्चर फवारणीचे काम केले जाणार आहे. यामुळे दुर्गंधी कमी होईल आणि माशांचा त्रास देखील होणार नाही असा पालिका प्रशासनाला विश्वास आहे.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॅरिऑन अडकले तांत्रिक निकषात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अभियांत्रिकी द्वितीय आणि तृतीय वर्गाच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी विद्यापीठ प्रशासनावर दबाव वाढत आहे. व्यवस्थापन परिषदेने 'कॅरिऑन' देऊ नये, असा ठराव पारित केला आहे. त्यामुळे पेचात अडकलेल्या प्रशासनाने शुक्रवारी कॅरिऑनचे परिपत्रक काढले नाही. निकष आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन योग्य पर्याय काढण्याचा प्रयत्न आहे असे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी सांगितले.

अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचे कॅरिऑनसाठी आंदोलन सुरू आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तांत्रिक अडचण सांगून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देणे गरजेचे आहे, असे निदर्शनास आणून दिले. 'चॉइस बेस्ड सिस्टिम' लागू होणार असल्यामुळे पुढील वर्षी विद्यार्थ्यांची अडचण होईल. या परिस्थितीत पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी पर्याय काढण्याची मागणी आहे. प्राथमिक पातळीवर विद्यापीठाने मागणी मान्य केली. निकष आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन प्रारूप ठरवले जाणार आहे. याबाबत शुक्रवारी निर्णय होऊ शकला नाही. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच निर्णय होईल असे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी स्पष्ट केले. अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना कॅरिऑन देणार आहे, असे लक्षात आल्यानंतर विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनीही कुलगुरूंची भेट घेऊन कॅरिऑनची मागणी केली. संस्थाचालक आणि प्राचार्य कॅरिऑनची आग्रही मागणी करीत आहेत. शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडल्याने संस्थांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेचा ठराव असूनही प्रशासनावर दबाव टाकला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, मागील वर्षी घेतलेल्या कॅरिऑनच्या निर्णयाची चौकशी राजभवन कार्यालयाने केली आहे. गुणवत्ता राखण्यासाठी व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राजभवनची मान्यता घेणे अनिवार्य आहे. हा निर्णय परस्पर घेतल्यास राजभवनकडे तक्रार करण्यात येईल, असे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शंकर अंभोरे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीचौकात भरला सवाऱ्यांचा मजमा, मातमी जुलूस

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

इमाम हुसैन यांच्या शहादतीनिमित्त दहा दिवसांचा अशुरा पाळण्यात आला. योमे अशुराच्या शेवटच्या दिवशी मोहर्रम (२१ सप्टेंबर) निमित्त सिटीचौकात सवाऱ्यांचा मजमा भरविण्यात आला. तसेच शिया बांधवांच्या वतीने मातमी जुलूसचीही शांततेत सांगता झाली.

यौमे अशुराच्या निमित्ताने फाजीलपुरा येथून नवाब सहाब देवडी येथून अजुंमन ए मासुमीनच्या वतीने शिया बांधवाचा मातमी जुलूसची काढण्यात आला. फाजीलपुरा, चेलीपुरा चौक, शहागंज चमन येथून हा जुलुस सराफा मार्गे सिटीचौकात पोहोचला. सिटीचौकात आलेल्या शिया बांधवाच्या 'अलम' ला पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. अलमबरदार कमिटीचे अध्यक्ष रशीद खान मामू यांनीही 'अलम' ला पुष्पहार अर्पण केला. यावेळी मातमी जुलूसचे नेतृत्व करणाऱ्या मौलाना जहीर अब्बास रिजवी यांनी शिया मातमी जुलूसचे महत्व सांगितले. संपूर्ण जगभरात औरंगाबाद एकमेव शहर आहे. जिथे सवाऱ्यांच्या मजम्यातून मातमी जुलूस जात असतो. या जुलूससाठी वाट करून दिली जाते. मौलाना जहीर अब्बास रिजवी यांच्या मार्गदर्शनानंतर पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनीही औरंगाबादच्या शांतताप्रिय जनतेचे अभिनंदन केले. शियांचा मातमी जुलूस सिटीचौकातून जुना बाजार, बुढ्ढीलेन या भागातून बारा भाई ताजिया येथून सालारजंग दिवान देवडी येथे संपन्न झाला.

तत्पूर्वी शुक्रवारी (२१ सप्टेंबर) सकाळपासूनच सिटीचौकात मागील दहा दिवसांपासून शहरात विविध ठिकाणी बसलेल्या सवाऱ्यांचा मजमा भरविण्यात आला. अलमबरदार कमिटीच्या वतीने कमीटीचे अध्यक्ष रशीद खान मामू यांनी या सवाऱ्यांचा सत्कार केला. ढोल ताशांच्या गजरात या सवाऱ्यांचा मजमा सिटीचौकात भरला होता. यात बडे चाँद सहाब, छोटे चाँद सहाब, पंजा, नाले हैदर अशा नावाच्या सवाऱ्यांनी भाग घेतला. सवाऱ्यांचा मजमा आणि मातमी जुलूस पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बांधव सिटीचौकात जमा झाले होते. हा मजमा दुपारी बारा वाजेनंतर समाप्त झाला. ज्या भागात सवाऱ्या बसलेल्या आहेत. अशा भागांकडे सवाऱ्या निघून गेल्या. जिन्सी भागात सायंकाळी या भागातील सवारी जमा होत असतात.

