Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

एकाचवेळी पाच मोबाइलची चोरी; पोलिस कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या जिममध्ये आलेल्या चार व्यक्तींच्या बॅगेतील ३५ हजार रुपये किंमतीचे पाच मोबाइल एकाचवेळी चोरल्याप्रकरणातील आरोपी शेख राजू शेख आयुब याच्या पोलिस कोठडीमध्ये शुक्रवारपर्यंत (३० नोव्हेंबर) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजाला अल अमोदी यांनी गुरुवारी (२९ नोव्हेंबर) दिले.

याप्रकरणी प्रदीप अंबादास राठोड यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी हा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या जिमला गेला होता व त्याने जिमनॅस्टीक हॉलमध्ये बॅग ठेवली होती. फिर्यादीसह योगेश रावसाहेब धारवळे, मंगेश भागवत पवार, अनिल सुधाकर ठोकळ यांनीही आपल्या बॅग जिमनॅस्टिक हॉलमध्ये ठेवल्या होत्या आणि चौघांच्या बॅगेतील ३५ हजार रुपयांच्या पाच मोबाईलची एकाचवेळी चोरी झाली होती. या प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी शेख राजू शेख आयुब (२८, रा. जुना बाजार) याला सोमवारी (२६ नोव्हेंबर) अटक करून गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला गुरुवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये शुक्रवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश कोर्टाने दिले. सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना ‘टीडीआर’प्रकरणी नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत उघडकीस आलेल्या 'टीडीआर' घोटाळ्यात आता पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी नगररचना विभागातील तीन अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना शुक्रवारी हजर राहण्याचे कळवले आहे.

सराफा भागातील 'टीडीआर' घोटाळ्याचे प्रकरण 'मटा' ने उघडकीस आणले होते. त्यानंतर या प्रकरणी तत्कालीन पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी लक्ष घालून चौकशी केली. काही अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत. सराफा येथील 'टीडीआर' प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१,१२० (ब) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याचा गुन्हा नोंदणी क्रमांक ५१७/२०१६ आहे. याचा संदर्भ देत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एस. बी. नवले यांनी पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. किराडपुरा भागातील 'टीडीआर' घोटाळ्याच्या संदर्भात जिन्सी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यात जाबजबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी तीन निवृत्त अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. पालिकेच्या सेवेत असलेल्या काही अधिकाऱ्यांना देखील त्यांनी जाबजबाब नोंदवण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. पण, या अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. अधिकारी सहकार्य करीत नसतील, तर पोलिसांना वेगळा मार्ग निवडावा लागेल, असा उल्लेख सूत्रांनी केला आहे.

\Bया तिघांना बोलावले

\B

पोलिस निरीक्षक नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार सिटीचौक पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात उपअभियंता वसंत निकम, ए. बी. देशमुख व आवक लिपिक मजहर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 'या गुन्ह्याचा तपास आम्ही करीत आहोत. गुन्ह्याच्या तपासाच्या अनुशंघाने विचारपूस करून जाब नोंदवणे आवश्यक आहे. यासाठी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पोलिस आयुक्त कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत हजर रहावे,' असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिश्रीलाल जन्मशताब्दीनिमित्त पदयात्रा, जप अनुष्ठान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुरुदेव मिश्रीलाल यांच्या जन्मशताब्दी वर्ष महोत्सवानिमित्त गुरुगणेशनगर स्थानकवासी जैन शिक्षण समितीअंतर्गत जन्मशताब्दी महोत्सव समितीतर्फे विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सुरू झालेल्या महोत्सवात पाच डिसेंबरपर्यंत कार्यक्रम असणार आहेत, अशी माहिती समितीचे ताराचंद दुग्गड, प्रकाश मुगदिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कार्यक्रमांमध्ये शुक्रवारी महावीर भवन येथून सकाळी आठ वाजता पदयात्रा काढण्यात येणार आहे. तिची सांगता गुरुगणेशनगर येथे होणार आहे. पंचदिवसीय ११ तासांचे जप अनुष्ठान सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. एक डिसेंबर रोजी जप अनुष्ठान, त्यानंतर दुपारी प्रश्नमंच असेल. दोन डिसेंबर रोजी जप अनुष्ठानासह दुपारी चित्रकला स्पर्धा महावीर भवन येथे होणार आहे. तीन डिसेंबर जाप, क्रीडा दिन, चार डिसेंबर रोजी जप अनुष्ठानसह सायंकाळी भक्ती संध्या असणार आहे. पाच डिसेंबर रोजी प्रवचन गुणानुवाद, मांगलिक, ध्वजारोहण आदी कार्यक्रम असणार आहेत.

