Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी बहुतांश भूसंपादन पूर्ण करण्यात आले असले, तरी जिल्ह्यात अद्यापही संपादन न करता आलेली १०५ हेक्टर जमीन आता सक्तीने ताब्यात घेण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मोबदल्यातही एक पटीचा फटका बसणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पळशी, कान्हापूर, जयपूर, गंगापूर जहांगीर, वरूड काजी, सावांगी, महालपिंप्री, कृष्‍णापूरवाडी, बकापूर, जळगाव फेरण, कोनेवाडी, शेवगा, भांबर्डा, नायगाव, भिकापूर, करंजगाव, जटवाडा, जोगवाडा, ओहोर, अब्दीमंडी, माळीवाडा, गावंदरी तांडा, रहाळपट्टी तांडा, दुधड आदी गावांमधील ४१० खातेदारांनी संपादनाची संमती दिली नसल्यामुळे यांच्या सुमारे ७० हेक्टरचे संपादन सक्तीने करण्यात येणार आहे. सक्तीच्या भूसंपादनात वैजापूर व गंगापूर तालुक्यांत औरंगाबादच्या तुलनेत संख्या कमी आहे. समृद्धी महामार्गातील प्रत्येक गावात कमी अधिक प्रमाणात विनासंमती असल्यामुळे सक्तीने भूसंपादन करण्यात येणार असले, तरी घायगाव, लासूर गाव, जांभाळा व डोणगाव; तसेच इतर गावांमधील एकूण ६५ शेतकऱ्यांची सुमारे ३५ हेक्टर जमिनीचे संपादन सक्तीने करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाची गेल्या काही दिवसांत जोरात धावत असली तरी अद्यापही जिल्ह्यातील भूसंपादनाची अवस्था 'हत्ती गेले शेपूट राहिले' अशी आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ३० जून २०१७ रोजी समृद्धीच्या भूसंपादनासाठी जमिनीच्या प्रतवारीनुसार खरेदीचे दर जाहीर केले होते, यानंतर जुलै २०१७मध्ये जिल्ह्यात प्रशासनाला पहिली रजिस्ट्री करण्यात यश मिळाले, मात्र त्यानंतर मोठ्या खंडानंतर पुन्हा जमीन देण्यास शेतकऱ्यांनी पुढाकार दर्शवला सध्या समृद्धी महामार्गासाठी तीनही तालुक्यातुन आवश्यक असलेल्या १२४७.७२ हेक्टरपैकी सुमारे ९० टक्के भूसंपादन करण्यात आले आहे. आता दीड वर्षानंतर समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम शेवटच्या टप्प्यात असल्याचे चित्र आहे.

\Bसमृद्धी महामार्ग

\B- मुंबई-नागपूर : ७१० किलोमिटर

- औरंगाबाद जिल्ह्यात : ११२ किलोमीटर

- जिल्ह्यातील तालुके : औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर

- एकूण गावे : ६२

- आवश्यक भूसंपादन : १२४७ हेक्टर

- समृद्धीबाधित शेतकरी : ३०५४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुकाती फाऊंडेशनतर्फे व्हील चेअर्सचे वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हारूण मुकाती फाऊंडेशनतर्फे अपंग व्यक्ती व्हील चेअर्स, विधवा महिलांसाठी रोजदारांसाठी हातगाडी वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. हा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी रोशनगेट परिसरात घेण्यात आला. या कार्यक्रमाला नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

जिन्सी भागातील हारूण मुकाती फाऊंडेशन व युसूफ मुकाती मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. गरीब महिलांना पतीचे निधन झाल्यानंतर अनेक वेळा रोजगाराचा प्रश्न भेडसावतो. नोकरी मिळेलच याची शाश्वती नसते. ही बाब समोर ठेवून महिलांना स्वंयरोजगार करता यावा, या हेतूने विधवांना हातगाडीचे वाटप करण्यात आले. यावेळी गरजू महिलांना शंभर हातगाड्या देण्यात आल्या; तसेच अनेक अंध अपंग व्यक्तींना व्हीलचेअर्सची गरज असते. परिस्थितीअभावी ती विकत घेणे परवडत नाही. अशा शंभर अपंग व्यक्तींना देखील व्हील चेअर्सचे वाटप यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला संयोजक युसूफ मुकाती यांच्यासह मित्र मंडळाचे सदस्य; तसेच नागरिकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नॅक’ मूल्यांकन डिसेंबरअखेरीस?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे 'नॅक' मूल्यांकन डिसेंबर अखेरीस होण्याची शक्यता आहे. विद्यापीठ कॅम्पसमधील पायाभूत सुविधांची कामे वेगात सुरू आहेत. सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, मात्र वसतिगृहांच्या दुरुस्तीचे काम रखडल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय कायम आहे.

