Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शेततळ्यांचा ‘हत्ती गेला अन् शेपूट राहिले’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रभावीपणे राबवण्यात येत असलेल्या 'मागेल त्याला शेततळे' या योजनेसाठी सरकारने १४७ कोटी रुपये खर्च केले, मात्र टार्गेटपैकी अद्यापही चार हजार ५६६ शेततळे अपूर्ण आहेत. यासाठी २७ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे विभागातील शेततळ्यांचे कामांची 'हत्ती गेला आणि शेपूट राहिले' अशी अवस्था झाली आहे.

जलयुक्त शिवार अभियान आणि मागेल त्याला शेततळे योजनेसाठी सरकारकडे निधीची कमतरता नाही, असे सरकारकडून वारंवार सांगण्यात येते. गेल्या तीन वर्षांत ३५ हजार शेततळी पूर्ण करण्यासाठी शासनाने दिलेल्या निधीपैकी १४१ कोटी खर्च करण्यात आले, मात्र केवळ २७ कोटी रुपयांसाठी साडेचार हजार शेततळ्यांचे काम रखडले आहे. प्रत्येक जिल्ह्यांना निर्धारित टार्गेट देण्यात आले असले, तरी काही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी शेततळ्यांसाठी अर्ज केले होते. शासनाने या अधिकच्या शेततळ्यांनाही मंजुरी दिली आहे. अशा जिल्ह्यांचाही निधीच्या मागणीत समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दहा हजार १८ शेततळे तयार केली असली, तरी शेततळ्यांच्या पूर्ण कामासाठी याच जिल्ह्याला सर्वाधिक सात लाख रुपयांची आवश्यकता आहे. सध्या मराठवाड्यात दुष्काळी स्थितीमुळे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी शेततळे तयार करण्यासाठी नव्याने टार्गेट देण्यात आले आहे, मात्र अद्याप सध्या असलेले टार्गेटच पूर्ण नसल्यामुळे पुढचे पाठ आणि मागचे सपाट अशी अवस्था झाली आहे. पिछाडीवर असलेल्या नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील कामे निधीअभावी पुढे सरकत नाहीत, मात्र या जिल्ह्यांनाही नवीन यादीमध्ये टार्गेट देण्यात आले आहे. विषेश म्हणजे मार्च अखेरीस प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शेततळे पूर्ण करायची आहेत. आतापर्यंत लातूरसाठी सात कोटी ९८ लाख रुपये, नांदेडसाठी सात कोटी ९३ लाख, तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नऊ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी प्राप्त आहे. तिन्ही जिल्ह्यांनी प्राप्त निधीपैकी बहुतांश निधी खर्च केला आहे.

१४१ कोटी खर्च

मराठवाड्यात ३९ हजार ६०० शेततळ्यांपैकी आतापर्यंत ३५ हजार ३४ शेततळे पूर्ण करण्यात आली असून, यासाठी १४१ कोटी २४ लाख रुपये खर्च करण्यात आली आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ४० कोटी ४० लाख, जालना ३० कोटी ७३ लाख, बीड २६ कोटी ५६ लाख, हिंगोली दहा कोटी आठ लाख, परभणी आठ कोटी १८ लाख, उस्मानाबाद नऊ कोटी ५६ लाख, नांदेड सात कोटी ७४ लाख तर लातूर जिल्ह्यामधे सात कोटी ९७ लाख रुपये असे एकूण १४१ कोटी २४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

अपूर्ण कामांसाठी आवश्यक निधी\B

जिल्हा..................... आवश्यक निधी

औरंगाबाद.................७ लाख ८ हजार

जालना.....................४ लाख ७४ हजार

बीड.........................५ लाख ३४ हजार

हिंगोली......................२ लाख ४३ हजार

परभणी......................२ लाख ५२ हजार

उस्मानाबाद.................२ लाख ६ हजार

नांदेड........................१ लाख ६१ हजार

लातूर.........................१ लाख ५० हजार

एकूण.........................२७ लाख ३२ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निधीअभावी दर्जेदार संशोधनाला भारतात खीळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'इन्स्पायर शिबिर आयोजित करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संशोधन संस्थेत संशोधन करण्यास प्रेरणा देणे हे सामाजिक दायित्व आहे. निधी नसल्यामुळे भारतात दर्जेदार संशोधन होत नाही,' असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. ते 'इन्स्पायर' शिबिराच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या इन्स्पायर शिबिराचा रविवारी समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे व मंगलोर येथील डॉ. भारती प्रकाश यांची प्रमुख उपस्थिती होती. 'देशाचे मोठेपण विद्यापीठाच्या मोठेपणावर व विद्यापीठाचे मोठेपण संशोधनावर अवलंबून असते. जागतिक पातळीवर अमेरिका, फ्रान्स, कोरिया, जर्मनी, जपान राष्ट्रात संशोधनावर प्रचंड खर्च केला जातो. त्या तुलनेत भारतात नगण्य तरतूद केली जाते. त्यामुळे एक-दोन उदाहरणे सोडली, तर भारत जागतिक संशोधनात अत्यंत मागे आहे. निधीअभावी भारतामध्ये दर्जेदार संशोधन होत नाही,' असे चोपडे म्हणाले.

