Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विभागीय मंडळाच्या अध्यक्षपदी गोसावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी शरद गोसावी यांच्याकडे देण्यात आली आहे. तत्कालीन अध्यक्ष रमेश गिरी सोमवारी सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. गोसावी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार असणार आहे.

औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदाची जबाबदारी गिरी यांच्याकडे १७ सप्टेंबर २०१८पासून आली होती. त्यांच्याकडे रत्नागिरी विभागाचाही पदभार होता. गिरी हे सोमवारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे विभागीय अध्यक्षपदावर नवीन नियुक्ती केली जाणार की, सचिव सुगदा पुन्ने यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला जाणार याची चर्चा होती. मंडळाने सायंकाळी शरद गोसावी यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. अमरावती विभागीय मंडळाचे अध्यक्ष असलेल्या गोसावी यांच्याकडे औरंगाबादचाही पदभार असणार आहे. औरंगाबाद विभागासह राज्यातील नऊ विभागांमध्येही पूर्णवेळ विभागीय अध्यक्ष नसून अनेकांकडे दोन-दोन विभागांचा कार्यभार आहे. पूर्णवेळी अध्यक्ष, सचिवांची नेमणूक करावी अशी मागणी वारंवार होते. मात्र, मंडळाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गिरी यांचा अपवाद वगळता औरंगाबादमध्येही दोन वर्षापासून पूर्णवेळ विभागीय अध्यक्ष मिळाले नाही. त्यात सेवानिवृत्तीचे चार महिने असताना पदभार देण्यात आला. प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने फेब्रुवारी-मार्चमधील येऊ घातलेल्या परीक्षांचे नियोजन अडचणीचे ठरू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विभागीय अध्यक्ष गिरी यांचा सेवागौरव

$
0
0

विद्यार्थी केंद्रीत व्यवस्था हवी - उपसंचालक खांडके

गिरी सेवानिवृत्त सोहळ्याला शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रीत व्हावे अन् शिक्षण मंडळासारख्या विभागात काम करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याचे भान ठेवायला हवे, असे मत शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांनी व्यक्त केले. विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रमेश गिरी यांच्या सेवागौरव सोहळ्यात ते बोलत होते.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष आर. बी. गिरी सोमवारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सेवागौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भानुदासराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला व्यासपीठावर नाशिकचे विभागीय मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटिल, विभागीय सचिव सुगता पुन्ने, विद्या प्राधिकरणचे संचालक सुभाष कांबळे, शिक्षणाधिकारी एस. पी. जयस्वाल, शिक्षण मंडळाचे प्रभारी सहसचिव विजय जोशी, माजी प्राचार्य डॉ. पी. आर. गायकवाड, डी. एस. कलकोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. रमेश गिरी यांचा विविध संघटना, संस्था, शिक्षकांनी सत्कार केला. यावेळी खांडके म्हणाले, शिक्षक पदापासून ते विविध पदावर काम करत असताना आपल्या जबाबदारीचे भान ठेवण्याची गरज असते. यावेळी उपस्थितांनी आपल्या भाषणात शिक्षकपदापासून सुरुवात केलेल्या गिरी यांच्या शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षपदापर्यंत कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. त्यांचा शिक्षण क्षेत्रातिल प्रवास उल्लेखनीय आहे. सहकार्याची भावना ठेऊन शासकीय सेवेत काम केल्याचे उपस्थितांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना गिरी म्हणाले, स्वातंत्र सैनिकाचा मुलगा असल्याने संस्कारांची शिदोरी घरातून मिळाली. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम केले. अतिशय खडतर परिस्थितीतून या पदापर्यंत पोहचलो. वडिलांची इच्छा होती की, मुलाने अधिकारी व्हावे अतिशय खडतर परिस्थितून वडिलांचे स्वप्न साकार केले यांचा आनंद आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोज पाटील, विलास पाटील, युनूस पटेल, मनोहर सुरगडे, नामदेव सोनवणे, वाल्मिक सुरासे, विजय द्वारकुंडे, आसाराम शेळके, प्रदीप पवार, महेश पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक मनोज पाटील तर सूत्रसंचालन प्रविण लोहाडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोख पोलीस बंदोबस्तात नववर्षाचे स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बोचरी थंडी, एकमेकांना स्वागतासाठी उठणारे हात, हॅपी न्यू इयरची साद आणि कडक पोलिस बंदोबस्त...महत्त्वाच्या प्रत्येक चौकात वाहनधारकांची तपासणी...मद्यपींवर रात्री उशिरापर्यंत दाखल होणारे गुन्हे...पहाटे पाचपर्यंत बीअर बारला परवानगी असताना पोलिसांनी तरुणाईंना केलेला अटकाव...थर्टी फर्स्टच्या मध्यरात्रीनंतर फसफसणारा उत्साह...हेच चित्र होते नवर्षाच्या स्वागताचे...

