Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कुलगुरुंची ऑडिओ क्लिप मंत्रालयात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या ऑडिओ क्लिपमधील वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. विद्यार्थी संघटनांशी पक्षपातीपणा करण्याची चूक कुलगुरूंनी केली. विद्यार्थिनींच्या आंदोलनाची खिल्ली उडवल्याने कुलगुरूंची संवेदनशीलता समजली अशी टीका विद्यार्थ्यांनी केली. डॉ. चोपडे यांच्या वक्तव्याची तक्रार उच्च शिक्षण विभागात करण्यात आली आहे.

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या वक्तव्याची व्हायरल झालेली कथित ऑडिओ क्लिप शैक्षणिक वर्तुळात रोष निर्माण करणारी ठरली आहे. विद्यार्थी संघटनांच्या वादात एका संघटनेच्या बाजुने अनुकूल मत मांडत कुलगुरूंनी दुसऱ्या संघटनेला झालेल्या मारहाणीचे समर्थन केले. याबाबत 'कुलगुरूंचे दणके व्हायरल' हे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने गुरुवारी प्रसिद्ध केले. या वृत्ताची दिवसभर चर्चा सुरू होती. विद्यार्थ्यांना समान वागणूक देण्याऐवजी कुलगुरू पक्षपातीपणा करीत असल्याची टीका विद्यार्थी संघटनांनी केली. विद्यापीठ वर्तुळात शैक्षणिक धोरणावर चर्चा होण्याऐवजी राजकारण वाढल्याचे क्लिपच्या माध्यमातून उघड झाले. या राजकारणाला कुलगुरूंचे पाठबळ असल्याचा आरोप सुरू झाला आहे. दर्जेदार उच्च शिक्षणासाठी निकोप वातावरण निर्माण करणे कुलगुरूंची जबाबदारी असते. मात्र, स्वत:चा गट तयार करून वातावरण दूषित करण्यात कुलगुरू सक्रिय आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या गटबाजीत विद्यापीठाचे प्रचंड नुकसान झाले. विद्यापीठ विद्यार्थीकेंद्रीत असल्याचा धोशा कुलगुरू नेहमी लावतात, पण विद्यार्थ्यांच्या समस्या वाढलेल्या असूनही कुलगुरूंनी तातडीने उपाययोजना केल्या नाहीत. वसतिगृहांची बिकट अवस्था आहे. दर आठ दिवसांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही. उलट कुलगुरुंनी 'हौशा-गवशांचे' आंदोलन म्हणत हेटाळणी केली आहे. या क्लिपमुळे चोपडे यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. दरम्यान, शहरातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी उच्च शिक्षण विभागाकडे ऑडिओ क्लिपसह कुलगुरू चोपडे यांची तक्रार केली आहे. कुलगुरूंचे धोरण संधीसाधू लोकांसाठी असून विद्यार्थी वाऱ्यावर असल्याचा तक्रारीचा सूर आहे. या वक्तव्यावर चोपडे यांनी अजून खुलासा केलेला नाही.

\Bआर्थिक व्यवहार चव्हाट्यावर ?

\Bकॅरिऑन, विद्यापीठातील बांधकामे, साहित्य खरेदी आणि परीक्षा नियोजनात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. कुलगुरूंच्या ऑडिओ क्लिपमधील संवाद ऐकल्यानंतर कॅरिऑन प्रकार संशयास्पद असल्याची शक्यता बळावली आहे. मागील कॅरिऑनमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला का, हा मुद्दा उपस्थित झाला आहे. तसेच आर्थिक गैरव्यवहारातील दोषींची चौकशी करण्याची मागणी जोर धरीत आहे. काही दिवसांपूर्वी चोपडे यांच्या चौकशीचा अहवाल पाटील समितीने राज्य सरकारला सादर केला. या अहवालातील शिफारशीनुसार शासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऑडिओ क्लिपची सत्यता तपासून न्यायिक कक्षेत कारवाई व्हावी अशी मागणी आहे. याबाबत कुलगुरूंची भेट घेणार आहोत. कुलगुरू विद्यापीठाचे पालक असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. हिटलरशाही करू नये.

- अभिजित पाटील, प्रदेशमंत्री, अभाविप

स्वत:ला वाटेल त्या पद्धतीने कुलगुरू कारभार करीत आहेत. किमान त्याची जाहीर वाच्यता त्यांनी करू नये. यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचे नाव असलेल्या विद्यापीठाचे प्रतिमाहनन होते. कुलगुरू शिक्षण क्षेत्रात द्वेष निर्माण करीत आहेत.

- डॉ. मारोती तेगमपुरे, पदाधिकारी, 'बामुक्टो'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


