Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘कॅरिऑन’ निर्णयाला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना कॅरिऑन देण्याचा प्रश्न चिघळला आहे. शिक्षण संस्थांच्या आर्थिक हितासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याची टीका करण्यात येत आहे.

विद्यापीठ कायद्याचे निकष पडताळून निर्णय घेण्यासाठी प्रशासन बैठका घेत आहे. दुसरीकडे कॅरिऑनचे समर्थक आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. कॅरिऑन लागू केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. ही पद्धती विद्यार्थ्यांना अभ्यासापासून परावृत्त करणारी आहे. त्यामुळे कॅरिऑन लागू करू नये, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाने केली आहे. याबाबत कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. फक्त अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना कॅरिऑन देण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला आहे. कॅरिऑन द्यायचे असल्यास सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना द्या. अन्यथा, राष्ट्रीय समाज पक्षाची विद्यार्थी आघाडी तीव्र आंदोलन करील असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष पवन कांबळे, आनंद लोखंडे, सुधीर कांबळे, विशाल भालेराव, योगेश घुसाळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘संत तुकाराम’ प्रयोग हाउसफुल्ल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीवर आधारीत 'संगीत संत तुकाराम' नाटकाला रसिकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. शंभर वर्षांपूर्वीच्या नाटकाने प्रबोधनात्मक कथानकातून रसिकांना खिळवून ठेवले. दर्जेदार अभिनय, संगीत आणि नेटक्या नेपथ्याने प्रयोग विशेष रंगला.

ओम नाट्यगंधा संस्था निर्मित 'सं. संत तुकाराम' नाटकाचा विनामूल्य प्रयोग झाला. रुक्मिणी सभागृहात शनिवारी सायंकाळी प्रयोग सादर झाला. बाबाजीराव राणे लिखित व संतोष पवार दिग्दर्शित या प्रबोधनात्मक नाटकातून संत तुकाराम यांचा भक्तिमार्ग आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मार्गावर प्रकाशझोत टाकण्यात आला. वैराग्याकडे वळत असलेल्या शिवरायांना उपदेश करून तुकारामांनी रयतेचे कल्याण करण्याचा उपदेश केला. सुश्राव्य अभंग आणि गीतांनी नाटक अधिक चित्तवेधक झाले. या नाटकात विक्रांत आजगावकर यांनी साकारलेली संत तुकाराम आणि लीना पाळेकर यांची जिजाईची भूमिका सर्वाधिक दाद घेऊन गेली. मयूरेश कोटकर, प्रीती तोरणे, कुशल कोळी, सुजीत मेस्त्री, देव कांगणे आणि ज्ञानेश महाराव यांच्या मुख्य भूमिका होत्या. औरंगाबाद शहरातील हा पहिलाच प्रयोग हाउसफुल्ल झाला. रसिकांनी स्वेच्छेने नाट्य प्रयोगाला आर्थिक मदत केली. लवकरच दुसरा प्रयोग आयोजित करण्यात येणार नसल्याचे संयोजकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुबोध भावे, श्रेया बुगडे येणार

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव २६ ते २९ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उदघाटन अभिनेता सुबोध भावे यांच्या हस्ते होणार आहे. यावर्षी महोत्सवात २२५ महाविद्यालये सहभागी झाले असल्याची माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. मुस्तजीब खान यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

युवक महोत्सवासाठी सृजनरंग, ललितरंग, नटरंग, नादरंग, लोकरंग, शब्दरंग, नाट्यरंग असे सात रंगमंच आहेत. एकूण एक हजार १८५ विद्यार्थी व ९६६ विद्यार्थिनी महोत्सवात सहभागी होणार आहेत. एकूण ३६ कलाप्रकारांमध्ये कलावंत विद्यार्थी सादरीकरण करणार आहेत. जलसा, कव्वाली आणि लघुपट या तीन नवीन कला प्रकारांचा यावर्षी समावेश करण्यात आला आहे. २९ सप्टेंबर रोजी अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. मराठवाड्यातील कलाकार संजय कुलकर्णी व उमेश जगताप यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्जन मिरवणुकीत पुरी भाजीचा बेत

$
0
0

औरंगाबाद : श्रींच्या विसर्जन मिरवणुकीत मोठा जल्लोष करत सहभागी होणाऱ्या गणेश भक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी तनवाणी मित्र मंडळातर्फे पुरी भाजीचा बेत आखण्यात आला आहे. शनिवारी दुपारपर्यंत तब्बल ४० हजार पाकिटची नोंदणी झाली असून, शहरातील विविध भागातील मंडळाने आगावू मागणी नोंदवली आहे, अशी माहिती मंडळाचे भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी दिली.

विसर्जन मिरवणूक सकाळी सुरू होते आणि ती रात्री उशीरापर्यंत सुरू असते. या दरम्यान, कार्यकर्त्यांची जेवणाची व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी गेल्या पाच वर्षांपासून अन्नदान वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती तनवाणी यांनी दिली. गेल्या वर्षी पुरी भाजीचे २० हजार पाकीट वाटप केले होते. यंदा जुन्या शहरासह सिडको, हडको, शिवाजीनगर, चिकलठाणासह विविध भागातील गणेश मंडळांनी आधीच नोंदणी केली आहे. आतापर्यंत पुरी भाजीच्या सुमारे ४० हजार पाकीटची आगावू नोंदणी झाली आहे. यासह मुख्य विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या भक्तांना गुलमंडी येथे प्रसाद वाटप केला जातो, अशी माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघांचा बुडून मृत्यू, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

