Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कुख्यात भुऱ्याला गुरुवारपर्यंत कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

फळ कापण्याच्या चाकूने व्यापाऱ्याचा चेहरा व मानेवर वार करून सात हजार रुपये हिसकावून पळून जाणारा सराईत गुन्हेगार वाजीद उर्फ भुऱ्या उर्फ बबलू कदीर कुरेशी याच्या पोलिस कोठडीत गुरुवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी सोमवारी दिले.

या प्रकरणात व्यापारी असद सत्तार कुरेशी (वय ३८, रा. सिल्लेखाना) यांनी तक्रार दिली. असद कुरेशी हे १५ डिसेंबर रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पैठण गेट परिसरात असतांना वाजीद उर्फ भुऱ्या उर्फ बबलू कदीर कुरेशी (वय ३४, रा. सिल्लेखाना) हा तेथे आला. त्याने असद कुरेशी यांना सिगारेट पाजण्याचा अग्रह केला असता त्यांनी नकार दिला. त्यानंतर आरोपी भुऱ्याने असद कुरेशी यांच्या खिशातील सात हजारांची रोख रक्कम बळजबरी हिसकावून घेत धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र कुरेशी यांनी त्याला पकडले असता आरोपीने फळ कापण्याच्या चाकूने कुरेशी यांच्या मानेवरी व चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमी केले व तेथून धूम ठोकली. प्रकरणात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

\Bपोलिसांकडून चाकूचा शोध \B

पोलिसांनी आरोपी भुऱ्याला रविवारी अटक केली, तर न्यायालयाने त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला न्यायालात हजर केले असता सहायक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करणे आहे. आरोपीने बळजबरीने हिसकावून घेतलेली रक्कम जप्त करणे असल्याने आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती कोर्टाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिमुकलीवर अत्याचार; नराधमास सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

घरा बाहेर खेळणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीला दुचाकीवर बसवून परिसरातील एका बोळात नेऊन अत्याचार करणाऱ्या नराधमाला पाच वर्षे सक्तमजुरी व विविध कलमांखाली दीड हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी सोमवारी ठोठावली. इद्रीस अफसर बागवान (वय १९, रा. बिडकीन, ता. पैठण), असे त्याचे नाव आहे.

ही घटना १३ डिसेंबर २०१५ रोजी घडली. पीडितेची आई सकाळी ११च्या सुमारास स्वयंपाक करत असताना मुलीने चित्र चिकटवून देण्यास सांगितले. स्वयंपाक झाल्यावर चिकटवून देते, असे सांगितल्याने मुलगी घरासमोर खेळण्यासाठी गेली. गल्लीत कोणी नसल्याची संधी साधून दुचाकीवर आलेला आरोपी इद्रीस याने मुलीला परिसरातील एका बोळात घेऊन गेला. तेथे अत्याचार केला व कोणाला सांगू नको, असे म्हणत दुचाकीवरून पळून गेला. स्वयंपाक झाल्यानंतर आईने मुलीचा शोध घेतला असता ती सापडली नाही. दहा मिनिटांनंतर मुलगी घरी आली असता आईने विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध कलम ३७६ व पोक्सोचे कलम ८,१० व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास अधिकारी ए. ए. डोंगरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता डी. के. नागुला यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात पीडिता आणि तिच्या आई-वडिलांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला पोक्साचे कलम १० अन्वये पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्त मजुरी, कलम १२ अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठाविली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पी. आर. पाटील, एस. आर. शेख, एस. डी. रामोड यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आकांक्षा’साठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. आकांक्षा देशमुख हिचा खून होऊन सहा दिवस पूर्ण झाले असून अद्याप मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. शोध घेऊन मारेकऱ्यास अटक करावी, मृत आकांक्षाला न्याय द्यावा या मागणीसाठी सोमवारी 'एमजीएम'मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.

'एमजीएम'च्या फिजीओथेरेपी महाविद्यालय परिसरात झालेल्या या ठिय्या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले.

सहा दिवस उलटूनही डॉ. आकांक्षा देशमुख हिच्या मारेकऱ्याचा शोध लागला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे झालेल्या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी फिजीओथेरेपी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर ठिय्या आंदोलन सुरू केले. 'अभाविप'चे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी संस्थाचालकांना भेटण्याचा आग्रह धरला. त्यामुळे संस्थेचे सचिव अंकुशराव कदम यांनी कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांची भेट घेतली. डॉ. आकांक्षा देशमुख हिच्या मृत्युनंतर तिला उचलून नेऊन पुरावे नष्ट करणाऱ्या संबंधित कर्मचारी आणि वार्डनवर कारवाई करण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी कदम यांच्याकडे केली. यावेळी 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांकडून वाद वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याने पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी मध्यस्थी करत कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढले. दरम्यान, संस्थाचालकांना भेटण्यासाठी गेलेल्या वसतिगृहातील विद्यार्थिनींनी भीतीचे वातावरण असल्याचे सांगितले. वॉशरूममध्ये जाण्यासाठी मुली घाबरत असल्याचे मत मांडले.

