Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रस्त्यांसाठी कंत्राटदार मिळेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोस्ट डेटेड चेक्स देण्याची अट मान्य करून देखील डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांना कंत्राटदार मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकारामुळे महापालिकेच्या विश्वासार्हतेवर तर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेच, पण रस्त्यांची कामे होणार की नाही या बद्दलही साशंकता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

शहरातील रस्त्यांसाठी राज्य शासनाने चार वर्षापूर्वी शंभर कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला. या निधीतून तीस रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरसेवकांकडून रस्त्यांची मागणी वाढू लागल्यामुळे डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून रस्त्यांची कामे करण्याचे ठरविण्यात आले. त्यावेळी पन्नास कोटी रुपयांची डिफर्ड पेमेंटची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. निर्णयानंतरही काम रखडल्यामुळे डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांची किंमत वाढली. ७९ कोटी रुपयांपर्यंत ही किंमत पोचली. डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांसाठी महापालिकेने निविदा काढल्या, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. कंत्राटदार प्रतिसाद देत नसल्यामुळे आयुक्त व महापौरांनी कंत्राटदारांची बैठक घेतली आणि काम करण्याचे आवाहन केले. केलेल्या कामाचे पेमेंट मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे महापालिकेने पोस्ट डेटेड चेक द्यावेत, अशी मागणी कंत्राटदारांनी केली. कंत्राटदारांची ही मागणी मान्य करण्यात आली. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची मागणी प्रशासनाने मान्य केली. पोस्ट डेटेड चेक्स देण्याची मागणी मान्य झाल्यावर देखील कंत्राटदारांनी निविदा भरण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे आता हे रस्ते होणारच नाही असे मानले जात आहे.

\Bआता म्हणे धोरण ठरवणार

\Bपोस्ट डेटेड चेक्स दिल्याच्या नंतरही कंत्राटदार काम करण्यासाठी पुढे येत नसल्याच्या वृत्ताला महापौर नंदकुमार घोडेले यांनी दुजोरा दिला. डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांना कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या रस्त्यांच्या कामांबद्दल धोरण ठरवावे लागेल. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर या संदर्भात सर्व पदाधिकारी - गटनेते व प्रशासन यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे घोडेले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बहिणीला गावी नेण्यासाठी आलेल्या प्रवाशाला रिक्षाचालकाने लुटल्याची घटना बुधवारी (१३ मार्च) मध्यरात्री एसटी वर्कशॉपच्या भिंतीलगत घडली. या प्रकरणात संशयित आरोपी रिक्षाचालक शेख शकील शेख मकरोद्दीन याला अवघ्या ११ तासांत अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीला शनिवारपर्यंत (१६ मार्च) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी दिले.

या प्रकरणी ज्ञानेश्वर मुंजाजी पुंड (वय २०, रा. वाडी खुर्द, ता. पालम, जि. परभणी) यांनी फिर्याद दिली होती. पुंड हे कमळापूर येथे राहणाऱ्या बहिणीला गावी घेऊन जाण्यासाठी परभणीहून बुधवारी रात्री नऊ वाजता दौंड पॅसेंजरने औरंगाबादला आले होते. ते बुधवारी मध्यरात्री पावणे तीन वाजता रेल्वेस्थानकावर उतरले व कमळापूर फाटा येथे जाण्यासाठी रेल्वेस्थानकाबाहेर आले. तेथे रिक्षाचालक शेख शकील शेख कमरोद्दीन (वय ३७, रा. आरेफ कॉलनी) याने ४० रुपये भाडे लागेल, असे सांगितले. पुंड यांनी त्यास होकार देत रिक्षात बसले, रिक्षा बाबा पेट्रोलपंप उड्डाणपुलावरून कार्तिकी सिग्नलमार्गे एसटी वर्कशॉपच्या भिंतीलगत थांबविली. तिथे रिक्षाचालकाने पुंड यांना शिविगाळ करीत धमकावत त्यांच्या हातातील घड्याळ व ५०० रुपये हिसकावून घेऊन पळ काढला. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संशयित रिक्षाचालकाला सकाळी पावणे अकराच्या सुमारास बाबा पेट्रोलपंप येथून अटक करण्यात आली. तपासादरम्यान त्याने प्रवाशाला लुटल्याची कबुली दिली व त्याच्या ताब्यातून घड्याळ व ५०० रुपये जप्त करण्यात आले.

