Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘सीएचबी’ प्राध्यापकांच्या मानधनात अडथळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, मानधन प्राध्यापकांच्या हातात पडण्यापर्यंतची प्रक्रिया अत्यंत जटील आहे. परिणामी, हक्काच्या मानधनासाठी प्राध्यापकांना संस्थाचालकांना विनवण्या कराव्या लागतात. दरमहा मानधन देण्यासाठी 'प्रस्ताव ते मानधन' प्रक्रिया सुरळीत करा, अशी मागणी प्राध्यापक संघटनांनी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात जवळपास दोन हजार प्राध्यापक तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. अत्यल्प मानधनावर अध्यापन करीत असलेल्या प्राध्यापकांचे प्रश्न जटील झाले आहेत. राज्यात भरती प्रक्रिया बंद असल्यामुळे प्राध्यापक तासिका तत्त्वावर शिकवतात. प्रतितास फक्त ३०० रुपये मानधन असल्यामुळे प्राध्यापकांचा रोष वाढला होता. विविध संघटनांनी मानधन वाढवण्याची मागणी केली होती. या मागणीचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विचार करून अखेर मानधन वाढवण्याचा शासन निर्णय जाहीर केला. यानुसार पदवी स्तरावर सुधारीत मानधन प्रतितास ५०० रुपये आहे. पदव्युत्तरच्या तासिकांसाठी ६०० रुपये मानधन आहे. प्रात्यक्षिकाच्या मानधनात १५० रुपयांवरून २०० रुपये वाढ झाली आहे. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या तासिकाही वाढवल्या आहेत. पूर्वी एका आठवड्यात जास्तीत जास्त सात तासिका होत्या. नवीन नियमानुसार नऊ तासिका करण्यात आल्या आहेत. 'सीएचबी' प्राध्यापकाला किमान १५ ते १८ हजार रुपये दरमहा मानधन देण्याचा नवीन नियमानुसार प्रयत्न आहे. ही नियुक्ती नऊ महिने असणार आहे. दुसरीकडे शिक्षण संस्थाचालकांची मनमानी 'सीएचबी' प्राध्यापकांच्या कामात अडथळा ठरत आहे. संस्थेत आवश्यक प्राध्यापकांच्या जागांची माहिती घेऊन मे महिन्यात जाहिरात देणे अपेक्षित असते. एक जुलै रोजी ऑर्डर देऊन तासिका सुरू केल्यानंतर त्याच महिन्यात विद्यापीठ प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवणे गरजेचे आहे. मात्र, बहुतेक संस्था फेब्रुवारी-मार्च महिन्यात प्रस्ताव सादर करतात. परिणामी, प्राध्यापकांना वर्ष-दीड वर्षे हक्काचे मानधनसुद्धा मिळत नाही. नऊ महिन्यांचे मानधन एकदाच मिळत असले तरी दरमहा खर्च कसा भागवावा अशा पेचात प्राध्यापक असतात. आर्थिक विवंचनेचा परिणाम अध्यापनावर होतो, असे प्राध्यापकांनी सांगितले. काही प्राध्यापक कॉलेज सुटल्यानंतर पार्ट टाइम नोकरी करतात. काही प्राचार्य आणि संस्थाचालक 'सीएचबी' प्राध्यापकांच्या मानधनातील अर्धी रक्कम मागण्याचे प्रकारसुद्धा घडले आहेत. शिक्षणसंस्था, विद्यापीठ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासकीय दिरंगाईत प्राध्यापकांची ओढाताण सुरू असते. राज्य सरकारने मानधन वाढवून दिलासा दिला आहे. मात्र, नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा, अशी प्राध्यापक संघटनांची मागणी आहे.

\Bमूल्यमापन वेळेत करा\B

राज्यात रिक्त जागांच्या ४० टक्के अध्यापक भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मागील अनेक वर्षे भरती प्रक्रिया झाली नसल्यामुळे काही प्राध्यापक किमान १५ वर्षांपासून तासिका तत्त्वावर शिकवतात. या अनुभवी प्राध्यापकांचे मूल्यमापन करून भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याची मागणी आहे. पूर्णवेळ प्राध्यापकांना दर आठवड्याला १८ ते २० तासिका बंधनकारक आहेत. तर 'सीएचबी' प्राध्यापकांना नऊ तासिका आहेत. प्रस्ताव ते मानधनाचे योग्य नियोजन झाल्यास अध्यापनात सुलभता निर्माण होईल, असे प्राध्यापकांनी सांगितले.

'सीएचबी' प्राध्यापकाला एकदा मान्यता दिल्यानंतर दरवर्षी मान्यता देण्याची प्रक्रिया राबवू नये. या प्रक्रियेत बराच वेळ जात असल्यामुळे प्राध्यापकांना वेळेत मानधन मिळत नाही. त्यामुळे नियमित मानधन देण्यासाठी सक्षम यंत्रणा राबवावी.

