Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मनसेच्या शहर शाखा बरखास्त

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरातील सर्व शाखा बरखास्त केल्या असून लवकरच नवीन शाखा स्थापना व शाखाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. प्रत्येक वॉर्डात तीन-चार शाखा असल्यामुळे हा निर्णय घेतला, असे शहराध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी सांगितले.

मुंडेंचे पवार काका-पुतण्याला आव्हान

$
0
0
'शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार हे दोन्हीही पवार निवडणुकीच्या वेळी बीडमध्ये येऊन बसले तरी मागच्या वेळेसपेक्षा यावेळी जास्त मतांनी निवडून येऊ,' अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नेते, खासदार गोपीनाथ मुंडे यांनी पवार काका-पुतण्याला आव्हान दिले.

औरंगाबादमध्ये कडकडीत बंद

$
0
0
बोधगया येथील जगप्रसिद्ध मंदिरात ७ जुलै रोजी झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या निषेधार्थ आज औरंगाबाद बंदची हाक देण्यात आली आहे. बुधवारी सकाळपासूनच या बंदला औरंगाबादकरांनी प्रतिसाद असून कडकडीत बंद पाळ्यात येत आहे. शहरातल्या बाजारापेठा, शाळा, कॉलेजही बंद ठेवण्यात आले आहेत.

खोदकामामुळे पाणी पुरवठा विस्कळीत

$
0
0
शहरातील जुना परिसर असलेल्या कोकणवाडी वॉर्डात पुरेसा पाणी पुरवठा होतो; मात्र सध्या रेल्वे स्टेशन रस्त्याच्या खोदकामामुळे स्नेहनगरसह दोन कॉलनीतील रहिवाशांना कमी पाणी मिळत आहे. वॉर्डातील इतर विकासकामे झाली असून नागरिकांनी समाधानकारक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शासकीय कॉलेज हाउसफुल्ल

$
0
0
संख्यात्मक झालेली वाढ, विद्यार्थ्यांनी फिरवलेली अभ्यासक्रमाकडील पाठ यामुळे राज्यातील पदव्युत्तर औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक प्रवेश रिक्त राहिले आहेत.

औरंगपुरा भागात टोळक्याचा धुडगूस

$
0
0
औरंगपुरा, निराला बाजार भागात युवकाच्या टोळक्याने धुडगूस घातल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. प्रवासी रिक्षा आणि कारच्या या टोळक्यानी काचा फोडल्या. तसेच, अनेक इमारतींच्या काचावर दगडफेक केली.

अजिंठा व वेरूळ लेण्यांना चोख सुरक्षा देण्याची मागणी

$
0
0
बोधगया येथील घटनेतून धडा शिकून अजिंठा व वेरूळ लेण्या, राज्यातील सर्व ऐतिहासिक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कायमस्वरुपी सुरक्षा व्यवस्था तैनात करावी, अशी मागणी व विविध पक्ष संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

२०९ कर्मचा-यांनी केला अपहार

$
0
0
महाराष्ट्र दर्शन रजा योजनेतील रक्कम लाटण्यासाठी बनावट देयके सादर करून उस्मानाबाद जिल्ह्यातील १९ शाळांतील २०९ शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून १८ लाख ५० हजार रूपये वसूल करण्यात आले.

नांदेड सिडको-हडकोत आज ऐवजी उद्या पाणीपुरवठा

$
0
0
काळेश्वर येथील पंप हाऊसच्या विद्युत मोटारीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उद्या गुरुवारी सिडको-हडको भागातील नियोजित पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

लाच घेताना पोलिस निरीक्षकास अटक

$
0
0
दरोडा प्रकरणातील आरोपीची अटक टाळण्यासाठी लाच घेत असताना लाचलूचपत प्रति‌बंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाशी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आविनाश बुधवंत यांना लाच घेत असताना रंगेहाथ पकडले.

नाईक महामंडळात आर्थिक घोटाळा

$
0
0
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोळ झाल्याचा आरोप कॉँग्रेसने केला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही शहर उपाध्यक्ष संजय जाधव यांनी केली आहे.

बिल न पाठविल्याने अडकला वनमजुरांचा पगार

$
0
0
पगार द्या हो...पगार असं म्हणण्याची वेळ वनमजूरांवर आली आहे. जून महिन्याच्या पगारासाठी अद्यापही बिल पाठविण्यात न असल्याने वनमजूर तसेच, औरंगाबाद वन विभागांतर्गत येणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप झालेले नाहीत.

वाया जाणारे पाणी साठवून घ्या

$
0
0
नांदेड येथील विष्णुपुरी भागात असलेल्या कै. शंकरराव चव्हाण उपसा जल सिंचन प्रकल्प भरल्याने त्यातून तीन दरवाजे उघडून गोदावरीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले होते. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला होता. बुधवारी फक्त एकच दरवाजा उघडा असून हे अतिरिक्त पाणी फुकटच वाहत आहे.

सुधारणा न झाल्यास कर्मचा-यांची बदली करणार

$
0
0
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कामकाजात येत्या पंधरा दिवसात सुधारणा न झाल्यास शिक्षण विभागातील दोषी आढळून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना किनवट, माहूर, हदगाव आणि हिमायतनगर पंचायत समिती आणि तालुका अंतर्गत रिक्त पदावर बदली करण्यत येणार आहे.

स्थायीची बैठक'आरोग्य'प्रमाणेच उरकणार?

$
0
0
जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या बैठका म्हणजे गेल्या वर्षभरापासून केवळ औपचारिकता म्हणूनच घेतल्या जातात. कुठलाही निर्णय न घेता बैठका गुंडाळल्या जातात. बुधवारी आरोग्य समितीची बैठक गुंडाळली गेली. गुरुवारी स्थायी समितीचीही तीच अवस्था होणार आहे.

बलात्कारप्रकरणी एकाला अटक

$
0
0
तेरा वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला बुधवारी मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. एका महिला पोलिस कर्मचाऱ्याची ही मुलगी असून गेल्या सहा महिन्यांपासून या बालिकेवर अत्याचार सुरू होता.

FOB चा खर्च झाला ३० वरून ५० लाख

$
0
0
सिद्धार्थ उद्यानासमोर तयार करण्यात आलेल्या फूट ओव्हर ब्रीजचा खर्च तीस लाखांवरून पन्नास लाख रुपयांवर गेला. एवढा खर्च कसा वाढला याचा शोध घेण्यासाठी स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे सरसावले आहेत.

रमजान महिन्याला आजपासून प्रारंभ

$
0
0
इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. रमजान महिन्यातील तीस दिवस रोजे (उपवास) उद्यापासून सुरुवात होणार आहे. शहरातील हिलाल कमिटीने गुरुवारपासून रमजान सुरू होणार असल्याची घोषणा केली.

मशिप्र मंडळाची निवडणूक बेकायदेशीर

$
0
0
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या काही सदस्यांनी वेगळा गट निर्माण करून बेकायदेशीररित्या मंडळाची निवडणूक घेतली आहे असा आरोप मंडळाचे मावळते सरचिटणीस मधुकरराव मुळे यांनी केला आहे.

औरंगाबाद 'बंद'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0
जगभरातील बौद्धधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या महाबोधी मंदिर व परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय समितीच्यातर्फे पुकारण्यात आलेल्या औरंगाबाद 'बंद'ला मोठा प्रतिसाद मिळाला. निराला बाजार येथे काही दुकानावर झालेल्या दगडफेकीची घटना वगळता हा बंद शांततेत पार पडला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images