Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

महापुरुषांविरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन पैठण तालुका सकल धनगर समाजातर्फे पैठण पोलिस ठाण्यात देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर समाजाचे दैवत मल्हारराव होळकर यांचा एकेरी उल्लेख केला; तसेच वाल्मिकी यांची तुलना मुंब्रा परिसरातील बांधकामाशी करून या महापुरुषांची बदनामी केल्याचा आरोप पैठण तालुका सकल धनगर समाजाने पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनात केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या असून, आव्हाड यांच्या विरोधात नियमानुसार योग्य कारवाई करण्याचीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर अण्णासाहेब कोल्हे, महादेव ठोक, मोहन जानकर, साईनाथ सोलाट, अप्पासाहेब सोलाट, दत्ता सोरमरे, अशोक सरगर, सुनील वीर, ज्ञानेश्वर तापकीर, बद्री सोरमारे, विष्णू तापकीर, जगदीश वीर, बंडू डोईफोडे, विकास नाचन, संदीप गाडे, ज्ञानेश्वर वीर अप्पासाहेब मेदड, योगेश पाचे, भगवान मैदड आदींनी सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भारनियमनाविरोधात युवक काँग्रेसचे निवेदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने फुलंब्री तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहेत. त्यातच महावितरणने अचानक भारनियमन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचा पार चुराडा होत आहे. त्यामुळे तात्काळ भारनियमन बंद करावे, अशी मागणी फुलंब्री तालुका युवक काँग्रेसने सहायक अभियंता महावितरण अरुण गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली.

फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी वळून जात आहे. थोडेफार उपलब्ध असलेले पाणी पिकांना घालण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करत आहे. त्यातच महावितरणने भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. याशिवाय सध्या धार्मिक कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांसह शालेय विद्यार्थी; तसेच तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारनियमन तात्काळ बंद करावे, अन्यथा माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, विधानसभा अध्यक्ष विठ्ठलराव कोरडे, जिल्हा महासचिव राहुल वाघ, दीपक पांडे, इद्रीस पटेल, हाफीज मन्सुरी, दीपक चव्हाण, सुभाष बोडखे, भागीनाथ बनकर, कैलास वाघ, बळीराम वाघ, सतीश गरसोळे, योगेश दानवे, सुरेश इधाटे, राहुल राऊत, सचिन बनकर यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आव्हाड यांच्या विरोधात वैजापुरात निवेदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मराठा साम्राज्याचे संस्थापक व अटकेपार झेंडा लावणारे थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचा ट्विटरवर आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा सकल धनगर समाजाने त्यांचा निषेध केला असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

'ठाण्यातील रेतीबंदर हा भाग पूर्वाश्रमीचा बदनाम भाग होता. या भागातील लोक आपली ओळख लपवत होते. या भागाचा कायापालट झाल्याने आता नवीन ओळख मिळालेली आहे. हा बदल म्हणजे वाल्याचा वाल्या कोळी व मल्ल्याचा मल्हार होळकर झाल्यासारखे आहे,' असे आव्हाड यांनी ट्विटर हँडलवर म्हटले आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी ही तुलना करून होळकरांचा अवमान केला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदनात म्हंटले आहे. याबाबत धनगर समाज क्रांती सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रमेश भालेराव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर हरिश्चंद्र शेळके, फुलचंद मालोदे, यशवंत पडवळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाईवर उपाय सुचवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात यंदा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्याचबरोबर पावसात ६० दिवसांहून अधिक खंड पडला. त्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके जळाल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. जलसाठे कोरडे झाल्यामुळे जनावरांना व माणसांना पिण्याचे पाणी गावात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आपल्या गटात उपाययोजना कराव्यात, असे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी ६१ जिल्हा परिषद सदस्यांना दिले आहे.

या पत्रात डोणगावकर यांनी सदस्यांना म्हटले आहे, की आपल्या गटातील गावामध्ये जिथे शेतकरी, शेतमजूर, ग्रामस्थ रोजगार मागतील त्यांची नोंदणी केलेली नसल्यास सर्वप्रथम ती करावी, जॉबकार्ड काढून घेऊन कामाची मागणी नमुना क्रमांक चारमध्ये संबंधित ग्रामपंचायतींकडे करण्याबाबत मजुरांना परावृत्त करून मागणी केलेल्या कामाबाबतची पोच पावती घेण्याबाबत मजुरांना सूचना द्याव्यात, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जलसंधाण व मृदसंधारणाची कामे हाती घ्यावीत, त्यात प्रामुख्याने विहिर फेरभरण, कंपार्ट बंडिंग, रिचार्ज शाफ्ट, पाटबंधारे प्रकल्पातील गाळ काढणे, मातीनाला बांध अशा प्रकारची कामे आहेत. ही कामे झाली तर पुढे पाणीपातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे. आपल्या गटातील ज्या नळ योजना नादुरुस्त असतील किंवा उदभव खोल करणे आवश्यक आहे अशी कामे तातडीने प्रस्तावित करावेत, तसेच संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे नियोजनाबाबतचा प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्याकडे तातडीने प्रस्तावित करण्यात यावेत, असे पत्रात म्हटले आहे.

