Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘शेकाप’ची तलवार अखेर म्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सन्मानाने बोलावले तरच काँग्रेसचा प्रचार करू, वेळप्रसंगी उमेदवार उभा करू असा इशारा देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाने अवघ्या एक दिवसात तलवार म्यान करत काँग्रेससोबत असल्याचे जाहीर केले.

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर पक्ष, संघटनांनी एकत्र येत संयुक्त पुरोगामी आघाडी जाहीर केली आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी कॉँग्रेसने आमदार सुभाष झांबड यांनी मैदानात उतरवले असून, त्यांनी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले होते. शेकाप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कोणताही निरोप नाही. आघाडीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांचे फोटो बॅनरवर नाहीत. याप्रकारवर 'शेकाप' प्रवक्ते महेश गुजर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत स्वतंत्र उमेदवार देण्याचा इशारा दिला होता. मात्र, पँथर्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या निवासस्थानी शेकाप कार्यकर्त्यांची शुक्रवारी बैठक झाली. त्यात शेकाप मराठवाडा चिटणीस विकास शिंदे यांनी कार्यकर्त्यांनी सर्व ताकदीनिशी महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे शेकापने माघार घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी आणण्यासाठी जाणारा मुलगा चिरडून ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव

पाणी आणण्यासाठी मोपेडवरून जात असताना मालट्रकने चिरडल्याने एक १६ वर्षांचा मुलगा जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास छावणी भरती कार्यालयासमोर झाला.अभय महेंद्र शेट्टी (रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव), असे त्याचे नाव आहे. तो दहावीचा विद्यार्थी होता.

अभय शेट्टी हा मोपेडवरून (एम एच २० ई टी ०१२१) पाणी आणण्यासाठी जात होता, त्यावेळी छावणी भरती कार्यालयासमोर त्याला बीड बायपासकडे जाणाऱ्या मालट्रकने (के ए ५६, २१०४) त्याला चिरडले. यात तो जागीच गतप्राण झाला. मृत अभय याला माहिती कळताच स्थानिक नगरसेवक सुभाष शेजवळ यांच्यासह इतरांनी घटनास्थळी धाव घेतली व त्याला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्याता तपासून मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मृत अभयचे आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्याला दोन बहिणी व एक भाऊ असून तो सर्वात लहान होता. दरम्यान, हा रस्ता दुपदरी करावा किंवा रस्त्याला सर्व्हिस रोड तरी करावा, या प्रलंबित मागणीचा पुनरुच्चार नागरिकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभय शेट्टी फोटो अपघात पान १

खैरे फक्त आठ कोटींचे धनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादचे खासदार व महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याकडे फक्त आठ कोटी ९८ लाखांची मालमत्ता आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलने खैरे कुटुंबियांच्या संपत्तीमध्ये फारसा बदल झाला नाही.

खैरे यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातानुसार त्यांच्या पत्नीच्या नावावर बिडकीन येथे १५ एकर जमीन असून, कुटुंबाकडे तब्बल ४३ तोळे सोने तर, एक किलो चांदी आहे. खैरे कुटुंबियांकडे एकूण स्थुल मालमत्ता एक कोटी ४९ लाख रुपये तर सात कोटी ४९ लाख १० हजार ही स्थावर मालमत्ता दर्शवली आहे. खैरे यांच्या पत्नी वैजयंती यांच्या नावावर बिडकीन येथे गट क्रमांक ८३९मध्ये १५ एकर जमीन आहे. त्यांनी ही जमीन २००७मध्ये १३ लाख ५० हजार रुपयांत खरेदी केली होती. सध्या या जमिनीची किंमत सुमारे पावणेचार कोटी रुपये आहे. खैरे कुटुंबियांकडे एकूण ४३ तोळे सोन्याचे दागिणे असून, याची किंमत ११ लाख ८५ हजार तर, ५० हजार रुपयांचे एक किलो ६०० ग्राम वजनाचे चांदीचे दागिने आहेत. खैरे कुटुंबियांकडे चार वाहने असून त्यात एक फियाट कार तर एक टाटा सफारी आणि दोन दुचाक्यांचा समावेश आहे.

\Bम्हणे, उत्पन्न घसरले

\Bशपथपत्रामध्ये खैरे यांनी ३१ मार्चला आयकर विवरण पत्रात दर्शवण्यात आलेल्या उत्पन्न पाहता हे उत्पन्न घसरले असल्याचे स्पष्ट होते. यामध्ये २०१३-१४ मध्ये १४ लाख ७८ लाख ६६० रुपये उत्पन्न दर्शवलेले उत्पन्न २०१७-१८ मध्ये घसरून सात लाख २६ हजार ९४० रुपये झाले असल्याचे नमूद केले आहे. २०१३-१४ मध्ये सहा लाख ३ हजार ३४३, २०१५-१६मध्ये आठ लाख २९ हजार ४८७, २०१६-१७ मध्ये आठ लाख ८८ हजार ४२४ रुपये उत्पन्न दाखवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस फोडली, एक वर्षाची सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जालन्याहून औरंगाबादकडे येणाऱ्या एसटी बसला दगड मारुन काच फोडणारा सचिन विष्णू डवले याला एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार २०० रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी ठोठावली.

