Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

निर्भिड पत्रकारिता अंगिकारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनंतराव भालेराव यांच्या पठडीतील पत्रकार निर्भिड व स्पष्ट होते. अशीच निर्भिड पत्रकारिता या क्षेत्रातील तरुणांनी अंगीकारावी, असे प्रतिपादन पंडित नाथराव नेरळकर यांनी केले. अरविंद आत्माराम वैद्य स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. आजच्या पत्रकारांची धावपळ वाढली आहे. त्यांचा सोशिकपणा कमालीचा असतो, असेही ते म्हणाले.

आठव्या 'अरविंद आत्माराम वैद्य स्मृती पत्रकारिता पुरस्कारा'ने ज्येष्ठ पत्रकार अरविंद गंगाधरराव वैद्य यांना, तर युवा पत्रकारिता पुरस्काराने विद्या गावंडे यांना गौरविण्यात आले. जीवन विकास ग्रंथालयाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यासाठी व्यासपीठावर प्रसिद्ध साहित्यिक, राज्य साहित्य, संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा भांड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पंडित नेरळकर म्हणाले,'एक कलावंताकडून पत्रकाराचा सन्मान होणे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. काम करत असताना जगणे वेगळे आणि सेवानिवृत्तीनंतर खरा जगण्याचा आनंद सुरू होतो.'

बाबा भांड म्हणाले, 'लेखन, प्रकाशन आणि वृत्तपत्रे ही समाजातील जबाबदार माध्यमे आहेत. आजचे वातावरण कसे यावरच बोलले जाते मात्र, त्याला किती शरण जायचे, किती बिघडायचे हे प्रत्येकानेच ठरवायला हवे. आपले वागणे, कृती अन् लेखनाने आपल जीवन सुंदर होऊ शकते. स्वप्न पाहिले पाहिजे आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे.'

अरविंद गं. वैद्य म्हणाले, 'अरविंद आ. वैद्य यांच्याकडे असलेल्या व्यक्तशीरपणातून खूप काही शिकता आले. मागच्या पिढीच्या खांद्यावर पुढची पिढी उभी राहते. आम्ही जी पत्रकारिता पाहिली, शिकली आणि अनुभवली ती अतिशय प्रभावी अशी होती. आजची पत्रकारिता चकाककणारी आहे. हे स्वरूप किळसवाणे वाटते. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे गारूड आहे. आपापसातील संवाद कमी झाला आहे.'

पत्रिकारितेतील दिग्गज अनंतराव भालेराव, बाबा दळवी, दादासाहेब पोतनीस यांच्यासोबतच्या आठवणी ही त्यांनी मांडल्या. विद्या गावंडे म्हणाल्या, 'हा पुरस्कार माझ्यासाठी मनौधैर्य वाढविणारा आहे.' अरविंद आत्माराम वैद्य स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये आणि मानपत्र असे आहे. युवा पत्रकारिता पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये आणि मानपत्र असे आहे. अर्चना वैद्य यांनी मान्यवरांचे स्वागत केले. धनंजय लांबे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या पुरस्काराची भूमिका स्पष्ट करताना अरविंद आ. वैद्य यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा मागोवा घेतला. प्रमोद माने यांनी पुरस्कार विजेत्यांना परिचय करून दिला. प्रेषित रुद्रवार सूत्रसंचालन केले. संजय वरकड यांनी आभार मानले.

..

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काकांच्या मनधरणीसाठी खैरेंची धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज आणून जोमाने तयारी करू पाहणारे भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांची मनधरणी करण्यात शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांना यश आले आहे. गायकवाड हे निवडणुकीचा अर्ज दाखल करणार असल्याचे समजताच भाजप पदाधिकाऱ्यांना सोबत घेत खैरे यांनी गायकवाड यांची भेट घेत समाधानकारक चर्चा घडवून आणली. एक वादळ शांत झाल्याचे स्पष्ट होताच खासदार खैरे यांचा चेहऱ्यावर हास्य उमटले.

लोकसभा निवडणुकीसाठी दीड वर्षापासून भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड हे तयारी करत होते. त्यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज आणला. त्यामुळे शिवसेना भाजप युतीमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. त्यावर मार्ग काढण्यासाठी 'काका, मला वाचवा' नाट्य शुक्रवारी दुपारी गायकवाड यांच्या निवासस्थानी घडले. युतीचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजप प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांना सोबत घेत गायकवाड यांची भेट घेतली. महापौर नंदकुमार घोडले, सुहास दाशरथे, जया गुदगे यावेळी उपस्थित होते. सुमारे एक तास चर्चेनंतर तोडगा निघाला. गायकवाड यांनीही भाजपचा सच्चा कार्यकर्ता असल्याचे सांगत युतीचा प्रचार जोमाने करणार असल्याची ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात उमेदवारांची भाऊगर्दी

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद

मराठवाड्यातील सहा लोकसभा मतदारसंघाचे चित्र शुक्रवारी उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. या सर्व मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होत आहेत. बीड मतदारसंघातून ३६, परभणीत १७, नांदेड व उस्मानाबादमध्ये प्रत्येकी १४, लातूरमध्ये १० उमेदवार रिंगणात आहेत. या सहा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. \B

नांदेडच्या रिंगणातून ४१ उमेदवार बाहेर

\B

नांदेड: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नांदेड लोकसभा मतदारसंघातून ३१ जणांनी अर्ज मागे घेतल्याने आता १४ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. नांदेडमधून ५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी १० जणांनी गुरुवारी माघार घेतली होती. अशोक चव्हाण (काँग्रेस), प्रताप पाटील चिखलीकर (भाजप), अ. रईस अहेमद (आंबेडकर नॅशनल काँग्रेस), अब्दुल समद (समाजवादी पार्टी) यशपाल भिंगे (वंचित बहुजन आघाडी), मोहन वाघमारे (बहुजन मुक्तीपार्टी), सुनील सोनसळे (बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टी), श्रीरंग कदम, अशोक चव्हाण, मनीष वडजे, महेश तळेगाकवर, माधवराव गायकवाड, रंजीत देशमुख व शिवानंद देशमुख (अपक्ष) हे निवडणूक रिंगणात आहेत.