-डॉ. मारोती तेगमपुरे, 'एमफुक्टो'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाच घेताना कॉन्स्टेबल गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कंत्राटदाराकडून हजार रुपयांची लाच घेताना वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी वेदांतनगर पोलिस ठाण्यासमोर करण्यात आली. मारहाणीच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती. आठवड्याभरात तीन पोलिसांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

वेदांतनगर पोलिस ठाण्यात कंत्राटदाराच्या भावावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात जामिनावर सोडण्यासाठी, कठोर कारवाई न करण्यासाठी; तसेच पोलिस जमादार जाधव यांच्याकडे तपास करण्यासाठी पोलिस कॉन्स्टेबल योगेश पंडित सूर्यवंशी याने हजार रुपयाची लाच मागितली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदारसाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून शुक्रवारी दुपारी सापळा रचून हजार रुपये घेताना योगेश सूर्यवंशी याला अटक करण्यात आली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक शंकर जिरगे, उपाधिक्षक वर्षाराणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव ढाकणे आणि पथकाने केली.

\Bआठवड्यात तिसरी कारवाई\B

या आठवड्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तीन लाचखोर पोलिसांना अटक केली आहे. यामध्ये १२ नोव्हेंबर रोजी सातारा पोलिस ठाण्यात सहायक फौजदार नारायण भराटे याला २० हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. यानंतर १३ नोव्हेंबर रोजी सिटीचौक पोलिस ठाण्यातील कर्मचारी सुनील जहागीरदार याला अडीच हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. यानंतर तीनच दिवसांत वेदांतनगरचा योगेश सूर्यवंशी लाचेच्या सापळ्यात अडकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिर्यादींना केला ११ लाखांचा मुद्देमाल परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा तपास करताना मुद्देमाल जप्त करण्यात येतो. न्यायलयीन प्रक्रियेनंतर हा मुद्देमाल फिर्यादीला सुपूर्द केला जातो. शहर पोलिस दलातील नऊ ठाण्यांतर्गत विविध गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल शुक्रवारी एका कार्यक्रमात ५५ तक्रारदारांना परत करण्यात आला. यामध्ये सोने, चांदी, दुचाकी, लॅपटॉप आदी ११ लाखांच्या मुद्देमालाचा समावेश होता.

शहरातील विविध पोलिस ठाण्यात अनेक गुन्ह्यांत लाखो रुपयांचा मुद्देमाल पडून आहे. हा मुद्देमाल पुन्हा तक्रारदारांना परत करण्यासाठी सबंधित पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि मोहरील यांनी प्रयत्न केले. फिर्यादींचा शोध घेऊन त्यांना हा मुद्देमाल परत करण्यात आला. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे, डॉ. राहुल खाडे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे यांच्या उपस्थितीमध्ये फिर्यादींना हा मुद्देमाल परत करण्यात आला. सिडको, क्रांतीचौक, एमआयडीसी वाळूज, वेदांतनगर, मुकुंदवाडी, सिटीचौक, जवाहरनगर आणि एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यातील मुद्देमाल यावेळी परत करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, अनिल गायकवाड, अनिल आढे, , निर्मला परदेशी, दादाराव शिनगारे, नाथा जाधव, राहुल खटावकर, श्रीपाद परोपकारी आदींची उपस्थीती होती.

\Bपोलिस ठाणे निहाय फिर्यादींना परत करण्यात आलेला मुद्देमाल\B

पोलिस ठाणे........................फिर्यादी...............मुद्देमालाची किंमत

सिडको पोलिस ठाणे.............१४ फिर्यादी...........२ लाख १९ हजार

क्रांतीचौक..........................१३ फिर्यादी............१ लाख २० हजार

सिटीचौक...........................२ फिर्यादी............२१ हजार ५००

वेदांत नगर.........................४ फिर्यादी............२ लाख ४४ हजार

जिन्सी................................५ फिर्यादी............९३ हजार

एमआयडीसी वाळूज.............७ फिर्यादी............२ लाख

मुकुंदवाडी...........................४ फिर्यादी............२ लाख

एमआयडीसी सिडको............१ फिर्यादी............४० हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त करणार रिक्षाचालकांशी चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिटीबस सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर आपण स्वत: रिक्षा चालकांशी चर्चा करणार आहोत, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त तथा औरंगाबाद स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे सीटर रिक्षांची संख्या जास्त आहे. शहरात विविध मार्गांवर सीटर रिक्षा चालविल्या जातात. सिटीबस सुरू झाल्यावर रिक्षांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे रिक्षा चालक आणि मालकांकडून सिटीबसला विरोध होण्याची शक्यता आहे. याबद्दल पत्रकारांनी डॉ. निपुण विनायक यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, या संभाव्य समस्येबद्दल पोलिस आयुक्तांशी चर्चा झाली आहे. त्यांनी पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. २६ नोव्हेंबर रोजी वाहतूक सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत देखील सीटर रिक्षांबद्दल चर्चा केली जाईल.

