Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हिंदू महासभा, संघाचा पुतळा जाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसतर्फे गुरुवारी (७ फेब्रुवारी) केलेल्या आंदोलनात हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येचा देखावा करत हिंदू महासभेने गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकाराचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी अमर रहे, भारतीय जनता पार्टी मुर्दाबाद आदी घोषणा देण्यात आला. शेंद्रा येथे अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे शेंद्रा ते टोलनाका परिसरामध्ये काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली. या आंदोलनासाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, चित्रा चव्हाण, उषा दराडे, छाया जंगले, वीणा खरे, सुरेखा पेडणेकर, मेहराज पटेल, प्रतिभा वैद्य, ज्योती काकडे, शहॉजहाँ फेरोज, बिलकीस बानो यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धनगर आरक्षणासाठी मुंडण आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी व इतर मागण्यांसाठी सकल धनगर समाज क्रांतीमोर्चाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

धनगर समाजाच्या वतीने आरक्षण तसेच इतर मागण्यांसाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. आता निर्वाणीचा इशारा म्हणून धनगर समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने लोकशाही पद्धतीने मुंडण आंदोलन करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आरक्षणाची मागणी मंजूर करा, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर असे नाव देऊन अंमलबजावणी करा, धनगर साजाच्या आरक्षण मागणीसाठी बळी गेलेले सामाजिक नेते मनजित कोळेकर यांना शहीद दर्जा द्यावा व कुटुंबास आर्थिक मदत करावी, शेळी मेंढी महामंडळास शंभर कोटी रुपये तरतूद करावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदेालन करण्यात आले. या मागण्यांची अंमलबजावणी त्वरित झाली नाही, तर धनगर समाज युवक रस्त्यावर उतरून यापुढे उग्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी मुख्य निमंत्रक डॉ. संदीप घुगरे तसेच नारायण रहाटकर, दादाराव रोकडे व सुरेश डोळझाके यांनी मुंडण केले. यावेळी संघटनेचे संजय फटांगडे, रवी वैद्य यांच्यासह धनगर समाजातील युवकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तेसाठी सोशल मीडियाचा बेजबाबदार वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशाने उभ्या केलेल्या परंपरा सोशल मीडियाने नष्ट केल्याची चर्चा ज्येष्ठ नागरिक करतात. पण, सामान्यांसाठी व्यक्त होण्याचे हेच हक्काचे माध्यम आहे. सामाजिक माध्यमांनी नेता व जनतेतील संवादाची दरी कमी केली. फक्त सत्ता मिळवण्याच्या इर्षेत माध्यमांचा बेजबाबदार वापर झाला, असा सूर 'पॉलिटिकल कट्टा' चर्चासत्रात उमटला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने गुरुवारी 'पॉलिटिकल कट्टा' हा चर्चात्मक कार्यक्रम घेण्यात आला. 'सोशल मीडियाचे राजकीय परिणाम' या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली. 'एमआयएम'चे आमदार इम्तियाज जलील, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, भाजयुमोचे पदाधिकारी मल्हार गंधे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अभय टाकसाळ यांनी चर्चेत सहभाग घेतला. ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे हे चर्चासत्राचे समन्वयक होते. प्रत्येक चर्चकाने सोशल मीडियाबाबत त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली. '२०१४ मध्ये मोदी लाट नव्हती. लोकांनी भावना व्यक्त केल्या होत्या. त्यात सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची ठरली. फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअॅपद्वारे जनतेपर्यंत पोहचण्याची पर्वणी मिळाली,' असा मुद्दा मल्हार गंधे यांनी मांडला.

'सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर भाजपने केला. पण, हा बेजबाबदार वापर माध्यमाला बदनाम करणारा ठरला,' अशी टीका हनुमंत पवार यांनी केली. 'ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर दधिच नावाच्या व्यक्तीने अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली होती. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करतात. काँग्रेस पक्ष जबाबदारीने सोशल मीडिया वापरतो. आक्षेपार्ह भाषा वापरल्यास नोटीस बजावतात. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या 'साले' वक्तव्यावरील आंदोलन सोशल मीडियानेच उभे केले,' असे पवार यांनी सांगितले.

'सोशल मीडिया आपल्याला वापरत आहे. पण, प्रत्येकाला लिहिते करण्यात त्याचे योगदान आहे. फेसबुकच्या झुकेरबर्गची भेट पंतप्रधान मोदी घेतात. पण, त्यांना शेजमजुराला भेटण्यासाठी वेळ नाही. यावरून सोशल मीडियाची ताकद लक्षात येते,' असे कॉ. अभय टाकसाळ म्हणाले. 'सोशल मीडियाचा प्रभावी वापर देशाला नरेंद्र मोदी यांनीच शिकवला. एखाद्या कंपनीसारखी सोशल मीडिया चालवणारा पक्ष नावारुपाला आला. पंतप्रधान 'मन की बात' करू शकतात. तर सोशल मीडियाचा वापर करून सामान्य माणूस 'दिल की बात' करू शकतो. हे माध्यमाचे महत्त्व लक्षात घेणे गरजेचे आहे,' असे आमदार इम्तियाज जलील म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना चर्चकांनी उत्तरे दिली.