\Bउस्मानाबादेतून पाच जणांची माघार

\B

उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून २३ जणांनी ३७ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे १४ उमेदवार रिंगणात आहेत. अतुल विक्रम गायकवाड (अपक्ष), अर्चना राणाजगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), काकासाहेब बापूराव राठोड (अपक्ष), नवनाथ दशरथ उपळेकर (अपक्ष), बसवराज गुरुलिंगप्पा वरनाळे (अपक्ष) यांनी शुक्रवारी उमेदवारी मागे घेतली. रिंगणातील उमेदवार पुढीलप्रमाणे: राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजे निंबाळकर (शिवसेना), अर्जुन सिद्राम सलगर (वंचित बहुजन आघाडी), डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमान (बहुजन समाज पक्ष), दीपक महादेव ताटे (भापसे पार्टी), अण्णासाहेब रामचंद्र राठोड (भारतीय बहुजन क्रांती दल), विश्वनाथ सदाशिव फुलसुरे (क्रांतिकारी जयहिंद सेना), तुकाराम दासराव गंगावणे, जगन्नाथ निवृत्ती मुंडे, सय्यद सुलतान लडखान, डॉ. वसंत रघुनाथ मुंडे, नेताजी नागनाथ गोरे, शंकर पांडुरंग गायकवाड, आर्यनराजे किसनराव शिंदे (सर्व अपक्ष). ही माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.

\Bबीडमधून १७ जणांची माघार

\B

बीड: बीड लोकसभा मतदारसंघातून शुक्रवारी अखेरच्या दिवशी १७ उमेदवारांनी माघार घेतली असून आता ३६ उमेदवार रिंगणात आहेत. यात राष्ट्रीय पक्षाचे दोन, नोंदणीकृत पक्षाचे आठ आणि २६ अपक्ष उमेदवार असल्याची माहिती निवडणूक जिल्हा निर्णय अधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात २३११ मतदान केंद्र व १४ उपमतदान केंद्र असून निवडणुकीसाठी दहा हजार २३२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतदारांना मार्गदर्शन व तक्रारी नोंदविण्यासाठी मतदार हेल्पलाइन क्रमांक १९५०, जिल्हा नियंत्रण कक्ष क्रमांक २२४६०४ कार्यान्वित केला आहे. गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आठ असे एकूण ४८ भरारी पथक नियुक्त केले आहेत.

\Bलातूरमधून दोघांची माघार \B

लातूर: लातूर राखीव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता या मतदारसंघातून १० उमेदवार अंतिम झाले आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: मच्छिंद्र गुणाजी उर्फ गुणवंतराव कामंत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सुधाकर तुकाराम श्रृंगारे (भाजप), रामराव नरसिंग गारकर (वंचित बहुजन आघाडी), सिद्धार्थकुमार दिगंबर सूर्यवंशी (बहुजन समाज पक्ष), अरुण रामराव सोनटक्के (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), दत्तू प्रभाकर करंजीकर (बहुजन मुक्ती पार्टी), रुपेश शामराव शंके (स्वतंत्र भारत पक्ष), मधुकर संभाजी कांबळे, पपिता रावसाहेब रणदिवे व रमेश निवृत्ती कांबळे (अपक्ष). ही माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आली.

\Bपरभणीतून चौघांची माघार \B

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत १७ उमेदवार राहिले आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २१ पैकी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. छाननीच्या दिवशी राजा भगदावानदास जोंधळे या उमेदवाराने अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी दादाराव गणपतराव पंडित, डॉ. धर्मराज चव्हाण व निहाल अहमद कौसडीकर यांनी अर्ज मागे घेतले. शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव, राष्ट्रवादीतर्फे राजेश विटेकर, वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान, भाकपचे राजन क्षीरसागर हे प्रमुख उमेदवार आहेत.

\Bहिंगोलीतून २८ उमेदवार \B

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघातून अर्ज केलेल्या ३४ पैकी सहा उमेदवारांनी शुक्रवारी माघार घेतली. या मतदारसंघांत आता २८ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. इंगोले पिराजी गंगाराम, चक्रधर पांडुरंग देवसरकर, ढोले विठ्ठल नागोराव, डॉ. मनीष वडजे, ॲड. शिवाजीराव जाधव, अॅड. गंगाधर रामराव सावते यांनी माघार घेतली. वानखेडे सुभाष बापुराव (काँग्रेस), हेमंत पाटील (शिवसेना), मोहन फत्तुसिंग राठोड (वंचित बहुजन आघाडी) या प्रमुख उमेदवारांसह २८ उमेदवार रिंगणात आहेत.

\Bमतदान यंत्र वाढणार \B

एका मतदान यंत्रावर १६ नावे बसू शकतात. त्यामुळे परभणी मतदारसंघात १७ व्या उमेदवारासह नोटाचा पर्यायाकरिता दुसरे मतदान यंत्र ठेवावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रात दोन यंत्र दिसणार आहेत. बीड मतदारसंघात ३६ उमेदवार, तर हिंगोलीत २८ उमेदवार असल्यामुळे तेथेही मतदान यंत्रांची संख्या वाढवावी लागणार आहे.

