Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आनंदाची धुंद बरसात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जगण्याच्या तुंबळ लढाईत, स्पर्धा-शर्यत-तणावात आणि घड्याळ्याच्या काट्यावर जणू काही कठपुतलीप्रमाणे नाचताना हरवलेले आनंदाचे छोटे-मोठे मोहक क्षण पुन्हा एकदा वेचण्याचा आणि मनसोक्त जगण्याचा सुंदर आणि धुंद अनुभव तमाम औरंगाबादकरांनी घेतला तो 'हॅपी स्ट्रीट'मध्ये. गुलाबी थंडीत आणि सकाळच्या झुंजू-मुंजू वातावरणात भोवऱ्यापासून ते लिंगोरचापर्यंत आणि अॅरोबिक्सपासून झुंबा डान्सपर्यंत, सायकलिंगपासून गोट्यांपर्यंत आणि वेटलिफ्टिंगपासून बॅडमिंटनपर्यंत हवे ते खेळण्यात आणि करण्यात पार रंगून गेले होते औरंगाबादकर. या वर्षातील पहिल्या-वहिल्या 'हॅपी स्ट्रीट'ने शहरवासीयांच्या ओंजळीत भरभरून मनस्वी आनंदी दिला.

महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडियाच्या वतीने हा निराळा उपक्रम रविवारी (२७ जानेवारी) 'मटा' कार्यालयासमोर उस्मानपुरा सर्कल भागातील रस्त्याच्या एका बाजुला सकाळी सहा ते नऊ या वेळेत घेण्यात आला. महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेवक विकास जैन, स्थायी समिती सभापती रेणुकादास वैद्य आदींच्या उपस्थितीत या धुंद उपक्रमाचे छोटेखानी उद्घाटन झाले आणि महापौर घोडेले यांनीही 'झुंबा'शी ताल छेडत स्वत: 'हॅपी स्ट्रीट'मध्ये विरघळून गेले. उस्मानपुऱ्यापासून ते क्रांतीचौकापर्यंतचा डाव्या बाजुचा संपूर्ण रस्ता पार 'हॅपी'मय झाला होता आणि रस्त्याच्या पलीकडची बाजू अनेकविध खेळांनी अक्षरश: बहरली होती. महिला-मुलांसह सर्ववयीन बॅडमिंटन खेळण्यात दंग झाले होतेच, पण गोट्या, लिंगोरचा, भोवरा खेळतानाही तरुणाईची मस्त धमाल सुरू होती. भले मोठे ट्रॅक्टरचे चाक दोरीने ओढून पायाजवळ आणत पुन्हा उलट्या दिशेने आहे त्या जागेपर्यंत उलटवून टाकताना अनेकांची दमछाक होत होती, तरीही छोट्या-छोट्या मुला-मुलींनी आणि महिला-पुरुषांनीही हा भन्नाट अनुभव घेतलाच. ज्यांना हे चाक उलटवून टाकता येत नव्हते त्यांनी ते चाक ढकलत ढकलत का होईना जागेपर्यंत नेले. समप्रमाणात भारदस्त वजन असलेल्या एका स्पोर्टस बॅगला विशिष्ट पद्धतीने उचलून खांद्यावरुन वर उंचावत पुन्हा खांद्यावर आणि खाली नेतानाचा एक्सरसाईजही अनेकांनी एन्जॉय केला. वेगवेगळी प्रकारची केटलीच्या आकाराची वजने उचलण्याचीही मजा अनेकांनी घेतली. स्ट्रेचिंग, एरोबिक्सचा आनंद घेतानाही अनेकजण दिसून आले. अगदी पाच वर्षांपासूनच्या बाळगोपाळांची 'टोळी' अत्यंत सफाईने स्केटिंग खेळताना सगळीकडेच गोंडस धुडगुस घालत होती. अशा कितीतरी 'फन गेम्स', छोटेखानी 'जिम'ची भुरळ शहरवासियांवर स्पष्टपणे दिसत होती. नानाप्रकारच्या स्पोर्टस सायकल्सचा एक स्टॉलही याच ठिकाणी लक्ष वेधून घेत होता आणि सर्व वयाचे औरंगाबादकर सायकलिंगचा आनंद लुटत होते. आदल्या दिवशीच साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाचा मूडही काहींवर दिसून येत होता आणि त्यामुळेच अनेकजण आपल्या सायकलवर लावलेल्या तिरंग्यासह उपक्रमात रंगून गेले होते. त्याशिवाय अनेक अकल्पित व्यायाम प्रकार करण्यातही शहरवासीय दंग झाले होते. दोरीवरच्या उड्या मारण्यासाठीही तर झुंबड उडाली होती. एक जोडपे एकाच दोरीमध्ये लयबद्ध उड्या घेत होते आणि दोघांचे पाय आणि उड्या बरोबर समेवर येत होते. 'विंटेज कार'ने तर प्रत्येक औरंगाबादकराचे लक्ष वेधले नसले तरच नवल. त्याचवेळी 'स्नेहसावली'सारख्या वृद्ध-निराधारांची काळजी घेणाऱ्या संस्थेची माहितीही या ठिकाणी सादर करण्यात आली होती.

महापौर घोडेले, स्थायी समितीचे सभापती वैद्य, नगरसेवक विकास जैन आणि दिलीप थोरात यांचे स्वागत 'मटा'च्या ब्रँड विभागाचे निखिल देशमुख, असिस्टंट एडिटर श्रीपाद कुलकर्णी यांनी केले.

\B'झुंबा'वर स्वार झाली तरुणाई

\Bजोरदार आणि दिलखेचक संगीताच्या तालावर झुंबा डान्सने 'हॅपी स्ट्रीट'मध्ये वेग‌ळीच रंगत आणली आणि समस्त तरुणाई झुंबावर अखंड आणि मनसोक्त थिरकली. मुले-मुली, तरुण-तरुणीच तव्हे तर मध्यमवयीन पुरुष-महिला आणि काही साठी पार केलेल्या महिला-पुरुषांनीही झुंबावर ठुमके लगावले, हे विशेष. एक सत्तरीतले आजोबाही झुंबाचा आनंद घेताना दिसून आले आणि न राहून झुंबा ट्रेनरनेही त्या आजोबांच्या उत्साहाला मानाचा मुजरा घातला. झुंबा ट्रेनर जान्हवी जाजू, जुही बर्गे, प्रणाली अंभोरे यांच्यासह अँकर अस्मिता पांडे यांनी झुंबाची रंगत वाढवली. तसेच शोएब मिर्झा यांच्या टीमने विविध प्रकारचे फन गेम्स तसेच जिम रस्त्यावर आणले आणि शहरवासियांनी धूम केली.

\B'मटा'वर महापौरांचा वर्षाव

\Bयानिमित्त महापौर घोडेले यांनी 'मटा'च्या विविध उपक्रमांसह 'हॅपी स्ट्रीट'च्या भन्नाट उपक्रमाचा गौरव केला. गेल्या वर्षापासून घेण्यात येणाऱ्या या निराळ्या उपक्रमाची ओळख ही 'मटा'नेच शहरवासीयांना करून दिली आहे. काळानुरूप गरजेच्या या आनंददायी उपक्रमाची अनुभूती माझ्यासह असंख्य औरंगाबादकरांनी घेतली आहे. मागच्या वेळी मी घोड्यावरुन पडलो होतो, मात्र आता मीही अनुभवी झालो असल्याने आता पडणार नाही, अशी कोपरखळीही घोडेले यांनी मारली. तसेच 'मटा'च्या पुढील वाटचालीसाठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या.

