Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मारहाणीच्या घटनांनी मिरवणुकीला गालबोट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मारहाणीच्या विविध तीन घटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीला गालबोट लागले. पैठणगेट आणि मुकुंदवाडी भागात रविवारी रात्री या घटना घडल्या. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मिरवणुकीत मारहाणीची पहिली घटना रविवारी रात्री दहा वाजता पैठणगेट भागात घडली. सनी संजय भालेराव (वय १८, रा. बायजीपुरा) हा तरुण मिरवणुकीत नाचत होता. यावेळी त्याला दुसऱ्या तरुणाची काठी लागली. सनीने त्यांना दुसरीकडे नाचायला सांगितले असता या तरुणांनी त्याला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी सनीच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अमित लांडगे, विक्रांत भुईगड, नितीन रत्नपारखे यांच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची दुसरी घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजता नूतन कॉलनी परिसरात घडली. अविनाश मनोहर बनकर (वय ३०, रा. रमानगर) याला शुभम पवार (रा. रमानगर) या आरोपीने जुन्या वादातून धारदार शस्त्राने मारहाण केली. या घटनेत पाठीवर वार लागल्याने अविनाश गंभीर जखमी झाला. याप्रकरणी संशयित आरोपी शुभम पवारविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणीची तिसरी घटना रविवारी रात्री दहा वाजता जे सेक्टर मुकुंदवाडी भागात घडली. या ठिकाणी मनिष संजय भोळे (वय २२, रा. मुकुंदवाडी) याला चार जणांनी मिरवणूक पाहत असताना पैशाची मागणी केली. मनिषने त्यांना नकार दिला असता या आरोपींनी त्याला दगडाने मारहाण केली. याप्रकरणी मनिषच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शुभम रेंगे आणि इतर तीन आरोपींविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावणेदोन लाखाच्या फसवणूकीच्या बातमीसाठी चौकट

$
0
0

ठार मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; …भालेराव हा पाटील यांना तुमचे काम करतो, असे सांगत टाळाटाळ करीत होता. यामुळे पाटील हे त्याच्या घरी जाऊन त्याला भेटले. यावेळी भालेराव याने पाटील यांनाच अश्लील शिवीगाळ केली; तसेच 'यापुढे माझ्या घरी आला तर हातपाय तोडून ठार मारेल,' अशी धमकी दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार हिना गावित यांच्या विरोधातील याचिका निकाली

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

नंदुरबार जिल्ह्याच्या भाजप खासदार खासदार हिना गावित यांच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पी. आर. बोरा यांनी मंगळवारी निकाली काढली.

अपक्ष उमेदवार डॉक्टर सुहास नटावदकर यांनी गावित यांच्याविरोधात याचिका केली होती. त्यानुसार गावित यांनी उमेदवारी अर्जासोबत निवडणूकही त्याच्या नियम क्रमांक चारप्रमाणे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. हे प्रतिज्ञापत्र शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दिले होते. मात्र, स्टॅम पेपर कोठून खरेदी केले, कोणत्या कामासाठी त्याचा उपयोग करणार यासह तो स्वाक्षरीनिशी का नव्हता. त्यामुळे हा स्टॅप पेपर बोगस असल्याचा दावा करत त्यांच्याविरोधात याचिकाकर्त्याने निवडणूक निर्णय अधिकारी याकडे तक्रार दाखल केली होती. गावित यांनी त्यांच्यावर आई आणि बहीण या अवलंबून असल्याचे म्हटले होते. त्यांची आई माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या तर, बहीण ही व्यावसायिक आहे. या दोघींचे उत्पन्न हिना गावित यांच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट आहे. गावित यांनी उत्पन्नाचे साधन शेती असल्याचे नमूद केले आहे. त्या विद्यमान खासदार असून केंद्राकडून त्यांना भत्ता आणि लाभ मिळत असल्याचे याबाबतची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केली नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा अशी विनंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळल्यानंतर डॉक्टर नटावदकर यांनी खंडपीठात धाव घेतली होती. सुनावणीनंतर खंडपीठाने निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. कायद्याप्रमाणे उपलब्ध असलेल्या योग्य त्या प्राधिकरणाकडे दाद मागावी, असे मत मांडत याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्यातर्फे ज्ञानेश्वर बागुल व विष्णू मदन (पाटील) यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीवर बहिष्कार; प्रचाराला गावबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

एक दशकाचा कालावधी लोटूनही ब्रह्मगव्हाण जलसिंचन उपसा योजना पूर्ण न झाल्याने, या भागातील ५५ गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. यातील अकरा गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा व उर्वरित ४४ गावातील नागरिकांनी प्रचारासाठी गावात येणाऱ्या नेत्यांना गावबंदी केली आहे.

तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील जवळपास ५५ गावांना जायकवाडी धरणाच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी २००९ साली ब्रह्मगव्हाण जलसिंचन उपसा योजनेचे काम सुरू करण्यात आले. मात्र, जवळपास दहा वर्षांचा कालावधी लोटल्यावरही अद्याप या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. परिणामी या योजनेचा लाभ होणाऱ्या गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक निवडणुकीत उपसा सिंचन योजनेचे काम लवकरच पूर्ण होणार, असे आश्वासन राजकीय पक्षाचे नेते देतात. मात्र, काम योजनेचे काम पूर्ण होत नसल्याने आश्वासनामुळे त्रस्त झालेल्या या भागातील गावकऱ्यांनी मंगळवारी खेरडा येथे बैठक करून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. दहा वर्षांपूर्वी ब्रह्मगव्हाण जलसिंचन उपसा योजना मंजूर झाल्यावर व या योजनेचे काम सुरू झाल्यावर आम्ही अक्षरशः दिवाळी साजरी केली. योजना पूर्ण झाल्यावर आमचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटेल अशी आमची अपेक्षा होती. मात्र, अद्याप ही योजना पूर्ण झालेली नाही. त्यासाठी अनेकदा आंदोलन केली, पण आश्वसनाशिवाय आमच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर हर्षी खु, हर्षी बु, दादेगाव खु, दादेगाव बु, दावरवाडी, सोनवाडी खु, सोनवाडी बु, इनायतपूर, नानेगाव, पुसेगाव व खेरडा या अकरा गावांनी बहिष्कार टाकण्याचा व उर्वरित गावांनी प्रचारासाठी गावात येणाऱ्या राजकीय नेत्याना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांच्या डेडलाइनला महावितरणचा झटका

$
0
0

म. टा. \Bप्रतिनिधी, \Bऔरंगाबाद

चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया मशीन सुरू करण्यासाठी महापौरांनी दिलेल्या डेडलाइनला महावितरण कंपनीने झटका दिला आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वीज जोडणीच्या कामाची निविदा काढता येणार नाही, असे महावितरण कंपनीने महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे आचारसंहिता संपेपर्यंत वीज जोडणीचे काम होणे शक्य नाही, हे स्पष्ट झाले आहे.

चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर महापालिकेतर्फे १५० टन क्षमतेचे मशीन लावण्यात आले आहे. हे मशीन १० एप्रिलपासून सुरू करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले होते, परंतु महावितरण कंपनीने कचरा मशीनसाठी वीज जोडणी दिलीच नाही. त्यामुळे महापौरांची दहा एप्रिलची डेडलाइन चुकली. त्यानंतर त्यांनी १५ एप्रिलपर्यंत मशीन सुरू करा, असे अधिकाऱ्यांना सांगितले. वीज जोडणी मिळत नसेल तर जनरेटरच्या सहाय्याने मशीन सुरू करण्याची सूचना देखील त्यांनी केली होती. १५० टन क्षमतेची मशीन जनरेटरवर चालविणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी महापौरांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत कचरा प्रक्रिया मशीन सुरू करण्याचा महापौरांचा डाव फोल ठरला.

कचरा प्रक्रिया मशीन केव्हा सुरू होणार याचा आढावा महापौरांनी मंगळवारी घेतला तेव्हा निवडणूक आचारसंहितेमुळे वीज जोडणीच्या कामाची निविदा काढणे शक्य नसल्याचे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. निविदा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन परवानगी मागितली जाणार आहे. परवानगी मिळाल्यावर निविदा काढू, असेही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी महापौरांशी बोलताना सांगितल्याचे महापौर म्हणाले. निविदा प्रक्रियेत किमान दोन महिने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन महिने कचरा प्रक्रिया मशीन सुरू होणार नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा नको म्हणून बक्षीस रद्द करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षिसांवर महापालिकेच्या आयुक्तांनी गंडांतर आणले आहे. आपापसात स्पर्धा नको, विद्यार्थ्यांची बौद्धिक वाढ निकोप झाली पाहिजे असा दृष्टिकोन ठेऊन आयुक्तांनी विद्यार्थ्यांसाठीची बक्षीस योजना रद्द करण्याचा विचार केला आहे, अशी माहिती खुद्द शिक्षणाधिकाऱ्यांनीच दिली आहे.

पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी महापालिका शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस योजना लागू केली होती. मोठ्या रकमेची बक्षिसे त्यांनी ठेवली होती. बक्षिसामुळे विद्यार्थी अभ्यास करतील आणि खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत येतील. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये देखील त्यांचा शिरकाव होईल, या उद्देशाने डॉ. कांबळे यांनी बक्षीस योजना सुरू केली होती. डॉ. कांबळे यांच्यानंतर दोन - तीन वर्ष ही योजना चालली, परंतु दोन वर्षांपासून या योजनेला घरघर लागली. विशेष गुणांनी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे अकरावीचे वर्ष पूर्ण झाल्यावर बक्षीस मिळू लागले. त्यामुळे बक्षिसाबद्दलची उत्सुकता राहिली नाही.

आता विद्यमान आयुक्तांनी बक्षीस योजनाच रद्द करण्याचा विचार सुरू केला आहे. एसएससी बोर्डात देखील आता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जात नाही. त्यामुळे महापालिकेने तरी बक्षीस का द्यावे, असा प्रश्न आयुक्तांनी उपस्थित केला आहे. बक्षिसामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लागते. निकोप वाढीसाठी अशी स्पर्धा योग्य नाही, असे आयुक्तांचे मत बनले आहे. त्यामुळे बक्षीस योजना रद्द केली जाण्याचीच शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची ‘जिज्ञासा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमआयटी महाविद्यालयात आयोजित जिज्ञासा प्रकल्प प्रदर्शनात प्रथमवर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधक प्रयोगांचे सादरीकरण केले. दीडशेपेक्षा अधिक प्रकल्पांमध्ये अद्ययावत पाणी पुरवठा व्यवस्थापन, डेअरी, ऑटोमॅटिक वायर कटिंग मशीन अशा विविध प्रकल्पांनी लक्ष वेधले.