………………

क्रांतीचौकात ताजियांचा मजमा

क्रांतीचौकात यौमे अशुराच्या दुसऱ्या दिवशी ताजिंयाचा मजमा भरविण्यात येतो. शनिवारी सकाळी ७ ते ११ या काळात ताजियांचा मजमा भरविण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्रीत सवाऱ्यांची उत्साहात मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

मोहरम व पोळा हे सण प्रसिद्ध आहेत. या दोन्ही सणात हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन होते. यामुळे हे सण शांततेत पार पडतात. मोहरममधील सवारी (ताबुत) बसविणारे हिंदू आहेत. यात एक सवारी माळी समाजाची दुसरी भोई समाजाची तिसरी सवारी ही मुस्लिम समाजाची असते. या सवाऱ्यांची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.

दुपारी एकच्या सुमारास भोई व मुस्लिम समाजाची सवारी उठविली. या दोन सवाऱ्यांचा समारोप झाल्यानंतर चार वाजता नालसाहब ही सवारी उठवण्यात आली. सर्व सवाऱ्यांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. छत्रीचे छत धरण्यात आले. दुपारी उठविलेल्या सवाऱ्यांच्यावेळी असलेली सर्व गर्दी नालसाहबच्या मिरवणुकीत सामील झाली. यामुळे सर्व रस्ते दुतर्फा गजबजले होते. संध्याकाळी सातच्या सुमारास या सवारीचा समारोप झाला. 'अलविदा हो' अशा गर्जना देत पुढील वर्षीसाठी या सवाऱ्या पेटीबंद होतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थर्ड पार्टी इन्स्पेक्शनमध्ये रस्ता रखडला

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

एमआयटी कॉलेज ते खंडोबा मंदिर या रस्त्याच्या काँक्रिटिकरणाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले. त्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असताना, 'थर्ड पार्टी इन्स्पेक्शन' अद्याप करण्यात आलेले नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम थांबले आहे. दरम्यान, शहरात होणाऱ्या १५० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामातही एमआयटी कॉलेज ते खंडोबा मंदिर या रस्त्याचा समावेश करण्यात आला आहे.

एमआयटी कॉलेज ते खंडोबा मंदिर हा रस्ता सातारा गावासाठी महत्त्वाचा मानला जातो. सातारा गावाबरोबरच श्रेयस इंजिनीअरिंग कॉलेज, भारत बटालियनकडे जाण्यासाठी रस्ता वापरला जातो. त्याचबरोबर हा रस्ता पुढे सातारा परिसराकडेही जातो. त्यामुळे या रस्त्यावर कायम वर्दळ असते. एमआयटी कॉलेज ते खंडोबा मंदिर या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम महापालिका दर दोन ते तीन वर्षांनंतर करते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; या रस्त्याचे काम तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांनी दोन वर्षांपूर्वी मंजूर केले होते. त्यासाठी सुमारे ९६लाख रुपये खर्च अपेङित होता. एक वर्षापूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली, परंतु डिसेंबर २०१७मध्ये खंडोबा यात्रेमुळे रस्त्याचे काम तीन महिन्यांसाठी थांबविण्यात आले होते. नंतर काम सुरू करण्यात आले, मात्र ते पुन्हा गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून बंद आहे. मध्यंतरी या रस्त्याच्या कामाची फाइल गहाळ झाल्याचे सांगण्यात येत होते.

यासंदर्भात रस्त्याचे कंत्राटदार विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, रस्त्याचे आतापर्यंत सुमारे ६० ते ७० टक्के काम झालेआहे. या कामाचे 'थर्ड पार्टी इन्स्पेक्शन' करणे बाकी आहे. हे काम करण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला महापालिकेने पत्र दिले आहे. महापालिकेने तपासणीचे पैसे तेथे भरल्यानंतर आतापर्यंत केलेल्या कामाची तपासणी होईल. त्यानंतर उर्वरित काम करण्यात येईल.

काही महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या काँक्रिटिकरणाचे काम सुरू करण्यात आले. सातारा गावातील पुलापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटिकरण पूर्ण करण्यात आले. एमआयटी कॉलेजपासून गावापर्यंतच्या रस्त्याचे एका बाजुचे काँक्रिटिकरण करण्यात आले, मात्र ते काम बंद पडले आहे. तांत्रिक कारणामुळे काम बंद असल्याची चर्चा त्यावेळी सातारा गाव व सातारा परिसरात सुरू झाली होती.

वॉर्डाच्या नगरसेवक सायली जमादार यांनी सांगितले की, गणेशोत्सव झाल्यानंतर या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी या कामाची फाइल गहाळ झाली होती.

दरम्यान, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सहा जुलै रोजी ट्विटरवरून शहरातील ५१ रस्त्यांची यादी जाहीर केली. या रस्त्यांच्या कामांसाठी १५२ कोटी ९२ लाख ६८ हजार ७५० रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यात ९४ कोटी ८१ लाख ८४ हजार २२७ रुपयांची कामे राज्य सरकारने दिलेल्या निधीतून करण्यात येणार आहेत. त्याशिवाय ५८ कोटी १० लाख ८४ हजार ४७३ कोटी रुपयांची कामे डिफर्ड पेमेंटमधून करण्यात येणार आहेत.

डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या यादीमध्ये एमआयटी कॉलेज ते खंडोबा मंदिर या रस्त्याचा समावेश करण्यात आला आहे. सध्या रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. हा रस्ताही निविदा प्रक्रियेमध्ये आहे. या कामासाठी तीन कोटी ५८ लाख ४४ हजार ५२५ रुपये खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात विचारले असता, नगरसेवक सायली जमादार यांनी सांगितले की, रिक्षा स्टँडपासून मंदिराच्या मागील बाजूने हा रस्ता करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेले काम आणि यादीत असलेला रस्ता वेगवेगळा आहे. या कामामध्ये नाल्यावरील मोठ्या पुलाचाही समावेश आहे.

