Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पाकिस्तानविरोधी संताप!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुलवामा येथे जवानांवर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी शहरात उमटले. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तानचा झेंडा तसेच मौलाना मसूद अजहरचा फोटो जाळला.

आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, निवडणुकीच्या तोंडावर देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आपले जवान हा डाव यशस्वी होऊ देणार नाहीत. केंद्र सरकार व लष्कर जे कठोर पावले उचलत आहेत त्यास आमचा पाठिंबा राहील. या हल्ल्यामध्ये पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनांचा हात असला तरी त्यांना मदत करणारे स्थानिक स्लीपर सेल सक्रिय असतात. त्याचा छडा लावून बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनामध्ये भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनीही भाग घेतला. यावेळी आमदार अतुल सावे, किशनचंद तनवाणी, कन्हैय्यालाल शहा, डॉ. भागवत कराड, बापू घडामोडे, प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, अनुराधा चव्हाण, मनीषा भान्साळी, कांताबाई कदम उपस्थित होते.

\Bहिंदू जनजागरण समितीचे निवेदन

\Bपाकिस्तानवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत हिंदू जनजागरण समितीने जिल्हा प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन दिले. आतापर्यंत दहशहवाद्यांकडून जम्मू आणि कश्मीर तसेच देशभरात सातत्याने हल्ले होत आहेत. भारताने आक्रमण करून पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा. केंद्र सरकारने जनभावनेचा आदर करून भारतीय सैन्याला दहशतवाद्यांवर कारवाईसाठी मोकळीक द्यावी, पाकिस्तानवर कारवाईसाठी संयुक्त राष्ट्राकडे दबाव निर्माण होईल असे प्रयत्न करावे, पाकिस्तानशी संपूर्ण व्यवहार, संबंध तत्काळ तोडून टाकावे, कश्मीरमधील फुटीरतावाद्यांचे संरक्षण काढून त्यांना अन्य राज्यातील कारागृहात बंद करावे आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत. निवेदन देण्यासाठी अरुण महाराज पिंपळे, शरद चावडा, बळीराम गायकवाड, श्याम बागडे, प्रवीण वैष्णव, नीलेश पिंगळे, गणेश देशपांडे, प्रकाश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

\Bराष्ट्रवादी व काँग्रेसतर्फे मसूद अजहरच्या प्रतिमेचे दहन

\Bपुलवामा येथील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश - ए - मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरच्या प्रतिमेचे क्रांतीचौक येथे दहन करून या घटनेचा राष्ट्रवादी विद्यार्थी व युवक काँग्रेसने निषेध केला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, मसूद अजहर मुर्दाबाद, भारत माता की जय, शहीद जवान अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील, शहराध्यक्ष मयूर सोनवणे, कार्याध्यक्ष अमोल दांडगे, युवक शहराध्यक्ष दत्ता भांगे, कार्याध्यक्ष कय्यूम शेख, भारत चव्हाण, जितेंद्र गायकवाड यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवरायांच्या पुतळ्याचे आता स्ट्रक्चरल ऑडिट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतीचौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे महापालिकेकडून स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर पुतळा स्थलांतराचे काम केले जाणार आहे. त्यानंतर या पुतळ्याची उंची वाढवण्यात येणार आहे.

शिवप्रेमींच्या मागणीनंतर गेल्यावर्षी शिवजयंतीच्या दिवशी (१९ फेब्रुवारी) पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले, पण त्यानंतर वर्षभर महापालिकेने काहीच केले नाही. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी शिवप्रेमींनी महापालिकेत धाव घेतली व महापौरांना या बद्दल जाब विचारला. शिवजयंतीपूर्वी काम सुरू करण्याचे आश्वासन महापौरांनी शिवप्रेमींच्या शिष्टमंडळाला दिले होते. काम सुरू करण्याच्या निमित्ताने महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महापालिकेत बैठक झाली. बैठकीनंतर महापौरांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, 'पुतळ्याची उंची वाढवण्याचे काम सुरू करण्याबद्दल जाहीर प्रकटन दोन दिवसांत काढले जाईल. त्यातून नागरिकांना या कामाबद्दल माहिती मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा सुमारे ३५ वर्षांपूर्वी बसवण्यात आला आहे. उंची वाढवण्याचे काम करण्यासाठी पुतळा स्थलांतरित करावा लागणार आहे. पुतळा स्थलांतरित करण्यापूर्वी त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे लागेल. कारण उन्ह, पाऊस, प्रदूषण याचा परिणाम पुतळ्यावर झाला असण्याची शक्यता आहे. स्ट्रक्चर ऑडिटच्या संदर्भात तज्ज्ञांची बैठक घेतली जाईल. पुतळा काढल्यानंतर तो सिद्धार्थ उद्यानात ठेवण्याचा निर्णय झाला आहे. शिवजयंती झाल्यानंतर क्रांतीचौकात पुतळ्याच्या जागी फलक लावून काम सुरू केले जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुनमान मंदिर, कापड दुकानात चोरांचा डल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरांचा सुळसुळाट झाला आहे. उस्मानपुरा परिसरातील हनुमानाचे मंदिर फोडून चोरांनी चांदीचा मुकुट चोरून नेला, तर दुसऱ्या घटनेत औरंगपुऱ्यातील रेडिमेड कापड दुकान फोडून ८२ हजारांचा माल लंपास केला. या प्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उस्मानपुरा परिसरात वरे हॉस्पिटलसमोर हनुमान प्रासादिक जनसेवा मंडळाचे हनुमान मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्याचा कडी कोडा तोडून गुरुवारी दुपारी दोन ते चारच्या दरम्यान मूर्तीवरील १७ हजार रुपयांचा अर्धा किलोचा चांदीचा मुकुट चोरून नेला. हा प्रकार मंदिराच्या पुजाऱ्यास लक्षात आला. या प्रकरणी रवी रामदास जामकर (वय ३४, रा. उस्मानपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहायक फौजदार कल्याण शेळके हे तपास करित आहेत.