सिटीबस सुरू होण्यापूर्वी सीटर रिक्षाचालकांशी चर्चा करण्याची आपली इच्छा आहे, असे डॉ. विनायक म्हणाले. त्यांच्या पोटावर पाय देण्याची आमची इच्छा नाही, पण नागरिकांना देखील शहरांतर्गत प्रवासाची सुरक्षित आणि चांगली सेवा मिळाली पाहिजे हे देखील आमचे उद्दीष्ट आहे. रिक्षाचालकांशी चर्चा करून योग्य मार्ग काढू, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांचा दिवाळी हंगाम सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात दिवाळीच्या सुट्यांमध्ये बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. म्हाडा कॉलनी येथे घरफोडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला; तसेच महावीर चौकात प्रवासी महिलेचे एक लाखाचे दागिने पळवण्यात आले. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

घरफोडीची मोठी घटना बुधवारी दुपारी तीन ते रात्री साडेआठ यादरम्यान मूर्तीजापूर, म्हाडा कॉलनी येथे घडली. येथील नितीन रामदास वाल्हेकर या तरुणाचे रामनगर भागात कपड्याचे दुकान आहे. नितीनची आई व पत्नी बुधवारी दुपारी त्याला मदत करण्यासाठी घराला कुलूप लावून दुकानात गेल्या. रात्री साडेआठ वाजता त्या घरी परतल्या. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरुममधील कपाट फोडून चोरट्यानी सामान अस्ताव्यस्त केले. कपाटातील रोख रक्कम व दागिने असा अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. वाल्हेकर यांनी सिडको एमआयडीसी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक फौजदार मुरलीधर सांगळे तपास करीत आहेत.

\Bप्रवासी महिलेचे लाखाचे दागिने लांबवले\B

प्रवासी महिलेचे एक लाख रुपयाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही प्रवासी महिला बुधवारी दुपारी बाबा पेट्रोल पंप चौकातून रिक्षामध्ये घरी जाण्यासाठी बसली होती. यावेळी तिच्यासोबत आणखी दोन महिला आणि मुलगी होती. क्रांतीचौक येथे या महिलेचे लक्ष विचलित करून महिलेच्या गळ्यातून ३६ ग्रॅमचे एक लाखाचे मंगळसूत्र या संशयित आरोपींनी लंपास केले. काही वेळाने हा प्रकार महिलेच्या लक्षात आला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून तिन्ही संशयित महिला आरोपीविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएसआय गायकवाड तपास करीत आहेत.

\Bघरातून १४ हजारांचा ऐवज लांबवला\B

घराच्या दरवाजाजवळ ठेवलेला मोबाइल व रोख चार हजाराची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी सकाळी सात वाजता सुरेवाडी हर्सूल येथे घडला. येथील दिगंबर किसन गायकवाड यांनी याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गायकवाड हे आंघोळीसाठी गेले असता चोरट्यांनी संधी साधून हा ऐवज लांबवला. याप्रकरणी सहायक फौजदार जवखेडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रक्रिया मशीनला ब्रेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा प्रक्रिया मशीनच्या खरेदीला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर बसविण्यात आलेल्या मशीनचे काम पाहून उर्वरित संच खरेदी करण्याचे पालिकेच्या प्रशासनाने ठरविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर सध्या बेलिंग, श्रेडिंग आणि स्क्रिनींग मशीनचा एक संच बसविण्यात आला आहे. या तिन्हीही मशीनच्या माध्यमातून रोज १६ टन कचऱ्यावर प्रक्रिया होणे अपेक्षित आहे. ५ नोव्हेंबर रोजी या मशीनची चाचणी घेण्यात आली. चाचणी यशस्वी झाल्याचे त्यावेळी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सांगितले व समाधान देखील व्यक्त केले. दहा ते १५ दिवसांत या मशीनचे काम ढेपाळले. या दिवसात १२० टन कचऱ्यावर प्रक्रिया होणे गरजेचे असताना प्रत्यक्षात ७० ते ८० कचऱ्यावरच प्रक्रिया झाल्याचे स्पष्ट झाले. फारच कमी क्षमतेने या मशीन चालत असल्यामुळे नवीन संच खरेदी करण्याबाबत पालिकेचे प्रशासन फेर विचार करीत आहे.

महापालिकेची नऊ झोन कार्यालये आहेत. या झोन कार्यालयांच्या क्षेत्रात तीन मशीनचा एक संच बसविला जाणार आहे. एकूण २७ मशीन खरेदी केल्या जाणार आहेत. त्यापैकी सध्या एकच संच प्राप्त झाला आहे. प्राप्त झालेल्या संचाच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने काम होत नसल्यामुळे उर्वरित आठ संच खरेदी करायचे की नाही या बद्दल प्रशासन गांभिर्याने विचार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या मशीन नागपूर येथील वेस्ट बिन्स सोल्युशन्स या कंपनीकडून खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कंपनीचे औरंगाबादेतील प्रतिनिधी कचरा प्रक्रियेच्या कामावर देखरेख करीत आहेत. कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा वेग वाढवण्यात आला नाही तर उर्वरीत मशीनच्या खरेदीबद्दल प्रशासनाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांची सौदा शक्ती वाढविणे गरजेचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मान्सून व बाजार या शेतकऱ्यांसमोरील समस्या आहेत. बाजारात एका बाजूने संघटित लोक असतात, तर दुसऱ्या बाजुला असंघटित शेतकरी. त्यामुळे तो गंडवला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांची खरेदी विक्री करण्याची सौदा शक्ती वाढविणे गरजेचे आहे, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले. शेतकऱ्यांचे उत्पादन केवळ दुप्पट करून चालणार नाही तर गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादन घेत त्यांचे मूल्यवृद्धी कशी होईल यासाठी गांभीर्याने विचार झाला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