या प्रकरणी एसटी बसचे चालक नारायण विठ्ठल काकडे (५१, रा. जालना) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २ जून २०१४ रोजी फिर्यादी हा जालना आगारातून विनावाहक बस घेऊन औरंगाबादकडे येत होता. दुपारी सव्वादोनला बस चिकलठाणा येथे आली असता सचिन विष्णू डवले (२५, रा. हनुमान चौक, चिकलठाणा) हा बससमोर आला व त्याने हातातील दगडाने बसच्या समोरील काच फोडली. त्यावेळी हद्दीत गस्त घालणाऱ्या पोलिसांनी सचिन डवले याला ताब्यात घेत अटक केली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील सुनिल जोंधळे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी १९८४ कायद्याच्या ३ कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना कारावास, तर कलम ३३६ अन्वये दोन महिने सक्तमजुरी व २०० रुपये दंड व दंड न भरल्यास १० दिवस कारावासची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार मंजूर हुसेन यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दपार आरोपीसह बॅटरीचोर गुन्हे शाखेच्या जाळ्यात

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या गुंडासह बॅटरी चोरणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. बेगमपुरा आणि भडकलगेट येथे ही कारवाई करण्यात आली. या आरोपीकडून नऊ बॅटरी जप्त करण्यात आल्या आहेत.

गुन्हे शाखेचे पथक शनिवारी बेगमपुरा भागात गस्त घालीत होते. यावेळी त्यांना मकबऱ्याच्या पार्किंगजवळ शहरातून हद्दपार करण्यात आलेला गुन्हेगार मयुर भास्कर आडोळे (वय २०, रा. बेगमपुरा) हा उभा असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून आरोपी मयुरला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल देशमुख आणि पथकाने केली. तसेच गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने भडकलगेट येथे बॅटरी चोरांना अटक केली. यावेळी संशयित आरोपी शेख आरेफ शेख रफीक, अब्दुल रफीक अब्दुल शकूर, शेख इजाज शेख हिजब्रोद्दीन आणि शेख फहाद शेख समद यांना अटक करण्यात आली. या आरोपीच्या ताब्यातून नऊ बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई एपीआय अजबसिंग जारवाल, नंदकुमार भंडारे आणि पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कूल बसची धडक; दुचाकीस्वार ठार

$
0
0

वैजापूर: औरंगाबाद-मालेगाव रस्त्यावरील लोणी खुर्द गावाजवळ स्कूल बस (एम एच २० सी टी ७१८८) व दुचाकीच्या (एम एच २० एफ इ १३५९) धडकेत दुचाकीस्वार ठार व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास झाला. दीपक मन्साराम खैरनार (वय ५२, रा. वाळूज, औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे. शिऊर पोलिसांनी बसचालकास ताब्यात घेतले आहे. खैरनार हे पत्नीसोबत दुचाकीवरून मालेगाव येथे पाहुण्यांकडे जात होते. शिवगाव पाटी (ता. वैजापूर) येथील साई पब्लिक स्कूलची बस तलवाडाकडून लोणीच्या दिशेने विद्यार्थ्यांना घेऊन येत होती. बसच्या मागील बाजुस खैरनार यांची दुचाकी आदळली व त्यांचा पाय चाकात सापडून धडापासून वेगळा झाला. जखमी पती-पत्नीला उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पण, खैरनार यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर खैरे लोकसभेच्या रिंगणात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी भव्य मिरवणूक काढून युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

आदित्य ठाकरे यांचे सकाळी साडेअकराच्या सुमारास विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर स्वागत स्वीकारल्यावर पदाधिकाऱ्यांसह ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले. खैरे यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी ११ ते २ या वेळेतील मुहूर्त निवडला होता. बरोबर एक वाजून चार मिनिटांनी खैरे यांनी जिल्हाधिकारी कार्यायातील दालनामध्ये प्रवेश केला व तब्बल एक तासानंतर अर्ज भरून बाहेर आले. अर्ज भरण्यापूर्वी खुलताबाद येथील भद्रामारोती मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे त्यांनी सांगितले. अर्ज भरताना आदित्य यांच्यासह भाजप नेते हरिभाऊ बागडे, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, महायुतीचे मराठवाडा विभागाचे समन्वयक राज्यमंत्री अर्जुन खोतकर, वैजयंती खैरे, संपर्कनेते विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांची उपस्थिती होती. खैरेंची नियोजित वेळेनुसार सकाळी अकरा वाजता निघणारी मिरवणूक दुपारी अडीचच्या सुमारास सुरू झाली. फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपमध्ये खैरे यांच्यासह आमदार अतुल सावे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात विराजमान झाले होते. दुसऱ्या जीपमध्ये महिला आघाडीच्या पदाधिकारी होत्या. क्रांतीचौकातून निघालेली मिरवणूक संस्थान गणपती मंदिराजवळ संपली. या ठिकाणी खैरे यांनी मिरवणूकीत सहभागी झालेले पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे आभार मानले.

\Bनगरसेविकांनी उचलल्या बाटल्या\B

महायुतीच्या मिरवणुकीला निर्धारित वेळेपेक्षा खूप उशीर झाला. उन्हाची तीव्रता खूप होती. त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी रिक्षातून पाण्याच्या बाटल्या आणण्यात आल्या. पाणी पिल्यावर कार्यकर्त्यांनी रिकाम्या बाटल्या रस्त्यावर फेकल्या. मिरवणूक क्रांतीचौकातून पुढे निघून गेल्यावर शिवसेना नगरसेविकांनी या रिकाम्या बाटल्या पोत्यात जमा करून रस्ता स्वच्छ केला.