$
0
0

जालना:

शहरातील तीन तरुण गणपती विसर्जन करण्यासाठी रविवारी येथील मोती तलावात उतरले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मात्र या घटनेला नगर परिषदच जबाबदार असल्याचा आरोप करत मृतांच्या कुटुंबीयांनी तिघांचेही पार्थिव घेण्यास नकार दिला असून त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

रविवारी गणपती विसर्जनादरम्यान झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत या तरुणांचा बुडून मृत्यू झाला. मोती तलावात गणरायाच्या विसर्जनासाठी खूप मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अमोल संतोष रणमुळे हा मोती तलावातील पाण्यात उतरला, मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर लक्कडकोट भागातील निहाल खुशाल चौधरी (वय २६) आणि शेखर मधुकर भदनेकर (वय २०) यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. चौधरी आणि भदनेकर हे दोघेही विसर्जनावेळी गणपतीच्या मूर्ती मागे होते. मूर्ती पाण्यात जात असताना हे दोघे मूर्तीच्या खाली दबले गेले. असाच प्रकार अमोल बाबतीतही घडला आणि तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

गणेश विसर्जनावेळी मोती तलाव परिसरात प्रचंड गर्दी उसळली होती. अनेक घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचं या तलावात थाटात विसर्जन करण्यात येत होतं. मात्र अचानक झालेल्या या घटनेमुळे सदर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सकाळी जिल्हा सरकारी रुग्णालयात या तिघांच्याही पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र या घटनेला नगर परिषद जबाबदार असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. या दुर्घटनेपोटी प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करतानाच नगर परिषदेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतांच्या कुटुंबीयांनी केली आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, भाजप शहराध्यक्ष सिध्दीविनायक मुळे आणि भास्कर दानवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबादेत डीजे, गुलालमूक्त मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

ढोल-ताशांचा गजर, फुलांनी सजविलेले प्रेक्षणीय रथ आणि 'मोरया मोरया'चा जयघोष, टाळ मृदंगाच्या निनाद, अशा चैतन्य आणि उत्साही वातावरणात डीजे व गुलालमूक्त गणपतींची विसर्जन मिरवणूक दिमाखदार ठरली. विसर्जन मिरवणुकीला रविवारी सायंकाळी सहा वाजता प्रारंभ झाला.

विसर्जन मिरवणूक सुरू करताना तहसीलदार राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक हरीश खेडकर, नायब तहसीलदार महेंद्र गिरगे, नगर पालिकेचे संभाजी वाघ यांच्यासह अन्य राजकीय मंडळी उपस्थित होती. गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांची झालेली गर्दी, विविध पारंपरिक खेळांचे सादरीकरण, युवक-युवतींचा सहभाग लक्षणीय राहिला. शांतता समितीच्या बैठकीत तहसीलदार गायकवाड यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बाजार गल्लीतील सार्वजनिक गणेश मंडळाने विसर्जन मिरवणुकीत गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेची जनजागृती करणारा देखावा सादर केला. यानिमित्त नागरिकांनी लसीकरण करून घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. गोवर हा बालकांमधील अपंगत्व तसेच मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. रुबेला हा गर्भवती स्त्री व नवजात बालकांसाठी जीवघेणा रोग आहे. महाराष्ट्राला गोवर-रुबेला मुक्त करण्यासाठी शासन लसीकरण मोहिम राबविणार आहे. ही मोहिम राज्यात १४ नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेत सामाजिक संस्थाचे सहकार्य घेण्यात येणार असून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे तहसीलदार गायकवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिटमिटाच्या तलावात गणेश विसर्जन

$
0
0

पडेगाव: मिटमिटा पंचक्रोशीतील गणेश मंडळांनी अतिशय उत्सहात निर्विघ्नपणे गणेश विसर्जन केले. मिटमिटा, रामगोपालनगर, तारांगण, पीस होम सोसायटी, देवगिरी व्हॅली, आर्च आंगण, राधाकृष्ण हौसिंग सोसायटी आदी परिसरातील गणेश मंडळांनी मिटमिटा येथील पाझर तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन केले. यावर्षी तलावात बऱ्यापैकी पाणी असल्याने विसर्जनात अडचण आली नाही. मात्र, येथे महापालिकेने कोणतीही व्यवस्था उपलब्ध करून दिली नसल्याने गणेश भक्तांनी संताप व्यक्त केला. पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. वीटभट्टीवरील कामगारांचे गणेश मंडळ आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिले. या कामगारांनी सहकुटुंब नृत करत बाप्पाला निरोप दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणमध्ये प्रथमच प्रदूषणमुक्त विसर्जन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पैठण नगर पालिकेने यावर्षी नदीपात्राबाहेर निर्माल्य जमा करण्याचे नियोजन केल्याने शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील नदीचे पात्र प्रदूषित झाले नाही. यावेळी, नदीपात्राबाहेर जवळपास तीन टन निर्माल्य जमा करून त्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिली.