मंगलोर येथील शास्त्रज्ञ डॉ. भारती प्रकाश यांनी विद्यार्थ्यांनी देशातील वेस्ट मॅनेजमेंटवर काम करून शहरातील प्रश्न सोडवावे. कचऱ्याचे रूपांतर खतामध्ये व बायोगॅसमध्ये वेगाने करून ऊर्जा निर्मिती करता येईल. याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. मानवाला होणारे रोग, सौंदर्य व औषधी, खराब तेलाचा पुनर्वापर, खाण्याचे रंग व जैविक घड्याळ यावर संशोधन करावे असा सल्ला दिला. यावेळी कुलगुरूंनी विज्ञान स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान केले. डॉ. गुलाब खेडकर यांनी कार्यक्रमाचे संचलन केले आणि डॉ. विक्रम खिलारे यांनी आभार मानले.

\Bप्रवेशाबद्दल मार्गदर्शन \B

आयआयएसआर, आयआयएससी, आयआयएसटी, आयआयटी, एनआयटी, एनबीआरसी, बीएआरसी, इस्रो, आयसीएआर, मिलिस्ट्री इंजिनिअरिंग अशा विविध राष्ट्रीय संशोधन संस्थेतील प्रवेशाबाबत शिरपूर येथील फार्मसीचे प्रा. डॉ. विवेकानंद चटप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी उपसा थांबविण्याची तहसीलदारांकडे मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

हळदा डकला शिवारातील साठवण तलावातून होत असलेल्या अवैध पाणी उपशाकडे तहसीलदारांनी नेमलेल्या पथकाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पथकाचे असे दुर्लक्ष राहिल्यास परीसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. याप्रकरणी तहसीलदारांनी गंभीर दखल घेऊन पथकाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

हळदा डकला तलावात सध्या पाणी आहे. या पाण्यावर या परिसरातील गावांची भिस्त आहे. टंचाई काळात या पाण्याची गरज भासणार आहे, मात्र सध्या या तलावातून पाण्याचा अवैध उपसा सुरू आहे. ग्रामपंचायत कार्यालयाने हा पाणी उपसा थांबविण्याची मागणी तहसीलदारांकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन तहसीलदारांनी पाण्याचा अवैध उपसा होऊ नये म्हणून त्यावर नियंत्रण राहावे म्हणून एक पथक तयार केले. त्यात लघू पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता जी. पी. भांड, मंडळअधिकारी रमंडवाल, तलाठी महेश बडके, महावितरणचे कनिष्ठ अभियंता एस. एस. सोन्ने, ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष यांचा सामावेश करण्यात आला होता. हा पाणी उपसा रोखून पाणी संरक्षण करावे, तसा अहवाल सादर करण्याबाबत १९ ऑक्टोबरला समितीला पत्र दिले होते, मात्र समितीने काहीच केले नसल्याचा आरोप बाजार समितीचे संचालक ईश्वर जाधव यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलाग्राममधील प्रदर्शनात आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील कलाग्राममध्ये सुरू असलेल्या इंडएक्सपो या प्रदर्शनातील एका स्टॉलला आग लागल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या आगीमुळे धावपळ उडाली. नागरीकांनी दाखवलेल्या प्रसंगावधाने ही आग आटोक्यात आली. वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

कलाग्रामच्या परिसरात लघू उद्योजकांचे इंडएक्सपो नावाने गेल्या तीन दिवसापासून प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनामध्ये अनेक उद्योजकांनी त्यांच्या उत्पादनाची माहिती देण्यासाठी स्टॉल थाटले होते. रविवारी या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. या प्रदर्शनामध्ये गॅस सुरक्षेची साधने असलेल्या एका कंपनीचा देखील स्टॉल होता. दुपारी चारच्या सुमारास या स्टॉलमधील गॅसचा अचानक भडका उडाल्याने स्टॉलच्या मंडपाला आग लागली. स्टॉलधारकाने तातडीने इतरांच्या मदतीने तेथे असलेल्या आग विझवण्याच्या साधनाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाचा बंब देखील घटनास्थळी दाखल झाला. काही वेळात ही आग विझवण्यात आली. या आगीमध्ये स्टॉलमधील मशनरी जळाल्याने नुकसान झाले. आगीची घटना घडल्यामुळे हे प्रदर्शन बंद पडल्याने आयोजकांचे मात्र नुकसान झाले.

\Bअनर्थ टळला\B

या प्रदर्शनाचा रविवारी शेवटचा दिवस होता. प्रदर्शन पाहण्यासाठी सुमारे ५०० ते ६०० जण आले होते. यामध्ये महिला लहान मुलांचा देखील समावेश होता. स्टॉलला आग लागल्याने धावपळ उडाली. प्रवेशद्वार देखील एकच असल्याने सर्व जण घाबरून गेले. तेथे प्रदर्शन बघण्यासाठी आलेले ज्ञानेश्वर ढाकणे आणि सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत लाथा मारून तेथील बॅरिकेटस तोडले. यानंतर बरेच जण त्या मोकळ्या जागेतून बाहेर पडल्याने बचावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा खून करून पतीचे पलायन