विभागप्रमुख डॉ. प्रशांत अमृतकर यांनी प्रास्ताविक केले आणि डॉ. ह. नि. सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राजेश मुंडे, डॉ. उल्हास उढाण, डॉ. दासू वैद्य, डॉ. मुस्तजिब खान यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

अचानक औरंगाबाद असुरक्षित होईल

'विकासाच्या मुद्द्यांपेक्षा भावनिक मुद्द्यांवर निवडणुका लढवल्या जातात. जात, धर्म, प्रदेश या वादाचा प्रभाव अधिक असतो. त्याला सोशल मीडिया हातभार लावत आहे. आता लोकसभा निवडणूक आल्यामुळे अचानक औरंगाबाद शहर असुरक्षित होईल. हिंदू विरुद्ध मुस्लिम, संभाजीनगर विरुद्ध औरंगाबाद चित्र उभे करुन निवडणूक लढवली जाईल,' अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम करावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'लोकांचे आरोग्य सांभाळणे, त्याचे नियोजन करणे ही जबाबदारी शासनाची असते. शासन आरोग्यासंबंधी अनेक योजना राबवते. मात्र या योजना लोकांपर्यंत पोचतात काय? या योजना योग्य प्रकारे राबवल्या जातात का, हे पाहून कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम केले पाहिजे,' असे प्रतिपादन गुरुवारी (सात फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस पितांबरन् मास्टर (केरळ) यांनी केले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय कमेटीतर्फे 'निरोगी जीवन, हक्क माझा' या विषयावर राज्य कार्यकारणी सदस्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन पितांबर मास्टर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. फौजिया खान, आमदार विद्या चव्हाण यांच्यासह उषा दराडे, जिल्हाध्यक्ष छाया जंगले यांची उपस्थिती होती.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी दमन आहुजा यांनी 'सार्वजनिक आरोग्य व त्यांची संरचना' या विषयावर मार्गदर्शन केले. लोकांची जागरुकता, स्वास्थतंत्र, शिशूमृत्यू, मातृदर, स्वस्थ, निरोगी नागरिक आदी मुद्द्यांचा त्यांच्या भाषणामध्ये समावेश होता. यावेळी आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व शहरी रुग्णालयांची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली.

दुसऱ्या सत्रात तृप्ती मालानी यांनी राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेवर मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात विविध गटांनी आरोग्य प्रश्नांवर चर्चा केली. या कार्यक्रमासाठी शहाजहाँ फेरोज, सुषमा कश्यप, सुमा नायर, बिल्किस शेख, वीणा खरे, मेहराज पटेल, ज्योती काकडे, स्वाती माने, सुरेखा पेडणेकर आदींची उपस्थिती होती. कार्यशाळेच्या समारोपासाठी शुक्रवारी (आठ फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदाधिकारी तुपाशी, नगरसेवक उपाशी !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

महापालिकेत पदाधिकारी तुपाशी आणि सर्वसामान्य नगरसेवक उपाशी, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे तीव्र असंतोष आहे. त्यामुळेच नगरसेवकांकडून राजीनाम्याची भाषा सुरू झाल्याचे सांगितले जाते. मूठभरांच्या वॉर्डात भरमसाठ विकास आणि बाकीच्यांचे वॉर्ड भकास, या समीकरणाने सत्ताधारी शिवसेनेची साठमारी चव्हाट्यावर आली आहे.

शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांनी पाणी पुरवठ्यांची कामे होत नाहीत म्हणून, चक्क महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अंगावर सर्वसाधारण सभेत राजीनामा फेकला. त्यामुळे पालिकेचे वातावरण ढवळून निघाले आहे. सुरेंच्या अगोदर शिवसेनेच्याच काही नगरसेवकांनी वॉर्डात विकास कामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. काही नगरसेवकांनी तर पालिकेच्या सभागृहातच ठिय्या आंदोलन केले. वॉर्डातील विकास कामांना गती द्या, हीच त्यांची मागणी होती. कचऱ्याच्या प्रश्नावरून पडेगाव - मिटमिट्यातील जनता त्रस्त झाल्यामुळे या संपूर्ण भागातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला, त्यात शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या जास्त होती. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून समजला जाणाऱ्या पुंडलिकनगर, हनुमाननगरातील दूषित पाण्याचा प्रश्न वर्षभरापासून सुटला नाही. या भागात शिवसेनेचेच नगरसेवक निवडून आले आहेत. प्रश्न सुटावा म्हणून पाठपुरावा करता-करता त्यांनाही आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले. विकास कामांवरून पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेत धुसफूस सुरू झाली आहे. पालिकेच्या कारभारात पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची असते. त्यातले तीन पदाधिकारी शिवसेनेचेच आहेत, तरीही वॉर्डांमध्ये कामे होत नसल्याने शिवसेनेमधील असंतोष शिगेला पोचला आहे. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या तीन पदांपैकी महापौर आणि स्थायी समितीचे सभापती ही दोन पदे वैधानिक आहेत. या पदांवर बसलेल्यांना केवळ शिवसेनेच्याच नगरसेवकांचे नाही, तर सर्वच नगरसेवकांचे प्रश्न सोडवावे लागतात. शिवसेनेच्या नगरसेवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहनेत्याची नियुक्ती केल्याचे मानले जाते. त्यानंतरही नगरसेवक विकास कामांसाठी त्रस्त आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डात रस्ते, एलईडी, पाणी, ड्रेनेज आणि साफसफाईची कामे बिनबोभाट झाल्याचे शिवसेना नगरसेवकांच्या एका गोटात बोलले जाते. इतर नगरसेवकांच्या वॉर्डातला दूषित पाण्याचा प्रश्न मात्र, गेल्या काही वर्षांपासून सुटलेला नाही. त्यांना इतर कामांसाठीही सत्तेत असूनही संघर्ष करावा लागतो आहे.

\Bलिपिकाकडून एकदम ३० फाइल

\Bपालिका आयुक्तांनी लेखा विभागातील एका 'तज्ज्ञ' लिपिकाची बदली काही दिवसांपूर्वी वॉर्ड कार्यालयात केली. हे समजताच एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने त्या लिपिकाकडून आपल्या वॉर्डातील विकास कामांच्या तीसपेक्षा जास्त फाइल तयार करून घेतल्याची चर्चा आहे. त्या लिपिकाने लेखा विभागातील सवयीप्रमाणेच फायली तयार करून दिल्या. त्यामुळे त्या आर्थिक संकटात सापडणार नाहीत आणि त्या पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डातील कामे मार्गी लागतील. इतर नगरसेवक मात्र लेखा विभागातून फाइल बाहेर निघत नसल्यामुळे त्रस्त आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामांसाठी मजुरांचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे सुरू करा, मजुरांना २०० रुपये रोजगार द्या, आदी मागण्यांसाठी तालुक्यातील धानोरा, आडगाव, गेवराई गुंगी, वारेगाव, बोरगाव अर्ज, साताळ पिंप्री या गावातील सुमारे ४०० ते ५०० मजुरांनी फुलंब्रीच्या प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार घोषणाबाजी करीत गुरुवारी (सात फेब्रुवारी) सुमारे दीड तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, तहसीलदार संगीता चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे, तालुका कृषी अधिकारी मेघा पतंगे यांनी मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर मजुरांनी आंदोलन थांबवले.

फुलंब्री तालुक्यात सध्या तीव्र दुष्काळ पडला असून, शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम उपलब्ध नाही. शासनाने दुष्काळ जाहीर करून तीन महिने उलटले आहे, मात्र अद्याप तालुक्यातील अनेक गावांत मजुरांच्या हाताला काम उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे गुरुवारी दुपारी तालुक्यातील धानोरा, आडगाव, गेवराई गुंगी, वारेगाव, बोरगाव अर्ज, साताळ पिंप्री या गावातील मजूर काँग्रेसची दुष्काळी सभा आटोपल्यावर थेट तहसील कार्यालय गाठत हमी योजनेची कामे सुरू करा, मजुराला २०० रुपये रोज द्या, मजुरांच्या हाताला काम द्या, अशा जोरदार घोषणा दिल्या.

दरम्यान, तहसील कार्यालयात तहसीलदार संगीता चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे, तालुका कृषी अधिकारी मेघा पतंगे यांच्याशी जगन्नाथ काळे, जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप बोरसे यांनी मजुरांतर्फे चर्चा केली. यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी येत मागणी केलेल्या सर्व मजुरांच्या हातात काम उपलब्ध करून देण्यात येईल व कामाचा मोबदला चांगला देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

\Bमजुरी केवळ ६० रुपये\B

धानोरा येथे ४०५ मजूर आहेत, तर प्रशासनाने फक्त २५० मजुरांना काम उपलब्ध करून दिले आहे. २०० मजूर अद्याप कामाच्या शोधात चकरा मारत आहेत. त्यातही काम मिळालेल्या २५० मजुरांना केवळ ६० रुपये रोजदारी मिळते. त्यांनी आम्हला किमान २०० रुपये रोज द्यावा; तसेच धानोरा येथील हमी योजनेतून सुरू असलेले काम मागील चार दिवसापासून बंद पडले असल्याने मजुरांना उपास मारीची वेळ आली आहे. तर उर्वरित कामातील मजुरांनी आम्हाला काम उपलब्ध करून द्यावे यासाठी ठिय्या आंदोलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ कार्यालयाचे ३७ अधिकारी पुन्हा सेवेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहन चाचपणी करताना नियम डावलल्याच्या आरोपावरून राज्यभरातील २८ मोटार वाहन निरीक्षक आणि नऊ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांचे न्यायालयाने केलेले निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