……

\B'अभाविप'ने जोडला 'राफेल'चा संबंध \B

संस्थाचालकांची भेट घेतल्यानंतर 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून मारेकऱ्यांना वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप केला. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचा राफेल विमान खरेदीतील भ्रष्टाचारावर रविवारी 'एमजीएम'मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या आरोपाचे संस्थेचे सचिव अंकुशराव कदम यांनी खंडन केले. भाजपचा कार्यक्रमही 'एमजीएम' परिसरात होत असल्याची माहिती त्यांनी 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांना दिली. दरम्यान, यावरून वातावरण तापले होते.

डॉ. आकांक्षा देशमुख हिच्या मारेकऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. ते निश्चितच मारेकऱ्याला शोधून काढतील. वसतिगृहातील अनेक मुलींमध्ये भीती निर्माण झाली आहे. या मुलींची व्यवस्था इतर वसतिगृहात करत आहोत.

-अंकुशराव कदम, सचिव, 'एमजीएम'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार यादीची उद्या पडताळणी

$
0
0

औरंगाबाद : जिल्ह्यातील मतदारांनी आपली नोंद असलेल्या मतदार यादीच्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदार यादीतील नोंदीमध्ये शुद्धता व अचूक करण्याबाबत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे. बुधवारी (१९ डिसेंबर) जवळच्या मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व बूथ लेवल एजंट मतदार यादीसह मतदान केंद्रावर सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत उपस्थित राहून पुढील यादींची पडताळणी करणार आहेत. एक जानेवारी २०१९ या आर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती निकाली काढणे, डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी यादीची व अंतिम मतदार यादी दिनांक ११ जानेवारी, २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’ला पालिकेचे पाणी!

$
0
0

unmesh.deshpande@timesgroup.com

Tweet - @UnmeshdMT

औरंगाबाद : सरकारचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाला महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कामाचे नमुने 'समृद्धी'चे काम करणासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांनी घेतले आहे. या पाण्यावर त्यांनी समाधान देखील व्यक्त केले आहे. पाच रुपयांत एक हजार लिटर पाणी या कामासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

समृद्धी महामार्गाचा प्रकल्प सुरू होण्याआधीच चांगला गाजला आहे. भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने सुरुवातीला या प्रकल्पाला विरोध केला. आता त्यांच्या विरोधाची धार कमी झाली आहे. समृद्धी महामार्गाचा काही भाग औरंगाबाद जिल्ह्यातून जातो. या महामार्गाच्या बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता आणि पाण्याची उपलब्धता कमी होत असताना महामार्गासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाण्याचा पर्याय शोधून काढण्यात आला आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. समृद्धी या प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला केली. त्यानुसार महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात माहिती देताना महापालिकेचे कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी म्हणाले, 'समृद्धी महामार्गाचे काम करणासाठी नियुक्त केलेल्या मेघा इन्फ्रास्ट्रक्चर आणि एल अँड टी कंपनी या दोन्ही कंपनींच्या अधिकाऱ्यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या पाण्याचे नमुने घेतले. हे नमुने त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत तपासले. रस्त्यांच्या कामासाठी हे पाणी योग्य असल्याचा अभिप्राय त्यांनी दिला आहे. 'सोर्स पासून बल्क वॉटर' घेणाऱ्यांसाठी पाच रुपये प्रति हजार लिटर असा या पाण्याचा दर ठरविण्यात आला आहे. समृध्दी महामार्गाच्या कामासाठी बल्क वॉटर लागणार आहे. हे पाणी महापालिका उपलब्ध करून देईल. उपलब्ध करून दिलेले पाणी समृद्धी महामार्गाच्या साइटपर्यंत कसे न्यायचे याचे नियोजन संबंधित कंपनीला करावे लागणार आहे.'

\Bसर्वसाधारण सभेत प्रस्ताव

\Bपालिकेचे कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी म्हणाले, 'समृद्धी महामार्गासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी देण्याबद्दलचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवला जाणार आहे. सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यावर संबंधित कंपनींबरोबर करार करून पाणी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. औरंगाबादमध्ये शासकीय अनुदानातून आणि डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून येत्या काळात रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी देखील या प्रकल्पाचे पाणी वापरता येणे शक्य आहे.'

\Bसांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून उपलब्ध होणारे पाणी

\Bकांचनवाडी ६० ते ७० दश लक्षलिटर

झाल्टा १० दश लक्षलिटर

पडेगाव २ दश लक्षलिटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर - उपमहापौरांमध्ये रंगला कलगीतुरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्ते कामाचा आणि सिटी बससेवेच्या कामाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यावरून सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले आणि उपमहापौर विजय औताडे यांच्यात काही मिनीटांचा कलगीतुरा रंगला. महापौरांनी आपल्या गोडबोलण्याच्या स्टाईलमध्ये औताडे यांची समजूत काढली.

शासकीय निधीतून ३१ रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ केला जाणार आहे. त्याच बरोबर सिटी बससेवेचा शुभारंभ देखील महापालिकेतर्फे केला जाणार आहे. या दोन कार्यक्रमांना जोडून कांचनवाडी येथील एसटीपीचे उद्घाटन आणि कचऱ्यापासून गॅस निर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले जाणार आहे. हा सर्व कार्यक्रम रविवारी (२३ डिसेंबर) आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. यासाठी महापालिकेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची अगोदरच वेळ घेतली आहे. आता मुख्यमंत्र्यांची वेळ मिळावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत.

मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यासाठी तयार करण्यात आलेले पत्र उपमहापौर औताडे यांनी सोमवारी सायंकाळी महापौरांच्या दालनात पाहिले आणि त्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. 'रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, आपण त्यास उपस्थित रहावे' असे पत्रात नमूद करण्यात आल्याचे पाहून औताडे यांनी या मजकूरावर आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांना विनंतीवजा पत्र लिहायला हवे होते. कार्यक्रमाला उपस्थित रहा, असे पत्रात कसे काय नमूद केले, असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांच्या कामांसाठी १०० कोटी रुपये दिले, कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी १०० कोटी रुपये दिले. रस्त्यांच्या कामांसाठी ते आणखी १०० कोटी रुपये देणार आहेत, असे असताना प्रथम मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यायला हवी होती, त्यानंतर अन्य पाहुण्यांना निमंत्रण द्यायला हवे होते, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरेंची वेळ अगोदर घेऊन नंतर मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्यासाठी जाण्यास उपमहापौरांचा आक्षेप होता. आदित्य ठाकरे रस्त्यांसाठी १०० कोटी देऊ शकतील का, असा सवाल त्यांनी महापौरांना केला.

अनपेक्षितपणे उद्भवलेल्या या प्रसंगाला महापौर देखील समर्थपणे सामोरे गेले. औताडे यांना उद्देशून ते म्हणाले, 'विजूभाऊ आजून आपण मुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्यायला गेलेलो नाहीत. तुमच्या सूचनेप्रमाणे पत्रात बदल करून घेऊ. प्रत्येकाला त्यांच्या पदानुसार मान दिला जाईल. मुख्यमंत्र्यांबद्दल आमच्या मनात आकास असण्याचे काहीच कारण नाही. मी एकदा नाही, दहादा त्यांच्याकडे जाण्यास तयार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राफेल’प्रकरणी लोकसभेत चर्चा करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारातील निर्णय प्रक्रिया, भारतीय ऑफसेट पार्टनर याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गैरव्यवहार नसल्याचा निर्वाळा दिला आहे. मात्र, असे असतानाही काँग्रेसकडून बिनबुडाचे आरोप केले जात असून या प्रकरणी लोकसभेत चर्चा करायला तयार आहोत,' असे आव्हान केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी दिले.

अहीर यांनी सुभेदारी विश्रामगृहात पत्रकारांशी राफेल प्रकरणासंदर्भात संवाद साधला. ते म्हणाले, 'खाऊँगा नही, खाने नही दूँगा याची जाणीव ठेवून केंद्र सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणी सरकारला क्लीनचीट दिली. मात्र, स्वच्छ प्रतिमा असलेल्या केंद्र सरकारची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राफेल प्रकरणात बदनामी करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे अपरिपक्व अध्यक्ष आणि नेतेमंडळी करत आहेत. काँग्रेसने या प्रकरणी लोकसभेत चर्चा करावी. कोर्टाने क्लिनचीट दिलेली असतानाही काँग्रेसचे नेते बिनबुडाचे आरोप करत सरकारला बदनाम करत आहेत. सरकारपेक्षा संरक्षण मंत्रालयाला अडचणीत आणू जगात आपल्या देशाची बदनामी करण्याचा घाट घालत आहेत. राफेल विमानांच्या किंमतीची माहिती महालेखापालांना (कॅग) दिली असून ते त्याचा विचार करतील. त्यानंतर कॅगचा अहवाल संसदेच्या लोकलेखा समितीला जाईल व त्यानंतर संसदेसमोर अहवाल सादर होईल. सरकारने कॅगला माहिती दिल्याने ही प्रक्रिया सुरू झाली आहे,' असे अहीर म्हणाले. यावेळी आमदार अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये, सरचिटणीस कचरू घोडके, माजी महापौर भगवान घडमोडे, बसवराज मंगरुळे, प्रा. राम बुधवंत उपस्थित होते.

\Bकॉँग्रेसच्या सत्तेत देशाची सुरक्षा वाऱ्यावर

\Bअहिर म्हणाले, 'आपली शेजारी राष्ट्रे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे मिळवत असताना काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात शस्त्रांस्त्रांच्या बाबतीत चालढकल करण्यात आली. ही खरेदी 'कमिशन'पोटी रखडली का,' असा सवाल त्यांनी केला. 'काँग्रेसने सत्तेत असताना देशाची सुरक्षा वाऱ्यावर सोडली. देशहित डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने राफेलचा सौदा केला आहे. यात कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशापेक्षा सत्ताप्रेम अधिक आहे,' असा आरोपही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महारेशीम अभियानाचा शुभारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे या हेतुने जिल्हा रेशीम कार्यालयाच्यावतीने 'महारेशीम अभियान २०१९' राबविण्यात येत असून यासाठी रेशीम रथाची निर्मिती निर्मिती केली आहे. या रथाला जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी हिरवी झेंडा दाखवून अभियानाचा शुभारंभ केला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात चौधरी यांनी चित्ररथाची फित कापून तसेच हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे सहायक संचालक डी. ए. हाके, जिल्हा रेशीम विकास अधिकारी बि. के. सातदिवे, प्रकल्प अधिकारी आर. एस. माने, एम. पी. साळुंखे, कीर्ती नागरगोजे आदींसह रेशीम विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन

या कार्यक्रमांतर्गत २९ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना तूती रेशीम शेती उद्योगाबाबत माहिती देण्यात येणार आहे. २०१९ साठी शेतकऱ्यांची नोंदणी देखील या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तसेच रेशीम शेतीसाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...भाऊ रात्रीचे तिकीट, टेन्शन खल्लास!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रात्री उशिरा रेल्वेने येणाऱ्यांना आणि सिनेमाचा शेवटचा शो सुटल्यानंतर घराकडे जाताना वाहनासाठी हात दाखवून हैराण होणाऱ्या शहरवासियांसाठी एक आनंदवार्ता. आता कोणत्या रिक्षाचालकाकडून लुबाडणूक होण्याची भीतीही राहणार नाही. कारण महापालिका या वेळेत या मार्गावर सिटी बस सुरू ठेवणार आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून रविवारी सिटी बससेवा सुरू केली जात आहे. रेल्वेच्या वेळांमध्ये, रात्री उशिरा सिनेमा सुटण्याच्या वेळांमध्ये सिटी बस सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. 'रात्री बारा - साडेबारा वाजेच्या दरम्यान रेल्वे येते. त्यावेळी रेल्वेस्टेशनहून लांबपल्ल्याच्या बस सोडण्याचे नियोजन केले आहे. सिडको - हडकोसह पडेगाव, मिटमिटा, कांचनवाडी - नक्षत्रवाडी, शिवाजीनगर - पुंडलिकनगर, बेगमपुरा - पहाडसिंगपुरा आदी भागातील नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येईल व कमी पैशात घरापर्यंत जाता येईल. सिनेमाचा तिसरा शो सुटल्यावर देखील सिटी बसची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितपणे आपापल्या ठिकाणापर्यंत पोचता येणार आहे. धारवाड येथील टाटा मोटर्सच्या कारखान्यात २५ सिटी बसची तांत्रिक तपासणी सोमवारी झाली. त्यामुळे या बस मंगळवारी सायंकाळपर्यंत शहरात दाखल होणार आहे. बस दाखल झाल्याचे रिपोर्टिंग अधिकारी बुधवारी करतील,' असे महापौरांनी सांगितले.

\Bस्मार्ट थांबे करणार

\B'सिटी बससाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम देखील सोबतच केले जाणारआहे. स्मार्ट बसथांबे तयार करण्याची मूळ संकल्पना आहे. हे बसथांबे तयार करण्यास थोडा वेळ लागणार असल्यामुळे तूर्तास बसथाब्यांच्या जागेवर एक खांब उभा करून त्यावर पाटी लावण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना बसथांबा कुठे आहे याची माहिती मिळेल. सिटी बसच्या माध्यमातून चांगली सेवा देण्याचा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा प्रयत्न आहे,' असे महापौर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयक्यूब’ पालिका प्रशासनाची मेहरबानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर मशीन लावून त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम आयक्यूब कंपनीला पाच वर्षांसाठी देण्यात आले आहे. मात्र, पालिका प्रशासन या कंपनीवर इतके मेहरबान झाले की, त्यांनी याच कंपनीला हे काम दहा वर्ष करण्यासाठी परस्पर मान्यता दिल्याचे उघड झाले आहे.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहाराच्या चार भागात चार जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी हर्सूल येथील एक जागा आहे. या जागेवर प्रक्रिया प्रकल्प उभारून या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाची निविदा महापालिकेने काढली. देखभाल दुरुस्तीचे काम दहा वर्षांचे असेल असे त्यात नमूद करण्यात आले होते. पालिकेकडे तीन कंपनींच्या निविदा प्राप्त झाल्या. त्यात आयक्यूब कंपनीची १२ कोटी रुपये दर भरलेली निविदा सर्वात कमी दराची होती. त्यामुळे ही निविदा स्वीकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला. प्रस्ताव तयार केल्यावर कंपनीने दहाऐवजी पाच वर्षांचा उल्लेख केल्याचे लक्षात आले. याबद्दल प्रशासनाने कंपनीच्या प्रतिनिधींकडे विचारणा केली असता देखभाल दुरुस्तीचे काम पाच वर्षांचेच आहे, असे वाटल्यामुळे पाच वर्षाचा दर निविदेत भरला असा खुलासा आयक्यूबकडून करण्यात आला.

\Bचुकीच्या पद्धतीने निविदा भरली

\Bसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चुकीच्या पद्धतीने निविदा भरल्यामुळे प्रशासनाने आयक्यूबची निविदा रद्द करून दुसऱ्या क्रमांकाच्या निविदाधारकाला संधी द्यायला हवी होती किंवा फेर निविदा काढायला हवी होती. मात्र, असे न करता याच कंपनीची २४ कोटींची निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीच्या समोर ठेवण्याची तयारी आता प्रशासनाकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अठरा दिवसात डेंगीचे १९ संशयित रुग्ण

