Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सामाजिक न्यायमंत्र्यांचा उद्या जनतेशी संवाद

$
0
0

औरंगाबाद: गेल्या चार वर्षाच्या कालावधीत सामाजिक न्याय विभागाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे राज्यातील नागरिक, विद्यार्थ्यांशी, सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत गुरुवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी साडेअकरा वाजता लाइव्ह संवाद साधणार आहेत, असे सहायक आयुक्त शिवाजी शेळके यांनी कळविले आहे. या उपक्रमाकरिता निवासी शाळा, वसतिगृहे, सामाजिक न्याय विभागाच्या सर्व आस्थापनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या संवादाचे http://elearning.parthinfotech.in या लिंकवरून थेट प्रसारण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जादा भाडे आकारणी; १९ ट्रॅव्हल्स बसवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निश्चित दरापेक्षा अधिक भाडे आकारणी करणाऱ्या १९ ट्रॅव्हल्स बसवर आरटीओ विभागाकडून कारवाई करण्यात आली. याशिवाय ३० बसवर मोटार वाहन अधिनियम डावलून प्रवासी वाहतूक केली प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

आरटीओ कार्यालयाच्या वतिने दिवाळीत परिवहन विभागाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दराची आकारणी करणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. दिवाळीच्या काळात आरटीओ विभागाच्या वायू वेग पथकाने एकूण ४९ ट्रॅव्हल्सवर कारवाई केली आहे. या कारवाईत ३० ट्रॅव्हल्सचालकांनी आरटीओ विभागाकडून फिटनेस प्रमाणपत्र घेणे, तसेच नियमानुसार परमीट घेण्याची कारवाई केली नाही, तसेच अनेक वाहनांच्या चालकाने कागदपत्रे सादर केली नाहीत. याप्रकरणी ही वाहने जप्त करण्यात आली आहे.

याशिवाय १९ ट्रॅव्हल्स बसचालकांनी प्रवाशांकडून निर्धारित दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्याप्रकरणी जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यातील बहुतेक ट्रॅव्हल्स बस औरंगाबाद ते मुंबई, नागपूर या मार्गावर धावणाऱ्या असल्याची माहिती आरटीओतून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज मराठा क्रांतीमोर्चाची बैठक

$
0
0

औरंगाबाद: १६ नोव्हेंबरपासून निघणाऱ्या मराठा संवाद यात्रेचे नियोजन तसेच मराठा आरक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मराठा क्रांती मोर्चाची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी (१४ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आली आहे. हडको येथील गुलाब विश्व हॉलमध्ये सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी सर्व तालुका, जिल्हा समन्वयक तसेच सर्व क्षेत्रातील समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन सकळ मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तंबाखुला नकार, व्हॅक्सिनचा स्वीकार, हेच कॅन्सरवर उत्तर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांना हद्दपार करीत पाच ते सहा प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण देणाऱ्या 'एचपीव्ही व्हॅक्सिन'चा स्वीकार, हाच भारतातील बहुतांश कर्करोगांवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्याचा रास्त मार्ग आहे आणि भारतासारख्या विकसनशील देशाने हा मार्ग तातडीने स्वीकारावा, असे आवाहन अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या उपाध्यक्ष मरिया गुयेटे यांनी औरंगाबाद दौऱ्यात केले.