उच्च न्यायलयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकामध्ये वाहनांना योग्यता प्रमाणपत्रे देताना केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९मधील नियम ६२ व महाराष्ट्र मोटार वाहन नियमाचे काटेकोर तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानंतर औरंगाबादसह यवतमाळ, कोल्हापूर, पुणे, पनवेल आणि ठाणे आरटीओ कार्यालयातील २८ मोटार वाहन निरीक्षक व नऊ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अशा एकूण ३७ अधिकाऱ्यांना २१ सप्टेंबर २०१८ रोजी निलंबित करण्यात आले होते. या अधिकाऱ्यांच्या विरोधात विभागीय चौकशीच्या अनुषंगाने दोषारोपपत्रे निर्गमित करण्यात आलेली आहे. दोषारोपपत्रे दाखल झाल्यानंतर या ३७ अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीच्या अधीन राहून सेवेत घेण्यात आले.…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरीवाला धोरण समिती स्थापन केली का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फेरीवाला धोरण ठरविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे का, तसे असेल तर यासंबंधीचे रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. सुनील के. कोतवाल यांच्या खंडपीठाने दिले. या याचिकेवर २१ फेब्रुवारी रोजी सुनावणी होईल.

रंजना बनकर व अनुराधा हिवराळे यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत यासंबंधी याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांना महापालिकेने चारचाकी हातगाडी परवाना दिला आहे. तरीही त्यांच्याविरुद्ध पोलिसांची कारवाई होत असल्याने त्यांनी खंडपीठात धाव घेतली आहे. पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम २०१४, केंद्र शासनाने अंमलात आणला आहे. हा अधिनियम अंमलात आणावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. २०१५पासून सदर याचिका प्रलंबित आहे. दरम्यान नगरविकास खात्याने नऊ जानेवारी २०१७ पासून पथविक्रेता योजना अंमलात आणली. मात्र या योजनेनुसार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झालेले नाही व २०१४ मधील अधिनियमानुसार, तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती स्थापन करण्यात आली नसल्याचे तसेच फेरीवाल्यांसाठी कुठलेही धोरण नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. दरम्यान याविषयीची आणखी एक याचिका अ‍ॅड. राहुल तांबे यांनी दाखल केली आहे. याचिकेत औरंगाबाद महापालिकेतर्फे अ‍ॅड. आनंद भंडारी, तर नगर महापालिकातर्फे अ‍ॅड. किशोर लोके काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटीच्या दोन विद्यार्थ्यांना ‘आयसीएमआर’ची शिष्यवृत्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (घाटी) पदवीचा विद्यार्थी सोहम बरकुले याच्या संशोधनाच्या प्रकल्पाला 'आयसीएमआर'कडून दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. याच महाविद्यालयाची पदवीची विद्यार्थिनी दिवे सिंग हिच्या स्तनपान प्रकल्पालाही 'आयसीएमआर'कडून शिष्यवृत्ती जाहीर झाल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वाशे कोटींतून होणार ६५ रस्त्यांची कामे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

सव्वाशे कोटींमधून करावयाच्या ६५ रस्त्यांच्या कामांची यादी महापालिकेने अंतिम केली आहे. मात्र, रस्त्यांची फक्त यादी पाठवू नका, ती तांत्रिक मान्यतेसह यादी पाठवा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

राज्य शासनाने दिलेल्या शंभर कोटी रुपयांतून करण्यात येणाऱ्या व्हाइट टॉपिंगच्या ३० रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीन जानेवारी रोजी आणखी सव्वाशे कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. त्यातून कोणत्या रस्त्यांची कामे करायची यावर महापालिकेत खल सुरू झाला. यादी लवकर होत नसल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन यादी करण्यास सुरुवात करत पालिका प्रशासनाने लवकर यादी तयार न केल्यास भाजपने तयार केलेली यादी मुख्यमंत्र्यांना सादर करू, असा इशारा देण्यात आला. सव्वाशे कोटींमधून करावयाच्या रस्त्यांची यादी अंतिम करण्यात आल्याची माहिती महापौरांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. यादीत ६५ रस्त्यांपैकी काही रस्ते विकास आराखड्यातील, तर काही जास्त वर्दळीचे रस्ते असल्याचे त्यांनी सांगितले. तांत्रिक मान्यतेसह यादी पाठवल्यावर लगेच निधी मिळण्याची शक्यता आहे. रस्त्यांच्या कामांसाठी 'पीएमसी'ची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामाध्यमातून लवकरात लवकर सक्षम यंत्रणेची तांत्रिक मान्यता घेऊन यादी शासनाकडे पाठवली जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा खून, पतीला सक्तमजुरीसह जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आजारी पडलेल्या मुलाला पत्नी माहेरी घेऊन गेल्यामुळे 'तुला भाकरी घालू वाटत नाही,' असे म्हणत दोन मुलांदेखत पत्नीच्या छातीवर बसून तिचा मरेपर्यंत दोरीने गळा घोटणारा आणि विरोध करणाऱ्या स्वत:च्या आईच्या हनुवटीला चावणारा आरोपी पती विलास सर्जेराव घोडके याला सक्तमजुरीसह जन्मठेपेची व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी गुरुवारी (सात फेब्रुवारी) ठोठावली. या गुन्ह्याची तक्रार मृत सुनेच्या सासुने म्हणजेच आरोपीच्या आईने पोलिस ठाण्यात जाऊन दिली, तर आरोपीच्या पाच वर्षांच्या मुलीची साक्षही महत्त्वाची ठरली.