\Bजाधवांच्या मिरवणुकीला वाट दिली

\Bआमदार हर्षवर्धन जाधव यांनीही शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली. त्यापूर्वी जाधवांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पोलिसांच्या परवानगीनुसार दुपारी दोनला मिरवणूक सुरू केली. नेमकी त्याचवेळी शिवसेनेची मिरवणूक सुरू होती. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते आणि जाधव समर्थक यांच्यात घोषणायुद्ध सुरू झाले. मिरवणुकीतील दोन्हीकडचे कार्यकर्ते एकमेकांना भिडणार असे वाटल्याने पोलिस दक्ष झाले. त्यांनी शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांना विनंती केली. त्यानंतर जैस्वाल आणि अंबादास दानवे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आवरत जाधवांच्या मिरवणुकीला वाट करून दिली. जाधव यांची गुलमंडीवर सभा सुरू होती. त्यावेळी महायुतीची मिरवणूक देखील तेथे आली. सभा सुरू असल्याचे लक्षात आल्यावर सुमारे अर्धातास टिळकपथावर मिरवणूक थांबवण्यात आली. सभा झाल्यावर मिरवणूक मार्ग मोकळा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासदार दानवेंचा मंगळवारी अर्ज

$
0
0

जालना: भाजपचे उमेदवार खासदार रावसाहेब पाटील दानवे हे मंगळवारी (२ एप्रिल) सकाळी ११ वाजता मिरवणुकीद्वारे दाखल करणार आहेत. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. विजया रहाटकर, शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले यांच्यासह आमदार, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ही मिरवणूक मामा चौकातून सकाळी १० वाजता निघून सिंधी बाजार, फुलबाजार, सराफा रोड, कादराबाद पोलिस चौकी, मस्तगड, गांधीचमन, शनी मंदिर, अमृतेश्वर महादेव मंदिर मार्गे कल्याणराव घोगरे स्टेडियम, जुना जालना येथे पोहोचणार आहे. मिरवणुकीचा समारोप जाहीर सभेत होणार असल्याची माहिती प्रचार समन्वयक देवीदास देशमुख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नागसेन फेस्टिव्हल’मध्ये शैक्षणिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांतर्फे 'नागसेन फेस्टिव्हल-२०१९'चे अयोजन करण्यात आले आहे. २९ ते ३१ मार्च दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवामध्ये सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

गेल्या तीन वर्षांपासून नागसेन फेस्टिव्हलच्या माध्यमातून नागसेनवनातील निगडीत आजी-माजी विद्यार्थी एकत्र येतात. यंदाचा महोत्सव सायंकाळी साडेपाच ते रात्री दहा या वेळेत नागसेनवनातील लुम्बिनी उद्यान येथे होणार आहे. २९ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता यशदाचे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंडे यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. यानंतर भीम गीतांवरील बासरीवंदन होणार आहे. 'जागतिक क्षितिजावरील आंबेडकरी चळवळीचा वेध' विषयावर डॉ. अनिल बनकर हे मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी डॉ. संजय पगारे असतील. बी. जी. रोकडे, माधवराव बोरडे, जनार्धन म्हस्के, विजयकुमार तायडे, पंढरीनाथ कांबळे, प्राचार्य डॉ. भास्कर साळवी, प्रा. राम गायकवाड, दौलतराव मोरे, केशवराव बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी डी. टी. डेंगळे, एस. आर. बोडदे, प्रा. राजेश भोसले पाटील, डॉ. अनिल पांडे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

३० मार्च रोजी आंबेडकरी रॅपचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शिवराम जाधव, बाबू गारोल, सूरज बनकर, भिक्कन गवळी यांचा गौरव करण्यात येणार आहे. 'एल्गार समतेचा' हे राज्यस्तरीय अभिनव कवी संमेलन आठ वाजता सुरू होणार आहे. देवानंद पवार, राजेश शिर्के, कुणाल गायकवाड, सुदाम राठोड, उर्मिला खोब्रागडे, विकास जाधव, प्रा. पंजाबराव मोरे, ध. सु. जाधव, रमेश डोंगरे, भीमानंद तायडे हे कवी यात सहभागी होणार आहेत. ३१ मार्चला 'भारतीय संविधानापुढील आव्हाने आणि आंबेडकरी चळवळीची भूमिका' या विषयावर प्रो. रतन लाल यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. विजयकुमार गवई अध्यक्षस्थानी असणार आहेत. डॉ. एम. ए. वाहुळ, डॉ. क्षमा खोब्रागडे, डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य यू. एम. म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी डॉ. राहुल म्हस्के, मनोहर उबाळे, डॉ. सुरेश चौथाईवाले यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी माजी कुलगुरू डॉ. विठ्ठल घुगे यांना 'नागसेन गौरव पुरस्कार' याने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानंतर मेघानंद जाधव यांची भीमगीतांची क्रांतीकारी मैफल रंगणार आहे. महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सचिन निकम, अविनाश कांबळे, सिद्धार्थ मोकळे, मेघानंद जाधव, प्रा. किशोर वाघ, अॅड. धनंजय बोरडे, अरुण शिरसाठ, अतुल कांबळे, आनंद सूर्यवंशी, कुणाल भालेराव, चिरंजीव मनवर, विवेक सोनवणे, विशाल देहाडे, किरण शेजवळ, हेमंत मोरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेआठ लाख, बीडमध्ये ताब्यात

