Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कचऱ्यावर उपभोक्ता कर; वसुलीसाठी निविदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा संकलनासाठी लावलेल्या उपभोक्ता कराच्या वसुलीसाठी सेवाभावी संस्थेची नेमणूक करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव नगरसेवकांनी हाणून पाडला असून, या कामासाठी आता निविदा काढण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

महापालिकेने कचरा संकलन आणि वाहतुकीच्या कामाचे खासगीकरण करून हे कंत्राट पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दहा वर्षांसाठी दिले आहे. हे काम सुरू झाल्यावर महापालिकेने नागरिकांकडून उपभोक्ता कर वसूल करावा, असा उल्लेख घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात २०१६मध्ये तयार केलेल्या नियमामध्ये आहे. या नियमाचे पालन करण्यासाठी महापालिकेने उपभोक्ताकर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. निवासी क्षेत्रातून दररोज एक रुपया, तर व्यावसायिक क्षेत्रातून दररोज दोन रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे शुल्क वसूल करण्यासाठी सेवाभावी संस्थेची नेमणूक करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला होता. मात्र, त्याला नगरसेवकांनी विरोध केला. घनकचरा संकलन करणाऱ्या खासगी एजन्सीतर्फे कमीत कमी ३०० वाहने शहरात घरोघरी कचरा संकलनासाठी वापरली जाणार आहेत. एका घंटागाडीच्या माध्यमातून एक हजार घरातून कचऱ्याचे संकलन होईल. उपभोक्ता कर वसूल करण्यासाठी सेवाभावी संस्थेची एक व्यक्ती एका घंटागाडी सोबत असेल. सेवाभावी संस्थेतर्फे नेमण्यात येणारा व्यक्ती घरोघर कचऱ्याचे वर्गीकरण होते की नाही, याची खात्री करेल व वर्गीकरण करण्यात आलेल्या कचऱ्याचेच संकलन केले जाईल. उपभोक्ता कर वसूल करण्यासाठी प्रत्येक गाडीवर एक व्यक्ती या प्रमाणे तीनशे गाड्यांवर तीनशे व्यक्तींची नेमणूक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून केली जाईल. या शिवाय व्यावसायिक क्षेत्रासाठी वेगळ्या नेमणुका होतील असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र, प्रशासनाचा हा प्रस्ताव नगरसेवकांनी हाणून पाडला. त्यामुळे प्राप्त होणाऱ्या निविदांची छाननी करून पात्र ठरणाऱ्या निविदाधारकाला नियमानुसार काम द्यावे असे नगरसेवकांनी सूचविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रक्रिया प्रकल्पांचे काम वेगाने करा; विभागीय आयुक्तांचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे काम वेगाने करा, असे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. पालिका अधिकाऱ्यांनी केद्रेकरांसमोर तांत्रिक अडचणींचा पाढा वाचला. या अडचणी दूर करू, तुम्ही काम करा, असे केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

विभागीय आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी केंद्रेकर यांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या होत्या. घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात शासनाने तयार केलेल्या संनियंत्रण समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त आहेत. त्यामुळे त्यांनी घनकचऱ्याच्या संदर्भात संबंधितांची बैठक घ्यावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार केंद्रेकर यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीसाठी पालिकेच्या दक्षता कक्षाचे प्रमुख एम. बी. काजी, कर निर्धारक महावीर पाटणी, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्यासह सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना बोलावले होते. वॉर्ड अधिकाऱ्यांना बैठकीसाठी विभागीय आयुक्तांच्या दालनात प्रवेश देण्यात आला नाही. केंद्रेकर यांनी काजी, पाटणी आणि भोंबे यांच्याबरोबर चर्चा केली. सुरुवातीला त्यांनी कामाचा आढावा घेतला. कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे काम धिम्या गतीने सुरू असल्याचे लक्षात आल्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम गतीने करा असे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉपी प्रकरणात बदनाम केंद्रावरही परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कॉपीमुक्त परीक्षा अशी घोषणा मंडळाकडून करण्यात येते. प्रत्यक्षात औरंगाबाद विभागात कॉपी सर्रास सुरू असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात कॉपी प्रकरणे झालेली असतानाही परीक्षा केंद्र दिल्याचे लक्षात आल्याने बारावीचे दोन केंद्र जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले. परभणी जिल्ह्यातील हे केंद्र असून परीक्षार्थींची बैठक व्यवस्था इतर केंद्रावर केली जाणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावी परीक्षेत कॉपीमुक्त परीक्षेसाठी विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, त्यानंतरही कॉपी प्रकरणांना आळा बसलेला नाही. महसूल विभागाच्या बैठे पथकांमुळे वचक असली तरी अनेक ठिकाणी हे पथक नसते. मागील वर्षीही अनेक केंद्रावर कॉपीचे प्रकार घडले. अशाच दोन केंद्रांवर परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये बोरवंड येथील विश्वभारती कनिष्ठ महाविद्यालय व रामेटाकळी येथील महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्यामुळे यंदा ही केंद्र फेब्रुवारी-मार्च २०१९ परीक्षेसाठी रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींची बैठक व्यवस्था इतरत्र करण्यात आलेली आहे.

