Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कचरा प्रक्रिया प्रकल्पाची चाचणी पाच जून रोजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन-तीन वेळा हुकलेला कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या चाचणीचा मुहूर्त आता बुधवारी (पाच जून) निश्चित करण्यात आला आहे. या दिवशी प्रमुख पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चाचणी घेतली जाणार आहे.

चिकलठाणा येथे सावंगी रस्त्यावर महापालिकेतर्फे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. दररोज १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पाची उभारणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. प्रकल्पाची उभारणी झाली, पण विजचे पुरवठा महावितरण कंपनीकडून मिळाला नाही त्यामुळे प्रकल्प सुरू करण्यात अडचणी येत होत्या. आठ दिवसांपूर्वी महावितरणने प्रकल्पासाठी एक्स्प्रेस फीडरचे काम सुरू केले. आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मंगळवारी हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बुधवारी प्रकल्पाची चाचणी घेतली जाणार आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी ही माहिती दिली. पाच जून रोजी कचरा प्रकल्पाच्या परिसरात वृक्षारोपण देखील केले जाणार आहे. याचवेळी प्रकल्पाची चाचणी घेतली जाईल. चाचणी यशस्वी झाल्यावर प्रकल्पाच्या लोकार्पणाचा निर्णय घेतला जाणार आहे. लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धोकादायक इमारत पाडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिटीचौक घासमंडी येथील धोकादायक इमारत महापालिकेने सोमवारी पाडली. सिटी सर्वेक्षण क्रमांक ६५०८ वरची ६० ते ७० वर्षे जुनी ही इमारत पडायला आली होती. या इमारतीचे क्षेत्रफळ ५० बाय १५ फूट आहे. मनोहर, जनार्दन,वसंत आणि दिगंबर लांडगे (मिस्त्री) यांच्या मालकीची ही इमारत होती. इमारत धोकादायक झाल्यामुळे या ठिकाणी कुणीही रहात नव्हते. इमारत स्वत:हून पाडून घेण्याची तयारी मालकांनी दाखवली होती, पण रविवारी मध्यरात्री या इमारतीची भींत पडण्यात सुरुवात झाली, त्याची माहिती शेजारी राहणाऱ्या रऊफ यांनी महापालिकेला दिली. त्यानंतर सोमवारी अतिक्रमण हटाव पथकाने इमारत पाडली. यावेळी उपायुक्त रवींद्र निकम, पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, इमारत निरिक्षक सय्यद जमशीद, रवींद्र देसाई आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकीतील दूषित पाण्यामुळे महापौरांना झाला त्रास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टाकीतील दूषित पाण्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांना सोमवारी त्रास होऊ लागला. पाण्याच्या टाकीत एखादा प्राणी मरून पडला असावा, त्यामुळे टाकीमधील पाणी दूषित झाले, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

महापौर घोडेले यांचे रेल्वे स्टेशनच्या जवळ 'रायगड' हे शासकीय निवासस्थान आहे. निवासस्थानाच्या गच्चीवर पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. या टाक्यांमधील पाणी केवळ तोंड धुणे, आंघोळ करणे यासाठीच वापरले जाते. पिण्याच्या पाण्याची स्वंतत्र व्यवस्था आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून टाकीतून येणाऱ्या पाण्याला वेगळाच कुबट वास येत होता, पण त्याकडे महापौरांसह त्यांच्या स्वकीयांनी व महापौर बंगल्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. सोमवारी पाण्याची दुर्गंधी अधिकच वाढली, त्यातच या पाण्यामुळे हात-पाय धुतल्यामुळे महापौरांना त्रास होऊ लागला. शेवटी महापौरांनी सायंकाळी अधिकाऱ्यांना फोन करून ही माहिती दिली. गच्चीवरची टाकी स्वच्छ करा, त्यात पक्षी-प्राणी मरून पडला आहे का ते तपासा. टाकी धुवून त्यानंतर त्यात पाणी भरा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पालिकेची यंत्रणा कामाला लागली. महापौरांच्या शासकीय निवासस्थानावरील टाकीला झाकण नसावे व त्यामुळे अशी घटना घडली असावी, अशी चर्चा आहे आहे. शहरात पालिकेच्या मालकीच्या अनेत टाक्या (जलकुंभ) आहेत. बहुतेक जलकुंभांना झाकण नाही, झाकण असेल तर ते तुटलेले आहे. या जलकुंभांमध्येही पक्षी, प्राणी मरून पडल्याचे प्रकार अनेकवेळा उघड झाले. महापौर बंगल्याची टाकी सुस्थितीत ठेवण्याकडे महापालिका यंत्रणेचे एवढे दुर्लक्ष असेल तर शहरातील टाक्या सुस्थितीत ठेवण्याची अपेक्षा पालिकेच्या यंत्रणेकडून करणे कितपत वाजवी आहे असा प्रश्न निर्माण होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय चौकशीचा अहवाल सादर करा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

