Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वामनदादा आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'लोककवी वामनदादा कर्डक यांचे जीवन अत्यंत खडतर होते. त्यांनी आंबेडकरी चळ‌वळ सामान्यांपर्यंत पोहचवत नवी ऊर्जा निर्माण केली. वामनदादा आंबेडकरी चळवळीचे खरे भाष्यकार होते', असे प्रतिपादन समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले. ते विद्यापीठात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वामनदादा कर्डक अध्यासन केंद्राच्या वतीने 'गीत स्वरांजली' कार्यक्रम घेण्यात आला. विद्यापीठाच्या नाट्यगृहात बुधवारी झालेल्या कार्यक्रमाला डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. दिलीप महालिंगे, परीक्षा संचालक डॉ. गणेश मंझा, अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. युवराज धबडगे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राहुल म्हस्के, प्राचार्य किशोर साळवे, प्रताप कलावंत उपस्थित होते. 'वामनदादा कर्डक यांनी दहा हजार गाणी लिहिली. या गाण्यांचे संकलन करुन ते प्रकाशित करण्याची जबाबदारी अध्यासन केंद्राने घ्यावी व पूर्णत्वास न्यावी', असे डॉ. कांबळे म्हणाले. डॉ. महालिंगे यांनी वामनदादा यांच्या सहवासातील आठवणी सांगितल्या. गाणे सूचणे ते सादरीकरण यावर वामनदादा ठाम असत. तोच विचार त्यांच्या मनात घोळत असायचा असे महालिंगे म्हणाले.

दरम्यान, दुसऱ्या सत्रात प्रतापसिंग बोदडे आणि सहकाऱ्यांनी 'गीत स्वरांजली' कार्यक्रम सादर केला. वामनदादांची विविध गाणी कलाकारांनी गायली. चेतन चोपडे, डॉ. किशोर वाघ, अजय देहाडे यांनी साथसंगत केली. डॉ. बाबासाहेब गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला डॉ. बाळासाहेब लिहिणार, मोहन सौंदर्य, मिलिंद वाव्हळे, डॉ. राहुल तायडे, डॉ. मुरलीधर इंगोले यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व रसिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अजिंठा लेणीच्या बसचे ब्रेक फेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फर्दापूर: अजिंठा लेणीच्या प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वातानुकूलित बसेचे ब्रेक फेल होऊन चालकाचा ताबा सुटल्यामुळे ती झाडावर आदळली. या अपघातात नऊ कामगार जखमी झाले. त्यांच्यावर फर्दापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेची नोंद फर्दापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी सकाळी साडे नऊ वाजता सोयगाव आगाराचे चालक नितेश छगन कोळी हे टी पॉइंट येथून वातानुकूलित बसमध्ये (एम एच १४, बी टी २१६६) पर्यटक व कामगार यांना घेऊन लेणीकडे जात होती. त्यावेळी टी पॉइंट जवळच्या वळणावर बसचे ब्रेक फेल होऊन ती झाडावर आदळली. या अपघातात अख्तर खान बिसमिल्ला खान, फारुख खान मजीत खान, अनिल आरक हे तिघे गंभीर जखमी झाले. जीवन आठोले, चंद्रकांत आरक, शेख महेमुद, विशाल शिंदे, सुभाष सुरवाडे, हे कामगार जखमी झाले. मात्र, एकाही पर्यटकाला मार लागला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीएचबी’ नियुक्त्यांची विभागनिहाय चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियमबाह्य नियुक्त्या केल्याप्रकरणी पाली विभागाची विभागनिहाय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार याचिकाकर्त्यांनी राजभवनकडे तक्रार केली आहे. तीन उमेदवारांची स्थानिक समितीने सदोष पद्धतीने निवड केल्याचा आक्षेप होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पाली आणि बुद्धिझम विभागातील सीएचबी नियुक्त्या वादात सापडल्या आहेत. तासिका तत्त्वावरील दोन जागांसाठी ३० एप्रिल २०१६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही निवड ११ महिन्यांसाठी करण्यात आली होती. तसेच दरमहा २४ हजार रुपये निश्चित मानधन होते. मुलाखतीसाठी पाच सदस्यांची समिती होती. मात्र, निवड प्रक्रियेत विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम पाळले गेले नाही, असा आक्षेप उमेदवार सुचिता इंगळे यांनी घेतला होता. विद्यापीठ प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे इंगळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने संबंधित उमेदवारांना पदावरुन काढण्याचे आदेश दिले होते. पण, विद्यापीठ प्रशासनाने पदमुक्त करीत अनुभव प्रमाणपत्र दिले. थेट गुणांकन करण्याची चूक निदर्शनास आल्यानंतर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढत विभागनिहाय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर योग्य कारवाई करणे अपेक्षित आहे. याचिकाकर्त्याच्या बाजुने अॅड. शिरीष कांबळे यांनी बाजू मांडली.

दरम्यान, पाली आणि बुद्धिझम विभागाची चौकशी करण्याबाबत राजभवनकडे तक्रार करण्यात आली आहे. निवड समितीवर गुन्हे दाखल करण्याची तक्रारकर्त्यांची मागणी आहे. अपात्र उमेदवारांची नियुक्ती वादात सापडल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाचा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे.