पुरेसे सफाई कर्मचारी नसल्याने शहर स्वच्छतेचे कंत्राट ओंकारेश्वर स्वयंरोजगार संस्थेला देण्यात आले आहे. शहराची स्वच्छता केल्यानंतर नगराध्यक्ष सूरज लोळगे व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या आदेशानुसार या संस्थेने शहरातील नदी पात्र व संत एकनाथ समाधी मंदिरामागील दशक्रिया घाट स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

नदीपात्रात गणेश मूर्ती विसर्जित करण्याची व मूर्तीसोबत निर्माल्य नदी पात्रात टाकण्याची परंपरा वर्षानुवर्षे आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून शहरातील नदीपात्र प्रदूषित होते. यावर्षी प्रदूषण टाळण्यासाठी नगराध्यक्ष लोळगे व मुख्याधिकारी जाधव यांनी स्वछता एजन्सीसोबत बैठक घेऊन विशेष व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार, रविवारी ओंकारेश्वर संस्थेने गणेश मूर्ती विसर्जित करण्यात येणाऱ्या सर्व ठिकाणांवर जवळपास ९० कर्मचारी तैनात केले. यावेळी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांना निर्माल्य नदीपात्रात न टाकण्याचे आवाहन करत ते वाहनांत निर्माल्य जमा केले. सकाळी सहा ते रात्री बाराच्या ही मोहीम राबवून जवळपास तीन टन निर्माल्य जमा केले, त्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक विजय ताठे यांनी दिली. दरम्यान, शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच गणेश विसर्जनादिवशी शहरातील नदीपात्र प्रदूषित न झाल्याने शहरवासीयांना समाधान व्यक्त केले आहे.

शहरातील गोदावरी नदी प्रदूषित होऊ नये यासाठी नगर पालिका प्रशासन विशेष मोहीम राबवत आहे. निर्माल्यमूक्त नदीपात्रानंतर, दशक्रियामुळे नदीचे प्रदूषण रोखण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत.

-सोमनाथ जाधव, मुख्याधिकारी

मागील दोन महिन्यांपासून आम्ही शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत आहोत. येणाऱ्या सहा महिन्यांत आम्हाला देशाच्या 'टॉप टेन' स्वच्छ शहरामध्ये स्थान मिळवायचे आहे.

- सूरज लोळगे, नगराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैजापूरमध्ये बारा तास मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

'बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला', 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर,' या अशा घोषणा देत शेकडो गणेश भक्तांनी दहा दिवसांच्या मुक्कामानंतर लाडक्या गणरायाला संगीताच्या तालावर नाचत भावपूर्ण निरोप दिला. येथील विसर्जन मिरवणूक जवळपास बारा तास सुरू होती. मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

शहरातील मानाचा नगर पालिका गणेश मंडळ व स्वामी समर्थ गणेश मंडळांच्या गणपतीने विसर्जंन मिरवणुकीत सहभाग घेतला. श्री स्वामी समर्थ गणेश मंडळाच्या मिरवणुकीतील चित्ताकर्षक लेझिम कवायतींनी रंगत आली. याप्रसंगी मंडळाचे संस्थापक माजी आमदार आर. एम. वाणी, तहसीलदार विनोद गुंडमवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, उपनगराध्यक्ष साबेरखान, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील बोरनारे, रामहरी जाधव, मेजर सुभाष संचेती, संजय पाटील निकम, प्रकाश चव्हाण, बाबासाहेब जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आरती करण्यात आली. सायंकाळी सहानंतर महात्मा गांधी रोड, टिळक पथ, महाराणा प्रताप रस्ता या रस्त्यांवर सार्वजनिक गणेश मंडळाची सजवलेली वाहने भव्य व आकर्षक गणेश मूर्तींसह मिरवणुकीत सहभागी झाली. टिळक रस्त्यावर कुरेशी समाज व भारतीय जनता पक्षातर्फे मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. याठिकाणी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अभय पाटील चिकटगावर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती आदी उपस्थित होते. जुमा मशिदीजवळ उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप, उपविभागीय अधिकारी सुनील लांजेवार, तहसीलदार विनोद गुंडमवार, मुख्याधिकारी विठ्ठल डाके, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सदर ए काजी हाफिजोद्दिन, काजी इनामदार, राजू मलिक काजी मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला

$
0
0

मेनल बातमी

(मुख्य मिरवणुकीतील फोटो घ्यावा)

बाप्पाला निरोप : मुख्य मिरवणूक

गणपती विसर्जनाची मिरवणूक १४ तास रंगली, डिजे बंदीचा परिणाम नाही, ढोल ताशा पथकांनी मारली बाजी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रविवारी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाची मिरवणुकीने गणेशोत्सवाची सांगता झाली. संस्थान गणपती येथून सकाळी अकरा वाजता मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. तब्बल चौदा तासांच्या मिरवणुकीनंतर मध्यरात्री उशिरा औरंगपुरा जिल्हा परिषद मैदानावर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत भाविकांनी आपल्या लाडक्या गणराणााला निरोप दिला. डिजे बंदीचा कोणताही परिणाम मिरवणुकीवर जाणवला नाही. त्याचवेळी बहुतांशी मंडळानी ढोलताशा पथकावर जोर दिल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवून आले.

