Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पदव्युत्तर परीक्षा आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पदव्युत्तर परीक्षा बुधवारी सुरू होणार आहे. एकूण ३२ हजार ८०३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा ६८ केंद्रांवर घेतली जाणार असून कॉपीला आळा घालण्यासाठी १८ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. विद्यापीठ कॅम्पसमधील पदव्युत्तर परीक्षेच्या वेळापत्रकात २३ एप्रिलला होणारे मतदान लक्षात घेऊन फेरबदल करण्यात आला आहे.

विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांची पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा बुधवारी सुरू होणार आहे. तब्बल ३२ हजार ८०३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बी. एड, एम. एड, बीपीएड, एमपीएड आणि विधी अभ्यासक्रमांच्या परीक्षा २५ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. या अभ्यासक्रमांचा अध्यापन कालावधी ९० दिवस पूर्ण झाला नसल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठातील कर्मचारी निवडणूक कामासाठी प्रतिनियुक्तीवर गेल्यामुळे पदव्युत्तर परीक्षेचे नियोजन कोलमडले होते. त्यामुळे परीक्षा मंडळाची बैठकीत पाच एप्रिलऐवजी दहा एप्रिलपासून परीक्षा घेण्याचा निर्णय संमत झाला होता. विद्यापीठ कॅम्पसमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे. पीजी व एम. फिल अभ्यासक्रमाचे शुल्क भरण्यासाठी दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांची गर्दी आहे. विद्यापीठातील विभाग स्वायत्त असून आपल्या सोयीनुसार परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करतात. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पदव्युत्तर परीक्षा घेणे बंधनकारक असते. येत्या २३ एप्रिल रोजी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याबाबत संभ्रम होता. अखेर येत्या २२ एप्रिलपासून परीक्षा घेण्याचे नियोजन करीत असलेल्या विभागांनी दोन दिवस परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

\Bकाही विभागांकडून सुटी

\Bकाही विभागांनी वेळापत्रक कायम ठेवत मतदानाच्या दिवशी सुटी दिली आहे. विद्यापीठातील बहुतांशी कर्मचारी आणि प्राध्यापक निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केले आहेत. परीक्षा प्रक्रियेवर ताण पडणार असल्यामुळे वेळापत्रकात फेरबदल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हा बदल झाला आहे. विद्यार्थ्यांनी विभागात नवे वेळापत्रक जाणून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष रावसाहेब दानवे रुग्णालयात दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रावसाहेब दानवे सोमवारी एका खासगी रुग्णालयात दाखल आहेत. ही माहिती मिळताच मंगळवारी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली असून त्याचा तपशील समजू शकला नाही. दरम्यान, लोकसभा रिंगणात उतरलेले दानवे यांचे जावई आमदार हर्षवर्धन जाधव यांना सत्तार पाठिंबा देणार का? अशी चर्चाही आता रंगू लागली आहे.

जालना लोकसभा निवडणूक रिंगणात असलेल्या दानवे यांना स्वत:च्या मतदारसंघासह प्रदेशाध्यक्ष म्हणूनही राज्यभर प्रचारार्थ जावे लागत आहे. जाहीरसभा, कॉर्नर बैठका, मेळावे यासाठी त्यांची दिवसरात्र धावपळ सुरू आहे. वाढत्या तापमानाचा फटका त्यांना बसला आहे. ऊन्हामुळे त्यांना ताप आला आहे. सोमवारी तपासणीसाठी ते दर्गा रोडवरील एका खासगी रुग्णालयात गेले असता डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देत उपाचार सुरू केले.

दानवे अॅडमीट असल्याची माहिती मिळताच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडले, शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनीही त्यांची भेट घेत विचारपूस केली.

दरम्यान, काँग्रेस विरोधात बंड करणारे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनीही सायंकाळी दानवे यांची भेट घेतली. त्यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. बंद खोलीत झालेल्या या भेटीत नेमकी काय राजकीय चर्चा झाली, याचा तपशील समजू शकला नाही. सत्तार यांना संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. दरम्यान, दानवे यांचे जावई आमदार हर्षवर्धन जाधव यांना सत्तार पाठिंबा देणार का? अशी चर्चाही आता रंगू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापूस, तूर विम्याचे अडीचशे कोटी मिळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खरीप हंगामातील पिकांतील कापूस व तूर पिकांची उत्पादकता जमा केल्यानंतर आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या दोन पिकांच्या विम्यापोटी सुमारे २५० कोटी रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल, अशी माहिती कृषी खात्याच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील कापूस व तूर पिकांची उत्पादकता विमा कंपनीला नुकतीच सादर करण्यात आली आहे. त्यामुळे पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा पीक विमा येत्या ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. खरीप हंगामात ३ लाख ११ हजार ४८ शेतकऱ्यांनी उडीद, मूग, भुईमूग, मका, बाजरी, ज्वारी व सोयाबीन आदी पिकांचा विमा काढला होता. त्यांना सुमारे १४८ कोटी ३५ लाख रुपयांचा पीक विमा मिळाला आहे. जिल्ह्यात कापूस पिकांचे क्षेत्र एक लाख ४१ हजार ४८६ हेक्टर आहे.

