Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तहसीलचा कारभार आता सुसाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माहिती तंत्रज्ञानाच्या वापरातून सर्वसामान्यांच्या कामांचा तत्काळ निपटारा करणे व कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळपास सर्व विभागांमध्ये ई-ऑफिसच्या माध्यमातून कामकाज सुरू करण्यात आले आहे. येत्या आठ दिवसांमध्ये तालुका; तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे कामकाजही पूर्णपणे ई-ऑफिसच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे आता ग्रामीण भागातील फायलींचा प्रवासही डिजिटल माध्यमातून वेगाने होणार आहे.

संपूर्ण कामकाज ई-ऑफिसच्या माध्यमातून करण्यासाठी संबंधित कार्यालयांना स्कॅनर, प्रिंटरही देण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाने सर्व सरकारी कार्यालयांना 'ई-ऑफिस' प्रणालीचा वापर करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी उदय चौधरी पाऊल उचलत आहेत. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांमध्ये ई-ऑफिसच्या माध्यमातून काम करणे सुरु झाले असल्यामुळे कार्यालयातील फायलींचा डिजिटल प्रवास सुरू झाला आहे. यामुळे सध्या प्रत्येक विभागप्रमुखांच्या टेबलावर आलेल्या एका फाइलचा निपटारा सरासरी पाच दिवसांत करण्यात येत आहे. प्रशासकीय कामकाजाचा वेग वाढावा म्हणून आता जिल्हाप्रशासनाने प्रत्येक तालुकास्तरावरील कामकाज ई-आफिसच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी येत्या आठ दिवसांमध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

तत्कालीन 'टेक्नोसेव्ही' जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ई-ऑफिस करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु या कामात कम्प्युटरची संख्या, जुने कम्प्युटर व कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आदी आव्हाने निर्माण झाली होती. दरम्यानच्या काळात त्यांची बदली झाली होती, नवल किशोर राम यांच्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले उदय चौधरी यांनी मात्र पेपरलेस ऑफिस करण्यासाठी टप्प्यप्प्यांने प्रवास सुरू केला असल्याचे चित्र आहे.

\Bदोन दिवस प्रशिक्षण\B

'ई-ऑफिस' प्रणालीचा वापर कसा करावा यासंदर्भात तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लिपिकापासून नायब तहसीलदार, तहसीलदारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सात व आठ फेब्रुवारी रोजी हे प्रशिक्षण होईल. यासाठी शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रशिक्षक येणार आहेत. या सर्व कर्मचाऱ्याचे ई-मेल आयडी, डीजीटल सही, स्कॅनर यांसह पूर्वतयारी अगोदर केली असून, प्रशिक्षणांनतर काही दिवसांत तहसीलमध्ये यावर काम सुरू होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी दिली.

\Bप्रत्येक तहसीलला पाच स्कॅनर

\Bजिल्हाधिकारी कार्यालयाने ई-ऑफिससाठी शंभर स्कॅनर घेतले आहेत. यामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयाला पाच स्कॅनर पाठवण्यात आले आहेत. उपविभागीय कार्यालयाला दोन स्कॅनर देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विभागीय लोकशाही सोमवारी दिन

$
0
0

औरंगाबाद : विभागी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या दालनामध्ये सोमवारी (११ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

विभागीय लोकशाही दिनासाठी मुदतीत व विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज सादर केले असतील, अशा नागरिकांनाच ११ फेब्रुवारी रोजी समक्ष अर्ज सादर करण्याची परवानगी राहील. यापूर्वीच्या विभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेले असतील, परंतु त्यांच्या प्रकरणात अद्याप कार्यवाही झाली नाही, अशा प्रकरणात त्यांनी पुन्हा अर्ज देण्याची आवश्यकता नाही. त्याच दिवशी लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय स्तरावरील विभागीय महिला लोकशाही दिनाचेही आयोजन करण्यात आले असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्दळीच्या रस्त्यावरील पानटपरी फोडून चोरी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भर रस्त्यावर असलेली उस्मानपुरा चौकातील सिमला पान सेंटर फोडून चोरट्यांनी २३ हजारांचा ऐवज लांबवला. हा प्रकार रविवारी रात्री घडला. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी खलीलखान रज्जाकखान (वय ४८, रा. शिवराज कॉलनी, गादिया विहार) यांनी तक्रार दाखल केली. खलीलखान यांची उस्मानपुरा चौकात सिमला पान सेंटर नावाने पानटपरी आहे. रविवारी रात्री सव्वाअकरा वाजता ते टपरी बंद करून घरी गेले होते. सोमवारी सकाळी साडेसात वाजता टपरी उघडण्यासाठी ते नेहमीप्रमाणे आले. टपरीचे समोरचे शटर त्यांनी उघडले असता त्यांना टपरीच्या मागच्या बाजूचा लहान दरवाजा उघडा दिसला. त्यांनी टपरीची पाहणी केली असता त्याना वरच्या बाजूचे सिलिंगचे पत्रे उचकटलेले दिसून आले. चोरट्यांनी पत्रे उचकटून आतमध्ये प्रवेश केला होता. टपरीमधील रोख आठ हजार आणि तंबाखू, सिगारेटचा माल असा एकूण २३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला असल्याचे यावेळी दिसून आले. याप्रकरणी खलीलखान यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bसीसीटीव्हीत चित्रीकरण

\Bचोरट्यांनी पाळत ठेवून ही चोरी केल्याचे दिसत आहे. पहाटे पावणेचारच्या सुमारास ही चोरी करण्यात आली. शेजारी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित चोरट्याचे चित्रीकरण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठलनामाच्या जयघोषात रंगला महासत्संग

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

'शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, त्या निश्चितच दूर होईल. त्यासाठी काही अवधी लागेल. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. देशाला व्यसनमुक्त करा, देशाच्या प्रगतीत आपले योगदान द्या,' अशा शब्दात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रवीशंकर यांनी भक्तांना साद घातली.