\Bटंचाई आरखड्याचा तालुक्यांना विसर\B

यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता पंचायत समिती स्तरावरून टंचाई आराखडा तयार होणे अपेक्षित होते. मात्र प्रशासन परतीच्या पावसावर अवलंबून राहिले. त्यामुळे यंदाचा टंचाई आराखडा अद्याप तयार झालेला नाही. २२ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा टंचाई आराखडा जिल्हा प्रशासनाला सादर करावयाचा आहे. अद्याप गंगापूर आणि फुलंब्री तालुक्यांनी टंचाई आराखडा सादर केला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. अध्यक्षांच्या तालुक्यानेच टंचाई आराखड्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आता काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागले आहे.

दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील पाऊस

- जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ५३.३१ टक्के पाऊस पडल्याची नोंद

- खुलताबाद तालुक्यात यंदा केवळ ४०.३६ टक्के पाऊस

- जिल्ह्यातील ६५पैकी २४ मंडळांमध्ये २५ ते ५० टक्के पाऊस

- ३३ मंडळांमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस पडल्याची नोंद

- आठ मंडळांत ७५ ते १०० टक्क्यांदरम्यान पाऊस

- जिल्ह्यातील एकाही मंडळात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिटलाइनविषयी प्रतिज्ञापत्र सादर करा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने चिकलठाण येथे पिटलाइन उभारण्याचा प्रस्ताव कुठलेही संयुक्तिक कारण न देता रेल्वे मंत्रालयाने फेटाळला. हा प्रस्ताव रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करूनच सुपूर्द केला होता. या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून नांदेड विभागाने सुचविलेल्या चार जागांपैकी कुठलीही एक जागा पिटलाइनसाठी निवडावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका खंडपीठात दाखल करण्यात आली. रेल्वे मंत्रालयासह रेल्वे बोर्डास प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्या. प्रसन्ना वराळे व न्या. मनीष पितळे यांनी दिले आहेत.

पिटलाइनसाबंठी औरंगाबाद रेल्वेस्थानकासह चिकलठाणा, नगरसोल आणि करमाड स्थानकांचा प्रस्ताव नांदेड विभागाने रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला होता. विविध प्रवासी संघटना, एनजीओे, स्थानिक लोकप्रतिनिधी आदींच्या मागणीनुसार नांदेड विभागाने यासंबंधी पाहणी करून चार जागा निश्चित केल्या होत्या. तज्ज्ञ समितीने पाहणी करून आर्थिक वास्तव अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार चिकलठाणा येथे पिटलाइन प्रस्तावित करण्यात आली होती. रेल्वे मंत्रालयास सक्षम अधिकाऱ्यांनी २०१७मध्ये प्रस्ताव पाठविला होता.

\Bऔरंगाबादच्या प्रवाशांची गैरसोय\B

मुंबई आणि नवी दिल्लीसाठी प्रवाशांची संख्या लक्षात घेता नांदेड ते औरंगाबादपर्यंतच्या प्रवाशांना जागा मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे. नंदीग्राम, देवगिरी या रेल्वेंवर मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा भार असतो. सचखंड एक्स्प्रेसचे तिकीट कट ऑफ डेटला १५ मिनिटांत संपून जाते. नांदेडला जगभरातून भाविक येत असल्याने येथून दिल्लीसाठी जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. नांदेड-उना, नांदेड-श्रीगंगानगर, पूर्णा-पटना, नांदेड संत्रागच्छी आदी रेल्वेंचा विस्तारही औरंगाबादपर्यंत झाल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होईल. या रेल्वेंना २४ डब्यांची परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र १८ डब्यांवरच चालविण्यात येत असल्याचे जनहित याचिकेत अजित कडेठाणकर यांनी नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ पुनरुज्जीवनात मूळ करार कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनी कराराच्या पुनरुज्जीवनात कंपनीबरोबर केलेला मूळ करार कायम राहील, असे महापालिकेतर्फे शुक्रवारच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. कंपनीच्या प्रतिनिधींनी मात्र पुनरुज्जीवनात एस्सेएल ग्रुपला मुख्य भागीदार करा, असा हट्ट कायम ठेवला. याबाबत २६ ऑक्टोबर रोजी पुन्हा एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, आजच्या बैठकीकडे पालिकेतील भाजपच्या सदस्यांनी पाठ फिरवली.