एमआयची कॉलेजकडून येणारा रस्ता हा नागरिकांसाठी रहदारीचा मुख्य मार्ग आहे. खंडोबा यात्रा जवळ आली आहे. त्यापूर्वी महापालिकेने या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.

- सोमिनाथ शिराणे, सातारा परिसर

सिमेंट रस्त्याच्या कामाची फाइल महापालिका प्रशासनाकडून गहाळ झाली होती. आम्ही आयुक्तांना सांगून ती शोधली. ही फाइल सध्या प्रोसेसमध्ये आहे. गणेशोत्सवानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे.

- सायली जमादार, नगरसेवक, सातारा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधाऱ्यांतीस मतभेद चव्हाट्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विषय समित्यांच्या बैठकीचे इतिवृत्त स्थायी समितीच्या बैठकीत का ठेवले जात नाही, यावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी वादळी चर्चा झाली. त्यात सत्ताधारी काँग्रेसच्या एका सदस्याने नियोजनात काही काळा बाजार असतो का? असा सवाल करताच जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर संतप्त झाल्या आणि त्या सभागृहातून बाहेर पडल्या.

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी जिल्हा परिषदेत शिवसेना, काँग्रेस एकत्र येत आले, मात्र या सत्ताधारी आघाडीतील सदस्यांमध्ये धुसफूस असल्याचे बोलले होते. त्याचा प्रत्यय शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आला. जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ही सभा सुरू झाली आणि पहिलाच विषय चर्चेला गेला तो नियोजनचा. जिल्हा परिषदेकडे निधी पडून आहे. निम्मे अर्थिक वर्ष होत आले तरी जिल्हा परिषदेच्या विभागांचे नियोजन झाले नाही. यावरून यापूर्वीच्याही स्थायी समितीच्या बैठकीत मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी पुढच्या बैठकीत नियोजनाचा विषय ठेवला जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार विभागनिहाय नियोजन विषयावर चर्चा सुरू झाली. प्राप्त निधी, केलेले नियोजन, जुनी देणी आणि किती रकमेचे अजून नियोजन करता येईल याविषयी सदस्यांच्या मागणीवरून विभागप्रमुखांनी माहिती यावेळी दिली.

बांधकाम विभागाच्या नियोजनाची अधिकारी देत असतानाच सत्ताधारी कॉग्रेसचे सदस्य किशोर बलांडे, भाजपचे मधुकर वालतुरे यांनी विषय समितीच्या बैठकीत काय निर्णय होतात याची इतरांना माहिती का दिली जात नाही, स्थायी समितीत त्याचे इतिवृत्त का मांडले जात नाही, असा सवाल केला. त्यात बलांडे यांनी विषय समित्यांचे इतिवृत्त स्थायीपुढे न ठेवण्याइतका काय त्यात काळाबाजार असतो, असे विधान केले. त्यावर अध्यक्ष डोणगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांना राग अनावर झाल्याने प्रत्येकवेळी सदस्य विषय सोडून काहीतरी आरोप करतात म्हणत त्या बैठकीतून निघून गेल्या.

उपाध्यक्ष केशव तायडे, अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे यांनी त्यांनी त्यांची समजूत काढण्यानंतर त्या शांत झाल्या आणि पुन्हा कामकाज सुरू झाले ते शांततेत पार पडले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या उपकरातून राबविण्यात येणाऱ्या योजनासाठी 'डीबीटी'ची अट रद्द करावी, असा ठराव यावेळी घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधाऱ्यांतील मतभेद चव्हाट्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विषय समित्यांच्या बैठकीचे इतिवृत्त स्थायी समितीच्या बैठकीत का ठेवले जात नाही, यावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी वादळी चर्चा झाली. त्यात सत्ताधारी काँग्रेसच्या एका सदस्याने नियोजनात काही काळा बाजार असतो का? असा सवाल करताच जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर संतप्त झाल्या आणि त्या सभागृहातून बाहेर पडल्या.

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी जिल्हा परिषदेत शिवसेना, काँग्रेस एकत्र येत आले, मात्र या सत्ताधारी आघाडीतील सदस्यांमध्ये धुसफूस असल्याचे बोलले होते. त्याचा प्रत्यय शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आला. जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ही सभा सुरू झाली आणि पहिलाच विषय चर्चेला गेला तो नियोजनचा. जिल्हा परिषदेकडे निधी पडून आहे. निम्मे अर्थिक वर्ष होत आले तरी जिल्हा परिषदेच्या विभागांचे नियोजन झाले नाही. यावरून यापूर्वीच्याही स्थायी समितीच्या बैठकीत मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी पुढच्या बैठकीत नियोजनाचा विषय ठेवला जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार विभागनिहाय नियोजन विषयावर चर्चा सुरू झाली. प्राप्त निधी, केलेले नियोजन, जुनी देणी आणि किती रकमेचे अजून नियोजन करता येईल याविषयी सदस्यांच्या मागणीवरून विभागप्रमुखांनी माहिती यावेळी दिली.

बांधकाम विभागाच्या नियोजनाची अधिकारी देत असतानाच सत्ताधारी कॉग्रेसचे सदस्य किशोर बलांडे, भाजपचे मधुकर वालतुरे यांनी विषय समितीच्या बैठकीत काय निर्णय होतात याची इतरांना माहिती का दिली जात नाही, स्थायी समितीत त्याचे इतिवृत्त का मांडले जात नाही, असा सवाल केला. त्यात बलांडे यांनी विषय समित्यांचे इतिवृत्त स्थायीपुढे न ठेवण्याइतका काय त्यात काळाबाजार असतो, असे विधान केले. त्यावर अध्यक्ष डोणगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांना राग अनावर झाल्याने प्रत्येकवेळी सदस्य विषय सोडून काहीतरी आरोप करतात म्हणत त्या बैठकीतून निघून गेल्या.