रविवारी सकाळी अकरा वाजता शहरातचे ग्रामदैवत संस्थान गणपती येथून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाठ, सुभाष झांबड, महापौर नंदकुमार घोडेले, पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष डी. एन. पाटील, राजू शिंदे, अभिजित देशमुख, देवयानी डोणगावकर, रशीद मामू यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मानाचा संस्थान गणपती निघाल्यानंतर त्याच्या मागे महासंघाचा गणपती व नंतर जबरे हनुमान क्रीडा मंडळाचा गणपती होता. संस्थान गणपती, शहागंज, गांधी पुतळा, सराफा, सिटीचौक, मछलीखडक, गुलमंडी, बाराभाई ताजीया चौक, औरंगपुरा, महात्मा फुले चौक मार्गे औरंगपुरा जिल्हा परिषद मैदानावरील सार्वजनिक गणेश विसर्जन विहीरीजवळ या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

संथगतीने मिरवणूक

मिरवणुकीला सकाळी अकरा वाजता प्रारंभ करण्यात आला तरी इतर मंडळे नेहमीप्रमाणे उशिरा मिरवणुकीत दाखल झाली. त्यामुळे हि मिरवणूक संथगतीने सुरू होती. सायंकाळी सहा वाजेनंतर मिरवणुकीमध्ये इतर मंडळाच्या वाहनांनी प्रवेश केला. यानंतर खऱ्या अर्थाने मिरवणुकीला रंग भरला. रात्री आठ वाजता संस्थानचा गणपती गुलमंडी चौकात होता. रात्री बारा वाजेच्या सुमारास औरंगपुरा जिल्हा परिषद मैदानावर आरती केल्यानंतर संस्थान गणपती व महासंघाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

अनेक मंडळानी मार्ग बदलला

नेहमीच्या प्रथेप्रमाणे संस्थान गणपती येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात येते. मात्र, पदमपुरा, कोकणवाडी, उस्मानपुरा येथील गणेश मंडळांना संस्थान गणपतीपासून मिरवणुकीमध्ये सहभागी होणे गैरसोयीचे ठरते. यामुळे या भागातील मंडळांनी संस्थान गणपतीपासून मिरवणुकीत सहभागी होणे टाळले. ही मंडळी पैठणगेट मार्गे मिरवणुकीत सहभागी झाली होती. बाराभाई ताजीया चौकात ही मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी झाली. …

एकचा भाषा ढोल ताशा

उच्च न्यायालयाने डिजे वापरावर बंदी आणली आहे. त्याचा कोणताही परिणाम मिरवणुकीवर जाणवला नाही. तथापि, बहुतांशी मंडळानी यावेळी मिरवणुकीत आपले ढोल ताशा पथक, पावली पथक तसेच झांज पथक सहभागी केले होते. या पथकांनी आकर्षक चाली सादर करीत नागरीकांना खिळवून ठेवले होते. या पथकांमध्ये दिवाण देवडी येथील पावन गणेश मंडळ, विघ्नहर्ता गणेश मंडळ, रणझुंजार क्रीडा मंडळ. महाकाल, मोरया क्रिडा मंडळ, रणसंग्राम, गुरू गणेश क्रिडा मंडळ, संगम नवयुवक गणेश मंडळ, नारळीबाग येथील पावन गणेश मंडळ, पदमपुरा येथील हर हर महादेव क्रिडा मंडळ, पदमपुरा मित्र मंडळ, बेगमपुरा येथील गोगानाथ क्रिडा मंडळ यांच्यासह इतर ढोल पथकांचा समावेश होता.

नामांकित बँड पथकाने घातली भुरळ

यंदाच्या मिरवणुकीत ढोल ताशांच्या मानाने बँड पथके कमी दिसून आली. मानाचा गणपती असलेल्या संस्थान गणपतीसमोर चाळीसगावाचे प्रसिद्ध बँड पथक होते. तसेच जुने मंडळ म्हणून ओळख असलेल्या गांधीपुतळा येथील नवसार्वजनिक गणेश मंडळा समोर देखील चाळीसगावचेच बँड पथक आकर्षक गाणी सादर करीत होते.

मान्यवरांनी केले मिरवणुकीचे स्वागत

…शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणूकीचे मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी विविध संस्था संघटनांच्या वतीने स्वागत करण्यात येत होते. यामध्ये शहागंज रोडवर अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, सिटीचौकात पोलिस आयुक्तालयाच्या वतीने तसेच मछली खडक येथे जय चतुर्थी गणेश मंडळ, बाराभाई ताजीया चौकात भारतीय जनता पार्टी, औरंगपुरा पोलिस चौकीजवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, ब्राम्हण युवक मंडळ, अश्वमेध क्रिडा मंडळ यांच्या वतीने स्टेज टाकून अध्यक्षांचे तसेच मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

मिरवणुकीदरम्यान शहर पोलिसांनी जय्यत बंदोबस्त तैनात केला होता. रेंगाळणाऱ्या मंडळासाठी विशेष धक्का स्क्वॉड तयार करण्यात आले होते. वाहतूक शाखेच्या वतीने देखील विविध मार्ग सकाळपासून बंद करण्यात आल्याने नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर केला. गर्दीच्या ठिकाणी मात्र पोलिस बंदोबस्त कमी असल्याचे यावेळी जाणवून आले.

मुख्य मिरवणुकीतील गणपती विसर्जन

सार्वजनिक गणपती - ७६८

घरगुती - ७३,९००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा यंत्रांची शोभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा प्रक्रियेसाठी तब्बल २७ कोटी मोजून घेतलेल्या नऊ यंत्रांपैकी तीन यंत्रे येवून चक्क वीस दिवस उलटले. मात्र, अजूनही केवळ वीजजोडणी मिळाली नसल्यामुळ‌े त्यांचे काम सुरू झाले नसल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे डोंगर साचत आहेत.