'आयएमए'च्या शहर शाखेच्या वतीने मंगळवारी (१३ नोव्हेंबर) आयएमए हॉलमध्ये झालेल्या अनौपचारिक चर्चेवेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी 'आयएमए'चे शहराध्यक्ष डॉ. कुलदिपसिंग राऊळ, सचिव डॉ. यशवंत गाडे, सहसचिव डॉ. हरमितसिंग बिंद्रा, शहरातील दंतवैद्यतज्ज्ञ डॉ. श्याम महाजन व डॉ. उमा महाजन, शासकीय कर्करुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, स्तन कर्करोगतज्ज्ञ डॉ. अरुणा कराड, डॉ. पर्सी जिल्ला आदींची या वेळी उपस्थिती होती. या प्रसंगी मरिया गुयेटे म्हणाल्या, भारतामध्ये कॅन्सर स्क्रिनिंग अधिकाधिक प्रमाणात होणे गरजेचे असून, लवकरात लवकर निदान व उपचार होणे खूप गरजेचे आहे. भारतामध्ये मुख कर्करोग व गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि भारतातील खूप जास्त प्रमाणातील तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन हेच मुख कर्करोगांना कारणीभूत आहे. त्यामुळे तंबाखुला हद्दपार करणे तितकेच गरजेचे आहे. त्याचवेळी गर्भाशयाच्या कर्करोगासह विविध पाच ते सहा प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण देणाऱ्या 'एअचपीव्ही व्हॅक्सिन'चा स्वीकार करुन देशातील ११ ते १२ वर्षांपासूनच्या मुला-मुलींना हे व्हॅक्सिन दिले गेले पाहिजे. त्याचवेळी भारतीयांमधील वाढते स्थुलत्व व शारीरिक निष्क्रियता, हेदेखील विविध कर्करोगांना आमंत्रण देणारे ठरत असल्याचे त्या म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात सहा महिन्यांचा चारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अपुरा पाऊस व त्यात पडलेला मोठा खंड यामुळे यंदा दुष्काळचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून, जिल्ह्यात एप्रिलपर्यंत पुरेल एवढाच चारा उपलब्ध असल्याने पशूपालकांसमोरील अडचणीतही भर पडणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात मोठी व लहान मिळून सहा लाख ७६ हजार१८० जनावर आहेत. त्यात सर्वाधिक जनावरे कन्नड तालुक्यात आहे. या ठिकाणी एक लाख १९ हजारच्यावर जनावरे आहेत. जिल्ह्यातील ही पशूधन संख्या विचारता घेता त्यांच्यासाठी दररोज तीन हजार ५५३ टन चारा लागतो. त्यानुसार ३१ मेपर्यंत आठ लाख १० हजार ८४ टन चाऱ्याची आवश्यकता आहे, परंतु जिल्ह्यात सध्या सहा लाख ६० हजार ६२५ टन चारा उपलब्ध असून, तो साधारणपणे १५ एप्रिल २०१९पर्यंतच पुरेल, अशी शक्यता जिल्हा पशूसंवर्धन विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात जिल्ह्यात तीव्र चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त आहे.

\Bटंचाईच्या पार्श्वभूमीवर किंमती वाढल्या\B

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने चाऱ्याचे भावही वाढले आहेत. कडबा पेंडीचे (१०० पेंडी) भाव १५ दिवसापूर्वी तीन हजार रुपये होता. तो सध्या चार ते साडेचार हजारांच्या घरात पोचला आहे, अशी माहिती पशूपालक हरिष पवार यांनी दिली. एक हजार ५०० ते एक हजार ८०० रुपयांची सरकी ढेपेसाठी आता २१०० रुपये मोजावे लागत आहेत. ऊस कुट्टीचे भाव ५० ते १०० रुपयांनी वाढले असून, एका गोणीसाठी १५० ते २०० रुपये द्यावे लागत असल्याचे पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळावर पकडले सहा किलो सोने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिल्लीहून औरंगाबादला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून सहा किलो सोने तस्करी करणाऱ्या एका प्रवाशाला औरंगाबाद विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई कस्टम विभागाने केली.

या प्रकरणात सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरब इथून एक प्रवासी दिल्ली विमानतळावर उतरला. तो दिल्लीहून औरंगाबाद येथे विमानाने येत होता. दरम्यान, या विमानप्रवाशाकडे काही संदिग्ध वस्तू असल्याचा संशय कस्टम विभागाला आला. त्यानंतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा दिल्लीपासून पाठलाग गेला. तो औरंगाबाद विमानतळावर उतरताच त्याला पथकाने ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, सोन्यासह ताब्यात घेतलेला प्रवासी दुसऱ्याच्या प्रवास करत होता. सौदीतून आलेला प्रवासी दिल्लीत थांबला. त्याचा नावावर दुसरा प्रवासी प्रवास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मूळ प्रवाशाला औरंगाबादला बोलवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेवर तलवारीने हल्ला; नियमित जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरात शिरून महिलेवर तलवारीने हल्ला करून परिसरात दहशत पसरविणारा अट्टल गुन्हेगार शेख अजहर उर्फâ मच्छी शेख मजहर याचा नियमित जामीन अर्ज मोक्का कोर्टाचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी फेटाळला.