शहरात सोमवारी रात्री नववर्षाच्या स्वागताच्या बंदोबस्तासाठी तब्बल तीन हजार पोलिस रस्त्यावर होते. हर्सूल, जालना नाका, बीड नाका, पैठण रोड नाका, दौलताबाद टी पॉइंट आणि वाळूज नाका मार्गावर चेकपोस्ट लावण्यात आले होते. शहरात ६५ ठिकाणी फिक्स पॉइंट तैनात करण्यात आले होते. महत्त्वाच्या चौकात रात्री दहानंतर ब्रीथ अॅनालायझरच्या मदतीने वाहनधारकांची तपासणी करण्यात येत होती. ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिमेअंतर्गत मद्यपी वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. नववर्ष साजरे करण्यासाठी शहरातील निराला बाजार, कॅनाट प्लेस भागात तरुणाईने गर्दी केली होती. रात्री अकरानंतर शहरातील सर्व प्रमुख मार्गावर पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त दिसून आला. वेगाने दुचाकी चालवणाऱ्या वाहनधारकांची पोलिसांकडून समजूत घालण्यात येत होती.

मार्ग केला मोकळा

मध्यरात्री बारा वाजेनंतर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर तरुणांची गर्दी झाली. क्रांतीचौक, मोंढा नाका, सेव्हन हिल्स् आणि सिडको बसस्टँड जवळील उड्डाणपुलावर हौशी तरुणांनी फोटोसेशनसाठी गर्दी केली. पोलिसांनी ही गर्दी पुलावरून पिटाळून लावत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएच. डी. याद्यांची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पीएच. डी. गुणवत्ता याद्यांचा घोळ संपवून सुधारित याद्या तयार करण्याची जबाबदारी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांवर सोपवली आहे. दोन दिवसांपासून पीएच. डी. गाइडची संख्या आणि रिक्त जागांचा आढावा घेण्यात येत आहे. नवीन यादीनुसार संशोधक विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. याद्या जाहीर करण्यास उशीर झाल्यामुळे संशोधक विद्यार्थी विद्यापीठात गर्दी करीत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पीएच. डी. अंतिम याद्यांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. नवीन गाइड आणि रिक्त जागांचा आढावा न घेता अंतिम याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. या यादीत मोजक्याच संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी याद्यांवर आक्षेप घेत प्रशासनाला जाब विचारला होता. विशेषत: सामाजिकशास्त्रांच्या यादीत सर्वाधिक गोंधळ झाल्यानंतर अभ्यास मंडळ अध्यक्षांनी निवेदन देऊन सुधारित यादी लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार आढावा घेण्याचे काम अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व विभागप्रमुख करीत आहेत. दोन दिवसांत अनेक विषयांचे काम पूर्ण झाले आहे. सुधारित यादी लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही असे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी सांगितले. अडीच वर्षांपूर्वी प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) होऊनही प्रक्रिया रखडली आहे. 'आरआरसी'नंतर चार महिन्यांपासून विद्यार्थी अंतिम गुणवत्ता यादीची वाट पाहत आहेत. विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विषयांची यादी जाहीर झाली आहे. सामाजिकशास्त्रे विषयांच्या गुणवत्ता यादीत गोंधळ होता. नवीन सुधारित यादीनुसार इतिहास विषयाच्या सात जागांवरून १२२ जागा जाहीर होणार आहेत. राज्यशास्त्र विषयाच्या १५ जागा जाहीर झाल्या होत्या. या जागात भर पडून संख्या ७२ झाली आहे. विज्ञान शाखेसाठी नवीन ५७ गाइड दिले आहेत. या जागा वाढणे अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ख्रिश्चन महासंघाचे धरणे आंदोलन

$
0
0

औरंगाबाद :

कोल्हापूरातील चंदगड तालुक्यात ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थनावेळी काही बुरखाधारी लोकांनी ख्रिस्ती धर्मगुरू व समाज बांधवावर चाकू, कोयता, लोखंडी रॉड व बिअरच्या बाटल्या याचा वापर करून प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेत सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेच्या निषेधार्थ अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सोमवारी (३१ डिसेंबर) क्रांतीचौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात ख्रिश्चन महासंघाचे अॅड. डॅनियल ताकवाले, नितीन गायकवाड, पास्टर्स अण्ड लीडर फेलोशिपचे अध्यक्ष प्रविण बोरगे, संजय गझले, हनोख देवकाते, गंगेश आघम, जेम्स अंबिलढगे राजु शिंदे, अनिल खरात, सतीश डोंगरदिवे, विनय नोहा यांची उपस्थिती होती.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या वर्षात विद्यापीठाची दोन कौशल्य विकास केंद्रे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जालना येथील नियोजित कौशल्य विकास केंद्र जून महिन्यात कार्यान्वित होणार आहे. अंबाजोगाई येथे दुसरे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने बीड जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तालाही मान्यता मिळण्याची शक्यता असून, जानेवारी महिन्यात विद्यापीठ आणि कौशल्य विकास मंत्रालयात सामंजस्य करार होणार आहे.