कृषी विभाग, इंस्टिट्यूशन ऑफ अॅग्रिकल्चर टेक्नोलॉजिस्ट (आयएटी) यांच्यातर्फे शुक्रवारी भानुदासराव चव्हाण सभागृहात गट शेतीद्वारे गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादन, मूल्यवृद्धी, पणन व निर्यात या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख होते.

कुलगुरू डॉ. ढवण यांनी,'कृषी क्षेत्राने मोठा पल्ला गाठला आहे. दुष्काळ आला तरी भुकेची समस्या आता नाही, तर अन्नदाता म्हणून शेतकरी कसा उभा राहील, समृद्ध कसा होईल, कृषी व्यवसाय सन्मानाने कसा करता येईल, याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. 'मान्सून' व 'मार्केट' या शेतकऱ्यांसमोरील समस्या आहेत. बाजारात एका बाजुने संघटित लोक असतात तर दुसऱ्या बाजुला असंघटित शेतकरी. त्यामुळे तो गंडवला जातो. गट शेतीच्या माध्यमातून सामुदायिक प्रयत्न पूरक ठरतील,' असे सांगतानाच त्यांनी शेतकऱ्यांची खरेदी विक्री करण्याची सौदा शक्ती वाढविणे गरजेचे आहे, असे नमूद केले.

'अंमलबाजवणीची पुढील दिशा' या विषयावर बोलताना माजी कृषी आयुक्त उमकांत दांगट यांनी खरेदी विक्रीच्या बाजारापेठेच्या जात्यात शेतकरी हा भरडला जातो, असा आरोप केला. बाजार पेठेवर निर्बध नकोच, ती मुक्त असली पाहिजे, असे सांगतानाच अनेक कायदे, नियम हे कालबद्ध झाले आहेत. त्याचा आढावा घेत सुधारणा झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

डॉ. भापकर यांनी,'शेती उन्नत करण्यासाठी आणि शेतकरी समृद्ध होण्यासाठी शासनस्तरावर विविध योजना राबवण्यात येत असल्याचे सांगत काम अधिक गतिमान होणे आवश्यकत असल्याचे नमूद केले. माजी कुलगुरू डॉ. देशमुख यांनी गट शेतीची गरज विशद करतानाच विक्री व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचत्सांगितले. कार्यशाळेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, गोविंद हांडे, सुनील पवार, गणेश हिंगमिरे, डॉ. भगवान कापसे आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार अपघातात दोन मेहुणे जागीच ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

फुलंब्री तालुक्यातील पालफाटा येथे भरधाव कार (एम. एच. २०, डी. एम. ९०७६) झाडावर धडकून झालेल्या अपघातात दोन मेहुणे जागीच ठार झाले. सुनील विनायक काकडे (वय ३४, रा. अयोध्यानगर, औरंगाबाद) व जगन्नाथ फकिरबा बोडखे (वय ४०, रा. डोंगरगाव कवाड), अशी त्यांची नावे आहेत. या अपघातात भीमराव बोडखे हे गंभीर जखमी झाले आहेत.

दिवाळीसाठी माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी सुनील काकडे डोंगरगाव कवाड येथे गेले होते. ते हे पत्नीचा भाऊ जगन्नाथ बोडखे व भीमराव बोडखे यांच्यासोबत काही कामानिमित्त फुलंब्रीला आले होते. येथून परताना गुरुवारी मध्यरात्री हा अपघात झाला. महात्मा फुले रुग्णवाहिकेचे चालक विजय देवमाळी यांनी तिघांना औरंगाबाद येथे रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. भीमराव यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पोलिस निरीक्षक साम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोरगाव कासारी परिसरातून १६० ब्रास वाळूसाठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

तालुक्यातील बोरगाव कासारी परिसरात पूर्णा नदीपात्रातून बेकायदा उपसा केलेला सुमारे १६० ब्रास वाळूसाठा महसूल विभागाच्या पथकाने गुरुवारी जप्त केला. या वाळू साठ्याचा लिलाव करण्याचा निर्णय तहसील प्रशासनाने घेतला आहे.