महोत्सवाला विवेकमुनी, श्रृत मुनी, प्रभाकवंर, दिलीपकवंर, डॉ. प्रतिभाकवर, आनंद श्रमणी रत्ना कंचनकवर, शीलरत्नाश्री, अर्चनाश्री, आनंदाश्री, सुरभीश्री यांची उपस्थिती असेल. महोत्सव यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष दुग्गड, शिक्षण समितीचे अध्यख प्रकाश मुगदिया, स्वागत समिती अध्यक्ष राजेंद्र दर्डा, कार्याध्यक्ष आमदार सुभाष झांबड, पारस तातेड, शेखर देसरडा, अॅड. रतीलाल संचेती, सुभाष देसरडा, कन्हैयालाल रुणवाल, डॉ. गौतम रुणवाल, रवि खिवंसरा, बाळु संचेती, सुभाष देसरडा, ओमप्रकाश पेाकर्णा, पारसमल बोहरा, मिठालाल कांकरिया, झुंबरलाल पगारिया, प्रवीण छाजेड, प्रशांत देसरडा, डॉ. प्रकाश झांबड, रवींद्र लोढा, संजय सुराणा, किशोर संकलेचा, मनसुखलाल झाबंड आदी परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यावसायिक अभ्यासक्रमांत सहा हजारांवर विद्यार्थ्यांना लाभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याचे सरकारने जाहीर केले. नोकऱ्यांपेक्षा शिक्षणात अधिक गरज असलेल्या या समाजाला निर्णयाचा निश्चित लाभ मिळणार आहे. मराठवाड्यात व्यावसायिक अभ्यासक्रमात सुमारे सहा हजार ७०० विद्यार्थ्यांना निर्णयाचा लाभ मिळेल.

विविध अभ्यासक्रमांचे वाढते शुल्क अनेकांना भरणे अवघड आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने हजारो विद्यार्थी उच्च व व्यावसायिक शिक्षणापासून वंचित आहेत किंवा अर्धवट शिक्षण सोडणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. राज्य मागास आयोगाच्या पाहणीतही हेच आढळून आले. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क तर, लाख भर किंवा त्यापेक्षा अधिक आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये इंजिनीअरिंग, पॉलिटेक्निकसह, औषधनिर्माणशास्त्र, एमसीए, एमबीए अभ्यासक्रमांचा समावेश आहे. शुल्कवाढीमुळे या अभ्यासक्रमांच्या शिक्षणात आर्थिक अडथळे मोठे आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाने आरक्षण लढा उभारला आहे. अखेर सरकारने शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. १६ टक्के आरक्षण असून, सध्याच्या परिस्थितीचा विचार केला शिक्षणात या निर्णयाचा फायदा होईल अशी स्थिती आहे. मराठवाड्यात आरक्षणाच्या निर्णयानंतर या विद्यार्थ्यांसाठी किती जागा राखीव ठेवण्याची प्रक्रिया करण्यात येईल.

सहा हजार ७०० जणांना फायदा

शिक्षणातील आरक्षणाचा मराठवाड्यात व्यावायिक अभ्यासक्रमाला सहा हजार ७०० विद्यार्थ्यांना प्रवेशात, शुल्कात लाभ होणार असल्याचे बोलले जात आहे. मराठवाड्यात इंजिनीअरिंग, फार्मसीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता ३९ हजार २५० एवढी आहे. त्यापैकी मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणामुळे सहा हजार ७०० जागा राखिव राहतील.

निर्णयाचा लाभ निश्चित मराठा समाजातील विद्यार्थ्यांना होणार आहे. शुल्कमाफीबाबत आणि पुढील सूचना आल्यानंतर कार्यवाहिला सुरुवात होईल.

- डॉ. महेश शिवणकर, सहसंचालक, तंत्रशिक्षण.