आचारसंहिता भंगाची तक्रार

राजभवनच्या संकेतस्थळावर भाजपशी निगडीत पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे आणि मजूकर होता. वेबसाइटर लॉग इन केल्यानंतर हा मजकूर वाचनात येत होता. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आपण भाजपशी संबंधित असल्याचे या माध्यमातून खुलेपणाने दाखवले. हा आचारसंहितेचा भंग असून कारवाई करावी अशी मागणी मराठवाडा विकास कृती समितीने निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. या पत्रावर अॅड. शिरीष कांबळे, हनुमंत गुट्टे आणि प्रा. दिगंबर गंगावणे यांची स्वाक्षरी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातग्रस्तांना मदत करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अपघातानंतर फोटो, व्हिडिओ काढत बसण्यापेक्षा माणुसकी जपा आणि आधी अपघातग्रस्तांना प्लीज मदत करा. तुम्हाला मदत करणे शक्य नसेल तर, अॅम्ब्युलन्सला फोन करा. आमच्या नातेवाईकांना वेळीच मदत मिळाली असती तर, त्यांचे प्राण नक्कीच वाचले असते. त्यामुळे अपघातात जखमी झालेल्यांना कृपा करून मदत करा, असे कळक‌ळीचे आवाहन अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांनी केले. 'अॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स'तर्फे रविवारी (१९ मे) झालेल्या कार्यक्रमात मृतांचे नातेवाईक बोलते झाले.

अपघातग्रस्तांना मदत करण्याची मानसिकता शहरवासीयांमध्ये वाढावी, त्यासाठी नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा आणि जमेल तशी जमेल तिथे मदत करावी आणि अपघातग्रस्तांचे प्राण वाचावेत, या हेतूने 'अॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स'तर्फे क्रांतीचौकातील झाशीची राणी उद्यानासमोर हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी आमदार संजय शिरसाठ, आमदार अतुल सावे, निवृत्त पोलिस अधिकारी नरेंद्र मेघराजानी, अनिल मकरिये, पृथ्वीराज पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या काही दिवसांपूर्वी दौलताबाद रोडवर झालेल्या अपघातात सुमित कवडे या तरुणाचा वेळीच मदत न मिळाल्याने मृत्यू झाला. या तरुणाचे काका राकेश कवडे यांनी, अपघातग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करतानाच 'हेल्प रायडर्स'च्या कार्याचे कौतुक केले. शहरातील टीव्ही सेंटर येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेले डॉ. अतुल देशमुख यांचे नातेवाईक स्वप्नील देशमुख म्हणाले, पोलिसांसह कुणीच मदत केली नाही. तब्बल ४० मिनिटे डॉ. अतुल हे जमिनीवर पडून होते, पण त्यांना मदत करण्याची साधी माणुसकी कुणी दाखवली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यानिमित्त, कुठे ना कुठे अपघातात जखमी झालेले मिलिंद लिहिणार, आदिनाथ जंगले, अमर उगले यांच्यासह पुण्याच्या 'हेल्प रायडर्स'चे डॉ. रोहित बोरकर यांनीही मदतीचे आवाहन केले. पोलिसांत तक्रार देणाऱ्यांनी नाव दिलेच पाहिजे, असे अजिबात नाही. हा नागरिकांना अधिकार मिळाला आहे; परंतु त्याचवेळी अपघातग्रस्तांना मदत करण्याचे कर्तव्यदेखील नागरिकांनी पार पाडले पाहिजे, असे सांगताना निवृत्त पोलिस अधिकारी नरेंद्र मेघराजानी यांनी रुग्णवाहिकेला तातडीने रस्ता देण्याचे आवाहन केले. सायरन वाजताच नागरिकांनी आपली वाहने डावीकडे घ्यावी आणि रुग्णवाहिकेला जाण्यासाठी उजवीकडे वाट करुन द्यावी, असेही ते म्हणाले. तसेच एक १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका 'हेल्प रायडर्स'साठी द्यावी व नागरिकांनी हेल्मेटसह वाहतूक नियमांचे पालन करावे, अशीही त्यांनी सूचना केली. संदीप कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. मधुरा दीक्षित यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

\Bजखमींचे फोटो काढण्यात कोणते थ्रील?

\Bअलीकडे अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यापेक्षा सर्रास फोटो, व्हिडिओ काढले जातात मात्र, जखमींचे फोटो काढण्यात कोणते थ्रील आहे? त्यापेक्षा अपघातग्रस्तांचे प्राण वाचवून समाधान मि‌ळवा, असे आवाहन करत आमदार शिरसाठ म्हणाले, १२ वर्षांपूर्वी महापालिकेचा सभागृह नेता माझा पडेगावात अपघात झाला होता. समोरासमोर गाड्यांची टक्कर झाली होती व आमच्या गाडीचा असा काही चक्काचूर झाला होता की यात कोणी वाचू शकेल, यावर कुणाचा विश्वास बसू नये, अशी गाडीची अवस्था झाली होती. मी रक्तबंबाळ झालो होतो व माझ्यासोबतचा बेशुद्ध झाला होता. त्याचवेळी रोडवरून छापा टाकण्यासाठी निघालेल्या अबकारी खात्याच्या अधिकाऱ्याने आम्हाला तातडीने मदत केली व मला घाटीत दाखल केले म्हणून मी आज तुमच्या समोर आहे, असेही शिरसाठ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशाची बॅग चोरली; आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पत्नी व मित्रांसह देवदर्शनाहून रेल्वेने घरी परतणाऱ्या प्रवाशाची बॅग लांबवल्याप्रकरणात आरोपी शेख सोहेल शेख शार्दुल याला शनिवारी (१८ मे) रात्री लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला मंगळवारपर्यंत (२१) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिले.