उपाध्यक्ष केशव तायडे, अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे यांनी त्यांनी त्यांची समजूत काढण्यानंतर त्या शांत झाल्या आणि पुन्हा कामकाज सुरू झाले ते शांततेत पार पडले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या उपकरातून राबविण्यात येणाऱ्या योजनासाठी 'डीबीटी'ची अट रद्द करावी, असा ठराव यावेळी घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेंढपाळांवर हल्ला; चौघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मेंढपाळांवर हल्ला करून त्याला जखमी करणाऱ्या चौघांना बुधवारी (२० सप्टेंबर) अटक करण्यात आली. त्यांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींना मंगळवारपर्यंत (२५ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. कैलास गोयकर यांच्या तक्रारीरून मेंढपाळांना मारहाण केल्यावरून चिकलठाणा पोलिसांत विलास महेर, विजय चंदवाडे, विजय महेर व पूनम रामधन दुल्हत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटक करून गुरुवारी कोर्टात हजर केले असता, कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवाड यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेंगाळणाऱ्या मंडळीसाठी धक्का स्क्वॉड, पाकीटमारांसाठी विशेष पथके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गणेशोत्सवानिमीत्त शहरातील विविध भागातून विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. या ठिकाणी होणारी गर्दी ही पाकीटमारांसाठी तसेच रोडरोमियोसाठी पर्वणीच असते. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. रोडरोमियो तसेच जाणीवपूर्वक गणेश मंडळासमोर तसेच मिरवणुकीत रेंगाळणाऱ्या मंडळीसाठी विशेष धक्का स्क्वॉड पथक तसेच पाकीटमारांसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. रेकॉर्डवरील पाकीटमारांवर पोलिसांची करडी नजर आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या गुन्हेगारांवर अंकूश ठेवण्यासाठी या दोन दिवसांत मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन व सिडको बसस्थानक येथे गुन्हे शाखेच्या पथकांची पाळत ठेवण्यात येणार आहे.

रविवारी शहरात विविध मंडळांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे. शहरात या दिवशी पाच ठिकाणावरून विसर्जन मिरवणूका काढण्यात येतात. यामध्ये मुख्य मिरवणूक संस्थान गणपती ते औरंगपुरा, सिडको हडको गणेश महासंघ, नविन औरंगाबाद, चिकलठाणा, वाळूज महासंघ आदी मिरवणुकांचा समावेश आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांखेरीज आबालवृद्ध सगळेच गर्दी करतात. या काळात गर्दीच्या ठिकाणी पाकीटमारी मोठ्या प्रमाणात होते. या अनुषंगाने शहर पोलिसांनी पाकीटमारांवर अंकूश ठेवण्यासाठी गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके तयार केली आहेत. तसेच इतर भागात होणाऱ्या मिरवणूकांसाठी देखील सबंधीत पोलिस ठाण्यांची स्वतंत्र पथके निर्माण केल्याची माहिती उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी दिली.

धक्का स्क्वॉड

गणेशोत्सवाच्या शेवटच्या काही दिवसांत शहरात देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची झुंबड उडते. यामध्ये महिला, तरुणी, मुली, कुटुंबातील सदस्य आदींचा समावेश असतो. या काळात टवाळखोरांकडून छेडछाडीचे प्रकार मोठया प्रमाणावर घडतात. महिला तरुणींना जाणून बूजून धक्का देण्याचे प्रकार या काळात घडतात. विसर्जन मिरवणुकीमध्ये देखील असे छेडछाडीचे प्रकार नेहमीच घडतात. गणेश देखावे पाहताना काही मंडळी जाणीवपूर्वक एकाच ठिकाणी रेंगाळताना दिसून येतात. मिरवणुकीमध्ये देखील अनेक मंडळे संथगतीने मार्गक्रमण करताना दिसून येतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी उपायुक्त डॉ. धाटे घाडगे यांच्या संकल्पनेतून धक्का स्क्वॉड पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकामध्ये गुन्हे शाखेचा एक अधिकारी व २० कर्मचारी तसेच विशेष शाखेचा एक अधिकारी तसेच २० कर्मचारी साध्या वेशात असणार आहेत. मुख्य मिरवणुकीत धक्का स्क्वॉडची आठ पथके साध्या वेशात तैनात असणार आहेत. छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांवर तसेच रेंगाळणाऱ्या मंडळीवर हे धक्का स्क्वॉड लक्ष ठेऊन कारवाई करणार आहेत.

बसस्थानक, रेल्वे स्टेशनवरही पाळत

शहरातील पाकीटमार अशा पर्वणीच्या वेळी बाहेरगावच्या साथीदारांना शहरात कामासाठी बोलावून घेत असल्याचे काही घटनांवरून दिसून आले आहे. या अनुषंगाने देखील गुन्हे शाखेने खबरदारी बाळगली आहे. येत्या दोन दिवसांत शहरातील रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक आदी ठिकाणी साध्या वेशातील कर्मचारी संशयित प्रवाशांवर पाळत ठेऊन आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून लॉज व हॉटेल, धर्मशाळा आदी ठिकाणी देखील तपासणी मोहीम राबवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

गर्दीमध्ये महिला तरुणींची छेडछाड होऊ नये यासाठी रोडरोमियोंवर अंकूश ठेवण्यासाठी तसेच गर्दीत, मिरवणुकीत विनाकारण रेंगाळणाऱ्या मंडळीसाठी विशेष धक्का स्क्वॉड तसेच पाकीटमारांसाठी वेगळी पथके तयार करण्यात आली आहे. सबंधित पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकांना देखील या संदर्भात सुचना करण्यात आल्या आहेत. ही विशेष पथके त्यांना नेमून दिलेल्या हद्दीत कार्यरत असणार आहेत.