'समांतर'च्या कराराचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय पालिकेच्या चार सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेतल्यानंतर कंपनीने पालिकेला आपले म्हणणे लेखी स्वरुपात सादर केले. यावर चर्चा करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी आपल्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सभागृहनेता विकास जैन, सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, विरोधीपक्षनेते जमीर कादरी, 'एमआयएम'चे गटनेते नासेर सिद्दिकी, शिवसेनेचे गटनेते मकरंद कुलकर्णी, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप उपस्थित होते. कंपनीतर्फे एस्सेएल इन्फ्राचे विजयश गुप्ता, स्मार्ट युटिलिटीजचे प्रकल्प संचालक जीवन सोनवणे बैठकीत सहभागी झाले.

'समांतर'च्या मूळ करारात कोणताही बदल होणार नाही, करारात ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्याचा स्वतंत्र सामंजस्य करार पालिका आणि कंपनीमध्ये केला जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. प्रकल्पासाठी काढावे लागणारे कर्ज, त्यासाठी तारण ठेवायच्या जागा, मूळ करारात एसपीएमएल (सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड) या कंपनीचा सहभाग आहे. या कंपनीला करारातून काढून त्याच्या जागी एस्सेएल ग्रुपला प्रमुख भागीदार करणे, राष्ट्रीयकृत बँकेचा आग्रह न धरणे या मुद्यांवर विचार करून निर्णय घेण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. या समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी, मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज, मुख्यलेखाधिकारी सुरेश केंद्रे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आणि विधी सल्लागार अपर्णा थेटे यांचा समावेश असेल. कंपनीच्या प्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करताना एस्सेएल ग्रुपला मुख्य भागीदार केल्याशिवाय बँकेचे कर्ज प्रकरण होणार नाही, त्यामुळे एस्सेएल ग्रुपला मुख्य भागीदार करण्याबाबत निर्णय घ्या असे बजावले. पालिकेकडे सुमारे पन्नास कोटी थकबाकी आहे. ही रक्कम मिळाल्याशिवाय काम सुरू करता येणार नाही. पेमेंट केल्याशिवाय जुने कंत्राटदार काम करणार नाहीत. जायकवाडीपासून जलवाहिनी टाकण्याच्या मार्गात काही ठिकाणी वन विभागाची जागा आहे, या जागेबद्दल वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र पालिकेनेच मिळवून द्यावे असा मुद्दाही कंपनीच्या प्रतिनिधींनी मांडला.

\Bजायकवाडी ते नक्षत्रवाडीसाठी स्वतंत्र प्रकल्प अहवाल

\Bजायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान पहिल्या टप्प्यात मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा स्वतंत्र सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार नाहीत या बद्दल शपथपत्र करा, अशा सूचना महापौरांनी दिल्या. समांतर जलवाहिनीचा प्रकल्प पीपीपीतत्वावरचा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पात आम्ही वीस टक्के गुंतवणूक करणार आहोत. उर्वरित ऐंशी टक्के गुंतवणूक सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांना करावी लागेल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेलातून मोबाइल चोरी; आरोपीला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हॉटेल मालक असल्याची बतावणी करत ग्राहकाचा मोबाइल घेऊन पसार होणारा मोबाइल चोरटा शेख सलमान शेख मकसूद याला पोलिसांनी अटक केली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता रविवारपर्यंत (२१ ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी शुक्रवारी (१९ ऑक्टोबर) दिले.

याप्रकरणी सिद्धांत मंगेश हिवराळे (१८, रा. जुना बायजीपुरा) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी हा त्याचे मित्र मयूर गायकवाड व जगदीश बनकर यांच्यासह रोशनगेट येथील एका हॉटेलात जेवण करण्यासाठी गेला होता. त्यावेळी २७ ते २८ वयोगटातील एक व्यक्ती फिर्यादीजवळ आली. त्याने हॉटेलचा मालक असल्याची बतावणी करत हॉटेलसाठी चिकनची ऑडर द्यायची असून, दोन मिनिटांसाठी तुमचा फोन द्या, असे म्हणत फिर्यादीकडून मोबाइल घेतला व पसार झाला.