शहरातील सिमेंटच्या रस्त्यांची २४ कोटींच्या कामांमध्ये महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, निवृत्त कार्यकारी अभियंता सिकंदर अली व निवृत्त उपअभियंता सदानंद खन्ना यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. आदेशाप्रमाणे सहसचिव दर्जाचा चौकशी अधिकारी नियुक्त झाला का, तिन्ही अधिकारी त्यांच्यासमोर हजर झाले की नाही, या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी शासनाने कोणती पावले उचलली आहेत, याविषयीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी राज्य शासनास दिले.

सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांच्या विनंतीनंतर या प्रकरणाची दोन आठवड्यानंतर सुनावणीला ठेवण्यात आली आहे. शासनाने दोन आठवड्यांत चौकशी अधिकारी नेमावा; तसेच पालिकेने यासंबंधीचे दस्ताऐवज चौकशी अधिकाऱ्याला उपलब्ध करून द्यावेत, असेही निकालात स्पष्ट करण्यात आले होते.

शहरातील रस्त्यांच्या विकास कामासाठी राज्य शासनाने २४ कोटी ३३ लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून व्हॉइट टॉपिंगची कामे होणार होती. रस्त्यांच्या कामाचा दर्जा राखण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. जिल्हाधिकारी या समितीचे सचिव तर, महापालिका आयुक्त सदस्य आहेत. रस्त्यांच्या कामासाठी निविदा काढण्यासाठी महापालिका शहर अभियंत्यांनी दरपत्रक मागवले. कामासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या. पण त्यातील दोन निविदा तांत्रिक कारण दाखवून नाकारण्यात आल्या आणि जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची निविदा मंजूर केली. अंदाजपत्रकीय दरापेक्षा आठ टक्के अधिक असतानाही काम कायार्रंभ आदेश देण्यात आले. यासाठी स्थायी समितीची मान्यता घेण्यात आली. विशेष म्हणजे यासाठी लागणारा एक कोटी ६७ लाख रुपयांचा अधिभार हा महापालिकेच्या निधीतून देण्याचा ठराव घेण्यात आला. या निविदा पद्धतीला नगरसेवक विकास एडके यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले. याप्रकरणी डी. ए. वानखेडे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीला याचिकाकर्त्याने आक्षेप घेतला. शहर अभियंता पानझडे आणि वानखेडे यांचा दर्जा एकच आहे. यापूर्वी महापालिका आयुक्तांनी प्राथमिक चौकशी केली असून, विभागीय चौकशीत दोषी अधिकाऱ्याला दाद मागता येते. त्यामुळे चौकशी अधिकारी हा वरिष्ठ दर्जाचा असावा, अशी विनंती करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे नितीन त्रिभुवन यांच्यासाठी बी. एल. सगर-किल्लारीकर, मबापालिकेतर्फे संजीव देशपांडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गो एअरचे विमान मुंबईकडे रवाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रविवारी दुपारी चारच्या सुमारास पाटणा ते मुंबईला जाणाऱ्या गो एअरच्या विमानाने औरंगाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले होते. या विमानातील प्रवाशांना मुंबईला पाठविण्यासाठी पहाटे तीन वाजले. हे विमान दुरुस्त करून सोमवारी दुपारी १२च्या सुमारास विमानतळावरून मुंबईकडे रवाना झाले.

पाटणा ते मुंबईला जाणाऱ्या विमानाचे औरंगाबाद विमानतळावर रविवारी दुपारी चार वाजून १९ मिनिटांनी इमर्जन्सी लँडिंग झाले होते. यात विमानातील १५८ प्रवाशांना सुखरूप उतरविण्यात आले. या विमानातील प्रवाशांना गो एअर कंपनीने दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे हे प्रवासी रात्री साडेआठपर्यंत थांबले होते. दुसऱ्या विमानाची व्यवस्था होत असल्याने काही विमान प्रवाशांनी खासगी वाहनांने पूणे किंवा सोलापूर गाठण्याची मागणी गो एअरच्या व्यवस्थापनाने नाकारली होती. रात्री साडेनऊपर्यंत विमानाची व्यवस्था न झाल्याने अखेर स्थानिक अल्फा टुर्स कंपनीच्या मदतीने या विमान प्रवाशांसाठी चार वातानुकूलित ट्रॅव्हल्स बसची व्यवस्था करण्यात आली. या बसमध्ये रात्री दहापर्यंत ४० ते ५० प्रवासी मुंबईला जाण्यासाठी तयार झाले. या प्रवाशांना मुंबईकडे रवाना करण्यात आले तर, काही प्रवाशांनी दुसऱ्या विमानाशिवाय जाणार नसल्याचे स्पष्ट करून जाण्यासाठी नकार दिला. प्रवाशांनी विमानतळ सोडण्याचा निर्णय न घेतल्यामुळे या ठिकाणी विमानतळाचे अधिकारी आणि 'सीआयएसएफ'चे जवान थांबले होते. अखेर या विमान प्रवाशांची समजूत काढून सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास उर्वरित ५० प्रवाशांना बसने मुंबईला पाठविण्यात आले. काही विमान प्रवासी खासगी वाहनांद्वारे सोलापूर आणि पुण्याकडे निघून गेले.