न्या. पाटील यांना आज निरोप

$
0
0

न्या. पाटील यांना आज निरोप

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संगीतराव पाटील हे निवृत्त होत आहेत. औरंगाबाद खंडपीठ वकील संघातर्फे शुक्रवारी त्यांना निरोप दिला जाणार आहे. हा कार्यक्रम खंडपीठाच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणार आहे. न्या. पाटील यांचा सत्कार सपत्निक केला जाणार आहे. संघाचे अध्यक्ष अतुल कराड अध्यक्षस्थानी असतील आहेत. या कार्यक्रमास वकिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव कमलाकर सूर्यवंशी, उपाध्यक्ष राम शिंदे व मंजुषा जगताप यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुदृढ जीवनशैली कॅन्सरमुक्तीची गुरुकिल्ली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शरीराच्या कोणत्याही भागात कोणत्याही अवयवाचा कॅन्सर होऊ शकतो, तरीही सुदृढ जीवनशैलीद्वारे कॅन्सरला दूर ठेवणे शक्य आहे आणि कॅन्सर झाला असला तरी योग्य जीवनशैलीसह वेळीच केलेल्या योग्य औषधोपचारांनी कॅन्सरवर मात करणेही शक्य आहे. कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी योग्य आहार, विहार, व्यायाम, योगाभ्यास खूप उपयुक्त ठरतो आणि याबाबत व्यापक जनजागरण करण्याचा प्रयत्न स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र संघटनेच्या वतीने भरवण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनातून प्रभावीपणे होत आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या सहकार्याने आणि स्त्रीरोग संघटनेच्या वतीने अदालत रोडवरील तापडिया-कासलीवाल मैदानावर सुरू असलेल्या 'संस्कृती रास दांडिया'च्या माध्यमातून हे पोस्टर प्रदर्शन दांडियामध्ये सहभागी होण्यासाठी येत असलेल्या समस्त नागरिकांसाठी तसेच तरुणाईसाठी बहुमोल संदेश देणारे ठरत आहे. वेगवेगळ्या रंगांमध्ये तयार करण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (१० ऑक्टोबर) झाले. या ठिकाणी विविध स्त्रीरोगतज्ज्ञांनी विविध पोस्टरच्या माध्यमातून वेगवेगळ्या कर्करोगांबाबत सविस्तर व शास्त्रीय माहिती दिली आहे. यातील निळ्या रंगाच्या पोस्टरद्वारे संघटनेच्या अध्यक्षा व शासकीय कर्करुग्णालयाच्या विभागप्रमुख डॉ. वर्षा देशमुख यांनी 'कॅन्सर म्हणजे कॅन्सल नाही' असा महत्वाचा संदेश देत, कॅन्सर होऊच नये म्हणून वेगवेग‍ळ्या शास्त्रीय सूचनाही केल्या आहेत. मुळात स्वतःचे वजन आटोक्यात ठेवा, जेवणाच्या वेळा पाळा व पौष्टिक आहाराचे सेवन करा, नियमित योगाभ्यास, व्यायाम व प्राणायाम करा, डॉक्टरांकडून नियमित शारीरिक तपासण्या करुन घ्या, सणावारांसाठी कधीच मनासिक पाळी पुढे ढकलू नका, धुम्रपानासह कोणतेही व्यसन करू नका, शरीरात होणाऱ्या बदलांबाबत सजग राहा, विनाकारण थकवा येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मुख्य म्हणजे आपल्या शरीराचा आवाज ऐका, असाही मार्मिक संदेश डॉ. देशमुख यांनी दिला आहे. याच श्रृंखलेत शहरी महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात असलेल्या स्तनाच्या कर्करोगाच्या अनुषंगाने स्तनांची स्वपरीक्षा नेमकी कशी करायची, याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ व बदनापूर येथील मेडिकल कॉलेजच्या प्रा. डॉ. भाग्यश्री रांजवण यांनी महिला-तरुणींना अचूक व शास्त्रीय मार्गदर्शन केले आहे. मासिक पाळीनंतरच्या तीन ते चार दिवसांत ही स्वपरीक्षा करावी. मासिक पाळी नियमित नसेल किंवा अधून-मधून पाळी चुकत असेल तर ही परीक्षा दर महिन्याच्या एका ठराविक दिवशी करावी. वयाच्या २० वर्षानंतर प्रत्येक महिलेने आपल्या स्तनातील गाठ किंवा इतर कोणत्याही स्वरुपातील बदलांबाबत जागरुक राहिले पाहिजे, असेही डॉ. रांजवण यांनी पोस्टरच्या माध्यमातून नमूद केले आहे.

\Bअशी करा स्तनांची स्वरपरीक्षा

\Bमहिलांनी आंघोळीवेळी किंवा शॉवर घेताना दोन्ही स्तनावरून गोलाकार बोटे फिरवावी. गाठ, कडक भाग किंवा सूज असल्यासारखे वाटते का हे आवर्जून तपासावे. दोन्ही हात कंबरेवर ठेऊन आरशासमोर उभे राहून स्तनांकडे बघावे. शरीर वाकवून स्तनांचे निरीक्षण करावे. हात डोक्यावर ठेऊन कुठे खड्डा पडतो का, फुगवटा जाणवतो का आणि विशेषतः खालच्या बाजुने खड्डा-फुगवटा जाणवतो का, हे बघावे. दोन्ही स्तनांमध्ये सारख्या आकाराचे खड्डे एकाच वे‍ळेला पडणे सामान्य व हानीकारक नसल्याचे लक्षण आहे. तसेच डोक्यावरुन हात उचला आणि स्तनाग्रांचेही निरीक्षण करा आणि कोणतेही वेगळ‍े-विचित्र बदल जाणवले तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या, अशीही सूचना डॉ. रांजवण यांनी पोस्टरमधून केली आहे.

गरब्यासोबतच कर्करोगाबाबत प्रबोधन व्हावे आणि तरुणांनी कर्करोगाबाबत सजग होऊन कॅन्सरपासून दूर राहावे, हाच या प्रदर्शनामागचा उद्देश आहे. तरुणांनी या सूचनांचा आवर्जून विचार करावा.

