Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ई-दुचाकीला नियमांचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इंधनाचे वाढते दर, तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ई-वाहनांची संख्य वाढवण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. मात्र, मात्र ई-दुचाकींबद्दलच्या नियमांची संबंधित एजन्सीधारकांनाच माहिती नसल्याचा फटका वाहनधारकांना सोसावा लागत आहे. विनानंबरच्या ई-दुचाकीवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे वाहनधारकांना आरटीओ व वाहतूक पोलिसांच्या कचाट्यात सापडले आहेत.

शहरात विविध ठिकाणी ई-वाहन विक्रीची दुकाने सुरू झाली आहेत. त्यांच्याकडून १९ व्हॅटच्या दुचाकींची विक्री केली जात आहे. १९ व्हॅटपेक्षा जास्त व्हॅटची वाहनेही विकली जात आहेत. एक वर्षात शहरात अंदाजे एक हजार वाहनांची विक्री झाली असावी. ही विक्री केंद्र शासनाच्या नियमानुसार केली जात आहे. मात्र, या ई-वाहनांवर नोंदणी क्रमांक नसल्याने वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. या वाहनांना नोंदणी आवश्यक नसल्याचे आरटीओंचे पत्र आणावे, असे वाहनधारकांना वाहतूक पोलिस विभागातील काही पोलिसांकडून सांगितले जात आहे. त्याचवेळी आरटीओमध्ये अशा वाहनांबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याने, तेथून असे पत्र देण्यास असमर्थता व्यक्त होत आहे. परिणामी, ई-दुचाकीधारक आरटीओ व वाहतूक पोलिसांच्या कचाट्यात सापडले आहेत.

ई-वाहन एजन्सीचालकांच्या प्रतिनिधींना आरटीओ कार्यालयात बोलविण्यात आले होते. त्यांनी केंद्र शासनाचे नियम, तसेच गुजरात आरटीओ विभागाचे पत्र सादर केले होते. शहरात वाहन विकणाऱ्या एजन्सीने आरटीओ विभागाकडून ट्रेड प्रमाणपत्र घेऊन, वाहनांची आरटीओ कार्यालयात नोंदणी करूनच वाहन विक्री करावी, असा नियम आहे. मात्र याची माहिती शहरातील अनेक ई-वाहन विक्रेत्यांना नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, शहराच्या रस्त्यांवर अनेक ई-वाहने विनानोंदणी फिरत आहेत. शहरात ई-वाहना विकणाऱ्या चार एजन्सी आहेत. त्यापैकी काही जणांनी आरटीओ कार्यालयाकडे ट्रेड प्रमाणपत्र दाखल केले आहे. तर काही एजन्सीने प्रमाणपत्र सादर केलेले नाही.

…………

\Bमुख्यमंत्र्यांकडून घोषणा\B

२७ मे रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ई-वाहनांची संख्या वाढविण्यासाठी रोड टॅक्स, नोंदणी शुल्कातून ही वाहने मुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला होता. सध्या ई-रिक्षाबाबत नियम जाहीर करण्यात आले आहे, मात्र ई-दुचाकीबाबत अजून स्पष्ट निर्देश आलेले नाहीत.

…………

आरटीओ कार्यालयाच्या हद्दीत वाहन विक्रीसाठी आरटीओ विभागाकडून ट्रेड परवाना घेणे बंधनकारक आहे. ई-वाहन विक्रेते एजन्सीधारक, असे प्रमाणपत्र न घेता वाहन विकत असतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांची नोंदणीही आरटीओ विभागाकडे आवश्यक आहे, असा स्पष्ट नियम आहे.

-सतीश सदामते, प्रादेशिक परिवहन आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ई-पॉस’ची गाडी अडखळती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोरगरिबांचे धान्य विक्री करून मलिदा लाटणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी शासनाने मोठा गाजावाजा करत मराठवाड्यातील प्रत्येक रेशन दुकानांवर गेल्या दोन वर्षांपासून 'ईपीओएस' (इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल) मशीन बसवल्या. या माध्यमातून गोरगरिबांपर्यंत धान्य मिळत असले तरी अद्यापही जिल्ह्यातील तब्बल २५ टक्के लाभाधारकांना जुन्याच पद्धतीने रेशन वाटप होत असल्याने काळाबाजार होण्याला वाव काम आहे.

मार्च २०१८ मध्ये जिल्ह्यातील सर्व १८०० रेशन दुकानांच्या माध्यमातून ५२.५ टक्के धान्य ई-पॉस प्रणालीच्या माध्यमातून वाटप करण्यात आले होते. एप्रिलमध्ये ५९ टक्के, मे ६५ टक्के, जून ६९ टक्के, जुलै ७४ टक्के, ऑगस्ट ७५ टक्के, तर सप्टेबर महिन्यामध्ये ७५ टक्के धान्यवाटप ई-पॉस प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आल्याच्या नोंदी पुरवठा विभागाकडे आहेत.

रेशनकार्डला आधारशी लिंक करून, धान्य घेण्यासाठी दुकानावर येणाऱ्या लाभार्थ्यांच्या बोटांचे ठसे घेऊन, त्यांची ओळख पटवून धान्य देण्याची ई-पॉस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल) प्रक्रिया दोन वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १८०० रेशनदुकानदारांना ई-पॉस मशीन देण्यात आल्या असून यात शहरातील १९९ रेशनदुकानदारांचाही समावेश आहे. या रेशनदुकानदारांना ई-पॉस मशीन हाताळण्याचे अनेकदा प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे. मशीन हाताळताना येणाऱ्या अडचणी दूर केल्यानंतरही रेशन काही दुकानदारांकडून ई-पॉसला विरोध कायम होता. ई-पॉसवरून धान्य वितरणाचा लेखाजोखा गांभिर्याने घेतला जात असताना धान्य वाटपाचे प्रमाण कमी असणाऱ्या जिल्ह्याती १९४ रेशन दुकानदारांना पुरवठा विभागाकडून नोटीसही बजावण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही संपूर्ण लाभधारकांना अद्यापही ई-पॉस या प्रणालीच्या माध्यमातून धान्यवाटप करण्यात येत नाही. नवीन प्रणालीनुसार धान्यवाटपामध्ये सर्वात कमी ६३ टक्के वैजापूर तालुक्यात, तर सर्वाधिक ८८ टक्के धान्यवाटप फुलंब्री तालुक्यात करण्यात आले आहे.

या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम म्हणाले की, ई-पॉस प्रणालीच्या माध्यमातून काळ्याबाजाराला निश्चित आळा बसला असून काही तांत्रिक अडचणी वगळता प्रणालीच्या माध्यमातून धान्य वाटपाला वेग मिळत आहे, अनेक लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे जुळत नसल्याच्या अडचणी कायम असल्याचेही डॉ. कदम यांनी सांगितले.

