Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कार्गो सेवेला सॉफ्टवेअरचा अडसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद विमानतळावर आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सीमा शुल्क (कस्टम) विभागाकडून विमानतळात कार्गोसाठी असलेल्या सॉफ्टवेअर बसविणे बाकी आहे. त्यामुळे या सुविधेला अद्याप प्रारंभ झालेला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून ही प्रक्रिया प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद शहरातील शेती उत्पादित मालासह अन्य औद्योगिक उत्पादने कमी वेळेत थेट विदेशात नेता यावीत, यासाठी आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर विमानतळावर देशांतर्गत कार्गो सुविधेसाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली. पूर्वी देशांतर्गत कार्गो पाठविण्याचे काम संबंधित विमान कंपन्यांकडूनच केले जात होते. आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा सुरू करण्यासाठी जुन्या विमानतळाच्या जागेवर देशांतर्गत कार्गो आणि आंतरराष्ट्रीय कार्गोसाठी जागा निश्चित करण्यात आल्या. त्या ठिकाणी बांधकाम सुरू करण्यात आले. तेथे देशांतर्गत कार्गो सेवा दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. यानंतर आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा देण्यासाठी कामाची सुरवात करण्यात आली. काम पूर्ण झाल्यानंतर या जागेची विशेष केंद्रीय दक्षता पथकाकडून पाहणी करण्यात आली होती. या पथकाने काही आवश्यक बदल सुचविले होते. या बदलानंतर पुन्हा समितीची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधेचे काम काही दिवस रखडले होते. यानंतर औरंगाबाद विमानतळ संचालकपदी पुन्हा डी. जी. साळवे यांच्या नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधेच्या उभारणीला वेग आले. त्यांनी कार्गो सुविधेच्या उभारणीचे काम पूर्ण करून संबंधित दक्षता समितीकडून मान्यताही घेतली. याशिवाय या कार्गो सेवा चालू करण्यापूर्वी स्कॅनिंग मशीन, लिफ्टर आणि इतर आवश्यक साधन सामग्रीही मागविण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कस्टम विभागाकडून आंतरराष्ट्रीय नियमानुसार कार्गो तपासणी करण्यासाठी सॉफ्टवेअर बसविण्याची आवश्यक आहे. या सॉफ्टवेअर बसविण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने कस्टम विभागाकडे मागणी केली आहे. तीन महिन्यांपासून विमानतळ विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे, मात्र अद्याप सॉफ्टवेअर बसविण्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान, कस्टम विभागाने औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये कार्गो सुविधेसाठी सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन प्रक्रियेसाठी दिल्लीच्या मुख्यालयाला कळविण्यात आले आहे, अशी माहिती विमानतळ विभागाच्या सूत्रांनी दिली.

……

\Bउद्योजकांनी घेतला पुढाकार\B

आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा सुरू करण्यासाठी शहरातील उद्योजकांनी पुढाकार घेतला होता. नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू शहरात आले असताना, त्यांच्याशी कार्गो सुविधा सुरू करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. उद्योजकांनी पुढाकार घेतल्याने, कार्गोच्या सुविधेला वेग आला होता.

………

\Bआंतरराष्ट्रीय कार्गोचा असा होईल फायदा\B

औरंगाबाद, खान्देश, नगर आणि मराठवाड्यातील विविध भागातील कृषी माल, औषध निर्मिती कंपन्या, ऑटोमोबाइल क्षेत्रातील माल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठविण्याची सोय औरंगाबाद विमानतळावरून उपलब्‍ध होणार आहे.

मटा भूमिका

कार्गो सेवा लवकर सुरू व्हावी

औरंगाबाद विमानतळावर कार्गो सुविधा सुरू करण्याचे काम गेल्या सुमारे अडीच वर्षांपासून सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कस्टम विभागाच्या सॉफ्टवेअरची कार्गो सेवेला प्रतीक्षा आहे. मराठवाड्यातील कृषी उत्पादने, त्याचबरोबर औरंगाबादच्या परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील उत्पादने निर्यात करण्यासाठी कार्गो सुविधा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सरकारची घोषणा प्रत्यक्षात उतरण्यासाठी किती दीर्घ प्रतीक्षा करावी लागते, हे कार्गो सेवेच्या उभारणीतील संथपणावरून लक्षात येऊ शकते. निर्यातीची सुविधा उपलब्ध झाल्यास या परिसरातील शेतकऱ्यांना निर्यातक्षम कृषीमालाचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकेल. मागास भागात एखाद्या सेवेची उभारणी करताना सरकारने विशेष लक्ष देणे गरजेचे असते. अशा भागांमध्ये एखादी सेवा घोषणेनंतर लवकर उभारल्यास त्यातून परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होऊ शकते. असे असतानाही मोठी आणि विकसित शहरांतील कामांकडेच सरकारचे लक्ष असते, असा आजवरचा अनुभव आहे. आणि तोच अनुभव औरंगाबाद विमानतळावरील कार्गो सेवेतील विलंबाच्या निमित्ताने येत आहे. केंद्र सरकारच्या अख्त्यारितील कस्टम विभागाने त्यांच्याकडे प्रलंबित असलेले काम लवकर करावे, यासाठी राज्य सरकारच्या पातळीवरून पाठपुरावा झाला पाहिजे. त्याचबरोबर मराठवाड्यातील खासदारांनी एकत्रितपणे केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बांधकाम कामगारांचे निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना त्वरित देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार संघटना फेडरेशनने (आयटक) बुधवारी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. मागण्यांबाबत त्वरित सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