\Bरिक्षा चोरीची असण्याची शक्यता \B

संशयित रिक्षाचालक आरोपीला न्यायालयात हजर केले असता, आरोपीकडे मिळालेली रिक्षा ही चोरीची असण्याची शक्यता असल्याने त्याचा तपास करणे बाकी आहे. तसेच आरोपीने यापूर्वीही असे गुन्हे केल्याची शक्यता असून आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचाही तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती कोर्टात करण्यात आली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शासकीय दंत’ला २१ कोटींचा निधी

$
0
0

औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालयाला २०१९-२० या वर्षासाठी २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाविद्यालयाने राज्य शासनाकडे २१ कोटी २७ लाख ८९ हजार रुपयांचे अंदाजपत्रक पाठवले होते, तर शासनाने २१ कोटी ४८ लाख ९८ हजारांचा निधी मंजूर केल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांनी दिली. औरंगाबादच्या शासकीय दंत महाविद्यालयाकडून गेल्या वर्षी १७ कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता व आतापर्यत १६ कोटी ३९ लाख ३५ हजार रुपयांचा निधी मिळाल्याचेही स्पष्ट झाले आहे. महाविद्यालयाचा वेतनावर १७ कोटी १३ लाख ६७ हजार इतका निधी खर्च होणार आहे. कंत्राटी मजुरीसाठी ३६ लाखांचा निधी मागितला होता. त्यापैकी केवळ एक लाख रुपयांचा निधी मिळाला आहे, तर वीज-पाणी शुल्कापोटी ५२ लाखांची मागणी केल्यानंतर ५० लाख मंजूर झाल्याचेही डॉ. डांगे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ परिसरात ड्रोण उडवल्याने गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा विमानतळ परिसरात विनापरवाना ड्रोण कॅमेरा उडवणाऱ्या नऊ जणांविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार बुधवारी सकाळी पावणेनऊ वाजता घडला.

चिकलठाणा विमानतळ हे प्रतिबंधीत क्षेत्र आहे. बुधवारी सकाळी काही जण या भागात ड्रोण कॅमेरा उडवत असल्याचे विमानतळ प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सिडको एमआयडीसी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. या माहितीवरून पोलिसांनी हा प्रकार करणाऱ्या नऊ जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. यामध्ये लोहित रेड्डी रंगा रेड्डी (वय २४ रा. बल्लारी, कर्नाटक), सौरभ दिलीपराव मोतेवार (रा. देशपांडे गल्ली, देगलूर), पवनकुमार पटेल, पवनकुमार संजीवकुमार, नजीब सरवर सय्यद गुलाम सरवर रझवी, प्रशांतसिंग संतोषसिंग आणि संदीप माधव बेंडगिरी यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल पुंडलिक मानकापे यांनी तक्रार दाखल केली. जमादार कोलते तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट कागदपत्राद्वारे प्रवेश; गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट जातप्रमाणपत्राआधारे 'बीडीएस'च्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०११ ते जानेवारी २०१९ या कालावधीत हा प्रकार शासकीय दंत महाविद्यालयात घडला. हर्षल मोतीलाल ठाकूर (वय २५ रा. प्रताप चौक, बजाजनगर), असे विद्यार्थ्याचे नाव आहे.

या प्रकरणी डॉ. अमित राधेलाल पराते (रा. नारळीबाग) यांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणात संशयित आरोपी हर्षल मोतीलाल ठाकूर याला २०११ मध्ये 'बीडीएस'च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात आला होता. ठाकूर या अनुसूचित जमातीतून त्याला प्रवेश देण्यात आला. मात्र, हे प्रमाणपत्र नंतर बनावट असल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाले. हा प्रकार उघड झाल्यामुळे पराते यांच्या तक्रारीवरून ठाकूर विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक शेख सरवर हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महिलांचे सक्षमीकरण विकासासाठी आवश्यक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

'कुटुंबाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे गरजेचे आहे,' असे प्रतिपादन डॉ. संचिता सानप यांनी केले. निर्मला इन्स्टिट्युटने ग्रामीण भागातील महिलांसाठी सुरू केलेल्या अडिलेड महिला नागरी पतसंस्थेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

'ग्रामीण भागातील महिला अद्याप आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास आहेत. त्यांच्या सबलीकरणासाठी निर्मलाने उचललेले पाऊल प्रशंसनीय आहे,' असे डॉ. सानप म्हणाल्या. धोंडिरामसिंह राजपूत यांनी ही महिला सबलीकरण काळाची गरज असल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहायक निबंधक विनय धोटे यांनी ही महिलांनी धाडसाने पुढे येऊन पतसंस्थेच्या लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा नॅन्सी रोड्रिग्ज यांनी केले. सूत्रसंचलन इरफान सय्यद यांनी केले, तर तरिका एकक यांनी आभार मानले. यावेळी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, मर्चंट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती, शालिनी सोमाणी याची ही उपस्थिती होती.

