Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘संतांनी देशाला आधार दिला’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आई देव असते, आईच मुलांना घडवत असते. छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे, शिवाजी महाराजांना लहानपणी माता जिजाऊंनी विविध गोष्टी, कथा सांगितल्या. स्वामी विवेकानंदानांही त्यांच्या आईने लहानपणी रामायण, महाभारतातील कथा सांगितल्या होत्या. आजच्या आईनेही हे काम करायला हवे, संतांचे मार्गदर्शन हे महत्त्वाचे असून संतांनीच देशाला आधार दिला,' असे प्रतिपादन श्री रामकृष्ण मिशन आश्रमाचे प्रमुख तसेच संत विचारांचे प्रचारक स्वामी विष्णुपादानंद यांनी केले.

संत साहित्य शिक्षण व संशोधन प्रतिष्ठानच्या वतिने देण्यात येणारा 'माउली पुरस्कार' रविवारी (दहा फेब्रुवारी) स्वामी विष्णुपादानंद यांना देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी स. भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम भोगले, प्रतिष्ठाणच्या अध्यक्ष डॉ. अर्चना मोहगावकर, डॉ. संजीव सावजी, प्रा. श्रीकांत काशीकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी स्वामी विष्णुपादानंद म्हणाले की, सेवा आणि त्याग हा भारताचा आदर्श आहे. या दोन गोष्टींकडे लक्ष दिल्यास सर्व गोष्टी आपोआप होतात. सर्व धर्म हे भगवंतांकडे घेऊन जातात. त्यामुळे कोणत्याही धर्मातून तुम्ही अध्यात्म प्राप्ती घेऊ शकतो, हा संदेश स्वामी विवेकानंदांनी सर्वांपर्यंत पोचवला. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोला केलेले भाषण लोकांनी डोक्यावर घेतले. भारत हा सर्वात वेगळा देश आहे ही जाणीव इतर देशांमध्ये निर्माण करण्याचे अवघड काम त्यांनी केली असे त्यांनी सांगितले. हा सत्कार माझा नसून संस्थेचा आहे, हा पुरस्कार संस्थेतर्फे स्वीकारत असल्याचे ते नम्रपणे म्हणाले.

स. भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाल्याबद्दल राम भोगले यांचा सत्कार यावेळी संत साहित्य प्रतिष्ठान आणि मंगलमूर्ती संस्कार केंद्र यांच्या वतिने करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी शहरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

\Bशिक्षणात दोष आहेत का ?\B

यावेळी राम भोगले म्हणाले, १९७२च्या दुष्काळात आत्महत्या झाल्या नाहीत, मात्र आज पाऊस असतानाही शेतकरी आत्महत्या होत आहेत. त्यामुळे आजच्या शिक्षणात दोष आहेत काय असे वाटते. आज अधिकाधिक मिळवण्याची लालसा निर्माण झाली आहे. रांगेत आपणच पहिले राहिले पाहिजे ही मानसिकता कमी झालेली नाही. स्पर्धा असावी मात्र ही स्पर्धा स्वत:साठी असावी असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकसभेची मॅच आम्हीच जिंकणारः रामदास आठवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे चांगले बॅटस् मन असून मी चांगला बॉलर आहे. त्यामुळे २०१९ ची लोकसभेची मॅच जिंकल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधी यांनी ७०-८० रन काढावे. पण, त्यांना सेंच्युरी गाठू देणार नाही' अशी उपरोधिक टीका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली. तसेच भाजपचा पुन्हा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मराठवाडा विभागीय मेळावा जबिंदा लॉन्स मैदानावर रविवारी पार पडला. या मेळाव्याला 'रिपाइं'चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सीमा आठवले, जीत आठवले, आमदार अतुल सावे, 'रिपाइं'चे प्रदेशाध्यक्ष बाबूराव कदम, मिलिंद शेळके, विजय मगरे, अरविंद अवसरमल, संजय ठोकळ, किशोर थोरात, दौलत खरात, राजा सरवदे, पप्पू कागदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका करीत राजकीय दिशा सांगितली. 'आंबेडकरी पक्षांच्या ऐक्यासाठी तयार आहे. आता खालच्या लोकांनी चळवळ हाती घ्यावी. ऐक्याला विरोध करणाऱ्यांना वस्तीत न येऊ देण्याचा ठराव घ्या. ऐक्यासाठी मंत्रिपद सोडण्यात तयार आहे' असे आठवले म्हणाले. 'हमे नही चाहिए वो प्रकाश' अशी कोटी करीत आठवले यांनी आंबेडकरी अनुयायांना 'रिपाइं'सोबत येण्याचे आवाहन केले. मुस्लिम बांधवांनी 'एमआयएम'कडे जाऊ नये. भाजप सरकार मुस्लिमविरोधी नाही, असे आठवले म्हणाले.