गवंडी, सेट्रिंग, सुतार, फरशी पॉलिश, वायरमन, वेल्डर आणि इतर बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान व्हावी, यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. या मंडळामार्फत असंघटित कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात, परंतु अर्ज करूनही अनेक कामगार गेल्या एक ते दीड वर्षापासून लाभापासून वंचित आहेत. नोंदणीत कामगारांना बांधकाम साहित्य घेण्यासाठी पाच हजार रुपये देण्याची घोषणा झाली, पण अद्यापही हा निधी देण्यात आला नाही. त्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप कामगारांनी केला आहे. त्यांनी राज्य उपाध्यक्ष मधुकर खिल्लारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

कामगारांची पिळवणूक थांबवा, त्वरित न्याय द्या, अशी घोषणाबाजी करत कामगारांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. प्रलंबित अर्ज त्वरित निकाली काढा, विविध योजनांचे नवीन अर्ज तातडीने उपलब्ध करून द्या. नूतनीकरणासाठी दिलेल्या पावत्यांच्या आधारे कामगारांचे त्वरित नूतनीकरण करून घ्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. शहराध्यक्ष रुपचंद ढवळणपुरे, सुधाकर खिल्लारे, राजेश म्हस्के, विठ्ठल रंधवे, संदीप अंबिलढगे, सुनीता वाहुळे, सुधाकर घाटे, प्रमोद रंधवे, डिगांबर पळसकर यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशी संपल्यावर मिळतील फाइल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय 'टीडीआर'च्या (ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राइट) फाइल आणि रजिस्टर परत मिळणार नाही, अशा शब्दात राज्य शासनाच्या नगररचना विभागाच्या संचालकांनी महापालिकेला ठणकावले आहे. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांची घालमेल अधिकच वाढली आहे. संचालकांनी 'टीडीआर'च्या २२३ फाइल चौकशीसाठी ताब्यात घेतल्या आहेत.

महापालिकेतील 'टीडीआर' घोटाळा सर्व प्रथम 'मटा'ने उघडकीस आणला. त्यानंतर या घोटाळ्याचे पडसाद विधानसभेत उमटले. 'एमआयएम'चे आमदार इम्तियाज जलील यांनी 'टीडीआर' घोटाळ्याबद्दल विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न मांडला. त्यावर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नगररचना विभागाच्या संचालकांमार्फत या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले. संचालकांना देखील टीडीआर गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर संचालकांनी चौकशी सुरू केली. महापालिकेतर्फे २२३ प्रकरणात 'टीडीआर' देण्यात आले आहेत. ही सर्व प्रकरणे चौकशीसाठी ग्राह्य धरण्यात आली. महापालिकेकडून २२३ प्रकरणांच्या फाइल, टीडीआर नोंदणीचे रजिस्टर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुमारे दीड वर्षापासून फाइल आणि रजिस्टर संचालक कार्यालयाच्या ताब्यात आहेत. संचालकांनी फाइलमधील कागदपत्रांच्या झेरॉक्स काढून मूळ फाइल परत कराव्यात, त्याचबरोबर रजिस्टर देखील परत करावे, असा लकडा महापालिकेने गेल्या काही महिन्यांपासून लावला जात आहे. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात संचालक कार्यालयाशी संपर्क साधून फाइल आणि रजिस्टर परत करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी उपसंचालक कावळे यांच्याशी संपर्क साधला होता. चौकशीचे काम पूर्ण झाल्याशिवाय फाइल आणि रजिस्टर परत केले जाणार नाही, असे कावळे यांनी सांगितल्याची माहिती महापौरांनी दिली. लवकरात लवकर चौकशी पूर्ण करून कागदपत्र महापालिकेला परत केली जातील, असे कावळे यांनी स्पष्ट केल्याचा उल्लेख महापौरांनी केला. संचालकांच्या चौकशीच आम्हाला हस्तक्षेप करायचा नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीने चौकशीचे काम पूर्ण करावे अशीच आमची भूमिका आहे, असे महापौरांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीडीआर’ मंजुरी पुन्हा सहाय्यक संचालकांकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राइट (टीडीआर) मंजुरीचे अधिकार महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पुन्हा एकदा नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकांना दिले आहेत. हे अधिकार उपायुक्त मंजुषा मुथा यांना देण्यात आले होते. मुथा यांच्याकडून फाइल मंजूर करण्यास उशीर लागत असल्यामुळे त्यांच्याकडचे अधिकार काढून घेण्यात आले. पूर्वी हे अधिकार सहाय्यक संचालकांनाच होते, आता पुन्हा त्यांनाच अधिकार देण्यात आले आहेत. नगररचना अधिनियम १९६६अन्वये नियमानुसार विकास हक्क हस्तांतर (टीडीआर) प्रकरणांच्या संचिकांमध्ये कार्यवाही करावी व दर महिन्याला मंजूर केलेल्या प्रकरणांचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे आयुक्तांनी आदेशात नमुद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी ‘व्हीडिओ’चा उतारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यंदा अभ्यासक्रम बदलला असून प्रश्नपत्रिकेऐवजी कृतीपत्रिका सोडवावी लागणार असल्याने दहावीचे विद्यार्थी गोंधळेले आहेत. पण, बालभारती त्यांच्या मदतीला धाऊन आली आहे. प्रश्नपत्रिका कशी सोडवायची याचा प्रत्यक्ष अनुभव व्हीडिओद्वारे घेता येणार आहे. हे व्हीडिओ बालभारतीची वेबसाइट व यू ट्यूबवर गुरुवारपासून उपलब्ध होणार आहेत.

