Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र देणारे आपण कोणः आदित्य ठाकरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोणी सरकारच्या विरोधात बोलले ते सरकारच्या विरोधात आहेत. त्यांना राष्ट्रविरोधी कसे म्हणता येईल, राष्ट्रवादाचं प्रमाणपत्र देणारे आपण कोण, असा प्रश्न युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज उपस्थित करत केंद्र सरकारला टोला लगावला.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहर बससेवा व सिवरेज ट्रिटमेंट प्लांटच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, उपमहापौर विजय औताडे, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची प्रमुख उपस्थिती होती.

महापौर नंदकुमार घोडेले यांचे भाषण सुरू असताना नमाजासाठी अजान सुरू होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांना भाषण थांबविण्याच्या सूचना केल्या. त्याला अनुरसरून एमआयएमचे आमदार इम्तीयाज जलील यांनी भाषणात आदित्य यांचे कौतुक केले. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. मात्र, आम्ही कोणाला राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र देणे अयोग्य आहे. सरकारला जरी प्रश्न विचारला तर तो सरकारच्या विरोधातील प्रश्न असतो, तो देशाच्या विरोधात नसतो. त्याचा प्रश्न देशाविरोधात नसतो सरकारविरोधी असतो. जे देशासाठी काम करत असतील, त्या सगळ्यांना पाठबळ देणे आपले काम आहे. अनेक दिवसानंतर युतीच्या एकत्रित कार्यक्रमाला येता आले, याबाबत आनंद वाटत असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विवाहितेला छेडछाड, आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विवाहापूर्वी व विवाहानंतरही छेडछाड केल्याच्या प्रकरणात आरोपी निलेश योसेफ बत्तीसे याला शनिवारी (२२ डिसेंबर) अटक करून रविवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पांडव यांनी दिले.

या प्रकरणी २१ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली होती. त्यानुसार, तरुणीची तिच्या विवाहापूर्वी मैत्रिणीमार्फत आरोपी निलेश योसेफ बत्तिसे (वय २३, रा. अंबेलो) याच्याशी ओळख झाली होती. ती संधी साधत फिर्यादीचा मोबाइल क्रमांक घेऊन 'तू मला आवडतेस, भेटायला ये' असे आरोपी तिला फोनवर वारंवार सांगत होता. लग्न ठरल्याचे सांगितल्यानंतर आणि लग्न झाल्यानंतरही आरोपी तिला वारंवार फोन करायचा. तसेच भेटायला न आल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली. त्याला रविवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश कोर्टाने दिले. सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिरातून दानपेटी लांबवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या संस्थान गणपती मंदिरातून चोरट्यांनी दानपेटी चोरून नेली. रविवारी पहाटे पावणेपाच वाजता राजाबाजार भागात हा प्रकार घडला. रिक्षातून आलेल्या दोन चोरट्यांनी अवघ्या ३० सेकंदात हा डाव साधला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा पडेगाव कासंबरी दर्गा भागातून जप्त केली आहे. चोर मात्र पसार झाले आहेत. या प्रकरणी सीटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजाबाजार भागात शहरातील मानाच्या संस्थान गणपतीचे मंदिर आहे. या मंदिराच्या आवारात स्टीलची दानपेटी ठेवण्यात आली आहे. रविवारी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास एक चोरटा मंदिराच्या बाहेर दाखल झाला. त्याने टेहाळणी करीत ग्रील पार करून आतमध्ये प्रवेश केला. तेवढ्यात एक ऑटोरिक्षा मंदिरासमोर येऊन थांबली. आतमधील चोरट्याने दानपेटी उचलत बाहेर आणली. बाहेरील चोरट्याने त्याला मदत करीत दानपेटी उचलून रिक्षापर्यंत नेली. यानंतर आतील चोरटा बाहेर आला. दानपेटी रिक्षात टाकून दोघांनी क्षणार्धात पलायन केले. सकाळी दर्शनासाठी आलेले भाविक रमेश घोडेले (वय ७२ रा. राजाबाजार) यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. या प्रकरणी घोडेले यांच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात अज्ञात दोन आरोपीविरुद्ध अंदाजे २५ हजार रुपये रक्कम असलेली स्टीलची दानपेटी चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याची माहिती मिळताच विश्वस्त प्रफुल्ल मालाणी, लक्ष्मीनारायण बाखरीये, रमेश घोडेले, राजेंद्र पिंपळे आदिंनी मंदिर गाठले. सिटी चौक पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे, गुन्हेशाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी देखील पथकासह संस्थान गणपती मंदिराला भेट दिली.

गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त

चोरट्यांनी केलेला चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या चित्रीकरणामध्ये रिक्षाचा क्रमांक तसेच त्या रिक्षाच्या मागे जाहिरातीसाठी लावलेले एका शाळेचे नाव देखील ठळकपणे दिसत आहे. पोलिसांनी या क्रमांकाआधारे रिक्षाच्या मालकाचा शोध घेतला. या रिक्षाचा मूळ मालक नूर मोहम्मद नावाची व्यक्ती आहे. नूर मोहम्मदने या रिक्षाची विक्री केल्यानंतर पुन्हा दोन वेळा तिची विक्री करण्यात आली आहे. सध्याच्या मालकाने चालकाला ही रिक्षा चालवायला दिली होती. रिक्षाचालकाने साथीदाराच्या मदतीने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या आरोपीने हा गुन्हा केल्यानंतर घर सोडले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

सुरक्षा व्यवस्थेला तडा

राजाबाजार संस्थान गणपती मंदिरासमोर कायमस्वरुपी पोलिसांचा फिक्स पॉइंट तैनात करण्यात आलेला आहे. तसेच या भागात नेहमीच पोलिसांच्या वाहनांची गस्ती पथक गस्त घालत असते. पहाटेपासून या भागात वर्दळ सुरू असते. या सर्व सुरक्षा व्यवस्थेला तडा देत चोरट्यांनी अवघ्या ३० सेकंदात डाव साधत चोरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्जेदार सुफियानाला रसिकांची दाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शास्त्रीय गायन, तबलावादन आणि सुफीयानाने युवा सरगम महोत्सवाचा दुसरा दिवस लक्षवेधी ठरला. सुफी गायनातून रवींद्र खोमणे व शास्त्रीय गायकीतून अमृता काळे यांनी रसिकांना खिळवून ठेवले. नावीन्यपूर्ण सादरीकरणाला विशेष दाद मिळाली.

