Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मुलीशी अश्लिल चाळे; तीन वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शाळेत शिकवणीसाठी जाणाऱ्या १३ वर्षीय मुलीला शेताच्या बांधावर अडवून तिच्याशी अश्लिल चाळे करणारा गुलाब किसन गायकवाड याला तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी ठोठावली.

२६ ऑगस्ट २०१६ रोजी पीडित मुलगी सकाळी साडेआठच्या सुमारास शिकवणीसाठी शेताच्या बांधावरुन जात होती. त्यावेळी समोरुन आरोपी गुलाब किसन गायकवाड (२३) हा तिथे आला आणि त्याने तिच्याशी अश्लील वर्तन केले. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने काट्यावरुन उडी मारली आणि आरोपीनेही तिच्या पाठीमागे उडी मारुन अश्लिल चाळे सुरू केल्यामुळे मुलगी जोरजोरात ओरडली. नातीचा आवाज ऐकून मुलीचे आजोबा धावत आल्यामुळे आरोपी गुलाब हा उडी मारुन पळून गेला; पण जाताना त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीने घडला प्रकार आई-वडिलांना सांगितला. तिच्या पालकांनी तिला सोबत घेऊन पिशोर पोलिस ठाण्यात धाव घेतली व तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध भादंवि ३५४ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) ८ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब महेर यांनी सहा साक्षीदरांचे जाबब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला विनयभंग प्रकरणात एक वर्ष सक्तमजुरी, तर 'पोक्सो'च्या ८ कलमान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महावितरणचे कर्मचारी आज संपावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

औरंगाबाद शहरातील महावितरणचे काम पुन्हा खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या खासगीकरणाच्या विरोधात महावितरण कार्यालयाच्या कर्मचारी आणि अधिकारी रविवारी (०७ जानेवारी) मध्यरात्रीपासून १२ वाजेपासून आंदोलनावर जात आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या वीज कंपन्यांमध्ये काम करणारे ८६ हजार अधिकारी, कर्मचारी व अभियंते यांचे नेतृत्व करणाऱ्या सहा प्रमुख संघटनांच्या कृती समितीने रविवारी (०७ जानेवारी) २४ तासांचा संप पुकारला आहे. महावितरण कंपनीने कर्मचाऱ्यांची पुनर्रचना करताना संघटनांनी सुचविलेल्या सूचनांचा अंतर्भाव करून अंमलबजावणी करावी, महापारेषण कंपनीतील स्टाफ सेट अप लागू करत असताना अगोदरची एकूण मंजूर पदे कमी न करता स्टाफ सेट अप लागू करावे, व्यवस्थापनाने महावितरण कंपनीत राबविण्यात येत असलेले खाजगीकरण व फ्रान्चायझीकरणाचे धोरण थांबवावे, महानिर्मिती कंपनीचे २१० मेगाव्हॅटचे संच बंद करण्याचे धोरण तात्काळ थांबवावे, राज्य शासनाच्या जुन्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर तिन्ही कंपन्यातील कामगारांना पेन्शन योजना लागू कराव्यात, तीनही कंपनीतील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, कंत्राटी कर्मचाऱ्यांना टप्याटप्याने कायमस्वरुपी कामगार म्हणून सामावून घ्यावे, न्यायालयाच्या निकालानुसार समान काम समान वेतनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मुद्यांना विरोध करण्यासाठी वीज कर्मचारी, अभियंते संघटनांना संयुक्त कृती समितीतील घटक महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना, महाराष्ट्र स्टेट इले. वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, सबॉर्डिनेट इंजिनीअर्स असोसीएशन, राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक) या संघटनांनी संपाची हाक दिली आहे. हा संप रविवारी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात येणार आहे.

……

१५०० कर्मचारी तैनात

या संपात सहभागी न होणाऱ्या विविध संघटनांचे कर्मचारी कामावर असणार आहेत. शिवाय ट्रेनिंगसाठी आलेले कर्मचारी, कंत्राटदारांचे कर्मचारी असे एकूण १५०० कर्मचारी संपकाळात कामावर तैनात करण्यात आलेले आहेत. याशिवाय महावितरणने कंट्रोल रूमचीही स्थापना केली आहे. संपाच्या काळात महावितरण सेवा विखंडित झाल्यास ग्राहकांनी कंट्रोल रूमला संपर्क करावा, असे आवाहन महावितरण विभागाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांकडून तुळजाभवानीचा चरणस्पर्श

$
0
0

उस्मानाबाद :

तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये शनिवारी रात्री काही महिलांनी प्रवेश करत, देवीच्या मूळ मूर्तीचे चरणस्पर्श करत दर्शन घेतले. आतापर्यंत भोपे पुजारी मंडळाच्या महिला मूळ मूर्तीला स्पर्श करतात, अशी प्रथा होती आणि ही पद्धत मोडीत काढण्याची मागणी काही वर्षांपासून करण्यात येत होती. केरळच्या शबरीमलातील मंदिर प्रवेशावरून देशभरात वादंग माजले असतानाच, तुळजापुरातील ही घटना समोर आली आहे.

तुळजापुरातील मंदिराच्या गाभाऱ्यात सर्व महिलांना प्रवेश करता येतो आणि पूजाही करता येते. देवीच्या मूळ मूर्तीची झीज होत असल्यामुळे, रोज सकाळी एक अभिषेक झाल्यानंतर, पुढील अभिषेक उत्सव मूर्तीवर होतात. या मूळ मूर्तीला स्पर्श करण्याचे अधिकार फक्त भोपे पुजारी मंडळाच्या महिलांनाच आहेत. तर, असा मंदिर संस्थानचा नियम नाही, असे म्हणत सर्व महिलांना चरणस्पर्शाची परवानगी देण्याची मागणी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली होती. चरणतीर्थ, प्रक्षाळ पूजा व अन्य पुजांवेळी भोपे पुजारी व त्यांच्या परिवारातील महिला चरणस्पर्श करून पूजा करतात. त्या हवा तितका वेळ मनमानी पद्धतीने पूजा करत राहतात आणि अन्य महिलांना मात्र चरणस्पर्श नाकारला जातो. त्यामुळे, अन्य महिलांनाही चरणस्पर्श करण्याची परवानगी देण्यात यावी, असे या निवेदनात म्हटले होते. या पार्श्वभूमीवर, शनिवारी रात्री काही महिला मंदिराच्या गर्भगृहात घुसल्या आणि देवीचा चरणस्पर्श केला. या घटनेनंतर तुळजापुरात खळबळ उडाली असून, जिल्हाभरात याच घटनेची चर्चा सुरू होती.


