Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उर्दू माध्यम शाळांच्या तुकड्या वाढविणार !

$
0
0
उर्दू माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. अनेक वेळा या शाळांच्या तुकड्या वाढविण्याबाबत प्रस्तावही आलेले आहेत. आगामी काळात या शाळांच्या तुकड्या वाढविण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी केली.

शॉक लागून महिलेचा मृत्यू

$
0
0
विहिरीवरील विद्युत मोटारीत उतरलेल्या वीज प्रवाहाचा शॉक लागल्याने सुमित्रा गोरख बावीस्कर (२५ वर्षे) यांचा मंगळवारी मृत्यू झाला. ही घटना उपळा येथे घडली. शॉक लागल्यानंतर त्या दूर फेकल्या गेल्या व त्यांच्या डोक्याला मार लागला होता.

३५० वर्षांचा वारसा असलेली पहिली शाळा

$
0
0
गुजराती विद्यामंदिर ही औरंगाबाद शहरातील पहिली शाळा. गुजराती समाज औरंगाबादेत आल्यानंतर सर्वप्रथम पाठशाळा सुरु केली. या पाठशाळेस तब्बल सातशे वर्षांचा इतिहास आहे. पाठशाळेचे रुपांतर शाळेत करण्यात आले. या घटनेसही ३५० वर्षांचा काळ लोटला आहे.

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

$
0
0
भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सिडको बसस्थानक चौकात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. निखिल देवेंद्र भाले (वय 1७) असे त्याचे नाव आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाचेआरक्षणे टाकताना उल्लंघन

$
0
0
झालर क्षेत्र प्रारुप आराखड्यात सामाजिक आरक्षणे टाकताना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करण्यात आले आहे, असा आक्षेप शेतकऱ्यांनी केला आहे. सावंगी, तुळजापूर, आश्रफपूर, कृष्णपूर येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन व्यथा मांडल्या.

पाण्याचे बदलते वेळापत्रक त्रासदायक

$
0
0
महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका भवानीनगर (वॉर्ड क्रमांक ५७) वॉर्डाला बसत आहे. कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त असतानाच काही भागात वेळापत्रकाचेही तीनतेरा वाजल्याने यात आणखीनच भर पडत आहे.

'महानगरच्या निवडणुकीत सर्व मतदारांना ओळखपत्रे

$
0
0
औरंगाबाद महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीत सर्व मतदारांना ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. या संदर्भातील सूचना महापालिकेचे आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

पैठणच्या ओपन जेल मधून कैद्याचे पलायन

$
0
0
पैठण येथील खुले कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने मंगळवारी कारागृहातून पलायन केले. पंचू तुकाराम जाधव असे पलायन केलेल्या कैद्याचे नाव असून, कारागृह प्रशासनाने त्याच्या विरोधात पैठण पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

सॅटेलाइट चित्रांमुळे वाचले अनेकांचे प्राण

$
0
0
उत्तराखंड येथील जलप्रलयाची माहिती मिळताच, सॅटेलाइटच्या मदतीने आम्ही, भारतीय जवानांना माहिती देऊन अनेकांचे प्राण वाचविले. १८ ते २४ जूनपर्यंत आम्ही मदतकार्याच्या कामासाठी नेमकी माहिती देण्याचे काम करीत असल्याची माहिती कानपूर एअरबेसमधील एअर क्राफ्टमन अमोल विलासराव नाझिरे यांनी दिली.

खासगीकरण, नवी पेन्शन योजना रद्द करा

$
0
0
सरकारी क्षेत्रात खासगीकरणाचे धोरण रद्द करावे, नवीन पेन्शन योजना रद्द करावी, सर्व संवर्गांतील रिक्त पदे त्वरित भरावी आदी मागण्या महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने केल्या आहेत.

शेतक-यांना मदत न करणा-या बँकांवर कारवाई करा

$
0
0
'मराठवाडा व विदर्भातील बँका शेतकऱ्यांना मदत करत नाहीत. बँकिंगच्या क्षेत्रात महाराष्ट्रात कमालीचा विभागीय असमतोल निर्माण झाला आहे.

पंधरा दिवसात दुस-यांदा पाऊस

$
0
0
पावसाने शहरात एक आठवड्याच्या खंडानंतर मंगळवारी दुपारी हजेरी लावली. चिकलठाणा वेधशाळेत १०. ५ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात गेल्या पंधरा दिवसांत फक्त दोनदा पाऊस झाला आहे.

३ हजार रूपये किलो अजवाह पेंढखजूर

$
0
0
रमजान महिन्यात दिवसभराचे रोझे सोडण्यासाठी पेंडखजूरचा उपयोग करतात. सध्या बाजारात विविध प्रकारचे पेंडखजूर आले असून तीन हजार रूपये प्रतिकिलोचे अजवाह केसरी पेंडखजूरचीही आवक झाली आहे. याशिवाय ओमान, किमिया, आणि अलमदीना खजूरचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मंगळसूत्रचोरीचे नऊ गुन्हे उघडकीस

$
0
0
मंगळसूत्रचोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात सिडको पोलिसांना यश आले आहे. यात सुमारे पाच लाख रुपये किंमतीचे दागिने; तसेच दोन दुचाकी जप्त करण्यात आले असून आणखी गुन्हे उघडकीस येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मुंकुदवाडी भागात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

$
0
0
मुंकुदवाडी पोलिस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिला आहे. पीडीत मुलीचे पालक पोलिस खात्यात कर्मचारी असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

पहिल्या टीडीआर प्रमाणपत्राचे वितरण

$
0
0
नवीन विकास नियंत्रण नियमावलींतर्गत विकासासाठी महापालिकेला आरक्षित जमीन विनामूल्य हस्तांतरीत करून त्याबदल्यात जमिनीच्या मालकाला तितक्याच क्षेत्रफळाच्या विकास हस्तांतरणाचा हक्क (टीडीआर) देणाऱ्या पहिल्या प्रमाणपत्राचे वितरण आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

अंगणवाड्यांमधील पोषण आहार संपला

$
0
0
अंगणवाड्यांमधून बालकांना दिला जाणारा पोषण आहार गेल्या वीस दिवसांपासून संपला असून संबधित कर्मचारी व अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे अद्यापही अंगणवाड्यांना पोषण आहार प्राप्त झालेला नसल्याचे धक्कादायक चित्र मनाठा परिसरासह हदगाव तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये पाहावयास मिळत आहे.

दुष्काळी तालुक्यांसाठी पाणी सोडा

$
0
0
नाशिक जलसंपदा विभागाने सध्या अहमदनगर जिल्ह्यासाठी गोदावरी डावा व उजव्या कालव्यातून पाणी सोडले आहे; पण औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर या दुष्काळी तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून पिण्यासाठी पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाचे नियोजन नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

मराठवाडा चिंब भिजला

$
0
0
आठवडाभराच्या खंडानंतर संपूर्ण मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी सकाळपर्यंत विभागात २०.८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सोनपेठ तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टीची नोंद झाली.

डेंगीचे आणखी पाच नमुने पॉझिटिव्ह

$
0
0
डेंगीची लागण औरंगाबादलगतच्या परिसरासह शहरातही हळूहळू पसरत आहे. घाटी हॉस्पिटलमध्ये तपासण्यात आलेल्या २५ पैकी ५ नमुन्यांचा अहवाल डेंगी पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे यापैकी चार रक्तनमुने शहरातील आहेत. त्यामुळे शहरात साथ पसरण्याचा धोका वाढला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>