\Bसप्टेबर महिन्यातील स्थिती\B

तालुका..................... ई-पॉसद्वारे वाटप

एफजीडीओ.....................६७ टक्के

औरंगाबाद......................८० टक्के

पैठण.............................७५ टक्के

फुलंब्री...........................८८ टक्के

सिल्लोड.........................८३ टक्के

सोयगाव..........................८४ टक्के

गंगापूर.............................७५ टक्के

वैजापूर..............................६३ टक्के

खुलताबाद.........................८० टक्के

कन्नड..............................७५ टक्के

-------------------------------------.

एकूण...............................७५ टक्‍के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांच्या कर्करोगाचा कार रॅलीतून जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलांच्या कर्करोगांबाबत जनजागरण करण्याच्या हेतुने कॅन्सरवर मात केलेल्या मुलांच्या सहभागातून कॅनकिडस् संस्थेच्या वतीने ठाण्यातून काढण्यात आलेल्या कार रॅलीचे रविवारी (३० सप्टेंबर) सकाळी महाराष्ट्रातील पहिल्याच स्वतंत्र शासकीय शासकीय कर्करुग्णालयात जोरदार स्वागत करण्यात आले. यानिमित्त विविध छोटेखानी कार्यक्रम पार पडले. योग्य वेळी योग्य उपचार केले तर मुलांच्या कर्करोगावर मात केली जाऊ शकते, असा सकारात्मक संदेश देण्यात आला.

याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, कॅनकिडस् संस्थेच्या अध्यक्ष पूनम बगई, सदस्य सोनल शर्मा, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, कॅन्सर हॉस्पटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्त हॉस्पिटलमध्ये बाल कर्करुग्णांना दिल्या जाणाऱ्या दिल्या उपचारांची माहिती विभागप्रमुख डॉ. आदिती लिंगायत यांनी दिली, तर 'कॅनकिडस्'च्या कार्याबद्दल व राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती पूनम बगई यांनी दिली. याच कार्यक्रमात कॅन्सरवर मात केलेल्या मुलांनी पथनाट्य सादर केले आणि त्याला उत्स्फूर्त दाद मि‍ळाली. या कार्यक्रमाला डॉ. बालाजी शेवाळकर, डॉ. ऋषीकेश खाडीलकर, डॉ. अनघा वरुडकर आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पूजा तोतला यांनी केले, तर संदीप भडांगे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी भडांगे, बालाजी देशमुख, डॉ. अमित राठोड आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूर, गंगापुरात टँकरचा आलेख चढता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

परतीच्या पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे आता औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईचे मळभ निर्माण झाले आहे. मराठवाड्याच्या तुलनेत सर्वाधिक १७६ टँकर औरंगाबाद जिल्ह्यात असून यामध्येही गंगापूर तालुक्यात ५९, तर वैजापूर तालुक्यात ४८ टँकरद्वारे पाणी पुरवण्यात येत आहे.

समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यातील पैठण, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांतील अनेक गावांना पाणीटंचाईची सामोरे जावे लागत आहे. सध्या जिल्ह्यात टँकरद्वारे तब्बल तीन लाख नागरिकांची तहान भागवण्यात येत आहे. या पावसाळ्यात औरंगाबाद जिल्ह्यावर वरुणराजाने अवकृपा केली आहे. जून पासून जिल्ह्यात पावसाचे दोन मोठे खंड झाले, परतीचा पाऊसही बरसला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जुलै महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यात अडीचशेवर टँकर सुरू होते. मात्र दरम्यानच्या काळात ‌औरंगाबाद, सिल्लोड, खुलताबाद तालुक्यातील सुरू असलेले सर्व टँकर बंद झाले. त्यानंतर पावसाच्या मोठ्या खंडामुळे पैठण, वैजापूर आणि गंगापूर तालुक्याला बसलेला टँकरचा विळखा अद्यापही कायम आहे. यंदा एकही दिवस जिल्ह्यातील टँकर बंद झाले नाहीत. टंचाई आराखडा संपुष्टात येण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे तीव्र टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकर सुरू ठेवण्याची मागणी करण्यात येत होती. यामुळे टँकर सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती. त्यानंतरही जिल्ह्यातील टँकरचा चढता आलेख सप्टेंबरअखेरही सुरू आहे. सध्या पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे.

\Bटँकर संख्या \B

पैठण ३८

गंगापूर ५९

वैजापूर ४८

फुलंब्री ०३

सिल्लोड ०७

एकूण १७६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकचालकाला लुबाडणाऱ्या टोळीला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ट्रक चालकाला मारहाण करून लुबाडणाऱ्या, तसेच कार चालकाला मारहाण करून कार पळवणाऱ्या तिघांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. हा प्रकार चार ऑगस्ट रोजी पैठण रोडवरील बेस्ट प्राइज समोर घडला होता. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकचालक मंगेश गोपाल गोमटे हे आपल्या ट्रकसह चार ऑगस्ट रोजी बेस्ट प्राइज समोर थांबले होते. तेव्हा चार आरोपींनी ट्रकमध्ये शिरत लोखंडी सळईने मारहाण करून पाच हजार रुपये व मोबाइल पळवला. तसेच त्यांच्या एटीएम कार्डचा क्रमांक मिळवून बँक खात्यातून रक्कम काढली होती. या गुन्ह्यातील आरोपी शनिवारी दुपारी नेहरू भवन भागात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेने सापळा रचून कारमधून आलेले संशयित आरोपी शेख जावेद शेख गनी (रा. हुसैन कॉलनी), किशोर अंबादास पवार (वय २२ रा. मुकुंदवाडी, संजयनगर), परवेज बाबुलाल पठाण (वय १९ रा. संजयनगर) यांच्यासह एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून लुबाडलेले आठ मोबाइल जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय राहुल सूर्यतळ, जमादार संतोष सोनवणे, लालखान पठाण, नंदलाल चव्हाण, योगेश गुप्ता, रितेश जाधव व चालक शेख बाबर यांनी केली.