\Bपतसंस्थेची नूतन कार्यकारिणी: \Bअध्यक्षा नॅन्सी, मुख्य प्रवर्तक फिलोमिना, सचिव छाया बंगाळ, सदस्य तारिका एक्का, वेणुका राजपूत, शोभा त्रिभुवन, संगीता गडाख, रेखा गायकवाड, जबबीन शेख, मनीषा जगताप, रिझवाना पठाण, ज्योती पडवळ, माया वाघ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोणाचीही गय नाही; अवैध धंद्याविरुद्ध कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू दिले जाणार नाहीत, असा प्रकार कोणी करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नव्याने रुजू झालेले शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी दिला.

बोकडे हे रुजू झाले असता पत्रकारांनी त्यांची भेट घेतली. यावेळी बोकडे म्हणाले की, गुटखा, अवैध दारू विक्री, अवैध प्रवासी वाहतूक, गोवंश मांस विक्री व वाहतूक, वाळू तस्करी आदी अवैध धंदे कुठल्याही परिस्थितीत चालू दिले जाणार नाहीत. कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ता, कोणाचीही गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते तहसील कार्यालय, महावीर चौक, भोकरदन नाका या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी करणाऱ्या अवैध वाहनांना बोकडे हटवले आहे.

\Bदहानंतर उगीच फिरू नका \B

रात्री दहानंतर शहरातील हॉटेल, ढाबा, पानटपरी, वैद्यकीय सेवा वगळून अन्य दुकाने सुरू राहिल्यास मालकावर कडक कारवाई करण्यात येईल, शहरातील नागरिकांनी रात्री दहानंतर उगीच रस्त्यावर फिरू नये, काही महत्त्वाचे काम असल्यास पोलिस चौकशीत सबळ पुरावा द्यावा लागेल, असे पोलिस निरीक्षक बोकडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार जलील खासदारकीच्या फडात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातून आतापर्यंत 'एमआयएम'ने उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे अखेरच्या क्षणी आमदार इम्तियाज जलील खासदारकीच्या फडात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी 'एमआयएम'ने बहुजन वंचित आघाडीशी संधान साधले. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत असुदुद्दीन ओवेसी यांनी संयुक्त सभा घेतल्या. बहुजन वंचित आघाडीने राज्यभरात लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा केली. यात औरंगाबादहून माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील यांचे नाव जाहीर झाले. मात्र, नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत आमदार इम्तियाज जलील यांनी 'एमआयएम' स्वत:चा उमेदवार जाहीर करण्याचे संकेत दिले. त्याला कारण शहरातून पक्षाचे नगरसेवक, आमदार आमदार निवडून आल्याचे सांगितले. तसेच शहराचा मोठा समूह आफल्या पाठिशी असल्याचा दावा केला. जलील यांनी मंगळवारी हैदराबाद येथे 'एमआयएम'चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कार्यकर्त्यांची मागणी ओवेसी यांच्यासमोर मांडली आहे. मात्र, त्यांनी खासदारकीला उभे राहण्याच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय दिला नाही. यामुळे अखेरच्या क्षणी जलील लोकसभेच्या रिंगणात उतरतील, अशी शक्यता आहे.

पठाणांचा नकार

औरंगाबाद पाठोपाठ भायखळाचे 'एमआयएम'चे आमदार वारिस पठाण यांच्यावरही लोकसभा निवडणूक लढविण्याचा दबाव होता. मात्र, पठाण यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. दरम्यान, औरंगाबादमध्ये बहुजन वंचित आघाडी आणि 'एमआयएम'ची सभा जबिंदा लॉन्सवर घेण्यात आली होती. या सभेतील उपस्थितीतांना आंबेडकरी विचारधारेचा दलित उमेदवार लोकसभेला दिला जाईल, अशी अपेक्षा होती.

'एमआयएम'ने लोकसभेसाठी उमेदवार जाहीर करावा, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. याबाबतचा अहवाल पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. - इम्तियाज जलील, आमदार, एमआयएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चारा छावण्या सुरू न केल्यास तहसीलमध्ये जनावरे सोडू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

भीषण दुष्काळी परिस्थितीत तालुका प्रशासनाने येत्या तीन दिवसांत ग्रामीण भागातील गुरांसाठी तातडीने चारा छावणी व मन्याड धरणातील पाणी प्रश्नाचे नियोजन करावे, अन्यथा तहसील कार्यालयाच्या आवारात जनावरे सोडून, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी तहसीलदार विनोद गुंडंमवार यांना दिला.