पिनाक संगीत अकादमीच्या वतीने आयोजित युवा सरगम महोत्सवात रविवारी गायन आणि वादन रंगले. कलश मंगल कार्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ही मैफल झाली. सई बाराबोटे हिच्या तबलावादनाने मैफल सुरू झाली. सईने सोळा मात्रांचा तीन ताल सादर केला. उठाव, कायदे, रेले, गत, चक्रधार यांचा सुरेख वाद्याविष्कार तिने घडवला. सईच्या नादमाधुर्याला रसिकांनी विशेष दाद दिली. त्यानंतर अमृता काळे यांचे शास्त्रीय गायन झाले. 'मालकंस' राग उत्कटरित्या सादर करुन काळे यांनी मैफल रंगवली. रूपक तालात 'मोरे प्राण आधार' हा बडा ख्याल आणि तीन तालातील 'आज मोरे घर आये बालमा' ही बंदिश नजाकतीने गायली. तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर आणि हार्मोनियमवर उमेश पुरोहित यांनी साथसंगत केली. या मैफलीचा समारोप रवींद्र खोमणे यांच्या शास्त्रीय सुफियानाने झाला. 'इस शाने ए करम का क्या कहना' या सुफी गीताने रवींद्रने गायन सुरू केले. सरस सुफी गाणी सादर करुन मैफल उंचीवर नेली. कलाकारांचे स्वागत अरुण जोशी, अनुराधा जोशी, राधिका कुलकर्णी यांनी केले. सायली मुळे व सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले.

महोत्सवाचा आज समारोप

तीन दिवसीय युवा सरगम महोत्सवाचा सोमवारी समारोप होणार आहे. 'संगीतातील बदलते स्वरुप आणि व्यावसायिक दृष्टिकोन' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. पं. नाथराव नेरळकर, पं. शुभदा पराडकर आणि पं. विश्वनाथ ओक उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे, पेन्ट्रीचालकात पुन्हा संघर्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सचखंड एक्स्प्रेसमध्ये खाद्य पदार्थांचे अवाजवी दर आकारणाऱ्या पेन्ट्री चालकाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन सुरू आहे. नांदेड आणि परभणीहून रविवारी (२३ डिसेंबर) औरंगाबादला येणाऱ्या काही मनसे पदाधिकाऱ्यांनी खाद्य पदार्थांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी पेन्ट्री कार व्यवस्थापकाकडे तक्रार बुकची मागणी केली असता पेन्ट्री कार चालक व त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांनी मनसे विद्यार्थी सैनेच्या कार्यकर्त्यांना पेन्ट्री कारमध्ये कोंडून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याच आरोप आहे. रेल्वे तिकीट तपासणी अधिकाऱ्याने मध्यस्थी केल्याने हा वाद वाढला नाही. मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे स्टेशनवरील तक्रार बुकमध्ये या प्रकाराची नोंद केली आहे.

औरंगाबाद येथील बैठकीसाठी रविवारी मनविसेचे रूपेश सोनटक्के, उत्तम गंगाधर चव्हाण, शुभम टेहरे, अनिल बुचाली व अर्जुन टाक यांच्यासह अन्य पदाधिकारी सचखंड एक्स्प्रेसने येत होते. त्यापैकी काही जणांनी पेन्ट्री कार चालकाकडून पाण्याची बाटली घेतली, मात्र 'रेल नीर'ची अधिकृत बाटली न देता दुसऱ्या कंपनीचे पाणी देण्यात आले. त्याकरिता पैसेही जादा घेतल्याने तक्रार बुकमध्ये तक्रार नोंदविण्याबाबत आग्रह धरला. पण, कर्मचाऱ्याने तक्रार बुक संपल्याचे सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पेन्ट्री कारमध्ये जाऊन तक्रार बुकची मागणी केली. त्यावेळी तेथील दोन्ही बाजुचे दरवाजे लावून घेण्यात आले व २० ते २५ जण जमा झाले. यातील पेन्ट्रीच्या काही कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांच्या अंगावर गरम पाणी फेकले. तसेच काही भांडे घेऊन अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करत होते. तुम्हाला मारून टाकू, अशा धमक्याही पेन्ट्रीच्या कर्मचाऱ्यांनी दिल्याचा आरोप आहे. या परिस्थितीत रेल्वे तिकीट तपासणीसाने मध्यस्थी करून पाच कार्यकर्त्यांची सुटका केली, असा दावा अर्जुन टाक यांनी केला. ही घटना परतूर ते सेलू दरम्यान घडली.

रेल्वेतील कार्यकर्त्यांकडून याची माहिती मिळाल्यानंतर औरंगाबादचे पदाधिकारी औरंगाबाद स्टेशनवर सचखंड एक्स्प्रेसच्यावेळी हजर झाले. रेल्वे येताच परभणीचे सचिन पाटील, बालाजी मुंढे, औरंगाबादचे सुमित खांबेकर यांच्यासह इतर सचखंड एक्स्प्रेसमध्ये घुसले. त्यांच्यापैकी काही जणांनी पेन्ट्री कारच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पण, लोहमार्ग पोलिसांनी धाव घेतल्याने अनर्थ टळला. या कार्यकर्त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे रितसर तक्रार नोंदवली आहे. तसेच रेल्वे स्टेशनमध्ये प्रभारी रेल्वे स्थानक प्रमुख अशोक निकम यांच्या उपस्थितीत तक्रार नोंदविण्यात आली. या प्रकरणी पेन्ट्री चालकांकडून मनसे कार्यकर्त्यांविरोधात तक्रार नोंदविण्याची शक्यता लोहमार्ग पोलिसांनी वर्तविली आहे.