\Bतीन फेब्रुवारीला हॅपी स्ट्रीट\B

येत्या रविवारी, तीन फेब्रुवारी रोजीही हॅपी स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतीचौक ते उस्मानपुरा सर्कल यादरम्यान असलेल्या मार्गावर हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी सहा वाजता हॅपा स्ट्रीटला सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीज तंत्रज्ञाला केली मारहाण, अटकपूर्व जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वीज मीटर का काढले, असे म्हणत महावितरणच्या कार्यालयात जाऊन वरिष्ठ तंत्रज्ञाला शिविगाळ व मारहाण केल्याप्रकरणातील आरोपी किशोर खंदारे याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी फेटाळला.

या प्रकरणी शेख मतीन शेख शब्बीर (२८) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा जुबलीपार्क येथील महावितरणच्या कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. कार्यालयाच्या वतीने वीज बिल थकलेल्या ग्राहकांचे मीटर काढण्याची मोहिम सुरू आहे. त्यानुसार १५ जानेवारी रोजी फिर्यादी हा सहकाऱ्यांसह संसार नगर येथे मीटर काढण्याच्या मोहिमेवर गेला होता. त्यावेळी वीज ग्राहक कुसुम प्रमोद गणे यांनी वर्षभरापासून १६ हजार ८१० रुपये वीज बिल भरले नसल्यामुळे त्यांचे मीटर काढून कार्यालयात जमा करण्यात आले होते. दरम्यान, दुपारी दोनच्या सुमारास आरोपी किशोर खंदारे (३०, रा. संसार नगर) हा कार्यालयात आला व त्याने कार्यालयात धिंगाणा करून फिर्यादीला शिविगाळ व मारहाण केली. पुन्हा संसार नगर भागात दिसल्यास जिवे मारील, अशीही धमकी दिली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला असता कोर्टाने तो फेटाळला. प्रकरणात जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी एका संशयियाला मुंब्र्यातून अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंबई, ठाणे आणि औरंगाबादेत ऑगस्ट ते जानेवारीदरम्यान घातपात कारवाया करण्याचा कट रचणाऱ्या नऊ जणांना नुकतेच दशहतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पकडले. त्याचा आणखी एका साथीदारास ठाण्यातील मुब्रा उपनगरातून अटक केली. त्याच्या ताब्यातून लॅपटॉप, पेनड्राइव्ह आणि मोबाइल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला आहे.

दहशतवाद विरोधी पथकास ऑगस्ट २०१८ ते जानेवारी २०१९दरम्यान मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद शहरात गर्दीच्या ठिकाणी घातपात करण्याच कट उमत मोहंमदीय ग्रुपने रचला होता. याची गोपनीया माहिती 'एटीएस'च्या पथकास मिळाल्यामुळे त्यांनी उमत मोहमदीया ग्रुपवर लक्ष ठेवून औरंगबादेतील पाच आणि मुंब्रातील चा असा नऊ जणांना २२ जानेवारी रोजी अटक केली होती. ते नऊ जण पोलिस कोठडीमध्ये आहेत. पोलीस कोठडीदरम्यान उमत मोहमदीया ग्रुपच्या गुप्त बैठकीस सुरवातीपासून हजेरी लावणाऱ्या तलाह उर्फ अबू बकर हनिफ पोतरिक (२४, रा. एमरॉल्ड टॉवर, मुंब्रा) यांच्यावर 'एटीएस'ने लक्ष ठेवले होते. त्याला २६ जानेवारी रोजी सांयकाळी मुब्य्रातून अटक केली. त्याच्या ताब्यातून एटीएसने लॅपटॉप, मोबाइल, पेनड्राइव्ह जप्त केला आहे.

तलहा उर्फ अबुबकरला विशेष न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या समोर हजर करण्यात आले. अतिरिक्त लोकअभियोक्ता सतीश मुंडवाडकर यांनी आयएसच्या नऊ संशयितांच्या चौकशीमध्ये तलह उर्फ अबुबकरचे नाव समोर आले असून, त्यांनी रासायनिक द्रव्य कुठून आणले, कोणत्या शहरातील जलकुंभामध्ये विषारी रासायनिक द्रव्य मिळविणार होते. याची माहिती घ्यायची असल्यामुळे पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. न्यायालयाने ही मागणी ग्रह्य धरून तलहा उर्फ अबुबकर याला पाच फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारवर रावतेंची कौतुक फुले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कर्जमाफी योजनेपासून शेतकरी कसे वंचित आहेत, असा आरोप करत प्रत्येक गोष्टीत सरकारला कोंडीत पकडण्याची संधी शोधणाऱ्या शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी फडणवीस सरकारवर कौतुकाची अक्षरश: फुले उधळली. 'जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतून अधिकाधिक जणांना लाभ देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनांमध्ये सहभाग दर्शविल्यास भविष्यात क्रांती घडवून दुष्काळ मुक्तीची वाट दाखवू,' असा दावाही त्यांनी केला.

पोलिस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, पोलिस परिक्षेत्राचे महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पालिका आयुक्त निपुण विनायक, जिल्हा परिषदेचे सीईओ पवनीत कौर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह आदींची उपस्थिती होती. यावेळी रावते म्हणाले, 'औरंगाबादेत कमी पाऊस झाल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला. दुष्काळाला तोंड देण्याच्या उपायोजनांची अंमलबजावणीही तत्काळ सुरू केली. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटविण्याकरिता उपाय योजना केल्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विविध कामांवर ५२ कोटी रुपये खर्च केले असून ५८ हजार ९०० मजुरांना रोजगार मिळाला. जलयुक्त शिवार अभियानात ३०४ गावांमध्ये एक हजार ४०६ कामे सुरू आहेत. जागतिक बँकेच्या सहकार्यातून औरंगाबाद मधील पहिल्या टप्प्यातील ७७ आणि दुसऱ्या टप्प्यातील १९४ गावांमध्ये कामे सुरू आहेत. महामंडळामध्ये आवश्यक चार हजार ४१६ चालक तथा वाहक पदाची भरती करण्यात येते आहे. औरंगाबाद शहरातून शहर बसच्या माध्यमातून ५६० जणांना नवीन रोजगार मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात ९८६ कोटी २८ लाख रुपयांची कर्ज माफी केली. नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग म्हणजेच समृद्धी महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमीन दिली आहे. त्यांना बाजारभावापेक्षा पाच पट रक्कम दिली,' असे गौरवोद्गार काढत रावते यांनी फडणवीस सरकारची पाठ थोपटली.

\Bपरेडमध्ये पालिकेची बाजी

\Bदेवगिरी मैदानावरील परेडचे रावते यांनी निरीक्षण केले. शहर पोलिस विभाग, ग्रामीण पोलिस, भारत बटालियनच्या पथकाने शिस्तबद्ध पथसंचलन केले. या संचालनानंतर चित्ररथांचे सादरीकरण झाले. यात महापालिकेने स्वच्छ शहर, नवीन शहर बस, जुन्या गाड्यांच्या विरोधात केलेली कारवाई तसेच विविध योजनांचे प्रदर्शन चित्ररथांद्वारे केले. पालिकेच्या या चित्ररथांची चर्चा होती. सामूहिक संचलनात विविध विभागांनी चित्ररथांचे सादरीकरण केले. यात पालिकेबरोबरच सांघिक कवायत व मैदानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हातील विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते.

…………………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळकरी मुलांच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शाळकरी मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तणाव निर्माण होऊन त्यांच्यात भर रस्त्यावर तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २६ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता छावणीतील मिलिंद चौकात घडली. या घटनेनंतर दोन्ही गटाने आरोपींना अटक करा, या मागणीसाठी छावणी पोलिस ठाण्यासमोर धिंगाणा घालून एकमेकांवर दगडफेक केली.