\Bचोरीची कार जप्त

\B

या आरोपींच्या ताब्यातून एक इरटिका कार जप्त करण्यात आली. याची चौकशी करण्यात आली असता ती दीड महिन्यापूर्वी बदनापूर येथे एका कारचालकाला मारहाण करून पळवली होती. याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. ही चोरलेली कार शेख जावेद भाड्याने देऊन चालवत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस ठाण्यात धुडगूस; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मद्यपींना वैद्यकीय तपासणीसाठी नेताना त्यांनी पोलिस ठाण्यात धुडगूस घालत सहाय्यक फौजदाराला मारहाण केली. हा प्रकार शनिवारी मध्यरात्री अडीच वाजता सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात घडला. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री चार मद्यपी तरुणांना संशयित म्हणून आणले होते. या संशयितांना वैद्यकीय तपासणीसाठी घाटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत होते. यावेळी या चौघांनी सिद्धार्थ शिंदे यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. याप्रकरणी शिंदे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सनी रोशनलाल चहल (वय २५ रा. काल्डा कॉर्नर), अश्विन शिवप्रशांत शर्मा, दिव्याजी राजीव सहानी आणि रविकांत सुरेशचंद्र दुबे यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ करणे, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एपीआय राहुल जाधव हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित बहुजन आघाडीची गोळाबेरीज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

युती आणि आघाडीला दूर ठेवून भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम पक्षाची वंचित बहुजन आघाडी राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. शहरात मंगळवारी आयोजित जाहीर सभेत आघाडी आपली राजकीय दिशा जाहीर करणार आहे. मुस्लिम व दलित मतदारांवर भिस्त असलेल्या आघाडी सर्व घटकांची गोळाबेरीज करुन नवे राजकीय समीकरण मांडणार आहे.

भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम या दोन पक्षांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा चर्चेचा विषय ठरली आहे. मराठवाडास्तरीय सभेनंतर राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. औरंगाबाद शहरातील जबिंदा लॉन्सवर सभेची जय्यत तयारी सुरू असून किमान दोन लाख लोक सभेला उपस्थित राहण्याचा संयोजकांचा अंदाज आहे. 'भारिप'चे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि 'एमआयएम'चे खासदार असदुद्दिन ओवेसी सभेला मार्गदर्शन करणार आहेत. दलित-मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होऊन काही मतदारसंघात राजकीय उलथापालथ होईल असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. राज्यात मोठी 'व्होट बँक' असलेल्या दलित-मुस्लिम मतदारांना एकत्रित आणणाऱ्या सभेकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या सभेतून वंचित बहुजन आघाडी राजकीय धोरण निश्चित करणार आहे. या आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्काचा मतदार दूर जाणार असल्याने दोन्ही पक्षांनी टिकेचा सूर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष नसल्यामुळे त्यांच्याशी आघाडी करणार नसल्याची भूमिका अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली होती. या वक्तव्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. कर्मठ विचारधारा असलेला एमआयएम पक्ष धर्मनिरपेक्ष आहे का असा सवाल काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उपस्थित करण्यात आला. शिवसेना-भाजपच्या ताब्यातील काही मतदारसंघात दलित-मुस्लिम मतदार बहुसंख्य आहेत. आघाडीचे उमेदवार ही मते खेचणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीच्या संघर्षात मतांची फाटाफूट होऊन राजकीय निकाल बदलणार आहेत. वंचित बहुजन आघाडी भाजपची 'बी टिम' असल्याची टीका सोशल मीडियातून सुरू झाली आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवून आघाडी करणे म्हणजे 'बी टिम' असते का असा प्रतिप्रश्न आघाडीच्या समर्थकांनी केला आहे. या राजकीय वादात वंचित बहुजन आघाडीने उत्सुकता ताणली आहे. मिश्र लोकवस्तीच्या शहरात मतांचे ध्रुवीकरण होऊन निकाल बदलण्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

सर्व घटकांचा समावेश

स्वतंत्र आघाडीद्वारे सत्ता स्थापन करण्याचा दोन्ही पक्षांचा मनसुबा आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांना सभेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. बेरोजगारीचा मुद्दा मांडून तरुणांसह शेतकरी व कामगारांना एकत्र आणण्याचे प्रयत्न आघाडी करीत आहे. वकील, डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी-कर्मचारी, विचारवंत यांची सभेला उपस्थिती राहणार आहे. विविध घटकांची मोट बांधून बहुजन वंचित आघाडी अधिक जागा जिंकण्याचे नियोजन करीत आहे.

तालुकानिहाय बैठका घेतल्यामुळे ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात सभेला लोक येतील. जवळपास दोन लाख नागरिक उपस्थित राहणार आहेत. शहरात प्रत्येक वसाहतीत बैठका घेतल्या आहेत- अमित भुईगळ, सरचिटणीस, भारिप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१६७ कॉलेजांचा ठेंगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रत्येक महाविद्यालयाने युवा महोत्सवात सहभाग घेणे बंधनकारक असूनही १६७ महाविद्यालयांनी महोत्सवाकडे पाठ फिरवली. प्रवेश शुल्कात सांस्कृतिक उपक्रमाच्या नावाखाली शुल्क वसूल करणारी महाविद्यालये मनमानी कारभार करीत आहेत. एकाही महाविद्यालयाला दंड आकारणी झाली नसल्यामुळे दरवर्षी महोत्सवाची गर्दी घटत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या चार दिवसांच्या युवा महोत्सवाचा समारोप झाला. या महोत्सवात विद्यापीठाअंतर्गत ४१९ महाविद्यालयांनी सहभाग घेणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात फक्त २५२ महाविद्यालये सहभागी झाली. त्यामुळे महोत्सवाकडे पाठ फिरवलेल्या १६७ महाविद्यालयांवर प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सहभाग टाळणाऱ्या महाविद्यालयांना १० हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. मात्र, एकाही महाविद्यालयाला दंड आकारण्यात आला नाही. प्रशासनाची थंड कारवाई महाविद्यालयांसाठी सोयीची ठरली आहे. यंदाचा युवा महोत्सव ३६ कला प्रकारांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला. पण, एकूण कला प्रकारात विद्यार्थ्यांचा अत्यल्प सहभाग होता. महोत्सवात पहिल्या दिवशी २२८ महाविद्यालये उपस्थित होती. ही संख्या वाढून दुसऱ्या दिवसापर्यंत २५२ झाली. काही महाविद्यालयांनी नोंदणी असूनही पाठ फिरवली. परिणामी, महोत्सवात गर्दीचा उच्चांक गाठला गेला नाही. दरवर्षी महोत्सव नोव्हेंबर महिन्यात असतो. यावर्षी तयारीला वेळ मिळाला नसल्याचे कारण काही महाविद्यालयांनी सांगितले. युवा महोत्सवात सहभाग न घेतल्यास विद्यापीठ दंड आकारण्याची भीती असल्यामुळे बहुतांश महाविद्यालयांनी नावापुरता सहभाग नोंदवला. एक स्पर्धक सहभागी होऊ शकतो अशा कला प्रकारात नोंदणी करण्यात आली. दोन विद्यार्थी आणि एक संघप्रमुख पाठवून हजेरी नोंदवली गेली. औरंगाबाद शहरातील संघप्रमुख महोत्सवाकडे फिरकले नाही. विद्यार्थी वक्तृत्त्व स्पर्धा, रांगोळी, काव्यवाचन अशा वैयक्तिक स्पर्धेत सादरीकरण करतात. मोजकेच संघ असल्यामुळे अनेक रंगमंच स्पर्धकांची वाट पाहताना ओस पडले. पुरेशी तयारी नसल्यामुळे पारितोषिकाची खात्री नसलेले समारोपापूर्वीच किमान दिडशे संघांनी विद्यापीठ कॅम्पस सोडले. महाविद्यालयांची उदासीनता उत्तम कलावंत, शिल्पकार, चित्रकार आणि वक्ते घडवण्यात बाधा ठरली आहे. केवळ सहभागाची औपचारिकता पाळणाऱ्या महाविद्यालयांची हातचलाखी प्रशासनाने रोखण्याची गरज आहे. दंड आकारणीबाबत बोलण्यास वरिष्ठ अधिकाऱ्याने नकार दिला.

