Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले इच्छुकांचे डोळे

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडून भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा उघडपणे प्रचार करणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर या काँग्रेसच्या आमदारांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांची संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागावी, अशी विनंती केली तर, दुसरीकडे भाजप शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजप-शिवसेनेत प्रवेश करू इच्छिणारे आमदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले असले तरी मंत्रिमंडळ विस्ताराला केंद्रीय नेतृत्वाकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतच काँग्रेसविरोधात बंड केले होते. तर विरोधी पक्षनेतेपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा लोकसभेच्या निकालानंतर दिला आहे. त्यामुळे ते आता राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागेल, या प्रतीक्षेत आहे. विखे पाटील हे लवकरच भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असून त्यांना भाजपकडून मंत्रिपदाचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात वर्णी लावण्याबाबत त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली आणि चर्चा केली. त्यांच्यासोबत सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि वडाळा येथील आमदार कालिदास कोळंबकर हे काँग्रेसचे आमदार हजर होते. या दोन आमदारांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

एकीकडे विखे पाटील यांचा भाजप प्रवेश आणि मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असली तरी अद्याप काँग्रेसने त्यांना पक्षातून काढण्याची कारवाई केलेली नाही. याबरोबर राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून तेही मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून येणाऱ्या आमदारांची मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असताना भाजप आणि शिवसेनेचे आमदारही मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागते का, यासाठी प्रयत्नशील आहे.

विस्ताराबाबत संभ्रम

राज्यातील जनता दुष्काळाशी सामना करत असताना, मंत्रिमंडळ विस्तार करायचा की, नाही याबाबत भाजप नेतृत्वाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. तसेच इच्छुकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतील की नाही, याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. तसेच तीन महिन्यांसाठी विस्तार न करण्याचाही निर्णय होवू शकतो, असे भाजपच्या गोटात बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिककर्ज देण्यात बँकांचा हात आखडता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या चार वर्षापासून नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी ही दूर लोटले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार ७६० कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. पिककर्जापोटी त्यातील केवळ १८५ कोटी रुपयांचेच वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात ५२पैकी २५ बँकांना भोपळाही फोडता आलेला नाही. उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांवर कारवाईची घोषणा हवेत विरल्या आहेत.

गेल्यावर्षी कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सहन करावे लागले. राज्यात २८ हजार ५२४ गावांना दुष्काळाचा फटका बसला. त्यातीत सर्वाधिक गावे मराठवाड्यातील आहे. सततच्या नैसर्गिक संकटामुळे आणि गेल्यावर्षीच्या दुष्काळामुळे घेतलेले कर्ज फेडणे शेतकऱ्यांना शक्य नाही. अशा परिस्थितीत नवीन हंगामासाठी पिककर्ज वेळेत मिळावे, यासाठी राज्य शासनाने बँकांना सूचना केल्या होत्या मात्र, सूचनांना बँकांनी केराची टोपली दाखविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात बँकांना एक हजार ७६० कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. खरीप आणि रब्बी हंगामांसाठी हे उद्दिष्ट विभागून देण्यात आले. असे असले तरी, बँकांनी अद्याप केवळ १८५ कोटी रुपयांचेच पिककर्ज दिले आहेत. अनेक प्रकरणे बँकांमध्ये प्रलंबित आहेत. पावसाचे वेध लागले आहेत. मशागत आणि बियाणांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत हवी आहे. त्यात बँकांकडून अडवणूक होत असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराकडे जाण्याची वेळ येणार आहे. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांची तपासणी करून काहींना कर्जाचे पुर्नगठन करून नवीन कर्ज वाटप करण्याबाबत प्रक्रिया केली जाते.

\Bघोषणा बैठकीपुरत्याच\B

मराठवाड्यात खरीप पिकांवर सर्वाधिक शेतकरी अवलंबून असल्याने त्याला यादरम्यान मशागत आणि पेरणीसाठी पैसे हवे असतात. आर्थिक अडचणीत सापडलेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पिककर्ज तातडीने देऊ, असे सांगत, २९ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. त्यावेळी बँक अधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली. पिककर्ज वाटपाचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकावर कारवाईचे स्पष्ट सांगण्यात आले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही औरंगाबादमध्ये बैठकीदरम्यान कर्ज वाटपाची प्रक्रियेबाबत स्पष्ट केले मात्र, सरकारच्या स्तरावरच्या घोषणा बैठकीपुरत्याच राहिल्या आहेत.