शनिवारी सकाळी नऊ वाजता मिलिंद चौकात शाळकरी मुलांचे वाद झाले. यातून दोन गटांनी एकमेकांना मारहाण केली. याप्रकरणी प्रीतम प्रवीण आवसरे यांच्या तक्रारीवरुन शेख अनिस, फिरोज शेख, अब्दुल्ला, शेख मोहम्मद, शेख रफिक, असलम शेख यांनी तुषार, शॅमी भिसे, प्रीतम यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तर शेख इलियास शेख रफिक यांच्या तक्रारीवरुन समोरील गट त्यांचा लहान भाऊ शहबाजला मारहाण करत असताना ते सोडविण्यासाठी गेले असता त्यांना दगडाने मारहाण केली. दोघांच्या परस्परविरोधी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक सचिन मिरधे व पुरी पुढील तपास करत आहेत.

\Bदंगलीचा गुन्हा दाखल

\Bदरम्यान, दोन्ही गट हाणामारीनंतर पोलिस ठाण्यासमोर जमले. आरोपींना तत्काळ अटक करा, अशी घोषणाबाजी सुरू केली. ठाण्यासमोर पुन्हा वाद सुरू करून एकमेकांवर दगडफेक केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. याची स्वतंत्र दखल घेत छावणी पोलिसांनी दोन्ही गटातील शेख अफताफ शेख मोहम्मद, शेख अदिल शेख रफिक, शेख बिलाल शेख रफिक (रा. तिघेही रा. गवळीपुरा), प्रवीण राजकुमार अवसरे, कीर्तीराज उर्फ बाळा अनिल घोडके, अविनाश सुधाकर आठवले (रा. छावणी) यांच्याविरोधात दंगलीसह सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक रावसाहेब मुळे यांनी फिर्याद देऊन आरोपींना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघाच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांत समन्वयकांची बैठक रविवारी झाली. गेल्या वर्षभरात संघ आणि संघाशी संलग्नित विविध संस्थांनी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यमंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते.

भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सोमवारपासून जालन्यात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संघ समन्वयकांच्या आजच्या झालेल्या बैठकीचे मोठे महत्व आहे. राज्यातील ११ महसुली जिल्ह्यांमधील संघ प्रतिनिधी या समन्वय बैठकीसाठी उपस्थित होते. संघासोबत संलग्नित विविध संस्थांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. ही बैठक रविवारी सकाळी अकरा वाजता सुरू झाली. देवगिरी प्रांतसंचालक दाजी जाधव, पश्चिम संघ क्षेत्र चालक बाळासाहेब चौधरी, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

\Bनिवडणुकीच्या तोंडावर महत्त्व

\Bबैठकीत दुपारच्या सत्रात तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीसाठी उपस्थित झाले. राज्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला गेला तसेच काय उपाययोजना करण्यात येतील, याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठकीत मार्गदर्शन केल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी लोकसभा व सोमवारपासून होणाऱ्या भाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्रांत समन्वयकांच्या बैठकीस महत्व आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटदारांच्या समस्या सोडवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील इलेक्ट्रिक कंत्राटदारांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी मंत्रालय स्तरावर लवकरात लवकर बैठक घेऊ, असे आश्वासन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.

फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रक्टर्स असोसिएशन महाराष्ट्र तसेच औरंगाबाद इलेक्ट्रिक कॉन्ट्रक्टर्स असोसिऐशनच्या संयुक्त विदयमाने आयोजित तिसरे महाअधिवेशन तसेच इलेक्ट्रिक एक्स्पोच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख यांच्यासह असोसिऐशनचे अध्यक्ष अरुण अवघड पाटील, सचिव संजय वाघमारे यांच्यासह अन्य मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी असोसिऐशनचे अध्यक्ष अरुण अवघड पाटील यांनी राज्यातील कंत्राटदारांच्या समस्या खोतकर यांच्यासमोर मांडल्या. यात औरंगाबादचे अधीक्षक अभियंता कार्यालय पुण्याला हलविले आहे. हे कार्यालय पुन्हा औरंगाबादला आणावे. याशिवाय शासनाने प्रत्येक निविदा भरून घेण्यासाठी पाचशे रुपयांच्या बॉँडवर शपथपत्र देण्याचा नियम केला आहे. या नियमामध्ये बदल करून फक्त निविदा मिळालेल्या कंत्राटदाराकडून असे शपथ पत्र घ्यावे, अशी मागणी केली. याशिवाय एसी, लिफ्ट, फायर अशा विविध सुविधा देण्यासाठी एकत्रित निविदा काढण्यात येत आहे. यामुळे छोट्या कंत्राटदारांना अशा निविदांमध्ये भाग घेता येत नाही. याबाबत निर्णय घेण्याची मागणी केली.

\B१२ हजारावर लोकांनी दिली भेट

\Bश्री हरी पॅव्हेलियन येथे आयोजित इलेक्ट्रिक एक्स्पोमध्ये गेल्या तीन दिवसांत १२ हजारावर लोकांनी भेट दिली. एक्स्पोच्या शेवटच्या दिवशी इलेक्ट्रीकल वायरिंग बाबत अधीक्षक अभियंता विनय नागदेव यांनी मार्गदर्शन केले. तसेच एमजीएमच्या डॉ. अजिता अनक्षत्रे यांनी इलेक्ट्रिक शॉक लागल्यानंतर ह्दयविकार झटका येतो. अशा वेळी कोणत्या उपाय योजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहितेत अडकणार प्राध्यापक भरती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फेब्रुवारीपर्यंत चार हजार ७३८ जागा भरू, असे शिक्षणंत्र्यांचे आश्वासन कागदावर राहण्याची शक्यता असून, आगामी प्राध्यापक भरती आचरसंहितेत अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेट-सेट, पीएच.डीधारक बेरोजगारांमध्ये संताप आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.

राज्यातील विद्यापीठ आणि कॉलेजमधील रिक्त जागांपैकी ४० टक्के जागा भरण्यास सरकारने परवानगी दिली. तीन नोव्हेंबर २०१८ रोजी त्याबाबतचा अध्यादेश काढला. त्यानंतर उच्च शिक्षण संचालकांकडून सहसंचालकांना १२ डिसेंबरला सूचनापत्र दिले. मात्र, आता फेब्रुवारी सुरू होत आला तरी प्रक्रियेला गती नाही. अनेक कॉलेजांनी विद्यापीठ स्तरावरून 'रोस्टर अपडेट', 'मावक'ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यात सवर्ण आरक्षणाची घोषणा झाली. त्याची प्रकिया राज्यात फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा रोस्टरची प्रक्रिया नव्याने करावी लागेल असे नेट-सेट, पीएच.डीधारकांचे म्हणणे आहे. यासह भरती प्रक्रियेतील मार्गदर्शक तत्वे सहसंचालकांकडे आलेले नाहीत. त्यामुळे ना-हारकत प्रमाणपत्र मिळत नाही. एकंदर या प्रक्रियेसाठी लागणारा विलंब लक्षात घेता भरती प्रक्रिया आचारसंहितेत अडकेल अशी भीती बेरोजगारांना आहे. राज्यात विविध विषयात नेट-सेट, पीएचडीधारक पात्र बेरोजगारांची संख्या ५० हजार एवढी आहे.

\Bवाढीव पगारचाही अडथळा

\Bप्राध्यापक भरतीसह तासिका तत्वावरील प्राध्यापकांना मानधनात वाढ देण्याचे निश्चित करण्यात आले. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अध्यादेश काढण्यात आला. संचालकस्तरावरून सहसंचालकांना आदेशही देण्यात आले. मात्र, निधीचा अभाव, रखडलेली प्रक्रिया यात अनेक प्राध्यापकांना याचा प्रत्यक्ष लाभ झालेला नाही. त्यामुळे ही वाढही कागदापुरतीच राहिल्याचा आरोप बेरोजगार करत आहेत.