शुल्क वसुली भरमसाठ

सांस्कृतिक उपक्रम, युवा महोत्सव, स्नेहसंमेलनासाठी महाविद्यालये प्रवेश शुल्कात वेगळे शुल्क आकारतात. परंतु, विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक विकासाकडे पूर्णत: दुर्लक्ष करतात. युवा महोत्सवाकडे पाठ फिरवलेली १६७ महाविद्यालये हे शुल्क परत करणार का असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना रंगमंच मिळत नाही. त्यामुळे दरवर्षी ठरावीक महाविद्यालयांवर पारितोषिकांचा वर्षाव होताना दिसत आहे.

महात्सवात अपेक्षित कॉलेज : ४१९

सहभागी महाविद्यालये : २५२

सहभागी न झालेले : १६७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मटा’तर्फे गरबा-दांडिया प्रशिक्षण कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवरात्र म्हणताच सर्वांधिक उत्सुकता असते ती, गरबा-दांडियाची. वाचकांची आवड ओळखून 'महाराष्ट्र टाइम्स' व गरवारे कम्युनिटी सेंटर यांनी गरबा-दांडिया कार्यशाळा आयोजित केली आहे. येत्या तीन ते पाच ऑक्टोबरदरम्यान गरवारे कम्युनिटी सेंटर (सिडको, एन-सात) येथे दररोज दुपारी अडीच वाजता कार्यशाळा घेण्यात येईल.

पारंपरिक गरबा नृत्य आणि दांडिया यांची तरुणी-महिलांना प्रचंड आवड. कितीही व्यस्त असल्या तरी संपूर्ण नवरात्री दांडिया कार्यक्रमांना महिला-तरुणी आवर्जून जातातच. गेल्या काही वर्षांपासून कॉलनी, सोसायट्यांमध्येही दांडिया कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. अगदी मुलांनाही या खेळाचा मोह सुटत नाही. सर्वांसोबत 'ताल से ताल मिला' म्हणताना तसा खेळ जमतो, पण शास्त्रशुद्ध प्रशिक्षण असेल तर तुमचे नृत्य डान्स अधिक खुलते. तेव्हा आपणही गरबा खेळायला सज्ज असावे, म्हणूनच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळा तरुणी व महिलांसाठी खुली व मोफत आहे.

गरबा व दांडिया खेळल्याशिवाय नवरात्रीची धमाल पूर्णच होत नाही. मग वाट कसली बघताय. लगेच फोन उचला आणि पटकन नोंदणी करा. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गरबा व दांडियाचे शास्‍त्रशुद्ध प्रशिक्षण घ्या व नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणीत करा. अधिक माहिती व नोंदणीसाठी ९८२२६३०५५५ या क्रमांकावर किंवा गरवारे कम्युनिटी सेंटर, एन सात येथे ०२४०- २४८४७९४ यावर संपर्क साधावा.

प्रशिक्षण कालावधी : तीन ते पाच ऑक्टोबर

वेळ : दुपारी २.३०

प्रशिक्षणाचे स्थळ : गरवारे कम्युनिटी सेंटर, एन सात सिडको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक शाखा बंद विरोधात पाच ऑक्टोबरला मोर्चा

$
0
0

फर्दापूर: सोयगाव तालुक्यातील आठ गावे व तोंडापूरसह परिसरातील गावांसाठी असलेली तोंडापूर (ता.जामनेर) येथील आय. डी.

बी. आय. बँकेच्या शाखेचे स्थलांतर होणार आहे. हे स्थलांतर थांबवावे, या मागणीसाठी खातेदारांनी डोळ्याला काळी पट्टी बांधून एक किलो मीटर पायी चालत पाच ऑक्टोबर रोजी गांधारी मोर्चा व उपोषण करण्याचा इशारा जलसंधारण मंत्री गिरीश महाजन व जिल्हा अधिकारी जळगाव यांना दिला आहे. तोंडापूर येथे आय. डी. बी. आय. बँक ३५ वर्षांपासून कार्यरत आहे. हे गाव मराठवाडा खान्देशाच्या सीमेवर असून या शाखेत सोयगाव तालुक्यातील जामठी, रवळा, जवळा, पिंपळा, नांदा तांडा, टिटवी, सावळतबारा, देव्हारी या गावचे नागरिक खातेदार आहेत. विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, शेतकरी, बचतगट, व्यापारी या बँकेवर अवलंबून आहेत. ही शाखा जामनेर येथे स्थलांतर होणार असल्याने त्रास होणार आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर प्रभाकर साळवे, जगदीश पाटील, रंगनाथ लक्षण काळे आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरव समाजाने शिक्षणामध्येही प्राविण्य मिळवावे

$
0
0

(फोटो वापरू नये.)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुरव समाजाने मंदिर, पूजा, बेल वाहणे इतकेच मर्यादित न राहता शिक्षणामध्येही प्राविण्य मिळावावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय गुरव महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केले.

रविवारी (३० सप्टेंबर) राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

या सर्वसाधारण सभेसाठी माऊली महाराज, शशिकांत निळकंठ गुरुजी, डॉ. प्रल्हाद वडगावकर, गणेश पुजारी, विश्वासराव भामरे, बाळासाहेब क्षिरसागर, मनोहरराव गुरव, गणपत फुलारी, गणेश सुरडकर, बाळासाहेब वाघमारे, सुधीर कापसे यांच्यासह महासंघातील जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपााध्यक्ष, महिला, युवक अध्यक्ष आदींची उपस्थिती होती.