'नॅक' मूल्यांकनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात पायाभूत सुविधांच्या कामांना वेग आला आहे. ऑक्टोबर महिन्यात सेल्फ स्टडी रिपोर्ट (एसएसआर) सादर करण्यात आला. डिसेंबर अखेरीस 'नॅक' समिती विद्यापीठात दाखल होणे अपेक्षित आहे. सध्या सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा पदपथ तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामाला आणखी आठ दिवस लागणार आहेत. मुख्य रस्त्याशिवाय विविध विभागांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. संबंधित काम निकृष्ट असल्याचा आरोप झाल्यानंतर रस्त्यावर पुन्हा थर दिला जाणार आहे. सामाजिकशास्त्रे, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, मुख्य प्रशासकीय इमारत, परीक्षा विभाग या इमारतींची रंगरंगोटी करण्यात आली. स्वच्छतागृहांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. विद्यार्थी वसतिगृहांचा मुद्दा अधिक तीव्र असल्यामुळे प्राधान्याने दुरुस्ती हाती घेण्यात आली. मात्र, कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. वसतीगृह क्रमांक एक व चार येथील काम सुरू होऊन दोन महिने उलटले. तरीसुद्धा काम झाले नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय कायम आहे. विंगनिहाय काम करण्यात येईल असे प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, 'एसएसआर' पाठवल्यानंतर 'नॅक' समिती मूल्यांकनाचे वेळापत्रक कळवणार आहे. अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही, मात्र मूल्यांकनासाठी विद्यापीठ प्रशासनाची जय्यत तयारी झाली आहे असे कुलगुरू चोपडे यांनी सांगितले.

\Bपवार यांना डी. लिट?\B

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांना डी. लिट देण्याचा प्रस्ताव आहे. विद्यापीठ नामविस्ताराचा निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री पवार यांनी घेतला होता. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने १४ जानेवारीच्या कार्यक्रमात डी. लिट देण्याची तयारी केली आहे, पण भाजप वर्तुळातील नेते आणि व्यवस्थापन परिषद सदस्यांचा विरोध आहे. तूर्तास, प्रशासकीय स्तरावर निर्णय रखडला आहे. 'शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा योग्य सन्मान करण्याबाबत चर्चेअंती निर्णय घेऊ,' असे कुलगुरू चोपडे यांनी सांगितले.

'नॅक' मूल्यांकनाची तयारी वेगात सुरू आहे. पायाभूत सुविधांची कामे लवकरच मार्गी लागतील. वसतिगृहाच्या कामाची पाहणी केली असून काम लवकर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळसूबाईच्या रांगेतले अलंग, कुलंग सर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कळसूबाई डोंगर रांगेतील अलंग, कुलंग गड सर करण्याची भन्नाट आणि थरारक कामगिरी शहरातील अकरा युवकांनी केली आहे. त्यांच्यावर गिर्यारोहणप्रेमी व मित्रमंडळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गिर्याहोरण आपल्या मनास वेड लावणारे एक भन्नाट साहसी प्रकार. प्रदूषित व सतत कटकटीच्या जीवनातून थोडा वेळ काढून निसर्गाच्या कुशीत, डोंगर रांगाच्या सानिध्यात सर्वस्व विसरून जावून मनाला वेगळा आनंद देणारे हे धाडसी खेळ सध्या लोकप्रिय होत आहेत. नामंकित कंपनीत नोकरीला असलेले कीर्तीकुमार वैद्य, सतीश कोल्हे, अनिल जठार, जमीर खान, त्र्यंबक सोनवणे, पवन साळुंके, कैलास गायकवाड, शिवराज काथारी, दीपक वाघमारे, भूपेश देशमुख यांनाही निसर्गभ्रमंतीची आवड निर्माण झाली, ती कंपनीतर्फे आयोजित गौताळा भ्रमंतीमुळे. त्यांनी नुकतेच गिर्यारोहकांना आव्हानात्मक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरातील आणि कळसूबाईच्या रांगेत असणारे अलंग, मदन आणि कुलंग हे गड सर केले. प्रा. सुभाष फासे यांच्या मार्गदर्शनाखाली हे गड किल्ले सर करण्याची मोहीम कुरुंगवाडी येथून एक डिसेंबरला सकाळी साडेसहा वाजता सुरू झाली. सुरुवातीला अलंग किल्ल्यावर चढाईला सुरुवात झाली. काही अंतर गेल्यावर अनेक पायऱ्या तुटलेल्या अवस्थेत असल्याने रॉप क्लायम्बिंग करत या तरुणांना जावे लागले. खाली खोल दरी असल्याने हा ट्रेक तसा अवघड असल्याचे जठार यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. साडेचार तासानंतर हे ट्रेकिंग पूर्ण झाले. त्यानंतर रॅपलिंग करत या गडाच्या खाली मध्यापर्यंत सर्व पोहचले आणि तेथून परत मदन गडाच्या दिशेने त्यांनी कूच केली. क्लायम्बिंग करत, अवघड चढाई करत सायंकाळी साडेसहा वाजता सर्वजण मदनगडावर पोहचले. तेथील गुहेत रात्री मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रॅपलिंगचा थरारक अनुभव सदस्यांनी घेतला. काही अंतर खाली आल्यावर पर्वतरागांतून वाट काढत सर्वजण कुलंग गडावर तीन तासांत पोहचले. निसर्गाचा, ट्रेकिंगचा आनंद यातून मिळतोच त्याच नवी ऊर्जा यातून मिळते, अशी माहिती जठार यांनी दिली.

