Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

छायाचित्रकार डुमणे यांना अमेरिकेचा पुरस्कार

$
0
0

औरंगाबाद : येथील शिवाजीनगर भागातील छायाचित्रकार राजेंद्र डुमणे यांना फोटोग्राफी सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेकडून फोटोग्राफीबद्दल सुवर्णपदक देवून गौरविण्यात आले आहे. त्यांनी जायकवाडी येथील नाथसागरात काढलेल्या फोटोसाठी हा पुरस्कार देण्यात आला. डुमणे पंधरा वर्षापासून शिवाजीनगर येथे पुस्तके आणि स्टेशनरीचा व्यवसाय करतात. हा व्यवसाय करताना त्यांनी वन्यजीव छायाचित्रणास सुरुवात केली व ही आवड जोपासली. त्यांनी काढलेल्या छायाचित्रांची राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीयस्तरावर दखल घेतली जाऊ लागली आहे. त्यांनी 'लास्ट बाथ' या नावाने काढलेल्या छायाचित्राला सुवर्णपदक मिळाले. या स्पर्धेत चाळीस स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात निसर्गचित्र प्रकारात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल - अक्सा ट्रॅव्हल्सच्या संचालकाची शिक्षा कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

हज यात्रेस घेऊन जाणाऱ्या अल अक्सा टूर्स अ‍ॅण्ड ट्रव्हल्सचा संचालक एम. ए. वसीम यांनी यात्रेकरूची फसवणूक केल्यामुळे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी धनादेश अनादर केल्यामुळे एक वर्ष सक्तमजूरी आणि दोन लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला संचालकाने जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांनी शिक्षा कायम ठेवण्याचे आदेश दिले.

सिटीचौक येथील अल-अक्सा ट्रॅव्हल्स एजन्सीचे मालक एम. ए. वासिम याने हज यात्रेसाठी यात्रेकरूंना घेऊन जाण्यासाठी विविध वर्तमानपत्रांत जाहिरात दिल्या होत्या. या जाहिरातीवरून रोशनगेट परिसरातील शरीफ कॉलनीत राहणाऱ्या फेरोज खान बिस्मिला खान यांनी संपर्क साधला. तीस दिवसांच्या हज यात्रेसाठी फेरोज खान यांनी ट्रॅव्हल्स एजन्सीला दोन लाख १४ हजार रुपये दिले. या यात्रेचा कालावधी १८ जून २०१५ ते १८ जुलै २०१५ असा ठरविण्यात आला. मात्र, यात्रेला जाण्याची वेळ आली तरी एजन्सी आणि वासिम यांनी कुठल्याच प्रकारचा संपर्क यात्रेकरूशी साधला नाही. यात्रेकरू फेरोज खान यांनी वासिम यांची भेट घेतली व त्यांना विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे फेरोज यांनी आपण दिलेली रक्कम परत द्यावी, यासाठी तगादा लावला. वासिम यांनी रकमेच्या परताव्यासाठी फेरोज यांना बॉम्बे मर्केन्टाईल बँकेचा दोन लाख १४ हजार रुपयांचा धनादेश दोन जुलै २०१५ रोजी दिला. धनादेश वटविण्यासाठी फेरोजखान यांनी टाकला असता खात्यात रक्कम नसल्याने धनादेश परत आला. फेरोज खान यांनी न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्यावर सुनावणी झाली असता न्यायालयाने आदेश दिले. या आदेशा विरोधात ट्रर्स अण्ड ट्रॅव्हल्सचा संचालक एम. ए. वसीम यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली शिक्षा कायम करत वसीम याचे अपील फेटाळून लावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्धव यांच्या उपस्थितीत मंगळवारी मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात शिवसेना बांधणी करत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी २३ ऑक्टोबर रोजी औरंगबादेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना गटप्रमुख व लोकप्रतिनिधींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समिती सभापती रेणुकादास वैद्य, सभागृह नेता विकास जैन, नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांची यावेळी उपस्थिती होती. खैरे म्हणाले, 'आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा रविवारी शिर्डी दौरा आहे. मंगळवारी मराठवाड्यापासून गटप्रमुख व लोकप्रतिनिधींच्या मेळाव्यांची सुरुवात होईल. मंगळवारी सकाळी लातूर, दुपारी बीड तर सायंकाळी साडेचार वाजता श्रीहरी पॅव्हेलियन येथे औरंगाबादचा मेळावा होईल. मेळाव्यात गटप्रमुखांना मार्गदर्शन केले जाणार आहे. मेळाव्यास पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, सचिव मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महिला संपर्क प्रमुख आमदार मनीषा कायंदे आदींसह जिल्ह्यातील नेत्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.'

'मेळाव्यास शिवसेना, युवा सेना, उपशाखा प्रमुख व संघटक, अधिकारी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. देशपातळीवर अनेक प्रश्न भेडसावत आहेत. शिवसेनेची एकहाती सत्ता आल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकहाती सत्तेचा विडा उचलला आहे. अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी शिवसेनेने भूमिका जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत देशभरातून शिवसैनिक व हिंदू बांधव मोठ्या संख्येने जाणार आहेत. मंगळवारी होणारा दौरा संघटनात्मक असून पुढच्या टप्प्यात दुष्काळी दौरे काढण्यात येणार आहेत,' असेही खासदार खैरे यांनी स्पष्ट केले.