यावेळी सर्वांनी राष्ट्रीय गुरव महासंघामध्ये भाग घेऊन हिरीरिने काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. केवळ राष्ट्रीय गुरव समाज महासंघ हे महासंघापुरते मर्यादित न राहता प्रत्येक राज्यामध्ये याचे काम केले जाईल असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर शेवाळे, शिवाजी खरात, गणेश तोरणमल, संतोश मल्लीनाथ, राजकुमार बचाटे, विलास तोरडमल, लक्ष्मणराव खरात, दत्तात्रय खरात, ज्योती गुरव, संध्या उबाळे, अनिता पुजारी, स्मिता शेवाळे, प्रमोद शेवाळे आदींनी परीश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारूच्या ५२८ बाटल्या जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैधरित्या विक्रीसाठी जात असलेल्या देशी दारूच्या सव्वापाचशे बाटल्यांचा साठा पुंडलिकनगर पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शनिवारी रात्री जयभवानीनगरात करण्यात आली. याप्रकरणी रिक्षाचालकासह तिघांना अटक करून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र अंतराय यांनी तक्रार दाखल केली. ते शनिवारी रात्री, जमादार चव्हाण व सहकाऱ्यांसह गस्त घालत होते. शिवाजी पुतळा ते जयभवानीनगर रस्त्यावर एका रिक्षामध्ये अवैध देशी दारूचा साठा नेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून संशयित रिक्षा अडवून तपासणी करण्यात आली. रिक्षामध्ये देशी दारूचे अकरा बॉक्स ज्यामध्ये ५२८ बाटल्या आढळल्या. पोलिसांनी संशयित आरोपी रिक्षाचालक राजू सूर्यकांत काजळे (वय २३ रा. मुकुंदवाडी, रेल्वे स्टेशन), विवेक प्रकाश लवाळे (वय १८ रा. नवनाथनगर, भारतनगर) आणि सचिन सुभाषलाल जैस्वाल (वय ३५ रा. जाधववाडी) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून २७ हजार ४५६ रुपयांची देशी दारू व रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारु बंदी कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जमादार चव्हाण हे तपास करीत आहेत.

….

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धूत मोटर्सच्या कर्मचाऱ्याला एक लाखाचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बँकेत रक्कम जमा करण्यासाठी गेलेल्या धूत मोटर्सच्या कर्मचाऱ्याला भामट्याने एक लाखाचा गंडा घातला. हा प्रकार शनिवारी दुपारी समर्थनगरातील एका बँकेत घडला. मालकाला साडेचार लाख रुपये द्यायचे असल्याची थाप मारत कर्मचाऱ्याकडील एक लाख आरोपीने लंपास केले. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी राजू नंदराम बकले (वय ४९ रा. हर्सूल) यांनी तक्रार दाखल केली आहे. ते अदालत रोडवरील धूत मोटर्समध्ये कर्मचारी आहेत. ते शनिवारी दुपारी समर्थनगरातील एका बँकेत एक लाख रुपये भरण्यासाठी गेले होते. यावेळी एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आली. या व्यक्तीच्या अंगात काळा टी शर्ट, जीन्स पँट घातलेली असून डोळ्यावर चष्मा होता. त्याने बकले यांना तुमच्या मालकाला मला चार लाख ४० हजार रुपये द्यायचे आहे. यापैकी एक लाख ७० हजारांचा चेक आता देतो व उर्वरित दोन लाख ७० हजार रुपये माझ्या समोर असलेल्या कार्यालयातून घेऊन जा, असे सांगत बकले यांच्याजवळील एक लाख रुपये मी बँकेत भरतो, असे म्हणत ताब्यात घेतले. बकले हे समोर असलेल्या एका कार्यालयात गेले असता त्यांनी धूत मोटर्सशी आपला कोणताही व्यव्हार झाला नसल्याची माहिती दिली. बकले पुन्हा बँकेत येईपर्यंत तो पसार झाला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बकले यांनी क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सहायक फौजदार धर्मराज देशमुख तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोटरी एलिट क्लबतर्फे चाळीस शिक्षकांचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रोटरी क्लब ऑफ एलिटतर्फे नुकताच जिल्ह्यातील ४० शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या ४० पैकी २५ शिक्षकांना 'राष्ट्राचे शिल्पकार' पुरस्कार प्रदान करण्यात आला. चार शिक्षकांचा विशेष कार्याबद्दल गौरवण्यात करण्यात आला, तर क्लबचे सदस्य असलेल्या ११ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. क्लबच्या अध्यक्ष पुष्पा अरबाले, सचिव विवेक कानडे, सुहास वैद्य, डॉ.मनोरमा शर्मा यांची उपस्थिती होती.

'शिक्षक समाज घडवतो. मलाही हा पेशा आवडतो. मी पण हे काम करते. शिक्षकांमध्ये महिलांचे विशेष कौतुक. घर आणि नोकरी दोन्हीचे संतुलन साधल्याबद्दल शिक्षिकांचे खूप कौतुक. योग्य नियोजन, भरपूर मेहनत, प्रकृतीची काळजी घेतली तर कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल,' असे मत डॉ. येळीकर यांनी व्यक्त केले. डॉ. मनोरमा शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. स्वाती स्मार्त यांनी परिचय करून दिला, तर विवेक कानडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता कॉलेजांमध्ये मतदारनोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. 'नो वोटर लेफ्ट बिहाइंड' या संकल्पनेंतर्गत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी निवडणूक विभागाचे अधिकारी आता प्रत्येक महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची मतदारनोंदणी करून घेणार आहे. ही विषेश मोहीम ३१ ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी दिली.

एक ते ३१ ऑक्टोबरदरम्यान राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेंतर्गत संबंधित तहसील, उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात निवडणूक विभागाचे व महसूल विभागाचे कर्मचारी जाणार आहेत. तेथे वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या, पण मतदार यादीत नसलेल्या विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे आणि मतदारनोंदणी अर्ज भरून भरून घेणार आहेत. या नवमतदारांना शोधून त्यांची मतदार यादीत समाविष्ट करणे हा या मोहिमेचा उद्देश असला तरी या मोहिमेअंतर्गत मतदार जागृतीचेही काम करण्यात येणार आहे. इतर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांनाही त्या- त्या जिल्ह्यातील मतदार यादीत नाव यावे यासाठी प्रशासनाकडून ऑनलाइन पद्धतीने मतदारनोंदणी करण्यासंदर्भात आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. एक ते ३१ ऑक्टोबरदरम्यान टप्प्या टप्प्यांत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक मतदाराचे नाव यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे प्रशांत शेळके यांनी सांगितले.

\Bमोबाइलवर मिळणार विद्यार्थ्यांना माहिती

\Bमहाविद्यालयातून अर्ज भरुन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी नमूद केलेल्या मोबाइल क्रमांकावर त्यांनी भरून दिलेल्या अर्जाच्या सद्यस्थितीची माहिती मिळणार आहे. यावरून विद्यार्थ्यांना आपण भरून दिलेल्या अर्जानुसार आपले नाव मतदार यादीत येणार की नाही, याची माहिती मिळणार आहे.