किराडपुरा येथे राहणाऱ्या मुस्कानखान अन्वर खान यांच्या पतीने आरोपी शेख अजहर ऊर्फ मच्छी याच्याविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी मुस्कानखान यांच्यावर दबाव टाकण्यासाठी मच्छीच्या साथीदारांनी घरात शिरून दहशत पसरविण्यासाठी मुस्कानखानच्या हातावर तलवारीने हल्ला केला. यामध्ये ती जखमी झाली. त्यानंतर त्या गँगने किराडपुरा परिसरात तलवार हवेत फिरवत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुस्कानखान यांच्या तक्रारीवरून शेख इरशाद, शेख एजाज, शेख अजहर उर्फ शेरा, बाबर, शेरू, साजीद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान या गँगवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली.

दरम्यान, आरोपी मच्छीने मोक्काच्या कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, प्रकरणात दोषारोपपत्र दाखल होण्याचे बाकी असून, जामीन मंजूर केल्यास आरोपी साक्षीदारावर दबाव आणू शकतो. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपी मच्छीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दपार गुन्हेगारााकडून १६ किलो गांजा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगारांकडून गुन्हे शाखेच्या पथकाने १६ किलो गांजा जप्त केला. ही कारवाई मंगळवारी दुपारी सेव्हन हिल्स भागात करण्यात आली. याप्रकरणी दोन आरोपींना पकडण्यात आले असून, यामध्ये हद्दपार गुन्हेगाराचा समावेश आहे. त्यांचा एक साथीदार पसार होण्यामध्ये यशस्वी झाला आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही संशयित आरोपी मंगळवारी दुपारी रिक्षामध्ये सेव्हन हिल्सकडून गांजा घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी अपना बाजार बिल्डिंग समोर सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संशयित रिक्षा (क्रमांक एमएच २० ईएफ ४४५९) मध्ये तीन संशयित आरोपी पोलिसांना आढळले. पोलिसांनी ही रिक्षा अडवत तीच्यावर छापा टाकला, यावेळी दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले तर एक आरोपी पसार होण्यामध्ये यशस्वी झाला. पकडण्यात आलेल्या आरोपीमध्ये जाकेरखान महेबुबखान (वय २९ रा. सेंट्रल बसस्टँड, जनता हॉटेलच्या मागे) आणि कबीर बेग लाला बेग उर्फ सलमान (वय २५ रा. आसेफीया कॉलनी) यांचा समावेश आहे. तर पसार झालेल्या आरोपीचे नाव समीरखान सिकंदरखान (रा. आसेफीया कॉलनी) असल्याची माहिती पकडलेल्या आरोपींनी दिली. आरोपीच्या ताब्यातून सोळा किलो गांजा आणि रिक्षा असा अडीच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दिपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शेषराव उदार, एपीआय राहूल सुर्यतळ, पीएसआय हेमंत तोडकर, भाऊराव राठोड, संतोष सोनवणे, नवाब शेख, विरेश बने, विनोद गिरी आणि आयझेक कांबळे यांनी केली.

\Bसराईत गुन्हेगार

\Bपोलिसांनी पकडलेला जाकेरखान हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेले आहे; तसेच दुसरा पसार आरोपी समीरखान याच्यावर देखील यापूर्वी अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गटशेतीद्वारे दर्जेदार उत्पादनावर येत्या शुक्रवारी कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गट शेतीद्वारे दर्जेदार कृषी उत्पादन, मूल्यवृद्धी, पणन व निर्यात या विषयावर येत्या शुक्रवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इस्टिट्यूशन ऑफ अॅग्रिकल्चर टेक्नोलॉजिस्टचे (आयएटी) कार्यकारणी सदस्य डॉ. भगवान कापसे व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

कृषी विभाग, आयएटी यांच्यातर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. भानुदासराव चव्हाण सभागृहात सकाळी अकरा वाजता कार्यशाळेला सुरुवात होईल. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कृषी आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित असतील, अशी माहिती कापसे यांनी दिली.

गटशेती संकल्पना शेतकऱ्यांमध्ये रुजत चाललेली आहे. गटांची वाटचाल शास्त्रीय पद्धतीने होऊन सक्षमीकरण होण्यासाठी शासनपातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. शेतीमलाचे दर्जेदार उत्पादन घेऊन देशांतर्गत व विदेशातील बाजारात गटामार्फत शेतमाल पाठविणे, यांसह अन्य विषयांवर माजी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, गणेश हिंगमिरे, डॉ. विजय चोले, डॉ. तुकाराम मोटे, गोविंद हंडे, सुनील पवार, आर. बी. देशमुख आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुग्ध व्यवसायिकांसाठी शनिवारी प्रशिक्षण, मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी म्हणून वडखा येथे येत्या शनिवारी कोल्हापूर येथील गोकूळ दूध संघाचे संचालक अरुण नरके यांच्या उपस्थितीत दुग्ध व्यवसायिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जन जागृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भगवानराव कापसे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

अध्यक्षस्थानी माजी विभागीय आयुक्‍त, व्हीएसटीएफचे कार्यकारी संचालक डॉ. उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्याचे उद्घाटन विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे उपस्थित राहणार असल्याचे डॉ. कापसे यांनी सांगितले.