मी महत्व देत नाही

आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी नवीन पक्ष स्थापन केला. ते तुमच्यावर टीका करतात, याबाबत काय असे विचारले असता खैरे म्हणाले, की मी त्याकडे लक्ष देत नाही. किंबहुना महत्व देत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमाप खर्च करूनही कचरा प्रश्न जैसे थे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अमाप पैसा खर्च करूनही कचरा प्रश्न आहे तसाच आहे. शासनाकडून मिळालेल्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग होत नाही, असा आरोप नगरसेवकांनी शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. शासनाकडून किती निधी मिळाला आणि कोणकोणत्या कामावर किती निधी खर्च झाला, याचा तपशील सादर करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.

माजी महापौर भगवान घडमोडे यांनी कचऱ्याचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी शासनाने ९१ कोटींचे अनुदान दिले. हा निधी महापालिकेला प्राप्त देखील झाला आहे. शासनाने दिलेल्या निधीतून कामे केली जात आहेत. आतापर्यंत कोणत्या कामावर किती निधी खर्च केला याची माहिती घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्याकडे मागितली. त्यांना या संदर्भात चार वेळा पत्र दिले, पण अद्याप उत्तर दिलेले नाही. घनकचरा व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्र सामुग्री खरेदी केली जात आहे. आउट सोर्सिंगच्या माध्यमातून कर्मचारी नियुक्त केले जात आहेत. खासगी वाहने कचरा वाहतुकीसाठी लावण्यात येत आहेत. या सर्व प्रकारच्या उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात आहे. मात्र, शहरातील कचऱ्याची समस्या आहे तशीच आहे. त्यामुळे शासनाचा निधी योग्य प्रकारे खर्च झाला की नाही, याबद्दल शंका निर्माण होते. घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

\Bसविस्तर अहवाल देण्याचे आदेश

\Bनगरसेवक राजू शिंदे यांनी या संदर्भात विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी केली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी भोंबे यांना आदेश देताना शासनाकडून मिळालेला निधी, आतापर्यंत खर्च करण्यात आलेला निधी, त्यातून झालेली कामे या बद्दलचा सविस्तर अहवाल नगरसेवकांना सादर करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभीमानी शेतकरी संघटनेची कन्नड येथे निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

कन्नड तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी शहरातील पिशोर नाका परिसरात निदर्शने करण्यात आली. यावेळी नायब तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राज्यभर चक्काजाम आंदोलनाच्या अनुषंगाने कन्नड तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, मग्रारोहयोची कामे सुरू करावी, बेरोजगारांना रोजगार द्यावा, शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचा निधी द्यावा, स्वामीनाथन आयोग लागू करावा, युवकांना मुद्रालोन उपलब्ध करून द्यावे आदी मागण्यांचे निवेदन तालुकाध्यक्ष प्रकाश बोरसे यांनी नायब तहसीलदार हारून शेख यांना दिले. यावेळी संघटनेचे तालुक्यातील कार्यकर्त्यासह कन्नड शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अस्मान शिंदे, कैलास करवंदे, राजेंद्र मुळे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नड येथे आज भित्तीपत्रक स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

कन्नड नगर पालिकेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छता दूत होण्याची प्रेरणा देण्याकरिता 'स्वच्छ व सुंदर भारत' या विषयावर तालुकास्तरीय भित्तीपत्रक स्पर्धेचे सोमवारी सकाळी ११ वाजता जुने तहसील कार्यालय परिसरात आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा इयत्ता पहिली ते आठवी व इयत्ता नववी- दहावी या दोन गटात होणार आहे. दोन्ही गटात प्रथम बक्षीस पाच हजार रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह, द्वितीय दोन हजार रुपये प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह, तृतीय दीड हजार रुपये प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ दोन गटात पाच प्रत्येकी २५० रुपये प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी शाळास्तरावर निवडलेला संघ पाठवण्याचे आवाहन

नगराध्यक्ष स्वाती कोल्हे, गटनेता संतोष कोल्हे, मुख्याधिकारी नंदा गायकवाड, गटशिक्षणाधिकारी हुमेरा सिद्दिकी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज कन्नडमध्ये मोर्चा

$
0
0

कन्नड : शासनाने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय त्वरित घ्यावे या व इतर मागण्यांसाठी पिशोरनाका ते तहसील कार्यालयावर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी आमदार किशोर पाटील हे करणार आहेत. तालुकाध्यक्ष बबनराव बनसोड, शहराध्यक्ष अहेमद अली, विधानसभा विभाग अध्यक्ष प्रसन्ना पाटील, शेख चाँद, महिला आघाडीच्या सुनीता मातेरे, सुदाम राठोड यांची उपस्थिती राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेडकरी क्रांतीला प्रतिक्रांतीचा धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या दलदलीतून शोषित, वंचितांना बाहेर काढले. त्यांना आत्मसन्मान, मानवतेचा बौद्ध धम्म दिला. अडीच हजार वर्षांचा अंध:कार दूर करण्याचे कार्य केले. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला धम्म व संविधान अजून वंचितांपर्यंत पोहचले नाही, त्यामुळे प्रतिक्रांतीचा धोका निर्माण झाला आहे,' असे प्रतिपादन कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे यांनी केले.