\B

मुंबईहून आले अभियंते\B

गो एअरचे विमान दुरुस्त करण्यासाठी गो एअर कंपनीने मुंबईहून अभियंते पाठविले होते. याशिवाय काही कर्मचारी हे पुण्याहून औरंगाबादला आले होते. या विमान दुरुस्त केल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रान्सपोर्ट कमिटीची आज बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सिटीबससाठी तयार करण्यात आलेल्या ट्रान्सपोर्ट कमिटीची बैठक मंगळवारी (चार जून) होणार आहे. या बैठकीत शाळेच्या वेळात सिटीबस सोडण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर सध्या किती बस सुरू आहेत, एकूण किती बस उपलब्ध आहेत, बस चालवण्यासाठी कर्मचारी किती आहेत, किती कर्मचारी आजून अपेक्षित आहेत याचाही आढावा घेतला जाणार आहे. सिटीबसमध्ये विद्यार्थ्यांसह अन्य काही घटकांना तिकिटामध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. सूट दिल्यामुळे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला तोटा सहन करावा लागत आहे. तोट्याची रक्कम शासनाने द्यावी याचीही बैठकीत चर्चा केली जाणार आहे. बस स्वच्छ करण्याचे ब्रीक कंपनीचे कंत्राट रद्द करून अन्य कंपनीला हे काम देण्याचा विषय देखील ट्रान्सपोर्ट कमिटीच्या बैठकीत आहे. दुपारी चार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात ही बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतिपदासाठी जयश्री कुलकर्णींचे नाव निश्चित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक मंगळवारी (चार जून) होणार आहे. सभापतिपदासाठी जयश्री कुलकर्णी यांना उमेदवारी द्यायची की राजू शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करायचे या बद्दल भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष सुरूच आहे. हा संघर्ष आज सोमवारी पार परळीपर्यंत पोचल्याची माहिती मिळाली आहे. परळीत या संघर्षावर तोडगा निघाला असून, स्थायीच्या सभापतिपदासाठी जयश्री कुलकर्णी यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते.

शिवसेना-भाजप युतीमध्ये झालेल्या करारानुसार पालिकेच्या स्थायी समितीचे सभापतिपद यंदा भाजपकडे आहे. सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी ,एक जून रोजी राजू शिंदे आणि जयश्री कुलकर्णी या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्या अगोदर शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. बैठक झाल्यानंतर शिंदे यांनी सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे कळाल्यावर २० ते २५ मिनिटांनी कुलकर्णी यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपकडून दोन अर्ज दाखल झाले.

दोघांच्या उमेदवारीबद्दल खुलासा करताना भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी जयश्री कुलकर्णी याच अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर केले. पालिकेतील भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी राजू शिंदे यांना उमेदवारी अर्ज दिल्यामुळे शिंदे यांनी अर्ज दाखल केला. पक्षाचा आदेश येण्यापूर्वी राठोड यांनी शिंदेंना उमेदवारी अर्ज कसा काय दिला, याबद्दल आपण राठोड यांना विचारणार आहोत, असे ते म्हणाले परंतु, दोन दिवसांत तनवाणी यांचा रोठाड यांच्याशी संपर्क झाला नाही. 'मटा'शी सोमवारी बोलताना तनवाणी म्हणाले,'कुलकर्णी याच भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. पक्षाचा आदेश त्यांच्याच नावाने आहे. त्यामुळे हा आदेश बदलणार नाही, असे वाटते. राठोड यांच्याबरोबर अद्याप चर्चा झाली नाही.'