बदललेले केंद्र

विश्वभारती कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची व्यवस्था नृसिंग कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आली आहे. महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षार्थीं नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा देणार आहेत. या बदलाची विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय रुग्णालयांचे प्रश्न सोडवा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि अर्थ खात्याच्या सचिव आणि विशेष सरकारी वकील ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे यांच्यासोबत बैठक घेऊन केवळ घाटीच नव्हे, तर मराठवाड्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांतील विविध प्रश्नांवर निर्णय घेण्याचा आणि त्याची माहिती पुढील सुनावणीच्यावेळी सादर करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी गुरुवारी शासनाला दिला.

२० सप्टेंबर २०१८ रोजी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या औरंगाबाद टाइम्समध्ये 'घाटी खड्ड्यात' हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे यांनी घेतली. या घाटीला वैद्यकीय सुविधांची गरज आहे. ही घाटी केवळ औरंगाबाद शहराचीच नव्हे, तर आजूबाजूच्या जिल्ह्यांतील रुग्णांनाही सेवा देते. या इस्पितळात पॅरासिटॅमॉलसारख्या गोळ्याही उपलब्ध नाहीत. ट्रॉमा युनिटला व्हेंटिलेटरची कमतरता आहे. या घाटीला निधीची आवश्यकता आहे, असे या याचिकेत म्हटले आहे. तसेच लिफ्ट बंद असल्यामुळे तसेच स्ट्रेचर उपलब्ध नसल्यामुळे घाटी दवाखान्यात बाळंतपणासाठी आलेली महिला दुसऱ्या मजल्यावर चढून जात असताना पायऱ्यांवरच बाळंत होऊन पडल्यामुळे नवजात बालक दगावले होते. त्याबाबत दाखल जनहित याचिका या दोन्ही याचिकांवर गुरुवारी एकत्रित सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान घाटी दवाखान्यातील मशिनरी, कर्मचारी, औषधी, तंत्रज्ञ, आदी बाबींसंबंधी सविस्तर चर्चा झाली.

या प्रकरणात राज्य शासनातर्फे विशेष सरकारी वकील ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे आणि सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे, जनहित याचिकाकर्त्यातर्फे नितीन गवारे, न्यायालयाचे मित्र (अॅमिकस क्युरी) राजेंद्र एस. देशमुख यांनी काम पाहिले. या याचिकांची सुनावणी २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

\Bअधिष्ठातांनी दिली माहिती \B

घाटी दवाखान्याच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी घाटी दवाखान्याची ख्याती आणि सध्या उपलब्ध यंत्रसामग्री, सुपर स्पेशियालिटी विभाग, तळमजल्यावर नुकतेच सुरू करण्यात आलेल्या प्रसुती विभाग व इतर सोयी सुविधांची माहिती दिली. तर घाटीच्या प्रशासनाने मागणी केलेल्या १७५ औषधांपैकी केवळ १२५ औषधे (७० टक्के) हाफकीन इन्स्टिट्युटमार्फत पुरविले जातात. उर्वरित औषधी स्थानिक स्तरावर खरेदी करावी लागतात, असे त्यांनी सांगीतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा तणावमुक्तसाठी मंडळाचे समुपदेशक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावी, बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना काही तणाव असेल किंवा अडचणी असतील तर या हेतुने तणावमुक्त परीक्षेसाठी मंडळाने समुपदेशकांच्या नेमणुका केल्या आहेत. सहा जणांची समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २१ फेब्रुवारीपासून बारावी तर १०वी परीक्षा एक मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षेबद्दल अनेकांच्या मनात भीती असते, संभ्रम असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, परीक्षेचे दडपण घेऊ नये त्यांचे समुपदेशन व्हावे या हेतुने मंडळाने समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. औरंगाबाद विभागात सहा समुपदेशक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. औरंगाबाद वगळता प्रत्येक जिल्ह्यात एक समुदेशक असणार आहे. त्यांचा भ्रमणध्वनीही मंडळाने जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण आला किंवा भीती, दडपण असल्यास त्यांनी समुपदेशकाशी संपर्क साधवा, असे आवाहन ही करण्यात आले.

समुपदेशक

औरंगाबाद - शशीमोहन सिरसाट(९४२२७१५५४६)

शुभांगी हिस्वनकर (९८२२७४०१३१३)

बीड - एस. पी. मुटकुळे (९६८९६४०५००)

जालना एस. टी. पवार (९४०५९१३८००)

परभणी पी. एम. सोनवणे (९४२२१७८१०१)

हिंगोली एस. जी. खिल्लारे (९०११५९४९४४)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात अनुदान वाटपाचाही दुष्काळ

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

फेब्रुवारी अखेरपर्यंत जाहीर करण्यात आलेले सर्व अनुदान वाटप करण्याचा शासनाचा आग्रह असताना मराठवाड्यात मात्र गेल्या २० दिवसांपासून मिळालेले ५२५ कोटी रुपयांपैकी तब्बल निम्मे अनुदान सरकारी तिजोरीत पडून आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत यातील केवळ ४२ टक्के अनुदानच शेतकऱ्यांच्या पदारात पडले आहे.