डॉ. दीपाली धाटे घाडगे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचा जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जागतिक वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी महापालिकेतर्फे आयोजित विशेष मोहीम स्वाक्षरी अभियान, पोस्टर प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, स्मारक संवर्धन प्रतिज्ञेने गाजली. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी अंर्तमुख करायला लावणारे कला प्रकार सादर केले.

सिडको नाट्यगृहात देशभक्तीपर गीते, समूहनृत्य, समूह गायन, असे कार्यक्रम झाले. धर्मवीर संभाजी विद्यालय, नारेगाव येथील बाल विद्या मंदिर, जिजामाता कन्या विद्यालय, नारेगाव येथील महापालिका प्राथमिक शाळा, शिशुविकास विद्यालय या शाळांच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा, समूह गीत सादर केले. यावेळी पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासह महिला बालकल्याण समिती उपसभापती सुरेखा सानप यांची विशेष उपस्थिती होती. आयुक्तांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा जपण्याचे आवाहन केले. वारसास्थळांच्या जागी कोणी कचरा टाकत असेल किंवा स्थळाचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याला आपण विरोध केला पाहिजे. महापालिका शाळेतील विद्यार्थी सागर दाभाडे याने काढलेल्या चित्राचे त्यांनी विशेष कौतुक केले.

भारतमाता मंदिरात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला. आयुक्तांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी नगरसेविका अर्चना नीळकंठ, सहाय्यक आयुक्त महावीर पाटणी, उपअभियंता शेख खमर, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रांती चौकातील हुतात्मा स्मारकाच्या परिसरातही देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. यावेळी बायजीपुरा येथील महापालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी, महापालिका प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले. या कार्यक्रमाला स्थायी समिती सभापती रेणुकादास वैद्य, सभागृहनेते विकास जैन, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांच्यासह आयुक्त उपस्थित होते. दुपारी तीन ते सहा यावेळात स्वाक्षरी अभियान, पोस्टर प्रदर्शन, स्मारक संवर्धन प्रतिज्ञा आदी कार्यक्रम घेण्यात आले.

\Bनगरसेवकांचे कामांसाठी तुणतुणे

\B

वारसास्थळांच्या संवर्धनासाठी आयोजित कार्यक्रमात बहुतेक सर्व ठिकाणी आयुक्त डॉ. निपुण विनायक सहभागी झाले. ज्या वॉर्डात हे कार्यक्रम झाले त्या वॉर्डाचे नगरसेवकही त्या त्या वेळी उपस्थित होते. परंतु, नगरसेवकांना वारसास्थळांच्या संवर्धनाच्या कार्यक्रमापेक्षा वॉर्डातील कामांच्या फाइल निकाली निघणे महत्त्वाचे वाटत होते. त्यामुळे आयुक्तांच्या मागे त्यांनी कामांच्या फायलींचे तुणतुणे लावल्याचे दिसले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकलठाण्यात साकारले बालाजी मंदिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्री क्षेत्र बालाजीचे दर्शन घेण्याची अनेकांना इच्छा असते, मात्र तिरुपती येथे दर्शनासाठी जाण्याचा योग प्रत्येकाला येईल, असे नाही. यामुळेच यंदा चिकलठाण्यातील सावता गणेश मंडळाने हुबेहूब श्री क्षेत्र बालाजी देवस्थानाची संपूर्ण प्रतिकृती साकारली आहे. श्री क्षेत्रात प्रवेश करण्याची व्यवस्थाही तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणे करण्यात आली आहे. दररोज दोन ते तीन हजारांवर नागरिक या श्री क्षेत्र प्रतिकृतीचे दर्शन घेत आहेत.

चिकलठाण्याच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या मंदिराच्या अलिकडच्या मोकळ्या मैदानात सावता गणेश मंडळाकडून दरवर्षी विविध प्रकारचे सजीव देखावे सादर करण्यात येत असतात. १९८३पासून सावता गणेश मंडळाकडून गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध देखावे सादर करण्याची परंपरा आहे. ही परंपरा आजही कायम आहे. तुकाराम महाराजांचे जीवनचरित्र, द्रौपदी वस्त्रहरण असे सजीव देखावे आजही स्मरणात आहे. याशिवाय मागील वर्षी सादर करण्यात आलेले शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका हा सजीव देखावा प्रत्येक पाहणाऱ्यांच्या मनात कायम आहे. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी यंदाही अधिक चांगला उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

गणेश मंडळाचे अध्यक्ष बाळू नवपुते, उपाध्यक्ष तुकाराम नवपुते यांनी श्री क्षेत्र बालाजीची संकल्पना मांडली. साधारणत: महिनाभर बालाजी मंदिर उभारण्याचे काम सुरू होते. हे मंदिर सुमरे १२ हजार चौरस फुटांत बांधण्यात आले आहे. बालाजी मंदिराचा ३८ फूट उंच हुबेहूब कळस तयार करण्यात आला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात बालाजीची प्रतिमा ठेवण्यात आली आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवण्यात आला असून, या मंदिरात तंबाखुजन्य पदार्थ, सिगारेट नेण्यासही बंदी आहे. हे मंदिर तीन दिवसांपूर्वी खुले करण्यात आले आहे. दररोज तीन ते चार हजार भाविक मंदिराचे दर्शन घेत असतात. या भाविकांच्या सुरक्षेसाठी; तसेच व्यवस्थेसाठी सावता गणेश मंडळाने नियुक्त केलेल्या प्रत्येकाला स्वतंत्र आयकार्ड दिलेला आहे.