या प्रकरणात व्यंकटेशवरलू सिरानी सुब्रमण्यम नायडू (३८, रा. आंध्रप्रदेश) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, नायडू हे पत्नी व मित्रांसह १४ एप्रिल रोजी शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेले होते. ते शुक्रवारी (१७ मे) साईनगर शिर्डी-विशाखापट्टणम एक्सप्रेसने घरी परतत असताना शनिवारी पहाटे मुदखेड ते शिवनगाव स्थानकादरम्यान नायडू व त्यांच्या पत्नीला झोप लागली. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांची बॅग चोरुन नेली. या बॅगमध्ये रोख ३० हजार रुपये, तीन मोबाईल, सोन्याची अंगठी व कागदपत्रे, असा सुमारे ६६ हजार रुपये किंमतीचा ऐवज होता. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीनंतर नांदेड लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी शेख सोहेल (२४, रा. नवी अबादी, मुदखेड, नांदेड) याला अटक करण्यात आली. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने चोरी केलेला ऐवज जप्त करणे बाकी आहे. तसेच आरोपीने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केला असण्याची दाट शक्यता असून, प्रकरणाचा सखोल तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाद्याच्या नादात मुले रमली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाद्य वाजवण्याच्या अनुभूतीतून संगीत शिकण्याचा अभिनव प्रयोग असलेले अवलोकन शिबिर नुकतेच झाले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकसंगीत ते पाश्चात्य संगीताचे परिपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. पालकांसाठी स्वतंत्र सत्र घेऊन मुलांची आवड जोपासण्याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

कृष्णगुंजच्या वतीने 'अवलोकन' संगीत कार्यशाळा घेण्यात आली. पाच ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांना संगीतविषयक माहितीसोबत विविध खेळ, गाणी व गोष्टींच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत तीन गाणे शिकण्यासोबतच विविध वाद्यांची ओळख करून देण्यात आली. बासरीवादक निरंजन भालेराव यांनी वाद्ये, अलंकार, रागांची ओळख करून दिली. शिबिराच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. संदीप शिसोदे यांनी 'आई, बाबा आणि मी' हा समुपदेशन वर्ग घेतला. गायक श्रीराम पोतदार, कवी गणेश घुले यांच्या 'सुंदर माझी शाळा' या बालकवितासंग्रहातील कवितामध्ये मुले रमली. व्हायोलीन वाद्याची माहिती सुरेश विधाते यांनी दिली. शास्त्रीय संगीत व नाट्य संगीताबाबत मानसी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. शाहीर अजिंक्य लिंगायत यांनी शाहिरी परंपरेचे प्रकार शिकवले. ढोलकीवादक कल्याण उगले यांनी लोकसंगीतातील संबळ, ढोलकी, दिमडी, हलगी, बगलबच्चा, तुनतुना या पारंपरिक वाद्यांचे प्रात्यक्षिक दाखवले. मानसोपचार तज्ज्ञ शिवाली कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मुलांना विशेष भावले. पालकांसाठीही एक सत्र घेण्यात आले. राहुल जोशी यांनी पाश्चिमात्य वाद्ये शिकवली. या शिबिराच्या यशस्वितेसाठी सुधीर भालेराव, आदिती कोल्हटकर, सरोज मुरुमकर, सुरेखा भालेराव, विजया कुलकर्णी, अदिती वालवडकर, पूजा काळे यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्री तालुक्याचा घसा कोरडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यातील पाणी टंचाई तीव्र झाली असून अबालवृद्धांना भटकंती करावी लागत आहे. अनेक ठिकाणी हंडाभर पाणी काढण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. तालुक्यातील ९३ गावांपैकी ६६ गावांत १०२ टँकर सुरू आहेत, तर २७ गावात ५४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडल्या आहेत.

तालुक्यात ९३ गावांसाठी ७१ ग्रामपंचायती आहेत. बहुतांश ठिकाणी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, भारत निर्माण योजना व इतर योजनेच्या पाणीपुरवठा योजना आहेत. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे भूजल पातळी खालावली आहे. पाणी योजनांचे स्त्रोत आटल्यामुळे नळ योजना कुचकामी ठरल्या आहेत. अनेक हातपंप कोरडे पडले आहेत. तालुक्यातील तलाव, पाझर तलाव हिवाळ्यातच कोरडे पडले. सांजूळ तलावातील पाणी संपत आले आहे. चारा व प्यायला पाणी नसल्याने जनावरांचे हाल होत आहेत.

\Bपाणी व्यावसायिकांची चांदी \B

तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांना मोलमजुरी करून पोट भरावे लागते. त्यातच दुष्काळामुळे कामे कमी झाल्याने मजुरांवर बेरोजगारीचे सावट आहे. नागरिक पहाटे किंवा रात्री-अपरात्री पाण्यासाठी भटकंती करत आहेत. आधी पाणी भरावे की पोट?, असा प्रश्न अनेकांपुढे आहे. सुटीत मस्ती करण्याऐवजी विद्यार्थ्यांना पाणी भरावे लागत आहे.ही संधी साधून अनेक जण आर.ओ.चे किंवा टँकरच्या माध्यमातून पाणी विकत आहेत. वीस लीटरचा पाण्याचा जार २५ ते ३० रुपयांना खरेदी करावा लागत आहे.

\Bहातपंपाचे कोरडे \B

तालुक्यात भूजल पातळी खालावल्यामुळे हातपंप कोरडे पडले आहेत. काही ठिकाणी हातपंप दुरुस्ती करण्यात येत आहे.