शिक्षणमंत्र्यांनी फेब्रुवारीपर्यंत जाहीर केलेल्या जागा भरू, असे आश्वासन दिले. मात्र, ते आश्वासन कागदावरच राहणार असे दिसते. आरक्षणाचे बदलणारी धोरणे, विद्यापीठ, सहसंचालक कार्यालयस्तरावरील संथ गतीने होणारी प्रक्रिया. त्यात आता सवर्ण आरक्षणाची प्रक्रिया करायची, तर पुन्हा प्रक्रिया लांबेल. त्यामुळे भरती अचारसंहितेत अडकेल असे दिसते आहे. फेब्रुवारी शेवटचपर्यंत काय तर जाहिराती निघू शकतील पण भरतीचे काय? असा प्रश्न आहे. आचारसंहितेत प्रक्रिया अडकल्यास आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू.

- डॉ. संदीप पाथ्रीकर अध्यक्ष, महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना

\B...अशी आहेत पदे

- \B१३९ - शारीरिक शिक्षण संचालक

- ३५८० सहायक प्राध्यापक

- १६३ ग्रंथपाल

- ८५६ प्रयोगशाळा सहायक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेब्रुवारीपर्यंत थंडीचा मुक्काम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात तापमानाचा चढ उतार सुरु आहे. गेल्या आठवड्यामध्ये ओसरलेल्या थंडीने दोन दिवसांपासून पुन्हा जोर धरला आहे. पहाटे तसेच सायंकाळी वातावरणात प्रचंड गारवा तसेच थंड वारे वाहत असल्यामुळे शहरात हुडहुडी कायम आहे. गार वारे वाहत असल्यामुळे शहरवासीयांची चांगलीच धावपळ होत आहे.

रविवारी शहराचे किमान तापमान १३ अंश सेल्सिअस होते. तापमान फारसे कमी झाले नसले तरी थंड वारे वाहत असल्यामुळे सकाळी आणि सायंकाळी प्रचंड थंडी जाणवत आहे. हवामान अभ्यासकांनुसार शहरात थंडीचा हा मुक्काम फेब्रुवारी अखेरपर्यंत राहणार आहे.

हवामान अभ्यासक व एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर म्हणाले, की अल निनोचा प्रभाव अद्यापही कायम असून वातावरण बदलामुळे येत्या वर्षामध्ये आपल्याकडे पाऊस तुलनेत लवकर सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या सुरु असलेली थंडीचा मुक्काम आणखी काही दिवस राहणार असून दरम्यानच्या काळामध्ये उन्हाचे चटकेही बसणार आहे.

८ जानेवारी रोजी हवामान विभागाने शहरामध्ये थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला असल्यामुळे मंगळवारी शहराच्या तापमानात ८.४ अंशापर्यंत घसरण झाली होती. जानेवारीच्या सुरुवातीला तापमानात वाढ झाल्यामुळे 'थंडी गायब झाली' असे वाटले होते मात्र आता थंडीने पुन्हा एकदा जोर धरला असल्याने शहरात हुडहुडी कायम आहे. डिसेंबरमध्ये थंडीत वाढ झाली होती, जानेवारी महिन्यामध्ये थंडीचा जोर काही प्रमाणात ओसरला होता. पण आता थंडीचा कडाका आणखी वाढला आहे. काही दिवसांपासून पहाटे थंडी व दिवसा कडक ऊन आणि सूर्य मावळताच पुन्हा थंडी असे वातावरण शहरवासीयांना अनुभवायला मिळत आहे. हवामान विभागानुसार येत्या आठवड्यात तापमानात पुन्हा घट होणार असल्यामुळे शहरात थंडी वाढण्याचा अंदाज आहे. यंदा शहरवासीयांना यावर्षी गुलाबी थंडी जरा उशिरानेच अनुभवायला मिळाली होती.

दिवस तापदायक

शहरातून अद्याप कडाक्याची थंडी असली तरी गेल्या आठवड्यापासून उन्हाचा चटका बसण्यास सुरुवात झाली आहे. दिवसा ऊन आणि रात्री थंड वारे अशी स्थिती झाली आहे. शहराच्या कमाल तापमानामध्ये काही दिवसांपासून वाढ होत असल्यामुळे उन्हाचा कडाकाही वाढत असल्याचे चित्र आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात ढगाळ वातावरण असले तरी उकाडा तापदायक ठरणार आहे. जानेवारी अखेरीस तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. १७ जानेवारी रोजी ३१.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकाभिमुख सिटीबस सेवा करणार

$
0
0

नवीन शहर बसला प्रतिसाद कसा आहे?

- नवीन शहर बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशीच्या तुलनेत पुढचे दोन दिवस चांगले उत्पन्न मिळाले. शहर बससेवेसाठी एसटी महामंडळाच्या ५५ आसनी बस चालत होत्या. आता ३२ आसनी बस स्मार्ट सिटी अंतर्गत देण्यात आल्या. या बसमधून पहिल्या दिवशी ६८०० जणांनी प्रवास केला. त्यातून ५२ हजार रुपये अर्थप्राप्ती झाली. तिसऱ्या दिवशी हा आकडा ८ हजारांच्या वर पोचला त्यातून ७६ हजारांचे उत्पन्न मिळाले. सर्वसाधारणपणे ४० टक्के वाढ झाली. विशेष म्हणजे यात कोणत्याही प्रकारचा विद्यार्थी पास किंवा अपंग पास योजनेचा अद्याप समावेश झालेला नाही. कोणत्याही शहर बस सेवेला इतका चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. हा प्रतिसाद आगामी काळातही चांगला ठेवून ही सेवा अधिक लोकाभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. लोकांच्या अपेक्षा शहर बसकडून वाढलेल्या आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

बससेवेच्या व्याप्तीवाढीचा पुढचा टप्पा कसा असणार आहे ?

- धारवाडहून (कर्नाटक) नवीन सिटीबसचा पुरवठा केला जातो. कंपनीकडून टप्प्याटप्प्यात नवीन गाड्या येतील. आरटीओ पासिंगनंतर या बस प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येतील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शहर बसच्या ताफ्यात ४० बस धावतील असे नियोजन करण्यात आलेले आहे.

२००१ ला ११० शहर बस होत्या आता खुप कमी आहेत?

- २००१ ला ११० बस होत्या हे खरे आहे. त्यानुसार आपण शहर बस वाढवित आहोत. निश्चित आगामी काळात प्रवाशांच्या मागणीनूसार त्यांना बस सेवा उपलब्ध होतील. असे नियोजन करण्यात आलेले आहे. शंभर शेडयूलचे आमचे नियोजन आता तयार आहेत. या सर्व गाड्या निश्चितच धावतील. शहरातील नागरिकांना चांगली शहर बस सेवा आम्ही देऊ.

शहर बसचे नियोजन कसं राहिल ?

- शहर बस नियोजनात आम्ही दोन ठिकाणच्या प्रवाशांचा विचार प्राथमिक केला आहे. यात रेल्वे कनेक्शन आणि एसटी स्टँडवर येणाऱ्या प्रवासी यांचा समावेश आहे. रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना शहर बसची सुविधा देण्यासोबत सिडको आणि मध्यवर्ती बस स्थानक येथून शहरातील विविध भागात बस सुरू केली जाईल. यामुळे आमच्या प्रवाशांना बस स्थानक किंवा शहरातून बस स्थानकाला येण्यासाठी सिटीबस उपलब्ध होतील. याशिवाय बीड बायपास या मार्गावर शहर बस सेवा वाढविण्यात येणार आहे. ट्रंक रूट (मुख्य मार्ग) वर शहर बस वाढतील. शिवाय विद्यापीठ, वाळूजसह शहराबाहेरील वसाहतींपर्यंत शहर बस पोचविण्याचा आमचा मानस आहे. शहराच्या जुन्या भागातही ही सेवा वाढणार आहे. ही सेवा टप्प्याटप्प्याने वाढणार आहे. मुख्य मार्गासह महत्वाच्या ठिकाणी दर पाच मिनिटांनी बस उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर केला जाणार आहे?