कापसासाठी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा २९ कोटी ७१ लाख २२ हजार २८० रुपये, तर सरकारने ६५ कोटी ९६ लाख, ११ हजार ४६२ रुपये, असे एकूण ९५ कोटी ६७ लाख ३३ हजार ७४१ रुपयांचा प्रिमिअम जमा केला आहे. तुरीचे एकूण क्षेत्र २८ हजार ५१४ हेक्टर असून, शेतकरी व सरकार असे एकूण १६ कोटी ६१ लाख ७१ हजार १०४ रुपयांचा प्रिमिअम भरला आहे. या दोन्ही पिकांसाठी ११२ कोटी २९ लाख ४ हजार ८४६ रुपयांचा प्रिमिअम भरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा यंत्र चाचणीला महावितरणचा खोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फक्त वीज जोडणी अभावी चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रातील यंत्राची चाचणी रखडली आहे. महावितरणकडून वीज जोडणी मिळाली तर, बुधवारी चाचणी होऊ शकेल अशी माहिती सूत्रांनी दिली.

चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्राच्या जागेवर १५० टन क्षमतेचे यंत्र बसवून प्रक्रिया करण्याचे काम केले जाणार आहे. मायो वेसल्स कंपनीच्या माध्यमातून यंत्राचे सुटे भाग प्रक्रिया केंद्राच्या जागेवर दहा दिवसांपूर्वी आणण्यात आले. या भागांची जोडणी करून दहा एप्रिलपासून यंत्र सुरू करण्याची सूचना पालिका पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला केली. त्यादृष्टीने प्रशासनाने कंत्राटदाराच्या माध्यमातून तयारी केली. मंगळवारी (९ एप्रिल) यंत्राची चाचणी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. महावितरण कंपनीकडून वीज जोडणी मिळाली नाही तरी, जनरेटरच्या माध्यमातून चाचणी घेण्याचे ठरविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात जनरेटरवर यंत्राची चाचणी घेणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे महावितरण कंपनीकडून वीज जोडणी मिळाल्यावर चाचणी घेण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. बुधवारपर्यंत महावितरण कंपनीने वीज जोडणी द्यावी, यासाठी पालिकेचे अधिकारी प्रयत्न करीत होते. अन्यथा ही चाचणी लांबणीवर पडेल. परिणामी कचऱ्याचे ढीग वाढत राहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस निरीक्षक गिरमेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हनुमंत गिरमे यांच्यावर अखेर सोमवारी रात्री उशिरा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. निरीक्षक गिरमे यांनी एका तक्रारदार महिलेच्या मोबाइल आणि व्हॉटस्अॅप क्रमांकावर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे. दरम्यान, गिरमे हे चार एप्रिलपासून वैद्यकीय रजेवर गेले आहेत.

ही महिला ८ मार्च रोजी घरगुती वादाची तक्रार करण्यासाठी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गेली होती. पोलिस निरीक्षक गिरमे यांना भेटल्यानंतर त्यांनी तिचा मोबाइल क्रमांक घेतला होता. त्यानंतर या महिलेच्या मोबाइलवर सतत व्हॉटस्अॅप आणि टेक्स्ट मेसेज पाठवणे सुरू केले. तिने गिरमेंना व्हॉटस्अॅप ब्लॉक केल्यानंतर टेक्स्ट मेसेज पाठवणे सुरू ठेवले. दरम्यान, हा प्रकार चार एप्रिल रोजी महिलेच्या पतीच्या लक्षात आला. महिलेने पतीसह जवाहरनगर पोलिस ठाणे गाठले. मात्र या ठिकाणी तक्रार घेण्यात आली नसल्याने दुसऱ्या दिवशी तिने पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेतली. आयुक्तांनी हे प्रकरण तपासासाठी सायबर पोलिस ठाण्याकडे सोपवले. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर अखेर सोमवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. रात्री उशिरा पीडित महिलेच्या तक्रारीनंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक हनुमंत गिरमे यांच्या विरुद्ध कलम ३५४ ड नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्यातील ‘गॅप’वाढविण्यासाठी चाचपणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली ओरड थांबवण्यासाठी सरसकट पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करावा यासाठी प्रशासनातर्फे चाचपणी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; पदाधिकाऱ्यांनी मात्र पाणीपुरवठ्यातील 'गॅप' एक दिवसाने वाढवण्यास विरोध केला आहे. 'आहे त्या पाण्यात समान पाणी वाटपाचे नियोजन करा, 'गॅप' वाढवू नका,' असे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना कळविले आहे.