\Bटँकर सुरू असलेली गावे \B

आडगाव खुर्द, गेवराई पायगा, नरला भावडी, महाल किन्होळा, नायगव्हाण, जळगाव मेटे, शेलगाव खुर्द, गिरसावळी, पीरबावडा, तळेगाव, सताळ पिंप्री, रांजणगाव, शेलगाव जानेफळ, रिधोरादेवी, गेवराई गुंगी, आडगाव, बाभुळगाव खुर्द, गुमसताळा, बोरगाव अर्ज, भोयगाव, शेवता खुर्द, धनशी वस्ती, पिंपळगाव वळण वस्ती, बाबरा, वाघलगाव, धानोरा, हिवरा, खामगाव, आडगाव बुद्रुक, टाकळी कोलते, वाकोद, शिरोडी खुर्द, पाथ्री, वडोदबाजार, बाभुळगाव तरटे, बोधेगाव, निधोना, ममनाबाद, मुर्शिदाबाद वाडी, पेंडगाव आळंद, दरेगाव दरी, सुलतान वाडी, जातवा, उमरावती, पाल, चिंचोली नकीब, आळंद, डोंगरगाव कवाड, सताळा बुद्रुक, कान्होरी, मारसावळी, डोंगरगाव शिव, भालगाव, वाहेगाव, वावना, शिरोडी बुद्रुक, वानेगाव, वारेगाव.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डांबराच्या टँकरची धडक; मुलगी ठार, दोन जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथून वैजापुरकडे येणाऱ्या दुचाकीला डांबराच्या टँकरने धडक दिल्याने दुचाकीवरील १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला व मामा-भाचे गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी ११ वाजता गंगापूर रस्त्यावरील चिंतामणी ट्रेडिंगसमोर घडला.

पूजा अशोक कनगरे (वय १४), असे मृत मुलीचे नाव आहे. प्रकाश लक्ष्मण सोळसे (वय २२, रा. मोंढा मार्केट, वैजापूर) व राहुल अशोक कनगरे (वय १२, रा. नेवरगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. राहुल याच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. प्रकाश सोळसे हे भाचा राहुल व भाची पूजा यांना दुचाकीवरून (एम एच १५ एफ के २९९६) वैजापूरला येत होते. गंगापूर रस्त्यावर चिंतामणी ट्रेडिंगसमोर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या डांबराच्या टँकरने (एम एच ०६ बी डी ०२७०) जोराची धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील तिघे रस्त्याच्या खाली फेकले गेले. या घटनेत पूजाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर टँकरचालकाने पळ काढला. याप्रकरणी संतोष सोळसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चंपालाल चरभरे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांसाठी अडीच हजारांवर शेतीशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पेरणीच्या आधीपासून ते पीक काढणीनंतर प्रत्येक टप्प्यात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, यासाठी कृषी विभागाने खरीप हंगामासाठी खास शेतीशाळांचे आयोजन केले आहे. औरंगाबादसह संचालक कार्यालय क्षेत्रात दोन हजार ६५२ शेतीशाळांचे नियोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्याचा समावेश होतो. या औरंगाबाद विभागात खरीप हंगामाचे सरासरी पेरणी क्षेत्र २० लाख ८४ हेक्टर असून, यंदा २१ लाख १५ हजार हेक्टर हे पेरणी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. या खरीप हंगामासाठी पेरणीच्या आधीपासून ते पीक काढणीपर्यंत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, यासाठी शेती शाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षकांमार्फत प्रत्येकी एका गावात शेतीशाळा राबविणे. क्रॉपसॅपअंतर्गत मागील वर्षी फिक्स्‌ड प्लॉटसाठी निवडलेल्या गावात व सर्वात जास्त क्षेत्र असलेल्या पिकासाठी शेतीशाळा राबविण्यात यावी, असे निर्देश कृषी विभागाचे आहेत.

औरंगाबाद विभागातील तीन जिल्ह्यांत मिळून कृषी विभागामार्फत एक हजार ४२ शेतीशाळा घेण्यात येणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (ना.दे.कृ.सं.प्र) एक हजार ५२६, 'आत्मा'मार्फत ८४ असे एकूण दोन हजार ६५२ शाळा या यंत्रणामार्फत राबविण्यात येणार आहे. एक हजार १८१ कर्मचाऱ्यांकडे खास जबाबदारी देण्यात आली असून, एक हजार ८८९ गावांमध्ये शेतीशाळांचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

\Bविविध यंत्रणांच्या माध्यमातून शेतीशाळांचे नियोजन\B

जिल्हा...........गावे.........कृषी विभाग.....ना.दे.कृ.सं.प्र.......आत्मा.....एकूण शेतीशाळा

औरंगाबाद......६२६...............३५६..............४८६...........२७...........८६९

जालना..........५७९...............३११..............४८८...........२४...........८२३

बीड..............६८४...............३७५..............५५२...........३३...........९६०

एकूण............१,८८९...........१,०४२...........१,५२६........८४...........२,६५२

(ना.दे.कृ.सं.प्र : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढगफुटीत बीडमधील सहा जणांचे कुटुंब बेपत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

ओमान देशात नोकरी करीत असणाऱ्या मुलाकडे भेटण्यास गेलेल्या वडील, आई, पत्नी आणि तीन चिमुरड्यांवर निसर्गाच्या अवकृपेने घाला घातला. अचानक झालेल्या ढगफुटीत खान कुटुंबियातील सहाजण बेपत्ता झाले असून तेथील प्रशासन बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहे.