\B५२ पैकी २५ बँकांचे कर्जवितरण शून्य\B

जिल्ह्यातील ५२पैकी तब्बल २५ बँकांनी उद्दिष्टापैकी एक टक्काही उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. मागील १५ दिवसात तर खरीप आणि रब्बी अशा दोन्हीसाठी २५ बँकांनी एकाही शेतकऱ्याला कर्ज दिलेले नाही, अशी धक्कादायक बाब आकडेवारीवरून समोर आली आहे. कर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, एसबीआय, बँक ऑफ बरोदा, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा बँकांचा वरचा क्रमांक आहे. त्यापाठोपाठ काही खासगी बँकांनाही कर्ज दिले मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. यावर जिल्हा प्रशासन काय करते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पिककर्जाचे उद्दिष्ट : १७६० कोटी रुपये

आजपर्यंत दिलेले कर्ज : १८५ कोटी रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४२ हजारांची चोरटी दारू; दोघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

४२ हजार ४३२ रुपयांची चोरटी देशी दारूची विक्री केल्याच्या प्रकरणात राहुल पांडुरंग पाटील व भरत मारोती साळवे यांना सोमवारी (१० जून) रात्री अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना बुधवारपर्यंत (१२ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. तारे यांनी दिले.

या प्रकरणी गुन्हे शाखेचे हवालदार बबन नारायण इप्पर यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १० जून रोजी दुपारी फिर्यादी व त्याचे सहकारी परिसरात गस्त घालत असताना त्यांना दोन व्यक्ती रिक्षामधून देशी दारूची चोरटी विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जटवाडा येथे देशी दारुची चोरटी विक्री केल्याच्या प्रकरणात करणारा आरोपी राहुल पांडुरंग पाटील (३०, रा. हुसैन कॉलनी) व आरोपी रिक्षाचालक भरत मारोती साळवे (२३, रा. अंबिकानगर) यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी रिक्षातील दारुचे बॉक्स विक्रम भागाजी साळुंके (रा. विजय नगर, गारखेडा पिरसर) याचे असून त्याने देशी दारू दुकानदार राहुल जैस्वाल (रा. उस्मानपुरा) याच्याकडून दारुची खरेदी केल्याचे कबूल केले. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील भागवत काकडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईचा खून; मुलाचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्तेसाठी मानलेल्या मुलाने व सुनेने आईला आधी छळले आणि नंतर डोक्यात काठी घालून लाथा-बुक्क्यांनी तुडवले. गंभीर जखमी अवस्थेत ६५ वर्षीय आईने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आणि उपचाराअंती तिचा मृत्यू झाला. प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल होऊन आरोपी मुलगा संजय सोपानराव पाटील व आरोपी सून मीरा संजय पाटील यांना अटक करून त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यानंतर दोघांनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, दोघांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी बुधवारी (१२ जून) फेटाळला.

या प्रकरणी मृत सुनंदाबाई सोपानराव पाटील (६५, रा. कामगार चौक, एमआयडीसी वाळूज) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी व तिचे पती सोपानराव पाटील हे सुमारे ३० वर्षांपूर्वी मुंबईत वास्तव्यास होते आणि बांधकामाचे कंत्राट घेत होते. त्यावेळी संजू जाधव हा फिर्यादी व फिर्यादीच्या पतीच्या हाताखाली काम करत होता. पाटील दाम्पत्याला मूलबाळ नव्हते म्हणूनच दाम्पत्याने संजूला मुलगा मानले व त्याचा सांभाळ केला. त्यानंतर पाटील दाम्पत्य औरंगाबादला स्थायिक झाले व येताना त्यांनी संजुलाही सोबत आणले. त्याचा सांभाळ केला, स्वत:चे नाव दिले, लग्नही लावून दिले. दरम्यान, फिर्यादीच्या पतीच्या निधनानंतर मानलेला मुलगा व आरोपी संजय सोपानराव पाटील व त्याची पत्नी मीरा संजय पाटील हे फिर्यादी राहात असलेले घर स्वत:च्या नावावर करुन देण्यासाठी फिर्यादीचा छळ करू लागले. २० एप्रिल २०१९ रोजी सकाळी आठला फिर्यादी पाणी भरत असताना, मीरा हिने मुद्दामहून नळ बंद केला. फिर्यादीने त्याचा जाब विचारला असता, मीराने फिर्यादीच्या डोक्यात काठी मारली. त्यामुळे चक्कर येऊन फिर्यादी खाली कोसळली. फिर्यादीने आरडाओरड सुरू केल्याने दोघांनी फिर्यादीला मारहाण करीत तुडवले. शिविगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकीही दिली. शुद्धीत आल्यावर जखमी अवस्थेत फिर्यादीने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. उपचारादरम्यान २५ एप्रिल रोजी फिर्यादीचा मृत्यू झाला.