एमआयटी महाविद्यालयात 'जिज्ञासा' या प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी सामाजिक व औद्योगिक ठिकाणी येणाऱ्या अडचणींवर प्रकल्प तयार करून प्रदर्शनात मांडले. प्रदर्शनाला मंगळवारी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने पाहण्यासाठी गर्दी केली होती. या प्रदर्शनात एकूण ६०० प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी मिळून १५० 'प्रोजेक्ट'चे सादरीकरण केले. विद्यार्थांनी सादर केलेले प्रकल्प सामाजिक व औद्योगिक समस्यांवर अतिशय उपयोगी ठरणारे आहेत. प्रदर्शनात ऑटोमॅटिक लगेज कॅरिंग रोबो, ऑटोमेशन ऑफ डेअरी फार्म, स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट सिस्टिम, ऑटोमॅटिक वायर कटिंग सिस्टिम, सँड फिल्टरिंग सिस्टिम आदी प्रकल्प आकर्षण ठरले.

प्रदर्शनाला उद्योजक मिलिंद कंक, शिरीष कुलकर्णी, नंदकुमार भावसार यांनी भेट दिली. यावेळी महासंचालक प्रा. मुनीष शर्मा, प्राचार्य डॉ. संतोष भोसले, प्राचार्य डॉ. निलेश पाटील, प्रा. विश्वास कुरुंदकर उपस्थित होते. नंदकुमार भावसार यांनीही भेट देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रा. सुहास चाटे, प्रा. विनोद दामधर, प्रा. भूषण कुलकर्णी, प्रा. अमोल चित्ते, प्रा. सुहास कंकाळ, प्रा. सुहास तारगे, प्रा. गुणवंत पाटील आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपींना पोलिस कोठडी

$
0
0

आरोपी रवीशंकर हरिचंद्र तायडे व आदिनाथ उर्फ चिक्या उत्तम चव्हाण यांना मंगळवारी (१६ एप्रिल) अटक करून न्यायालयात हजर केले असता, दोघांना सोमवारपर्यंत (२२ एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. देशपांडे यांनी दिले. आरोपींचे साथीदार फरार असून त्यांना अटक करणे बाकी आहे; तसेच गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील योगेश तुपे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहाशेची लाच घेताना मुख्याध्यापक गजाआड

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षकाकडून ६०० रुपयांची लाच घेणाऱ्या नाचनवेल (ता. कन्नड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. नाचनवेल येथील शाळेत मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. सातव्या वेतन आयोगाची पडताळणी करण्यासाठी; तसेच महिन्याच्या वेतन बिल काढण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती.

या प्रकरणातील शिक्षकाने तक्रार केली होती. सातव्या वेतग आयोगाची पडताळणी करण्यासाठी, प्राप्तिकर आणि प्रत्येक महिन्याचे वेतन बिल तयार करण्यासाठी हे शिक्षक मुख्यध्यापक भाऊसाहेब रेऊबा आव्हाळे यांना भेटले होते. यावेळी आव्हाळे यांनी त्यांना या कामासाठी ६०० रुपयाच्या लाचेची मागणी केली. याबाबत शिक्षकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. मंगळवारी मुख्यध्यापक आव्हाळे यांनी लाचेची रक्कम घेऊन शिक्षकाला नाचनवेल येथील शाळेत बोलावले होते. या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला होता. लाचेची रक्कम घेताना मुख्यध्यापक आव्हाळे यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक सचिन गवळी, गोपाल बरंडवाल, रवींद्र आंबेकर, रवींद्र देशमुख, बाळासाहेब राठोड, संदीप चिंचोले आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी; निकालाला दहा तास उशीर

$
0
0

म. टा. प्रतिनीधी, औरंगाबाद

यंदा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानासोबत ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्रणा राहणार असून, मतमोजणी करताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या पाच अशा लोकसभा मतदारसंघातील ३० केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या मतपत्रिकेची मोजणी करण्यात येणार आहे. ईव्हीएम मतमोजणीनंतर चिठ्ठ्या मोजण्याचा प्रकार झाला तर, निकालाला किमान दहा तास उशीर होण्याचा अंदाज आहे.