पालिकेने प्रत्येक झोन कार्यालयाअंतर्गत प्रत्येकी एक प्रमाणे बेलिंग, श्रेडिंग आणि स्क्रिनिंगीची नऊ झोन कार्यालयासाठी प्रत्येकी तीन या प्रमाणे सत्तावीस यंत्र नागपूरहून खरेदी केली. त्यापैकी तीन यंत्रे आली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार देशमुखनगर, मध्यवर्ती जकात नाका आणि रमानगर येथे ही यंत्रे बसवली आहेत. या यंत्रांना आठेक दिवसांत महिनाही होईल. मात्र, केवळ वीजपुरवठा न झाल्यामुळे ही कोट्यवधींची यंत्र फक्त शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत. या यंत्रांसाठी स्वतंत्र थ्रीफेज कनेक्शनची गरज आहे. पालिकेच्या शाही कारभारानुसार पत्रव्यवहार केला. मात्र, अजूनही त्यांना महावितरणकडून वीजजोडणी मिळवता आली नाही. हर्सूल येथील केंद्रावर शेड विस्तारीकरणामुळे कचरा टाकणे बंद आहे. हे काम मंगळवारी सुरू होईल. हर्सूल येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेकडे दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. या निविदा उघडण्याचे काम मंगळवारी केले जाणार आहे. चिकलठाणा येथील साइटवर सिव्हिलवर्क केले जात आहे, तर पडेगाव येथील काम बंच आहे. कांचनवाडी येथे कचऱ्यापासून गॅस निर्मिती करण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी प्राप्त झालेल्या निविदांचे मूल्यमापन करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका केंद्रीय विद्यालयात आज चित्रकला स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महाराष्ट्र टाइम्स' व श्री जय चतुर्थी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने बेगमपुऱ्यातील महापालिका केंद्रीय विद्यालयात मंगळवारी (२५ सप्टेंबर) चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या विजेत्यांना महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात येतील.

श्री जय चतुर्थी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन खैरे यांच्या वतीने चित्रकला व चित्र रंगवा स्पर्धा ठेवण्यात आली आहे. तिसरी ते सहावी व सातवी ते दहावी अशा दोन गटांत ही स्पर्धा होईल. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेशाच्या विविध रूपांना रेखाटण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सकाळी दहा ते अकरा या वेळेत होणाऱ्या स्पर्धेचा निकाल लगेच जाहीर करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी तीन परीक्षक नेमले आहेत. विजेत्या विद्यार्थ्यांना महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात येणार आहेत. यावेळी श्री जय चतुर्थी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन खैरे, शाळेचे मुख्याध्यापक कोल्हे, शिवसेना उप-शहरप्रमुख हिरा सलामपुरे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर जाधव, शिवसेना विभागप्रमुख सुरेश पवार आदींची उपस्थिती असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेच्या सभेत हमरीतुमरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

थकबाकी असली तरीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे, या मागणीवरून औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी चांगलाचा गदारोळ झाला. संचालक मंडळाच्या विरोधात काही सदस्यांनी उघडपणे विरोधाची भूमिका घेतली. त्यांना चेअरमन सुरेश पाटील, संचालक विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सडेतोड उत्तरे दिली. संतोष जाधव, दिलीप बनकर यांनी संचालक मंडळाला विरोध करत आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केल्यामुळे सभागृहातील वातावरण तापले होते. दरम्यान, सभेसाठी येऊ न दिल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातून जमलेल्या काही जणांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळील खुर्च्यांची तोडफोड केली. संचालक मंडळाने सभा गुंडाळल्याचा सदस्यांनी सभागृहात निषेध केला.

जिल्हा बँकेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. चेअरमन सुरेश पाटील, व्हाईस चेअरमन दामोधर नवपुते, ज्येष्ठ संचालक व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार संदीपान भुमरे, माजी आमदार अण्णासाहेब माने, प्रभाकर पालोदकर, अभिजित देशमुख यांच्यासह संचालक उपस्थित होते. या सभेत पीक कर्जवाटपाचा प्रमुख मुद्दा होता. संतोष जाधव, दिलीप बनकर यांनी शेतकऱ्यांना पीककर्ज दिले जावे, वाढीव २० टक्के कर्जवाटप मंजूर करावे यासह अन्य ठराव मांडले. त्यावर उत्तर देताना चेअरमन पाटील यांनी सांगितले की, नियमानुसार ज्या सोसायटीची वसुली ५० टक्के आहे. त्यांना पीक कर्ज वाटपास मंजुरी दिली गेली आहे. बँकेने विशेष ठराव घेऊन ही मर्यादा ४० टक्क्यांवर आणली. त्यामुळे जिल्ह्यातील ६९३ पैकी २३५ सोसायटी पात्र ठरणार आहेत. पूर्वी १९३ सोसायटी पात्र होत्या. कर्जपुरवठा करण्यात अडचणी आहेत. वसुलीसाठी प्रयत्न करूनही ती योग्य पद्धतीने होत नाही. मराठवाड्यातील सातपैकी केवळ लातूर आणि औरंगाबाद या दोनच बँकांची परिस्थिती चांगली आहे. औरंगाबाद बँक यंदा नफ्यात आहे पुढच्या वर्षी वसुली झाली नाही, तर बँक बंद होण्याची भीती आहे, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. ११४ कोटी रुपये तोट्यात गेलेली बँक आता हळूहळू नफ्यात आणल्याचेही त्यांनी नमूद केले. कर्जाची मुदत वाढवण्याची मागणी संतोष जाधव यांनी केली. गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर बँकेने कर्जमाफीचा फायदा घेतला. दहा हजार रुपयांचे कर्ज असताना एक लाख रुपये कर्ज दाखवून बँकेने वसुली केली, असा आरोप त्यांनी केला. असे असतानाही संचालक मंडळ शेतकऱ्यांना कर्ज देण्यापासून वंचित ठेवत आहे.

