Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

डॉ. सुंदर कुलकर्णी यांची मुलाखत घेण्याचे आदेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक पदासाठी अर्जदार तथा औरंगाबादचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर व्यंकट कुलकर्णी यांची मुलाखत घेण्याचे अंतरिम आदेश महाराष्ट्र महसूल प्राधिकरणाचे (मॅट) चेअरमन न्या. ए. एच. जोशी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिले आहेत.

डॉ. कुलकर्णी यांच्या मूळ अर्जावरील प्राथमिक सुनावणीपर्यंत पदासाठीचा निकाल जाहीर न करण्याचेही आदेश मॅटने दिले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक पदासाठी २४ डिसेंबर २०१८ रोजी ऑनलाइन अर्ज मागविले होते. या पदासाठीच्या चाचणी परीक्षेत उमेदवाराला २८ वर्षे ५ महिन्यांचा अनुभव असावा, असा निकष ठरविला होता. अर्जदार डॉ. कुलकर्णी यांना एकूण ३३ वर्षांपेक्षा जादा अनुभव आहे. असे असताना त्यांना पदाच्या मुलाखतीसाठी बोलावण्यात आले नव्हते. या उलट त्यांच्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या उमेदवारांना मुलाखतीला बोलावण्यात आले. मुलाखतीसाठी दहा उमेदवारांना बोलावण्यात आले होते. डॉ. कुलकर्णी यांनी मॅटमध्ये मूळ अर्जाद्वारे आव्हान दिले आहे. चाचणी परीक्षेत योग्य निकष लावले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मूळ अर्जावर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. डॉ. कुलकर्णी यांची बाजू श्यामसुंदर बी. पाटील यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खुल्या प्रवर्गातील जागा वाढवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सर्व विद्यार्थ्यांना समान संधी द्या, खुल्या प्रवर्गासाठी जागा वाढवा, या मागणीसाठी विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्णय फाइट फॉर जस्टीस या संघटनेच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. सिडकोतील अग्रसेनभवनात झालेल्या बैठकीला डॉ. अमोल अन्नदाते, डॉ. संतोष रंजलकर, डॉ. आर. एम. मुंदडा, डॉ. वंदना काबरा यांच्यासह वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशावरून सध्या आरक्षणाचा विषय गंभीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीचे प्रास्ताविक डॉ. काबरा यांनी केले. त्या म्हणाल्या, 'आरक्षण ५० टक्क्यांवरून ७८ टक्क्यांवर गेले आहे. मतांवर डोळा ठेवून आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेत आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे आमच्या गुणवंत मुलांना प्रवेश मिळत नाही. आता आपण न्यायासाठी लढा उभारला नाही तर, येत्या काळात राज्य आणि देश सोडण्याची वेळ आपल्यावर येईल.' खुल्या प्रवर्गासाठी जागा वाढवा या मागणीसाठी डॉ. आर. एम. मुंदडा यांनी आंदोलनाचे विविध टप्पे या बैठकीत जाहीर केले. बैठक झाल्यानंतर लगेचच कँडल मार्च काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि बैठकीच्या नंतर कॅनॉटपर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. आरक्षणाबद्दलच्या अध्यादेशावर राज्यपालांची अद्याप स्वाक्षरी झाली नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत राज्यपालांना भेटण्याचा प्रयत्न संघटनेचे शिष्टमंडळ करणार आहे. मेलव्दारे देखील त्यांना भावना कळविण्यात येणार आहेत. यानंतरही खुल्या प्रवर्गासाठी जागा वाढण्याचा निर्णय शासनाने घेतला नाही तर, धरणे आंदोलन केले जाईल. त्यानंतर विधिमंडळाच्या अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चासाठी औरंगाबादमधून किमान पन्नास हजार नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉ. सौरभ बाहेती, डॉ. भुतडा यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले व आरक्षणामुळे शिक्षण आणि अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना येणाऱ्या अडचणी त्यांनी मांडल्या. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार केला नाही तर, येत्या काळात त्याचा स्फोट होईल. आम्हाला आरक्षण नको, आम्हाला आमचा हक्क द्या, असे विद्यार्थी म्हणाले.

\Bलढ्याला राजकीय स्वरूप द्या

\Bडॉ. अमोल अन्नदाते म्हणाले, 'आरक्षणाचे प्रकरण मतांसाठी सुरू आहे. मतांसाठी राजकारणी लोक आपल्या आई - वडिलांना सुळावर चढवायला मागे पुढे पाहणार नाहीत. अशा प्रकारामुळे हा देश सोडून जावे, असा विचार खरोखरच मनात येतो. या शासनाचे नाक आणि तोंड दाबल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. त्यासाठी या लढ्याला राजकीय पक्षाचे स्वरुप द्या, जातीच्या आधारावर मतदान करा,' असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० ठिकाणांहून १४ एमएलडी पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील ग्रामीण भागात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. १००० हून अधिक टँकरने जिल्ह्यातील लाखो नागरिकांची तहान भागवली जात आहे. एमआयडीसीच्या पाणीपुरवठा योजनेतून वाळूज, साजापूर, शेंद्रा, पैठण परिसरात टँकर भरण्यासाठी २० फिलिंग पॉइंट काढून दिले आहेत. त्याद्वारे १४ एमएलडी पाणी दररोज दिले जात आहे. दरम्यान फुलंब्री तालुक्यातील जलस्त्रोत आटल्याने टँकरची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे शेंद्रा येथे आणखी एक फिलिंग पॉइंट वाढविण्यात येणार आहे.

वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा व जालना एमआयडीसीला ब्रह्मगव्हाण योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. उद्योगांसह १४ ग्रामपंचायती व बजाजनगर वसाहतीलाही एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाणी दिले जाते. दररोज ७२ एमएलडी पाणी उचलण्याची या योजनेची क्षमता होती. पण ही जलवाहिनी जीर्ण झाल्याने ६६ एमएलडी पाणी उचलले जाते. गेल्यावर्षी जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने वैजापूर, गंगापूर तालुक्यातील अनेक गावात अगदी दिवाळीपूर्वीच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. हळूहळू संपूर्ण जिल्ह्यात टँकरची मागणी वाढली. त्यानुसार एमआयडीसीने फिलिंग पॉइंट वाढविले. सध्या वाळूज येथे सहा, साजापूर तीन, बीकेटी दोन फिलिंग पॉइंट आहेत. शेंद्रा येथे पाच पॉइंट आहेत. पैठणमध्ये दोन फिलिंग पॉइंट काढले आहेत. शेंद्रा एमआयडीसीसाठी खोडेगाव येथून नवीन पाणीपुरवठा योजना टाकली आहे. ही योजना अजून कार्यान्वित व्हायची आहे, पण आठ दिवसांपासून टेस्टिंग सुरू झाली आहे. खोडेगाव जलवाहिनीतून दोन फिलिंग पॉइंट काढून दिले आहेत. एकूण २० पॉइंटमधून १४ एमएलडी पाणी पुरविले जात आहे. फुलंब्री तालुक्यात पाण्याची मागणी वाढल्याने शेंद्रा येथे दोन दिवसांत आणखी एक टँकर फिलिंग पॉइंट काढून देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरराष्ट्रीय शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शैक्षणिक दर्जा अधिक सुधारावा यासाठी यंदा ८० शाळांची आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड केली आहे. याठिकाणी जूनमध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून पहिली, दुसरी व तिसरीच्या वर्गात आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.

मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये सुरू असलेल्या सात दिवसीय प्रशिक्षणाचा समारोप रविवारी होत आहे. राज्यात निवडलेल्या ८० शाळांमधून २२ शाळांचे शिक्षक पहिल्या प्रशिक्षणासाठी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्ड (एमआयईडी) च्या अभ्यास मंडळाचे सदस्य शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत. प्राची साठे, रुपेश ठाकूर, मुग्धा लेले यांच्यासह तज्ज्ञ मंडळी आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या पहिली, दुसरी व तिसरीच्या अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून लासूरगाव (ता. वैजापूर) येथील जिल्हा परिषद शाळा व ओंकार विद्यालयाची आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यभरातील १२७ शिक्षकांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जाईल. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या शाळांमधून आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम शिकवणे सुरू होणार आहे. अभ्यासक्रम तयार झाला आहे. या वर्गाला जोड म्हणून केजी व नर्सरीचे वर्गही या शाळांमधून सुरू होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळात तीन गावांची एसटी भागवणार तहान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या वैजापूर तालुक्यातील शिऊर गावानजिक असलेल्या सफियाबादवाडी, हाजीपोरवाडी आणि पेंडेफळ या तीन गावांना एसटीद्वारे पाणी पुरवठा केली जाणार आहे. या सेवेचे उद्घाटन एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती भयावह आहे. पाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक मैलांची पायपीट करावी लागत आहे. या गावांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय एसटी विभागाकडून घेण्यात आला आहे. यापूर्वी नांदेड, परभणी आणि हिंगोली या ठिकाणी काही गावांमध्ये एसटीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यातील मानेगाव येथे परिवहन सचिव आशिष कुमार सिंह यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले.

रविवारी (१९ मे) औरंगाबाद तालुक्यातील वैजापूर येथील शिऊर गावातील सफियाबादवाडी, हाजीपोरवाडी, पेडेंफळ येथे एसटीद्वारे पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ तसेच ज्येष्ठ महिला यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. सफियाबादवाडी, हाजी पोरवाडी आणि पेंडेफळ या तीन गावांची एकूण लोकसंख्या आठ हजार इतकी आहे. या गावांना प्रत्येक एक टँकरद्वारे दररोज पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या गावांना शिऊर बस स्थानकाजवळील पाण्याच्या विहिरीतून पाणी पुरवठा केला जाणार आहे. या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी उपमहाव्यवस्थापक मधुकर पठारे, विभाग नियंत्रक किशोर सोमवंशी, विभागीय वाहतूक अधिकारी ए. व्ही. अहिरे यांच्यासह वैजापूर बस स्थानक व्यवस्थापक हेमंत नेरकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

ग्रामस्थांनी मानले एसटीचे आभार

दुष्काळात पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या तीन गावांना एसटीने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रत्येक गावात जाऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभ प्रसंगी गावकऱ्यांनी एसटीच्या रणजित सिंह देओल यांचे आभार मानले.

पाण्याचा स्त्रोत वाढल्यास टँकरची संख्या वाढविणार

शिऊर बस स्थानकाच्या विहिरीतून प्रत्येक गावासाठी एक टँकर दररोज पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विहीरीत पाणी वाढल्यास आगामी काळात या तीन गावांना दोन किंवा तीन फेऱ्यांमध्ये पाणी देण्याचे नियोजन असल्याची माहिती विभाग नियंत्रक किशोर सोमवंशी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील निम्मे टँकर मराठवाड्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील दुष्काळाने आता जगणे असह्य करून टाकले आहे. राज्यात सुरू असलेल्या साडेपाच हजार टँकरपैकी निम्मे टँकर एकट्या मराठवाडा विभागात सुरू असून याद्वारे सुमारे ५० लाख नागरिकांची तहान भागविण्यात येत आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक १०६९ टँकर औरंगाबाद जिल्ह्यात सुरू आहेत.