बीड बायपास येथील जबिंदा इस्टेट मैदानावर बुधवारी सायंकाळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने विठ्ठला महासत्संगचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित भक्तांना श्री श्री रवीशंकर यांनी आपल्या मधुरवाणीने भारावून टाकले. विश्वनाथ दाशरथे यांच्या गणेश वंदनेनंतर नेहा वेदमुथा यांनी प्रज्ञा योग विषयी माहिती दिली. त्यानंतर दाशरथे, सरला शिंदे आणि सहकाऱ्यांनी 'अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर...' 'खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे..' 'वेदांनाही नाही कळला अंत:पार याचा, कानडा राजा पंढरीचा' आदी भक्तिगीते सादर केली. श्री श्री रविशंकर यांचे व्यासपीठावर आगमन होताच 'जय गुरू देव'चा जयघोष करण्यात आला. टाळ आणि टाळ्यांच्या निनादात त्यांचे स्वागत करण्यात आले. खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडले यांनी त्यांचे पूजन केले.

गुरुजी म्हणाले, ईश्वर कणकणात आहे. ईश्वराला केवळ भक्तीची आस असते. दुसरी कुठली अपेक्षा नसते. तणाव दूर करण्यासाठी, ज्ञान, ध्यान आणि गाणे यांना जीवनात खूप महत्त्व आहे. इंग्लंडमधील एका शाळेत योगा, प्राणायमचे शिक्षण दिले जाते. आपल्या देशात याचे शिक्षण द्यावे, यासाठी कित्येक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. शेतकऱ्यांबाबत बोलताना गुरुजी म्हणाले, आपण प्रत्येकाने भोजनावेळी 'अन्नदाता सुखी भव,' अशी प्रार्थना केली पाहिजे. आपला पोशिंदा शेतकरी आहे, त्याला मदत केली पाहिजे. त्यांच्या काही समस्या आहेत. त्या निश्चित दूर होतील, त्यासाठी काही कालावधी लागेल आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत, असा दिलासा त्यांनी दिला.

\Bभव्य मूर्तीने केले आकर्षित

\B

कार्यक्रमस्थळी संयोजकांनी अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या विठुरायाची ५१ फूट उंच प्रतिमा उभी केली आहे. ही प्रतिमा कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. ५०० हून अधिक वारकऱ्यांनी विठुरायाचा केलेला गजर, पावलीनृत्याने वातावरण भक्तीमय झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'मनरेगा'त १३ हजार मजुरांना मिळाले काम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कामाची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने (मनरेगा) दुष्काळात ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम दिले आहे. जानेवारीच्या अखेरच्या हप्त्यामध्ये जिल्ह्यात सरासरी १३ हजार ६०८ मजूर रोहयोच्या कामावर लागले आहेत. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावरील कामांवर सर्वाधिक ११ हजार ७८६ मजुरांचे हात राबत आहेत.

बोंडअळी, अत्यल्प पावसामुळे शेतीची झालेली धूळधान यामुळे बळीराजाच्या हातालाच काम राहिले नाही. खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे उत्पन्न बोंडअळीने फस्त केले, तर पावसाअभावी रब्बी हंगामात अत्यल्प पेरणी झालीच नाही. यामुळे शेती आणि शेतकरी या दोन्हींची अवस्था बिकट झाली आहे. शेतीत राबत असलेले हेच हात आता रोजगार हमी योजनेच्या कामावर लागले असल्याचे चित्र औरंगाबाद जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात विविध यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामांच्या तुलनेत सर्वाधिक कामे ग्रामपंचायत यंत्रणांवर उपलब्ध आहेत. यामध्ये आठवड्याभरात ८२ हजार ५०० मजुरांची उपस्थिती होती. याचे आठवड्याभरात सरासरी प्रमाण ११ हजार ७८६ होते. ग्रामपंचायत पाठोपाठ रेशीम उद्योग यंत्रणेत मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे. तर या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद सिंचन, बाधकाम तसेच सार्वजनिक बांधकाम, लघु पाटबंधारे स्थानिक स्तर, या विभागांकडू कामे उपलब्ध झाले नाही.

\Bग्रामपंचायत स्तरावरील कामे\B

तालुका.................... सुरू असलेली कामे...................सरासरी मजूर उपस्थिती

औरंगाबाद...................४६.......................................३१९

पैठण.........................१०३......................................७४६

फुलंब्री.......................१८४......................................२१२४

गंगापूर........................२२२..................................१६१५

वैजापूर........................१५८................................६६१

खुलताबाद......................१८................................४४

सिल्लोड......................१३९................................४४१८

कन्नड........................१८४..............................१७१६

सोयगाव.....................१५..............................१४३

--------

एकूण..........................१०६९......................११७८६

---------

\Bयंत्रणानिहाय मजूर उपस्थिती अहवाल\B

---

यंत्रणा.................... कामे................. सरासरी मजूर उपस्थिती

ग्रामपंचायत..............१०६९....................११७८६

वन विभाग................२३......................४८५

सामाजिक वनीकरण....२१......................२२६

कृषी विभाग..............१९.......................२१४

रेशीम उद्योग विभाग......४१०....................८९७

----

एकूण.......................१५४२..................१३६०८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी दानवेंविरुद्ध लढणारच: खोतकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मी, फार पुढे गेलो आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आपण लोकसभा निवडणूक लढवणारच,' अशी भूमिका शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी बुधवारी स्पष्ट केली. 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाद मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री बोलले असतील, युती झाली किंवा नाही यापेक्षा मी, त्यांच्या विरोधात उमेदवार असणारच,' असेही त्यांनी सांगितले.

जालना जिल्ह्यात खोतकर-दानवे वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी खोतकर यांनी केली आहे. लोकसभेला दानवे यांच्या विरोधात उभे राहणार, असे यापूर्वी खोतकर यांनी अनेकवेळा सांगितले आहे. मात्र, जालना येथील पशु प्रदर्शनात खोतकर यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरवोद्गार काढत त्यांना चुचकारले. 'खोतकर-दानवे वादात मध्यस्थी करत घरात वाद होतातच, ते घरातच सोडवावेत. भाऊ म्हणून हा वाद मिटविण्याचा मी, प्रयत्न करीन,' असे त्यांनी सांगितले होते. औरंगाबादमध्ये एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित असताना 'मटा'सोबत बोलताना खोतकर यांनी त्यावर भूमिका स्पष्ट केली. 'मी, फार पुढे गेलो आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलले हे महत्त्वाचे नाही. त्यांनी काय बोलावे हे मी ठरवू शकत नाही. मात्र, मी, दानवे यांच्या विरोधात उमेदवार राहणार आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले. युती झाली तर काय या प्रश्नावर युती होईल की नाही त्यापेक्षा मी, त्यांच्या विरोधात निवडणूक लढवताना दिसेल, हे निश्चित, असे त्यांनी निर्धोकपणे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन पोलिसांच्या कुटुंबीयांमध्ये हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवाजीनगर भागातील एका हॉस्पिटलसमोर दोन पोलिसांच्या कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी (सहा फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता घडली. हॉस्पिटल परिसरात झालेल्या या हाणामारीमुळे या भागात काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता.