अशी आहे मंदिराची व्यवस्था

या मंदिरात प्रवेश करताना बूट आणि चप्पल बाहेर ठेवावे लागतात. यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकांची तपासणी केली जाते. या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच. पाय धुण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पाय धुतल्यानंतच मंदिरात प्रवेश करता येतो असतो. मंदिरात रांगेत प्रवेश करण्यात येतो. मंदिराच्या गाभाऱ्यापासून काही अंतरापर्यंत भक्तांना जाण्याची मुभा देण्यात आली आहे. मंदिराच्या मागून बाहेर जाण्याचा मार्ग आहे. जाताना महादेव मंदिर, शनिमंदिर, राम-लक्ष्मण मंदिर, संत सावता महाराज मंदिर आदी विविध मंदिरांची उभारणी केली आहे.

………

केश अर्पण करण्याची सुविधा

बालाजीला जाणारे बहुतांश भाविक आपले केस बालाजी ट्रस्टला दान करतात. या ठिकाणी डोक्यावरील केस अर्पण करण्याची सुविधा देण्यात आली आहे. शिवाय या मंदिराचा प्रसादही तिरुपती बालाजी येथील मंदिराप्रमाणेच आहे.

……………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वारसा संवर्धन’साठी २२ ठिकाणी चित्रकला स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या वारसा संवर्धन मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी शहरात बावीस ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. चिकलठाणा येथील चारशे वर्ष जुन्या गोरख चिंचेच्या झाडालाही पालिका अधिकारी, पदाधिकारी व निसर्गप्रमींनी भेट दिली.

चित्रकला स्पर्धेत महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांसह काही खासगी शाळांचे विद्यार्थी देखील सहभागी झाले. स्पर्धेच्या परीक्षणासाठी महापालिकेचे अधिकारी व राजा रवीकर्मा कला महाविद्यालाचे शिक्षक यांची समिती स्थापन करण्यात आली होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून पाच क्रमांक काढून त्यांना प्रमाणपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले. ज्या ठिकाणी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली त्याच ठिकाणी स्वाक्षरी मोहीम, पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन देखील केले होते. या स्पर्धेनंतर चिकलठाणा येथील गोरख चिंचेच्या सुमारे चारशे वर्ष जुन्या झाडाला पदाधिकारी, अधिकारी, निसर्गप्रेमींनी भेट दिली. यावेळी डॉ. किशोर पाठक यांनी झाडाबद्दल माहिती दिली. गोरख चिंचेची माहिती देणारा फलक महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते लावण्यात आला. कार्यक्रमाला उद्यान अधीक्षक विजय पाटील, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहेमद, उद्यान विभागाचे कनिष्ठ अभियंता गोपीकिशन चांडक, स्वप्नील जोशी, निखिल भालेराव यांच्यासह निर्सगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिकलठाणा परिसरातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.

\Bमंकी ब्रेड ट्री

\Bगोरखचिंचेचे मूळ स्थान मध्य आफ्रिकेत आहे. भारतात फार पूर्वी अरब व्यापाऱ्यांमार्फत हा वृक्ष आणला गेल्याची शक्यता आहे. इतिहासकारांच्या मते औरंगाबादेत हा वृक्ष मलिक अंबरने आणला. भारतात क्वचित ठिकाणी गोरखचिंचेचे वृक्ष आढळतात. महाराष्ट्रात पुणे, रायगड, जळगाव, नाशिक, औरंगाबाद येथेच ही झाडे आहेत. या वृक्षाचे खोड दहा ते पंधरा मीटर उंच आणि दहा मीटर व्यासाचे असते. हे पानझडी असल्यामुळे हिवाळ्यात पूर्णपणे निष्पर्ण होते. फुलांचा हंगाम जून - जुलै असतो. फुलांचा रंग पांढरा असून फुले रात्री उमलणारी व उग्र वासाची असतात. झाडाच्या फळांचा गर माकडे आवडीने खातात. त्यामुळे आफअफ्रिकेत या झाडाला 'मंकी ब्रेड ट्री' असे म्हणतात.

\Bसातारा डोंगरावर वृक्षारोपण

\Bवास्तू संवर्धन मोहिमेत सकाळी साडेसात वाजता सातारा डोंगरावर आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विविध प्रकारची २६८ झाडे यावेळी लावण्यात आली. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला नगरसेविका सायली जमादार, डॉ. निधी विनायक, अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी, उद्यान अधीक्षक विजय पाटील, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहेमद, वॉर्ड अधिकारी मनोहर सुरे, संकेत कुलकर्णी, प्रयास फाउंडेशनचे रवी चौधरी, सचिन दराडे, गणेश अहिरे, सौरभ रणदिवे यांच्यासह एम.आय.टी. कॉलेज, श्रेयस कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृहनिर्माण विभागाच्या परीक्षेत इंग्रजीचे प्रश्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्याच्या गृहनिर्माण विभागातील शिपाई पदासाठी शनिवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रश्नांचे स्वरूप बदलल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. जाहिरातीत नमूद नसताना इंग्रजीचे प्रश्न विचारले. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला.

विभागातील निम्नश्रेणी लघुलेखक, लिपीक, प्रोसेस सर्व्हर आणि शिपाई अशा पदासाठी सरळसेवा भरती घेण्यात येत आहे. त्यात शनिवारी शिपाई पदासाठी परीक्षा घेण्यात आली. या पदासाठी जाहिरातीत परीक्षेचे स्वरूप देण्यात आले होते. त्यात इंग्रजी विषयाचा उल्लेख केला नव्हता. मात्र, शनिवारी परीक्षार्थींना प्रश्नपत्रिकेत इंग्रजी विषयाचे प्रश्न असल्याचे लक्षात आले. अचानक पद्धतीने स्वरूपात बदल झाल्याने परीक्षार्थींनी यावर आक्षेप घेतला. मात्र, परीक्षा केंद्रावर त्यांना कोणी दाद दिली नाही. वाळूजमधील इंटरनॅशनल सेंटर फॉर एक्सलंन्स इन इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट संस्थेतील परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत परीक्षेतील गोंधळ मांडला. लेखी परीक्षेमध्ये अभ्यासक्रमामध्ये जाहिरातीनुसार इंग्रजी हा विषय नमूद केलेला नसतानाही परीक्षामध्ये इंग्रजी विषयाचे २५ प्रश्न आले होते. परीक्षा संपण्यास १० मिनीटे शिल्लक असताना परीक्षा केंद्र प्रमुखांनी इंग्रजीचे प्रश्न सोडवू नका, अशी सूचना दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर विषयाचे प्रश्न सोडवण्यास वेळ मिळाला नाही. इंग्रजी विषयाचे प्रश्न सोडविल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