'भोपे पुजारी परिवारातील महिलांप्रमाणे अन्य महिला भाविकांनाही तुळजाभवानी देवीचे चरणस्पर्श करून दर्शन घेण्याचा अधिकार असला पाहिजे. मंदिर प्रशासनाचा तसा नियमही नाही. त्यामुळे सर्वच महिलांना मंदिरात जावून चरणस्पर्श, दर्शन व पूजेचे अधिकार असावेत. मी चरण स्पर्श दर्शन घेऊन इतिहास घडविला आहे.'
- अ‍ॅड. मंजुषा मगर,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, महिला आघाडी

'भोपे पुजारी महिलांना चरणस्पर्श करून दर्शन घेण्याची परंपरा आहे. मात्र, काही जण ही परंपरा मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करीत असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. भोपे महिला फक्त काही सण उत्सवावेळी दर्शन घेतात. गाभाऱ्यात सर्व महिलांना प्रवेश असतानाही, काही जण जाणीवपूर्वक गैरसमज करून देत आहेत.'
- अमर राजे कदम,
अध्यक्ष भोपे-पुजारी मंडळ, तुळजापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४० जागा जिंकू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

इतर पक्षांना नेत्यामुळे विजय मिळतो, मात्र भाजपला बूथ कार्यकर्त्यांमुळे विजय मिळत असतो, असे सांगतानाच २०१९ची लोकसभा निवडणूक पानीपतच्या युद्धासारखी महत्त्वाची असून, ती युगप्रवर्तक आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी केले. तर, ‘राज्यात युती होईल की नाही, याचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्याला लोकसभेच्या ४८पैकी ४० जागा जिंकायच्या आहेत आणि आपण त्या जिंकू शकतो, या विश्वासाने लक्ष केंद्रीत करून प्रत्येक व्यक्ती व घराशी संपर्क करावा,’ असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.

लातूरमध्ये रविवारी लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली या चार लोकसभा मतदारसंघातील बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित होते. बूथ कार्यकर्ता हाच पक्षाचे बळ आहे, असे सांगतानाच अमित शहा म्हणाले, ‘लोकसभेची २०१९ची निवडणुक ही तिसऱ्या पानीपतच्या युद्धासारखी आहे. ही युगप्रवर्तक लढाई आहे. या लढाईनंतर देशातील घुसखोरांना वेचून-वेचून देशाबाहेर पाठवले जाणार आहे. देशातील घुसखोरांविषयी काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा गौरव जगात वाढविल्याचे सांगून मोदी हे देशासाठी गौरव असल्याचा उल्लेख त्यांनी केला. २०१९च्या विजयानंतर ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही भगवा फडकेल.’

फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्राला दुष्काळ नवा नाही, परंतु यावर्षी प्रथमच ऑक्टोबरमध्ये दुष्काळाचा सामना करण्यासाठी तयारी केली गेली आहे. केंद्र सरकारकडून मदत मिळणार असून, मी पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेऊन चर्चा केली आहे. योग्य ती मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर लवकरच जमा केली जाणार आहे. राज्यात युती होईल किंवा नाही याचा विचार करीत न बसता आपल्याला लोकसभेच्या ४८पैकी ४० जागा जिंकायच्या आहेत आणि आपण त्या जिंकू शकतो असा विश्वास आहे. कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारने केलेल्या कामांच्या लाभार्थीवर लक्ष केंद्रित करून प्रत्येक व्यक्ती आणि घराशी संपर्क करून विजयासाठी प्रयत्न करा.’

या मेळाव्याला संघटनमंत्री विजय पुराणिक, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजीतसिंह ठाकूर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड यांचीही उपस्थिती होती.

‘आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयात जाणार नाही’
नांदेड : धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषयी मार्गी लागणार नाही, तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही, यासाठी वेळ प्रसंगी सरकारवर काठी उगारायला मागेपुढे हटणार नाही, असा इशारा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिला. माळेगाव यात्रेमध्ये आयोजित धनगर जागर मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी त्या बोलत होत्या. सत्तेत ७० वर्षे राहणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावता आलेला नाही, मात्र केंद्रात व राज्यात धनगर समाजामुळे सत्तापरिवर्तन झाले आहे. या समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यातील भाजप सरकार अनुकुल भूमिका घेत असून, आम्ही दिलेला शब्द पाळणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या चित्रपटांना उजाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य, स्वीडीश दिग्दर्शक इंगमार बर्गमन यांच्या दर्जेदार कलाकृती व संगीतकार नौशाद, स्नेहल भाटकर यांच्या कारकिर्दीला उजाळा देणारे पोस्टर प्रदर्शन लक्षवेधी ठरले. या प्रदर्शनाने औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने सहावा औरंगाबाद आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सोमवारी सायंकाळी प्रोझोन मॉल येथे पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनाचे उदघाटन विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांनी केले. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, संचालक अशोक राणे, प्रोझोन मॉलचे व्यवस्थापक मोहम्मद अर्शद, डॉ. भालचंद्र कानगो, सुजाता कानगो, नीलेश राऊत, शिव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, पुणे यांच्या सहकार्याने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त काही दुर्मिळ पोस्टरचे प्रदर्शन भरवण्यात आले. गीतकार कैफी आझमी, मझरूह सुल्तानपुरी, पार्श्वगायिका शमशाद बेगम यांच्या मोजक्या चित्रपटांची पोस्टर्स आदरांजली म्हणून मांडली आहेत. दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या चित्रपटांची पोस्टर्सही प्रदर्शनात आहेत. येत्या १३ जानेवारीपर्यंत प्रोझोन रसिकांसाठी प्रदर्शन खुले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कामगार एकजुटीचा विजय असो,… हम सब एक है..' अशा घोषणा देत वीज कर्मचारी आणि अभियंत्यांनी वीज कंपनीच्या धोरणाविरोधात सोमवारी (सात जानेवारी) आंदोलन केले. या एक दिवसाच्या संपात ८० टक्के कर्मचारी, अभियंत्यांनी सहभाग नोंदविला.