\Bप्रमुख उमेदवार \B

\Bनांदेड:\B अशोक चव्हाण (विद्यमान खासदार, काँग्रेस), प्रताप पाटील चिखलीकर (भाजप), अब्दुल समद (समाजवादी पार्टी) यशपाल भिंगे (वंचित बहुजन आघाडी)

एकूण उमेदवार १४

\Bउस्मानाबाद:\B राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजे निंबाळकर (शिवसेना), अर्जुन सिद्राम सलगर (वंचित बहुजन आघाडी), डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमान (बहुजन समाज पक्ष)

एकूण उमेदवार १४

\Bबीड:\B डॉ. प्रीतम मुंडे (विद्यमान खासदार, भाजप), बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रा. विष्णू जाधव (वंचित बहुजन आघाडी)

एकूण उमेदवार: ३६

\Bलातूर:\B मच्छिंद्र गुणाजी उर्फ गुणवंतराव कामंत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सुधाकर तुकाराम श्रृंगारे (भाजप), रामराव नरसिंग गारकर (वंचित बहुजन आघाडी), सिद्धार्थकुमार दिगंबर सूर्यवंशी (बहुजन समाज पक्ष)

एकूण उमेदवार १०

\Bपरभणी:\B संजय उर्फ बंडू जाधव (विद्यमान खासदार, शिवसेना), राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), राजन क्षीरसागर (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), आलमगीर खान (वंचित बहुजन आघाडी)

एकूण उमेदवार १७

\Bहिंगोली:\B हेमंत पाटील (शिवसेना), सुभाष वानखेडे (काँग्रेस), मोहन राठोड (वंचित बहुजन आघाडी)

एकूण उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सिमी' सदस्यांना नोटीस बजावण्याचे आदेश

$
0
0

औरंगाबाद : सिमी संघटनेस अवैध संघटना घोषित करण्याबाबत कार्यवाहीची सुनावणी न्यायाधिकरणासमोर चालू असल्याने या संघटनेच्या सर्व सदस्यांना सदर संघटनेस अवैध (बेकायदा) का घोषित करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा या प्रकरणातील पुढील तारीख १५ एप्रिल २०१९ पूर्वी सादर करण्याबाबत नोटीस तामील करण्याबाबत निर्देशित केले आहे.

सिमी संघटनेच्या कारणे दाखवा नोटीस संघटनेच्या सदस्यांना व्यक्तीश:, रजिस्टर पोस्ट व स्पीड पोस्टद्वारे बजावण्यात यावी. नोटीसची प्रत सिमी संघटनेच्या औरंगाबाद स्थित कार्यालयात डकवण्यात येऊन त्याबाबतचे फोटोग्राफर व पंचनामा तात्काळ तीन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. कार्यवाहीचा पोलिस अहवाल न्यायाधिकरणाकडे सादर करायचा असल्याने कार्यालयामार्फत सर्व संबंधित सदस्यांना कारणे दाखवा नोटीसची बजावावी. संघटनेच्या कार्यालयात नोटीस बजावून त्याबाबतची तामील प्रत, पंचनामा, छायाचित्रे जिल्हाधिकारी कार्यालयात तीन दिवसांत सादर करावेत, असेही चौधरी यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रक्तविकारांबाबत आजपासून मंथन

$
0
0

औरंगाबाद : वेगवेगळ्या रक्तविकारांवर आणि जनुकीय आजारांवर; तसेच या आजारांच्या बदलत चाललेल्या निदान तंत्रांवर व निरनिराळ्या उपचार पद्धतींबाबत बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ, मेंदूविकारतज्ज्ञ, चिकित्सक; तसेच रक्तविकारतज्ज्ञांमध्ये सखोल मंथन घडवून आणण्यासाठी दोन दिवसांची वैद्यकीय परिषद शनिवारपासून (३० मार्च) हॉटेल ताज विवांटा येथे होत आहे. कमलनयन बजाज रुग्णालयाच्या वतीने आणि 'फिजिशियन असोसिएशन' व 'फोग्सी'च्या सहकार्याने या प्रकारची परिषद पहिल्यांदाच मराठवाडा विभागात होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधानांचे निर्णय मतदारांपर्यंत पोचवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

'गेल्या पाच वर्षांत घेतलेल्या जन व देशहिताचे निर्णय मतदारांपर्यंत पोहोचवत बुथ कार्यकर्त्यांनी आपले योगदान द्यावे,' असे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. निलंगा मतदारसंघातील शेडोळ, निटूर, अंबुलगा येथे अटल बुथ संमेलनात ते बोलत होते.

यावेळी लोकसभा प्रभारी अ‍ॅड. मिलिद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे, तालुकाध्यक्ष संजय दोरवे, श्रीमंत जाधव, जिल्हा परिषध सदस्य घोडीराम बिराजदार, युवा नेते अरविंद पाटील, सभापती अजित माने, पंचायत समिती सदस्य उषा गवारे, सरपंच कालिदास सूर्यवंशी, बालाजी मोगरगे, दगडू साळुंके, गुंडेराव जाधव, सरपंच परमेश्‍वर हसबे, जनार्दन सोमवंशी आदी उपस्थित होते. 'काँग्रेस सरकारच्या काळात शासनाकडून मिळाणारा निधी हा दलालामार्फत मिळत होता. ही पद्धत बंद करण्यासाठी जनधन योजने अंतर्गत गोर-गरीब जनतेचे 'झिरो बँलेस' खाती बँकेतून सुरू करण्यात आली. त्या खात्यावर शासनाकडून देण्यात येणारे अनुदान थेट जनतेपर्यंत पोहचविले. देशाच्या हितासाठी काही निर्णय सरकारने घेतले व त्याची अंमलबजावणी कडक केली, असे निलंगेकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकी; जामीन फेटा‌ळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकींना वापरुन शासनाची फसवणूक करणारा आरोपी योगेश कुंजबिहारी अग्रवाल याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. सोळुंके यांनी फेटाळला.