यंदा अत्यल्प पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. सध्या राज्यातील तब्बल चार हजार ३३१ गावे व नऊ हजार ४७० वाड्यांना पाच हजार ४९३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे चित्र असून यामध्ये सर्वाधिक गावे व वाड्या मराठवाडा विभागात आहेत. सध्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये टँकरचा धुराळा असून दोन हजार ९१८ टँकरद्वारे नागरिकांची तहान भागविण्यात येत आहे. अद्याप किमान तीन आठवडे पावसाची वाट पहावी लागणार असल्याने टँकरसंख्या साडेतीन हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मराठवाडा पाठोपाठ उत्तर महाराष्ट्र विभागात एक हजार २५७ तर पश्चिम महाराष्ट्रात ८८१ टँकरद्वारे पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एकीकडे पेरणीच न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असताना दुसरीकडे पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याची स्थिती मराठवाड्यात आहे. सर्वाधिक टँकरमुळे टँकरवाडा अशी ओळख असलेल्या मराठवाड्यातील सर्वाधिक १०६९ टँकर एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात सुरू आहे. या पाठोपाठ ८८२ टँकरद्वारे बीड जिल्ह्याची तहान भागविण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात ५५३ तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये १६१ टँकर सुरू आहेत. यंदा अत्यल्प पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

गेल्यावर्षी होते केवळ १२४५ टँकर

पाणीसाठे तळाला जात असल्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. गेल्यावर्षी राज्यामध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ११८५ गावे व ७७७ वाड्यांमध्ये १२४५ टँकर सुरू होते. यामध्येही सर्वाधिक ७०९ टँकरद्वारे पाणीपुरवठा मराठवाड्यातील गावांमध्ये करावे लागत होते, तर १७९ टँकरद्वारे उत्तर महाराष्ट्रातील गावांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा राज्यात १५ जूनपर्यंत टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय विभागनिहाय स्थिती

विभाग ................. गावे.............. वाड्या............ एकूण टँकर

कोकण.................२२३................५९५................११२

पुणे....................५२५................२९६०...............७७४

नाशिक ................७३९...............४३७७...............८८१

औरंगाबाद............२०८८.............७३६................२९१७

अमरावती..............२७४...............००.................२८४

नागपूर................३६..................००...................४२

एकूण.................४३३१..............९४७०..............५४९३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावलीने साथ सोडली...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली येते अन् जणू ती गायब होते. हा शून्य सावलीचा रोमांचकारी अनुभव रविवारी (१९ मे) औरंगाबाद शहरातील नागरिकांनी घेतला. दुपारी १२ वाजून २० मिनिटांपासून दोन मिनिटे शून्य सावलीचा रोमांच अनुभवता आला.

पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर, कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्‍यावर येत नाही. तो सदैव उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो, पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्‍यावर आलेला अनुभवयाला मिळतो. सूर्य बरोबर डोक्‍यावर असतो, तेव्हा आपली सावली आपल्या पायाखाली पडते. सध्या उत्तरायण सुरू असून, मे महिना असल्याने ही घटना शहरवासीयांना पाहता आली. यावर्षी १२ मेपासून २१ मेपर्यंत ही खगोलीय घटना मराठवाड्यातील वेगवेगळ्या शहरामधून अनुभवण्यात येत आहे.

रविवारी या खगोलीय घटना पाहण्यासाठी महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्रातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी ११पासून केंद्रामध्ये गर्दी होण्यास सुरुवात झाली. यावेळी ही शून्य सावली का अनुभवयास मिळते यासाठी विशेष मार्गदर्शन हेलिओस मीटर, खगोलिय गोलक यांद्वारे करण्यात आले. यावेळी माहिती केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर यांनी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी केंद्र समन्वयक धनश्री कासार, योगेश साळी, रवींद्र मोरे, संदीप म्हस्के, मयुरी पाटील, मयुरी वैद्य, मनिषा खानापुरे, सिद्धेश औंधकर यांचे सहकार्य लाभले असल्याचे श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा मुलांवर होणार बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील दहा थॅलेसेमियाग्रस्त मुलांवर बोन मॅरो ट्रान्स्लाप्लान्टच्या शस्त्रक्रिया होणार असून, थॅलेसेमियाग्रस्तांसाठी काम करणाऱ्या 'थिंक फाऊंडेशन'च्या माध्यमातून व इतर संस्थांच्या पुढाकारातून या शस्त्रक्रिया येत्या काही महिन्यांत मुंबईत होणार असल्याचे संकेत आहेत. यातील प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी १४ ते १५ लाखांचा खर्च अपेक्षित असून, ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यास संबंधित रुग्ण थॅलेसेमिया मुक्त होऊ शकणार आहे. विशेष म्हणजे सीएम फंड, पीएम फंड, सिद्धीविनायक देवस्थान व इतर अनेक संस्थांकडून या शस्त्रक्रियांसाठी हातभार लागणार असला तरी दहा मुलांवरील शस्त्रक्रियांच्या अवाढव्य खर्चाची जुळवाजुळव करणे अशक्य आहे. त्यामुळेच दानशुरांनी पुढे यावे, असे कळकळीचे आवाहनही औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटीने केले आहे.

कोणत्याच थॅलेसेमियाग्रस्तांमध्ये (थॅलेसेमिया मेजर) रक्तनिर्मितीची प्रक्रिया होत नाही आणि त्यामुळेच प्रत्येक थॅलेसेमियाग्रस्ताला आयुष्यभर दर महिना-पंधरा दिवसांना रक्त द्यावे लागते. रक्त देण्याशिवाय संबंधित थॅलेसेमियाग्रस्तावर बोन मॅरो ट्रान्स्प्लान्टची शस्त्रक्रिया करणे, हादेखील एक पर्याय अलीकडे उपलब्ध झाला आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यास संबंधित रुग्णाला रक्त देण्याची गरज उरत नाही व संबंधित रुग्ण हा थॅलेसेमियावर मात करुन सामान्य जीवन जगू शकतो. मात्र रुग्णावरील शस्त्रक्रियेसाठी संबंधित रुग्णाला जुळणाऱ्या 'बोन मॅरो'ची गरज असते आणि 'एचएलए टायपिंग' तपासणीद्वारे दात्याचा 'बोन मॅरो' जुळतो किंवा नाही, हे स्पष्ट होते. त्यातही कुटुंबातील आई, वडील, भाऊ, बहीण आदी सदस्यांपैकी कुणाचा तरी बोन मॅरो जुळण्याची सर्वाधिक शक्यता असते. अर्थात, ही तपासणी महागडी असतेच; शिवाय फार कमी ठिकाणी ही तपासणी होते. या पार्श्वभूमीवर 'थिंक फाऊंडेशन'च्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यातील ५० थॅलेसेमियाग्रस्त मुलांची एचएलए तपासणी पूर्णपणे नि:शुल्क स्वरुपात अलीकडेच करण्यात आली असून, त्यातील १० मुलांचे बोन मॅरो त्यांच्या दात्यांच्या बोन मॅरोशी जळले आहेत. त्यामुळे १० मुलांवर बोन मॅरो ट्रान्स्प्लान्टच्या शस्त्रक्रिया या मुंबईतील एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल व एमसीजीएम- थॅलेसेमिया अँड बीएमटी सेंटर येथे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातील प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी १४ ते १५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये सीएम फंड, पीएम फंड, सिद्धीविनायक देवस्थान आदींकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच पालकांनाही किमान दोन लाखांचा निधी उभा करावा लागणार आहे. मात्र त्यानंतरही निधीची जुळवाजुळव करण्यासाठी दानशूर व्यक्ती तसेच संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटीच्या वतीने सोसायटीचे सचिव अनिल दिवेकर यांनी केले आहे. निधीची पूर्ण तरतूद झाली तर येत्या दोन ते तीन महिन्यांत शस्त्रक्रियांना सुरुवात होईल व टप्प्याटप्प्याने सर्व शस्त्रक्रिया केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