\Bडोक्याला मार लागून मृत्यू

\Bशवविच्छेदन अहवालानुसार डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या ३०२, ३२४, ३२३, ५०४, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल होऊन दोन्ही आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर दोघांनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, दोघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी काम पाहिले. अॅड. कुलकर्णी यांना अविनाश कोकाटे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेयसीसाठी दुसऱ्याच महिलेचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रेयसीसाठी दुसऱ्याच महिलेचा खून केल्याच्या प्रकरणात जिचा खून झाल्याचे भासवण्यात आले, ती आरोपी प्रेयसी सोनाली सदाशिव शिंदे व तिचा आरोपी प्रियकर छबादास भावलाल वैष्णव यांच्या पोलिस कोठडीमध्ये शुक्रवारपर्यंत (१४ जून) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. कादरी यांनी बुधवारी (१२ जून) दिले.

या प्रकरणात जिचा खून झाल्याचे भासवण्यात आले त्या आरोपी सोनाली सदाशिव शिंदे हिचा भाऊ अमोल कौतिकराव वाढेकर (२१, रा. तलवाडा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) याने फिर्याद दिली होती. प्रकरणात २४ मे रोजी पिसादेवी पोखरी शिवारात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता व प्राथमिक तपासात मृत महिला ही सोनाली सदाशिव शिंदे (रा. जाधववाडी) असल्याची ओळख तिच्या भावाने पटविली होती. या मृत महिलेच्या पायात चेन, जोड, अंगठ्या, बांगड्या आढळल्या होत्या व घटनास्थळी सुसाइड नोटही आढळली होती. त्यावरून ती मृत महिला सोनाली असल्याचे तिच्या भावाने म्हटले होते व तिचा भाऊ अमोल याच्या तक्रारीवरुन चिकलठाणा पोलिसांनी तिचा पती सदाशिव सिंदे याला अटक केली होती. मात्र, सोनाली शिंदे हिचे आरोपी छबादास भावलाल वैष्णव (२५, रा. बोघेगाव, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले. तसेच घटना घडल्यापासून छबादास बेपत्ता होता. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे छबादासला अटक केली असता, त्याच्यासोबत एक महिला होती व तिच खरी सोनाली असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, सोनाली हिच्यासाठीच छबादास याने २४ मे रोजी एका दुसऱ्याच महिला भुलवून नेऊन तिचा पिसादेवी पोखरी शिवारात खून केला आणि जिचा खून केला ती सोनाली असल्याचे भासवण्यात आले. त्यासाठी सोनाली हिची चप्पल, चेन, जोड, अंगठ्या मृत महिलेच्या बोटात घालण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले. तर, या प्रकरणात रुक्मणबाई सर्जेराव माळी (५०, रा. सैदा कॉलनी, हर्सूल तलानाजवळ) हिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर छबादास याला पाच जून रोजी, तर सोनाली हिला सहा जून रोजी अटक करून त्यांना न्यालायालयात हजर करण्यात आले असता, दोघांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

\Bखुनामागचा हेतू काय?

\Bपोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, मृत महिलेचा खून करण्यामागचा नेमका कोणता उद्देश होता, महिलेला जाळून मारण्यासाठी व पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी कोणते ज्वलनशील द्रव्य वापरले, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का आदी बाबींचा तपास करून आरोपींचा मोबाईल व वाहन जप्त करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सय्यद दुर्राणी यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपींच्या पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक मतीनचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत शिपाईची नोकरी लावून देतो म्हणत महिलेवर अत्याचार करून तिच्यासह तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देणारा आरोपी नगरसेवक सय्यद मतीन याने दुसऱ्यांदा दाखल केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी बुधवारी (१२ जून) फेटाळला. आरोपी मतीनला १९ एप्रिल रोजी रात्री अटक करण्यात आली होती आणि न्यायालयाने त्याची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत केली होती. त्यानंतर मतीनने नियमित जामिनासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर मतीनने नियमित जामिनासाठी पुन्हा अर्ज दाखल केला होता.

या प्रकरणी ३० वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. तिच्या तक्रारीनुसार, पीडितेच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर २०१५मध्ये ती परभणीहून औरंगाबादला राहण्यासाठी आली होती. संबंधित महिलेला नोकरीची आवश्यकता असल्याने महिलेला तिच्या परिचयाच्या दोन व्यक्तींनी, आरोपी सय्यद मतीन सय्यद रशिद (३३, रा. असेफिया कॉलनी, टाऊन हॉल) याला भेट, तो तुला नोकरी लावून देईल, असे सांगितले होते. त्यानुसार ती महिला एप्रिल २०१८मध्ये मतीन याला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात गेली होती. त्यानंतर महिलेला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. प्रकरणात महिलेच्या तक्रारीनंतर सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने दुसऱ्यांदा दाखल केलेल्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी झाली असता, आरोपी हा राजकारणाशी संबंधित असून तो पीडितेवर दबाव आणू शकतो. त्यामुळे आरोपीचा जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीतील कचरा वर्गीकरण न केल्यास पालिकेचा दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी रुग्णालयातील वॉर्डांत ओला-सुका कचरा एकत्र केल्यास महापालिकेकडून दंड आकारला जाणार असून, येत्या आठ दिवसांनी त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना वर्गीकरणासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे घाटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी २७ मे रोजी घाटीत पाहणी केली होती. त्यावेळी घाटीत वैद्यकीय घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनासंदर्भात अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर घाटी प्रशासनाने प्रत्येक वॉर्डामध्ये पाहणी करून कचऱ्याच्या वर्गीकरणात होणाऱ्या चुका कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणे सुरू केले. त्यासाठी पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही मदत घेण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चप्पलच्या दुकानाला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चप्पलच्या दुकानाला लागलेल्या आगीमध्ये लाखो रुपयाचे सामान जळाले. सिटीचौक भागात बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. येथील झवेरी बाजारच्या बाजूला असलेल्या प्रिन्स फुटवेअरला आग लागली. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सिटीचौक पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. एका तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला सुरक्षेसंदर्भात पोलिसांना निवेदन