या प्रकरणी हवालदार प्रमोद बाबुराव चव्हाण यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ६ मार्च रोजी एकच क्रमांक असलेल्या दोन दुचाकी शहरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरुन खात्री करण्यासाठी पोलिस हे आरोपी योगेश कुंजबिहारी अग्रवाल (३०, रा. एन-३, सिडको) याच्या घरी गेले असता तिथे दुचाकी (एमएच-२०, बीबी-१००६) उभी होती. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, दुचाकी आरोपीच्या नावावर असल्याचे समोर आले. तर, सेट्रल नाका परिसरातील एका हॉटेलसमोरसुद्धा त्याच क्रमांकाची व त्याच कंपनीची दुचाकी उभी होती. त्या दुचाकी चालकाची चौकशी केल्यानंतर तो दुचाकीचालक आरोपी अग्रवाल याच्याकडे कामाला असल्याचे व आरोपीनेच त्याला दुचाकी वापरण्यासाठी दिल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले. आरोपीने महसूल बुडवून शासनाची फसवणूक केल्याने त्याच्या विरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, न्यायालयाने तो फेटाळला. सहाय्यक सरकारी वकील उल्हास पवार यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेआठ लाख, बीडमध्ये ताब्यात

$
0
0

बीड: जिल्ह्यात आत्तापर्यंत तीन ठिकाणी तपासणीत खाजगी वाहनात मोठ्या रक्कम आढळल्या आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जात आहे. बीड शहरात नगररोडवर वाहन तपासणीवळी जी जे ०३ एफ डी ८८०७ या क्रमांकाच्या कारच्या डिक्कीत सुटकेसमध्ये साडे आठ लाख रुपये सापडले. ते कोषागार कार्यालयाकडे सुपूर्द केले जाणार आहेत, असे आचारसंहिता प्रमुख अमोल येडगे यांनी सांगितले. कारमधील भावेश मोहन रामोलिया (वय ३६) व हरेश वजू घाडिया (वय ३२, दोघेही रा. राजकोट, गुजरात) यांना घटनास्थळी ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर म्हणाले की, जिल्ह्यात दोन ठिकाणी देशी कट्टे ताब्यात घेतले आहेत. १३५० शस्त्र परवानाधारकांपैकी १२५५ शस्त्र जमा केली असून वेगवेगळ्या सात गुन्हेगारी टोळ्या तडीपार केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काकांच्या मनधरणीसाठी खैरेंची धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज आणून जोमाने तयारी करू पाहणारे भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांची मनधरणी करण्यात शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांना यश आले आहे. गायकवाड हे निवडणुकीचा अर्ज दाखल करणार असल्याचे समजताच भाजप पदाधिकाऱ्यांना सोबत घेत खैरे यांनी गायकवाड यांची भेट घेत समाधानकारक चर्चा घडवून आणली. एक वादळ शांत झाल्याचे स्पष्ट होताच खासदार खैरे यांचा चेहऱ्यावर हास्य उमटले.

लोकसभा निवडणुकीसाठी दीड वर्षापासून भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड हे तयारी करत होते. त्यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज आणला. त्यामुळे शिवसेना भाजप युतीमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. त्यावर मार्ग काढण्यासाठी 'काका, मला वाचवा' नाट्य शुक्रवारी दुपारी गायकवाड यांच्या निवासस्थानी घडले. युतीचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजप प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांना सोबत घेत गायकवाड यांची भेट घेतली. महापौर नंदकुमार घोडले, सुहास दाशरथे, जया गुदगे यावेळी उपस्थित होते. सुमारे एक तास चर्चेनंतर तोडगा निघाला. गायकवाड यांनीही भाजपचा सच्चा कार्यकर्ता असल्याचे सांगत युतीचा प्रचार जोमाने करणार असल्याची ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसची एक्सपायरी झाली!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

'भाजपने सर्वसामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून पाच वर्षांत विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. ५० वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने समस्याच निर्माण केल्या. आता काँग्रेसची एक्सपायरी झाली आहे. ना ती जनतेच्या हिताची, ना देशाच्या हिताची राहिली आहे,' अशी टीका राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नरसी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मंत्री बबनराव लोणीकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, आमदार सुभाष साबणे, आमदार तुषार राठोड, माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर, गंगाधर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुनगंटीवार म्हणाले, 'नांदेडला तीन वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले. शिवाय अनेक वेळा महत्वाची खाती मिळाली. परंतु, विकासाच्या बाबतीत कोणत्याही ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. उद्योगमंत्री पद सांभाळणाऱ्या अशोक चव्हाण यांनी नांदेडात एक साधा उद्योग आणला नाही. ज्याचे पक्षातच कोणी ऐकत नाही, त्यांचे मतदार काय ऐकणार. जिल्ह्यातल्या या आधीच्या सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा उपभोग घेतांना सर्वसामान्यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले. जिल्ह्यात एक किलोमीटरचा रस्ता केला नाही. मात्र, गेल्या साडेचार वर्षांत ११ हजार कोटी रुपये खर्च करून रस्त्याची कामे मार्गी लावण्यात आली. युतीच्या विजयानंतर मी व मुख्यमंत्री स्वतः जातीने विकासाचे प्रश्‍न मार्गी लावू,' असे आश्वासन दिले. यावेळी आमदार चिखलीकर यांच्यासह अन्य उपस्थितांची भाषणे झाली.