\Bदानशुरांकडून सढळ हाताने मदत

\Bऔरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटी व सोसायटीतील सगळ्याच थॅलेसेमियाग्रस्तांना आतापर्यंत निरनिरा‌ळ्या संस्था तसेच दानशुरांनी सढळ हाताने मदत केली आहे. डॉ. हेडगेवार रुग्णालय व रुग्णालयाची दत्ताजी भाले रक्तपेढी ही प्रत्येक थॅलेसेमियाग्रस्तामागे अतिशय खंबीरपणे उभी आहे. रक्तपेढीतून प्रत्येक रुग्णाला पाहिजे तेव्हा शुद्ध व नॅट टेस्टेड रक्त नि:शुल्क मिळते. तसेच सोसायटीच्या ट्रान्सफ्युजन सेंटरसाठी रक्तपेढीने स्वतंत्र जागाही उपलब्ध करुन दिली आहे. याच सेंटरसाठी महिंद्रा फायनान्सने रुग्णांच्या खाटांपासून औषधांपर्यंत, तर टीव्हीपासून विविध खेळणीपर्यंत दोन वर्षे भरीव मदत केली. रक्त देण्यासाठी लागणाऱ्या सुमारे एक लाख रुपयांच्या वैद्यकीय साहित्याची मदत 'लायन्स क्लब ऑफ आयकॉन'ने केली, तर तब्बल सहा लाख रुपयांच्या औषधींचा खर्च पुष्कर एजन्सीच्या कांतीलालजी दरडा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आल्याचे दिवेकर म्हणाले.

\Bलिव्हर फाऊंडेशनकडून गोळ्यांचा खर्च

\Bऔरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटीमध्ये नोंद असलेल्या १६५ रुग्णांपैकी १२ रुग्णांना रक्तसंक्रमणातून पांढऱ्या काविळीचा (एचसीव्ही) संसर्ग झाला आहे. यातील एक रुग्णाचा मागच्या वर्षी मृत्यू झाला, तर एक रुग्ण उपचारांनी पांढऱ्या काविळीतून मुक्त झाला. उर्वरित दहा रुग्णांना तीन महिन्यांच्या सुमारे अडीच लाखांच्या औषधी गोळ्या मुंबईच्या चिल्ड्रन्स लिव्हर फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आल्या व २० एप्रिलपासून या गोळ्यांचे उपचारही सुरू झाले आहेत. तीन महिन्यांनी पुन्हा चाचणी होऊन संसर्गित रुग्णांना पुढच्या तीन महिन्यांसाठी गोळ्या देण्यात येणार आहे व त्यासाठी फाऊंडेशनच्या कोषाध्यक्ष डॉ. आभा नगराळ हे पुढाकार घेत असल्याचेही सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसटी बसचालकाचा पाठलाग करून मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एसटी बसचालकाला साइड दिली नसल्याच्या कारणावरून दुचाकीवरील दोघांनी पाठलाग करीत मारहाण केली. हा प्रकार शनिवारी दुपारी पाच वाजता महावीर चौक ते मध्यवर्ती बसस्थानका दरम्यान घडला. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी भगवान देविदास जयकर (वय ३४, रा. गायत्रीनगर, यावल, जि. जळगाव) यांनी तक्रार दाखल केली. जयकर हे एसटी बस घेऊन महावीर चौकमार्गे मध्यवर्ती बसस्थानकाकडे येत होते. यावेळी पेट्रोल पंपाजवळ साइड देण्याच्या कारणावरून दोघांशी त्यांचा वाद झाला. या दुचाकीस्वारांनी त्यांचा पाठलाग करत मध्यवर्ती बसस्थानकासमोर त्यांना गाठले. बसच्या काचा फोडत त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. जयकर यांना त्यांनी लाथाबुक्क्याने मारहाण केली, तसेच हेल्मेटने मारहाण केल्यामुळे जयकर जखमी झाले. याप्रकरणी जयकर यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी आकाश राजू फतरे आणि विकास अशोक फतरे (दोघे रा. आनंदनगर, गारखेडा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार देशमुख तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेखाली उडी घेत मजुराची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मजूर तरुणाने रेल्वेखाली उडी मारत आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी सकाळी आठ वाजता मुकुंदवाडी राजनगर रेल्वे रुळावर उघडकीस आला. सोमीनाथ सोनवणे (वय ३५, रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी), असे या मजुराचे नाव आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून आर्थिक चणचणीतून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सोनवणे यांची प्रकृती बरी नसल्याने ते शनिवारी कामावर गेले नव्हते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत सोनवणे घरी परतले नाहीत. रात्रीच्या सुमारास त्यांनी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. रविवारी सकाळी रेल्वे रुळावर नागरिकांना एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत दिसून आला. पोलिसांनी हा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये रवाना केला. त्यांच्याजवळ असलेल्या कागदपत्रावरून हा मृतदेह सोनवणे यांचा असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी हा प्रकार कळवला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून सोनवणे यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्याला मागितली दहा लाखांची खंडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आर्थिक व्यवहारातून शहरातील व्यापाऱ्याला मोबाइलवर धमकी देत दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. हा प्रकार १५ मे रोजी मध्यरात्री घडला. या प्रकरणी मुंबईच्या चार जणांविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महम्मद अफरोज नूर महम्मद (वय ३८, रा. सफा मरवा कॉम्प्लेक्स, रोशन गेट) यांनी तक्रार दाखल केली. महम्मद अफरोज यांचा मुंबईच्या काही लोकांसोबत आर्थिक व्यवहार होता. या व्यवहारातून त्यांना यापूर्वी मुंबई येथे मारहाण देखील करण्यात आली होती. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर देखील त्यांना वारंवार धमक्या देण्यात येत होत्या. १५ मे रोजी मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास त्यांना कॉल करून दहा लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. या प्रकरणी संशयित आरोपी अब्दुल ताहेर, इम्रान इकबाल, अय्युब मणियार आणि इम्रानचा मित्र (सर्व रा. अजीज कंपाउंड, साकीनाका, मुंबई) यांच्या विरुद्ध खंडणी, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीएसआय दत्ता शेळके हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अचूक हवामान अंदाजासाठी महावेध योजना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