माजलगाव शहरातील बुखारी विद्यालयातील निवृत्त शिक्षक खैरुला खान सत्तार खान यांचा मुलगा ओमान देशातील मस्कत येथील आयबीएन अल हैतान या ठिकाणी नोकरीस आहे. आपल्या मुलाकडे ते त्यांच्या कुटुंबियांसह सहा मे रोजी गेले होते. तेथे गेल्यानंतर तेथील एका पर्यटनस्थळी खान कुटुंबीय खाजगी वाहनाने जात असताना अचानकपणे ढगफुटी झाल्याने त्यांच्या वाहनास समोरील काही दिसेनासे झाले. पुढे काय झाले हे पाहण्यासाठी त्यांचा मुलगा सरदार खान हा गाडीच्या बाहेर पडला काही मिनिटातच वातावरणात बदल होऊन तुफान वाऱ्याने वातावरणच बदलून टाकले. त्यावेळीच जोराच्या पावसाला सुरुवात होऊन पाण्याचा मोठा ओढा या प्रवासी वाहनात शिरला. यावेळी या वाहनात त्यांची खैरुला खान त्यांची पत्नी, त्यांची सून सरदार खान यांची चार वर्षीय एक मुलगी, दोन वर्षीय एक मुलगा आणि अवघ्या २२ दिवसांचा मुलगा यात होता. काही कळण्याच्या आतच आलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहन वाहून गेले. यात सरदार खान देखील घेरले गेले, परंतु सुदैवाने कसेबसे पोहत ते सुखरूप या ढगफुटीतून बाहेर पडले. या घटनेची माहिती सरदार खान यांनी मोबाइलवरून सांगितली. घटनेच्या ठिकाणी झालेल्या ढगफुटीत अनेक पर्यटक नागरिक अडकले असून तेथील प्रशासन मदतकार्य आणि शोधमोहीम सुरू झाली आहे. या घटनेने माजलगाव शहरावर शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौताळ्यात बिबट्यासह इतर प्राण्यांचे दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

गौताळा अभयारण्य परिसरात दरवर्षी प्रमाणे यंदाही बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्य प्राण्यांची गणना वन्यजीव विभागाकडून करण्यात आली. शनिवारी (१८ मे) गौताळा, नागद व पाटणादेवी परिसरात प्राणी गणना करण्यात आली.

या परिसरात काही पाणवठ्याजवळ कृत्रीम मचाण उभारून तर काही पाणवठ्याजवळील लोखंडी टॉवर, वन विभागाच्या पाहणी टॉवरवर एक वन्यजीव विभागाचा कर्मचारी तसेच निसर्गप्रेमींच्या उपस्थितीत प्राणी गणना करण्यात आल्याची माहिती वन्यजीव विभागाचे रत्नाकर नागापूरकर यांनी दिली. गौताळा अभयारण्य परिसरातील २२ हजार हेक्टर क्षेत्रातील ५० पाणवठे, १० नैसर्गिक पाणवठ्यावर १०० वन कर्मचारी व ११० निसर्गप्रेमींनी प्राणी गणना केली. गौताळा अभयारण्यात हिवरखेडा वन्यजीव विभागातील १० हजार ५०० हेक्टर क्षेत्रामध्ये २१ पाणवठे, नागद वन्यजीव विभागातील ८ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये २२ पाणवठे, तर पाटणादेवी वन्यजीव विभागातील ६ हजार हेक्टर क्षेत्रात १८ पाणवठे तयार करण्यात आले होते. हिवरखेडा विभागातील चंदन नाला, नाटी, भुगदरा परीसरातील पाणवठ्यावर बिबट्या आल्याचे दिसून आले. या अभयारण्यात रविवारी (१९ मे) सायंकाळी चार वाजेपर्यंत वन्य प्राणी गणना करण्यात आली.

हे प्राणी आढलले
पाणवठ्यावरील कॅमेरात बिबट्या, कोल्हा, उदक मांजर, नीलगाय, हरीण, साळिंदर, मोर, रानडुक्कर हे प्राणी आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजचा विमानप्रवास १३ हजारांनी महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हजसाठी औरंगाबादहून जाणाऱ्या यात्रेकरूंना प्रवास तब्बल १३ हजारांनी महाग झाल्याने भाविकांची कोंडी झाली आहे. सध्या ८८१ यात्रेकरूंनी औरंगाबादहून थेट जेद्दाहला जाण्याचा पर्याय निवडला आहे.

मुस्लिम धर्मियांसाठी हजची यात्रा पवित्र समजली जाते. राज्यभरातून औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई येथील केंद्रावरून भाविकांना हज यात्रेला जाता येते. दरवर्षी हज यात्रेला जाणाऱ्यांच्या संख्येत वाढच होत आहे. मात्र, यंदा औरंगाबादहून हजला जाणाऱ्यांचा विमानप्रवास महागला आहे. यंदा हज यात्रेसाठी मराठवाड्यातून अडीच हजारांवर भाविक जाणार आहेत. यातील ८८१ यात्रेकरूंनी औरंगाबादहून थेट जेद्दाहला जाण्याचा पर्याय निवडला आहे. मराठवाड्यातून जाणाऱ्या अनेक हाजींनी औरंगाबाद ते मुंबई असा प्रवास करून विमानाद्वारे मुंबई ते जेद्दाह असा प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईहून जाणाऱ्या यात्रेकरूंना प्रती प्रवासी एकूण दोन लाख ७७ हजार ९५० रुपयांचा खर्च येणार आहे. नागपूरहून जाण्यासाठी प्रती प्रवासी दोन लाख ७९ हजार ६०० रुपयांचा, तर औरंगाबादहून थेट जेद्दाहला जाणाऱ्यांना प्रती प्रवासी दोन लाख ९१ हजार १०० रुपये खर्च येत आहे. या खर्चात कुर्बानी कुपनची किंमत जोडलेली नाही. मुंबईहून हज यात्रेसाठी जाणारे किमान तीन महिन्यानंतर रवाना होणार आहेत. तीन महिन्यांपूर्वी विमान प्रवासाचे दरही ठरविण्यात आले आहेत. एका यात्रेकरूला मुंबईहून जेद्दादला गेल्यास त्यासाठी विमान दर, विमानतळाचे चार्जेस असे एकूण ६७ हजार ८४३ रुपये खर्च होणार आहे. तर औरंगाबादहून जाणाऱ्यांना हा खर्च ८० हजार ९८७ रुपये इतका राहणार असल्याची माहिती हज कमिटीच्या वतीने देण्यात आली.