अभ्यासक्रम… एकूण जागा…......विद्यार्थ्यांना लाभ

इंजिनीअरिंग........११६००............…………१८५६

पॉलिटेक्निक….......१८७५०............………३०००

बीफार्म..............…………३१००............…………...४९६

डीफार्म..............…………४५००.............…………..७२०

एमसीए………..............१०००..............…………….१६०

एमबीए………...............३०००..............…………….४८०

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामायण कथेला प्रारंभ

$
0
0

औरंगाबाद : हडको, एन-१२ भागातील भारतमातानगर येथे श्री संगीत रामायण कथा व ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला मंगळवारी सुरुवात झाली. यावर्षी सोहळ्याचे १९वे वर्ष असून तो चार डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सोहळ्यात दररोज सकाळी सात ते दहा या वेळेत मीनाक्षी तळेकर या ज्ञानेश्वर पारायण, दुपारी दुपारी १२ ते पाच या वेळेत तुकाराम मैराळ महाराज चातुर्मास्ये हे श्री संगीत रामायण कथा सादर करत आहेत. शुक्रवारी भागवताचार्य प्रा. माधव महाराज डाके, एक डिसेंबर रोजी सुरेश महाराज जाधव, दोन रोजी रामायणाचार्य नाना महाराज कदम, तीन रोजी शिवलिला पाटील महाराज यांचे कीर्तन, तर चार डिसेंबर रोजी तुकाराम मैराळ महाराज चातुर्मास्ये यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवे मारण्याचा प्रयत्न; एकाला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलीला दुचाकीवर घेऊन जाणाऱ्या पित्याला रस्त्यात अडवून त्याच्यावर तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नऊ आरोपींपैकी यादव श्रावण पाखरे याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता, सोमवारपर्यंत (तीन डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी गुरुवारी (२९ नोव्हेंबर) दिले.

या प्रकरणी अनुराग दामोदर जाधव (वय ३२) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, ते सोमवारी (२६ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास १२ वर्षीय मुलीला दुचाकीवर बसवून ब्रिजवाडी येथून उत्तरानगरीकडे जात होते. त्यावेळी मंगेश अशोक साबळे, प्रकाश यादव पाखरे, रवी दिलीप साबळे, यादव पाखरे, कडुबाई साबळे, पद्माबाई साबळे, प्रियंका पाखरे, सीमा लोखंडे व शांताबाई अशा नऊ जणांनी दुचाकी अडवून जुन्या वादावरून तलवार, कुऱ्हाड व लोखंडी रॉडने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी यादव श्रावण पाखरे (५८, रा. ब्रिजडवाडी) याला अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर केले असता, आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे बाकी आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यारही जप्त करावयाचे आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवार यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांजाप्रकरणी आरोपीला अटक, पोलिस कोठडी

$
0
0

औरंगाबाद: जालना रोडवर पकडण्यात आलेल्या गांजा प्रकरणात १६ दिवसांनी मुख्य आरोपी समीर खान सिकंदर खान (वय २५, रा. आसेफिया कॉलनी) याला अटक करून गुरुवारी (२९ नोव्हेंबर) कोर्टात हजर केले असता, मंगळवारपर्यंत (४ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी दिले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राहूल सूर्यतळ यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी अपना बाजारसमोर जाकेर खान व रिक्षाचालक कबीर बेग उर्फ सलमान यांना अटक करीन त्यांच्याकडून गांजा व रिक्षा जप्त केली होती. मुख्य आरोपी समीर खान हा पसार झाला होता. त्याला अटक करून कोर्टात हजर केले असता, आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहायक सराकरी वकील सुनिल जोंधळे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाव्या नेत्यांची फोटो.. डॉ. कानगो, प्रा. राम बाहेती


महावितरणचा चेक बाउन्स दीड हजारांचा दंड

$
0
0

औरंगाबाद: वीजबिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे बाउन्स झाल्यास ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल तेवढा दंड लावण्यात येणार आहे. महावितरणने वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकताच हा आदेश दिला असून एक नोव्हेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

औरंगाबाद परिमंडळातील नऊ हजार लघुदाब वीजग्राहक धनादेशाद्वारे दरमहा बिल भरतात. त्यापैकी सुमारे ३५० धनादेश दरमहा विविध कारणांमुळे बाऊन्स होतात.

वीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्यक आहे. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते. परंतु अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास साधारणतः तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा झाल्यास संबंधित ग्राहकांना धनादेशाद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागून येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेश बाउन्स झाला तर आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.