$
0
0

औरंगाबाद : शहरात डेंगीच्या संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. एक डिसेंबर ते १८ डिसेंबरपर्यंतची आकडेवारी त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या म्हणाल्या, 'डिसेंबर महिन्यात आतापर्यंत डेंगीचे १९ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत आणि पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. रुग्णांची एकूण संख्या २४ आहे. अठरा दिवसात रुग्णांची एवढी संख्या चिंताजनक असल्याचे मानले जात आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोळेकरांच्या नातेवाईकांचे घाटीत ठिय्या आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते मंजीत कोळेकर यांनी सोमवारी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत मंगळवारी सकाळी नातेवाईकांनी जोरदार आंदोलन केले. धनगर समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, कोळेकर यांच्या मुलाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, कोळेकर यांना शहिदाचा दर्जा देत त्यांच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत करावी आदी मागण्या सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आल्या. उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कोळेकर यांनी मुलीच्या विवाह सोहळ्यापूर्वी आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी बीड बायपास भागात घडला होता. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोळेकर गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील होते. त्यांच्या आत्महत्येनंतर सकल धनगर समाज आणि नातेवाईकात संताप निर्माण झाला होता. सकाळपासून घाटी हॉस्पिटल्या पोस्टमार्टेम विभागासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन तासांत मागण्या मान्य झाल्या नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरण रचून कोळेकर यांचा अंत्यविधी करणार असल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. यामुळे घाटी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात रण्यात आला. तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सुरेंद्र माळाळे, शेषराव उदार, राजश्री आडे, उपनिरीक्षक अनिल वाघ आदींनी घटनास्थळ गाठले. जमावाला समजावण्याचा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांनी केला.

\Bआश्वासन \B

सकल धनगर समाजाच्या आंदोलकांनी घाटी हॉस्पिटलमध्ये आंदोलन सुरू केल्यानंतर उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांनी आंदोलकांची भेट घेवून तुमच्या मागण्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवू, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेत कोळेकर यांचे पार्थिव ताब्यात घेवून अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतींचे ऐकूनच काम; महापौरांची गुगली!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्थायी समितीचे सभापती आणि सभागृहनेते यांचे ऐकूनच मी काम करतो,' अशा शब्दात महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांवर गुगली टाकली.

स्मार्ट सिटी मिशनमधून सुरू केल्या जाणाऱ्या शहर बसवर औरंगाबादची ओळख असलेल्या देवीदेवतांचे छायाचित्र असावे, अशी मागणी स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी आयुक्तांकडे पत्र देवून केली आहे. याच संदर्भात पत्रकारांनी महापौरांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, 'सिटी बसवर देवीदेवतांची छायाचित्रे काढली, तर त्यांची विटंबनी होऊ शकते. बसवर चिखल उडू शकतो. बसमध्ये बसलेले प्रवासी खिडकीतून बाहेर थुंकतात. काही जणांना उलट्या देखील होतात. ही घाण बसवर पडली तर ते योग्य होणार नाही. ही वस्तूस्थिती सभापतींच्या लक्षात आणून देऊ, सभापती समजूतदार आहेत ते समजून घेतील,' असे महापौर म्हणाले. 'सभापती व सभागृहनेता विकास जैन यांना महापालिकेत विविध पदांवर काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. मी त्यांचे ऐकूनच काम करतो. ३० डिसेंबर रोजी ४३ सिटी बस शहरात धाऊ लागतील. त्यापैकी पाच सिटी बस २३ डिसेंबररोजी धावतील. पाच बसच्या माध्यमातून सिटी बससेवेचे लोकार्पण केले जाईल,' असे महापौरांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘परप्रांतीय कामगारांची हकालपट्टी करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आकांक्षा देशमुख खून प्रकरणात तिचा मारेकरी हा परप्रांतीय मजूर असल्याचे निष्पन्न झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना हटवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवारी कामगार आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनात ज्या ठिकाणी मजूर काम करीत होता त्याची नोंद आहे का, तसेच शहरात अनेक कंपन्यामध्ये परप्रांतीय कामगारांची भरती करण्यात आली आहे. या परप्रांतीयाची हकालपट्टी करण्यात यावी, स्थानिक भूमीपुत्रांना कंपन्यामध्ये भरती करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या १५ दिवसांत पूर्ण झाल्या नाही, तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या शिष्टमंडळात सुमीत खांबेकर, बिपीन नाईक, संदीप कुलकर्णी, वैभव मिटकर, सतनामसिंग गुलाटी, राजू जावळीकर, मंगेश साळवे, राहुल पाटील, अमीत ठाकूर, राहुल रगडे, सतीश मिसाळ, ज्ञानेश्वर घुगे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणलोटाच्या कामांना श्रमदानाने सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

फुलंब्री तालुक्यातील मारसावळी ते शेवता या मार्गातील एकूण १३ गावांत पाणलोट व्यवस्थापनाचे काम सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ मार्फत करण्यात येत आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्याची मारसावळी येथून नुकतीच सुरुवात करण्यात आली. याला 'गिरीजा प्रकल्प' असे नाव देण्यात आलेले आहे.