\Bफेरपरीक्षा घ्या…

\Bपरीक्षेत अशा प्रकारच्या गोंधळामुळे ही परीक्षा रद्द करत फेरपरीक्षा घेण्याची मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत लेखी निवेदन देण्यात आले. त्यावर प्रदीप पवार, शिवाजी सोळंके, रिजवान बेग, विजयानंद पातोडे, महेश कदम, विशाल देशमुख, वासुदेव राठोड, मनोज राठोड, भालचंद्र बुमेकर यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॅनच्या धडकेत तरुण ठार

$
0
0

औरंगाबाद : ओमिनी व्हॅन आणि दुचाकी दरम्यान झालेल्या अपघातात दुचाकीवरील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास हडको कॉर्नर जवळील अण्णाभाऊ साठे चौकात घडली.

संतोष चंद्रकांत जाधव (वय १८, रा. कोकणवाडी, औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे. संतोष हा शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्याच्या दोन मित्रांसह दुचाकीवरून टीव्ही सेंटर येथून अण्णाभाऊ साठे चौकमार्गे हडको कॉर्नर कडे जात होता. साठे चौकात ओम्नी व्हॅन (एमएच २० बी एन २०१४) यू टर्न घेत असताना दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील दोघे तर दुचाकीवरील तिघे गंभीर रित्या जखमी झाले. अपघात पाहून परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आनंद बोर्डे यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना घाटी रुग्णालायत दाखल केले. उपचारादरम्यान संतोष जाधवचा मृत्यू झाला, तर इतर चार जण किरकोळ जखमी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनप्रकरणी आरोपीला बेड्या

$
0
0

औरंगाबाद : हायवाचालक बाळू घुगेच्या खुनप्रकरणी पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपील्या बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्यांमध्ये मनोज डावरे याचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ४५ मिनिटाला बाळू घुगे (रा. टीव्ही सेंटर) याच्या फोनवर मनोज डावरेने फोन केला. त्याला घराबाहेर बोलावून घेतले. पैशाच्या देवाण घेवाणावरून व घरातील वस्तू चोरल्यावरून बाळूला मनोज डावरे, नील पाटील, दत्ता भांगे आणि शुभम पाटील यांनी मारहाण केली. त्याचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाकडून देण्यात आली आहे. ……………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुपारी बारा वाजता विसर्जन मिरवणूक सुरू

$
0
0

औरंगाबाद : श्री गणेश विसर्जन मिर‌वणुकीनिमित्ताने नवीन शहर परिसरात तयारी पूर्ण झाली असून, शनिवारी दुपारी बारा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल, अशी माहिती नवीन औरंगाबाद श्री. गणेश महासंघाचे अध्यक्ष बबन डिडोरे यांनी दिली.

गारखेडा, पुंडलिकनगर, देवळाई आदी परिसरातील गणरायाचे विसर्जन शिवाजीनगर परिसरातील सार्वजनिक विहिरीत करण्यात येते. प्रशासनाने विहिरीची स्वच्छता केली असून, होणारी गर्दी लक्षात घेता ठिकठिकाणी बॅरिकेड लावत सुरक्षेचे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी मिरवणूक मार्गाची पाहणी केली असून, सायंकाळी पोलिसांनी या परिसरातून पथसंचलन केले. दरम्यान, महासंघाच्या गणेश विसर्जन मिरवणूक दुपारी बारा वाजता निघेल. खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, सतीश चव्हाण, सुभाष झांबड, महापौर नंदकुमार घोडेले, माजी आमदार डॉ. कल्याणराव काळे, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित असतील, अशी माहिती डिडोरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पांच्या विसर्जनासाठी घसरगुंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज्योतीनगरात बाप्पांच्या विसर्जनासाठी घसरगुंडीचे नियोजन करण्यात आले आहे. शेततळ्यामध्ये दोन गसरगुंड्या आणि दोन पाइपांची व्यवस्था केली असून, सुमारे पाच ते सात हजार गणेश मूर्तींचे येथे विसर्जन होईल.