\Bतीन दिवसांचे प्रशिक्षण\B

व्हिलेज सोशल ट्रान्सफार्मेशन (व्हीएसटी) अंतर्गत निवडण्यात आलेल्या औरंगाबाद तालुक्‍यातील वडखा, पळशी, बकापुर, आडगाव, माहुली येथील पशुपालकांसाठी मंगळवारपासून वडखा येथे तीन दिवसांचे दुग्धव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहितीही डॉ. कापसे यांनी यावेळी दिली. या प्रशिक्षणात सुमारे १०० शेतकरी सहभागी झाले असून, पुण्याचे डॉ. यशवंत वाघमारे, कृषि विज्ञान केंद्राच्या डॉ. अनिता जिंतूरकर, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. एस. कांबळे आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार हजार मजुरांच्या हाताला काम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यात विविध यंत्रणांच्या मार्फत सुरू असलेल्या ९०७ कामांवर सरासरी चार हजार मजुरांची उपस्थिती आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत असून ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला खात्रीशिररित्या काम मिळत असल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यात दुष्काळाच्या सर्वाधिक झळा औरंगाबाद जिल्ह्याला बसल्या आहेत. शेतीचे उत्पन्नही गेल्यामुळे सर्वसामान्य शेतरकी व मजूर आर्थिक अडचणीत सापडला आहे. पाण्याअभावी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हाल होत असून मजुरांची स्थितीही बिकट आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मनरेगा अंतर्गत कामे उपलब्‍ध करून देण्यात येत असून १ ते ७ नोव्हेंबर या कालावधीमध्ये उपलब्‍ध ९०७ कामांना ४२७५ मजुरांची उपस्थिती होती. यामध्ये ५९० ग्रामपंचायत यंत्रणेच्या कामावर ३ हजार १६९ मजूर, वनविभागाच्या ८ कामांवर १७१, सामाजिक वनिकरण विभागाच्या १० कामांवर १०६, कृषी विभागाचे ३ कामांवर ३८ तर रेशीम उद्योग विभागाच्या २९६ कामांवर ७९१ मजुरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू तस्कराचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळू तस्करी प्रकरणातील आरोपी चालक राहील रफिक पटेल याने दाखल केलेला नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी मंगळवारी (१३ नोव्हेंबर) फेटाळला.

याप्रकरणी विशेष पथकाचे पोलिस नाईक योगेश अन्नाराव खमाट यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ११ नोव्हेंबर रोजी अवैध वाहतूक करण्यात येत असलेला वाळुचा टिप्पर फिर्यादी व त्याच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून पकडला. याप्रकरणी आरोपी राहील रफिक पटेल (२०, रा. फुलंब्री) याला अटक करून टिप्पर, दोन ब्रास वाळू असा सुमारे दहा लाख दहा हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला होता व खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीला कोर्टात हजर केले असता, आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आरोपीची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला मंगळवारी कोर्टात हजर केले असता, कोर्टाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला असता, तो कोर्टाने फेटाळला. सहायक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वकीयांशी बोलताना बंदिवान गहिवरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुन्हा करताना रागाच्या भरात त्याच्या परिणामाची जाणीव होत नाही. नंतर मात्र शिक्षा भोगताना याची प्रचिती वारंवार येते. हर्सूल मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी बंदिवानासाठी १६ वर्षांखालील मुलामुलींच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वकीयांशी बोलताना बंदिवानांचे डोळे वारंवार पाण्याने भरून येत होते. एकूण ९० बंदिवानांनी यावेळी आपल्या नातेवाईकांची भेट घेतली.