………

\Bसात दिवसांची मुदत \B

तक्रार बुकमधील नोंद व लोहमार्ग पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी. मराठीतून दरपत्रक, नियमानुसार खाद्य पदार्थांची विक्री करावी, अन्यथा सात दिवसानंतर नांदेड येथे आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतरही दखल न घेतल्यास प्रवाशांना लुटणाऱ्या पेन्ट्री चालकांना मराठवाड्यातील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर चोप देणार आहे, असा इशारा परभणीचे शहराध्यक्ष सचिन पाटील आणि औरंगाबादचे अध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिला आहे.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर बसचे दीडशे बस थांबे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर बस सेवेत अद्याप बस येण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहरात जवळपास दीडशे जागी ही बस थांबणार आहे. वाढती गरज लक्षात घेता त्याचे मार्ग कोणते असतील याबाबतही नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, याबाबत प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

प्रशासकीय अडचणी लक्षात घेत नवीन वर्षातील पहिल्या महिन्यात काही बस शहरातील रस्त्यावर धावू शकणार आहेत. बस सेवा सुरू होणार त्यावेळी बस थांबे कोठे उभारायचे यावरही काम सुरू आहे. त्यासाठीची तयारी सुरू असून दीडशेपेक्षा अधिक बस थांबे विविध भागांमध्ये असणार आहेत. त्याचे स्थळ निश्चित झाले असून लवकरच हे बस थांबे उभारण्याचे काम सुरू होणार आहे. हे बस थांबे अत्याधुनिक स्वरुपाचे असणार आहेत. ज्यामध्ये बस कोठे आहे इथपासून थांब्यावर कोणती बस किती वाजता पोहचेल, याबाबतची माहिती नागरिकांना मिळेल. या बसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने बसवर नियंत्रण कक्षात बसूनही नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे. बसमध्ये सीसीटीव्ही, वॉकीटॉकी, डिजिटल बोर्ड, प्रदूषणमुक्त प्रणाली आहे. 'जीपीआरएस' सिस्टीम असल्याने काही अडचण आली तर बसमधील हेल्पचे बटन दाबल्यास त्याचा संदेश जवळच्या पोलिस स्टेशनला जातो. ज्यामुळे तत्काळ मदतही शक्य असल्याचे सांगण्यात येते. यासह बस कोठे आहे, कोणत्या वेगाने धावते आहे याबाबतही नियंत्रण कक्षाला कळते.

\Bसुरुवातीला २५ बस धावणार

\Bस्मार्ट सिटी अंतर्गत शहरात शंभर बस धावणार असल्यातरी पहिल्या टप्प्यात २५ बस धावण्याचेच नियोजन करण्यात आले आहे. एसटी विभागाकडे बस सेवेचे नियंत्रण असणार आहे. त्यासाठी पंचवीस मार्ग निश्चित करण्यात आले असून, त्या मार्गाचा अभ्यास करून पुढील नियोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या बसला प्रतिसाद किती मिळतो, मार्ग कोणकोणते असू शकतात याचा अभ्यास करून त्यानंतर इतर मार्गावर इतर बस सेवा सुरू करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन डिझेल शहर बसला हद्दपार करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

डिझेल रिक्षांमुळे शहराचे प्रदूषण वाढत आहे, असे कारण सांगून शहरातील डिझेल रिक्षा शहराबाहेर काढण्यात आल्या होत्या. आता नवीन १०० सिटीबसने प्रदूषणाची पातळी अधिक वाढण्याची शक्यता आहे. नवीन डिझेलच्या शहर बसलाही हद्दपार करा, या मागणीसाठी रिक्षा संघटनेच्या वतीने कोर्टात धाव घेण्याचा निर्णय रिक्षा चालकांच्या बैठकीत घेण्यात आला.

रविवारी (२३ डिसेंबर) शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते एकीकडे शहर बसचे उद्घाटन केले जात होते. तर दुसरीकडे शहर बस सेवा सुरू झाल्यामुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम होणार असल्याच्या भीतीने सुभेदारी विश्रामगृहाच्या हिरवळीवर शहरातील विविध रिक्षा चालक संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत निसार अहेमद, अज्जु भाई, कैलास शिंदे, रमाकांत जोशी, इम्रान पठाण, मिलिंद मगरे, एम. डी. फारूख, मोहम्मद बशीर, शेख लतीफ, राजेश मारगुडे, बिसन लोधे, भगवान नागरे यांच्यासह अन्य संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

या बैठकीत रिक्षा स्टॅण्ड देण्याबाबतच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. याबैठकीत काँग्रेस शहर अध्यक्ष माजी आमदार नामदेव पवार आणि काँग्रेस प्रवक्ते पवन डोंगरे यांनीची उपस्थिती होती.

स्मार्ट सिटीअंतर्गत निधी देण्यात आला आहे. हा निधी डिझेल गाड्यांवर खर्च करण्यात येत आहे. या जागी सीएनजीच्या बस स्मार्ट सिटीसाठी घेण्याची गरज होती. मात्र, संबंधितांनी डिझेल गाड्यांवर हा निधी खर्च केला आहे. या विरोधात रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिक्षा स्टॅण्डचा विषय मार्गी लावा

शहर बस सेवा सुरू होणार आहे. यासाठी नवीन स्टॅण्ड तयार करण्यात येणार आहेत. काही ठिकाणी रिक्षा स्टॅण्ड हटवून बस स्टॅण्ड बांधले जातील. यामुळे रिक्षा चालक आणि सिटीबस यांच्या संघर्ष होण्याची शक्यता आहे. यामुळे बस स्टॅण्ड तयार करीत असताना रिक्षा स्टॅण्डचा विषय मार्गी लावा. यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह शहर पोलिस आयुक्त, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला जाणार असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणासाठी निवडणुकीत दबाव वाढवावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राजकीय व सामाजिक इच्छाशक्ती असेल तरच मुस्लिम आरक्षण मिळणे शक्य आहे. त्यासाठी मुस्लिम आमदार, मुस्लिम सामाजिक नेते यांना एकत्र येवून येणाऱ्या निवडणुकीत राजकीय पक्षांवर दबाव वाढवावा लागेल. निवडणूक जवळ आली की, मतांसाठी राजकीय पक्षांचे नेते आरक्षणावर बोलतात नंतर मुद्दा मागे पडतो. यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे,' असे मत आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केले.

मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे महाराष्ट्र मुस्लिम महासंघाच्या वतीने मुस्लिम आरक्षण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महासंघाचे अध्यक्ष वाजीद अयूब जहागीरदार, सलीम पटेल, मराठा मुस्लिम आरक्षण अभ्यासक राजेंद्र दाते पाटील, बाळासाहेब जराळ, सचिन मिसाळ, प्रा. ज़कीऊद्दीन, अॅड. शेख अनिस, सुदर्शन धांडे, महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष जिशान मुकीम देशमुख आदी उपस्थित होते. आमदार मेटे म्हणाले की, २०१३मध्ये आघाडीचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मराठा समाजाला १८ टक्के, मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पण ते आरक्षण दुर्देवाने न्यायालयात टिकले नाही. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागासवर्गीय आयोग स्थापन करून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकेल अशी अपेक्षा आहे. मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत खांद्याला खांदा लावून शिवसंग्राम पक्ष उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दाऊद आझाद यांनी केले. राजेंद्र दाते पाटील यांनी कायदेशीररित्या आरक्षण कसे मिळू शकते? या विषयावर मार्गदर्शन केले. पत्रकारितेचे विद्यार्थी अब्दुल्ला मोहम्मदी यांनी आरक्षणाची गरज, या विषयावर विचार मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विदेशी सिगारेटचा अवैध साठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विकण्यासाठी अवैधरित्या विदेशी सिगारेट बाळगणाऱ्या छावणी येथील नासेर पान सेंटरवर छावणी पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली. या छाप्यामध्ये अवैध विदेशी सिगारेटचा तीन लाख ३६ हजारांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी दिपेश जितेंद्र गुप्ता (वय २६ रा. बोरीवली पश्चिम, मुंबई) यांनी तक्रार दाखल केली. गुप्ता हे वुई केअर फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे सदस्य आहे. त्यांची संस्था ही कॅन्सर विरोधात जनजागृतीचे काम करते. शहरातील छावणी परिसरात अवैधरित्या विदेशी सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती गुप्ता यांना मिळाली होती. गुप्ता यांनी त्यांच्या संस्थेचे फिल्ड ऑफिसर कुणाल खरात यांच्यासह छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांची भेट घेत त्यांना ही माहिती दिली. यानंतर पोलिसांच्या पथकासह छावणी नेहरू चौक येथील नासेर पान सेंटरवर छापा टाकला. यावेळी टपरीचालक अब्दुल नासेर अब्दुल शिकूर (वय ३६ रा. नेहरू चौक, छावणी) हजर होता. टपरीच्या वर असलेल्या खोलीची पोलिसांनी झडती घेतली. यावेळी त्यांना विदेशी सिगारेटचा मोठा साठा आढळून आला. यामध्ये विन, ब्लॅक, रुलरिव्हर, पॅरीस गुडन गरम आदी ब्रँडच्या सिगारेटचा समावेश असून एकूण तीन लाख ३६ हजाराचा हा माल आहे. हा माल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक पुरी हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट सोन देत ४० हजारांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट सोने खरे असल्याचे भासवत एक किलो सोने स्वस्तात देतो, असे आमिष दाखवून एका तरुणाची ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार गुरूवारी दुपारी दीड वाजता सिडको एन ६, चिश्तिया कॉलनी रोडवर घडला. या प्रकरणी दोन अनोळखी आरोपींविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी विक्की संजय त्रिभुवन (वय २५, रा. समतानगर, मोंढा, गंगापूर) याने तक्रार दाखल केली. विक्की हा तेथील एका कपड्याच्या दुकानात नोकर आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास तो दुकानात असताना दोन अनोळखी तरूण त्याच्या दुकानात आले. या दोघांनी त्याच्याशी बोलणे वाढवत विश्वास संपादन केला. यानंतर या दोघांनी त्यांच्याजवळ खरे सोने असून ते स्वस्तात विकण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला विक्कीने यासाठी घेतले, परंतु या आरोपींनी त्याला गळ घातली. सोन्यासारख्या दिसणाऱ्या धातूची माळ दाखवत हे खरे सोने असल्याचे त्यांनी भासवले. एक किलो वजनाची माळ त्यांनी ४० हजार रुपयांत विक्कीला विक्री केली. त्याच्याकडून ४० हजार रुपये रोख आणि त्याचा मोबाइल घेऊन आरोपी पसार झाले. विक्कीने या माळेची नंतर सोनाराकडे तपासणी केली असता ती बनावट सोन्याची असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी शनिवारी सिडको पोलिस ठाणे गाठत विक्कीने आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक पाचोळे हे तपास करत आहेत.

असे आहे आरोपींचे वर्णन

या दोन आरोपीपैकी एकाचे वय अंदाजे २८ वर्षाचे असून उंची पाच फुट पाच इंच आहे. रंग काळा सावळा असून केस लांब अंगात लाल रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पँट आहे. दुसऱ्या अनोळखी आरोपीचे वय अंदाजे ३२ वर्ष असून उंची पाच फुट, अंगात गुलाबी रंगाचा चेक्सचा शर्ट आणि साधी पँट घातलेली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाला रफिक ‘महाराष्ट्र केसरी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

बुलढाण्याच्या बाला रफिक शेखने गतविजेत्या 'महाराष्ट्र केसरी' पुण्याच्या अभिजित कटकेला ११-३ असे सहज नमवीत 'महाराष्ट्र केसरी' किताब पटाकावला. बाला रफिक प्रथमच विजेता ठरला आहे.