माजी नगरसेवक गिरजाराम हळनोर यांच्या पुढाकाराने गेल्या काही वर्षांपासून ज्योतीनगरात गणेश विसर्जनाची विशेष व्यवस्था केली जाते. जलकुंभाच्या शेजारी असलेल्या मैदानावर शेततळे तयार करण्यात आले आहे. शाडू मातीच्या गणपतींसाठी स्वतंत्र शेततळे तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसाठी स्वतंत्र शेततळ्याची व्यवस्था केली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या शेततळ्याचे क्षेत्रफळ ५० बाय ३० फूट, तर शाडू माती मूर्तींसाठीच्या शेततळ्याचे क्षेत्रफळ पंधरा बाय पंधरा फूट आहे. शेततळ्यात उतरून मुर्तीचे विसर्जन करण्याची मुभा देता येत नाही. त्यामुळे घसरगुंडीची व पीव्हीसी पाइपची व्यवस्था केली आहे. गणेश भक्तांनी त्यांच्याकडच्या गणेश मूर्ती घसरगुंडीवर किंवा पाइपवर ठेवल्या, तर त्या शेततळ्यात विसर्जित होतील अशी या मागची संकल्पना आहे. यामुळे अपघात होणार नाहीत आणि भाविकांना स्वत:च्या हाताने श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केल्याचे समाधान मिळू शकणार आहे. 'पीओपी'च्या मूर्ती ज्या तळ्यात टाकण्यात येणार आहेत, त्या तळ्यात अमोनियम बाय कार्बोरेट हा सोडा टाकण्यात येतो. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत मूर्ती विरघळून जातात. मूर्ती विरघळल्यावर जे पाणी शिल्लक राहते ते उद्यानांसाठी खत म्हणून वापता येते, तर जो गाळ शिल्लक राहतो तो खडू तयार करण्यासाठी किंवा प्लेव्हर ब्लॉक्स तयार करण्यासाठी रॉ मटेरियल म्हणून वापरता येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामूहिक अथर्वशीर्ष पठण

$
0
0

सामूहिक अथर्वशीर्ष पठण

औरंगाबादमध्ये शनिवारी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्र आणि शिवसेना जिल्हाप्रमुखांतर्फे सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मैदानावर सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात सुमारे वीस हजार शालेय विद्यार्थी, गणेश भक्त सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनसे’ची गणेशोत्सव स्पर्धा उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेअंतर्गत गणेशोत्सव २०१८ अंतर्गत घेण्यात आलेल्या धान्य व फुलांच्या रांगोळी स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी जिजामाता कॉलनी येथील राघवेंद्र स्वामी मठामध्ये या स्पर्धेचे 'मनविसे'चे राज्य कार्यकारिणी सदस्य अॅड. निनाद खोचे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

वेगवेगळ्या वयोगटातील सुमारे तीस स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये स्पर्धकांनी सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळीसोबत धार्मिक संदेश देणाऱ्या देवी देवतांच्या रांगोळ्या काढल्या. स्पर्धेमध्ये धान्याच्या रांगोळीत प्रथम क्रमांक मेघा आचार्य, द्वितीय सीमा पवार व तृतीय क्रमांक मेघना देशपांडे यांनी पटकावला. फुलांच्या रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राजक्ता पाटील, द्वितीय सीमा वांगीकर तसेच तृतीय क्रमांक स्वाती पुजारी यांनी पटकावला. त्याचप्रमाणे यावेळी महालक्ष्मी आरास स्पर्धेचा देखील निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक सावरकर यांचा जीवनपट दाखवणारा देखावा सादर करणाऱ्या गौरी मिलिंद पिंपळे, द्वितीय सविता विष्णू तांबट व तृतीय क्रमांक स्वप्ना मुळे यांनी पटकावला. स्पर्धांचे परीक्षण रांगोळी प्रशिक्षक शैला खोचे यांनी केले. विजेत्यांना मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, बिपीन नाईक, संदीप कुलकर्णी, वैभव मिटकर, सतनामसिंग गुलाटी, अॅड. नूतन जैस्वाल, मनोज जोगदंड, संतोष पवार, चेतन पाटील यांच्या हस्ते पारितोषीक देऊन गौरवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्रीतून खड्डे बुजवण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य कायमच आहे. त्यामुळे शनिवारी महापालिका व गणेश महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पदयात्रा काढून खड्ड्यांची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना पुन्हा डेडलाइन देत रात्रीतून खड्डे बुजवा असा आदेश देण्याचा सोपस्कार तेवढा उरकला.

गणपती विसर्जनाची मिरवणूक रविवारी निघणार आहे. त्या दृष्टीने पालिकेतर्फे केलेल्या तयारीची पाहणी करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे पदाधिकारी व गणेश महासंघाचे पदाधिकारी शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हा परिषद मैदानावरील विहिरीजवळ पोचले. या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी त्यांनी केली. विहिरीत पाणी शिल्लक रहात नसल्यामुळे टँकरमधून पाणी भरून आणून विहिरीत टाकण्यात येत होते. मैदानावर धुळ उडू नये म्हणून कचखडीचे पांघरून टाकण्यात येत होते. ही व्यवस्था पाहिल्यानंतर सर्वांनी संस्थान गणपती मंदिरापर्यंत पायी जाण्याचा निर्णय घेतला. संस्थान गणपती मंदिर ते जिल्हा परिषद मैदान या दरम्यान ज्या मार्गावरून विसर्जनाची मिरवणूक जाते. त्या मार्गावर खड्डे आहेत का, हे पाहण्याची इच्छा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सर्व पदाधिकारी मैदानाच्या बाहेर पडले आणि स. भु. बस थांब्याच्या समोरच तुंबलेले ड्रेनेज आणि त्यातून वाहणारे घाण पाणी निदर्शनास आले. पदाधिकाऱ्यांनी या बद्दल आक्षेप घेतला. तेव्हा ड्रेनेज चोकअप काढण्याचे काम तत्काळ करा, असे आदेश महापौरांनी दिले. त्यानंतर संस्थान गणपती मंदिरापर्यंत सर्वजण पायी चालत गेले. यावेळी महापौरांसह स्थायी समितीचे सभापती राजु वैद्य, गणेश महासंघाचे अध्यक्ष डी. एन. पाटील, पृथ्वीराज पवार, अभिजित देशमुख, संदीप शेळके, दिग्विजय पाटील, नगरसेविका कीर्ती शिंदे आदी सहभागी झाले होते. औरंगपुरा चौक, गुलमंडी चौक, सिटीचौक पोलीस स्टेशनच्या समोरचा परिसर या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याचे लक्षात आले. रात्रीतून सर्व खड्डे बुजवा असे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images