पाठांतर, घोकंमपट्टीवर आधारित दहावीचा अभ्यासक्रम २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून बदलला आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कृतीपत्रिका असे करण्यात आले असून विचारशक्ती, आकलनावर भर असल्याने विद्यार्थ्यांमध्ये काहीसा संभ्रम आहे. पाठांतर स्वरुपामध्ये पूर्वी उपलब्ध असलेल्या जुन्या प्रश्नपत्रिकांद्वारे विद्यार्थी सराव करत. यंदा ही सोय नाही परिणामी, निकालाचे प्रमाण कमी होईल, असे अंदाज व्यक्त होत आहे. या पाश्वभूमीवर बालभारतीने प्रश्नपत्रिकांचा संच वेबसाइटवर उपलब्ध करून दिला. त्याच सोबत गुरुवारपासून (सहा डिसेंबर) विद्यार्थ्यांना व्हीडिओद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रकच बालभारतीने जाहीर केले आहे. www.ebalbharati.in ही वेबसाइट व यू ट्यूबवर विद्यार्थ्यांना हे व्हीडिओ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कृतिपत्रिका स्वरूपावर आधारित मार्गदर्शनपर व्हीडिओ तयार केले आहेत. पहिल्या टप्प्यावर कृतिपत्रिका संच, यासह समाविष्ट प्रश्नांच्या उत्तरांच्या संदर्भात विषय तज्ज्ञांचे मत व्यक्त करणारे मार्गदर्शन आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविण्याच्या अनुभवासह, प्रश्न सोडविताना कोणती काळजी घ्यावी, चुका कोणत्या टाळाव्यात याचे मार्गदर्शन मिळेल, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. विभागातून दोन तर, राज्यभरातून दहावीला १७ लाख विद्यार्थी दरवर्षी बसतात.

\Bवेळापत्रक\B

विषय........... दिनांक

सर्व भाषा..... ६ डिसेंबर

द्वितीय भाषा.... ७ डिसेंबर

तृतीय भाषा..... ८ डिसेंबर

विज्ञान-१....... ९ डिसेंबर

विज्ञान-२....... १० डिसेंबर

गणित-१........ ११ डिसेंबर

गणित-२........ १२ डिसेंबर

इतिहास-राज्यशास्त्र.. १३ डिसेंबर

भूगोल.................. १४ डिसेंबर

बदलेला अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप त्याबाबत दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती दूर करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचा प्रत्यक्ष अनुभव त्यातून मिळेल अन् त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतील. भीती दूर होण्यासही मदत होईल. शिक्षकांनाही त्याचा निश्चित फायदा होईल.

-गजानन सूर्यवंशी, विज्ञान विषय तज्ज्ञ.

बदलेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये थोडिसी संद्धिगता आहे. त्यामुळे अशा प्रकारची संद्धिगता दूर होत कृतीपत्रिका कशी सोडवायची याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. सर्व विषयतज्ज्ञांनी यात मार्गदर्शन केले. त्यामुळे शिक्षकांनाही त्याचा उपयोग होणार आहे.

-संदेश सोनवणे, गणित अभ्यास गट, बालभारती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीनगर लुटमार; फरार आरोपीला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घराकडे रात्री दुचाकीवर निघालेल्या पिता-पुत्राला शिवाजीनगर रेल्वेरुळालगत अडवून पिस्तुलचा धाक दाखवत गंभीर स्वरुपाची मारहाण करुन दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले पाच हजार रुपये लुटल्याप्रकरणातील फरार आरोपी सादिक कासम ठेकिया याला घटनेच्या पावणे दोन वर्षानंतर बुधवारी (५ डिसेंबर) अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर केले असता, आरोपीला शुक्रवारपर्यंत (७ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

या प्रकरणी रोहित अशोक लोहाडे (२६, रा. सातारा परिसर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २२ एप्रिल २०१७ रोजी फिर्यादी व त्याचे वडील हे आपले दुकान बंद करुन रात्री साडेदहाच्या सुमारास घराकडे निघाले होते. शिवाजीनगर रेल्वेरुळाजवळ अडवून व पिस्तुलाचा धाक दाखवत आरोपींनी त्यांना गंभीर स्वरुपाची मारहाण केली होती. जीव वाचवण्यासाठी फिर्यादी व त्याचे वडील घटनास्थळावर दुचाकी सोडून पळून गेले होते. या प्रकरणात फिर्यादीच्या दुचाकीच्या डिक्कीतील पाच हजार रुपये लंपास केल्याचेही स्पष्ट झाले होते. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संजय त्रिंबक कापसे, दिपक आसाराम बरडे, देविदास विठ्ठलराव कदम, कासम दादाभाई ठेकिया या आरोपींना अटक करुन त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. तर, यातील आरोपी सादिक उर्फ बाबा साकम ठेकिया व आरोपी अमोल घुगे हे गुन्हा घडल्यापासून फरार होते. या प्रकरणात आरोपी सादिक कासम ठेकिया (२५, रा. मेमन कॉलनी, मोतीवाला नगर, सेव्हन हिलजवळ) याला बुधवारी अटक करण्यात आली.