वीज कर्मचारी-अभियंते संघटना कृती समितीतर्फे या संपाची हाक देण्यात आली. औरंगाबाद व अकोला येथील वीजवितरण खासगीकरणास विरोध, कर्मचारी पुनर्रचना, महापारेषण कंपनीतील स्टाफ सेट लागू करताना पदे कमी करू नये, लघु जल विद्युत निर्मिती प्रकल्प महानिर्मितीकडे ठेवावेत, पेन्शन लागू करावी आदी मागण्यांसाठी हा संप करण्यात आला. या संपात महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना, महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रिकल वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, सबॉर्डिनेट इंजिनीअर्स असोशिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस या सहा संघटनांनी सहभाग नोंदविला.

महावितरणच्या मिल कॉर्नर येथील मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर, महापारेषणसह इतर ठिकाणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संयुक्त कृती समितीचे सय्यद जहिरोद्दीन, ताराचंद कोल्हे, रोहिदास आल्टे, अरुण पिवळ, आर. पी. थोरात, बी. एल. वानखेडे, अनिल लेंभे, अभिजीत धर्माधिकारी, अविनाश चव्हाण, अविनाश जोशी, अख्तर अली, अभय पंडित आदींसह कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या आंदोलनानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी १० जानेवारी रोजी पुण्यात बैठक आयोजित केली आहे. आमदार हर्षवर्धन जाधव व आमदार इम्तियाज जलील यांनी भेट देऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले. याशिवाय माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनीही भेट देऊन काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला.

दरम्यान, दोन दिवसांच्या देशव्यापी संपात महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना, म. रा. वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन या तीन संघटना सामील होणार नाहीत. महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रिकल वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस संपात सामील होणार आहे.

……

\Bमहावितरणमध्ये कर्मचारी कपातीचा फेरविचार \B

या संपाबद्दल महावितरणने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात राज्यातील ५० टक्के कर्मचारी, अभियंते आंदोलनात सहभागी झाल्याचे म्हटले आहे. महावितरणमधील मनुष्यबळ पुनर्रचनेत कामगार कपात होणार नाही, याचा फेरविचार करण्यात येणार आहे, मुंब्रा, कळवा व मालेगाव विभागांची फ्रॅन्चायझी देण्यात येत असून ते धोरण आहे. हा निर्णयसुद्धा संघटनांशी चर्चा करून घेतला आहे. या संपाचा वीज वितरणावर परिणाम झाला नसल्याचे महावितरणने कळवले आहे.

……

\Bग्रामीण भागात तुरळक परिणाम \B

औरंगाबाद परिमंडळातील २८६५ कर्मचाऱ्यांपैकी २१८१ कर्मचारी संपात सहभागी झाले. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी संपात सामील नसलेल्या कर्मचाऱ्यांसह १५०० प्रशिक्षणार्थी, कंत्राटी कामगार तैनात करण्यात आले. गंगापूर तालुक्यातील जामगाव, कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी, औरंगाबाद तालुक्यातील गोलटगाव फीडर नादुरुस्त झाले. त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याचे महावितरणने कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीच्या वादातून खून; पाच वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतीच्या जुन्या वादातून आणि 'शेतजमीन मोगडू नको,' असे म्हणताच कुऱ्हाडीचे घाव घालून खून करणारा आरोपी कैलास फुलसिंह काकरवाल याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत पाच वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रधान जिल्हा न्यायाधीश पी. एच. माळी यांनी सोमवारी (७ जानेवारी) ठोठावली.

याप्रकरणी मृत भाऊसाहेब नारायण साबळे (३०, रा. एकघर पाड‍ळी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) यांचा चुलत भाऊ दत्तू देवराव साबळे (३६, रा. एकघर पाडळी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ३० सप्टेंबर २०१२ रोजी सकाळी दहाच्या सुमारास फिर्यादी हा एकघर पाडळी गावातील गट क्रमांक ३७ येथे जनावरे चारण्यासाठी गेला होता. तिथे दुपारी दीडच्या सुमारास कोमलसिंह राजपूत (रा. डोंगरगाव, ता. फुलंब्री) हा ट्रॅक्टरने शेजतमीन मोगडत (मशागतीचा प्रकार) होता, तर आरोपी कैलास फुलसिंह काकरवाल (३८, रा. ह.मु. फुलंब्री) हादेखील तिथेच कुऱ्हाडीने काड्या तोडत होता. त्यावेळी 'शेतजमीन मोगडू नको, गावातील लोकांसोबत बसून हा विषय सोडवू,' असे मृत भाऊसाहेब हा शेतीच्या वादाबाबत कोमलसिंहला म्हणाला. हे ऐकताच आरोपी कैलास हा तिथे धावत आला. फिर्यादी व कैलास यांच्यात वादीवाद होऊन आरोपी कैलास याने भाऊसाहेब याच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून गंभीर जखमी केले. तेवढ्यात आरोपी रामसिंह फुलसिंह काकरवाल (४३) व आरोपी बजरंग फुलसिंह काकरवाल (४०) हे कैलास याचे भाऊ तिथे पळत आले आणि फिर्यादीच्या पाठीमागे धावू लागले. जीव वाचवण्यासाठी फिर्यादीने तिथून पळ काढला आणि सर्व आरोपी पळून गेल्यावर फिर्यादीने गंभीर जखमी भाऊसाहेब यांना पिशोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथून त्यांना औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान दोन ऑक्टोबर २०१२ रोजी भाऊसाहेब यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या ३०२, ३४ कलमान्वये पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\B...तर दोन महिने आणखी शिक्षा