कन्नड येथील त्रिशरण बुद्धविहारात आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. त्रिशरण बुद्धविहार समिती भीमनगर, म्हाडा कॉलनी मित्रमंडळ, रेलकणकावती मित्रमंडळ, भीम आर्मी मित्रमंडळ, रजिस्टार जी. बी. सातदिवे, विलास सातदिवे यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हे आयोजन करण्यात आले.

'देशाला राष्ट्रात रुपांतरित करण्यासाठी बाबासाहेबांनी 'संविधान' आणि 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हे दोन महान ग्रंथ दिले. हे दोन्ही ग्रंथ राष्ट्राला व राष्ट्रातील माणसांना एकत्र बांधून ठेवणारे आहेत. मात्र, डॉ. बाबासाहेबांनी शोषितांना दिलेले संरक्षण, आरक्षण, शिक्षण, संविधान मोडित काढण्यासाठी काही शक्ती सज्ज झाल्या आहेत. हे शत्रू ओळखण्याच्या कार्यशाळा, अभ्यासवर्ग बुद्धविहारातून घेण्याची गरज आहे. केवळ पाठांतर, कर्मकांड करून प्रतिक्रांतीचे आव्हान पेलता येणार नाही,' असा इशारा त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे येथील रजिस्टार जी. बी. सातदिवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक संतोष पाटील, पोलिस उपनिरीक्षक सतीश दिंडे, आरमान शिंदे, बालाजी वैद्य, सुनील पवार, अनंत पगारे, रवींद्र तायडे, अंकुश सरोदे, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, नगरसेवक युवराज बनकर, रत्नाकर पंडित, आकाश बोलधने, गोकुळ राठोड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब सिरसाट यांनी केले. व्याख्यानानंतर बुद्धभूषण गायन पार्टी, वैजापूरचे दीपक त्रिभूवन व ज्ञानेश्वर त्रिभूवन यांनी आंबेडकरी गीते सादर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळमुक्त माहेरासाठी सासूरवाशिणीची धडपड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

दुष्काळातून माहेर मुक्त व्हावे यासाठी दीपाली इखे यांनी पाणी फाउंडेशनचे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ यांची भेट घेऊन दुष्काळ निवारणाची प्रेरणा घेतली. 'माझे माहेर दुष्काळमुक्त करणार,' अशी शपथ त्यांनी ग्रामस्थांसोबत घेतली. अजिंठा येथील दीपाली संजय इखे या पुण्यात व्यावसायिक आहेत.

व्यवसाय सांभाळत समाजासाठी काही देणे लागतो या हेतूने त्यांनी सत्यजित भटकळ यांची नुकतीच भेट घेतली. माहेर असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा गावाची निवड करून अजिंठ्यासह पुढील काही महिन्यात सिल्लोड तालुक्यातील १३१ गावात त्या जनजागृती करणार आहेत. याची सुरुवात अजिंठा येथे 'दुष्काळाशी दोन हात', 'पाणलोट नियोजन' हे लघुपट दाखवून केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी इखे यांनी मार्गदर्शन केले. त्यांना पती संजय इखे, वडील माधवराव साठे, विजय पगारे यांनी मदत केली.

\Bस्वयंस्वेवकांचे प्रशिक्षण \B

या मोहिमेअंतर्गत दीपाली इखे या पाणी अडवा पाणी जिरवा, वृक्षारोपणावर जनजागृती करणार आहेत. प्रत्येक गावातील पाच जणांची निवड करून त्यांना पाणी फाउंडेशनच्या शिबिरात प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे वॉटर कप स्पर्धेत गावांना सहभागी होता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य पातळीवर संशोधनाचा ‘आविष्कार’ घडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यस्तरीय 'आविष्कार' महोत्सवात तिसऱ्या स्थानावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यावर्षी 'आविष्कार'चे सूत्रबद्ध नियोजन केले आहे. विज्ञान-तंत्रज्ञान संशोधनाला चालना देण्यासाठी संशोधनवृत्तीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. या माध्यमातून राज्य पातळीवर चमकदार कामगिरीसाठी जिल्हा समन्वयक प्रयत्नशील आहेत.

विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी 'आविष्कार महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 'आविष्कार'ची तयारी सुरू केली आहे. विद्यापीठाअंतर्गत औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नोंदणी सुरू आहे. येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठ संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. जिल्हास्तरीय 'आविष्कार' महोत्सव १० आणि ११ डिसेंबरला होणार आहे. तर विद्यापीठ परिसरात १५ डिसेंबरला होणार आहे. जिल्हास्तरीय 'आविष्कार' देवगिरी महाविद्यालय (औरंगाबाद), बलभीम महाविद्यालय (बीड), विद्यापीठ उपपरिसर (उस्मानाबाद) व जे. ए. कॉलेज (जालना) येथे होईल. गेल्या वर्षी राज्यस्तरीय 'आविष्कार'मध्ये विद्यापीठाच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी केली. या संघामधील पाच विद्यार्थ्यांना राज्य शासनाची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. मागील वर्षी राज्य पातळीवर विद्यापीठाने तिसरा क्रमांक मिळवला होता. तब्बल एक हजार विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभाग घेतला होता. यावर्षी विद्यार्थी संख्या वाढवून चांगली कामगिरी करण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे प्रयत्न आहेत. जिल्हास्तरीय 'आविष्कार'साठी जिल्हा समन्वयक नेमले आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचे समन्वयक डॉ. विष्णू पाटील, डॉ. प्रशांत अंबड आहेत. जालना जिल्ह्यासाठी डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. तुषार धोंडगे, बीड जिल्ह्यासाठी डॉ. प्रमोद रोकडे, डॉ. सतीश जाधव आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी डॉ. प्रशांत दीक्षित, डॉ. राम कदम व डॉ. किशन हावळ यांची निवड करण्यात आली. विद्यापीठ परिसरासाठी डॉ. भगवान साखळे आणि डॉ. मदनलाल सूर्यवंशी नियोजन करीत आहेत. विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग वाढवण्यासाठी समन्वयक विशेष मोहीम राबवणार आहेत. एक हजार प्रकल्पातील ४८ प्रकल्प अंतिम फेरीत पोहचले होते. सामाजिकशास्त्र विषयाचे विद्यार्थीसुद्धा प्रकल्प सादरीकरण करीत आहेत. या कामासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टिस) संस्थेने सहाय्य केले.

दरम्यान, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासाने 'आविष्कार'ची तयारी केली आहे. या महोत्सवाच्या समन्वयक डॉ. भारती गवळी असून डॉ. भास्कर साठे व डॉ. प्रवीण येन्नावार सहसमन्वयक आहेत.

-----गोंडवाणा विद्यापीठात महोत्सव

जिल्हा आणि विद्यापीठ स्तरावरील 'आविष्कार' महोत्सवानंतर राज्यस्तरीय महोत्सव गोंडवाणा विद्यापीठ (गडचिरोली) येथे होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी राहुरी येथील कृषी विद्यापीठात महोत्सव झाला होता. विद्यापीठ स्तरावरील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय महोत्सवाचे दहा दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना गटचर्चेद्वारे प्रकल्पाची मांडणी करण्याचे कौशल्य शिकवण्यात येईल असे 'आविष्कार'चे सहसमन्वयक डॉ. भास्कर साठे यांनी सांगितले.

----कोट

मागील वर्षी एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. राज्यस्तरीय महोत्सवात ४८ प्रकल्प सादर करुन विद्यापीठ तिसऱ्या स्थानी होते. यावर्षी पहिला क्रमांक मिळ‌वण्याचे उद्दिष्ट आहे.

डॉ. भास्कर साठे, सहसमन्वयक, 'आविष्कार' महोत्सव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफांचा ‘उडान’ मेळावा उद्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा सराफ-सुवर्णकार मंडळाने मराठवाडा स्तरावर सोने व्यावसायिकांचा 'उडान' मेळावा आयोजित केला आहे. या व्यवसायातील नवीन बदल आणि नियमांबाबत जागरुकता वाढवणे मेळाव्याचा उद्देश आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष अशोक वारेगावकर यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

काही महिन्यांनी लागू होत असलेल्या केंद्र सरकारच्या 'हॉलमार्क' नियमाविषयी माहिती देणे, बॉम्बे स्टॉक मार्केटच्या सोने-चांदीच्या भावाची माहिती देणे आणि नवीन तंत्रज्ञान व कायद्याबाबत जागरुकता वाढवण्यासाठी सुवर्णकारांचा 'उडान' मेळावा होणार आहे. एमआयटी कॉलेज परिसरातील रामचंद्र हॉल येथे मंगळवारी सकाळी साडेनऊ ते साडेपाच या वेळेत मेळावा होईल. या क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. ज्वेलरी व्यवसायातील बदल, नवीन तंत्रज्ञान, व्यवसाय व कौटुंबिक स्वास्थ्य यांचे संतुलन, व्यवसायाचा विकास, ग्राहक सेवा या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. व्यवसायातील कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. औरंगाबाद जिल्हा सराफा असोसिएशन व जालना जिल्हा सराफा सुवर्णकार असोसिएशनने मेळावा आयोजित केला आहे. या पत्रकार परिषदेला अशोकराव वारेगावकर, गिरधारी लघानी, शशिकांत मैंढ, प्रफुल्ल दिंडोरिया, प्रतीक तिवारी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वड्रा यांना कंत्राट मिळाले नाही हे दुखणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राफेलचे कंत्राट रॉबर्ट वड्रा यांना मिळाले, हे खरे दुखणे आहे आणि त्यामुळेच राफेलवरून मोदींना लक्ष्य केले जात आहे. बोफोर्समुळे राजीव गांधी हरले, तसे मोदी हरतील, असे राहुल गांधींसह काँग्रेसला वाटते, मात्र बोफोर्स घोटाळ्याचे जागोजागी धागेदोरे होते तसे कुठलेच धागेदोरे राफेलचे नाही. 'कॉम्ट्रोलर जनरल'चा रिपोर्टमध्येही भ्रष्टाचाराची नोंद नाही. मुळात ज्या राफेलवरून आरोप होत आहेत, त्याविषयी काहीही माहिती नसताना बिनबुडाचे आरोप होण्यामागे माध्यमे आहेत. त्याचवेळी राफेलची इन्स्टॉलेशन्स बाहेर यावीत हादेखील शत्रुदेशांचा कुटील डाव असू शकतो. खरे म्हणजे राफेल सर्वसामान्यांना माहीत असण्याची गरज नाही व ती समजून घेण्याची कुवत सामान्यांची नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी राफेलविरोधाच्या आरोपांचे खंडन केले.