चोरीची दुसरी घटना बुधवारी रात्री औरंगपुरा पार्किंग रोडवर घडली. या ठिकाणी युवा ब्रँड फॅशन मेन्सवेअर हे कापड दुकान आहे. दुकानमालक दुकान बंद करून घरी गेल्यानंतर चोरांनी शटर उचकटून रोख साडेचार हजार रुपये आणि रेडिमेड शर्ट, टी शर्ट, कॉटन पँट, जीन्स पँट, नाईट पँट आदी ८२ हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात दुकानमालक लखबीरसिंग बिंद्रा (वय ३२, रा. पदमपुरा) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक सोनटक्के हे तपास करित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या जनरेटरवर कंत्राटदारांच्या मशीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला अद्याप वीज पुरवठा न मिळाल्यामुळे महापालिकेच्या जनरेटरवर कचरा प्रक्रिया मशीन चालविण्यात येत आहेत. अन्य ठिकाणचे प्रक्रिया केंद्राचे काम रखडले आहे. त्यामुळे कचराकोंडीच्या वर्षपूर्तीनंतरही शहराच्या चार भागात 'नारेगाव'ची निर्मिती झाल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद शहरात कचराकोंडी निर्माण होण्याला १६ फेब्रुवारीरोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्षाच्या काळात कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात महापालिका अपयशी झाली आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी संनियंत्रण समितीने चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल आणि कांचनवाडी येथे जागा निश्चित केल्या आहेत. शहराच्या चार दिशांना चार जागा निश्चित केल्यामुळे चार जागी कचऱ्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया होईल, असे मानले जात होते, परंतु चारपैकी एकही प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकला नाही. चारपैकी फक्त चिकलठाणा येथील जागेवर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीच्या मशीन दाखल झाल्या आहेत, परंतु त्यांची क्षमता फारच कमी आहे. रोज १६ टन कचऱ्यावर या मशीनच्या माध्यमातून प्रक्रिया केली जात आहे. शहरात रोज ४५० ते ५०० टन कचरा गोळा होतो. त्यापैकी दिवसाला फक्त १६ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्यामुळे उर्वरित कचऱ्याचे ढीग प्रक्रिया केंद्रांवर लागले आहेत. हर्सूल येथील प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. पडेगाव येथे प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास नागरिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे या दोन्हीही ठिकाणी कोणतेच काम सुरू झाले नाही. कांचनवाडी येथे कचऱ्यापासून गॅस निर्मितीचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी नऊ महिने ते एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिकलठाणासह हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी येथील जागांवर कचऱ्याचे डोंगर पहायला मिळतात.

चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्राच्या जागेवर सुक्या कचऱ्यासाठी २० टन क्षमतेची बेलिंग मशीन बसविण्यात आली आहे. दोन महिन्यांपासून या मशीनला वीज पुरवठा मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेने स्वत:च्या खर्चातून या ठिकाणी जनरेटर बसविले आहे. महापालिकेचे जनरेटर वापरून कंत्राटदाराची बेलिंगमशीन चिकलठाणा येथील चालविली जात आहे.

'ऑल इज वेल' चा राग

दरम्यान, कचराकोंडीला एक वर्षपूर्ण झाल्याबद्दल महापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्व वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरिक्षकांची बैठक महापालिकेत सर्वसाधारण सभेच्या सभागृहात घेतली. यावेळी स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, सभागृहनेते विकास जैन, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे, दक्षता कक्षप्रमुख एम. बी. काजी, विधी सल्लागार अपर्णा थेटे आदी उपस्थित होते. घनकचरा व्यवस्थापनाची वॉर्ड कार्यालयनिहाय माहिती यावेळी घेण्यात आली. 'ऑल इज वेल' चा राग सर्व अधिकाऱ्यांनी यावेळी आळवला. महापौरांनी देखील प्रक्रिया केंद्राचे काम तातडीने करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केल्या. चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्राला वीज जोडणी तात्काळ मिळावी यासाठी त्यांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नांमका’चे २१ पासून उन्हाळी आवर्तन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून वैजापूर, गंगापूर तालुक्यासाठी येत्या २१ तारखेला उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या आवर्तनामुळे लाभ क्षेत्रातील १०२ गावांना दिलासा मिळणार आहे.