आझाद मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने बाला रफिक शेखने महाराष्ट्र केसरी बहुमान पटाकावला. गादी विभागातील विजेता अभिजित कटके व माती विभागातील विजेता बाला रफिक शेख यांच्यातील महाराष्ट्र केसरी किताबाची झुंज काट्याची होईल, असे वाटत होते. परंतु, बुलढाण्याच्या बाला रफिकने प्रारंभापासून विविध डावपेचांनी अभिजित कटकेची कोंडी केली. कुस्तीला सुरवात होताच अभिजितने रफिकला उचलून फेकत एक गुणांची कमाई केली होती. त्यानंतर मात्र, बाला रफिकने निविर्वाद वर्चस्व गाजवले. बाला रफिकने एकेरी पट, दुहेरी पट, ढाक या डावांचा अवलंब करुन अभिजितला निष्प्रभ केले. मध्यंतराला रफिक ३-१ असा आघाडीवर होता. मध्यंतरानंतर रफिकने अभिजितला आक्रमणाची एकही संधी मिळू दिली नाही. एकेरी पटाचा सुरेख अवलंब करुन रफिकने एका पाठोपाठ गुण घेत अभिजितला ११-३ असे सहज पराभूत केले. अखेरच्या काही सेकंदात अभिजित काही किमया करील असा होरा होता. परंतु, बाला रफिकच्या आक्रमणासमोर अभिजितचे डावपेच फिके पडले. अखेरच्या दहा सेकंदात अभिजितने कुस्ती सोडल्याचेच चित्र दिसत होते. बलदंड शरीरयष्टी असलेल्या बाला रफिकसमोर अभिजितने सपशेल हार पत्करली. बाला रफिकच्या रुपाने महाराष्ट्राला नवा महाराष्ट्र केसरी विजेता मिळाला. अभिजित हा मॅटवरील 'दादा' कुस्तीपटू असला तरी माती विभागातील मातब्बर बाला रफिकसमोर त्याचे सर्व डावपेच फिके पडले. बाला रफिकने पुण्यातील हनुमान आखाड्यात कुस्तीचे धडे गिरवले आहेत.

माती विभागात ९२ किलो वजन गटात नांदेडच्या अनिल जाधवने मुंबईच्या सुहास गोडगेला पराभूत करुन सुवर्णपदक जिंकले. गादी विभागात पुण्याच्या अक्षय भोसलेने कोल्हापूरच्या सिकंदर शेखला नमवून ९२ किलो वजन गटात सुवर्णपदक पटाकावले.

या प्रसंगी विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे यांच्या हस्ते बाला रफिक शेखला महाराष्ट्र किताबाची मानाची गदा प्रदान करण्यात आली. या प्रसंगी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार राजेश टोपे, संतोष साबळे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे, प्राचार्य डॉ. दयानंद भक्त, आत्मानंद भक्त, डॉ. भागवत कटारे, संग्राम मोहळ, गणेश मोहळ, अनिल मोहळ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस थांब्याला रेल्वेची बगल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस थांबा द्या, या गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला रेल्वे बोर्डाकडून बगल देण्यात येत आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे व्यवस्थापक विनोद कुमार यादव यांनी आश्वासन देऊनही हा विषय अजूनही प्रलंबित असल्याचे आता माहिती अधिकारातून विचारलेल्या प्रश्नातून समोर आले आहे. याबद्दल रेल्वे संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावरून दररोज दोन ते तीन हजार प्रवासी या नांदेड आणि मनमाडकडे जातात. येथे एक्स्प्रेस रेल्वे थांबविल्यास सिडको, मुकुंदवाडी, चिकलठाणा, गजानन महाराज मंदिर परिसर, सेव्हन हिल्स्, एपीआय कॉर्नरसह सिडकोकडे राहणाऱ्या प्रवाशांना मुकुंदवाडीहून थेट मुंबई किंवा नांदेडला जाता येणार आहे. प्रवाशांची हीच गरज लक्षात घेऊन रेल्वे संघटनांनी मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस रेल्वे थांबा देण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोद कुमार यादव यांनी औरंगाबादला भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रायोगिक तत्वावर मुकुंदवाडी स्थानकावर एक्स्प्रेस थांबा देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. याबाबत रेल्वे विभागाला माहितीच्या अधिकारात एक्स्प्रेस थांब्याबाबत विचारले. तेव्हा मुकुंदवाडी, लासूर आणि रोटेगाव येथे एक्स्प्रेस थांबा देण्याचा विषय रेल्वे बोर्डाकडे प्रलंबित असल्याचे लेखी उत्तर देण्यात आले आहे. यामुळे हा विषय पुन्हा बासनात गुंडाळला जाणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.

एकीकडे रेल्वे महाव्यवस्थापक प्रायोगिक तत्वावर एक्स्प्रेस रेल्वे थांबा देण्याची सूचना करतात. दुसरीकडे रेल्वे विभाग पुन्हा एकदा औरंगाबादच्या प्रस्तावाबाबत रेल्वे बोर्डाकडे बोट दाखवत आहे. या उत्तरावरून दक्षिण मध्य रेल्वे विभाग औरंगाबादच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करित असल्याचे चित्र यातून स्पष्ट होत आहे.

- ओमप्रकाश वर्मा, मराठवाडा रेल्वे विकास समिती

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेलफेअर पार्टी पाच जागा लढविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

आगामी निवडणुकीत वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया पक्ष पाच राज्यात पाच जागांवर उमेदवार उभे करणार आहे. ही माहिती वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. इलियास यांनी पत्रकार परिषदेत दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून रोखणे हा आमचा प्रमुख अजेंडा असेल, असे यावेळी सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेत पक्षाचे अब्दुल रऊफ, शेख आकेफ, प्रदेशाध्यक्ष सलीम शेख, आम आदमी पक्षाचे ब्रिगेडीअर सुधीर सावंत, शेख जाहेद, अब्दुल हाई कादरी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. इलियास यांनी सांगितले की, सत्ताधारी केंद्र सरकारच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे भाजपाला सत्तेतून बाहेर करण्यासाठी तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्याचे काम दिल्लीमध्ये होत आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांची मते फुटू नये यासाठी वेलफेअर पार्टी आफ इंडियाने कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यात लोकसभेची प्रत्येकी एक जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय फक्त लोकसभेसाठी मर्यादित असून आगामी विधानसभांच्या निवडणुकांमध्ये वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया पक्ष मजबुतीने उभे राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

………

मैत्रीमुळे सोबत …

वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया सोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याने आम्ही सोबत आहोत. आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभरात तयारी पूर्ण केली आहे. राज्यातील लोकसभेच्या सर्वच जागांवर उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून किती उमेदवार उभे करावेत, याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑफलाइन’चा पीक विमा मिळेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

२०१७च्या खरीप हंगामात साइट विस्कळीत झाल्याने ऑफलाइन मागवण्यात आलेल्या शेतकरी अर्जदारांना अद्याप पीक विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही संख्या तब्बल १२ हजार ८३९ आहे. कृषी विभागाने सदर या अर्जांबद्दल कानावर हात ठेवले आहेत.