प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेत तिसरे पुष्प तोरसेकर यांनी रविवारी (२१ ऑक्टोबर) गुंफले. तापडिया नाट्य मंदिरात आयोजित व्याख्यानाप्रसंगी मराठवाडा युवक विकास मंडळाचे अध्यक्ष मनोज शेवाळे, संजीव सोनवणे आदींची व्यासपीठावर उपस्थित होते.

तोरसेकर म्हणाले, 'राफेलवरून देशभर जोरदार चर्चा आणि मोदींवर आरोप केले जात असले तरी सर्वेक्षणानुसार ७३ टक्के भारतीयांना राफेल काय आहे हेच मुळात माहीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे, तर ज्या २७ टक्के भारतीयांनी राफेल माहीत असल्याचे म्हटले आहे व त्यातील ८३ टक्के भारतीयांनी राफेल काय आहे हे जाहीर करू नये असेही म्हटले आहे. यूपीए सरकारच्या काळात राफेलचा करार झाला होता आणि करारानुसार मूळ किंमतीची ३० टक्के रक्कम भारतात खर्च करण्याची अट असताना मोदी सरकारने ५० टक्के रक्कम खर्च केली आहे. त्याचवेळी राफेलची किंमत जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी असताना, 'तुम्ही जो करार केला होता, त्यापेक्षा नऊ टक्के कमी किंमत आहे' असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले आहे, मात्र काँग्रेस त्याची किंमत जाहीर करण्यास तयार नाही.'

\Bसुप्रिम कोर्टाने आरोप ठरवले थोतांड

\B'हिंदूंना दोन दिवस दंगल करू द्या, असे आदेश गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री मोदी यांनी दिले होते,' असे आरोप तत्कालिन आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी केले होते आणि त्याआधारे गुजरात दंगलीचे आरोप मोदींवर करण्यात आले होते. त्याआधारेच मोदींची आठ तास चौकशी झाली होती, तर अमित शहांना दोन दिवस तुरुंगात पाठवले होते, मात्र सुप्रिम कोर्टाने शेवटी सर्व आरोप थोतांड ठरल्याचेही तोरसेकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद जालन्याचे टंचाईकडे दुर्लक्ष

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

अत्यल्प पावसामुळे दुष्काळकळा सहन करत असलेल्या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना टंचाई आराखडे तयार करण्याचे विभागीय प्रशासनाचे निर्देश आहेत. मात्र, दुष्काळाच्या सर्वाधिक झळा सहन करत असलेल्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याचे याकडे दुर्लक्ष केले असून या जिल्ह्यांनी अद्यापही विभागीय आयुक्त कार्यालयाकडे टंचाई आराखडा सादर केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी दडी मारल्यामुळे संपूर्ण प्रदेश दुष्काळाच्या झळा सहन करत आहे, दुष्काळाची पार्श्वभुमी व संभाव्य टंचाई पाहता सर्व जिल्ह्यांनी टंचाई आराखडे तयार करावे असे निर्देश ४ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाने काढले होते. २० ऑक्टोबरपर्यंत लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे टंचाई आराखडे सादर केले. मात्र, दुष्काळाच्या सर्वाधिक झळा सहन करत असलेल्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांनी संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर टंचाई आराखडे सादर केलेच नाहीत. यावरुन हे जिल्हे दुष्काळाला किती गंभीरतेने घेतात हे स्पष्ट होते.

टंचाई आराखड्यामध्ये प्रस्तावित उपाययोजनांची सर्व माहिती जिल्ह्यांकडून मागवण्यात येते या शिवाय टंचाई कालावधीत आवश्यक असलेल्या उपाययोजना, त्यासाठी लागणारा खर्च, कुठल्या गावांमध्ये काय उपाययोजना राबवणार, सध्या उपलब्‍ध असलेल्या पाण्याच्या स्‍त्रोतांची स्थिती, जिल्ह्यात किती पाणीसाठा उपलब्‍ध आहे, या शिवाय भौगोलिक परिस्थितीबद्दलची माहिती जिल्ह्यांकडून मागवण्यात येते. सर्व जिल्ह्यांना ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८, जानेवारी ते मार्च २०१९ व एप्रिल ते जून २०१९ या कालावधीचे टंचाई आराखडे मागवण्यात आले होते. मराठवाड्यात सध्या सुमारे २५० टँकर सुरू असून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाणीटंचाई आहे. सध्या जिल्ह्यामध्ये १५८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर जालना जिल्ह्यात २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