यंदा देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅटचा उपयोग करण्यात येणार आहे. लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधान सभा मतदार संघातील पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटमधील मत पत्रिकांची मोजणी केली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र 'रँडम' पद्धतीने निवडण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅटची मतदान मोजणी झाल्यानंतर मतदारसंघातील ३० मतदान केंद्रातील मत पत्रिका मोजण्यासाठी किमान दहा तासांचा अवधी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद मध्यमधील दोन मतदान केंद्रात बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभेसाठी औरंगाबाद (मध्य) विधानसभा मतदार संघातील दोन मतदान केंद्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये केंद्र क्रमांक ७९ व ८५ सिडको कम्युनिटी हॉल येथून सोनामाता बालक मंदिर येथे खोली क्रमांक १७ व १८ येथे तर, औरंगाबाद टेक्स्टाइल मिल कॉर्नर येथील केंद्र क्रमांक २४८ व २४९ हे मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल नागसेननगर येथे खोली क्रमांक १० व ११ जागेत स्थलांतरीत झाले आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या सोबतच मध्य विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदारांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे नवीन १८ सहाय्यकारी मतदान केंद्रांना निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. मध्य विधानसभा मतदार संघात ३३० केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदार संघातील १८ मतदान केंद्रांवर १४०० पेक्षा जास्त मतदार असल्याने सहाय्यकारी मतदान केंद्रांना निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादहून आता जेटचे उड्डाण अवघडच…

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आर्थिक गर्तेत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनीला पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता, जेट एअरवेजच्या १४० विमानाच्या ताफ्यापैकी २८ विमान 'डी-रजिस्टर' करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे औरंगाबाद मुंबई या मार्गावरील जेट एअरवेजचे विमान सुरू अवघड असल्याचे मानले जात आहे.

जेट एअरवेजचे विमान मुंबई - औरंगाबाद - मुंबई या मार्गावर दिवसांतून दोन फेऱ्या मारत होते. आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे ही सेवा मार्च महिन्यापासून रद्द करण्यात आले आहे. या विमानाच्या वेळापत्रकांचे स्लॉट २६ एप्रिलपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आले होते. जेट कंपनीला आर्थिक मदत देण्यासाठी एसबीआय बँकेने पुढाकार घेतला आहे. शिवाय काही गुंतवणूकदारही जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. यामुळे जेट एअरवेजने पाच मे पर्यंत जेट एअरवेजला दिलेले स्लॉट कायम ठेवण्याची मागणी जेट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विमानतळ प्राधिकरणाकडे केली आहे.

विमान सेवा रद्द केल्यास जेट एअरवेजला देशभरातील हजारो प्रवाशांना अंदाजे ३३५ कोटी रुपये द्यावे लागतील, असा अंदाज आहे. याशिवाय कंपनीकडे १४० विमाने असल्याची माहिती जेटच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. यातील २८ विमाने 'डी रजिस्टर' म्हणजे कंपनीच्या नावाखाली चालणारे विमान रद्द करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत आणखी १८ विमानेही 'डी रजिस्टर' करण्यात येणार आहेत. त्यामुळे जेट एअरवेज कंपनी आर्थिक संकटातून सावरली तरी, औरंगाबाद मुंबई या मार्गावर विमान सुरू होईल का, याबाबत शंका उपस्थितीत केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचे विसर्जन राहुल गांधीच करतील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'काँग्रेस विसर्जित करा, हे महात्मा गांधींचे स्वप्न राहुल गांधीच पूर्ण करतील,' अशी टोलेबाजी करत मंगळवारी भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी विरोधकांवर तोफ डागली.

युतीच्या लोकसभा निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर उपस्थित होते. शाहनवाज म्हणाले, 'विरोधी पक्षांकडून मर्यादा ओलांडून प्रचार केला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडूनही तसेच सुरू असून, याचा परिणाम निवडणुकीत काँग्रेसवर होईल. अमेठीतून पराभव होणार असल्याचे दिसत असल्यानेच राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड मतदारसंघातून अर्ज दाखल केला,' असा टोलाही त्यांनी मारला. 'समाजवादी पक्षाचे नेते आझम खान हे केवळ विष टाकण्याचे काम करत असून, एमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनीही भाषेची मर्यादा ओलांडली आहे. ते कुठेही सामना करण्याच्या परिस्थितीत नाहीत. बसप नेत्या मायावती यांनी धर्माच्या नावावर मते मागितली. त्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केवळ भगवान हनुमान यांचा आर्शीवाद पाठिशी आहे असे विधान केले,' असा दावा करून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा सन्मान करतो, असेही ते म्हणाले.

३७० कलम नको

'गेल्या पाच वर्षात एक दोन घटना वगळता जातीय दंगली झाल्या नाहीत. जात धर्माच्या नावावर भाजप राजकारण करत नाही तर, सर्वप्रथम देश, जनतेचा विकास हे लक्ष्य आहे. ३७० कलमचा कोणताही लाभ जम्मू काश्मीरच्या जनतेला नाही. भारतातील मुस्लिम समाजाला ३७० कलम नको असतानाच जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना का पाहिजे,' असा सवालही शाहनवाज हुसैन यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावावरून नांगर फिरवणारा दुष्काळ!