\Bपिस्तुल, काडतुसचा तपास बाकी

\Bआरोपी सादिक याला कोर्टात हजर केले असता, यापूर्वी अटक केलेला आरोपी कासम दादाभाई ठेकिया हा सादिक याचा पिता असून, त्याच्या घरातून पिस्तुल जप्त करण्यात आले होते. ते पिस्तुल कुठून आणले, काडतुस कुठे ठेवले, याची कोणतीही माहिती ठेकिया याने दिलेली नाही. याबाबत तपास करणे बाकी असून, आरोपींनी पिस्तुल कुणावर झाडले आहे का, याचाही तपास करावयाचा आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीदेखील जप्त करावयाची असल्याने आरोपीला सात दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी कोर्टात केली होती. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुम्हीच काही तरी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'साहेब देवाने, तर आमचे ऐकले नाही; आता तुम्ही आला आहात, आम्हाला पाणी नाही. यापूर्वीही सरकारमधील नेत्यांनी दुष्काळ दौरे केले. आमच्या हाताला काम नाही. कामासाठी एमआयडीसीत जावे लागत आहे,' अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमोर मांडल्या. 'आता आमच्यासाठी तुम्हीच काही तरी करा,' अशी हात जोडून विनंतीही त्यांनी पथकाला डोळ्यात पाणी आणून केली.

मराठवाड्यातील दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथकाने बुधवारी (पाच डिसेंबर) जिल्ह्यात दाखल झाले. पथकाने दोन तासांत गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी डॅम, मुरमी आणि सुलतानपूर या गावांना भेटी दिल्या. यावेळी पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली. इंटर मिनिस्टरियल सेंट्रल टीम (आयएमसीटी) अंतर्गत येणाऱ्या पथकाच्या प्रमुख केद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव छावी झा या होत्या. या पथकात कडधान्य विकास संचालनालयाचे संचालक ए. के. तिवारी, केंद्रीय कृषी विभागाच्या शालिनी सक्सेना, केंद्रीय जलसमितीचे संचालक आर. डी. देशपांडे यांचा समावेश आहे. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

पथकाने प्रथम संपूर्ण कोरड्या असलेल्या टेंभापूरी प्रकल्पाची पाहणी केली. पथकप्रमुख छावी झा यांनी उपस्थित शेतकऱ्यांना तुम्हाला पाणी कुठून मिळते?, दुष्काळात स्थिती काय आहे? पाणी असताना येथे प्रामुख्याने कोणते पीक घेत होता, अशी विचारणा केली. टँकर आणि विहीर अधिग्रहण हाच एक पर्याय असल्याचे सांगत, शेतकऱ्यांनी टँकरसाठी पाणी भरण्यासाठीही अडचणी असल्याचे लक्षात आणून दिले. यानंतर पथकाने मुरमी गावातील यादव पुंजाराम नीळ यांच्या कपाशीची पाहणी केली. यानंतर सुलतापूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून पथकाने औरंगाबाद गाठले. यानंतर ते जळगावकडे रवाना झाले.

\Bकेवळ एक क्विंटल कापूस

\Bसुलतानपूर (जिकठाण) येथील शेख युनूस शेख चाँद, तसेच शेख बाबुलाल शेख अहेमद यांच्या तूर, कपाशीच्या शेतीची पाहणी केली. यंदा केवळ एकच वेचणी झाली. पूर्वी जेथे १२ ते १५ क्विंटल कापसाचे उत्पन्न झाले, आज त्याच शेतातून केवळ एक ‌ते दीड क्विंटल कापूस निघाला, गावात काम नसल्याने एमआयडीसीत कामाला जावे लागते, असे असे शेख युनूस यांनी पथकाला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा डिसेंबरनिमित्त शहरात चोख बंदोबस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात गुरुवारी सहा डिसेंबरनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बाबरी मशीद पाडल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हिंदूत्ववादी संघटनांच्या वतीने शौर्य दिन, तर निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने काळा दिन पाळण्यात येतो. तसेच या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन देखील आहे. या निमित्ताने शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी .

बंदोबस्तामध्ये तीन पोलिस उपायुक्त, सात एसीपी, ३१ पोलिस निरीक्षक, ६९ सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, एक हजार पुरूष कर्मचारी, ५८ महिला कर्मचारी, ३४ पेट्रोलिंग व्हॅन, ६८ फिक्स पॉइंट यांच्यासह दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्यांचा समावेश आहे. यासोबत स्ट्रायकिंग फोर्स, क्वीक रिसपॉन्स टीम, गुन्हे शाखा, विशेष शाखेच्या पथकाचा बंदोबस्तामध्ये समावेश करण्यात आला आहे. शौर्य दिनाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने गुलमंडी येथे सुपारी हनुमान मंदिरात महाआरती करण्यात येणार असून, भारतीय जनता पक्षाच्या वतीने औरंगपुरा येथील दक्षीणमुखी हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने चंपा चौकात काळा दिनानिमित्त सामूहिक अजान देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहावी, बारावी संभाव्य वेळापत्रकच ‘अंतिम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०१९मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक अंतिम केले आहे. २१ फेब्रुवारीपासून बारावीची तर, दहावीची एक मार्चपासून परीक्षा सुरू होत आहे.