\Bखटल्यावेळ‍ी, जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या फिर्यादीसह इतर साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या ३०४ (भाग दोन) कलमान्वये (सदोष मनुष्यवध) आरोपी कैलास याला पाच वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तर, पुराव्याअभावी इतर दोन आरोपींना मुक्त केले. जिल्हा सरकारी वकील देशपांडे यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकुलत्या एक मुलाने सोडले घाटीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) परिसरात एकूलत्या एक मुलाने आणून सोडलेल्या वृद्ध दाम्पत्याची राहण्याची सोय मातोश्री वृद्धाश्रमात करण्यात आली आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी घटनास्थळी जाऊन वृद्धांची परिस्थिती जाणून घेत त्यांची सोय करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर 'मातोश्री'चा कर्मचारी दाम्पत्याला घेण्यासाठी सोमवारी (सात जानेवारी) सायंकाळी घाटी परिसरात आलाही होता. मात्र वृद्धाश्रमात जाण्यासाठी अनिच्छा व्यक्त करून दाम्पत्य गावी परतल्याचे समजते.

गंगापूर तालुक्यातील सत्तरी पार केलेल्या सुभाष पन्नालाल राठी व त्यांच्या पत्नीला त्यांचा मुलगा घाटी हॉस्पिलमध्ये सोडून गेला. त्यानंतर या वृद्ध दाम्पत्याने घाटीच्या रुग्णशेडमध्ये आसरा घेतला. जाणाऱ्या-येणाऱ्यांनी दिलेले पैसे व घाटीत रोज होणाऱ्या अन्नदानातून गुजराण करीत त्यांनी दोन दिवस कसेबसे काढले. हे लक्षात येताच डॉ. ये‍ळीकर यांनी रुग्णशेडमध्ये जाऊन त्यांची विचारपूस केली. एकुलता एक मुलगा आम्हाला घाटीत टाकून गेल्याची व्यथा त्यांनी मांडली. 'मातोश्री'चा पर्याय दाम्पत्यासमोर ठेवल्यानंतर वृद्धांनी होकार दिल्यामुळे डॉ. येळीकर यांनी स्वतः 'मातोश्री'च्या चालकांशी बोलून त्यांच्या निवासाची सोय केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, वैद्यकीय समाजसेवा अक्षीधक निलेश कोतकर यांनीही पुढाकार घेऊन मातोश्री वृद्धाश्रमात राहण्याबाबत दाम्पत्याचे मन वळवले.

\Bरोजच सोडले जाते अनेकांना घाटीत

\Bघाटीमध्ये दररोज किमान दोन ते तीन जणांना सोडून दिले जाते. कधी घरातील माणसे, तर कधी पोलिस आणून टाकतात, असे सांगितले जाते. आणून सोडलेल्यांमध्ये बहुतांश वृद्ध व रुग्णांचा समावेश असतो. यातील काही जण तिन्ही वेळच्या जेवणाची सोय होते म्हणून घाटी परिसरात तळ ठोकून असतात. बेघर, बेवारस, निराधार, वृद्धांची कायम सोय करण्यासाठी कोणतीच शासकीय किंवा खासगी सोय नाही, ही वस्तुस्थिती अनेक वर्षांपासून कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मद्यप्राशनामुळे कराटेपटूचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मद्यप्राशन केल्यामुळे कराटेपटूचा मृत्यू झाल्याचा आरोप करत सोमवारी संतप्त जमावाने गारखेड्यातील देशी दारूच्या दुकानाची तोडफोड केली. परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

गारखेड्यातील विजयनगरमध्ये श्याम विश्वनाथ फाजगे (वय ४७) हे आई वडील, दोन भाऊ एक बहीण, पत्नी आणि चार मुलांसह वास्तव्यास होते. फाजगे हे पूर्वाश्रमीचे कराटेपटू होते. रविवारी रात्री दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. येथील देशी दारूच्या दुकानामुळे परिसरातील तरुण, पुरूष व्यसनाधीन होत असून फाजगे यांचा त्यामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप महिलांनी केला. सोमवारी सकाळी फाजगे यांचा अंत्यविधी पार पडल्यानंतर शेकडो महिला पुरुषांचा संतप्त जमाव विजयनगरातील देशी दारूच्या अड्ड्यावर धडकला. जमावाने दुकानाची तोडफोड करीत देशी दारूचे बॅाक्स रस्त्यावर फोडून दुकानाला आग लावली. अचानक घडलेल्या प्रकाराने परिसरात तणाव निर्माण झाला. विजयनगर चौकातील वाहतूक बंद झाली होती. पोलिसांना हा प्रकार कळताच जवाहरनगर आणि पुंडलिकनगरच्या पेट्रोलिंग वाहनांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच जमावाने पलायन केले. यापैकी काही संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेला ५० हजाराच्या खंडणीसाठी धमक्या