बनकर म्हणाले, की मलकापूर बँकेला जिल्हा बँकेने एक कोटींचा 'ओडी' मागितला असताना दोन कोटी रुपये दिले. नंतर ते वसूल केले. मात्र त्यात बँकेचे नुकसान केले. मागणी केलेली नसताना दुप्पट पैशाचा 'ओडी' कसा काय दिला? २०१४ च्या निवडणुकीच्या तोंडावर तीन साखर कारखान्यांना कर्ज देऊन राजकीय अनुदान उपलब्ध करून दिले. बँक तोट्यात गेली त्याला संचालक मंडळ जबाबदार असल्याचा आरोप केला. यावर उत्तर देताना चेअरमन पाटील म्हणाले, की चुकीचे बोलणे हा यांचा धंदा आहे. कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे मलकापूर बँकेला पैसे दिले गेले. त्याची वसुली झाली आहे. ही मंडळी रेटून खोटे बोलतात. यावरून प्रचंड गदारोळ झाला.

\B...तर, खासगी बँकांना फायदा: बागडे \B

विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विषय मांडण्याला मर्यादा असायला हवी. तु्म्ही ताळेबंदावर बोलण्याऐवजी भलत्याच विषयावर बोलत आहात. बँकेची यंदा ६०० कोटींची थकबाकी झाली आहे. आपण विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहोत. आपल्या सोसायटीची शंभर टक्के कर्जभरणा व्हावा, असे प्रयत्न कधी होताना दिसत नाहीत. जेमतेम २० टक्के वाढीव रक्कम देता येईल. पण थकबाकी वसुलीबद्दल कुणीच काही बोलत नाही; असे चालणार नाही. बँकिंग क्षेत्र व्यावसायिक पद्धतीने चालवले पाहिजे. आर्थिक व्यवहार भावनेवर चालत नाहीत. आपल्या बँका अडचणीत आल्या, तर खासगी सावकारीला पुन्हा तोंड फुटेल. एकमेकाचे हात धरून चालणे हे एखाद्या नदीपात्रातून सर्वांना वाचवताना योग्य आहे. पण बँक कर्ज परतफेडीबाबत सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकेने ठराव केले आहेत.

\Bकाही जण बँकेच्या गच्चीवर \B

त्यानंतर चेअरमन पाटील यांनी सभा संपल्याचे जाहीर केले. त्यास संतोष जाधव यांनी विरोध दर्शविला. आम्हाला अजून बोलायचे आहे, असे म्हणून त्यांनी माइकचा ताबा घेतला. पण तोवर संचालक मंडळ सभागृह सोडून उठून गेले. याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रगीत न होताच सभा संपविल्याचा निषेध करण्यात आला. त्यानंतर जाधव यांच्यासह काही मंडळी बँकेच्या इमारतीच्या गच्चीवर चढली आणि संचालक मंडळाच्या विरोधात घोषणाबाजी केली. काही वेळाने बँकेसमोरील मैदानात येऊन राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली.

\Bजा‌धवांकडे ६० हजारांची बाकी \B

सदस्यांच्या विरोधाबद्दल चेअरमन पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, संतोष जाधव यांच्याकडे ६० हजारांची थकबाकी आहे. नियमानुसार थकबाकी असलेल्या सदस्याला सभेत बोलता येत नाही. त्यांच्यासोबत असलेले सुभाष भोसले यांच्यावरही आरोप आहेत. आम्ही त्याबाबत काही बोलत नाही. पण केवळ विरोध करायचा म्हणून विरोध करणे चूक आहे. यंदा बँकेला चार कोटी रुपये नफा झाला आहे. मात्र अनुत्पादित मत्याचे (एनपीए) प्रमाण २१ टक्के आहे. संपूर्ण ताळेबंद होईपर्यंत हे प्रमाण २८ टक्क्यांवर जाईल. पुढील वर्षी बँक नफ्यात राहील की नाही शंका आहे.

\Bबंदोबस्तामुळे टळला अनर्थ

\B

आजच्या सभेसाठी सोसायटी चेअरमन, संचालक मंडळाव्यतिरिक्त कुणालाचा प्रवेश नव्हता. प्रत्येक सभासदाचे पत्र पाहूनच प्रवेश दिला गेला. सभेत गदारोळ झाल्याचे कळताच खाली जमलेल्या मंडळींपैकी काहींनी खुर्च्या तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले. दरम्यान, सभेत गोंधळ होणार असल्याच्या शक्यतेमुळे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर असल्याने पुढील अनर्थ टळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपविरोधात काँग्रेसचा ‘एल्गार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'बेरोजगारी, मराठा-मुस्लिम-धनगर आरक्षण, दुष्काळप्रश्नी भाजप सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. भाजप सरकार देशात व राज्यात हुकूमशाही पद्धतीने काम करीत आहे,' अशा शब्दांत काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप सरकारचा सोमवारी आयोजित एल्गार यात्रेत समाचार घेतला. सरकारची पोलखोल करण्यासाठी काँग्रेसने या यात्रेचे आयोजन केले आहे.