मराठवाड्यातील दुष्काळ जाहीर करून अडीच महिने, तर केंद्राच्या दुष्काळी पाहणी पथकाने पाहणी करून दीड महिना उलटला आहे. मराठवाड्याला आवश्यक असलेल्या २ हजार ५६४ कोटी रुपयांच्या मदतीच्या रकमेपैकी १ हजार ५० कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यातील पहिल्या हप्त्यात देण्यात आलेल्या ५२५ कोटी रुपयांचे वाटप गेल्या २० दिवसांपासून सुरू आहे. अनुदान प्राप्त झाल्यानंतर तत्काळ दुसऱ्या दिवशीपासून लाभार्थ्यांच्या याद्याप्रमाणे अनुदान वाटपास सुरुवातही झाली होती. मात्र, तीन आठवड्यानंतरही अनुदान वाटपाची कासवगती कायम आहे. सर्वात कमी केवळ १३ टक्के अनुदान जालना जिल्ह्यात वाटप करण्यात आले असून सर्वाधिक ९९ टक्के अनुदान लातूर जिल्ह्यात वाटप करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात लाभार्थीसंख्या कमी असून या जिल्ह्याने ९ हजार ८९३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा केले आहे.

अत्यल्प पावसामुळे यंदाही मराठवाड्यातील शेतीचे अर्थचक्र कोलमडले आहे. मराठवाड्यातील ४८ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ३३ लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांची दुष्काळामुळे धूळधाण झाली आहे. यामध्ये एकूण ३६ लाख २७ हजार शेतकऱ्यांपैकी ३२ लाख ५५ हजार (९० टक्के) शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. दुष्काळी अनुदान जाहीर झाले मात्र हे अनुदान मिळणार कधी याची वाट शेतकरी पाहत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान मिळाल्यानंतरही केवळ प्रशासकीय यंत्रणांच्या ढिसाळ कारभारामुळे अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्याचे चित्र आहे. मराठवाड्याला आणखी दीड हजार कोटी रुपयांचे अनुदान येणार असून मार्चपूर्वीच हे अनुदान वाटप करण्याचा प्रशासनाचा आग्रह आहे. मात्र, पहिल्याच हप्त्यात अनुदान वाटप करताना प्रशासनाची दमछाक झाली आहे.

जिल्हानिहाय मिळणारी रक्कम (रक्कम लाखात)

जिल्हा................. प्रथम हप्ता.............. बँक खात्यात जमा.................. टक्के

औरंगाबाद...............१११.६४.................३१७७.४२.............................२८.४६

जालना...................९७.९०....................१३१३.९२..........................१३.४२

बीड......................१२६.९४..................८९२६.५५..........................७०.३२

लातूर......................३.३१...................३३१.०४.............................९९.७२

उस्मानाबाद...............६९.९८................२४१०.४९...........................३४.४४

नांदेड....................२५.७५...................१७७१.४७.........................६८.७८

परभणी.................५३.७७......................३०२६.८१.........................५६.२६

हिंगोली.................३५.९७......................१२९१.१०.........................३५.८८

एकूण....................५२५.२९..................२२२४८.८०.......................४२.३५ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकाला अटकाव करित मारहाण करण्यात आली. आरोपीला पसार करीत त्याचा भाऊ देखील यावेळी पळून गेला. हा प्रकार बुधवारी दुपारी साडे तीन वाजता बुढ्ढीलेन भागात घडला. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शेख सरवर यांनी तक्रार दाखल केली. बेगमपुरा पोलिस ठाण्यात शेरा उर्फ नदीम शेख अख्तर याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. तो बुधवारी दुपारी साडे तीन वाजता बुढ्ढीलेनमधील मुगल दरबार हॉटेलजवळ आल्याची माहिती उपनिरीक्षक शेख सरवर यांना मिळाली होती. त्यावरून पोलिस पथक तेथे गेले. शेराला पकडण्यासाठी पोलिस आल्याचे समजल्यानंतर त्याचा भाऊ बब्बर उर्फ कलीम अख्तर शेख याने गोंधळ सुरू केला. पोलिसांना मारहाण करित त्याने परिसरात दहशत माजवली. या गोंधळात शेरा हा पळून गेला. शेरा पळून जाताच गर्दीचा फायदा घेत बब्बर सुद्धा पळून गेला. या प्रकरणी बब्बर उर्फ कलीम अख्तर शेख याच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे,आरोपीला पळवून लावणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी उपनिरीक्षक तांगडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वा दोन लाख पळवले, संशयितांचा शोध सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

व्यापाऱ्याची कार पंक्चर करून सव्वा दोन लाख रुपये असलेली बॅग पळवणाऱ्या दोन चोरांचा शोध पोलिस घेत आहेत. हा प्रकार एका सीसीटीव्हीत चित्रीत झाला आहे. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी रात्री साडे दहा वाजता जिन्सीमधील मदनी चौकात घडला.

