Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बीएड कॉलेजमध्ये भरणार कायदा विद्यापीठाचे वर्ग

$
0
0
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे वर्ग येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होतील. औरंगाबादमध्ये मंजूर झालेल्या या विद्यापीठाचे वर्ग हे गर्व्हमेंट बीएड कॉलेजमध्ये भरणार आहेत. करोडी येथे बांधकामाला दोन वर्ष लागणार असून तोपर्यंत हे वर्ग या कॉलेजमध्ये चालतील.

दिल्लीच्या राजपथावर ‘सोपान’चे पथसंचलन

$
0
0
दिल्लीच्या राजपथावर प्रजासत्ताक दिनी पथसंचलन करण्याची संधी बीड येथील बलभीम महाविद्यालयाचा विद्यार्थी सोपान मुंडे याला मिळाली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकातील १४ मुलांमध्ये सोपान आहे.

पिटलाइनसाठी जागा निश्चित

$
0
0
रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेची साफसफाई करण्यासाठी २४ डब्याच्या रेल्वे पिटलाइनसाठीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर एकनाथनगर रेल्वे क्रॉसिंगजवळ पिटलाइनचे काम सुरू केले जाणार आहे.

तलाठी सजा फेररचनेसाठी विभागीय आयुक्तांची समिती

$
0
0
तलाठी सजा, मंडळ अधिकारी कार्यालय फेररचनेसाठी सरकारने नागपूरच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तलाठी संघाने कामावरील बहिष्कार आंदोलन मागे घेतले आहे.

उड्डाणपुलामुळे दोन ‘किमी’चा वळसा

$
0
0
सातारा परिसर आणि औरंगाबाद शहराला जोडणाऱ्या उड्डाण पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यावर खाली असलेले रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. खालचा रस्ताही बंद झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांची अडचण होणार आहे.

नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा

$
0
0
राज्याच्या तत्कालीन पर्यटनमंत्र्यांनी औरंगाबादचा गौरव ‘राज्याची राजधानी’ म्हणून केला. मात्र, जिल्ह्यातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे व शहराची अवस्था पाहिली, तर ‘नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा’ अशी गत झाली आहे.

अवजड वाहनांमुळे कोंडी

$
0
0
जीवघेणे खड्डे, धूळ आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे भावसिंगपुरा ते मिलकॉर्नर रस्ता वाहनचालकांसाठी गैरसोयीचा ठरला आहे. परिसरात शैक्षणिक संस्था मोठ्या संख्येने असूनही वाहतुकीचे योग्य नियंत्रण करण्यात येत नाही. परिणामी, या रस्त्यावरुन जाताना साधवगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे.

गाळाची मोजणी वर्षभरात

$
0
0
पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातील गाळाची मोजणी येत्या वर्षभरात करण्यात येणार आहे. नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेमार्फत (मेरी) ही मोजणी करण्यात येणार आहे. रिमोट सेन्सिंग तंत्राद्वारे करण्यात येणाऱ्या गाळमोजणीचे काम यंदाच्या वर्षांत नियोजित आहे.

भंगारातून केली रूग्णवाहिका

$
0
0
भंगार म्हणून फेकलेल्या विविध साहित्यांचा उपयोग करून, एसटी विभागाच्या मध्यवर्ती कार्यशाळेच्या कर्मचाऱ्यांनी प्रशस्त अशी रूग्णवाहिका बस तयार केली आहे. नवीन रूग्णवाहिका बस तयार करण्यासाठी साधारणतः दहा ते बारा लाखाचा खर्च लागतो.

पावसाच्या हलक्या सरी

$
0
0
शहराच्या सर्व भागात गुरुवारी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दोन दिवसांपासून आभाळ घोंगावत होते, पण ऐन घरी परतण्याच्यावेळी पावसाने गाठल्याने अनेकांची तारांबळ झाली.