व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास मंत्रालय राज्यभरात कौशल्य विकास केंद्र सुरू करीत आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात जालना येथे कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहे. या केंद्राला एकूण ७५ कोटी रुपये निधी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. नियोजित केंद्राच्या बांधकामाला परवानगी मिळाली असून, या आठवड्यात बांधकाम सुरू होणार आहे. पाच महिन्यांत गतीने काम पूर्ण करून जून महिन्यात कौशल्य विकास केंद्र कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. दुसरे केंद्र अंबाजोगाई येथे सुरू करण्याचे नियोजन आहे. या केंद्रासाठी २५ एकर जमीन देण्यात यावी, अशी मागणी विद्यापीठ प्रशासनाने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. केंद्राचा उपयोग कसा करणार, अशी विचारणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत प्रशासनाने सविस्तर माहिती पाठवली आहे. अभ्यासक्रम, उद्दिष्टे आणि संभाव्य संधींची माहिती देण्यात आली. या प्रस्तावाला तत्वत: मान्यता मिळाली असून, २०१९ मध्ये अंबाजोगाईतही कौशल्य विकास केंद्र सुरू होणे अपेक्षित आहे.

दरम्यान, कौशल्य विकास मंत्रालयाने विद्यापीठ प्रशासनाला सामंजस्य करारासाठी निमंत्रित केले आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करार होणार आहे. विभागाचे सचिव नरेंद्र सिंग यांनी प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्याशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. मराठवाड्यात रोजगाराभिमुख शिक्षणासाठी कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून पाऊल उचलण्यात आले आहे.

\Bजालन्याला मुख्यमंत्री येणार

\Bजालना येथील कौशल्य विकास केंद्र जून महिन्यात सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. या नियोजित कार्यक्रमासाठी पैठणचे संतपीठ आणि कौशल्य विकास केंद्र लवकर पूर्ण करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. या दोन शैक्षणिक केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे.

जालना येथील कौशल्य विकास केंद्राची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बांधकामासाठी आर्किटेक्चर निश्चित केले असून, लवकरच इमारत पूर्ण होईल. जून महिन्यात अभ्यासक्रम सुरू होणार आहे.

- डॉ. अशोक तेजनकर, प्र-कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचा कचरा सिडकोच्या कार्यालयात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन सात भागातील कार्यालयाचा वापर महापालिकेने चक्क कचरा जमा करण्यासाठी केला आहे. त्यामुळे ही जागा परत घेण्याच्या हालचाली सिडकोने सुरू केल्या आहेत.

सिडकोने आपल्या सोयी सुविधांचे हस्तांतरण केले. तेव्हा सिडकोवासियांना जवळपासच कार्यालयाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आपल्याकडील कार्यालयही दिले. हे कार्यालय काही वर्ष सुरू ठेवण्यात आले. या ठिकाणी मालमत्ता करापासून ते अन्य सुविधांबाबतची कामे सुरुवातीला केली जात होती. मात्र सिडको वॉर्ड कार्यालय सिडको मुख्यालयाच्या बाजूच्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले. सध्या एन सात येथील कार्यालयात पाणी पुरवठ्याचे कार्यालय सुरू आहे. या कार्यालयातील अर्धा भाग अजूनही सिडकोकडे असून अर्धा भाग महापालिकेला देण्यात आला आहे. आता महापालिकेने या ठिकाणी सिडको भागात जमा होणारा कचरा आणून टाकला आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

\Bसिडको जागा परत घेणार

\Bसिडकोच्या कार्यालयात कचरा टाकल्याचे समजल्याने सिडको प्रशासन संतप्त झाले आहे. त्यांनी हे कार्यालय परत घेण्याची तयारी सुरू केली आहे. तसे पत्र महापालिकेला देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. काहीच दिवसांमध्ये शहरात कचरा कोंडी निर्माण होण्याला एक वर्ष पूर्ण होईल. तरीही पालिका प्रशासन हा प्रश्न सोडवू शकले नाही. याबाबत नागरिकांमध्येही संताप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कम्युनिटी पोलिसिंगमुळे २३ बेरोजगारांना मिळाला रोजगार

$
0
0

vijay.deulgaonkar@timesgroup.com

Tweet : @vijaydeulMT

औरंगाबाद : तरुणांनी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे न वळू देता त्यांचे पुर्नवर्सन करण्याचा प्रयत्न शहर पोलिस दल कम्युनिटी पोलिसिंगअंतर्गत करीत आहेत. या उपक्रमातून २३ बेरोजगारांना विविध कंपन्यांमध्ये पोलिसांमार्फत रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे; तसेच सव्वाशे तरुणांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी कौशल्यभिमुख प्रशिक्षण सध्या देण्यात आहे. शहर पोलिस दल आणि धवल क्रांती फाउंडेशनतर्फे हा उपक्रम सुरू आहे.