सुमतीलाल बन्सीलाल गुगळे (रा. सिडको एन ७) यांचे जुन्या मोंढ्यात होलसेल किराणा मालाचे दुकान आहे. ते बुधवारी दिवसभरात जमा झालेली सव्वा दोन लाखांची रक्कम दुकान बंद केल्यानंतर बॅगमधून घेऊन जात होते. त्यांनी बॅग कारच्या मागील सिटवर ठेवली होती. यावेळी त्यांच्या कारच्या पुढील काचेवर ऑइल टाकल्याचे दिसले. ऑइल पुसण्याचा प्रयत्न केला, मात्र ते निघत नसल्याने तसेच कार सुरू करून घराकडे निघाले. त्यांच्या पाळतीवर असलेल्या चोरांनी मदनी चौकात त्यांची कार पंक्चर केली. हा प्रकार पाहण्यासाठी गुगळे हे कारमधून उतरले असता चोरांनी मागच्या सिटवर ठेवलेली सव्वा दोन लाख रुपये असलेली बॅग पळवली. या प्रकार लक्षात येताच गुगळे यांनी पोलिसांना माहिती दिली. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख, विजय पवार, जिन्सी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्ता शेळके आदींनी घटनास्थळी धाव घेतली. चोराचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज प्राप्त केले आहे. यामध्ये दोन संशयित दिसले असून त्यांची ओळख पटवण्यात येत आहे.

\Bशहराबाहेरची टोळी असल्याचा संशय\B

गुगळे यांचा पाठलाग करीत नियोजनबद्धरित्या त्यांची बॅग चोरट्यांनी लंपास केली. काचेवर ऑइल टाकणे, कार पंक्चर करणे आदींचा नियोजनात समावेश होता. यावरून हे कृत्य स्थानिक गुन्हेगाराचे नसून यात शहराबाहेरील टोळी असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वक्फ बोर्डाची सर्व प्रादेशिक कार्यालये बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वक्फ बोर्डाच्या संपत्तीचे रक्षण करणे, तसेच सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्यात सहा ठिकाणी प्रादेशिक कार्यालयांची स्थापना करण्यात आली होती. पण, प्रादेशिक अधिकाऱ्यांकडून कामे केली जात नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाशी संबंधीत सर्व कामे एकाच छताखाली व्हावीत याकरिता पाणचक्की येथील मुख्यालयात सर्व प्रादेशिक कार्यालये सुरू करण्याचा निर्णय वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम. एम. शेख यांनी घेतला आहे.

वक्फ बोर्डाच्या राज्यात २३ हजार ५६६ मालमत्ता असून ३७ हजार ३३०.९७ हेक्टर जमीन आहे. या संपत्तीसह भाडेकरू आणि इतर कारभार राज्यभरात विस्तारला आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर होत असलेले अतिक्रमण आणि भाडेकरू, तसेच मुतवल्ली यांना औरंगाबाद येथे मुख्यालयात चकरा मारण्याची वेळ येऊ नये याकरिता औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे आणि कोकण येथे प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही अनेक भाडेकरूंच्या समस्या तेथे सोडविल्या जात नव्हत्या. शिवाय प्रादेशिक कार्यालयाचे अधिकारी कोणत्याही कामासाठी औरंगाबादचा रस्ता दाखवित असत. या तक्रारी समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

या सर्व प्रादेशिक कार्यालये औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ कार्यालयात सुरू करण्यात येणार आहे. या सहा प्रादेशिक कार्यालयांतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना औरंगाबाद मुख्यालयात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय वक्फ मंडळाचे अध्यक्ष शेख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तडवी यांच्या बैठकीत घेण्यात आला. या सहा प्रादेशिक कार्यालयांतील २०पेक्षा जास्त कर्मचारी औरंगाबाद मुख्यालयात समावून घेतले जाणार आहेत. तसेच या प्रादेशिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा करण्यात येत आहे, असे शेख यांनी सांगितले.

……

ते आठ कर्मचारी रोजंदारी

वक्फ कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना वक्फ बोर्डाच्या सेवेत घेण्यात आल्याचा आरोप काही संघटनेनी केला होता. या सर्व आठ कर्मचाऱ्यांना दैनिक मानधनावर काम दिले असल्याची माहिती एम. एम. शेख यांनी दिली.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवजयंती तयारी; आज पालिकेत बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवजयंतीच्या तयारीसाठी शुक्रवारी महापौरांनी महापालिकेत बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीचा विषय मिरवणूक आणि इतर कार्यक्रम ठरविण्याचा असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामासंदर्भात या बैठकीत ठोस निर्णय होईल, असे मानले जात आहे.