औरंगाबाद- जालन्याची स्थिती

मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एकाही महसुली मंडळांमध्ये अपे‌क्षित पाऊस झाला नाही. तर जालना जिल्ह्यातील केवळ एकाच मंडळामध्ये अपे‌क्षित पाऊस झाला आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये गंभीर स्वरुपाच्या दुष्काळाची स्थिती आहे. २० ऑक्टोबरपर्यंत मराठवाड्यातील ४२१ महसुली मंडळांपैकी तब्बल ३०६ मंडळांमध्ये अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पाऊस झाला नाही. १०३ मंडळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून, २०४ मंडळांमध्ये ७५ टक्‍क्‍यांपर्यंत पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील केवळ २४ महसुली मंडळांमध्ये अपेक्षित सरासरीच्या तुलनेत १०० टक्के पाऊस झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमनच्या दारूची शहरात विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दमन येथून विक्रीसाठी असलेल्या दारूची शहरात अवैध विक्री करणाऱ्या आरोपीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई रविवारी मुकुंदवाडी भागात करण्यात आली. त्याच्या ताब्यातून एका कारसह दारूच्या अडीचशे बाटल्या जप्त करण्यात आल्या.

दमण, दादरा नगर हवेली येथे विक्रीसाठी असलेल्या दारूची शहरात विक्री करण्यात येत होती. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती मिळाली होती. या माहितीवरून पथकाने मुकुंदवाडी, रेल्वे स्टेशन परिसरात छापा टाकला. या छाप्यामध्ये संशयित आरोपी कृष्णा सीताराम पोटदुखे (वय ३२, रा. मादनी ता. सिल्लोड) याला अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून एका कारसह मॅकडॉल व्हिस्कीच्या १८० मिलीच्या २४० बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई अधीक्षक प्रदीप वाळूंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक गणेश इंगळे, गणेश नागवे, अनंत शेंदरकर, प्रवीण पुरी, भास्कर काकड, व अश्फाक शेख यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिग्गजांची धावाधाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आंतर जिल्हा बदल्यांनंतर गरोदर व स्तनदा मातांना अडचणीच्या ठिकाणी मिळालेल्या पदस्थापना बदलून मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषदेसमोर ११ शिक्षकांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. हे उपोषण सोडवण्यासाठी रविवारी सकाळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, आमदार प्रशांत बंब आदी दिग्गजांना धावाधाव करावी लागली. त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर आणि शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांच्यासमवेत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले. या शिक्षकांची अडचण मंगळवारपर्यंत दूर केली जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रिया यावेळी प्रथमच ग्रामविकास सचिव पातळीवरून राबविली गेली. प्रक्रियेत बदलून आलेल्या गरोदर व स्तनदा मातांना अवघड क्षेत्रात पदस्थापना मिळाल्या. याबाबत दाद मागितली गेली. स्थानिक प्रशासनाने हा प्रश्न त्यांच्या अखत्यारितील नसताना अडचण दूर करण्याबाबत आश्वासन दिले. पण त्यात काही मार्ग निघत नव्हता. या महिला शिक्षकांनी शुक्रवारी बेमुदत उपोषण सुरू केले. रात्री उशिरा सीईओ पवनीत कौर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांनी रिक्त जागांमधून या शिक्षकांना पदस्थापना बदलून देण्याचे आश्वासन दिले. शनिवारी सकाळी हे शिक्षक झेडपीत पोचले. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने त्यांना सहकार्य केले नाही. उलट पदस्थापनेबाबत काहीच निर्णय होत नसल्याचे सांगितल्याचा आरोप केला. मात्र, शिक्षण विभागात रिक्त जागांची यादी तयार करताना आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी करण्याचे काम सुरू होते. सोमवारपर्यंत आक्षेप मागवून मंगळवारी या महिला शिक्षकांना पदस्थापना दिली जाईल, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु प्रशासनाने शब्द फिरविल्याच्या आरोपावरून शनिवारी सायंकाळी गरोदर व स्तनदा मातांनी पुन्हा उपोषण सुरू केले होते.

विभागीय आयुक्तांनी बैठकीत सकारात्मक मार्ग काढण्याबाबत आश्वासन दिले. सद्यस्थितीत ५१ जागा रिक्त आहेत. त्याबाबत आक्षेप मागविले आहेत. मंगळवारी सकाळी तुमच्या हातात ही यादी देऊ त्यातून तुम्ही गावे निवडा. ही प्रक्रियानियमबाह्य आहे, कारण सचिवांनी अशा प्रकारची कार्यवाही करण्यास नकार दिला आहे. अकोला व यवतमाळ जिल्हा परिषदेत ही प्रक्रिया राबविल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, पण आपण करणारआहोत, असे कौर यांनी सांगितले. आमदार बंब यांनीही याप्रश्नी अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