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माहेरी राहण्यासाठी आलेल्या पत्नीचा गळा आवळून पतीने खून करूत पोबारा केला. चिकलठाणा भागातील सावित्रीनगरमध्ये हा प्रकार घडला रविवारी सकाळी उघडकीस आला. संगीता सुनील घोडके (वय २१) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सावित्रीनगर भागातील संगीताचा विवाह शिर्डी येथील सुनीलसोबत झाला होता. गेल्या आठ महिन्यांपूर्वी संगीता माहेरी राहण्यासाठी आली हेाती. तिच्या पाठोपाठ सुनीलने देखील औरंगाबाद गाठले होते. संगीताच्या माहेरी असलेल्या घराजवळ एक खोली करून दोघे राहत होते. त्यांना अडीच वर्षांची मुलगी आहे. सुनील शनिवारी रात्री घरी आला. मध्यरात्री त्याने संगीताला बेदम मारहाण करीत गळा आवळून तिचा खून केला. संगीताची आई शांताबाई रोजेकर या रविवारी संगीताच्या खोलीवर गेल्या असता, त्यांना संगीता मृतावस्थेत आढळली. तिच्या तोंडून फेस येत होता; तसेच डाव्या डोळ्याजवळ व पायाला जखम होती. तिला तातडीने घाटी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तिचा पती सुनील पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनुष्यसेवा हीच इश्वरसेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रत्येक मनुष्यामध्ये परमात्मा बसलेला असतो. त्यामुळे प्रत्येक मनुष्याची केलेली सेवा ही श्रेष्ठ असून हीच ईश्वरसेवा असते, असे प्रतिपादन श्री रामकृष्‍ण मिशनचे उपाध्यक्ष श्रीमंत स्वामी गौतमानंदजी महाराज यांनी केले.

श्री रामकृष्‍ण मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमामध्ये रविवारी (१८ नोव्हेंबर) शेवटच्या दिवशी रामकृष्‍ण भक्त संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गौतमानंदजी महाराज यांनी आशिर्वचन दिले. प्रत्येक हृदयामध्ये परमात्मा आहे, असे गीतामध्ये म्हटले असल्याचे उदाहरण देत स्वामी गौतमानंद म्हणाले की, 'प्रत्येक आई आपल्या मुलाला दूध पाजते तेव्‍हा ती असे समजते की, गोपालाला दूध पाजते आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरही आपल्या रुग्‍णांचा इलाज करत असताना इश्वरसेवाच करत असतो. प्रत्येक कर्मामध्ये व प्रत्येक ठिकाणी इश्वराचा वास असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण देवाला पाहिले पाहिजे. मनुष्यरुपी केलेली सेवा ही शरीर, मन, रुपाची सेवा नसून त्यामध्ये बसलेल्या इश्वराची सेवा आहे.

यावेळी रामकृष्‍ण मिशन मंदिराचे सचिव स्वामी विष्‍णुपादानंदजी महाराज यांनी प्रथम स्वामी गौतमानंदजी महाराज यांचे स्वागत केले. यावेळी स्वामी विष्‍णुपादानंदजी महाराज यांनी तीन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या या भव्य मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या आयोजनाबाबत विविध राज्यातुन आलेल्या भक्तांनी औरंगाबादकरांचे कौतुक केले असल्याचे सांगितले. रामकृष्‍ण भक्त संमेलनामध्ये मूर्तीपूजेचे रहस्य, ज्ञान काय आहे? तसेच भक्तीयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग, कर्मयोग आदी विषयांवर संन्यासी वक्‍त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संमेलनामध्ये सकाळी साडेआठ वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 'भक्तवत्सल श्रीरामकृष्‍ण' या विषयाला धरून अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातून हुडहुडी गायब; थंडीची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराचे १३ अंश सेल्यियस पेक्षा कमी झालेले किमान तापमान आता अचानक १५ अंशावर गेल्यामुळे शहरात काही प्रमाणात सुरू झालेली थंडी गायब झाली आहे. त्यामुळे गुलाबी थंडी सुरू होण्याच्या मानसिकतेमध्ये असलेल्या नागरिकांना थंडीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शुक्रवारी १२.५ अंश असलेल्या किमान तापमानात रविवारी वाढ होऊन ते १५ अंश सेल्यियसवर पोचले. कमाल तापमानातही वाढ होऊन ते ३४.८ अंशावर पोचले.

दिवााळीनंतर शहराचे तापमान १२ ते १३ अंशापर्यंत घसरल्यामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. मात्र आता किमान तापमानात वाढ झाली असल्याने सकाळी व काही प्रमाणात संध्याकाळी जाणवणारी हुडहुडीही गायब झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपासून शहरात थंडी जाणवण्यास सुरुवात झाली होती. दिवाळीनंतरही काही प्रमाणात वातावरणामध्ये गारवा होता. शनिवारी शहराचे किमान तापमान १३.७ अंश सेल्यियस होते, मात्र रविवारी किमान तापमानामध्ये दोन अंश, तर कमाल तापमानामध्येही दोन अंश सेल्यियसने वाढ झाल्यामुळे थंडी कमी झाली आहे.

\Bशहराचे तापमान \B

दिनांक......... किमान तापमान

१२ नोव्हेंबर....... १३.००

१३ नोव्हेंबर..........१२.४

१४ नोव्हेंबर..........१२.४

१५ नोव्हेंबर..........१२.४

१६ नोव्हेंबर..........१२.५

१७ नोव्हेंबर..........१३.७

१८ नोव्हेंबर..........१५.०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याच्या कामामुळे धुळीचा त्रास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सध्या अजिंठा-बुलडाणा रस्त्याचे काम सुरू आहे, परंतु या कामामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या रस्त्यावर वाहनांची रहदारी अधिक आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना धुळीच्या समस्येला सामोरे जावे लागते. वाहनांच्या उडणाऱ्या धुळीमुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे.