'भाजपला जातीयवादी म्हणणारे आमच्या पंगतीत जेवून गेले आहेत. शरद पवार, मायावती, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू असे सगळेच आहेत. या टिकेकडे लक्ष न देता आठवले यांना पाठिंबा द्या' असे रावसाहेब दानवे म्हणाले. दरम्यान, औरंगाबाद विमानतळाचे नामकरण लॉर्ड बुद्धा करावे आणि भडकलगेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा १०० फूट करावा अशी मागणी करण्यात आली.

जेमतेम प्रतिसाद

वंचित बहुजन आघाडीला आव्हान देण्यासाठी जबिंदा मैदानावर मोठा मेळावा घेण्याची घोषणा 'रिपाइं'ने केली होती. वंचितच्या सभेला ७० ते ८० हजार नागरिक उपस्थित होते. पुरेशी तयारी करुनही 'रिपाइं'च्या मेळाव्याला जेमतेम पाच हजार नागरिक उपस्थित होते. त्यामुळे हा जिल्हास्तरीय मेळावा आहे, असे काही पदाधिकाऱ्यांनी भाषणात सांगितले.

दक्षिण मुंबईची जागा द्या

लोकसभा निवडणुकीत रिपाइंला दोन जागा द्या, अशी मागणी रामदास आठवले यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना केली. भाजप-शिवसेनेने युती केली पाहिजे आणि मला दोन जागा दिल्या पाहिजे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या कोट्यातील आहे. या जागेवरुन मला निवडून आणा. विधानसभा निवडणुकीत बारा जागा द्या, असे आठवले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाही दिनी चार अर्जांवर सुनावणी

$
0
0

औरंगाबाद : विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय लोकशाही दिनात चार अर्ज दाखल झाले. या सर्व अर्जावर सुनावणी करण्यात आली. या लोकशाही दिनात महापालिका आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी बीड, जिल्हाधिकारी जालना, विशेष पोलिस महानिरिक्षक, औरंगाबाद यांच्या कार्यालयाशी संबंधित चार प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. प्राप्त प्रकरणांमध्ये सर्व संबंधित विभागांनी तत्परतेने नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना उपायुक्त वर्षा ठाकूर यांनी दिल्या. यावेळी उपायुक्त सूर्यकांत हजारे, अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, माहिती संचालक यशवंत भंडारे यांच्यासह संबंधित विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशी दारू तस्करी, एकाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैधरित्या देशी दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी हर्सूल येथे अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून दुचाकीसहीत ५२ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. विष्णू सिंधू काळे (रा. हर्सूल परिसर), असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून देशी दारूच्या दोन बॉक्ससह दुचाकी जप्त करण्यात आली. हर्सूल येथील पुलाजवळ एक तरूण अवैधरित्या देशी दारूची तस्करी करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून सापळा ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप वाळूंजकर, निरीक्षक जावेद कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जी. बी. इंगळे, जवान गणेश नागवे, अनंत शेंदरकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेंद्रा एमआयडीसीत कंपनी मालकाचा गळा आवळून खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेंद्रा एमआयडीसी येथील तुषार इंडस्ट्रीजचे मालक प्रकाश कडुबा कसारे (वय ४८, रा. मुकुंदवाडी) यांचा मृतदेह सोमवारी सकाळी त्यांच्या कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला. कसारे यांचा गळा आवळून खून केल्याचा पोस्टमार्टम अहवालावरून स्पष्ट झाले असून या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत चिकलठाणा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कसारे हे दलित पँथरचे शहराध्यक्ष देखील होते.

प्रकाश कसारे यांची शेंद्रा एमआयडीसीतील कंपनी काही महिन्यापासून बंद आहे. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता कसारे त्यांच्या इंडिगो कारमध्ये बेशुद्धावस्थेत असल्याचे नागरिकांनी पाहिले. चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या पेट्रोलिंग व्हॅनला ही माहिती मिळाल्यानंतर एपीआय सत्यजीत ताईतवाले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. कसारे यांना घाटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. कसारे यांचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून कारमधून कसारे यांचा मोबाइल तसेच कार देखील जप्त केली आहे. वैद्यकीय अहवालामध्ये कसारे यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी कसारे यांच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एपीआय ताईतवाले यांनी दिली.