ऑनलाईन वीज बीलातून ३० कोटी रूपये रक्कमेची होते वसुली

महावितरणचे घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे ऑनलाईन पेमेंटची सोय उपलब्ध आहे. इंटरनेट व मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून औरंगाबाद परिमंडलात सद्यस्थितीत सुमारे दीड लाख वीजग्राहक सुमारे ३० कोटी रुपयांचा दरमहा वीजबिल भरणा करीत आहेत. त्यामुळे धनादेशाऐवजी वीजग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेवारस कारने उडविली खळबळ

$
0
0

औरंगाबाद : कार बेवारस असल्याच्या संशयावरून नागरिकाने फोन केला. कारची बाँबशोधक व नाशक पथकाने तपासणीही करून ती ठाण्यात लावली. ही बाब समजताच मालकाची धांदल उडाली. कार आपल्याच मामाच्या मुलाची असून, ती बेवारस नसल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. सिडको एन-एक भागात गुरुवारी (२९ नोव्हेंबर) हा प्रकार घडला.

एमआयडीसी सिडको पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सिडको एन-एक भागातील रहिवासी शेंद्रा येथे कंपनीत कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मामाच्या मुलाची कार आणली. कार या परिसरात उभी करून ते पुणे येथे गेले. चार दिवसांपासून कार उभी असल्याने त्यावर बरीच धूळ साचली होती. ती बेवारस अवस्थेत असावी असा संशय आल्याने नागरिकाने पोलिसांना फोन केला. त्यानंतर बाँबशोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने परिसर व कारची तपासणीही केली. त्यानंतर कार एमआयडीसी सिडको पोलिसांनी ताब्यात घेत ठाण्यात नेली. यादरम्यान ही बाब मालकाला समजताच त्यांनी पोलिस ठाणे गाठले. कार मामाच्या मुलाची असून, तो पुणे येथे गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांची चौकशी करून कार त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधयेक मंजूर होताच जयजयकार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधिमंडळात गुरुवारी मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब होताच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. उस्मानपुरा, पुंडलिकनगर, सिडको एन आठ आदी ठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले.

उस्मानपुरा येथील भारतीय जनता पक्षाच्या विभागीय कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी दुपारी तीन वाजता जल्लोष केला. प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी फटाक्‍याची लड लावून मराठा आरक्षणाच्या निर्णयाच्या जल्लोषाला सुरुवात केली. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे उंचावत सरकारच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली. एकमेकांना मिठाई आणि पेढे भरवून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. संघटन मंत्री भाऊराव देशमुख, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये, कामगार मोर्चाचे संजय केणेकर, उपमहापौर विजय औताडे, दिलीप थोरात, बाळासाहेब गायकवाड, जालिंदर शेंडगे, कचरू घोडके, राजगौरव वानखेडे, राजू शिंदे, प्रमोद राठोड, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

\Bपुंडलिकनगरला जल्लोष

\Bमराठा आरक्षण मंजूर झाल्याबद्दल पुंडलिकनगर येथील आमदार अतुल सावे यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी आंनदोत्सव साजरा केला. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ढोलताशाच्या गजरात जल्लोष करत कार्यकर्त्यांनी मिठाई वाटप केली. प्रा. गोविंद केंद्रे, अशोक दामले, संजय बोराडे, विवेक राठोड, अर्जुन गवारे, उमाकांत रत्नपारखी, जयश्री किवळेकर, अश्विनीकुमार खुल्लर, श्रीकांत घुले, ओम अग्रवाल, प्रवीण खैरे आदी उपस्थित होते.

\Bबजरंग चौक मिठाई वाटप

\Bभाजप सिडको- राजाबाजार मंडळाच्या वतीने सिडको एन आठ येथील बजरंग चौकात जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी यावेळी मिठाईचे वाटप केले. नगरसेवक शिवाजी दांडगे, राहुल खरात, गणेश जोशी, रामचंद्र जाधव, प्रशात नांदेडकर, कैलास राऊत, प्रदीप ठाकरे, नितीन राऊत, उषा काळे, अभिजित काकडे, उदय काळे, वर्षा साळुंके, श्रीरंग जोशी, रवींद्र पाठक, हर्षाल चिचोंलकर, श्याम बांगड, आशा वानखेडे, लक्ष्मी गायकवाड, प्रवीण जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकावर हल्ला करणाऱ्यावर चाकूहल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुंडलिकनगर येथील शिवसेनेच्या नगरसेवकावर चाकूहल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी तुरुंगातून जामिनावर बाहेर येताच. त्याच्या घरात घुसून चौघांनी चाकू हल्ला केला व त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली. हा प्रकार २७ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. याप्रकरणी हल्ला करणाऱ्यातील चौघांपैकी एकाची ओळख पटली असून, राजू क्षीरसागर असे संशयीताचे नाव आहे. राजूसह इतर अज्ञात तिघांवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमाननगर परिसरात पत्ते खेळून धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना नगरसेवक आत्माराम माणिकराव पवार(४१) हे समजविण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर ३० ऑक्टोबर रोजी भरदिवसा चाकूहल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी हल्ला करणारा आकाश पडोळ याला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली होती. नुकताच तो जामिनावर तुरुंगातून सुटला होता. २७ नोव्हेंबर रोजी तो आई, वडिल, बहिणीसोबत घरात असताना राजू क्षीरसागर व त्याच्यासोबतच्या अन्य तिघाांनी त्याच्या घरात प्रवेश करून सर्वांना मारहाण सुरू केली. त्यानंतर एकाने आकाशवर चाकुने वार केले. यात आकाशची आई, वडिल व बहिण हे सुद्धा जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी आकाशसह त्याच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत पोबारा केला. आकाशच्या आईने याप्रकारानंतर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून राजू व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक लक्ष्मण शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हेड कॉन्स्टेबल एल. बी. हिंगे करत असून, आरोपींचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७ बिल्डरांवर गुन्हे