२०१७मध्ये खरीप हंगामात ऑनलाइन पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना चार महिन्यांपूर्वी विम्याची रक्कम मिळाली. त्यावेळी अर्ज भरण्याच्या शेवटे तीन दिवस साइट अचानक बंद झाली होती. कृषी विभागाने उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी ऑफलाइन अर्ज भरून तालुका कृषी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यात संबंधित शेतकऱ्यांकडून पीक विमा हप्ता घेतलेला नव्हता. पीक विमा हप्ता केव्हा भरायचा याचा आदेश काही दिवसांनी कळवला जाईल, असे निर्देश कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिले होते. काही दिवसांनी शेतकऱ्यांना कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सदर पीक विमा रक्कम मंजूर झाल्यानंतर मिळणाऱ्या रक्कमेतून विमा हप्ता कापून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना अदा केली जाईल. मात्र, दुसरे वर्ष उलटत आले तरी या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी कृषी कार्यालयात खेट्या घालत आहेत. त्यांना तुमच्या खात्यावर विमा रक्कम जमा होईल, असे कृषी विभागाकडून आतापर्यंत देण्यात येत होती. आता शेतकरी कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरत असल्याने कृषी अधिकाऱ्यांकडून उलटसुलट उत्तरे मिळत आहेत.

\Bविमा रकमेपासून वंचित राहणार का? \B

ऑनलाइन व ऑफलाइनच्या गोंधळात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. साइट बंद झाल्याने शेतकऱ्यांकडून ऑफलाइन अर्ज भरून घेतले मात्र, शेतकऱ्यांची तयारी असतानाही विमा हप्ता भरून घेतला नाही. विमा हप्ता वजा करून क्लेम अदा केला जाईल, असे फर्मान सोडण्यात आल्याची चर्चा होती. परंतु, आता त्यावेळचे 'फर्मान' चर्चेचा विषय ठरला आहे. ऑनलाइन, ऑफलाइनच्या गोंधळात शेतकरी विमा रकमेपासून वंचित राहणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मागील वर्षी ऑनलाइन अर्ज भरताना तांत्रिक अडचणीमुळे काही तुरळक शेतकऱ्यांना अर्ज भरता आले नाहीत. अर्ज भरणाच्या मुदतीच्या शेवटचे तीन दिवस साइट बंद झाल्याने ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता घेतलेला नाही. अशा शेतकऱ्यांची यादी शासनाला पाठवलेली आहे. त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे काम माझे नसून वरिष्ठ स्तरावर व शासनाचे आहे.

-टी. एस. मोटे, जिल्हा कृषी अधीक्षक

\Bऑफलाइन अर्ज केलेले तालुकानिहाय शेतकरी \B

तालुका शेतकरी

औरंगाबाद ११४१

पैठण २१७८

फुलंब्री १४३८

वैजापूर १०७८

गंगापूर २६११

खुलताबाद ८९७

सिल्लोड २०२७

कन्नड १३७७

सोयगाव ९२

\Bएकूण १२,८३९\B

...

\B७५ लाख ९९ हजार ३२६ रुपये

विमा हप्ता (भरलेला नाही)

....

७ कोटी २९ लाख ८७ हजार ७७७ रुपये

क्लेम रक्कम \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंडस्ट्रियल कॉरिडॉरने देश गिळंकृत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शेतीप्रधान देशात शेती टिकेल की नाही हा प्रश्न आहे. इंडस्ट्रियल कॉरिडॉर देशाला गिळंकृत करत असून, देशातील शेती कशी वाचवावी हा आज मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेती वाचवण्यासाठी राजकारणासह इतर घटकांनीही प्रयत्न करावेत,' असे आवाहन नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी रविवारी केले.

अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा अमृतमहोत्सव गौरव कार्यक्रम समितीच्या वतिने 'भारतातील शेती, पर्यावरण व परिवर्तनाच्या चळवळीसमोरील आजची आव्हाने' या विषयावर आयोजित परिसंवादात पाटकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमजीएमचे अंकुशराव कदम होते. यावेळी व्यासपीठावर मार्क लिंडले, डॉ. मारुती तेगमपुरे, डॉ. रेखा शेळके, किशोर ढमाले यांची उपस्थिती होती. यावेळी पाटकर म्हणाल्या, 'आज देशभरात शेती, पर्यावरण हे कळीचे प्रश्न आहेत. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांतील सत्ताबदलातही शेतकऱ्यांचे योगदान आहे. निसर्गावर जगणारे सर्वच शेतकरी आहेत. आज मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या सर्व आत्महत्यांना विषमताच जबाबदार आहे. आज शेती म्हणजे घाटे का सौदा म्हणतात. त्यामुळे भूसंपादनाची कीड लागणार ही परिस्थिती आहे. भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये एकरी मूल्य देण्यात येते. ही रक्कम कोण नाकारणार असे म्हणत 'समृद्धी' जमिनीचा घास घेत आहे,' असा आरोपही पाटकर यांनी केला. यावेळी प्रा. देसडा म्हणाले की, 'आज जगासमोर विषमता, विसंवाद आणि विघ्वंस या मोठ्या समस्या आहेत. माणूस आणि माणुसकी वाचवणे हे आव्हान निर्माण झाले आहे.' यावेळी मार्क लिंडले यांनीही आपले मत मांडले. भाषणानंतर मेधा पाटकर तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा. एच.एम. देसरडा यांचा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमासाठी आमदार सुभाष झांबड, सुनिधी धारवाडकर, प्रा. विजय दिवाण यांच्यासह शहरातील नागरीकांची उपस्थिती होती.