याप्रकरणी मृत विवाहिता रेणुका विलास घोडके (२८) हिची सासू व आरोपी विलास सर्जेदार घोडके (३१, रा. एकतुनी, ता. पैठण, जि. औरंगाबाद) याची आई सुभद्रा सर्जेराव घोडके (५५) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आधीच्या दोन पत्नींचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी विलास याचा रेणुका हिच्याशी २००८मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर दोघांना पाच वर्षांची मुलगी, तीन वर्षांचा मुलगा झाला. जानेवारी २०१५मध्ये विलास, रेणुका व दोन्ही मुले बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी येथे राहायला गेले होते. सुमारे अडीच महिने ते तिथे होते, मात्र मुलगा आजारी पडला म्हणून रेणुका मुलाला घेऊन माहेरी गेली होती व घटनेच्या आठ दिवसांपूर्वी रेणुका सासरी आली होती.

सासरी आल्यानंतर तिने 'मुलगा आजारी असताना विलासने मारहाण केली,' असे सासुला (फिर्यादी सुभद्राबाई) सांगितले होते. दरम्यान, त्यापूर्वी काही दिवसांसाठी सैलानीहून घरी आलेल्या विलासने पत्नी माहेरी निघून गेल्यावर 'भाकरी घालायला कोणी नाही,' अशी तक्रार आपल्या आईकडे (सुभद्राबाई) केली होती व तो पुन्हा सैलानीला निघून गेला होता. २६ मार्च २०१५ रोजी विलासने रेणुका हिला फोन करून 'तुला भाकरी घालू वाटत नाही, तू पैशाच्या मागे लागली, थांब तुला बघतोच,' असे धमकावले होते. दुसऱ्या दिवशी २७ मार्च रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घराचे दार वाजले म्हणून रेणुका व सुभद्राबाई उठल्या. त्यांनी दरवाजा उघडताच विलास घरात घुसला. दुसऱ्याच क्षणी त्याने सोबत आणलेल्या दोरीने रेणुकाचा गळा आवळू लागला असता. सुभद्राबाईने त्याला कडाडून विरोध केला. त्यावेळी विलासने सुभद्राबाईच्या हनुवटीचा चावा घेतला. त्यानंतर मदत मागण्यासाठी सुभद्राबाई सरपंचाकडे धावल्या. तेवढ्यात विलासने रेणुकाच्या छातीवर बसून दोन्ही मुलांसमोर तिचा मरेपर्यंत गळा घोटून खून केला. काही वेळात सुभद्राबाई आपल्यासोबत सरपंचाचा मुलाला घेऊन आल्या असता, रेणुका निपचित पडली होती, तर विलास पळून गेला होता. या प्रकरणी सुभद्राबाईने तक्रार दिल्यावरुन भारतीय दंड संहितेच्या ३०२, ३२४ कलमान्वये पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bफिर्यादी फितूर, पुराव्यांच्या आधारे शिक्षा

\Bखटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात सुभद्राबाई, सरपंचाचा मुलगा प्रवीण भानुसे, सैलानी येथे रेणुकाला मारहाण केल्याचा साक्षीदार असलेला दामोदर शिंदे, विजय देशमुख यांच्यासह विलासची पाच वर्षांची मुलगी यांची साक्ष महत्वाची ठरली. खटल्यावेळी फिर्यादी सुभद्राबाई अंशत: फितूर झाली होती, परंतु सबळ पुराव्यासह दोन्ही बाजुंचा युक्तिवाद व साक्षींवरून कोर्टाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या ३०२ कलमान्वये आजन्म सक्तमजुरीसह जन्मठेप व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी, तर भारतीय दंड संहितेच्या ३२३ कलमान्वये सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून शेख नईम व एस. एस. पटेकर यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बसचा गल्ला १५ लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेली सिटी बसला शहरातील नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. गेल्या १५ दिवसांत १४ लाख ८८ हजार रुपयांचा महसूल जमा झाला असून आतापर्यंत साडेनऊ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.