या रस्त्यावर वाहनांमुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडते. दुचाकी, चारचाकी वाहनांना समोरून, मागून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे केव्हाही अपघात घडू शकतो. या अपघातांना जवाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांपुढे आहे. दुसरी बाब म्हणजे रस्त्यावर पुलाचे काम केले आहे. त्याठिकाणी खड्डे पडलेले दिसून येत आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात घडू शकते. अजिंठा-बुलडाणा राज्य मार्गाचे दुहेरी महामार्गात रुपांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने काँक्रिटीकरण करण्यात येत आहे, मात्र अतिशय संथगतीने काम सुरू असल्याने व रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.

अजिंठा ते बुलडाणा हा सुमारे ५५ किलोमीटर रस्ता खोदून ठेवण्यात आला असून, त्यावर मुरूम टाकण्यात आले आहे. या मुरमावरूनच वाहतूक सुरू आहे. मोठी वाहने धावतात, तेव्हा प्रचंड धूळ उडून समोरचे वाहन काही काळासाठी दिसेनासे होत असते. प्रसंगी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. रस्त्याचे खोदकाम करून मुरूम टाकण्यात आला असला, तरी या कच्च्या रस्त्यावर पाणी मारले जात नाही.

\Bधुळीमुळे होते श्वसनाची क्षमता कमी

\Bधूळ श्वासावाटे शरीरात जाते. त्यानंतर धूलिकण श्वसनसंस्थेत जमा होतात. हे धूलिकण श्वसनातून शरीरात, फुप्फुसात, श्वसननलिकेत जातात. अॅलर्जीचा त्रास असणाऱ्यांना सर्दी, खोकला, कफ होणे, धाप लागणे असे त्रास होतात, तर काहींना सर्दी, खोकला आणि घशात दुखणे असे त्रास होत आहेत. या धूलिकणाचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे श्वसनाची क्षमता कमी होत जाणे होय.

\Bरस्त्या शेजारील कपाशीचे नुकसान

\Bसुरू असलेले काम व त्यावरून होणारी सततची वाहतूक यामुळे दिवसभर धूळ उडत असते. परिणामी रस्त्या शेजारी असलेल्या शेतातील कपाशीवर याचा वाईट परिणाम होत आहे़ कपाशीवरील बोंडांवर धुळीचा थर साचल्याने पांढरी शुभ्र कपाशी काळवंडत आहे़ परिणामी बाजारात गेल्यावर या मालाला कमी भाव मिळणार; तसेच नवीन पात्या फुटणे सुरू आहे. त्याच्या वाढीवरही परिणाम होत आहे़ सुरू असलेले काम कंत्राटदाराने आपल्या नियोजित वेळतच पूर्ण करावे मात्र नागरिकांना व शेतकऱ्यांना त्रास होणार नाही़ याची खबरदारी घेऊनच काम करावे व दिवसातून दोनदा या मुरूमावर पाणी टाकावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे़.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकसभेची निवडणूकलढविण्यास इच्छुक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

औरंगाबाद मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली तर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड 'मटा'शी बोलताना सांगितले.

दृष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी डॉ. कराड औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करत आहे. शेतकरी व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून अपेक्षित उपाययोजनांबाबत माहिती संकलित करून सदर पाहणी अहवाल थेट मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत. डॉ. कराड यांनी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, जिल्हा परिषद सदस्य किशोर नारायणराव पवार, संजय गव्हाणे, काकासाहेब तायडे, सुरेश गुजराणे, सुनील ढोले यांच्यासह तालुक्यातील निमडोंगरी, हतनूर, बनशेंद्रा व अंधानेर या शिवारात फिरून दुष्काळ व उपाय योजना यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधला. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पात इस्त्रायलच्या सहाय्याने जायकवाडी प्रकल्पातील पाणी कृषी सिंचनासाठी शिवना-टाकळी प्रकल्पात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून, 'नदीजोड प्रकल्पांतर्गत तापी खोऱ्यातील उर्वरित पाणी सिंचनासाठी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रर्यत्नशील राहू,' असे त्यांनी स्पष्ट केले.

कन्नडमार्गे औरंगाबाद ते चाळीसगाव लोहमार्गासाठी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा झाल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. हतनूर येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमासाठी सरपंच वैशाली काळे, उपसरपंच रघुनाथ गायकवाड, भाजप जिल्हा उपाध्यक्ष खंबायते, काकासाहेब तायडे, प्रा. संजय गव्हाणे, ग्राम पंचायत सदस्य विलास काळे, कैलास अकोलकर, शेख कादर, संतोष करवंदे यांच्यासह डॉ. रवींद्र काळे, लक्ष्मण केरे, गणेश नलावडे, संतोष जाधव, कारभारी जाधव, आप्पाराव जाधव यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्तिकी एकादशीनिमित्त आज कीर्तन आयोजित