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्याने सोमवारी परळीत कार्यक्रम होता. या कार्यक्रमात राजू शिंदे यांनी ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे व अन्य उपस्थित होते. जयश्री कुलकर्णी यांना सभापतिपदासाठी संधी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. राजू शिंदे यांना दुसरे मोठे पद देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे शिंदे उद्या मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेतील, अशी चर्चा आहे. जयश्री कुलकर्णी स्थायी समितीच्या सभापती झाल्यास पालिकेच्या इतिहासात स्थायी समितीच्या सभापतिपदी महिला प्रथमच विराजमान होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या विद्यार्थिनीची तणावामुळे आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावीची परीक्षा दिलेल्या पंधरा वर्षांच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी सकाळी साडेसात वाजता विजयनगर, गारखेडा भागात हा प्रकार घडला. साक्षी अशोक पांढरे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. साक्षी आपला दहावीचा निकाल कसा लागेल, यामुळे तणावाखाली होती, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली.

साक्षीने उल्कानगरी येथील जयभवानीनगर विद्यामंदिरात दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिचे वडील वाहनचालक असून आई मोलकरीण आहे. तिचा मोठा भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. सकाळी साडेसहा वाजता साक्षीची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. वडील गजानन महाराज मंदिर परिसरात पाणी आणण्यासाठी गेले होते तर, भाऊ घरात झोपलेला होता. यावेळी साक्षीने आतल्या खोलीत जाऊन दरवाजाच्या कडीला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळाने हा प्रकार घरी आलेल्या वडिलांच्या लक्षात आला. साक्षीला तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. साक्षीचा दहावीचा निकाल लवकरच लागणार होता, या निकालाच्या ताणामुळे साक्षी गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकशाही दिनात १६ तक्रारी

$
0
0

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (तीन जून) झालेल्या लोकशाही दिनात १६ तक्रारी दाखल झाल्या. त्यामध्ये जलसंपदा विभाग एक, महसूल विभाग सात, पोलिस तीन व इतर तीन अशा १६ तक्रारी दाखल झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेनऊ लाखांचे कर्ज बुडवले; कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साडेनऊ लाखांचे वाहनकर्ज बुडविल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल अशोक लोखंडे याच्या पोलिस कोठडीमध्ये मंगळवारपर्यंत (४ जून) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी सोमवारी (३ जून) दिले.

या प्रकरणी किरण बाळू गायकवाड (रा. मसनदपूर, चिकलठाणा) यांनी फिर्याद दिली होती.

फिर्यादीनुसार, सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळील राणा कॉम्प्लेक्समध्ये आयकेएफ फायनान्स कंपनीचे कार्यालय असून फिर्यादी हा कंपनीत कलेक्शन अधिकारी म्हणून काम करतो. दरम्यान, २०१५ मध्ये आरोपी अमोल अशोक लोखंडे (२८, रा. आंतरवाला ता. जि. जालना) व त्याचा भाऊ अजय या दोघांनी आयशर गाडीचे आरसी बुक सादर करून साडेनऊ लाखांचे वाहन कर्ज घेतले व कर्जाची परतफेड न करता ते पसार झाले. त्यानंतर फायनान्स कंपनीने कागदपत्रांची तपासणी केली असता आरोपींनी बनावट आरसी बुक जोडल्याचे समोर आले. २० ऑगस्ट २०१८ रोजी फिर्यादीच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आरोपी हा वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला ३१ मे रोजी अटक करुन न्यायालयात हजर केले असता, त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. चौकशी व तपासात आरोपीने गाड्यांचे बनावट आरसी बुक हे दत्ता शेंडगे याच्याकडून खरेदी केले व त्यानंतर कंपनीकडून कर्ज मंजूर करुन घेतल्याची कबुली दिली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, आरोपीचा साथीदार दत्ता दिंगबर शेंडगे याला अटक करणे व आरोपीच्या ताब्यातून आरटीओ कार्यालयाचे तयार केलेले बनावट शिक्के हस्तगत करणे बाकी असल्याने आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीच्या कोठडीत मंगळवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एलआयसी’ला गंडा, आरोपींच्या कोठडीत वाढ