$
0
0

वाळूज महानगर : औरंगाबाद तालुक्यातील वडगाव कोल्हाटी, शेकापूर परिसरात सिडकोची परवानगी न घेता भूखंड विक्री व बांधकाम करणाऱ्या १७ बिल्डरांवर सिडको प्रशासनाच्या तक्रारीवरून २८ नोव्हेंबर रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात असलेल्या वडगाव कोल्हाटी व शेकापूर येथील जमिनीवर बिल्डरांनी सिडकोची परवानगी न घेता प्लॉटिंग केली. ग्रामपंचायतीकडून गावठाण प्रमाणपत्र घेऊन रजिस्ट्री करून अनेक नागरिकांना भूखंडाची विक्री करण्यात आली आहे़ या भूखंडाच्या रजिस्ट्री होत असल्याने; तसेच ग्रामपंचायतीमध्ये भोगवटाधारक म्हणून नोंदी घेण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी इतर भागापेक्षा येथे स्वस्तात घर मिळत असल्याने अनेकानी भूखंड खरेदी केले आहेत. कारवाईची माहिती मिळाल्यानंतर काही बिल्डर बेपत्ता झाले आहेत.

हा परिसर सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात असल्याने सिडकोच्या अधिकाऱ्यांनी वडगाव कोल्हाटी व शेकापुरात अनाधिकृत बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. त्यावेळी येथील बांधकाम नियमानुसार होत नसल्याचे निदर्शनात आल्याने ही कारवाई करण्यात आली़ महाराष्टÑ प्रादेशिक आणि नगर नियोजन अधिनियम १९६५च्या कलम ५४ अन्वये अनाधिकृत रेखाकंन व बांधकाम करणाऱ्या विकासकांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार शासनाने सिडको प्रशासनाला दिलेले आहे. या कायद्याचा आधाराने सिडको प्रशासनाने बिल्डरांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे़ याप्रकरणी सिडकोचे सहाय्यक वसाहत अधिकारी गजाजन साटोटे यांच्या तक्रारीवरून एस. के. पाटील, ए. के. ताजणे, सुभाष औताडे, बाबासाहेब साळुंके पाटील, विकी पारसवाणी, कृष्णा रावसाहेब पवार, गोविंद रामलिंग सोलपुरे, किशोर भीमराव म्हस्के, विजय एकनाथ साळे, मोहम्मद एकबाल मोहम्मद रमजान, कर्नल आशुतोष जोशी, सुभेदार बॅनर्जी, सुभेदार मेजर बलविंदरिसिंग, सुभेदार गोविंदा, डॉ. चंद्रशेखर पाठक, शंकर गणपतराव सोनवणे, संदीप महापुरे या बिल्डरांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे हे करत आहे.

\Bनागरिकांची फसवणूक\B

वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक पाच, सात, दहा/एक, दहा/दोन, ११, १२ व शरणापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शेकापूर गट क्रमांक सहामध्ये बिल्डरांनी अनाधिकृत रेखाकंन व बांधकाम करून नागरिकांची फसवणूक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार काय ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत. आम्ही या निर्णयामुळे समाधानी आहोत. मात्र, हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार काय,' असा सवाल मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात रस्त्यावर उरतलेल्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी 'मटा'शी बोलताना उपस्थित केला.