\Bसात व २१ ऑक्टोबरला मतदानकेंद्रावर नोंदणी\B

जिल्ह्यातील प्रत्येक मतदानकेंद्रावर सात व २१ ऑक्टोबर रोजी निवडणूक विभागाकडून विषेश मोहीम राबवण्यात येणार असून, यामध्ये नवीन मतदार नोंदणी, नाव वगळणे, मतदार यादीतील दुरुस्ती; तसेच नाव स्थलांतरित करणे शक्य होणार नाही. मतदान केंद्रामध्ये नागरिकांच्या मदतीसाठी 'बीएलओं'ची उपस्थिती राहणार आहे. या विषेश मोहिमेमध्ये नावनोंदणी; तसेच सुधारणा करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

\B३१ ऑक्टोबरपर्यंतच संधी

\Bनवीन मतदार नोंदणी, नावामध्ये दुरुस्ती करण्याची संधी केवळ ३१ ऑक्टोबरपर्यंतच राहणार आहे. यासाठी सात७ व २१ ऑक्‍टोबरच्या विषेश मोहिमेशिवाय नागरीकांना तहसील कार्यालयातही आपला फॉर्म जमा करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटीप्रश्नी आमदारांची आज जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यासह तब्बल १० ते १२ जिल्ह्यांतील गोरगरीब रुग्णांचा आधारस्तंभ असलेल्या घाटीतील गंभीर असुविधांसंदर्भात शहरातील आमदार अतुल सावे, आमदार इम्तियाज जलील व आमदार संजय शिरसाठ यांची जिल्ह्याधिकारी उदय चौधरी यांच्यासोबत सोमवारी (१ ऑक्टोबर) बैठक होणार आहे. घाटीतील समस्त असुविधांकडे 'मटा'ने लक्ष वेधले होते आणि 'मटा'च्या वृत्ताची दखल मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेऊन स्युमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. याच असुविधांबाबत 'मटा'ने 'घाटीला घरघर' ही मालिकाही सुरू केली आहे. या संदर्भात आमदार जलील यांनी शुक्रवारी (२८ सप्टेंबर) घाटीच्या अधिष्ठातांची भेट घेत अधिष्ठातांच्या दालनातूनच जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर तीन आमदारांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत सोमवारी बैठक होत आहे.

या बैठकीत घाटी रुग्णालयातील असुविधांबाबत सविस्तर चर्चा होऊन ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे. बैठकीतून औषधांच्या तसेच वैद्यकीय उपकरणांच्या थकलेल्या बिलांपैकी निदान काही रक्कम तातडीने अदा करण्याचा प्रश्न मार्गी लागला तर सिटी स्कॅन किंवा व्हेंलिटेलरसारखी काही महत्वाची उपकरणे दुरुस्त होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तसेच काही महत्त्वाच्या औषधांचाही प्रश्न मार्गी लागू शकतो.

'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये २१ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या 'सिटी स्कॅन मृतप्राय; घाटी खड्ड्यात' या वृत्ताची दखल खंडपीठाने स्वतःहून दखल घेतली. कोट्यवधींची बिले थकल्यामुळे घाटीचे पाय खड्ड्यात गेल्याची गंभीर स्थिती रुग्णालयावर ओढवली आहे. घाटीमध्ये एक ते दोन वर्षांपासून बहुतांश दैनंदिन औषधे, प्रतिजैविके, इंजेक्शन, ग्लोज, कॉटन, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य तसेच इतरही वैद्यकीय साहित्याचा शब्दशः ठणठणाट आहे. रुग्णांना जगवणारे निम्मे व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत, तर आयोडिन, पॅरासिटामोलसारखी अत्यंत मूलभूत औषधींपासून ते जीवरक्षक औषधी-इंजेक्शनचाही गंभीर तुटवडा असून, या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी 'घाटीला घरघर' ही मालिकाही 'मटा'नेही २६ सप्टेंबरपासून सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात वादविवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय पातळीवर रविवारी झालेल्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात विद्यार्थ्यांची गर्दी वाढल्याने एकच गोंधळ उडाला. वितरण कार्यक्रमाला किती विद्यार्थी येणार यांचा अंदाज प्रशासनाला आला नाही. त्यामुळे परजिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.

मुक्त विद्यापीठाच्या मे-२०१७ मध्ये झालेल्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना विभागीय पातळीवर पदवी प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम रविवारी देवगिरी कॉलेजच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात झाला. या कार्यक्रमला कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक जयवंत खडताळे, विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. रामराव माने, डॉ. कैलास बोरसे यांची उपस्थिती होती.

मुख्य पदवी प्रदान सोहळा फेब्रुवारीमध्ये नाशिक येथे झाला. यावेळी उपस्थित न राहू शकल्याने अशा विद्यार्थ्यांसाठी विभागीय पातळीवर अशा प्रकारे कार्यक्रम घेण्याच्या सूचना होत्या. त्यासाठी विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे माहिती पाठविण्यात आली. औरंगाबाद विभागात चार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बोलावले होते. त्यासाठी जवळपास १७ ते १८ हजार विद्यार्थ्यांना 'ई-मेल'वर आवाहन करण्यात आले. दुपारी कार्यक्रमाला सुरुवात झाली अन् मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आले. विद्यापीठ प्रशासनाने प्रमाणपत्र देण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. विषयनिहाय वितरण व्यवस्था करण्यात आली. परंतु, गर्दी वाढल्याने विद्यार्थ्यांच्या रांगा वाढल्या अन् व्यवस्था कमी पडू लागली. प्रमाणपत्र मिळणे अवघड झाल्याने विद्यार्थ्यांनी काहीसा गोंधळ केला. विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

\Bअभ्यास केंद्रावर मिळणार प्रमाणपत्र \B

विद्यार्थ्यांना शांत करण्याचा विद्यापीठ प्रशासनाने प्रयत्न केला. ज्यांना पदवी प्रमाणपत्र मिळाले तरी त्यांना संबंधित अभ्यास केंद्रावरून प्रमाणपत्र दिले जाईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्ग २ जमीन विक्री परवानगीची गती मंदावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वर्ग २ जमीन विक्रीच्या नियमबाह्य परवानग्या देणाऱ्या दोन उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर जिल्ह्यातील ही प्रकरणे आता अत्यंत बारकाईने तपासण्यात येत आहेत. गेल्या आठ महिन्यांत दाखल झालेल्या ४७ प्रकरणांपैकी केवळ दहा प्रकरणे मंजूर झाली आहेत.