कारण अज्ञात

प्रकाश कसारे हे दलित पँथर या संघटनेचे शहराध्यक्ष देखील होते. त्यांच्या बंद असलेल्या कंपनीचे शेड त्यांनी काही दिवसापूर्वीच भाड्याने दिल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. कसारे यांच्या मृत्युची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांनी मोठ्या संख्येने घाटी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश जयंती उत्साहात साजरी

$
0
0

औरंगाबाद : कुंभारवाडा, औरंगपुरा भागातील श्री ओम गणेश मंडळातर्फे गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गणेश मंडळातर्फे चार वर्षांपासून गणेश जयंतीनिमित्त अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यंदाही सहस्त्रावर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमात गणेश मंडळाचे सदस्य, व्यापारीवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहाय्यक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या हस्ते आरती करण्यातआली. यावेळी माजी नगरसेवक अनिल मकरिये, हिरालाल भंडारी, झुंबरलाल पगारिया यांची विशेष उपस्थिती होती. आमदार इम्तिजाय जलील, महापालिकेचे विरोधी पक्षनेते जमीर कादरी हे देखील या कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर बक्षी, बंडु गुरुजी पुजारी, पुरोहित वर्गासह व्यापाऱ्यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यावर महापौरांचे स्मित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक करणाऱ्या कंपनीने तीन झोन कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध वसाहतींमधून सोमवारी १४७ टन कचरा गोळा केला. हा कचरा कुठे टाकला, असा सवाल महापौरांना केला असता त्यांनी या प्रश्नावर फक्त स्मित हास्य केले.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल आणि कांचनवाडी येथील जागा निश्चित केल्या आहेत. यापैकी फक्त चिकलठाणा येथील जागेवर प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालवला जात नाही. त्यामुळे कचरा पडून राहतो. अन्य तीन जागांवर अद्याप कचऱ्यावर प्रक्रिया सुरू झालेली नाही. शहरातून रोज सुमारे ४५० टन कचरा गोळा होतो. यापैकी शंभर टन कचरा चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्राच्या जागेत टाकला जात असल्याची शक्यता आहे. उर्वरित कचरा कुठे जातो, असा प्रश्न अनुत्तरित आहे. सोमवारी पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीच्या माध्यमातून झोन क्रमांक दोनमध्ये ४२ टन ओला कचरा आणि १२ टन सुका कचरा गोळा करण्यात आला. झोन क्रमांक सातमधून ६४ टन ओला आणि २० टन सुका कचरा गोळा करण्यात आला. झोन क्रमांक नऊमधून ४५ टन ओला आणि १८ टन सुका कचरा गोळा करण्यात आला. ही माहिती घनकचरा व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्याने महापौरांच्या समक्ष पत्रकारांना दिली. तेव्हा गोळा केलेला कचरा टाकला कुठे, असा प्रश्न महापौरांना केला असता त्यांनी फक्त स्मित हस्य केले. पूर्ण क्षमतेने प्रक्रिया होत नसल्यामुळे कचरा साठवला जात आहे. महापौरांच्या स्मित हस्यातून त्याचा उलगडा झाल्याचे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्र प्रमुखांवर गुन्हा नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावी, बारावी परीक्षेबाबात मंडळाच्या विविध सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावा, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत. मुख्याध्यापकांच्या बैठकीत परीक्षेचा मुद्दा समोर होता. मात्र, सूचना अन् मागण्यांचाच भडीमार होता. उत्तरपत्रिका तपासणीचे काम मुख्याध्यापकांना देऊ नका, केंद्र प्रमुखांवर गुन्हे दाखल करू नका, अशा प्रकारची मागणी मुख्याध्यापकांनी रेटून धरली.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा काही दिवसावर आल्या आहेत. बारावीची लेखी परीखा २१ फेब्रुवारी तर दहावीची एक मार्चपासून सुरू होत आहे. त्या अनुषंगाने परीक्षेच्या तयारीबाबत मुख्याध्यापकांची बैठक घेत शिक्षणाधिकारी, मंडळ अधिकारी यांनी परीक्षेतील माहिती देत, बाकडे, सुविधा पुरविण्याबाबत स्पष्ट केले. शहरीभागासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पेपर लिहिताना काय काळजी घ्यावी, याच्या सूचना परीक्षा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित आहे, परंतु मुलांना सूचना न दिल्यामुळे बऱ्याच वेळा पेपरमध्ये गाणी लिहिणे, भावनिक मजकूर लिहिणे असे प्रकार समोर येतात. परिणामी आक्षेपार्ह लेखन केल्याने कार्यवाहीस सामोरे जावे लागून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होते. हे लक्षात घेत विद्यार्थ्यांना सूचना, नियमावली सांगण्यात यावी अशी सूचना करण्यात आली. तर याच बैठकीत उत्तरपत्रिका तपासणीचे काम मुख्याध्यापकांना देणे योग्य नाही. कारण ते केंद्र प्रमुख म्हणूनही काम करतात. त्यांच्या मानधनात वाढ करावी, केंद्र प्रमुखांवर गुन्हे दाखल करू नये, अशी मागणी मुख्याध्यापकांनी जोर देऊन केली. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी अन् मुख्याध्यापक असा वाद रंगला.