शिवराज होटाळकर भाजपमध्ये
अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक व जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवराज पाटील-होटाळकर यांनी समर्थकांसह या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला. होटाळकर बंधूचे नायगाव, नरसी परिसरात मोठे संघटन आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देणे हे आपले ध्येय असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदींची सहा एप्रिलला सभा
नरसीच्या सभेपूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी नांदेड शहरात व्यापाऱ्यांची बैठक घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. 'व्यापाऱ्यांनी कोणाच्याही दहशतीला न जुमानता युतीच्या मागे पाठबळ उभे करावे,' असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहा एप्रिल रोजी नांदेडात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या यशस्वीतेसाठी भाजपचे पदाधिकारी आतापासूनच कामाला लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने प्राणघातक शस्त्रे बाळगणाऱ्यावर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध जोरदार कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. चिकलठाणा पोलिसांनी शुक्रवारी रात्री नाकाबंदीमध्ये एक गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले. जिल्ह्यात आतापर्यंत १४३१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून ६७ पसार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी या संदर्भात एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चिकलठाणा पोलिसांनी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनच्या दरम्यान पळशी येथे कारवाई करीत हरीषचंद्र सोळुंके (वय ३६ रा. पिशोर) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून एक पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. तसेच कन्नड, अजिंठा येथे देखील कारवाई करीत प्राणघातक शस्त्र जप्त करण्यात आली. यामध्य पाच तलवारी, एक गुप्ती, दोन चाकू, एक कोयता आदी घातक शस्त्रांचा समावेश असून सहा आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती अधिक्षक पाटील यांनी दिली. आचारसंहितेच्या काळात आतापर्यंत तीन वेळा कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले आहे. यामध्ये साडेतीन हजार वाहने तपासण्यात आली असून १४२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये ७० अजामीनपात्र आरोपींना वॉरंट बजावण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच पाहिजे (वॉन्टेड) असलेल्या ६७ आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे. वेगवेगळ्या कलमानुसार १४३२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई जिल्ह्यात करण्यात आली असल्याची माहिती अधिक्षक पाटील यांनी दिली. २० गुंडाविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच दारुबंदीच्या १३१ केसेस करण्यात आल्या असून यामध्ये पाच लाख ९३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार खेळणाऱ्या आरोपींविरुद्ध २१ केसेस करण्यात आल्या असून यामध्ये दोन लाख ९२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला अप्पर अधिक्षक गणेश गावडे यांची उपस्थिती होती.

२९ लाख रुपये जप्त

जिल्ह्यांमध्ये एकूण नऊ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. यामध्ये वैजापूर येथे भरारी पथकाने एक लाख रुपये पकडले असून सिल्लोड येथे भरारी पथकाने २८ लाख ७८ हजार रुपये पकडले असून त्याची सबंधित विभागाकडून चौकशी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसी भागविणार तहान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उन्हाची तीव्रता आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे शहरात टंचाईसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करून शहरवासीयांची तहाण भागवण्यासाठी 'एमआयडीसी'च्या पाण्याची मदत घेण्याचे महापालिकेने ठरविले आहे. 'एमआयडीसी'च्या पाण्यावर २५ टँकरद्वारे रोज १०० फेऱ्या केल्या जाणार आहेत.

पाण्याच्या वाढत्या मागणीच्या तुलनेत पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे शहरात टंचाईसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयावर रोज मोर्चे आणले जात आहेत, निदर्शने केली जात आहेत. यातून मार्ग काढून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी काही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. अधिकाऱ्यांना विविध कामांच्या जबाबदाऱ्या देखील देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी स्थायी समितीचे सभापती रेणुकादास वैद्य, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, विशेष कार्यअधिकारी करण चव्हाण, उपअभियंता के. एम. फालक आदी उपस्थित होते.

बैठकीबद्दल महापौरांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'शहरात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाल्यामुळे किमान पाच"एमएलडी' पाणी देण्याची विनंती 'एमआयडीसी'ला करण्यात आली होती. 'एमआयडीसी'ने त्याला मान्यता दिली आहे. वाळूज आणि सिडको येथे 'एमआयडीसी'चे टँकर फिलिंग पॉइंट आहेत. तेथे टँकर भरण्याची परवानगी त्यांनी दिली आहे. दोन्ही ठिकाणाहून २५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाईल. २५ टँकरच्या रोज १०० फेऱ्या करतील. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल. एका टँकरची क्षमता १२ हजार लिटरची असणार आहे.

महापालिकेसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे 'एमआयडीसी'ने मान्य केले असले तरी, पालिका प्रशासनातर्फे अद्याप अधिकृत पत्र 'एमआयडीसी'ला देण्यात आले नाही. प्रशासनाने तात्काळ पत्र द्यावे, अशी सूचना महापौरांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिपब्लिकन सेना वंचित बहुजन आघाडीसोबत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांना रिपब्लिकन सेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. जिल्ह्यात जलील यांचा प्रचार करून 'वोट भी देंगे और नोट भी देंगे' अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीबाबत इतर आंबेडकरी पक्षांची बैठक सहा एप्रिल रोजी होणार आहे.

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद मतदारसंघात 'एमआयएम'चे आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रिपब्लिकन सेनेने जलील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख व माजी नगरसेवक के. व्ही. मोरे आणि इम्तियाज जलील यांनी पदाधिकाऱ्यांसह बैठक घेतली. जलील यांना मताधिक्याने विजयी करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात 'वोट भी देंगे और नोट भी देंगे' अभियान राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व आंबेडकरी अनुयायी जलील यांचा प्रचार करणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. या बैठकीला राज्य प्रवक्ते प्रा. विजयकुमार घोरपडे, अॅड. प्रशांत म्हस्के, काकासाहेब गायकवाड, प्रा. सिद्धोधन मोरे, सुरेश सोनटक्के, मिलिंद बनसोडे, लक्ष्मीकांत पाटील, अशोक कानडे, पी. के. दाभाडे, सुधाकर साबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

\Bसहा एप्रिलला बैठक

\Bलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी विचारांच्या पक्ष-संघटनांची बुधवारी बैठक झाली. यावेळी रिपब्लिकन डेमॉक्रॅटीकचे रमेश गायकवाड, मनोज संसारे, प्रकाश कांबळे, अॅड. रमेशभाई खंडागळे, दिनकर ओंकार उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत योग्य भूमिका घेण्यावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. आता सहा एप्रिल रोजी औरंगाबादेत राज्यव्यापी बैठक घेऊन राजकीय भूमिका जाहीर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळू पाटोळेंना दिलासा; स्थानबद्ध करण्याचा आदेश रद्द

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी येथील बाळू वामन पाटोळे (३५) याला एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा औरंगाबाद पोलिस आयुक्तांचा आदेश आणि सल्लागार मंडळाच्या अहवालाआधारे हा आदेश कायम करणारा राज्य शासनाच्या गृह विभागाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. मंगेश एस. पाटील यांनी रद्द केला, याचिकाकर्ता बाळू पाटोळे याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