$
0
0

बीड: जिल्ह्यात आत्तापर्यंत तीन ठिकाणी तपासणीत खाजगी वाहनात मोठ्या रक्कम आढळल्या आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जात आहे. बीड शहरात नगररोडवर वाहन तपासणीवळी जी जे ०३ एफ डी ८८०७ या क्रमांकाच्या कारच्या डिक्कीत सुटकेसमध्ये साडे आठ लाख रुपये सापडले. ते कोषागार कार्यालयाकडे सुपूर्द केले जाणार आहेत, असे आचारसंहिता प्रमुख अमोल येडगे यांनी सांगितले. कारमधील भावेश मोहन रामोलिया (वय ३६) व हरेश वजू घाडिया (वय ३२, दोघेही रा. राजकोट, गुजरात) यांना घटनास्थळी ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर म्हणाले की, जिल्ह्यात दोन ठिकाणी देशी कट्टे ताब्यात घेतले आहेत. १३५० शस्त्र परवानाधारकांपैकी १२५५ शस्त्र जमा केली असून वेगवेगळ्या सात गुन्हेगारी टोळ्या तडीपार केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्भिड पत्रकारिता अंगिकारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनंतराव भालेराव यांच्या पठडीतील पत्रकार निर्भिड व स्पष्ट होते. अशीच निर्भिड पत्रकारिता या क्षेत्रातील तरुणांनी अंगीकारावी, असे प्रतिपादन पंडित नाथराव नेरळकर यांनी केले. अरविंद आत्माराम वैद्य स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. आजच्या पत्रकारांची धावपळ वाढली आहे. त्यांचा सोशिकपणा कमालीचा असतो, असेही ते म्हणाले.

आठव्या 'अरविंद आत्माराम वैद्य स्मृती पत्रकारिता पुरस्कारा'ने ज्येष्ठ पत्रकार अरविंद गंगाधरराव वैद्य यांना, तर युवा पत्रकारिता पुरस्काराने विद्या गावंडे यांना गौरविण्यात आले. जीवन विकास ग्रंथालयाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यासाठी व्यासपीठावर प्रसिद्ध साहित्यिक, राज्य साहित्य, संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा भांड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पंडित नेरळकर म्हणाले,'एक कलावंताकडून पत्रकाराचा सन्मान होणे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. काम करत असताना जगणे वेगळे आणि सेवानिवृत्तीनंतर खरा जगण्याचा आनंद सुरू होतो.'

बाबा भांड म्हणाले, 'लेखन, प्रकाशन आणि वृत्तपत्रे ही समाजातील जबाबदार माध्यमे आहेत. आजचे वातावरण कसे यावरच बोलले जाते मात्र, त्याला किती शरण जायचे, किती बिघडायचे हे प्रत्येकानेच ठरवायला हवे. आपले वागणे, कृती अन् लेखनाने आपल जीवन सुंदर होऊ शकते. स्वप्न पाहिले पाहिजे आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे.'

अरविंद गं. वैद्य म्हणाले, 'अरविंद आ. वैद्य यांच्याकडे असलेल्या व्यक्तशीरपणातून खूप काही शिकता आले. मागच्या पिढीच्या खांद्यावर पुढची पिढी उभी राहते. आम्ही जी पत्रकारिता पाहिली, शिकली आणि अनुभवली ती अतिशय प्रभावी अशी होती. आजची पत्रकारिता चकाककणारी आहे. हे स्वरूप किळसवाणे वाटते. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे गारूड आहे. आपापसातील संवाद कमी झाला आहे.'

पत्रिकारितेतील दिग्गज अनंतराव भालेराव, बाबा दळवी, दादासाहेब पोतनीस यांच्यासोबतच्या आठवणी ही त्यांनी मांडल्या. विद्या गावंडे म्हणाल्या, 'हा पुरस्कार माझ्यासाठी मनौधैर्य वाढविणारा आहे.' अरविंद आत्माराम वैद्य स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये आणि मानपत्र असे आहे. युवा पत्रकारिता पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये आणि मानपत्र असे आहे. अर्चना वैद्य यांनी मान्यवरांचे स्वागत केले. धनंजय लांबे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या पुरस्काराची भूमिका स्पष्ट करताना अरविंद आ. वैद्य यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा मागोवा घेतला. प्रमोद माने यांनी पुरस्कार विजेत्यांना परिचय करून दिला. प्रेषित रुद्रवार सूत्रसंचालन केले. संजय वरकड यांनी आभार मानले.

..

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच मराठा उमेदवारांना प्रवेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

पाच मराठा उमेदवारांना पदव्युत्तर दंतचिकित्सा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातून विशेष आर्थिक मागास प्रवर्गात अंतर्भाव करून प्रवेश देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराले व न्या. सुनील कोतवाल यांनी दिले. वैधता प्रमाणपत्राअभावी संबंधितांचा खुल्या प्रवर्गात समावेश करण्यात आला होता.