चाऱ्याअभावी पशुधनाची उपासमार होत असताना प्रशासकीय पातळीवर चारा छावण्या सुरू करून पशुधन मालकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरण्याचा प्रकार केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी चारा छावण्या चालू करण्याच्या प्रस्तावात प्रशासकीय पातळीवर बदल झाल्याची माहिती दिली. जिल्हा परिषद गटस्तरावर पशुसाठी छावण्या सुरू करण्याचे निर्देश प्राप्त झाल्याने तालुक्यात चार ठिकाणी चारा छावणी सुरू करण्यात येणार असून तालुकास्तरीय शिफारस समितीकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाच्या या खुलाशावर आमदार चिकटगावकर यांचे समाधान झाले नाही. तीन दिवसांत मतदार संघातील दुष्काळी परिस्थितीत चारा छावणी व पाणी प्रश्न मार्गी न लावल्यास जनावराचा कळप तहसील कार्यालयाच्या आवारात आणून सोडण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.

\Bकागदी धोरणांचा फटका \B

चार दिवसांपूर्वी हरगोविंदपूर, जानेफळ, लोणी, घायगाव या ठिकाणी तहसील कार्यालयात चारा छावण्या सुरू करण्यासाठी टंचाई शाखेत दाखल झालेल्या प्रस्तावावर काय निर्णय झाला याची माहिती घेण्यासाठी आमदार भाऊसाहेब पाटील, मंजाहरी गाढे, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक सारंगधर डिके, नाना इंगळे यांनी तहसीलदार गुंडमवार यांचे दालन गाठले. तहसीलदार यांनी पूर्वी गाव पातळीवर चारा छावण्या सुरू करण्याच्या प्रस्तावात प्रशासकीय पातळीवर बदल करण्यात आले असल्याचे सांगताच आमदार चिकटगावकर भडकले. जनावरांना दावणीला चारा नसल्याने उपासमार होत असताना प्रशासन प्रस्तावाच्या कागदपत्रे अदलाबदल करण्याच्या धोरणाचा फटका सोसावा लागत आहे, अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महिंद्रा’कडून जिल्ह्यास तीनशे टाक्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

वाहन उत्पादक कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'च्या सामाजिक फंडातून पाणीटंचाईची झळा सोसणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यासाठी दोन हजार लिटर क्षमतेच्या ३०० टाक्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.

सध्या जिल्ह्यातील ५४५ गावे आणि २०४ वाड्यांना ७६३ टँकरच्या साह्याने पाणी पुरवठा केला जात आहे. काही ग्रामपंचायतींकडे पाणी साठवण्यासाठी साधन नसल्याने 'महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी'ने तेथे ३०० पाण्याचा टाक्या देण्याचा निर्णय घेतला. या ३०० टाक्यांपैकी औरंगाबाद तालुक्यासाठी ४५, फुलंब्री ३०, पैठण ४५, गंगापूर ४५, वैजापूर ४५, खुलताबाद २०, सिल्लोड ४०, कन्नड २५, सोयगाव तालुक्यास ५ टाक्या, असे तालुकानिहाय वितरण करण्यात आले. वैजापूर तहसील कार्यालयात गुरुवारी ४५ टाक्यापैकी १५ टाक्या प्राप्त झाल्या. पाणी साठवण व्यवस्था नसलेल्या गावांची माहिती मागवून तेथे या टाक्या द्यावात, अशी सूचना तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी गटविकास अधिकारी यांना केली आहे. दरम्यान, तहसील कार्यालयाकडे प्राप्त टाक्या आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाला मिळाव्या यासाठी मोठी स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्याला दोन कोटींचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मद्यविक्री परवाना मिळवून देण्याचे आमीष दाखवून शहरातील व्यापाऱ्याला एक कोटी ९२ लाखांचा गंडा घालण्यात आला. ऑक्टोबर २०१५ ते मे २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशाने चार आरोपींविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी विलास दादाराव चव्हाण (वय ५५, रा. प्रोझोन मॉलजवळ) यांनी तक्रार दाखल केली. चव्हाण यांचा २०१५ मध्ये बाहेरगावच्या काही व्यापाऱ्यांशी परिचय झाला होता. यावेळी या चार व्यापाऱ्यांनी त्यांना मद्यविक्री परवाना मिळवून देतो, अशी थाप मारली. या आमिषापोटी चव्हाण यांच्याकडून या चौघांनी एक कोटी ९२ लाख रुपये उकळले. चव्हाण यांना परवाना देण्यास आरोपींनी नंतर टाळाटाळ केली. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे चव्हाण यांच्या लक्षात आले. त्यांनी रक्कम परत करण्यासाठी पाठपुरावा केला. यावेळी त्यांना खोटे चेक आरोपींनी दिले. हे चेक बँकेत वटविण्यासाठी टाकले असता ते बाऊंस झाले. या प्रकरणी चव्हाण यांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशाने बुधवारी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी दिलीप काशीनाथ काळभोर (रा. लोणीभोर, ता. हवेली), दयानंद उजलू वनंजे (रा. नांदेड), सुनील जबरचंद मोदी (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) आणि दिलीप कांबळे (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलश पूजन कार्यक्रमात शिवसेनेला ‘मित्राचा’ विसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेना - भाजप युतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे गुरुवारी कलश पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेनेला आपल्या मित्राचा (भाजप) विसर पडल्याचे चित्र होते.