वैजापूर, गंगापूर तालुक्यात या वर्षात कमी पाऊस झाल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांना टँकरने पिण्याचे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नांदूर मधमेश्वर विभागाकडे वैजापूर, गंगापूर तालुक्याचे १.२७ टी. एम. सी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे पाणी आवर्तन सोडण्याची मागणी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी शुक्रवारी नांदूर मधमेश्वर प्रकल्प कार्यालयात कालवा सल्लागार समितीच्या सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीला कार्यकारी अभियंता पंडित शिरसाठ, सहाय्यक अभियंता प्रशांत वनगुजरे, उपअभियंता युसूफ पठाण यांच्यासह कालवा सल्लागार समिती सदस्यांची उपस्थिती होती. आमदार चिकटगावकर म्हणाले, नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पाण्याशी सबंध नसताना कोपरगाव तालुक्यात कालव्याच्या पाण्याची होणारी बेसुमार पाणी चोरी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

\Bअवैध उपसा रोखा \B

पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी आवर्तन काळात कालव्यावर पोलिसाचे दंगा काबू पथक तैनात करा, अशी सूचना त्यांनी केली.

तालुक्यात सर्वच भागात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने पाणी आवर्तनचे पाणी लाभ क्षेत्रातील गावांना नागरिक व जनावरांना पिण्यासाठी पूर्ण क्षमतेने देण्यासाठी नांदूर मधमेश्वर विभागाने काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादः 'युती झाली तरी विजय अवघड'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

युती शिवाय पर्याय नाही आणि युती झाली तरी विजय मात्र सोपा नाही, असे स्पष्टपणे सांगताना शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील शिवसेनेची वस्तुस्थिती कथन केली.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी शिवसेना प्रशांत किशोर यांची मदत घेत आहे. याच अनुशंगाने प्रशांत किशोर आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' वर बैठक झाली आहे. या बैठकीनंतर राज्यभरातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आढावा घेण्याची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्या संस्थेवर सोपविण्यात आली. त्यानुसार संस्थेचे चार प्रतिनिधी औरंगाबाद शहरात आले आहेत. गुरुवार, शुक्रवार असे दोन दिवस त्यांनी शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्याशी एका मोठ्या हॉटेलमध्ये चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी त्या प्रतिनिधींनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शुक्रवारी त्यांनी नगरसेवक व अन्य लोकप्रतिनिधींशी चर्चा केली.

औरंगाबाद शहर व जिल्ह्यात शिवसेनेची स्थिती कशी आहे? शिवसेनेतर्फे काय काम केले जाते? काय काम करणे अपेक्षित आहे? सर्वांना समजून घेऊन काम केले जाते का? लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची स्थिती काय असेल, असे विविध प्रश्न प्रशांत किशोर यांच्या संस्थेच्या प्रतिनिधींनी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना विचारले. यावेळी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी गटातटाचा प्रामुख्याने उल्लेख केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मूठभर पदाधिकाऱ्यांमध्ये हातभर गट आहेत. त्यामुळे काम करताना अवघड होऊन जाते. एका पदाधिकाऱ्याबरोबर काम केले तर दुसऱ्याला राग येतो. त्यामुळे संघटनेचे काम कसे करायचे व पक्ष कसा वाढवायचा, असा प्रश्न निर्माण होतो, असे मत अनेकांनी खुलेपणाने मांडल्याचे समजते.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप बरोबर युती होणे गरजेचे आहे. युती शिवाय पर्याय नाही आणि युती झाली तरी शिवसेनेचा विजय सोपा नाही, असे काही लोकप्रतिनिधींनी स्पष्टपणे सांगितले. महापालिकेत २७ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे, परंतु शहरात विकासाची कामे म्हणावी तशी झालेली नाहीत. पाण्याचा प्रश्न काही नेत्यांच्या अट्टहासामुळे काही वर्षांपासून सुटलेला नाही. रस्ते-वीज हे प्रश्नही आहे तसेच आहेत. शहरात विकास कामांची जशी स्थिती आहे तशीच स्थिती जिल्ह्यात देखील आहे. जिल्ह्यातील एकही रस्ता सुस्थितीत नाही, अन्य कामेही प्रलंबितच आहेत. होत नसलेली विकास कामे आणि अंतर्गत गटबाजी यामुळे निवडणुकीतील विजय सहज सोपा आहे असे वाटत नाही, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रशांत किशोर यांच्या संस्थेचे प्रतिनिधी ही सर्व माहिती 'मातोश्री' वर पोचविणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम कार्ड बदलून २० हजार लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एटीएम कार्डची अदलाबदल करत एका तरुणाचे २० हजार रुपये भामट्याने काढून घेतले. हा प्रकार गुरुवारी दुपारी साडे बारा वाजता दशमेशनगर, उस्मानपुरा भागात घडला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शेख इसाक शेख जाफर (वय २८, रा. चौसरनगर, शहानुरवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. ते गुरुवारी दुपारी त्याच्या आई-वडिलांच्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी दशमेशनगर येथील एटीएम सेंटरमध्ये गेले होते. त्याचे पैसे निघाले नसल्याने त्यावेळी मागे उभ्या असलेल्या तरुणाने मी पैसे काढून देतो, असे सांगत त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले. पैसे निघत नसल्याचे सांगत त्याने इसाक यांना हातचलाखीने गोरख कुंभार नावाचे एटीएम कार्ड देत निघून गेला. यानंतर काही वेळात त्याने इसाक यांच्या कार्डचा वापर २० हजार रुपये काढून घेतले. हे लक्षात आल्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन इसाक यांनी फसवुणकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी जमादार जाधव तपास करित आहेत.