पिण्याच्या पाण्यावरून सध्या सिडको, हडको भागात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सिडको, हडको भागात सहा, सात, आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जलकुंभावर नागरिकांकडून आंदोलन केले जात आहे. नगरसेवक देखील आपल्या वॉर्डात पाणीपुरवठा व्हावा म्हणून जलकुंभावर ठाण मांडून बसत आहेत. अशीच स्थिती राहिली तर, जून महिन्यापर्यंत नागरिकांच्या रोषाला उत्तर देणे पालिका प्रशासनाला कठीण होणार आहे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. शहरात सध्या चौथ्या दिवशी पाणीपुरवठा केला जात आहे. चौथ्या दिवसाऐवजी पाचव्या दिवशी पाणीपुरवठा केल्यास पाण्याविषयीच्या तक्रारी दूर होतील व सर्वांना पाणी मिळेल, असे त्या अधिकाऱ्याने महापौरांना सांगितले. प्रशासन या दृष्टीने नियोजन करीत आहे, अशी माहिती देखील त्या अधिकाऱ्याने महापौरांना दिली. महापौरांनी मात्र पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यास विरोध केला. चौथ्या दिवशी पाणीपुरवठा होतो, हाच मोठा 'गॅप' आहे. आता 'गॅप' वाढवू नका. आहे त्या पाण्यात योग्य नियोजन करा आणि सर्वांना पाणी द्या, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सुचविले.

जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहरासाठी १५० ते १५५ एमएलडी (दशलक्ष लिटर रोज) पाण्याचा उपसा केला जातो. उन्हाळ्यामुळे हा उपसा १३० ते १३५ एमएलडीपर्यंत आला आहे. पाण्याचा उपसा १३० ते १३० 'एमएलडी' होत असला तरी शहरात मात्र १०० ते ११० 'एमएलडी'पर्यंतच पाणी येते. एवढ्या पाण्यात संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्याचे आव्हान पालिकेच्या यंत्रणेसमोर आहे.