$
0
0

Ravindra.Taksal@timesgroup.com

Tweet : @rtaksalMT

औरंगाबाद : 'पाणी नसल्यानं सारं उद्धवस्त झालं. गाव भकास झालं. हाताला काम नाही म्हणून पुण्याला गेलो. मिळेल ते काम करतोय. गावात पाण्याची, रोजीरोटीची सोय झाली असती तर परगावी कशाला गेलो अस्तो,' पाणावलेल्या डोळ्यानं जब्बार शेख शेख सांगत होते. दुष्काळाच्या झळा चेहऱ्यावर दिसत होत्या.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नांदेडला जाण्याचा योग आला. तेव्हा नांदेडच्या ग्रामीण भागाचा आढावा घेण्यासाठी मित्रासह सकाळी दहा वाजता दुचाकीने निघालो. काही अंतरावर गेल्यावर महामार्गावर असलेले काकडी गाव आलं. घास कोरडा पडल्याने टपरीवजा हॉटेल गाठलं. शेजारच्या व्यक्तीला नमस्कार केला. त्यांनी श्यामसुंदर जानापुरे असे आपले नाव सांगितले. ते म्हणाले, 'फेब्रुवारीपासून नळाला पाणी नाही. शेतातले पीक केव्हाच करपले. गावकरी देशावर निघतायत.' त्यांचं इतकं वाक्यच परिस्थिती सांगणारं होतं. काही अंतर गेल्यावर कहाळा फाटा लागला. मुखेड ४० किलोमीटर, असा फलक पाहात आम्ही प्रस्थान केले. रस्त्याचे काम सुरू असल्याने प्रचंड धूळ होती. त्यातून मार्ग काढत श्री दत्त संस्थान मंदिर व ब्रह्मयंत्र मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या कोलंबी गावात पोहचलो. लोकसंख्या सुमारे साडेपाच हजार. इथंही दुष्काळ. त्यामुळे पाण्याचा धंदा तेजीत. गावात कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना नाही. गामपंचायतीच्या बोरला पाणी नाही. विहिरींनी तळ गाठलेला. गावातील चार-पाच लोकांच्या बोअरला पाणी आहे. त्यांनी गावापर्यंत पाइपलाइन टाकली. तेथून पुढे गरजूंना स्वखर्चाने घरापर्यंत पाइप टाकून घ्यावा लागतो. महिन्याकाठी दहा ते १४ वेळा पाणी दिले जाते. ते ही पंधरा मिनिटे. त्यासाठी वर्षाकाठी तीन हजार रुपये मोजावे लागतात. मात्र, हे पाणी आटले तर, असा प्रश्न माजी सरपंच कोडिंबा बुरपल्ले, उद्धवराव बैसे यांना सतावतोय. 'कोरडूवाहू शेती. यंदा पावसाने कंबरडे मोडले. रब्बीची पेरा करणारं कुणीही नाही. जितकं खरीप आलं, ते वानरं आणि वन्यप्राण्यांनी धुडगूस घातल्यानं मोठं नुकसान झालं,'हे सांगताना बैसे आणि रामकिसन शिंदे चांगलेच संतापलेले. चर्चा संपवून पुढे गोदमगावच्या दिशेने निघालो. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास गावात प्रवेश झाला. साधारणत: तीन सव्वातीन हजार लोकसंख्येचे गाव. इथेही कोरडवाहू शेती. गावात सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा. रस्त्यालगत नळ दिसून आला, पण गेल्या काही महिन्यांत पाणी नाही. काळजाला पीळ सांगणारी माणसं इथंही भेटली. दोन एकर शेती असलेले दाऊजी येल्लवार. 'खरीप गेले. गावात पाणी आणि रोजगारही नाही. पिण्याचं पाणी तीन किलोमीटर अंतरावरून आणावं लागतं,' काय वाढून ठेवलंय माहित नाही. त्यांच्या वाक्यावर आमच्याकडंही उत्तर नव्हतं.

पत्रिका वाटप सुरूय; लग्नासाठी पाणी कुठून आणणार?

अनसूया गणगोपाले म्हणाल्या, 'कामच नाही. घरी बसून आहोत. आमचं ८० हजारांचं कर्जही सरकारनं माफ केलं नाही. गावात कायम पाणी नाही. आमच्याकडं मते मागण्यासाठी येणारे पुढारी, यांना हे काही दिसत नाही. पाणी विकत घ्यावं लागतं. ते पिण्यासारखं नाही. रोज जार विकत ऐपत किती जणांची असणार.' माधव टेकाळे म्हणाले, 'दुष्काळामुळे गावातले ४०० जण परभणी, पुणे, नांदेडसह रोजीरोटीसाठी गेलेत. मंडप डेकोरेशन, वीट भट्टी मिळेल ते काम करतायत. आई वडिलांसह पुण्याला काम करणारा शेख सद्दाम गावात पुन्हा परत आलाय. गावात राहणाऱ्या बहिणाच्या लग्नासाठी. तारीख ठरलीय. पत्रिका वाटप सुरूय. रोज प्यायला पाणी नाही. आता लग्नासाठी कुठून पाणी आणणार. याचे उत्तर खासदारकीचा प्रचार करणारे सर्व पक्ष देणार का,' टेकाळे व्यथित झालेले. घाम पुसत बसताना बोलले. हेलावून गेलं आत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादहून विमान सुरू करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

औरंगाबादहून जाणारे जेट एअरवेजचे विमान बंद झाले आहे. याचा फटका पर्यटकांसह व्यवसायिकांना बसत आहे. औरंगाबाद विमानतळावरून विमान सुरू करावे यासाठी टुर्स ऑपरेटरसह हॉटेल व्यवसायिकांकडूनही इंडिगो, गो एअर सारख्या विमान कंपन्यांना पत्रव्यवहार करण्यात येत आहे.