\Bपदाधिकारी काय म्हणतात...

\Bराज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल १०० टक्के अनुकूल आलेला असताना आणि सरकारने तो स्वीकारलेला असताना, आहे त्या ओबीसी संवर्गात मराठा समाजाचा समावेश करणे अपेक्षित होते आणि टक्केवारी वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता ५२ टक्क्यांच्या बाहेर १६ टक्के आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला नसताना तरी सुद्धा त्यांनी हे दिलेले आहे. त्यामुळे हे न्यायालयात टिकेल का हा मोठा प्रश्न आहे. त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे.

- डॉ. शिवानंद भानुसे, संभाजी ब्रिगेड

सरकारच्या निर्णयाचे स्वागत. समाजाला किमान सवलती तरी लागू होतील म्हणुन समाधानी आहोत. मात्र, हे आरक्षण न्यायालयात टिकाणार आहे काय, असा प्रश्न आहे. या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले तर अडचण निर्माण होऊ शकते. याचा विचार शासनाने करणे गरजेचे आहे.

- सुरेश वाकडे, बुलंद छावा

आरक्षण दिल्यामुळे सर्वप्रथम सरकारचे अभिनंदन. मात्र, हे आरक्षण नसून केवळ सवलत आहे. हे आरक्षण कायद्याच्या कसोटीत टिकले पाहिजे. आरक्षणाच्या माणीसाठी ४० बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे आनंद व्यक्त करू शकत नाही. आरक्षणाचे श्रेय केवळ सरकारने न घेता हे संपूर्ण श्रेय रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाचे आहे.

- अप्पासाहेब कुढेकर, अ.भा. छावा

आरक्षणाचे विधेयक पास झाले त्याचे समाधान आहेच. सध्या आम्ही ५० टक्के लढाई जिंकलो आहोत. या आरक्षणाचा सरकारने सर्वसामान्यांना लवकरात लवकर प्रत्यक्ष लाभ द्यावा व जो पर्यंत प्रत्यक्ष आरक्षणाचा लाभ मिळत नाही तोपर्यंत आम्ही पूर्णत: समाधानी नाही. सरकारने दिलेले आरक्षण कसे टिकवायचे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, जो पर्यंत हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत लागू होणार नाही तो पर्यंत पूर्ण समाधान नाही.

- विजय काकडे, महासम्राट बळीराजा शेतकरी संघटना

आरक्षण यापूर्वीच्या सरकारने दिले त्याच प्रमाणे आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. जो पर्यंत प्रत्यक्षात मराठा समाजाला या आरक्षणाचा लाभ होत नाही, तो पर्यंत आम्हाला या निर्णयावर विश्वास नाही. सरकारने दिलेल्या आरक्षण न्यायालयात कसे टकेल ही जबाबदारी शासनाची आहे.

- सुनील कोटकर, झुंझार छावा

सरकारचे आणि सर्व राजकीय पक्षांचे प्रथम आभार. मात्र, पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी ने दिलेल्या आरक्षणाची पुनरावृत्ती होऊ नये ही काळजी सरकारने घ्यावी. आज जे विधेयक मंजूर करून घेतले हे आरक्षणाचे पहिले पर्व पार झाले हे मी समजतो. आज पर्यंतचे यश हे आरक्षणात शहीद झालेल्या बांधवाना समर्पित आहे.

- मनोज गायके, बुलंद छावा मराठा युवा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिलांसाठी भेटू नका’; आयुक्तांनी लावली पाटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धनादेश मिळवण्यासाठी, कामाचे बिल काढण्यासाठी भेटू नका अशी विनंती करणारी पाटीच महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी आपल्या दालनाच्या बाहेर लावली आहे. या पाटीची गुरुवारी महापालिकेत चर्चा होती.

केलेल्या कामाचे बिल मिळावे, धनादेश मिळावा याकरिता कंत्राटदारांची महापालिकेत नेहमीच गर्दी असते. काही कंत्राटदार मध्यस्थांना गाठून बिलांसाठी आयुक्तांपर्यंत पोचतात. या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी आयुक्तांनी महापालिकेत दलाल जास्त येतात. त्यामुळे आपण महापालिकेतील कार्यालयात बसत नाही, असे स्पष्ट केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून गदारोळ उठल्यानंतर त्यांनी पालिकेतील कार्यालयात येऊन बसणे सुरू केले. आता त्यांनी कंत्राटदार आणि त्यांचे मध्यस्थ यांच्यातून सुटण्यासाठी आपल्या दालनाच्या बाहेर पाटी लावली आहे. त्यावर त्यांनी म्हटले आहे की, देयके, धनादेश मिळण्यासाठी आयुक्तांना भेटू नये ही विनंती. कृपया मुख्य लेखाधिकारी किंवा लेखा विभागाशी संपर्क साधावा.