बाळू पाटोळे याला पोलिस आयुक्तांनी विविध कायद्यांतर्गतच्या विविध कलमांखाली गुन्ह्यांमध्ये सहभागी दाखवून १५ ऑक्टोबर २०१८ रोजी एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले होते. या आदेशाला त्याने आव्हान दिले होते. सदर व्यक्तीला १ ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबई येथील सल्लागार मंडळापुढे (अ‍ॅडव्हायजरी बोर्ड) हजर करून सुनावणी झाली असता सल्लागार मंडळाने सदर व्यक्ती ही धोकादायक असून पोलिस आयुक्तांनी केलेली कार्यवाही योग्य आहे. सदर व्यक्ती एक वर्षासाठी स्थानबद्धतेस योग्य असल्याचा अहवाल राज्य शासनाला २ नोव्हेंबर २०१८ रोजी दिला होता. गृह विभागाने सल्लागार मंडळाचा अहवाल गृहित धरून बाळूच्या स्थानबद्धतेचा आदेश कायम केला. बाळूने या आदेशास खंडपीठात आव्हान दिले होते.

भारतीय राज्यघटना आणि एम.पी.डी.ए. कायद्यातील विविध कलमांमध्ये 'धोकादायक व्यक्ती कोण आणि शिक्षा काय असावी' याबाबत याचिकाकर्त्याचे वकील राजेंद्र सानप यांनी सविस्तर युक्तिवाद करून याचिकाकर्त्याची बाजू मांडली. एम.पी.डी.ए. कायद्यात झोपडपट्टी दादा, अमली पदार्थांची तस्करी करणारे, हातभट्टीवाले, वाळू माफिया, जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणारे आणि व्हिडिओ, सी.डी.ची कॉपी करून विकणारे अशा व्यक्तींचा धोकादायक व्यक्तींमध्ये समावेश होतो. ज्यांच्यामुळे सामाजिक कायदा आणि जनजीवन विस्कळीत होऊ शकते, अशा व्यक्ती धोकादायक असतात. सानप यांनी राज्यघटना, एम.पी.डी.ए. कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांचा आधार घेत याचिकाकर्ता कसा निर्दोष आहे. त्याच्या स्थानबद्धतेचा आदेश कसा चुकीचा आहे, हे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. सुनावणीअंती खंडपीठाने राज्यघटनेचे कलम २१ आणि २२ तसेच एम.पी.डी.ए. कायद्यातील कलम व सर्वोच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिवाड्याआधारे ५८ पानांचा न्यायनिर्णय पारित करून आदेश दिला. सानप यांना अभयसिंह भोसले यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक सत्ता परिवर्तन घडवेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'सद्यस्थितीत आंबेडकरी चळवळीला गती द्यायची असल्यास राजकीय सत्तेसोबत आर्थिक सत्तेचाही विचार करावा लागेल. आर्थिक सक्षमता वाढल्यास परिवर्तन घडवणे शक्य होईल', असे प्रतिपादन डॉ. अनिल बनकर यांनी केले. ते नागसेन फेस्टिव्हलमध्ये बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागसेन फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. लुंबिनी उद्यानात शुक्रवारी महोत्सवाला सुरूवात झाली. 'यशदा'चे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंडे यांनी महोत्सवाचे उदघाटन केले. यावेळी डी. टी. डेंगळे, एस. आर, बोदडे, प्रा, राजेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. अनिल बनकर यांनी 'जागतिक क्षितिजावरील आंबेडकरी चळवळीचा वेध' या विषयावर व्याख्यान दिले. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आर्थिक संघर्ष लक्षात घेण्याची गरज आहे. आंबेडकरी चळवळीने आर्थिक सत्तेचाही विचार करुन नोकऱ्या निर्माण कराव्या. आर्थिकदृष्ट्या सक्षमता आल्यास परिवर्तन घडवणे शक्य होईल', असे बनकर म्हणाले. या महोत्सवात शनिवारी आंबेडकरी रॅम्पला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 'एल्गार समतेचा' हे राज्यस्तरीय कविसंमेलन रंगले. देवानंद पवार, राकेश शिर्के, कुणाल गायकवाड, सुदाम राठोड, उर्मिला खोब्रागडे, विकास जाधव, पंजाबराव मोरे, ध. सु. जाधव, रमेश डोंगरे, भीमानंद तायडे यांनी कविता सादर केल्या. या महोत्सवात सामाजिक कार्यकर्ते शिवराम जाधव, बाबूअण्णा गारोल, सूरज बनकर, भिकन गवळी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या महोत्सवासाठी सचिन निकम, अविनाश कांबळे, सिद्धार्थ मोकळे, मेघानंद जाधव, प्रा. किशोर वाघ, अॅड. धनंजय बोर्डे आदी परिश्रम घेत आहेत. महोत्सवाला रसिकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.

समारोप आज

नागसेन महोत्सवात रविवारी 'भारतीय संविधानापुढील आव्हाने आणि आंबेडकरी चळवळीची भूमिका' या विषयावर प्रा. रतन लाल यांचे सायंकाळी सात वाजता विशेष व्याख्यान होणार आहे. तसेच माजी कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे यांचा 'नागसेन गौरव' पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. मेघानंद जाधव यांचा भीमगीताच्या कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप वॉर्डाध्यक्षाची आत्महत्या, साळवे याला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजप वॉर्ड अध्यक्ष सुनील प्रल्हाद आहिरे यांना आत्महत्येस प्रवृत करणारा आरोपी मोहनलाल उर्फ नाना साळवे याला अटक करुन कोर्टात हजर केले असता, त्याला रविवारपर्यंत (३१ मार्च) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. राठोड यांनी दिली.