शहरातील आंबेडकरनगर, मिसारवाडी, नारेगाव, वडगाव कोल्हाटी यासारख्या अनेक भाग पोलिसांच्या लेखी गुन्हेगारांची वसाहत म्हणून ओळखल्या जातात. अनेक वेळा इच्छा नसताना देखील या भागातील तरुण संगतीमुळे गुन्हेगारीकडे प्रवृत्त होतात. यामध्ये बेरोजगार तरुणांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. या तरुणांना रोजगार उपलब्ध करून त्यांचे पुर्नवसन केल्यास वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी कम्युनिटी पोलिसिंगअंतर्गत या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ठरवले. धवलक्रांती फाउंडेशनच्या मदतीने हा उपक्रम सध्या सुरू आहे. या उपक्रमांतर्गत सध्या २३ बेरोजगारांना पोलिसांच्या मदतीमुळे रोजगार मिळाला आहे. यापैकी व्हॅरॉक कंपनीत सात तरुणांना; तसेच सॅमसंग, नॅचरल कुलर या कंपनीमध्ये १४ तरुणांना रोजगार मिळाला आहे. कंपनीमध्ये विविध विभागांत ही दहावी, बारावी उत्तीर्ण तरुण समाधानकारक वेतनावर काम करीत आहेत. शहरी भागातच नव्हे, तर सिल्लोड येथील आकाश सिड्स कंपनीमध्ये दोन तरुणांना शहर पोलिसांच्या मदतीने रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

\Bकौशल्यभिमुख प्रशिक्षणाला प्रवेश

\Bबेरोजगार तरुणांना रोजगारासोबत स्वंयरोजगार सुरू करता यावा, यासाठी देखील कम्युनिटी पोलिसिंगअंतर्गत प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी या तरुणांना स्वयंरोजगाराचे कौशल्यभिमुख अभ्यासक्रम शिकवण्यात येत आहेत. सिपेट संस्थेमध्ये सध्या ४८ तरुण विविध प्रशिक्षण घेत असून, इंडो जर्मन टूल रुम कंपनीत देखील ७६ तरुण प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या आवडीच्या कोर्सचे प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र मिळणार असून, त्यांना स्वंयरोजगार सुरू करून स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत होणार आहे. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, अविनाश जोशी, धवल क्रांतीचे डॉ. किशोर उढाण, स्वप्नील विटेकर आदी या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.

पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कम्युनिटी पोलिसिंगअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तरुण वर्गाशी सुसंवाद वाढत असून, पोलिस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात सलोखा निर्माण होत आहे. या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत असून, यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे.

- घनश्याम सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस आयुक्तालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिनी घाटीत पहिली सिझेरियन शस्त्रक्रिया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा परिसरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात अर्थात मिनी घाटीमध्ये मंगळवारी (एक जानेवारी) पहिल्यांदाच सिझेरियन शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेद्वारे मुलीचा जन्म झाल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यांत रुग्णालयामध्ये विविध विभाग सुरू झाले असून रुग्णांवर उपचार होत आहेत. काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात प्रसूती विभागही सुरू झाला आहे. काही वैद्यकीय कारणांमुळे मंगळवारी रुग्णालयात दाखल गर्भवती महिलेची सिझिरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. प्रसुतीसाठी प्रसुती विभागातील डॉ. अपर्णा रंजलकर, डॉ. सुनीला लाळे, डॉ. संजय चव्हाण, डॉ. नागरे, शस्त्रक्रियागारातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीर्ण इमारतींचे पाडकाम; आठ लाखांची कमाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विभाग नियंत्रक कार्यालयाच्या शेजारी असलेल्या इमारतींसह मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील जीर्ण इमारत पाडण्यासाठी एस. टी. महामंडळाने निविदा प्रक्रिया राबविली. या निविदेत सहभागी झालेल्या कंत्राटदाराने इमारत पाडण्याकरिता आठ लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली आहे. येत्या १५ दिवसांत या जीर्ण इमारती पाडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

एस. टी. महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयाशेजारी एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी इमारती बांधण्यात आल्या आहेत. तसेच मध्यवर्ती बस स्थानकाजवळ दोन इमारती आहेत. याशिवाय रेल्वे स्टेशन येथे इमारती आहे. या इमारती जीर्ण झाल्याचा अहवाल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आला होता. या अहवालानंतर या इमारतीमधील कर्मचाऱ्यांना घरे रिकामे करण्याची प्रक्रिया चालली होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी विभागीय अभियंता संजय नालमवार यांनी इमारत पाडण्याबद्दल निविदा जाहीर केली होती.

या इमारतीची निविदा २६ डिसेंबर रोजी उघडण्यात आली. तीन कंत्राटदारांनी निविदा भरली होती. एकाने साडे पाच लाख रुपये, दुसऱ्याने सात लाख, तर तिसऱ्याने आठ लाख रुपये इमारत तोडून जमीनदोस्त करण्यासाठी बोली लावली. सर्वाधिक बोली लावणाऱ्या आठ लाख रुपये देण्यास तयार असलेल्या कंत्राटदारास कंत्राट देण्यात आले आहे.