अवैध वाळू उपसा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून मिळाल्यानंतर ही कारवाई केल्याचे मंडळाधिकारी संतोष धर्माधिकारी यांनी सांगितले. तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी धर्माधिकारी, निल्लोडचे तलाठी विजय चव्हाण, बोरगावचे तलाठी विजय राठोड व केऱ्हाळ्याचे तलाठी मनीष खरे यांनी ही कारवाई केली आहे. पिंपळगाव पेठ ग्रामपंचायतीने ठराव घेऊन गावांच्या हद्दीमधील पूर्णा नदीतून वाळू उपसा करण्यास मनाई केली आहे. त्यानंतर वाळू तस्करांनी बोरगाव कासारी व परिसरातील नदी पात्राकडे मोर्चा वळवला आहे. येथे बेसुमार वाळू उपसा केल्याने नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. या भागातील विहिरींची पाणीपातळीतही घट झाल्याने प्रशासनाविरुद्ध असंतोष पसरला होता. वाळू तस्करांवर लक्ष ठेऊन कायम कारवाई करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाण्यातून पळविलेला ट्रक हस्तगत

$
0
0

वाळूज महानगर : गंगापूरचे तहसीलदार अरुण जऱ्हाड यांच्या पथकाने चार नोव्हेंबर रोजी पकडून वाळूज पोलिस ठाण्यात जमा केलेला हायवा ट्रक रात्री चोरून नेला होता. तो शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे़ पोलिसांनी जयराम सोळस (रा़ सातारा) याला ताब्यात घेतले आहे. त्याने हा हायवा दीपक वाघमोडे (रा़ कांचनवाडी) यांच्या सांगण्यावरून तोंडापूर (ता़ जामनेर जि. जळगाव) येथे लपवल्याची माहिती दिली. त्यावरून तो हायवा पोलिसांनी ताब्यात घेतला

नारायणपूर शिवारात कारवाई करून बेकायदा वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक (क्रमांक एमएच २० ईजी ६७१८) महसूल पथकाने पकडून चालक मालकावर कारवाई करून वाळूज पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला़ दिवाळी सणानिमित्त हायवाचे लक्ष्मी पूजन करून परत आणतो, असे सांगून सोमवारी (पाच नोव्हेंबर) रोजी रात्री उशिरा हा ट्रक नेण्यात आला होता. नंतर तो परत न आनल्याने पोलिसांवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. यावर पकडलेला ट्रक सांभाळण्यासाठी महसूल विभागाचा माणूस असायला हवा, अशी भूमिका पोलिसांनी घेतली होती, मात्र तहसीलदार यांनी हायवा ठाण्यात जमा करून त्याची रीतसर पावती घेतली होती़ ट्रक चोरी जाण्यामागे पोलिसांचा हात होता का, याची चोकशी करण्यात येत आहे़ यावेळी पोलिस उपायुक्त ज्ञानोबा मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवीकुमार पवार, देवरे, बागूल, राजू वाघ, रवी बहुले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे़ जयराम सोळस याला गंगापूर न्यायालयात हजर केले असता १९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे़ हायवा ट्रकचा चालक व मालक बेपत्ता आहेत. वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार हे करत आहेत़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसभरात एक कोटी १५ लाखांची वसुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या विशेष वसुली आणि नियमितीकरण सप्ताहात शुक्रवारी दिवसभरात एक कोटी १५ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. त्यात मालमत्ता करापोटी ९९ लाख १० हजार आणि पाणीपट्टी पोटी १५ लाख ६९ लाख रुपयांचा कर वसूल झाला. विशेष म्हणजे महापालिकेला खुलताबाद उरुसाच्या निमित्ताने सुट्टी होती. सुट्टी असूनही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही वसुली केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात ३५ हजार शेततळी पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाची अनियमिता व त्यामुळे शेतकऱ्यांचे होणाऱ्या नुकसानीला उपाय म्हणून शासनने मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली असून, मराठवाड्यातील ३९ हजार ६०० या उद्दिष्टापैकी आतापर्यंत ३५ हजार ३४ शेततळे पूर्ण करण्यात आली आहेत. सर्वाधिक दहा हजार १८ शेततळे पूर्ण करून औरंगाबाद जिल्हा राज्यात अव्वल क्रमांकावर आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना मुबलक पाणी त्यांच्या जवळच असावे यासाठी शासनाने शेतकऱ्यांची गरज ओळखून मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. या योजनेला प्रारंभीपासून मोठा प्रतिसाद ‌मिळाला आणि शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेततळी तयार करून घेतले. राज्याच्या तुलनेत मराठवाड्यात पूर्ण करण्यात आलेली शेततळी ३६ टक्के आहेत. प्रारंभी या योजनेसाठी प्रथम अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र दुष्काळात अडकलेल्या शेतकऱ्यांना स्वत: पैसे खर्च करून शेततळी बांधावी लागली, तर शेततळी बांधल्यानंतरही अनुदान न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रशासनाकडे खेट्या माराव्या लागल्या होत्या.

गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या योजनेंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंत औरंगाबाद, जालना, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांनी टार्गेट पूर्ण केले आहे. नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची अद्यापही मोठी पिछाडी आहे. या नांदेडमध्ये ४७ टक्‍के, लातूरमध्ये ३९ तर उस्मानाबादमध्ये ६३ टक्केच काम पूर्ण झाले आहे. मराठवाड्यातील ३९ हजार ६०० शेततळे तयार करण्यासाठी १४७ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, यापैकी १४१ कोटी २४ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

\Bआता नवीन टार्गेटचे आव्हान

\Bमराठवाड्यात ३९ हजार शेततळ्यांचे टार्गेट जवळपास पूर्ण होत आले असल्याने शिवाय दुष्काळी परिस्थितीमुळे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी शेततळे पूर्ण करण्यासाठी नव्याने टार्गेट दिले आहे. मार्चपर्यंत विभागात तब्बल ४० हजार शेततळी पूर्ण करावी लागणार आहेत.

\Bअपूर्ण कामांना निधीची अडचण\B

जलयुक्त शिवार अभियान आणि मागेल त्याला शेततळे योजनेसाठी सरकारकडे निधीची कमतरता नाही, असे वारंवार आश्वासने देण्यात आली, मात्र नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील कामे निधीअभावी पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत लातूरसाठी सात कोटी ९८ लाख रुपये, नांदेडसाठी सात कोटी ९३ लाख, तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नऊ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी प्राप्त आहे. तिन्ही जिल्ह्यांनी प्राप्त निधीपैकी बहुतांश निधी खर्च केला आहे आता या जिल्ह्यांना अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी पाच कोटी १७ लाख रुपयांची आवश्यकता आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्याला एक कोटी ६१ लाख, लातूरला एक कोटी ५० लाख, तर उस्मानाबाद जिल्ह्याला दोन कोटी सहा लाख रुपयांची आवश्यकता आहे. या तुलनेत औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्‍ह्यांना टार्गेट अधिक असल्यामुळे त्या तुलनेत निधी मिळाला. मात्र, या जिल्ह्यांनी टार्गेट पेक्षा अधिकचे काम पूर्ण केले आहे. यामुळे अपूर्ण असलेल्या जिल्ह्यांची कामे केवळ निधीअभावी रखडली काय असा प्रश्न पडतो.

मागेल त्याला शेततळे

जिल्हा................. उद्दिष्ट...........पूर्ण शेततळी

जालना.................६०००.............७०९७

औरंगाबाद.............९१००.............१००१८

बीड....................६५००..............७१३१

हिंगोली.................२५००.............२५०५

परभणी..................३०००............२१४५

उस्मानाबाद.............३७००...........२३३१

नांदेड...................४०००............१९१०

लातूर....................४८००...........१८९८

एकूण..................३९६००...........३५०३४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीडिता पोलिसांत जाताच तरुण विवाहास राजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस भरतीसाठी औरंगाबादला आलेल्या एका तरुणीची शहरातील एक तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर सोबत होते. लग्न करण्यासाठी तयार होत नसल्याने अखेर तरुणीने पोलिस ठाणे गाठले. पोलिस ठाणे गाठताच तरुणाचे मनपरिवर्तन झाले आणि ते विवाहबंधनात अडकले.

नगर जिल्ह्यात राहणारी २० वर्षांची तरुणी पोलिस भरतीच्या तयारीसाठी औरंगाबादेत आली होती. प्रशिक्षण घेत असतानाच २०१७मध्ये तिची ओळख खाजगी बँकेत ऑडिटर पदावर कार्यरत असलेल्या २४ वर्षांच्या तरुणाशी झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून मुलीसोबत संबंध स्थापन केले. दोघेही एकाच जातीचे असल्याने कोणतीही अडचण न येता आपले लग्न होईल, असे तरुणीला वाटले. ते दोघे तब्बल एक वर्ष सोबत विविध ठिकाणी गेले. तरुणीने लग्नाचा विषय काढताच तरुणाकडून टाळाटाळ केली जात होती. यावरून दोघांमध्ये अनेकवेळा वादही झाले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी तरुणी गावाकडे निघून गेली.

नोव्हेंबर महिन्यात तरुणी पुन्हा औरंगाबाद परतली आणि तिने मुलाशी मोबाइलद्वारे संपर्क करत लग्नाच्या वचनाचे काय झाले? याबाबत विचारणा केली. नेहमीप्रमाणे तरुणाने लग्नास नकार देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याच्याकडे लग्नाची विनवणीही केली, परंतु तरुणाकडून नकार मिळत होता. अखेर संतापलेल्या तरुणीने शनिवारी (१७ नोव्हेंबर) सिडको पोलिस ठाणे गाठले. पोलिस अधिकाऱ्याला घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणात सिडको पोलिसांनी तरुणीला हर्सुल पोलीस ठाण्याला पाठविले.