\B'गॅप' वाढविणे हा उपाय नव्हे : महापौर\B

पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याबद्दल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावाबद्दल बोलताना महापौर म्हणाले, 'पाणी पुरवठ्यात 'गॅप' वाढवण्याला आमचा विरोध आहे. आहे त्या पाण्यात समान पाणी देण्याचे काम प्रशासनाचे आहे. प्रशासनातील अधिकारी तज्ज्ञ असतात, त्यांना काम कसे करायचे हे माहिती असते. काही जण तुपाशी आणि काही जण उपाशी, अशी स्थिती नको अशी आमची भूमिका आहे, पण सर्वजण एकमेकांकडे बोट दाखवू लागले आहेत, हे योग्य नाही. आहे त्या पाण्यात योग्य नियोजन करून नागरिकांना प्रशासनाने पाणीपुरवठा करावा, गॅप वाढवणे हा उपाय असू शकत नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातपंपांची दुरुस्ती सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री तालुक्यातील अनेक गावांतील हातपंप नादुरुस्त आहेत. या बाबीकडे संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समितीने साफ कानाडोळा केला होता. मात्र, याबद्दलचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले असून काही गावांतील हातपंप दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरू केला आहे. सध्या दुष्काळ व वाढत्या उन्हामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली आहे. तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावांमध्ये गंभीर पाणी टंचाई जाणवत आहे, तर तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावांमध्ये टँकर सुरू झाले आहेत. शासनाने विहिरींचे अधिग्रहण केले आहे. सर्वच गावात हातपंप असून अनेक हातपंपाचे पाणी आटले आहे. पण, काही हातपंपांना भरपूर पाणी असताना केवळ ते नादुरूस्त असल्याने गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. याकडे 'मटा'ने सहा एप्रिलच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते. यामुळे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना जाग आली असून हातपंपाची दुरूस्ती सुरू करण्यात आली आहे. सध्या बाबरा, निधोना शिवारातील हातपंप दुरूस्त करून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी गेल्या काही वर्षांत टप्याटप्याने प्रत्येक वाड्या वस्त्यांवर विंधन विहिरी खोदून त्यावर हातपंप बसविले आहेत. सुरुवातीच्या काळात ते व्यवस्थित चालले, मात्र कालांतराने देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अनेक हातपंप बंद पडले आहेत. बरेच हातपंप अनेक वर्षांपासून नादुरुस्त स्थितीत उभे आहेत. अनेक वर्षे वापर होत नसल्याने हातपंप गंजून गेले. हातपंप सुरू असल्यास अनेक गावांना पाणी टंचाईतून दिलासा मिळतो. वार्षिक शुल्क घेऊनही दुर्लक्ष शासन एकीकडे पाणी पुरवण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करते, तर दुसरीकडे पाणी असलेल्या हातपंपांची दुरूस्ती करण्यात उदासिन असते. हातपंपाच्या देखभाल दुरूस्तीकरिता ग्रामपंचायतीकडून वार्षिक शुल्क आकारले जाते. त्यानंतरही शासन दुरुस्तीकडे कानाडोळा का करते, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यूटन भाभा शिष्यवृत्ती जवळकर यांना जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील नीलेश जवळकर यांना प्रतिष्ठेची न्यूटन भाभा शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. ते इंग्लंड मधील न्यू कॅसल विद्यापीठात संशोधनासाठी रवाना झाले असून तेथे चार महिने संशोधन करणार आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश मिळवलेले जवळकर यांनी गदाना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेले आहे. त्यांचे कीटकशास्त्र या विषयात संशोधन सुरू आहे. प्रगत संशोधनासाठी ब्रिटिश कॉन्सिल आणि भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने न्यूटन भाभा शिष्यवृत्ती जाहीर केली जाते. या शिष्यवृत्तीसाठी संपूर्ण भारतातून फक्त ५८ जणांची निवड करण्यात आली आहे. कीटकशास्त्रातील संशोधनासाठी ज‌वळकर यांना २०१५ मध्ये भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची प्रतिष्ठेची इन्स्पायर फेलोशिप मंजूर झाली आहे. मक्यातील कीटवर जैविक कीटकनाशक वापरून कसे नियंत्रण मिळवता येईल, यावर ते सध्या संशोधन करत आहेत. त्यांना इंग्लंडमधील न्यू कॅसल विद्यापीठातील वरिष्ठ संशोधक प्राध्यापिका डॉ. अनघराड एम आर गेटहाऊस आणि प्राध्यापक डॉ. मार्टिन एडवर्ड्स यांच्या मार्गदर्शनाखाली चार महिने संशोधनाची संधी मिळाली आहे. जवळकर यांनी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा लौकिक वाढवला आहे. या संशोधनासाठी प्राणिशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सुरेशचंद्र झांबरे यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गावाचे नाव पाणवाडी; प्रत्यक्षात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री तालुक्यातील पाणवाडी येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी एक महिन्यापासून वनवन भटकावे लागत आहे. ग्रामपंचायतीमार्फत आठ दिवसांतून एकदा प्रत्येक कुटुंबाला दोन-चार हंडे पाणी मिळते. त्यामुळे येथील ग्रामस्थ दिवसभर पिण्याच्या पाण्याचा शोधात भटकावे लागत आहे. या गावात तालुक्यात एकेकाळी मुबलक पाणी असायचे, आता पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नाही. यंदा फुलंब्री तालुक्यात दुष्काळाची दहाकता अत्यंत तीव्र झाली आहे. हा विषय ढिम्म प्रशासन पाणी गंभीरपणे घेत नाही. पाणवाडीची लोकसंख्या दोन हजारांहून अधिक असून २०१५पर्यंत फुलंब्री व पाणवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत होती. फुलंब्रीला नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर पाणवाडी स्वतंत्र झाली. पण, प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे गावाचा कारभार केवळ ग्रामसेवकावर चालतो. सरपंच, सदस्याची निवडणूक अद्याप घेण्यात आलेली नाही. ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने सुविधांसाठी कोणाकडे जावे, हा प्रश्न येथील ग्रामस्थांना आहे. येथील नळ योजनेची टाकी बंद असून नळ तुटले आहेत. या टाकीकडे पाहून असे वाटते या गावात मागील कित्येक दिवसापासून पाणी आलेच नाही. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून किमान पिण्याच्या पाण्याची तरी सोय करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. खेळण्या बागडण्याच्या वयातच लहान मुलांनाही विहिरीवरून पाणी वाहावे लागत आहे. मुले विहिरीत पडण्याचा धोका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Narendra Modi: मोदींनी शहिदांसाठी मागितलं मत, विरोधकांची ECकडे तक्रार