या प्रकरणी भाजप वॉर्ड अध्यक्ष सुनिल प्रल्हाद आहिरे (मृत) यांच्या पत्नीने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, सुनील आहिरे यांनी दोन महिला आरोपींसह आरोपी मोहनलाल उर्फ नाना साळवे याच्या त्रासाला कंटाळून १० मार्च रोजी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार फिर्यादीने केली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आरोपी मोहनलाल उर्फ नाना साळवे हा गुरुवारी स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याला कोर्टात हजर केले असता, कोर्टाने साळवे यास रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टार्गेटेड थेरपीने रक्ताच्या कॅन्सरवर प्रभावी उपचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुरुष व महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगात रक्ताचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमाकांवर आहे. टार्गेटेड थेरपीद्वारे केवळ खराब पेशी नष्ट केल्या जातात. त्यामु‌ळे रक्ताचा कर्करोग झालेले रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत आहेत, असा सूर रक्ताविकारांवरील वैद्यकीय परिषदेतून व्यक्त झाला.

कमलनयन बजाज रुग्णालयाच्या वतीने तसेच फिजिशियन्स असोसिएशन ऑफ औरंगाबाद व 'फोग्सी' या स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संघटनेच्या सहकार्याने रक्तविकारांवरील दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेला शनिवारी (३० मार्च) प्रारंभ झाला. रुग्णालयाचे विश्वस्त सी. पी. त्रिपाठी, लंडन येथील डॉ. आशुतोष वेचलेकर, डॉ. रोषण कोलाह, डॉ. सुमित गुजराल यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन झाले. रक्तविकाराच्या आजारांचे प्रमाण वाढत असून तंत्रज्ञानामुळे आजारांचे नेमके व अचूक निदान होत आहे. त्यामुळे अलीकडे अधिक प्रमाणात रुग्णांचे निदान होत आहे, असा सूर परिषदेतून उमटला. कर्करोगात रक्ताचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमाकांवर असून, टार्गेटेड थेरपीद्वारे केवळ खराब पेशी नष्ट केल्या जातात. लहान मुले असो की मोठी व्यक्ती, रक्ताचा कर्करोग झालेले रुग्ण अधिक संख्येने बरे होत आहेत, असे परिषदेच्या संयोजन समितीचे सचिव डॉ. व्यंकेटेश एकबोटे यांनी सांगितले. डॉ. समीर मेलेनकरी, डॉ. अभिजित गणपुळे यांनी रक्ताच्या कर्करोगाच्या उपचाराविषयी, डॉ. वेचलेकर यांनी विविध रक्तविकारांवर, डॉ. कोलाह यांनी थॅलेसेमियासारखे आजार कशाप्रकारे टाळता येतील यासंदर्भात मार्गदर्शन केले. परिषदेस डॉ. आलोक श्रीवास्तव, डॉ. व्यंकटेश एकबोटे, डॉ. अलका एकबोटे, डॉ. प्रांजळ कुलकर्णी, डॉ. गजानन पदमवार, डॉ. संजय पाटणे, सचिव डॉ. अनंत कुलकर्णी, डॉ. वर्षा देशमुख, डॉ. मनिषा काकडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंठा एक्स्प्रेस मुंबईपर्यंत नेण्याचा घाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नांदेड येथून औरंगाबादमध्ये मुंबईकरिता नवीन रेल्वे सोडण्याची मागणी मराठवाड्यातून केली जात आहे. पण, नवीन रेल्वे सुरू करण्याऐवजी अजिंठा एक्स्प्रेसचा (मनमाड-सिकंदराबाद) मुंबईपर्यंत विस्तार करण्याचा घाट दक्षिण मध्य रेल्वेकडून घातला जात आहे.

नांदेड येथून मुंबईला जाण्यासाठी औरंगाबादमार्गे देवगिरी व नंदीग्राम या दोनच रेल्वेगाड्या आहेत. त्यामुळे तिसरी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. या मागणीची पूर्तता न करता दक्षिण मध्य रेल्वेकडून अजिंठा एक्स्प्रेसचा विस्तार करण्याचा विचार केला जात आहे. सध्या अजिंठा एक्स्प्रेस सिकंदराबाद येथून सायंकाळी सहा वाजून १० मिनिटाला निघून औरंगाबाद येथे पहाटे साडे पाच, तर मनमाडला येथे सकाळी पावणे सात वाजता पोचते. त्यानंतर ती रात्री आठ वाजून ५० मिनिटांनी मनमाडहून परतीच्या प्रवासाला निघते. या रेल्वेत प्रामुख्याने शिर्डी येथे साईबाबा यांच्या दर्शनासाठी दक्षिणेतून येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. तरीही नांदेड ते मनमाड दरम्यानच्या प्रवाशांना काही प्रमाणात जागा मिळते.

या रेल्वेचा मुंबईपर्यंत विस्तार करण्याचा प्रयत्न तत्कालीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक ए. के. सिन्हा यांच्या काळात करण्यात आला. पण, मध्य रेल्वेने ही रेल्वे 'सीएसटीएम'पर्यंत नेण्यास नकार दिला. आता पुन्हा नवे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांच्यासमोर हा विषय ठेवण्यात आला आहे. त्यासाठी ही रेल्वे मनमाड येथे १४ तास उभी राहते, असे कारण दिले जात आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने यापूर्वी देवगिरी एक्स्प्रेसचा विस्तार करत ती सिकंदराबादला नेली. त्यानंतर नंदीग्राम एक्स्प्रेस आधी नांदेडपर्यंत होती, ती आता नागपूरपर्यंत वाढवली आहे. यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना जागा मिळत नाही. आता अजिंठा एक्स्प्रेस सुद्धा मुंबईपर्यंत नेण्याचा घाट घातला जात आहे.