मार्च अखेरपर्यंत शहरात शंभर सिटी बस सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या माध्यमातून त्यापैकी १४ मार्गांवर २३ सिटी बसची सेवा २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आली. या १५ दिवसांत सिटी बसला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाचा आढावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला. या काळात सिटी बसच्या माध्यमातून १४ लाख ८८ हजार रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती महापौरांनी पत्रकारांना दिली. प्रतिदिन सरासरी एक लाख रुपये मिळाले असून सिटी बस ५५०० किलोमीटर धावल्या आहेत, तर ९५०० प्रवाशांनी प्रवास केला. आणखी

२१ बस सुरू केल्या जाणार असून त्यापैकी सहा बस सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यानंतर एकूण २९ बसमार्फत सेवा दिली जाणार आहे. आठ ते दहा दिवसांत आरटीओ पासिंग होऊन उर्वरित १५ बस उपलब्ध होणार आहेत. फेब्रुवारीअखेरीस शहरात ४३ बस रस्त्यावर धावत असतील, असे महापौरांनी स्पष्ट केले. ३७० बस थांबे बांधण्याचे कंत्राट मुजीब कॉन्टरॅक्टर या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत बस थांबे बांधकामाला सुरुवात होणार आहे.

विद्यापीठात सोमवारपासून सिटी बस

सोमवारपासून एकूण २९ बस सुरू झाल्यानंतर विद्यापीठ, मिटमिटा, बीड बायपास, सातारा, छावणी या भागांसाठी सिटी बस सेवा सुरू केली जाणार आहे. फेब्रुवारी अखेरीस एकूण ४३ बस सुरू झाल्यानंतर रेल्वे स्टेशनवरून बस सेवा सुरू केली जाणार आहे.

बसची धाव ५५०० किमी

प्रवासी ९५००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकराने लांबवले चार लाखाचे भंगार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नोकराने मालकाचा विश्वासघात करीत चार लाखांचे भंगार सामान माल लंपास केला. हा प्रकार एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारीदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात नोकराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आसीफ सलीम सय्यद (रा. रहीमनगर) यांनी तक्रार दाखल केली. आसीफ यांचे सिटीचौक भागात भंगार सामानाचे दुकान आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांनी शहरातील विविध दुकानातून खरेदी केलेले तांबे, पितळ, जर्मन आदीचा भंगार माल दुकानात जमा करून ठेवला होता. सुमारे २२०० किलो वजनाचा हा चार लाख रुपयाचा माल होता. आसीफ यांचा नोकर सय्यद आसीफ सय्यद खलील याने दुकानातील चाव्यांचा वापर करीत हा माल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बुधवारी आसीफ यांनी पोलिस ठाण्यात नोकर सय्यद आसीफविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पीएसआय बांगर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जन्मठेप झालेला आरोपी ३१ वर्षांनंतर जेरबंद

$
0
0

परभणी : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाचा खून करून फरार झालेल्या आरोपीला तब्बल ३१ वर्षांनंतर परभणी पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना सेलू येथील असून या आरोपीला १९८९ साली परभणी न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

छपन्या न्हाकुल्या उर्फ महाकुल्या भोसले (वय ५५, रा. जवळा जिवाजी, ता. सेलू) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने १९८८ साली पत्नीचे बंसय्या आपय्या शिंदे (रा. धारासूर, ता. गंगाखेड) याच्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून निर्घृण खून केला होता. या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन परभणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. त्यानुसार झालेल्या सुनावणीत परभणी न्यायालयाने त्याला १६ मार्च १९८९ ला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्यानंतर तो फरार झाला. त्याने नाव, अस्तित्व बदलून व वेषांतर करून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळकुटे येथे गेल्या ३१ वर्षांपासून राहत होता. मात्र, या आरोपीचा शोध घेण्यासाठी परभणी पोलिसांनी विशेष पथक नेमले. या पथकाने आरोपीची विविध ठिकाणी माहिती घेऊन त्याला राहत्या घराजवळ सापळा रचून गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास अटक केली. त्यास सायंकाळी परभणीच्या न्यायालयात हजर करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर अधीक्षक विश्व पानसरे, पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे, पीएसआय सय्यद अफसर, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, गणेश कौटकर, शंभुदेव राख, जमीर फारुखी, शंकर गायकवाड, अरुण कांबळे आदींनी ही कामगीरी बजावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ अधिसभेवर शिवसेनेला पुन्हा हुलकावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुलगुरूद्वारा नामनिर्देशित अधिसभा सदस्यपदी भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड आणि भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण यांची वर्णी लागली आहे. दोनपैकी एक जागा मिळवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू होते. पण, दोन्ही जागांवर दावा सांगत भाजपने सेनेला दूर ठेवले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रिक्त अधिसभा सदस्यपदी नगरसेवक प्रमोद राठोड आणि जिल्हा परिषद सदस्या अनुराधा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. कुलगुरू नामनिर्देशित जागा मागील काही दिवसांपासून रिक्त होत्या. भाजपच्या गटातील दोन सदस्यांची वर्णी लावण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू होते. अधिसभा सदस्य निवडीचा निर्णय होत नसल्यामुळे जागा रिक्त ठेवण्यात आल्या होत्या. एका जागेची मागणी शिवसेनेने केली होती. मात्र, दोन्ही जागा स्वत:कडे ठेवत भाजपने मित्रपक्षाला दूर ठेवले. आतापर्यंत फक्त दोन जागा देऊन शिवसेनेची बोळवण करण्यात आली आहे. भारतीय विद्यार्थी सेनेचे तुकाराम सराफ यांची निवड होण्याची शक्यता होती. वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होऊनही सराफ यांना सदस्य करण्यात आले नाही. दोन्ही पक्षातील अंतर्गत कलह विद्यापीठ स्तरावरही सुरू आहे. राठोड आणि चव्हाण यांना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांच्यासह अधिसभा सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्याचे आवर्तन संपामुळे लांबले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