जिल्ह्यातली यात्रेची सुरुवात सोमवारी क्रांतीचौकातून झाली. आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, झेडपी उपाध्यक्ष केशवराव तायडे, माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेखा पानकडे, शहराध्यक्ष सरोज मसलगे, जगन्नाथ काळे, डॉ. जितेंद्र देहाडे, पवन डोंगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. आमदार सत्तार म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियानात महात्मा गांधी यांच्या फोटोचा वापर करतात. मात्र गांधीजींचे विचार आचरणात का आणत नाहीत ? देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचे योगदान नाकारता येत नाही, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी भाजपचे कान टोचल्यावरही भाजप सरकार काँग्रेसने काय केले ? असा सवाल करते. भाजपच्या नेत्यांना सगळे कळते, पण सत्तेची संधी साधून घेण्यासाठी भाजप झोपेचे सोंग घेत आहे. नोट बंदी, जीएसटी, पेट्रोल - डिझेल दरवाढीच्या आड देशातील जनतेची भाजप सरकार लूट करीत आहे. काँग्रेस देशातील सामान्य जनतेसोबत आहे. सामान्यांची होणारी लूट थांबवून भाजपला येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत घरी बसविण्यासाठी काँग्रेसने सरकारविरोधी एल्गार पुकारला असून जनतेने या एल्गार यात्रेत सहभागी व्हावे,' असे आवाहन त्यांनी केले.

नामदेव पवार म्हणाले, 'केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सामान्य जनता व शेतकऱ्यांवर अन्याय केला असून यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत आहे. भाजपमुळे सर्वजण हवालदिल झाले असून देश व राज्य सरकार चालविण्याची भाजपची लायकी नाही.' माजी आमदार डॉ. कल्याण काळे म्हणाले, 'भाजपच्या सत्ताकाळात देश व राज्यातील जनता हताश झाली असून, भाजपच्या चार वर्षांत देश व राज्य देशोधडीला गेले आहे.' आमदार झांबड म्हणाले, 'दोन कोटी युवकांना नोकऱ्यांचे आमिष दाखवून भाजप सरकारने सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे आयुष्य उध्वस्त केले . मराठवाड्यात व औरंगाबाद मध्ये राज्याचे 'फसवणीस' सरकार नवीन उद्योग उभारणार होते. मात्र राज्यात कुठेही नवीन उद्योग उभारला गेला नसून उलट राज्यातील सुरू असलेले उद्योग या सरकारने गुजरातला नेले.' एल्गार यात्रा मंगळवारी सोयगाव तालुक्यात प्रवेश करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागर स्वच्छतेची फेरी दोन ऑक्टोबरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सर्वसामान्य नागरिकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासासाठी येथील सजग नागरी आघाडीतर्फे दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त कचरासंबंधी जनजागृती व्हावी या उद्देशाने 'जागर स्वच्छतेची' या फेरीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे व सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सहचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

फेरीमध्ये शहरातील शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक, प्राध्यापकासह कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था व सुजाण नागरिक सहभागी होणार आहेत. सर्वांनी शहराप्रतीच्या आपल्या जबाबदारीची जाणीव व्यक्त करावी. ही काळाची गरज आहे, अशी अपेक्षा संयोजकांनी व्यक्त केली. या फेरीमध्ये कुठलाही राजकीय मुद्दा घेतला जाणार नाही. कुणाही विरुद्ध टीका केली जाणार नाही, असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. केवळ सकारात्मक व प्रेरक स्वरुपाची ही फेरी मंगळवारी सकाळी सकाळी साडेनऊ वाजता स. भु. प्रशालेच्या मैदानावरून सुरू होणार आहे. या फेरीत सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीमंत शिसोदे, डॉ. अविनाश येळीकर, दिगंबर गाडेकर, बिजली देशमुख, युनूस पटेल, विजय राऊत, अरुण मेढेकर, राजेंद्र जोशी, दिगंबर गाडेकर, प्राचार्य मिलिंद उबाळे, डी. डी. लांडगे, सुबोध जाधव, मंगेश निरंतर, प्राचार्य अभिजित वाडेकर, रेखा शेळके व प्रेरणा जाधव आदींनी केले आहे.

\Bफेरीचा मार्ग

\Bसरस्वती भुवन पासून सुरुवात. महात्मा फुले पुतळा - औरंगपुरा - गुलमंडी - रंगारगल्ली - सिटी चौक - गांधी पुतळा - संस्थान गणपती - किराणा चावडी - पानदरिबा - मच्छली खडक - सुपारी हनुमान - दलालवाडी - पैठणगेट मार्गे पुन्हा स. भु. शिक्षण संस्थेत सांगता.

औरंगाबादच्या नागरी समस्या आपणा सर्वांच्या परिचयाच्या आहेतच. त्या सोडविण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याएवढीच सर्वसामान्य नागरिकांची देखील जबाबदारी आहे. ही भावना ठेवली, तरच आपले शहर स्वच्छ होणार आहे .

- प्रताप बोराडे, विश्वस्त, एमजीएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन बंधाऱ्यासाठी जायकवाडीतून पाणी सोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

गोदावरी नदीवरील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यासाठी जायकवाडी धरणाच्या जलविद्युत केद्रातून सोमवारी सकाळी आमदार सदीपान भुमरे यांच्या हस्ते १६ हजार क्युसेस या वेगाने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. दोन्ही बंधारे भरून घेण्यासाठी १५ दशलक्ष घनमीटर एवढे पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी धरण धरण उपअभियंता अशोक चव्हाण यांनी दिली. जलसंपदा विभागाने दोन्ही बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे, या दोन्ही बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या गोदावरी नदी काठावरील जवळपास ४० गावांतील गावकरी व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