संस्थेतर्फे पुढील पाच वर्षे काम करण्यात येणार आहे. सलग समतर चर, बांध बंधिस्ती, वृक्ष लागवड, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, व्हॅट आदी विविध प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. प्रकल्पाचे प्रमुख म्हणूनगजानन साईखेडकर हे काम पाहत आहेत. मारसावळी येथील श्रमदानात ११० महिला व १२० पुरूष, असे एकूण २३० जणांनी सहभाग नोंदविला. सरपंच पुरुषोत्तम गाडेकर यांनी स्वत: श्रमदान केले. त्यांच्या पाठोपाठ गावातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून श्रमदान केले. यावेळी सुरेश दुधे, ज्ञानेश्वर गाडेकर, शिवाजी गाडेकर, संस्थेच्या वतीने लहू ठोंबरे, दिग्विजय राजगुरू, केतन शर्मा, योगिता फुले, गजानन इधाटे, शिवाजी पवार, प्रदीप गाडेकर, गणेश दाभाडे, शीतल मेश्राम, सिद्देश शेळके, सर्जेराव हावळे व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयक्यूब’वर पालिका प्रशासनाची मेहरबानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर मशीन लावून त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम आयक्यूब कंपनीला पाच वर्षांसाठी देण्यात आले आहे. मात्र, पालिका प्रशासन या कंपनीवर इतके मेहरबान झाले की, त्यांनी याच कंपनीला हे काम दहा वर्ष करण्यासाठी परस्पर मान्यता दिल्याचे उघड झाले आहे.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहाराच्या चार भागात चार जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी हर्सूल येथील एक जागा आहे. या जागेवर प्रक्रिया प्रकल्प उभारून या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाची निविदा महापालिकेने काढली. देखभाल दुरुस्तीचे काम दहा वर्षांचे असेल असे त्यात नमूद करण्यात आले होते. पालिकेकडे तीन कंपनींच्या निविदा प्राप्त झाल्या. त्यात आयक्यूब कंपनीची १२ कोटी रुपये दर भरलेली निविदा सर्वात कमी दराची होती. त्यामुळे ही निविदा स्वीकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला. प्रस्ताव तयार केल्यावर कंपनीने दहाऐवजी पाच वर्षांचा उल्लेख केल्याचे लक्षात आले. याबद्दल प्रशासनाने कंपनीच्या प्रतिनिधींकडे विचारणा केली असता देखभाल दुरुस्तीचे काम पाच वर्षांचेच आहे, असे वाटल्यामुळे पाच वर्षाचा दर निविदेत भरला असा खुलासा आयक्यूबकडून करण्यात आला.

\Bचुकीच्या पद्धतीने निविदा भरली

\Bसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चुकीच्या पद्धतीने निविदा भरल्यामुळे प्रशासनाने आयक्यूबची निविदा रद्द करून दुसऱ्या क्रमांकाच्या निविदाधारकाला संधी द्यायला हवी होती किंवा फेर निविदा काढायला हवी होती. मात्र, असे न करता याच कंपनीची २४ कोटींची निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीच्या समोर ठेवण्याची तयारी आता प्रशासनाकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याला लाच मागणारा महावितरणचा अभियंता गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरणचा अतिरिक्त अभियंता रामेश्वर नारायण सोनत (वय ४५, रा. तापडिया पार्क एन चार) याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी अटक केली. पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची धमकी देत एका शेतकऱ्याकडे २० हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.

रामेश्वर सोनत हा भरारी पथकाचा प्रमुख आहे. त्याच्या पथकाने एका शेतकऱ्याच्या मीटरची तपासणी केली होती. या शेतकऱ्याला त्यांनी मिलकॉर्नर येथील महावितरणच्या कार्यालयात एक डिसेंबर २०१८ रोजी बोलावून घेतले. तुमचे मीटर सदोष असून तुम्हाला पाच लाख रुपये दंड होऊ शकतो. दंडाची रक्कम कमी करायची असेल, तर ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तडजोडीअंती ही रक्कम २० हजार ठरली होती. दरम्यान, लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता सोनत याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मंगळवारी रामेश्वर सोनत याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक शंकर जिरगे, नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सचिन गवळी, भीमराज जिवडे, अश्वलिंग होनराव, दिगंबर पाठक आणि संतोष जोशी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रब्बीच्या पीक विम्यापोटी मिळाले ७३ कोटी रुपये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकऱ्यांनी २०१७-१८ मध्ये रब्बी पिकांच्या संरक्षणार्थ उतरविलेला पीक विमा मंजूर झाला आहे. यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ७३ कोटी ५१ लाख रुपये मिळणार आहेत. यात बीड जिल्ह्यासाठी १४ कोटी १५ लाख ४४ हजार सर्वाधिक विमा रक्कम मिळणार आहे.

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसू नये यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे. रब्बी पिकांचा विमा उतरविण्यासाठी ५ डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. या पीक विमा योजनेंतर्गत रब्बी पिकांसाठी २०१७-१८मध्ये औरंगाबादसह मराठवाड्यातील एकूण १२ लाख १२ हजार १५ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी सुमारे २८ कोटी रुपयांचा हिस्सा जमा केला होता.

दरम्यान, रब्बीच्या विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी २ लाख ३८ हजार ५४८ शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यात औरंगाबादेतील ७९६ शेतकऱ्यांना ४५ लाख ६६ हजार रुपये, जालना जिल्ह्यातील १ हजार ७३४ शेतकऱ्यांना ३३ लाख ३१ हजार तर बीड जिल्ह्यातील ५४ हजार १०२ शेतकऱ्यांना १४ कोटी १५ लाख ४४ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असून लातूर कृषी सहसंचालक कार्यालय क्षेत्रात असलेल्या लातूर उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार९१६ शेतकऱ्यांना ५८ कोटी ५६ लाख १३ हजार असा एकूण मराठवाड्याला ७३ कोटी ५१ लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ओटीएस यंत्रणेद्वारे जमा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलचाचणी पहिल्याच दिवशी ‘फेल’..