शिक्षण मंडळाने परीक्षेचे संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या वेबसाइटवर जाहीर केले होते. त्यानुसार पालक, शिक्षक, संघटना याच्यांकडून सूचना मागविण्यात आल्या. सूचना मान्य न करता संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आल्याचे मंडळाने कळविले आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान चालणार आहे. दहावीची परीक्षा एक ते २२ मार्च दरम्यान लेखी परीक्षा होणार आहे. अंतिम वेळापत्रक वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर शाळा, ज्युनिअर कॉलेजांना देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल. २०१८-१९पासून दहावीकरिता पुनर्रचित अभ्यासक्रम असल्याने पुनर्परीक्षार्थींकरिता अंतिम संधी असलेले जुन्या अभ्यासक्रमाचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आलेले असल्याचे मंडळाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी वाहतुकीबाबत मनविसेची आरटीओकडे मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून नियमबाह्य वाहनांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी केली. यासंदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाला एक निवेदन देण्यात आले.

मनसेच्या निवेदनात म्हटले की, शहरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने बहुतांश जुनी असून यामध्ये अॅटोरिक्षा, मिनी बसेसचे प्रमाण जास्त आहे. या वाहनांची विद्यार्थी वाहतूक करीताची नोंदणी आरटीओ कार्यालयात झाली असून नियमानुसार या वाहनांवर तपासणी करून कारवाई करण्यात यावी. या मागण्यासोबतच इतर मागण्या देखील मनविसेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्या वाहनांची नोंदणी झाली नाही अशी वाहने तात्काळ जप्त करावीत. विद्यार्थी वाहतुकीसाठी देण्यात आलेल्या फिटनेस सर्टीफिकेटची फेर तपासणी व्हावी, निकष डावलून देण्यात आलेल्या परवानग्या तात्काळ रद्द करून सबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. शहरात विविध पथके नेमून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करावी आदी मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष राजीव जावळीकर, जिल्हा उपाध्यक्ष निखिल ताकवाले, प्रतीक गायकवाड, शुभम नवले, कार्तिक फरकाडे, नीतेश देवरे, संदीप राजपूत, शुभम घोरपडे, रविराज कांबळे, प्रशांत आटोळे, नितीन कल्याणकर, विशाल गोंधळे, किरण राठोड आदींचा समावेश होता.

स्कूल बस, टाटा मॅजिक, ऑटो रिक्षामध्ये विद्यार्थी कोंबून त्यांची वाहतूक करणे हा विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. मनविसेच्या वतीने अशा शाळा व वाहनांविरुद्ध मोहीम राबविण्यात येणार आहे. अशा वाहनांमध्ये पालकांनी देखील आपल्या मुलांना पाठवू नये याबाबत देखील जनजागृती करण्यात येणार आहे.

राजीव जावळीकर, जिल्हाध्यक्ष, मनविसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीनगरात प्राध्यापकाची तर जटवाड्यात विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवाजीनगर भागात प्राध्यापकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला तर जटवाडा परिसरात १७ वर्षांच्या विद्यार्थ्याने गळफास घेत जिवनयात्रा संपवली. रविंद्र जग्गनाथ खैरनार (वय ३८ रा. बारावी योजना) असे या प्राध्यापकाचे नाव असून रोहित बाबू डोंगरे (रा. आरेफ नगर) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

रविंद्र खैरनार हे खुलताबादेतील एका कला महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांची पत्नी देखील खुलताबादच्याच जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे. मंगळवारी दुपारी त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा खेळण्यासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी खैरनार यांनी बेडरुमचा दरवाजा आतून बंद करीत सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. सायंकाळी पत्नी घरी परतल्यावर हा प्रकार आला. खैरनार यांना घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रा. खैरनार यांच्यावर गेल्या महिन्यापासून वैद्यकीय उपचार सुरू होते.

आत्महत्येची दुसरी घटना बुधवारी सकाळी जटवाडा रोड परिसरातील आरेफ कॉलनी येथे उघडकीस आली. या ठिकाणी रोहित बाबू डोंगरे या महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. रोहित हा रोजेबाग परिसरातील एका कॉलेजमध्ये ११वीत शिकत होता. बुधवारी सकाळी रोहितचा भाऊ व वहिनी बाहेर गेले होते. तसेच त्याची आईही बाहेर गेलेली होती. वडील चालक असून ते नोकरीला गेले होते. यावेळी रोहितने छताला दोरी बांधून गळफास घेतला. घरातील मंडळी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. रोहितला तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंजूरपुरा टीडीआर प्रकरणाची आयुक्तांनी चौकशी करावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मंजूरपुरा टीडीआर (ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राइट) प्रकरणाची चौकशी आयुक्तांनी स्वत: करावी व त्याचा अहवाल सादर करावी, अशी भूमिका महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्पष्ट केली. यासंदर्भात आपण आयुक्तांना पत्र देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