\Bत्यांना कसे भेटणार \B

आयुक्तांनी लावलेल्या या पाटीची महापालिकेत दिवसभर चर्चा होती. मुख्य लेखाधिकारी व लेखा विभागातील अन्य अधिकारी, कर्मचारी भेटतच नाहीत मग त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केम्बिज-नगर नाका रस्ता भूसंपादनासाठी विशेष अधिकारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केम्ब्रिज स्कूल ते नगर नाका या रस्त्याकरिता भूसंपादन करण्यासाठी दोन विशेष अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. हे अधिकारी कार्यकारी अभियंता किंवा उपअभियंता दर्जाचे राहणार आहेत, त्यांच्या नियुक्तीचे आदेश येत्या एक-दोन दिवसांत निघणार आहेत.

केम्ब्रिज स्कूल ते नगर नाका पर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केंद्र सरकारकडे तत्काळ प्रस्ताव पाठवावा व केंद्र सरकारने एक महिन्यात या कामाची प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी दिले. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत अधिकारी, पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेण्यात आली. या रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. कसे आणि किती भूसंपादन करायचे हे ठरविण्यासाठी दोन सक्षम अधिकाऱ्यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले.

\Bशिवाजीनगरला भुयारी मार्गाचा प्रस्ताव\B

शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग येथे भुयारी मार्ग तयार करायचा आहे. दहा दिवसांत या कामाचा प्रस्ताव महापालिकेने रेल्वे प्रशासनाला द्यावा, असे आदेशही खंडपीठाने दिले आहेत. हा प्रस्ताव तयार करण्यासाठीही विशेष अधिकाऱ्याची गरज भासणार आहे. भुयारी मार्गाचा प्रस्ताव आणि केम्ब्रिज स्कूल ते नगर नाका या रस्त्याचा भूसंपादन आराखडा तयार करण्याचे काम विशेष अधिकारी करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्री मोकाट कुत्रे पकडण्याचे नियोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोकाट कुत्र्यांमुळे अडचणीत आलेल्या महापालिकेने आता रात्री कुत्रे पकडणारे पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे नियोजन अंतिम टप्प्यात असून आयुक्तांच्या मंजुरीनंतर हे पथक कार्यान्वित केले जाईल.

बारुदगर नाला परिसरात मोकाट कुत्र्याने चावा घेतल्यामुळे एका नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात पालिकेचे प्रशासन सतर्क झाल्याचे दिसते. कुत्रे पकडण्यासाठी पालिकेकडे एकच पथक असून त्यात आता वाढ करण्यात आली आहे. सध्या चार पथकांकडून कुत्रे पकडण्यात येत आहेत. हे काम पुणे येथील ब्ल्युक क्रॉस संस्थेला देण्यात आले आहे. चार पथकाशिवाय आणखी एक पथक रात्री कार्यरत करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी मोकाट कुत्रे अधिक त्रास देतात, त्यामुळे रात्री कुत्रे पकडण्याची मागणी नगरसेवकांकडून सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकीत वारंवार करण्यात आली. नागरिकांकडूनही तशी मागणी होत असल्याने त्याची दखल घेऊन हे रात्रीचे पथक स्थापन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

\Bनोटीसनंतर सुधारणा \B

कुत्रे पकडण्यासाठी नेमलेल्या संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर संस्थेच्या कामात सुधारणा झाल्याचा दावा डॉ. पाटील यांनी केला. रोज सरासरी २० कुत्रे पकडण्याचे व त्यापैकी १५ ते १८ कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्याचे काम संस्थेकडून केले जात होते. नोटीस बजावल्यावर गुरुवारी दुपारपर्यंत २५ कुत्रे पकडण्यात आले. सायंकाळपर्यंत हा संख्या ४० ते ५० होईल, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात सर्व ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत केली.