या प्रकरणी मोबाईलची चोरी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हॉटेलातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी शेख सलमान शेख मकसुद (१९, रा. कैसर कॉलनी) याला गुरुवारी (१८ ऑक्टोबर) अटक करुन आरोपीला शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीकडून मोबाईल जप्‍त करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती विशेष सहायक सरकारी वकील जी. बी. कदम यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकुंदवाडीत घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लांबवला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुटुंब घरातील हॉलमध्ये झोपलेले असताना चोरट्याने हॉलचा दरवाजा लावून घरफोडी केली. हा प्रकार गुरुवारी पहाटे मुकुंदवाडी भागात घडला. या घटनेत चोरट्याने एक लाख ४४ हजारांचा ऐवज लांबवला असून, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी तान्हाजी जीवनराव सोमवंशी (वय ४५, रा. नालंदा शाळेजवळ, मुकुंदनगर, मुकुंदवाडी) यांनी तक्रार दाखल केली. सोमवंशी कुटुंबीय बुधवारी रात्री दांडिया पाहण्यासाठी घराजवळ गेले होते. रात्री एक वाजता परतल्यानंतर पत्नी, मुलगी आणि ते घरातील हॉलमध्ये झोपी गेले. पहाटे साडेपाच वाजता सोमवंशी यांना जाग आली. हॉलचा दरवाजा त्यांनी उघडण्याचा प्रयत्न केला असता तो बाहेरून लावल्याचे दिसून आले. सोमवंशी यांनी त्यांचे शेजारी नवनाथ शेरे यांना आवाज देऊन दरवाजा उघडायला लावला. हॉलच्या बाहेर आल्यानंतर सोमवंशी यांना समोरील बेडरुमचा दरवाजा उघडा दिसला. बेडरुममधील कपाटातील सामान अस्तावस्त करून चोरट्यानी रोख एक लाख रुपये व सोन्याचे दागिने असा एक लाख ४४ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. जिन्याच्या चॅनलगेटचे लॉक तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. सोमवंशी झोपलेल्या हॉलचा दरवाजा लावून त्यांनी हे कृत्य केले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक फौजदार शेख हारूण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सय्यद मतीन यांना प्रवेश नाकारला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिकेच्या सभागृहात प्रवेश नाकारला. एमआयएमच्या अन्य नगरसेवकांनीही मतीन यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांच्या मदतीला कुणीही धावून गेले नाही, शेवटी त्यांना घराची वाट धरावी लागली.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यावर पालिकेच्या सभागृहात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजली वाहण्यास सय्यद मतीन यांनी विरोध केला व अपशब्द वापरले. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी मतीन यांना चोप दिला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मतीन यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची शिफारस शासनाकडे करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले व मतीन यांना सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यास मज्जाव करण्यात येत आहे असे जाहीर केले. मतीन आले तर त्यांना सुरक्षारक्षकांनी सभागृहात येऊ देऊ नये असे आदेश त्यांनी दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर परिवर्तन आघाडीची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणी प्रश्नाच्या संदर्भात शहर परिवर्तन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी महापालिकेच्या मुख्यालयासमोर निदर्शने केली. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत आघाडीतर्फे प्रत्येक वॉर्डात उमेदवार उभे केले जातील, असे यावेळी जाहीर करण्यात आले.

समांतर जलवाहिनीचे खासगीकरण रद्द करा, अशी प्रमुख मागणी या आघाडीतर्फे करण्यात आली. पाण्याचा सध्या निर्माण झालेला प्रश्नही निदर्शनाच्या माध्यमातून आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उचलला. आता पाण्याचे असे हाल असतील, तर उन्हाळ्यात काय स्थिती असेल, नागरिकांचे हात होतील असा इशारा या आघाडीने दिला आहे. महापालिका प्रशासनाने ही समस्या जाणून घ्यावी व समांतर जलवाहिनीचा खासगीकरणाचा करार लवकरात लवकर रद्द करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून काम करून घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महापालिकेने शहरवासीयांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आघाडीतर्फे महापालिका निवडणुकीत शहरातील प्रत्येक वॉर्डात उमेदवार उभे केले जातील व जनतेला न्याय मिळवून दिला जाईल, असे आघाडीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. निदर्शनात राहुल इंगळे, भारत गायकवाड, विशाल लहोट, गौरव सुरडकात, संनू माधवन, सुचित सोनवणे, बबलू अंधारे, संतोष लाखे, मनोज भालेराव, आशिष मार्गे, मंगेश अलगडे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुस्ती स्पर्धेत गैरसोय; मल्लांचा चढला पारा

$
0
0

औरंगाबाद : कुस्ती स्पर्धेसाठी वेळेवर पोहोचलेल्या मल्लांना संयोजकांच्या गैरनियोजनाचा शनिवारी फटका सहन करावा लागला. त्यामुळे मल्लांचा पारा चांगलाच चढला.

पहाडसिंगपुरा येथे जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे विभागीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी पात्र ठरलेले खेळाडू सकाळी नऊ वाजता वजनासाठी पोहोचले. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात होणार होती. मात्र परभणी, हिंगोलीसह अन्य जिल्ह्यातून स्पर्धक आले नाहीत म्हणून स्पर्धेची वेळ पुढे ढकलण्यात आली. सायंकाळी पाचपर्यंत ही स्पर्धाच सुरूच झाली नाही. यानंतर मल्लांसह पालक आणि क्रीडा शिक्षकांचाही पारा चढला. त्यांनी संयोजकांना चांगलेच धारेवर धरले. त्यांनी हे सामने प्रकाश झोतात होणार आहेत. खेळाडूंच्या जेवणाची व राहण्याची सोय करण्यात आली असल्याचे सांगत समजूत काढली. स्पर्धेचे सर्व सामने रविवारी होणार असल्याची माहिती क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी दिली. मैदानावर पाण्याची सोय नसल्याचीही तक्रार अनेक स्पर्धकांनी केली. स्पर्धेसाठी तयार केलेली मॅट तपाल्याचीही तक्रार क्रीडा शिक्षकांनी केली. या सर्व तक्रारी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे नोंदविण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांसाठी ‘अग्निपथ’ आदर्श वस्तूपाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'के. टी. नानकर यांचे 'अग्निपथ' पुस्तक शिक्षकांसाठी आदर्श वस्तुपाठ आहे. विद्यार्थी, पालकांशी शिक्षकाचे वर्तन कसे असावे आणि शैक्षणिक कार्याची महती सांगण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला पुस्तक दिले पाहिजे' असे प्रतिपादन डॉ. श्रीरंग देशपांडे यांनी केले. ते पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