………

\Bसागवानाची दारे \B

एस. टी. महामंडळाच्या जीर्ण इमारती पाडणाऱ्या कंत्राटदाराला यातून सागवानची दारे व इतर भंगार सामान मिळणार आहे. दारे व इतर सामान कंत्राटदाराला देण्याचा करार करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायद्याची मोडतोड करणाऱ्यांवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माथाडी कायद्याची मोडतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी मराठवाडा लेबर युनियनतर्फे सोमवारी येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.

माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान व्हावी, यासाठी १९६९ मध्ये माथाडी कायदा तयार करण्यात आला. कायद्यामुळे अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळाला पण, आजही कायद्याचे संरक्षण शेकडो माथाड्यांना अद्याप मिळाले नाही. असंघटित असलेल्या माथाडी कामगारांच्या कल्याणसाठी, सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी असलेल्या माथाडी कायदा धाब्यावर बसविला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष लोमटे यांनी केला. कायद्याचा आग्रह धरण्यासाठी सातत्याने संघर्ष का करावा लागतो, असा सवाल याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी केला. कायद्याचा आग्रह धरला तर कंपनी व्यवस्थापन कामगारांना कामावरून काढून टाकते, असा आरोपही करत त्यांनी माथाडी कायद्याची मोडतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी केली. बेकायदेशीरपणे कामावरून काढलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घ्या, सर्व थकबाकी वसूल करा, मजुरीची, लेव्हीची झालेली लूट वसूल करा यासह अन्य मागण्या या‌वेळी करण्यात आल्या. कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, माथाडी कायद्याची सर्वत्र काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत माथाडी कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालय परिसर दणाणून सोडला होता.

दरम्यान, लोमटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंड‌ळाने उपायुक्त शैलेद्र पोळ यांची भेट घेत त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. कायद्याच्या चौकटीतील सर्व प्रश्न जर माथाडी मंडळाने सोडविले नाहीत तर रस्त्यावरील आंदोसलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा लोमटे यांनी दिला. युनियनचे सरचिटणीस देविदास कीर्तीशाही, प्रविण सरकटे, जगन भोजणे, संजय पाटील, देवचंद आल्हाट, कैलास लोखंडे, शेख रफिक, कमलेश शेजुळ, शिवाजी राऊत, गणेश म्हस्के, गजानन इंगळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज वापर चक्क शून्य युनिट!

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरणाच्या औरंगाबाद परिमंडळात ऑक्टोबर महिन्यात ४० हजार ग्राहकांचा विजेचा वापर चक्क शून्य युनिट असल्याची माहिती समोर आली आहे. यात औरंगाबाद शहरातील ग्राहकांची संख्या १७ हजारांवर असल्याची माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद परिमंडळात साडेसात लाख वीज ग्राहक आहेत. या वीज ग्राहकांना केंद्रीय पद्धतीने बिले दिली जातात आहे. या बिलामध्ये ग्राहकांच्या वीज वापराबाबत विशेष लक्ष केंद्रीय पद्धतीने ठेवण्यात येत आहे. याचा अहवाल दर महिन्याला पाठविण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्यात महावितरण मुख्यालयाचे पाठविलेल्या माहितीत विभागात ४० हजार २२८ वीज ग्राहकांचा वीज युनिट वापर शून्य असल्याचे म्हटले आहे. विभागात एक ते ३० युनिट वीज वापर करणारे ग्राहक एर लाख ८५ हजार ५३९ ग्राहक आहेत. महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळात ऑक्टोबर महिन्यात ४० हजार २२८ ग्राहकांचा वीजवापर शून्य युनिट असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे वीज चोरीचे प्रमाण वाढत असल्याची शंका महावितरण अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

……

\Bशून्य युनिट वीजवापर असलेले ग्राहक\B

औरंगाबाद शहर १ : ७९२२

औरंगाबाद शहर २ : १०००६

औरंगाबाद ग्रामीण १ : ४७४०

औरंगाबाद ग्रामीण २ : ३९०२

कन्नड : ४१८४

जालना १ : ५५६३

जालना २ : ३९११

……

\Bएक ते ३० युनिट वीजवापर करणारे ग्राहक\B

औरंगाबाद शहर १ : १३०३०

औरंगाबाद शहर २ : १३४१२

औरंगाबाद ग्रामीण १ : ३१०००

औरंगाबाद ग्रामीण २ : २९३८६

कन्नड : ५४१९६

जालना १ : ३४७१०

जालना २ : ९८०५

……

\Bसहा वीज ग्राहकांवर गुन्हे\B

शहरात वीज चोरी पकडण्यासाठी मोहीम सुरू आहे. याअंतर्गत वीज चोरांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. छावणी पोलिस ठाण्यात वीज चोरीच्या चार विविध प्रकरणांत पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पडेगाव, गणेश नगर येथील मिलिंद भीवसन शेजवळ, भीवसन रघुनाथ शेजवळ, मिटमिटा भागातील विनायल शेलकर चापटकती, भाऊसाहेब शिंदे , भीमनगर भावसिंगपुरा येथील रमेश सांडुजी वाघमारे, भीमनगरमधील अनिल भिकाजी घुळे या सहा जणांवर विजेची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