विमान दर डॉलरमध्ये का?

हज यात्रेचे नियोजन करताना, हज कमिटी ऑफ इंडिया तसेच परराष्ट्र विभागाकडून 'रियाल' चलनाच्या माध्यमातून सर्व खर्चाचे नियोजन करण्यात येते. यात राहण्याचा खर्च आणि इतर सुविधा देण्यात येत असतात. मात्र, हज यात्रेसाठी विमान सेवा एअर इंडियाच्या माध्यमातूनच निवडण्यात येते. विमान प्रवासासाठी रियाल किंवा रुपये या चलनाचा वापर न करता, डॉलर या चलनाचे वापर करण्यात येत असतो. यामुळे विमान तिकीट अधिक महागात पडत असल्याचा दावा हज कमिटीशी संबंधित असलेल्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. कडेठाणकरांच्या संगीतयात्रेने वेधले लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या (आयएमए) शहर शाखेच्या वतीने रविवारी (१९ मे) आयएमए हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात शहरातील फिजिशियन व गिटारवादक डॉ. अनंत कडेठाणकर यांच्या 'माझी संगीतयात्रा' मैफलीने रसिकांचे लक्ष वेधले.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयएमएचे शहराध्यक्ष डॉ. सत्यनारायण सोमाणी तसेच सचिव डॉ. यशवंत गाडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. अनंत कडेठाणकर यांनी स्वतःच्या संगीत शिक्षणाचा प्रवास खुमासदार शैलीत कथन केला. यात ताल-स्वरांच्या मूलभूत संकल्पनांबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने संगीत कसे आत्मसात करता येते, हे त्यांनी विस्तृतपणे सांगितले. संगीत हे गणित व अध्यात्माच्या कसे जवळ जाते, हेदेखील उदाहरणासह त्यांनी पटवून दिले. तर, त्याच्या पुष्ट्यर्थ डॉ. विनया भागवत यांनी गाणे गाऊन प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले तसेच खिळवून ठेवले. या कार्यक्रमाला रसिक डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'आयएमए'च्या शहर शाखेचे सांस्कृतिक सचिव डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंप हाउसला संरक्षण द्यावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी येथील महापालिकेच्या पंप हाउसला संरक्षण द्यावे, अशी विनंती महापौर नंदकुमार घोडेले यांनी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याकडे केली आहे. अन्नदाता संघटनेने औरंगाबादचा पंप हाउसपासूनचा पाणीपुरवठा तोडण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौरांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.

पैठणच्या नाथसारगाचे पाणी हिरडपुरी बंधाऱ्यात सोडण्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून जायकवाडी प्रकल्पातून औरंगाबाद शहराला पुरविण्यात येणारे पाणी तोडण्याचा इशारा या आंदोलनात सहभागी झालेल्या संघटनेने दिला आहे. या संघटनेच्या अशा प्रकारच्या आंदोलनाची कुणकुण दोन दिवस अगोदरच लागल्यामुळे महापालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्त मागितला होता. त्यानुसार जायकवाडी येथील पंप हाउसवर तात्पुरता पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. आता संघटनेने थेट इशाराच दिल्यामुळे महापौरांनी पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधून पंप हाउसला बंदोबस्त देण्याची विनंती केली. पोलिस अधीक्षकांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे मान्य केले आहे, असे महापौर घोडेले यांनी सांगितले.

\Bपाणीपुरवठ्यात सुधारणा : महापौर\B

शहराच्या पाणीपुरवठ्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. सहाव्या दिवशी पाणी असलेल्या भागात आता पाचव्या दिवशी पाणी येत आहे. ज्या भागात पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत होता. त्या भागात आता चौथ्या दिवशी पाणीपुरवठा केला जात आहे. सर्व शहरात तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा व्हावा या दृष्टीने नियोजन करणे सुरू आहे. लवकरच त्यात यश येईल असे महापौरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अतिक्रमण हटाव’ निकम यांच्याकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी दोन कार्यालयीन आदेश काढून उपायुक्त रवींद्र निकम आणि शहर अभियंता सखाराम पानझडे यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या आहेत. निकम यांच्याकडे अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. पानझडे यांच्याकडे मान्सूनपूर्व कामे व नाला सफाईच्या कामाचे नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. स्मार्ट रोडसाठी पानझडे यांनी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करावी, अशी शिफारस महापौरांनी केली होती. ही शिफारस आयुक्तांनी अद्याप मान्य केली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थकित पेमेंटसाठी भारतीय किसान संघाचे आंदोलन

$
0
0

भारतीय किसान संघाचे

थकित रकमेसाठी आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कमच दिली नाही. वारंवार कारखानदारांच्या दारात जाऊनही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. परिणामी माजलगाव, गेवराई (जि. बीड), घनसावंगी (जि. जालना), खुलताबाद (जि. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांनी औरंगाबादेतील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय येथे सोमवारी धरणे आंदोलन केले. आंदोलनानंतर साखर कार्यालयाने कारखान्यांना शेतकऱ्यांचे पेमेंट १५ टक्के व्याजाने देण्याचे आदेश दिले आहेत.