शिक्षणतज्ज्ञ के. टी. नानकर लिखित 'अग्निपथ' या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. गोविंदभाई श्रॉफ कला अकादमी सभागृहात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर स. भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बॅरिस्टर जे. एम. गांधी, साहित्यिक डॉ. प्रल्हाद लुलेकर, कवी डी. बी. जगत्पुरिया, के. टी. नानकर, जे. टी. नानकर, ज्ञानप्रकाश मोदाणी यांची उपस्थिती होती. शैक्षणिक क्षेत्रातील वाटचालीवर प्रकाश टाकलेल्या पुस्तकाचे मान्यवरांनी प्रकाशन केले. 'त्याग, जिद्द, समर्पण यांचा लेखाजोखा असलेले पुस्तक मार्गदर्शक आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार नानकर यांच्यासाठी खूप लहान आहे. अशा व्यक्तींचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान झाला पाहिजे. मात्र, पुरस्कार मिळत नाही तर घेतले जातात. नानकर यांचा स्वभाव घेण्याचा नाही' असे देशपांडे म्हणाले. डॉ. विश्वनाथ दाशरथे यांनी स्वागतगीत सादर केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारा छावण्या सुरू करा; बुलंद छावाची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस झालेला नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. पुढचे आठ महिने जाणार कसे, असा प्रश्न आहे. जनावरांना पाणी कुठून आणायचे ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. या परिस्थितीचा विचार करून सरकारने मराठवाड्यात लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी बुलंद छावा मराठा युवा संघटनेने केली आहे.

संघटनेच्या शिष्टमंडळाने महसूल उपजिल्हाधिकारी मृणाली सावंत निंबाळकर यांना निवेदन सादर केले. त्यात मराठवाड्यातील पाणी, दुष्काळी परिस्थितीबाबत परिस्थिती मांडली आहे. चारा छावण्या लवकर सुरू केल्या तर शेतकऱ्यांचे नुकसान टळेल. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी बुलंद छावाचे प्रदेश सचिव सुरेश वाकडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश वाकडे, प्रदेश उपाध्यक्ष सतीश वेताळ, मराठवाडा अध्यक्ष साहेबराव मुळे, ज्ञानेश्वर जाधव, मनोज गायके, योगेश देशमुख, गिरीश झाल्टे, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विधी’च्या विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना कॅरिऑनबाबत मध्यममार्ग काढत विद्यापीठ प्रशासनाने दिलासा दिला आहे. मागील वर्षी अनुत्तीर्ण झालेले प्रथम वर्षाचे विद्यार्थी आगामी अर्धवार्षिक सत्र परीक्षेत एटीकेटी मिळण्याइतक्या विषयात उत्तीर्ण झाल्यास द्वितीय वर्षातील प्रवेश निश्चित केला जाईल, असे लेखी आश्‍वासन विद्यापीठ प्रशासनाने दिले. या आश्वासनानंतर विधीच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी उपोषण सोडले.

कॅरिऑनच्या मागणीसाठी चार दिवसांपासून उपोषण करीत असलेल्या विधीच्या विद्यार्थ्यांशी प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी चर्चा केली. परीक्षा मुदतपूर्व घेतल्यामुळे प्रथम वर्षाचे ७० टक्के अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचा मराठवाडा लॉ कृती समितीचा दावा होता. विद्यापीठाने कॅरिऑनबाबत निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. कुलगुरूंनी तोडगा काढल्यामुळे उपोषण मागे घेतले. पुढील वर्षाचे वर्ग करण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच आगामी अर्धवार्षिक सत्र परीक्षेत एटीकेटी मिळण्याइतके विषय उत्तीर्ण केले, तर द्वितीय वर्षातील प्रवेश निश्चित केला जाणार आहे. याबाबतचा ठराव विद्या परिषदेत मंजूर करून घेऊ असे आश्‍वासन डॉ. तेजनकर यांनी दिले. 'मास'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उल्हास उढाण यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने यशस्वी शिष्टाई केली.