मंजूरपुरा टीडीआर प्रकरणात शिवदास राठोड व मजहर अली या दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर महापौर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 'त्या प्रकरणात एकदा रोखीने मोबदला देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा 'टीडीआर'साठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. 'टीडीआर'चा अर्ज कोरा होता. कोर अर्ज मजहर अली व शिवदास राठोड यांनी पुढील कार्यवाहीसाठी चालवला असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांच्या तपासात ते निष्पन्न झाले आहे. आता आयुक्तांनी या प्रकरणाची फाइल स्वत:च्या ताब्यात घ्यावी व चौकशी करून अहवाल सादर करावा.'

कोऱ्या अर्जावर फाइल चालवल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यावर उपअभियंता ए. बी. देशमुख, एम. बी. काजी यांनी त्यावर तसा अभिप्राय लिहिला व फाइल रद्द करण्याची शिफारस केली होती, तत्कालीन आयुक्तांनी ही शिफारस ग्राह्य धरली होती, असे घोडेले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईबाबत अद्याप प्रश्नचिन्हच

$
0
0

शिवाजी हायस्कूलच्या अहवालावर बुधवारी काम नाही; शिक्षण विभागाचा सोयीनुसार कारभार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवाजी हायस्कूलची मान्यता रद्द करण्याचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांकडून बुधवारी तयार झाला नाही. पटसंख्येत घोळ घालण्याचा शाळेचा प्रताप २०११ पासून सुरू असूनही शिक्षण विभागाने शाळेला अभय दिले. मान्यता रद्द वरूनही 'शाळा संहिता' की, 'आरटीई'नुसार कारवाई होणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

राजंणगावातून बेकायदेशीरपणे विद्यार्थी आणून खोडकपुऱ्यातील शिवाजी हायस्कूलच्या नावाने शाळेचा पट दाखविला जात होता. सोमवारी गोवर रुबेला लसिकरणासाठी बसमधून विद्यार्थी औरंगाबादला आणले होते. परत जाताना बसमधून विद्यार्थी पडल्यानंतर शाळेचा हा प्रताप उघड आला. त्यानंतर मंगळवारी शिक्षण विभागाने शाळांना भेटी देत पाहणी केली. त्यावेळी उपस्थितीही कमी होती. ४७४ माध्यमिकचे विद्यार्थी असताना ११० आढळले तर ३६५ प्राथमिकपैकी १९ विद्यार्थीच आढळले. तर, रांजणगावात प्राथमिकचे विद्यार्थीच आढळले नाहीत. या सगळ्या प्रकरणानंतर शिक्षण विभाग मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्याची प्रक्रिया करणार आहे. त्यासाठी तीन-चार दिवसांचा कालावधी लागेल असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात बुधवारी अहवालाबाबत काहीच काम झाले नाही. दोन दिवसांत प्रक्रियेला सुरुवात होऊन अहवालाचे काम होईल असे सांगण्यात येत आहे.

'शाळा संहिता' की, 'आरटीई'

शाळेवर मान्यता रद्द करण्याची कारवाई शाळा संहितेनुसार होणार की, आरटीई यावरूनही निश्चिती नाही. प्राथमिकची कारवाई आरटीईनुसार होणार असे सांगण्यात येते. तर, माध्यमिक स्तरावरील मान्यता रद्द करण्याची कारवाई शाळा संहितेनुसार होईल असे सूत्रांनी सांगितले. यामध्ये शिक्षण उपसंचालक स्तरावर हा अहवाल जातो. या ठिकाणी सुनावणी अन् निकालानंतर हे प्रकरण संचालक कार्यालयाकडे जाते. या सगळ्या प्रक्रियेत शिक्षण विभाग किती विलंब लावणार यावर शाळेवरील कारवाई ठरणार आहे.

परीक्षेला आणले जात होते विद्यार्थी

शिक्षण विभागातील तपासणी पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव येथून खोकडपुऱ्यात परीक्षेसाठी विद्यार्थी आणले जायचे. येथून परीक्षा देऊन पुन्हा त्यांना रांजणगावात नेले जायचे. असे असले तरी या विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार एवढ्या वर्षांपासून कोठे गेला असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. रांजणगाव येथे बेकायदेशीररित्या भरविण्यात येणाऱ्या प्राथमिकच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शोलय पोषण आहार दिला जात होता तर, कोठून दिला जात होता असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

अहवाल तयार करण्याची प्रक्रिया दोन-तीन दिवसांत पूर्ण करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. बुधवारी कन्नडला गेल्यामुळे याकडे फारसे लक्ष देता आले नाही.

सुरजप्रसाद जैयस्वाल

प्राथमिक शिक्षणाधिकारी, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेशांवर टांगती तलवार

$
0
0

ashish.choudhari@timesgroup.com

औरंगाबाद : विधी, बीएडसारख्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर अजूनही टांगती तलवार कायम आहे. विधी अभ्यासक्रमासह अध्यापक महाविद्यालयांमध्ये यंदा प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश संगणीकृत प्रणालीद्वारे पडताळण्यात येत आहेत. मात्र, यात सुमारे ३० टक्के विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्या दूर करण्याच्या सूचना कॉलेजांना देण्यात आल्या, पण या प्रक्रियेतच अनेक कॉलेज सहभागी झाले नसल्याचे उघड झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे.