गाळप हंगाम संपल्यानंतर एफआरपीनंतर १४ दिवसांपर्यंत ऊसाच्या पेमेंटची शेतकऱ्यांनी वाट पाहिली. मात्र सहा महिने उलटूनही दमडीही न मिळाल्याने शेतकऱ्यांनी भारतीय किसान संघाच्या माध्यमातून एकत्र येत धरणे आंदोलन केले. घरचे आजारपण, लग्ने, जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्‍न गंभीर झालेला असतानाही कारखानदार मंडळी शेतकऱ्यांचे पेमेंट करणे मनावर का घेत नाहीत? असा सवाल शेतकऱ्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर एनएसएल शुगर, जय महेश शुगर लि, पवारवाडी, माजलगाव (जि. बीड), जयभवानी सहकारी साखर कारखाना, शिवाजीनगर, गेवराई (जि. बीड), घृष्णेश्‍वर शुगर प्रा. लिमिटेड, गदाना, ता. खुलताबाद (जि. औरंगाबाद) या कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना साखर कार्यालयाने आदेश काढले असून या कारखान्यांनी शेतकऱ्यांना आता १५ टक्के व्याजाने पेमेंट अदा करावे, असेही आदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरदार पटेलांच्या पुतळ्याचे काम रखडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहागंज चमन येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बसविण्याचे काम सुरू आहे. डिसेंबर महिना अखेरीस पर्यंत या पुतळ्याचे काम होणे आवश्यक होते. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून हे काम रखडले आहे. या वॉर्डाच्या नगरसेविका यशश्री बाखरिया यांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

शहागंज चमन येथे पूर्वी सरदार पटेल यांचा अर्धाकृती पुतळा होता. हा पुतळा काढून या ठिकाणी नविन पुतळा बसवण्याचे काम मनपाच्या वतीने ठरवण्यात आले. गेल्या वर्षभरापासून या पुतळ्याचे काम सुरू आहे. ३० ऑक्टोंबर रोजी या ठिकाणी नविन पुतळा आणण्यात आला. डिसेंबर २०१८ अखेरीस या ठिकाणी पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम पूर्ण होऊन नविन पुतळा उभारण्यात येणार होता. मात्र, हे काम रखडले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हे काम पूर्ण करावे, असा पाठपुरावा देखील नगरसेविका यशश्री बाखरिया यांनी वारंवार निवेदने देऊन केला होता. मात्र, त्यांच्या मागणीला यश आले नाही. गेल्या आठ महिन्यांपासून हा पुतळा कापडाच्या कनातीमध्ये झाकून ठेवण्यात आला आहे. या ठिकाणच्या चबुतऱ्याचे काम देखील अर्धवट अवस्थेत पडून आहे.

सुरक्षारक्षक बेपत्ता

या ठिकाणी पुतळ्याच्या सुरक्षिततेसाठी मनपाच्या वतीने सुरक्षारक्षक नेमण्यात आला होता. एक महिन्यानंतर हा सुरक्षा रक्षक देखील येथून बेपत्ता असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुतळ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अतिक्रमणाचा विळखा

शहागंज चमनच्या आजूबाजूला फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा विळखा कायम आहे. गेल्यावर्षी ११ मे रोजी नवाबपुरा भागात दोन गटात मोठी दंगल उसळली होती. या दंगलीचे एक कारण येथील फेरीवाल्यांचे आणि स्थानिक तरुणांचे भांडण हे देखील ठरले होते. पोलिसांनी काही दिवस अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा या ठिकाणी अतिक्रमणाचा विळखा कायम पडला आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे काम लवकर करावे म्हणून वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र, मनपा प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. आठ महिन्यांपासून पुतळा आणून ठेवण्यात आला आहे. पुतळ्याच्या सुरक्षिततेचा देखील प्रश्न आहे. काही अनुचित घटना घडल्यास या भागातील नागरिकांना धरण्यात येऊ नये.

यशश्री लक्ष्मीनारायण बाखरिया - नगरसेविका, राजाबाजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवर्तनासााठी उपोषणाचे अस्त्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैजापूर व गंगापूर तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून पिण्यासाठी पाणी नाही. नांदूर मधमेश्वर कालव्यात पाण्याचे आवर्तन सोडावे या मागणीसाठी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी शेतकऱ्यांसह उपोषण केले. पाणी सोडण्याबाबत शासनाला कळवण्यात आल्याचा खुलासा कडा प्रशासनाने केल्यानंतर चिकटगावकर यांनी उपोषण मागे घेतले.

वैजापूर व गंगापूर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई असून २०० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील मन्याड व गळमोडी धरणात मोजकाच साठा शिल्लक आहे. पाणी टंचाईत पुरेशा उपाययोजना नसल्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी नांदूर मधमेश्वर कालव्यात आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, प्रशासनाने दखल घेतली नसल्याने आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यासह शेतकऱ्यांनी सोमवारी गोदावारी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालसमोर उपोषण केले. एकूण ६२ गावांसाठी पाणी सोडण्याची मागणी आहे. या आंदोलनाची दखल घेत 'कडा' प्रशासनाने पाटबंधारे महामंडळाने लेखी खुलासा करीत चिकटगावकर यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. नाशिक येथे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला (कडा) माहिती कळवण्यात आली होती. त्यानंतर उर्ध्व भागातील धरणांच्या पाणीसाठ्याची माहिती देण्यात आली. सध्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन शिर्डी, कोपरगाव, राहता, पुणतांबा, वैजापूर इत्यादी शहरांना देण्यात आले आहे. पाणीसाठा विचारात घेता नांदूर मधमेश्वर कालव्यासाठी पाणी शिल्लक नसल्याचा खुलासा 'कडा'ने केला. गंगापूर धरण समूहात १६०३ द.ल.घ.फू. पाणी असून त्यातून पिण्याच्या पाण्याची गरज भागवून नाशिक शहरासाठी आकस्मिक पाणी म्हणून जुलैनंतर २७२ द.ल.घ.फू. शिल्लक राहणार आहे. त्यामुळे पाणी शिल्लक राहत नसल्याचे 'कडा'ने म्हटले आहे.