$
0
0

औरंगाबाद: श्री स्वामी समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कार्तिकी एकादशी निमित्त गीता व विष्‍णुसहस्‍त्रनाम पठण तसेच त्यानंतर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. समर्थनगर येथील श्री राम मंदिर येथे दुपारी साडेतीन ते साडेपाच वाजेदरम्यान गीता व विष्‍णुसहस्‍त्र नाम पठण होणार असून संध्याकाळी साडेपाच ते साडेपाच वाजेदरम्यान ह.भ.प. श्रीपाद मुळे गोंदीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतिने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेहंदी पलायन कटातील आरोपीचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुख्यात गुन्हेगार व सुपारी किलर इम्रान मेहंदीला पोलिस संरक्षणातून पळवून नेण्याच्या कटात सहभागी असलेला आरोपी शेख सद्दाम शेख इमाम याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. भालेराव यांनी फेटाळला. या प्रकरणात एकूण १६ आरोपींना अटक करण्यात आली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

सुपारी किलर इम्रान मेहंदीला साथीदार हबीब खालेद हबीब मोहम्मद उर्फ खालेद चाऊस व मोहम्मद शोएब मोहंमद सादेक हे कट रचून पोलिस संरक्षणातून पळवून नेणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याआधारे २७ ऑगस्ट २०१८ रोजी गुन्हे शाखा पोलिसांनी नारेगाव चौकात सापळा रचून दहा जणांना पकडले. त्यावेळी त्यांच्याकडून एक पिस्तूल, काडतुसे, दोन कार व मोबाइल जप्त करण्यात आला होता. यातील एकाने गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकावर पिस्तूल रोखले होते. या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन १६ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली केली.

प्रकरणामध्ये पोलिसांनी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपी शेख सद्दाम शेख इमाम (२८, रा. युनूस कॉलनी, कटकटगेट) याने नियमित जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीवेळी, आरोपीविरुद्ध सबळ पुरावे असून, तो कुख्यात गुन्हेगार इम्रान मेहंदी याला पोलिसांच्या ताब्यातून पळविणार होता. त्यासाठीच तो पोलिसांच्या हालचालीची माहिती सहआरोपींना देत होता, असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. मध्य प्रदेशमधून बोलविण्यात आलेल्या आठ शार्प शूटर आरोपींच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्थादेखील आरोपी शेख सद्दाम याने केली होती. त्यामुळे आरोपी शेख सद्दाम हा मेहंदीला पळविण्याच्या कटातील मुख्य सूत्रधार आहे. त्याला जामीन मंजूर केल्यास तो पुरावे नष्ट करू शकतो व तो पसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोपीचा नियमित जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या मुलांना कपडे-खाऊचे वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा परिसरातील डॉ. हेडगेवार पब्लिक स्कूलमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा दसरा तसेच दिवाळी सण उत्सवात साजरा व्हावा यासाठी शहरातील काही नागरिकांनी पुढाकार घेतला. दोन वर्षांपासून या मुलांसाठी धडपडणाऱ्या सुनंदा आचवल यांच्यासोबत यंदा इतरांनी या मुलांची दिवाळी रंगतदार करण्याचा प्रयत्न केला.

वेगवेगळे सण, वाढदिवसाचे निमित्त साधून आचवल या दोन वर्षांपासून विविध छोटे-मोठे कार्यक्रम-उपक्रम घेत आहेत. यंदा रक्षाबंधनानिमित्त ६० मुलींना नवीन कपडे, दसऱ्याला ७० मुलांना टी-शर्ट व पँट देण्यात आल्या. नवरात्रोत्सवात एका संध्याकाळी मुलांना कचोरी-गुलाबजाम, तर दसऱ्याला आम्रखंड देऊन जेवणातील गोडी वाढवली. ७० मुलांचे माप घेऊन पँट शिवून देण्याचे काम 'युनिव्हर्सल ट्रेडर्स'चे सय्यद यांनी केले. याकामी डॉ. शैलेंद्र आचवल, कुमुदिनी देशपांडे, आमोद बसोले यांनी अर्थसाह्य केले. त्याचवेळी वैदेही काळे (पुणे), मनीषा जोशी, शुभांगी मोघे, सुमेधा देशपांडे, मीरा सहस्त्रबुद्धे, श्रीमती थत्ते, अनघा जोशी, कुंदा बोर्डे तसेच वृंदावन डेअरीने आपापल्या परीने हातभार लावला. चेरेकर यांनी शाळेतील मुलांना खाऊ दिला. या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी श्री साई ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे अध्यक्ष श्यामसुंदर कनके यांनी समन्वय साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौशल्य विकास अभियान; हजार तरुणांची नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजप आमदार अतुल सावे यांच्या वतीने रविवारी गारखेडा परिसरातील तिरुमला मंगल कार्यालयात मोफत कौशल्य विकास नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानात औरंगाबाद पूर्व मतदार संघातील एक हजार तरुण-तरुणींनी नाव नोंदणी केली.