पेट्रोलवर ‘जिझिया’

$
0
0
एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रम व जागतिक बँक प्रकल्पाच्या माध्यमातून रस्ते बांधल्यामुळे औरंगाबादकरांच्या मानगुटीवर तब्बल अठरा वर्षांपासून टोल बसला आहे. राज्याच्या इतर भागात टोलविरोधी आवाज बुलंद होत असताना येथील लोकप्रतिनिधी टोल कायमचा बंद व्हावा यासाठी काहीच करीत नाही.

आश्वासनानंतर तुर्तास आंदोलन मागे

$
0
0
पर्यायी पूल उभारण्यासंदर्भात आमदार सुभाष झांबड यांनी आश्वासन दिल्याने रिपब्लिकन सेनेचे नगरसेवक मिलींद दाभाडे आणि नंदनवन विकास समितीचे अध्यक्ष अॅड. धनंजय बोरडे यांनी बुधवारी रात्री उपोषण आंदोलन मागे घेतले.

व्हाइट टॉपिंगला ड्रेनेज, पाइप लाइनचा ‘ब्रेक’

$
0
0
सर्वच रस्त्यांची कामे व्हाइट टॉपिंगमधून करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असला तरी ड्रेनेज लाइन, पाइप लाइन व भूमिगत केबल या कामासाठी अडथळा ठरतील असे जाणकारांचे मत आहे.

कन्नडचे गटविकास अधिकारी सक्तीच्या रजेवर?

$
0
0
जिल्हा परिषद सदस्य व ग्रामसेवक संघटनेच्या तक्रारीनंतर गट विकास अधिकारी के. एस. सानप यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यत आले आहे. या बद्दल अद्याप अधिकृत आदेश नाही.

लाच स्वीकारताना तलाठ्यास पकडले

$
0
0
हिवरा राळा ( ता. बदनापूर) येथील तलाठी प्रवीण दिगंबर रूइकर आणि नागेवाडीचे तलाठी अनिल दासू चव्हाण यांना जमीनीच्या फेरफार नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

बजाजनगरातील वाढीव सेवाकर रद्द करा

$
0
0
सप्टेंबर महिन्यापासून सिडको प्रशासनाने सेवाकरात वाढ केली असून, त्यामुळे नागरिकांना मोठा अर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे हा वाढीव सेवाकर रद्द करावा, अशी मागणी गोविंद हिल आसोसिएशनने निवेदनाद्वारे केली आहे.

आयुक्तालयाचे भिजत घोंगडे

$
0
0
लातूरला महसूल आयुक्त कार्यालय करण्याच्या दृष्टीने दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी कृषी, शिक्षणा पासुन ते रेशीम आणि कुष्ठरोग निवारणा पर्यंतची २७ शासकीय कार्यालयाचे उपसंचालक कार्यालय लातूरात सुरू केले होते.

भररस्त्यात महिलेची छेडछाड

$
0
0
घाटी हॉस्पिटल परिसरात भररस्त्यावर महिलेची छेडछाड करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटी रूग्णालय परिसरातील अपघात विभागासमोरून एक ४३ वर्षांची महिला जात होती.

झेडपीचा वरिष्ठ सहायक गजाआड

$
0
0
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ सहायकास शुक्रवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. घाटी हॉस्पिटलमधील डॉक्टराचे थकीत वेतन काढण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना या सहायकाला जिल्हा परिषद गेटसमोर रंगेहाथ पकडण्यात आले.

मतदार यादीत १० लाख ‘अंडर नाइन्टीन’

$
0
0
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात सुमारे ४० लाखांवर मतदारांनी नव्याने नोंदणी केली आहे. त्यामध्ये सुमारे सव्वाआठ लाख मतदार १८ ते १९ वर्षे या वयोगटातील आहेत. निवडणुकीपूर्वी जास्तीत जास्त पात्र मतदारांची नावे यादीत नोंदवून घेण्यासाठी निवडणूक आयोगाने येत्या ३१ जानेवारीपर्यंत मतदार नोंदणी अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images