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'कलचाचणी व अभिक्षमता कसोटी' मंगळवारपासून राज्यभर सुरू झाली. संगणकावर घेतलेली परीक्षा यंदा 'मोबाइल अॅप' द्वारे घेतली जात आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची यादी न दिसणे, अॅप न दिसल्याने काही तास प्रक्रियाच हँग झाली. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शाळेकडे स्मार्टफोन नसल्याने थेट विद्यार्थ्यांमार्फत पालकांना गळ घातली जात आहे. शिक्षण विभागाच्या गलथान नियोजनामुळे पालकांचीही पुरती तारांबळ उडते आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना आपला कल पाहून करिअर निवडता यावे या हेतुने दोन वर्षांपासून कलचाचणी सुरू झाली. ऑफलाइन, ऑनलाइन अन् संगणक करत आता मोबाइल अॅपद्वारे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. १८ डिसेंबर ते १७ जानेवारीपर्यंत शाळांना कलचाचणी पूर्ण करायची आहे. मोबाइलवर होत असलेल्या कलचाचणीसाठी स्मार्टफोन कसा असावा, तो किती इंची असावा अशा सूचना आहेत. आज सकाळी सुरुवात झाली. मात्र, सर्व्हर हँग झाले. त्यामुळे ज्या शाळांना प्रक्रिया करायची होती त्यांना काही कळेना. संबंधितांना फोन करत प्रक्रिया सुरळीत होण्यापर्यंत ताटकळत बसावे लागले. तेवढा वेळ विद्यार्थ्यांनाही ताटकळत बसावे लागले. साडेअकरानंतर अॅप, विद्यार्थ्यांची यादी दिसू लागली अन् प्रक्रियेला सुरुवात झाली. मोबाइलचे नियोजन करण्याचे अनेक शाळांना यश आले नाही. शिक्षकांकडे स्मार्टफोन पुरेसे नसल्याने विद्यार्थ्यांना घरून मोबाइल आणण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. शिक्षण विभागाने तशा तोंडी सूचना दिल्या. स्मार्टफोनसाठी पालकांकडे तगादा लावला जात असल्याने पालकही गोंधळले आहेत. या चाचणीसाठी ज्या प्रकारच्या सुविधांचा फोन हवा तसा अनेक पालकांकडे नाही. त्यामुळेही पालकांची फरफट होते आहे. यासह 'कलचाचणी व अभिक्षमता कसोटी' प्रत्येकाला आयडी, पासवर्ड दिला जाणार आहे. अशावेळी पासवर्ड मुलांना कळाला तर त्याबाबत माहिती लिक होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

पालकांकडूनच मोबाइल आणा

दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता मोबाइलच उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शाळांमधील शिक्षकांनाही स्मार्ट फोन कोठून आणायचे असा प्रश्न आहे. एका विद्यार्थ्याला दीड तास कालावधी देण्यात आला. काही शाळांमध्ये शंभर, दोनशे काही ठिकाणी ही संख्या पाचशे, सहाशेपेक्षा अधिक आहेत. तेवढ्या संख्येने मोबाइल उपलब्ध नसल्याने शाळांनी थेट पालकांकडे गळ घातला आहे. विद्यार्थ्यांना पालकांकडून मोबाइल आणण्याच्या सूचना देण्यात आल्या. शाळेत मोबाइलला बंदी म्हणता अन् मोबाइल आता का? असा प्रश्न ही पालक उपस्थित करत आहेत. औरंगाबाद विभागात दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ८६ हजार ६६ एवढी आहे. विद्यार्थी संख्येचा विचार करता मोबाइल कोठून आणायचे असा प्रश्न उपस्थित झाला. राज्यात दहावीला १७ लाख विद्यार्थी बसतात. १७ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तेवढ्या वेळात प्रक्रिया पूर्ण करणे शाळा व्यवस्थापनांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

अशी आहे चाचणी

कलचाचणी मानसशास्त्रीय कसोटी आहे. विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीकोनातून कृषी, ललित कला, वाणिज्य, तांत्रिक, कला, संरक्षण सेवा, आरोग्य विज्ञान असे सात क्षेत्राबाबत कल तपासला जाणार आहे. त्यामध्ये १४० प्रश्न आहेत जे ७५ मिनीटात सोडवायचे. 'अभिक्षमता कसोटी'मध्ये भाषीय, तार्किक, अवकाशीय आणि संख्यात्मक असे टप्प्यावर प्रश्न आहेत. बौद्धिक लेवलेचे प्रश्न असून काठिण्य पातळी अधिक आहेत.

दहावी विद्यार्थी आकडेवारी

जिल्हा............ विद्यार्थी संख्या

औरंगाबाद...... ६५८७०

बीड................ ४३७०१

परभणी............ २८८२४

जालना............. ३१४०६

हिंगोली............. १६६५८

..

एकूण दहावीचे विद्यार्थी...१८६०६६

..

कल व अभिक्षमता कसोटीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला दीड तास कलावधी आहे. त्यासाठी स्मार्टफोन, पाच इंचापेक्षा मोठा मोबाइल आवश्यक आहे. शाळेतील विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांकडे मोबाइल उपलब्ध करून घेणे कसे शक्य आहे. संख्या, वेळ याचा विचार तरी करण्याची गरज होती.