तत्कालीन अप्पर पोलिस महासंचालक यांनी चार वर्षांपूर्वी बंदिवानांच्या १६ वर्षांखालील मुलांच्या गळाभेटीचा उपक्रम राबवला होता. यानंतर राज्यातील सर्व कारागृहामध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला. हर्सूल कारागृहात २०१६पासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मंगळवारी गळाभेटीचा हा चौथा उपक्रम घेण्यात आला. हर्सूल मध्यवर्ती कारागृहात एक हजार ६०० बंदिवान आहेत. यापैकी काहीजण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. या बंदिवानाच्या १६ वर्षांखालील मुलामुलींच्या भेटीचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये ९० बंदिवानांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी आले होते. यामध्ये पत्नी, आई-वडील, मुले, मुली आदींचा समावेश होता.

\Bनिरोप घेताना डोळे पाणावले\B

कारागृहाच्या आवारात या गळाभेटीच्या कार्यक्रमासाठी मंडप उभारण्यात आला होता. नातेवाईक व बंदिवान एकमेकाला भेटल्यानंतर काही क्षणातच वातावरण बदलून गेले. भेटण्याची उत्सुकता भावनेमध्ये बदलली. आपल्या मुलांना बिलगताना अनेक बंदिवानांना अश्रू आवरत नव्हते. एकमेकांची आस्थेवाईकपणे चौकशी करण्यात आली. बंदिवानांनी यावेळी आपल्या नातेवाईकांना कारागृहात तयार केलेले फराळाचे पदार्थ भेटवस्तू दिल्या. एकमेकांचा निरोप घेताना बंदिवान आणि नातेवाईका दोघांचेही डोळे पाणावले होते. या कार्यक्रमासाठी कारागृह अधीकक्ष बी. आर. मोरे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी आशिष गोसावी, पी. एस. साबळे, जेलर औताडे, रेहपाडे, साबळे, महाजन शिक्षिका पंचशीला चव्हाण, जी. एस. गीते आदींनी पुढाकार घेतला.

\B१२५ पदवीधर बंदिवान

\Bहर्सूल कारागृहात १२५पेक्षा जास्त बंदिवानांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापिठातून अनेकांनी पदवी घेतली घेतली आहे. यातील अनेकांना पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे आहे. बंदिवानांना कॉलेजात पाठवता येत नसल्याने त्यांच्यासमोर अनेक तांत्रिक अडचणी आहेत. बंदिवानाना पुढील शिक्षण घेता येईल का, या विषयावर नाशिक येथे लवकरच एक बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती कारागृह शिक्षिका पंचशीला चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शफिक मोमीन, पैठणे यांना कारणे दाखवा नोटीस

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वॉर्ड अभियंता शफिक अहमद मोमीन आणि वॉर्ड अधिकारी भालचंद्र पैठणे यांना महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मोमीन यांच्या विरोधात नगरसेविका साजेदा फारुकी यांची तक्रार होती. वॉर्डातील विकास कामांबद्दल विचारणा केली असता मोमीन माहिती देत नाहीत. असभ्य भाषा वापरतात, असे साजेदा फारुकी यांनी आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून आयुक्तांनी मोमीन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पैठणे यांना कार्यालयीन वेळेत गैरहजर राहिल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगांच्या योजना; पालिकेकडे मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिव्यांगांच्या कल्याणासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या तीन टक्के रक्कम खर्च करण्याचे शासनाचे आदेश आहेत. औरंगाबाद महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा विचार करता नऊ कोटी ५० लाख रुपये दिव्यांगांचे कल्याण, त्यांच्या विविध योजनांसाठी खर्च करायला हवेत. परंतु, अद्याप काहीच खर्च झालेला नाही. या संदर्भात प्रहार अपंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची भेट घेतली. दिव्यांगांसाठीचा निधी खर्च करा, त्यांच्यासाठीच्या योजना अंमलात आणा, अशी मागणी केली. दिव्यांगांना महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांमध्ये आरक्षण द्या, मालमत्ता कर आणि पाणीपट्टी माफ करा, वीस बाय तीसच्या प्लॉटवर दिव्यांगांनी बांधकाम केले आहे, ते बांधकाम नियमित करा आदी मागण्या आयुक्तांकडे करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे शिवाजी गाडे, दत्ता साळकर, रोहित देशमुख, राजू मोरे, पारसचंद साकला उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यातील १९ ड्रायव्हिंग स्कूलची मान्यता निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात ९९ मोटार ड्रायव्हिंग स्कूलपैकी १९ ड्रायव्हिंग स्कूलची मान्यता दोन महिन्यासाठी निलंबित करण्यात आली आहे. या ठिकाणी नियमानुसार सुविधा व आवश्यक उपकरणे नसल्याने करण्यात आली, अशी माहिती आरटीओ कार्यालयातून देण्यात आली.