\Bआरोपीचे वर्णन\B

शेख इसाक यांना फसवणाऱ्या आरोपीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. त्याचे वय अंदाजे २५ ते ३० असून पांढऱ्या आणि लाल रंगाचा टी शर्ट, जीन्स पँट घातलेली आहे. उंची साडेपाच फूट असून मजबूत बांधा, रंग गोरा, नाक सरळ आणि डोक्यावर टोपी घातलेली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशोधक डॉ. पटोले यांचे आज घाटीमध्ये व्याख्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैद्यकीय सेवा देतांना इतर अतिरिक्त विषयांमध्ये प्रावीण्य कसे मिळवावे, या विषयावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक व ऑस्ट्रेलिया विद्यापीठाचे प्रा. डॉ. संजय पटोले यांचे व्याख्यान शनिवारी (१६ फेब्रुवारी) दुपारी दोन ते पाच या वेळेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणार आहे. यानिमित्त संभाषण कौशल्य, रिस्क मॅनेजमेंट, आर्ट ऑफ निगोशिएशन, पीस अँड प्रोडक्टिव्हिटी या विषयांवर ते मार्गदर्शन करणार आहेत. मेडिकल एज्युकेशन युनिट व नवजात शिशुशास्त्र विभागाच्या वतीने हे व्याख्यान होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. एल. एस. देशमुख व डॉ. सरोजिनी जाधव यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसटीला २० लाखांचा फायदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने शिवशाही बससेवेचा विस्तार ग्रामीण भागापर्यंत केल्याचे परिणाम दिसू लागले असून, मंडळाला जानेवारी महिन्यात २० लाख रुपयांचा नफा झाला आहे. डिझेलच्या दरांतील वाढ आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ यामुळे खर्च वाढूनही महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला नफा झाला आहे.

एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या अनेक मार्गांवर शिवशाही बस सेवा सुरू केली आहे. ही सेवा ग्रामीण भागापर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर औरंगाबाद विभागामार्फत शिवशाही स्लीपर, व्हॉल्व्हो, निमआराम आणि साध्या बसद्वारे प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. विभागातर्फे औरंगाबाद ते पुणे मार्गावर दर एक तासाने व्हॉल्व्हो बस सेवा उपलब्ध आहे. त्याशिवाय नाशिक, नागपूर, अकोला, बोरीवली, मुंबई, लातूर, बीड, यवतमाळ, अलिबाग, कोल्हापूर, विजापूर या मार्गांवरही शिवशाही बस सेवा चालू करण्यात आली आहे. औरंगाबाद ते नागपूर आणि मुंबई मार्गावर शिवशाही स्लीपर बसही सुरू करण्यात आली आहे.

या विविध मार्गांवरील बस सेवांमुळे एसटी महामंडळाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी डिझेलचे दर चार रुपये ६३ पैशांनी वाढले आहेत. याशिवाय कर्मचाऱ्यांचे वेतनातही वाढ करण्यात आली आहे. हा खर्च असतानाही एसटी महामंडळाला मागील वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत यंदाच्या वर्षी २० लाख २ हजार रुपयांचा नफा झाला आहे, अशी माहिती माहिती विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी दिली.

……

\Bएसटीचा नफा\B

औरंगाबाद आगार क्रमांक-दोन : ०५.९४

पैठण : २६. ३६

सिल्लोड : ११.५६

वैजापूर : १२.२२

गंगापूर : ०४.७९

सोयगाव : ०४.३०

(नफा लाख रुपयांत)

\Bदोन आगार तोट्यात\B

औरंगाबाद विभागातील आठ आगारत्पैकी सहा आगार नफ्यात आहेत. एसटी सिटीबस चालविणारे औरंगााबद आगार क्रमांक एक आणि कन्नड आगार असे दोन आगार तोट्यात आहेत. या तोट्याची रक्कम वजा केली असता, यंदा एसटीला २० लाख २ हजाराचा फायदा झालेला आहे, अशी माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस भरतीत दहा टक्के आरक्षण द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस पाल्यांना भरतीमध्ये दहा टक्के राखीव जागा द्याव्यात, अशी मागणी पोलिस बॉइज असोसिएशनने राज्यपालांकडे केली आहे. पोलिस कुटुंबीयांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी पोलिस बॉइज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांना पत्र पाठवून साकडे घातले आहे. प्रशासन या मागण्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

पोलिस बॉइज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रवी वैद्य यांनी बुधवारी यासंदर्भात निवेदन पाठवले आहे. यामध्ये २०१३मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पोलिस कॉन्स्टेबल संवर्गातील कर्मचाऱ्यांनी परीक्षा दिली होती. उत्तीर्ण कॉन्स्टेबलनां तात्काळ 'पीएसआय'पदी नियुक्ती द्यावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

राज्यात तत्काळा पोलिस भरती करावी, पोलिस कर्मचाऱ्यांना महसूल विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात यावे, निवृत्त पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलिस कुटुंब आरोग्य योजना निवृत्तीनंतरही सुरू ठेवावी, सर्व आजारांवर होणाऱ्या खर्चाची व्याप्ती वाढवून संपूर्ण खर्च पोलिस कुटुंब आरोग्य योजनेतून मंजूर करावा, गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातील पोलिस कर्मचाऱ्यांना सुटीचा पगार देण्यात यावा, आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यातील पोलिसांप्रमाणे महाराष्ट्र पोलिसांना दुप्पट पगार देण्यात यावा, पोलिस पाल्यांना शैक्षणीक आरक्षण देण्यात यावे, पोलिस पाल्यांकरिता आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, पोलिस कर्मचारी मृत झाल्यास अनुकंपात नावामध्ये त्याच्या कुटुंबातील व्यक्तीचे नाव बदल करण्यास संमती द्यावी; तसेच अनफीट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला त्वरित सेवेमध्ये सामावून घ्यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