$
0
0

औरंगाबाद : राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ होत आहे. नागपूर येथे चार वर्षांच्या मुलीवर शाळेतील चौकीदाराने लैंगिक अत्याचार केले; तसेच गुहागर येथे सहा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्यात यावी, महिला मुली यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांची भेट घेत केली. यावेळी शिष्टमंडळात जिल्हाध्यक्षा छाया जंगले पाटील, मेहराज पटेल, प्रतिभा वैद्य, वीणा खरे, मंजुषा पवार, शोभा गायकवाड, शकीला खान आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांसाठी एक लाखाची मदत

$
0
0

औरंगाबाद : राज्यात सध्या दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली आहे. दुष्काळ निवारणसाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाने देखील पुढाकार घेतला आहे. भाजयुमोचे प्रदेश सचिव राजेंद्र साबळे यांनी दुष्काळ निवारणासाठी एक लाखाची मदत केली आहे. मंगळवारी एक लाख रुपयांचा धनादेश साबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या प्रेरणेतून साबळे यांनी हा उपक्रम राबवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांची यादी त्यांची असली तरी निर्णय आमचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'रस्त्यांची यादी त्यांची असली तरी यादी बद्दलचा निर्णय आमचा असेल,' असे म्हणत महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना इशाराच दिला आहे. 'आम्ही आमचे अधिकार वापरू,' अशी भूमिका त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्त्यांकरिता १२५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर महापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ७९ रस्त्यांची यादी तयार केली. ती प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेसाठी आयुक्तांकडे पाठवण्यात आली. मात्र, आयुक्तांनी यादीला मान्यता देण्यासाठी सुमारे दीड महिना घेतला. या काळात त्यांनी शहरातील प्रत्येक रस्त्याची पाहणी केली. गुणनुक्रमानुसार त्याची विभागणी केली आणि ५७ रस्त्यांची यादी तयार केली. ५७ रस्त्यांची कामे करण्यासाठी २१२ कोटी रुपये लागतील, असे त्यांनी नमूद केले आहे. ही यादी आज गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे. रस्त्यांची यादी सर्वसाधारण सभेच्या मूळ विषयपत्रिकेला जोडण्यात आली आहे.

\Bसभेत सादरीकरण \B

पत्रकारांशी बोलताना महापौर म्हणाले, सर्वसाधारण सभेत रस्त्यांच्या यादीबद्दल सादरीकरण करण्याची परवानगी आयुक्तांनी मागितली असून त्यांना परवानगी दिली आहे. सादरीकरणानंतर त्यावरील चर्चेनंतर यादी अंतिम केली जाईल. पण, यादी त्यांनी केली असली तरी अंतिम निर्णय आमचाच राहणार आहे. यादी अंतिम करताना आम्ही आमचे अधिकार वापरणार आहोत. महापौरांच्या या विधानामुळे महापौर आणि पदाधिकाऱ्यांत वादाची ठिणगी पडल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव ७५० ‘एमएलडी’चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल ७५० एमएलडी पाणी मिळावे, असे औरंगाबाद शहराच्या एकत्रित पाणीपुरवठा प्रस्तावात म्हटले आहे. सध्या शहराला १५० ते १५५ एमएलडी पाणी मिळते. प्रस्तावानुसार, सध्या मिळणाऱ्या पाण्यांत ६०० एमएलडी जास्त पाणी मिळावा, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावात सिडको वाळूज महानगरसह सातारा-देवळाई, झालरपट्ट्यातील काही गावांचा समावेश करण्यात आला आहे.