नांदूर मधमेश्वर कालव्याच्या चार धरणांवरील आरक्षणाची माहिती घेऊन शासनाला अहवाल सादर करण्यात येईल, असे औरंगाबाद 'कडा' कार्यालयाने स्पष्ट केले. तसेच पुढील कार्यवाही होईपर्यंत उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली.

दारणा समूहात ठणठणाट

दारणा धरण समूहात उपयुक्त पाणीसाठा कमी आहे. दारणा (७२१ द.ल.घ.फू.), मुकणे (११५ द.ल.घ.फू.), भाम, भावली, वाकी (शून्य टक्के) पाणीसाठा आहे. गाळ घट ३०० द.ल.घ.फू. व बाष्पीभवन ८३.६ द.ल.घ.फू. वगळता फक्त ४५२.४ द.ल.घ.फू. पाणीसाठा आहे. यातून नाशिक महापालिकेसाठी १५० द.ल.घ.फू. पाणी आवश्यक आहे. त्यामुळे आवर्तन सोडण्यात अडचणी येत आहेत. दोन तालुक्यांची परिस्थिती बिकट असून पाणी नसल्यामुळे स्थलांतर वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरुच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कन्नड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात ट्रॅक्टर मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणी पोलिस प्रशासनाने मंडळ अधिकारी व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या चालकाविरुद्ध कोणतेही पुरावे नसताना खोटा गुन्हा दाखल केला असून हे गुन्हे मागे घ्या व संबंधित पोलिस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा तलाठी संघ, जिल्हा सरकारी मध्यवर्ती संघटना, तहसीलदार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, नायब तहसीलदार संघटनेने पुकारलेला संप सोमवारीही सुरू होता. दरम्यान, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही.

जिल्ह्यातील कोतवाल, शिपाई, वाहनचालक, तलाठी, महसूल कर्मचारी, तहसीलदार अशा एकूण ८०० जणांनी या संपामध्ये सहभाग घेतल्याचा दावा संघटना पदाधिकाऱ्यांनी केला. दरम्यान, दुष्काळ नियोजन, चारा छावणी व निवडणुकीच्या कामांमध्ये कोणताही अडथळा न आणता हा संप सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणामध्ये मंडळ अधिकारी बी. एन. गवळी यांनी अवैध गौण खणिज वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध उपविभागीय अधिकारी, कन्नड यांच्या आदेशानुसार सदर वाहनचालकावर चोरटी वाहतूक करत असल्याने गुन्हा दाखल केला होता. या अवैध वाहतूक करणाऱ्याने उपविभागीय अधिकारी कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येस मंडळ अधिकारी गवळी व वाहनचालक सुनील चिंधुटे हे जबाबदार असल्याचे गृहित धरून पोलिसांनी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. गवळी यांनी उपविभागीय अधिकारी यांचे लेखी आदेशानुसार गुनहा दाखल करण्याचे कर्तव्य पार पाडले होते. विनाकारण दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे कर्मचाऱ्यांची वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हानी झाली आहे. केवळ कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी पोलिस निरीक्षकांनी महसूल कर्मचाऱ्यांचा बळी दिला असल्याचा आरोप यावेळी संघटना पदाधिकाऱ्यांनी केला.

या प्रकरणात पोलिस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सोमवारी आंदोलनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गिरगे, अरविंद धोंगडे, तलाठी संघाचे अनिल सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.

... तर मराठवाडा, राज्यव्यापी आंदोलन

पोलिस प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात तत्काळ कारवाई झाली नाही तर आंदोलनाची व्याप्ती वाढवावी लागून आंदोलन मराठवाडा पातळीवर व त्यानंतर राज्यपातळीवर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची कर्जप्रकरणे निकाली काढण्याची मनसेची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अण्णासाहेब पाटील आर्थीक मागास विकास महामंडळाची बँकेतील प्रलंबीत कर्ज प्रकरणाच्या फाईल त्वरित निकाली काढण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. सोमवारी या संदर्भात जिल्हा अग्रणी बँकेच्या मुख्य प्रबंधकांना या संदर्भात निवेदन देण्यात आले असून सात दिवसांचा इशारा देण्यात आला आहे.

मनसेने दिलेल्या निवेदनामध्ये औरंगाबाद जिल्ह्याला गेल्या वर्षी सहा हजार कर्ज वाटप फाईलचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यापैकी केवळ दहा ते १५ टक्के कर्ज प्रकरण निकाली निघाली आहेत. बँकांनी काही ठिकाणी कर्ज प्रकरणे घेतली आहेत. मात्र, त्या कर्ज प्रकरणात तारण तसेच इतर कारणास्तव बँक व्यवस्थापक हेतू पुरस्सर कर्ज प्रकरण निकाली व मंजुरी करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही मनसेच्या वतीने निवेदनात करण्यात आला आहे. मराठवाड्यात दुष्काळाचे सावट असून बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्यामुळे तरुणांना उद्योग व्यवसायासाठी ही कर्ज प्रकरणे त्वरित निकाली काढण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली. यावेळी मनसेचे उपशहराध्यक्ष राहुल पाटील, मनविसेचे जिल्हाध्यक्ष राजीव जावळीकर, वाहतूक सेना जिल्हा संघटक मनीष जोगदंडे, चेतन पाटील, उमेश काळे, कार्तिक फरकाडे पाटील, किरण पाटील, गजानन गोमटे, प्रशांत आटोले, विशाल जोंधळे, शशांक काकडे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात सहा हजार कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असताना केवळ दहा ते पंधरा टक्के कर्ज प्रकरण निकाली निघाली आहे. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व बँकेतील कर्ज प्रकरणाच्या फाईल निकाली काढण्यात याव्यात अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

राहुल पाटील - उपशहराध्यक्ष, मनसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images