………

हा वीजवापर प्रत्यक्षात आहे की नाही, याची पडताळणी करण्याचे आदेश औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सर्व विभाग कार्यालयांना दिले आहेत. येत्या पाच दिवसांत या सर्व ग्राहकांची तपासणी सर्वोच्च प्राधान्याने करावी. या कामात हयगय केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहेत.

- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, औरंगाबाद परिमंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीची छेड, मारहाण; आरोपीला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील १२ वर्षीय मुलीची छेड काढत तिला मारहाण करणारा आरोपी प्रमोद संतोषराव हिवाळे याला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी ठोठावली. प्रकरणातील सर्व चार साक्षीदार फितूर झालेले असतानाही, पुराव्याआधारे व भादंवि ३२३ कलमान्वये आरोपीला ही शिक्षा ठोठावण्यात आली, हे विशेष.

या प्रकरणी १२ वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १८ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी फिर्यादीची सहावीमध्ये शिकणारी पीडित मुलगी घराजवळच्या किराणा दुकानात तांदुळ आणण्यासाठी गेली होती. मात्र थोड्या वेळात फिर्यादीच्या रडणाऱ्या मुलीला परिसरातील एक महिला फिर्यादीच्या घरी घेऊन आली. फिर्यादीने मुलीला विश्वासात घेऊन कारण विचारले असता, आरोपी प्रमोद संतोषराव हिवाळे (३२) याने मागून येऊन त्याने मुलीची शारिरिक छेड काढली व त्याच्यापासून पळण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला मारहाण केल्याचे मुलीने फिर्यादीला सांगितले. या प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात भादंवि ३५४, ३२३ व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) कलम १० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील कैलास पवार यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदविले. मात्र सर्व चार साक्षीदार फितूर झाले; तरीही पुराव्याआधारे व भादंवि ३२३ कलमान्वये आरोपीला सहा महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस कारावासाची शिक्षा कोर्टाने ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रोस्टर’साठी विद्यापीठाकडून अडवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्राध्यापकांच्या भरतीवरील बंदी उठविण्यात आली. मात्र, कॉलेजांमधील 'रोस्टर' अपडेट करण्याच्या प्रक्रियेच्या विलंबामुळे भरती प्रक्रिया रखडते आहे. प्रक्रियेला विलंब होत असल्याने संतापलेल्या नेट-सेटधारकांनी विद्यापीठात धाव घेतली.

शासनाने तीन नोव्हेंबर रोजी राज्यातील विद्यापीठ, कॉलेजांमधील रिक्त जागांपैकी ४० टक्के जागा भरतीला मंजुरी दिली. १२ डिसेंबरला संचालकांनी सहसंचालक कार्यालयांना पत्र पाठवित प्रक्रियेच्या सूचना दिल्या. शासननिर्णयानंतर एक महिना पत्राकरिता लागला. त्यात आता विद्यापीठ, आयुक्त कार्यालयस्तरावर प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे नवीन वर्ष उजाडले तरी, प्रक्रियेला गती आलेली नाही. रिक्त जागांसाठीची प्रक्रिया लांबत असल्याने प्रत्यक्ष कधी जागा भरल्या जाव्यात, असा प्रश्न नेट-सेट, पीएच. डी.धारकांना पडला आहे. रिक्त जागांसाठी कॉलेजांना विद्यापीठाकडून रोस्टर तपासणी करून ते अपडेट करून घ्यावे लागते. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयातूनही अशीच प्रक्रिया होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्तरावर अशा प्रकारच्या प्रस्तावास प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याने प्रक्रिया मंदावल्याचा आरोप करत नेट-सेट, पीए. डी.धारकांनी मंगळवारी प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांची भेट घेत प्रक्रिया गतीमान करण्याची मागणी केली. याबाबत निवेदनही देण्यात आले. यावेळी डॉ. संदीप पाथ्रीकर, प्रा. हनुमान भोसले, डॉ. दत्तात्रय पानसरे, प्रा. श्रीराम फरताडे, डॉ. प्रवीणकुमार डोळे, प्रा. सुभाष जोगदंड, प्रा. राजू गाढे, प्रा. गोविंद खाडप, डॉ. धम्मज्योत गायकवाड, प्रा. राजू वानखेडे, प्रा. संदीप खंदारे, प्रा. शरद खंदारे यांची उपस्थिती होती.