तपासणीनंतरही कॉपी कशी

परीक्षार्थी परीक्षा केंद्रात प्रवेश करताना प्रवेश द्वारावर विद्यार्थ्याची तपासणी करणे आवश्यक असते, तशी ती केलीही जाते. त्यानंतरही विद्यार्थ्यांकडे कॉपी आढळून येते. मोबाइल आढळून येतात. परीक्षा केंद्रावर असलेल्या पर्यवेक्षकांनाही मोबाइल वापरता येत नाही. असे असले तरी अनेकदा शिक्षकांकडेही मोबाइल आढळले. बैठकीत त्यावरही चर्चा करण्यात आली. तपासणीनंतरही विद्यार्थ्याकडे कॉपी कशी येते, कारवाई कोणावर करायची, हा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुथ्थूट फायनान्सची फसवणूक: एकाला अटक

$
0
0

म. टा.प्रतिनिधी ,औरंगाबाद

मुथ्थूट होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बनावट कागदपत्रांआधारे ३० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणात पोलिसांनी सोमवारी एका संशयित आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता १३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. खारकर यांनी दिले. इम्रान आरेफ खान (वय २८, रा. कैसर कॉलनी) असे त्याचे नाव आहे.

मुथ्थूट होम फिन (इंडिया) लि.चे क्लस्टर सेल्स मॅनेजर विजयकुमार तात्याराव चव्हाण यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मुथ्थूट होम फिन कंपनी संशयित आरोपी इम्रान आरेफ खान व त्याची पत्नी रेश्मा इम्रान खान (रा. खासगेट) यांनी गृहकर्जासाठी अर्ज दिला होता. त्यांनी त्यासाठी शांतीलाल चौधरी व सुदर्शन कालिके यांच्याकडून जयसिंगपुरा येथील मालमत्ता खरेदी करीत असल्याची कच्ची इसारपावती केली होती. त्याआधारे कंपनीने २८ लाख ६३ हजार ३१० रुपयांचे कर्जावर ३० हजार ५३६ रुपयांचा हप्ता ठरवून दिला होता. आरोपींनी सात हप्ते भरल्यानंतर ते भरणे बंद केले. त्यामुळे हे कर्ज खाते अनुत्पादक म्हणून घोषीत झाले. आरोपींनी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता आरोपी नोकरीला असलेली कंपनी अस्तित्वात नसल्याचे समोर आले. तसेच कर्ज घेण्यासाठीची मुथ्थुट होम फायनान्स कंपनीचे रिलेशिनशिप ऑफिसर विजयकुमार शंकरराव राठोड यांच्याशी संगनमत करून बनावट कागदपत्रांआधारे २८ लाख ६३ हजार ३१० रुपयांचे कर्ज घेवून कंपनीची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.

बनावट कागदपत्रे कोठे तयार केली ?

पोलिसांनी सोमवारी इम्रान खान याला अटक करून न्यायालयात हजर केले. आरोपींनी बनावट कागदपत्रे कोठे व कशी तयार केली याचा तपास करणे आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का? याबाबत तपास करणे आहे का, याचा तपास करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी न्यायालयात केली. ही विनंती कोर्टाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसथांबे दत्तक घ्या; नगरसेवकांना सूचना