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'तुमच्या मुलामुळे गुन्हा दाखल झाला असून, त्यासाठी ५० हजार रुपये खर्च आला. ती रक्कम द्या,' असे म्हणत मुलाच्या आईला धमक्या देण्यात आल्या. हा प्रकार शनिवारी आणि रविवारी सकाळी जाधववाडी भागात घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ५० वर्षांच्या महिलेने हर्सूल पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही महिला शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घरी होती. यावेळी संशयित आरोपी अमोल लहाने त्यांच्या घरी आला. मला ५० हजार रुपये पाहिजेत, अशी मागणी त्याने केली. या महिलेने कशासाठी पैसे मागतो असे विचारल्यावर मागील वर्षी माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता, त्यामध्ये मला ५० हजार रुपये खर्च आला. तो खर्च तुमच्या लहान मुलामुळे झाला आहे, असे म्हणत या महिलेला शिवीगाळ करीत हात पिरगाळला. रविवारी सकाळी सहा वाजता ही महिला फिरण्यासाठी बाहेर पडली असता अमोल पुन्हा त्यांना अडवले. मला पैसे दिले नाही तर तुमच्या मुलाचा पाय तोडेल, अशी धमकी देत पुन्हा शिवीगाळ केली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अमोल लहानेविरुद्ध खंडणी, रस्ता अडवणे, धमक्या दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार तायडे याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणमंत्री तावडे राजीनामा द्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या सोमवारी निराला बाजार परिसरातील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन करत निषेध केला, तसेच तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मराठवाडा लॉ कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

अमरावती येथील एका कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उद्देशून तावडे यांनी 'ऐपत नसेल तर शिकू नका,' तसेच 'छायाचिण करणाऱ्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्याला अटक करा,' असे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी दोन तास त्या विद्यार्थ्यांना डांबून ठेवले, अशा कृत्याचा विद्यार्थी म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतो असे सांगत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. तावडे यांनी राजीनामा द्यावा, अशा आशयाचे फलक हाती घेत विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. अशा प्रकारची दडपशाही करून लोकशाहीला संकटात टाकणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनावर नवनाथ देवकते, विश्वजित बडे, अजहर पटेल, राम भागवत, अर्जुन डुकरे, दत्ता पाटइल, दीपक डोईफोडे, विलास पाटील, नितीन बिडवे, कृष्णा साबळे, विक्की कामेटे, शिल्पा मुंडे यांची नावे आहेत.

विद्यार्थ्यांना अटक करायला लावणे व ऐपत असेल तर शिक्षण घ्या, असे बेताल वक्तव्य शिक्षणमंत्र्यांना शोभत नाहीत. त्यामुळे तशा वक्तव्याचा आम्ही निषेध केला. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्याबाबत आम्ही स्पष्ट केले.

- नवनाथ देवकते, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हँडलिंग अ म्युनिसिपल कॉर्पोरेशन !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'हँडलिंग अ म्युनिसिपल कॉर्पोरेशन' अशी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी केलेली पोस्ट आणि दोन भल्या मोठ्या शिळांमधून (दगड) पुढे सरकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र. ट्विटवरील या मिर्च मसाल्याने महापालिका वर्तुळात नाना खमंग चर्चा सुरू आहेत. आयुक्तांना काम करताना मोठ्या दबावाला सामोरे जावे लागत आहे की काय, हा दबाव ते झेलणार की चक्रव्यूह भेदून ते बाहेर पडणार, हे येणारा काळच ठरवेल.

दोन भल्या मोठ्या शिळांमध्ये आयुक्त स्वत: अडकले आहेत. छातीवर कोसळू पाहणारा भला मोठा दगड दोन हातांनी तोलण्याचा आणि त्यातून बाहेर पडण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, असे आयुक्तांनी पोस्ट केलेल्या छायाचित्रातून स्पष्ट होते. महापालिकेत येणाऱ्या प्रत्येक आयुक्तासमोर काम करताना मोठे आव्हानच असते. त्यातील पहिले जमा-खर्चाचा ताळमेळ राखत विकास कामांचे. जमा - खर्चाचा ताळमेळ कधीच साधला जात नाही आणि विकास कामांबद्दल होणारी ओरड कामाची गती कमी करून टाकते. पालिका 'हँडल' करताना ही मोठी समस्या आहे, असा संदेश आयुक्तांना नागरिकांपर्यंत पोचवायचा आहे का, असा प्रश्न पोस्ट पाहिल्यावर निर्माण होतो. महापालिकेत युतीची सत्ता असली तरी स्वत:च्या अस्तित्वासाठी या दोन्हीही पक्षांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू असते. त्यामुळे प्रशासन कोंडीत सापडते. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मताप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, तर भाजप पदाधिकारी आक्रमक होतात. भाजप पदाधिकाऱ्यांच्या मतानुसार काम केले, शिवसेना पदाधिकारी व नेते खोडा घालतात. पाणी पुरवठ्यासंदर्भात हा अनुभव आयुक्त व प्रशासनासाठी ताजा आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा हवा होता, तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तो तीन दिवसाआड करून घेतला. त्यामुळे प्रशासन कोंडीत सापडले. रस्ते कामाच्या निविदा, स्मार्ट सिटी मिशनमधून करायची कामे, कचराकोंडी फोडताना पदाधिकाऱ्यांचे निर्माण झालेले वेगवेगळे 'इंटरेस्ट', या सर्वातून मार्ग काढणे म्हणजे अंगावर पडू पाहणारा पहाड दोन्ही हातांनी पेलून तो उलथवून टाकण्यासारखेच आहे, असा अर्थ आयुक्तांनी केलेल्या पोस्टमधून कुणी काढल्यास त्यात गैर काही असेल असे नाही. पालिकेत सध्या लेखा विभागाच्या कारभारावरून पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांत घमासान सुरू आहे. हा विषय पदाधिकाऱ्यांसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. मुख्य लेखाधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी पदाधिकाऱ्यांकडून विविध माध्यमातून दबाव टाकला जात आहे. त्यामुळे एका वेगळ्याच समस्येत प्रशासन गुरफटून गेले आहे. या बद्दलचा संदेशही आयुक्तांनी त्या पोस्टमधून दिला नसेल ना, असेही बोलले जात आहे.