क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या मागणीसाठी वर्षापूर्वी दिलेले आश्वासन महापौरांनी पाळले नाही. अद्याप पुतळ्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे सोमवारी विनोद पाटील, अभिजित देशमुख व नगरसेवक राजू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमींनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली व पुतळ्याचे काम महापालिकेतर्फे होणार नसेल तर आम्हाला ना हरकत प्रमाणपत्र द्या, आम्ही काम करतो अशी गळ घातली. तेव्हा शिवजयंतीपूर्वी काम सुरू करण्याचे आश्वासन देवून महापौरांनी कामाच्या संदर्भात १५ फेब्रुवारीरोजी बैठक घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही बैठक होत आहे. शिवजयंतीच्या निमित्याने शहरातून मिरवणूक काढली जाते. मिरणूक मार्गात दिवाबत्ती, स्वच्छता, पाणी व्यवस्था ही कामे पालिकेतर्फे केली जातात. याचे नियोजन देखील यावेळी केले जाईल, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळात विद्यार्थ्यांकडूनच वसूल केले १२ लाख!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना सरकारच्या परीक्षा शुल्कमाफीचा फायदा झाला नाहीच. उलट विभागीय मंडळाने ४०५९ विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या पूर्व व्यावसायिक विषयांच्या विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त वसूल केलेली हे शुल्क आता परत केले जात आहे. परीक्षांचा विचार करता विद्यार्थ्यांना ते मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण घेता यावे या हेतुने विविध विषय घेण्याची मुभा आहे. यामध्ये पाच विषय आहेत. त्यात विभागात तीन विषयाला विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले. यामध्ये 'मल्टीस्किल फाउंडेशन बेसीक टेक्नॉलॉजी' (८१), 'मॅकॅनिकल टेक्नॉलॉजी'(९१), 'इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक टेक्नोलॉजी' (९२) विषयांचा समावेश आहे. या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रत्येक विद्यार्थी ४०० रुपये घेतले. याबाबत राज्यभर ओरड झाली. मंडळ चुकीचा अर्थ घेत विद्यार्थ्यांकडून अधिकचे शुल्क आकारत आहे. अशा प्रकारची अयोग्य शुल्कवसुली थांबवावी, अशी ओरड झाल्यानंतर मंडळाने वसूल केलेल्या शुल्कापैकी ३०० रुपये परत करण्याचे जाहीर केले. औरंगाबाद जिल्ह्यात अशा विषयांची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चार हजार ५९ एवढी आहे. त्यांच्याकडून मंडळाने १६ लाख २३ हजार ६०० रुपयांची रक्कम शुल्कापोटी जमा केली. त्यातील १२ लाख १७ हजार ७०० रुपये आता परत केले जात आहे. मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. राज्यशासनाने परीक्षा शुल्कमाफी जाहीर केली, परंतु ती उशिराने झाली त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष लाभ विद्यार्थ्यांना झाला नाही. त्याचवेळी मंडळाच्या कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांना अधिकचे शुल्क भरावे लागले.

विद्यार्थ्यांना परत मिळणार का

शिक्षण मंडळाने दहावीच्या पूर्वव्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे प्रत्येक विद्यार्थ्याकडून ४०० रुपये शुल्क आकारले होते. ३०० रुपये अधिकचे आहेत. आता हे पैसे परत केले जात आहेत. मात्र, आता परीक्षेची लगबग सुरू आहे. विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत आहेत. मंडळ आता शाळांना शुल्क परत करते आहे. परीक्षेनंतर विद्यार्थी परत येतील तेव्हा किंवा आता प्रत्यक्ष शाळा विद्यार्थ्यांना त्यांचे घेतलेले अतिरिक्त शुल्क परत करणार का, त्यावर कोण नियंत्रण ठेवणार हा प्रश्न आहे. दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा फटका मंडळाच्या कारभारामुळे बसला आहे. परीक्षा शुल्कमाफीचा फायदा नाहीच मात्र, अतिरिक्त वसुलीने विद्यार्थ्यांच्या पालकांचा खिसा रिकामा झाला.

एवढ्या शाळा... २११

एकूण विद्यार्थी संख्या... ४०५९

अशी आहे जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या…

विषय……... औरंगाबाद.. बीड…...जालना...परभणी…..हिंगोली..

८१………… ३४० १५३ १४३ १०० १७२

९१ ९४४ २९६ १०४ १९६ १९२

९२ ७४९ २४३ २३१ १४८ १११

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रामा’त ‘राजस्थानी’ फूड फेस्टिव्हल

$
0
0

औरंगाबाद :

राजस्थानमध्ये जैसलमेर येथे मोठी यात्रा भरविण्यात येते. या यात्रेनिमित्त हॉटेल रामा इंटरनॅशनलच्या मधुबन रेस्टॉरेन्ट येथे १५ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी दरम्यान राजस्थानी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७.३० नंतर या फूड फेस्टिव्हलची सुरुवात होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये खवय्यांना गट्टा करी, केरसागरी. मंगेडीसाद, कुमठी, राजस्थानी दाल बाटी, चुरमा यासह लाल मास, मुर्ग जोधपुरी, जंगली मास असे चविष्ट राजस्थानी खाद्य पदार्थ उपलब्ध राहणार आहेत. राजस्थानी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी प्रती व्यक्ती ११०० रुपये अधिक जीएसटी असे दर ठेवण्यात आले असल्याची माहिती रामा इंटरनॅशनलचे श्रीकांत जोगदंड, सिरील न्यून्स, दिनकर सरदेसाई आणि राजस्थानी मास्टर शेफ रणजित सिंग रावत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'अनुलोम' काढणार जिल्ह्यातील २८७ तलावातील गाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत व लोकसभागातून यावर्षीही अनुलोम संस्थेने औरंगाबाद जिल्ह्यातील २८७ तलावातील गाळ काण्याचे निश्चित केले आहे. पहिल्या टप्प्यातील १२२ तलावातील गाळ काढण्याच्या कामाबाबत शासनासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

राज्यभरात ही संस्था तब्बल २६०० तलावातील गाळ काढणार असून त्या संदर्भत महाराष्ट्र शासन व अनुलोम संस्था यांच्यात राज्यपातळीवर करार झाला आहे. राज्य शासनाची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या अंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात ही संस्था लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याचे काम करणार आहे. संस्थेच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने हा गाळ मोफत काढून देण्यात येणार असून जेसीबी डिझेलचा खर्च शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना केवळ गाळ वाहून नेऊन आपल्या शेतात टाकावा लागणार आहे. त्यातून तलावाचे खोलीकरण होऊन मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे तर सुपिक गाळाच्या माध्यमातून शेतीच्या उत्पादकतेत वाढ असा दुहेरी फायदा होणार आहे.