औरंगाबाद शहरातील टुरिस्ट प्रमोटर्स गिल्डचे जसवंत सिंह, हॉटेल व्यावसायिक सुमीत कोठारी यांच्याकडून हे प्रयत्न सुरू आहेत. सध्या एअर इंडियाचे मुंबई-औरंगाबाद-दिल्ली हे विमान सुरू आहे. मात्र, विमान प्रवाशांची वाढती मागणी पाहता टुरिस्ट प्रमोटर्स गिल्डचे जसवंत सिंह यांनी एअर इंडियाचे प्रमुख अश्विनी लोहानी यांच्याकडे औरंगाबाद-मुंबई हे विमान सकाळच्या वेळात सुरू करावे अशी मागणी केली आहे. याशिवाय हॉटेल व्यवसायीकांनी औरंगाबादहून विमान सेवा सुरू करावी. यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. औरंगाबाद सह राज्यभरात विविध ठिकाणी असलेल्या हॉटेल व्यवसायीकांनी इंडिगो आणि गो एअर या विमान कंपन्यांकडे विमान सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. हॉटेल चालकांनी औरंगाबादहून जेटच्या विमानाने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या, पर्यटकांची संख्या आणि व्यवसायीकांची मागणी याच्या माहितीसह गो एअर आणि इंडिगो सारख्या कंपनीकडे विमान सेवा चालविण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे.

या प्रस्तावावर विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चाही करण्यात आलेली आहे. ही चर्चेतून इंडिगो सह गो एअर कंपनीकडून आगामी काळात औरंगाबाद विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्याबाबत आश्वासन देण्यात येत असल्याची माहिती जसवंत सिंह यांनी दिली. प्रत्यक्षात ही विमाने कधी पासून सुरू होतील. याबाबत कोणतेही ठोस भुमिका या कंपन्यांकडून देण्यात आले नसल्याची माहितीही संबंधीत हॉटेल व्यवसायीकांकडून देण्यात आली आहे.

……

शिर्डीचेही दर वाढले

सुट्टयांच्या काळात अनेक पर्यटक शिर्डीच्या विमानद्वारे येत आहे. औरंगाबादहून अनेक जण शिर्डीमार्गे जात आहे. शिर्डी मार्गे जाणाऱ्या प्रवाशांना मुंबई किंवा दिल्लीला जाण्यासाठी जास्त पैसे दयावे लागत आहे. शिर्डीच्या विमानाचे दर वाढल्याचा फटका औरंगाबादच्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेळके खुनप्रकरणी आणखी दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गारखेडा परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या दत्तात्रय शेळके खुनप्रकरणात आणखी दोन आरोपींना पुंडलिकनगर पोलिसांनी शिर्डी येथून अटक केली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी शेळके यांच्या नातेवाईकांनी घाटी हॉस्पिटलच्या शवविच्छेदन हॉलसमोर ठिय्या आंदोलन करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि आरोपींच्या अटकेची मागणी करीत ठिय्या आंदोलन केले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा तणाव निवळला.

गारखेडा रिलायंन्स मॉल शेजारी असलेले टपरी चालक दत्तात्रय उर्फ बंडू शेळके यांचा सोमवारी सायंकाळी चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. पाण्याची बाटली देण्यास नकार दिल्याने संशयित आरोपी रवीशंकर तायडे, आदिनाथ चव्हाण उर्फ चिक्या आणि साथीदारांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर हा प्रकार घडला होता. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रवी तायडे आणि आदीनाथ चव्हाण यांना तात्काळ अटक केली होती. घाटी हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सकाळी शेळके यांच्या मृतदेहाचे पोर्टमार्टेम करण्यात आले. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी सर्व आरोपींना अटक करण्याची; तसेच खुनाचा प्रकार घडत असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र गायकवाड आणि सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी नातेवाईकांची समजूत काढली. आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याचे आश्वासन दिले. यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

\Bदोन आरोपींना शिर्डीवरून अटक\B

शेळके खुनप्रकरणी पाच ते सहा आरोपींचा समावेश आहे. दोन आरोपींना सोमवारी रात्री अटक करण्यात आली. मंगळवारी पसार झालेल्या दोन आरोपींना शिर्डी येथून अटक करण्यात आली. शाम सुरेश भोज्जया (वय २८, रा. श्रीकृष्णनगर) आणि सोमेश बरखा रिडलॉन (वय २२, रा. गांधीनगर) अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील आणखी दोन पसार आरोपींचा शोध सुरू आहे.