संघटनेने यापूर्वी मुख्यमंत्री, गृहमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी या मागण्यांसाठी निदर्शने, मोर्चे, धरणे आदी आंदोलने केली आहेत, मात्र संघटनेच्या या मागण्यांचा विचार करण्यात आला नसल्याने अखेर राज्यपालाना निवेदन पाठवले आहे.

- रवी वैद्य, संस्थापक अध्यक्ष, पोलिस बॉइज असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग’ ३८ टक्केच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बाळाच्या जन्मानंतर सहा महिने बाळाला केवळ स्तनपान (एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग) करणाऱ्या ग्रामीण मातांचे प्रमाण हे फक्त ३८ टक्के आहे आणि त्यामागे मातांना करावे लागणारे भरपूर कष्ट, पौष्टिक आहाराचा अभाव, अंधश्रद्धा आदी कारणे असल्याचे घाटीत आलेल्या दीड हजार मातांच्या सर्वेक्षणवरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हा अभ्यास व संशोधन दिवी सिंग या घाटीच्या विद्यार्थिनीने केला असून, तिच्या संशोधन निबंधाची निवड भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) केली आहे. त्यातबरोबर इतर तीन विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधांचीही 'आयसीएमआर'ने निवड केली असून, अधिष्ठाता डॉ. कानन ये‌ळीकर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

पदवीपूर्व विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी उत्तेजन मिळावे, या हेतूने 'आयसीएमआर'कडून दरवर्षी अखिल भारतीय पातळीवर शोधनिबंध स्पर्धा घेतली जाते. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी) दिवी सिंग (नवजात अर्भक वैद्यकशास्त्र विभाग), सोहम बरकुले (जनवैद्यक औषधशास्त्र), दिव्यांशी बजाज (नवजात अर्भक वैद्यकशास्त्र विभाग) व विधी मालू (शरीरशास्त्र) या चार विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधांची निवड करण्यात आली आहे. दिवी सिंग या विद्यार्थिनीने स्तनपानविषयी संशोधन केले व केवळ ३८ टक्के ग्रामीण महिला स्तनपान करत असल्याचे समोर आणले. नवजात शिशुशास्त्र विभागाचे प्रमुख एल. एस. देशमुख यांनी दिवी सिंग हिला मार्गदर्शन केले. सोहम बरकुले या विद्यार्थ्याने 'शेतकऱ्यांच्या ताणतणावाचे कारण व ताण वाढविणारे घटक' यावर अभ्यास केला आणि वाढते कुटुंब व घटते उत्पन्न हेच शेतकऱ्यांच्या ताणतणावामागचे मुख्य कारण असल्याचे नमूद केले आहे. जनऔषध वैद्यकशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. मोहन डोईबळे, डॉ. स्मिता अणदूरकर यांचे सोहम याला मार्गदर्शन लाभले.

\Bमधुमेहाची त्रिसूत्री महत्त्वाची

\Bनियमित औषधी, व्यायाम व योग्य आहाराच्या त्रिसुत्रीद्वारेच दुसऱ्या प्रकारचा (टाईप टू) मधुमेह नियंत्रणात राहतो, असे संशोधन विधी मालू हिने आपल्या निबंधात मांडले. तिला शेख साजिया मसूर यांचे मार्गदर्शन लाभले. तर, दिव्यांशी बजाज हिने 'कमी वजनाच्या बाळाची काळजी घरी कशी घ्यावी' या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. त्यांना सहयोगी प्राध्यापक डॉ. अमोल जोशी यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत औरंगाबाद खंडपीठाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेत या संदर्भात काय पावले उचलली आहेत, याचे शपथपत्र २८ फेब्रुवारीपर्यंत दाखल करण्याचे आदेश न्या. संभाजी शिंदे व न्या. आर. जी. अवचट यांनी महापालिकेला शुक्रवारी दिले आहेत.

महापालिकेने काही अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित करण्याविषयी प्रस्ताव पाठविला आहे. दोन पत्रांद्वारे राज्य शासनाने सदर प्रस्तावातील त्रुटी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिल्या. मात्र, महापालिकेने त्यातील त्रुटी दूर केल्या नसल्याचे व नियमितीकरणाचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. तर महापालिकेने वेळ मागून घेतला. या याचिकेवर चार मार्च रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाचे मित्र म्हणून प्रदीप देशमुख यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन महिन्यांनंतर पुन्हा पैठणमध्ये गूढ आवाज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

दोन महिन्यानंतर शुक्रवारी सकाळी शहराच्या दक्षिण भागात पुन्हा एकदा गूढ आवाज झाला. गेल्या तीन वर्षांपासून नेहमीच कमी जास्त प्रमाणात ऐकू येत असलेल्या या गूढ आवाजामुळे शहरवासियांमध्ये घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून येत असलेल्या या गूढ आवाजाची प्रशासनाकडे कुठलीही नोंद नाही.