\Bआतापर्यंत १८ किल्ले सर

\Bज्येष्ठ गिर्यारोहक प्रा. सुभाष फासे यांच्याशी या युवकांची गौताळ भ्रमंतीत भेट झाली होती. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून या ग्रपने साहसी पर्यटन करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दीड वर्षात त्यांनी रतनगड ते कळसूबाई शिखरासह १८ वन व डोंगरी किल्ले सर केले आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल मित्रमंडळी आणि गिर्यारोहकातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसपीआय’चे ४० विद्यार्थी ‘एनडीए’ परीक्षेत पास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्थेचे (एसपीआय) ५९पैकी ४० विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या (यूपीएससी) 'एनडीए'च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

हे विद्यार्थी १२वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असून, पुढील महिन्यात होणाऱ्या 'एसएसबी'च्या मुलाखतीसाठी भोपाळ, अलाहाबाद आदी ठिकाणी जाणार आहेत. मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची लष्कर, हवाईदल, नौदल या सरंक्षण दलांसाठी निवड केली जाईल. मुलाखतीत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी होऊन अंतिमता हे विद्यार्थी पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी येथे पुढील प्रशिक्षणासाठी दाखल होतील. हे विद्यार्थी 'एसएसबी' मुलाखतीमध्येही लेखी परीक्षेप्रमाणेच चांगली कामगिरी करतील, असा विश्वास संस्थेचे प्रभारी संचालक पी. एल. सोरमारे यांनी व्यक्त केला. संस्थेचे गृहरक्षक राजू मानेकर, अधीक्षक सुभाष हरकळ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक शुल्क माफीसाठी ‘एसएफआय’ची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करा, विद्यार्थ्यांना मोफत बस पास योजना लागू करा यासह इतर मागण्यांसाठी स्‍टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने (एस.एफ.आय.) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी (सात डिसेंबर) तीव्र निदर्शने केली.

मराठवाड्यात सध्या तीव्र दुष्काळ असून, शेतकरी संकटात आहे. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. सध्या राज्य सरकारने केवळ परीक्षा शुल्क माफ केले आहे, मात्र यामुळे दिलासा मिळाणार नाही. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची आहे. दुष्काळी परि‌स्थितीमुळे सर्व तालुका व जिल्ह्यांच्या ठिकाणी वसतिगृह सुरू करा, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना जाहीर केलेल्या वसतिगृह योजनेची तत्काळ अंमलबजावणी करा, थकित शिष्यवृततीचे तत्काळ वाटप करा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावेळी विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

निदर्शनासाठी राज्य अध्यक्ष मोहन जाधव, उपाध्यक्ष सुनील राठोड, राज्य सचिव मंडळ सदस्य नितीन वाव्हळे, जिल्हाध्यक्ष सत्यजित म्हस्के, सचिव लोकेश कांबळे; तसेच शिवाजी तोगरवार, समाधान बारगळ आदींसह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुप्रीम कोर्टात महापौरांची भूमिका अस्प्ष्ट

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या सुधारित विकास आराखड्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या विशेष याचिकेत महापौर नंदकुमार घोडेले यांना पक्षश्रेष्ठींकडून आदेश आले नाहीत. त्यामुळे यावर महापौरांची भूमिका काय आहे, हे स्पष्ट झाले नाही. सुप्रीम कोर्टात शुक्रवारी वेळ मागवून घेतल्याने सुनावणी जानेवारीत होणार आहे.

सुधारित विकास आराखड्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी (सात डिसेंबर) सुनावणी झाली. आराखड्याबद्दल तत्कालीन महापौरांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञपत्र दाखल केले आहे. आता शिवसेनेचे नंदकुमार घोडेले हे महापौर आहेत. त्यांनी विकास आराखड्याबद्दल अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे त्यांचे प्रतिज्ञापत्र देखील न्यायालयात सादर केले नाही. औरंगाबाद महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात तत्कालीन महापौरांनी बारा विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या असून, सर्व याचिकांवर शुक्रवारी न्या. मदन लोकूर व न्या. गुप्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. विकास आराखड्यासंदर्भात गोविंद नवपुते यांनी याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयात विकास आराखड्याबद्दलचे प्रकरण चालवायचे की नाही, याबद्दल महापौरांचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. विकास आराखड्यावर फक्त तत्कालीन महापौरांचीच स्वाक्षरी आहे. आयुक्तांनी स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे प्रतिज्ञापत्राबद्दल महापौर घोडेले यांची भूमिका काय राहणार? हे स्पष्ट झाले नाही. यापूर्वी सदर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विचारणा केल्यानंतर तत्कालीन पालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी शपथपत्र सादर करून, सादर विशेष अनुमती याचिकांच्या पुष्ट्यर्थ शपथपत्र सादर करण्यास नकार दिला होता. उच्च न्यायालयाचा निकाल मान्य असल्याबाबतचे सदर शपथपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महापालिकेचे नाव सदर सर्व विशेष अनुमती याचिकांमधून वगळण्यात आले होते. मात्र, तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे, बापू घडामोडे यांनी सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर करून याचिकांना समर्थन असल्याबाबतचे निवेदन केले. त्यामुळे या सर्व याचिकांवर सुनावणी झाली.

\Bजानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुनावणी

\Bमूळ याचिकाकर्ते गोविंद नवपुते यांनी सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले. त्यामध्ये नमूद करण्यात आले होते की, विद्यमान महापौरांनी अद्याप सदर याचिकेमध्ये याचिका सुरू ठेवण्याबाबत कोणत्याही स्वरूपाचे शपथपत्र दिलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या निर्देशाप्रमाणे सदर प्रकरणात महानगरपालिका पक्षकार नसल्याने सर्व याचिका त्वरित फेटाळण्यात याव्यात. आज झालेल्या सुनावणीच्या वेळी महापौरांच्या वतीने, श्री नवपुते यांनी सादर केलेल्या शपथपत्रावर उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागून घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने, महापौरांनी म्हणणे सादर करण्यासाठी तसेच सुनावणीसाठी जानेवारी महिन्यातील तिसऱ्या आठवड्यातील तारीख निश्चित केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या संशोधनाला ‘आविष्कार’ची चालना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण संशोधन संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आविष्कार महोत्सव होणार आहे. विद्यापीठाशी संलग्न ४५० महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार असून 'आविष्कार'च्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर विद्यापीठ चमकदार कामगिरी करील,' अशी माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत 'आविष्कार' कक्षातर्फे आविष्कार संशोधन स्पर्धा सहा शाखा आणि चार प्रकारांत घेण्यात येणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. आविष्कार महोत्सवाची पहिली फेरी उस्मानाबाद येथे विद्यापीठाच्या उपकेंद्रात दहा डिसेंबरला होईल. या स्पर्धेचे समन्वयक प्रा. किसन हवाळ व प्रा. प्रशांत दीक्षित आहेत. औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्ह्याची स्पर्धा ११ डिसेंबरला होईल. औरंगाबाद जिल्ह्याची स्पर्धा देवगिरी महाविद्यालयात होणार असून, डॉ. विष्णू पाटील आणि डॉ. प्रशांत अंबड समन्वयक आहेत. बीड जिल्ह्याची आविष्कार स्पर्धा बलभीम महाविद्यालयात असून, डॉ. प्रमोद रोकडे व डॉ. सतीश जाधव समन्वयक आहेत. जालना जिल्ह्याच्या स्पर्धेचे आयोजन जेईएस महाविद्यालयात केले आहे. डॉ. लक्ष्मीकांत शिंदे व डॉ. तुषार धोंडगे समन्वयक आहेत. या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी व संशोधक प्राध्यापक आपली संकल्पना पोस्टर आणि 'पीपीटी'द्वारे सादर करणार आहेत. स्पर्धेचा निकाल २० डिसेंबरला जाहीर करण्यात येईल. जिल्हास्तरीय पातळीवर निवडलेले स्पर्धक राज्यस्तरीय पातळीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तीन ते पाच जानेवारीदरम्यान विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा होणार आहे. या उपक्रमासाठी विद्यापीठाने २५ लाख रुपये निधी दिला आहे. पत्रकार परिषदेला प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, 'आविष्कार'च्या समन्वयक डॉ. भारती गवळी, सहसमन्वयक डॉ. भास्कर साठे व डॉ. प्रवीण येन्नावार उपस्थित होते.

\Bउद्योग संकल्पना स्पर्धा\B

आविष्कार महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अटल इनोव्हेशन मिशन आणि महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी यांच्या वतीने 'बिझनेस आयडिया कॉन्टेस्ट' घेतली जाणार आहे. दहा ते १५ डिसेंबर या कालावधीत आयोजित उपक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती व विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. संशोधनावर आधारित उद्योग संकल्पना 'आयडीशन बॉक्स'मध्ये देणे अपेक्षित आहे. या संकल्पनेवर तज्ज्ञ चर्चा करून निवड करणार आहेत. प्रथम पाच संकल्पनांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल असे कुलगुरूंनी सांगितले. उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे.

\B

जिल्हा........सहभागी विद्यार्थी\B

बीड..............१७५

जालना..........७६

उस्मानाबाद....१७८

औरंगाबाद.......४७५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घर नावावर करण्याची मागणी करीत जन्मदात्यांना घराबाहेर काढले

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आमच्या नावावर घर करून द्या, वृद्धाश्रमात जाऊन राहा, असे सुनावत पोटच्या मुलाने आणि सुनेने मातापित्यांना घराच्या बाहेर काढले. बुधवारी सकाळी नऊ वाजता एन १२, हडको परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी आईने दिलेल्या तक्रारीवरून मुलगा आणि सुनेविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात जेष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडको एन १२ भागात शेख कुटुंबीयाचे निवासस्थान आहे. या घरात आई वडील, मुलगा आणि सून असा परिवार राहतो. बुधवारी सकाळी मुलगा अस्लम मोहम्मद इकबाल शेख आणि त्याच्या पत्नीने आई वडिलांना घर नावावर करण्याची धमकी देत मारहाण व शिवीगाळ केली. तुम्ही दोघे हे घर खाली करा, येथून निघून जाऊन वृद्धाश्रमात राहा. नाहीतर तुमच्या नावावर असलेले घर आमच्या नावावर करून द्या असा मानसिक त्रास दिला. तसेच त्यांना घराच्या बाहेर काढून देण्यात आले. या प्रकरणी आईच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अस्लम मोहम्मद इकबाल शेख आणि त्याच्या पत्नीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक वाघ तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओकडून स्कूल बसविरुद्ध मोहीम सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरटीओच्या पथकांनी १७५ स्कूल बसची शुक्रवारी तपासणी केली. यामध्ये १४ स्कूल बस जप्त करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली. नगरनाका येथील स्कूलबसच्या अपघातानंतर स्कूल बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनेही (मनविसे) यासंदर्भात स्कूलबसवर कारवाईची मागणी केली होती.