\Bखुनानंतरही आरोपींची दादागिरी\B

शेळके यांचा खून केल्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे आरोपी पसार झाले. घटनास्थळी शेळके यांचे नातेवाईक, काही मित्रमंडळी जमा झाली होती. यावेळी तेथे उपस्थित असलेला एक तरुण आरोपींच्या विरोधात बोलत होता. हा प्रकार आरोपींना समजल्यानंतर ते पुन्हा रिक्षाने घटनास्थळी आले. विरोधात बोलणाऱ्या तरुणावर या आरोपींनी लोखंडी रॉडने हल्ला केला. त्याला बेदम मारहाण करून ते पसार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांचनवाडी येथील गॅस प्लांटच्या जागेवर कचऱ्याचा डोंगर, झाडेही जळाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कांचनवाडी येथील कचऱ्यापासून गॅस तयार करण्यासाठीच्या प्लांटच्या जागेवर कचऱ्याचा डोंगर जमा झाला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात तर दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याच बरोबर नियोजित प्लांटच्या क्षेत्रातील झाडे देखील जळू लागली आहेत. या प्रकारामुळे पर्यावरणाची हानी होऊ लागली आहे.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील संनियंत्रण समितीने शहराच्या चार दिशांना चार जागा निश्चित केल्या आहेत. त्यापैकी कांचनवाडी येथील एक जागा आहे. या ठिकाणी कचऱ्यापासून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचे ठरविण्यात आले आहे, परंतु अद्याप हा प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही. महापालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण करून बॅम्को कंस्ट्रक्शन या कंपनीला गॅस प्लांट उभारणीचे काम दिले आहे. या कंपनीने प्लांटसाठी आवश्यक असलेल्या मशीन आणल्या असल्या तरी त्या लाऊन प्लांट प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी जुलैपर्यंत वाट पहावी लागणार आहे. तोपर्यंत कांचनवाडीच्या प्लांटच्या जागेवर टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया होणे शक्य नाही.

सध्या या ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणावर कचरा आणून टाकला जात आहे. प्रक्रिया होत नसल्यामुळे कचऱ्याचा डोंगर तयार झाला आहे. साचलेल्या कचऱ्याची दुर्गंधी निर्माण होऊ नये म्हणून कचऱ्यावर विशिष्ट प्रकारच्या औषधीची फवारणी केली जाते. अशा प्रकारची फवारणी कांचनवाडी येथील साईटवर साचलेल्या कचऱ्यावर केली जात नसल्याचे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्यावर लक्षात आले आहे. कचऱ्याच्या डोंगरावर औषधींची फवारणी होत नसल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचऱ्यापासून निघणाऱ्या द्रव्यामुळे आजूबाजूची झाडे जळाली आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर रुक्ष झाला आहे. साईटवर नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना देखील दुर्गंधीचा मोठा त्रास होत आहे. सुरक्षा रक्षकांना केबीन नसल्यामुळे रणरणत्या उन्हात त्यांना उभे रहावे लागते. पालिकेने त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील केलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचा खून; आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महिलेच्या खून प्रकरणात पाचोड (ता. पैठण) येथून संतोष धोंडीराम ताकवाले याला बुधवारी (१७ एप्रिल) अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला शुक्रवारपर्यंत (१९ एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. ए. पठाण यांनी दिले.

याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजिनाथ रायकर यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, आठ एप्रिल २०१९ रोजी सकाळी दहाच्या सुमारास रायकर यांना शापोरजी पालनजी कंन्स्ट्रक्शन कंपनीचा मॅनेजर इम्रान खान याने फोन करून ह्योसंग कंपनीसमोर रेल्वे रुणाजवळील ड्रेनेज लाइनलगत एका महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती दिली. रायकर हे घटनास्थळी गेले असता, तेथे महिलेचा मृतदेह आढळून आला.

प्रकरणात करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संबंधित मृतदेह हा देवबाई रामचंद्र सोनवणे हिचा असल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान आरोपी संतोष धोंडिराम ताकवाले (२४, रा. कारकीन, ता. पैठण, ह.मु. पाचोड, ता. पैठण) याला बुधवारी अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील शोभा विजयसेनानी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील १८ केंद्रांवर महिला राज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रशासनाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आदर्श मतदान केंद्र तसेच महिला मतदान केंद्रांची संख्या निश्चित झाले आहेत. यंदा जिल्ह्यामध्ये तब्बल ८८ आदर्श मतदान केंद्र असून, यात १८ मतदान केंद्राचे संपूर्ण नियोजन महिलांकडे राहणार आहे.

जिल्ह्यामध्ये सुमारे तीन हजार मतदान केंद्रांवर लोकसभेसाठी मतदान घेण्यात येणार आहे. जिल्ह्यामधील सिल्लोड, फुलंब्री, औरंगाबाद मध्य, पैठण, वैजापूर आणि फुलंब्री मतदारसंघातील प्रत्येकी दहा मतदान केंद्र तर, कन्नड मतदारसंघात ११, औरंगाबाद पश्चिममध्ये ७, औरंगाबाद पूर्वमध्ये ८, गंगापूर तालुक्यात सर्वाधिक १२ मतदान केंद्र आदर्श राहणार आहेत. इतर मतदान केंद्रांच्या तुलनेत या मतदान केंद्रांवर मतदरांसाठी अधिक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. या केंद्रांवर विद्युत व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्त्री तसेच पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे, स्वच्छ व सुंदर इमारतीमध्ये हे मतदान केंद्र राहणार असून, त्याचप्रमाणे मतदान केंद्राबाहेर मतदान केंद्राचा तपशील, इशारा, मतदार यादी, नमुना पत्रिका व सूचना आदी मतदाराला दिसतील अशा दर्शनी भागात लावलेली राहतील. मतदान केंद्राबाहेर पुरुष व स्त्री मतदारांच्या स्वतंत्र रांगा लावण्यासाठी पुरेशी जागा आदी बाबींची शहानिशा करून जिल्ह्यातील ८८ मतदान केंद्र आदर्श ठरवली आहेत. यातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांचे स्वागतही करण्यात येते. जिल्ह्यात यंदाही तब्बल अठरा मतदान केंद्रांवर महिलाराज राहणार आहे. या केंद्रांवर मतदान प्रक्रियेची सर्व जबाबदारी महिलांकडे राहणार आहे. यामध्ये केंद्र अध्यक्षापासून ते बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसही महिला राहणार आहेत.