$
0
0

औरंगाबाद: बनावट मृत्यू प्रमाणपत्रे व कागदपत्रे सादर करुन 'एलआयसी'च्या जनश्री योजनेअंतर्गत ९९ लाख ३० हजार रुपयांची शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी लिपिक विनोद बत्तिसे, मुरलीधर खाजेकर, अली खान, शंकर गायकवाड या चौघांच्या पोलिस कोठडीत बुधवारपर्यंत (५ जून), तर 'एलआयसी'चा अधिकारी भीमराव सरवदे याच्या पोलिस कोठडीत गुरुवारपर्यंत (६ जून) वाढ करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे यांनी सोमवारी (३ जून) दिले. आरोपी मुरलीधर खाजेकर हा एलआयसीचा किंवा कोणत्याही संस्थेचा किंवा एनजीओचा कर्मचारी नव्हता; तरीदेखील तो संबंधित योजनेअंतर्गत नवीन प्रस्ताव वारंवार दाखल करत होता. या बाबत तसेच उर्वरित आरोंपीबाबत सखोल तपास करणे बाकी असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया ‘सीआयडी’ने वृद्धाला लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'सीआयडी' असल्याची थाप मारत जेष्ठ नागरिकाचे ४५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेदहा वाजता बीड बायपास रोडवर घडला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी छबन विनायकराव कुलकर्णी (वय ६४, रा. म्हस्के पेट्रोल पंपाजवळ, बीड बायपास रोड) यांनी तक्रार दिली. कुलकर्णी हे शनिवारी सकाळी साडेदहा वाजता दुचाकीवरून मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्यांना घोले कॉम्प्लेक्ससमोर एका अनोळखी व्यक्तीने अडवले. मी 'सीआयडी इन्स्पेक्टर', आहे अशी बतावणी केली. शहरात जेष्ठ नागरिकांना लुबाडण्यात येत असून तुमच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून ठेवा, असे सांगितले. कुलकर्णी यांना हा प्रकार खरा वाटल्याने त्यांनी अंगठ्या काढून घेतल्या. या अंगठ्या हातचलाखीने लंपास करत या आरोपीने पोबारा केला. काही वेळाने हा प्रकार कुलकर्णी यांच्या लक्षात आला. या प्रकरणी कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जमादार पदार हे तपास करित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कार्यशाळेतून हजेरी यंत्र चोरीस

$
0
0

औरंगाबाद: चिकलठाणा येथील एस. टी. महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेतून हजेरीसाठी बसवण्यात आलेली फेसरिडिंग इंप्रेशन मशीन चोरीस गेली. हा प्रकार ३० मे ते एक जून दरम्यान घडला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटीचे अधिकारी मनोज प्रल्हाद सुरडकर (वय ३३, रा. गरमपाणी) यांनी तक्रार दिली. चिकलठाणा येथील मध्यवर्ती कार्यशाळेच्या साठा बांधणी विभागात कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवण्यासाटी मेन फेम कंपनीचे चार फेस रिडिंग, थम इंप्रेशन मशीन बसवण्यात आले आहे. मशीनमध्ये चेहरा दाखवल्यानंतर संगणकात नेांद होऊन कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविली जाते. या चार मशीनपैकी एक मशीनच चोरीस गेल्याचे शनिवारी उघडकीस आले. याप्रकरणी पोलिस नाईक शेजूळ हे तपास करित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक अधिकारी पोलिसांच्या रडारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनिवासी भारतीयाची आठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उद्योजक सोमनाथ साखरे यांच्या विरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सखोल तपास करण्यात येणार असून बँकेच्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी जयेश हसमुख शहा (रा. हरारे, झिंबाबे, सध्या रा. सांताक्रुझ, मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे. शहा हे अलमश ग्लोबल लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. त्यांनी २००८ मध्ये सोमनाथ साखरे यांच्या कंपनीला दहा कोटींचे कर्ज दिले होते. यातील काही रक्कम त्यांनी अमरप्रित हॉटेल समोरील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शहा यांच्या नावाने फिक्स डिपॉझिट करण्याबाबत सांगितले होते. ही रक्कम डिपॉझिट केल्यानंतर त्याची पावती देखील शहा यांच्या नावावर आहे. दरम्यान, साखरे यांनी शहा यांच्या नावाने बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बनावट अकाउंट उघडून आठ कोटी रुपये परस्पर काढल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत करीत आहेत.

\Bदोन सह्या असताना खाते कसे उघडले?\B

शहा यांच्या दोन वेगवेगळ्या सह्या असताना बँकेने खाते कसे उघडले याचा तपास करण्यात येत आहे. यापैकी एक सही बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे. साखरे यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती निरीक्षक सावंत यांनी दिली. तसेच बनावट खाते उघडण्याप्रकरणात बँकेच्या कोणत्या अधिकाऱ्याचा समावेश आहे का याचाही तपासणी करण्यात येणार आहे, कोणी दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचे निरीक्षक सावंत यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीबसच्या ट्रान्सपोर्ट कमिटीची आज बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सिटीबससाठी तयार करण्यात आलेल्या ट्रान्सपोर्ट कमिटीची बैठक मंगळवारी (चार जून) होणार आहे. या बैठकीत शाळेच्या वेळात सिटीबस सोडण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर सध्या किती बस सुरू आहेत, एकूण किती बस उपलब्ध आहेत, बस चालवण्यासाठी कर्मचारी किती आहेत, किती कर्मचारी आजून अपेक्षित आहेत याचाही आढावा घेतला जाणार आहे. सिटीबसमध्ये विद्यार्थ्यांसह अन्य काही घटकांना तिकिटामध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. सूट दिल्यामुळे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला तोटा सहन करावा लागत आहे. तोट्याची रक्कम शासनाने द्यावी याचीही बैठकीत चर्चा केली जाणार आहे. बस स्वच्छ करण्याचे ब्रीक कंपनीचे कंत्राट रद्द करून अन्य कंपनीला हे काम देण्याचा विषय देखील ट्रान्सपोर्ट कमिटीच्या बैठकीत आहे. दुपारी चार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात ही बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे कुलगुरूपदाचा कार्यभार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. देवानंद शिंदे यांना सोपवण्यात आला. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ सोमवारी संपला. नवीन कुलगुरूंची नियुक्ती होईपर्यंत शिंदे विद्यापीठाचा कार्यभार सांभाळणार आहेत.