सोमवारी नगरनाका भागात स्कूल बसची काच निखळून शिवाजी हायस्कूलचे दोन विद्यार्थी बसमधून खाली पडून गंभीर जखमी झाले होते. शुक्रवारी आरटीओ अधिकाऱ्यांची विविध पथके स्कूल बसच्या तपासणी मोहिमेसाठी रस्त्यावर उतरली होती. या पथकांनी स्कूल बसचालकांकडून आरटीओच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होती का नाही, याची कसून तपासणी करण्यात आली. दिवसभरात या पथकांनी १७५ बसची तपासणी केली. यामध्ये ४८ स्कूल बसंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तर १४ बस जप्त करण्यात आल्या. ज्या बसच्या कागदपत्रांची कमतरता होती तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करण्यात आले होते, अशा बस जप्त करण्यात आल्याची माहिती मेत्रेवार यांनी दिली. तसेच तीन स्कूल बसचे फिटनेस प्रमाणपत्र आरटीओच्या पथकाने रद्द केले. या बसनी नुकतेच फिटनेस प्रमाणपत्र नियमानुसार घेतले होते, परंतु तपासणी दरम्यान काही कागदपत्रांची कमी असल्यामुळे हे फिटनेस प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, शहर व जिल्ह्यातील सर्वच स्कूल बसची तपासणी करण्यात येणार असून नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा मेत्रेवार यांनी दिला आहे.

मनविसेकडून आभार

मनविसेच्या शिष्टमंडळाने बुधवारी आरटीओ अधिकाऱ्यांची भेट घेत स्कूल बसच्या तपासणीची तसेच कारवाईची मागणी केली होती. आरटीओ कार्यालयाने सुरू केलेल्या तपासणी व कारवाईच्या मोहिमेचे मनविसेचे जिल्हाध्यक्ष राजीव जावळीकर यांनी स्वागत केले आहे. ही मोहीम कायमस्वरुपी राबविण्याची मागणी त्यांनी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीच्या मेंटॉरपदी संजयकुमार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सुनील पोरवाल यांची बदली गृह विभागात अप्पर मुख्य सचिवपदी झाली असून, आता स्मार्ट सिटीच्या मेंटॉरपदी गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजयकुमार यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे आदेश नगरविकास विभागाने शुक्रवारी काढले.

जून महिन्यामध्ये पोरवाल यांची गृह विभागात अप्पर मुख्य सचिवपदी बदली झाली होती. गृह विभागाचा पदभार सांभाळतांना स्मार्ट सिटीच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मेंटॉर बदलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेंटॉर बदलून देण्याची तयारी दर्शवली. पोरवाल हे ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यापूर्वीच गृह विभागात बदली झाल्यामुळे मेंटॉरपदी गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा शासन निर्णय नगरविकास विभागाने काढला. अपूर्व चंद्रा यांनी वर्षभर अध्यक्षपद सांभाळल्यानंतर ऑक्टोबर २०१७मध्ये स्मार्ट सिटीच्या मेंटॉरपदी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांची नियुक्ती करण्यात आली होती. पोरवाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्मार्ट सिटीच्या कामांना गती देण्यात आली होती. पहिल्याच बैठकीत शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या बैठकीमध्ये सिटी बस सुरू करण्यासाठी शंभर बसेस खरेदी करणे तसेच मास्टर सिस्टीम इंटिग्रेटर, पालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीवर सोलार पॅनल, तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती, स्मार्ट रोड आदींचा ठराव घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतात अनधिकृत वास्तव्य; सुदानच्या नागरिकास शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारत देश सोडून जाण्याचे आदेश देऊनही सुमारे दशकभर औरंगाबाद शहरात राहणारा सुदानचा नागरिक अबू मीडियन अब्दल्लाह मोहम्मद उमर याला कोर्ट उठेपर्यंत उभे राहण्याची व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजाला अल अमोदी यांनी शुक्रवारी (७ डिसेंबर) ठोठावली.

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव बाबुराव मनोहर यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, सुदानचा नागरिक व आरोपी अबू मीडियन अब्दल्लाह मोहम्मद उमर (३६, मूळ रा. सुदान, ह. मु. हिमायतबाग परिसर, औरंगाबाद) याला भारतामध्ये १८ सप्टेंबर १९९९ पर्यंत राहण्याचा परवाना देण्यात आला होता. त्याची मुदत संपल्यामुळे त्याला भारत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तिकिटाला पैसे नाहीत, असे कारण देत तो देशात अनधिकृत वास्तव्य करुन होता. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनंतर सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता व १२ मे २००९ रोजी त्याला अटक करुन कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला कोर्ट उठेपर्यंत उभे राहण्याची व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच दंड न भरल्यास आरोपीला १० दिवसांच्या कारावासाची शिक्षाही भोगावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेवारस वाहनांच्या तक्रारीसाठी ग्रामीण पोलिस दलाची हेल्पलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात बेवारस तसेच नो पार्किंगमधील वाहने जप्त करण्याची मोहीम सुरू आहे. या अनुषंगाने ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयांनी देखील जिल्ह्यात बेवारस वाहने तसेच नो पार्किंगमधील वाहने उचलण्याबाबत मोहीम हाती घेतली आहे. बेवारस वाहनांविषयी तक्रार करावयाची असल्यास हेल्पलाइन क्रमांक देण्यात आले असून ई मेल आयडीवर देखील आता तक्रार करता येणार आहे.