समांतर जलवाहिनीचा 'पीपीपी'तत्वावरील करार रद्द झाल्यानंतर महापालिकेने औरंगाबाद शहर व सातारा-देवळाईसाठी स्वतंत्र पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण शहराचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापालिका प्रशासना दिले. त्यामुळे यश इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स या संस्थेमार्फत एकत्रित पाणीपुरवठा योजनेचा 'डीपीआर' तयार करण्यात येत आहे. सध्या 'डीपीआर'चे काम जवळपास पूर्ण झाले आहे. दरम्यान, यश इनोव्हेटिव्ह सोल्युशन्सला नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 'पीएमसी' म्हणून नियुक्त करण्याच्या निर्णयाला कार्योत्तर मान्यता देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठेवला आहे. या प्रस्तावाच्या मसुद्यात ठळक मुद्दे देण्यात आले आहेत. त्यानुसार, नवीन पाणीपुरवठा योजना ७५० एमएलडीची आहे. नवीन पाणीपुरवठा योजना तयार करताना केवळ औरंगाबाद शहराचा विचार केलेला नाही. औरंगाबादसह सिडको-हडको, सातारा, देवळाई, सिडको वाळूज महानगर, झालरपट्ट्यातील महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गावांचा विचार 'डीपीआर' करताना तयार करण्यात आला आहे.

\Bपुढील ३० वर्षांचा विचार \B

गुंठेवारी भागात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात नाही. 'नो नेटवर्क एरिया' सुद्धा टँकरनेच पाणीपुरवठा केला जातो. गुंठेवारीसह 'नो नेटवर्क एरिया'मध्ये जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा करण्याचा उल्लेख 'डीपीआर'मध्ये करण्यात आला आहे. 'डीपीआर' तयार करताना पुढील ३० वर्षांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजना ७५० एमएलडीची असेल, असे नमूद केले आहे.

\B१५०० कोटी रुपये

नवीन पाणीपुरवठा योजनेचा खर्च

०.९६ टक्के रक्कम

'पीएमसी'ला देण्याचा प्रस्ताव \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक होर्डिंगबद्दल पालिकेची बोटचेपी भूमिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोराच्या पावसामुळे शहराच्या विविध भागात लावलेले अनेक होर्डिंग धोकादायक बनले आहेत. त्यापैकी एखादे होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते. मात्र, धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्याची भूमिका महापालिकेचे अधिकारी घेत आहेत.

होर्डिंग पडून काही व्यक्ती मरण पावल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी पुण्यात घडली होती. मुंबईत बुधवारी दुपारी धोकादायक होर्डिंग पडले. त्यामुळे शहरातील होर्डिंगची स्थिती व पालिका त्यावर काय कारवाई करणार याची माहिती घेतली असता पालिका प्रशासन सतर्क नसल्याचे स्पष्ट झाले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मालमत्ता विभागाच्या कर्मचाऱ्याला होर्डिंगची माहिती घेण्यासाठी बोलावले. मात्र, त्याच्याकडे काहीच माहिती नव्हती. धोकादायक होर्डिंग किती, किती होर्डिंगसाठी नोटीस बजावली, नोटीस बजावलेल्यांपैकी किती जणांनी खुलासे केले आदी प्रश्न त्या कर्मचाऱ्याला विचारण्यात आले. पण त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. शहरात ३५ एजन्सींच्या माध्यमातून ४७४ होर्डिंग लावण्यात आले आहेत. प्रत्येक होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. सुमारे दोनशे जणांचे ऑडिट रिपोर्ट प्राप्त झाले असून प्राप्त ऑडिट रिपोर्टनुसार होर्डिंगचे बांधकाम चांगले असल्याचे स्पष्ट होते (स्टेबलिटी सर्टिफिकेट), असे मत त्या कर्मचाऱ्याने व्यक्त केले. ऑडिट रिपोर्ट न दिलेल्यांबद्दलच्या काय भूमिका आहे, अशी विचारणा केली असता तो कर्मचारी निरुत्तर झाला. ऑडिट रिपोर्ट न देणाऱ्यांना पुन्हा नोटीस द्या, त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही, तर होर्डिंगचे परवाने रद्द करा, अशी सूचना महापौरांनी त्या कर्मचाऱ्याला केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद - उदयपूर विमानसेवा २१ वर्षांनंतर सुरू होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उदयपूर, जयपूरमार्गे औरंगाबाद ते दिल्ली ही एअर इंडियाची विमानसेवा २१ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू होणार आहे. त्यासाठी औरंगाबादेतील टूर ऑपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांच्या प्रयत्नांना यश आले आहे. एअर इंडियाने औरंगाबाद - उदयपूर सेवा दिवाळीपासून सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

मराठवाड्याची राजधानी, पर्यटन राजधानी, उद्योग क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळविलेल्या औरंगाबादचे विमानसेवा जाळे कमकुवत होते. देशांतर्गत पर्यटन, उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी विमानांची संख्या वाढविण्याच्या मागणीसाठी टूर ऑपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांचे एक शिष्टमंडळ सध्या दिल्लीत गेले आहे. पहिल्या दिवशी या शिष्टमंडळाची बैठक स्पाइस जेट, इंडिगो एअरलाइन्सच्या व्यवस्थापकीय समितीसोबत झाली. दुसऱ्या दिवशी एअर इंडियाचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आश्विनी लोहानी, कार्यकारी संचालक मीनाक्षी मलिक यांच्यासोबत बैठक झाली. येत्या दिवाळीपूर्वी औरंगाबाद-मुंबई-उदयपूर विमानसेवा सुरू करणार असल्याचे एअर इंडियातर्फे सांगण्यात आले.