\Bआंदोलनकर्त्या विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली

\Bदरम्यान, औषधनिर्माणशास्त्राच्या विद्यार्थिनींनीच्या उपोषणावर रात्री साडेआठपर्यंत तोडगा निघू शकला नव्हता. प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॅरिऑन देण्याची मागणी आहे. दोन उपोषणार्थी विद्यार्थिनींची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना शनिवारी घाटीत दाखल करण्यात आले. 'एमआयएम'ने उपोषणाला पाठिंबा देत प्र-कुलगुरूंची भेट घेतली. विद्या परिषदेत ठराव करुन कॅरिऑन देण्यात येईल असे तेजनकर यांनी सांगितले. मात्र, अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकता वाढीसाठी इनक्यूबेशन सेंटर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात उद्योजकता वाढीस लावण्यासाठी विद्यापीठात नवीन इनक्युबेशन सेंटर कार्यान्वित होणार आहे. या माध्यमातून नावीन्यपूर्ण उद्योग संकल्पना असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. आगामी पाच वर्षात उद्योजक घडवणारे केंद्र म्हणून ते नावारूपास येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली. ते शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

कुलगुरू म्हणाले, विद्यापीठ स्तरावर सुरू होणाऱ्या इनक्युबेशन सेंटर प्रकल्पासाठी राज्य सरकार पाच कोटी रुपये आणि विद्यापीठ दोन कोटी रुपये निधी देणार आहे. पुढील टप्प्यात प्रत्येक कॉलेज आणि जिल्हा स्तरावर सेंटर सुरू होईल. महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीअंतर्गत राज्यभरात इनक्युबेशन सेंटरला प्रोत्साहन दिले जात आहे. 'बामू'त बजाज इनक्यूबेशन सेंटरनंतर नवे इनक्यूबेशन सेंटर कार्यान्वित होत आहे. ऑटोमोबाइल, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, बायोमेडिकल इमॅजिंग, नॅनो टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल्स आणि हर्बल मेडिसीन या क्षेत्रात काम करण्यात येणार आहे. उद्योगाबाबत नवीन संकल्पना असलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रात मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थ्यांच्या उद्योगाबाबतच्या संकल्पना गोपनीय ठेवल्या जाणार आहेत. या संकल्पना जाहीर करण्याचा किंवा प्रकाशित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. थेट उद्योग उभारणीसाठी उपयोग करता येईल, असे कुलगुरू म्हणाले. दरम्यान, इनक्यूबेशन सेंटरसाठी पूर्णवेळ संचालक निवडीची प्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांवर जबाबदारी न सोपवता उद्योग क्षेत्राचा अनुभव असलेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. दरमहा दोन लाख रुपये वेतन असलेल्या पदाची जाहिरात काढण्यात आली आहे. मात्र, पात्र संचालक मिळत नसल्यामुळे विद्यापीठ प्रशासन युद्ध पातळीवर शोध घेत आहे. या पत्रकार परिषदेला प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, सेंटरच्या समन्वयक डॉ. भारती गवळी, डॉ. भास्कर साठे उपस्थित होते.

\B'आविष्कार'चे नियोजन

\Bविद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संशोधनवृत्तीस प्रोत्साहन देण्यासाठी आविष्कार महोत्सव होणार आहे. पदवी, पदव्युत्तर, पोस्ट पदव्युत्तर विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील. या महोत्सवाचे जिल्हास्तरावर नियोजन सुरू आहे. या महोत्सवासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद येथे १० व ११ डिसेंबर तर विद्यापीठ परिसरात १५ डिसेंबरला महोत्सव होईल. मागील महोत्सवात पाच विद्यार्थ्यांना उत्तम कामगिरीसाठी फेलोशिप मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ख्रिश्चन समाजाला आरक्षण देण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ख्रिश्चन समाजातील तरुणांना नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावे. सुशिक्षीत बेरोजगारांच्या उद्योग विकासासाठी मदर तेरेसा यांच्या नावार स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करावी. यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी (२२ ऑक्टोबर) ख्रिश्चन समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती असोसिऐशन ऑफ इंटिग्रेटेड ख्रिश्चन कौन्सिलचे अध्यक्ष बाळासाहेब साळवे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

बजाजनगर येथील कामगार कल्याण भवन, मोहटा देवी चौकात हा मेळावा होणार आहे. त्यासाठी मराठवाड्यासह राज्यातील विविध भागातून ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष अनिल थॉमस उपस्थिती राहणार आहेत. ख्रिस्ती धर्म, धर्मगुरू, प्रार्थना सभा किंवा घरगुती प्रार्थना यांच्या रक्षणासाठी विशेष कायदा करावा. ख्रिश्चन समाजाच्या मालमत्तेच्या रक्षणासाठी विशेष मालमत्ता नियंत्रण बोर्ड स्थापन करावा. लोकप्रतिनिधीत्व द्यावे, अशा विविध मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. या मेळाव्यातून आगामी काळात विविध मागण्यांसाठी समाजबांधवांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी डॉ. संजीव इंगळे, रेव्ह. कपिल गवळी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्णकर्कश आवाजाच्या गाड्या जप्त