गणेश संपत चव्हाण (रा. बोकुड जळगाव, ता. पैठण) यांनी त्यांची पत्नी सोनल चव्हाण यांना चार फेब्रुवारीला सायंकाळी पाचच्या सुमारास शिवाजीनगर येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे गणेश यांचे आई, वडील व सासू मुक्कामी होते. रुग्णालयात रात्री ११च्या सुमारास छाया हिरालाल राठोड, सरला प्रभाकर माने, संदीप हिरालाल राठोड, सचिन राठोड व अन्य एक नातेवाईक हे सर्वजण आले. रवी संपत चव्हाण कुठे आहे? अशी विचारणा केली. रवीला जीवंत सोडणार नसल्याची धमकी देऊन हे सर्वजण निघून गेले.

गणेश चव्हाण याचा भाऊ रवी संपत राठोड पुण्याहुन रुग्णालयात पाच फेब्रुवारीला सकाळी आला. गणेश यांच्या पत्नीला सुटी झाल्याने ते सकाळी ११च्या सुमारास हॉस्पिटलमधून बाहेर जात होते. त्यावेळी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरर छाया व सरला आल्या. त्यांनी गणेश यांच्या आईला मारहाण सुरू केली. तेथे हिरालाल राठोड, संदीप राठोड व अन्य एकजण आला. त्यांनी रवी संपत चव्हाण व संपत चव्हाण यांलाही फायटरने मारहाण सुरू केली. यानंतर गणेश चव्हाण यांच्या गटांकडूनही प्रत्त्युत्तर देण्यात आले. दरम्यान, सचिन राठोड, सरला राठोड, अनील चव्हाण, रवी शंकर चव्हाण, रामधन राठोड यांनीही हाणामाऱ्यात भाग घेतला.

या प्रकारामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. आसपासच्या लोकांनी तत्काळ पोलिसांना बोलावून घेतले. पोलिस आल्यानंतर ही परिस्थिती आटोक्‍यात आली. या हाणामारी प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, या तक्रारीनंतर या परिवारातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानांचे वेळापत्रक बदलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद-दिल्ली जाणाऱ्या विमानांच्या वेळापत्रकात आठवड्यातील तीन दिवसांत बदल करण्यात आला आहे. मुंबई विमानतळावर सुरू असलेल्या धावपट्टीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ७ फेब्रुवारी ते ३० मार्च दरम्यान हा बदल लागू असेल. आठवड्यातील तीन दिवस हे विमानतळ सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेच्या सुमार बंद असणार आहे.

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे काम ७ फेब्रुवारीपासून प्रत्येक आठवड्याच्या प्रत्येक मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी केले जाणार आहे. या कामामुळे २४० विमान रद्द करण्यात आले आहेत. मुंबई - औरंगाबाद - दिल्ली या मार्गावरील विमानांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. एआय ४४२ मुंबई-औरंगाबाद-दिल्ली हे विमान मुंबईहून सायंकाळी पाच वाजता निघेल. हे विमान औरंगाबादला सहा वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल. औरंगाबादहून हे विमान दिल्लीकडे सहा वाजून ४० मिनिटांनी निघेल. दिल्लीला हे विमान रात्री आठ वाजून २५ मिनिटांनी पोहचेल. दरम्यान, सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी हे विमान आपल्या जुन्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे. दिल्लीहूनही या विमानाचे वेळापत्रक तसेच कायम राहणार आहे.

\B………या दिवसांसाठी बदल

फेब्रुवारी\B - ७, ९, १२, १४, १६, १९, २०, २१, २३, २६

\Bमार्च\B - २, ५, ७, ९, १२, १४, १६, १९, २१, २३, २६, २८, ३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्त म्हणतात, ४० एमएलडी पाणी वाढवण्याचे नियोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरासाठी ४० एमएलडी पाणी वाढवण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी दहा एमएलडी पाणी होलानी पॅटर्ननुसार, तर ३० एमएलडी पाणी स्मार्ट सिटी मिशनच्या माध्यमातून वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती देत आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पाणी पुरवठ्याबद्दल प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.

सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी पाणी पुरवठ्याबद्दल उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचा आयुक्तांनी खुलासा केला. ते म्हणाले, ११५ वॉर्डांपैकी ४८ वॉर्डांच्या पाणी पुरवठ्याच्या संचिका मंजूर केल्या आहेत. त्या मंजूर झाल्यानंतर काम सुरू झाले की नाही हे पाहण्याची जबाबदारी पाणी पुरवठा विभागावर आहे. शहराची लोकसंख्या १५ लाख असून दररोज २०३ एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात १२५ एमएलडी पाणी उपलब्ध होते. १५ पैकी दहा लाख लोकसंख्या नेटवर्क एरियात असून उर्वरित ठिकाणी जलवाहिन्या टाकलेल्या नाहीत. समांतर जलवाहिनीच्या कराराचे पुनरुज्जीवन करणे शक्य नाही, असे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेसाठी पर्यायी प्रस्ताव शासनाकडे पाठवावा लागणार आहे. दरम्यानच्या काळात शहरातील पाण्याची उपलब्धता वाढावी याकरिता डॉ. राजेंद्र होलानी यांनी काही सुधारणा सूचविल्या होत्या. त्यासाठी दहा कोटींचे अंदाजपत्रक तयार केले असून त्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.

\B'समांतर'ला पर्यायी योजना करावी लागेल \B

डॉ. होलानी यांनी सूचवलेल्या सुधारणा केल्यास दहा एमएलडी पाणी वाढेल. स्मार्ट सिटी मिशनच्या माध्यमातूनही पाणी पुरवठ्याची कामे करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यातून ३० एमएलडी पाणी वाढेल. ४० एमएलडी पाणी वाढले तरी 'समांतर'ची पर्यायी योजना करावीच लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता करासाठी पाच कंपन्यांसह २३ मालमत्तांना सील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्ता कर थकल्यामुळे महापालिकेने आता जप्तीची धडक कारवाई सुरू केली आहे. मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यानंतर यंत्रणा कार्यरत झाली असून बुधवारी दिवसभरात विविध झोन कार्यालयाच्या क्षेत्रातील तब्बल २३ मालमत्तांना सील ठोकण्यात आले. सील केलेल्या मालमत्तांमध्ये चिकलठाणा एमआयडीसी मधील पाच कंपन्यांचा समावेश आहे. मालमत्ता सील करण्याची कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.