दंतचिकित्सा विभागात पदवी प्राप्त केल्यानंतर घेण्यात आलेल्या प्रवेशपूर्व परीक्षेत पाच मराठा उमेदवारांनी विशेष आर्थिक मागास प्रवर्गातून अर्ज सादर केले होते. यामध्ये डॉ. युगंधरा देसरकर, डॉ. नीलेश उबाळे, डॉ. माया शिंदे, डॉ. गणेश कलंदर व डॉ. रूपाली आदी पदव्युत्तर दंतचिकित्सा अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षेत पात्र ठरले होते. प्रवेश अर्जासोबत मराठा जातीचे प्रमाणपत्र दाखल केले होते, परंतु वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात आले नव्हते. वैधता प्रमाणपत्र नसल्याने त्यांना खुल्या प्रवर्गात गृहित धरण्यात आले होते. विशेष आर्थिक मागास प्रवर्गातून प्रवेश देण्यात यावा असी विनंती त्यांनी खंडपीठात डॉ. संतोष डांबे यांच्यावतीने दाखल केली होती. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ७ ते १२ मार्च दरम्यान कागदपत्रांची पडताळणी ठेवण्यात आली होती. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मराठा समाजासाठी विशेष आर्थिक मागास प्रवर्गाचे आरक्षण देण्यात आलेले आहे. संबंधित मराठा उमेदवारांनी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र काढले होते. प्रमाणपत्र वैधता समितीकडे पडताळणीसाठी प्रलंबित असल्याने सादर करता आले नाही, परंतु विहित मुदतीच्या नंतर वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून विशेष आर्थिक मागास प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली होती. खंडपीठाने यासंबंधी वरीलप्रमाणे आदेश दिले. राज्यशासन व प्रवेशपूर्व पात्रता परीक्षा विभागास नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहेब, पक्षाच्याच तिकीटावर लढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'साहेब, तुम्ही लोकसभेची निवडणूक पक्षाच्या तिकीटावरच लढा,' असा कौल काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी दिला. अपक्ष निवडणूक लढण्याबाबत सत्तार समर्थकांनी 'नाही' असे उत्तर दिले आहे. यामुळे निवडणुकीत पक्षाच्या तिकीटावर उभे राहायचे किंवा नाही, याचा निर्णय समर्थकांनी आमदार सत्तार यांच्यावर सोडला आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रसने आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस जिल्हाध्यक्ष, आमदार अब्दुल सत्तार यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला आहे. त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवारी (२९ मार्च) समर्थकांचा आमखास मैदानावर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षातील सत्तार यांचे समर्थक उपस्थितीत होते. यावेळी रामकृष्ण बाबा पाटील यांनी विविध समाजाचे मतदार सत्तार यांच्या पाठिशी असल्याने त्यांना मदत करण्याचे जाहीर केले. समर्थकांसमोर बोलताना आमदार सत्तार यांनी 'एमआयएम' आणि त्या पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांच्यावर टिकास्त्र सोडले. 'एमआयएम'ने आधी निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले, पण जिंकण्यासाठी नव्हे तर मला रोखण्यासाठी 'एमआयएम' निवडणूक लढत असल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेस उमेदवार माझ्यासाठी जागा सोडण्याचे सांगत आहेत, पण त्यांना पक्षाने उमेदवारी दिली असल्याने त्यांनी निवडणूक लढवावी असे आवाहन केले. 'गेल्या २५ वर्षांत खासदार चंद्रकांत खैरे यांना शहराचा पाणी, रस्त्याचे प्रश्न सोडवता आले नाहीत. खैरेंमुळे औरंगाबाद शहर ही कचऱ्याची राजधानी झाली. ते फक्त भावनिक मुद्यांवर निवडणूक लढवतात, त्यांनी पाच मोठी विकासकामे दाखवावीत,' अशी टीका खासदार खैरे यांच्यावर केली.

\Bसत्तारांचे प्रश्न, समर्थकांचे उत्तर \B

आमदार सत्तार: लोकसभा निवडणूक लढवावी का?

समर्थक: (हात उंचावून) हो

आमदार सत्तार: पक्षाच्या तिकीटावर लढवावी का?

समर्थक: (हात उंचावून) हो

आमदार सत्तार: अपक्ष लढवावी का?

समर्थक: नाही

त्यावर आमदार सत्तार यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

………

\Bआमदार जलील हे तर रणछोडदास \B

आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणातून 'एमआयएम' आणि आमदार इम्तियाज जलील यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी हैदराबाद येथील 'रिमोट'बाबत मत व्यक्त केले. आमदार जलील हे रणछोडदास आहेत. कटकट गेटचा चिल्लर रस्ता करून विकास केल्याचा आव आणत आहेत. आगामी औरंगाबाद मध्य विधानसभा क्षेत्रातून आमदार जलील यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना नगरसेवकाची दगडाने ठेचून हत्या

$
0
0

परभणी

परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरात किरकोळ कारणावरून शिवसेनेच्या नगरसेवकाची दगडाने ठेचून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरदीप रोडे असे या नगरसेवकाचे नाव आहे. या हत्येनंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

रवी गायकवाड आणि किरण ढाके अशी आरोपींची नावे असून हे दोघे रोडे यांचे सहकारी आहेत. किरकोळ वादातून त्यांनी नगरसेवकाची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रोडे, गायकवाड आणि ढाके यांच्यात पाण्यावरून वाद झाल्याचे सांगितले जात आहे. काही महिलांनी रोडे यांना पाण्याचा वाद सोडण्यासाठी फोन करून बोलावले. त्यावेळी रवी गायकवाड, किरण ढाके आणि नगरसेवक रोडे यांच्यात वाद निर्माण झाला. याचे पर्यवसन हाणामारीत झाले. भांडण विकोपाला गेल्यानंतर गायकवाड आणि ढाके यांनी दगडाने ठेचून नगरसेवक रोडे यांची हत्या केली.

या घटनेनंतर जायकवाडी परिसरात लोकांचा मोठा जमाव जमला आहे. शिवाय शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, नगरसेवक अमरदीप यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खैरेंनी २० वर्षांत किती रोजगार दिला?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'गेल्या २० वर्षांत खासदार म्हणून चंद्रकांत खैरे यांनी किती जणांना रोजगार उपलब्ध करून दिला?,' असा प्रश्न काँग्रेसचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुभाष झांबड यांनी विचारला आहे. 'पर्यटन राजधानी असूनही कुठलीच उपाययोजना नाही, उद्योगांची भरभराट झालेली नाही. केवळ धार्मिक तेढ निर्माण करून मते मागण्याचे काम त्यांनी केले आहे. जनता यावेळी त्यांना धडा शिकवेल,' असा दावा झांबड यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केला. झांबड काँग्रेसचे लोकसभा उमेदवार आहेत. ते सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर झांबड म्हणाले,'विद्यमान खासदारांनी २० वर्षे केवळ जातीपातीचे राजकारण केले. त्यांनी एखादा लोकोपयोगी प्रकल्प आणल्याचे दाखवून द्यावे. रोजगार निर्मिती, पर्यटनविकास, उद्योगवाढ कुठल्याच क्षेत्रांत काम केले नाही. औरंगाबादेत चार मोठे प्रकल्प

येणार होते, पण खासदारांच्या भूमिकेमुळे ते दुसरीकडे गेले. एकीकडे उद्योगांसाठी रेड कार्पेट टाकले जाते आणि आपल्याकडून उद्योग जातात हे दुर्दैव आहे. औरंगाबादची मार्केटिंग व्हावे, यासाठी त्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत.