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ सोमवारी संपला. नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया राज्यपाल कार्यालय करीत आहे. या निवडीला किमान किमान एक महिना अपेक्षित आहे. त्यामुळे 'बामू'च्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होण्यापूर्वी शिंदे 'बामू'च्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागात कार्यरत होते. विद्यापीठाच्या प्रशासकीय कारभाराची आणि स्थानिक प्रश्नांची पुरेपूर जाण असल्यामुळे शिंदे यांच्याकडे कार्यभार दिल्याची शक्यता आहे. कुलगुरू पदासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात विद्यापीठ कॅम्पसमधील १२ प्राध्यापकांचा समावेश आहे.

\Bसेवागौरव कार्यक्रम आज\B

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे कार्यभार सोपवणार आहेत. त्यानंतर महात्मा फुले सभागृहात सकाळी ११ वाजता कुलगुरू चोपडे व प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांचा सेवागौरव कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिफेन्स कॉलेजतर्फे आज वृक्षारोपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डिफेन्स करिअर ज्युनिअर कॉलेजतर्फे जागतिक पर्यावरणदिनानिमित्त मंगळवारी (चार जून) शहिदांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात येणार आहे. हडकोतील स्वामी विवेकानंदनगरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, पर्यावरण संरक्षण व संवर्धन कृती अभियान समिती, मारवाडी युवा मंच, निर्भया डिफेन्स अकादमी, इंडियन डिफेन्स अकादमीचा सहभाग असणार आहे. या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, अरुणा कोचुरे, संयोजक राजेश भोसले, मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष संतोष तिवारी, प्राचार्य सचिन महाले, वैशाली भोसले, अंजुषा मगर, अनुपमा देहाडे यांनी पुढाकार घेतला आहे. शहीद जवानांच्या आठवणीत ज्यांना झाडे लावायची असतील त्यांना मोफत रोपटी देण्यात येणार आहेत, असे राजेश भोसले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवटच्या दिवसापर्यंत वाद धुमसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवससुद्धा वादाने धुमसत राहिला. एकीकडे कुलगुरू चोपडे शेवटच्या दिवसाचे काम उरकत असताना दुसरीकडे कुलगुरूंच्या चौकशीचा अहवाल जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलक आत्मदहनाचा प्रयत्न करीत होते. कुलगुरूंच्या वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्याची मागणी 'रिपाइं'चे नागराज गायकवाड आणि अधिसभा सदस्य विजय सुबुकडे पाटील यांनी स्वतंत्रपणे पोलिस आयुक्तांकडे केली. संशोधन प्रकाशनासाठी कुलगुरूंनी सहा लाख रुपये खर्च केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मराठवाडा लॉ कृती समितीने राज्यपाल कार्यालयाकडे केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ सोमवारी (तीन जून) पूर्ण झाला. पाच वर्षांच्या कार्यकाळात चोपडे यांच्यावर अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार, नियमबाह्य नियुक्त्यांचे आरोप झाले. राज्य शासनाने माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील सत्यशोधन समिती नेमून चोपडे यांच्या कामाची चौकशी केली. या समितीने साडेआठशे पानांचा अहवाल सादर केला आहे. विद्यार्थी संघटनांची आंदोलने, अधिसभा सदस्यांचे आक्षेप, व्यवस्थापन परिषद सदस्यांचा विरोध, विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, शिक्षक संघटनांचा घेराओ अशा घटनांनी विद्यापीठ नेहमी धुमसत राहिले. कुलगुरूंच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाद राहिले. चोपडे कार्यालयात शेवटच्या दिवसाचे काम उरकत असताना विभागीय आयुक्तालयासमोर रिपब्लिकन बहुजन सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल वडमारे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. चोपडे यांच्या गैरव्यवहाराची चौकशी करून पाटील समितीने राज्य शासनाला अहवाल सादर केला. हा अहवाल जाहीर करून दोषी असल्यास चोपडे यांच्या कारवाई करावी, या मागणीसाठी वडमारे मागील एक महिन्यापासून उपोषण करीत होते. उच्च शिक्षण विभाग आणि राज्यपाल कार्यालयाच्या टोलवाटोलवीत चौकशी अहवालावर ठोस उत्तर मिळाले नाही. त्यामुळे वडमारे यांनी निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोमवारी सकाळपासून विभागीय आयुक्तालय परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलिस बाजूला हटत नसल्याचे पाहून वडमारे यांनी गाडीवरून अचानक झेप घेत रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांनी तात्काळ वडमारे यांना ताब्यात घेतले. त्यामुळे अनर्थ टळला. कुलगुरू चोपडे यांचा मंगळवारी विद्यापीठात सेवागौरव समारंभ आहे. खबरदारी म्हणून वडमारे यांना बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, कुलगुरू चोपडे यांनी पुणे विद्यापीठांतर्गत शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठी त्यांच्यासह ११ प्राध्यापकांचे विद्यापीठाच्या निधीतून सहा लाख रुपये खर्च केले. पुणे विद्यापीठाच्या संशोधकांसाठी 'बामू'चा निधी कसा वापरला असा प्रश्न करीत मराठवाडा लॉ कृती समितीने राज्यपालांकडे चौकशीची मागणी केली. चोपडे यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा समितीचा आरोप आहे. या निवेदनावर नवनाथ देवकते, स्वप्नील लोहिया, अजहर पटेल, कृष्णा घुले, भारत घोडके, विजय घुगे यांची स्वाक्षरी आहे.