दोन दशकांपूर्वी औरंगाबाद हे राजस्थानशी विमानसेवेने जोडलेले होते मात्र, सुमारे २० वर्षांपूर्वी ही विमानसेवा बंद पडली. तेव्हापासून आजपर्यंत ही विमानसेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि पर्यनटकांकडून होत होती. औरंगाबादच्या शिष्टमंडळाने मागणी केल्यानंतर एअर इंडियाकडून ही विमानसेवा दिवाळीपूर्वी सुरू करण्यासाठी आश्वासन मिळाले. शिष्टमंडळामध्ये हॉटेल उद्योजक सुनित कोठारी, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंतसिंह राजपूत, 'सीएमआयए'चे अध्यक्ष राम भोगले, सचिव नितीन गुप्ता, इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटरचे अध्यक्ष प्रणब सरकार आणि इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटरचे उपाध्यक्ष राजीव मेहरा यांचा समावेश होता.

एअर इंडियाच्या आश्विनी लोहानी यांनी सांगितले, की औरंगाबाद ऐतिहासिक शहर असून, याठिकाणी नव्या विमानसेवा सुरू करण्यास इच्छुक आहोत. आजघडीला औरंगाबादमध्ये उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घडामोडी होत आहेत. त्यामुळे औरंगाबाद राजस्थानशी जोडणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी ही विमानसेवा सुरू होती. आता दिवाळीच्या आसपास पर्यटनाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी ही विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे. त्याचा औरंगाबादेतील उद्योग, व्यवसाय आणि पर्यटनवाढीसाठी निश्चितच फायदा होईल.

\B'डिस्कव्हर इंडिया फेअर'चे पुनरुज्जीवन\B

परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रवासात सूट मिळत असलेली 'डिस्कव्हर इंडिया फेअर' ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी ही योजना नक्कीच फायद्याची ठरू शकेल. १५ ते २१ दिवसांसाठी ही योजना सुरू करण्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन एअर इंडियाने दिले. औरंगाबादचा समावेश बुद्धिस्ट सर्किटमध्ये करण्यात यावा, अशीही आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-भाजपविरोधात सर्व पक्षांची एकजूट व्हावी: राजू शेट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद



माजी खासदार शेट्टी हे मंगळवारी विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा दौऱ्यानंतर औरंगाबादमध्ये आले होते. त्यानिमित्त घेतलेल्या कार्यकर्त्यांची बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण असताना पुन्हा भाजपचे सरकार बहुमतांनी आल्याचे आश्चर्य वाटते. हा खेळ 'इव्हीएमचा'च असावा, अशी शंका येते. शेतकरी आमच्या सोबत असून त्यांनी योग्य ठिकाणीच मते दिली आहेत, मग त्यांची मते कोठे गेली याचा शोध घ्यावा लागणार आहे. ३७० मतदारसंघातील मतमोजणीत तफावत कशी आली याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सदाभाऊ खोत यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले. 'कुंभाराला काय माहिती हे मडके कच्चे निघणार म्हणून; दोष कुंभाराचा नाही, तर दोष त्या मातीचा आहे. मध्यंतरीचे एक-दीड वर्ष सोडल्यास मी सतत सरकारच्या विरोधातच काम केले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा पश्चाताप नाही, उलट आता जोमाने काम करणार आहे, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला.

दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. मराठवाड्याला दुष्काळाची मोठी झळ बसूनही सरकार गंभीर नाही. सरकारने ३१ ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर केला पण उपाययोजना करण्यात कमी पडले, अशी टीका शेट्टी यांनी केली. सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या नावे बँकेत पैसे जमा झाले नाहीत, असा आरोप त्यांनी केला. पत्रकार परिषदेला माणिक कदम, कृष्णा साबळे, प्रताप पोकळे आदी उपस्थित होते.

शेतकरी, सरकारला अधिकाऱ्यांनी फसवले

पंतप्रधान वीमा योजना म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टाच होती. २०१६-१७ या वर्षी विम्यापोटी शासनाने १७ हजार ४८२ कोटी रुपये जमा केले, मात्र शेतकऱ्यांना फक्त ४२०९ कोटी रुपयेच मिळाले. २०१७-१८ यावर्षी २० हजार ७०८ कोटी रुपये शासनाने विम्यासाठी भरले, त्यापैकी ४२९१ कोटी रुपयेच शेतकऱ्यांना मिळाले. विमा कंपन्यांनी दोन वर्षांत १९ हजार ४०९ कोटींचा नफा कमावल्याचा दावा शेट्टी यांनी केला. पीक विमा कंपन्यांनी बदमाशी केली असून त्यांना कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदत करून शेतकरी व सरकारला फसवल्याचा आरोप त्यांनी केला.