राज्यभरातून या संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या कामातून ५०० कोटी लीटर पाणीसाठा वाढणार आहे. त्याचा लाभ १५ हजार खेड्यातील २० हजार शेतकरी व ६० लाख लोकांना मिळणार आहे.

संस्थेने गेल्यावर्षीही लोकसहभागातून शासनाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत काम करुन जिल्ह्यातील ११४ तलावातून ८ लाख १८ हजार ६१३ घनमीटर गाळ काढला होता. याचा लाभ जिल्ह्यातील ८४२ शेतकऱ्यांनी घेतला. १११९ एकर क्षेत्रावर हा गाळ टाकण्यात आला. तर राज्यात गेल्यावर्षी अनुलोमच्या सहभागातून १६८० तलावातील गाळ काढला होता. या उपक्रमास शेतकऱ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता, असे अनुलोम संस्थेने कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समर्थनगर चोरी; दोघांच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समर्थनगरातील व्यंकटेश अपार्टमेंटमध्ये भरदिवसा फ्लॅटचे लॉक तोडून २४ तोळे सोन्यांसह एक लाखांची रोकड चोरल्याप्रकरणी अटकेतील संशयित आरोपी किशोर तेजराव वायाळ व राजू शिवाजी इंगळे यांच्या पोलिस कोठडीत शनिवारपर्यंत (१६ फेब्रुवारी) वाढ करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) दिले.

अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीला असलेल्या सुनीता धर्मेंद्र पुराणिक (वय ३८) यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना चार फेब्रुवारी रोजी झाली आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी किशोर तेजराव वायाळ (३८, रा. मेहरा. ता. चिखली, जि. बुलढाणा) व राजू शिवाजी इंगळे (२४, रा. बाराई, ता. मेहकर, जि. बुलढाणा) या दोघांना ९ फेब्रुवारी रोजी अटक केली. त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दोघांच्या कोठीडीची मुदत संपल्याने त्यांना कोर्टात हजर केले असता, आरोपींच्या ताब्यातून सात लाख १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून उर्वरित दागिने व एक लाख रुपयांची रोख जप्त करणे बाकी आहे. आरोपी इंगळे याने गुन्ह्यातील सोन्याचे दागिने बुलढाणा व मेहकर भागात विक्री केल्याची सांगितले असून त्याचा तपास करणे बाकी आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेला मोबाईल हस्तगत करावयाचा आहे. आरोपींचे आणखी साथीदार असून त्याचा तपास करुन त्यांना अटक करणे असल्याने आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांचे ८५० अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोफत जेवण देण्यात येणार आहे. योजनेसाठी ८५० विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून २० फेब्रुवारीपर्यंत पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर होणार आहे. दानशूर संस्था आणि व्यक्तींची मदत मिळवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. पुरेसा निधी उभा राहिल्यास किमान चार महिने योजना सुरू राहणार आहे.

विद्यापीठाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत भोजनासाठी दहा लाख रुपयांची तरतूद केली. सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींच्या मदतीतून जमा झालेली रक्कम आणि विद्यापीठाच्या निधीतून गरजू विद्यार्थ्यांना एक फेब्रुवारीपासून मोफत जेवण देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी साडेआठशे विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या अर्जांची छाननी करुन २० फेब्रुवारीला पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर होणार आहे. या विद्यार्थ्यांना फेब्रुवारीपासून मदत मिळणार आहे. आपत्कालीन विद्यार्थी सहायक समितीने खाणावळचालक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्याचे पैसे थेट खाणावळचालकाला दिले जाणार आहेत. जास्तीचे विद्यार्थी असल्यामुळे रास्त दरात जेवण देण्यास खाणावळचालकांनी तयारी दाखवली आहे. पैसे विद्यार्थ्यांना न देता थेट मेसचालकाला देण्यात येणार आहे.

पालकाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न एक लाख रुपये असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत जेवण देण्याचा निकष आहे. पण, भीषण दुष्काळ पाहता बहुतेक गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे. फेलोशिपप्राप्त विद्यार्थ्यांना मदतीतून वगळण्यात आले आहे. तुटपुंजा निधी असल्यामुळे योजना जास्त दिवस राबविण्याचे आवाहन आहे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये साडेतीन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिकतात. बहुतेक विद्यार्थी शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील आहेत. घरुन मिळणारी आर्थिक मदत बंद झाल्यानंतर विद्यार्थी अर्धवेळ नोकरी करीत आहेत. विद्यार्थ्यांना जेवण व निवास सुविधा मोफत देण्याची मागणी व्यवस्थापन परिषद सदस्यांनी केली होती. आपत्कालीन विद्यार्थी सहायक समितीने प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात विद्यापीठाने दहा लाख रुपयांची तरतूद केली.