जलसंपदा विभागाचे कालवा निरीक्षक व पाटकरी हे एक फेब्रुवारीपासून संपावर गेल्याने शहरासाठी सोडण्यात पाणी आवर्तन लांबणीवर पडले असून, त्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यताआहे.

वैजापूर शहराला पाणीपुरवठा करणारा नारंगी सारंगी प्रकल्प या वर्षी अपुऱ्या पावसामुळे कोरडाठाक आहे. या प्रकल्पातील पाणीसाठा संपल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील धरणातून वैजापूर शहराची पाण्याची तहान भागवली जाते. नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून गोदावरी डाव्या कालव्याद्वारे कोपरगाव तालुक्यातील घोयगाव साठवण तलावात पाणी साठवण्यात येते. तेथून उपसा करून वैजापूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. दहा नोव्हेंबर रोजी नाशिक जलसंपदा विभागाने शहरासाठी पाण्याचे आवर्तन दिले होते. साधारणपणे ९० दिवसानंतर एक फेब्रुवारी रोजी पाण्याचे आवर्तन मिळणे अपेक्षित होते, परंतु पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एक फेब्रुवारीपासून बेमुदत संप सुरू केल्याने पाण्याचे आवर्तन लांबणीवर पडले आहे. त्यामुळे शहरात काही दिवस पाणी टंचाई भेडसावणार आहे.

सध्या शहरात चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून नगर पालिका प्रशासनाने टँकर सुरू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. याशिवाय आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आमदार प्रशांत बंब व माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पिण्याच्या पाण्याचे आवर्तन लवकरात लवकर सोडावे, अशी मागणी केली आहे.

\Bपाण्यास लागणार आठवड्याचा वेळ\B

दोन दिवसांत हे आवर्तन सुटण्याची शक्यता आहे. धरणातून पाणी सुटल्यानंतर घोयगाव साठवण तलावात हे पाणी पोचण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी, पाणी साठवण्यासाठी तीन दिवस असे एकूण आठवडाभर शहरास पाणी मिळणे अशक्य आहे. वैजापूर शहरासह कोपरगाव, शिर्डी, राहाता व जवळपास ६० ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर कर्मचाऱ्यांच्या संपाचा परीणाम होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.तसेच नगरपालीकेला सहकार्य करावे. असे आवाहन नगराध्यक्ष शिल्पा परदेशी व उपनगराध्यक्ष साबेर खान यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंधश्रद्धा सोडून विवेकी व्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जगात जादू वगैरे काही नसते. जसा चष्मा तसे जग आपल्याला दिसते. त्यामुळे अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता विवेकी व्हा, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते शहाजी भोसले यांनी केले. डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात ते गुरुवारी बोलत होते. त्यांनी सप्रयोग मार्गदर्शन केले. भोंदूबाबा कसे फसवतात याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले. समाजमनावर अंधश्रद्धेचा प्रचंड प्रभाव आहे. विज्ञान स्त्री आणि पुरुष असा भेद करीत नाही. एकविसाव्या शतकात आपल्याला काही गोष्टी समजावून घ्याव्या लागतील, असे भोसले म्हणाले. यावेळी विभागप्रमुख प्रा. डॉ. दिनकर माने, प्रशांत कांबळे उपस्थित होते. गणेश फरताडे यांनी सूत्रसंचालन केले आणि रोहित गिरी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिनी घाटीत डायबेटिक क्लिनिक सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिनी घाटी अर्थात चिकलठाणा परिसरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र 'डायबेटिस क्लिनिक'चे बुधवारी (सहा फेब्रुवारी) उद्घाटन करण्यात आले. या क्लिनिकमध्ये दर बुधवारी सकाळी नऊ ते दुपारी १२ या वेळेत मधुमेहासंबंधित विविध चाचण्या, उपचार होणार आहेत. शहरातील मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील धुळे हे रुग्णालयात हे दर बुधवारी नि:शुल्क सेवा देणार आहेत.