पालिकेच्या झोन क्रमांक एक अंतर्गत पडेगाव येथील दिलीप वाणी यांची व्यावसायिक मालमत्ता सील करण्यात आली. दशरथ मुळे यांच्या दुकानाला सील लावले, त्यांच्याकडे एक लाख २८ हजार ८०१ रुपयांची थकबाकी आहे. पडेगाव येथील कडुबा मुळे यांच्याकडील ४८ हजार १६२ रुपयांच्या थकबाकीसाठी दुकान सील करण्यात आले. याच भागातील निवृत्ती तांदळे यांच्याकडील ७० हजार १६२ रुपयांच्या थकबाकीकरिता दुकानाला सील लावले.

झोन क्रमांक दोन अंतर्गत अनिल पारिख (जाधवमंडी) यांची मालमत्ता ३३ हजार १९९ रुपयांच्या थकबाकीसाठी सील करण्यात आली. अशोक तिवारी व दिनेश तिवारी (कुंभारवाडा) यांच्याकडे ४५ हजार ७८१ रुपयांची थकबाकी असल्याने मालमत्ता सील केली. कुसूम बेगम शहा (दलालवाडी), शेख मुसा (पैठणगेट) यांच्या मालमत्तेला सील लावण्यात आले. झोन क्रमांक तीन अंतर्गत सलीम हसन (गणेश कॉलनी) यांचे दुकान सहा लाख ८५ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी सील करण्यात आले. याच भागातील रजिया बेगम अहमद चाउस यांचे दुकान एक लाख रुपयांच्या थकबाकीसाठी जप्त केले. झोन क्रमांक चार अंतर्गत ६५ हजार ६० रुपयांची थकबाकीपोटी ब्रम्हगिरी कॉम्प्लेक्स येथील लक्ष्मण खैरनार व अजय खैरनार यांच्याकडील ६४ हजार ६० रुपयांच्या थकबाकीकरिता मालमत्ता जप्त करण्यात आल्या. झोन क्रमांक पाच अंतर्गत चिकलठाणा एमआयडीसीमधील जिम ल्यालिवीवर्कस ही मालमत्ता नऊ लाख ३१ हजार ४०० रुपयांची थकबाकी असल्याने जप्त करण्यात आली. देवगिरी टेक्सटाइलकडे ९९ लाख ११ हजार ६५६ रुपये थकलेले असल्याने मालमत्ता जप्त केली. गेट लेजर इं. प्रा. लि. या कंपनीची मालमत्ता नऊ लाख २५ हजार ९०१ रुपयांच्या वसुलीकरिता जप्त केली, तर हिरा केमिकल्सच्या मालमत्तेला तीन लाख ६५ हजार ४४३ रुपयांच्या वसुलीकरिता सील लावण्यात आले.

झोन क्रमांक सहा अंतर्गत जयभवानीनगर येथील अनिता दुरे यांच्या दुर्गा फॅब्रिकेशनला दोन लाख ३५ हजार २८६ रुपयांच्या वसुलीसाठी सील लावण्यात आले. येथीलच सिद्दिकी नसीर यांचे डेली फ्रेश मटन चिकन शॉप १८ हजार ७७१ रुपयांच्या वसुलीकरिता सील करण्यात आले. नारायण दौड (जयभवानीनगर) यांची मालमत्ता सील करण्यात आली. झोन क्रमांक सात अंतर्गत ज्योर्तिमय येथील दुकान क्रमांक ५० जप्त करण्यात आले. झोन क्रमांक आठ अंतर्गत जबिंदा इस्टेट देवानगरी येथील महेश बाहेती यांची मालमत्ता ५३ हजार ४०५ रुपयांच्या थकबाकीपोटी जप्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण हटाव पथकावर दगडफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगपुरा भाजीमंडईच्या आरक्षित जागेवरील आणि पिया मार्केटमधील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकावर या भागातील नागरिकांनी दगडफेक केली. दगडफेकीत जेसीबीचा चालक जखमी झाला. दगडफेकीनंतरही पालिकेच्या पथकाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई पूर्ण केली.

भाजीमंडईच्या आरक्षित जागेवर पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण करण्यात आले होते. या शेडमध्ये काही व्यक्ती रहात होत्या. आरक्षित जागेवर बेकायदा वसाहत उभी रहात असल्याची तक्रार काही नागरिकांनी पालिका आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीनुसार अतिक्रमण हटाव विभागाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख ए. बी. देशमुख, पदनिर्देशित अधिकारी एस. एस. कुलकर्णी, वामन कांबळे, मालमत्ता अधिकारी बी. जी. निकम, वॉर्ड निरीक्षक गवळी, मजहर यांची पत्र्याच्या शेडचे अतिक्रमण काढण्यास सकाळी दहाच्या सुमारास सुरुवात केली. याचवेळी जमावाने अतिक्रमण हटविण्याचे काम करीत असलेल्या जेसीबीवर दगडफेक केली. यात जेसीबीच्या चालकाला मार लागला. दगडफेक करणाऱ्या चौथमल यास पथकातील कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पत्र्याच्या शेडचे अतिक्रमण हटविण्यात आले. पिया मार्केटमध्ये पक्के बांधकाम करून दोन दुकानांचे अतिक्रमण करण्यात होते. हे अतिक्रमण देखील काढण्यात आले. अतिक्रमण केलेल्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. दुपारी दोनपर्यंत ही कारवाई सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी दिले तरच कर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पाणी द्या, नाही तर नागरिकांकडून कर घेऊ नका,' अशा शब्दात नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला सर्वसाधारण सभेत सुनावले. मंगळवारी झोलल्या सभेत नगरसेवक पाणी प्रश्नावरून चांगलेच आक्रमक झाले. नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तर देताना अधिकाऱ्यांची धांदल उडाली.