दोन महिन्यांपूर्वी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सलग दोन दिवस शहरातील दक्षिण भागातून गूढ आवाज आले होते. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधी नंतर शुक्रवारी पुन्हा एकदा शहरातील दक्षिण भागातूनच गूढ आवाज आला. विशेष म्हणजे, शहराच्या उत्तर भागातील वसाहतीतील नागरिकांना शुक्रवारी आलेला गूढ आवाज ऐकू आला. 'मी सकाळी चहा पित असताना, नऊ वाजून २७ मिनिटाला मला दक्षिण भागातून मोठा आवाज ऐकू आला. आवाज येताच मी घराबाहेर पळालो. त्यावेळी आमच्या गल्लीतील बहुतांश नागरिक घाबरलेल्या अवस्थेत घराबाहेर आले होते,' अशी माहिती रामनगर येथील रहिवासी विष्णू मुंदडा यांनी दिली.

\Bप्रशासन अनभिज्ञ \B

अनेक वर्षापासून शहर व तालुक्यात गूढ आवाज एकू येत आहे. या आवाजाविषयी पोलिस व तहसील प्रशासनाकडे विचारणा केली असता या दोन्ही विभागाकडे गूढ आवाजाविषयी कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतापाची लाट, हल्ल्याचा सूड हवा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामुळे संबंध देशभर संतापाची लाट उसळली असून, या हल्ल्याचा सूड घ्या, अशी मागणी करत शुक्रवारी भाजपसह इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

गुलमंडी येथे भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, आमदार अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. प्रारंभी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पाक व दहशतवाद्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संतप्त कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. पाक व दहशतवाद्यांच्या नांगी ठेचल्याशिवाय पर्याय नाही, अशी मागणीही यावेळी कार्यकर्त्यांनी केली. नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत, शहर सरचिटणीस कचरू घोडके, जगदीश सिद्ध, उपाध्यक्ष जालिंदर शेंडगे, बाळासाहेब गायकवाड मुकुंद दामोदरे, दयाराम बैसये यावेळी उपस्थित होते. दरम्यान, भाजप क्रांती चौक मंडळातर्फे पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, बाल हक्क व संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, शहर उपाध्यक्ष जालिंदर शेंडगे, प्रा. राम बुधवंत, राजू पाटील, नंदू गवळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप गारखेडा मंडळातर्फे पुंडलिकनगर परिसरात आमदार अतुल सावे, मंडळ अध्यक्ष मंगलमूर्ती शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थित जोरदार निदर्शने करण्यात आली. पाकिस्तान व दहशतवाद्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला. नगरसेवक शिवाजी दांडगे, लक्ष्मीकांत थेटे, संजीब बोराडे, विवेक राठोड, रामदास तुपे, बालाजी मुंडे, स्वाती कुलकर्णी आदी उपस्थित होते.

\B

एमआयएमतर्फे निषेध

\Bपुलवामा येथील शहीद जवानांवर झालेल्या हल्ल्याचा एमआयएम पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. शहागंज येथील गांधी पुतळ्यासमोर दुपारी तीन वाजता शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी आमदार इम्तियाज जलील, डॉ. गफ्फार कादरी, विरोधी पक्षनेते जमीर अहेमद कादरी, नासेर सिद्धिकी, समीर साजीद, नगरसेवक अज्जू नायकवडी, आरेफ हुसैनी, अब्दुल अजीम, फेरोज खान, अब्दुल सत्तार, रफत यारखान, अक्रम शेख, अमर बीन हैदर आदींची उपस्थिती होती.

\B

शहीद जवानांना श्रद्धाजंली \B

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी सिडको येथील संचार भवनासह जिल्ह्यातील सर्व कार्यालयात श्रद्धाजंली अर्पण केली. रंजन दाणी, राजेंद्र कोलापकर, एस. आर. वाणी, ए. आर. वाघचौरे, शिवाजी चव्हाण, भास्कर सानप, वी. जी ठाकूर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, सरकारच्या धोरणाविरोधात व न्याय हक्कासाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांतर्फे शुक्रवारी जनजागृती फेरी काढण्यात येणार होती. मात्र, ही फेरी पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आली आहे.

\Bव्यापारी महासंघ

\Bजिल्हा व्यापारी महासंघ व सलग्न संघटनांनी मेहर सीडस् येथे आयोजित कार्यक्रमात पुलवामातील शहीद जवानांना श्रद्धाजंली अर्पण करत या आंतकवादी हल्ल्याचा तीव्र शब्दाचा निषेध केला. महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, महासंघाचे महासचिव लक्ष्मीनारायण राठी, सरदार हरिसिंग, अजय शहा, दीपक पहाडे, विजय जैस्वाल, संजय कांकरिया, जयंत देवळाणकर, तनसुख झांबड, कचरू वेळंजकर, सुभाष दरख, गोपाल पटेल, राकेश सोनी, भारुका इसराणी, ज्ञानेश्वर खर्डे, महेबूब घडिवाले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेची आत्महत्या; पतीसह सहा जणांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हुंड्याच्या राहिलेल्या एक लाख रुपयांच्या रकमेसाठी सातत्याने केल्या जाणाऱ्या शारीरिक-मानसिक छळाला कंटाळून २६ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात पती संतोष पांडू रणयेवले याच्यासह सासरच्या सहाजणांना गुरुवारी (१४ फेब्रुवारी) अटक करून शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, सर्व सहा आरोपींना शनिवारपर्यंत (१६ फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. ए. पठाण यांनी दिले.