समर्थनगरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाजवळ युतीचे मध्यवर्ती प्रचार कार्यालय सुरू केले जाणार आहे. या कार्यालयाची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. गुरुवारी सकाळी अकराच्या मुहूर्तावर खासदार चंद्रकांत खैरे व त्यांच्या पत्नी वैजयंती खैरे यांच्या हस्ते कार्यालयात कलश पूजन व देवी - देवतांचे पूजन करण्यात आले. यावेळी फक्त शिवसेनेचेच मोजके पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणुकीत शिवसेनेची भाजप बरोबर युती झालेली आहे. त्यामुळे कलश पूजन कार्यक्रमाला भाजपचे काही पदाधिकारी उपस्थित असतील, असा कयास बांधण्यात आला होता. मात्र, तो खोटा ठरला. भाजपचे कुणीच कसे नाही, याबद्दल पत्रकारांनी खैरे यांना विचारले असता खैरे थोडेसे चिडले. 'हा आमचा घरगुती कार्यक्रम असून, फक्त कलश पूजन होते. मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (१७ मार्च) होणार आहे. त्यावेळी भाजपसह महायुतीमधील घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहतील. कलश पूजनाचा आजचा मुहूर्त होता. तो आम्ही साधला,' अशी सारवासारव त्यांनी केली.

\Bखैरेंनी घेतला मातोश्रींचा आशीर्वाद

\Bकलश पूजनाच्या कार्यक्रमाला खैरे यांच्या मातोश्री वत्सलाबाई यांची उपस्थिती होती. खैरे यांनी यावेळी मातोश्रींचा आशीर्वाद घेतला. यावेळी खैरे यांचा मुलगा ऋषिकेश, पुतण्या सचिन, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, माजी आमदार अण्णासाहेब माने, माजी महापौर त्र्यंबक तुपे, माजी जिल्हाप्रमुख राधाकृष्ण गायकवाड, माजी महापौर कला ओझा, मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य अशोक पटवर्धन, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, सुनीला आउलवार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेबी केअर किट’ आचारसंहितेत अडकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयात पहिल्या प्रसुतीवेळी जन्मलेल्या बालकाच्या जन्मानंतर त्याला राज्य सरकारच्यावतीने 'बेबी केअर किट' देण्यात येणार होते. २६ जानेवारीपासून योजना लागू झाली. प्रशासकीय मान्यता तसेच अन्य प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी पूर्ण न झाल्याने तूर्तास ही योजना लांबणीवर पडली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत ही योजना निविदा प्रक्रियेत थांबली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयात गरोदरपणात नावनोंदणी केलेल्या व त्याठिकाणी प्रसुती होणाऱ्या महिलांना पहिल्या प्रसुतीच्यावेळी या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पहिल्या प्रसुतीच्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शासकीय रुग्णालयात नाव नोंदणी केलेल्या गरोदर महिलेने नवव्या महिन्यात जवळच्या अंगणवाडी सेविकेकडून संबंधित लाभार्थींना 'बेबी केअर किट' उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आचारसंहिता लागू झाल्याने लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्तात सोन्याचे आमिष; ५० हजारांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

साडेतीन लाख रुपयांत अर्धा किलो सोने देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांची फसवणूक करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

गणेश दत्तात्रेय कर्डिले (वय ३५, रा. नांदूर शिकारी ता. नेवासा, जि. अहमदनगर) यांना मुकेश नावाच्या अज्ञात व्यक्तीने फोन करून त्याच्याकडे अर्धा किलो सोने असून ते स्वस्तात विक्री करण्याचे आमिष दिले. सोने खरेदी करण्यात रस दाखवल्याने मुकेश नावाच्या व्यक्तीने गणेश कर्डिले यांना पैठण येथील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. यावेळी दोघांमध्ये अर्धा किलो सोन्याचा भाव साडे तीन लाख रुपये ठरवण्यात आला. सुरुवातीला ५० हजार व सोने घेतल्यानंतर उर्वरित तीन लाख रुपये देण्याचा सौदा करण्यात आला. कर्डिले याने ५० हजार रुपये देऊन अर्धा किलो सोने ताब्यात घेतले. ते विकण्यासाठी सोनाराकडे गेले असता, हे सोने नकली असल्याचे स्पष्ट झाले. गणेश कर्डिले याने त्वरित सोने देणाऱ्याचा शोध घेतला. पण, त्याने हॉटेलमधून पोबारा केला. त्याचा फोन बंद होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कर्डिले यांनी पैठण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन ग्रामपंचायतीत ३९ उमेदवार रिंगणात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील विटा, रामनगर व खापरखेडा (पळसखेडा) तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी सहा, तर सदस्यपदासाठी ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