\B- ऋषिकेश खैरे\B, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अक्षर मानव’च्या कार्याध्यक्षपदी शिरसीकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अक्षर मानव संघटनेच्या मराठवाडा कार्याध्यक्षपदी सुरेश शिरसीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्यिक राजन खान यांच्या प्रमुख उपस्थित अक्षर मानवच्या राज्यकार्यकारिणीची बैठक नुकतीच खुलताबाद येथे पार पडली. यात कार्यकारणीत फेरबदल करण्यात आले असून अध्यक्षपदी श्रीकांत डांगे (मुंबई), मराठवाडा कार्याध्यक्षपदी सुरेश शिरसीकर (औरंगाबाद), खान्देश आणि मध्यमहाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून शिरीष भोर (पुणे) यांची निवड झाली. संघटक जावेदा जिंदगी, कोकण विभागाचे कार्याध्यक्ष विजय जोगमार्गे, विदर्भ कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते. बैठकीत अक्षर मानवकडून घेण्यात येणाऱ्या महिला महोत्सव, पुस्तक जत्रा, नाटक, चित्रपट, साहित्य, आरोग्य, शिक्षण, विज्ञान, क्रीडा, कायदा, संविधान, पर्यावरण, शेती यांसारख्या संमेलनाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंधन दरवाढी विरोधात युवक काँग्रेसची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'बस हुई पेट्रोल डिझेल और महगाई का वार. अब की बार मोदी सरकार का अत्यंसंस्कार' अशा घोषणा देत शहर युवक काँग्रेंसच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल, डिझेल दरवाढीबरोबर वाढत्या महगाईचा निषेध केला.

बाबा पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने आंदोलन केले. या आंदोलनात युवक काँग्रेसचे जितेंद्र देहाडे, अॅड. सय्यद अक्रम यांच्यासह मुज्जफर खान, गौरव जैस्वाल, नदीम सौदागर, निलेश अंबरवाडीकर, मुजाहेद पटेल, सलमान पटेल, इम्रान पठाण, जावेद पठाण, मोहित जाधव यांच्यासह इरफान पठाण आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. महगाई विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय बाबा पेट्रोल पंपासह क्रांतीचौक पेट्रोल पंपावरही आंदोलन करण्यात आले. दरवाढीची माहिती देण्यासाठी पत्रकांचे वाटप यावेळी करण्यात आले.

काँग्रेसचा दावा

२०१३-१४ २०१८

पेट्रोल ७१.४१ ८८.१०

डिझेल ५५.४९ ७६.७२

गॅस ४६० प्रती सिलेंडर ८९० प्रती सिलेंडर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोके फोडले, दोषी ठरवून आरोपीस हमीपत्रावर सोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतातून जाण्या-येण्याच्या वादातून शिविगाळ करीत तसेच धमक्या देत कुऱ्हाडीच्या दांड्याने डोके फोडून गंभीर जखमी करणारा आरोपी रणजित उधलसिंग घुसिंगे याला कोर्टाने दोषी ठरवून दोन वर्षे कालावधीच्या हमीपत्रावर सोडले. तसेच मारहाणीत जखमी झालेल्या तक्रारदाराला आरोपीने दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यु. पी. देवर्षी यांनी दिले.

या प्रकरणी कांतीलाल शिवलाल घुसिंगे (४०, रा. बेंबळ्याची वाडी, ता. जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २३ जानेवारी २०१७ रोजी दुपारी चारच्या सुमारास शेतातून जाण्या-येण्याच्या वादातून आरोपी रणजित उधलसिंग घुसिंगे (२७, रा. बेंबळ्याची वाडी) व फिर्यादीमध्ये शाब्दिक वादावादी होऊन आरोपीने फिर्यादीला शिविगाळ करीत तसेच धमक्या देत कुऱ्हाडीच्या दांड्याने फिर्यादीचे डोके फोडले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध भादंवि ३२४, ५०४, ५०६ कलमान्वये चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजूंच्या युक्तिदानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला भादंवि ३२४ कलमान्वये दोषी ठरवून दोन वर्षे कालावधीच्या चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर सोडले. त्याचप्रमाणे नुकसान भरपाईपोटी आरोपीने फिर्यादीला दहा हजार रुपये देण्याचेही आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा भारनियमना विरोधात मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात सुरू करण्यात आलेल्या भारनियमनाचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. मिलकॉर्नर येथील महावितरण कार्यालयावर शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी आठ दिवसांत लोडशेडिंग बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने एका निवेदनात करण्यात आली आहे.

पेट्रोल, डिझेल दरवाढीनंतर आता शासनाने नवरात्र उत्सवाच्या काळात भारनियमन केले आहे. दररोज होणाऱ्या आठ तासांच्या भारनियमनामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. शासनाने हे भार नियमन बंद करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. महावितरण कार्यालयावर यासंदर्भात शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी महावितरणचे व्यवस्थापकीय महासंचालक ओमप्रकाश बकोरीया यांना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. आठ दिवसांत भारनियमन बंद झाले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दत्ता भांगे, कार्याध्यक्ष कय्युम शेख, मयूर सोनवणे, संदेश कांबळे, गजानन पाटील, के. के. पाटील, बबलू अंधारे, सागर जाधव, शेख सलीम, साहेल पठाण, शेरा खान, यांच्यासह इतरांची उपस्थीती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वादोन लाखांचा गंडा; आरोपीस पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ट्रक विक्री व्यवहारातील उर्वरित दोन लाख ३७ हजार रुपये मुदत उलटूनही न देणारा मध्यस्ती व आरोपी अमोल दगडू आडे याला सोमवारपर्यंत (१५ ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी शुक्रवारी (१२ ऑक्टोबर) दिले.