तीन, पाच वर्ष कालावधींचा असलेल्या विधी अभ्यासक्रमासह बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड अशा अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पडताळणीचे काम यंदा प्रथमच संगणीकृत करण्यात येत आहे. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियाही सीईटी सेलतर्फे करण्यात येते. २०१८-१९ शैक्षणिक वर्षामधील प्रवेश प्रक्रिया पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी www.safalta.org वीन वेबसाइटही तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेले कागदपत्र, कॉलेजांमधून जमा झालेली कागदपत्रे तपासली जात आहेत. यासाठी कॉलेजांना सुरुवातीला वेबसाइटवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. ज्यांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली, त्या कॉलेजांमधील विद्यार्थ्यांच्या अर्जांमधील कागदपत्रांमध्ये कोणत्या त्रुटी आहेत याबाबत कळविण्यात आले आहे. जवळपास तीस टक्क्यांपेक्षा अधिक कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून येत आहेत. या त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांची योग्य ती कागदपत्रे ऑनलाइन तत्काळ सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशास मान्यता असणार आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यानही कागदपत्रांची तपासणी करूनच प्रक्रिया पूर्ण केली जाते. असे असतानाही, त्रुटी राहिल्याचे समोर आले आहे. नामांकित कॉलेजांमध्ये सुमारे २० टक्के त्रुटी आढळून आल्या आहेत. ग्रामीण, तालुकास्तरावरील कॉलेजांमधील त्रुटीतर अधिक असल्याचे चित्र आहे.

\Bदोनवेळा मुदतवाढ

\Bप्रवेश प्रक्रिया पडताळणीचे कामकाज ऑनलाइन करण्यासाठी संस्थांना नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. प्रत्यक्षात अनेक संस्थांनी नोंदणीची प्रक्रियाच पूर्ण केली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रवेशालाच मान्यता दिली जाणार नाही, असा पवित्रा प्रवेश नियामक प्राधिकरणाने घेतला आहे. दोन वेळा संस्थांना मुदत देण्यात आली. त्यानंतरही काहींनी नोंदणी केली नसल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला तीन वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या कॉलेजांपैकी तब्बल ३९ तर, पाच वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या २५ संस्थांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही. यासह बीएड, एमएड कॉलेजांचाही मोठा सहभाग आहे.

राज्यातले विद्यार्थी

- १३० - विधी अभ्यासक्रम

- १४,००० विद्यार्थी

- ३० टक्के प्रवेश गोत्यात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात घुसून प्राणघातक हल्ला, जामीन फेटाळळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरात घुसून पाच ते सहा जणांनी महिलेवर तलवारीने गंभीर हल्ला केल्याच्या प्रकरणातील आरोपी शेख बाबर शेख निझाम याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी फेटाळला.

या प्रकरणी मुस्कान खान अन्वर खान (२१, रा. किराडपुरा) हिने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, दोन महिन्यांपूर्वी शेख इरशाद शेख इब्राहिम याने दारुसाठी पैसे मागितल्याच्या कारणावरुन फिर्यादीच्या पतीवर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणात तक्रार दिल्यावरुन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा राग मनात ठेऊन 'माझ्याविरुद्धची तक्रार मागे घे' अशी धमकीही आरोपीने दिली होती. त्यानंतर १२ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी साडेनऊला फिर्यादी व तिची नणंद घरी असताना आरोपी शेख बाबर शेख निझाम (३५, रा. इंदिरानगर बाजयीपुरा) व त्याच्या ५ ते ६ आरोपी साथीदारांनी फिर्यादीच्या घरात घुसून तलवार, हॉकी स्टिकने फिर्यादीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन प्रकरणात मोक्का लावण्यात आला होता. यात आरोपी शेख बाबर याला अटक करुन त्याची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला असता, कोर्टाने तो फेटाळला. जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटीत दाखल मुलींची प्रकृती सध्यातरी स्थिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) लसीकरणानंतर दाखल केलेल्या दोन मुलींची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. लसीकरणानंतर त्रास झाल्याची तक्रार झाल्यानंतर जालना जिल्हा तसेच फुलंब्री तालुक्यातील दोन मुलींना घाटीत दाखल करण्यात आले. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने म्हणाले, यातील एका मुलीची प्रकृती चांगली आहे. दुसऱ्या मुलीची प्रकृती पूर्वीपेक्षा सुधारत आहे, मात्र अजूनही तिची प्रकृती गंभीर आहे. दोघींना लसीकरणामुळे त्रास झाला का आधीपासून त्यांना त्रास होता, हे त्यांच्या अहवालावरून स्पष्ट होईल. यासंदर्भात तपासणीसाठी दोघींचे रक्तनमुने 'एनआयव्ही'ला पाठवण्यात आले आहेत, असेही डॉ. झिने यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्य पाजून चुलतभावाला मारहाण करीत वीस हजाराचा ऐवज लुबाडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मद्यप्राशन केल्यानंतर चुलत भावाशी वाद उकरून काढत सोनसाखळी आणि घड्याळ पळवण्यात आली. मंगळवारी सायंकाळी जोगवाडा गावाजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी शेषराव केशवराव बनसोडे (वय ५०, रा. रसुलपुरा, खुलताबाद) यांनी तक्रार दाखल केली. बनसोडे हे चिंचेचे व्यापारी आहे. त्यांचा चुलत भाऊ अनिल सोनाजी बनसोडे याने त्यांना चिंचा खरेदी करण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. या ठिकाणी दोघांनी सोबत मद्यप्राशन केले. अनिलने शेषराव यांच्यासोबत माझ्या आईला शिवीगाळ का केली होती, या कारणावरून जुना वाद उकरून काढला. यानंतर अनिलने मित्रांना बोलावून घेतले. या चौघांनी शेषराव यांना फायटरने बेदम मारहाण करीत सोन्याची साखळी आणि घड्याळ असा २० हजारांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन गेले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस नाईक नरोटे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल पळवणाऱ्या सराईत गुन्हेगारास सहा तासात अटक