$
0
0

औरंगाबाद:

लातूरमधील औसा येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या नावानं भाजपला मत द्यावं, असं भावनिक आवाहन नवमतदारांना केलं. मोदी राजकीय फायद्यासाठी शहीद जवानांच्या नावाचा वापर करत आहेत, असं म्हणत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

औसा येथे पंतप्रधान मोदींची काल प्रचारसभा झाली. त्यात मोदींनी नवमतदारांना भावनिक आवाहन केलं. 'पहिल्यांदा पगार मिळाल्यानंतर तुम्ही तो स्वतःसाठी ठेवत नाहीत. तुम्ही ते पैसे आई किंवा बहिणीला देता. तसंच तुमचं पहिलं मत एअर स्ट्राइक किंवा पुलवामात शहीद झालेल्या जवानांसाठी द्याल का? कमळ किंवा धनुष्यबाणावरील बटन दाबल्यानंतर तुम्ही अभिमानानं सागू शकाल की तुमचं मत थेट मोदींना मिळालं,' असं ते म्हणाले. मोदींच्या या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदींवर टीका केली आहे. राजकीय फायद्यासाठी एअर स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या नावाचा वापर केला जात आहे, असं विरोधकांनी म्हटलं.

मोदींविरोधात विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्याची दखल घेत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे अहवाल मागितला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का करताहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे. पण दुर्दैवानं निवडणूक आयोग त्यावर कोणतीही कारवाई करत नाही,' असं माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणाले. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. मोदी हे नवमतदारांना मूर्ख समजतात. पण तसं नाही, असं ते म्हणाले. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही मोदी आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर टीका केली आहे. माकपचे नेते नीलोत्पल बसू यांनीही टीकास्त्र सोडलं आहे. निवडणूक आयोगानं कठोर कारवाई करावी. भविष्यात ध्रुवीकरणाच्या दिशेने जाणारा निवडणूक प्रचार थांबवण्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळ व्यापाऱ्यांना कारवाईचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फळे पिकविण्यासाठी व्यापारी कॅलशियम कार्बाइड, अॅसिटीलिन गॅसचा वापर करतात; याप्रकारे फळे पिकवू नका, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषधी प्रशासनाने बुधवारी शहरातील व्यापाऱ्यांना दिला. फळे पिकविण्यासाठी 'ईथिलिन गॅस' ही नवीन पद्धती योग्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