याप्रकरणी व्यापारी बिस्मिल्ला खान याकूब खान (६०, रा. सेंट्रल नाका रोड, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीने त्याचा ट्रक हा मच्छिंद्र देविदास आडे यांना चार लाख ८७ हजार ५०० रुपयांना विकला होता. हा व्यवहार सुरू असताना आरोपी अमोल दगडू आडे (२२, रा. राडीतांडा, ता. अंबाडोगाई, जि. बीड) व शेख मिलानी मुनिरोद्दिन हे मध्यस्थी होते. यात आरोपी अमोल याने फिर्यादीला दोन लाख ५० हजार रुपये दिले व बाकी रक्कम दोन लाख ३७ हजार ५०० रुपये हे १५ दिवसांत देण्याचे ठरले व याबाबत बाँडवर करार करण्यात आला होता, मात्र मुदत संपूनही आरोपीने फिर्यादीला पैसे दिले नाही म्हणून फिर्यादीने तक्रार दिल्यावरून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपीला अटक करून शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चेक क्लोन प्रकरणातील आरोपीकडे कोट्यवधीची माया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट कागदपत्राआधारे बँकेत खाते उघडून चेक क्लोन करून गंडा घालणाऱ्या टोळीतील एका प्रमुख आरोपीला गुन्हे शाखेने वसई (मुंबई) येथून अटक केली आहे. या आरोपीची मुंबईत प्रचंड मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. अजय उर्फ ओमप्रकाश अनिल श्रीवास्तव (वय ४२ मूळ रा. सारनाथ, उत्तर प्रदेश) असे या आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाने २७ जून रोजी बँकाना गंडा घालणाऱ्या टोळीला अटक केली होती. यावेळी पोलिसांनी संशयित आरोपी हरिश गोविंद गुंजाळ (रा. मानगाव, ता. कुडाळ, सिंधुदुर्ग) मनीषकुमार जयराम मौर्य उर्फ राकेश उर्फ मनिष यादव उर्फ अमित रमेश सिंग (रा. उत्तर प्रदेश), मंदीपसिंग बनारसीदास सिंग (रा. गुरुदासपूर, पंजाब), रशीद इम्तीयाज खान (रा. नालासोपारा, पालघर), डब्ल्यू शेख अरमान शेख (रा. कमलसागर, पश्चिम बंगाल) यांना अटक केली होती. या टोळीने शहरातील १९ बँकांमध्ये बनावट कागदपत्रांआधारे खाती उघडली होती. यांच्या ताब्यातून मुंबईहून बनावट चेकबूक, पॅनकार्ड, आधारकार्ड, पासबुक, विविध बँकांचे २७ एटीएम कार्ड, १५ मोबाइल आदी साहित्य जप्त केले होते. या टोळीतील चेक वटवणारा प्रमुख आरोपी अजय श्रीवास्तव पसार झाला होता. त्याला तीन महिन्यानंतर अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

\Bपत्नीच्या नावावर दोन दुकाने\B

आरोपी अजय श्रीवास्तव याने आपण केवळ नववी उत्तीर्ण असल्याची माहिती पोलिसांना दिली. मुंबई येथे वसई भागात एका महिन्यापूर्वी तो राहावयास आला होता. त्याच्या घराची किंमत अंदाजे दोन कोटी असल्याची माहिती सूत्रांनी दिली; तसेच त्याचे मुंबईला दोन बियर बार आहे. यापैकी एका बारमध्ये त्याची ३० लाखांची गुंतवणूक होती. या आरोपीवर सहारनपूर उत्तरप्रदेश येथे देखील गुन्हा दाखल आहे. सहारनपूर पोलिसांनी श्रीवास्तवच्या भागीदाराला विश्वासात घेऊन त्याची ३० लाखांची रुपये परत करायला लावली व ही रक्कम गुन्ह्यात त्यांनी सील केली असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली. तसेच त्याच्या पत्नीच्या नावावर दोन दुकाने आहेत. यापैकी एक केक शॉप असून, दुसरे दुकान लेडीज गारमेंटचे असल्याची माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’च्या कंपनीशी महापौर करणार चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी यापूर्वीच नियुक्त करण्यात आलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या प्रतिनिधींशी महापौर चर्चा करणार आहेत. चर्चेसाठी त्यांनी १९ ऑक्टोबरचा मुहूर्त निवडला आहे. या दिवशी कंपनीच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी पाचारण करण्यात आले आहे.

समांतर जलवाहिनीच्या कंपनीशी तुम्हीच चर्चा करा आणि योग्य तो निर्णय घ्या. जलवाहिनीच्या योजनेसाठी शासन पैसा कमी पडू देणार नाही. २८९ कोटींचा वाढीव खर्च राज्य शासन देण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले. औरंगाबादेत आढावा बैठकीनिमित्त ते असता त्यांनी महापालिकेचे पदाधिकारी व आयुक्तांची देखील बैठक घेतली. यावेळी 'समांतर' च्या कंपनीशी तुम्हीच चर्चा करा, असे त्यांनी सांगितले होते.

मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना हुरूप आला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर विश्वास टाकल्याची भावना पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी 'समांतर'च्या कंपनीला शुक्रवारी पत्र दिले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कंपनीने पालिका प्रशासनाला पत्र पाठवले आहे. त्या पत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार कंपनीने पाठवलेल्या पत्रावर चर्चा करण्यासाठी १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता महापौर दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला संबंधित अधिकाऱ्यांसह उपस्थित राहण्याचे महापौरांतर्फे कंपनीच्या प्रतिनिधींना कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्याला तीन ठिकाणी आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्याला आग लागण्याचे प्रकार शहरात वाढले असून शुक्रवारी दिवसभरात तीन ठिकाणी कचऱ्याला आग लागली. ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकांना धावपळ करावी लागली. आगीमुळे वित्त किंवा जीवित हानी झाली नसली, तरी दूषित वायुमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

महापालिकेने महात्ला गांधी जयंतीला नऊ झोन कार्यालयांसाठी नऊ नागरिक मित्र पथकांची स्थापना केली आहे. एका पथकात नऊ माजी सैनिकांची नियुक्ती केली आहे. शहरातील साफसफाईवर लक्ष ठेवणे, कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीकडे लक्ष पुरवणे, कचरा जाळण्याच्या प्रकारांना आळा घालणे, कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांत जनजागृती, प्लास्टिक बंदीची कारवाई करणे ही कामे पथकाला दिली आहेत. यापैकी काही माजी सैनिकांनी गुरुवारी महापौरांची भेट घेवून पालिकेचेच कर्मचारी कचरा जाळत असल्याची तक्रार केली. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे. यामुळे मित्र पथक आणि अधिकारी-कर्मचारी असा संघर्ष होतो निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शुक्रवारी पहिली घटना शहागंज भाजीमंडईत घडली. त्यानंतर पैठणगेट येथील पार्किंगच्या जागेजवळ कचऱ्याच्या ढीगाला आग लागली. दुपारी जिन्सी येथील जीनिंग मिलच्या जागेवर टाकलेला कचरा पेटला. ही आग विझवण्यासाठी नागरिकांनी फोन करून अग्निशमन विभागाच्या पथकाला बोलावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. अशोक वडजे यांचा पीएच.डी.

$
0
0

औरंगाबाद: औरंगाबाद येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक अशोक वडजे यांना विधी शाखेची पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी 'सायबर गुन्हेगारी' या विषयावर पुणे येथील सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता. या विद्यापीठाने त्यांना पीएच. डी. प्रदान केली. वडजे यांने विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश, प्रभारी कुलसचिव डॉ. एस.डी. माळी आदींनी प्रा. वडजे यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाअभावी खरीप धोक्यात

$
0
0

(पान सहा मेनलीड)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अपुरा पाऊस आणि पडलेला मोठा खंड याचा जबर फटका खरीप पिकांना बसला आहे. मराठवाड्यात सर्वत्र पिकांची हिच परिस्थितीत असून मूग, उडीद पिकाच्या उत्पन्नात ४० ते ६० टक्के घट झाली असून अन्य पिकांच्या उत्पादनाही मोठी घट होण्याची शक्यता कृषी खात्याने पीक परिस्थिती अहवालात नमूद केली आहे.

मराठवाड्यातील खरीपाचे सरासरी पेरणी क्षेत्र ५० लाख ४ हजार हेक्टर असून त्यापैकी यंदाच्या हंगामात ४८.६१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. अपुरा पाऊस त्याच बरोबर २४ जुलै ते १५ ऑगस्ट व २३ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०१८ अखेर ३१ व ३८ दिवसांचा पावसाचा पडलेला खंड याचा फटका पिकांना बसला आहे. पिकांच्या उत्पादनात घट होणार असून पाण्याअभावी अनेक ठिकाणी पिके जळू लागली आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात मका, मूग तसेच उडीद पिकांच्या उत्पादनात ५० ते ६० टक्के घट येत आहे. सोयाबीन पीक उत्पादनात ५० टक्के घट येणार आहे. कापूस पिकातही मोठी घटची शक्यता असून जिल्ह्यातील २३ हजार ५९९ हेक्टर क्षेत्र पावसाअभावी बाधित झाले आहे.

बीड जिल्ह्यात मूग, उडीद पिकाची काढणी अंतिम टप्प्यात असून पीक कापणी प्रयोगाच्या प्राप्त आकडेवारीनुसार मुगाची सरासरी उत्पादकता २४३ किलो तर उडीद पिकाची ३४० किलो प्रति हेक्टरी येत आहे. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात ५० टक्क्यापेक्षा जास्त घट येण्याची शक्यता आहे. तर बाजरीच्या कणसात सुमारे ७० टक्के दाणे भरलेले नाही. कापूस पिकातही ४० टक्के घट होण्याची शक्यता असून तूर पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता कृषी खात्याने व्यक्त केली. जालना जिल्ह्यातही खरीप पिकांची अशीच अवस्था असून दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेडाईच्या प्रॉपर्टी एक्स्पोला नागरिकांचा प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रेडाईतर्फे आयोजित ड्रीम होम २०१८ प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्वप्नातील घर साकारण्याकरिता सर्वोत्तम पर्यायांच्या शोधात असलेल्यांकरिता क्रेडाईने साकारलेले हे प्रॉपर्टी एक्स्पो ही एक पर्वणीच ठरत असून, दोन दिवसांतच तब्बल ७०हून अधिक घरांचे बुकिंग झाले.