\B'ऑडिओ क्लिप' पुन्हा वाजली\B

आठ महिन्यांपूर्वी वाजलेली कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची कथित ऑडिओ क्लिप पुन्हा वाजली. या क्लिपचा तपास पूर्ण झाला नसताना भलत्याच व्यक्तींकडे दोषी म्हणून बोट दाखवले जात आहे. या पार्श्वभूमीवर अधिसभा सदस्य अॅड. विजय सुबुकडे पाटील यांनी पोलिस आयुक्तांना भेटून ऑडिओ क्लिप प्रकरणाची पूर्ण चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. चोपडे यांनी चौकशी थांबवण्याची केलेली विनंती योग्य नाही. पोलिसांनी आठ दिवसात सखोल चौकशी करावी. अन्यथा, कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नागराज गायकवाड यांनी दिला. यावेळी लक्ष्मण हिवराळे, सतीश गायकवाड, विशाल सोनवणे, दीपक दाभाडे, मनोज भालेराव, अनिल आगळे, बाळासाहेब नरवडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घातक सांडपाण्याने शहरातील भूजल प्रदूषित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने भूजल प्रदूषणाचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचे पाणीसुद्धा दूषित झाल्यामुळे पिण्यायोग्य पाण्यासाठी रहिवाशांची परवड होत आहे. सांडपाणी उघड्यावर सोडणे आणि प्रक्रिया टाळणे भूजल प्रदूषणाच्या हानीचे कारण ठरले आहे.

तब्बल १५ लाख लोकसंख्येच्या औरंगाबाद शहरात पाणी टंचाई भेडसावत आहे. महापालिकेचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून बोअरवेल व विहिरीतून उपलब्ध होणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे निष्कर्ष आहेत. त्यामुळे पाणी टंचाईची झळ जास्त जाणवत आहे. अतिरिक्त सांडपाणी भूजल प्रदूषणाचे प्रमुख कारण ठरले आहे. महापालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने राबवण्यात अपयशी ठरली. बहुतेक सांडपाणी नाल्यांद्वारे भूजलात झिरपत आहे. शहरात जवळपास ४० टक्के नागरिक पाण्याचे नैसर्गिक स्रोत वापरतात. बोअरवेल, तलाव आणि विहिरींचे पाणी उपयुक्त ठरत होते. पण, गुणवत्ता ढासळल्यानंतर पाणी पिण्यायोग्य राहिले नसल्याचे पाहणीत आढळले. आता पाणी फक्त वापरासाठी योग्य असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. दोन वर्षांपूर्वी देवगिरी कॉलेजच्या भूगर्भशास्त्र विभागाने शहरात १३० ठिकाणी पाणी नमुने तपासले होते. नागरिकीकरण व औद्योगिकीकरणामुळे झालेल्या भूजल प्रदूषणाचे संशोधन केले होते. या प्रकल्पात सार्वजनिक ठिकाणचे पाणी, नैसर्गिक स्रोत, नदी-नाल्याकाठच्या भागातील पाणी नमुने तपासले होते. बेगमपुरा, घाटी, छावणी, कांचनवाडी, पाटोदा, बिडकीन, शिवाजीनगर, सूतगिरणी, शहानूरमियाँ दर्गा, रेल्वेस्थानक, समर्थनगर, ज्योतीनगर, सिडको अशा विविध भागात संशोधन केले होते. हा अहवाल महापालिका प्रशासनाला दिल्यानंतरही उपाययोजना झाली नाही. परिणामी, सांडपाण्यामुळे भूजल वेगाने दूषित होत आहे. सांडपाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर आवश्यक ठरला आहे. हा प्रयोग प्रत्यक्षात आल्यास किमान ६० टक्के पाणी पुन्हा वापरता येऊ शकते. सांडपाणी सिमेंट पाइपद्वारे वळवल्यास पाणी मुरण्याची प्रक्रिया रोखता येईल असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. मात्र, भूमिगत गटार योजना राबवूनही शहरातील सर्व सांडपाणी वळवण्यात अपयश आले.