फळे पिकविताना घातक रसायनिक साधनांचा वापर करू नये, यासाठी अन्न व औषधी विभागाने बुधवारी जाधववाडीतील व्यापाऱ्यांची बैठक घेतली. फळे पिकविताना घातक रसायनांचा वापर केला जातो. विशेषत: उन्हाळ्यात येणारा आंबा पिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॅलशियम कार्बाइड, अॅसिटिलिन गॅसचा वापर होत असल्याचे समोर आले होते. यातील रसायने अतिशय घातक असून त्यामुळे घेरी येणे, वारंवार तहान लागणे, चिडचिड होणे, अथवा गिळण्यास त्रास होणे, उलटी, त्वचेचे अल्सर असे आजार होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर जाधववाडीतील व्यापाऱ्यांची बुधवारी बैठक घेण्यात आली. यामध्ये नव्याने आलेल्या ईथिलिन गॅसचा वापर करून फळे पिकविण्याच्या पद्धतीची माहिती देण्यात आली. यावेळी सहआयुक्त उ. शं. वंजारी, सहायक आयुक्त मि. दा. शाह, अन्न सुरक्षा अधिकारी सुलोचना जाधवर, मेघा फाळके, योगेश कनसे यांची उपस्थिती होती. बैठकीला जाधववाडीतील २८ व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक विभागातील कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निवडणूक विभागात प्रतिनियुक्तीवर असलेले महावितरण परिमंडळ कार्यालय ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच येथील लघुलेखक गंगाधर कापसे (वय ५६) यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. निवडणूक विभागात कार्यरत असताना सकाळी ११ वाजता त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना रुग्णालयातही दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची मोठी आवश्यकता असते. त्यामुळे इतर शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर निवडणूक विभागात कार्यरत व्हावे लागते. काही दिवसांपूर्वीच कापसे यांची नियुक्ती निवडणूक विभागात करण्यात आली होती. कापसे हे सकाळीच कामावर हजर झाले होते. मात्र, त्यांना पाठदुखी तसेच हात दुखण्याचा त्रास सुरू झाला. ११ वाजता निवडणूक विभागात त्यांची तब्येत बिघडली. यानंतर त्यांनी काही वेळ कार्यालयातच आराम केला. मात्र, त्यांची तब्येत अधिकच खालावल्याने इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. कापसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरेश पाटील आत्महत्या; गायके, पाटील यांच्या जामिनावर सुनावणी पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या आत्महत्याप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले सदाशिव गायके व नाना पाटील यांच्या नियमित जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांच्या कोर्टात सुनावणी पूर्ण झाली. प्रकरणात गुरुवारपर्यंत (११ एप्रिल) निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव गायके व नाना पाटील यांच्या छळाला कंâटाळून आत्महत्या करत असल्याची सुसाइड नोट लिहून २५ फेâब्रुवारी २०१९ रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली असल्याची तक्रार माजी आमदार नितीन पाटील यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणात सदाशिव गायके व नाना पाटील यांना अटक होऊन ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. गायके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, प्रकरणात दोषारोपत्र दाखल केल्याचे खंडपीठात निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यानंतर खंडपीठाने विचारणा केल्यामुळे गायके, नाना पाटील यांच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला. त्यानंतर गायके व पाटील यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर न्यायालयाने दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतले असून सुनावणी पूर्ण झाली आहे. तसेच न्यायालयाने गुरुवारपर्यंत निकाल राखीव ठेवला आहे. सराकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभक्त पत्नीवर बलात्कार करणारा पोलिस गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विभक्त राहत असलेल्या व कोर्टात दावा सुरू असलेल्या पत्नीसोबत बळजबरीने बलात्कार करणाऱ्या आरोपी पोलिस पतीला सिडको पोलिसांनी अटक केली. जनार्दन भिमराव हरणे, असे त्याचे नाव असून त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

या प्रकरणी ४६ वर्षांच्या महिलेने शुक्रवारी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जनार्दन हरणे याचा पहिला विवाह झालेला असताना तो लपवून त्याने आपल्यासोबत दुसरा विवाह केल्याचे नमूद केले आहे. यापूर्वी या विवाहितेने जनार्दन हरणे विरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. कोर्टाकडून तिला सात हजार रुपये महिन्याची पोटगी देखील मंजूर झालेली आहे. दरम्यान, २१ फेब्रुवारी आणि २३ फेब्रुवारी रोजी जनार्दन हरणे याने तिच्या घरी येत बळजबरी बलात्कार केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरून बुधवारी सकाळी जनार्दन हरणे याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉटसअॅपवर आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड; उच्चशिक्षित अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

व्हॉटसअॅप ग्रुपवर दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा व्हिडिओ अपलोड करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही व्हॉटसअॅप ग्रुपवर दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, असा व्हिडिओ एका तरुणाने अपलोड केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने हे गांभीर्याने घेत या तरुणाचा शोध घेतला. संशयित तरुण आमीरखान अलफखान पठाण (वय ३५, रा. लोटाकारंजा) याला ताब्यात घेण्यात आले. आमीरखान हा उच्चशिक्षित असून एम. एसस्सी. पर्यंत शिक्षण घेतले असून लॅब टेक्निशीयन आहे. काही माहिती नसताना, सत्यता न पाहता त्याने व्हॉटसअॅपवर व्हिडिओ अपलोड केल्याचे दिसून आले. या प्रकरणी आमीरखानला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, राजेंद्र साळुंके, सुनील धात्रक, विशाल सोनवणे, प्रभाकर राऊत, गजानन मांटे, संजय जाधव यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कंत्राटदारांचे उपोषण मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