\Bसमस्या मांडताना महिलांच्या डोळ्यात अश्रू \B

रात्रभर उपोषण सुरू असल्याचे कळताच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकरही सकाळी जिल्हा परिषदेत पोचले. मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या दालनात उपोषणकर्त्या महिलांसोबत डॉ. भापकर, आमदार बंब, सीइओ कौर, शिक्षणाधिकारी जैस्वाल यांची बैठक झाली. या बैठकीत शिक्षकांनी कैफियत मांडली. आम्हाला मिळालेल्या पदस्थापना अडचणीच्या आहेत. आम्ही राहत असलेल्या घरात दिवसा साप निघतात. लहान बाळाला घेऊन कशी राहणार? मुलांना शाळेत सोडून जाणे जमत नाही. आमच्यापैकी एका महिलेची आरोग्य विषयक अडचण आहे. हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहीद पोलिसांना स्मृतिदिनानिमित्त मानवंदना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

२१ ऑक्टोबर हा दिन पोलिस स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने रविवारी सकाळी पोलिस मुख्यालयात वर्षभरात शहीद झालेल्या ४१४ जणांना मानवंदना आणि श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांची प्रमुख उपस्थिती होती.

२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे दहा जवान देशाचे रक्षण करताना चीनच्या सैनिकांसोबत लढताना शहीद झाले होते. तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा दिवस पोलिस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. रविवारी सकाळी पोलिस मुख्यालयाच्या देवगिरी क्रीडा संकुलावर हा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. स्मृतिदिनाचे सूत्रसंचालन पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी, शहीद जवानांच्या नावाचे वाचन पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी केले. हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. यावेळी सादर करण्यात आलेल्या परेडचे संचालन राखीव निरीक्षक राजेंद्र कत्तूल यांनी केले. या कार्यक्रमाला महापौर नंदकुमार घोडेले, आमदार संजय शिरसाठ, अतुल सावे, प्रशांत बंब, आयुक्त चिरंजीवप्रसाद, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, लाचलुचतप प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, निकेश खाटमोडे पाटील यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा खून करणारा पती गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पत्नीचा खून करून पळून गेलेल्या पतीला गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी लासूर स्टेशन येथील बाजारातून अटक केली. अशोक पंडीत जाधव (वय ४२ रा. राजनगर हर्सूल), असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याने शुक्रवारी राजनगर भागात पत्नीचा खून केल्याचा आरोप आहे.

कविता उर्फ सोनी अशोक जाधव (वय ३०) या महिलेचा शुक्रवारी दुपारी राजनगर भागात दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. तिचा मृतदेह नग्नावस्थेत दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांना आढळला होता. या प्रकरणी कविताचे वडील रावसाहेब खरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून हर्सूल पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यापासून कविताचा पती अशोक हा पळून गेला होता. तो पोलिसांच्या धाकाने लासूर स्टेशन येथे लपून बसला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून लासूर स्टेशन गाठून रविवारच्या बाजारातून अशोकला अटक केली. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक अफरोज शेख, शेख नजीर, संदीप क्षीरसागर, शिवाजी शिंदे, ज्ञानेश्वर ठाकूर, प्रमोद चव्हाण, प्रभाकर राऊत आदींनी केली.

चौकट

मध्यरात्री केला खुन

अशोक जाधवला दारुचे व्यसन आहे. तसेच नेहमी तो चारित्र्याच्या संशयावरून कविताला मारहाण करीत होता. दसऱ्याच्या दिवशी मध्यरात्री त्याने कविताच्या डोक्यात दगड टाकून तीचा खुन केला. यानंतर तिला निर्वस्त्र करीत घराला बाहेरून कडी लावत तो पसार झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार टिळेकरांची आमदारकी रद्द करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राजकीय दबाव टाकून केलेली पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची बदली रद्द करावी, राजकीय दबाव टाकणारे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांची आमदारकी रद्द करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र पोलिस बॉइज असोसिएशनतर्फे शनिवारी क्रांतीचौकात निर्दशने करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र पोलिस बॉइज असोसिएशनचे रवी वैद्य, अनिल मालुसरे, राजू शिरसाठ, शिरीष चव्हाण, राज ठाकरे, अरुण सहाशिवे, धोकटे मामा, मनोज गांगवे, प्रसाद धोकटे, कृष्णा लोखंडे, गोकुळ दाभाडे, सुशांत पाटील, दत्ता सोनवणे यांच्यासह संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोंडवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची सूडभावनेतून व राजकीय दबावाचा वापर करून करण्यात आलेली बदली तत्काळ रद्द करावी. यापुढे असे प्रकार होऊ नये. कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राजकीय मंडळीपासून त्रास होणार नाही यासाठी गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी परिपत्रक काढावे, आदी मागण्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नांमका’च्या पाण्यासाठी पाणी वापर संस्था सक्रिय करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

'वैजापूर व गंगापूर या दुष्काळी तालुक्यांसाठी असलेल्या नांदूर-मधमेश्वर जलदगती कालव्याचे हक्काचे पाणी भविष्यात सुरक्षित ठेवायचे असेल, तर पाणी वापर संस्था सक्रिय करा. अन्यथा लाभधारक शेतकऱ्याचे हक्काचे पाणी आरक्षणाच्या नावाखाली दुसरीकडे वळवले जाईल. हक्काच्या पाण्यासाठी जागरुक राहा आणि संघटीत होऊन व्यवस्थेविरुद्ध लढा द्या,' असे आवाहन शेतकरी मित्र प्रतिष्ठाणचे डॉ. राजीव डोंगरे यांनी केले.