सध्या दुष्काळ आहे. नागरिक त्रस्त आहेत, पण सत्ताधाऱ्यांना काहीच घेणे देणे नाही. हक्काच्या पाण्यासाठी खासदारांनी दिल्लीत कधी आवाज उठवला नाही.' जिल्ह्यात जातीयवाद, धार्मिक तेढ निर्माण करून राजकारण केल्याचा आरोप करत झांबड म्हणाले की, औरंगाबादेत झालेली दंगल 'एमआयएम'शी हातमिळवणी करून घडवून आणली गेली. 'एमआयएम' आणि शिवसेनेची 'सेटिंग' असल्याचे लोक बोलत आहेत. 'एमआयएम'चे वरिष्ठ नेते एकीकडे निवडणूक लढवणार नसल्याचे सांगतात आणि उमेदवार उभा करतात त्यामागे काय राजकारण आहे, हे आता मतदारांनाही लक्षात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तारांचा पत्ता जालन्यातून कट?

$
0
0

सुरेश कुलकर्णी, जालना

जालन्यातून आमदार अब्दुल सत्तार हे कोणत्याही क्षणी काँग्रेसची उमेदवारी मिळऊ शकतात. आपल्याला मिळालेली संधी नाहक घालवण्यापेक्षा झटकन, आहे त्या परिस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करून मोकळे व्हावे, या विचाराने काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांनी अतिशय गडबडीत, कोणतीही तयारी नसताना शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला, अशी चर्चा जालन्यात सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोडचे आमदार सत्तार यांनी केलेल्या बंडाचे सर्वाधिक नुकसान जालना आणि त्यानंतर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे, अशी चर्चा जालन्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जालना मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी नांदेड येथे बैठक बोलाविली होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी जालना मतदारसंघातून आमदार सत्तार यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह धरला होता.

'महाराष्ट्र टाइम्स'ने यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवरून ऐनवेळी घुमजाव केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि आमदार सत्तार यांचीच खूपच मोठी अडचण झाली होती. जालन्यातून खोतकर यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरण्याच्या चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेवर अखिल भारतीय काँग्रेस नेत्यांकडे आणि त्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे चव्हाण यांच्या विरोधात अनेकांनी तक्रारी केल्या. त्यात जालन्यातील काँग्रेसचे नेते डॉ. संजय लाखे पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. खोतकर यांचे नाव कांग्रेसच्या लोकसभा उमेदवारीसाठी निश्चित आहे, असे छातीठोकपणे चव्हाण सांगत होते. त्यामुळे दुसऱ्या नावाची चर्चा सुद्धा त्यांच्यासमोर झालेली त्यांना चालत नव्हते.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करायला एकही नेता धजावत नव्हता. विलास औताडे यांना असेच ऐनवेळेस उभे करण्यात आले आहे, ही वस्तुस्थिती आहे. खोतकरांनी काँग्रेसला चकवा दिला. त्यानंतर चव्हाण यांनी घाईघाईत जालना आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांतून काँग्रेसचा उमेदवार ठरवण्याची मुख्य जबाबदारी आमदार सत्तार आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना दिली होती. सत्तार यांना जालना अथवा औरंगाबाद यापैकी एका मतदारसंघातून लोकसभेवर पाठवण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठी एका पायावर तयार असल्याचे स्पष्ट दिसत होते. आमदार सत्तार हे खासदार चव्हाण यांच्या अतिशय जवळचे असल्याने क्षणार्धात निर्णय फिरवला जाऊ शकतो. चंद्रपूर मतदारसंघातून जाहीर झालेली काँग्रेसची उमेदवारी बदलल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जालन्यात देखील काहीही होऊ शकते. उगाच हाता तोंडाशी आलेला घास कशाला सोडायचा, अशी चर्चा शुक्रवारी दुपारी जालन्यातील काँग्रेसच्या एका जेष्ठ नेत्यांच्या घरी झालेल्या बैठकीत झाली. शिवाय समजा आमदार सत्तार यांना जालन्यातून लोकसभेची काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली तर, जालन्यातील काँग्रेसअंतर्गत नेत्वृत्वात कमालीचे बदल होतील.

इतके दिवस सांभाळून ठेवलेले सगळे संचित वाया जाईल, अशी भीती जालन्यातील काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांनी व्यक्त केली आणि त्यानंतर तातडीने उद्याच्या उद्या विलास औताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. महेश भवनमध्ये दुपारी झालेल्या कार्यक्रमात हा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी समजावून सांगितले. 'विलासबापू कोणत्याही गाड्या लावणार नाहीत. आता मोबाइल फोन, व्हॉट्स अॅपवरून निरोप देऊन जे येतील त्यांना बोलवावे,' असे ठरल्याची माहिती त्यांनी दिली. मिरवणूक काढण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. 'इतकी घाई कशासाठी,' या कार्यकर्त्यांच्या प्रश्नाला सोईस्कर बगल देऊन, 'चला कामाला लागा असेच सांगण्यात आले.' दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा आमदार सत्तार हे काय करणार याची त्यांच्या औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरणार होते. त्याचीही मोठी धास्ती जालन्यातील नेत्यांच्या बोलण्यात जाणवत होती.