शासनाच्या निर्णयानुसार शासनाने ४० टक्के प्राध्यापकांच्या पदभरतीला मान्यता दिली आहे. मात्र, प्रक्रियेला गती आलेली नाही. विद्यापीठ स्तरावरून महाविद्यालयीन रोस्टर अपडेट तपासणीला वेळ होतो. त्यामुळे पुढच्या प्रक्रियेलाही विलंब होतो. त्यामुळे आम्ही प्र-कुलगुरूंची भेट घेत या प्रश्नावर चर्चा करत त्यांनी लक्ष द्यावे अशी विनंती केली.

-डॉ. संदीप पाथ्रीकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नरहर कुरूंदकर व्याख्यानमालेचे आयोजन

$
0
0

औरंगाबाद: डॉ. इं. भा. पाठक महिला कॉलेजमध्ये पाच जानेवारी रोजी नरहर कुरूंदर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. कॉलेजच्या सभागृहात दुपारी १२ वाजता व्याख्यानमालेला सुरुवात होणार आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन नांदेड येथील प्रतिभा निकेतन, डॉ. जीवन पिंपळवाडकर, श्यामल पत्की यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 'नरहर कुरूंदकर यांचे मराठी साहित्य क्षेत्रातील योगदान व कार्य'यावर उपस्थित मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. वसुधा पुरोहित, डॉ. मीनाक्षी देव, डॉ. प्रेमला मुखेडकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्नीला दिला धोका; मेहुण्याने बेदम चोपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पत्नीला माहेरी सोडून प्रेयसीसोबत घरोबा करणारा रिक्षाचालक शोएब खान याला बेदम मारहाण करणारा आरोपी मेहुणा जुबेर खान जहीन खान याच्या पोलिस कोठडीमध्ये शुक्रवारपर्यंत (चार जानेवारी) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिले.

या प्रकरणी शोएब खान (वय २७, रा. मिसारवाडी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरून जुबेर खान जहीन खान, अब्दुल्ला खालीद जहीर खान उर्फâ कल्लू खालीद चाऊस, हुसेन चाऊस व एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन जुबेर खान यास अटक करण्यात आली होती. त्याला कोर्टात हजर केले असता, कोर्टाने आरोपीला मंगळवारपर्यंत (एक जानेवारी) पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला मंगळवारी हजर केले असता, आरोपी जुबेर खान याने पोलिस कोठडीदरम्यान तपासामध्ये सहकार्य केले नाही. तसेच त्याच्या साथीदारांचाही शोध घेणे बाकी असल्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये शुक्रवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खिडकी गँगच्या दोघांची रवानगी पोलिस कोठडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडकोतील घरफोडीप्रकरणात खिडकी गँगमधील शंकर तान्हाजी जाधव व बलवीर अमृत जाधव या बीडच्या आरोपींना अटक केल्यानंतर पोलिस कोठडीदरम्यान त्यांनी शहरात अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिल्यामुळे त्यांना मंगळवारी (१ जानेवारी) कोर्टात हजर केले असता, त्यांना गुरुवारपर्यंत (३ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिले.

या प्रकरणी प्रतिभा अशोक पवार (रा. सावरकर, सिडको) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी ही ३० ऑक्टोबर २०१८ रोजी आपल्या घरामध्ये कुटुंबासह झोपली असता, चोरट्यांनी बेडरुमच्या खिडकीला लावण्यात आलेली लोखंडी जाळी तोडून आत प्रवेश केला. तसेच लोखंडी कपटातून रोख ३ हजार ५०० रुपये, कानातील टॉप्स, वेल, अंगठी, डोरले, सोन्याचे मणी, गंठण, अंगठी, चांदीचा आकडा, जोडवे, गणपती मूर्ती, कंकवाचा करंडा असा १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार फिर्यादीने दिल्यावरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने बीड येथून खिडकी गँगच्या शंकर तान्हाजी जाधव (३५, रा. पाथरुड गल्ली, बीड) व बलवीर अमृत जाधव (३६, रा. माळीवेस, बीड) यांना अटक केली. पोलिस कोठडीदरम्यान त्यांनी शहरात घरफोड्या केल्याची कबुली दिली. तसेच दोघांच्या ताब्यातून १ लाख ६२ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. दोघांना मंगळवारी पोलिस कोठडीत हजर केले असता, आरोपी बाहेर जिल्ह्यातून येऊन शहरात घरफोडी करत होते. त्यामुळे त्यांचे शहरात कोणी साथीदार आहे का, याचा तपास करणे बाकी आहे. तसेच त्यांचा अन्य गुन्ह्यांसदंर्भातही तपास करावयाचा असल्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने दोघांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात उभारण्यात आलेल्या दोन गोदाम, मका संकलन केंद्र यासह अन्य विकास कामांचा लोकार्पण गुरुवारी (३ जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

जाधववाडी परिसरात बाजार समितीमार्फत शेतीनियमित माल वळविण्यासाठी मका संकलन केंद्र, १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे दोन शेतकरी गोदाम, होलसेल फूल मार्केट, फळे भाजीपाला मार्केट परिसरात प्रिकोटेड शेड आधी उभारण्यात आले आहे. भाजीपाला मार्केट परिसरात सिमेंट कॉक्रीटकरणाच्या रस्त्याचे कामही पूर्ण करण्यात आले असून या सर्व विकासकामाचा लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे व उप सभापती भागचंद ठोंबरे यांनी दिली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती आवारात दुपारी २ वाजता लोकार्पण सोहळा सुरू होईल. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार व पणन मंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, खासदार चंद्रकांत खैरे आदी उपस्थित असणार आहेत.