नगरसेवक सीताराम सुरे यांनी त्यांच्या वॉर्डातील सुरेवाडीसह अन्य वसाहतींचा पाणी प्रश्न सर्वात आधी मांडला. त्यानंतर नगरसेविका संगीता वाघुले यांनी पाणीप्रश्न मांडताना पाठपुरावा करून देखील अधिकारी काम करीत नाहीत, अशी व्यथा व्यक्त केली. सीमा खरात म्हणाल्या, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता फोन उचलतात पण त्यांच्या हाताखालचे अधिकारी फोन घेत नाहीत. 'अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या घरचे काम सांगत नाही, वॉर्डातील काम सांगतो. त्यामुळे त्यांनी नगरसेवकांचे फोन उचलले पाहिजेत,' अशी खरडपट्टी त्यांनी काढली. मीना गायके, फेरोज खान, अब्दुल नाईकवाडी, आत्माराम पवार यांनीही त्यांच्या त्यांच्या वॉर्डातील पाण्याच्या समस्या तीव्र शब्दात मांडल्या. लोखंडे आणि सीमा चक्रनारायण यांनी फाइल हरवल्याची तक्रार केली. एक महिन्यापासून फाइल हरवली होती, आता ती सापडली आहे; पण काम करण्याबद्दल पाणी पुरवठा विभाग आणि लेखा विभागाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, अशी परिस्थिती त्यांनी सभागृहात कथन केली. सुरेखा सानप यांनी वॉर्डातील पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत सभागृहात ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिला. ज्योती अभंग, माधुरी अदवंत यांनीही त्यांच्या वॉर्डातील पाण्याचा प्रश्न मांडला. अदवंत यांच्या वॉर्डात पाण्याची समस्या नाही, असे अजब उत्तर कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी दिले. त्यामुळे भाजपचे गटनेते प्रमोद राठोड संतापले. 'पाण्याची समस्या नाही असे तुम्ही कसे काय म्हणता? तुम्ही प्रत्यक्ष येऊन पाहणी केली आहे का? पाणी कुठून आणि कसे द्यायचे ही तुमची जबाबदारी आहे. नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे,' या शब्दात त्यांनी कोल्हे यांना सुनावले.

माधुरी अदवंत म्हणाल्या, सर्व अधिकाऱ्यांना पाण्याची समस्या माहिती आहे. पण ते या समस्येकडे दुर्लक्ष करतात. पाणी द्या, पाणी देऊ शकत नसाल तर मालमत्ता कर घेऊ नका असे त्यांनी प्रशासनाला ठणकावले. पाणीप्रश्नाबद्दल नगरसेवकांनी केलेल्या प्रश्नाच्या भडिमारामुळे अधिकाऱ्यांची धांदल उडाली. कोणत्याही अधिकाऱ्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही.

\Bनगरसेविकांना सन्मानाची जागा\B

पाणीप्रश्नावर नगरसेवक पोटतिडकीने बोलत असताना आयुक्त डॉ. निपुण विनायक बोलण्यासाठी उभे राहिले. सर्वांना वाटले ते पाणीप्रश्नाबद्दल खुलासा करतील. परंतु आयुक्त म्हणाले, पालिकेच्या सभागृहात नगरसेविकांना सन्मानाची जागा द्या. सभागृहातील आसनव्यवस्थेत बाकांच्या मधल्या तीन रागांवर नगरसेवक बसतात, तर बाजूच्या दोन-दोन रागांवर नगरसेविकांना बसावे लागते. बाकांच्या मधल्या तीन रागांवर नगरसेविकांना बसू द्या, नगरसेवकांनी बाजूच्या रांगांत बसावे, असे आयुक्तांनी सूचवले. आयुक्तांच्या या सूचनेचे पालन लगेचच करण्यात आले, पण जागा बदलून आमचे प्रश्न सुटतील का, असा सवाल नगरसेवकांनी आयुक्तांना विचारला. त्यावर त्यांनी उत्तर देणे टाळले.

\B-पाठपुरावा करूनही अधिकारी काम करत नाहीत: संगीता वाघुले

-अधिकाऱ्यांना आम्ही घरचे काम सांगत नाही: सीमा खरात

-पाणीप्रश्न सुटेपर्यंत सभागृहात ठिय्या आंदोलन करेन: सुरेखा सानप

-पाणी देणार नसाल, तर मालमत्ता कर घेऊ नका: माधुरी अदवंत \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा इम्पॅक्ट: जलकुंभ सुरक्षेवरून सभागृहात पडसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोणत्याही जलकुंभाला पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही, त्यामुळे केव्हाही घातपात होऊ शकतो. प्रशासनाने जलकुंभांना सुरक्षा पुरविण्याचा विचार गांभीर्याने विचार करावा, असे म्हणत नगरसेवकांनी या गंभीर विषयाकडे आयुक्त आणि महापौरांचे लक्ष वेधले. जलकुंभासाठी सुरक्षारक्षक उपलब्ध करून देण्याची फाइल सहा महिन्यापासून प्रलंबित असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांच्या उत्तरातून स्पष्ट झाले.

'जलकुंभांची सुरक्षा वाऱ्यावर' असे वृत्त 'मटा' ने २५ जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. त्याचे पडसाद मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले. नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांनी 'आयएस'च्या संशयित दहशतवाद्यांना 'एटीएस'ने पकडल्याचा हवाला देत ते शहरातील जलकुंभांमध्ये विष मिसळण्याच्या तयारीत होते, असे पोलिसांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्याचे सभागृहात सांगितले. कोणत्याही जलकुंभाला सुरक्षाव्यवस्था नसून सिडको एन ५ येथील जलकुंभावर सुरक्षा यंत्रणा असणे फार आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. राजेंद्र जंजाळ म्हणाले, दहशतवाद्यांनी जलकुंभांची 'रेकी' केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानंतरही जलकुंभांच्या सुरक्षेचा मुद्दा पालिकेने गांभीर्याने घेतला नाही. शिवाजीनगरच्या जलकुंभावर चढून एक व्यक्ती केबल बांधत होती, असे त्यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक व महापौर घोडेले यांना सांगितले. जलकुंभांच्या सुरक्षेबद्दल प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली.