आरटीओ कार्यालयातर्फे दरवर्षी ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी केली जाते. त्यात स्कूलमधील सुविधा आणि तसेच प्रशिक्षण देणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व मोटार वाहन निरिक्षकांकडून तपासणी करण्यात आली. त्यात ९९ पैकी १९ ड्रायव्हिंग स्कूलमध्ये सुविधा नसल्याचे, तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या नियमाप्रमाणे आवश्यक उपकरणे नसल्याचे स्पष्ट झाले. मान्यता घेण्यात आलेल्या पत्त्यावर स्कूल नसणे, मान्यतेचे नूतनीकरण आदी त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे हे १९ ड्रायव्हिंग स्कूल अवैध ठरवून ते एक नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत निलंबित करण्यात आले आहेत.

\Bनावे जाहीर करण्यास नकार

\Bमान्यता निलंबित केलेल्या १९ स्कूलची नावे विचारली असता ती सांगण्यास प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी नकार दिला. मात्र, प्रवेश घेताना संबंधितांनी ड्रायव्हिंग स्कूलचा ग्रेड, वैध लायसन्स, फॉर्म ११ तपासून खात्री करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारा नेणारे दोन ट्रक जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

जिल्ह्यात दुष्काळामुळे चाराबंदी असताना परजिल्ह्यात विक्रीसाठी नेण्यात येणाऱ्या चारा कुट्टीचे दोन आयशर ट्रक महसूल विभागाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ताडपत्री खाली झाकून चाऱ्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून शिवना-अजिंठा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी संजय दयाराम बेलदार(वय ४६, तामसवाडी, ता. पारोळा, जि. जळगाव) व माधवराव पोपट पाटील(वय ४९, रा. जुनवने, ता. जि. धुळे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चाऱ्याच्या गाड्या अजिंठा पोलिस ठाण्यात लालण्यात आल्या आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा येथून कडब्याची कुट्टी करून ती दोन आयशर ट्रकमध्ये (क्रमांक : एमएच १८ एए १६५१, एमएच १८ एए ०११७) जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे विक्रीसाठी नेली जात होती. एका ट्रकमध्ये तीन टन चारा होता त्याची किंमत ४० हजार रुपये आहे. अजिंठा येथील तलाठी बी. पी. पाटील, शिवना येथील तलाठी व्ही. आर. शेलकर, कोतवाल राजू पवार यांनी पाठलाग करून अजिंठा गावाजवळ हे दोन्ही ट्रक पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. अजिंठा पोलिस ठाण्याचे कर्मचारी अनंत जोशी, तेजस्विनी जोशी, दीपक भंगाळे, विष्णू कोल्हे यांनी चाऱ्याचे ट्रक व आरोपींना ताब्यात घेतले.

महसूल विभागाची तपासणी पथके स्थापन

यावर्षी जिल्ह्यात भयाण दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे जनावारांना चारा टंचाईस सामोरे जावे लागू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी परराज्यात किंवा परजिल्ह्यात चारा नेण्यास मनाई केली आहे. हे आदेश असताना सर्रास चारा वाहतुक सुरू होती. या चोरट्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात दुष्काळ आहे त्यामुळे चारा वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे. चारा वाहतूक कायम बंद करण्यासाठी अन्य जिल्ह्यांत चारा नेला जाऊ नये, यासाठी महसूल विभागाची पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दिली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनविसेमध्ये विद्यार्थ्यांचा जंगी प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे बुधवारी आयोजित विद्यार्थी प्रवेश सोहळ्यात विविध महाविद्यालयांनी १६७ विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. हा कार्यक्रम सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या नाट्य विभागात पार पडला. यावेळी मनविसेचे राज्य उपाध्यक्ष तसेच मराठवाडा संपर्क अध्यक्ष राजेश येरुणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना येरुणकर यांनी नवीन प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे व जबाबदारीने पक्ष संघटन बांधणीचे कार्य पार पाडावे, पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे विचार घरोघरी पोहचण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. तसेच मनविसेच्या कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीत अधिक सुधारणा करण्यासाठी लवकरच प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजीव जावळीकर, शहराध्यक्ष मंगेश साळवे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. निनाद खोचे, कार्तिक फरकाडे, अविनाश सावळे, किरण साठे, अमोल मुळे, किरण पाटील, रितेश देवरे, शुभम घोरपडे, निशांत शिरसाठ, संदीप राजपूत, विशाल गोंधळे, सचिन कुंटे, कुणाल खरात, योगेश आनेराव, निखील ताकवले, शुभम नवले, स्वप्नील घोडके, किरण राठोड, मनसेचे शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी, वैभव मिटकर, बिपीन नाईक, मनीष जोगदंडे आदीची उपस्थीती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेष्ठ नागरिकाच्या बांधकामाची तोडफोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकाच्या घराच्या सुरू असलेल्या बांधकामाची खोडसाळ पद्धतीने तोडफोड करण्यात आली. गारखेडा जय गजानन नगरात बुधवारी पहाटे हा प्रकार घडला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या या नागरिकाच्या मुलाची तक्रार स्वीकारण्यास पुंडलीकनगर पोलिसांनी टाळाटाळ केली.