यावर्षात अचूक हवामान अंदाजाकरिता राज्यात महावेध योजना कार्यान्‍वीत करण्‍यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज व कृषी सल्‍ला मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्‍याचे कृषी सचिव एकनाथराव डवले यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या ४७ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषी विभाग, महाराष्‍ट्र शासनातर्फे शनिवारी आयोजित खरीप शेतकरी मेळाव्‍यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्‍ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यकारी संचालक उमाकांत दांगट हे उपस्थित होते. व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक महेश कुलकर्णी, लातूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. बी. आळसे, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डवले पुढे म्‍हणाले की, पारंपरिक शेती किफायतशीर राहिली नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करूनच शेती करावी लागेल. शेती मधील समस्‍या सोडविण्‍याकरिता शेतकऱ्यांना संघटीत होणे गरजेचे असून गटशेती शिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे बाजारातील शेतकऱ्यांची सौदाशक्‍ती वाढीस लागेल., असे ते म्हणाले. उमाकांत दांगट म्‍हणाले की, देशाची अर्थव्‍यवस्‍था पूर्णपणे शेती अर्थव्‍यवस्थेवरच अवलंबून आहे. जागतिकरणाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. सकल राष्‍ट्रीय उत्‍पादनात शेतीक्षेत्राचा वाटा कमी झाला आहे, परंतु आजही रोजगारासाठी ६० टक्के लोकसंख्‍या आजही शेतीवरच अवलंबून आहे. बदलत्‍या हवामानात ज्ञान व तंत्रज्ञानाच्‍या आधारेच शेती करावी लागेल. कुलगुरू डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, मराठवाड्यातील शेतीपुढे अनेक प्रश्‍न आहेत,. येणाऱ्या हंगामात विविध पिकांवरील किडींच्‍या प्रादुभार्वाचे आव्‍हान शेतकऱ्यांपुढे राहणार आहे. यासाठी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व कृषि विभाग शेतकऱ्यांना तंत्रज्ञानात्‍मक पाठबळ देईल. दुष्‍काळ परिस्थितीत विशेषत: हलक्‍या जमिनीवरील मोसंबी बागाचे मोठे नुकसान झाले आहे. त्‍यामुळे हलक्‍या ते मध्‍यम जमिनीत डाळिंब, सीताफळ, अॅपल बोर आदी फळपीक शेतकऱ्यांनी घ्‍यावीत. मोठी मागणी असलेला कापसाचा विद्यापीठ विकसित नांदेड-४४ हा वाण बीटीमध्‍ये परावर्तित करण्‍यात आला असून येणाऱ्या खरीप हंगामात या वाणाचे बियाणे मर्यादित प्रमाणात महाबिज उपलब्‍ध करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव व डॉ. अरूण गुट्टे यांनी केले, तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.

\Bयांना पुरस्कार प्रदान \B

जालना जिल्‍ह्यातील उद्धवराव खेडेकर (शिवनी), जयकिशन शिंदे (वरूडी), पुंजाराम भुतेकर (हिवरडी), औरंगाबाद जिल्‍ह्यातील भरत आहेर (टोणगांव), पत्रकार विजय चौधरी (खुलताबाद), संतोष देशमुख (औरंगाबाद), उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील त्र्यंबक फंड (जळकोटवाडी), विकास थिटे (बावची), बीड जिल्‍ह्यातील बालाजी तट (आपेगांव), रमेश सिरसाट (आरणगांव), संतोष राठोड (वसंतनगर तांडा), लातूर जिल्‍ह्यातील बाबासाहेब पाटील (हेर), अनिल चेळकर (किल्‍लारी), परभणी जिल्‍ह्यातील सदाशिव थोरात (सारोळा खुर्द) यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पुरस्कार प्रदान करून सत्‍कार करण्‍यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादचा पाणीपुरवठा तोडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आपेगाव-हिरडपुरी बंधारा आणि डाव्या-उजव्या कालव्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी २१ मे रोजी औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा तोडणार आहेत. जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी रविवारी झालेल्या बैठकीत निर्णय जाहीर करण्यात आला. पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी दोन आठवड्यांपासून गाजत आहे.