बेवारस वाहने तसेच नो पार्किंगमध्ये उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. यासाठी ही मोहिम जिल्हा वाहतूक निरीक्षक भागवत फुंदे यांनी पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली आहे. बेवारस वाहनांच्या तक्रारी करता याव्यात यासाठी हेल्पइन क्रमांक १००, ०२४०२३८१६३३, ०२४०२३९२१५१ तसेच व्हॉटसअप क्रमांक ७७३८९३२२२२ वर देखील तक्रार करता येणार आहे. इमेलद्वारे तक्रार करण्यासाठी नागरिकांना या unclaimedvechileabdr@gmail.com मेल आयडीवर तक्रार करता येणार आहे.

बेवारस वाहनांसाठी जिल्ह्यात आता विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ही वाहने सुरक्षितस्थळी हटविण्यात येणार असून त्यांच्या मालकांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात देखील बेवारस वाहनांची तक्रार करण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात आली असून नागरीकांना पोलिस ठाण्यात देखील तक्रार करता येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकामासाठी मागितली दहा लाखांची खंडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बांधकाम करण्यासाठी दहा लाखाच्या खंडणीची मागणी करीत जमीनमालकाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पाच संशयित आरोपींविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजमल मुस्तफा शहेबाज (वय ५०, रा. लक्कडमंडी, नवा मोंढा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शहेबाज यांचे मोंढा भागात दर्गा हजर कादर शहा औलिया कंपाउंडच्या परिसरात दोन प्लॉट आहेत. शहेबाज बुधवारी दुपारी त्यांच्या प्लॉटवर घराचे बांधकाम बघण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना आरोपींनी तुम्ही येथे बांधकाम कसे काय करत आहात, अशी विचारणा केली. यावर शहेबाज यांनी हा प्लॉट माझ्या आईच्या नावावर असून मी वारसदार असल्याचे सांगितले. यावेळी आरोपींनी त्यांना येथे बांधकाम करायचे असेल तर दहा लाखाची खंडणी द्यावी लागेल असे म्हणत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. शहेबाज यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी मोहम्मद रफीक अब्दुल गफ्फार, मोहम्मद सलीम अब्दुल गफ्फार, मोहम्मद इलियास अब्दुल गफ्फार, मोहम्मद आकीब मोहम्मद सलीम आणि मोहम्मद जुनेद मोहम्मद सलीम यांच्याविरुद्ध खंडणी, मारहाण, दंगल करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक फौजदार ऐजाज शेख तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाहिरात एजसीची २० लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जाहिरात एजन्सीकडून जाहिराती प्रकाशित करून घेत त्याचे बिल अदा न करता २० लाखांची फसवणूक करण्यात आली. ३ मार्च २०१७ ते ३० ऑगस्ट २०१७ या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी जाहिरातदाराविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रोहित भालचंद्र देशपांडे (वय ३०, रा. जनकपुरी कॉलनी, गारखेडा परिसर) यांनी तक्रार दाखल केली. देशपांडे आणि त्यांचे भागीदार अमरजितसिंग चौहान यांची माय अर्काय कम्युनिकेशन सोल्युशन प्रा. ली. नावाने जाहिरात एजन्सी आहे. त्यांच्या एजन्सीमार्फत फर्स्ट आयडिया एज्युकेशन प्रा. ली. कंपनीचे सचिन मलिक यांनी त्यांच्या शैक्षणिक जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. ३ मार्च २०१७ ते ३० ऑगस्ट २०१७ या कालावधीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींचे एकूण बिल २५ लाख ७३ हजार रुपये झाले होते. यापैकी मलिक यांनी साडेतीन लाख रुपये देशपांडे यांना दिले होते. उर्वरित बिलाच्या रकमेपोटी त्यांनी दहा चेक दिले होते. 'माझ्या अकाऊंटमध्ये बॅलेन्स नसल्याने तुम्ही ते चेक वटविण्यासाठी देऊ नका', असे सचिन मलिक यांनी देशपांडे यांना सांगितले असल्यामुळे त्यांनी चेक वटविण्यास दिले नाही. सचिन मलिक यांना पेमेंटसाठी फोन केल्यास ते फोन उचलत नसल्याने देशपांडे यांनी त्यांनी दिलेले चेक बँकेत वटविण्यास दिले. मात्र, मलिकच्या खात्यावर बॅलन्स नसल्याने ते चेक बाऊंस झाले. यानंतर मलिक आणि देशपांडे यांच्यात तडजोड होऊन २० लाख रुपये बिलाची रक्कम देण्याचे ठरविण्यात आले. यापोटी मलिक यांनी पुन्हा २० लाखांचे चेक देशपांडे यांना दिले. हे चेक देखील बँकेत वटविण्यासाठी दिल्यावर मलिक यांचे खाते त्याआधीच बंद करण्यात आलेले असल्याचे कळाले. या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने रोहित देशपांडे यांनी पोलिसांत धाव घेतली. सचिन मलिक यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय बनसोड तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीपची काच फोडून दीड लाख लांबवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गजबजलेल्या जालना रोडवरील कुशलनगर भागात हेल्मेटधारी दुचाकीस्वार चोरट्यांनी जीपची काच फोडून दीड लाखाची रोख रक्कम लांबवली. हा खळबळजनक प्रकार शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडला. टोलनाक्याचा लेखापाल तेथील बँकेत गेला असता ही चोरी करण्यात आली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला असून, त्याआधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