यासगळ्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीतून विलास औताडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयारी केली आणि सकाळी ते जालन्यात दाखल झाले. आमदार राजेश टोपे यांना या सगळ्या निर्णयाची फार माहिती नव्हती. त्यामुळे ते त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त होते आणि उमेदवारी अर्ज भरताना टोपे यांनी उपस्थित असणे अत्यंत आवश्यक असल्याने त्यांच्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना शनिवारी सकाळी दोन तास ताटकळत उभे रहावे लागले. शिवाय आमदार टोपे हे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आले. उमेदवारी अर्ज दाखल करताना औताडे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कक्षात थांबले आणि त्यानंतर थेट निघून गेले. बाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींना ते बोलले नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर गायत्री लॉन्स येथे झालेल्या छोटेखानी मेळाव्यात टोपे आले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करोडीच्या ट्रॅकवर पाण्यासाठी टाहो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरटीओ कार्यालयाकडून करोडी येथे दररोज २०० ते ३०० वाहनांची फिटनेस तपासणी केली जात आहे. तपासणी होईपर्यंत वाहनधारकांना तेथेच थांबावे लागते. येथे आरटीओ अधिकाऱ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी, ग्राहकांना इतर सुविधा सोडाच, किमान पाणी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, शेंद्रा एमआयडीसी येथील वाहनांची फिटनेस तपासणी बंद करून करोडी येथे केली जात आहे. येथे दोन टेस्टिंग ट्रॅक तयार केले, तर सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून सरंक्षक भिंत बांधण्यात आली. येथे वाहन तपासणी केली जात असताना ग्राहकांना उन्हात उभे राहावे लागत होते, त्यामुळे सहा खोल्यांची इमारत बांधली आहे. या इमारतीमध्ये अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली. पण, वाहनधारकांना बसण्याचीही सुविधा नाही. वाहन तपासणीकरिता सकाळी नऊ वाजता आल्यानंतर दुपारी तीन ते चारपर्यंत येथेच थांबावे लागते. येथे कार्यालयातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. ज्यांना परवडते ते पाणी खरेदी करतात, पण अनक जण सोबत आणलेले पाणी पितात, ते संपल्यानंतर तसेच बसून राहतात.

\Bवॉटर कुलर बंद \B

आरटीओ कार्यालयात लावलेले वॉटर कुलर काही दिवसांपासून नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना पाणी खरेदी करावे लागते किंवा होटलात जाऊन तहान भागवावी लागते.

……

करोडी भागात पाण्याची बिकट समस्या आहे. पाणी मिळवण्यासाठी आम्ही ग्रामपंचायती सोबत चर्चा करत आहोत. त्यांच्या विहिरीतून पाणी घेण्याचा विचार आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आमचेही प्रयत्न सुरू आहेत.

-सतीश सदामते, आरटीओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन साइड लाइवर पहिली मालगाडी दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एफ. सी. आय.)मागणीनुसार दौलताबाद येथे तयार करण्यात आलेल्या रेल्वेच्या साइड लाइनचा वापर सुरू झाला आहे. येथे शनिवारी फरिदाबाद येथून ४२ बोगीची मालगाडी गहू घेऊन शनिवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास दाखल झाली. या रेल्वेतून २८०० टन गहू आला आहे.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर 'एफ. सी. आय.'चा गहू, तांदूळ येत आणण्या. येत होता. पण, स्टेशनवरून धान्य शहरात नेण्यासाठी येत असलेल्या अडचणी येत असल्याने 'एफ. सी. आय.'च्या कंत्राटदाराने दौलताबाद रेल्वे स्टेशनजवळ गोदाम बांधून साइड लाइनचा प्रस्ताव नांदेड रेल्वे विभागाला दिला होता. त्यानुसार, हे काम १५ दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आले. रेल्वे ट्रॅकसह सिग्नलचे काम पूर्ण झाल्यानंतर ट्रॅक वापरण्यास योग्य असल्याचे नांदेड विभागाकडून कळविले होते. त्यानुसार येथे धान्याची आवक सुरू झाली आहे. गहू घेऊन आलेल्या पहिल्या मालगाडीचे स्वागत रेल्वेचे सहाय्यक अभियंता विजय खुब्बे, वाहतूक निरीक्षक अशोक निकम, रेल्वेचे कर्मचारी व 'एफ. सी. आय.'च्या कंत्राटदारने केले. या पुढील काळात 'एफ. सी. आय.'चा माल दौलताबाद येथेच येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

\Bदौलताबादहून वाहतूक\B

'एफ. सी. आय.'चे गोदाम दौलताबाद बांधण्यात आल्याने आता औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर धान्य उतरवण्यात येणार नाही. दौलताबाद रेल्वे स्टेशन येथून वाहनांद्वारे शहरात धान्य पोचवले जाईल. औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर रिक्षा, चारचाकी लोडिंग वाहने, टॅक्टर, सिमेंट आणि युरिया आदी मालाची आवक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तारांचा जालन्यातून पत्ता कट?