\Bयेथे आहेत मतदान केंद्र

\Bमहिला मतदान केंद्रामध्ये सिल्लोड तालुक्यातील जोहर उर्दू शाळा, खोलीक्रमांक एक व दोन, कन्नड तालुक्यातील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय व जि. प. प्रा. शाळा हिवरखेडा गौताळा, फुलंब्री तालुक्यातील सुशीलादेवी देशमुख विद्यालय, खोली क्रमांक दोन रामनगर, महापालिका प्राथिमक शाळा चिकलठाणा खोली क्रमांक चार, औरंगाबाद मध्य मतदारसंघामध्ये आयशा मोतीवाला इंग्रजी पूर्व प्राथमिक शाळा टाइम्स कॉलनी, आझाद मुलींचे महाविद्यालय, नवखंडा, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील चाटे स्कूल सातारा परिसर, औरंगाबाद पूर्वमधील महाराष्ट्र पब्लिक स्कूल, पैठण मधील जि. प. प्रा. शाळा कावसान जुनी खोली क्रमांक एक, जि. प. शाळा पातेगाव जुनी खोली क्रमांक दोन, गंगापूर तालुक्यातील गणेशवाडी जि. प. प्रा. शाळा नारायणपूर खोली क्रमांक एक, जि. प. प्रा. शाळा वेरुळ खोली क्रमांक एक, वैजापूर तालुक्यातील लक्ष्मीनगर प्रा. शाळा नगर परिषद वैजापूर खोली क्रमांक एक, स्वामी समर्थ विद्यालय नगर परिषद वैजापूर खोली क्रमांक एक असे जिल्ह्यात एकूण १८ महिला मतदानकेंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफारी पार्कच्या कामाचा मे महिन्यात श्रीगणेशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सफारी पार्कच्या कामाचा मे महिन्यात श्रीगणेशा होण्याची शक्यता आहे. सफारी पार्कच्या कामासाठी नेमलेल्या पीएमसीने (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) संपूर्ण प्रकल्पाचे रेखाटन केले असून एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रेखाटनाचे सादरीकरण केले जाणार आहे. त्यानंतर प्राथमिक कामे सुरू केली जातील, अशी माहिती मिळाली आहे.

सफारी पार्कसाठी राज्य शासनाने महापालिकेला मिटमिटा शिवारात १०० एकर जागा दिली आहे. या जागेवर सफारी पार्कचे काम करण्यासाठी महापालिकेने दिल्ली येथील ब्रिजराज शर्मा अँड असोसीएटस् या कंपनीची पीएमसी म्हणून नियुक्ती केली आहे. १५ दिवसांपूर्वी सफारी पार्कची जागा पाहण्यासाठी ब्रिजराज शर्मा स्वत: औरंगाबादेत आले होते. त्यांनी प्राणिसंग्रहालयाचे संचालक विजय पाटील व पालिकेच्या अन्य अधिकाऱ्यांसह सफारी पार्कच्या जागेची पाहणी केली. १०० एकराच्या क्षेत्रात कोणत्या प्राण्यासाठी कुठे आणि कसे पिंजरे असावेत याची चर्चाही त्यांनी केली. त्यानंतर सफारी पार्क मधील प्राण्यांचे पिंजरे, पाणवठे, पर्यटकांना फिरण्यासाठीच्या सुविधा आदी बाबतीत सुयोग्य नियोजन करून त्याचे ड्रॉइंग सादर करण्यासाठी त्यांनी पालिका प्रशासनाकडे वेळ मागितला होता. काही दिवसांपूर्वी ब्रिजराज शर्मा यांनी पालिका आयुक्त आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक यांच्या नावे मेल पाठवून सफारी पार्कच्या जागेचे ड्रॉइंग घेऊन एप्रिल महिन्याच्या अखेरीस आपण येत असल्याचे कळविले आहे. त्यांनी तयार केलेल्या ड्रॉइंगचे सादरीकरण आयुक्तांच्या समोर केले जाणार आहे. आयुक्तांना ते सादरीकरण योग्य वाटले तर सफारी पार्कचा एकत्रित प्रस्ताव पीएमसीने तयार केलेल्या ड्रॉइंगसह केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला पाठविला जाणार आहे. प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर प्राण्यांचे पिंजरे आणि त्या अनुशंगाने करावयाची कामे सुरू केली जातील, परंतु दरम्यानच्या काळात सफारी पार्कच्या जागेवर प्राथमिक कामे सुरू केली जाणार आहेत. ही कामे मे महिन्यात सुरू होऊ शकतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images