विटा ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्य असून सरपंचपदासाठी तीन, तर सदस्यपदासाठी १७ नामनिर्देशन पत्र दाखल झाले. त्यापैकी एक नामनिर्देशन पत्र अवैध ठरले. सरपंचपदासाठी एकाने, तर सदस्यपदांपैकी दोघांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे सरपंचपदासाठी दोन, तर सदस्यपदाच्या सहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. सुनील धनवत, संदीप भोजने व चंद्रकला औटे हे बिनविरोध निवडून आले. उषा भोजणे, सुनीता भोजणे, रेखा शिंदे, सुनीता खैरनार, मंदाबाई कोरडे, बाळासाहेब निकम, रमेश खैरनार, आसाराम बागुल, दीपक खरात, जिजा शिंदे, सविताबाई निकम हे सदस्यपदासाठी, तर कविता भोजणे व मनोज पेंढारे हे सरपंचपदाचे उमेदवार रिंगणात आहे.

रामनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी दोन, तर नऊ सदस्यपदांसाठी २२ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. चार जणांनी माघार घेतल्याने सदस्यपदासाठी १८ जण रिंगणात आहेत. त्यात ज्ञानेश्वर माळी, दिलीप सोनवणे, राणी खुर्दे, सुशीलाबाई मोरस्कर, कांताबाई गायकवाड, स्वाती गव्हांडे, प्रकाश हिरे, शुभम दुसारिया, अलका गायकवाड, सरुबाई शिरसाट, ममता नरवडे, रंजना नलावडे, लता नरवडे, मीनाबाई नलावडे, संजय गायकवाड, कारभारी खुर्दे, रामदास नरवडे व ज्ञानेश्वर काळे यांचा समावेश आहे. मीरा माळी व गयाबाई शिंदे यांच्यात सरपंचपदासाठी लढत होत आहे.

खापरखेडा (पळसखेडा) ग्रुप ग्रामपंचायतीच्या सात जागांपैकी पाच सदस्य बिनविरोध निवडून आले. दोन जागांसाठी जयवंता सोनवणे, सुदाम सोनवणे, ज्योती पवार व माया पवार हे निवडणूक लढवत आहेत. सरपंचपदासाठी कन्हिराम राजपूत व विजय पवार हे रिंगणात आहेत. लक्ष्मण आगवान, निर्मला काकडे, पुष्पा आगवान, जयकोरबाई घुनावत व शेखलाल चुंगडे हे बिनविरोध निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. जी. जाधव, तर सहायक म्हणून पी. एस. वाणी काम पाहत आहेत.

\Bमतदान २४ मार्च

मतमोजणी २५ मार्च

\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांसमोर कट्टरतावादाचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सीमेवरील दहशतवादी कारवायांसोबतच देशामध्ये अंतर्गत कट्टरवादाचे मोठे आव्हान आहे. या समाजविघातक शक्तीकडे वळणाऱ्या तरुणांचे समुपदेशन करून त्यांना या चळवळीपासून दूर ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा प्रयत्नशील आहे,' अशी माहिती गुरुवारी पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जायस्वाल यांनी गुरुवारी नांदेड आणि औरंगाबाद परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत मार्गदर्शन केले. निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ते मराठवाडा दौऱ्यावर आले होते. सकाळी त्यांचे पोलिस आयुक्तालयात आगमन झाले. यानंतर त्यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. 'निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार काम करू. राज्यातील पेालिस दल या निवडणुकीसाठी आहे. निवडणूक काळात कशा पद्धतीने कामकाज करावे याच्या सूचना त्या त्या जिल्ह्यातील घटक प्रमुखांना दिल्या आहेत,' असे जायस्वाल यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांची उपस्थिती होती. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी जायस्वाल यांना विविध प्रश्न विचारले. मात्र, त्यांनी या प्रश्नांना बगल देत उत्तर देणे टाळले. या पत्रकार परिषदेवरही आचारसंहितेचे सावट असल्याचे जाण‌वले.

\Bदांडगा जनसंपर्क

\Bपोलिस महासंचालक जायस्वाल यांनी यापूर्वी १९८७ ते १९९०पर्यंत औरंगाबादमध्ये कर्तव्य बजावले आहे. त्या काळी देखील त्यांचा शहरात दांडगा जनसंपर्क प्रमाणात होता. जायस्वाल गुरुवारी शहरात आले असता त्यांना भेटण्यासाठी अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यामध्ये माजी महापौर रशीदमामू यांच्यासह इतरांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी सैनिकांना फसवणाऱ्यास अटक; कोठडीत रवानगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत चालणाऱ्या ग्रुप 'सी'मधील प्रायमरी स्कूल सुपरवायजर पदावर नोकरीचे आमीष दाखवून दोन माजी सैनिकांसह तिघांना ३० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणात संशयित आरोपी सुरेंद्र सुभाष काकडे याला बुधवारी (१३ मार्च) अटक करून गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्याला मंगळवारपर्यंत (१९ मार्च) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले.