गायरान व सिलिंग जमीन विक्री परवानगी देण्याची प्रकरणे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत, तर महार हाडोळा, इनाम, कूळ आदी वर्ग २ प्रकारातील जमीनीची विक्री परवानगी प्रकरणे सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत हाताळली जातात. डिसेंबर २०१७ मध्ये तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी विश्‍वंभर गावंडे आणि सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी नियमबाह्य विक्री परवानग्या दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी या दोघांना निलंबित केले होते. त्यानंतर तब्बल चार-सहा महिन्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना शासन आदेशाने पुन्हा सेवेत नियुक्‍त करण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांवरील निलंबन कारवाई, त्यानंतर कटके यांनी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिस प्रशासनाला दिलेल्या तक्रारीमुळे महसूल विभाग हादरला होता. यामुळे विक्री परवानगीची प्रकरणे हाताळण्याचे काम संथगतीने सुरू होते. घडलेल्या प्रकारानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्वत: सुनावण्या घेण्यास सुरुवात केली होती. त्यांच्यानंतर आलेले उदय चौधरी यांनीही तो पायंडा कायम ठेवला आहे.

\Bआठ महिन्यात केवळ दहा प्रकरणे मंजूर\B

जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकाऱ्यांकडे विक्री परवानगीसाठी ४० प्रकरणे दाखल झाली. यातील दहा प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी विक्री परवानगी दिली, तर एका प्रकरणात अपील नामंजूर करण्यात आले. तसेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केवळ सात प्रकरणे दाखल झालेली असून, अद्याप एकाही प्रकरणात विक्री परवानगी देण्यात आलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या दुबळ्या रुग्णसेवेचा घाटीवर ताण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या संपूर्ण आरोग्याची जबाबदारी महापालिकेवर आहे, मात्र महापालिकेने चक्क हात वर करून जबाबदारी झटकण्याचा उद्योग वर्षानुवर्षे सुरूच ठेवला आहे. दोन-चार नव्हे तर बहुतांश शहर परिसराचा समावेश होऊ शकेल अशा महापालिकेच्या तब्बल ३३ आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये वर्षोनुवर्षे अत्यंत तोकडे उपचार होत आहेत. एकीकडे औरंगाबादसारख्या शहरामध्ये 'हार्ट ट्रान्स्प्लान्ट', 'लिव्हर ट्रान्स्प्लान्ट', 'किडनी ट्रान्स्प्लान्ट'पासून अनेक अद्ययावत उपचार-प्रक्रिया-शस्त्रक्रिया होत असताना, महापालिकेच्या एकाही केंद्रात किंवा रुग्णालयामध्ये आज सामान्य बाब झालेली सिझेरियन शस्त्रक्रियादेखील होत नाही. तेथे सोनोग्राफीची सोय नाही, 'कुटुंब नियोजना'शिवाय कुठलीही शस्त्रक्रिया या रुग्णालयांत केली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. महापालिकेची आरोग्यसेवा यंत्रणा दुबळी असल्यामुळे घाटी हॉस्पिटलला गेल्या अनेक वर्षांपासून दुप्पट भार सोसावा लागत आहे.

पालिकेच्या बहुतांश आरोग्य केंद्रांमध्ये दुपारी बारानंतर डॉक्टरांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत शुकशुकाट असतो आणि तरीही चुकून कोणी उपचारासाठी किंवा आपत्कालिन परिस्थितीत आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयांमध्ये धाव घेतली तर 'घाटीत जा' असे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना खुशाल सांगितले जाते. 'क्रिटिकल केसेस'मध्ये 'रेफर टू घाटी'ची असा शेरा मारून रुग्णाला घाटीमध्ये पाठविल जाते. शिवाय दैनंदिन केसेसमध्येही पालिकेकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घाटीमध्ये रुग्ण पाठवले जातातच. हा प्रकार आता इतका नित्याचा झाला आहे. त्यामुळे शहरातील अनक रुग्ण पालिकेच्या आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये न जाता थेट घाटीमध्येच उपचारासाठी जातात. रात्री-बेरात्री तर पालिकेच्या आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयांमध्ये उपचार मिळण्याची कोणतीही शक्यता नसते. आतातर पाचपैकी एन-आठ, कैसर कॉलनी व सिल्म मिल कॉलनी परिसरातील तीन रुग्णालये इतकीच कार्यरत असल्याचे समोर येत आहे. बन्सीलाल नगर व एन-११ परिसरातील रुग्णालयांमध्ये नूतनीकरण सुरू असल्याचे सांगण्यात येऊन दोन्ही ठिकाणची आरोग्य सेवा बंद करण्यात आली आहे.

\Bपालिका यंत्रणा सिझरलाही महाग

\Bपालिकेच्या ३३ आरोग्य केंद्र व रुग्णालयांसाठी (यामध्ये पाच रुग्णालयांचा समावेश आहे) सुमारे ३५ डॉक्टरांची टीम कार्यान्वित आहे, तर साधारणतः डॉक्टरांची दहा पदे रिक्त आहेत. यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ पाच, बालरोगतज्ज्ञ सहा ते सात, कान-नाक-घसातज्ज्ञ एक, पॅथॉलॉजिस्ट तीन असे स्पेशालिस्ट आहेत आणि महिन्याकाठी ३० ते ३५ नैसर्गिक प्रसुती व जवळजवळ तेवढ्याच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया होतात. त्याशिवाय कुठलेही महत्वाचे किंवा आधुनिक उपचार किंवा शस्त्रक्रिया पालिकेच्या केंद्र किंवा रुग्णालयात होत नाहीत. आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये सामान्य बाब ठरलेली सिझेरियन शस्त्रक्रियाही कुठल्याच केंद्र-रुग्णालयामध्ये होत नाहीत. पालिकेच्या आरोग्य यंत्रणेत भूलतज्ज्ञ नसल्याचे कारण देत किती वर्षे सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यासाठी टाळाटाळ केली जाणार आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. साध्या सोनोग्राफीचीही सोय पालिकेच्या संपूर्ण आरोग्य विभागात नाही. स्थानिक क्ष-किरण तज्ज्ञांशी करार करून गरोदर मातांची कशीबशी सोनोग्राफी केली जाते, मात्र वैद्यकीयदृष्ट्या तातडीची गरज म्हणून सोनोग्राफी करावी लागली, तर अशी कोणतीही सोय कोणत्याच आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयामध्ये नाही. त्याशिवाय कोणतेही तातडीचे जीवनदायी उपचार-शस्त्रक्रिया पालिकेच्या यंत्रणेमध्ये उपलब्ध नाहीत. आज सर्वाधिक 'किलर' आजार ठरलेल्या हृदयरोगावर किंवा मधुमेह-उच्चरक्तदाबावर किंवा मेंदूविकारावर कोणतेही तातडीचे किंवा दैनंदिन उपचार करण्याची सोय पालिकेच्या आरोग्य यंत्रणेत नाहीत. आज सर्व प्रकारच्या अपघातांचे प्रमाण खूप वाढले असताना 'ट्रॉमा सेंटर'ची नितांत गरज आहे; परंतु पालिकेच्या यंत्रणेमध्ये अशी कोणतीही सोय-सुविधा नाही व भविष्यात 'ट्रॉमा सेंटर' होण्यासाठी कोणतीही हालचाल सुरू नसल्याचे दिसून येत आहे. केवळ ओपीडी व राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्याशिवाय पालिकेच्या यंत्रणेत काहीही होत नाही म्हणूनच घाटीवर वर्षानुवर्षे भार आहे, जो सातत्याने वाढत आहे. आज घाटीमध्ये निम्मे रुग्ण हे शहर परिसरातील आहेत आणि पालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम असती तर या सर्व रुग्णांनी पालिकेच्या आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये उपचार घेतले असते.