\Bसुरक्षारक्षक तत्काळ नेमा: महापौर \B

कार्यकारी अभियता हेमंत कोल्हे म्हणाले, जलकुंभांना सुरक्षा मिळावी याकरिता प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून अद्याप सुरक्षा मिळाली नाही. यावर जंजाळ यांनी प्रशासन म्हणजे कोण,अशी विचारणा केली. कार्यकारी अभियंता बेजबाबदारपणे उत्तर देत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर महपौर म्हणाले, 'एटीएस'ने स्पष्ट केल्यानंतर विनाविलंब सुरक्षा व्यवस्था करायला हवी होती. सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीची फाईल मागवा आणि तत्काळ नियुक्ती करा, असे निर्देश त्यांनी उपायुक्त मंजुषा मुथा यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण नव्हे ‘वसुली मंडळ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळात एकीकडे परीक्षा शुल्क माफ केल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी विषय, माध्यम दुरुस्तीसाठी शुल्क आकारले जाते. तांत्रिक विषयाला आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबतही असाच गोंधळ झाला. हे शिक्षण मंडळ नव्हे तर, महसूल विभागासारखे वसुली मंडळ झाले आहे, अशा कठोर शब्दांत मुख्याध्यापक, प्राचार्यांनी मंडळाच्या बैठकीत खडे बोल सुनावले.

दहावी, बारावी परीक्षा काही दिवसांवर आल्या आहेत. त्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तयारी करत असून बुधवारी कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षक संघटना, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. परीक्षेतील संभाव्य अडचणी, उपाययोजना अन् मंडळाची प्रक्रिया यावर यावेळी चर्चा झाली. सचिव सुगता पुन्ने यांच्या दालनात झालेल्या बैठकीला प्राचार्य, मुख्याध्यापकांनी हजेरी लावली. विषय, माध्यम दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणी करू नका, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हॉलतिकीट ऑनलाइन पाठवून काय साध्य केले, डाऊनलोडसाठी लागणारा खर्च मंडळ देणार का, असा सवाल यावेळी प्राचार्यांनी केला. कोणत्याही बाबतीत मंडळ शुल्क आकारणीवरच भर देते, याबद्दल तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. क्षमता नसताना परीक्षा केंद्र देणे, जवळ असताना दूरचे केंद्र का दिले, अशी विचारणाही संतप्त मुख्याध्यापक, प्राचार्यांनी केली तेव्हा मंडळाचे अधिकारीही निरुत्तर झाले.

\B'स्वयं अर्थसहाय्यित'ला केंद्र कसे

\Bपरीक्षा केंद्र देताना पायाभूत सुविधा, क्षमतांकडे मंडळ दुर्लक्ष करते असा आरोपही मुख्याध्यापकांनी केला. अनुदानित शाळांना केंद्र देत नाही मात्र, स्वयं अर्थसहाय्यित शाळांना केंद्र देण्याचा प्रताप मंडळ करते आहे. त्यासह जवळचे केंद्र देण्यापेक्षा त्या केंद्रावरून पुढचे केंद्र दिले जाते हे कसे होते, असा प्रश्न करत मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले. क्षमता पाहून परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी देण्याची गरज आहे. मात्र, तसे होत नसल्याची खंत मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.

मंडळ परीक्षा आली की मुख्याध्यापकांना एकत्र काम करू असे सांगते. इतर वेळी शाळांकडे दुर्लक्ष करते. परीक्षा केंद्र देण्याबाबतही क्षमतांचा विचार केला जात नाही. विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत याचा विचार मंडळाने करायला हवा.

- युनूस पटेल, मराठवाडा अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ

यंदा टेक्निकल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अधिकचे शुल्क आकारण्याचा प्रकार समोर आला. आता, हे पैसे परत केले जात आहेत. त्याचवेळी मंडळाने लक्ष द्यायला हवे होते. परीक्षा केंद्राबाबतही असेच प्रकार समोर येतात.

- मनोहर सुरगडे, जिल्हाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ

येथे कोणत्याही प्रकारे शुल्क आकारले जाते ते राज्यमंडळाच्या आदेशानुसार. त्यात बदल हवे असतील तर ते राज्य मंडळाच्या निदर्शनास आणून देतो. त्यानुसार बदलही होतात. परीक्षा सुरळीत होण्यासाठीच्या सूचना, अडचणींचा आम्ही विचार करतो.

- सुगता पुन्ने, सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार अड्यावरील छाप्यात चौघांना अटक

$
0
0

वाळूज महानगर : गंगापूर तालुक्यातील वसुसायगाव शिवारात औरंगाबाद गुन्हे शाखा व शिल्लेगाव पोलिस यानी संयुक्त छापा मारून झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्या चौघाना मंगळवारी (पाच जानेवारी) ६२ हजार ७६० रुपये रोख रकमेसह अटक केली़

विजय नामदेव भिसे (३५, रा़ लासूरगाव, ता़ वैजापूर), धनराज मानसिंह बिघोत (३०, रा़ टाकळीवाडी, ता़ गंगापूर), रमेश आसाराम आहेर (३४, लासूरस्टेशन, ता़ गंगापूर), जमील चंदूलाल शेख (५५, रा़ परसोडा, ता़ वैजापूर) असे जुगार खेळणाऱ्यांची नावे आहेत़ गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा शोध घेत आताना त्याना येथे जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्याची खात्री करण्यासाठी गेले असता वसुसायगाव शिवारातील मोकळ्या जागेवर वरील चौघे झन्ना मन्ना नावाच जुगार खेळत असल्याचे दिसून आले़ त्यांची झडती घेतली असता विजय भिसेकडे सात हजार, धनराज बिघोतकडे १३ हजार ९००, रमेश आहेर पाच हजार ६० रुपये, जमील शेख ३६ हजार ८०० रुपये असे एकूण ६२ हजार ७६० रुपये रोख मिळून आले़ ही कारवाई ग्रामीण पोलिस अधीक्षक आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक योगेश खमाट, सुनील वाघ, अभिजीत डहाळे, रोहीत पगडे, शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बारहाते, आप्पासाहेब काळे यांच्या पथकाने केली आहे़ योगेश खमाट यांच्या तक्रारी वरून वरील चौघांवर शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक बारहाते हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळाशी लढण्यास सरकार समर्थ : मुख्यमंत्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती गंभीर आहे. मात्र, राज्य सरकार दुष्काळाशी दोन हात करण्यास समर्थ आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या आहेत. यामधून पुढाऱ्यास कुरण उपलब्ध होणार नाही, याची खात्री राज्य सरकार घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.