- एसटी महामंडळाने काळानुरूप बदल केला आहे. पूर्वी एसटीत बस स्टँडला महत्व होते. नंतर ग्राहकाभिमुख सेवा करण्यासाठी एसटीला बदलावे लागले आहे. आता एसटीची रातराणी स्लीपर कोच येत आहे. शहर बस सेवा सुरू करण्यापूर्वी आम्ही आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली येथील बससेवेचा अभ्यास केला आहे. आंध्रप्रदेशात कंट्रोलर हा प्रकार नाही. बस टर्मिनलमध्ये येण्यापूर्वी व्हिटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम ) वरून माहिती मिळते. त्याआधारे पब्लिक अनाऊन्स सिस्टममधून माहिती दिली जात आहे. आगामी काळात औरंगाबाद शहरातही ही पब्लिक अनाऊन्सिंग सिस्टम सह अन्य सेवा लोकांना मिळावी, याचा प्रयन्त सुरू आहे. एका अॅपवर शहर बसची सर्व माहिती लोकांना मिळणार आहे. तसेच बस मध्ये सगळ्या रुटची माहिती दिली जाईल.

शहर बसला रिक्षांचा त्रास आहे काय ?

- शहर बससेवा नसताना औरंगाबादेतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रिक्षांनीच सांभाळली. आम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमची सेवा मजबूत झाल्यानंतर प्रवाशांना चांगली सेवा मिळेल. हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धक असले तर आपली सेवा सुधारण्यास वाव मिळतो. त्यामुळे त्रास म्हणणे योग्य होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉटिंग एजंटचा खून, दोघांचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल परिसरात व्हॉट्सअॅप ग्रुपवरील पोस्टमुळे झालेल्या वादातून १८ जणांनी प्लॉटिंग एजंटचा खून केला होता. या प्रकरणात कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर नबी बुऱ्हाण पटेल व गुलाब रसुल पटेल या आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी फेटाळला.

या प्रकरणी प्रकरणात इरफान रहीम शेख (२४, रा. बेरीबाग, हर्सूल) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, व्हॉटस्अ‍ॅपवरील वादग्रस्त पोस्टच्या कारणावरून हर्सूल परिसरातील फातेमानगरात प्लॉटिंग एजंट मोईन पठाण (३५, रा. फातेमानगर, हर्सूल) यांचा खून करण्यात आला होता व फिर्यादीच्या तक्रारीवरुन हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात शेख रहीम पटेल, आबेद पटेल, शेख जावेद पटेल, तौफिक पटेल, आमेर पटेल, सद्दाम पटेल, शोहेब पटेल, मेहराज नूर पटेल व आसेफ पटेल या आरोपींना अटक करण्यात आली होती, तर उर्वरित आरोपींना फरारी घोषित करण्यात आले होते. दरम्यान, आरोपींविरोधात कोर्टात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपी नबी बुऱ्हाण पटेल (५५) व गुलाब रसूल पटेल (५५, दोघे रा. हर्सूल) यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. सुनावणीवेळी, गुन्हा गंभीर असून आरोपींना अटक केल्याशिवाय तपास होऊ शकत नाही. तसेच आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करणे बाकी असल्याने आरोपींना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. प्रकरणात अ‍ॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांना नववर्ष भेट कधी ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'३१ डिसेंबरपर्यंत रँडम पदवीधर शिक्षकांच्या पदस्थापना बदलून देऊन पदोन्नतीने जवळपास ३२० नवीन पदवीधर शिक्षक भरू,'अशी राणाभीमदेवी थाटातली घोषणा शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांनी केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनीही दुजोरा दिला होता. मात्र, महिना उलटून गेला तरी त्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे नवीन वर्षाची भेट कधी मिळणार, असा सवाल प्राथमिक शिक्षक संघाने केला आहे.

१० जानेवारी रोजी रँडम पदवीधर शिक्षकांना पदस्थापना बदलून देण्यासाठी समुपदेशनाला अगदी हजेरी घेऊन बसवून सुरुवातही केली. ४२ रँडम पदवीधरांना पदस्थापना बदलून, तर कित्येक विस्थापित शिक्षकांना पदवीधर पदोन्नतीत आपल्या कुटुंबाजवळ येण्याची संधी मिळणार होती. मात्र, अचानकपणे समुपदेशन रद्द करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने ग्रामविकास विभागाचे मार्गदर्शन मागवल्याचे रँडम पदवीधर शिक्षकांना दोन दिवसानंतर कळाले. ऑक्टोबर २०१८ पासूनची ही मागणी केली. आधीच मार्गदर्शन का मागविले गेले नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला. आठवडाभरात निर्णय घेतला गेला नाही तर पुन्हा उपोषण करावे, लागेल असा इशारा शिक्षकांनी दिला आहे. राज्यात फक्त जालना व औरंगाबाद जिल्ह्यातच पदवीधर शिक्षकांच्या रँडममध्ये बदल्या झाल्या. त्यापैकी जालना जिल्ह्याने जुलै महिन्यातच सर्व रँडम पदवीधर शिक्षकांना शासन आदेश २८/०६/२०१८ नुसार पदस्थापना बदलून दिल्या. राज्यात कोठेही पदवीधर शिक्षक रँडममध्ये गेलेच नाहीत. फक्त औरंगाबाद जिल्ह्यात गेले. त्यामुळे रँडम पदवीधर शिक्षकांना इतर जिल्ह्यात पदस्थापना बदलून देण्याचा प्रश्नच नाही. औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या चुकीमुळे पदवीधर शिक्षक रँडममध्ये गेले. कारण औरंगाबाद जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांचे २०१७-१८ चे विषयनिहाय समानीकरण चुकीचे केलेले आहे.

\Bसमानीकरणाचे भूत बोकांडी

\Bऔरंगाबाद, जालना सोडून राज्यभरात कोठेही पदवीधर शिक्षकांचे समानीकरणाच्या नावाखाली रिक्त पदे ठेवण्यात आलेले नाही हे विशेष. मार्गदर्शनाच्या नावाखाली विषय फार लांबवू नये, रँडम पदवीधर शिक्षकांच्या पदस्थापना बदलून देऊन लवकरात लवकर पदवीधर पदोन्नती करावी, अशी मागणी शिक्षक संघाने केली आहे. पदवीधर पदोन्नती पाच फेब्रुवारीपूर्वी करण्याची आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख मधुकर वालतुरे,राज्य प्रसिद्धीप्रमुख राजेश हिवाळे,जिल्हाध्यक्ष काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, बळीराम भुमरे, जे. के. चव्हाण, हारूण शेख, संजय भुमे, दिलीप साखळे, प्रशांत हिवर्डे आदींनी केली आहे.

---

\Bपदवीधर प्राथमिक शिक्षक समानीकरण अंतर्गत जिल्हाभरात तालुकानिहाय रिक्त जागा

\B---

\Bतालुका भाषा, गणित, विज्ञान व सा.शा.