१४ एप्रिलच्या पार्श्वभूमीवर थकीत बिले तातडीने देण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर कंत्राटदारांनी तीन दिवसांपासून सुरू केलेले उपोषण बुधवारी मागे घेतले. महापालिकेत केलेल्या विविध कामांची कंत्राटदारांची सुमारे दोनशे कोटींची बिले थकीत आहेत. ही बिले मिळावीत या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून कंत्राटदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यापूर्वी दोन वेळा कंत्राटदारांनी पालिकेच्या मुख्यालयासमोर याच मागणीसाठी उपोषण केले होते. आता कंत्राटदारांनी पुन्हा एकदा महापालिकेसमोर बिलांसाठी उपोषण सुरू केले. प्रशासनाने दोन दिवस या उपोषणाची दखल घेतली नाही. बुधवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या सूचनेनुसार मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे व लेखाधिकारी संजय पवार यांनी उपोषण करणाऱ्या कंत्राटदारांची भेट घेतली व तातडीने बिल देण्यात येईल असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर कंत्राटदारांनी उपोषण मागे घेतले. बंडू कांबळे, बबन हिवाळे, कानिफनाथ मोरे, अशोक साबळे, राहुल दाभाडे, सचिन महापुरे, विठ्ठल गुंजकर, यशवंत पागोरे, राजू होर्शिळ, हनुमान पहुळ, सुनील पंडित, बाळू गायकवाड, संकेत प्रधान आदी कंत्राटदार उपोषणात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पाइस जेटची पुन्हा भरारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्पाइस जेटने औरंगामध्ये बंद केलेली विमानसेवा पुन्हा एकदा सुरू करण्यास तयारी दर्शवली आहे. मुंबई - औरंगाबाद - मुंबई या मार्गावर या फेऱ्या सुरू राहणार आहेत.

आर्थिक कोंडीत सापडल्यामुळे जेट एअरवेजने मुंबई-औरंगाबाद विमान सेवा १९ मार्चपासून सेवा बंद केली. या फेऱ्या पुन्हा सुरू होणार किंवा नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे औरंगाबादहून मुंबईसाठी विमान सेवा सुरू व्हावी यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू होते. स्पाइस जेट, इंडिगो, गो एअर या कंपन्यांकडे मुंबईसाठी विमान सेवा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला होता. यावर स्पाइस जेटने विमानतळ प्राधिकरणाला सकारात्मक प्रतिसाद देत मुंबई - औरंगाबाद - मुंबई मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, सध्या कंपनीकडे विमान उपलब्ध नाहीत. व्यवस्थापनाने विमान खरेदीचा निर्णय घेतला असून, त्यानंतर ही सेवा सुरू केली जाणार आहे. दरम्यान, एअर इंडिया कंपनीने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी यासाठी १२२ सिटर विमानाऐवजी १६२ सिटर विमान सुरू करावे अशी मागणी केली होती. या मागणीनुसार गेल्या दोन दिवसांपासून मुंबई - औरंगाबाद - दिल्ली - मुंबई मार्गावर जास्त आसनक्षमतेचे विमान सुरू करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासी मुलाच्या औषधीसाठी रेल्वे अधिकाऱ्यांची धावपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सचखंड एक्स्प्रेसमधील दीड वर्षाच्या मुलाची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी धावपळ करून डॉक्टरांशी संपर्क साधला. व्हॉटस् अॅपवर आलेल्या प्रिसकिप्शनच्या आधारे औषधोपचार सुरू केले. त्यामुळे मुलगा बरा झाला.

मंगळवारी नांदेडहून सचखंड एक्स्प्रेस निघाली. या गाडीच्या एस सात डब्यातून मनजिंदर सिंह परिवारासह प्रवास करत होते. त्यांच्या परिवारातील दीड वर्षाच्या मुलाची तब्येत अचानक बिघडली. त्याला उलट्यांचा त्रास सुरू झाला. रेल्वे तिकीट तपासणी निरीक्षक आर. झा यांनी ही परिस्थिती समजली. त्यांनी याबाबत कंट्रोल रूमला माहिती दिली. कंट्रोल रूमने औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक एल. के. जाखडे यांना कळवले. त्यांनी मुलाला होत असलेल्या त्रासाबाबत स्थानिक डॉक्टरांशी संपर्क केला. डॉक्टरांनी फोनवरून माहिती घेत व्हॉटस अॅपवर प्रिसकिप्शन टाकले. गाडी औरंगाबादला येण्यापूर्वी जाखडे यांनी औषधी तयार ठेवली. रेल्वे औरंगाबादला येताच मनजिंदर सिंह यांच्याकडे औषधी देण्यात आली. ती कशी घ्यायची याची माहिती दिली. विशेष म्हणजे त्याचे पैसेही त्यांनी स्वीकारले नाहीत. रेल्वेच्या या सोयीबद्दल मनजिंदर सिंह यांनी आभार मानले. दरम्यान, आपत्कालीन स्थितीत रेल्वेतर्फे अनेकदा अशी सुविधा पुरवली जाते, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार यादीत महिला मतदारांचा टक्का वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने राज्यात मतदार याद्या विषेश संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम तसेच मतदार नोंदणीचे विविध विषेश मोहीम राबविल्याने मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा औरंगाबाद मतदारसंघात तब्बल एक लाख ७७ हजार ३०४ महिला मतदारांची वाढ झाली आहे.