औद्योगिक वसाहती वाढल्यानंतर भूजल साठे दूषित होऊन शेती नापीक झाली. रसायनयुक्त पाण्याचे प्रमाण वाढले असून वाळूज परिसरातील १८ गावांत क्षारयुक्त पाणी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करुनच सोडण्याचा नियम असताना कारखाने सर्रास उल्लंघन करीत असल्याची वस्तुस्थिती आहे. परिणामी, ग्रामीण भागातही दूषित पाण्यामुळे त्वचाविकार आणि हाडांची ठिसूळता या आजारांचे रूग्ण वाढले आहेत. मैलायुक्त सांडपाण्यावर भाजीपाला पिकवला जात आहे. हा भाजीला शहरात सर्रास विकला जात असल्यामुळे आजाराला आमंत्रण मिळाले आहे. भूजल प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्याला अटकाव घालणे काळाची गरज ठरली आहे.

\Bघातक घटक वाढले\B

भूजल दूषित झाल्यामुळे पाण्यातील घातक घटक लक्षणीय वाढले आहेत. हार्डनेस, सल्फेट, क्लोराइड, सॉल्वंट, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पीएच, अल्कलीनिटीची मात्रा तुलनेने वाढली आहे. दूषित पाणी प्यायल्याने नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाला आहे. दूषित सांडपाणी जमिनीत झिरपत असल्याने रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. औद्योगिक वसाहत परिसरात ही भयावह स्थिती आहे.

सांडपाणी बंद पाइपद्वारे प्रक्रिया प्रकल्पापर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. तसेच उद्योगांना रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया बंधनकारक करुन दरमहा ऑडिट करावे. या उपाययोजनातून भूजल प्रदूषण रोखणे शक्य होईल.

डॉ. अशोक तेजनकर, भूगर्भ शास्त्रज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक गट्टू उद्योगाला करोडीमध्ये आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगर

वाळूज एमआयडीसी जवळील करोडी येथे एका प्लास्टिकच्या गोदामाला सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत गोदामातील प्लास्टिक गट्टू व यंत्र सामुग्री जळून खाक झाली. आगीचे कारण कळू शकले नाही.

करोडी शिवारातील गट नंबर ३८ मध्ये अबु फैजल चौधरी यांनी गोदाम भाड्याने घेऊन तेथे फैजल इंटरप्रायजेस नावाने प्लास्टिक गट्टू बनविण्याचा उद्योग चार महिन्यांपूर्वी सुरू केला होता. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता गोदाम बंद करण्यात आले, रात्री साडेआठच्या सुमारास प्लास्टिकच्या साहित्याला अचानक आग लागली. याची माहिती नागरिकांनी चौधरी यांना दिली. त्यांनी तत्काळ गोदामाकडे धाव घेऊन अग्निशमन दलाला कळविले. वाळूज एमआयडीसी अग्निशमन दलाचा एक व औरंगाबाद महानगरपालिकेचा एक, अशा दोन बंबांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले.

वाळूज अग्निशमन विभागाचे प्रमुख के. ए. डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप वासनकर, एस. आर. गायकवाड, सी. डी. साळवे, ए. एम. हातोटे, महापालिका अग्निशमन दलाचे एल. पी. कोल्हे, सुभाष दुधे, दिनेश मुंगसे, शेख इसाक, प्रसाद शिंदे आणि छगन सलामबाद यांनी आग विझविली.

\B१५ लाखांचे नुकसान \B

गोदामातील गट्टू मशीन, १२ टन प्लास्टिकचे गट्टू, इतर साहित्य, यंत्रसामुग्री जळून खाक झाली. यात अंदाजे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले, असे गोदाममालक फैजल चौधरी यांनी सांगितले. घटनेवेळी काम सुरू नसल्याने जीवितहानी झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images