यावर्षी, अपेक्षित पाऊस न पडल्याने भर पावसाळ्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर, गोदावरी नदीवरील आपेगाव व हिरडपुरी हे दोन्ही बंधारे कोरडे पडले आहे. परिणामी, दोन्ही बंधाऱ्यावर अवलंबून असलेले पैठण, शेवगाव, गेवराई व अंबड तालुक्यातील जवळपास ४० गावांतील गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे, जायकवाडी धरणातून या दोन्ही बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी या गावातील गावकऱ्यांनी केली होती. बंधाऱ्यात पाणी सोडावे या मागणीसाठी आमदार संदीपान भुमरे हे पाठपुरवठा करत होते. अखेर, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, जलसंपदा विभागाने दोन्ही बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळी आमदार भुमरे यांच्या हस्ते जलविद्युत केंद्राचे दरवाजे उघडून त्यातून सोळा हजार क्युसेकप्रमाणे पाणी सोडण्यात आले. यावेळी, जायकवाडी धरण उपअभियंता अशोक चव्हाण, जलविद्युत केद्राचे कार्यकारी अभियंता पागावाड हे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रासेयो’दिन साजरा पाथ्री येथे साजरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यातील पाथ्री येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात सोमवारी (२४ सप्टेंबर) राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. प्राजक्ती वाघ व डॉ. नारायण बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. 'आरडी परेड'साठी निवड झाल्याबद्दल विद्यार्थी अक्षय चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. वाघ म्हणाल्या की, आधुनिक युगात महिलांना प्राधान्य मिळत आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात जीवनशैली व भावनांची सांगड घालता आली पाहिजे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ . एस. बी. जाधव हे होते. यावेळी एन. एस. एस. विभागप्रमुख डॉ. शिवाजी उंबर्डे, डॉ. सचिन मोरे, गटसमन्वयक डी. एफ. पाथ्रीकर, डॉ. तनीशा दळे, डॉ. आरती ठाले, डॉ. रवी जाधव, डॉ. सुरेश अलोणे, प्रा. अजय राठोड यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीशी लैंगिक चाळे; आरोपीस सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खाऊ घेण्यासाठी दुकानात गेलेल्या पाच वर्षीय मुलीला घरात बोलावून अश्लील चाळे करणारा दुकानदार शाहेद मोहम्मद अब्दुल सत्तार याला पाच वर्षे सक्तमजुरी व २५ हजारांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी ठोठावली. तसेच पीडितेला नुकसान भरपाई देण्याचेही आदेश कोर्टाने दिले. या प्रकरणी पीडितेची आई फितूर झाल्यानंतरही आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली.

१४ ऑक्टोबर २०१६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पीडित मुलगी आरोपी शाहेद मोहम्मद (वय ३७) याच्या किराणा दुकानात चॉकलेट-गोळ्या आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी शाहेद याने तिला घरात बोलावून दार बंद केले व तिच्याशी अश्लील चाळे केले. मुलीने आरडा-ओरड केल्यानंतर आरोपीने तिचे तोंड दाबून तिला चॉकलेट दिले व प्रकार कोणास सांगितला, तर जिवे मारण्याची धमकी दिली. मुलीच्या आईने तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने घडला प्रकार सांगितला. आईच्या तक्रारीनुसार जिन्सी पोलिस ठाण्यात आरोपी शाहेद मोहम्मदविरुद्ध भादंवि ३५४ व पोक्सो कायद्याच्या ८ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहायक सरकारी वकील डी. के. नागुला यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात पीडिता, पीडितेची आत्या व पंचाची साक्ष महत्त्वाची ठरली, तर पीडितेची आई (फिर्यादी) फितूर झाली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपीला ३५४ कलमान्वये पाच वर्षे सक्तमजुरी व २५ हजारांचा दंड ठोठावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणी फोटो

लोकसभेसाठी आमदार झांबड यांना उमेदवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार किशनचंद तनवाणी यांना धूळ चारत विधानपरिषदेवर गेलेल्या सुभाष झांबड यांना लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार म्हणून तत्वत मान्यता दिली आहे,' अशी घोषणा सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी केली.

भाजपकडून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यासह अन्य काही नेत्यांचे नावे चर्चेत आहेत. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेकडून यंदा पुन्हा खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सत्तार बोलत होते. कार्यकर्ता शिबिरासह अन्य काही कार्यक्रमात झांबड यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली होती. त्यात भाजप सरकारची पोलखोल करण्याच्या हेतूने काँग्रेसने जिल्ह्यात सुरू केलेल्या एल्गार यात्रेचे संयोजक पदही आमदार झांबड यांच्याकडेच आहे. याच माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढत प्रभावी प्रचार करण्यावर त्यांचा भर असल्याचे बोलले जात आहे.

\Bशेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये द्या

\Bआमदार सत्तार म्हणाले, 'जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असून शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत करावी, नुकसान भरपाई द्यावी. आज दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. १९७२ पेक्षा गंभीर परिस्थिती जिल्ह्यात आहे. मागणी करूनही पिण्याचे टँकर मिळत नाही.'

\B'ते' ढेकूण आहेत

\Bएल्गार यात्रेसंदर्भात सोशल मीडियावर काही कार्यकर्त्यांनी केलेल्या टिकाटिपण्णीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सत्तार म्हणाले, 'इगो करणाऱ्या कार्यकर्त्यांचे दिवस आता संपले आहेत. आता कार्यकर्त्यांचे दिवस आहेत. इगो करणारे ढेकूण आहेत. ते पक्षाला बदमान करत आहेत. आगामी निवडणुकीसाठी धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणत महाआघाडी तयार करण्याचे काम सुरू आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images