$
0
0

औरंगाबाद : रात्रीच्या वेळी कर्णकर्कश आवाज करत जोरजोरात वाहने चालविणाऱ्या चालकांना पोलिसांनी जबर झटका देत आठ दुचाकी आणि एक कार जप्त केली. बुलेट किंवा अन्य वाहनांमध्ये विशेष प्रकारचे सायलेन्सर लावून त्यांचा आवाज मोठा केला जातो. अनेकदा फटाके फोडल्याचा आवाज होतो. त्यामुळे रस्त्यावरील सामान्य गोंधळून जातात. अपघाताचीही शक्यता असते. त्यामुळे शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईत वाहतूक पोलिसांनी आठ मोटारसायकल जप्त केल्या. ही वाहने मध्यवर्ती बस स्थानक येथील वर्कशॉपमध्ये लावण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकारी उद्धटपणाची वागणूक देतात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अधिकारी उद्धटपणाची वागणूक देतात, पत्र दिल्यानंतरही आमच्या वॉर्डातील कामे होत नाहीत, अशा तक्रारी शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महिला नगरसेवकांनी केल्या.

शिवसेनेच्या शिल्पाराणी वाडकर यांनी महिला स्वच्छतागृहाचा विषय काढला. हा विषय वारंवार निघतो पण त्यानंतर काहीच होत नाही. स्वच्छतागृहांचे काम होत नसेल, तर तो स्थायी समिती व सर्वसाधारण सभेचा अवमान आहे. हा प्रश्न मार्गी निघणार नसेल तर सर्व महिला नगरसेवक सभागृहात ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला. शिवसेनेच्या सीमा खरात म्हणाल्या, महिला स्वच्छतागृहाचा विषय २०१५पासून सुरू आहे. तीन वर्षात स्वच्छतागृह बांधले जात नाहीत ही लाजीरवाणी बाब आहे. कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी म्हणाले, औरंगपुरा येथील स्वच्छतागृहाचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले आहे. ३० ऑक्टोबर रोजी त्याचे लोकार्पण करता येईल. संगीता वाघुले यांच्यासह काही नगरसेविकांनी आमची कामे होत नाहीत. पत्र दिल्यावर त्याची दखल घेतली जात नाही. अधिकारी उद्धटपणाची वागणूक देतात अशा तक्रारी केल्या.

\B'त्या' अधिकाऱ्यांचे निलंबन

\Bमहिला बालकल्याण समितीच्या सभापती अॅड. माधुरी अदवंत यांनी महिला स्वच्छतागृहाच्या संदर्भात व शाळांमध्ये बांधावयाच्या स्वच्छतागृहांच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारले. त्यानंतर अधिकाऱ्यांची कानउघाडणी करताना महापौर नंदकुमार घोडेले यांनी महिला स्वच्छतागृहाच्या कामाचा टाइमबाउंड प्रोग्रॅम देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. नगरसेविकांना सन्मानाची वागणूक द्या, त्यांनी दिलेल्या पत्राला प्रतिसाद द्या आणि कामे करा असे अधिकाऱ्यांना सांगितले. जे अधिकारी महिलांचा अनादर करतील, त्यांच्या पत्राला प्रतिसाद देणार नाहीत, अशा अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी सर्वपक्षीय ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील पाणी प्रश्नाचे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी तीव्र पडसाद उमटले. भारतीय जनता पक्ष, एमआयएम आणि काँग्रेसचे नगरसेवकांनी एकत्र येत सभागृहातच ठिय्या आंदोलन केले. यामुळे दहा सभा तहकुब करून महापौरांनी सभागृह सोडले. सभा पुन्हा सुरू झाल्यावर पाणी प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी एक नोव्हेंबररोजी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची घोषणा करण्यात आली.