अधिसभा बैठकीतही सदस्यांनी मदत देण्याची तयारी दाखवली. अधिसभा सदस्य प्रमोद राठोड यांनी ५१ हजार रुपये मदत जाहीर केली. डॉ. राम चव्हाण यांनी पंधरा विद्यार्थ्यांना चार महिने मोफत जेवण देण्याची घोषणा केली. सदस्य अनुराधा चव्हाण यांनी ५० हजार रुपये, तसेच गोविंद देशमुख, नरहरी शिवपुरे व प्रा. गोविंद काळे यांनी प्रत्येकी १० हजार रुपये मदत जाहीर केली. प्रा. डॉ. राजेश करपे यांनी प्राध्यापक व प्राचार्यांनी एक दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या निधीला देण्याचा ठराव मांडला. वेगवेगळ्या माध्यमातून निधी मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. पहिल्या टप्प्यात निधीची चणचण भासत आहे.

मदत कर सवलतीस पात्र
सेवाभावी संस्था, उद्योजक, व्यावसायिक आणि दानशूर व्यक्तींना दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी मदत करण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासाने केले आहे. याबाबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. तसेच स्वतंत्र बँक खातेही उघडण्यात आले आहे. काही व्यक्ती आणि संस्थांनी गोपनीय पद्धतीने मदत करण्याची तयारी दाखवली आहे. ही मदत ‘८० जी’नुसार कर सवलतीस पात्र आहे असे आपत्कालीन विद्यार्थी सहायक सहायता निधीने कळवले आहे.

अल्पभूधारक व शेतमजूर कुटुंबातील सर्वाधिक विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत. गरजू विद्यार्थ्यांना योजनेचा निश्चित लाभ दिला जाईल. आर्थिक मदतीसाठी दानशूर संस्था आणि व्यक्तींशी संपर्क साधत आहोत.
डॉ. नरेंद्र काळे, सदस्य, व्यवस्थापन परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळी मदत सरकारी तिजोरीतच पडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळासाठी मदतीचा ५२५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मराठवाड्याच्या पदरात पडून तीन आठवडे उलटल्यानंतरही आतापर्यंत बाधित ३२ लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ६ लाख ७२ हजार शेतकऱ्यांनाच तुटपूंजी मदत मिळाली आहे. दप्तर दिरंगाईमुळे तब्बल ३०३ कोटी रुपयांची मदत सरकारी तिजोरीतच पडून आहे. यामुळे २६ लाख शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित असून त्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.

नियमानुसार ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना प्रथम हप्त्यापोटी प्रतिहेक्टर दराच्या ५० टक्के किंवा किमान एक हजार रुपये यापैकी अधिक असलेली रक्कम सर्व बाधित शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाल्यानंतर द्यावयाची होती. मात्र, आतापर्यंत निम्मेही अनुदान वाटप झालेले नाही. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर झालेल्या ५ हजार ५१७ गावांपैकी केवळ एक हजार ८६७ गावातील सात लाख ३७ हजार ६९९ लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी सहा लाख ७२ हजार २८८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नियमाप्रमाणे अनुदानही मिळाले आहे. मात्र, अद्यापही अनुदानाची मोठी रक्कम केवळ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे बँक खात्यात पडून आहे. वाटप करण्यात आलेल्या रकमेपैकी सर्वाधिक २ लाख ९० हजार बीडमधील शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आले आहे.

मराठवाड्याला दोन हजार ५६४ कोटी रुपयांच्या मदतीच्या रकमेपैकी एक हजार ५० कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यास शासनाची मान्यता होती. पहिल्या टप्प्यात मिळालेल्या ५२५ कोटी रुपयांचे संपूर्ण वाटप झाल्यानंतर पूर्णत्वाचा दाखला सादर केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निधी मराठवाड्याला मिळणार आहे. मात्र, तब्बल तीन आठवड्यानंतरही निम्म्याही मदतीचे वाटप झाले नसल्याचे चित्र मराठवाड्यात आहे.

यंदा अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील खरिपाची होळी झाली. ४८ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ३३ लाख ७१ हजार हेक्टरवरील पिके दुष्काळामुळे करपली. यामध्ये ३६ लाख २७ हजार शेतकऱ्यांपैकी तब्बल ३२ लाख ५५ हजार (९० टक्के) शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला असून हे शेतकरी अनुदानाची वाट पाहत आहेत.

जिल्हानिहाय स्थिती

जिल्हा.............. दुष्काळी गावे...... याद्या तयार गावे........... मदत मिळालेले शेतकरी

औरंगाबाद............१३५५.....................३५७......................८२१८६

जालना..............८५४..........................१५७.....................३२५७७

बीड..................१४०२........................५७६.....................२९०३४७

लातूर.................४८..........................२६........................९८९३

उस्मानाबाद..........६४०.....................२४६.........................९१३४२

नांदेड................३०६.....................१४७..........................४९४३६

परभणी................४७९....................१९५........................७०८८३

हिंगोली.................४३३..................१६३........................४५६२४

-------------------------------------------------------------.

एकूण..................५५१७................१८६७.....................६७२२८८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भल्या सकाळी आग; तीन दुकाने भस्मसात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

शहरातील भोकरदन रस्त्यावरील तीन दुकानांना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास आग लागून सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीमुळे तीन दुकानदारांचे ७ लाख ७७ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही आग रात्रीच्या लागली असती, तर इतर दुकांनाचेही मोठे नुकसान झाले असते.