तरुणी पोलिस ठाण्यात पोचत असल्याची माहिती तरुणाला मिळाली. आता आपल्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यासाठी येत असल्याची माहिती त्याला मिळाली. त्याने तरुणीला फोनवरून संपर्क साधला व टोकाचे पाऊल न उचलण्याची विनंती केली. त्यानंतर तरुणीने आपल्या कुटुंबीयांना औरंगाबादला बोलावून घेतले. मुलानेही आपल्या कुटुंबीयांना औरंगाबादला बोलाविले. दोघांच्या भविष्याचा विचार करून चांगला निर्णय घेण्याचा सल्ला पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिला. दोन्ही कुटुंबीयांत दीर्घ चर्चा झाली. दोन्ही बाजुंनी सामंजस्याची भूमिका घेत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लवकरच नोंदणी पद्धतीने लग्न लावले जाईल, असेही ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याचे घर फोडून रोख, दागिने लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात दिवाळीनंतरही घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. रामनगरातील घटना ताजी असतानाच, याच परिसरातील स्वराजनगरात शिरलेल्या चोरांनी शेतकऱ्याचे घर फोडून रोख आणि दागिन्यांसह भांडेही लांबवले. हा प्रकार १३ ते १६ नोव्हेंबर यादरम्यान घडला.

मुळचे जळगाव जिल्ह्यातील श्रीराम मनसुब राठोड (७०, रा. पी. के. अण्णा पाटील शाळेजवळ, मूळ भालखेडा, ता. जामनेर) हे शेतात बोअर खोदण्याच्या कामासाठी पैसे हवे असल्याने १३ नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास घराला कुलूप लावून गेले होते. त्यांची पत्नी जामनेरला १२ रोजीच गावी गेली होती. घरी कोणीही नसल्याचा फायदा उचलत चोरांनी दरवाजाच्या बाजूचा पत्रा कापून घरातील ५०० ग्रॅमचे चांदीचे दंड, सोन्याची पोत, २० हजारांची रोकड, पितळ, तांबे आणि स्टीलचे डबे लांबवले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घरी परतलेल्या राठोड दाम्पत्याच्या निदर्शनास आला. त्यावरून त्यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान... बँकावर सायबर दरोड्याची भिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बँकांवर पडणाऱ्या सायबर दरोड्याच्या शक्यतेमुळे औरंगाबादसह राज्यातील सायबर पोलिसांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहे. या विभागातील अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. या प्रशिक्षात प्रकरण कसे हताळावे? यासह आरोपी शोधण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन मुंबईत करण्यात आले असल्याची माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली आहे.

जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बसून सायबर गुन्हेगार डल्ला मारू शकतात. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहर आणि महाराष्ट्रात सर्वाधिक सायबर गुन्हे घडले आहेत. याअनुषंगाने देशातील नामांकित सरकारी बँक म्हणून ओळखली जाणारी बँक ऑफ इंडियातर्फे महाराष्ट्र पोलीस खात्यातील ३५ निवडक पोलिस अधिकाऱ्यांना सायबर गुन्ह्यांसंदर्भात प्रशिक्षण देणारी कार्यशाळा नवी मुंबईत येथे घेण्यात आली. या प्रशिक्षणात औरंगाबादसह राज्याच्या अन्य शहरातील पोलिस अधिकारी यांनी सहभाग नोंदविला. या वेळी तपासाच्या पद्धती आणि गुन्हा घडल्यानंतर आरोपी शोधण्यासह तांत्रिक पुरावे जमा करण्याबाबत मार्गदर्शन केले.

असे पडले सायबर दरोडे

इस्लामिक स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या संगणक प्रणालींवर सायबर लुटारूचा हल्ला, कॉसमॉस बँक दरोडा प्रकरणात सिल्लोड येथून दोन तरुणांना अटक करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज कौशल्य विकास नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आमदार अतुल सावे यांच्या पुढाकाराने तरुण, तरुणी व महिलांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी रविवारी (१७ नोव्हेंबर) इच्छुकांची नोंदणी केली जाणार आहे. पुंडलिकनगर येथील तिरुमला मंगल कार्यालयात सकाळी दहापासून नोंदणी सुरू होणार आहे. यामध्ये इंग्लिश स्पिकिंग कोर्स, बेसिक कंम्प्युटर कोर्स, टॅली, महिलांसाठी शिवणकाम, कापडी पिशवी, सेल्स नमॅनेजर, शो रूम मॅनेजर, रिटेल मॅनेजर, अकाउंट असिस्टंट आदी प्रशिक्षण दिले जाणार आहे. उमेदवारांनी येताना आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स, दोन पासपोर्ट फोटो आणावेत. जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनी, महिला बचत गटांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आमदार सावे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोधनकर स्मृती पुरस्कार आज प्रदान करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांना आज स्वातंत्र सेनानी श्यामराव बोधनकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. वसंतराव नाईक कॉलेजमध्ये सायंकाळी पाच वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा सुरू होईल.

ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी ना. वि. देशपांडे यांच्या हस्ते या पुरस्कार प्रदान केले जाणार असून, ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव शहाजी भोसले यांना प्रोत्साहनपर पुरस्कार, तर हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या डॉ. शुभांगी अहंकारी यांना इंद्रायणी बोधनकर स्मृती पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कार्यक्रम मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, संयोजक राजाराम राठोड, डॉ. राघवेंद्र चाकूरकर व डॉ. उर्मिला चाकूरकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमानंद गज्वी आज ‘साक्षात’मध्ये

$
0
0

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या 'साक्षात' कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मसापच्या सभागृहात रविवारी सायंकाळी सहा वाजता गज्वी आपल्या लेखन प्रवसाबद्दल आणि वाड्मयीन भूमिकेबद्दल विचार मांडणार आहेत. त्यानंतर साहित्य रसिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह दादा गोरे, उपाध्यक्ष किरण सगर, कोषाध्यक्ष देवीदास कुलकर्णी आणि कार्यक्रम समितीचे अध्यक्ष रामचंद्र काळुंखे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाकडे कराची ८३ लाखांची थकबाकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्ता कर थकल्यामुळे महापालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाला मालमत्ता सील करण्याची नोटीस बजावली आहे. विद्यापीठाचा समावेश महापालिकेच्या झोन क्रमांक एक कार्यालयात होतो. या कार्यालयाचे झोन अधिकारी भालचंद्र पैठणे यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले,'विद्यापीठाकडे मालमत्ता कराची ८३ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी भरण्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाला वेळोवेळी पत्र देण्यात आले, पण त्याला विद्यापीठाने प्रतिसाद दिला नाही. विद्यापीठाने सामान्य कर भरला आहे, पण अन्य कर भरलेला नाही. या कराची थकबाकीच ८३ लाख रुपये आहे. थकबाकी भरा अन्यथा मालमत्ता सील करू, अशी नोटीस विद्यापीठाला बजावण्यात आली आहे. विद्यापीठाच्या ३८ मालमत्ता आहेत. त्यांचा हा कर आहे. येत्या एक - दोन दिवसांत थकबाकी न भरल्यास काही मालमत्ता सील केल्या जातील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीरामकृष्ण ध्यान मंदिराचे लोकार्पण उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रामकृष्ण मिशन आश्रमने बीड बायपास रोडवर उभारलेल्या श्रीरामकृष्ण ध्यान मंदिराचा लोकार्पण सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने पार पाडला. वेदशास्त्रसंपन्न पुरोहितांच्या मंत्रजपाने, देश-विदेशातून आलेल्या साडेतीनशे साधू, संत-महंताच्या आर्शीवादाने व हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री रामकृष्णांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याप्रसंगी संपूर्ण परिसरात रामकृष्णांचा जयघोष निनादत होता. पर्यटननगरी असलेले औरंगाबाद शहर आता या मंदिराच्या नावानेही ओळखले जातील, प्रेरणा देण्याचे काम या मंदिरा माध्यमातून होईल, असे प्रतिपादन यावेळी वक्त्यांनी केले. श्रीरामकृष्ण ध्यान मंदिर उभारणीसाठी तब्बल नऊ वर्षे लागली असून, त्यासाठी २८ कोटी खर्च आला आहे. हे मंदिर सार्वजनिक असल्यामुळे ते सर्व धर्मांतील स्त्री, पुरुषांसाठी मंदिर खुले असणार आहे.

पहाटे पाच वाजता मंगल आरतीने श्रीरामकृष्ण ध्यान मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला सुरुवात झाली. प्रार्थना, ध्यानधारणा व पूजा झाल्यानंतर देशविदेशातून आलेल्या साधू, संत-महंतांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर स्वामी वागीशानंद महाराज यांच्या हस्ते कलशाभिषेक करण्यात आला. त्यानंतर स्वामी शांतात्मानंद महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा पूजा करण्यात आली. त्यानंतर मुख्य सभा मंडपात सकाळी दहा वाजता सभेला सुरुवात झाली. स्वामी वागीशानंद महाराज, स्वामी शिवमयानंद महाराज, स्वामी गौतमानंद महाराज, स्वामी योगात्मानंद महाराज, स्वामी बलभद्रानंद महाराज, स्वामी पितांबरानंद महाराज, स्वामी विष्पुपादानंद महाराज, महापौर नंदकुमार घोडेले, राजेंद्र बारवाले यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी रामकृष्ण मिशन औरंगाबादचे सचिव स्वामी विष्षुपादानंद महाराज यांनी मंदिर उभारणीबाबत माहिती दिली. या अभूतपूर्व मंदिरामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. या मंदिर उभारणीमागे अनेकांचे हात आहे. देणगी देणारे, स्वत: उभे राहून श्रम करणारे आणि मंदिर निर्माणासाठी अहोरात्र झटणाऱ्यां सहकार्यांमुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद करतानाच मंदिर सर्वांसाठी असल्याचे सांगितले.

\Bशहराच्या वैभवात भर\B

महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले की, औरंगाबाद शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. या मंदिरामुळे त्यात प्रथम भर पडली आहे.

\Bमहाराष्ट्राची शौर्य पंरपरा\B

सायंकाळी महाराष्टाची अद्वैत भक्ती आणि शौर्य परंपरा या विषयावर आधारीत नाट्य, रुपक सादर करण्यात आले. यात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, संत तुकाराम आदी संतांची चरित्रे, त्यांचे कार्य, त्यांच्या रचना नृत्य, गीत, संगीत, भजन; तसेच नाट्य रुपाने कलाकारांनी सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images