\Bविस्तार निरुपयोगी \B

मुंबईकरिता नवी रेल्वे सुरू करण्याऐवजी अजिंठा एक्स्प्रेसचे विस्तार करून मराठवाड्यातील प्रवाशांच्या मागणीला खो दिला जात आहे. या रेल्वेचा विस्तार केला तर त्याचा लाभ मराठवाड्यातील प्रवाशांना होण्याची शक्यता कमीच आहे, असे मत मराठवाडा रेल्वे समितीचे अरुण मेघराज यांनी व्यक्त केले.

……

\B'राज्यराणी'चे काय झाले ? \B

'सीएसटीएम' ते मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसला सहा डबे जोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. नांदेड ते मनमाड या मार्गावर ही सहा डब्याची रेल्वे चालवण्याचा प्रस्ताव आहे. पण, या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला जात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियात प्रचाराची रणधुमाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीत मतदारांना आकृष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांनी सोशल मीडियावर प्रचाराची राळ उडवली आहे. राज्याच्या प्रश्नांना हात घालत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे. तर राज्यातील कामगिरीचे भाजपने जोरदार मार्केटिंग सुरू केले आहे. या प्रचारासाठी फेसबूक पेजची संख्या भरमसाठ वाढली आहे. तुलनेने शिवसेना आणि काँग्रेस पक्ष सोशल मीडियावर कमी चर्चेत आहेत मात्र, प्रत्येक राजकीय पक्षाला सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा सामना करावा लागत आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सोशल मीडियावरील आक्रमक प्रचाराने गाजत आहे. सोशल मीडियावर प्रचार करण्याबाबत निवडणूक आयोगाने नियमावली निश्चित केली आहे मात्र, प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व चाहते वैयक्तिक पातळीवर प्रचार करीत आहेत. राजकीय पक्षांची स्वतंत्र शेकडो फेसबुक पेज आहेत. व्हॉटसअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम सांभाळणारी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार आणि पक्षांवर प्रखर टीका करणाऱ्या पोस्ट शेअर करण्यासाठी फेसबुक व व्हॉटसअॅप उपयोगी ठरले आहेत. सद्यस्थितीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोशल मीडियात आघाडी घेतली आहे. 'एनसीपी', 'राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र' या नावाचे पेजेस कार्यरत आहेत. सध्या 'साद राष्ट्रवादीची, साथ महाराष्ट्राची' या जाहिरातीने धूम उडवली आहे. जीएसटी, नोटबंदी, शेतीचे प्रश्न, बेरोजगारी या मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात भर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक प्रचाराला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सर्वाधिक फेसबुक पेज आणि व्हॉटसअॅप ग्रुप असलेल्या भाजपची प्रचारात आघाडी आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती देण्याचा पक्षाने धडाका लावला आहे. 'मै भी चौकीदार' कॅम्पेन सगळीकडे पोहचवण्यात यंत्रणा यशस्वी ठरत आहे. शिवसेना आणि काँग्रेसने सोशल मीडियात स्वतंत्र यंत्रणा राबविली तरी त्यांचा पुरेसा बोलबाला नाही. दोन्ही पक्षांची ध्येयधोरणे मतदारांपर्यंत पोहचत नसल्याचे निरीक्षण आहे. पुढील काळात सोशल मीडियातील प्रचार अधिक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. काही कार्यकर्ते विखारी प्रचार करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वसामान्य मतदारांनी संबंधित पक्षांवर परखड टीका केली. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम या पक्षांनीही सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.

\Bग्रामीण भागातही जोर

\Bपक्षाच्या नियमित सभा, आरोप-प्रत्यारोपांची सविस्तर माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर सुरू आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठीही ही यंत्रणा उपयोगी ठरत असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गावोगावच्या जाहीर सभेचे फेसबूक लाइव्ह करणे सहजसोपे झाल्यामुळे सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करणारी निवडणूक ठरली आहे. मतदान खेचण्यासाठी वेगवेगळी युक्ती वापरली जात आहे.

\Bजिल्हा समन्वयक महत्त्वाचे

\Bप्रत्येक पक्षाने सोशल मीडिया सेलसाठी जिल्हा समन्वयक नेमले आहेत. पक्षाचे मुख्य काम मुंबईच्या कार्यालयातून सुरू आहे. मात्र, औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूर अशी विभागीय कार्यालयेसुद्धा कार्यरत आहेत. जिल्हानिहाय समन्वयक नेमले असून प्रमुख नेत्यांशी दररोज संवाद असतो, असे एका समन्वयकाने सांगितले. कमी खर्चात सोशल मीडियातून प्रचार करणे पक्षांसाठी सोयीचे ठरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सिमी' सदस्यांना नोटीस बजावण्याचे आदेश

$
0
0

औरंगाबाद : सिमी संघटनेस अवैध संघटना घोषित करण्याबाबत कार्यवाहीची सुनावणी न्यायाधिकरणासमोर चालू असल्याने या संघटनेच्या सर्व सदस्यांना सदर संघटनेस अवैध (बेकायदा) का घोषित करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा या प्रकरणातील पुढील तारीख १५ एप्रिल २०१९ पूर्वी सादर करण्याबाबत नोटीस तामील करण्याबाबत निर्देशित केले आहे.

सिमी संघटनेच्या कारणे दाखवा नोटीस संघटनेच्या सदस्यांना व्यक्तीश:, रजिस्टर पोस्ट व स्पीड पोस्टद्वारे बजावण्यात यावी. नोटीसची प्रत सिमी संघटनेच्या औरंगाबाद स्थित कार्यालयात डकवण्यात येऊन त्याबाबतचे फोटोग्राफर व पंचनामा तात्काळ तीन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. कार्यवाहीचा पोलिस अहवाल न्यायाधिकरणाकडे सादर करायचा असल्याने कार्यालयामार्फत सर्व संबंधित सदस्यांना कारणे दाखवा नोटीसची बजावावी. संघटनेच्या कार्यालयात नोटीस बजावून त्याबाबतची तामील प्रत, पंचनामा, छायाचित्रे जिल्हाधिकारी कार्यालयात तीन दिवसांत सादर करावेत, असेही चौधरी यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images