या प्रकरणी मृत विवाहिता मनीषा संतोष रणयेवले हिचे वडील कचरू सर्जेराव नरवडे (५७, रा. शेवगा, ता. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. मनीषा हिचे लग्न १३ मे २०१२ रोजी संशयित आरोपी संतोष पांडू रणयेवले (३०, रा. सांजखेडा, ता. औरंगाबाद) याच्याशी झाले होते. लग्नात सव्वा लाख रुपये हुंडा मागण्यात आला होता; परंतु फिर्यादीची आर्थिक स्थिती बेताची असल्याने २५ हजार रुपये व संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या. हुंड्याची उर्वरित रक्कम लग्नानंतर देण्याचे ठरले होते. लग्नानंतर मनिषाला वर्ष-दीड वर्ष चांगले वागवण्यात आले व त्यांना एक मुलगीही झाली. मात्र त्यानंतर हुंड्याच्या राहिलेल्या एक लाख रुपयांच्या रकमेसाठी छळ केला जात होता. मनीषाला उपाशी ठेऊन घराबाहेर काढण्यात येत होते. ही माहिती माहेरी दिली होती. याबाबत नातेवाईकांनी सासरच्या मंडळीला समजावून सांगितले होते. दरम्यान, ६ जानेवारी २०१९ रोजी फिर्यादीच्या मुलाचा साखरपुडा पिसादेवी येथे ठरला होता. त्यासाठी मनीषाला बोलावले असता, हुंड्याचे एक लाख रुपये दिले, तरच कार्यक्रमाला येऊ व तोपर्यंत मनीषालाही पाठवणार नाही, असे संतोष याने सांगितले होते. १२ फेब्रुवारी २०१९ रोजी मनीषा अचानक घरातून बेपत्ता झाली व शोध घेऊनही सापडली नाही. दुसऱ्या दिवशी सांजखेडा येथील अंबिकापूर शिवारातील विहिरीत मनीषा हिचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहिता ३०४ (ब), ३०६, ४९८ (अ), ३२३, ५०४ कलमान्वये करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी संतोष याच्यासह किसन पांडू रणयेवले (३५), कविता किसन रणयेवले (३०, सर्व रा. सांजखेडा), दिलीप तात्याराव बनकर (४६), पुष्पा दिलीप बनकर (३५, रा. किन्हाळा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) व मंगल अर्जून दाभाडे (४०, रा. निकळक अकोला, रा. बदनापूर, जि. जालना) यांना गुरुवारी अटक करण्यात आली.

\Bघातपाताचाही होणार तपास

\Bप्रकरणात सर्व सहा आरोपींना शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, गुन्ह्यातील इतर दोन आरोपींना अटक करणे बाकी असून, आरोपींनी मृत मनिषा हिला कशा प्रकारे त्रास दिला, हुंड्याबाबत नेमकी काय बोलणी झाली होती, प्रकरणात आणखी कोणत्या आरोपींचा समावेश आहे का, मृतास काही घातपात झालेला आहे का आदींचा तपास करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील शोभा विजयसेनानी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने सर्व सहा आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुकुंदवाडी येथील कुख्यात गुंड सुंदऱ्या स्थानबद्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुकुंदवाडी परिसरातील कुख्यात गुंड विजय उर्फ सुंदऱ्या भगवानराव, उर्फ बाळू उर्फ बापु कांबळे उर्फ यादव उर्फ जाधव (वय २४ रा. अंबिकानगर झोपडप‌ट्टी, मुकुंदवाडी) याला 'एमपीडीए' कायद्याखाली एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. हे आदेश पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी शुक्रवारी जारी केले.

आरोपी सुंदऱ्यावर मुकुंदवाडी, सातारा पोलिस ठाण्यात चोरी करणे, दरोड्याची तयारी, घरफोडी करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दरोडा, हद्दपार आदेशाचे उल्लंघन आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी हद्दपारीची कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र त्याच्या गुन्हेगारी कृत्यात फरक पडत नसल्याने त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, एच. एच भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, नाथा जाधव, जमादार द्वारकादास भांगे, नाना हिवाळे, अजय आवले, प्रकाश सोनवणे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संधी देतोय... कामात सुधारणा करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मी कोणत्याही क्षणी कसाही येईल आणि पाहणी करेन. मराठवाडा दुष्काळाच्या छायेखाली आहे; त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांवर अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने प्रशासकीय यंत्रणेने वागावे, संधी देतोय... कामात सुधारणा करा,' या शब्दात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) मराठवाड्यातील उपविभागीय अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांना तंबी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदारासोबत बैठक घेऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी अनुदान वाटपाची स्थिती, महसुली वसुली, वाळूपट्ट्यांचे कंत्राट, तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेने सतर्क रहावे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन असावे. कुणाचीही तक्रार आली, तर त्याची गय करणार नाही, असे म्हणत पारदर्शक कामकाजावर भर देण्याचे आवाहन केंद्रेकर यांनी केले. अवघ्या दीड तासामध्ये केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांना कार्यपद्धतीबद्दल मार्गदर्शन करून बैठकीतून बाहेर पडले त्यामुळे अधिकाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला.