शेंद्रा एमआयडीसीमध्ये औरंगाबाद जालना टोल लिमिटेड नावाने कंपनी आहे. या कंपनीच्या टोलनाक्यावर सहायक लेखापाल म्हणून दिनेश अशोकराव रिंढे (वय ३९, रा. शिवाजीनगर) हे कार्यरत आहेत. रिंढे शुक्रवारी दुपारी आकाशवाणी चौकातील एचडीएफसी बँकेमध्ये आले होते. टोलनाक्यावर त्यांना सुट्या पैशाची गरज असल्याने त्यांचीकडील दीड लाखाच्या नोटा देत दहा व वीस रुपयांची दीड लाखांची रक्कम अदलाबदली केली. ही रक्कम त्यांनी एका बॅगमध्ये ठेवली. ही बॅग टाटा सुमोच्या (क्रमांक एमएच २० वाय ९१२) समोरील बाजूस चालकाच्या सीटजवळ ठेवली. यानंतर रिंढे जीप घेऊन जालना रोडवरील कुशलनगर भागातील जळगाव पिपल्स बँकेमध्ये आले. या ठिकाणी त्यांना आरडीचा हप्ता भरायचा होता. यासाठी दीड लाखाची बॅग जीपमध्येच ठेवून ते बँकेत गेले. काही वेळाने ते परत आले असता त्यांना जीपची चालकाच्या बाजूची काच फुटलेली दिसून आली; तसेच दीड लाखाची बॅग देखील जागेवर आढळली नाही. बॅग लंपास केल्याचे रिंढे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कंट्रोल रूम आणि गुन्हे शाखेला माहिती दिली. घटनास्थळी गुन्हे शाखेचे एपीआय अजबसिंह जारवाल, शिवाजी झिने, विशाल सोनवणे, समद पठाण, जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शरद इंगळे, बाळासाहेब आहेर, विजय वानखेडे आदींनी भेट दिली.

\Bसीसटीव्हीमध्ये झाले चित्रिकरण\B

जळगाव पिपल्स बँकेच्या बाहेरील बाजूला सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे. या कॅमेऱ्यात झालेल्या चित्रिकरणाची तपासणी पोलिसांनी केली. यामध्ये दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी हा प्रकार केल्याचे दिसून आले. रिंढे यांनी बँकेसमोर जीप उभी केल्यानंतर आत गेले. यानंतर लगेच दोन दुचाकीवर चौघे पाठीमागून त्या ठिकाणी आले. एका दुचाकीवरील मागे बसलेला तरुण मोंढा नाका उड्डाणपुलावर जीपच्या अलीकडे उतरून थांबला. दुसरे दोघे देखील पाठीमागेच थांबले. यानंतर जो दुचाकीस्वार जीपच्या पुढे गेला होता. तो पुन्हा दुचाकी वळवून विरुद्ध दिशेने जीपकडे आला. पूर्वीपासून थांबलेल्या दोघांनी जीपची काच फोडून दीड लाखाची बॅग घेऊन पोबारा केला. गर्दीमध्ये हा प्रकार कोणाच्या लक्षात देखील आला नाही. एचडीएफसी बँकेपासून या चोरट्यांनी जीपचा पाठलाग केल्याची शंका व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा हेरिटेज सायक्लोथॉन उद्या रंगणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महाराष्ट्र टाइम्स'च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त औरंगाबाद जिल्हा सायकलिंग संघटनेच्या सहकार्याने रविवारी (नऊ डिसेंबर) मटा हेरिटेज सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या कार्यक्रमाची सुरवात हेरिटेज सायक्लोथॉनने होणार आहे. 'मटा'चा सातवा वर्धापनदिन असल्याने शहरातील सात वारसास्थळांना सर्व सायकलपटू भेट देणार आहेत. उस्मानपुरा भागातील मटा कार्यालयापासून हेरिटेज सायक्लोथॉनची सुरवात होईल. रविवारी सकाळी सात वाजता महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते सायक्लोथॉनला झेंडा दाखवण्यात येणार आहे. या प्रसंगी औरंगाबाद जिल्हा सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे व सचिव चरणजितसिंग संघा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शहराच्या विविध भागातून सायकलपटू मार्गक्रमण करणार आहेत. याचा समारोप दिल्लीगेटजवळ होणार आहे. शहरातील सात वारसा स्थळांचे महत्त्व इतिहास तज्ज्ञ सांगणार आहेत. सायक्लोथॉनमध्ये सहभाग घेण्यासाठी जिल्हा सायकलिंग संघटनेशी; तसेच नदीम अहमद (९८२२६३०५५५) यांच्याशी संपर्क साधावा.