पुरवणी यादी जाहीर केल्यानुसार २०१४ लोकसभेच्या तुलनेत सर्वाधिक ३९ हजार ९४६ महिला मतदारांची वाढ झाली असून कन्नड मतदारसंघात सर्वात कमी २१ हजार ७११ महिला मतदारांची वाढ झाली आहे.

लोकसभा मतदारसंघांची विभागणीमध्ये संबंधित जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ शेजारच्या लोकसभा मतदारसंघाला जोडले गेल्याने मतदारांची जिल्हानिहाय मतदरसंख्या आणि मतदारसंघातील मतदारसंख्येत फरक आढळतो. जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघाच्या रचनेनुसार पैठण, सिल्लोड व फुलंब्री विधानसभा मतदारसंघ जालना जिल्ह्याला जोडण्यात आले आहेत.

वाढलेले महिला मतदार

कन्नड - २१७११

औरंगाबाद मध्य - ३३५४०

औरंगाबाद पश्चिम - ३९९४६

औरंगाबाद पूर्व -३५०६४

गंगापूर - २४१८८

वैजापूर - २२८८५

एकूण - १७७३०४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधी कंपनीचा विभागीय व्यवस्थापक निघाला गुंगीच्या गोळ्या विक्रीचा सुत्रधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातून गुंगीच्या गोळ्या विक्री करणाऱ्या आरोपी सागर शिंदे याला गुन्हे शाखेच्या पथकाने २१ मार्च रोजी अटक केली होती. सागर शिंदे ज्या औषधी कंपनीसाठी काम करीत होता त्या कंपनीचा विभागीय शाखा व्यवस्थापक संदीप पाटील (रा. पनवेल) याने त्याला कंपनीचा हा साठा पुरवल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने संदीप पाटील याला अटक केली आहे.

गुन्हे शाखा आणि अन्न औषधी प्रशासनाच्या वतीने दिल्लीगेट येथे २१ मार्च रोजी सागर बाबुराव शिंदे (वय ४५, रा. मयुरनगर, हडको) याला अटक करण्यात आली होती. शिंदे याच्या ताब्यातून सुरुवातीला ७० हजाराच्या गुंगीच्या गोळ्यांचा साठा आणि घर झडतीमध्ये सुमारे सव्वा तीन लाख रुपयांचा साठा असा एकूण तीन लाख ९८ हजाराचा गुंगीच्या औषधी गोळ्याचा साठा जप्त करण्यात आला होता. आरोपी सागर शिंदे हा पीएसआय नावाच्या एका औषधी कंपनीसाठी औरंगाबाद जिल्ह्यासाठी सेल्समन म्हणून काम करीत होता. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल देशमुख या प्रकरणी तपास करीत होते. या तपासामध्ये सागर शिंदे याला हा साठा त्याच्या औषधी कंपनीचा विभागीय व्यवस्थापक संदिप शांताराम पाटील (वय ३५, रा. लाइन अळी रोड, पनवेल, जि. रायगड) याने पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी गुन्हेशाखेने संदीप पाटील यांना तपासासाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. चौकशीमध्ये या गुन्ह्यामध्ये पाटील याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर संशयित आरोपी संदीप पाटील याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल देशमुख आणि पथकाने केली.

कंपनीतील इतरांचा समावेश असल्याची शक्यता

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही औषधी कंपनी एनजीओ मार्फत औषधी पुरवठा करते. मात्र, डॉक्टरांच्या प्रिस्पीक्शनशिवाय ही औषधी मिळत नाही. विभागीय व्यवस्थापक असलेल्या संदीप पाटीलने हा साठा सागर शिंदे याला कसा दिला, याचे बिलिंग आणि पेमेंट कसे झाले याचा तपास गुन्हा शाखा करीत आहे. दरम्यान संदीप पाटीलने ज्या कंपनीत हा घोळ केला त्या कंपनीचा राजीनामा फेब्रुवारी महिन्यात दिला असून दुसऱ्या कंपनीत रुजू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images