या योजने अंतर्गत सर्व बेरोजगारांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये इंग्लीश स्पिकिंग कोर्स, बेसिक शिवणकाम, हँड एम्ब्रॉयडरी, संगणक, रिटेल सेल्स आदी कोर्सचा समावेश आहे. आमदार अतुल सावे यांनी या योजनेची माहिती दिली. महापालिकेचे प्रकल्प व्यवस्थापक भरत मोरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बोरडे यांनी केले, तर विवेक राठोड यांनी आभार मानले. यावेळी कौशल्य विकास प्रशिक्षण नोंदणीसाठी व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडर संस्थेचे श्रीनिवास कुलकर्णी, नरेंद्र अमृतकर तसेच नगरसेवक शिवाजी दांडगे, माधुरी अदवंत, बालाजी मुंढे, दामू अण्णा शिंदे, मुकुंद दामोधरे, गणेश नावंदर, स्मिता दंडवते, वीरेंद्र देशमुख, ताराचंद गायकवाड, अशोक दामले, विलास कोरडे, अरुण पालवे, राहुल खरात, रामचंद्र जाधव, बाळू वाघमारे, राजू वाडेकर आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औद्योगिक शांततेची विकासासाठी गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उद्योजकांच्या मागण्या पूर्ण करत औद्योगिक विकासातून देशनिर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकार आणि कौशल्य विभाग उद्योगांना मदत करण्यास सदैव तत्पर आहे. मात्र त्यासाठी औद्योगिक शांतता कायम राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलेंगकर यांनी व्यक्त केले.

डॉ. हेगडेवार रुग्णालयात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मकरंद देशपांडे यांनी औरंगाबादसह मराठवाड्याच्या इतर शहरांत कामगार कार्यालयातील पायाभूत सुविधा वाढवण्याची गरज व्यक्त केली. 'एनआयपीएम'चे उपाध्यक्ष अनुराग कल्याणी यांनी ग्रामपंचायत करातील दर आकारणी व त्यातील प्रक्रियांचा विषय उपस्थित केला. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ (कामगार उपायुक्त) यांनी श्रम विभाग, कामगार आयुक्तालयामार्फत केलेल्या व उद्योगाला फायदेशीर योजनांची माहिती सादर केली. सरकारच्या 'ईज आफ डुइंग बिझनेस' च्या अंतर्गत कामगार विभागातील प्रत्येक प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्यामुळे बरेचसे काम सोपे झालेले आहे. याप्रसंगी श्रम आणि कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे चर्चेदरम्यान म्हणाले की, उद्योग विकासासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार तत्पर आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी उदय चौधरी, आमदार अतुल सावे, राम भोगले, अनिल भालेराव, डॉ. अनंत पांढरे, डॉ. विहार राखुंडे, बालाजी मुळे, अमोल मोहिते, मुकुंदकुमार, संदीप नागोरी यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

………

\Bमाथाडी कायद्याची गरज काय? \B

माथाडी कायदा अंमलात आणणारे महाराष्ट्र हे एकवेव राज्य आहे. या कायद्याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी मानव संसाधन तज्ज्ञ व उद्योजक मकरंद देशपांडे यांनी केली.

……

\B'एमआयडीसी'तील दारू दुकाने बंद करा \B

औरंगाबादच्या 'एमआयडीसीं'मध्ये खासगी सावकारीचा उदय व दारू दुकाने हे अशांततेमागील एक गंभीर कारण असल्याचे अनुराग कल्याणी यांनी सांगितले. औद्योगिक परिसरात निरोगी वातावरण राखण्यासाठी सरकारने दारू दुकाने बंद करावीत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पिकअप’च्या बोनटमध्ये दडवून साहित्य चोरी

$
0
0

वाळूज महानगर: वाळूज एमआयडीसी येथील प्रिसीजन कंपनीत साहित्याची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाच्या बोनटमध्ये कंपनीचे कास्टिंग साहित्य लपवून घेवून जाताना चालकाला गेटवरील सुरक्षा रक्षकांनी पकडले़ विशाल कर्डिले (रा़ बकवालनगर वाळूज ता़ गंगापूर), असे त्याचे नाव आहे.

कर्डिले हा अनेक दिवसांपासून कंपनीत पिकअप (एम एच २० ए ए ९७६९) मधून कंपनीच्या साहित्य वाहतुकीचे काम करत होता़ तो घटनेदिवशी साहित्य घेवून जात असताना त्याला कंपनीच्या गेटवर सुरक्षा रक्षकांनी तपासणीसाठी अडवले. त्याला बोनट उघडण्यास सांगितले असता ते लॉक झाल्याचे सांगून उघडण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे सुरक्षा रक्षकाला शंका आली. तपासणी केल्याशिवाय बाहेर जाऊ देणार नाही,असे सांगितल्यानंतर तो वाहन तेथेच सोडून निघून गेला़ दुसऱ्या दिवशी तो आला मात्र माझ्याकडे चावी नाही, असे सांगितले. त्यावेळी कंपनीचे अतुल लांडे यानी नट खोलून बोनट उघडले असता त्यात कास्टिंगच्या पाच गोण्या आढळल्या. त्यात एकशे दहा किलो वजनाचे चारशे दोन नग (अंदाजे किंमत १७ हजार रुपये) चोरून नेत असल्याचे आढळले़ त्यामुळे भास्कर नखाते यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात कर्डिलेविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक कोंडके हे करत आहेत़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंजली दमानिया यांना दिलासा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला आहे. त्यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध मुक्ताईनगर येथे दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे माजी मंत्री खडसे यांना चांगलीच चपराक बसली आहे.

अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात डिसेंबर २०१६ मध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेमध्ये त्यांनी श्री. खडसे यांचे चोपडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवरील ९ कोटी ५० लाखाचा एक १० लाखांचा असे दोन 'डीडी' जोडलेले आहेत. यासंदर्भात नोटीस प्राप्त झाल्यावर खडसे यांनी, चौकशी केली असता हे 'डीडी' खोटे असून, बनावट दस्तेवजआधारे तयार करण्यात आलेले आहेत. आपली बदनामी करण्याच्या उद्देशानेच हे करण्यात आले. हे बनावट डीडी आणि त्या संदर्भातील खोटा दस्तऐवज खरे असल्याचे भासवून खंडपीठात दाखल याचिकेमध्ये त्याचा उपयोग करण्यात आला. हे डीडी आरोपींनी कसे मिळविले, त्यांच्याकडे कसे आले याच्या तपासासंदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली. मात्र गुन्हा नोंदविण्यास नकार देण्यात आल्यानंतर मुक्ताईनगर न्यायालयातून १५६ (३) अन्वये आदेश प्राप्त करवून फसवणूक, कटकारस्थान, बनावट दस्तऐवज तयार करणे आदी विविध कलमांखाली श्रीमती अंजली दमानिया, रोशनी राऊत, गजानन मालपुरे, सुशांत कुऱ्हाडे, सदाशिव सुब्रमण्यम आणि चार्मीन फर्न्स यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.खोटे स्टँप्स बनवून फसवणूक केल्याचा आरोपही त्यात करण्यात आला. मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अंजली दमानिया व अन्य पाच जणांविरुद्ध १३ जून २०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. 'शेल' कंपनीमधील पैसा हा मंदाकिनी खडसे आणि गिरीष चौधरी यांच्या खात्यात आला. याविषयीची संपूर्ण माहिती दमानिया यांनी याचिकेत दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे यांना क्लीन चीट दिली होती. कुठलाही तपास न करता या विभागाने राजकीय दबावामुळे त्यांना व खडसे यांना या प्रकरणातून वाचविल्याचे याचिकेत म्हटले होते.

दमानिया यांचा मानसिक छळ करण्यासाठीच १५ महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्दबादल करण्यात यावा, अशी विनंती दमानिया यांनी औरंगाबाद खंडपीठात केली होती. जळगाव, नाशिक, धुळे, बुलडाणा, जालना आणि नंदूरबार या सहा जिल्ह्यांमध्ये अंजली दमानिया यांच्याविरुद्ध २८ अब्रू नुकसानीचे दावे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील एक गुन्हा ऑगस्ट महिन्यातच औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला होता. सोमवारी खंडपीठाने मुक्ताईनगरमध्ये दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.

एकनाथ खडसे यांच्याविरुद्धचा लढा चालूच ठेवणार आहे, असे अंजली दमानिया यांनी सांगितले. या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. या याचिकेत दमानिया यांनी स्वत:च आपली बाजू मांडली. अन्य पाच याचिकाकर्त्यांतर्फे विजय पाटील यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यातील चाराछावण्यांचा संभाव्य अंदाज शासनदरबारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अत्यल्प पावसामुळे मराठवाड्याला यंदाही दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत. मराठवाड्यात मुबलक चारा उपलब्ध असल्याची आकडेवारी प्रशासनाकडे असली तरी दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या मराठवाड्यात यंदा जानेवारीपासून चारा छावण्या सुरू करावे लागतील असा अंदाज प्रशासनाचा आहे. दरम्यान, प्रत्येक जिल्ह्याने दिलेल्या अहवालानुसार विभागीय प्रशासनाने जून २०१९ पर्यंत सुमारे सहाशे चारा छावण्या लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असून त्या संदर्भातील संभाव्य प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.

मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसने सुरू झाले असून येत्या काही दिवसांमध्ये या झळा तीव्र होणार असल्याने मराठवाड्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जनावरांसाठी दररोज ३ ते ६ किलो इतक्या चाऱ्याची आवश्यकता असते. आता उपलब्‍ध चाऱ्यानुसार हा चारा केवळ जानेवारीपर्यंत पुरण्याची शक्यता आहे. यामुळे जानेवारीनंतर मराठवाड्यात चारा छावण्या सुरू कराव्या लागण्याचा अंदाज प्रशासनाचा आहे. येणाऱ्या कालावधीत चारा व पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी, पशुपालकांना पशुधनाचा सांभाळ करणे अवघड होणार आहे. मराठवाड्यात ६७ लाख ७ हजार ६१२ जनावरे असून त्यामुळे दुष्काळात शेतकऱ्यांना जनावरे जगवणे अवघड ठरणार आहे.

६७ लाख जनावरांचा प्रश्न

मराठवाड्यात लहान मोठी अशी एकूण ६७ लाख जनावरांची संख्या असून यामध्ये ३६ लाख २५ हजार ४९० मोठी जनावरे, ११ लाख ३६ हजार लहान जनावरे आहेत. तर विभागात शेळ्या मेढ्याची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. मराठवाड्यात जनावरांच्या संख्येच्या तुलनेत दररोज २६ हजार ३३० टन चाऱ्याची आवश्यकता आहे.