\Bहेरिटेज सायक्लोथॉनचा मार्ग\B

मटा कार्यालय, पैठणगेट, औरंगपुरा, खडकेश्वर, मिलकॉर्नर, ज्युबिलीपार्क, घाटी, पाणचक्की, विद्यापीठगेट, औरंगाबाद लेणी, सोनेरी महल, बीबीका मकबरा, मकाई गेट, रंगीन दरवाजा, दिल्लीगेट.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रघुनाथ कुलकर्णी यांचे ‌निधन

$
0
0

औरंगाबाद : जालना तालुक्यातील नेर येथील रहिवासी सेवानिवृत्त ग्रामसेवक रघुनाथ माधवराव कुलकर्णी (८३) यांचे गुरुवारी (सहा डिसेंबर) सकाळी दहा वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर नेर येथील स्मशानभूमीत सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सुरेंद्र कुलकर्णी व जिल्हा परिषदेचे शिक्षक यशवंत कुलकर्णी यांचे ते वडील होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळा चिरून खून, आरोपीस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टीव्ही सेंटर परिसरातील ३२ वर्षीय महिलेचा गळा चिरून खून केल्याच्या प्रकरणातील आरोपी शुभम भाऊसाहेब बागूल याला बुधवारपर्यंत (१२ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी शुक्रवारी (७ डिसेंबर) दिले.

या प्रकरणी शारदा बाबासाहेब वाहूळ (३०, रा. जाधववाडी) यांनी फिर्याद दिली होती. टीव्ही सेंटर, एन-१२ परिसरात राहणाऱ्या सुनंदा शिवा वाघमारे हिचा गळा चिरून खून केल्याच्या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात भादंवि ३०२ कलमान्वये गुरुवारी (६ डिसेंबर) गुन्हा दाखल होऊन आरोपी शुभम भाऊसाहेब बागूल (२२, रा. सिद्धार्थनगर) याला गुरुवारीच अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीचा सुनंदाला जिवे मारण्याचा नेमका उद्देश काय होता, आरोपीने गुन्ह्यात वापरलेले धारदार कटर कुठून आणले, आरोपीचे कोणी साथीदार आहेत का आदी बाबींचा तपास करणे बाकी आहे. तसेच आरोपी हा गुन्हेगारी वृत्तीचा असून, त्याचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासावयाचे आहे. त्यामुळे आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाने पालिकेला फटकारले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन हा रस्ता स्मार्ट करण्यासाठी ३७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, याचा उल्लेख होताच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पी. व्ही. नलावडे व न्या. विभाग कंकणवाडी यांनी 'आधी कपडे घाला, नंतर फॅशन करा,' अशा शब्दांत महापालिका प्रशासनाला फटकारले.

औरंगाबाद खंडपीठातील वकील रुपेश जैस्वाल, शिवराज कडू, हिरामण झांबरे यांनी जनहित याचिका केली आहे; तसेच प्रभाकर औरंगाबादकर यांनी सातारा परिसरातील नागरिकांना पाणी मिळण्यासाठी याचिका सादर केली आहे. या सर्व याचिकांची सुनावणी शुक्रवारी झाली. सुनावणी सुरू असताना रुपेश जैस्वाल यांनी क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्यावर निवेदन केले. २०१५मध्ये क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन हा रस्ता तयार करण्यात आला. त्यावेळी ३४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. एकीकडे पालिका म्हणते विकास कामांसाठी पैसा नाही. मग हा रस्ता स्मार्ट करण्यासाठी खर्च करण्याची गरज नाही, असा युक्तीवाद जैस्वाल यांनी केला. हे पैसे सर्व जनतेचे आहे. तुम्ही पैसे खर्च करू शकत नाही, असे कोर्टाने सांगितले. याचिकाकर्ते जैस्वाल यांना या रस्त्यासंदर्भात नव्याने अर्ज करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या अडीच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे क्राँक्रिटीकरण करण्यात आले. त्यावेळी ३४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. या रस्त्याला प्रारंभी डॉ. पुरुषोत्तम भापकर मार्ग असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर हा निर्णय बदलून पालिकेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी 'शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महामार्ग' असे केले. औरंगाबाद शहराचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाल्यानंतर स्मार्ट रोडची संकल्पना पुढे आली. क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन, रेल्वेस्टेशन ते महावीर चौक आणि महावीर चौक ते क्रांतीचौक असा त्रिकोण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रस्तावित स्मार्ट रस्ता

पहिल्या टप्प्यात क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्याचे काम स्मार्ट रोडच्या धर्तीवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डिसेंबरमध्येच या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात येईल. रस्त्याच्या दुभाजकात झुंबर आणि आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. सायकल ट्रॅकशिवाय संदेश देणाऱ्या पाट्या, वैशिट्यपूर्ण फूटपाथ आणि फुलझाडे, अशी स्मार्ट रस्त्याची संकल्पना असणार आहे.

'कोर्टाच्या आदेशानूसार हा रस्ता स्मार्ट करण्याला आक्षेप घेत नव्याने अर्ज दाखल करणार आहे.'

- रुपेश जैस्वाल, याचिकाकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images