\Bअधिकाऱ्यांना सूचना \B

या बैठकीमध्ये विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी 'ग्राउंड लेव्हल'वर जाऊन चाराटंचाईच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा, टँकरची गरज तपासून सुरू करण्यात यावे, कुणावर अन्याय होईल असे काम प्रशासनाकडून होता कामा नये, असे निर्देश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंभीर मारहाण; तिघांचा नियमित जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पोलिसांत तक्रार का दिली' असे म्हणत लोखंडी रॉड, दगड व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणात गोरख धनाजी फोलाणे, मच्छिंद्र धनाजी फोलाणे व नितीन नारायण झळके या आरोपींनी दाखल केलेला नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) फेटाळला.

या प्रकरणी श्रीपती विश्वनाथ बागडे (५८, रा. जटवाडा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी आणि आरोपी गोरख धनाजी फोलाणे (४२) व मच्छिंद्र धनाजी फोलाणे (३५, दोघे रा. जटवाडा) हे एकमेकांच्या शेजारी राहतात. दोघांचे जागेवरून वाद सुरू आहेत. या वादातून पूर्वी त्यांचे भांडणही झाले होते. या प्रकरणी फिर्यादीने दौलताबाद पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचारला फिर्यादी हा छावणी परिसरातील एका हॉटेलात पाणी पिण्यासाठी गेला असता, दोन्ही आरोपी फोलाणे बंधू व आरोपी नितीन नारायण झळके (२३, रा. वंजारवाडी, ता. जि. औरंगाबाद) हे तिघे तिथे आले. त्यांनी 'आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार का दिली' असे म्हणत फिर्यादीला आरोपी गोरख फोलाणे याने डोक्यात लोखंडी रॉड मारुन जखमी केले. मच्छिंद्र फोलाणे याने दगडाने बागडे यांना मारहाण केली, तर नितीन झळके याने फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकीही दिली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असता, कोर्टाने आरोपींची रवानगी आधी पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर तिघा आरोपींनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला. या प्रकरणात सहायक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'जेएनपीटी'च्या शिल्पकृतीत रामदास स्वामी नको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या शिल्पाशेजारी समर्थ रामदासांचे शिल्प बसवून इतिहासाचे विकृतीकरण, राष्ट्रीय महापुरुषांचा अवमान केला जात आहे', असा आरोप करत संभाजी ब्रिगेडने त्यास विरोध दर्शविला आहे. रायगड जिल्ह्यातील उरण येथील 'जेएनपीटी'च्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पासोबत रामदास स्वामींचा पुतळा बसविल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्‍त डॉ. शिवानंद भानुसे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

जेएनपीटीच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचे शिल्प बसविण्याचे १९९८ मध्ये ठरले होते. मात्र, याच शिल्पात रामदास स्वामी यांच्याही पुतळ्याचा समावेश असल्याने मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यास विरोध दर्शविला होता. आघाडी सरकारच्या काळात हे प्रकरण मागे पडले, पण आता पुन्हा निवडणुकांच्या तोंडावर जाणीवपूर्वक सरकार छत्रपती शिवरायांशेजारी रामदास स्वामी यांचे शिल्प बसवून वाद निर्माण करू पाहात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या शिल्पाचे अनावरण करण्यात येणार आहे. याला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शविला असून वेळप्रसंगी आंदोलनही छेडणार असल्याचे सांगितले.

पत्रकार परिषदेसाठी आर. एस. पवार, डॉ. सुभाष बागल, हेमाताई पाटील, बाबासाहेब दाभाडे, राहुल भोसले, शिवाजी चव्हाण, निलेश शेलार, राम भगुरे, ज्ञानेश्वर अंभोरे, वैशालीताई खोपडे, रवींद्र वहाटुळे, श्रीमंत गाडेकर, रेणुका सोमवंशी, रेखा वाहटूळे, राजेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा कंत्राटदारांना आता वेळेची मर्यादा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचराकोंडीला एक वर्षपूर्ण होऊनही समस्या सुटली नाही. कंत्राटदारांकडून प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे कामही धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे त्यांनी आता किती दिवसांत काम करणार त्याचा मुदतीसह कृती कार्यक्रम सादर करा, अशी सक्ती केली जाणार आहे.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल आणि कांचनवाडी या ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाने कंत्राटदार देखील निश्चित केले आहेत. मात्र, हे काम गतीने सुरू झालेले नाही. त्यामुळे प्रक्रिया प्रकल्पाच्या जागांवर कचऱ्याचे डोंगर आहेत. एक वर्षानंतरही चार पैकी एकाही जागेवर पूर्ण क्षमतेने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात न आल्यामुळे महापालिकेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी पत्रकारांशी बोलताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, 'प्रक्रिया प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदारांकडून मुदतीसह कृती कार्यक्रम घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. दररोज काय काम करणार याची लेखी माहिती कंत्राटदारांकडून मागवली आहे. दिलेल्या माहितीनुसार काम होते की नाही याची पाहणी देखील केली जाणार आहे. कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. झोन क्रमाक २, ७, ९ मध्ये या कंपनीकडून काम सुरू आहे. सोमवारपासून झोन क्रमांक तीनमध्ये कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम सुरू होईल,' असा दावा महापौरांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images