नगरपालिकेतर्फे अमृत भुयारी गटार योजना, निवारा गृहाचे लोकार्पण, नगरोत्थान अंतर्गत सोहळा, डी. पी. रस्ते कामांचे भूमिपूजन, प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ४४८ घरांच्या निर्मिती, नगर पालिकेच्या सभागृहाचे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे सभागृह असे नामकरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार सुरेश धस, विक्रम काळे, भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख, पद्मश्री डॉ. वामन केंद्रे, पद्मश्री सय्यद शब्बीर मामू, सुवर्ण पदक विजेते राहुल आवारे, १४ वर्षांखालील क्रिकेट संघाचा कर्णधार सचिन धस, माजी आमदार बदामराव पंडित, विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह व्यासपीठावर होते.

मुख्यमंत्री म्हणाले, 'खरे म्हणजे हा कार्यक्रम फार पूर्वी होणार होता, पण अनेक अडचणीमुळे तो लांबला. गोपीनाथराव मुंडे यांचे नाव नगरपरिषद सभागृहाला देऊन एका संघर्षशील नेत्याचा सन्मान केला आहे. शहर विकासासाठी राज्य सरकारकडून कुठली ही कमतरता भासू दिली जाणार नाही. शहरातील रस्ते विकासासाठी पहिला टप्पा ८८ कोटी रुपयांचा दिला. दुसरा टप्पाही तातडीने दिला जाईल. यंदा राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. मात्र, याविरोधात सरकार आणि प्रशासनाच्या इच्छाशक्तीच्या बळावर आपण दुष्काळाशी दोन हात करू. यावर्षी राज्य सरकारने लवकर पाऊले उचलत दुष्काळ जाहीर केला.

दरम्यान, डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे कायमचे नगराध्यक्ष असले तरीही आता दुसरे मोठे पद मिळेपर्यतच ते नगराध्यक्ष राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे येत्या काळात भारतभूषण यांची वर्णी कुठे लागते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

(छावणी नेत्यांसाठीचे कुरण नव्हे.... वर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भलिंग निदानप्रकरणात तिघांचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गर्भलिंग निदान प्रकरणात, गर्भलिंग निदानासाठी आरोपी डॉ. सूरज राणा याच्याकडे ज्या महिलेला आणले, ते तिचे आरोपी नातेवाईक ज्ञानेश्वर सांडू लोंढे, कारभारी जगन्नाथ हिवाळे व राहूल हरिबा गोरे यांचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी गुरुवारी (सात फेब्रुवारी) फेटाळला. तर, याच प्रकरणातील आरोपी डॉ. वर्षा शेवगण उर्फ अंजली राजपूत हिच्या पोलिस कोठडीमध्ये शनिवारपर्यंत (नऊ फेब्रुवारी) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभ‌ळे यांनी गुरुवारी दिले.

या प्रकरणात गर्भलिंग निदानासाठी ज्ञानेश्वर सांडू लोंढे (५०, रा. चिकलठाणा), कारभारी जगन्नाथ हिवाळ (४०, रा. चिकलठाणा) व राहुल हरिबा गोरे (२७, रा. अंधारी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) या आरोपींनी संबंधित महिलेला आरोपी डॉ. राणा याच्याकडे नेण्यासाठी गणेश गोडसे याच्या ताब्यात दिले होते; तसेच गर्भलिंग निदानासाठी दिलेले १५ हजार रुपये गणेश याच्याकडे सापडले होते. प्रकरणात तिन्ही आरोपींना अटक होऊन त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर तिन्ही आरोपींनी नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला असता, गर्भलिंगनिदानासाठी जेवढे डॉक्टर जबाबदार आहेत तेवढेच असे कृत्य करणारे संबंधित व्यक्ती व त्यांचे नातेवाईकदेखील जबाबदार आहे. तसेच या आरोपींना जामीन मंजूर केला तर समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे आरोपींचा नियमित जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील उल्हास पवार यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने तिन्ही आरोपींचा जामीन फेटाळला. त्याचवेळी प्रकरणामध्ये यापूर्वी अटक केलेली आरोपी डॉ. वर्षा शेवगण उर्फ अंजली राजपूत हिच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांच्या कोर्टाने हजर करण्यात आले असता, चेंबर फोडल्याबाबत सखोल तपास करणे बाकी असून, प्रकरणात आणखी कोण-कोण सहभागी आहे, त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करावयाची असल्याने आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये शनिवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्तव्यावर निधन झालेल्या सैनिकाला मानवंदना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सियाचिन येथे सीमेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या अनिल शांताराम वाघमारे या सैनिकाचा मृतदेह गुरुवारी (सात फेब्रुवारी) विमानाने औरंगाबादला आणण्यात आला. या ठिकाणी सैन्य दलाने मानवंदना दिली. गावातील जीवाभावाचा मित्र असलेल्या अनिल उर्फ सचिन वाघमारे यांचा मृतदेह पाहून त्यांच्या मित्रांच्याही अश्रुंचा बांध फुटला.

अनिल शांताराम वाघमारे हे सियाचिन येथील तिसऱ्या बेसवर तैनात होते. या तिसऱ्या बेसवर ऑक्सिजन खुपच कमी असते. अशा परिस्थिती देशाचे रक्षण करताना त्यांचे प्राणज्योत मालवली. अनिल शांताराम वाघमारे (२८) हे डुकरे सावरगाव (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील रहिवासी होते. गावात अनिल यांना सचिन या नावाने ओळखले जायचे. त्यांच्या वडील शांताराम वाघमारे यांचा मृत्यू ते लहान असतानाच झाले होते. त्यांचे शिक्षण आणि त्यांचा संभाळ त्यांची आई तुळशाबाई वाघमारे यांनी केला. घरची परिस्थिती बेताताचीच बारावी उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी भारतीय सैन्य दलाच्या भरतीसाठी प्रयत्न केला. या प्रयत्नात अनिल वाघमारे उत्तीर्ण झाले. मुलगा सैन्यदलात भरती झाला. हातात काही पैसे आले. म्हणून आईने बुलडाणा येथील स्थळ पाहून मुलाचे लग्न २०१६मध्ये लावून दिले. दोन महिन्यांपूर्वीच वाघमारे यांनी त्यांना मुलगा झाल्याचे आनंद साजरा केले होते.

अनिल वाघमारे यांचे पार्थिव औरंगाबाद विमानतळावर गुरुवारी आणण्यात आले. त्यांचा मृतदेह रात्री छावणी येथील सैन्य दलाच्या शवगृहात ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजता त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी डुकरे सावरगाव येथे नेण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता अंत्यदर्शनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सैन्य दलाच्या प्रतिनिधींकडून देण्यात आली. त्यांच्या मागे आई तुळसाबाई, पत्नी किरण आणि दोन बहिणी असा परिवार आहे. अनिल वाघमारे यांच्या मोठ्या बहिणीच्या पतीचे अपघातात निधन झाले होते. या बहिणीच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही वाघमारे यांनी स्वीकारली होती.