चारा छावण्यांचा संभाव्य अंदाज

महिना................. संभाव्य छावण्यांची संख्या.................... अपेक्षित खर्च

डिसेंबर २०१८.................००.................................................००

जानेवारी २०१९................११०..............................................८०८.५०

फेब्रुवारी २०१९.................१६१............................................१७८६.१९

मार्च २०१९......................३१०............................................५३७७.३०

एप्रिल २०१९.....................४७४..........................................९२७७.९२

मे २०१९...........................६००.........................................१२५२२.१५

जून २०१९..........................५६९........................................११६५५.१०

------------------------------------------------------------------

एकूण..............................................................................४१४२७.१६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यावर चाकूहल्ला; चौघांकडून लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जेवण करण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना अडवून त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करीत मोबाइल आणि पाकीट पळवण्यात आले. हा प्रकार रविवारी रात्री दहा वाजता पैठण रोडवरील संताजी चौकीसमोरील पाटोदा रोडवर घडला. या घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, चौघांविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी योगेश फकीरबा शिणगारे (वय २०, मूळ रा. वडोदबाजार, सध्या रा. सैनिक विहार कांचनवाडी) यांनी तक्रार दाखल केली. योगेश हे कांचनवाडी येथील छत्रपती शाहू कॉलेजमध्ये मॅकेनिकलच्या तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी आहेत. ते रविवारी रात्री मित्र सौरभ साईनाथ ठेंगरे (वय २०, रा. कांचनवाडी) यांच्यासोबत दुचाकीवरून पाटोदा बजाजगेट रोडवरून वाळूज एमआयडीसीमध्ये जेवणासाठी जात होते. यावेळी सह्याद्री स्कूल ते चित्रकुट व्हॅली दरम्यान एका झाडाजवळ त्यांना समोरून एकाच दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवले. योगेश व सौरभ यांच्यावर चाकूने वार करत दोघांच्या खिशातील मोबाइल, पाकीट आदी ऐवज लुबाडला. या घटनेत सौरभच्या पोटाला चाकूने गंभीर जखम झाली. योगेश आणि सौरभ यांना आरडाओरड केल्यास ठार मारण्याची धमकी देत आरोपी एकाच दुचाकीवरून (एम एच २२ ए ई २३९४) बजाज कंपनीच्या दिशेने पळून गेले. या प्रकरणी योगेशच्या तक्रारीवरून चारही आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bगंभीर जखमीवर घाटीत इलाज सुरू\B

एका दुचाकीस्वाराने योगेश आणि सौरभला कांचनवाडी येथे एका हॉस्पिटलमध्ये आणून सोडले. यानंतर त्यांच्या मित्रांनी दोघांना घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. योगेशवर उपचार करून सोडण्यात आले असून गंभीर जखमी सौरभवर उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीच्या तरुणाची रेल्वेसमोर आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील सिडको एन चार भागातील कॉलेजमध्ये बारावीत शिकणाऱ्या तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी पहाटे पाच वाजता शिवाजीनगर गेटजवळील रेल्वे रुळावर घडला. गणेश सुभाषराव काटे (वय १७, रा. हनुमानगर, गारखेडा), असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गणेश हा मूळ वाई ता. जालना येथील रहिवासी होता. औरंगाबादेत त्याचे मामा वैजनाथ मोहनराव महेकर यांच्याकडे तो शिक्षणासाठी राहत होता. सिडको एन चार भागातील कॉलेजमध्ये मॅकेनिकल टेक्नॉलॉजी शाखेत तो बारावीचे शिक्षण घेत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे जमादार बी. जी. जाधव आणि कावरे यांनी त्याला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयशरने चिरडल्याने कला शिक्षकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुचाकीवरून जाणाऱ्या कला शिक्षकाला मागून येणाऱ्या आयशर ट्रकने चिरडले. या अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी सव्वाचार वाजता पैठण रोडवरील ईटखेड्याजवळ झाला. संतोष लक्ष्मण गायकवाड (वय ३४, रा. ईटखेडा), असे या शिक्षकाचे नाव असून ते ईटखेड्यातील अग्रसेन विद्या मंदिर इंग्रजी शाळेत म्हणून कार्यरत होते.

याप्रकरणी सातारा पेालिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष गायकवाड हे शाळा सुटल्यानंतर पत्नीला सोडण्यासाठी घरी गेले होते. घरी तयार होऊन ते पुन्हा क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडले. त्यांची दुचाकी ईटखेडा फाट्यावरून पैठण रोडवर आली. महानुभाव आश्रम चौकाकडे जाताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येत असलेल्या आयशर ट्रकने धडक दिली. यामध्ये चाकाखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त हनुमंत भापकर, निरीक्षक अशोक मुदीराज यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या वाहनामध्ये मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. घटनास्थळावरून अपघातग्रस्त आयशर ट्रक चालक पळून गेला होता, मात्र त्याला नंतर ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

\Bमाहिती मिळताच पत्नी बेशुद्ध\B

मृत संतोष गायकवाड यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अपघाताचे वृत्त काही वेळातच त्यांच्या कुटुंबाला कळाले. त्यांची पत्नी घटनास्थळी दाखल झाली. हा प्रकार पाहून त्यांची शुद्ध हरपली. पोलिसांनी त्यांना बेशुद्धावस्थेत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये रवाना केले. या प्रकाराने परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>