या घटनेची माहिती अशी की, सय्यद महंमद शफिक यांच्या रेडियम प्रिंटिंग प्रेसच्या दुकानाला आग लागली. यात दुकानातील प्रिंटिंग मशीन व इतर साहित्य आदी साडे पाच लाख रुपयांचे साहित्य जळून गेले. या दुकानाशेजारी असलेल्या शेख अफसर यांच्या सोनी इलेक्ट्रिकलला आग लागून इलेक्ट्रिकल साहित्य व कुलर खाक झाले, यामुळे त्यांचे एक लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. या आगीने शेख आजम मोहंमद यांच्या महाराष्ट्र मोटार रिवायडिंग या दुकानाला कवेत घेतले. त्यांच्या दुकानातील मोटारी व इतर समान, असे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही आग विझवण्यासाठी नागरिकांनी मोठे शर्थीचे प्रयत्न केले. नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने आग विझवण्यासाठी मदत केली. या घटनेचा महसूल विभागातर्फे पंचनामा करण्यात आला आहे. सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूज येथे कार सोडून पळालेले दरोडेखोर जेरबंद

$
0
0

वाळूज महानगर: पोलिसांना गुंगारा देत कार सोडून पळून गेलेल्या पाच पैकी तीन संशयित दरोडेखोरांना वाळूज पोलिसांनी शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) अटक केली. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका संशयित कारला शहर आणि वाळूज पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास अडविण्याचा प्रयत्न केला असता ते पळून गेले होते.

कांचनवाडी परिसरात ९ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास गस्त घालताना लाल कार सुसाट जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तिचा पाठलाग सुरू केला, शिवाय याची माहिती वायरलेसद्वारे वाळूज पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक सतीशकुमार टाक, फौजदार रवीकुमार पवार, पोहेकॉ शेख सलीम आणि गस्तीवरील पोलिसांनी अहमदनगर रोडवर या कारला अडवण्याचा प्रयत्न केला. पण, वाळूज येथील लायननगर भागात कार उभी चोर अंधारात पळून गेले. पोलिसांनी कार (एम एच ०२ बी वाय १२६३), दोन तलवारी, एक कोयता, एक कटर मशीन, लोखंडी रॉड, एक हेल्मेट आदी दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त केले होते. तपास केला असता ही कार वाळूज येथील साठेनगरातील रहिवासी अमोल काशीनाथ खरात यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. त्याला सापळा रचून अटक करण्यात आली. खरात याने ही कार विकल्याचा दावा करत कारची सर्व कागदपत्रे दाखविली. त्यांची चौकशी केली असता त्यांने सतोष कांबळे (रा. वाळूज), गोकुळ आराक (रा. बकवालनगर) आणि अन्य दोघे असे पाच जण या कारमध्ये असल्याची कबुली दिली. त्यावरून या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात फौजदार रवीकुमार पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार अमितकुमार बागूल हे करित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादः रोजगार मेळाव्यात १६७४ जण प्रथम फेरीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान महापालिका, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात १६७४ बेरोजगार युवकांची प्रथम फेरीत निवड करण्यात आली.

महापालिकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात ४७५० बेरोजगार युवक-युवतींनी सहभाग घेतला. त्यांच्यापैकी १६७४ जणांची पहिल्या फेरीत निवड करण्यात आली. आता या युवक-युवतींच्या मुलाखती त्या त्या कंपनींच्या मनुष्यबळ विकास विभागातर्फे घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर त्यांना नियुक्तीचे पत्र दिले जाणार आहे.

रोजगार मेळाव्याचे उद्घाटन महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, विरोधीपक्षनेता जमीर कादरी, महिला बालकल्याण समितीच्या सभापती अॅड. माधुरी अदवंत, एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दिकी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त रवींद्र निकम, वसंत निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन उपायुक्त मंजुषा मुथा, प्रकल्प अधिकारी एन.एन. सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली भरत मोरे, प्रविण बैनाडे, अब्दुल माजीद, सुरेंद्र पाटील, अविनाश बरंडवाल आदींनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र वाणी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन तरुणी दोन घटनांत बेपत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन विविध घटनांत १७ वर्षांच्या विद्यार्थिनी बेपत्ता झाल्या आहेत. हे प्रकार मुकुंदवाडी, एन २मध्ये घडले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी पहिली घटना सोमवारी सकाळी नऊ वाजता महालक्ष्मी चौकात घडली. येथील ११वीची विद्यार्थिनी (वय १७ वर्षे ७ महिने) क्लासला जाते, असे सांगून घराबाहेर पडली. ती सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने तिच्या भावाने शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी दुपारी त्याच्या मोबाइलवर कल्याण दिवटे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला. कल्याणने तुझी बहीण माझ्यासोबत असून आम्ही लग्न करणार आहोत, तुला काय करायचे ते करून घे, अशी धमकी दिली. मुलीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी दिवटे याच्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता राजमाता जिजाऊनगर येथून १७ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. 'एमएससीईटी'च्या क्लासला जाते, असे सांगून घराबाहेर पडली. ती अद्याप घरी परतली नाही. या तरुणीची उंची पाच फूट, रंग सावळा, चेहरा लांबट, बांधा मजबूत, अंगात काळा टी शर्ट, निळी जीन्स पँट घातलेली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक मीरा चव्हाण या तपास करित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>