\Bदेशातील संस्थांची पडझड

\B'आज देशातील आरबीआय, सीबीआयसह इतर संस्थांची पडझड झाली आहे. विद्यापीठापासून ते न्यायपालिकेपर्यंत वातावरण बदलत चालले आहे. न्यायधीशांना पत्रकार परिषद घ्यावी लागत असल्याची परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. देशात शहरी गरिबांपासून ते शेतमजूरांपर्यंतच्या प्रश्नांना हात घालणे हे आव्हान आहे,' असेही पाटकर म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाइप खरेदीत चार लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाइप खरेदीच्या व्यवहारात एक जोडप्याची तीन लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सहा जुलै २०१६ ते १८ मे २०१७ या कालावधीत सिडको एन ६ बजरंग चौक येथील युनियन बँकेच्या शाखेत घडला. या प्रकरणी सांगली येथील उद्योजकाविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. या महिलेने व तिच्या पतीने सांगली येथील श्रीनिवास इंडस्ट्रीज संजिवनी पाइपचे मालक श्रीनिवास मालू यांच्यासोबत एचडीपी पाइपसंच खरेदी करण्याबाबत व्यवहार केला होता. या व्यवहारापोटी त्यांनी कंपनीला चार वेळा वेगवेगळ्या टप्प्यात तीन लाख ९७ हजार ६३३ रुपये दिले होते. हा सर्व व्यवहार पती व पत्नीच्या संयुक्त बँक खात्यातून आरोपीच्या खात्यात आरटीजीएसद्वारे रक्कम जमा करून करण्यात आला होता. ही रक्कम जमा केल्यानंतर वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही मालू यांनी एचडीपी पाइपचा संच पुरवला नाही, तसेच रक्कम देखील परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर या महिलेने संशयित आरोपी श्रीनिवास मालू, श्रीनिवास इंडस्ट्रीज, रजि. ऑफिस राहुल टॉवर्स, पहिला मजला, मिरज-सांगली रोड, सांगली याच्या विरुद्ध फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहायक फौजदार अधाने हे तपास करीत आहेत.

\Bअशी दिली रक्कम\B

-६ जुलै २०१६ - ४७ हजार १४५

- १५ नोव्हेंबर २०१६ -७३ हजार १४३

- २७ जानेवारी २०१७ - ६० हजार ३४५

- १८ मे २०१७ - २ लाख १७ हजार

(आरोपीच्या खात्यात आरटीजीएसद्वारे जमा केलेली रक्कम)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खैरे अद्यापही नगरसेवकाच्याच भूमिकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर बससेवेच्या लोकार्पण सोहळ्यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शिवेसनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत खासदार चंद्रकांत खैरे यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. खासदार खैरे हे अद्यापही नगरसेवकाच्याच भूमिकेतच आहेत. खैरे यांनी खासदारच्या भूमिकेत जाऊन काम करावे, असा उपरोधिक सल्ला बागडे यांनी दिला. जमिनी विकून पैसे खाल्याचा आरोप खासदार खैरे यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यावर बागडे यांनी खैरे यांना शिवसेनेच्याच व्यासपीठावर सुनावले.

स्मार्ट सिटी योजनेतून शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. क्रांतीचौकातील कार्यक्रमासाठी व्यासपीठावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, उपमहापौर विजय औताडे यांची प्रमुख उपस्थिती होती. हरिभाऊ बागडे आपल्या भाषणात खासदार खैरे यांच्यावर भडकले. ते म्हणाले, 'महापालिकेला राज्य आणि केंद्र सरकारने मिळून अडीचशे ते पावणे तीनशे कोटी रुपये दिले, परंतु त्यांना अद्यापही खर्च करता आले नाहीत. स्मार्ट सिटीत २० टक्के निधी महापालिकेला द्यायचा होता, तोही पालिकेला देता आला नाही. हा निधीही राज्य सरकारने भरला. खैरे, आपण बरेच वर्ष खासदार आहात. आमदार, मंत्री राहिलात, आपण माहिती न घेता बोलता. परवा आपण राजाबाजारात गेला आणि बाजार समिती प्लॉटमधील पैशातील काही हिस्सा बागडे यांना दिल्याचे सांगितले. ही माहिती जर खरी असेल तर माझ्याविरुद्ध कोर्टात जा, मी परवानगी देतो. ऐकीव माहितीच्या आधारावर नवीन नगरसेवकही बोलणार नाही तसे तुम्ही बोललात. आपण अद्यापही नगरसेवकाच्या भूमिकेत आहात. खैरे साहेब खासदाराच्या भूमिकेतही या. तुम्ही फुलंब्रीत म्हणालात, कन्नड आणि वैजापुरात बागडे जॅकेट घालून फिरतात. लोकांनी बोलावले तर जावे लागते खैरे साहेब. शहराचे १८०० कोटींचे बजेट आहे. मात्र, एप्रिलपासून आजपर्यंत पालिकेची वसुली किती तर केवळ १८ टक्के. १९८९ पासून बाजार समितीचा डीपी प्लॅन प्रलंबित आहे. पालिकेने बाजार समितीला ९ कोटी कर लावला. बाजार समितीचा सगळा विकास त्यामुळे थांबला होता. आयुक्तांनी हिशोब केला, कायद्याचा अभ्यास केला तर २८ लाखांचा कर असल्याचे सांगितले. त्यानंतर विकासाची प्रक्रिया सुरू होऊ शकली. अद्याप शहराचा डीपी प्लॅनही तयार नाही. अनेक नवीन वसाहती झाल्या. मात्र, केवळ डीपी प्लॅन मंजूर नसल्याने त्यांना सोयी सुविधा देता येत नाहीत. त्यामुळे आदित्यजी तुम्ही यांना सांगितले पाहिजे, ते आपले नागरिक आहेत. नागरिकांना सर्व प्रकारच्या सोयी पुरविणे पालिकेची जबाबदारी आहे. शहराचा विकास आरखडा तयार करा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे टेंडरसुद्धा महापालिकेला काढता आले नाही, असेही बागडे यांनी खैरेंना सुनावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्रियांना कायद्याचे ज्ञान आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