आपेगाव-हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पैठण, गेवराई आणि शेवगाव तालुक्यातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने वारंवार पाठपुरावा करूनही पाणी सोडण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांनी औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा तोडण्याचा निर्णय घेतला आहे. जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी रविवारी शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी, हनुमान बेलगे, शरद गुंते, महादेव गोर्डे, बाबा वाघमोडे, शिवराज शिंदे, पवन औटे, सलीम पठाण, मकबूल पठाण, प्रशांत नरके, अशोक बनगर उपस्थित होते. शेतकऱ्यांनी १३ ते १६ मे या चार दिवसांत विविध पातळीवर आंदोलन केले पण, राज्य सरकार आणि पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला नाही येत्या २३ मे रोजी मतमोजणी असून, नंतर काही दिवस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना शेतकऱ्यांकडे पहायला वेळ राहणार नाही. या दिरंगाईत शेतकऱ्यांच्या संसाराची राखरांगोळी होईल. म्हणून २३ मे पूर्वी पाणी सोडावे, अन्यथा औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा रोखण्याचा येईल असा निर्णय घेतला असे जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले.

\Bसरकारी अनास्था\B

पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री यांनी म्हटले आहे पण, विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांची सहनशीलता संपली आहे. विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जलसंपदा विभागात ठिय्या आंदोलन झाले. तरीसुद्धा प्रशासन पाणी सोडण्याचा निर्णय घेत नसल्याने शेतकरी संतापले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट करारनाम्याद्वारे प्लॉट विक्री; आरोपीला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट स्वाक्षरी व विक्री करारनामे करून दुसऱ्याच्या प्लॉटची विक्री करणारा आरोपी एजंट हामेद खान रफत खान याला रविवारी (१९ मे) अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला मंगळवारपर्यंत (२१ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिले.

या प्रकरणी मोहम्मद रशीदउल्ला मोहम्मद अजीजउल्ला सिद्दीकी (४३, रा. रोहिलागल्ली, देवडी बाजार) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, सिद्दीकी यांची मिटमिटा येथे ६९ गुंठे जमीन आहे. त्या जमिनीवर सिद्दीकी यांनी प्लॉटिंग टाकून १२०० स्क्वेअर फुटाच्या ३९ प्लॉटची विक्री सुरु केली होती. १२ जून २०१८ मध्ये आरोपी एजंट हामेद खान रफत खान (३१, रा. राहत कॉलनी, नेहरुनगर) याने सिद्दीकी यांच्याकडून एक प्लॉट एक लाख रुपयांमध्ये बॉन्ड पेपरवर करारनामा करून खरेदी केला. हामेद याने अगाऊ रक्कम म्हणून दहा हजार रुपये दिले व उर्वरित रक्कम एका महिन्यात देण्याचे ठरले होते. मुदत उलटूनही हामेद याने पैसे दिले नाही. दरम्यान, २५ मार्च २०१९ रोजी नसीर शेख (रा. सिल्लेखाना) हे सिद्दीकी यांना भेटले व त्यांनी 'तुमच्या प्लॉटिंगमधील बॉन्ड पेपरवर करारनामा करुन एजंट हामेद खानने खरेदी केलेले पाच प्लॉट आम्हाला विक्री केले आहे. मात्र तुम्ही जमिनीचे मूळ मालक असल्याने आम्हाला रजिस्ट्री खरेदीखत करुन द्या', असे नसीर शेख हे सिद्दीकी यांना म्हणाले. त्यावर सिद्दीकी यांनी एजंट हामेद याला एकच प्लॉट विक्री केल्याचे नसीर शेख यांना सांगितले. त्यानंतर सिद्दीकी यांनी आरोपी हामेद खान याची भेट घेतली असता, आरोपीने बनावट स्वाक्षऱ्या व बॉन्डपेपरवर खोटे विक्री करारनामे करुन सदरचे प्लॉट वेगवेगळ्या लोकांना विक्री केल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रकरणात फिर्यादी सिद्दीकी यांच्या तक्रारीवरुन सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bया तपासासाठी कोठडी \B

या प्रकरणात आरोपी हामेद खान याला अटक करुन रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीकडून सदर प्लॉटचे नोटरीकृत खरेदीखत करारनाम्यांची मूळ प्रत जप्त करणे बाकी आहे. तसेच प्लॉटच्या खरेदी विक्री व्यवहारात आरोपीला कोणी मदत केली आहे का, याचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सराकरी वकील बालाजी गवळी यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहेश्वरी मंडळाच्या शिबिरात १०५ दात्यांनी केले रक्तदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माहेश्वरी मंडळ समर्थनगर-छावणी प्रभाग व महेश युथ क्लब यांच्या वतीने रविवारी (१९ मे) 'आयएमए' हॉलमध्ये घेण्यात आलेल्या १९ व्या रक्तदान शिबिरात १०५ दात्यांनी रक्तदान केले. शिबिराप्रसंगी माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष रमेशचंद्र दरख, मंडळ अध्यक्ष सी. एस. सोनी, सचिव विष्णू बजाज, महेश युथ क्लबचे अध्यक्ष निखिल सारडा, सचिव गोपाल मुंदडा, समर्थनगर- छावणी प्रभाग अध्यक्ष विजय बाहेती, सचिव जितेश साबू, प्रकल्प प्रमुख मनोज सोमाणी, संदीप चांडक, प्रदीप राठी, पूजा डागा, मनोज तोतला, अनिल बाहेती, पराग बाहेती, पुरुषोत्तम करवा, रंचोडदास चिचाणी, अजित नावंदर, दत्ताजी भाले रक्तपेढीचे महेंद्रसिंग चौहान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विभागीय रक्तपेढीचे डॉ. शैलेश पाटील, देवकुमार तायडे, सुनीता बनकर आदींची उपस्थिती होती. प्रभागातील नंदलाल बाहेती यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन होऊन शिबिराला सुरुवात झाली. यानिमित्त शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळी आठ वाजता सुरू झालेले शिबिर दुपारी दोनपर्यंत चालले. या शिबिरात १०५ दात्यांनी रक्तदान केले. दत्ताजी भाले रक्तपेढी व विभागीय रक्तपेढीतर्फे रक्तसंकलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मानधनमुळ‌े प्रशासनाची डोकेदुखी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणूक मतदानानंतर आता सर्वांना निकालाचे वेध लागले असले तरी, निवडणबक कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा मुद्दा अद्यापही प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाने नुकत्याच आयोजित केलेल्या प्रशिक्षणामध्येही तुटपुंजा मानधनाबाबत कर्मचाऱ्यांची नाराजी दिसून आली.