\B...क्षण कसोटीचा

\Bमुख्यमंत्र्यांनी शहरातील रस्त्यांसाठी सव्वाशे कोटींचे नुकतेच पॅकेज नुकतेच जाहीर केले. वास्तविक पाहता या पॅकेजनुसार कामाचे नियोजन करण्याची जबाबदारी प्रशासनाची, पण प्रशासनावर स्वार होवून पदाधिकाऱ्यांनीच या नियोजनाचा लगाम स्वत:च्या हाती घेतला आहे. दीड वर्षानंतर शंभर कोटींच्या रस्त्यांचा मार्ग मोकळा झाला. त्यातही प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. आताही सव्वाशे कोटींमुळे प्रशासनाची कसोटी लागणार आहे. हा क्षण आयुक्तांनी ट्विट करून सर्वसामान्यांच्या लक्षात आणून दिला का, अशी चर्चा येत्या काळात सुरू होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीएम’ भेटीवरून सेना-भाजपत जुंपली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनी प्रकल्पासंदर्भात झालेल्या बैठकीच्या अहवालासह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना महापालिकेचे पदाधिकारी साकडे घालणार आहेत. साकडे घालण्यासाठी मुंबईला केव्हा जायचे यावरून शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तीन जानेवारी रोजी रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांकरिता आणखी १२५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली. समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या तिढ्यातून मार्ग काढा, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. याशिवाय पालिकेच्या इतर मागण्यांबद्दलही गांभीर्याने विचार करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे लवकरात लवकर मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांसाठी साकडे घालावे, अशी भूमिका महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतली आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांकडे समांतर जलवाहिनी संदर्भात झालेल्या बैठकीचा अहवाल सादर करण्याचे त्यांनी ठरविले आहे. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांनी बुधवार (नऊ जानेवारी) ठरवला आहे. सर्व पदाधिकारी व आयुक्तांना सोबत घेवून मुंबईला जाऊ आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करू, मुख्यमंत्र्यांची वेळ मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

\Bतातडीने जाण्याची गरज नाही: उपमहापौर \B

उपमहापौर विजय औताडे (भाजप) यांनी मात्र तातडीने मुंबईला जाण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. सव्वाशे कोटींमधून ज्या रस्त्यांची कामे करायची आहेत त्याची सविस्तर माहिती एकत्रित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटाला जाणे योग्य राहील, असे ते म्हणाले. रस्त्यांच्या कच्च्या यादीसह मुख्यमंत्र्यांची भेट घेणे म्हणजे मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करण्यासारखेच आहे, असा उल्लेख त्यांनी केला. महापौरांनी घाई करू नये, मुख्यमंत्र्यांनी मदत करण्याचा शब्द दिला आहे, ते नक्की मदत करतील, असा सल्लाही औताडे यांनी महापौरांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी आरोपीला अटक करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको येथील एका शाळेतील पाच वर्षांच्या विद्यार्थिनीवर अज्ञात आरोपीने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याचबरोबर टीव्ही सेंटर येथे मुख्यमंत्र्याच्या सभेप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.

सिडको परिसरातील प्रशालेच शिकत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर अज्ञात नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा मनविसेने निषेध केला आहे. सिडको पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकाराला दोन दिवस उलटले तरी अद्याप आरोपीचा शोध लागलेला नाही. ही मुलगी लहान असल्याने तिच्याशी संवाद साधण्यात देखील पोलिसांना यश येत नाही. दरम्यान, याप्रकरणी बाल लैंगीक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी मनविसेने केली आहे. या शाळेला देखील सुरक्षेबाबत कडक सूचना करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांची भेट घेत ही मागणी करण्यात आली, यावेळी औरंगाबाद पुर्व विभागाचे शहराध्यक्ष संकेत शेटे, विशाल आमराव, अशोक म्हस्के, सुशांत भुजंगे, गणेश ढगे, विशाल विराळे, योगेश खाडे, शिवा लिंयायत आदींची यावेळी उपस्थिती होती.

\Bआयोजकांवर गुन्हे दाखल करा\B

तीन जानेवारी रोजी टीव्ही सेंटर येथे शंभर कोटींच्या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भररस्त्यावर सभा घेण्यात आली. यामुळे परिसरातील रहिवासी, वाहनधारका सहा तास वेठीस धरल्या गेले. यापूर्वी शहर पोलिस प्रशासनाने राष्ट्रवादीच्या हल्लाबोल कार्यक्रमाला तसेच मनसेच्या दंडुका मोर्चाला रस्त्यावर व्यासपीठ उभारण्यास नकार देत आयोजकांवर गुन्हा दाखल केला होता. मनसे, राष्ट्रवादीला एक न्याय आणि सत्ताधारी पक्षाला एक न्याय देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी भाजपाच्या सभेंच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनविसेच्या वतीने करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विवाह