क्रांतीचौकातील हॉटेल मॅनोरच्या लॉनवर गुरुवारपासून या गृह प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यात औरंगाबाद शहर आणि परिसरातील जवळपास ३०० प्रकल्पामधील हजारो घरे, फ्लॅट, रो हाउस, बंगले आदीची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

गृहप्रकल्पांच्या जोडीला गृह बांधणी, खरेदी या क्षेत्राला शासनाने दिलेल्या विशेष महत्त्वामुळे वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थामध्येही उत्साह निर्माण झाला आहे. याचेच प्रत्यंतर या प्रदर्शनात दिसून येत असून अनेक वित्तपुरवठा संस्थांनी प्रदर्शनामध्ये स्टॉल लावले आहेत. घर खरेदी, बांधणी याकरिता या प्रदर्शनामध्ये विविध योजना सदर केल्या आहेत. अतिशय आकर्षक पद्धतीने सजविलेल्या या दालनांमध्ये उपलब्ध घरांची सविस्तर माहिती देण्यात येत आहे.

घर खरेदी हा सर्व कुटुंबाचाच जिव्हाळ्याचा विषय असल्याने अनेकजण मुलाबाळांसह प्रदर्शनात प्रत्येक दालनाला भेट देऊन माहिती घेताना दिसत आहेत. मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड यांसह खान्देशातूनही नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रदर्शनाला भेट देत पाहणी केली

सर्वसमावेशक आणि ग्राहकांच्या सर्व गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने परिपूर्ण असे हे प्रदर्शन रविवारपर्यंत चालणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे. प्रदर्शन यशस्वितेकरिता क्रेडाईचे अध्यक्ष रवी वट्टमवार, सचिव आशुतोष नावंदर, आयोजन समिती प्रमुख संग्राम पटारे, नरेंद्रसिग जबिंदा, अंकित भारुका, विकास चौधरी, दीपक कुलकर्णी, गौरव मालपाणी, गोपेश यादव, जुगलकिशोर तापडिया, ललित राठी, नितीन बगडिया, निलेश अग्रवाल, पंजाब तौर आदीसह सर्व कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यातील दुष्काळावर आज काँग्रेसची चिंतन बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकार गंभीर नाही. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. पिण्याच्या पाण्याची उपलब्धतता, जनावरांसाठी चारा छावण्या, मजुरांना काम उपलब्ध होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती व शेतकरी आत्महत्यांबाबत चिंतन बैठक शनिवारी औरंगाबादेत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गारखेडा परिसरातील राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे शनिवारी सकाळी दहा वाजता ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील नेते उपस्थिती राहणार आहेत.

बैठकीत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच शेतकरी आत्महत्या, महावितरणकडून शेतकऱ्यांची वीजबिलांसदर्भात अडवणुकीचे धोरण तसेच डीपीची उपलब्धता, मराठवाड्यातील धरणात असलेला अपुरा जलसाठा यावर विचारमंथन होईल. मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करण्यासंदरंभीत चर्चा होईल. बैठकीत मराठवाड्यातील खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगर पालिकांचे अध्यक्ष, काँग्रेस पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे सत्तार यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेव पवार, कार्याध्यक्ष डॉ. कल्याण काळे आदी उपस्थित होते.

………….

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबाद लेणी रस्त्याची खंडपीठात सुनावणी पूर्ण

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

बीबी का मकबरा आणि औरंगाबाद लेणीसाठी जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था असल्याने पर्यटकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम करावे, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांच्या समोर सुनावणी पूर्ण झाली. या याचिकेवर निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

बीबी का मकबरा येथे देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असून, येथून औरंगाबाद लेणी अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर आहे. औरंगाबाद लेणी ही जगप्रसिद्ध असून, या ठिकाणी बौद्ध लेण्या आहेत, विदेशातून येणारे पर्यटक दोन्ही स्थळांना भेटी देण्यासाठी येत असतात. अैरंगाबाद लेणीच्या पायथ्याथी प्रत्येक धम्मचक्र अनुपरिर्वन दिनानिमित्त मोठा उत्सव भरतो. मकबरा ते औरंगाबाद लेणी रस्ता १९९२मध्ये विकास आराखड्यात मंजूर झाला, मात्र तब्बल बारा वर्षापासून रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही. त्यामुळे परेश बदनपुरे (रा. पहाडसिंगपुरा) यांनी २०१६ मध्ये खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. मकबरा ते औरंगाबाद लेणी हा २४ मीटर रस्ता अपेक्षित असताना, सध्या केवळ सहा मीटरचा असून, रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. रस्त्यात अनेक अनधिकृत बांधकामे आहेत.

नोहेंबर २०१४या महिन्यात बीबी का मकबरा येथे एक लाख नऊ हजार पर्यटकांनी भेट दिली, तर अवघ्या अडीच किलोमीटर असलेल्या औरंगाबाद लेणीला केवळ साडेसहा हजार पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे या रस्त्याचे काम करण्यात यावे, रस्त्यावर पथदिवे लावावेत, महापालिकेने येथील नागरिकांना टीडीआर द्यावा व अनधिकृत बांधकामे थांबवावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे. सुनावणीनंतर खंडपीठाने याचिका निकालासाठी राखून ठेवली आहे. याचिकाकर्त्यातर्फे रुपेश जैस्वाल, शासनातर्फे अमरजीतसिंह गिरासे व महापालिकेतर्फे आनंद भंडारी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इकडे सन्मान, तिकडे निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना मानद कर्नल रँक प्रदान करण्यात आली. मात्र, कथित ऑडिओ क्लिपचा वाद सुरू असल्यामुळे 'पिपींग सेरेमनी' सोहळ्यात पुरेसा उत्साह नव्हता. कार्यक्रमानंतर कर्नलच्या गणवेशात असलेल्या कुलगुरूंना ऑडिओ क्लिपचा खुलासा करण्याचे 'अभाविप'चे निवेदन स्वीकारावे लागले.