या कार्यक्रमात पिसादेवी रोडलगत तसेच फळे भाजीपाला मार्केट परिसरातील नियोजित कमर्शियल शॉपिंग सेंटर यासह विविध विकास कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती पठाडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९० हजारांचा गंडा, रवानगी हर्सूलमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट कागदपत्रांच्या आधारे गायरान जमीनीवरील प्लॉटची विक्री करुन ९० हजारांचा गंडा घालणारा आरोपी शेख फेरोज शेख कमरोद्दीन याची रवानगी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी मंगळवारी (१ जानेवारी) दिले.

या प्रकरणी कैलास नागोराव बनकर (३८, रा. आंबेडकर नगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ५ मार्च २०१८ रोजी फिर्यादी मित्रासह चिकलठाणा येथील गट क्रमांक २३१ मध्ये गेला होता. तिथे शेख फेरोज शेख कमरोद्दीन (४५, रा. किराडपुरा), शेख सालक मोहम्मद बवाजीर, शबाना शेख फारुक यांनी कमी किंमतीत प्लॉटची विक्री करत असल्याचे सांगून फिर्यादीला प्लॉट घेण्याचे आमीष दाखविले. त्यानंतर फिर्यादीने ११७, २८८ व २८९ क्रमांकाच्या प्लॉटचे आरोपींकडून खरेदी खत करुन घेत करारनामा केला. तसेच आरोपींनी फिर्यादीकडून ९० हजार रुपये घेऊन प्लॉटची नोटरी करुन दिली. काही दिवसांनी फिर्यादी प्लॉटची पाहणी करण्यासाठी गेला असता ती जमीन गायरान असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात पोलिसांनी आरोपीला २० डिसेंबर रोजी अटक करुन कोर्टात हजर केले असता, त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस बंदोबस्त घेतला, पैसे भरणे विसरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाटबंधारे विभागाकडून महापालिकेकडे थकबाकी भरण्यासाठी तगादा लावण्यात आला होता, आता या विभागाच्या पाठोपाठ पोलिस प्रशासनानेही पालिकेकडे तगादा लावला आहे. पोलिस बंदोबस्ताचे आठ कोटी ८२ लाख रुपये तत्काळ भरा, असे पत्र खुद्द पोलिस आयुक्तांनी महापौरांच्या नावे दिले आहे.

शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेतर्फे जायकवाडी धरणातून पाणी घेतले जाते. धरणातून पाणी घेण्यासाठी महापालिकेस पाटबंधारे विभागाला ठराविक शुल्क भरावे लागते. पालिकेने पाच वर्षांत शुल्क न भरल्यामुळे पाटबंधारे विभागाची महापालिकेकडे साडे दहा कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. थकबाकी न भरल्यामुळे पाटबंधारे विभागाने २७ डिसेंबर रोजी महापालिकेचा पाणीपुरवठा खंडित केला होता. त्यानंतर पालिकेने या विभागाकडे ५० लाख रुपये जमा केले.

पाटबंधारे विभागानंतर आता पोलिस प्रशासनाने थकबाकी भरण्याबद्दल महापालिकेला पत्र दिले आहे. खुद्द पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या नावे पत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अनधिकृत बांधकामांविरुद्ध काम करणाऱ्या पथकाच्या संरक्षणासाठी मार्च २०१८पर्यंत व्याजासह महापालिकेकडे आठ कोटी २९ लाख १५ हजार ७४८ रुपये एवढी थकबाकी आहे. थकबाकीची ही रक्कम एप्रिल २०१८पर्यंत आठ कोटी ८२ लाख २७ हजार २४१ एवढी झाली आहे, असे या पत्रातून लक्षात आणून देण्यात आले आहे.

\Bथकबाकी भरली तरच बंदोबस्त \B

जवळपास तीन वर्षांपासून महापालिकेने पोलिस बंदोबस्ताचे पैसे भरले नाहीत. त्यामुळे महालेखापालांनी सुद्धा आक्षेप घेतला आहे. थकबाकीची रक्कम तत्काळ भरा, म्हणजे पुढील आठवड्यात होणाऱ्या तपासणीच्या वेळी महालेखापालांनी काढलेल्या परिच्छेदाचे निवारण करता येईल, थकबाकीची रक्कम भरली तरच यापुढे महापालिकेस बंदोबस्तासाठी १३ पोलिस कर्मचारी देणे शक्य होईल, असे पोलिस आयुक्तांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images