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अल्पवयीन मुलीच्या भावाला धमकी देत तिचे अपहरण करून विवाह करण्यात आला. हा प्रकार २४ डिसेंबर रोजी पहाटे जटवाडा रोड भागात घडला. या पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सहा जणाविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात अपहरण आणि अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पीडित मुलीगी १६ वर्षांची आहे. तिची आई २३ डिसेंबर रोजी भोकरदन येथील मूळ गावी गेली होती, तर वडील मुंबईला गेले होते. ही मुलगी आपल्या लहान भावासोबत घरी होती. २४ डिसेंबर रोजी पहाटे संशयित आरोपी शेख उमर आणि इतर आरोपींनी मुलीच्या भावाला धमक्या देत मुलीला सोबत नेत तिचा शेख उमरसोबत जबरदस्तीने विवाह करण्यात आला. मुलीचे वडील गावावरून परतल्यानंतर २८ डिसेंबर रोजी जिन्सी पोलिस ठाण्यात त्यांची मुलीसोबत भेट झाली. मुलगी अल्पवयीन असल्याने तिला आई वडीलांच्या ताब्यात पोलिसांनी दिले. या नंतर पीडित मुलीने आपल्यासोबत जबरदस्तीने विवाह लावण्यात आला असून, कोंडून ठेवत अतिप्रसंग केल्याचे सांगितले. या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात संशयित आरोपी शेख उमर, शेख इस्माइल, शेख फारूख, समीर भंगारवाला; तसेच इतर दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संशोधकांची ‘फेलोशिप’ ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा मनस्ताप शेकडो विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. नऊ महिन्यांपासून अधिछात्रवृत्ती आणि शिष्यवृत्ती मिळाली नसल्यामुळे आर्थिक कुचंबणा सुरू आहे. शेतकरी-शेतमजूर शिष्यवृत्ती योजनाही प्रशासनाने गुंडाळली आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करीत असून 'नॅक'च्या तोंडावर विद्यार्थी संतापले आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिछात्रवृत्तीधारकांचा (फेलोशिपधारक) रखडलेल्या पैशाचा प्रश्न अजूनही अधांतरी आहे. तिमाही फेलोशिप देण्याचा नियम असताना नऊ महिन्यांपासून संशोधक विद्यार्थ्यांना पैसे मिळाले नाही. त्यामुळे विविध विभागातील ६०० विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. प्रशासकीय कार्यवाहीत गलथानपणा असल्यामुळे फेलोशिप वेळेत मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. मागील आठ दिवसांपासून विद्यार्थी दररोज नियोजन आणि सांख्यिकी विभागात विचारणा करीत आहेत. प्रक्रिया सुरू आहे, असे उत्तर कर्मचारी देतात. विभागाच्या ढिसाळपणाची प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली. तसेच मागण्यांचे निवेदन काही दिवसांपूर्वी देण्यात आले. मात्र, फेलोशिप मिळणे लांबणीवर पडले आहे. युजीसी आणि कॅनरा बँकेच्या तांत्रिक प्रक्रियेत पैसे रखडल्याचे प्राथमिक कारण प्रशासन सांगत आहे. तर विद्यापीठ प्रशासन कार्यवाही करीत नसल्यामुळे पैसे रखडल्याचा संशोधकांचा आरोप आहे. फेलोशिपच्या समस्या लवकर सोडण्याची मागणी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे करण्यात आली. संशोधक विद्यार्थ्यांची कागदपत्रे स्कॅनिंग करून योग्य मुदतीत युजीसीकडे पाठवल्यास वेळेवर पैसे मिळतील. पण, 'नॅक' आणि इतर कामांचा व्याप असल्याने उशीर झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अध्यासन केंद्राच्या माध्यमातून एम. फिल. आणि पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी दोन संशोधक विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती ठप्प आहे. एम. फिल. संशोधकाला दरमहा चार हजार रुपये आणि पीएच. डी. साठी सहा हजार रुपये शिष्यवृत्ती आहे. १८ अध्यासन केंद्रे ७२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहेत. गुणवत्तेनुसार पात्र विद्यार्थ्यांची निवड करून शैक्षणिक विभागाला अहवाल देण्यात आला आहे. या प्रक्रियेला दोन महिने झाले असून पुढील प्रक्रिया करण्यात आली नाही. प्रशासनाने लेखा व वित्त विभागाला पत्र देण्यात विलंब केल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. प्रशासकीय विलंबात शिष्यवृत्ती प्रक्रिया रखडली आहे. एम. फिलचे वर्ष संपण्यास अवघे चार महिने शिल्लक आहेत. वर्षभरानंतरही शिष्यवृत्ती न देण्याची किमया प्रशासनाने केली आहे.

\Bशेतकरी-शेतमजूर शिष्यवृत्ती बंद ?

\Bदुष्काळी परिस्थितीत शेतकरी-शेतमजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली होती. तीन वर्षांनंतर पुन्हा दुष्काळी परिस्थिती उदभवल्यामुळे शिष्यवृत्ती देण्याची मागणी आहे. मागील योजनेत शिष्यवृत्ती थकलेल्या विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन डॉ. प्रवीण वक्ते यांनी प्रशासनाला अहवाल दिला आहे. या अहवालानंतर नवीन योजना जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासनाने कार्यवाही केली नसल्यामुळे शिष्यवृत्ती मिळणे कठीण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापूसवडगावात एकाचा गूढ मृत्यूकापुसव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

कापूसवाडगाव शिवारातील शेतवस्तीवर तोंड व गळा फाडून एकाची हत्या झाल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेतील व्यक्तीचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भीमाशंकर आनंद गिरी (वय ५५) असे मृताचे नाव आहे.

मागील काही दिवसांपासून वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कापूसवाडगाव भागात बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांनी वनविभागाला कळवले होते. त्यामुळे भीमाशंकर यांना हिंस्त्र प्राण्यानेचे मारून टाकल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे, मात्र याबाबत वनविभागाने स्पष्ट बोलण्यास नकार दिला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतरच यावर काही सांगता येईल, अशी भूमीका वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.दरम्यान, बिबट्याच्या अस्तित्वाबाबत वेळोवेळी कळवूनही वनविभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तत्परता न दाखवल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे. हत्या झाल्यानंतर भीमाशंकर यांच्या पत्नीने वन व पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांना मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यास विरोध केल्याने शेतवस्तीवर, येथील उपजिल्हा रुग्णालयात गोंधळ उडाला.

वैजापूर तालुक्यातील कापूसवाडगाव शिवारातील गट क्रमांक २४९ मध्ये भीमाशंकर यांची शेतजमीन असून, या ठिकाणी ते एकटेच राहत होते. त्यांची शेती सर्जेराव फकिरा कदम यांना बटाईने दिली आहे. सोमवारी दुपारी १२च्या सुमारास कदम हे गिरी यांना बोलावण्यासाठी गेले असता गिरी हे मृत अवस्थेत पडलेले आढळुन आले. त्यांचा चेहरा पूर्णपणे विद्रुप झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक वनरक्षक प्रशांत वरुडे, वनपाल एच. एच. सय्यद, बी. पी. झोड, प्रवीण कोली, वीरगाव पोलिस ठाण्याचे एपीआय हरीश बोराडे, अक्रम पठाण, विलास सुखदान, शिवनाथ सरोदे, संतोष सोनवणे, संदीप गायकवाड, आय बाइक पथकाचे दिनेश गायकवाड, अमोल पहाडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करण्यात आला.