या प्रकरणी माजी सैनिक रवींद्र साहेबराव भोसले (वय ३५, रा. आडगाव, ता. कन्नड) यांनी फिर्याद दिली होती. ते ऑगस्ट २०१७ मध्ये सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या नोकरीच्या शोधात होते. त्यावेळी मित्र व माजी सैनिक कैलास रामराव थोरात याच्यामार्फत संशयित आरोपी सुरेंद्र सुभाष काकडे (रा. म्हाडा कॉलनी, विठ्ठलनगर, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलसमोर) याच्याशी भारत बाजार येथील कार्यालयात फेब्रुवारी २०१८ मध्ये नोकरीसंदर्भात भेट झाली. 'मी मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत चालणाऱ्या ग्रुप 'सी'मधील प्रायमरी स्कूल सुपरवायजर या पदाच्या नोकरभरतीसाठी काम करतो. दिल्लीतील मंत्रालयातील अधिकारी व मंत्र्यांशी ओळख आहे,' असे त्याने भोसले व थोरात यांना सांगितले. तुम्हालाही नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखवत ऑनलाइन जाहिराती दाखवल्या. मात्र, त्यासाठी १० लाखांचा खर्च येईल व पैसे रोख स्वरुपात द्यावे लागतील. मुलाखत, वैद्यकीय चाचणी, प्रशिक्षणासाठी दिल्लीला जावे लागेल व फॉर्म भरताना चार लाख रुपये व उर्वरित रक्कम ऑर्डर मिळाल्यावर द्यावे लागतील, असे सांगितले. त्याबद्दल तयारी दाखविल्यानंतर काकडे यांना भोसले यांच्याकडून फेब्रुवारी २०१८ मध्ये फॉर्म भरून घेत नोकरीसाठी मूळ कागदपत्रांसह चार लाख रुपये घेतले. मानव संसाधन विकास मंत्रालयाचे पत्र प्राप्त झाल्यानंतर भोसले यांच्याकडून १३ ते २० मार्च २०१८ रोजी साडेतीन लाख रुपये घेतले. दरम्यान, काकडे याने भोसले व त्यांचा मित्र विलास राधाकिसन चव्हाण यांना दिल्ली येथे शास्त्री भवन येथे बोलावून हितेश नावाच्या व्यक्तीची ओळख करून दिली. त्यानंतर भोसले, विलास चव्हाण व कैलास थोरात यांना २ एप्रिल २०१८ रोजी नोकरीच्या प्रशिक्षणासाठी बाराखंडा रोड, दिल्ली येथे बोलावले. तेथे तिघांनी अर्ज भरले व तिघांना 'मिड डे मिल स्किम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, उत्तराखंड' येथील प्रशिक्षणाचे पत्र देण्यात आले. तेथे गेल्यानंतर शर्मा नावाच्या अधिकाऱ्याने ऑर्डर पाहून कागदपत्रे ठेऊन घेतली व प्रशिक्षणाला सुटी असून, तुम्हाला कळविण्यात येईल, असे सांगितले. ७ सप्टेंबर २०१८ रोजी तिघे दिल्लीला गेले असता, आरोपीचा साथीदार हितेश याने शास्त्री भवनच्या गेटवरच नोकरीची फायनल ऑर्डर जावक क्रमांकासह दिली. त्यानुसार भोसले यांना फुलंब्री ब्लॉक, थोरात यांना खुलताबाद, तर चव्हाण यांना सिल्लोड ब्लॉक येथे रिपोर्ट करण्यास सांगितले. त्याचवेळी फिर्यादीकडून उर्वरित अडीच लाख रुपयेही घेतले.

\Bरुजू करून न घेतल्याने फुटले बिंग

\Bतिघे नोकरीच्या अंतिम ऑर्डरसह दिलेल्या ठिकाणी रुजू होण्यासाठी गेले असता, त्यांना रुजू करुन घेण्यात आले नाही. फसवणू झाल्याचे लक्षात आल्यानंतर भोसले यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या ४०६, ४२०, १२० (ब), ४६७, ४७१, ३४, तर माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या ६६ (क), ६६ (ड) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

\Bगुन्ह्यात आंतरराज्य टोळीची शक्यता \B

या प्रकरणात संशयित आरोपी काकडेला बुधवारी अटक करून गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले. गुन्हा गंभीर असून, फसवणुकीची रक्कम व तिघांची मूळ कागदपत्रे जप्त करणे, साथीदारांना अटक करणे बाकी आहे. तसेच आरोपीने बनावट वर्क ऑर्डर, आयकार्ड कुठून तयार केले याचाही तपास करायचा आहे. फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी कार्यरत असू शकते व त्यादृष्टीने तपास करावयाचा असल्याने १२ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवाड यांनी केली. ही विनंती मान्य करुन आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेलमालक, वाहनचालकाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टीव्ही सेंटर आणि मुकुंदवाडी भागात दोघांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. यामध्ये हॉटेल मालक व वाहनचालकाचा समावेश आहे.