\B---

औरंगाबाद ७ १७ ३५

गंगापूर ८ ४२ १०

कन्नड १९ २३ १०

खुलताबाद ७ ११ ८

पैठण १७ २६ १४

फुलंब्री ८ १५ ८

सिल्लोड १३ ३८ २१

सोयगाव ६ ११ ४

वैजापूर ११ ३७ ११

एकूण ९६ २२० १३०

एकूण -४४६

\B(४४६+सध्या रिक्त ३२=४७८)

\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलाबी थंडीत उत्साहाला उधाण

$
0
0

\Bगुलाबी थंडीत उत्साहाला उधाण\B

गुलाबी थंडी, संगीत, झुंबा नृत्याच्या तालावर नाचणारी तरुणाई यासह 'लिंगोरचा', 'भोवरा' अशा जुन्या खेळांची गंमत-रंगत अनुभवत शहरवासीयांनी 'हॅपी स्ट्रीट'चा रविवार धम्माल गाजवला. 'महाराष्ट्र टाइम्स', 'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या पुढाकारने यंदाचा पहिला 'हॅपी स्ट्रीट' उत्साहात झाला. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या उस्मानपुरा कार्यालयासमोरील रस्त्यावर हा सोहळा रंगला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात नागरिकांनी उपक्रमाला गर्दी करण्यास सुरुवात केली. काहीवेळातच रस्त्यावर उत्साहाने भरलेली सकाळ अनुभवायला शहरवासीयांनी गर्दी केली. यात बच्चे कंपनी, तरुणाई, महिला, नागरिक अन् अबाल वृद्धांची ही उपस्थिती लक्षणिय होती. झुंबा सुरू झाला सरसळता उत्साह रस्त्यावर अनुभवायला मिळाला. संगीताच्या ठेक्यावर प्रत्येकाला डोलायला लावणारा या प्रकारात उपस्थित प्रत्येकाने आनंद लुटला. यासह 'योगा', 'कॅलिग्राफी' 'फन गेम' मधील विविध कला, क्रीडा प्रकारांमध्ये प्रत्येकाला सहभागी होण्याची निर्माण झालेली इच्छा अन् प्रत्येकाचा सहभाग हा उत्तरोत्तर 'हॅपी स्ट्रीट' रंगत आणणारा ठरला. सायकलींग, स्केटिंग, मिनी जीममध्येही उत्साहाने सहभागी होत शहरवासी, तरुणाईने स्वागत केले. तर विंटेज कार रॅलीने लक्ष वेधले.

\B

विटेंज कारची सवारी\B

हॅपी स्ट्रीटमध्ये विटेंग कारची सवारी अन् फोटोशेसनमध्ये शहरवासी रमले होते. लाला चव्हाण यांनी १९२८ची फोर्ड लक्ष वेधत होती, तर संजय आव्हाड यांच्याकडील १९७३च्या लँड लोव्हरजवळ उभे रहात अनेकजन त्या आठवणींमध्ये रमत होते. चव्हाण यांनी तर उपस्थितांसमोर सवारी करत विटेंग कारकडे सर्वांचे लक्ष वेधले.

\B'फन गेम', 'मिनी जीम'

\Bझुंबासह 'फन गेम'मधील पारंपारिक खेळांचा आनंद शहरवासीयांनी हॅपी स्ट्रीटच्या माध्यमातून लुटला. लहानपणी खेळलेल्या विविध खेळात मनमुराद रमले. यामध्ये गोट्या खेळताना वर्तुळाकारात गोट्या ठेवून नेम धरण्यापासून ते 'लिंगोरचा'मध्ये प्रतीस्पर्धीला चितपट कसे करता येईल याची धम्माल ही अनुभवली. भोवऱ्याची दोरी गुंडाळण्यापासून तो टाकताना किती अधिकवेळ फिरतो यातही अनेकजन गुंग होते. बॅटमिंटन, डिस्क गेम, कोन्स गेमनेही आपल्यातील बालपण अनेकांना आठवणारे ठरले. 'मिनी जीम'मध्ये फक्शनल अॅक्टिव्हिटी होत्या. टायर पुलिंग, स्टेपर, केटल बेल, बॉक्सींग यातून शरीराची तंदुरुस्ती अनुभवली. यासाठी शेख माजेद, अंकुश विसपुते, तारेख शेख, सय्यद रिझवान, सईद चाऊस, अब्दुला चाऊस, शोएब मिर्झा, अझहर शेख यांनी त्यासाठी परिश्रम घेतले.

\B'फोटोसेशन'मध्ये रंगले औरंगाबादकर

\Bविंटेज कार, 'मटा'च्या सेल्फी पॉइंटवर फोटोसेशनचा धडाका सुरू होता. विशेषत: तरुण, तरुणी आणि महिलांसह बच्चे कंपनी फोटो काढण्यात दंग होती. आपल्या परिवारासोबत, मित्र-मैत्रिणींसोबत अन् कलाकरांसोबत फोटो, सेल्फी काढण्यासाठी अनेक क्लिकवर क्लिकची बरसात सुरू होती.

'योगासनांचे प्रशिक्षण

आरोग्यासाठी योगासनांचे महत्त्व सांगणारा योगासनांचा उपक्रमही हॅपी स्ट्रीटसाठी लक्ष वेधक ठरला. योग प्रशिक्षक शीतल थोरात यांनी योगासनांबाबत मार्गदर्शन केले. सकाळी सुरुवातीच्या टप्प्यात तरुण-तरुणींसह महिला, पुरुषांनी सहभाग नोंदविला. थोरात यांनी सुरुवातीला वॉर्म अप करून घेतले. यानंतर सूर्यनमस्कार, ताडासन, त्रिताडासन, नटराज असन, वृक्षासन, दिकोणासन, अर्धकटी चक्रासन आदी आसन उपस्थितांनी केले.

\B'सायकलिंग'चा मजेदार अनुभव

\Bहवेशीर मोकळ्या मार्गावर सायकलिंगचा अनुभव काही औरच असतो. अरोग्यासाठी असलेला फायदा इतरांनाही पटवून देत शहरातील अनेक सायकलस्वार हॅपी स्ट्रीटमध्ये सहभागी झाले. तर, काहींनी तर अनेक महिन्यांनतर हा अनुभव घेत जुन्या आठवणींमध्ये रमले नसतील तर नवलं. सायकलिंगमध्ये असोसिएशनचे विजय व्यवहारे, चरणजितसिंग संघा, हिमांशू देशमुख, राजकुमार मालाणी, अब्दुल हई, अभिजित कुलकर्णी यांनी सहभागी होत इतरांनाही मार्गदर्शन केले.

\Bबच्चे कंपनीची 'स्केटिंग'

\Bहॅपी स्ट्रीटवर बच्चे कंपनीची स्केटिंगही प्रत्येकाला प्रोत्साहित करणारी होती. चार वर्षांपासून ते १२-१५ वर्षांपर्यंतच्या मुलांनी यात सहभाग घेतला. अतिशय उत्तम स्केटिंग सादर करत या मुलांनी सर्वांची वाहवाह मिळविली. 'रोल रिलेज स्केटिंग'चे भिकन अंबे, राधिका अंबे, नंदित कुलकर्णी, आर्या धामणगावकर, अर्थव कुलकर्णी, साई अंबे, विराज गायकवाड, दानिश शेख आदींचा सहभाग होता.