मतदान, मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या तब्बल आठ हजार कर्मचाऱ्यांना एका दिवसासाटी रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरापेक्षा थोडे जास्त मानधन मिळते मात्र, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निश्चित केलेल्या रकमेशिवाय अधिक मानधन देण्यात येत नसल्याने प्रशासनातील अधिकारी हतबल असून, राष्ट्रीय कर्तव्याच्या नावाखाली कर्मचारीही निमुटपणे निवडणुकीचे काम करत आहेत. मानधन कमी आणि ते मिळवण्यासाठी त्रास अधिक असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी तर, 'आम्हाला तुटपुंजे मानधन नको, कुठे तरी देणगी देऊन टाका,' असेही प्रशासनाला खडसावून सांगितल्याचा प्रकार प्रशिक्षणादरम्यान घडले.

२३ एप्रिल रोजी जिल्ह्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया वगळता केवळ एक दिवसांसाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना ड्यूटी लावण्यात आली होती. जिल्ह्यातील २०२१ मतदान केंद्रांबाहेर नियुक्त करण्यात आलेले चतुर्थश्रेणी कर्मचारी, अतिरिक्त केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), अंगणवाडी सहाय्यक, पोलिस आदींचा समावेश होता, या कर्मचाऱ्यांना एका दिवसाचे केवळ २५० रुपये मानधन देण्यात आले तर, शिपायांना १५० रुपयांवर आनंद मानून घ्यावा लागला.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये केंद्र अध्यक्षांना दररोज ३५० रुपये मानधन देण्यात आले (तीन प्रशिक्षण व मतदानाचा दिवस असे चार दिवस) तर, केंद्रावरील सर्व मतदान अधिकाऱ्यांना प्रत्येक दिवसाचे २५० रुपये देण्यात आले मात्र, याशिवाय प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी नसलेले शिपाई, चतुर्थश्रेणी कर्मचारी, सहाय्यक बीएलओ व शिपायांना तुटपुंजे मानधन देण्यात आले. मतदान होऊन महिना होत असतानाही प्रत्यक्ष या प्रक्रिये सहभागी झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना अद्यापही मानधन मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत.

\B

देणगी देण्याची इच्छा\B

निवडणूक प्रक्रियेमध्ये विविध विभागांतील अधिकाऱ्यांचीही नेमणूक कामासाठी करण्यात आली होती. यातील अनेक अधिकारी प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी दर्जाचे आहेत. त्यांनाही दीड हजार रुपये मानधन देण्यात आले. त्यामुळे यातील अनेक कर्मचाऱ्यांनी आम्ही ही तुटपुंजी रक्कम देणगी स्वरुपात देण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलईडी बल्बच्या गोदामाला भीषण आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा एमआयडीसी एलईडी बल्बच्या गोदामाला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. हा प्रकार रविवारी सकाळी बारा वाजेच्या सुमारास घडला. इलेक्ट्रॉन एनट्री इफेसिन्सी प्रा. लि. या कंपनीचे हे तीन मजली गोदाम असून या कंपनीला महापालिकेने पथदिवे बदल्याचे काम दिले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सात तासानंतर यश आले.

दिल्लीतील इलेक्ट्रॉन कंपनीने शहरात पथदिवे बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एलईडी बल्ब मागवले होते. हे साहित्य ठेवण्यासाठी कंपनीने ब्रिजवाडी भागात एका वर्षापूर्वी गोदाम भाड्याने घेतले आहे. दुपारी बारा वाजेच्या सुमारास या गोदामातून अचानक आगीचे लोळ उठले. शेजारील कंपन्याच्या वॉचमनने हा प्रकार पाहिला. ब्रिजवाडी येथील तरुणांनी देखील आग विझवण्यासाठी धाव घेतली. सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एपीआय शेख अकमल, पीएसआय सुरेश जारवाल आदी इतरांनी घटनास्थळ गाठले. अग्निशमन दलाला माहिती कळवल्यानंतर पालिका, गरवारे आणि चिकलठाणा एमआयडीसीचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतरही आग आटोक्यात येत नसल्याने सतत पाण्याचे टँकर मागवण्यात येत होते. या आगीची माहिती मिळाल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक परमेश्वर बनसोडे, सय्यद शहा अब्दुल हक व अभय गुळवे यांनी धाव घेतली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सहा ते सात तास लागले.

\Bतरुणांच्या सतर्कतेने वाचली वाहने\B

गोदामाला आग लागली त्यावेळी त्याच्या आवारात दोन छोटा हत्ती ही वाहने उभी होती. ब्रिजवाडीतील तरुणांनी सतर्कतेने ती बाहेर काढली. यामध्ये रणजीत मोरे, सतीश शिनगारे, मिलिंद पाखरे, सुमीत शिंदे, बाळू साळवे आदींचा समावेश होता.

\Bथर्माकोलमुळे भडकली आग\B

नवीन एलईडी बल्ब गोदामाच्या वरच्या मजल्यावर होते. हे बल्ब पुठ्यात आणि थर्माकोलमध्ये पॅकिंग केलेले होते. यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. तसेच गोदामाच्या खालच्या मजल्यावर जुने बल्ब, ट्युब आणि केबल वायर ठेवण्यात आली होती. साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने या गोदामाचे स्थलांतर करण्यात येणार होते, मात्र त्यापूर्वीच ही दुर्घटना घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळी योजना फक्त कागदावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

सध्या तालुक्यात उन्हाचे चटके बसत आहेत, मात्र प्रशासन व शासनाच्या निष्क्रियतेमुळे पोटालाही चटका बसत आहे. माणसांबरोबरच जनावरेही हाल भोगत आहेत. हाताला काम, पोटाला अन्न, जनावरांना चारा व पिण्यास पाणी नाही, अशी तालुक्यातील परिस्थिती झाली आहे. प्रशासनाची कुठलीही योजना फक्त कागदावरच लागू आहे., अशी टीका माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी शनिवारी तालुक्यात दुष्काळी दौरा केल्यानंतर केली.