$
0
0

सुरेश कुलकर्णी, जालना

जालन्यातून आमदार अब्दुल सत्तार हे कोणत्याही क्षणी काँग्रेसची उमेदवारी मिळऊ शकतात. आपल्याला मिळालेली संधी नाहक घालवण्यापेक्षा झटकन, आहे त्या परिस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करून मोकळे व्हावे, या विचाराने काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांनी अतिशय गडबडीत, कोणतीही तयारी नसताना शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला, अशी चर्चा जालन्यात सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोडचे आमदार सत्तार यांनी केलेल्या बंडाचे सर्वाधिक नुकसान जालना आणि त्यानंतर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे, अशी चर्चा जालन्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जालना मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी नांदेड येथे बैठक बोलाविली होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी जालना मतदारसंघातून आमदार सत्तार यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह धरला होता.

'महाराष्ट्र टाइम्स'ने यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे.

विशेष म्हणजे शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवरून ऐनवेळी घुमजाव केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि आमदार सत्तार यांचीच खूपच मोठी अडचण झाली होती. जालन्यातून खोतकर यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरण्याच्या चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेवर अखिल भारतीय काँग्रेस नेत्यांकडे आणि त्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे चव्हाण यांच्या विरोधात अनेकांनी तक्रारी केल्या. त्यात जालन्यातील काँग्रेसचे नेते डॉ. संजय लाखे पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. खोतकर यांचे नाव कांग्रेसच्या लोकसभा उमेदवारीसाठी निश्चित आहे, असे छातीठोकपणे चव्हाण सांगत होते. त्यामुळे दुसऱ्या नावाची चर्चा सुद्धा त्यांच्यासमोर झालेली त्यांना चालत नव्हते. लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करायला एकही नेता धजावत नव्हता. विलास औताडे यांना असेच ऐनवेळेस उभे करण्यात आले आहे, ही वस्तुस्थिती आहे.

खोतकरांनी काँग्रेसला चकवा दिला. त्यानंतर चव्हाण यांनी घाईघाईत जालना आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांतून काँग्रेसचा उमेदवार ठरवण्याची मुख्य जबाबदारी आमदार सत्तार आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना दिली होती. सत्तार यांना जालना अथवा औरंगाबाद यापैकी एका मतदारसंघातून लोकसभेवर पाठवण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठी एका पायावर तयार असल्याचे स्पष्ट दिसत होते. आमदार सत्तार हे खासदार चव्हाण यांच्या अतिशय जवळचे असल्याने क्षणार्धात निर्णय फिरवला जाऊ शकतो. चंद्रपूर मतदारसंघातून जाहीर झालेली काँग्रेसची उमेदवारी बदलल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जालन्यात देखील काहीही होऊ शकते. उगाच हाता तोंडाशी आलेला घास कशाला सोडायचा, अशी चर्चा शुक्रवारी दुपारी जालन्यातील काँग्रेसच्या एका जेष्ठ नेत्यांच्या घरी झालेल्या बैठकीत झाली.

शिवाय समजा आमदार सत्तार यांना जालन्यातून लोकसभेची काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली तर, जालन्यातील काँग्रेसअंतर्गत नेत्वृत्वात कमालीचे बदल होतील. इतके दिवस सांभाळून ठेवलेले सगळे संचित वाया जाईल, अशी भीती जालन्यातील काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांनी व्यक्त केली आणि त्यानंतर तातडीने उद्याच्या उद्या विलास औताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. महेश भवनमध्ये दुपारी झालेल्या कार्यक्रमात हा निर्णय जाहीर करण्यात आला.

यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी समजावून सांगितले. 'विलासबापू कोणत्याही गाड्या लावणार नाहीत. आता मोबाइल फोन, व्हॉट्स अॅपवरून निरोप देऊन जे येतील त्यांना बोलवावे,' असे ठरल्याची माहिती त्यांनी दिली. मिरवणूक काढण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. 'इतकी घाई कशासाठी,' या कार्यकर्त्यांच्या प्रश्नाला सोईस्कर बगल देऊन, 'चला कामाला लागा असेच सांगण्यात आले.'

दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा आमदार सत्तार हे काय करणार याची त्यांच्या औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरणार होते. त्याचीही मोठी धास्ती जालन्यातील नेत्यांच्या बोलण्यात जाणवत होती. यासगळ्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीतून विलास औताडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयारी केली आणि सकाळी ते जालन्यात दाखल झाले. आमदार राजेश टोपे यांना या सगळ्या निर्णयाची फार माहिती नव्हती. त्यामुळे ते त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त होते आणि उमेदवारी अर्ज भरताना टोपे यांनी उपस्थित असणे अत्यंत आवश्यक असल्याने त्यांच्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना शनिवारी सकाळी दोन तास ताटकळत उभे रहावे लागले. शिवाय आमदार टोपे हे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आले. उमेदवारी अर्ज दाखल करताना औताडे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कक्षात थांबले आणि त्यानंतर थेट निघून गेले. बाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींना ते बोलले नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर गायत्री लॉन्स येथे झालेल्या छोटेखानी मेळाव्यात टोपे आले नाहीत.

\Bजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील नाट्य\B

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीबाहेर शनिवारी मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे राहिलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी ज्या पद्धतीने दूर केले त्याची जालन्यात मोठी चर्चा रंगली आहे. यावेळी साधा शिष्टाचार न पाळणाऱ्या पोलिस, जिल्हा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी काँग्रेसचा एकही नेता पुढे आला नाही. शंभर मीटरची मर्यादा सांभाळून जिल्हा प्रशासनाला या सगळ्या जेष्ठ, माजी आमदार व जिल्ह्यातील जबाबदार लोकनेत्यांना सांभाळता आले असते. कोणाचाही अपमान झाला नसता, अशी चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images