पाणीप्रश्नाचा विषय सभागृहनेते विकास जैन यांनी काढला. ते म्हणाले, नगरसेवक आपल्या वॉर्डातील कामाचे अंदाजपत्रक मेहनत करून तयार करतो, पण त्यांची कामे मार्गी लागत नाहीत. पाणीपुरवठ्याच्या कामाच्या अनेक फाइल प्रलंबित आहेत. त्याच्यावर निर्णयच होत नाही. काही कामांच्या निविदा झाल्या आहेत, पण कंत्राटदार ठरले जात नाहीत. ज्योती नाडे यांनी त्यांच्या वॉर्डातील पाण्याचा प्रश्न मांडला. तेवढ्यात भाजप, एमआयएम आणि काँग्रसचे नगरसेवक महापौरांच्या आसनाच्या समोरील मोकळ्या जागेत जमा झाले व पाण्याचा प्रश्न आक्रमकपणे मांडू लागले. त्यातच त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. नगरसेवकांनी हे आंदोलन सुरू करतात महापौर सभागृह सोडून अँटीचेंबरमध्ये निघून गेले. त्यांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब केली. सभा पुन्हा सुरू झाल्यावर भाजपचे दिलीप थोरात म्हणाले, पाण्याबद्दल आमच्या भावना फार तीव्र आहेत. पाण्याचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. माजी महापौर भगवान घडमोडे म्हणाले, पाच - सहा दिवसांच्यानंतरही पाणी येत नाही. दूषित पाण्याचा प्रश्न कायमच आहे. हा प्रश्न सोडवला जात नाही. पाणी पुरवठ्याची कामे थांबली आहेत. बिल निघत नसल्यामुळे कंत्राटदार काम करीत नाहीत. भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी पाण्याच्या प्रश्नासह अन्य प्रश्नही गंभीर आहेत असा उल्लेख केला. नागरिकांकडून टँकरचे पैसे घेतले जातात, पण टँकर दिले जात नाही. सगळी कामे थांबली आहेत. प्रशासनावर नियंत्रण राहिलेले नाही. एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दिकी यांनीही पाण्याचा प्रश्न मांडला. विरोधीपक्ष नेते जमीर कादरी यांनी पाणी पुरवठ्याची कामे वॉर्डांमधून होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पाणीपुरवठ्याच्या सुमारे ६२ प्रलंबित फाइल येत्या २२ ऑक्टोबरपर्यंत मार्गी लागतील, अन्य कामेही गतीने केली जातील असे आश्वासन कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी दिले. यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाणी प्रश्नावर सखोल चर्चा करून निर्णय घेण्यासाठी एक नोव्हेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे जाहीर केले. या दिवशी आयुक्त डॉ. निपुण विनायक देखील उपस्थित असतील असा उल्लेख त्यांनी केला.

\Bनगरसेवकांचे कंत्राटदार प्रेम \B

महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी काय करता येईल याचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी दोन नोव्हेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची घोषणा महापौरांनी केली. माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी उत्पन्न वाढीबद्दल विशेष सभा घेण्याची मागणी केली होती. विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या व्यथा पाणी प्रश्नावर चर्चा करताना नगरसेवकांनी मांडल्या नाहीत. त्यांनी कंत्राटदारांचे थकलेले बिल, टँकरचे पेमेंट हाच विषय लावून धरला. थकित बिलाचा संबंध प्रशासन आणि कंत्राटदार यांचा असल्यामुळे नगरसेवकांनी या विषयात हात घालून पालितेच्या सभागृहाचे सुमारे दोन तास वाया घातल्याची चर्चा होती. टँकरच्या पेमेंटचा मुद्दा मांडणाऱ्या नगरसेवकांपैकी काहींचे टँकर लॉबीशी साटेलोटे असल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्वसाधारण सभेत मोठ्या आवाजात बोलल्यावर कामे होतात असे गणित आहे. त्याचाच आधार घेवून नगरसेवकांनी कंत्राटदारांची मोठ्या आवाजात वकिली केली. सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल ते बोलले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमाप खर्च करूही कचरा प्रश्न जैसे थे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अमाप पैसा खर्च करूनही कचरा प्रश्न आहे तसाच आहे. शासनाकडून मिळालेल्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग होत नाही, असा आरोप नगरसेवकांनी शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. शासनाकडून किती निधी मिळाला आणि कोणकोणत्या कामावर किती निधी खर्च झाला, याचा तपशील सादर करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.

माजी महापौर भगवान घडमोडे यांनी कचऱ्याचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी शासनाने ९१ कोटींचे अनुदान दिले. हा निधी महापालिकेला प्राप्त देखील झाला आहे. शासनाने दिलेल्या निधीतून कामे केली जात आहेत. आतापर्यंत कोणत्या कामावर किती निधी खर्च केला याची माहिती घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्याकडे मागितली. त्यांना या संदर्भात चार वेळा पत्र दिले, पण अद्याप उत्तर दिलेले नाही. घनकचरा व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्र सामुग्री खरेदी केली जात आहे. आउट सोर्सिंगच्या माध्यमातून कर्मचारी नियुक्त केले जात आहेत. खासगी वाहने कचरा वाहतुकीसाठी लावण्यात येत आहेत. या सर्व प्रकारच्या उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात आहे. मात्र, शहरातील कचऱ्याची समस्या आहे तशीच आहे. त्यामुळे शासनाचा निधी योग्य प्रकारे खर्च झाला की नाही, याबद्दल शंका निर्माण होते. घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

\Bसविस्तर अहवाल देण्याचे आदेश

\Bनगरसेवक राजू शिंदे यांनी या संदर्भात विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी केली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी भोंबे यांना आदेश देताना शासनाकडून मिळालेला निधी, आतापर्यंत खर्च करण्यात आलेला निधी, त्यातून झालेली कामे या बद्दलचा सविस्तर अहवाल नगरसेवकांना सादर करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>