'आत्मनिर्भरतेने जागता यावे म्हणून निर्माण केलेल्या कायद्याचे ज्ञान मुली, स्त्रियांनी अवगत करणे गरजेचे आहे,' असे प्रतिपादन अॅड. रुख्मन घोडे यांनी केले. भराडी येथील श्री सरस्वती भुवन प्रशालेत महिलांविषयक कायदे या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेतील महिला तक्रार निवारण समितीमार्फत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुभाष साळवे हे होते. यावेळी व्यासपीठावर अॅड. सविता आहेर, उपमुख्याध्यापक अशोक भारती, पर्यवेक्षक मारुती पाटील, रेखा सोनुने यांची उपस्थिती होती. अॅड. घोडे म्हणाल्या की, माणसाने बुद्धीच्या साह्याने प्रचंड भौतिक प्रगती करूनही त्याचा स्त्रीविषयक दृष्टीकोन बदलला नाही. घोडे यांनी भारतीय कायद्याची निर्मिती, विनयभंग, नोकरीच्या ठिकाणचा लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, विवाहितांवरील अत्याचार, समाजात पदोपदी येणारा अश्लील अनुभव, हुंडाबळी, स्त्रियांची चौकशी करताना अधिकाऱ्यांनी पाळाव्याची पथ्ये, स्त्रियांना अटक करतानाची नियमावली, घटस्फोटीत स्त्रियांना संपत्तीत असलेले अधिकार, बलात्कारी आरोपींना होणारी जन्मठेप व फाशीची शिक्षा आदींची सविस्तर माहिती दिली. महिला सुरक्षा अॅपची माहिती देऊन ते हाताळण्याचे कौशल्य श्रीमती आहेर यांनी स्पस्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा पावरा यांनी केले, तर कमल सोनोवणे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूलच्या पथकावर वाळू तस्करांचा हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

तालुक्यातील देवळी शिवारातील शिवना नदीच्या पात्रात सुरू असलेला बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांसह परिसरातील १०० ते १२५ जणांच्या जमावाने दगडांनी हल्ला केला. या घटनेत नायब तहसीलदार रमेश भालेराव यांच्यासह तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी लाखनी मांडकी शिवारातील शिवना नदीच्या पात्रात घडली.

शिवना नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. ही तस्करी थांबवण्यासाठी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी तातडीने शिवना नदी पात्राकडे धाव घेतली. पथक घटनास्थळी पोचले त्यावेळी चार ते पाच ट्रकमध्ये वाळू भरण्यात येत होती. पण कर्मचाऱ्यांना काही समजण्याच्या आतच तस्कारांनी व परिसरातील १०० ते १२५ लोकांच्या जमावाने दगडगोट्यांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. यात नायब तहसीलदार भालेराव, तलाठी म्हस्के, लिपिक जाधव व सचिन गायकवाड हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या कर्मचाऱ्यांच्या हातावर आणि डोक्यावर दगडांचा वर्षाव झाला. त्यांच्या नाकातोंडातून रक्त येत होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेबद्दल रात्री उशिरा देवगांव पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे काम सुरू होते.

\Bनायब तहसीलदारांसह चार कर्मचारी जखमी \B

गंभीर अवस्थेत नायब तहसीलदार भालेराव याना अघोदर लासूर व इतर तीन कर्मचाऱ्यांना देवगांव रंगारी येथे प्राथमिक उपचार करून वैजापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुंडा घेणाऱ्याशी लग्न न करण्याची घ्या शपथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अजूनही हुंडा देण्या-घेण्याची प्रथा-परंपरा काही थांबलेली नसून, अगदी उघड-उघड किंवा लपून-छपून का होईना हुंडा घेतला जातोच. त्यामुळे मी हुंडा घेणाऱ्याशी लग्न करणार नाही, अशी शपथ जोपर्यंत मुली घेणार नाहीत आणि तशी मानसिकता समाजामध्ये तयार होणार नाही, तोपर्यंत समाजाला लागलेली ही कीड काही जाणार नाही, असा सूर वंजारी समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त झाला.

वंजारी समाजाचा सर्वशाखीय वधू-वर परिचय मेळावा रविवारी (२३ डिसेंबर) जयभवानीनगर चौकातील कृष्णराज मंगल कार्यालयात झाला. या वेळी मान्यवरांमधून हुंडाविरोधी सूर उमटला. या प्रसंगी माजी कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे, निवृत्त न्यायाधीश मारुती कांगणे, वंजारी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वनाथराव घुगे, जय भगवान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, प्राचार्य डी. एन. केंद्रे, डॉ. उज्ज्वला दहिफळे, कार्यकर्ते गोपीनाथ वाघ, मनसे जिल्हाध्यक्ष (जालना) गजानन गिते, गोपीनाथराव वाघ, डॉ. संभाजी मुंडे आदींच्या उपस्थितीत मेळाव्याचे उद्घाटन झाले. कार्यक्रमात सानप म्हणाले, 'हुंडा घेतल्याशिवाय अजूनही लग्न लागत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे समाजाविषयी आपुलकीही राहिलेली नाही, असेही ते म्हणाले. हुंडा घेणाऱ्यांवर समाजानेच आता आर्थिक बंधने घातली पाहिजेत, असे मत वाघ यांनी नोंदविले. कुटुंबसंस्था टिकण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांचा शेवटपर्यंत विश्वास टिकवणे गरजेचे आहे, याचा भावी पती-पत्नीने विचार करावा, असे डॉ. घुगे म्हणाले. तर, हुंडा ही समाजाला लागलेली कीड आहे, असे डॉ. दहिफळे म्हणाल्या. त्याचवेळी, हुंडा घेणाऱ्याशी मी लग्न करणार नाही, अशी शपथ घेतल्याशिवाय ही वाईट प्रथा थांबणार नाही, असे मत कांगणे यांनी नोंदविले. विश्वनाथ घुगे यांनीही अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन केले.

मुलींना जाऊ द्या पुढे

मुलींना शिकवा, पुढे जाऊ द्या, स्वावलंबी होऊ द्या. स्वालंबन व शिक्षणाला आजच्या काळात अनन्यसाधारण महत्व आहे. मुलींनी शारीरिक-मानसिकदृष्ट्या कणखर व भावनिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच संयम, समन्वय व नियंत्रणशिवाय कुठलेही घर टिकू शकणार नाही, समृद्ध होऊ शकणार नाही, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना आपला अनुभव शेअर केला पाहिजे व मुलांनीही पालकांच्या अनुभवातून शिकले पाहिजे. त्याचवेळी आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर प्राधान्यक्रम ठरवावा लागतो, हेही लक्षात घ्या, अशा शब्दांत डॉ. दहिफळे यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images