$
0
0

औरंगाबाद : नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डातील बसथांबे दत्तक घ्यावेत आणि त्याचा विकास करावा, अशी सूचना शिवसेना संपर्कनेते विनोद घोसाळकर यांनी महापालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांना केली. घोसाळकर सोमवारी शहरात आले होते. त्यांनी सिडको बसस्थानक ते औरंगपुरा दरम्यान सिटी बसमधून प्रवास केला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन, स्थायी समितीची सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांच्यासह काही नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. महापौरांनी बस प्रवासाचे सर्वांचे तिकीट काढले. घोसाळकर यांनी बस प्रवासाच्या दरम्यान काही सूचना केल्या. सध्या सिटी बस दिवसातून एकदाच स्वच्छ केली जाते. दिवसातून दोनवेळा बस स्वच्छ करा. महापौरांनी महिन्यातून एकदा सिटी बसने प्रवास करावा असे आदेश त्यांनी दिले. सिटी बससाठी प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे. त्यामुळे सिटी बसच्या फेऱ्या वाढवा. नगरसेवकांनी बसथांबे दत्तक घ्यावेत व त्यांचा विकास करावा असेही त्यांनी सांगितल्याचे महापौर म्हणाले. या सूचना अंमलात आणू, असे महापौरांनी पत्रकारांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध घटनात दोन तरुणांची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध दोन घटनांत दोन तरुणांनी गळफास घेत आत्महत्या केली. हे प्रकार सिडको एन-७ आणि नारेगाव येथे रविवारी मध्यरात्री उघडकीस आले. या दोन्ही आत्महत्येचे कारण समजू शकले नसून सबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सिडको एन-७ भागात योगेश सिताराम ठोंबरे (वय ३२) याने रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास खोलीत छताच्या हुकाला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार योगेशच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉक्टरानी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येची दुसरी घटना नारेगाव भागात घडली. येथील मुकद्दर शहा नबी शहा (वय २९ रा. नारेगाव) याने रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास खोलीमध्ये लोखंडी अँगलला साडीच्या मदतीने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार मध्यरात्री उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटी बसचा पहिला अपघात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात नव्यानेच सुरू झालेल्या स्मार्ट सिटी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणारा पादचारी तरूण जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी अकरा वाजता एपीआय कॉर्नरजवळ झाला. दीपक म्हस्के (वय २०, रा. वैद्य टाकळी, औरंगाबाद), असे त्याचे नाव असून त्याला उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सिटी बस (एम एच २० ई जी ९५५४) ही सोमवारी सकाळी मुकुंदवाडीकडून महावीर चौकाकडे जात असताना एपीआय कॉर्नर येथील उड्डाणपुलाखालून म्हस्के रस्ता ओलांडत होता. यावेळी बसचा धक्का लागून तो जखमी झाला. सुरुवातीला त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये आणि नंतर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. सिटी बस मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात उभी करण्यात आली आहे. या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्न समारंभात पुन्हा डल्ला; दहा हजारांचा ऐवज लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

लग्न समारंभातून महिलेची दहा हजार रुपायांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली. हा प्रकार रविवारी सायंकाळी बीड बायपास रोडवरील रेशीम लॉन्स येथे घडला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी ज्ञानदेव देवीदास वाणी (वय ३३, रा. मेहेरून, जि. जळगाव) यांनी तक्रार दाखल केली. वाणी हे पत्नीसह रेशीम लॉन्स येथे विवाह समारंभासाठी आले होते. मंगळसूत्र ठेवलेली पर्स उघड्या असलेल्या रुम क्रमांक पाचमध्ये ठेवून त्यांच्या पत्नी स्वच्छतागृहात गेल्या. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांची पर्स लंपास केली. या पर्समध्ये मंगळसूत्र, पॅनकार्ड, एटीएम कार्ड, मतदान कार्ड आदी ऐवज होता. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जमादार चव्हाण हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवकालिन शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सवानिमित्त शिवकालीन दुर्मिळ शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरु बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू अशोक तेजनकर, कुलसचिव साधना पांडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पार्क फाउंडेशन, अंमळनेरच्या सहकार्याने विद्यापीठ क्रीडा विभागातील बॅडमिंटन हॉलमध्ये हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे, डॉ. हरिदास विधाते, डॉ. राजेश करपे, डॉ. राहुल मस्के,डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. संजय साळुंके, डॉ.शरफुन्निसा निहार, डॉ. वैशाली खापर्डे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. सुधाकर शेंडगे यांची उपस्थिती होती.