पथनाट्यातून 'वाहतूक सुरक्षे'वर भाष्य

'हेड फोन'वर गाणे ऐकत गाडी चालवणे असो की, दारू पिऊन गाडी चालवणे ते कसे जीवावर बेतते हे प्रभावीपणे पथनाट्यातून तरुणाईने मांडले. झुंबा, पारंपारिक खेळांमध्ये रमलेल्यांना अशा माध्यमातून वाहतूक सुरक्षेबाबत जागृती करण्याचा प्रयत्न टाळ्यांनी दाद मिळवून गेला. शहरांमध्ये वाहन चालविताना अनेकजन बेशिस्त गाडी चालविताना आपण पाहतो. तशा प्रसंगातून कशा प्रकारे अपघात होतो अन् नाहक जीव गमवावा लागतो असा संदेश पटना‌ट्यातून तरुणांनी दिला. हेड फोनवर गाणे ऐकत जाणारी एक मुलगी सिग्नल तोडते अन् पुढे जाते तेवढ्यात तिला दारू पिऊन एकजन धडकतो. असा प्रसंगात उत्तम अभिनय या तरुणांनी केला. दारू पिऊन गाडी चालवू नका, सिग्नल तोडू नका, हेल्मेट वापरा, वाहतुकीचे नियम पाळा असा संदेश त्यातून त्यांनी दिला. त्यांच्या अभिनयाला उपस्थितांनी टाळ्या, शिट्यांची दाद दिली. पथनाट्यात गायत्री मथाडे, विशाल जाधव, वैभव देशपांडे, वैभव जोशी, अनिरुद्ध राजपूत, अनिल अनुमंन्ते, गजानन वाबळे, राहूल दाभाडे, प्रशांत वाघमारे, मनिषा कुंटे, विशाल मगरे यांनी अभिनय केला. यानंतर या तरुणांनी हॅपी स्ट्रीटमध्ये हातात फलक घेत फेरीही काढली. 'वाहतुकीचे नियम पाळा, दंडात्मक कारवाई टाळा', 'दुर्घटना पर लगेगा ताला, जब पहनोगे सुरक्षा की माला', 'मत करो इतनी मस्ती जिंदगी नही है सस्ती' अशा आशयाची ही फलक होती. या तरुणांमध्ये उद्योजक प्रशांत देशपांडे ही सहभागी झाले.

अतिशय छान असा हा उपक्रम. यामध्ये आम्ही वाहतुक सुरक्षा, वाहने चालविताना काय काळजी घ्यावी, यावर भाष्य केले जे सर्वांना आवडले.

- अनिरुद्ध राजपूत

दुचाकी चालविताना अनेकदा हेड फोनवर गाणे ऐकत गाडी चालवितात. दुचाकी चालविणाऱ्यांकडून अनेकदा वाहतुक नियमांकडेही दुर्लक्ष केले जाते.

- गजानन वाबळे

रस्त्यावर होणारे अपघात ही मोठी समस्या आहे. ते टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी या दृष्टीकोनातून आम्ही पथनाट्य तयार केले ते सादर केले.

- प्रशांत वाघमारे

दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करणे हे महत्वाचे असते. वाहतूक नियम हे आपल्या भल्यासाठी असतात, त्याचे पालन करणे हे आपली कर्तव्य आहे.

- मनिषा कुंटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खून प्रकरणात आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बजाजनगर परिसरातील हॉटेलचालकाच्या खून प्रकरणातील आरोपी सोनू हरिश्चंद्र शर्मा याला अटक करून कोर्टात हजर केले असता, आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिले.

या प्रकरणी मृत कमलेश पनिका (३८, मूळ रा. उत्तर प्रदेश, ह. मु. बजाजनगर) यांचा भाऊ मनमोहन श्यामलाल पनिका (३५, रा. बजाजनगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचा भाऊ बजाजनगरात हॉटेल चालवत होता व तिथेच एकटा राहात होता. दरम्यान, भावाला डोक्याला गंभीर मार लागल्याचा फोन फिर्यादीला आल्यावरून फिर्यादीने त्या ठिकाणी धाव घेतली होती. गंभीर जखमी कमलेश यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. प्रकरणात तक्रार दिल्यावरून भादंवि ३०२ कलमान्वये वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालामध्ये गंभीर जखमांमुळ‍ेच मृत्यू झाल्याचे व मृत कमलेश यांचा फोन जागेवर नसल्याचेही स्पष्ट झाले होते. फोन लोकेशनवरून आरोपी आरोपी सोनू हरिश्चंद्र शर्मा (२५) याला प्रयागराज येथे कुंभमेळ्यातून ताब्यात घेण्यात आले. त्याला अटक करून कोर्टात हजर केले असता, खुनामागचा नेमका उद्देश काय, आरोपी कुठे-कुठे गेला होता व त्याला कुणी मदत केली का आदी बाबींच्या सखोल तपासासह आरोपीकडून मृताचा मोबाईल जप्त करणेही बाकी आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादमध्ये कृषी प्रदर्शन; एक फेब्रुवारीपासून सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, मराठवाडा शेती सहाय्य मंडळ, सीड इंडस्ट्रीज असोसिएशन अशा विविध संघटनातर्फे एक ते चार फेब्रुवारीदरम्यान औरंगाबादमध्ये 'कृषी प्रदर्शन व शेतातील पीक प्रात्यक्षिक'चे आयोजन करण्यात आले आहे. नवतंत्रज्ञान, नवे वाण आदींची माहिती यातून देण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती मंडळाचे वसंत देशमुख, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अॅग्रीकल्चर असोसिएशनचे उपाध्यक्ष उमेष दाशरथी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पैठण रोडवरील कृषी तंत्र विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, कुलगुरू डॉ. अशोक ढवण, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, कृषी आयुक्त एस. पी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रदर्शनात दोनशे विविध स्टॉल असणार आहेत. यामध्ये बियाणे, लागवड तंत्रज्ञान, कीड नियंत्रण, शेतमाल विपणन, शेती पूरक उद्योग, सेंद्रिय शेती, प्रगत पशू पालन, कुक्कुटपालन, रेशीम उत्पादन, आधुनिक दूध उत्पादन, फळ उत्पादन यांसह आधुनिक तंत्रज्ञानाचा शेती योजनांची माहिती या विषयांशी निगडित स्टॉल असणार आहे. यावेळी शेती बाजाराही असणार आहेत.

\Bपीक प्रात्यक्षिक होणार

\Bप्रदर्शनात पीक प्रात्यक्षिकही असणार आहेत. ज्यामध्ये उपस्थितांना गहू, हरबरा, मका अशा धान्यांसह भाजीपाला यांच्या वाणांचे प्रात्यिक्षिक पाहता येणार आहेत. चार दिवसांत होणाऱ्या विविध चर्चासत्रात अनेक विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेला प्राचार्य के. टी. जाधव, व्यापारी महासंघाचे लक्ष्मीनारायण राठी, हरिसिंग, डॉ. किशोर झाडे, किशोर पाटील, भगवान काळे, प्रकाश उगले यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धूमस्टाइल दुचाकीस्वारांने ज्येष्ठ नागरिकाला उडवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धूमस्टाइल दुचाकीस्वारांनी शहराच उच्छाद मांडला असून, शुक्रवारी स्टंट करत निघालेल्या दोन तरुणांनी एका पंचाहत्तरीच्या घरात असलेल्या आजोबांना उडवून पोबारा केला. तुकाराम धनाजी मोकळे (वय ७५, रा. गौतमनगर, सिडको) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जाधववाडी परिसरातील एका हॉटेल चालकाने दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम मोकळे हे पिसादेवीकडून आंबेडकरनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने जात होते. त्यावेळी पाठीमागून धूमस्टाइल स्टंट करत असलेल्या दोन तरुणांनी त्यांना धडक दिली. यात मोकळे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हॉटेल चालक आणि परिसरातील नागरिकांनी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. यात मोकळे यांच्या उजव्या पायाला फॅक्चर झाले असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक पटेल हे करीत आहेत. दरम्यान, सिडको आणि एमआयडीसी सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था, वैद्यकीय सुविधा, राष्ट्रीयकृत बँक, पतसंस्था, व्यापारी पेठ, विविध क्लास आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. यात विद्यार्थी, विद्यार्थिनी, रुग्ण, शेतकरी यांची सर्वाधिक वर्दळ असते. यामुळे हे दोन्ही परिसर नेहमी गर्दीने गजबजलेले असतात. सकाळी नऊ ते बारा दरम्यानही मोठी रहदारी असते. यावेळी प्राथमिक व माध्यमिक शाळा भरते, तर उच्च माध्यमिक शाळा सुटत असते. अशाच वेळी विना सायलेन्सरच्या दुचाकी भरधाव वेगाने चालवत युवकांची स्टंटबाजी सुरू असते. याचा त्रास लहान मुले, युवती, वयस्कर लोकांना होत आहे. एखाद्या वेळी अशा सुसाट येणाऱ्या वाहनाचा ताबा सुटला तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करून पोलिस यंत्रणेने अशा युवकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिद्धार्थ उद्यानासाठी आता ई - रिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या वृद्ध व अपंग व्यक्तींच्या सुविधेसाठी दोन ई-रिक्षा (बॅटरी ऑपरेटेड रिक्षा) खरेदी करण्यात आहेत. प्रजासत्ताक दिनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते या रिक्षांचे लोकार्पण करण्यात आले.