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना 'मानद कर्नल रँक' प्रदान करण्यात आले. महात्मा फुले सभागृहात शुक्रवारी हा कार्यक्रम झाला. या 'पिपींग सेरेमनी'त एनएनसीचे ग्रुप कमांडर ब्रिगेडीयर एस. एस. मोहिते यांनी रँक प्रदान केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडे, कर्नल एफ. बी. कार्लेकर, कर्नल धर्मेश यादव, ले. कर्नल अभिजीत बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. रँक स्वीकारताना अभिमान वाटत असल्याचे चोपडे यांनी भाषणात नमूद केले. मात्र, सध्या कुलगुरू चोपडे यांचे वादग्रस्त वक्तव्य असलेल्या ऑडिओ क्लिपने वातावरण तापले आहे. विद्यार्थी संघटना, व्यवस्थापन परिषद सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी यांनी कुलगुरूंचा निषेध केला. या चिघळलेल्या स्थितीचा कार्यक्रमावर परिणाम जाणवत होता. निरुत्साहात चोपडे यांनी मानद कर्नल रँक स्वीकारली. विशेष म्हणजे कर्नलच्या गणवेशात असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी चोपडे यांना निवेदन दिले. ऑडिओ क्लिप अत्यंत संतापजनक व निंदनीय आहे. 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांना गुंडाकडून झालेल्या मारहाणीचे समर्थन करणे, दणके दिल्याची हसून चर्चा करणे, गांधी सन्मान मोर्चाची खिल्ली उडवण्याचे प्रकार समोर आले. या ऑडिओ क्लिपची न्यायिक कक्षेत सत्यता तपासून लेखी उत्तर द्या अशी मागणी शिष्टमंडळाने केली. विशेष म्हणजे कुलगुरुंचा सन्मान सुरू असताना मुख्य प्रशासकीय इमारतीबाहेर निदर्शने सुरू झाली.

\Bदोन दिवसांत खुलासा करा\B

ऑडिओ क्लिपमधील संभाषणात असलेल्या शंकर व विजय या व्यक्ती कोण आहेत व त्यांचे तुमचे हितसंबंध स्पष्ट करा. संभाषण झाले त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. तसेच दोन दिवसात माध्यमांसमोर खुलासा करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शिवा देखणे, नितीन केदार, विवेक पवार, निखिल आठवले उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-वे बील नियमावलीचे उल्लंघन भोवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्यातील ई वे बील नियमांचे पालन न करणाऱ्या १५ माल वाहतूक करणाऱ्या वाहनां विरोधात राज्य कर विभागाने (एसजीएसटी) कारवाई करीत करासह एकाच दिवसात ६० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. कर व दंड न भरणाऱ्या तीन वाहने ताब्यात घेण्यात आली आहे. मराठवाड्यातील ही अशा प्रकारची पहिलीच मोठी कारवाई आहे.

देशभरात एक जुलै २०१७पासून वस्तू व सेवाकर कायदा लागू करण्यात आला. करप्रणाली नवीन असून, त्यात आवश्यकतेनुसार वेळोवेळी सुधारणाही केल्या जात आहेत. एक जून २०१८पासून सर्वत्र ई वे बिल प्रणाली लागू झाली आहे. 'जीएसटी'तील नव्या व्यवस्थेनुसार अर्थात, ई-वे बिलनुसार राज्यांतर्गत ५० हजार रुपयांहून अधिक, तर परराज्यात एक लाख रुपयांहून अधिक मूल्याच्या सामानाची ने-आण करण्यासाठी ई-वे बिल घ्यावे लागते.

मालाची वाहतूक करण्यापूर्वी संबंधितास त्याचे पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून (ई-वे बिल) सरकारला त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. माल वाहतूक करणाऱ्या वाहनाने ई वे बिलसोबत बाळगावे लागते. ई वे बिलावर दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष माल वाहतूक केली जात नसेल किंवा दिशाभूल केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद कायद्यात आहे.

दरम्यान, दसरा, दिवाळी सणांनिमित्त विविध वस्तूंना मागणी वाढली असून, परिणामी माल वाहतुकीचे प्रमाणही वाढले आहे. याच काळात करचुकवेगिरी होऊ शकते, हे लक्षात घेता 'एसजीएसटी' विभागाच्या उपायुक्त दीपा मुधोळ मुंडे यांनी प्रमुख टोल नाक्यावर वाहनांची तपासणीचे आदेश दिलेले आहे. त्यानुसार उपायुक्त (अन्वेषण) संतोष श्रीवास्तव, सहायक आयुक्त धनंजय देशमुख, तुषार गावंडे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथकाद्वारे माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केल्या जात आहे. औरंगाबाद - जालना महामार्गावरील लाडगाव येथील टोलनाका येथे गेल्या दोन दिवसात २००हून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली.