यावेळी स्पार्क फाउंडेशनचे पंकज दुसाने शस्त्रांबद्दल सविस्तर माहिती दिली. हे प्रदर्शन १३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे, असे अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. सुधाकर शेंडगे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कत्तलीसाठी जनावरे चोरणारी टोळी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण भागातून अवैध कत्तलीसाठी जनावरे चोरणाऱ्या तिघांच्या टोळीला ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. पडेगाव आणि खुलताबाद येथे ही कारवाई करण्यात आली. या टोळीच्या ताब्यातून चार गायीसह एका वासराची सुटका करण्यात आली. संशयित आरोपींनी सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

शिऊर पोलिस ठाणे हद्दीत चोरी केलेली जनावरे पडेगाव येथील एका घरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने संशयित आरोपी अल्ताफ अय्याज कुरेशी (रा. सिल्लेखाना, पडेगाव) याच्या घरावर छापा मारला. त्याच्या घरात चार गायी आणि एक वासरू आढळले. ही जनावरे आपण वहाब युसूफ कुरेशी व एजाज रियाज कुरेशी (रा. खुलताबाद) यांच्या मदतीने चोरल्याची कबुली अल्ताफने पेालिसांना दिली. पोलिसांनी वहाब आणि एजाज या दोघानांही अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना पुढील तपासासाठी शिऊर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक सचिन कापुरे, गफार पठाण, सुधाकर दौड, विठ्ठल राख, गणेश मुळे, किरण गोरे, संजय भोसले, प्रमोद साळवी आणि चालक तांदळे यांनी केली.

\Bदहा जणांची टोळी\B

ग्रामीण भागातून जनावरे चोरी करणारी ही दहा जणांची टोळी आहे. या टोळीने औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, पिशोर, वैजापूर, पाचोड, बिडकीन आदी भागातून जनावरे चोरली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तोतया बिल्डिंग निरीक्षकाला पाच महिने सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बिल्डिंग निरीक्षक असल्याची थाप मारून वडापाव विक्रेत्याकडून पाचशे रुपये उकळणाऱ्या तोतयाला पाच महिने सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी ठोठावली. आरोपीला ठोठावलेल्या दंडापैकी एक हजार रुपये तक्रारदाराला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. हा प्रकार २३ जुलै २०१६ रोजी शिवाजीनगर रेल्वे रुळाजवळ घडला होता.

गजानन चुन्नीलाल बसैये (वय ४० रा. शिवाजीनगर) हे शिवाजीनगर परिसरात वडापाव विक्रीची हातगाडी लावतात. त्यांच्या हातगाडीवर २३ जुलै २०१६ रोजी दुपारी ईश्वर हिरामण सातदिवे (वय ४५, रा. रेणुकानगर, गारखेडा) हा आला. आरोपी सातदिवे याने तुम्ही येथे हातगाडी कशी काय लावली, मला ओळखता का, मी महापालिकेत बिल्डिंग निरीक्षक असून येथे हातगाडी लावायची असेल, तर एक हजार रुपये द्यावे लागतील, अशी बतावणी केली. यामुळे घाबरलेल्या बसैये यांनी पाचशे रुपये सातदिवेला दिले. यानंतर सातदिवे बाजुला असलेल्या गॅरेजचे मालक आनंद देसाई यांनाकडेही बिल्डिंग निरीक्षक असल्याची बतावणी करत दोन हजार रुपयांची मागणी केली. देसाई यांना शंका आल्याने त्यांनी नगरसेवकाच्या कार्यालयात फोन करून माहिती घेतली. नगरसेवकाच्या कार्यालयातील सुरेश पाटे यांनी पालिकेत विचारणा केली असता आरोपी सातदिवे हा तोतया असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात आरोपी सातदिवे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्याच्या सुनावणीवेळी विशेष सहायक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुच्या युक्तीवाद तसेच साक्षीपुराव्यावरून न्यायालयाने आरोपी सातदिवेला भादवी कलम १७० नुसार पाच महिने सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवस सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतळ्यावरून महापौरांची माफी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचे महापौरांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे शिवप्रेमींच्या संतापासमोर शिवसेनेच्या नंदकुमार घोडेले यांना माफी मागावी लागली.