\Bसाथरोगांचाही भार घाटीलाच

\Bमहापालिकेच्या निष्क्रिय यंत्रणेमुळेच शहरातील कचरा समस्या तीव्र बनली आहे आणि त्यामुळेच शहराला वर्षानुवर्षे साथरोगांचा विळखा आहे, परंतु हा साथरोगांचा विळखा सोडवण्याचे काम पालिकेची आरोग्य यंत्रणा करू शकत नाही. ही पालिकेची जबाबदारी असताना घाटीमध्येच दरवर्षी स्वाइन फ्लू वॉर्ड सुरू करण्याची वेळ येते. शहरामध्ये तापेचे किंवा डेंगीचे रुग्ण वाढले तर त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ अगदी न चुकता दरवर्षी घाटीवरच येते. शहरातील सर्दी-खोकल्याच्या रुग्णांवर घाटीनेच उपचार करायचे, स्वाइन फ्लू-डेंगी-व्हायरलच्या रुग्णांवरही घाटीनेच उपचार करायचे, तर मग पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने काय फक्त रुग्णांचे आकडे मोजायचे, असा मूलभूत प्रश्न पालिकेच्या आरोग्य यंत्रणेबाबत उपस्थित होत आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी पालिकेकडून मोठमोठी रुग्णालये चालवली जातात, मेडिकल कॉलेजही चालवले जातात, मग औरंगाबाद पालिका मात्र वर्षानुवर्षे 'रेफर टू घाटी' एवढे एकच काम करीत असल्याचे चित्र आहे.

प्राथमिक उपचारांबरोबरच महत्त्वाच्या लसीकरण व सर्व राष्ट्रीय मोहिमा राबवण्यावर आमचा भर आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांनाही प्राधान्य दिले जाते. तरीही लवकरच नेहरूनगर-कटकटगेट आरोग्य केंद्राचे रुपांतर रुग्णालयामध्ये करण्यात येऊन या ठिकाणी विविध उपचार-शस्त्रक्रियांच्या सेवा देण्यात येणार आहेत; तसेच आंबेडकरनगर येथे विविध आरोग्य सेवा देणारे ५० खाटांचे रुग्णालयही उभे राहणार आहे व त्यासाठी जागादेखील मिळाली आहे.

- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामचुकार लाइनमनवर बडगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरण कंपनीतील लाइन स्टाफकडून काम योग्य प्रकारे होत नसेल किंवा वारंवार तक्रारी प्राप्त होत असतील तर अशा कर्मचाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात येणार आहे. त्यासाठी नियमांमध्ये आवश्यक बदल केला जाणार असल्याचे महावितरणाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी सूचित केले. याशिवया या बैठकीत अभियंते व तांत्रिक कामगारांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी कामगारांच्या 'रिस्ट्रक्चरिंग'ची नोव्हेंबर २०१८पासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महावितरणामधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेची पदाधिकऱ्यांनी व्यवस्थापकीय संचालक संजिव कुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसमवेत मुंबई गेल्या आठवड्यात बैठत झाली. या बैठकीत कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. रिस्ट्रक्चरिंग करण्याच्या निर्णयाची अमलबजावणी नोव्हेंबरपासून केली जाणार आहे. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एमडी इंडियामार्फत वैद्यकीय उपचार देणे शक्य नसल्याचेही महावितरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. याशिवाय निधीची अडचण असल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देता येत नसलयाचेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत लाइनस्टाफ कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करण्यात येणार असून, यासाठी नियमामध्ये बदल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.

या बैठकीत संचालक (वित्त) श्रीनिवासन, कार्यकारी संचालक चंद्रशेखर येरमे, कार्यकारी संचालक अंकुश नाळे, मुख्य महाव्यवस्थापक संदेश हाके, मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील, संजय ढोके, ललित गायकवाड यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष एन. के. मगर, कार्याध्यक्ष भाऊसाहेब भाकरे, सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन, कोषाध्यक्ष ताराचंद कोल्हे, उपसरचिटणीस आर. पी. थोरात यांची उपस्थिती होती.

\Bबैठकीत घेण्यात आलेले निर्णय\B

- १२००० यंत्रचालकांना प्रधान यंत्रचालक ते मुख्य यंत्रचालक पदोन्नतीचे पद निर्माण करण्यास नकार

- तांत्रिक कामगारांना गणवेशाचे डिझाइन महिन्यात तयार करणार

- उपकेंद्र व शाखा कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी लॉकरची सुविधा करून देणार

- शाखा व उपकेंद्रात पिण्याचे शुद्ध पाणी व स्वच्छतागृहाची सोय करणार

- लाइनस्टाफला वाढवून वाहन भत्ता देण्याबाबत सीईएमडी अनुकूल

- सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसास दह हजार रुपयांचा धनादेश मृताच्या कुटुंबीयांकडे देण्यात येईल

- दर दोन वर्षांच्या रेनसूट, गमबुट खरेदी केल्यानंतर, कर्मचाऱ्याने बिल स्कॅन करून एम्प्लॉई पोर्टलवर टाकल्यास बिलाची रक्कम त्वरित मिळणार

- कर्मचाऱ्यांच्या शिकाऊ उमेदवार पाल्यांना भविष्यात भरतीमध्ये १०० टक्के सामावून घेणार

- प्रादेशिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा ओटीचा प्रश्न मार्गी लावणार

- कर्मचाऱ्यांना गृहकर्ज अल्प व्याजदारावर मिळावे यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याचा झाला निर्णय

- बदली धोरण लवकरच ठरविणार

- शहरी भागात लाइनस्टाफला शिडी गाडी देण्यात येणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images