ई- रिक्षांना लिथियम बॅटरी वापरण्यात आली असून, त्यामुळे बॅटरी एक वेळा चार्ज केल्यानंतर ही रिक्षा १३० ते १५० किलोमीटरपर्यंत धावते. चार ते पाच तासांमध्ये ही बॅटरी फूल चार्ज होते. इनबिल्ट जीपीएस सिस्टीम व म्युझिक सिस्टिम असलेली या रिक्षा २० ते ३० किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकतात. रिक्षात चार प्रवासी व चालक अशी क्षमता आहे. ई-रिक्षा लोकार्पणप्रसंगी विरोधी पक्षनेता जमीर कादरी, नगरसेवक सीताराम सुरे, सचिन खैरे, शोभा बुरांडे, रामेश्वर भादवे, कीर्ती शिंदे, अर्चना नीळकंâठ, आयुक्त डॉ. निपुण विनायक आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा वाहतूक ठप्प, उद्घाटनाचा देखावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील कचरा संकलन व वाहतुकीच्या कामाचे २६ जानेवारी रोजी महापालिकेने थाटात उद्घाटन करत रविवारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले. मात्र, रविवारी प्रत्यक्षात ही कामे सुरू झालीच नाही. त्यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी लागेल, असे सांगण्यात आले.

शहऱ्यातील कचऱ्याच्या प्रश्नाकडे पालिकेचे दुर्लक्ष सुरू आहे. कचरा प्रक्रिया केंद्र उभारले मात्र, त्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण क्षमेतेने सुरू नाही. त्यात कचरा संकलन व वाहतुकीची जबाबदारी एका खासगी कंपनीला देण्यात आले. हे काम पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले. संकलन व वाहतुकीसाठी लागणाऱ्या कचरा संकलन वाहनांचे पूजन शनिवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आले. रविवारी कामाला सुरुवात होईल असे सांगण्यात आले. मात्र, काम सुरू होवू शकले नाही. शहर बस सेवेप्रमाणे हा कार्यक्रमही केवळ देखाव्यासाठी होता का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही कंपनी शहरात घरोघरी जाऊन कचरा जमा करणार आहे. शहरातील काही ठिकाणी तो एकत्र करत तो कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहचता करणार आहे. तिथे कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

\Bकर्मचाऱ्यांची नेमणूक नाही

\Bकचरा वाहतूक, संकलनाचे काम आता प्रत्यक्षात केव्हा सुरू होईल असा प्रश्न आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने अद्याप कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे आणखी आठ दिवस संकलन व वाहतुकीचे काम सुरू होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून या समस्येकडे महापालिकेचे किती दुर्लक्ष होत आहे, हेच समोर येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरूरच्या शब्बीर मामूचा पद्म पुरस्काराने गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यातील दोघांचा यंदाच्या पद्म पुरस्कारासाठी निवड झालेल्या यादीत समावेश आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक वामन केंद्रे आणि गोरक्षक सय्यद शब्बीर यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

बीड जिल्ह्याचे नाव नेहमी मागास आणि दुष्काळी जिल्हा म्हणून घेतले जाते. मात्र, याला छेद देत एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा कार्य बीडच्या भूमिपुत्रांनी वेगवेगळ्या क्षेत्रात केले आहे. साहित्य, कला, क्रीडा, नाट्य, चित्रपट, संगीत, राजकारण, समाजकारण या विविध क्षेत्रात बीडची पताका उंचावण्याचे काम बीडच्या भूमिपुत्रांनी केले आहे. यात आणखी भर पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पडली आहे.

जिल्ह्यातील शिरूर कासार हा सर्वात मागास तालुका म्हणून ओळखला जातो. शिरूरपासून अवघ्या तीन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या दहिवंडी शेतातील वस्तीवर राहणारे सय्यद शब्बीर हे गेल्या २० वर्षांपासून गोशाळा चालवतात. आपल्या दावनीला असणारी जनावरे सकाळी सोडून डोंगरात जगवायची हा दिनक्रम असणाऱ्या शब्बीर मामू यांनी त्यासाठी कसलेही अनुदान कुणाकडे कधीच मगितले नाही. जी मदत मिळेल त्यावर समाधान मानत मुक्या जनावरांची शेण झाडलोट ते २० वर्षांपासून करीत आले आहेत. आपल्या कामाचे कसलीही मार्केटिंग न करता काम प्रामाणिकपणे करणारे शब्बीर मामू यांनी आज दुष्काळी स्थितीत ८५ गाई संभाळल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच कुटुंब या गोसेवत कार्यरत आहे.

निस्वार्थाने गो सेवा करणाऱ्या शब्बीर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या कामाची दखल सरकारी पातळीवर घेतली गेली असेच म्हणावे लागेल. त्यांना या पुरस्कारा जाहीर झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना आतापर्यंत आपण केलेल्या गोसेवेचे चीज झाले अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

वामन केंद्रे यांच गाव दरडवाडी ज्या गावी जाण्यासाठी मागच्या पाच वर्षापर्यंत धड रस्ताही नव्हता अशा गावातील वामन केंद्रे यांचा बीड, मुंबई, दिल्लीपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. दरवर्षी आपल्या गावी वडिलांची आठवण म्हणून राष्ट्रीय पातळीवर भारुड महोत्सव ते आयोजित करून आपली आणि गावाशी असणारी नाळ तुटू देत नाहीत. त्यांचा ही सन्मान यंदा होणार आहे.

बीड जिल्ह्याची मान उंचावली
पद्मश्री शंकर बापू अपेगावकर यांना त्यांच्या पखवाज वादन क्षेत्रातील कार्यासाठी बीड जिल्ह्याला पहिल्यांदा पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. आता मात्र सय्यद शब्बीर आणि वामन केंद्रे यांच्या निवडीने बीड जिल्ह्याची मान उंचावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकतेयः दानवे

$
0
0

जालना

भाजप विरोधकांची अवस्था मोठी बिकट झाली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुणावरही भरोसा न ठेवता आपल्याला नेमून दिलेलं काम करावं, अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना केल्या. यामुळे शिवसेना-भाजपची युतीवरून संभ्रम कायम आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

भाजपच्या प्रदेश कार्यकारणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, बबनराव लोणीकर, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासह प्रदेश कार्यकारीणीचे पदाधिकारी उपस्थित आहेत. मराठा समाजाचे आरक्षण, पीक विमा योजना, आयुष्यमान योजना, उज्ज्वला योजना यातून देशातील गरीबांना पंतप्रधान मोदींनी मदत केली आहे, असं दानवे म्हणाले.

दानवे यांनी अतिशय गंभीर भाषण केले. निवडणूक समोर आली आहे म्हणून असे भाषण केल्याची प्रतिक्रिया भाजपच्या राज्य प्रभारी डॉ. सरोज पांडे यांनी दिली. विशेष म्हणजे भाजपच्या या कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेसोबतच्या युतीबाबत दानवे यांनी कुठलाही उल्लेख केला नाही. पण विरोधी घाबरून गेले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे, असा अप्रत्यक्षपणे टोला त्यांनी शिवसेनेला लगावल्याच्या प्रतिक्रिया कार्यकारिणीतून उमटत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images