क्रांतीचौकातील शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी शिवप्रेमी करीत आहेत. गेल्यावर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने (१९ फेब्रुवारी) या मागणीला जोर चढला. पुतळ्याची उंची वाढवण्याचे काम पालिकेकडून होत नसेल, तर आम्ही हे काम करतो, अशी मागणी शिवप्रेमींनी केली. पालिकाच पुतळ्याचे काम करील, निविदा प्रक्रिया पूर्ण करून लगेचच कामास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. मात्र, एक वर्ष आले तरी पुतळ्याचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे सोमवारी विनोद पाटील, अभिजित देशमुख, नगरसेवक राजू शिंदे, गोकुळसिंह मलके, राजेंद्र जंजाळ यांच्यासह शिवप्रेमींनी पालिकेत धाव घेतली. महापौरांनी सुरुवातीलाच या सर्वांची दिलगिरी व्यक्त केली. 'पुतळ्याच्या कामाला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व,' असे ते म्हणाले. यावर राजू शिंदे म्हणाले, 'पुतळ्याच्या कामाची निविदा काढली का, निविदा काढली असेल, तर ती आठ फेब्रुवारीला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी का ठेवली नाही.' यावर उपअभियंता राजपूत म्हणाले, 'स्थायीची बैठक झाल्यावर प्रस्ताव तयार झाला. त्यामुळे तो प्रस्ताव बैठकीत ठेवता आला नाही.' विनोद पाटील म्हणाले, 'पुतळ्याचे काम करण्याची मानसिकता पालिकेत नाही. आम्हाला ना हरकत प्रमाणपत्र द्या, आम्ही उद्याच काम सुरू करतो. कामाच्या आड कोण येतो ते पाहतो.' पृथ्वीराज पवार म्हणाले, 'पुतळ्याचे काम होत नसेल तर १९ फेब्रुवारीरोजी पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी कुणालाही येऊ देणार नाही.' विनोद पाटील यांनी पुन्हा ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली. 'महापौर - सभागृहनेत्यांनी काम सुरू केले असे सांगतो. आम्हाला श्रेय नको. पालिकेची विश्वासार्हता संपली आहे. एक वर्ष गेले. आता पुन्हा एक वर्ष जाईल. त्यातच निवडणूक आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे अडचणी येतील. ना हरकत प्रमाणपत्र देणार नसाल, तर आम्ही काम सुरू करतो. गुन्हा दाखल करायचा असेल तर करा' असे आव्हानही पाटील यांनी दिले.

महापौर उपस्थितांना उद्देशून म्हणाले, 'माझ्याकडे पाहून तरी असे करू नका. मी तुमची माफी मागतो.' यावर विनोद पाटील म्हणाले, 'तुमच्याकडे पाहूनच इतके दिवस आम्ही थांबलो. पालिकेने शिवाजी महाराजांची चेष्टा चालवली आहे. आम्ही हात जोडतो आम्हाला ना हरकत प्रमाणपत्र द्या.' महापौर म्हणाले, 'पुतळ्याच्या कामाची निविदा लगेचच स्थायी समितीकडे पाठवण्यात येईल. स्थायी समितीची बैठक लवकर घेण्याबद्दल सभापतींनी विनंती केली जाईल. १५ फेब्रुवारीरोजी पुतळ्याच्या ठिकाणीच बैठक घेवू आणि त्यानंतर दोन -तीन दिवसांत काम सुरू केले जाईल.' राजू शिंदे म्हणाले, 'शिवाजी महाराजांबद्दल थोडा जरी अभिमान असेल, तर १५ फेब्रुवारीला काम सुरू करा. निविदा मंजुरीसाठी रात्री बारा वाजता स्थायी समितीची बैठक घ्या.'

\Bटक्केवारीची भानगड

\Bपृथ्वीराज पवार यांनी कळीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, 'पुतळ्याचे काम सुरू होत नाही याचा अर्थ यात काही टक्केवारीची भानगड आहे का ? बॅकडेटमध्ये तुम्ही बाकीची कामे करता मग छत्रपतींच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामासाठीच उशीर कशासाठी ?' विनोद पाटील म्हणाले, 'काम मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे हवे आहेत का, किती पैसे पाहिजेत ते सांगा आम्ही पैसे पाठवून देतो.' राजू शिंदे म्हणाले, 'पुतळ्याच्या कामातून काही मिळणार नाही म्हणून उशीर केला जात आहे.'