दरम्यान, शेतवस्तीवर पावलांचे ठसे आढळले असले तरी हे ठसे वन्य प्राण्याचे नसल्याचे वनधिकाऱ्यांनी 'मटा'ला सांगितले. हत्या नेमकी कशामुळे व कुणी केली याचा खुलासा शवविच्छेदनानंतर पोलिस तपासात उघड होणार असल्याचे सांगत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.

\Bपत्नी, मांजर ताब्यात\B

मृत भीमाशंकर गिरी यांची पहिली पत्नी २००५मध्ये मृत झाल्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले होते. पहिल्या लग्नाच्या तीन विवाहित मुली असून, दुसरी बायकोही मागील सात महिन्यांपासून जवळ नसल्याने भीमाशंकर शेतवस्तीवर एकटेच राहत होते. भीमाशंकर यांचे शवविच्छेदन करू देणार नाही, असे म्हणत त्यांच्या दुसऱ्या बायकोने उपजिल्हा रुग्णालयात चक्क पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली व तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, पण महिला पोलिसांनी तातडीने तिला ताब्यात घेतले. घटनास्थळी एक मांजर मृताचा चेहरा ओरबडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे ही घटना संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून पोलिसांनी एका मांजरीला ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप शिवसेनेला खिंडीत पकडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांच्या कामांसाठी आणखी सव्वाशे कोटी रुपयांची घोषणा केल्यानंतर महापौर आणि सभापतींनी अधिकाऱ्यांना काम करावयाच्या संभाव्य रस्त्यांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. मात्र, हे सांगताना सोबत घेतले नसल्याने भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. शिवसेनेची भूमिका 'एकला चलो', अशी असेल, तर आम्ही 'सब का साथ, सब का विकास' या भूमिकेतून रस्त्यांच्या कामांकडे बघू, असा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन जानेवारी रोजी शंभर कोटी रुपयांच्या रस्ते कामांचे उद‌घाटन करताना आणखी सव्वाशे कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अधिकाऱ्यांना बोलावून १२५ कोटींमध्ये कोणत्या रस्त्यांची कामे करता येतील, अशी विचारणा करून रस्त्यांची यादी देण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांनी पाच जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन १२५ कोटींमधून करावयाच्या रस्त्यांच्या कामांवर चर्चा केली. शंभर कोटी आणि डिफर्ड पेमेंटमध्ये समावेश नसलेल्या सर्व रस्त्यांचा समावेश यादीत करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. मात्र, या बैठकीवेळी भाजप पदाधिकाऱ्यांना टाळण्यात आले.

यासंदर्भात 'मटा' शी बोलताना उपमहापौर विजय औताडे म्हणाले, रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्र्यांची सव्वाशे कोटींची घोषणा केल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे 'एकला चलो' सुरू झाले आहे. महापौर व स्थायी समिता सभापतींनी अधिकाऱ्यांची बैठक घेताना भाजप पदाधिकाऱ्यांना सोयीस्करपणे टाळले आहे, असा आरोप केला. घाई गडबडीत यादी तयार करून मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना स्वारस्य नाही. रस्त्यांची व्यवस्थित यादी तयार करून, त्याला सर्वसाधारण सभेची मान्यता घेतल्यानंतर प्रस्तावाच्या स्वरुपात ती मुख्यमंत्र्यांकडे सादर करावी, अशी भूमिका औताडे यांनी मांडली.

\Bसर्व नगरसेवकांकडून रस्त्यांची यादी घ्यावी \B

शहरात ११५ नगरसेवक असून सव्वाशे कोटींमधून आपल्या वॉर्डात रस्ते व्हावेत, असे प्रत्येक नगरसेवकाला वाटते. त्यामुळे सर्व नगरसेवकांकडून रस्त्यांची यादी घेवून त्यातून विकास आराखड्यातील रस्ते निवडले जातील आणि त्या रस्त्यांचा समावेश यादीत केला जाईल. मुख्यमंत्र्यांनी देखील विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे प्राधान्याने करा, असे सांगितले आहे. त्यामुळे सगळ्या नगरसेवकांना सोबत घेवून रस्त्यांची यादी तयार करावी, अशी भाजपची भूमिका असल्याचे उपमहापौर औताडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांनी सुट्टी वाढवली; समांतरची बैठक लांबणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सुट्टी वाढवली असून त्यामुळे समांतर जलवाहिनी प्रकल्पाबद्दलची बैठक लांबणीवर पडली आहे. आयुक्तांनी 'एल. एल. एम.' ची परीक्षा देण्यासाठी दहा दिवसांची रजा घेतली होती. रजा संपून ते सोमवारी रुजू होणार होते. परंतु, ते रुजू झाले नाहीत. त्यांनी दोन दिवसांनी रजा वाढवली. आता ते बुधवारी रुजू होणार आहेत. समांतर जलवाहिनी प्रकल्पाबद्दल महापौर नंदकुमार घोडेले यांनी पालिका व कंपनी अधिकारी यांची शनिवारी बैठक घेतली. या बैठकीत निघालेल्या निष्कर्षाबद्दल मंगळवारी आयुक्तांबरोबर बैठक घेऊन अंतिम निर्णय करू, असे त्यांनी सांगितले होते. परंतु, आयुक्त बुधवारी येणार असल्यामुळे मंगळवारची बैठक बारगळली आहे. आयुक्त रुजू झाल्यावर समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पाबद्दल बुधवारी बैठक होणार की नाही याबद्दल संभ्रम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाजपेयींचे तैलचित्र पालिकेच्या सभागृहात लावणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे तैलचित्र महापालिकेच्या मुख्य सभागृहात लावण्यात येणार आहे. १८ जानेवारी रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार असून त्या दिवशी सभागृहात तैलचित्राचे अनावरण केले जाईल, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. वायजेपी यांचे स्मारक तयार करण्याचा प्रस्तावही यापूर्वीच सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. १८ जानेवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत जुन्या शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याचा प्रस्ताव देखील मांडला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images