\Bगावाची अशीही एकी\B

सियाचिन बेसवरून अनिल यांच्या आईला त्यांच्या मृत्यूची बातमी देण्यात आली. हिंदी समजत नसल्याने अनिलच्या आई तुळसाबाई यांनी शेजारी राहणाऱ्यांना फोन दिला. त्यांनी अनिलच्या आईला मृत्यूच्या बातमीमुळे धक्का बसू नये म्हणून अनिला अपघात होऊन त्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगितले. मृतदेह गावात येईपर्यंत आई आणि पत्नीला अनिलच्या मृत्यूची बातमी कळू नये, याची गावकऱ्यांनी तीन दिवस काळजी घेचली, अशी माहिती पवन पाटील, शरद पाटील आणि रवीकुमार डुकरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नॅक’ची चालढकल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे 'नॅक' मूल्यांकन मार्च महिन्यात होण्याची शेवटची संधी आहे. या प्रक्रियेला विलंब झाला असून 'नॅक'च्या नियोजनात विद्यापीठाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले नाही. त्यामुळे मार्च महिन्यात मूल्यांकन न झाल्यास ऑगस्ट महिन्यानंतर होईल असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. कुलगुरूंच्या कार्यकाळात मूल्यांकन होऊ नये म्हणून प्रशासकीय स्तरावर चालढकल सुरू असल्याची चर्चा आहे.

विद्यापीठात 'नॅक' मूल्यांकनाच्या पार्श्वभूमीवर मागील पाच महिन्यांपासून विकासकामे वेगात सुरू आहेत. नियमित बैठका आणि सादरीकरणाचा सराव सुरू आहे. डिसेंबर महिन्यात 'नॅक' मूल्यांकनासाठी केंद्रीय समिती येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात फेब्रुवारी महिन्यातही मूल्यांकन होणार नसल्याचे स्पष्ट झाले. चार फेब्रुवारी रोजी झालेल्या 'नॅक'च्या बैठकीत शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यात 'बामू'चा समावेश नाही. पुढील आठवड्यात पुन्हा बैठक होणार असून त्यानंतर 'नॅक'चे चित्र स्पष्ट होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. किमान मार्च महिन्यात मूल्यांकन अपेक्षित आहे. अन्यथा, ऑगस्ट महिन्यानंतर होण्याचा अंदाज आहे. विद्यापीठातील सर्व विभागांनी मूल्यांकनाची तयारी केली आहे. विकासकामे वेगात सुरू असली तरी प्रशासकीय स्तरावर पुरेशा वेगाने पाठपुरावा करण्यात आला नाही. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ संपण्यास तीन महिने शिल्लक आहेत. या कुलगुरूंच्या कार्यकाळात 'नॅक' टाळण्यासाठी काही प्रशासकीय अधिकारी प्रयत्नशील असल्याची विद्यापीठ वर्तुळात चर्चा आहे. कदाचित 'नॅक' श्रेणीत घसरण झाल्यास कोण जबाबदार राहणार असा पेच आहे. त्यामुळे 'नॅक' मूल्यांकनाबाबत संभ्रम कायम आहे. विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात 'सेल्फ स्टडी रिपोर्ट' (एसएसआर) सादर केला. कॅम्पसमधील सिमेंट रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मुख्य रस्त्याशिवाय विभागांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. सामाजिकशास्त्रे, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, मुख्य प्रशासकीय इमारत, परीक्षा विभाग इमारतींची रंगरंगोटी करण्यात आली आहे. विद्यार्थी वसतिगृहांची दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

\Bरंगीत तालीम सुरू

\B'नॅक' समितीसमोरील सादरीकरणाची विद्यापीठात तयारी सुरू आहे. समितीसमोर सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगीत तालीम बुधवारी सायंकाळी झाली. गायन, वादन आणि नृत्याचा त्यात समावेश होता. लोककला आणि शास्त्रीय कलांचे सादरीकरण उत्तम झाले. मात्र, धार्मिक रचनांचा समावेश असल्यामुळे काही प्राध्यापक आणि अधिसभा सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यापीठाचा कार्यक्रम सर्वधर्मसमभाव जपणारा असावा असे प्राध्यापकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या दुष्काळ निवारण-निर्मूलन निर्धार परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळातर्फे शनिवारी (नऊ फेब्रुवारी) 'दुष्काळ निवारण-निर्मूलन निर्धार परिषद'चे आयोजन करण्यात आले आहे. शासनाने दुष्काळाची घोषणा केली, प्रत्यक्षात उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे परिषदेचे आयोजन केल्याची माहिती कृष्णा हरिदास, मारोती तेगमपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ही परिषद शासकीय अभियांत्रिकी कॉलेज शेजारीच्या भानुदास चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय परिषदेत मराठवाड्यातील दुष्काळावर विचारमंथन होणार आहे. परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. एच. एम. देसरडा हे राहणार आहेत. या परिषदेत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, भाकपचे डॉ. भालचंद्र कानगो, स्वराज अभियानचे सुभाष लोमटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रोजगार हमीची कामे प्रत्येक गावात सुरू करावीत, अर्जाची अट न ठेवता कामाच्या ठिकाणी येईल त्या प्रत्येकाला काम द्यावे, काम न दिल्यास प्रत्येक कुटुंबास दररोज ५०० रुपये निर्वाहभत्ता द्यावा आदी अशी मागण्या करण्यात येणार आहेत. यावेळी प्रा. एच. एम. देसरडा, प्रा. उमाकांत राठोड, चंद्रकांत चव्हाण, नितीन व्हावळे यांची उपस्थिती होती.

\Bकुलगुरूंच्या वक्तव्याचा निषेध\B

'विद्यार्थ्यांना फुटक खायची सवय लागेल' या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या विधानाचा यावेळी निषेध करण्यात आला. विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी मोफत भोजनाची सोय करावी, यावर भाष्य करताना कुलगुरूंनी हे वक्तव्य केले होते. प्रसंगाचे गांभीर्य अन् भान नसलेल्या कुलगुरूंचा मंडळ निषेध व्यक्त करते, असे तेगमपुरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images