..तर, मुख्यमंत्र्यांच्या घरावर धडक

मराठवाड्यात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जळालेल्या फळबागांचे आठ दिवसात सर्वेक्षण करून पंचनामा करावा अन्यथा आठ दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांच्या घरावर शेतकऱ्यांसह धडक देऊ, असा इशारा त्यांनी दिला. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत मिळावेत, खरीप पिकाचे कर्ज एक महिन्यात शेतकऱ्यांना वितरित करावे, या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयास शेतकऱ्यांसह बेमुदत घेराव घालण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेची आता पर्यावरणपूरक अंत्यविधी योजना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका प्रशासनामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यसंस्कार योजना फसल्यानंतर आता पर्यावरणपूरक अंत्यविधी योजना राबवण्याचा विचार पालिका प्रशासन व पदाधिकारी करीत आहेत. ही योजना प्रायोगिकतत्वावर शहरातील सहा स्मशानभूमींमध्ये सुरू केली जाणार आहे.

वसुधा वुडलेस क्रिमेशन फाउंडेशनने पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची योजना महापालिकेला सादर केली आहे. त्यानुसार पुष्पनगरी, कैलासनगर, प्रतापनगर, बनेवाडी, सिडको एन ६ या स्मशानभूमीमध्ये प्रायोगिकतत्वावर पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे. तत्कालीन उपमहापौर संजय जोशी यांनी पुढाकार घेऊन आखलेली बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यसंस्कार योजना एक वर्ष चालली. त्यानंतर निधीचा मुद्दा निर्माण होऊन ती बंद पडली. पालिकेत शिवसेनेचा महापौर असताना शिवसेनाप्रमुखांच्या नावाची योजना सुरू होऊ शकली नाही. त्यानंतर २०१८ मध्ये विश्व हिंदू परिषदेने अंत्यविधी योजनेसाठी आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव महापालिकेसमोर ठेवला होता, पण त्यावर निर्णय झाला नाही. बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यविधी योजना पुन्हा सुरू करण्याबद्दल आयुक्तांशी चर्चा झाली आहे, येत्या दोन दिवसांत त्याबद्दल निर्णय होईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजची सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेची आज गुरुवारी सर्वसाधारण सभा होत आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे दोन महिन्यांत केवळ औपचारिकता म्हणून सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. आचारसंहितेनंतर प्रथमच सर्वसाधारण सभा होत असल्यामुळे या सभेत विकास कामांवरून गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वॉर्डांमधील विकास कामे ठप्प झाल्याच्या अनेक नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. मे महिन्यात झालेल्या औपचारिक सर्वसाधारण सभेनंतर काही नगरसेवकांनी आयुक्तांना त्यांच्या दालनात जावून ठप्प झालेल्या कामांबद्दल जाब विचारला होता. वॉर्डांमधून कामे करणाऱ्या कंत्राटदारांची सुमारे ३०० कोटी रुपयांची बिले थकलेली आहेत. केलेल्या कामाचे बिल मिळत नसल्यामुळे कंत्राटदारांनी काम बंद केले आहे. वॉर्डातील कामे मार्गी लागली नाहीत, तर ठिय्या आंदोलन करण्याचा व राजीनामा देण्याचा इशारा काही नगरसेवकांनी दिला होता. त्यावर काही नगरसेवक अजूनही ठाम आहेत. त्याचे पडसाद गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता आहे. वॉर्डांमध्ये विकास कामे होणार नसतील, तर आम्ही नागरिकांना काय उत्तर द्यायचे, असा सवाल नगरसेवक करत आहेत.

\Bपाणीप्रश्न पेटणार \B

विकास कामांसोबतच पाणीप्रश्नामुळेही नगरसेवक त्रस्त आहेत. समान पाणी वाटपाचे धोरण निश्चत करून त्यानुसार पाणीपुरवठा करण्यात पालिका प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे पाण्यासाठी वारंवार आंदोलन होत आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दोन दिवसांपासून पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी, पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या संदर्भातही नगरसेवक सर्वसाधारण सभेत प्रशासनाला जाब विचारण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सम्राटनगरात हायमस्टचे लोकार्पण