\Bफाइलचा प्रवास

\B- २५ मे २०१८ फाइलचा श्रीगणेशा

- ५ जून २०१८ पोलिस आयुक्तांकडे एनओसी

- ११ डिसेंबर २०१८ प्रशासकीय मान्यता मिळाली

- १२ डिसेंबर २०१८ निविदा काढण्यास मान्यता

- १४ जानेवारी २०१९ पहिली निविदा काढली

- ५ फेब्रुवारी २०१९ फेरनिविदा काढून उघडली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकाट कुत्र्यांचे आव्हान, महापौरांची कबुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मोकाट कुत्र्यांचे आव्हान खरोखरच मोठे आहे. कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे एवढेच आपल्या हाती आहे,' अशी कबुली महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे गेल्या तीन - चार दिवसांत शहराच्या विविध भागातील मुले गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. कुत्र्यांकडून होत असलेल्या हल्ल्याबद्दल पत्रकारांनी महापौरांना छेडले. महापालिका प्रशासन आणि कुत्रे पकडण्यासाठी नियुक्त केलेली संस्था योग्य प्रकारे काम करीत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे, असे महापौरांच्या लक्षात आणून देण्यात आले. यावर म्हापौर म्हणाले, 'मोकाट कुत्र्यांचे मोठे आव्हान आहे. कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. शस्त्रक्रियेमुळे कुत्र्यांचा जन्मदर वाढणार नाही. कुत्रे पकडण्याचे प्रमाण वाढवण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. एक एप्रिलपासून आतापर्यंत २९०० कुत्रे पकडण्यात आले. रोज चाळीस ते पन्नास कुत्रे पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे टार्गेट ब्ल्यू क्रॉस संस्थेला देण्यात आले आहे. या संस्थेने सोमवारी २५ कुत्रे पकडले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ पर्यायावर आज निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या पर्यायावर मंगळवारी (१२ फेब्रुवारी) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निर्णय होणार आहे. 'पीपीपी'तत्वावरील समांतर जलवाहिनीची योजना रद्द करून, त्या जागी नवीन योजना हाती घेण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

समांतर जलवाहिनीसाठी पर्यायी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याबद्दल पालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव ठेवला आहे. पालिकेने 'पीपीपी'तत्वावरील समांतर जलवाहिनी योजनेचे काम एसपीएमएल (सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमीटेड) या कंपनीला दिले होते. आता या कंपनीने समांतर जलवाहिनीच्या योजनेसाठी 'एस्सेल' ग्रुपला मुख्य भागीदार करण्याची अट घातली आहे. कायदेशीदृष्ट्या ही अट मान्य करता येणे शक्य नाही, असा स्पष्ट अभिप्राय जिल्हा सरकारी वकिलांनी नोंदवल्यामुळे 'एसपीएमएल' कंपनीने समांतर जलवाहिनीच्या कामातून माघार घेतली आहे. या सर्व घटनाघडामोडींचा उल्लेख करून पालिका आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत समांतर जलवाहिनीसाठी पर्याय निवडण्यासाठीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवला. नवीन पर्याय निवडताना 'पीपीपी'तत्वावरचा मूळ प्रस्ताव पालिकेला रद्द करावा लागणार आहे. हा प्रस्ताव रद्द केल्यावर नवीन कोणता पर्याय निवडायचा याचा निर्णय देखील सर्वसाधारण सभेत नगरसेवकांना घ्यावा लागणार आहे.

सेवाशुल्क वसुलीचे खासगीकरण

कचऱ्याच्या वाहतूक आणि संकलनाचे काम महापालिकेने खासगीकरणातून सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांकडून सेवाशुल्क वसूल केले जाणार आहे. निवासी भागातून दररोज एक रुपया, तर व्यावसायिक भागातून रोज दोन रुपये शुल्क वसूल केले जाणार आहे. खासगी संस्थेच्या माध्यमातून शुल्क वसूल करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रशासनाने सर्वसाधारण सभेत ठेवला आहे. सेवा शुल्क वसुलीचे धोरण देखील सर्वसाधारण सभेत निश्चित केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२३ मालमत्ता जप्त, १४ लाखांची वसुली

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या प्रशासनाने विविध झोन कार्यालयांच्या माध्यमातून सोमवारी (११ फेब्रुवारी) २३ मालमत्ता जप्त केल्या. या मालमत्ताधारकांकडे ३० लाख ९५ हजार रुपयांची थकबाकी होती. त्यापैकी १४ लाख ४३ हजार रुपये वसूल करण्यात आले. झोन दोन कार्यालयाच्या अंतर्गत तीन, झोन तीन कार्यालयाच्या अंतर्गत तीन झोन चार कार्यालयाच्या अंतर्गत चार, झोन सहा कार्यालयाच्या अंतर्गत दहा तर झोन आठ कार्यालयाच्या अंतर्गत तीन मालमत्ता सील करण्यात आल्याची माहिती कर निर्धारक व संकलक विभागातर्फे देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images