रतन पुरी गुलाब पुरी गोसावी (वय ७३, रा. गारखेडा परिसर) या सेवानिवृत्त नागरिकाचा जय गजानन नगरात प्लॉट क्रमांक २८ आहे. अडीच महिन्यांपूर्वी या प्लॉटवर त्यांनी दोन मजली घराचे बांधकाम सुरू केले आहे. या बांधकामावर त्यांचा मुलगा चंद्रकांत लक्ष ठेवतो. चंद्रकांत मंगळवारी रात्री ११ वाजता घराची पाहणी करून निघून गेला. बुधवारी सकाळी सात वाजता तो पाणी मारण्यासाठी आला. यावेळी त्याला घराच्या छतावर पाण्याच्या दोन टाक्याची तोडफोड केल्याने पाणी वाहत असल्याचे दिसून आले. इतर ठिकाणी पाहणी केली असता नव्याने बांधलेला किचन ओटा, स्वव्छतागृह आदी ठिकाणी तोडफोड करण्यात आली होती.

\Bबोअरची मोटरही चोरली\B

नुकत्याच घेतलेल्या बोअरच्या मोटरचे वायर कापून बोअरची मोटर काढून टाकली. बसवण्यासाठी आणलेल्या नवीन टाइल्सच्या बॉक्सचे देखील नुकसान करण्यात आले. या घटनेत अंदाजे दीड लाखांचे नुकसान झाले. चंद्रकांत गोसावी हे बुधवारी सकाळी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार घेण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांचा गुन्हा नोंदवून घेतला नाही. एका कागदावर केवळ त्यांची तक्रार लिहून घेतली, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून सबंधित आरोपींवर कारवाई करण्याची मागणी चंद्रकांत गोसावी यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कत्तलीसाठीची जनावरे पकडली; चालकास कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिल्लेखान्यात कत्तलीसाठी घेऊन जाणारी सहा जनावरे क्रांतीचौक पोलिसांनी पाठलाग करून पकडली. तसेच जनावरांची अवैध वाहतूक करणारा चालक व आरोपी सय्यद सादिक सय्यद मंजूर अली याला अटक करून कोर्टात हजर केले असता, त्याला शनिवारपर्यंत (१७ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एन. पाटील यांनी दिले.

क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गजानन पिराजी सोनटक्के हे आपल्या पथकासह गस्त घालत असताना त्यांना मंगळवारी (१३ नोव्हेंबर) रात्री नऊ वाजता पिकअप व्हॅनमधून कत्तलीसाठी जनवारे आणण्यात येत असल्याची माहिती मिळाली. पोलिस थांबलेले दिसल्यामुळे चालक वेगाने निघाला. दरम्यान, बेगमपुरा पोलिस ठाण्याचे बीट मार्शल यांनी दुचाकी आडवी लावून पिकअप व्हॅन अडवली. त्यानंतर पोलिसांनी व्हॅनचा चालक व आरोपी सय्यद सादिक सय्यद मंजूर अली (वय २२, रा. सादातनगर) याच्यासह क्लिनर व अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. त्या वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये पाच बैल व एक गाय मिळून आली. त्यानंतर जनावरांची रवानगी गोशाळेत करण्यात आली. या प्रकरणी आरोपी चालक सय्यद सादिक यास कोर्टात हजर केले असता, त्याला कोर्टाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images