१५ वाहनचालकांकडील साहित्य हे करप्राप्त असतानाही त्यांच्याकडे ई वे बील नव्हते. तपासात ही बाब उघड होताच 'एसजीएसटी'च्या पथकाने कारवाई करत संबंधितांकडून करासह दंडापोटी मिळून एकूण ६० लाख रुपयांची वसुली केली. त्यात तीन वाहनधारकांनी कर व दंड अदा न केल्याने त्यांच्याकडून तीन नवीन वाहने ताब्यात घेण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसच निघाला मंगळसूत्र चोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा परिसरात धुमाकूळ घालणारा मंगळसूत्र चोर भारत बटालीयनचा जवान असल्याचे निष्पन्न झाले आहे. सातारा पोलिस व गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक केलेल्या या जवानाचे नाव योगेश सुरेश शिनगारे (वय ३३, रा. राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १४, सातारा परिसर), असे आहे. त्याने तीन मंगळसूत्र चोरीची कबुली दिली आहे. महिलेच्या सतर्कतेमुळे तो पोलिसांच्या हाती लागला.

सातारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून हेल्मेटधारी दुचाकीस्वाराने मंगळसूत्र चोरून धुमाकूळ घातला होता. निर्जन ठिकाणी महिलेला हेरून तो मंगळसूत्र तोडून घेत पळून जात होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो टिपला गेला होता. त्याने २४ ऑगस्ट रोजी एका महिलेचे ३७ हजार रुपयांचे मंगळसूत्र लंपास केले होते. नवरात्रोत्सवानिमित्त सातारा परिसरातील रेणुकामाता मंदिराजवळ सातारा पोलिस व गुन्हे शाखेचे कर्मचारी तैनात आहेत. मंगळसूत्र चोरीला गेलेली महिला मंदिरात दर्शनासाठी आली होती. याचवेळी मंगळसूत्र हिसकावणारा संशयित दोन वेळा दुचाकीवर तेथून गेला. महिलेने त्याला ओळखले व सातारा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक चेतन ओगले यांना मोबाइलवर ही माहिती दिली. ओगले व इतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून संशयित योगेशला विनाक्रमांकाच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणून पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी सखोल चौकशी केली असता झडतीमध्ये राज्य राखीव दलाचे ओळखपत्र सापडले. अधिक चौकशीत त्याने तीन मंगळसूत्र चोरीची कबुली दिली. हे मंगळसूत्र त्याने जवाहरनगर भागातील एका सराफाकडे विकले आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

\Bमटक्यामुळे चार लाखांचे कर्ज

\B

संशयित आरोपी योगेश शिनगारे हा मूळ तेल्हारा, जि. अकोला येथील रहिवासी असून २००७ मध्ये राज्य राखीव बलात दाखल झाला. त्याला पत्ते आणि मटका खेळण्याचा नाद आहे. शहागंज येथील एका मटकाचालकाकडे तो मटका लावतो. एकवेळी तो तो ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मटक्यात लावत होता. या नादात त्याला चार लाखांचे कर्ज झाले आहे. तसेच त्याने काही सहकाऱ्यांकडूनही व्याजाने रक्कम घेतली आहे.

\Bएकदा निसटला होता \B

मंगळसूत्र चोरीकडे कसा वळला याची चौकशी उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील व निरीक्षक चंद्रमोरे यांनी केली. यावेळी वर्तमानपत्रातील बातम्या वाचून गुन्हेगारीकडे वळल्याचा दावा त्याने केला. तो फक्त साप्ताहिक सुटीच्या दिवशी रविवारी मंगळसूत्र पळवत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वी योगेश शिनगारे याला संशयित म्हणून ओळखले होते. त्याला विनाक्रमांकाच्या दुचाकीवर जाताना हटकले होते. तेव्हा पोलिसाचे ओळखपत्र दाखवून दुचाकी मित्राकडून आणल्याचे सांगितले होते. शिवाय मित्रासोबत गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याचे बोलणे करून दिले होते. त्यावेळी त्याच्यावर विश्वास ठेऊन गुन्हे शाखेने त्याला सोडून दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्णपुऱ्यात दर्शनासाठी तोबा गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कर्णपुरा येथे भाविकांनी तोबा गर्दी केली. मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे वार मानले जातात. त्यामुळे पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्यासंख्येने कर्णपुरा येथे हजेरी लावली, ही गर्दी सायंकाळी अधिकच वाढली.

कर्णपुरा येथील तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. त्यामुळे प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवला जातो. यंदा नवरात्रोत्सवाची सुरुवात बुधवारी (१० ऑक्टोबर) सुरुवात झाली. त्यानंतरचा आजचा पहिलाच शुक्रवार असल्यामुळे पहाटेपासून भाविक कर्णपुरा येथे येत होते. सकाळी दहा वाजेपर्यंत गर्दी होती. त्यानंतर वाढत्या उन्हामुळे गर्दी ओसरली. सायंकाळी चार वाजेच्या नंतर पुन्हा गर्दी वाढू लागली. सात वाजेच्या नंतर गर्दीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. कर्णपुरा यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या बहुतेक सर्व पार्किंग फुल्ल झाल्या होत्या.

तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यावर घराकडे परतणारे भाविक यात्रेतील विविध खेळ-खेळण्यांचा आनंद लुटत होते. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, चोऱ्या होऊ नयेत यासाठी पोलिसांची कुमक विशेष लक्ष ठेवून होती. रात्री उशिरापर्यंत कर्णपुरा यात्रेतील गर्दी कायम होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images