डॉ. काळे यांनी किनगाव फाटा येथून दौरा सुरू केला. रेगलाव, निधोना, बोरगाव अर्ज, ममनाबाद, धानोरा या चार सर्कलमध्ये गावागावात नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झाले. महत्त्वाचे म्हणजे हाताला काम, जनावरांना चारा, पिण्याचे पाणी यावरच दुष्काळग्रस्तांनी वेदना मांडल्या. जनावरे विकण्याची वेळ आली आहे, दुधाला भावही मिळत नाही. आता जनावरे विकली, तर अर्धी किंमत येत नाही, विकल्यानंतर दुसरी जनावरे घेऊच शकत नाही, अशा भावना दुष्काळग्रस्तांनी मांडल्या.

तालुक्यात वडोद बाजार सर्कलमध्ये सर्वाधिक भयंकर दुष्काळ आहे. पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी तीन-तीन हजार रुपये भरले. मात्र पीक विमा १३३८ रुपयेच मिळाला. विमा भरलेल्या रकमेच्या रकमेचा अर्धा देखील पीक विमा मिळाला नाही. विहिंरी कोरड्या पडल्या आहेत. काही विहिरीत फक्त पाणी चमकते, सर्वत्र शेती ओसाड झाली आहे, झाडे वाळून गेली असून शेतवस्त्यांवर माणूस नाही. अशी स्थिती कधीच ओढावली नव्हती, असे यावेळी सांगण्यात आले.

पाल व कोलते टाकळी येथे चारा छावण्या सुरू होऊन महिना उलटला, मात्र शासनाकडून निधी मिळाला नसल्याने छावणी चालक हतबल झाले आहेत. यापुढे हा खर्च शक्य नसल्याचे सांगण्यात आले. चारा व पाणी आणण्यासाठी रोख रक्कम द्यावी लागते, हा पैसा कोठून आणायचा, असा प्रश्न असल्याचे छावणी चालकांनी सांगितले.

या दौऱ्यात तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, बबलू चौधरी, पुडलिक जंगले, सुदाम मते, संतोष मेटे, सदाशिव विटेकर, शामराव साळुंखे, गणेश क्षीरसागर, कचरू मैंद, राजू चव्हाण, बाबुराव डकले, युनूस पठाण, अमोल डकले, रज्जाक शेख, ज्ञानेश्वर जाधव, संदीप डकले, कारभारी वाहटुळे यांच्यासह पदाधिकारी सामील झाले.

\Bउद्या रास्ता रोको \B

काँग्रेस पक्षातर्फे दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (२१ मे) सकाळी ११ वाजता फुलंब्री येथील टी-पॉइंटवर रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष संदीप बोरसे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीच्या लेबर रुममध्ये शॉर्टसर्किट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाच्या लेबर रुममध्ये रविवारी (१९ मे) रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास शॉर्टसर्किट झाला. लेबर रुमच्या वायरिंगमध्ये आधी स्पार्किंग झाले व त्यानंतर थोड्याप्रमाणात जाळ झाला. मात्र परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणण्यात आली. या प्रकारात कोणत्याही रुग्णाला कसलाही त्रास झाला नाही, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्र, सूर्याला ग्रहण कसे लागते, पिधान म्हणजे काय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सूर्य मालेची वैशिष्ट्ये कोणती, चंद्र, सूर्याला ग्रहण कसे लागते, पिधान म्हणजे काय, अशा विविध प्रश्नांची उत्तरे मिळविण्यात मुले गर्क झाली होती. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांकडून तातडीने उत्तरेही दिली जात होती. त्यामुळे मुलांचा उत्साह सातत्याने वाढत होता. निमित्त होते औरंगाबाद येथील एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या मूलभूत खगोलशास्त्र उन्हाळी शिबिराचे. या शिबिराला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे अनेक ज्येष्ठांनीही यात हिरीरिने सहभाग घेतला.

१७ ते १९ मे अशा दोन कालावधीत हे शिबिर घेण्यात आले. यासाठी शालेय मुलांपासून ऐंशी वर्ष असलेल्या जेष्ठ नागरिकांपर्यंत ४० जणांनी सहभाग नोंदवला. यामध्ये औरंगाबादसह मलकापूर, बुधवड, पुणे, ठाणे, नांदेड, अंबाजोगाई, अंमळनेर, हैदराबाद येथील विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग घेतला.

या शिबिरात खगोलशास्त्रीय मूलभूत संकल्पना, व्याख्या, राशी, नक्षत्रे , तारकाचक्र, नकाशा वाचन, खगोलीय अंतरे, ताऱ्यांची वर्गवारी, तेजस्वीता सूर्य व सूर्य मालेची वैशिष्ट्ये, चंद्र व सूर्य ग्रहणे, अधिक्रमण, पिधान, उल्का वर्षाव, वर्षभरातील तारखा, दुर्बिणींचे प्रकार, द्विनेत्री, फिल्टर्स, माऊंटचे प्रकार, कॅमेरा, अॅस्ट्रो फोटोग्राफी, फोटोमीटर तसेच येत्या काळातील खगोलशास्त्र अशा अनेक विषय तज्ञांमार्फत प्रात्यक्षिकांसहित शिकविण्यात आली असल्याचे एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

२४ रोजी शिबिराचे आयोजन

२४ ते २७ मे दरम्यान या शिबिराचे पुन्हा एकदा आयोजन करण्यात आले आहे. या साठी ११ वर्षांपुढील व खगोलशास्त्र विषयी आवड असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या वर्गामध्ये सहभागी होता येणार आहे. या शिबिरासाठी २३ मे पर्यंत आपली नाव नोंदणी एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्लब येथे करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images