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबद

मोबाइलवर बोलत जात असलेल्या पादचारी तरुणाचा मोबाइल दुचाकीवरील दोघांनी पळवला होता. बुधवारी सकाळी पावणे आठ वाजता निराला बाजार परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपीला क्रांतीचौक पोलिसांनी अवघ्या सहा तासात जेरबंद केले. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याने आणखी दोन मोबाइल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

प्रविण त्रिंबक निकम (वय २६ रा. समर्थनगर) हा तरुण बुधवारी सकाळी निराला बाजार भागातून मोबाइल बोलत जात होता. यावेळी तापडिया नाट्यगृहाच्या सिग्नलजवळ एका लाल रंगाच्या बजाज पल्सरवर आलेल्या दोघांनी त्याचा चौदा हजारांचा मोबाइल हिसकावत पलायन केले. या प्रकरणी निकमने क्रांतीचौक पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे दुचाकीचा क्रमांक मिळवला. आरटीओ कार्यालयातून या क्रमांकाचा मालकाची माहिती काढण्यात आली. ही दुचाकी अशोक आबाजी शेळके (रा. दत्ता कॉलनी, शिवाजीनगर वाळूज) यांची असल्याची माहिती मिळाली. शेळके यांनी ही दुचाकी त्यांचा मुलगा शुभम अशोक शेळके चालवत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी झोपेतच असलेल्या शुभमला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत त्याने हा निकमचा मोबाइल पळविल्याची कबुली दिली. शुभम हा सराईत गुन्हेगार असून त्याने आणखी दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे, एसीपी गोवर्धन कोळेकर, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शिवाजी चव्हाण, रमेश गायकवाड, रमेशलाल जैस्वाल, दिलीप जाधव, गिरी आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारेगावात महिलेच्या घरातून सोळा किलो गांजा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नारेगाव परिसरातील बलूची गल्ली येथे एका महिला आरोपीच्या घरावर छापा टाकत पोलिसांनी १६ किलो गांजा जप्त केला. गुरुवारी दुपारी सिडको एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जमादार शेख मुनीर यांना बलुची गल्ली क्रमांक पाच येथे एका ४० वर्षांच्या महिलेच्या घरात गांजाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी या संशयित महिलेच्या घरावर छापा टाकला. यावेळी तिच्या घरात गोणीमध्ये भरून ठेवलेला १६ किलो ३४० ग्रॅम गांजा पोलिसांना आढळला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून महिलेला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, एसीपी गुणाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुरेंद्र माळाले, पीएसआय क्रांती निर्मळ, के.पी. अन्नलदास, जमादार मुनीर पठाण, शाहेद शेख, राम हत्तरगे, गणेश राजपूत, दिपक शिंदे, नितेश सुंदर्डे, हरीकराम वाघ, नवनाथ ढगे, संदीप भोटकर, रविकिरण गोलवाल, जावेद पठाण आणि चंचल बमनकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगवा संकल्पदिनी शिवसेनेची महाआरती

$
0
0

फोटोसह मेन बातमी

फोटो चार कॉलम लावणे

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भगवा संकल्पदिनाच्या निमित्ताने शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेतर्फे सुपारी हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. या आरतीला कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभू रामचंद्र की जय, सौगंध राम की खाते है ,मंदिर वही बनायेंगे अशा घोषणांनी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता.

खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरती करण्यात आली. यावेळी आदर्श महिला भजनी मंडळातर्फे भजन आणि भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. खैरे यांच्या हस्ते आरती करण्यातआली. यावेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राजु वैद्य, सभागृहनेता विकास जैन, वैजयंती खैरे, महिला आघाडीच्या संपर्क संघटक कला ओझा, सहसंपर्क प्रमुख सुनीता आऊलवार, जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी यांच्यासह बंडू ओक, राजेंद्र राठोड, संतोष जेजुरकर, कृष्णा डोणगावकर, ऋषीकेश खैरे, ऋषीकेश जैस्वाल, सुनीता देव, अंजली मांडवकर, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, गोपाळ कुलकर्णी, प्राजक्ता राजपूत, आशा दातार, दुर्गा भाटी, किरण तुपे, नारायण सुरे, अक्षय खेडकर, संदीप लिंगायत आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images