$
0
0

औरंगाबाद : क्रांतीचौक वॉर्डातील सम्राटनगरच्या खुल्या जागेवर बसवण्यात आलेल्या हायमस्टचे लोकार्पण ज्येष्ठ नागरिक अशोर ग्रोवर यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांच्या प्रयत्नातून हायमस्ट बसवण्यात आला आहे. लोकार्पणाच्या वेळी उदय जैस्वाल, सागर वाडकर, गणेश पिंपरीकर, राज जैस्वाल, प्रसाद वायचळ, रवी पाटील, कौस्तुभ नाईक, सुधीर आलोने, विशाल गिरी, रवींद्र खांबेकर, सुनील जाधव, सोहम मक्तेदार, माधुरी बढे, सुरेखा शिंदे, अंजली जाधव, जयश्री मोहीर, प्रफुल्लता गुजराथी, अरुणा बल्लारी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वमग्न मुलांशी हावभावातून साधा अधिकाधिक संवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वमग्न मुलांशी शब्दांतून संवाद साधण्यापेक्षा हावभावातून तसेच हातवारे-इशाऱ्यातून अधिकाधिक संवाद साधा. त्यांना विचार करायला भाग पाडा आणि स्वमग्न मुलांना अधिकाधिक सामावून घ्या. यामुळेच ते अधिकाधिक प्रवाहात येतील, असे आवाहन मुंबई येथील दिव्यम ऑटिझम सेंटरच्या संचालिका डॉ. धनश्री पवार यांनी बुधवारी (१२ जून) आयोजित कार्यक्रमात केले.

'एमजीएम'च्या श्रीमती रुक्मिणीदेवी ऑटिझम फाउंडेशनच्या वतीने तसेच एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा बालरोग व मानसोपचार विभाग आणि पंख फाउंडेशनच्या वतीने 'स्वमग्न (ऑटिस्टिक) मुलांचा स्वभाव व त्यांचे संगोपन' या विषयावर एमजीएम परिसरातील आईन्स्टाईन सभागृहात विशेष व्याख्यान झाले. या वेळी त्या बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, तर एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. शिकणे ही सहजसुलभ प्रक्रिया स्वमग्न मुलांमध्ये बरीच गुंतागुंतीची असते. त्यातही दोन्ही बाजुंनी संवाद साधणे हे स्वमग्न मुलांसाठी आव्हानात्मक असते. त्यामुळेच स्वमग्न मुलांशी शब्दांतून संवाद साधण्यापेक्षा त्यांच्याशी हावभावातून तसेच हातवारे-इशाऱ्यांमधून अधिकाधिक संवाद साधण्याचा प्रयत्न करा. त्यातूनच स्वमग्न मुलांशी संवाद साधणे जास्त सोपे होऊ शकेल. त्यांना कमीत कमी बोलून अधिकाधिक विचार करायला भाग पाडा. त्यामुळे त्यांची अपेक्षित कृतीही वाढेल. याच पद्धतीने त्यांना सामावून घेतले पाहिजे, असेही डॉ. पवार म्हणाल्या. या वेळी डॉ. पवार यांनी स्वमग्न मुलांना सामान्य प्रवाहात आणण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण तंत्रांची माहितीही पालकांना दिली. श्रीमती रुक्मिणीदेवी ऑटिझम फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. रश्मी जायभाये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. सुवर्णा मगर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर शुभांगी हिस्वणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हृदयरोग मुक्त चिमुकल्याच्या कुटुंबातून घाटीला उपकरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा - चौधरी कॉलनीतील हर्षद शशिकांत बोरुडे या चिमुकल्याला जन्मतः हृदयरोगाने ग्रासले होते. गेल्या वर्षी त्याच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया होऊन तो हृदयरोग मुक्त झाला व त्याने चौथ्या वर्षात पदार्पण केल्याने नव्या जन्मातील पहिला वाढदिवस त्याच्या कुटुंबियांनी घाटीच्या बालरोग विभागाला तीन ओटू मिटर देत साजरा केला.

हर्षदच्या हस्ते घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. तृप्ती जोशी, डॉ. अमोल सूर्यवंशी यांच्याकडे ही तिन्ही उपकरणे बुधवारी (१२ जून) सुपूर्द करण्यात आली. अधिष्ठाता कार्यालयात बुधवारी छोटेखानी कार्यक्रम पार पडला. या वेळी, 'हर्षदचे जन्मानंतरचे पहिले उपचार घाटीत झाले होते. त्यानंतर एमजीएममध्ये त्याच्यावर हृदयरोग शस्त्रक्रिया झाली होती. घाटी रुग्णालयातून मिळालेल्या सहकार्याच्या ऋणात आम्ही होते. त्या ऋणातून मुक्त होता येणार नाही. मात्र, छोटीशी मदत म्हणून दहा हजार रुपयांचे तीन ओटू मिटर भेट देत आहे' अशी भावना त्याचे वडील शशिकांत बोरुडे यांनी बोलून दाखवली. या प्रसंगी सिस्टर इनचार्ज स्वरुपा खेत्रे, जेसर पाखरे, श्रीकांत बोरुडे, सीमा बोरुडे, मंजुषा बोरुडे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images