मुकुंदवाडी येथील प्रकाशनगर गल्ली नंबर दोन मध्ये वाहनचालक राजू रामराव हिवाळे (वय ३३) याने स्वत:च्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केली. हिवाळेच्या पत्नीचे निधन झाले असून त्याला सात वर्षांचा मुलगा आहे. मुलगा त्याच्या मामाकडे राहतो. हिवाळे यांच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याने घरमालकाने त्याच्या लहान भावाला ही माहिती दिली. ही माहिती मुकुंदवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवला. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पत्नीच्या विरहाने हिवाळे यांनी आत्महत्या केल्याचा संशय असून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. या प्रकरणी जमादार शिवाजी मनगटे हे तपास करीत आहेत.

आत्महत्येची दुसरी घटना रविवारी सकाळी टीव्ही सेंटर भागात घडली. येथील उत्तम टी हाउसचे मालक विजय लक्ष्मण मगरे (वय ३७ रा. सिद्धार्थनगर) यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी सहा वाजता मगरे यांच्या काकाच्या लक्षात आला. दुकानाचे शटर तोडून मगरे यांचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टेमसाठी रवाना केला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठजण होणार स्थायी समितीतून निवृत्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पालिकेच्या स्थायी समितीतील सोळा सदस्यांपैकी शिवसेनेच्या कोट्यातील पाच सदस्यांसह स्थायी समितीचे आठ सदस्य एक मे रोजी निवृत्त होणार आहेत. निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती करण्याबद्दल एप्रिल महिन्यात विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे.

स्थायी समितीत शिवसेनेचे रेणुकादास (राजू) वैद्य, ऋषीकेश खैरे, सिद्धांत शिरसाट, तर सेनेच्या कोट्यातून अपक्ष नगरसेवक रुपचंद वाघमारे व स्वाती नागरे यांना स्थान मिळाले आहे. हे पाचही सदस्य एक मे रोजी स्थायी समितीमधून निवृत्त होणार आहेत. त्यांच्याबरोबरच एमआयएमचे सय्यद मतीन रशीद, शेख नरगीस सलीम आणि भाजपच्या राखी देसरडा निवृत्त होणार आहेत. निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागी शिवसेनेचे पाच, एमआयएमचे दोन आणि भाजपचा एक नवीन सदस्य नियुक्त होईल. नियुक्तीसाठीच्या विशेष सर्वसाधारण सभेची सूचना पालिका प्रशासनाकडून एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काढण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोळसे-पाटील जनता दलाचे उमेदवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रचंड उत्सुकता ताणलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. कोळसे-पाटील यांना वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरण पूर्णत: बदलणार आहे. येत्या रविवारी जनता दल मेळावा घेऊन अधिकृतपणे उमेदवारीची घोषणा करणार आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करून बहुजन वंचित आघाडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या नावाची घोषणा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी परभणीच्या जाहीर सभेत केली होती. मात्र, सर्वांचा पाठिंबा असेल तरच निवडणूक लढवणार असे सांगत कोळसे पाटील यांनी उमेदवारी नाकारली होती. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी उमेदवाराच्या शोधात असताना जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) औरंगाबाद मतदारसंघात कोळसे यांच्या नावाची घोषणा केली. पक्षाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी बुधवारी कोळसे पाटील यांच्याशी चर्चा केली. राजकीय परिस्थिती आणि बदलणारी समीकरणे लक्षात घेऊन कोळसे पाटील यांनी उमेदवारीस होकार दिला. त्यानुसार कोळसे यांची उमेदवारी निश्चित केल्याचे जनता दलाचे नेते अजमल खान यांनी 'मटा'ला सांगितले.

वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद मतदारसंघात अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) उमेदवार कोळसे-पाटील यांना वंचित आघाडी पाठिंबा देण्याची शक्यता आहे. या एकत्रिकरणातून उमेदवार विजयी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जनता दलाच्या वरिष्ठ पातळीवरून काँग्रेस पक्षश्रेष्ठींशीही संपर्क साधण्यात आला आहे. काँग्रेस आघाडीने कोळसे यांना पाठिंबा द्यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

रविवारी मेळावा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दलाने रविवारी शहरातील सिमंत मंगल कार्यालयात मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात कोळसे पाटील यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात विविध पक्षात विभागलेले जनला दलाचे माजी नेते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images