अलका खोडे,

मुख्याध्यापक,

जागृती हायस्कूल.

सरकारचा उपक्रम सकारात्मक आहे. मात्र, त्यात लवचिकता असायला हवी. संगणकावर असताना नियोजन करणे सोपे होते. स्मार्टफोन प्रत्येकाकडे एखादा असू शकतो विद्यार्थी संख्या तशी नाही. शिक्षक अॅडजेस्ट करू शकतात. मात्र, त्यालाही मर्यादा आहेत. विद्यार्थी, पालकांची धावपळ ही योग्य नाही.

शेख जमील अहमद

समुपदेशक

कलचाचणी घ्यायची असल्याने आम्ही तसे नियोजन चार दिवसापूर्वीच केले. आमच्याकडे सत्तर विद्यार्थी आहेत. एकाचवेळी तेवढ्या विद्यार्थ्यांची कलचाचणीसाठी मोबाइल उपलब्ध होत नसल्याने आम्ही बॅच केल्या. आज २० विद्यार्थ्यांची घेतली. यासह तसेच पुढचे नियोजन केले आहे. कलचाचणीबाबत विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला.

शैला धुमाळ

मुख्याध्यापक,

श्रेयस माध्यमिक विद्यालय.

कलचाचणीचा टप्पा अतिशय छान विद्यार्थ्यांनी सोडविला. त्यानंतर अभिक्षमतेत थोडासा वेळ लागला. या प्रश्नांची काठिण्य पातळी थोडी अधिक होती. त्यासह प्रश्नांची उकल करत ते सोडविणे यासाठी विद्यार्थ्यांना वेळ लागला. मानसशास्त्रीय चाचण्या अतिशय उत्तम आहे. त्याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल.

शालिनी खंडाळे

कलचाचणी समन्वयक

कलचाचणीत प्रश्न सोपे वाटले. मी, कृषीबाबतचे प्रश्न अधिक सोडविले. यामध्ये नवीन काय धोरण आणाल, शेती करायला आवडते का कमी जागेत अधिक उत्पन्न येणारे पिके असे प्रश्न होते. ते सोडविताना छान वाटले. सुरुवातीला थोडेसे कसे सोडवायचे वाटत होते. मात्र, सहज सोडविता आले.

किरण चौधरी

विद्यार्थी

कलचाचणीतील प्रश्न अतिशय सुटसुटीत होते. त्यामुळे उत्तरे देताना फार काही वेगळे वाटले नाही. विविध सात क्षेत्रातून आपला कल कोणत्या क्षेत्राकडे हे कळेल. यात सरंक्षण क्षेत्रातील प्रश्नांकडे मी, अधिक गांभीर्याने पाहिले. त्यातील प्रश्न साधारणत: सोपे वाटले. अहवाल आल्यानंतर कळेल.

गजानन मालुसरे

विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोड तालुक्यातील घरकुलांसाठी शासकीय गायरान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

विविध योजनेतून मंजूर झालेल्या घरांसाठी मोढा खुर्द, पालोद, उंडणगाव, डोंगरगाव येथील लाभार्थींना शासकीय गायरान जमीन नाममात्र दराने उपलब्ध करून द्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सिल्लोडचे गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांना दिले आहेत. यामुळे घरकुल मंजूर झाले, पण बांधकामासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांचा प्रश्न सुटला आहे. याचा लाभ ४७० बेघरांना तातडीने होणार आहे.

पंतप्रधान घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजनेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना या चार गावातील शासकीय गायरान जमीन उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड, तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी मंजूर घरकुल सार्वजनिक प्रकल्पासाठी जमीन प्रदान करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केली होती. त्यानुसार, काही अटी व शर्थींवर गायरान जमीन देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ग्रामीण गृह प्रकल्पाअंतर्गत गायरान जमीन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आठ गावांचे प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी चार गावांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. एका गावातील किमान दहा जणांना ग्रामीण गृह प्रकल्प योनजेतून जागा देता येते. घर बांधण्यासाठी जागा नसलेल्या पण, प्रस्ताप मंजूर असलेल्या, प्रतीक्षा यादीतील लाभार्थींनी ग्रामपंचायतीकडे जागेची मागणी करावी, सर्वाचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना दिले आहेत, अशी माहिती दाभाडे यांनी दिली.

तालुक्यात २०१६ ते २०१८पर्यंत पंतप्रधान घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजनेतून १४७८ प्रस्ताव मंजुर झाले होते. यापैकी १००८ घरांची कामे पूर्ण झाली. मात्र जागा नसल्याने ४७० लाभार्थींना योजनांचा लाभ घेणे अशक्य झाले होते.

\Bयोजनेसाठी मंजूर जागा \B

मोढा: गट क्रमांक ११६ मध्ये ४३०५.५६४ चौरस फूट जागा

गट क्रमांक ११४ मध्ये ६४५८.३४६ चौरस फूट

पालोद: गट क्रमांक १२४ मध्ये १२००० चौरस फूट

उंडणगाव: गट क्रमांक ३८३ मध्ये ४०० चौरस फूट जागा

गट क्रमांक ४३५ मध्ये २८०० चौरस फूट

डोंगरगाव: गट क्रमांक ३१३ मध्ये १२००

गट क्रमांक ४७२ मध्ये २८००

एकूण ३७ हजार १६३.९१ चौरस फूट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images