औपचारिक उद्घाटनावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. धुळे आदींची उपस्थिती होती. पहिल्याच दिवशी दहा रुग्णांची तपासणी होऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. जे रुग्ण आधीपासून रुग्णालयात दाखल आहे आणि ज्यांना मधुमेहतज्ज्ञांचा सल्ला गरजेचा आहे, अशांवर या क्लिनिकमध्ये उपचार होतील. तसेच ज्या रुग्णांना या क्लिनिकसाठी रेफर केले जाईल किंवा ज्यांना स्वत:ला मधुमेह असल्याची माहिती आहे व फॉलोअपसाठी जे रुग्ण स्वत:हून येतील, अशा सर्व प्रकारच्या रुग्णांच्या तपासण्या-उपचार या क्लिनिकमध्ये होणार आहेत. अशा रुग्णांच्या तपासण्या गरजेनुसार 'एचएलएल'द्वारे केल्या जाणार आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुलकर्णी यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

\Bरुग्णालयात झाल्या ७१ प्रसुती

\Bजिल्हा रुग्णालयात सव्वादोन महिन्यांत ७१ महिलांच्या प्रसुती झाल्या आहेत. यामध्ये ६७ नैसर्गिक प्रसुती, तर ४ सिझेरियन प्रसुती झाली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये १५ नैसर्गिक प्रसुती, जानेवारी २०१९ मध्ये ४० नैसर्गिक प्रसुती व ४ सिझर, तर फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत १२ नैसर्गिक प्रसुती झाल्या आहेत, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. अनघा गुंडेवार ‘आयडॉल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र आर्य वैश्य आयडॉल गायन स्पर्धेत डॉ. अनघा गुंडेवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. नागपूर येथे ही स्पर्धा पार पडली. राज्यभरातील स्पर्धकांच्या चुरशीच्या स्पर्धेत अनघा यांनी बाजी मारली.

महाराष्ट्र आर्य वैश्य समाज नागपूर व आर्य वैश्य यूथ क्लब नागपूर यांच्या वतीने महाराष्ट्र आर्य वैश्य आयडॉल गायन स्पर्धा घेण्यात आली. सुरेश भट सभागृहात झालेल्या स्पर्धेत डॉ. अनघा (मारावार) गुंडेवार अंतिम फेरीत विजेती ठरली. अनघा यांनी चषक आणि दीड लाख रुपये असे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत सहाशे स्पर्धक सहभागी झाले होते. चंद्रपूर, नांदेड, नागपूर, यवतमाळ आणि पुणे येथे प्राथमिक फेरी घेण्यात आली. तीन वयोगटात झालेल्या स्पर्धेत १८ ते ४० वयोगटात अनघा विजयी ठरल्या. लोणी येथील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात अनघा सहयोगी प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ डॉ. प्रमोद मारावार यांच्या त्या कन्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकांना चारा नव्हे, डान्स बार दिला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'लोकांना चारा छावण्या पाहिजेत आणि तुम्ही डान्स बार आणि लावण्या दिल्या. खोटी आश्वासने देत जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजपला

धडा शिकवण्यासाठी अब की मार पटकी मार करावेच लागेल,' अशा शब्दांत गुरुवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर तोफ डागली.

राजीव गांधी स्टेडियम मैदानावर सायंकाळी काँग्रेसतर्फे आयोजित जनसंघर्ष सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाबा सिद्दिकी, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड, जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष माजी आमदार नामदेव पवार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, नितीन पाटील, विलास औताडे उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, 'राज्यातील १२१ मतदारसंघातून जनसंघर्ष यात्रा काढली असून, जोपर्यंत युतीचे सरकार पाय उतार होणार नाही आणि काँग्रेस सत्तेत येणार नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहिल. दुष्काळ परिस्थिती गंभीर आहे. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रिकेट खेळण्यात मग्न आहेत. लोकांना चारा छावण्या पाहिजे. तुम्ही मात्र डान्स बार व लावण्या दिल्यात,' अशी टिका चव्हाण यांनी करत सेना व भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगितले. 'मराठवाडा पोरका झाला आहे. पालकमंत्री १५ ऑगस्ट व २६ जानेवारी शिवाय येत नाहीत. औरंगाबादची वाट लावण्याचे काम येथील सत्ताधारी शिवसेना-भाजपने केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस २८ फेब्रुवारीला सरकार बरखास्त करतील आणि लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक घेतील,' असा दावा केला. 'वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची पाच वेळा भेट घेतली. युतीला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. जागेची तोडजोड करू ती मोठी गोष्ट नाही. मताचे विभाजन टाळा आणि भाजपला पाडा,' असे आवाहन चव्हाण यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images