वैजापूर येथे रविवारी झालेल्या शेतकरी परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या शेतचाऱ्यांची अपूर्ण कामे, भूसंपादन, आवर्तन, हक्काचे ११ टीएमसी पाणी मिळण्यासंदर्भात विविध ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. परिषदेला ओझर येथील महात्मा फुले पाणी वापर संस्थेचे गोवर्धन कुलकर्णी, रवींद्र शिरोडे, पुरुषोत्तम वाणी, अभिजित धामणे, किरण राऊत, पाटबंधारे विभागाचे अविनाश डुडुर, डॉ. विजया डोंगरे, माधवानंद महाराज, पंडित शिंदे, कोपरगावचे संजय जामदार व लाभक्षेत्रातील शेतकरी रमेश सावंत आदींची उपस्थिती होती.

वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी निर्माण करण्यात आलेला नांदूर-मधमेश्वर जलदगती कालवा प्रकल्प पूर्ण होऊन १५ वर्षांचा कालावधी उलटला. पण अद्याप शेतचाऱ्यांची कामे अपूर्ण आहेत. हक्काचे ११ टीएमसी पाणी शेवटच्या टोकापर्यंत मिळत नाही. प्रकल्पातील हक्काच्या मुकणे धरणावर नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत व विविध गावांसाठी नगर पालिका व महापालिकेने आरक्षण टाकल्याने मराठवाड्याचे हक्काचे पाणी वळवण्यात आले. विविध वितरिकांवर व नांदूर-मधमेश्वर धरणाच्या मुखाशी पाणी सोडतांना इलेक्ट्रॉनिक गेट नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची चोरी होते. परिणामी येथील लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, याबद्दल परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वास्तविक जलदगती कालव्यावर औद्योगिक वसाहतीस

११ टक्के व पिण्यासाठी १५ टक्के आरक्षण टाकण्याची तरतूद आहे. हे आरक्षण टाकले असते, तर वैजापूर व गंगापूर येथे औद्योगिक वसाहत व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असता. या पुढील काळात हक्काच्या पाण्यासाठी पाणीवापर संस्था सक्षम करणे गरजेचे आहे, तसेच पाण्याची शंभर टक्के मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गायत्री म्हस्के यांनी केले.

\Bपरिषदेतील ठराव\B

कालव्याच्या चाऱ्या व पोटचाऱ्यांची कामे पूर्ण करावी, त्यासाठी लागणारा निधी तातडीने मंजूर करावा, शेतचाऱ्या व कालव्याची साफसफाई करावी, पाण्याची शंभर टक्के मागणी नोंदवावी, मुकणे व इतर धरणांवरील आरक्षण हटवावे, आरक्षणाचा अनुशेष अप्पर वैतरणा धरणातून पूर्ण करावा, नांदूर-मधमेश्वर कालव्यावर वैजापूरसह १०२ गावांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना टाकावी, वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी औद्योगिक वसाहतीसाठी आरक्षण द्यावे, धरणाच्या मुखाशी इलेक्टॉनिक गेट बसवावे, जलमापन यंत्रणा बसवावी, सर्व पाणी वापर संस्थाची शिखर संस्था करावी आदी ठराव मंजूर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पेशल संडे’ला नवमतदारांचा प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून निवडणूक विभागही सक्रिय झाला आहे. 'नो वोटर लेफ्ट बिहाइंड' या संकल्पनेअंतर्गत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी रविवारी (२१ ऑक्टोबर) जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर 'स्पेशल संडे' मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत तब्बल सात हजार ४०० नवीन मतदारांनी फॉर्म क्रमांक सहा भरला. मतदार यादीतील नावाची दुरुस्ती, स्थलांतर आणि वगळणीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

निवडणूक विभागातर्फे सात ऑक्टोबर रोजी जिल्ह्याभरात राबवण्यात आलेल्या विषेश मोहिमेमध्येही आठ हजार ३०० नवीन मतदारांनी फॉर्म क्रमांक सहा भरून नोंदणी केली होती. रविवारच्या विशेष मोहिमेमध्ये नवीन मतदार नोंदणी, नाव वगळणे, मतदार यादीतील दुरुस्ती तसेच नाव स्थलांतरित करण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती. जिल्ह्यातील सर्व २९५७ मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी पाच पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी नागरिकांची मदत करून फॉर्म भरून घेतले.

'स्पेशल संडे'बाबत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रशांत शेळके म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मे महिन्यांपासून विविध माध्यमांद्वारे मोठ्याप्रमाणावर मतदार जागृती करण्यात आली होती. प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या दोन 'स्पेशल संडे' मोहिमेमधूनही समाधानकारक नोंदणी झाली.

वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्यांसाठी मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदवण्यासाठी अद्यापही वेळ गेलेली नाही. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ऑनलाइन किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन योग्य ते कागदपत्रांची पूर्तता करून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करुन घ्यावे.

-प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images