विरोधी पक्षाच्या वतीने दुष्काळावर सभागृहात चर्चा करण्यात आली होती. या चर्चेला महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सभागृहात उत्तर दिले. यावेळी आ. सतीश चव्हाण म्हणाले, 'दिवाळीच्या सुटीनंतर नुकतेच महाविद्यालय सुरू झाले आहेत. मोठ्या शहरात शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी तगादा लावला आहे. त्यांना महाविद्यालयात बसू दिले जात नाही. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पैसेच नाी. त्यामुळे त्यांचे परीक्षा शुल्कासह संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावे,' अशी मागणी आ. चव्हाण यांनी सभागृहात केली.

\Bमुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित निर्णय

\Bमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफीचा निर्णय मुख्यमंत्रीच घेऊ शकतात. त्यामुळे या संदर्भात शासन सकारात्क निर्णय करेल,' असे सांगितले. यावर निर्णय आत्ताच घ्यावा अशी मागणी करत विरोधी पक्षातील सदस्यांनी सभागृहात सरकारच्या जाहीर निषेधाच्या घोषणा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिहीनांच्या नावे करा जमिनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गायरान व जंगल जमिनी कसणाऱ्या भूमिहीनांच्या नावे कराव्यात, बेघरांना विनाअट घरे द्यावीत, यासह इतर मागण्यांसाठी फुले शाहू आंबेडकर विचार प्रबोधन परिषदेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, म्हाडा आणि सिडको या संस्थांनी किती घरे बांधली व किती मागासवर्गीय आणि इतरांना दिली याची यादी जाहीर करावी, माळीवाडा येथे गायरानावर ३५ ते ४० वर्षांपासून झोपड्या बांधून राहणाऱ्या आदिवासींना तेथेच घरे बांधून द्यावीत, त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी-वीज-प्राथमिक शाळा या सुविधा द्याव्यात, हमालवाडी, रेल्वेस्टेशन परिसर, नक्षत्रवाडी, कांचनवाडी व सातारा परिसरात पालांमध्ये संसार थाटलेले भटके विमुक्त, आदिवासींना त्याच ठिकाणी घरे बांधून द्यावी, नागरिकत्वाच्या ओळखीसाठी आधार कार्ड, रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र, शाळा व उत्पन्नाचे साधन उपलब्‍ध करून द्यावे, झोपडपट्टीतील घरांना पी. आर. कार्ड द्यावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा, दलित-आदिवासी आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

परिषदेचे मार्गदर्शक रमेशभाई खंडागळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या निदर्शनामध्ये भीमराव सोनवणे, बबन चंदनशिवे, सुंदर साळवे, प्रल्हाद मगरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. निदर्शनांत महिलांची मोठी संख्या होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदारांच्या उशिरामुळे आयुक्त, महापौरांची घालमेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या विकास कामांसदर्भात आयोजित बैठकीला खासदार चंद्रकांत खैरे तब्बल अडीच तास उशारा आल्यामुळे महापौर आणि आयुक्तांची घालमेल झाली. त्याचे कारण फारच नाजुक होते. पण, खैरेंपुढे कुणालाच काही बोलता आले नाही. लग्नाच्या वाढदिवसामुळे आयुक्तांना, तर नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी महापौरांना जायचे होते.

समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना आणि स्मार्ट सिटी मिशन या कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार खैरे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात शुक्रवारी दुपारी चार वाजता बैठक आयोजित केली होती. परंतु, भाजप नगरसेवकांनी आयुक्तांना बैठकीत रोखून ठेवले, शिवाय खैरे यांनी भाजप नगरसेवक गेल्याशिवाय बैठकीला येणार नाही,असा पवित्रा घेतला. यामुळे खासदारांचे बैठकस्थळी साडे सहा वाजता आगमन झाले. ही बैठक किमान दोन तास चालेल, या विचारानेच आयुक्त डॉ. निपून विनायक आणि आणि महापौर नंदकुमार घोडेले हे अस्वस्थ झाले.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आयुक्तांना नेहमीपेक्षा थोडे लवकर घरी जायचे होते. पण बैठकसोडून जाणे त्यांना शक्य नव्हते. नातीच्या वाढदिवसानिमित्त महापोरांनी महापौर बंगल्यात जंगी तयारी केली होती. आप्त, मित्रांना त्यांनी सायंकाळी सातचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे त्यांनाही लवकर जायचे होते. समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना या दोन कामांचा आढावा घेवून खासदारांनी बैठक संपवली, पण तोपर्यंत आठ वाजले होते. उशीर लागल्याबद्दल महापौरांनी पाच वर्षांच्या नातीची समजूत काढली असावी, पण आयुक्तांची काय स्थिती झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images